Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एफआरपीवरून संघर्ष पेटणार

$
0
0

स्वाभिमानी संघटनेची १५ एप्रिलपर्यंत डेडलाइन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे १५ एप्रिलपर्यंत ८०:२० फॉर्म्युलानुसार दुसऱ्या टप्प्यातील एफआरपी साखर कारखानदारांनी न दिल्यास सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर जप्त करावी, साखर जप्त करण्याचे आदेश देण्यात निष्क्रीयता दाखवल्यास संघटना काय करायचे ते ठरवेल. तरीही कारखानदारांनी एफआरपी न दिल्यास एक मे रोजी सहकारमंत्र्यांना ध्वजारोहण करु न देता जिल्ह्यात फिरणे मुश्कील करु,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात देण्यात आला. कारखानदार आणि संघटनेने घेतलेल्या भूमिकेमुळे एफआरपीच्या मुद्यावरुन पुन्हा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

एक एप्रिल रोजी गळीत हंगाम संपलेल्या साखर कारखान्यांनी राज्य ऊसदर नियंत्रण समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उर्वरीत २० टक्के देण्याचे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर शनिवारी झालेल्या जिल्हा बँकेतील साखर कारखान्याच्या बैठकीत मे महिन्यापासून उर्वरीत एफआरपी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र रविवारी (ता.३) झालेल्या संघटनेच्या मेळाव्यात

कारखानदारांनी उर्वरीत एफआरपी न दिल्यास सहकार मंत्र्यांनाच गर्भित इशारा दिला आहे. केवळ ८०: २० फॉर्म्युलानुसार संघटना दर घेवून गप्प बसणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

हंगामाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये साखर दर कमी झाल्याने ८०:२० टक्क्याचा व्यवहार्य फॉर्म्युला स्वीकारला होता. याच बैठकीत साखर दर प्रतिक्विंटल तीन हजार रुपयांच्यावर गेल्यास व्याजही घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सध्या ३५०० ते ३७०० रुपयांपर्यंत साखरेचा दर गेल्याने व्याजाची रक्कमही सोडणार नसल्याचे ठणाकवून सांगण्यात आले आहे. यासाठी प्रसंगी विराट संख्येने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला असल्याने दुसऱ्या हप्त्यातील एफआरपीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना व कारखानदारांमध्ये तीव्र संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांचे हिणकस राजकारण

$
0
0

हसन मुश्रीफ यांची कडवट टीका

म. टा. वृत्तसेवा, कागल

'विधानपरिषदेच्या निवडणुकीत गडहिंग्लजच्या सत्ताधारी गटाने मदत केली म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाच कोटीचा निधी मंजूर करुन वितरित केला. त्यानंतर 'गोडसाखर' कारखान्यामध्ये श्रीपतराव शिंदे आणि आमची युती होवून विजय झाला म्हणून पाटील यांनी हे पाच कोटी परत घेण्याचे हिणकस राजकारण केले. सिनेमातल्या खलनायकासारखे पालकमंत्री पाटील यांनी राजकीय द्वेषातून कागललाही वगळले आहे. जर आतापर्यंतच्या पालकमंत्र्यांवर पुस्तक लिहायला घेतल्यास सर्वात वाईट पालकमंत्री असाच उल्लेख चंद्रकांत पाटील यांचा होईल,' अशी खरमरीत टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली.

गडहिंग्लज नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत गडहिंग्लज नगरपालिकेला मंजूर झालेला पाच कोटी रुपयांचा निधी सरकारने परत घेण्यात आला आहे, त्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

कागल नगरपरिषदेच्या वतीने शहरातील १२२ अपंगाना प्रयेकी चार हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान तीन टक्के राखीव निधीतून देण्यात आले. यावेळी धनादेश वितरण कार्य्रमात आमदार हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कागलच्या नगराध्यक्षा संगीता गाडेकर होत्या.

आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, 'पालकमंत्री हे पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे गोरगरीब जनतेचा आणि त्यांचा संबंधच आलेला नाही. परिणामी राजकीय अपयशातून निराश होत ते चुकीचे निर्णय घेत आहेत. माझ्याबरोबर तर गतजन्मीचे वैर असल्यासारखे वागत आहेत आणि सूडाचे डाव खेळत आहेत. ज्यामुळे माझ्यासोबत असणाऱ्या लोकांना आणि सामान्य जनतेला पालकमंत्र्यांच्या या डावपेचात बळी पडावे लागत आहे, असे असूनही या सर्वसामान्य गरीब जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने पालकमंत्री माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी...

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'दिलेला पाच कोटीचा निधी परत घेतला जाऊ शकतो का? याबद्दल न्यायालयातही जाण्याचा आमचा विचार आहे.'ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी' याप्रमाणे आम्ही पालकमंत्र्याना यापुढे उत्तर देवू. जिल्ह्यात यामुळेच भाजपला यश मिळू शकले नाही हे मुख्यामंत्र्यांना भेटूनही निदर्शनास आणून देऊ.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरवर आज आरोपनिश्चिती ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याच्यावर सोमवारी (ता. ४) जिल्हा सत्र न्यायालयात होणाऱ्या सुनावणीत आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे, तर तपास अधिकारीही आपला अहवाल न्यायालयाला सादर करणार आहेत. मागील सुनावणीदरम्यान पानसरे कुटुंबियांचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात झालेल्या खडाजंगीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॉम्रेड पानसरे यांच्या खुनाचा तपास अद्याप अपूर्ण असल्याने संशयित आरोपी समीर गायकवाडवर आरोप निश्चित करण्याची घाई करू नये अशी भूमिका पानसरे कुटुंबियांनी जिल्हा सत्र न्यायाधीश बिले यांच्यासमोर मांडली होती. याबाबत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यापासून तपासात झालेल्या प्रगतीचा अहवाल उच्च न्यायालयाला मागील सुनावणीवेळी सादर केला जाणार होता, मात्र न्यायाधीश बदलल्याने सुनावणी होऊ शकली नव्हती.

जिल्हा सत्र न्यायाधीश बिले यांनीही अहवाल सादर करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना दिल्या होत्या, मात्र मागील सुनावणीला तपास अधिकारी उपस्थित न राहिल्याने हा अहवाल सादर होऊ शकला नव्हता. तपास अधिकारी उपस्थित न राहिल्याने न्यायलयाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्याचबरोबर

सोमवारच्या सुनावणीसाठी संशयित समीर गायकवाडला न्यायालयात हजर करण्याचेही आदेश दिले होते. या आदेशानुसार सोमवारच्या सुनावणीदरम्यान समीर गायकवाड याला न्यायालयात हजर केले जाऊ शकते.

सोमवारी होणाऱ्या सुनावणीदरम्यान समीरवर आरोप निश्चिती होण्याची शक्यता असली तरी, पानसरे कुटुंबियांकडून विरोध सुरू असल्याने ते कोर्टासमोर काय भूमिका मांडतात हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. मागील सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आरोपींचे वकील यांच्यामध्ये न्यायाधीशांसमोरच वाद झाला होता, त्यामुळे सोमवारी होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, समीर गायकवाडने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केल्याचे सुत्रांकडून समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेवाडी, मोरेवाडी, विंझणेत पाणीटंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

अडकूर परिसरातील सत्तेवाडी, मोरेवाडी, विंझणे ही गावे गेली दोन महिन्यापासून तहानलेली आहेत. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांसह लहान मुलांना पायपीट करावी लागत आहे. प्रशासकीय पातळीवर याची दखल घेतली न गेल्याने नागरिकांची पायपीट थांबलेली नाही.

पाण्याच्या एका घागरीसाठी येथील नागरिकांना रात्रंदिवस धडपडावे लागत आहे. पाणी टंचाईचा प्रश्न भंगीर होत असल्याने प्रशासकीय पातळीवर नेहमीच दुर्लक्ष होत आल्याने हा प्रश्न गंभीर होत आहे. डोंगरांमध्ये वसलेली विंझणे, मोरेवाडी व सत्तेवाडी या गावच्या ग्रामस्थांना दरवर्षी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा फटका जनावरांनाही बसत आहे. पाणीच मिळत नसल्याने दूध उत्पादकांनी आपली जनावरे कवडीमोल दराने विकली आहेत. त्यामुळे दूध संस्थांच्या संकलनावरही याचा परिणाम झाला असून सहकारी संस्था तोट्यात येत आहेत. घटप्रभा नदीत मुबलक प्रमाणात पाणी आहे. या परिसरात ऊस, मका आदी पिके घेतली जातात. तर पाण्याच्या स्कीमसाठी जॅकवेल बांधलेले आहेत. मात्र अद्यापही ती अनेक कारणांनी बंद स्थितीत असल्याने उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. या योजना लवकर सुरू करून ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीनिर्णय घेण्यासाठी एकनाथ खडसे आज सांगलीत येणार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मिरज
मिरजेतून लातूरला रेल्वेने पिण्याचे पाणी पुरविण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. या बाबत सोमवारी सायंकाळी जिल्हा प्रशासन आणि मिरज रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आहे. आज (मंगळवार) महसूल मंत्री एकनाथ खडसे या बाबतचा अंतिम निणर्य घेण्यासाठी सांगलीत येत आहे. ते जिल्हाधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून अतिंम निर्णय घेतील, अशी माहिती मिरजेतील भाजपचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे यांनी 'मटा'ला दिली.
नाशिक येथे मागील दोन दिवस सुरू असलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मकरंद देशपांडे यांनी मिरजेतून रेल्वेने पाणी लातूरला देणे शक्य आहे. त्याबाबत विचार करण्याची विनंती मुख्यमंत्र्‍यांना केली होती. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानंतर मिरज रेल्वे प्रबंधक यांच्या कार्यालयात मिरजेचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर, तहसीलदार किशोर घाडगे, नायब तहसीलदार शेखर परब, स्टेशन अधीक्षक व्ही. एस. रमेश यांच्यासह रेल्वेचे अधिकारी आणि भाजप नेते मकरंद देशपांडे यांची बैठक झाली.
बैठकीत मिरज स्थानकावरून किमान ३०-४० बोगींची विशेष गाडी पाणी भरून लातूरला कशी सोडता येईल यावर चर्चा करण्यात आली. रेल्वे प्रशासनाच्या या बाबतीत असलेल्या अडचणी व त्यावर उपाययोजना याचीही सविस्तर चर्चा झाली. अशी गाडी मिरजहून निघाल्यास ती अंदाजे १० तासांत लातूरला पोहोचेल. दरम्यान, केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या बाबतीत सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरज-सोलापूरलोकलची चाचणी

$
0
0


मिरज :
अनेक दिवस चर्चेत असलेल्या मिरज-सोलापूर लोकलची चाचणी सोमवारी झाली. मुंबईच्या लोकल शेडमधून खास मिरज स्थानकात दाखल झालेली लोकल रेल्वे सोमवारी सोलापूरकडे चाचणीसाठी रवाना झाली.
केवळ ड्रायव्हर व अन्य तांत्रिक बाबी सांभाळणारे काही कर्मचारी इतकेच गाडीतून गेले. सकाळी दहा वाजता ही गाडी चाचणीसाठी निघणार होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे तब्बल चार-पाच तास उशिरा मिरज स्थानकातून सोलापूरकडे रवाना झाली. आता या गाडीच्या चाचणीचा अहवाल आल्यावरच तिच्या प्रत्यक्ष फेऱ्या सुरू होतील, असा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली बंदला संमिश्र प्रतिसाद

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सराफ, सुवर्णकारांच्या उत्पादन शुल्काविरोधातील आंदोलनाला पाठिंबा म्हणून सोमवारी सर्वपक्षीयांनी पुकारलेल्या सांगली बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. सांगलीतील प्रमुख बाजारपेठा वगळता अन्य ठिकाणचे व्यवहार सुरू होते. काँग्रेस, मनसेसह काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी सराफ पेठेत एकत्र येवून निदर्शने केली. दुकाने बंद करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणला गेला नाही. व्यापाऱ्यांसह सांगलीकरांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन बंद यशस्वी केल्याचा दावा जिल्हा सराफ समितीचे सचिव पंढरीनाथ माने यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
उत्पादन शुल्काविरोधात सराफ, सुवर्णकारांचा बेमुदत बंद कायम असून, सोमवारी ३४व्या दिवशी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगली बंदची हाक देण्यात आली होती. सराफ पेठ सध्या बंदच असते. त्याच्या शेजारील गणपती आणि कापडपेठेतही सोमवारी कडकडीत बंद होता. शहराच्या अन्य भागातील काही पेठा बंद होत्या तर काही ठिकाणचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होते. उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, माजी आमदार नितिन शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटने महेश खराडे, माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील, राजन पिराळे, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ, शिवसेनेचे पृथ्वीराज पवार यांच्यासह सराफ व्यावसायिकांनी सरकारच्या निषेधार्थ निदर्शने केली.
जिल्हा सराफ समितीचे सचिव पंढरीनाथ माने म्हणाले, पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुण्यात राज्य कार्यकारिणीची व्यापक बैठक सुरू आहे. त्या बैठकीतील निर्णयानुसार सराफ, सुवर्णकारांचे आंदोलन सुरू राहील. दरम्यान, सांगलीकरांनी एक दिवस बंद ठेवून आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कोणतेही गालबोट लागले नाही. कोणीही दबाव आणलेला नाही. बंद शांततेत पार पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशीलकुमार शिंदेपंतप्रधान होतील

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
'माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे एक दिवशी देशाचे पंतप्रधान होतील. सोनिया गांधी लवकरच त्यांची राज्यसभेवर वर्णी लावतील,' असे भाकित माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी वर्तविले.
सुशीलकुमार शिंदे गौरव समिती मुंबई आणि सप्टेंबर ग्रुप सोलापूर यांच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात 'दुसरी गोष्ट', या चित्रपटाचे फेरप्रदर्शन आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमात डॉ. डी. वाय. पाटील बोलत होते.
'सुशीलकुमार शिंदे हे अत्यंत कठीण परिस्थितीतून पुढे आले आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ता ते लोकनेता, अशी त्यांची वाटचाल आहे. चपराशाचे काम करण्यापासून ते देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत पोहोचले. त्यांची राजकीय वाटचाल थक्क करणारी आहे. देशभरात सुशीलकुमार शिंदे यांचे नाव घेतले जाते. लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्या असला तरीही त्यांची कॉँग्रेस पक्षावरील निष्ठा कमी झालेली नाही. सोनिया गांधी लवकरच त्यांची राज्यसभेवर वर्णी लावतील. ते एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील, असा आम्हाला आत्मविश्वास वाटतो, ' असेही डी. वाय. पाटील म्हणाले.
हिंगोलीचे खासदार राजीव सातव म्हणाले, सोलापूरच्या विकासासाठी आयुष्य वेचणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूरकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत करून फार मोठी चूक केली आहे. त्यांची किंमत सुदधा सोलापूरकर मोजत आहेत. सुशीलकुमारांचा पराभव हा माझ्या जिव्हारी लागला आहे. पराभवामुळे मी नाराज झालो आहे. भविष्यात अशी चूक होणार नाही, याची काळजी सोलापूरकरांनी घ्यावी. लाट लाट म्हणून आपण चुकीच्या लोकांना निवडून दिले. लाट असताना मी हिंगोलीमधून कसा निवडून आलो, असा प्रश्नही सातव यांनी उपस्थित केला. कार्यक्रमाला सुशीलकुमार शिंदे, कन्या स्मृती शिंदे, गिरीश गांधी आदी उपस्थित होते.
सुशीलकुमारांचा राष्ट्रपतीच्या
हस्ते गौरव होणार
सुशीलकुमार शिंदे यांनी ४ सप्टेंबर २०१५ रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पन केले आहे. त्यांचा अमृतमहोत्सव मुंबईत सप्टेबर ग्रुप सोलापूर व शिंदे गौरव समितीच्या वतीने ४ सप्टेंबर २०१६ रोजी मुंबईत करण्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदेंचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती माजी राज्यपाल पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेती पंपांना फक्त एक तास वीज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधून होणारा बेसुमार पाण्याचा उपसा रोखण्यासाठी बॅक वॉटरच्या परिसरात असलेल्या शेती पंपांना केवळ एक तास वीजपुरवठा केला जाणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून, ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. त्यामुळे हाताशी असलेला पाणीसाठा जपून वापरण्यात येत आहे. सध्या उजनी धरणात वजा ३२ टक्के इतका पाणीसाठा आहे. सोलापूरला पिण्यासाठी या पाणीसाठ्यातून पुढील तीन महिने पाणी पुरवावे लागणार आहे. त्यासाठी पाण्याचे आवर्तन नदीवाटे सोडावे लागणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जपून वापरावा लागणार आहे. धरणाच्या बॅक वॉटरचा पसारा पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांतील काही तालुक्यांत आहे. या भागातून मोठा पाणी उपसा केला जातो. त्याला आळा घालण्यासाठी परिसरातील शेतीच्या पंपांचा वीजपुरवठा यापूर्वीच आठ तासांवरून ५ तासांवर आणला होता, तो आता केवळ एका तासावर आणण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्याविरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. आता एक तास वीज देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांतील बॅक वॉटर परिसरात केली जाणार आहे.
.....
शेतकरी रस्त्यावर
प्रशासनाच्या वीज कपातीच्या निर्णयाविरोधात सोलापूर जिल्ह्यात आंदोलनांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी भीमनगर येथे विविध पक्षातील नेत्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग बंद करून आंदोलन करण्यात आले. करमाळा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सोलापूर-नगर रोड बंद पाडला.
...
उजनीत किती गाळ आहे, तळाचे पाणी पिण्यायोग्य असेल का, याचा कसलाही अंदाज प्रशासनाकडे नाही. त्यामुळे उजनी जलाशय परिसरातील शेतीसाठी सुरू असलेला पाणी उपसा बंद करण्यासाठी वीजेच्या वेळेत मोठी कपात करण्यात आली आहे. सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून, गरजेनुसार पाणी सोडले जाणार आहे.
तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडच्या पाणीप्रश्नीआज मंत्रालयात बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कृष्णा नदीवरील टेंभू उपसा योजनेसाठी पाणी अडवल्याने कराड शहराला दूषित पाणीपुरवठा होत आहे. या बाबत तोडगा काढण्यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम, स्थानिक आमदार व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आज (बुधवारी) मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शहराला शुद्ध पाणीपुरवठा होण्याबाबत ठोस तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी कराडकर नागरिकांनी केली आहे.
टेंभू उपसा योजनेसाठी कृष्णा-कोयना नदीचे पाणी कराड शहराजवळील वाखाण येथे बंधारा घालून अडवल्यानंतर शहराला पाणीपुरवठा होणारा नदीचा वाहता प्रवाह बंद झाला आहे. नदीपात्रात साचलेल्या पाण्याचा फुगवटा वाढून वर्षातील आठ महिने पाण्याची डबक्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. साचलेल्या पाण्यात सांडपाणी मिसळून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी कराडकरांना पिण्यासाठी पुरविले जाते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील उन्हाळ्यात शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत होता. त्यानंतरही बैठका, पाहणी झाली होती. मात्र, तोडगा निघाला नाही. त्यामुळे आज आयोजित बैठकीत ठो, तोडगा निघावा, अशी मागणी होत आहे.
असा आहे दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न
टेंभू बंधाऱ्याची उंची वाढविल्यामुळे पाणी साचून राहते
कराड, मलकापूर नगरपालिकेला दूषित पाणीपुवठा
अनेक महिन्यांपासून पिवळ्या, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा
कराड नगरपालिकेने पर्यावरण विभागाला अहवाल सादर
पाण्यावर शेवाळ तयार होणे, रंग बदलणे, चव बदलण्याचे प्रकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजिंक्यतारा किल्ल्यावरीलऐतिहासिक तळ्यांना निधी

$
0
0


सातारा :
अजिंक्यतारा किल्ल्यावरील ऐतिहासिक तळ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ४९ लाखांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे किल्ल्यावरील दुरवस्थेत असणाऱ्या नऊ पैकी सात तळ्यांना नवी झळाळी मिळणार आहे.
किल्ल्यावर विस्तृत पठार आहे. या किल्ल्यावर पूर्वी शेती केली जात होती. या शेतीसाठी या तळ्यांतून पाणी उपलब्ध होत होते. वन्य प्राणी, पशुपक्ष्यांची तहानही तळी भागवत असल्याने वन्यप्राणी व पशुपक्ष्यांची संख्याही किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, वर्षानुवर्षे दुर्लक्षाच्या फेऱ्यात किल्ला अडकल्याने गडावरील पाण्याच्या मोठ्या तळ्यांकडे दुर्लक्ष झाले होते. साताऱ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस नेहमीच पडतो. या किल्ल्यावरील तळी पावसाळ्यात भरतात. मात्र, पाणी गळती होऊन निघून जाते. गडावर मोजकेच पाणी शिल्लक राहत होते. काही वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी किल्ल्यावरील दोन तळ्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या तळ्यांची गळती थांबविण्यात आली. पडझडीच्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले. या दोन तळ्यांमध्ये सध्या चांगला पाणीसाठा होत असल्याने हे पाणी किल्ल्यावर लागवड केलेल्या वृक्षांसाठी वापरले जाते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ व त्यांचे सहकारी किल्ल्यावर या वृक्षांचे संगोपन करीत आहेत.
जलसंधारणाचीही कामे किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात झाली आहेत.
सात तळ्यांची दुरवस्था
किल्ल्यावरील सात तळ्यांची दुरवस्था कायम आहे. तळ्यांमध्ये मोठा गाळ साठलेला आहे. तळ्यांची पडझड झालेली आहे. पावसाचे पाणी काही दिवसांतच गळती होऊन निघून जाते. या तळ्यांची दुरुस्ती केल्यास किल्ल्यावर पाणीसाठा होऊ शकतो. किल्ल्यावरील वन्यजीवांच्या पिण्याच्या पाण्याची सोय या निमित्ताने कायमस्वरूपी होऊ शकते. या हेतूने जिल्हा प्रशासनाने किल्ल्यावरील तळ्यांच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळून निधी मिळाला आहे. अजिंक्यतारा किल्ल्याची उंची लक्षात घेता एवढ्या उंचीवर तळ्यांचे पुनरुज्जीवनाचे काम करणे आव्हान आहे. तरी देखील उरमोडी विभागाच्या अभियंत्यांनी दोन तळ्यांचे काम चांगल्या पद्धतीने पूर्ण केले होते.
....
निधी मिळाल्यामुळे दुर्लक्षित तळ्यांना झळाळी मिळण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील पशुपक्षी व झाडांची तहान भागेल. तसेच भूगर्भातील पाणीसाठाही या निमित्ताने वाढण्यास मदत होईल.
डॉ. अविनाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगाव-वेंगुर्ला होणार राष्ट्रीय महामार्ग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

चंदगड तालुक्यातून जाणाऱ्या व सर्वाधिक वर्दळ असलेल्या बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गाचे रुपांतर राष्ट्रीय महामार्गात होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. या कामी केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे बांधकाममंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विशेष प्रयत्न केले आहे. याबाबतची माहिती माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी दिली.

बेळगाव-वेगुर्ला मार्गासाठी मिळत असलेला निधी अपुरा पडत असल्यामुळे कामे व्यवस्थित होत नव्हती. मधल्या काळात या रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाची मागणी वारंवार होत होती. पूर्वी वेंगुर्ला हे प्रसिद्ध व्यापारी बंदर होते. दुसऱ्या टोकाचे विशाखापट्टण बंदर होते. त्यामुळे मालवाहतुकीसाठी हा रस्ता महत्त्वाचा होता. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग करण्यात यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री भरमू पाटील व उदयकुमार देशपांडे यांनी केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्र सरकारडे केली होती. या कामी पालकमंत्री व मुख्यमंत्री यांनी विशेष पाठपुरावा केल्यामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हा रस्ता चंदगड तालुक्यामधून जाणार असल्याने या रस्त्याला विशेष महत्व आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थेट पाइपलाइनचे काम लांबणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वन विभागाची मान्यता मिळाल्याने काळम्मावाडी धरणाजवळ उभारण्यात येणाऱ्या जॅकवल, इनटेक वेल आ​णि पंप हाऊस उभारणीचा मार्ग सुकर झाला आहे. या परिसरातून १६०० मीटर लांबीची पिण्याची पाइपलाइन टाकली जाणार आहे. थेट पाइपलाइन योजनेतील हा महत्वाचा टप्पा आहे. पाइपलाइन योजनेंतर्गत आतापर्यंत बारा किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकली आहे. परंतु, केवळ २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यातच विविध विभागाच्या मान्यता आणि प्रत्यक्ष कामावेळी अडथळे येत असल्याने पाइपलाइन योजना फेब्रुवारी २०१७ पर्यंत मुदतीत पूर्ण होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

वन विभाग आ​णि वन्य जीव मंडळाच्या मान्यतेसाठी गेली दीड वर्षे प्रयत्न सुरू होते. त्यांची मान्यता मिळाल्याने धरणाच्या उजव्या बाजूला करण्यात येणाऱ्या कामांना लवकरच सुरूवात होण्याची शक्यता आहे. काळम्मावाडी धरण ते पुईखडी हा ५२ किलोमीटरचा पाइपलाइन मार्ग आहे. या मार्गावरील हळी ते परितेपर्यंतच्या सरकारी पाणंदीतून साडेआठ किलोमीटर पाइपलाइन टाकली आहे. परिते ते ठिकपुर्लीपर्यंत १८०० मीटर पाइपलाइन टाकली आहे. शेळेवाडी फाटा ते गणेश मंदिर आणि गणेश मंदिर ते तुरंबेपर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. वाडीपीर ते हळदीपर्यंतही पाइपलाइनचे काम सुरू आहे.

योजनेंतर्गत अभयारण्य क्षेत्रातील काम महत्त्वाचे आहे. धरणाच्या उजव्या बाजूला जॅकवेल, पंपिंग हाउस, इनटेक वेल अशी कामे प्रस्तावित आहेत. अभयारण्य क्षेत्रात काम करण्यासाठी मान्यता मिळाल्याने पाइपलाइन योजनेला गती मिळले, अशी माहिती उपअभियंता अजय साळुंखे यांनी दिली.

शहर परिसरात ९ किमीची पाइपलाइन

शहर परिसरात ९ किलोमीटर पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुईखडी येथे ८० एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाला सुरूवात झाली आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर पहिली पंधरा वर्षे रोज १८० एमएलडीपर्यंत उपसा करण्याचे प्रस्तावित आहे. पुईखडी येथील जुने ६० एमएलडी क्षमतेचे व नवीन ८० एमएलडी क्षमतेचे आणि कसबा बावडा येथील ३६ एमएलडी क्षमतेच्या केंद्राचा समावेश आहे.

पाटबंधारेच्या मान्यतेची प्रतीक्षा

पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेतून साडेअकरा किलोमीटर अंतर पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. हा मार्ग कॅनॉलच्या बाजूने जाणार आहे. या मार्गासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. पण अजून मान्यता मिळालेली नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेने त्यांच्या मालकीच्या जागेतून पाइपलाइन टाकण्यास मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरात महिलांना रोखले

$
0
0

मंदिरप्रवेशात 'परंपरे'ची आडकाठी, धक्काबुकी; पो​लिसांची बघ्याची भूमिका

म. टा. प्रतिनिधी, प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीरनिवासीनी श्री अंबाबाई मंदिरातील गर्भकुडीत जाऊन प्रतिकात्मक दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा (अवनि) संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या नेतृत्वाखालील महिलांना भाविक महिलांनी रोखले. परंपरेनुसार गर्भकुडीत प्रवेश करता येणार नाही, असे सांगत या महिलांना महिलांकडूनच धक्काबुक्की झाली. या प्रकारामुळे सोमवारी सकाळी मंदिर आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दर्शन घेण्यापासून रोखल्यानंतर भोसले यांनी मुंबई हायकोर्टाच्या आदेशाची पायमल्ली होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप यांनी केली. भोसले यांनी धक्काबुक्की करणाऱ्या महिलांविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अंबाबाई मंदिरातील गर्भकुडीत प्रतिकात्मक प्रवेश करण्याची घोषणा भोसले यांनी केली होती. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक महिला या उपक्रमात सहभागी व्हायला आल्या होत्या. त्यात काही देवीच्या रूपात व राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषेतील महिलांचा समावेश होता. महिलांच्या हातात पूजा आणि ओटीचे साहित्य होते. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय,' 'राजर्षी शाहू महाराज की जय,' आणि 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,' अशा घोषणा देत या महिलांनी दक्षिण दरवाजातून मंदिर आवारात प्रवेश केला.

दर्शनरांगेतून या महिला शिस्तबद्धपणे मंदिरात आल्या. पितळी उंबरा चौकात महिला पोलिसांसह साध्या वेषातील पोलिस होते. गर्भकुडीबाहेर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या महिला कर्मचाऱ्यांनी कडे केले होते. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख कर्मचाऱ्यांना सूचना करत होते. भोसले यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या महिलांनी जयघोष सुरू केला. भोसले यांनी हायकोर्टाच्या निर्णयानुसार गर्भकुडीत सर्व महिलांना प्रवेश देण्याऐवजी काही महिलांना गर्भकुडीत प्रतिकात्मक प्रवेश करू द्यावा, अशी विनंती केली. त्यावर आक्षेप घेत गिरीजा शानभाग व अन्य महिलांनी त्यांना गर्भकुडीत प्रवेश करता येणार नाही, असे ठणकावले. गाभाऱ्यात महिलांनी प्रवेश करू नये, यासाठी देवस्थान समितीच्या महिला कर्मचाऱ्यांनी कडे केले होते. त्यामुळे गोंधळ उडाला. गर्भकुडीत प्रवेश करणाऱ्या महिलांना भाविक महिलांनी धक्काबुक्की केली. या गदारोळातच 'हायकोर्टाचा आदेश असल्याने पोलिसांनी आम्हाला मदत करावी,' असे भोसले ओरडून सांगत होत्या. पण, पोलिसांनी गोंधळाचे कारण पुढे करत सर्व महिलांना गाभाऱ्यातून बाहेर काढले.

मंदिरातील गर्भकुडीत प्रवेश हे आंदोलन नव्हते तर उपक्रम होता. आम्ही प्रतिकात्मक प्रवेश करणार होतो. पण, महिला भाविकांना पुढे करून आमचा प्रवेश रोखला. महिलांना धक्काबुक्की होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.

- अनुराधा भोसले, अवनि सामाजिक संस्था

श्री अंबाबाई मंदिराच्या गर्भकुडीत जाऊन महिला दर्शन घेत नाहीत. ही प्रथा कायम रहावी, अशी महिला भाविकांची मागणी आहे. महिला भाविक गर्भकुडीत दर्शन घेण्याची नवीन पद्धत आम्ही कधीच स्वीकारणार नाही. आम्ही त्याला यापुढेही तीव्र विरोध करीत राहू.

गिरीजा शानभाग, महिला भाविक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेतून लातूरला रेल्वेद्वारे पाणी देणारदहा दिवसांत तांत्रिक अडचणी दूर करणार; एकनाथ खडसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
'मिरजेतून लातूरला रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करणार आहे. पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये सर्व तांत्रिक अडचणी दूर करून पाणीपुरवठा सुरू केला जाईल,' अशी माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली.
खडसे लातूरला पाणी नेण्याच्या नियोजनासाठी आणि संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मिरजेत आले होते. खडसे यांच्यासह ग्रामविकास मंत्री आणि लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आणि पाणीपुरवठा खात्याचे सचिव राजेश कुमार यांनीही जिल्हा आणि रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून पाहणी केली. भाजप नेते मकरंद देशपांडे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खडसे म्हणाले, 'राज्यात दुष्काळामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. लातूरमधील पाणीटंचाई भीषण झाली आहे. लातूरमधील टंचाईग्रस्त भागाला रेल्वेद्वारे पंढरपूर येथून पाणी देण्याचा विचार होता. मात्र, उजनी धरणातून पंढरपूरला पाणी पोहोचवून, येथून पुढे नेण्यास विलंब होणार आहे. यामुळे मिरजेतून पाणी नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिरजेत रेल्वे प्रशासनाची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. शिवाय मिरजेतून पुढील सहा महिने लातूरला पाणी देणे शक्य आहे.'
खडसे, पंकजा मुंडे, निलंगेकर, राजेश कुमार, जिल्हाधिकारी गायकवाड आणि देशपांडे यांनी मिरज रेल्वेस्थानकास भेट देऊन पाहणी केली. सरकारी विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत संबधित अधिकाऱ्यांना नियोजनाबाबत सूचना दिल्या. बैठकीला महसूल, पाणीपुरवठा, पाटबंधारे आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वेच्या पाणी योजनेचा वापर
मिरज रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे ५० ते ५५ रेल्वेगाड्यांची ये-जा सुरू असते. रेल्वेच्या वापरासाठी व प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने कृष्णा नदीतून थेट मिरज रेल्वे स्थानकात पाणी आणण्याची आणि पाणी शुद्धीकरणाची योजना उभारली आहे. बंदिस्त पाइपलाइनद्वारे नदीतून रेल्वे स्थानकाच्या परिसरात पाणी आणण्यात येते. दररोज सुमारे ४ ते ५ लाख लिटर पाण्याचे शुद्धीकरण करण्याची या योजनेची क्षमता आहे. या योजनेतील पाणी रेल्वेद्वारे लातूरला देण्यात येणार आहे. एका रेल्वेतून सुमारे २५ लाख लिटर पिण्या योग्य पाणी लातूरला नेण्याची योजना आहे.
..
रविवारी नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर हा विषय घातला. सोमवारी स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याशी या बाबत चर्चा केली. मंगळवारी महसूल मंत्री खडसे आणि लातूरच्या पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी थेट सांगलीत येऊन मिरजेतून लातूरला रेल्वेद्वारे पाणी देण्याचे निश्चित केले. केवळ तीन दिवसांत तातडीने प्रशासनाने निर्णय घेतला.
मकरंद देशपांडे, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुडी पाडव्या दिवशीहीसराफांचा बंदचा इशारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सराफ, सुवर्णकारांचे शिष्ठमंडळ दिल्लीत ठाण मांडून आहे. पंतप्रधान, अर्थमंत्री यांनी अद्याप भेटीची वेळ दिलेली
नाही. त्यांनी भेट देऊन आमच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय झाला तर ठिक, अन्यथा गुडीपाढव्या दिवशीही
बंद कायम ठेवण्याचा निर्धार आम्ही केला असल्याची माहिती राज्य संघटनेचे उपाध्यक्ष किशोर पंडीत यांनी मंगळवारी सांगलीत पत्रकारांना दिली. सराफ, सुवर्णकारांचा अबकारी कराच्या विरोधातील बेमुदत मंगळवारी पस्तीसाव्या दिवशीही कायम होता. राज्यातील पदाधिकाऱ्यांची सोमवारी पुण्यात दिर्घकाळ बैठक झाली. त्यावेळी दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळाला केंद्रीय अर्थमंत्री भेट देण्यास टाळत असल्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. शिष्टमंडळाला सरकारच्या प्रतिनिधींनी भेट देवून योग्य निर्णय घ्यावा, अशी आमची मागणी आहे. असे झाले नाही तर आमचा बेमुदत कायम राहणार आहे. अगदी गुडीपाढव्यादिवशीही व्यवसाय बंद ठेवण्याची आमची तयारी आहे. सराफ, सुवर्णकारांची केंद्रीय समिती जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असणार आहे. सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सराफ, सुवर्णकार सांगलीत आले होते. त्यांनाही या बाबतची माहिती देण्यात आली असल्याचे पंडीत यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिकारीमुळे बिबट्यांनाचांदोलीत भक्ष्यांची टंचाई

$
0
0


भगवान शेवडे, शिराळा
नरक्या तस्करी पाठोपाठ चांदोली राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांचे भक्ष असलेल्या सांबर, चितळ, काळवीट या सारख्या वन्यप्राण्यांच्या शिकारीमध्ये वाढ होत असल्यामुळे बिबट्यांना भक्ष्य कमी पडू लागले आहे. त्यामुळेच भक्षाच्या शोधात सैरभैर झालेल्या बिबट्यांनी चांदोली राष्ट्रीय उद्यानाबाहेर पडण्यास सुरुवात केली आहे.
अभयारण्यात सध्या ३ वाघ, २५ बिबटे, ३५० ते ४०० गवे, २५० सांबर, १०० अस्वले असे प्राणी आहेत. घनदाट जंगलातून बाहेर पडल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नुकताच मृत्यू पावलेला बिबट्या अवघ्या नऊ महिन्यांचा बछडा होता. अभयारण्याला कुंपण करावे, अशी मागणी वारंवार होऊनही वनखात्याने त्याबाबत काहीच कार्यवाही केली नाही. बिबट्यांचा त्रास अभयारण्यालगतच्या गावांना वारंवार होत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागाबरोबरच उत्तर विभागातील डोंगरा जवळ असणाऱ्या वाड्या-वस्त्यांवरील पाळीव जनावरांवर बिबट्यांचे हल्ले वाढू लागले आहेत. त्यामुळे या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगली जिल्ह्याच्या पश्‍चिम विभागात चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या या राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ ३१७.६७ चौ. कि. मी. इतके आहे. राज्यातील सर्वात मोठे व नैसर्गिक निर्मनुष्य असणारे हे उद्यान आहे. हे उद्यान निर्मनुष्य होण्यासाठी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या ठिकाणी वन्यप्राण्यांची संख्या वाढू लागली आहे. मात्र, अभयारण्यातील चोरट्या शिकारीमुळे बिबट्यांना भक्ष्य कमी पडू लागले असून, भक्षाच्या शोधात बिबटे मानवी वस्तीत घुसून येथील पाळीव जनावरांवर हल्ले करू लागले आहेत. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील मणदूर, धनगरवाडा, जाधववाडी, सोनवडे, आरळा, बेरडेवाडी, खोतवाडी, काळोखेवाडी, मिरूखेवाडी, गुढे-पाचगणी या परिसरात या पूर्वी बिबट्याने पाळीव जनावरावर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. आता तालुक्याच्या उत्तर भागातही जंगल सोडून सुमारे २५ कि. मी अंतरावर विबट्या आल्याचे मृत्यूवरून स्पष्ट होत आहे.
...
चार संशियांतावर गुन्हे
शिराळा तालुक्यातील वाकुर्डे गावाजवळच्या शेतात मृताअवस्थेत सापडलेला बिबट्याचा बछडा चांदोली अभयारण्यातील आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मुळात बिबट्या उसाच्या शेता बरोबरच अन्य मार्गाने मानवाच्या वस्तीजवळ रहाणे पसंत करतो. त्यातूनही वाकुर्डेजवळ मृतावस्थेत आढळलेला बिबट्या जंगलातून ३० ते ४० कि. मी अंतरावर येऊ शकत नाही. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचा डोंगर, शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठार या ठिकाणाहूनही तो आला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच बरोबर गेल्या दहा वर्षांपासून चांदोली अभयारण्यात संरक्षण यंत्रणा वाढवल्यामुळे शिकारीचे प्रमाण कमी झाले आहे. संशयास्पद शस्त्रे घेऊन जंगलात प्रवेश करणाऱ्या चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय वनाधिकारी एस. एल. झुरे यांनी 'मटा' ला दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाते प्रमुखांच्या तातडीने बदल्या करानगर विकास मंत्रालयाचा आदेश

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
इस्लामपूर नगरपालिकेतील पाच खाते प्रमुखांच्या तातडीने बदल्या कराव्यात, असा आदेश नगरविकास विभागाने काढला आहे. या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून तसा अहवाल सरकारला सादर करावयाचा असल्यामुळे बदल्या कराव्याच लागणार आहेत. राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांच्या पंखाखाली असलेले हे अधिकारी बदलीच्या आदेशामुळे हबकले आहेत.
या बाबत इस्लामपूर नगर पालिकेतील विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाकडे तक्रार केली होती. इस्लामपूर नगरपालिकेत १९८५पासून राष्ट्रवादीची सत्ता आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून लोकांची पिळवणूक करीत आहेत. आपल्या मनमानी कारभारासाठी कर्मचाऱ्यांचा वापर केला जात आहे. आजपर्यंत राज्यात आणि केंद्रात त्यांची सत्ता होती त्यामुळे हे कर्मचारी गेल्या २५-३० वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत. अशी तक्रार कुंभार यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर नगर विकास मंत्रालयाने बदलीचे आदेश काढले आहेत.
यांच्या होणार बदल्या
नगरपालिकेतील नगर रचना अधिकारी एस. एम. कांबळे, बांधकाम अभियंता अविनाश जाधव, पाणीपुरवठा अधिकारी आर. आर. खांबे, प्रभारी कर निरीक्षक आनंदा कांबळे आणि अस्थापना विभागाचे मोहन माळी या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ताबडतो सरकारला कळविण्याचे आदेश सांगलीचे जिल्हाधिकारी व इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना आले आहेत.
....
नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत फेब्रुवारीमध्येच सरकारने अहवाल मागविला होता. सरकारने राज्य पातळीवर सर्वच नगरपालिकांसाठी बदल्यांचा प्रोग्राम राबविला आहे. मात्र, आम्हाला या बाबतचा सरकारचा आदेश अद्याप प्राप्त झालेला नाही.
दीपक झींजाड, मुख्याधिकारी इस्लामपूर नगर पालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिखर शिंगणापूरच्यायात्रेवर टंचाईचे सावट

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सातारा
दुष्काळामुळे शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या चैत्र यात्रेवर टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. प्रशासकीय यंत्रणाही जागी झाली आहे. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी भाविकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनामार्फत ५० टँकरची सोय करण्याचे आदेश दिले आहेत.
शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाची यात्रा ८ ते १८ एप्रिल या कालावधीत होत आहे. यंदा यात्रेवर दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे प्रशासनाला सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने बरीच कसरत करावी लागत आहे. नुकतीच यात्रा नियोजन बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, माणचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, फलटणचे प्रांताधिकारी कांबळे, माणच्या तहसीलदार सुरेखा माने उपस्थित होते.
सरपंच मेनकुदळे यांनी पुष्कर तलाव कोरडा पडल्याने शिंगणापूर यात्रेस येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाने टप्प्या-टप्प्याने ५० टँकर उपलब्ध करून द्यावेत, पाणीपुरवठा करण्यासाठी ८०० मीटर पाइपलाइन, ६ विद्युतपंप तसेच ९ विंधन विहीरींची पूर्तता करावी, अशी मागणी केली. टँकरचे पाणी टाक्यांमध्ये सोडून भाविकांना पाणीपुरवठा करण्यात यावेत, अशी मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मुद्गल म्हणाले, कारूंडे (ता. माळशिरस) येथील तलावातून टँकरने पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या शिवाय माण तालुक्यातील चार ठिकाणी पाणी स्त्रोत अधिग्रहण करण्यात आले आहेत. कावडीप्रमुखांसह सर्व भाविकांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून यात्रा शांततेत पार पाडवी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपक्रमांची पायवाट दाखविणारी शाळा

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

जिल्ह्यात बऱ्याच शाळा आय.एस.ओ मानांकनाला पात्र झाल्या परंतु ज्या शाळेने ज्या सर्व शाळांना पायवाट दाखविली ती आहे, राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर प्राथमिक शाळा. मुख्याध्यापकांसह शिक्षकांची धडपड आणि प्रगतीची नस सापडलेल ग्रामस्थ यामुळे शाळा आयएसओ मानांकनाला पात्र ठरली. त्याही आधी या शाळेने विविध उपक्रम राबवून प्रशासनाचेही लक्ष वेधून घेतले आहेत.

सध्या या शाळेने राबविलेले विविध उपक्रम पाहण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हेत तर सीमाभागातील शिक्षक आणि ग्रामस्थ शाळेला भेट देतात. एकप्रकारे ही शाळा शैक्षणिक पर्यटनाचा केंद्रबिंदूच झाली आहे.

राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षणाचा पाया घातल्यानंतर कपिलेश्वर येथे १९१९ मध्ये प्राथमिक शाळा सुरू झाली. शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या या शाळेतील २४८ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. शिक्षकांचे परिश्रम आणि शाळा समिती व अधिकारी यांच्या मार्गदर्शनातून शाळेचे रूपडेच पालटले आहे. शाळेने १९८७ पासून जिल्हा आदर्श पुरस्कार घेऊन शैक्षणिक गुणवत्ता विकासाचे नियोजनपूर्वक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

सकाळी सात ते सायंकाळी सात असे १२ तासांचे शाळेचे कामकाज करून विजेच्या भारनियमनमया काळात असणारी 'सौर अभ्यासिका' हे या शाळेचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवलाच शिवाय शाळेतीलच शिक्षकांनी बसविलेले मुलींचे लेझीम पथक उत्कृष्ट कवायती करते. याशिवाय प्रार्थनेला ज्ञानेश्वरी वाचन आणि योगासन आदी उपक्रमही राबविले जातात. वर्ग स्वच्छ रहावा यासाठी प्रत्येकक वर्गासाठी आदर्श विद्यार्थी पुरस्कार आणि स्वच्छ वर्ग पुरस्काराची ट्रॉफी दिली ‌जाते.

शाळेच्या भिंतींवर विविध प्रकारची माहिती आणि बलुतेदारी संस्कृती चित्ररुपात रेखाटण्यात आली आहे. ई-लर्निंग प्रोजेक्टर रुम, संगणक लॅब, प्रयोगशाळा, मुलांच्या परिपाठासाठी प्रार्थना मंदिर, व्हरांड्यात विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, त्याच्या खाली असणारी चप्पल स्टँड आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.

सहकारी शिक्षक, शिक्षण समिती, माजी विद्यार्थी व ग्रामपंचायतीने केलेली आर्थिक मदत, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे शाळा हायटेक होत आहे. राज्यात आदर्श शाळा बनवून पै न् पै विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी कसा वापरता येईल, अशा दृष्टीने आमचे नियोजन आहे.

- धोंडीराम चौगले, मुख्याध्यापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images