Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाचगणी-महाबळेश्वरात नियमांचे सर्रास उल्लंघन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
'पाचगणी-महाबळेश्वर ही दोन्ही शहरे व त्यांचा परिसर 'इको सेन्सिटिव्ह झोन' अर्थात पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील विभाग असल्याने बांधकामे करणे, उत्खनन करणे, वृक्षतोड करणे या साऱ्यावर सरकारचे कडक निर्बंध आहेत. या तालुक्यांत डोंगरमाथ्यावर कवडीमोलाने जमिनी खरेदी करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे. बेसुमार उत्खनन करून त्या ठिकाणी कधी महसूल विभागाला अंधारात ठेऊन, तर कधी पदाधिकाऱ्यांचे वजन वापरून बांधकामे पूर्ण करून घेण्याची जणू स्पर्धाच लागली आहे,' अशी तक्रार या भागातील पर्यावरणप्रेमींनी केली आहे.
गेल्या काही वर्षांत साम, दाम, दंड, भेद अशी सर्व प्रकारची जबरदस्त ताकद वापरून 'इको सेन्सिटिव्ह'च्या नियमांना वाटाण्याच्या अक्षदा लावत रातोरात डोंगर पोखरून त्या ठिकाणी टोलेजंग इमले उभे राहू लागले आहेत. वनराजीतून डोंगर, टेकड्यांवर टुमदार बंगले आकाशाकडे झेपावलेले दिसत आहेत. महसूल विभागाने कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या, की लगेच स्थानिक पदाधिकारी व नेतेमंडळीच्या हस्तक्षेपामुळे कारवाई थांबते. माहिती अधिकाराच्या नावाखाली अवैध बांधकामांवर टाच आणण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्यांचा आवाजही तिथल्या तिथेच दाबला जात आहे.
पाचगणी शहराबरोबरच आसपासच्या छोट्या-मोठ्या गावांत फार मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे, डोंगर व जमिनीचे खोदकाम दिवसाढवळ्या सुरू आहे. गावागावांत बंगलेच्या बंगले उभे राहात आहेत. महसूल यंत्रणा अशी बांधकामे रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसते; परंतु पंचनाम्याशिवाय अधिकाऱ्यांकडून काहीही होताना दिसत नाही. गावोगावी मदतीच्या रूपाने या बांधकामांना अभय मिळताना दिसत आहे. धनदांडग्यांच्या नजरा या परिसराकडे वळल्यामुळे या परिसरात जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे जमीन विक्री व्यवहाराची एजंटगिरी वाढली आहे. त्यातच जमिनी विकत देऊन त्यांचे बांधकाम आणि त्यासंबंधी सर्व परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारीही या एजंटांकडे असल्याने हे लोकही या परिसरात आपली वेगळे अस्तित्व निर्माण करू लागले आहेत.
कोणताही मार्ग वापरून आपले बांधकाम पूर्ण करण्यासाठी धडपड चालू आहे; परंतु यामध्ये पर्यावरणाचे नुकसान होताना दिसत आहे. एकीकडे पर्यावरण वाचवायची हाक द्यायची आणि दुसरीकडे या ठिकाणी व्यवसायाच्या स्वरूपात येथील निसर्गाचे विद्रुपीकरण करून या परिसराला बकाल करायचा डाव सध्या सर्वच पातळ्यावरून सुरू आहे.
गरज नियंत्रणाची
ही परिस्थिती सुधारण्यासाठी अनधिकृत बांधकाम, डोंगर पोखरणे, उत्खनन, वृक्षतोड या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणण्याची गरज आहे. अन्यथा ही दोन्ही शहरे आगामी काळात उघडी-बोडकी होणार आहेत. महसूल विभागाने गांभीर्याने लक्ष घालून कारवाईचा बडगा उचलावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सचिनच्या आर्थिक मदतीने जखीणवाडी झाले सौरग्राम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
प्रसिद्ध क्रिक्रेटपटू आणि खासदार सचिन तेंडूलकर यांनी दत्तक घेतलेले कराड तालुक्यातील जखीणवाडी गाव आता सौरग्राम झाले आहे. सचिनने १ कोटी ३४ लाख रुपयांची भरीव निधी दिल्यामुळे संपूर्ण गावात सौर दिवे बसविणे शक्य झाले आहे.
लोकसहभागातून गावात सुधारणा होत असल्याची माहिती मिळताच सचिनने गावची माहिती घेऊन गाव दत्तक घेतले होते. त्यांनी विकासासाठी गावाला तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी दिला. या निधीतून गावातील रस्त्यांवर आणि सार्वजानिक ठिकाणी सौरदिवे लावण्यात आले आहेत. त्यासाठी एक सोलर प्रकल्प उभारण्यात आला, त्यातून दररोज १६.२ किलो व्हॅट वीज तयार होते. त्यातून सौरदिवे प्रज्वलित होतात. आता गावाने हायटेक शालेय शिक्षणावर भर दिला आहे. गावातील शाळा डीजिटल करण्यात आल्या आहेत. ई-लर्निंगची सोयही करण्यात आली आहे.
मूळात जखीणवाडी गावाची लोकसंख्या केवळ दोन हजार इतकी आहे. या छोट्याशा गावात कोणत्याच सुविधा नव्हत्या. रस्ते, पाणी, गटार या सर्वांच्याच बाबतीत गाव मागास होते. मात्र, आता गावाचा कायापालट सुरू झाला आहे. गावातील गाव पुढाऱ्यांनी पहिल्यांदा ग्रामस्थांना राळेगणसिद्धी आणि हिरवेबाजार ही गावे दाखवून आणली. त्यानंतर गावाचा कायापालट करायचाच असा निश्चय प्रत्येकाने केला. सुरुवातीला गावाच्या स्वच्छतेवर भर दिला. त्यानंतर गावातील रस्ते, पाणी, बंदिस्त गटार योजना या गोष्टी केल्या. सरकारी निधीसह लोकसहभाग आणि लोकवर्गणीही वाढत होती. गावात होणाऱ्या परिवर्तनाची माहिती सचिन तेंडूलकरांपर्यंत जावून पोहोचली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकला आग लागूनसहा म्हशी ठार

$
0
0

सातारा

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याजवळील शिवराज पेट्रोलपंपानजीक जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला

मंगळवारी सायंकाळी आग लागली. आगीत ट्रकमधील १२ पैकी ६ म्हैशीचा होरपळून मृत्यू झाला, तर युवकांच्या

प्रसंगवधानामुळे सहा म्हैशी बचावल्या. ट्रक मलकापूर (कराड) येथून साताऱ्याकडे येत होता.

हाजी शेख (रा. यशवंतनगर, साईनगर, मलकापूर, कराड) यांचा ट्रक (क्र. एम. एच. ११ ए. एल. २८८८) मलकापूर

(कराड) येथून साताऱ्यांच्या दिशेने येत होता. ट्रक सायंकाळी शिवराज पेट्रोलपंपाजवळ आला असताना चालकाच्या

केबिन खालून धूर येऊ लागला. गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे चालकाने उडी मारली. परंतु, ट्रक जळत

असताना शेजारील काही युवकांनी गाडीत काय आहे, असे विचारले असता त्याने काही माहिती देण्यास नकार

दिला. गाडी चारीबाजूने पॅक बंद असल्याने गाडीत काय आहे, याची कल्पना शेजारील युवकांना आली नाही. मात्र,

आगीची झळ ट्रकच्या मागील बाजूस बसताच गाडीतील म्हैशींनी ओरडण्यास सुरुवात केली. चालक तेथून प्रसार

झाला होता. मात्र, स्थानिक युवकांनी ट्रकमधून म्हैशींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु,

तोपर्यंत सहा म्हैशींचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता, तर सहा म्हैशी भाजून जखमी झाल्या होत्या. त्यापैकी

तीन म्हैशी लगतच्या अंजिक्यताऱ्यांच्या बाजूने डोंगरात पळत गेल्या. या घटनेची माहिती कळताच सातारा पोलिस

आणि नगरपालिकेचा अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग आटोक्यत आणली. या

घटनेमुळे वाहतुकीची कोंडी झाली. म्हैशींना वाचविताना युवकांनाही किरकोळ भाजले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटणचा देसाई कारखानापुन्हा शंभूराज देसाईंकडे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड

पाटण तालुक्यातील मरळी येथील बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक आमदार

शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने जिंकली आहे. देसाई यांच्या पॅनेलचे सर्व १३ उमेदवार मोठ्या

मताधिक्याने विजयी झाले. विरोधी स्वाभिमानी शेतकरी पॅनेलचा धुव्वा उडाला आहे.

दरम्यान,संचालक मंडळाच्या एकूण १७ जागांपैकी देसाई गटाचे ४ उमेदवार या पूर्वीच बिनविरोध निवडून आले

होते. त्यामुळे उर्वरित १३ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. मंगळवारी मतमोजणी होवून निकाल जाहीर

करण्यात आला. निकालानंतर देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव

साजरा केला.

कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटातून ११ जागांसाठी २२ उमेदवार तर महिला राखीव

गटातून २ जागांसाठी ४ उमेदवार अशा प्रकारे एकूण १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात होते..

विजयी उमेदवार असे, महिला राखीवमधून विश्रांती विजय देशमुख, दिपाली विश्वास पाटील, सर्वसाधारण

मतदारसंघातून सोमनाथ हिंदूराव खामकर, आनंदराव विठ्ठल चव्हाण, दिलीपराव बापूराव चव्हाण, अशोक मारूती

डिगे, शंभूराज शिवाजीराव देसाई, पांडुरंग आण्णासाहेब नलवडे, शशिकांत मोहनराव निकम, अशोकराव अनंतराव

पाटील, राजाराम रामचंद्र पाटील, व्यंकट बापूराव पाटील, संपत कृष्णा सत्रे. अनुसूचित जाती जमातीतून बबन

बळी भिसे, इतर मागास प्रवर्गातून राजेंद्र येडू गुरव, भटक्या विमुक्त जातीमधून विकास बाळगू गिरीगोसावी व

संस्था ब गटमधून शंकर पांडुरंग शेजवळ, हे उमेदवार या पूर्वीच बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशोधनाचा टक्का वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात मंगळवारी विद्यार्थीकेंद्री, विद्यापीठ आणि कॉलेजमधील संशोधनाला प्रोत्साहन देणारे बजेट सादर झाले. विद्यापीठातील व कॉलेजांमधील संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजनेसाठी ४६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. शैक्षणिक सहल अनुदानाची वाढीव रक्कम, शिक्षकांना संशोधनासाठी सहाय्य, बेटी बचाओ अभियानासाठी ५० हजार रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कारासाठी दोन लाख रुपयांची तरतूद या बजेटची वैशिष्ट्य आहे.

यंदा ने २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी ३६६.३३ कोटी रुपये जमा आणि ३७०.६६ कोटी रुपये खर्चाचे बजेट मंगळवारी झालेल्या अंदाजपत्रकात मांडण्यात आले. प्रशासकीय विभागांकडून ४५.३१ कोटी, शास्त्र अधिविभागाकडून २.५७ कोटी, अन्य विभागाकडून २.५६ कोटी जमा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अन्य उपक्रमांतून २८.२० कोटी असे एकूण ७८.६५ कोटी विद्यापीठाच्या स्वनिधीत जमा अपेक्षित आहे. सरकारकडून वेतन अनुदानासाठीचे ६४.४९ कोटी आणि अन्य विविध संस्थांकडून विविध प्रकल्पांसाठी ७६.३० कोटी जमा अपेक्षित आहे.

विद्यापीठाच्या संशोधन व विकास निधीतून १४. ९४ कोटी रक्कम जमेसाठी प्रस्तावित आहे. यासह घसारा निधीच्या शिल्लक रक्कमेतून ११.१२ कोटी रक्कम जमेसाठी प्रस्तावित आहे. निलंबन लेख्यांमधून १२०. ८४ कोटी जमा अपेक्षित आहे. या अंदाजपत्रकात विविध विभागांसाठी खर्चाचे नियोजन करण्यात आले. विद्यापीठाचे प्रशासकीय विभाग ५१.२५ कोटी, विज्ञान विभाग २.९१ कोटी, इतर अधिविभाग २.९४ कोटी, विद्यापीठाचे विविध सेवा व इतर उपक्रम ३१.७६ कोटी अशी विद्यापीठाच्या स्वनिधीतील ८८.८६ कोटीची खर्चाची तरतूद प्रस्तावित आहे. यासह घसारा निधी ११.१२ कोटी, संशोधन व विकास निधी १४.९४ कोटी, सरकारी वेतन अनुदानाचा खर्च ६४.४९ कोटी, विविध वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या निधीतून खर्चासाठी ७६.३० कोटी आणि निलंबन लेख्यांमध्ये ११४.९५ कोटी अशा एकूण ३७०. ६६ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अधिकारी एसीत, अतिक्रमणे ऐटीत

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, मुख्य रस्ते व चौक मोकळे असावेत यासाठी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाने फेरीवाला झोन घोषित केले. त्याची अंमलबजावणी कागदावरच राहिली असताना प्रमुख चौक आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर अनधिकृत केबिनची भर पडत आहे. फूटपाथ आणि चौक परिसरात बिनधिक्कतणे खोकी वाढत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अ​नधिकृत केबिन आणि अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबवण्याची आवश्यकता असताना प्रशासन मात्र थंड आहे. अधिकारी एसीत आणि अतिक्रमणे ऐटीत अशी​ शहरात स्थिती आहे.

प्रशासकीय पातळीवर अनिधकृत केबीनबाबत उदासीनता असताना नगरसेवकांची भूमिकाही सोयीचीच दिसते आहे. महापालिका निवडणुकीआधी शहर स्वच्छ, सुंदर, पार्किंग पॉलिसीच्या वल्गना करणारे अनेक नगरसेवक मात्र सध्या सोयीची भूमिका घेत आहेत. प्रभागातील राजकारण आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याच्या नावाखाली बेकायदेशीर केबीन, अनधिकृत टपऱ्यांना अभय देत आहेत. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातूनच अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून कारवाया थांबविण्याचे आदेश दिले जातात. गेल्या पाच महिन्यांत कोल्हापुरात जवळपास पाचशे अनधिकृत केबिन सुरू झाल्या. खाऊ गल्ली, बिंदू चौक, लक्ष्मीपुरी, दसरा चौक, महावीर कॉलेज परिसर, महावीर गार्डन, रामानंदनगर परिसर, शाहूपुरी, शिवाजी पेठेतील विविध भागात बेकायदेशीर केबिनचे पेव फुटले आहे.

मोहिमेचे नेतृत्व अधिकारी कधी करणार?

कोल्हापुरात यापूर्वी मास्टर प्लॅन, रस्ता रुंदीकरणसाठी अतिक्रमण आणि बेकायेदशीर केबिनविरोधात जोरदार मोहिमा राबविल्या. द्वारकानाथ कपूर यांच्या कालावधीत मास्टर प्लॅनची अंमलबजावणी झाली. त्यानंतर तत्कालीन आयुक्त राजगोपाल देवरा, श्रीनिवासन, कुणालकुमार, विजय सिंघल यांच्या कालावधीतही अनधिकृत बांधकाम, बेकायदेशीर झोपडपट्टीवर कारवाईच्या मोहिमा गाजल्या. हे अधिकारी स्वतः मोहिमेत सहभागी होते. त्यांना उपायुक्तांची साथ मिळायची. कोल्हापुरातील वाहतूक वाढली आहे. भाविक व पर्यटकांचा ओघ वाढला आहे. शहरातील रस्ते रुंद, अतिक्रमणमुक्त करण्याची आवश्यकता आहे. प्रमुख चौक आणि रस्त्यावर रोज बेकायदेशीर केबिनची भर पडत असताना प्रशासकीय पातळीवरून मात्र कारवाईचा धडाका दिसत नाही. वरिष्ठ अधिकारी मोहिमेत उतरले तर प्रभावी कारवाई होऊ शकते. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त, सहायक आयुक्त अशी मंडळी असताना अतिक्रमण हटावची सर्व भिस्त मात्र तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांवर आहे. काही नगरसेवकांकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जाते आणि मोहीम बारगळते. वरिष्ठ मंडळी मोहिमेत सहभागी झाल्याचे कधीच दिसत नाही.

................

खाऊ गल्लीत प्रमाण जास्त

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहलगतच्या खाऊ गल्लीतील अतिक्रमणावर तर कुणाचेच नियंत्रण नाही. खाऊ गल्ली सोडून आता रस्त्यावर केबिन थाटल्या आहेत. येथे अधिकृत केबीनची संख्या ६२ आहे. पण, या भागात संध्याकाळच्या वेळेला जवळपास शंभरावर बेकायदेशीर केबिन आहेत. फेरीवाला संघटनांनीही येथील अनधिकृत केबीनकडे लक्ष वेधले आहे. पण अतिक्रमण निर्मूलन पथकाने त्याठिकाणी कारवाईचे धाडस दाखवले नाही.

......

'माजी'कडून आदेश, 'आजी'कडून मनाई

रामानंदनगर पुलाजवळील बेकायदेशीर केबिन हटविण्याच्या सूचना माजी नगरसेवकांनी केली. त्यानुसार कर्मचारी घटनास्थळी गेले. कारवाईला सुरूवात होणार इतक्यात विद्यमान सदस्यांनी कर्मचाऱ्यांना फोनवरून केबिन हटवू नका असा आदेश दिला. पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयातूनच अनधिकृत कामावर कारवाई करू नका असे फोन जातात. आरटीओ ऑफिस परिसरातील बेकायदेशीर केबिनचा सर्व्हे करण्यासाठी कर्मचारी गेले असता एक सदस्य कसलीही खातरजमा न करता केबिन हटवू नका असे सांगतो आणि पथक परत फिरते.

दोघांच्या दोन तऱ्हा

महावीर उद्यान परिसरात बेकायदेशीर केबिन उभ्या राहिल्या आहेत. शाहूपुरीतील एका नगरसेवकाने अनधिकृत केबीन हटविण्याच्या सूचना केल्या. तर सत्तारूढ गटातील एका नगरसेवक बेकायदेशीर केबिनधारकांच्या पाठिशी राहिला. दोन नगरसेवकांच्या दोन तऱ्हा, यामुळे कुणाचे ऐकायचे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडतो. लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, ट्रेझरी ऑफिस परिसरात तर कुणीही उठावे आणि केबिन सुरू करावे अशी स्थिती आहे. उद्यमनगरमध्ये गटारीवर अनधिकृत बांधकाम केले आहे. क्रशर चौकात एका चायनिज सेंटरने रस्त्यावर पत्र्याचे शेड उभारले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली रस्त्याच्या टोल विरोधाने राज्य सरकारची कोंडी

$
0
0

म . टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील टोल लढा यशस्वी झाल्यानंतर आता कोल्हापूर - सांगली चौपदरीकरणाच्या रस्त्यावरील वाहतुकीलाही टोल घेतला जाऊ नये यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही टोलला विरोधाची जाहीर भूमिका घेतली आहे. त्यामुळे सरकारपुढे आव्हान उभे राहिले आहे.

कोल्हापूर महापालिकेने २२० कोटी रुपयांचा शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प २००८-०९ ला मंजूर झाला. महापालिका सभेत शहरात टोल लावण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, टोलची अंमलबजावणी सुरू झाल्यावर टोलला विरोध सुरू झाला. त्यावेळी राज्यात दोन्ही काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे पहिल्या टप्यात जिल्ह्यातील या दोन पक्षांनी बचावात्मक भूमिका घेतली. शिवसेना टोलविरोधात आक्रमक झाल्यानंतर भाजपही त्यामध्ये सहभागी झाला. त्यानंतर टोलविरोधी लोकभावना लक्षात आल्यानंतर दोन्ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही आंदोलनात उतरले. टोलनाके जाळण्यापर्यंत नागरिकांची आक्रमकता वाढली. त्यावेळी राज्यात सत्तेवर असलेल्या आपल्याच पक्षाविरोधी आंदोलनाची धार काँग्रेस राष्ट्रवादीप्रमाणे नंतर शिवसेना आणि भाजपने वाढवली. त्यामुळे अखेर कोल्हापूरला टोलमुक्त करण्याची घोषणा भाजप-शिवसेना सरकारला करावी लागली.

टोलचा एक लढा यशस्वी केल्यानंतर आता प्रस्तावित कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाच्या टोल विरोधात जनभावना एकवटत आहे. पालकमंत्री विरोधात सर्व पक्ष असे वातावरण तयार होत आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली करता येणार नाही, असे सांगताना कामाच्या पूर्ततेनंतर टोल वसुली होणारच असा दावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पातळीवर सुरू असलेला विरोध आता सर्व पक्षांत पोहोचला आहे.

भाजपचे खासदार संजय पाटील यांचाही टोलला विरोध आहे. खासदार राजू शेट्टी गेले दोन तीन वर्षापासून, टोल वसुली करू देणार नाही असे वारंवार सांगत आहेत. शिवसेनेचे आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, भाजपचे सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, जिल्हा परिषदेचे सभापती अनिल मादनाइक हे तर या टोलविरोधात सतत रस्त्यावर उतरत आहेत.

कोल्हापूर, सांगली, जयसिंगपूर, हातकणंगले या सर्वच भागातून टोलला विरोध सुरू आहे. टोलविरोधात सत्तेत असलेले भाजप, शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आक्रमक होत असल्याने भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांची कोंडी होणार आहे. राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर, काँग्रसचे अनिल यादव, धैर्यशिल माने यांच्यासह सर्वच स्थानिक नेतेही टोलच्या विरोधात आहेत. हा रस्ता वेळेत पूर्ण होत नसल्याने सुप्रीम कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली. या रस्त्याच्या कामाबाबत कोणत्याच पक्षाचे नेते अथवा कार्यकर्ते समाधानी नाहीत. त्यामुळे सरकारच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. सत्ताधारी खासदार व आमदारांनीच अशी भूमिका घेतल्याने संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही सांगलीतल्या बायपास पुलाची टोलवसूली मुदतीनंतरही सुरूच होती. ती कायमची बंद पाडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. सांगली कोल्हापूरच्या रस्त्यावरील टोलधाडही अशाच प्रकारे परतवून लावू. नवीन टोलधोरण जाहीर झाल्यानंतर वसुलीत पारदर्शकता आल्याशिवाय टोल वसूली करु देणार नाही.

सतीश साखळकर, अध्यक्ष मदन पाटील युवा मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीआय कार्यकर्त्याला मारणारे चौघे अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गांधीनगर (ता. करवीर) येथील व्यापारी आणि माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते (आरटीआय) अशोक हदुमल चंदवाणी (वय ४३) यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार हल्लेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. चंदवाणी यांना व्यावसायिक स्पर्धेतून ठार मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी देणारा व्यापारी सुरेश ऊर्फ पप्पू आहुजा (रा. धैर्यप्रसाद चौक, ताराबाई पार्क) हा फरारी आहे.

पोलिसांनी सुपारी घेणारे योगेश अशोक आझाटे (वय २५, रा. श्रीराम कॉलनी टेंबलाईवाडी), संदीप उर्फ चिम्या अशोक दोरकर (वय २८, रा. हनुमान गल्ली, टेंबलाईवाडी), बाळकृष्ण यल्लाप्पा किल्लेदार (रा. सरस्वती कॉलनी, टेंबलाईवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. चंदवाणी यांना १५ मार्च रोजी रात्री साडेसात वाजता शिरोली टोलनाक्याजवळ मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी लाथा-बुक्क्यांसह काठीने मारहाण केली. हा प्रकार गांधीनगर येथील व्यावसायिक स्पर्धेतून सुपारी देऊन झाल्याची माहिती निरीक्षक दिनकर मोहिते यांना कळाली. पोलिसांनी तपासात योगेश आझाटे, संदीप दोरकर, अजित कोराणे यांना ताब्यात घेतले. आहुजा यांनी सेंट्रिंग कर्मचारी बाळकृष्ण किल्लेदार यांच्या मदतीने तिघांना चंदवाणी याला मारण्यासाठी दीड लाखांची सुपारी दिली. या कामांसाठी २५ हजार रूपये अॅडव्हान्सही दिले होते. १७ मार्चला संशयितांनी पाळत ठेवून मारहाण केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकाऱ्यांकडून पंटरांची बडदास्त

$
0
0

Sachin.yadav@ timesgroup.com

आरसीटीसी, नोंदणी अर्जांसाठी लागणारी अत्यावश्यक सामग्री परिवहन आयुक्त कार्यालयाकडून कोल्हापूर आरटीओला मिळत नाही. त्याचा गैरफायदा काही एजंट आणि कार्यालयातील लिपिकांकडून केला जात आहे. कार्यालयात लिपिकांपेक्षा एजंटांचा वरचष्मा आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांकडे असलेला पंटरची बडदास्त कमी होणे गरजेचे आहे.

आरटीओ कार्यालयात साखळी पद्धतीने काम सुरू आहे. प्रत्येक अधिकारी आणि लिपिकांचे एजंट ठरलेले आहे. ते कार्यालयाच्या आवारात विशिष्ट ठिकाणी थांबतात. अनेकांचा व्यवहार हा फोर व्हिलर वाहनांत बसून चालतो. लिपिकांची आणि एजंटाची ही साखळी कायम आहे. मोटार वाहन निरीक्षकाचे स्पेशल पंटर आहेत. या पंटरकरवी यंत्रणेचा कारभार सुरू आहे. नेमून दिलेल्या कामात सर्वंच वाहन निरीक्षक तपासणी करतात असे नाही. काही निरीक्षक नियम धाब्यावर बसवून वाहनांचे पासिंग करतात. पासिंगचा सर्व कारभार पंटरकडून सुरू आहे. दररोज पासिंग आणि परमंट लायसन्सच्या येथील निरीक्षकांची ड्युटी बदलत असली तरी पंटरचा फंडा कायम आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांकडे दोन पंटर आहे. कार्यालय संपल्यानंतर खास आर्थिक व्यवहाराच्या मोजदादीसाठी विश्वासू पंटरची नेमणूक केली आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयाकडून बहुतांशी कागदोपत्री सामग्री मिळत नाही. त्याचा फायदा स्थानिक पातळीवरील एजंट घेतात. सध्या आरसी नोंदणीची स्टेशनरी मिळालेली नाही. त्यामुळे परराज्यात वाहन तपासणी पथकाकडून वाहनांची तपासणी केल्यास वेगळ्या कागदावरील आरसी बुक ग्राह्य मानले जात नाही. लर्निग आणि परमंट लायसन्ससाठी ऑनलाइन अपॉइमेंट केली आहे. मात्र अनेकदा आरटीओच्या सर्व्हर डाऊन असतो. त्याचा फटाका वाहनधारकांना बसत आहे. आरटीओ लक्ष्मण दराडे यांनी अनेकदा कार्यालयाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. ओळखपत्र, बाहेरील कर्मचाऱ्यांचा प्रवेश आणि काही कर्मचाऱ्यांना मेमोही दिला. मात्र अजूनही कार्यालयातील काहींची कनेक्टिव्हीटी एजंटाच्या सोबत आहे. त्याला चाप लावण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकची २.७ टीएमसी पाण्याची मागणी

$
0
0

Uddhav.Godase @timesgroup.com

कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटकालाही भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने कर्नाटकने महाराष्ट्र सरकारकडे २.७ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता वारणा आणि दूधगंगा (काळम्मावाडी) धरणांमधील पाणी कर्नाटकला दिल्यास कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीच्या सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र, कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असा विश्वास पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

यंदा कमी पाऊस पडल्याने महाराष्ट्रासह कर्नाटकातील धरणे पूर्णक्षमतेने भरलेली नाहीत. परिणामी पावसाळा संपताच पाणी वापराचे नियोजन करावे लागले. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमधील अपुरा पाणीसाठा लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्वच नद्यांवर पाळी पद्धतीने उपसाबंदी लागू केली आहे.

कोयना, वारणा आणि दूधगंगा धरणांवर उत्तर कर्नाटकातील जनता अवलंबून असते. या धरणांमधून योग्य पद्धतीने पाणीपुरवठा झाला नाही, तर उत्तर कर्नाटकातील शेतीसह नागरिक तहानलेले असतात, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा आणि दूधगंगा धरणांतून कर्नाटकसाठी करारानुसार दरवर्षी ३.४३ टीएमसी पाणी दिले जाते. यावेळी अपुरा पाऊस पडल्याने केवळ २.४४ टीएमसी पाणी कर्नाटकच्या वाट्याला आले होते. आजवर यातील १.१४ टीएमसी पाणी कर्नाटकने वापरले आहे, तर १.३० टीएमसी पाणी शिल्लक आहे.

वाढत्या दुष्काळामुळे कर्नाटकने महाराष्ट्र सरकारला वाढीव पाण्यासाठी साकडे घातले आहे. वारणा धरणातून २ टीएमसी आणि दूधगंगा धरणातून .७ टीएमसी पाणी मिळावे अशी मागणी महाराष्ट्राकडे केली आहे.

राज्य सरकारने त्याला मंजुरी देताच कर्नाटकसाठी गरजेनुसार पाणी साडले जाईल. मात्र, याचा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीवर विपरीत परिणाम होणार आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी शिल्लक राहावे यासाठी जिल्ह्यातील सर्वच धरणांमधील १५ टक्के पाणी राखीव ठेवले आहे, तर पाटबंधारे विभागाने दोन महिन्यांपासूनच उपसाबंदी लागू करून पाण्याचा काटेकोर वापर केला आहे. जिल्ह्यातील शेतीसाठी वापरात येणारे पाणी कर्नाटकला द्यावे लागले तर, उपसाबंदीची मर्यादा वाढणार आहे. शेतीसाठी पाणी मिळणे मुश्कील होणार असल्याने उभी पिके करपून जाण्याचा धोका आहे. त्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकार झाले सरळ...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातात सोन्याचे कडे, गळ्यात सोन्याचा गोफ, हातात उंची बनावटीचे घड्याळ, सोन्याचे कडे, उंची कपडे, डोळयावर काळा गॉगल असा रुबाब मारणारे सावकार सुतासारखे सरळ आले होते. पोलिसांच्या प्रश्नाला उत्तरे देताना त्यांची दमछाक झाल्याचे दिसत होती. पोलिसांच्या चौकशीमुळे सावकारांची 'शुगर' चांगलीच वाढली.

सोमवारी पोलिसांनी १२ सावकारांची यादी जाहीर केल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी दुपारनंतर ११ सावकारांना बोलावण्यात आले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या कक्षात हे सावकार एखाद्या कंपनीत मुलाखतीला जाणाऱ्या उमेदवारांसारखी कागदपत्रांची फाइल घेऊन बसले होते. प्रत्येक सावकार आपल्याला पवार बंधूंनी फसवले असल्याचे पोलिसांना सांगत होते. प्रत्येक सावकाराची निरीक्षक दिनकर मोहिते स्वतंत्रपणे चौकशी करत होते. यावेळी काही सावकार चेहरा लपवत होते. 'आम्ही कुठे गुन्हा केला?, आमचे पैसे बुडणार ते बुडणार आणि मग आमची कशाला चौकशी' असा त्यांचा सवाल होता. मोहिते यांच्या कार्यालयात अमोल पवार व विनायक पवार या दोन बंधूंना जमिनीवर बसविण्यात होते. त्यांच्यासमोर ​व्याजाने दिलेल्या रक्कमेची पोलिस खातरजमा करून घेत होते. एका सावकाराने तर २० लाख नव्हे तर ४० लाख रूपये दिले आहे असे मग्रुरीत उत्तर दिल्याने, पोलिसही अवाक झाले.

दरम्यान, सोमवारी सावकारांची सरबराई करण्यासाठी आपण गेलो नव्हतो असा खुलास माजी नगरसेवक रविंद्र आवळे यांनी केला आहे. विवाह समारंभातील पोलिस बँडचे भाडे भरण्यासाठी मी पोलिस मुख्यालयात गेलो होते असे आवळे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांचा बंद कायमच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशातील बहुसंख्य सराफ व्यावसायिकांचा अबकारी कराला विरोध असून आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. राष्ट्रीयस्तरावरील संघटनेशी येथील व्यापाऱ्यांनी ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधल्यानंतर निर्णय जाहीर करण्यात आला. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बुधवारी (ता. २३) कोल्हापूर सराफ संघ व जिल्हा सराफ संघाची बैठक होणार आहे. तर शुक्रवारी (ता.२५) मुंबई येथे जेम्स अँड ज्वेलरीची (जीजेएफ) बैठक होणार आहे.

मंगळवारी जीजेएफ या शिखर संघटनेची मुंबईत बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस देशातील ५० सराफ संघटना ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाल्या होत्या. कॉन्फरन्समध्ये ४० पेक्षा अधिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अबकारी कराचा निर्णय मागे घेतल्याशिवाय बंद मागे घेवू नये अशी भूमिका मांडली.

कोल्हापूर येथील माणिक जैन, सुहास जाधव, राजेश राठोड व किशोर परमार यांनी मते मांडली. दरम्यान, सुवर्णकारांच्या मागण्या मान्य झालेला नसताना बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. व्यावसायिकांमधील द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी राज्य सराफ सुवर्णकार संघाची बैठक पुणे येथे झाली. बैठकीत राज्याध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी बंद सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

कोल्हापुरात आज बैठक

दरम्यान, अबकारी करासंबंधी सुरू असलेल्या सराफांचा आंदोलनाचा आजचा २१ वा दिवस होता. बंद असलेल्या गुजरी कॉर्नर येथे दिवसभर व्यावसायिक बसून होते. यासंदर्भात सुरेश गायकवाड आणि भरत ओसवाल यांनी सांगितले की, कर हटल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सापडले ८३ कॉपीबहाद्दर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत आतापर्यंत कॉपीचे ५९ बारावीच्या परीक्षेत २४ गैरप्रकार घडल्याचे उघड झाले आहे. दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता असून त्याची पुर्नपरीक्षा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. तर बारावीचा निकाल २० मेच्या दरम्यान लागणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याचीही पुर्नपरीक्षा होईल अशी शक्यता आहे.

दहावीच्या परीक्षेत २२ मार्चअखेर बोर्डाच्या सात पथकांनी केलेल्या पाहणीत ५९ कॉपीबहाद्दर सापडले. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर धाडी टाकल्या. यापैकी सर्वाधिक कॉपीचे प्रकार कोल्हापुरातील आहेत. दहावी परीक्षेच्या कालावधीत गेल्यावर्षी कॉपीचे ५५ गैरप्रकार घडले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा यात वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांकडे अपेक्षित प्रश्नसंच, पुस्तकातील तसेच वह्यांची पाने आणि नोट्स काढलेली झेरॉक्सची पाने सापडली. यातही ३२ कॉपीबहाद्दर कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. बोर्डाच्या सात पथकांत एकूण तीस कर्मचारी सहभागी होते. आता २३ मार्च पासून दहावीच्या उत्तरपत्रिका संकलनाचे काम सुरु होणार आहे. बारावी परीक्षेमध्ये यंदा २४ कॉपीचे प्रकार घडले होते.



सर्वाधिक कॉपी गारगोटी केंद्रावर

दहावीची परीक्षा २९ मार्चला संपत असली तरी मुख्य विषयांची परीक्षा २२ मार्चचपर्यंत आहे. यांदरम्यान सर्वाधिक कॉपीचे गैरप्रकार गारगोटीतील शाळांमध्ये सापडले आहेत.

दहावी-बारावीच्या परीक्षेत यंदा कॉपीचे प्रमाण वाढले आहे. सात भरारी पथकांनी दहावीचे ५९ तर ‌बारावीचे २४ गैरप्रकार उघडकीस आणले आहेत. त्या विद्यार्थ्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

शरद गोसावी, सचिव, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

बारावीतील कॉपी

सातारा - ०८

सांगाली - ०५

कोल्हापूर - ११

एकूण - २४

दहावीतील कॉपी

सातारा - २१

सांगली- ६

कोल्हापूर - ३२

एकूण - ५९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलयुक्तच्या २६५ गावांत ४२० कोटी रुपयांची कामे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात २०१६-१७ या वर्षासाठी जलयुक्त शिवार योजनेतील २६५ गावांत ४२० कोटी रुपयांची कामे केली

जाणार आहेत. यामध्ये सर्वांचा सक्रिय सहभाग आणि नियोजन केल्याप्रमाणे प्रत्यक्षात काम केल्यास दोन

महिन्यांत अनेक वर्षांपासून भेडसावणारा दुष्काळाचा प्रश्न कायमस्वरुपी हद्दपार होऊ शकतो, असे प्रतिपादन

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले.

येथील रंगभवन सभागृहात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व जलयुक्त शिवार अभियानाबाबत सरपंच, क्षेत्रीय

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी

अरुण डोंगरे, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, उपजिल्हाधिकारी दिनेश

भालेदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.

मुंढे म्हणाले, जिल्ह्यातील ११४४ गावांसाठी ११५३३ योजना आहेत तरीही योजनेत पाणी नसल्यामुळे टंचाई

जाणवते, यासाठी पावसाचे पाणी जसस्त्रोतामध्ये आले पाहिजे. गेल्या अनेक वर्षांत निसर्ग नियमाच्या विरुद्ध

गेल्यामुळे पिण्याच्या पाण्याची खोली १९९५ पासून २० वर्षांत ८ मीटरने खाली गेली आहे. पिण्याच्या पाण्याचे

संकट दूर करण्यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब स्त्रोतामध्ये अडविला पाहिजे. पुनर्भरणामध्ये आहे त्या योजना

पुनर्जिवित करा, गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पुनर्जिवित केल्याशिवाय पर्याय नाही. मागील वर्षी विविध

गावांत अशा प्रकारची कामे झाली तिथे यामध्ये बदल दिसून येत आहेत.

लोकसहभाग महत्त्वाचा

३०एप्रिलपर्यंत सर्व स्त्रोतांचे पुनर्भरण करा. शेतीसाठी बांध-बंदिस्ती, योग्य त्या उपययोजना शंभर टक्के क्षेत्र उपचार

केले पाहिजेत. शेतातले पाणी शेतात आडवा, पीक पद्धतीत बदल करुन, ठिबकवर शेती करा, नदी नाल्याचे

लोकसहभागाद्वारे सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण करावे. त्याठिकाणी सरकारकडून सिमेंट नालाबांध करण्यात

येईल यासाठी निधीची अडचण नाही. विविध प्रकल्पातील अतिक्रमणांसह पूर्ण गाळ लोकसहभागाद्वारे काढावा.

शिवारातले पाणी शिवारातच थांबले पाहिजे. मागील वर्षी या कामांना ज्या गावांनी चांगला प्रतिसाद दिला तेथे

चांगली कामे झाली आहेत. गावकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या विकासासाठी योजना आहे. याद्वारे शिवार जलयुक्त होईल,

असा आत्मविश्वास जिल्हाधिकारी मुंढे यांनी व्यक्त केला.

जलयुक्तच्या २६५ गावांत पाझर तलाव, गाव तलाव आदी ३६०४ विविध प्रकल्प आहेत. लोकसहभागाद्वारे त्यातील

गाळ काढा सरकारकडून दुरुस्ती केली जाईल. शिवार जलयुक्त करावयाचे असेल तर प्रत्येक क्षेत्रावरील पाणी

अडवावे लागेल यासाठी प्रशासनाची टीम काम करीत आहे. त्यांना सक्रिय साथ देवून या संधीचा फायदा करून

घ्या. दोन महिन्यात २६५ गावांतील पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करून गावाला सुजलाम, सुफलाम करण्यासाठी

सक्रिय सहभाग घ्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फर्निचर दुकानांना पाचवडमध्ये आग

$
0
0

सातारा :

पाचवड (ता. वाई) येथे मुख्य बाजारपेठेत असलेल्या फर्निचरच्या दोन दुकानांना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास

भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. दोन सख्ख्या भावांची फर्निचरची दुकाने भस्मसात

झाली.

आगी विझविण्यासाठी पाचवड ग्रामस्थ, भुईंज पोलिस, रिलायन्स कंपनीचे कर्मचारी, किसन वीर सातारा साखर

कारखान्याचे अग्निशमन दलाच्या सांघिक प्रयत्नानंतरही तब्बल एका तासानंतर आग पूर्णपणे आली. आगीवर

नियंत्रण मिळविता आल्याने उर्वरित दुकाने वाचविण्यात यश आले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.

पाचवड येथील मुख्य बाजारपेठेत असणारे संतोष व रामदास सदाशिव पार्टे या दोन सख्ख्या भावांच्या कृष्णाई

फर्निचर व कृष्णामाई फर्निचर या दोन्ही दुकानांना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता अचानक आग लागली. काही

क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने धुराचे लोट वाई-सातारा रस्त्यावर येऊ लागले. त्यामुळे स्थानिक व्यापारी व

ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. पाहता पाहता घटनास्थळी

दोन-तीन हजार लोक गोळा झाले होते.

दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचा अंदाज नाही. आग शार्टसर्किटमुळे लागली असल्याची चर्चा

घटनास्थळी होती. कृष्णाई व कृष्णामाई फर्निचर या दुकानांच्या शेजारी दोन्ही बाजूला दुकानांची अखंड रांग आहे.

या आगीची तीव्रता वाढली असती तर मोठा अनर्थ झाला असता. सुदैवाने ती दुकाने वाचविण्यात यश आले असून,

कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस पाटील पद अद्यापही रिक्तच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड तालुक्यात १७७ गावांत पोलिस पाटील पद भरण्यासाठी सरकारच्या वतीने परीक्षा घेण्यात आल्या. या

परीक्षेत प्रत्यक्ष ३३५ उमेदवारांनी लेखी परीक्षा व मुलाखती दिल्या. त्यापैकी फक्त ११२ जणांची पोलिस पाटील पदे

भरण्यात आली असून, उर्वरित ५९ गावांतील पोलिस पाटील पदे भरण्यात आली नाहीत. या निवडीत ३९ महिलांची

तर ७३ पुरुषांची पोलिस पाटीलपदी वर्णी लागली आहे. मात्र, नांदगावमध्ये एक जागेचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात

आलेला आहे.

कराड तालुक्यातील २२२ गावांपैकी १७७ गावांमध्ये पोलिस पाटील पदे भरण्यात येणार होती. या पदांसाठी २२ व

२३ रोजी लेखी परीक्षा व त्यानंतर तोंडी मुलाखती देखील घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी मंडलनिहायक

उमेदवारांच्या परीक्षा घेण्यात आल्या. पोलिस पाटील पदासाठी तालुक्यातील एकूण १३ मंडलांतील ११८ गावांतील

इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्षरितीने परीक्षा दिल्या. या परीक्षेसाठी दहावीपासून ते पदवीधर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या

युवक व युवतींसह महिलांनीही प्रयत्न केले होते. ग्रामीण भागात गावांतील तंटामुक्तीसाठी पोलिस पाटील या

व्यक्तीची महत्त्वाची गरज असते. गावातील कौटुंबिक कलह, जाती-जातीतील भांडणे पोलिसांपर्यंत न नेता ती

गावपातळीवर सोडविण्यासाठी व गावातील सलोखा राखण्यासाठी पोलिस पाटलाची निवड केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईला फेरीवाल्यांचा विरोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील अनधिकृत केबिन आणि बेकायदेशीरिरित्या व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांच्या विरोधात महापा​लिका प्रशासनाने, २९ मार्चपासून कारवाईचा निर्णय घेतला आहे. ज्या फेरीवाल्यांकडे बायोमेट्रिक कार्ड नसतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याने फेरीवाले - प्रशासन आमनेसामने उभे ठाकणार आहे. महापालिकेने यापूर्वी सर्व्हे केलेल्या ८६०० फेरीवाल्यांपैकी जवळपास ६००० फेरीवाल्यांकडे बायोमेट्रिक कार्ड नाहीत. अशा फेरीवाल्यांसाठी फेरीवाले संघटना पुढे सरसावल्या आहेत. सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेऊन, महापालिकेला पोलिस संरक्षण पुरवू नये अशी मागणी केली.

शहरातील प्रमुख चौकातं आणि रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर केबिन थाटण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. महापालिकेकडून कसलाही परवाना न घेता बिनधिक्कतपणे केबिन थाटणारे आणि बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे. शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत केबिनधारकांच्या विरोधातील कारवाई संदर्भात बुधवारी पोलिस अधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक झाली.

सर्व्हे होऊनही महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळे सगळ्यांना बायोमेट्रिक कार्ड मिळू शकलेले नाहीत. परिणामी महापालिकेच्या कारवाईचा फटका अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना बसू शकतो, तो फेरीवाल्यांवर अन्याय ठरेल असे सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखाली फेरीवाला संघटनांचे प्रतिनिधी सुभाष वोरा, दिलीप पोवार, नंदकुमार वळंजू, रमाकांत उरसाल, अशोक भंडारे, सुरेश जरग, महंमदशरीफ शेख, रघुनाथ कांबळे, प्र. द. गणपुले, समीर नदाफ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापालिकेच्या कारवाईविरोधात फेरीवाल्यांनी संघटित होण्याचे ठरले. फेरीवाल्यांच्या नियोजनाबाबत कायदेशीर बाबींची पूर्तता होत नाही तोपर्यंत शहरातील कोणत्याही फेरीवाल्यास हलवू नये या भूमिकेवर प्रतिनिधी ठाम आहेत. सायंकाळी त्यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन महापालिका प्रशासानाने २९ तारखेपासून कारवाईसाठी मागितलेले पोलिस संरक्षण पुरवू नये अशी मागणी केली. शिष्टमंडळात फेरीवाल्यांच्या प्रतिनिधीसह अस्लम बागवान, किरण गवळी, विजय नागावकर, राजेंद्र महाडिक, शिला पाटील, सुनंदा देसाई, शांता गुरव, सुलोचना यादव, मीना पवार आदींचा समावेश होता.

गेल्या काही महिन्यांत शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीररित्या जी केबिन्स सुरू झाली आहेत, त्यांच्यावर कारवाईला फेरीवाला संघटनाचा विरोध नाही. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनप्रश्नी महापालिका प्रशासन आणि फेरीवाला समिती प्रयत्नशील आहे. अजून अंतिम निर्णय ठरलेला नाही. त्याअगोदरच प्रशासनाने कारवाईची घाई करू नये. केवळ बायामेट्रिक कार्ड नाहीत म्हणून कारवाई होऊ नये.

आर. के. पोवार (निमंत्रक, फेरीवाले कृती समिती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैयाकुमारची पुणे, कोल्हापुरात सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे प्रमुख कन्हैयाकुमार यांची पुणे येथे सभा घेतली जाणार आहे. पुण्यानंतर त्यांची कोल्हापूर येथे सभा होईल. सभेला कोणाचाही होणारा विरोधाला जुमानणार नाही' अशी असल्याची माहिती ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय कार्यकारिणी परिषद सदस्य गिरीश फोंडे, एआयएसएफचे जिल्हा सेक्रेटरी प्रशांत आंबी, शहर सेक्रेटरी आरती रेडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गिरीश फोंडे म्हणाले, 'पुणे येथील विद्यार्थ्यांचा कन्हैयाकुमार यांच्या सभेला विरोध आहे. भाजप युवा मोर्चाही त्याला विरोध करीत आहे. मात्र महात्मा फुले यांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी ही जाहीर सभा घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्यभरातील संघटनेचे कार्यकर्त्यांकडून पुरेसे पाठबळ दिले जाणार आहे. पुणे येथे सभा झाल्यानंतर कोल्हापुरातही सभा घेतली जाईल. त्याबाबत दूरध्वनीवरुन कन्हैयाकुमार यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनीही सभेसाठी सहमती दर्शविली आहे. रानडे इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना भाजप युवा मोर्चाकडून धमकी दिली आहे. या धमकीचा निषेध करून राज्यातील पुरोगामी युवक विद्यार्थी संघटना या विद्यार्थ्यांच्या पाठिशी उभ्या राहणार आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून सामाजिक वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न केला जात आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळाप्रश्नी प्रशासन-नगरसेवक संघर्ष चिघळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका सभागृहाने एकमताने फेटाळलेला घरफाळावाढीचा प्रस्ताव मंजूर करावा, यासाठी प्रशासनाने तो राज्य सरकारकडे पाठवला आहे. चाळीस टक्क्यापर्यंत घरफाळावाढीचा हा प्रस्ताव होता. उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत नसल्याने घरफाळावाढ आकारणीच्या विचारात प्रशासन आहे. त्यामुळे या प्रश्नावरून प्रशासन आणि नगरसेवकांत संघर्ष अटळ आहे.

महापालिकेने मार्च २०११ मध्ये भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली स्वीकारली आहे. त्या आधारे प्रशासनाने एक ए​प्रिलपासून भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणीचा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सभागृहापुढे ठेवला होता. रेडीरेकनरच्या दरावर आकारणी ठरणार असल्याने घरफाळ्यात १५ ते ४० टक्क्यापर्यंत वाढ होणार होती. मिळकतकरात चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याने महापालिका सभागृहाने २० फेब्रुवारीला झालेल्या सभेत हा प्रस्ताव फेटाळला. तसेच आगामी पाच वर्षे घरफाळ्यात वाढ न करण्याचा निर्णयही घेतला. दुसरीकडे प्रशासनाने उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून घरफाळा वाढ अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने घरफाळावाढीचा ठराव सभागृहाने वीस फेब्रुवारीच्या सभेत फेटाळला होता. त्यानंतर महापौर कार्यालयाकडून त्या ठरावावर सही होऊन १७ मार्च रोजी आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला.

प्रशासनाने, सर्वसाधारण सभेने फेटाळलेला ठराव रद्द करण्यासाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे बुधवारी सादर केलाहे. घरफाळाप्रश्नी नगरसेवक आणि प्रशासन दोन टोकावर आहेत. महापौर, उपमहापौरांसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी घरफाळावाढीला एकमुखी विरोध केला आहे. पक्षीय पातळीवरूनही घरफाळावाढीला यापूर्वीच विरोध झाला आहे. प्रशासनाकडून राज्य सरकारच्या माध्यमातून घरफाळावाढ आकारणीच्या हालचाली सुरू आहेत. एलबीटी बंद झाल्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आहेत.

महापालिकेचा गाडा हाकण्यासाठी प्रशासनाला नव्या आर्थिक स्त्रोतांचा आधार घ्यावा लागणार आहे. शहरातील मिळकतींचा सर्व्हे, नव्या मिळकतींचा शोध घेऊन घरफाळा आकारणीच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. खासगी संस्थेतर्फे शहरातील मिळकतींचा सर्व्हे सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणी करून येत्या आर्थिक वर्षात सध्याच्या उ​द्दिष्टापेक्षा आणखी १५ कोटी रुपये जादा महसूल जमा करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. मात्र राज्यात अन्य कुठल्याही शहरात भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारण्यात आलेली नाही. मग कोल्हापुरातच प्रयोग कशासाठी? असा नगरसेवकांचा सवाल आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिनसूर्य महाराज यांचे निर्वाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कासार गल्लीतील जिनसेन मठातील १०५ जिनसूर्य महाराज यांचे शुक्रवारी निर्वाण झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निर्वाण झाले. त्यांचे पार्थिव रात्री कोल्हापुरात आणले असून, शनिवारी (ता.२६) सकाळी अकरा वाजता रुकडी (ता. हातकणंगले) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जिनसूर्य महाराजांचे येथील जिनसेन मठामध्ये २९ वर्षापासून वास्तव्य होते. त्यापूर्वी त्यांनी १०८ बाहुबली महाराजांकडून दीक्षा घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे उपचारासाठी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी त्यांचे निर्वाण झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी रात्री येथील मठामध्ये आणण्यात आले. शनिवारी सकाळी सात ते दहापर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी जिनसेन मठामध्ये ठेवण्यात येणार आहे. अंत्ययात्रेला मठापासून सुरुवात होणार असून भाऊसिंगजी रोड, महाद्वार रोड, गुजरी, सीपीआरमार्गे पार्थिव रुकडीला जाणार आहे. सकाळी अकरा वाजता रुकडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

जिनसूर्य महाराज देशभूषण महाराजांबरोबर कोथळी येथील संघ जयपूरपासून मुंबईपर्यंत घेऊन आले होते. जवळपास २९ वर्षांपासून जिनसेन मठात वास्तव्यास असलेल्या जिनसूर्य महाराजांनी विविध ठिकाणचे जुने जैन ग्रंथ मागवून येथे त्यांचा ठेवा जतन केला होता. त्यांच्या कार्यामुळेच जिनसेन मठ नावारूपाला आला. त्यांनी जैन धर्मीयांना उपदेश देत जागृती करण्याचा अखंड प्रयत्न केला. त्यांनी मठामध्ये जैन मंदिरही स्थापन केले असून, त्यामुळे श्राविकांची मोठी सोय झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images