Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शेतकरी मेळावा

$
0
0

शेतकरी मेळावा

सोलापूर

राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या वतीने २२ मार्च जागतिक जलदिनाचे औचित्य साधून १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने रविवारी दुपारी ४ ते ६.३० या वेळेत शिरापूर पंपगृह क्रमांक १ येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उजनी कालवा उपविभागाचे सहायक अभियंता एस. के. हरसुरे यांनी दिली आहे. जलसंपदाचे अधीक्षक अभियंता प्रकल्पाची माहिती देणार असून, अधुनिक सिंचन पद्धत, सोलर पंप तसेच पीक नियोजनाबाबत जैन इरिगेशनचे वैज्ञानिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मलकापूरच्या नगराध्यक्षपदी कल्पना रैनाक निश्चित

$
0
0



कराड

मलकापूर येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातून कल्पना रैनाक यांनी आपला उमेदवारी

अर्ज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र तेली यांच्याकडे दाखल केला. अर्ज

दाखल करण्याच्या मुदतीमध्ये केवळ एकच अर्ज आल्याने कल्पना रैनाक यांची नगराध्यपदी निवड निश्चित झाली

असून, या बाबतची औपचारिक घोषणा मंगळवारी (दि.२२) रोजी दुपारी करण्यात येणार आहे.

मलकापूर नगरपंचायतीची सप्टेंबर २०१३मध्ये सार्वत्रिक निवडणूक होऊन पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित

जातीच्या महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव होते. त्यानुसार सुनंदा साठे यांची नगराध्यपदी निवड करण्यात आली.

त्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवड

प्रक्रियेनुसार या पदासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत रैनाक यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. अर्ज वैध ठरल्याने

यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या बाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी निवडी दिवशी

निवडणूक निर्णय अधिकारी करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल चोरट्यांची इचलकरंजीत टोळी ताब्यात

$
0
0

इचलकरंजी : कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकात धुमाकुळ घालणाऱ्या मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीला शनिवारी इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. शाहीद सरदार मोमीन (वय २४, रा. वृंदावन कॉलनी), फिरोज आलमशहा फकीर ( वय २५, रा. साळुंखे मळा), ताहिर शकील जमादार (वय २३, रा. यड्राव सूतगिरणीसमोर) मुनीर उर्फ मुन्ना मेहबुब मोमीन (वय २६, रा. सुरभी कॉलनी), शिवाजी सुभाष सनदी (वय ३०, रा. मैलखड्डानजीक परिसर) आणि प्रमोद विजय बुचडे (वय २८, रा. विक्रमनगर) अशी त्या चोरट्यांची नावे आहेत. या कारवाईत सुमारे दिड लाखांच्या ६ मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत.

इचलकरंजी परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक उपनगरात गस्त घालताना शाहीद सरदार मोमीन हा सांगली रोडवर मोटारसायकलवरून संशयास्पदरित्या फिरताना आढळला. विना नंबरप्लेटच्या या मोटारसायकलीबाबत विचारणा केली असता त्याने चोरीची गाडी खरेदी केल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोटरसायकली जप्त केल्या. चौकशीत त्याने साथीदारांची नावे उघड केली. या माहितीप्रमाणे गुन्हे शोध पथकाने आणखी पाचजणांना अटक केली. सनदी याने इचलकरंजी, कोल्हापूर, शहापूर, हातकणंगले येथून ४ मोटरसायकली चोरल्या होत्या तर बुचडे याने सांगली व निपाणीतून मोटारसायकली चोरल्या. मुनीर याने मोटारसायकली आपल्या गॅरेजमध्ये ठेवल्या होत्या असे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक युवराज सूर्यवंशी यांनी सांगितले. कारवाईत महेश कोरे, वैभव दड्डीकर, मोहन पाटील, राजू पट्टणकुडे, ज्ञानेश्‍वर बांगर, संजय ङ्गडतारे, विजय तळसकर, रविराज कोळी आदी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षकांची रिक्त पदे भरू’

$
0
0

म. टा. प्र‌तिनिधी, कोल्हापूर

'जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न नाही. याउलट २१ मुख्याध्यापक पदे आणि ६ पदवीधर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. लवकरच ती भरण्यासाठी प्रयत्न केले जातील' असे असे राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी केले. महासैनिक दरबार हॉल ये‌थे जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हा शिक्षण पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील होत्या.

माने म्हणाले, 'शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक असून, त्यांच्याशिवाय विद्यार्थी प्रगत होऊ शकत नाही. त्यामुळे शिक्षकांनीच पुढाकार घेऊन शाळा शंभर टक्के प्रगत करणे आवश्यक आहे. पूर्वी खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांना कमी लेखले जायचे. मात्र, शाळांनी वेगवेगळे बदल, उपक्रम राबवित शाळांची गुणवत्ता वाढवत दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आता सर्व शाळा प्रगत होण्यासाठी शिक्षकांनी प्रतिज्ञा केल्यास १०० टक्के शाळा प्रगत होऊ शकतील. तसेच शिक्षकांच्या प्रश्नाबाबत शिक्षकांना संच मान्यता दिलेली असून, सर्व शिक्षकांना सरल डाटा बेसमध्ये याबाबत महिती मिळू शकते. याचबरोबर शिक्षकांना ४ टक्के तादील अनुदान देण्यात आले आहे.'

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख म्हणाले, 'ज्या व्यक्तीला कसं आणि का जगायचं हे कळले ती व्यक्ती आयुष्यात नेहमी यशस्वी होते. व्यक्तीने केवळ भाव, विचार, कृती आणि वाणी या चार गोष्टी दिल्यास त्याला आयुष्यात खूप काही मिळू शकते.'

यावेळी सभापती अभिजीत तायशेटे, स्मिता गौड यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगले यांनी प्रास्ताविक केले.सहायक आयुक्त व माजी शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांना राष्ट्रीय स्तरावरील आदर्श प्रशासक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गणेश देशपांडे, शाहूवाडीचे सभापती पंडित नलवडे, हिंदुराव चौगुले, सीमा पाटील, ज्योती पाटील, अरुण इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते.

सहा हजार बेंच

इतर विद्यार्थ्यांप्रमाणे तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनाही बेंचची सुविधा मिळावी म्हणून या वर्षी जिल्हा परिषदेला सहा हजार बेंच मंजूर करण्यात आले. त्यापैकी तीन तालुक्यांना दीड हजार बेंच पाठविण्यात आले. ज्या शाळांना बेंचची आवश्यकता आहे, अशाच शाळांना प्राधान्य द्या. नाहीतर बेंच पळविले जाण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचा टोला माने यांनी मारला.

यांना मिळाले शिक्षक पुरस्कार

२०१४ - तानाजी पावले, रेखा पाटील, रमेश कोळी, विलास पाटील, कलाप्पा अभिमनभावी, राजेंद्र भोरे, नंदकुमार जाधव, वर्षा केनवडे, दिलीप खाडे, शिवाजी पाटील, शाहू चौगुले, समीर चौगुले, समीर मुल्लाणी, दिलीप कोळी व विशेष पुरस्कार नंदकुमार वड्ड आणि आनंदा मोगणे यांना देण्यात आला.

२०१५ - शामराव कांबळे, प्रकाश पाटील, रघुनाथ शिंदे, सुहा शिंत्रे, अशोक वसगडे, मारुती लांबोरे, संजय दाभाडे, नारकर नामदेव, श‌शीकुमार पाटील, राजश्री काळे, नवीद पटेल, चित्रगार चिदंबर तर विशेष पुरस्कार सुनिल देसाई आणि तानाजी रानमाळे यांना देऊन गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बांधकाम’च्या अहवालाशिवाय टोलवसुली नाही

$
0
0

कोल्हापूर ः कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत सुप्रिम कंपनीने टोलवसुलीसाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय टोल वसुली सुरू होणार नाही. प्रमाणपत्र देण्यापूर्वीच टोलविरोधी आंदोलन सुरू झाले असून आंदोलनासाठी आणखी एक विषय मिळाला असल्याचा उपरोधिक टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. कन्यागत पर्व, नाइट लँडिंग, तीर्थविकास आराखड्यासाठी यापूर्वीच तरतूद केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात जिल्ह्याला काहीच मिळाले नाही, असे म्हणने चुकीचे असल्याचे पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार लहान वाहनांना टोलमधून वगळले आहे. तरीही सुप्रिम कंपनीने कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी टोलवसुलीसाठी तयारी सुरू केली आहे. कंपनीने ९५ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा केला असला, तरी बांधकाम विभागाकडून काम पूर्ण झाल्याचा अहवाल दिल्याशिवाय टोल वसुलीला सुरुवात होणार नाही. अहवाल देण्यापूर्वीच आंदोलन करणे चुकीचे आहे. शाहू जन्मस्थळासाठी १५ कोटीची तरतूद केली आहे. तर नाइट लँडिंगसाठी तीन कोटी निधी लागणार आहे. यासाठी केंद्रीय विमानपत्तनकडे प्रस्ताव पाठवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकीत सूतगिरण्यांना १३ कोटींचे उद्दीष्ट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या चार जिल्ह्यांतील थकीत सहकारी सूत गिरण्यांना ३१ मार्चअखेर सोलापूर वस्त्रोद्योग विभागाने १३ कोटी रुपये वसुलीचे उद्दीष्ट दिले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा निर्णय इचलकरंजी येथे सूत गिरणी प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला आहे. एनसीडीसी योजनेंतर्गत यंत्रमाग सहकारी संस्थांना मिळालेल्या अर्थसहाय्याची थकीत रक्कम भरणे आणि एकरकमी परतफेड योजनेसंदर्भात राज्य सरकारची भूमिका यावर चर्चेसाठी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग महासंघाने इचलकरंजीत संस्थाचालकांची बैठक नवमहाराष्ट्र सहकारी सूत गिरणीत वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, राहुल आवाडे, सुनील सांगले, मोहन भिडे आदी पदाधिकाऱ्यांसह चार जिल्ह्यांतील सूत गिरण्यांच्या कार्यकारी संचालकांची बैठक झाली.

राज्य सरकारच्या योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू झालेल्या ६८ संस्था युतीच्या काळातील, १४१ नवीन संस्था, १४ अॅटो यंत्रमाग सोसायटी आणि ६० खेळते भांडवल घेतलेल्या संस्थांपैकी २६२ संस्थाकडून ४०० कोटी रुपये येणे बाकी आहे. दरवर्षी व्याज आणि दंडामुळे ही रक्कम वाढत असल्याने पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग महासंघाने सन २०११ पासून पुढाकार घेत वसुली सुरू केली आहे. यंदा सोलापूरच्या वस्त्रोद्योग विभागाने राज्याला ३ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातून ३१ मार्चपूर्वी २ कोटी रुपयांचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार सर्वच संस्थाचालकांनी ही रक्कम भरण्याचा निर्णय घेतल्याचे स्वामी यांनी सांगितले. रक्कम न भरणाऱ्या संस्थांच्या अतिरिक्त जमिनी व संस्थेची मालमत्ता सरकार लिलावात काढणार असल्याने संस्थाचालकांनी देय रक्कम भरण्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग महासंघाचे अध्यक्ष सुनील तोडकर यांनी केले. यावेळी सुरेशदादा पाटील, दत्तात्रय मोहिते, महादेव गौड, मारुती जाधव, धनराज खंडेलवाल, आर. के. पाटील आदी उपस्थित होते.

एकरकमी भरण्याचा प्रस्ताव

कोल्हापूर जिल्ह्यात एनसीडीसी योजनेतून उभारलेल्या २६२ संस्थांचे सुमारे १६५ कोटी रुपये एकरक्कमी परतफेड योजनेतून भरण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवला असल्याचेही स्वामी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकडी, कैरीने फुलला बाजार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाढत्या उन्हामुळे सध्या बाजारात पालेभाज्याबरोबर काकडी, कैरी, मुळा, टोमॅटो याचबरोबर फळांमध्ये द्राक्षे, कलिंगडला अधिक मागणी आहे. बाजारात लवकरच हापूस आंबाही दाखल होत आहे. या आठवड्या कडधान्यांचे दर स्थिर आहेत तर पालेभाज्यांची आवकही वाढली होती.

आठवड्याच्या बाजारात जादा आवक असल्यामुळे पालेभाज्या ‌किंवा फळभाज्यांचे दर स्थिर असतात. त्यामुळे सकाळी सात वाजल्यापासूनच रात्री उशीरापर्यंत बाजारात गर्दी दिसते. कोल्हापूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तालुक्यांतून ताजी भाजी थेट बाजारात येत असल्यामुळे ग्राहकही चार दिवसांची भाजी एकदम खरेदी करण्यासाठी रविवारचा दिवस निवडतात. आठवड्यात बाजारात कोथिंबीर, टोमॅटो, शेवगा शेंग, मेथी आणि पालक या भाज्यांची आवक वाढलेली होती. त्यामुळे या भाज्यांचे दरही स्थिर होते.

शहरातील लक्ष्मीपुरी, कपिलतीर्थ, राजारामपुरी भाजी मार्केटमध्ये शिरोळ, हातकणंगले परिसरासह सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कर्नाटकातील बेळगाव परिसरातून आवक होते. कैरीला मागणी असल्यामुळे १० रुपयाला ४ ते ५ कैऱ्यांची विक्री होत आहे. काकडी ६० रुपये किलोने विक्री सुरू आहे. धान्य बाजारात या आठवड्यात दर स्थिर आहेत. तांदूळ, गहू, ज्वारी यांसह कडधान्यांचेही दर स्थिर राहिले. आटा, गरा, पोहे, चहापूड, शाबू आदींचेही दर स्थिर असून खाद्यतेलांच्या दरातही बदल झालेला नाही. सरकी ६८ रुपये, सूर्यफूल ९० रुपये, शेंगतेल १२० रुपये, खोबरेल १९० रुपये असे दर कायम आहेत.

फळभाज्यांचे दर स्थिर

आठवड्यात ग्राहकांच्या मागणीप्रमाणे फळभाज्यांची आवक असल्याने दर स्थिर होते. सर्वच फळभाजीसह मेथी, चाकवत, आंबाडा, पालक, पोकळा, शेपू भाज्यांची आवक वाढली आहे. फ्लॉवर व कोबीच्या दरात या आठवड्यातही वाढ झालेली नसल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

कलिंगड, अननसाची आवक

उन्हाचा पारा वाढत असल्याने कलिंगड, द्राक्ष आणि अननस फळांची आवक वाढली आहेत. शहरातील विविध ठिकाणी कलिंगडचे मार्केट दिसून येत आहे. साधारण ३० ते ९० रुपयांपर्यंत कलिंगडची बाजारात विक्री होत आहे. अन्य फळांमध्ये स्ट्रॉबेरी १६० रुपये किलो, सफरचंद ८० ते ११० रुपये, डाळिंब ५० ते ८०, मोसंबी ६० ते ८० रुपये, चिकू ५० ते ६०, पपई २० ते ५० रुपये प्रतिनग असे दर आहेत. फळबाजारात अंजीर, चिक्कू, हापूस आंबा, तोतापुरी आंबा, पिअर्स, केळी, किव्ही दिसून येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ संघाचा सलग अठरा दिवस बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सराफ संघटनेचा बंद सलग अठरा दिवसानंतरही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत वरिष्ठ पातळीवरून आदेश येत नाही तोपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाची बैठक झाली.

अबकारी कराला विरोध करण्यासाठी सराफांनी व्यवसाय बंद ठेवला आहे. दरम्यानच्या काळात विविध आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. पुढील आंदोलनाची काय दिशा असेल, या संदर्भात निर्णय घेण्यासाठी व्यावसायिकांची व्यापक बैठक दैवज्ञ बोर्डिंग येथे झाली.

कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी देशभरातील आंदोलनाचा आढावा घेतला. आज, उद्या केंद्रीय स्तरावर जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनबरोबर इतर संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह संबंधित घटकांशी भेट घेत आहेत. त्यातून काही आशादायक चित्र दिसेल, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर आंदोलनाची दिशा ठरवू, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलेला वाममार्गाला लावणाऱ्या दोघांवर गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

विधवेशी विवाह करून तिला वाममार्गाला लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोरोची येथील शिक्षण संस्थाचालक प्रा. शरद कांबळे याच्यासह मच्छिंद्र मोहिते (रा. कोसुंब, देवरुख जि. रत्नागिरी) या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. याबाबत इचलकरंजीतील पीडित महिलेने फिर्याद दिली.

पोलिसांनी सांगितले की, इचलकरंजीतील या संबंधित महिलेचा पतीचा २००९ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर कोरोची (ता. हातकणंगले) येथील प्रा. शरद कांबळे याने वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून तिला देवरुख येथील मच्छिंद्र मोहिते याचे स्थळ सुचविले. बड्या इंजिनीअरशी विवाह लावून देतो असे सांगून शरद कांबळेने विवाहासाठी या महिलेकडे एक लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे त्याला महिलेच्या कुटुंबियांनी ८० हजार रुपये दिले. त्यानंतर देवरुखला २१ फेब्रुवारी २०१६ रोजी मोहिते याच्याशी या महिलेचा विवाह झाला. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तिचा भ्रमनिरास झाला. घरात मद्यपी लोकांचा वावर, त्यांचे अश्लिल बोलणे यासह मोहिते याच्या अत्याचाराला तिला सामोरे जावे लागले. शरद कांबळे आणि मोहिते हे दोघेही घरात तिच्यासमोर अर्धनग्न अवस्थेत फिरत. तिच्याशी अश्लिल चाळे व लगट करण्याचा प्रयत्न करीत. मोहिते अन्य एका महिलेशी फोनवरून अश्लिल संभाषण करायचा. बंगल्यातील इतर खोल्यांमध्ये आश्रमातील काही महिलांचा इतर व्यक्तीसोबत वावर असायचा. हा प्रकार पाहता आपल्यालाही वाममार्गाला लावल्याचा संशय पीडित महिलेला आला. तिने धाडसाने भाऊ आणि वडिलांशी संपर्क साधून माहिती दिली आणि सुटका करून घेतली.

तक्रार दडपण्याचा प्रयत्न

या महिलेने घडलेली घटना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सांगून फिर्याद नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस निरिक्षक संजय साळुंखे यांनी पीडित महिलेला पोलिस ठाण्यातून हाकलून लावले. हा प्रकार पोलिस उपअधिक्षक विनायक नरळे यांच्यासमोरच घडला असे सांगण्यात आले. दरम्यान, वृत्तपत्रांना याची माहिती समजल्यावर वरिष्ठांच्या आदेशनांतर सायंकाळी उशीरा या महिलेची फिर्याद नोंदवून घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीककर्ज तीन टक्क्याने देण्याचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बँकांकडून अल्पदरात पीक कर्जपुरवठा केला जातो. पीक कर्जावरील व्याज सवलत तातडीने मिळत नसल्याने एनपीए वाढत आहे. त्यामुळे तीन बँकांचा परवाना बंद झाला आहे. यासाठी नाबार्डकडून चार टक्के दराने होणारा कर्जपुरवठा तीन टक्के करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवून पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. कोल्हापूर, नाशिक व सोलापूर जिल्हा बँकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, 'राज्यातील ३१ बँकांपैकी २९ बँका सुरू आहेत. दहा बँकांचे एनपीए प्रमाण वाढल्याने डेंजर झोनमध्ये आहेत. त्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी नाबार्ड, सहकार आयुक्तांनी प्रत्येक खात्याची स्वतंत्र चौकशी करुन मार्गदर्शन करावे. सेवा सोसायटींचे सचिव सक्षम करण्यासाठी त्यांना नियमित पगार देण्यसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे.

नाशिक बँकेचे सीइओ सुभाष देसले यांनी राज्य बँक आणि नाबार्डकडून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत खडे बोल सुनावले. राज्य बँकेकडे ठेवाव्या लागणाऱ्या ठेवींवर एक टक्का कर लावला जातो. त्यामुळे बँकांच्या अडचणीत भर पडत आहे. जिल्हा बँकेवर जिल्हा उपनिबंधकांना संचालक म्हणून नियुक्त केले आहे. मात्र ते एकाही बैठकीला उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी जिल्हा बँकेचे सीइओ प्रतापसिंह चव्हाण कोल्हापूर जिल्हा बँकेचा आढावा घेतला.

यावेळी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हा बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ, नाबार्डचे यू. ए. सहा, राज्य बँकेचे प्रशासक एम. एल. सुखदेव, विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप ऊर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, सर्जेराव पाटील - पेरीडकर, निवेदिता माने, उदयानी साळुंखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अहवालानंतरच टोलवसुली होणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करत सुप्रिम कंपनीने टोलवसुलीसाठी जय्यत तयारी केली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय टोल वसुली सुरू होणार नाही. प्रमाणपत्र देण्यापूर्वीच टोलविरोधी आंदोलन सुरू झाले असून आंदोलनासाठी आणखी एक विषय मिळाला असल्याचा उपरोधिक टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

कन्यागत पर्व, नाइट लँडिंग, तीर्थविकास आराखड्यासाठी यापूर्वीच तरतूद केली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात जिल्ह्याला काहीच मिळाले नाही, असे म्हणने चुकीचे असल्याचे पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार लहान वाहनांना टोलमधून वगळले आहे. तरीही सुप्रिम कंपनीने कोल्हापूर-सांगली रस्त्यासाठी टोलवसुलीसाठी तयारी सुरू केली आहे. कंपनीने ९५ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा केला असला, तरी बांधकाम विभागाकडून काम पूर्ण झाल्याचा अहवाल दिल्याशिवाय टोल वसुलीला सुरुवात होणार नाही. अहवाल देण्यापूर्वीच आंदोलन करणे चुकीचे आहे. शाहू जन्मस्थळासाठी १५ कोटीची तरतूद केल्याचे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कडक ऊन, पाणीटंचाईने सोलापूरकर हैराण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
मागील दोन महिन्यांपासून दुष्काळाने होरपळून निघत असलेला सोलापूर जिल्हा आता कडक ऊन आणि पाणीटंचाईने पुरता हैराण झाला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्नही बिकट बनत चालला आहे. दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या सवलती अद्याप मिळाल्या नाहीत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्यात आला नव्हता. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्वच लोकप्रतिनिधींनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्हा दुष्काळी जाहीर केला; मात्र सरकारच्या दुष्काळी मदतीपासून बहुतेक गावे दूरच आहेत.
माळशिरस, बार्शी, सांगोला, करमाळा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ या तालुक्यांमध्ये आजही दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे. चारा आणि पाण्याचा प्रश्न कायम असून, अनेक गावे आणि वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. ग्रामीण भागातील सर्व तलाव कोरडे ठणठणीत पडले आहेत. विहिरींमध्येही पाण्याचा ठणठणाट आहे. हजारो हातपंप पाण्याविना बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीही पायपीट करावी लागत आहे. टँकरची मागणी करूनही टँकरचे पाणी मिळत नाही. दुष्काळी जाहीर झाल्यानंतर तरी टँकरचे पाणी मिळेल, अशी अपेक्षा होती; पण अद्यापही मागणी केलेल्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.
जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती व नंदेश्वर तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील घोडातांडा, आहेरवाडी, वळसंग, करमाळा, मद्रे, पांडे, तर अक्कलकोटमधील जेऊर आदी ठिकाणी एकूण बारा टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. माणसांना कसेबसे पाणी मिळत आहे; पण जनावरांच्या पाण्याची अत्यंत भीषण टंचाई जाणवत आहे. तरीही प्रशासनाकडून काहीच हालचाल दिसत नाही.
दरम्यान, प्रशासनाकडे मागणी करूनही टँकर मिळत नसल्यामुळे अखेर लोकप्रतिनिधींनीच स्वखर्चाने ठिकठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे; पण मागणीच्या तुलनेत हा पाणीपुरवठा तोकडा पडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडीत टेम्पो घुसून चार वारकरी ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
वनवासाला निघालेल्या दिंडीमध्ये भरधाव निघालेला टेम्पो घुसून झालेल्या भीषण अपघातात एका महिला वारकऱ्यासह चार वारकरी जागीच ठार झाले. वीस वारकरी जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात पहाटे पाचच्या सुमारास सोलापूर-पुणे रस्त्यावरील मोहोळनजीक घडला. अंधाराचा फायदा घेऊन टेम्पो चालक टेम्पोसह फरार झाला आहे.
मृतांमध्ये दत्तात्रय शेंडगे, विलास साठे, भाऊसाहेब जाधव आणि जिजाबाई गाडे (सर्व रा. वडाळा ता. उत्तर सोलापूर) यांचा समावेश आहे. टेम्पोची धडक इतकी भीषण होती की, वारकरी चिरडून जागीच ठार झाले. इतर २० वारकरी कमी अधिक प्रमाणात जखमी झाले. काहींची प्रकृती गंभीर आहे. सर्व मृतांवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
उत्तर सोलापूर तालु्क्यातील वडाळा गावामध्ये रामायण सुरू आहे. रामायणाच्या परंपरेचा एक भाग म्हणून काही वारकरी चौदा दिवस वनवासासाठी बाहेर जाऊन राहण्याची रुढ आहे. रविवारी २० मार्च रोजी सकाळी अकरा वाजता वडाळा येथून २५ वारकरी दिंडी घेऊन निघाले होते. मोहोळच्या अलिकडे लांबोटी येथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला होता. पहाटे लवकर उठून वारकरी भजन करीत मोहोळच्या दिशेने निघाले होते. वडवळजवळील कमानीजवळ ते थांबले. त्याठिकाणी सर्वांनी वडवळच्या नागनाथ महाराजांचा अभंग गायला. त्यानंतर ते मोहोळच्या दिशेने मार्गस्थ झाले. मोहोळच्या अलिकडे सदिच्छा हॉटेल व दादासाहेब बोडके यांच्या फार्मजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेला आयशर टेम्पो थेट दिंडीत घुसला. पहाटे ५.२० वाजता हा भीषण अपघात झाला. या अंधाराचा फायदा घेऊन टेम्पो चालक तेथून फरार झाला.
अपघात झाल्याचे समजताच मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मोहोळ पोलिस तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. रस्त्याच्या कडेला पडलेले चारही मृतदेह बाजूला करून जखमींना वाहनांमध्ये बसवून मोहोळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल केले. त्यापैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर टेम्पो चालक वाहनासह फरार झाला आहे. पोलिसांनी तपासासाठी नाकेबंदी केली आहे. परंतु, वाहन आणि त्यांचा चालक अद्यापही सापडलेला नाही.
दरम्यान, अपघाताची बातमी गावात कळताच अखंड गाव शोकसागरात बुडाले. रविवारी सकाळी सर्व वारकऱ्यांना मोठ्या भक्तीमय वातावरणात वनवासासाठी जाण्यास निरोप दिला होता. चौदा दिवसांच्या वनवासानंतर त्यांचे वडाळा गावात आगमन होणार होते. वडाळा गाव सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही घटना घडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन उड्डाणपूल, महामार्गाच्या मांचे गडकरींच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापुरातील दोन उड्डाणपूल आणि महामार्गांच्या कामांचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक आणि रस्ते विकास मंत्री

नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २६) होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष

रावसाहेब दानवे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमला उपस्थित राहणार असून, जुळे सोलापुरात जाहीर सभेचेही

आयोजन करण्यात आले आहे.

१४४७.५६ कोटी रुपये खर्चून करून सुमारे ११९ किलोमीटर लांबीच्या सोलापूर-विजापूर रस्त्याचे चौपदरीकरण. २५०

कोटी रुपये खर्चून २२५ किलोमीटरच्या सोलापूर-कोल्हापूर रस्त्याचे चौपदरीकरण. एक हजार कोटी रुपये खर्चून

११० किलोमीटरच्या सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर रस्त्याचे चौपदरीकरण व दुपदरीकरण. १०७ कोटी रुपये खर्चून

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊवरील टेंभुर्णी अंतर्गत रस्ता, सहा किलोमीटरचा भुयारी मार्ग. ४०० कोटी रुपये खर्चून

सुमारे सहा किलोमीटरचा जुना पुणेनाका-विजापूर रस्ता उड्डाणपूल आणि ५०६ रुपये खर्चून साडेसह किलोमीटरचा

बोरामणी नाका-विजापूर रस्ता उड्डाणपूल, अशा सुमारे २५ हजार कोटी रुपयांच्या कामांचा प्रारभ शनिवारी होणार

आहे.

गडकरी सुशीलकुमारांच्या घरी

विविध विकास कामांचे उद्घाटन झाल्यानंतर नितीन गडकरी दुपारी साडेचार वाजता माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार

शिंदे यांची सातरस्ता येथील जनवात्सय, या निवासस्थांनी जाऊन भेट देणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवार झाले लोक चळवळी’

$
0
0


सोलापूर

जलयुक्त शिवार योजना सरकारी योजना म्हणून न राबविता स्वत:ची योजना म्हणून राबवावी. जलयुक्त शिवार

योजनेच्या कामाला चांगला लोकसहभाग मिळाला त्यामुळे लोकचळवळीचे स्वरुप आले असल्याची माहिती

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी व बोरामणी येथील शिवगंगा पाझर तलाव, ओढ्यातील गाळ काढणे,

सरळीकरण करण्याच्या कामाचा प्रारंभ करताना बोलत मुंढे बोलत होते.

मुंढे म्हणाले, पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे आणि पाण्याचा अपव्यय केल्यामुळे वारंवार दुष्काळी

परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. या बाबत सर्वकष विचार करून पीक पद्धतीत बदल, पाणी वापराच्या

नियोजनात बदल केला पाहिजे. शेतावर शंभर टक्के बांध बंधिस्त केल्यास शेतातील पाणी शेतात अडेल. विहीर

पुर्नभरण करून गावातले पाणी गावात अडवा. नदी नाल्याचे खोलीकरण, सरळीकरण. गाळ काढण्याचे काम

लोकसहभागातून करावे. त्याची दुरुस्ती तसेच त्यावर आवश्यकतेनुसार सिमेंट नाला बांध सरकारच्या वतीने केला

जाईल. नदी-नाले या शेतीच्या रक्तवाहिन्या आहेत. त्या जोपर्यंत वाहणार नाहीत तोपर्यत शेतीचा विकास होणार

नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उजनीतील २४ टीएमसी पाणी गेले कुठे

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'पाण्याची उपलब्धता पाहूनच शहरांनी आपले पाय पसरावेत. सोलापूर शहराला पिण्यासाठी वर्षाकाठी केवळ सव्वा

टीएमसी पाणी लागते. मात्र, यंदा उजनी धरणातून सोलापूरकरांना पिण्यासाठी सुमारे २५ टीएमसी पाणी सोडण्यात

आले. त्यामुळे उजनीतून सोडलेले २४ टीएमसी पाणी गेले कुठे? याचा शोध घ्या,' असे आवाहन महाराष्ट्र सिंचन

सहयोगचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे यांनी केले.

जागतिक जलदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ड्रीम फाउंडेशन, महाराष्ट्र विकास केंद्र पुणे

व अभिनव कॉमर्स क्लब पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जलक्रांतीकारक शिवयोगी सिद्धरामेश्वर नगरीत (हुतात्मा

स्मृती मंदिर) चौथे राष्ट्रीय जलसाक्षरता संमेलन मंगळवारपासून सुरू झाले. संमेलनाचे उद्घाटन गौडगावचे ष. ब्र.

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. मोरे

बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून हिवरे बाजारचे प्रणेते पोपटराव पवार व ज्ञानेश्वर बोडके तर संमेलनाध्यक्ष

म्हणून जोहडकार सुरेखा शहा उपस्थित होत्या.

डॉ. मोरे म्हणाले, 'सोलापूर शहरातील दहा लाख लोकसंख्येला प्रतिमानसी प्रतिदिन १०० लिटर प्रमाणे दरवर्षी

सव्वा टीएमसी पाणी लागते. माज्ञ, वर्षभरात तब्बल २५ टीएमसी पाणी उजनीतून सोडले जाते. या पाण्याचा वापर

नेमका कसा आणि कुठे होतो याचा शोध घ्या.

पाणीच उपलब्ध नसेल तर शहरे आपण कशासाठी वाढवत आहोत. शहरीकरणाला माझा विरोध नाही. मात्र,

एखाद्या शहराने किती मोठे व्हावे याला आपला विरोध आहे. पाणी नसेल तर शहर स्मार्ट होणार नाही.

सोलापूरला पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा केला जातो हे स्मार्टपणाचे लक्षण आहे काय? ७० वर्षानंतरसुद्धा

शहरात सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही ही खेदाची बाब आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणवर

कामे करून आपण पाठ थोपटून घेत आहोत. परंतु त्या पाण्यातून पुन्हा ऊस वाढणार असेल तर त्याचा उपयोग

नाही.'

उसावर प्रतिबंध आवश्यक

सोलापूर जिल्ह्यात देशात सर्वाधिक पाणीसाठा केला जातो. त्यामुळे जिल्ह्यावर आलेले जलसंकट नैसर्गिक की

मानवनिर्मित याचा विचार होणे गरजेचे आहे. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही म्हणणे चुकीचे आहे. उजनी

भोवतालच्या दोन लाख हेक्टरपेक्षा जास्त उसाच्या क्षेत्राला १६० टीएमसी पाणी लागते त्यामुळे जास्त पाणी

पिणाऱ्या ऊस पिकावरच प्रतिबंध घातला पाहिजे. समाजाला उपयोगी असलेल्या धोरणाच्या विरोधात कांही घडत

असेल तर आता जनरेट्याचीच गरज आहे. उस ठिबकवर आणल्याने प्रश्न मिटणार नाही, असेही मोरे म्हणाले.

पोपटराव पवारांना पुरस्कार

कार्यक्रमात हिवरे बाजारचे प्रणेते पोपटराव पवार आणि डॉ. दि. ना. मोरे यांना महाराष्ट्राचे जलनायक पुरस्काराने

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह

आणि वृक्ष, असे या पुरस्काराचे स्वरुप होते. शास्त्रज्ञ अरुण देशपांडे, कृषिभूषण दादा बोडके, माढ्याचे युवा

शेतकरी बाळासाहेब पाटील आणि कल्लप्पा भतगुणकी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

......

कोट

सोलापूर शहरात बांधकाम, शौचालय व गॅरेजच्या माध्यमातून लाखो लिटर पाणी आजही वाया घालविले जाते.

पाण्याचे मोठे आव्हान शहरासमोर आहे. पाण्याची नासाडी पाहिल्यानंतर मनाला वेदना होतात. लोकांमध्ये

जलसाक्षरतेची भावना निर्माण झाली पाहिजे. जलसाक्षरतेच्या माध्यमातून पाण्याचे महत्व पटवून सांगणे गरजेचे

बनले आहे.

विजयकुमार काळम-पाटील, आयुक्त सोलापूर महापालिका

पाणी हे अमूल्य धन आहे. त्याचा आपण जपून वापर केला पाहिजे. एकीकडे लोक दुष्काळाने ग्रासले असताना

दुसरीकडे मात्र रात्रंदिवस पाणी वाहून जाते. सुजाण नागरीक म्हणून पाण्याची बचत व काटकसर केली पाहिजे.

पाणी हा सामाजिक व राष्ट्रीय पर्यावरणाचा प्रश्न बनला आहे.

सुरेखा शहा, समेलनाध्यक्षा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आगीत गॅरेजचे दीड कोटींचे नुकसान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
मलकापूर येथील ट्रक बॉडी बांधणी करणाऱ्या गॅरेजला रविवारी आग लागून तीन नवीन ट्रकांसह अनेक वाहने, मशिन व कृषिपंप दुकानातील साहित्यही जळून खाक झाले आहे. आगीत सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कराड तालुक्यातील बानुगडेवाडी येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागून एक दोन म्हैशी आणि एक रेडकू होरपळल्याने यातील म्हैशीचा मृत्यू झाला आहे. गोठ्याशेजारील घरालाही या आगीची झळ बसली.यामध्ये जीवनावश्यक साहित्य जळाल्याने हजारोंचे नुकसान झाले आहे. कोपर्डे हवेली येथील ऊस शेतास आग लागून शेतकऱ्यांचा सुमारे दहा एकर ऊस जळून खाक झाला आहे.
मलकापूर येथील आगीत भक्षस्थानी पडलेल्या गॅरेजचे नाव गोल्डन ट्रक बाँडी बिल्डिंग मोटर्स, असे आहे. या प्रकरणी गॅरेजचे मालक जुबेर अजिज मांगलेकर (वय ३८, कराड) यांनी येथील शहर पोलिसांत खबर दिली आहे. गॅरेजच्या शेजारील कृषिपंप दुकानातील साहित्यही आगीच्या भक्षस्थानी पडल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
कराड शहरासह तालुक्यात तीन ठिकाणी लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांसह एका गरीब कारागिराचे मोठे नुकसान झाले आहे.
चार-पाच ट्रक चॅसिसि, काही बॉडी तयार केलेले ट्रक, बॉडी बिल्ट करणाऱ्या मशिन व गॅरेज लाकडांचे असल्याने त्याची लाकडे यामुळे पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीच्या आवाजाने आसपासच्या लोकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
दुसऱ्या एका घटनेत कराड तालुक्यातील बानुगडेवाडी येथे जनावरांच्या गोठ्याला आग लागून एक दोन म्हैशी आणि एक रेडकू होरपळले. यातील म्हैशीचा मृत्यू झाला, तर गोठ्याशेजारील घरालाही या आगीची झळ बसून जीवनावश्यक साहित्य जळाले.
आगीची तिसरी घटना कोपर्डे हवेली (ता. कराड) येथे भवानी नावाच्या शिवारात घडली. आगीत दहा एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे शिवारातील उर्वरीत ऊस आगीपासून बचावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचारी मंत्र्यांना तुरुंगात डांबा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
'राज्याच्या जलसंपदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून कालवे व धरणांची कामे अपूर्ण आहेत. सिंचन योजना अपूर्ण असल्याने भीषण दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागात भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांना तुरुंगात डांबून त्यांच्याकडून भ्रष्टाचाराची सर्व रक्कम वसूल करावी,' अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी करून स्वतःच्याच पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार व सुनील तटकरे यांना पुन्हा लक्ष्य केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे म्हणाले, 'मी पक्ष-बिक्ष मानत नाही. जनता हाच माझा पक्ष आहे. पाणी अडवा-पाणी जिरवा, अशी पूर्वीच्या राज्यकर्त्यांची योजना होती; मात्र आताच्या राज्यकर्त्यांनी त्या योजनेला 'लोकांना अडवा आणि लोकांचे जिरवा,' अशी बनवली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचा विकास झाला नाही. दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. राज्यकर्त्यांनी जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे धरणे-कालव्यांची कामे अपूर्ण राहिली आहेत. भ्रष्टाचार केला नसता तर आज सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असते. आज दुष्काळाची तीव्रता इतकी जाणवली नसती.'
'भ्रष्ट मंत्र्यांच्या गाड्या अडवून जनतेने जाब विचारला पाहिजे. त्यांचे फिरणे मुश्कील केले पाहिजे. जलसंपदा खात्याच्या माजी मंत्र्यांच्या व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार आहे,' असेही ते म्हणाले.
भारतमातेचा आदर राखलाच पाहिजे. 'भारत माता की जय' म्हणायला लाज का वाटते? राजकारणासाठी काही राजकीय लोक जाती-धर्मांत तेढ निर्माण करत आहेत, ते चुकीचे आहे. लोकांनी मूठभर स्वार्थी लोकांच्या वक्तव्याला बळी पडू नये. देश अखंड राहिला पाहिजे, असेही उदयनराजे भोसले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मार्चअखेरचा’चा शेतकरी कर्जदारांना धसका

$
0
0

सातारा
मार्चअखेरमुळे शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या घरांवर वसुली पथके धडकू लागली आहेत. दुष्काळामुळे खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसाच आला नाही, उलट घरातील दागदागिने मोडून शेतीचा आणि जनावरांचा खर्च भागवावा लागत आहे. वसुली पथकांचा धसका घेतलेले शेतकरी सकाळपासूनच घराबाहेर पडत आहे.
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तलाव, विहिरी, हातपंप आणि बोअरवेल आटल्या आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा गंभीर झाला आहे. त्यात भर म्हणून शेतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या दारात बँका वसुलीसाठी हेलपाटे मारत आहेत. महिन्याभरापासून नोटीसा येत असल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
विहिरी, पाइपलाइन आणि इतर कामांसाठी अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकाचे कर्ज घेतलेले आहे. मात्र, दुष्काळामुळे शेतीचे अर्थचक्रच कोलमडून पडले आहे.
बाजारपेठांत शुकशुकाट
दुष्काळाच्या वाढत्या दाहकतेमुळे औंधसह परिसरातील आठवडा बाजारांवर विपरीत परिणाम झाला आहे. बाजारपेठांमधील उलाढाल थंडावली आहे. धान्य खरेदी-विक्री जवळपास बंद पडली आहे. लग्नसराईचे दिवस असूनही बाजारात काहीच हालचाल दिसत नाही. शेतकरी, चाकरमानी, नागरिकांच्या हातात खेळता पैसाच नसल्याने सर्वत्र मंदीचे वातावरण जाणवू लागले आहे. व्यापारी वर्गही हवालदिल झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

$
0
0

सातारा
पाणीकपातीची उपाययोजना म्हणून सातारा शहराचा पाणीपुरवठा दर मंगळवारी बंद राहणार आहे. सातारा शहराला प्रामुख्याने कास तलाव आणि शहापूर योजनेतून पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसांमध्ये पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाल्याने आठवड्यातून एकदा पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यानुसार दर मंगळवारी शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुढील आठवड्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
कासची पाणीपातळी पंधरा फुटांवर आल्याने आणि बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्याने दिवसाआड पाणी कपात करण्यात यावी, असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. मात्र, आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्यात यावी, अशा निर्णय घेण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images