Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ग्राहक हक्कांचे व्हावे संरक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा प्रशासनातर्फे जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याहस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. सैनी यांनी ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, संवर्धन व त्यांचे प्रबोधन होण्याची गरज व्यक्त केली. ग्राहकांचे प्रबोधन व्हावे, दैनंदिन व्यवहारात त्यांची फसवणूक टाळावी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी शासकीय, निमशासकीय विभागांच्या सहयोगाने भवानी मंडप येथे ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी म्हणाले, 'दैनंदिन व्यवहारामध्ये ग्राहकांची अनेक बाबतीत फसवणूक होत असते. ती टाळण्यासाठी फसवणूक झाल्यास त्याविरुद्ध कोठे व कशी दाद मागावी याबाबत व्यापक प्रमाणात प्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधनपर प्रदर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घ्यावा.'

अन्न व औषध प्रशासनाने विविध खाद्य पदार्थांमधील भेसळीचे नमुने व ते कसे ओळखावेत या संबंधीची माहिती देणारे फलक व पुस्तिका ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिल्या. प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा विषयक माहिती देण्यात आली. वजन मापे विभागानेही विविध वजन मापे व त्या संबंधाने होणारी फसवणूक कशी टाळावी या संबंधीची माहिती उपस्थितांना दिली.

यासह परिवहन महामंडळ, डाकघर, भविष्य निर्वाह निधी, गॅस कंपन्या यांनीही ग्राहकांसाठी उपयुक्त माहिती देणारे स्टॉल्स उभारले होते. जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष शरद मडके हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. तहसीलदार योगेश खरमाटे यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी आभार मानले. ग्राहक हक्क संघटनेचे संजय हुक्केरी, जिल्हा संघटक बी. जे. पाटील, यशवंतराव शेळके उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाजली रणरागिणींची झुंज

0
0

Maruti.Patil@ timesgroup.com

कोल्हापूर : वय केवळ १६ ते १७ वर्षे. पण जिंकण्याची जबरदस्त इच्छा. 'आक्रमण हाच बचाव' या तंत्राचा अवलंब करत कोणत्याही संघाशी दोन हात करण्याचा दृढ निश्चित आणि आत्मविश्वास त्यांच्या मनात भिनलेला. या आत्मविश्वासाच्या जोरावर जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील राजर्षी शाहू निवासी शाळेतील विद्यार्थींनी मुंबई पोलिस वरिष्ठ संघाला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. उपउपांत्य फेरीत त्यांना याच संघाकडून केवळ एक गुणांने (२४-२३) पराभव पत्करावा लागला तरी, या रणरागिणींनी दिलेल्या झुंजीमुळे त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव झाला.

शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस दिल्यानंतर अनेकांनी रोख रक्कम देवून रणरागिणींच्या खेळाचे कौतुक केले. मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद मुंबई संघाने पटकावले तरी मने मात्र कोल्हापूरच्या रणरागिणींनी जिंकले. जिल्हा परिषदेच्यावतीने २०१४ पासून शिंगणापूर येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू केली आहे. केवळ दीड वर्षात सुरू झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कामगिरीने सर्वांनाच आश्चर्य चकीत केले आहे. अभ्यासबरोबर येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच कामगिरीची पुनरावृत्ती मुंबई महापौर महिला कबड्डी स्पर्धेत करुन दाखवली आहे. देवगड (जामसांडे) येथे स्पर्धेनिमित्त गेलेल्या मुलींच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाने सर्वाना प्रभावीत करत विजेतेपद पटकावले. संघाच्या खेळाने प्रभावीत झालेल्या मुंबई महापालिकेने महापौर कबड्डी स्पर्धेसाठी निमंत्रित केले. वरीष्ठ गटाची स्पर्धा असल्याने संघाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते.

मात्र, कबड्डीतील अनेकांना आश्चर्याचा धक्का देत साखळी फेरीतील सर्व सामने एकतर्फी खिशात टाकले. मात्र, उपउपांत्य फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. मुंबईच्या वरिष्ठ पोलिस संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला तरी, प्रेक्षकांची मने जिंकण्यात त्या यशस्वी ठरल्या. अत्यंत संघर्षपूर्ण लढतीत त्यांनी आपल्यापेक्षा सरासरी पाच ते दहा वर्षांच्या खेळाडूंना जोरदार टक्कर दिली. सामन्यात आसावरी खोचरे, मृणाल टोणपे, प्राजक्ता पाटील यांनी केलेल्या चढायांनी तर वैशाली कांबळे, ऋतुजा कडलगे यांच्या पकडीमुळे मुंबई संघाला जेरीस आणले. अनुभवी मुंबई संघाने सामना २३-२३ असा बरोबरीत आणून जिंकला.

केवळ एक गुणाने संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र खासदार किर्तीकर यांनी मैदानात येऊन कौतुक करताच त्यांच्याभोवती प्रेक्षकांचा गरडाच पडला. भारवून गेलेल्या मुलींनी महाराणी ताराराणींचा जयघोष करत लढाऊ बाणा दाखवून दिला. प्रेक्षकांच्या मिळालेल्या पाठिंब्यानंतर गुरुवार (ता.१७) पासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी कबड्डी स्पर्धेसाठी सज्ज झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या टोलचे रणशिंग!

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कोल्हापूर-सांगली चौपदरीकरणाचे काम अपुर्ण असताना टोल वसुली सुरू करण्याच्या निर्णयाविरोधात गुरुवारी जयसिंगपुरात सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने रणशिंग फुंकले. यावेळी अंकली टोलनाक्याला कडाडून विरोध करण्यात आला. टोल हटाव आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी २७ मार्चला पुन्हा बैठक बोलाविण्यात आली आहे.

रस्त्याचे काम अद्याप पूर्ण नसताना सुप्रीम कंपनीने एक मेपासून टोल वसुलीची तयारी सुरू केल्याने शिरोळ तालुक्यात नागरिक संतप्त झाले आहेत. कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाल्याचे सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने सांगितले आहे. मात्र, शिरोळ तालुक्यात अनेक कामे अपूर्ण आहेत. रखडलेली कामे पूर्ण करण्याची मागणी होत असतानाच सुप्रीम कंपनीने टोल वसुलीसाठी नाका उभारणीचे काम हाती घेतले आहे. याबाबत गुरुवारी नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत नगराध्यक्ष युवराज शहा, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, जि.प. सदस्य सावकर मादनाईक, अॅड. संभाजीराजे नाईक प्रमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोषारोपपत्र ३३ जणांवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संचालक मंडळाच्या निष्काळजीपणामुळे दि रवि को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक हितास बाधा पोहोचवल्याप्रकरणी एकूण ३३ जणांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुरुवारी दोषारोपपत्र दाखल करुन नोटीस लागू केली.

यात चार माजी नगरसेवक आहेत. या सर्वांच्यावर आठ कारणांच्या आधारे सुमारे १० कोटी रुपयांची जबाबदारी निश्चिती केली आहे. विभागीय उपनिबंधक आणि दि रवि को ऑप बँकेचे प्राधिकृत चौकशी अधिकारी रंजन लाखे यांनी हा कारवाई केली. याबाबत नोटीस धारकांना लेखी कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यासाठी ३० मार्च सकाळी ११ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. बँकेच्या आर्थिक स्थैर्य धोक्यात आणणारी कर्जाची थकबाकी ८ कोटी ६८ लाख रुपये निश्चित केली. ५६२.३७ लाख रुपये थकबाकी कॅश क्रेडिट कर्जाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोलिसांनो, ट्विटर, व्हॉट्सअॅप वापरा’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि ट्विटरचा वापर करावा, असा आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी दिला. पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे आणि सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह सांगली, पुणे ग्रामीण येथील अधीक्षक या जिल्हास्तरीय बैठकीस उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर भर दिला आहे. देशातील सर्व पोलिस महासंचालकांची नुकतीच राजस्थान येथे पंतप्रधान मोदी यांनी बैठक घेतली होती. बैठकीत पोलिसांचा समाजाशी सलोखा वाढावा, यासाठी ४० सूचना केल्या आहेत. त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रात जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात या सूचनांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचा उपयोग समाजाशी जोडण्यासाठी पोलिसांनी करावा. व्हाट्सअॅप व ट्विटर अकाऊंट उघडा. त्यासाठी विशेष प्रशिक्षण घ्यावे, अशी सूचना करण्यात आली. कल्याण निधीसाठी कार्यक्रम आयोजित करावेत, पोलिस मित्र वाढविण्याची चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आपलं बजेट’ घडवेल कोल्हापूरचा विकास

0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सामान्यांचा आधार असलेल्या केएमटीचे सक्षमीकरण, उद्यानांचे सुशोभीकरण, रिंगरोडसारख्या रस्त्यांची गरज, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पर्यटकांच्या संख्येसाठी आवश्यक असणारी पार्किंग सुविधा, शहरवासियांचे आरोग्य जपण्यासाठी ड्रेनेज लाइनची असणारी गरज अशा शहरवासियांच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या अपेक्षांचा आता महापालिकेच्या बजेटमध्ये केवळ विचार नव्हे तर त्याबाबत तरतूद करुन त्या पूर्ण केल्या जाणार आहेत.

'महाराष्ट्र टाइम्स' च्या 'आपलं बजेट, आपलं कोल्हापूर' मोहिमेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कोल्हापूरवासियांनी विकासकामांबाबत मांडलेल्या अपेक्षा महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या. त्यावेळी सभापती जाधव यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'च्या माध्यमातून शहरवासियांनी मांडलेल्या या अपेक्षा निश्चितच पूर्ण करण्याची ग्वाही दिली.

'महाराष्ट्र टाइम्स' चे निवासी संपादक विजय जाधव व मुख्य प्रतिनिधी गुरुबाळ माळी यांच्या हस्ते सभापती जाधव, सभागृह नेता प्रविण केसरकर, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजीत कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुनिल पाटील, ताराराणी मार्केट प्रभाग समिती सभापती राजसिंह शेळके, परिवहन ​​समिती सदस्य शेखर कुसाळे यांच्याकडे 'आपलं बजेट, आपलं कोल्हापूर' सादर केले.

महापालिकेचे बजेट म्हणजे शहरवासियांच्या दररोजच्या जगण्याला सहाय्यभूत करण्यासाठी जुन्या योजनांचे सक्षमीकरण व गरजांनुसार नवनव्या संकल्पनांची अंमलबजावणी करण्याचे महत्वाचे असते. शहरवासियांच्यादृष्टीने या महत्वाच्या बजेटमध्ये शहरवासियांना काय आवश्यक आहे व कोणत्या योजनांची गरज आहे हे 'महाराष्ट्र टाइम्स' ने 'आपलं बजेट, आपलं कोल्हापूर' या उपक्रमातून जाणून घेतले. नागरिकांना प्रभागात काय होणे आवश्यक आहे याची माहिती स्वतंत्र फॉर्मवरुन भरुन घेतली.

शहरामध्ये विविध ठिकाणी महिलांसाठीची स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने सातत्याने आवाज उठवला आहे. त्यादृष्टीने गेल्यावर्षीच्या बजेटमध्ये स्वच्छतागृहांसाठी तरतूद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. महिलांची ही गरज ओळखून यंदाच्या बजेटमध्ये या कामासाठी आणखी तरतूद करण्यात येणार आहेच.

- मुरलीधर जाधव, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजनी-सोलापूर जलवाहिनीला मोठी गळती लाखो लीटर पाणी वाहून गेले ओढ्यात

0
0


म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी-सोलापूर जलवाहिनीला शुक्रवारी मोठी गळती लागली. पुणे नाका उड्डाणपूल व केगावजवळ मोठ्या गळती लागून लाखो लिटर पाणी ओढ्यात वाहून गेले आहे. गळतीच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने तातडीने हाती घेतले असून, दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जलवाहिनीमधील पाण्याचा उपसा करून गळती शोधण्याचे काम सुरू आहे.
भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. सुमारे दहा लाख नागरिकांना सध्या पाच दिवसांआड मिळत आहे. या टंचाईच्या परिस्थितीत शुक्रवारी सकाळी पुणे नाका उड्डाणपूल आणि केगावच्या जिल्हा परिषद शाळेजवळ दोन ठिकाणी उजनी-सोलापूर मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणवर गळती लागली. नागरिकांनी या बाबतची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख धनशेट्टी व त्यांच्या अन्य अधिकाऱ्यांनी दोन्ही ठिकाणी भेट दिली. गळती असलेल्या जलवाहिनीतून पाण्याच्या उखळ्या फुटत होत्या. मोठ्या प्रमाणवर पाणी वाहून जात असल्याचे लक्षात आल्यानंतर तातडीने यंत्रसामग्री मागविण्यात आली. पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. तरीही जलवाहिनीतील पाणी बाहेर जाण्यास बराच वेळ गेला. जलवाहिनीतील लाखो लिटर पाणी बाजूच्या ओढ्यातून वाहून गेले.
ऐन दुष्काळात शहरवासियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. शिवाय शहरवासियांना पाच दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. असे असताना दोन ठिकाणच्या गळतीमधून लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
या पूर्वीही जलवाहिनीतून पाणी चोरी
उजनी-सोलापूर ही शंभर किलोमीटर अंतराची जलवाहिनी सोलापूरला पाणीपुरवठा करते. पाकणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीतून पाणी आल्यानंतर शुद्ध झालेले पाणी या जलवाहिनीच्या माध्यमातून शहरात आणून टाक्या भरून घेतल्या जातात. या पूर्वी उजनी-सोलापूरपर्यंतच्या याच जलवाहिनीला काही शेतकऱ्यांनी होल मारून पाणी चोरुन घेतल्याचा प्रकार खुद्द महापालिकेचे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करून सर्व गळत्या बंद करण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात ७५५ गावे टंचाईग्रस्त जाहीर

0
0

सातारा
सातारा जिल्ह्यात ७५५ गावे टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. उष्णतेची तीव्रता वाढू लागल्यामुळे दिवसेंदिवस टँकरच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात ४७ टँकरद्वारे ४२ गावे ३१९ वाड्यावस्त्यांवरील ७० हजार ४११ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यातील ७५५ टंचाईग्रस्त गावांमध्ये माण तालुक्यातील १०५, खटाव १४०, फलटण ६२ गावांचा समावेश आहे. या तीन तालुक्यांतच सर्वाधिक गावांचा समावेश आहे. सध्या टंचाईची तीव्रता वाढू लागल्याने माण, खटाव, फलटण, कोरेगाव, वाई व पाटण तालुक्यांतील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
सध्या जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ४२ गावे व ३१९ वाड्यावस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांसह पश्चिमेकडील वाई व पाटण तालुक्यांत टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. माण तालुक्यात ३७ टँकरद्वारे ३२ गावे २९९ वाड्यावस्त्यांवरील ५१ हजार ५३४ लोकसंख्येस. खटाव तालुक्यात एका टँकरद्वारे एक गाव व चार वाड्यावस्त्यांवरील दोन हजार ५० लोकसंख्येस. फलटण तालुक्यात एका टँकरद्वारे एक गाव १४ वाड्यावस्त्यांवरील दोन हजार ९५ लोकसंख्येस. कोरेगाव तालुक्यात चार टँकरद्वारे पाच गावांना नऊ हजार ९९१ लोकसंख्येस, वाई तालुक्यात दोन टँकरद्वारे तीन गावांतील दोन हजार ८९० लोकसंख्येस, तर पाटण तालुक्यात दोन टँकरद्वारे दोन वाड्यावस्त्यांवरील एक हजार ५९ लोकसंख्येस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याचे पाणी राखीव ठेवण्यासाठी ३३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये माण दहा, खटाव एक, कोरेगाव दोन, खंडाळा दोन, वाई १८ विहिरींचा समावेश आहे.
प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)
कोयना : ३८.०७
कण्हेर : ३०.०९
धोम :२२.३०
धोम- बलकवडी : २७.६७
तारळी : ५१.७४
उरमोडी :६२.९८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातारा जिल्हा सरकारीहॉस्पिटलला कायाकल्प पुरस्कार प्रदान

0
0

सातारा
केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारा कायाकल्प पुरस्कार सातारा जिल्हा सरकारी हॉस्पिटलला नुकताच प्रदान करण्यात आला. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देशातील हॉस्पिटलच्या स्वच्छतेसाठी कायाकल्प पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार साताऱ्याच्या जिल्हा सरकारी हॉस्पिटलला मिळाला.केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर देश पातळीवर हॉस्पिटलमधील स्वच्छतेबाबत कायाकल्प ही योजना मागील वर्षीच्या मे महिन्यात घोषित केली होती. या अंतर्गत हॉस्पिटलमधील स्वच्छतेबाबत विविध निकष जाहीर करण्यात आले होते. यामध्ये पेशंट तपासणी, पेशंटच्या मुलाखती, हॉस्पिटलच्या आतील तसेच बाहेरील परिसराची स्वच्छता, जैविक कचऱ्याची विल्हेवाट, कर्मचाऱ्यांच्या मुलाखती, कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन, अशा विविध स्तरावर तपासणी करण्यात आली होती. या योजनेंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा हॉस्पिटलची केंद्रीय समितीमार्फत तपासणी करण्यात आली होती. हे सर्व मापदंड पूर्ण करीत सातारा जिल्हा हॉस्पिटलने अव्वल स्थान पटकाविले होते.५० लाख रुपये, कायाकल्पचे मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक असे, या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामार्गावरील दुभाजक तोडल्यास गुन्हा दाखल होणार

0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा
'पुणे-बेंगळुरू महामार्गावर ज्या ठिकाणीचे दुभाजक तोडले असतील त्या ठिकाणी दुभाजक पुन्हा बसवावेत. कोणी दुभाजक तोडत असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करा,' असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिला आहे.
सातारा-पुणे सहापदरीकरण कामकाजाचा प्रगती आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) अमृत नाटेकर, शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, प्रोजेक्ट हेड राकेशकुमार कटारीया तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, वाढेफाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या ठिकाणच्या उड्डानपुलाचे काम तातडीने सुरू करा. येत्या मे महिन्यापर्यंत महामार्गावरील काम मोठ्या प्रमाणात पूर्ण करा, म्हणजे पावसाळ्यात लोकांना त्रास होणार नाही. पारगाव-खंडाळा येथील नवीन उड्डान पुलाबाबत ग्रामस्थांबरोबर बैठक घ्या. तसेच खंबाटकी घाटातील काम तातडीने पूर्ण करा. वाढे, सुरुर, पारगाव, खंडाळा, शिरवळ येथील रस्त्यांवरील इलेक्ट्रिकल पोल मागे घेवून सर्व्हिसरोडचे रुंदीकरण करा. यासाठी विद्युत वितरण कंपनीची मदत घ्या. महामार्गावर ज्या ठिकाणी काम चालू आहे त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, झेब्राक्रॉसिंग, ब्लिंकर्स आणि रिफ्लॅक्टर्स लावावे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडच्या मंडईनजीकची अतिक्रमणे हटविली

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कराड शहरातील रस्ते आणि चौकांतील अतिक्रमणे पालिकेच्या वतीने हटविण्यात आली. गुरुवार आणि शुक्रवारी त्यासाठी पालिकेने विशेष मोहीम राबविली. रस्त्यांच्या पदपथांवरील स्टॉल, हातगाडे, फळविक्रेत्यांची खोकी, वडापाव आणि चायनीजचे गाडे हटविताना तणाव निर्माण झाल्याने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
पालिकेने शहरातील सौंदर्यात भर पडावी म्हणून पालिकेने शहरातील रस्त्यांसह त्याच्या बाजूने आकर्षक पादचारी मार्गाची उभारणी करून काही ठिकाणी मोकळी जागा ठेवली होती. त्यावर शहरातील फळविक्रेते व चायनीज, वडापाव विक्री करणारे चारचाकी हातगाडेधारकांकडून व्यवसाय केला जात होता. नो हॉकर्स झोनमधील जागेत अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेकडून शुक्रवारी कारवाई करण्यात आली. मंडई परिसरातील खोकी, हातगाडे जप्त करण्यात आले. दत्तचौकापासून-कृष्णा नाका, या मार्गादरम्यान मुख्य रस्त्याच्या दोंन्ही बाजूला बांधण्यात आलेल्या पदपथावरील मार्गावर प्रवाशांची सारखी वर्दळ असते त्यावरही अतिक्रमण झाले होते. मंडईतील चौका-चौकांत व मोकळ्या जागांवर बेकायदा व्यावसायिकांनी आपले व्यावसाय थाटत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विक्रेते व दुकानमालकांकडून आकर्षक पद्धतीने तयार केलेले जाहिरात फलकही तेथे ठेवले होते. फळविक्री व वडापाव,चायनीज विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडूनही याच जागांवर आपले हातगाडे लावले जात होते. त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना व प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या बाबत अनेक तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या होत्या. कोर्टानेही दिलेल्या निर्णयानुसार पालिकेकडून शहरातील बसस्थानक परिसर, विजय दिवस चौक, दत्तचौक, कर्मवीर भाऊराव पाटील चौक या ठिकाणी फूटपाथवर लावण्यात आलेल्या हातगाडाधारक व फळविक्रेत्यांवर कारावाई करण्यात आली. शुक्रवारी मंडई परिसरातील चौका-चौकांत व मोकळ्या जागेत असलेल्या बेकायदा अतिक्रमणांवर पुन्हा एकदा पालिकेकडून कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महालक्ष्मी बँकेसाठी मेअखेर मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महालक्ष्मी को-ऑपरेटिव्ह बँकेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधकांनी जाहीर केला. शुक्रवारी प्रारुप मदारयादी प्रसिद्ध केली. त्यावरील हकरती आणि सुनावणीनंतर एप्रिलअखेर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर दहा दिवसाने अर्ज दाखल आणि माघारीचा कालावधी धरता मेअखेर बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. एकूण १७ जागांसाठी मतदान होईल.

एकूण २३ हजार ३६२ सभासदांची प्रारुप यादी शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. तीवर २८ मार्चअखेर हरकती दाखल करण्यात येणार आहेत. दाखल झालेल्या सर्व हरकती सात एप्रिलला निकालात काढण्यात येतील. निकालानंतर पंधरा दिवसांत अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा नियम असल्याने २१ एप्रिलअखेर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर दहा दिवसांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. साधारण एक मे रोजी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यानंतर दहा दिवस अर्ज दाखल करण्यासाठी आणि पंधरा दिवस माघारीसाठी निश्चित करण्यात येणार आहेत. सर्व कालावधी लक्षात घेता मे अखेरीस मतदान होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिजाऊ याच शिवरायांच्या गुरू’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवरायांना छत्रपती बनविणाऱ्या जिजाऊ याच त्यांच्या गुरू आणि जिजाऊंना घडविणारे राजे लखुजीराव हेच जिजाऊंचे गुरू होते,' असे मत प्रसिद्ध शस्त्रास्र संग्राहक आणि अभ्यासक गिरीश लक्ष्मण जाधव यांनी व्यक्त केल्या. राजे लखुजीराव जाधव प्रतिष्ठानचे पाचाड येथील जिजाऊंचा वाडा-राजवाडा-गढी येथे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जयंतराव जाधव यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण झाले. गिरीश जाधव यांच्याहस्ते राजे लखुजीराव व जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. फत्तेसिंह जाधव-इनामदार, धनाजीराव जाधव, राजेंद्र सरनोबत, जीवन सरनोबत, सुनीलकुमार सरनाईक यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

गिरीश जाधव म्हणाले, 'प्रतिकूल परिस्थितीत उपलब्ध साधनांनीशी स्वराज्य उभारणीचे व्रत जिजाऊंनी पूर्ण केले. शिवरायांना मराठी साम्राज्याचे संस्थापक म्हणून ओळखले जाते. त्यांची जडणघडण जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली झाली. महाराजांना धाडसी, चाणाक्ष, शूरवीर बन‌विण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. महाराजांच्या बालपणापासून वीर पुरुषांच्या कथांबरोबरच शस्त्रास्र प्रशिक्षण, घोडेस्वारी, कवायत, व्यवहारज्ञान यामध्ये त्यांनी जाणीपूर्वक तयार केले. महाराजांना प्रेरणा दिली. याचबरोबर रयतेचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावर कोणताही जुलूम होता कामा नये याचे बाळकडू महाराजांना जिजाऊंपासून मिळाले होते. त्यामुळेच शिवराय रयतेचे राजे म्हणून ओळखले जातात.'

जाधव म्हणाले, 'जिजाऊंचे चरित्र म्हणजे एक धगधगते वादळच आहे. म्हणूनच तिच्यापोटी स्वातंत्र्यसूर्य जन्मला. जिजाऊंची गढी म्हणजेच महाराष्ट्राचे खरे मातृतीर्थ प्रेरणास्थान आहे. प्रत्येक स्त्रीने नव्हे तर प्रत्येक भारतीयाने या स्थानाचे दर्शन घ्यायला हवे.'

जयंतराव जाधव म्हणाले, 'जिजाऊंचा विचार म्हणजे महाराष्ट्राचा विचार व हेच महाराष्ट्रीयत्त्व होय. जिजाऊंचे विचार जपले तर राष्ट्रभक्ती कधीही कमी होणार नाही. त्याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी.'

यावेळी जिजाऊंची गढी पाहून सर्वांनी रायगडाकडे प्रयाण केले. गिरीश जाधव यांच्याकडून माहिती घेत सर्वांनी रायगडावरील वास्तूंचे दर्शन घेतले. फत्तेसिंह जाधव यांनी होळीच्या माळावरील व महाराजांच्या सदरेवरील मूर्तीस अभिवादन केले. जगदिश्वर व समाधीचे दर्शन घेतले. शाहीर मिलिंदराव सावंत यांनी पोवाडा आणि बिगुलाने मानवंदना दिली. यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी, जयसिंगपूर, उंब्रज, कराड, बहिरेवाडी, तळबीड, पुणे येथील शिवभक्तांसह निलेश डुबल, अनंतराव देशमुख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानीचे उपोषण

0
0

कुपवाड :
कवठेएकंद येथील सिद्धराज पाणीपुरवठा संस्थेचे उर्ववरीत कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले. संघटनेचे प्रवक्ते महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूविकास बँकेची कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्याबाबतचे आदेश अद्याप पोहचलेले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शैक्षणिक सोयींसाठी राष्ट्रवादीचे आंदोलन

0
0

कुपवाड :
विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करावेत. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत सुरू करावे, मरठवाड्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातही स्वाती अभय योजना लागू करावी, अशा मागण्या करीत सांगलीत राष्ट्रवादीने शुक्रवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. उपोषणानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.
राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, सांगली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष कमलाकर पाटील , राहुल पवार, ताजुद्दीन तांबोळी, हणमंतराव देसाई यांच्यासह युवा पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फिरत्या उर्दू ग्रंथालयास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

0
0

मिरज :
मिरजेतील चाँद उर्दू स्कूलमध्ये शुक्रवारी एक दिवसीय उर्दू ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उर्दू भाषा विकास परिषदेतर्फे फिरत्या ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. मिरेजच्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
सुमारे अकराशे विविध विषयांवरील दहा हजार पुस्तकांमुळे मिरजेतील विद्यार्थ्यांसाठी उर्दू ग्रंथांचा खजिनाच खुला झाला होता. मिरजेतील १४ उर्दू शाळांतील सुमारे ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या फिरत्या ग्रंथालयास भेट दिली. ग्रंथांची पाहणी करून अनेक विद्यार्थ्यांनी वाचनासाठी पुस्तके विकत घेतली.मिरजेतील चाँद उर्दू स्कूलच्या प्रांगणात या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. चाँद उर्दू स्कूलचा उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकीक आहे. काही दिवसांपूर्वी कराड येथे झालेल्या एका बौद्धिक स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले होते. या संदर्भाने चाँद्र उर्दू स्कुलला या ग्रंथ प्रदर्शनाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मुख्याध्यापिका तबस्सुम पालेगार यांनी सांगितले.
उर्दू कथा, कविता, व्याकरण, ऐतिहासिक, आत्मकथा, प्रेरणादायी कथा, धार्मिक पुस्तके, बोधकथा, सुविचार, उर्दू शब्दकोश, नव्या शिक्षण पद्धतीतील ज्ञानरचनावाद, अशा विविध अकराशे विषयांवरील दहा हजार पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे. हे ग्रंथालय सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी व कुरुंदवाडनंतर शुक्रवारी मिरजेत या फिरत्या ग्रंथालयाचे आगमन झाले. मिरजेतून पुढे शनिवारी इस्लामपूर व रविवारी कराड येथे हे प्रदर्शन पहावयास मिळणार आहे. मिरज शहरात १४ उर्दू शाळांतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उर्दू शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या मोठी असली तरी उर्दू भाषेतील पुस्तके मात्र मिरजेत फारशी उपलब्ध होत नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमांशिवाय उर्दू भाषेतील इतर साहित्याची ओळख करून देण्यात अडचणी येतात. फिरत्या ग्रंथालयामुळे विद्यार्थ्यांना विविध उर्दू ग्रंथांचा परिचय होण्यास मोठी मदत झाली आहे, असे चाँद उर्दू स्कूलच्या तबस्सूम पालेगार म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाचप्रकरणी पोलिसावर गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

घराच्या बांधकामावरून झालेल्या भांडणाच्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी लाच मागितल्यामुळे भुदरगड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राजाराम ईश्वरा सूर्यवंशीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

निष्णप (ता. भुदरगड) येथील बाळासाहेब श्रीपती पाटील व बाजीराव पाटील यांच्यात घराच्या बांधकामावरून २४ जानेवारीला भांडण झाले होते. याप्रकरणी भुदरगड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. याचा तपास पोलिस नाईक राजाराम सूर्यवंशीकडे होता. सात मार्चला सूर्यवंशीनी बाळासाहेब पाटील यांना मोबाइलवरुन फोन करून गुन्ह्यातील कारवाई टाकण्यासाठी सात हजाराची लाच मागितली. त्यानुसार पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने सरकारी पंचांसमवेत पडताळणी केली असता सूर्यवंशी यांनी तक्रारदार पाटील यांच्याकडे सात हजारांची लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार सूर्यवंशीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्यांना अटक केली नसल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी सांगितले. कारवाईत पोलिस नाईक संजय गुरव, हवालदार श्रीधर सावंत, दयानंद कडूकर, सर्जेराव पाटील यांनी भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उष्म्यात वाढ चटके असह्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यापासून वाढत असलेल्या तापमानाने शुक्रवारी यंदाचे सर्वाधिक तापमान नोंदवले. कमाल तापमान ३७.७ अंशावर पोहचल्याने दिवसभर प्रचंड उष्मा जाणवत होता. पुढील आठवड्यातही ३७ अंशावरच तापमान जाण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढीला सुरुवात झाली. काही दिवस ढगाळ वातावरणाने तापमान ३५ अंशापर्यंतच पोहचले होते. तसेच सायंकाळी वाराही असल्याने उष्म्याची तीव्रता जाणवत नव्हती. गेल्या आठवड्यात शनिवारी (३७.३ अंश) सर्वांत जास्त तापमान पोहचले. यानंतर हा आकडा थोडा कमी झाला असला तरी ३५ ते ३६ अंशापर्यंत तापमान होते. यामुळे दिवसभर या उष्म्याने तगमग वाढत होती. गुरुवारी पुन्हा तापमानाचा पारा ३६.७ अंशाकडे सरकल्याने उष्म्याचे प्रमाण वाढले. शुक्रवारी तर ३७.७ अंशावर तापमान पोहचल्याने अंगाची लाही लाही होत असल्याचे वातावरण दिवसभर होते. रात्री वातावरणात गारवा असला तरी दिवसभरातील या उष्म्यामुळे नागरिक हैराण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरकरांच्या पदरी निराशाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्याच्या अर्थसंकल्पात कोल्हापूर थेट फारसा निधी मिळणार नाही. मात्र राज्यासाठी ज्या काही अनेक योजना आहेत त्यातील काही योजनांमधून कोल्हापूरला काही प्रमाणात निधी मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प काही प्रमाणात निराशजनक असला तरी काही प्रमाणात दिलासा देणारा आहे. विमानतळ, तीर्थक्षेत्र आराखडा यासाठी काहीच तरतूद नसली तरी कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामासाठी गती मिळणार आहे.

जिल्ह्यातील अकरा आमदारांनी राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात कोल्हापूरसाठी भरीव निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या आमदारांनी ज्या अपेक्षा सरकारकडे व्यक्त केल्या होत्या. त्या योजना किंवा प्रकल्पांसाठी प्रत्यक्ष अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केलेली नाही. तीर्थक्षेत्र आराखडा, शाहूंचे आंतरराष्ट्रीय स्मारक, विमानतळ विस्तारीकरण, चित्रनगरी यांसह विविध प्रकल्पांसाठी निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ते दिसत नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदाराबरोबरच या पक्षाच्या नेत्यांनी निराशजनक अर्थसंकल्प अशी टीका केली आहे.

रेल्वे अर्थसंकल्पात कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाची घोषणा केली होती. यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली​ आहे. यामुळे या प्रकल्पाला गती येणार आहे. ड वर्ग नगरपालिकांना मोठा निधी देण्याची तरतूद केल्याने कोल्हापूर महापालिकेला त्याचा फायदा होणार आहे. व्याघ्र प्रकल्पासाठी ४७ कोटीची तरतूद केली आहे. त्याचा फायदा सह्याद्री व्याघ्र पकल्पांतर्गत कोल्हापूरला होईल. कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याने या स्थानकावर अनेक सुविधा उपलब्ध होतील. सेफ सिटीसाठी ३५० कोटीची तरतूद असून कोल्हापूरात या माध्यमातून सीसीटीव्ही उभारण्याबरोबरच त्याची देखभालही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रसंगी नगरसेवकांना घरात घुसून ठोकू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटना वारंवार घडत आहेत. सदस्यांच्या जिवावर त्यांच्या कुटुंबांची मनमानी सुरू आहे. त्यांचे अख्खे घरदारच कारभारी बनल्याने कर्मचाऱ्यांना भयंकर त्रास वाढला आहे. कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना यापुढे घडल्यास कर्मचारी संघही हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही. मारहाण करणाऱ्या नगरसेवकांच्या घरात घुसून आम्हीही ठोकून काढू, असा इशारा महापालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष रमेश देसाई यांनी शुक्रवारी दिला. त्यामुळे महापालिकेतील वातावरण तंग झाले. देसाई यांच्या वक्तव्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी कर्मचारी संघाला प्रतिआव्हान दिले. लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. तुम्ही ५० कर्मचारी घेऊन आलात तर आम्ही शंभरच काय पाचशे लोक आणून तुमचे आव्हान मोडून काढू, अशा इशारा दिला. त्यामुळे महापालिकेचा जणू आखाडाच बनला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व अपक्ष नगरसेवक राजू दिंडोर्ले यांचा भाऊ विशाल यांनी गुरूवारी आरोग्य निरीक्षक संजय गेंजगे यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ महापालिका कर्मचारी संघाने शुक्रवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त व मुख्य लेखापाल वगळता सर्व अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात उतरले होते. त्यामुळे महापालिकेचे पूर्ण कामकाज ठप्प झाले. सर्वसाधारण सभाही रद्द करण्यात आली.

आंदोलन मागे घ्यावे, यासाठी तोडगा काढण्यासाठी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, आयुक्त पी. शिवशंकर यांच्या उपस्थितीत आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत नगरसेवक आणि कर्मचारी संघाचे पदाधिकारी एकमेकांविरोधात उभे ठाकले. दोन्ही बाजूनी आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने वातावरण स्फोटक बनले. नगरसेवक कमलाकर भोपळे, नियाज खान, अभिजीत चव्हाण, राजाराम गायकवाड, राहुल चव्हाण आक्रमक होत देसाई यांनी शब्द मागे घ्यावेत, यावर ठाम राहिले. यावरून नगरसेवक व कर्मचारी संघाच्या पदा​धिकाऱ्यांत शाब्दिक बाचाबाची झाली.

सर्वसाधारण सभा तहकूब

दरम्यान, जवळपास अर्धा दिवस सुरू असलेल्या या गोंधळामुळे कामकाज पूर्णपणे थांबले. त्यामुळे शुक्रवारची सर्वसाधारण सभाही रद्द करावी लागली. अग्निशमन विभागाचा अपवाद वगळता विविध विभागातील तीन हजारांवर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे सर्व कार्यालये ओस पडली. काम बंद आंदोलन, नगरसेवकांच्या विरोधात घोषणेबाजी सुरू राहिल्याने अस्वस्थता होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images