Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कचऱ्यापासून खतनिर्मिती करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरातील कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रत्येक प्रभागात कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प सुरू करावेत' अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. एकटी व अवनि संस्थेच्यावतीने लक्ष्मीपुरीतील दलाल मार्केट परिसरातील कचरा वेचक महिलांना ओळखपत्र व पर्यापूरणपूरक साहित्याच्या वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कचरा वेचक महिला या स्वच्छतेच्या दूत आहेत. शहराची स्वच्छता राखणाऱ्या महिलांना आरोग्य विषयक सुविधा पुरवाव्यात. प्रत्येक प्रभागात कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प सुरू केला तर रोजगार निर्मिती होईल. नगरसेवकांनी प्रत्येक प्रभागात विकेंद्रित घनकचरा केंद्रे उभी केल्यास महिलांना रोजगार मिळू शकेल. महापालिकेने प्रत्येक प्रभागात घनकचरा केंद्रे उभी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प यशस्वी झाल्यास शेकडो महिलांना रोजगाराच्या संधी मिळतील.'

एकटी संस्थेकडील रात्र निवारा शेड अपुरे असल्याच्या प्रश्नाकडे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले होते. यासंदर्भात पालकमंत्री म्हणाले, 'रात्र निवारासाठी महापालिकेने एखादा भूखंड उपलब्ध करून द्यावा. त्या जागेवर बांधण्यात येणाऱ्या रात्र निवाऱ्यासाठी आमदार निधीतून रक्कम उपलब्ध केली जाईल. वीटभट्टीवरील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी चाळीस बस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी या बस उपलब्ध होतील.'

यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते कचरा वेचक महिलांना हातमोजे, गमबूट, बकेटसह सुरक्षेच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी, आयुक्त पी.शिवशंकर, डॉ. सूरज पवार, रेश्मा पवार आदींच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. 'अवनि' संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले, सचिव संजय पाटील, नगरसेविका अश्विनी बारामते, तनुजा शिपूरकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भारत भीम यात्रा १० एप्रिलला कोल्हापुरात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची पश्चिम महाराष्ट्राची जंबो कार्यकारिणी रविवारी जाहीर करण्यात आली. दहा एप्रिल रोजी भीम यात्रा कोल्हापुरात दाखल होत आहे. त्यानिमित्त खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत दसरा चौक येथे सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे. पक्षाचे राज्याध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

प्रा. कांबळे म्हणाले, 'पश्चिम महाराष्ट्र कार्यकारीणीमध्ये ४१ पदाधिकारी, २६ पदसिद्ध अध्यक्ष, १६ उपाध्यक्ष, १६ संघटक,१२ सचिव, सहसचिव १ आणि १३ सदस्य अशी रचना आहे. याचबरोब पाच जिल्ह्यांचे पदसिद्ध अध्यक्ष, पश्चिम महारष्ट्रामधील केंद्र व राज्य कार्यकारणीचे पदसिद्ध सदस्यांची नावेही जाहीर केली आहेत. खासदार रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली कन्याकुमारीहून निघालेली भारत भीम यात्रा १० एप्रिलला गोव्याहून पश्चिम महाराष्ट्रात दाखल होत आहे. तर कोल्हापुरात ही यात्रा आजरा-आंबोली मार्गाने दसरा चौक येथे येणार आहे. खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीत त्या दिवशी सायंकाळी ५ वाजता जाहीर सभा होणार आहे.

जाती तोडो समाज जोडो - समता अभियानाच्या या सभेत २५ ते ३० हजार लोक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ही यात्रा ११ एप्रिल रोजी सांगली, १२ एप्रिल रोजी पुणे आणि १३ एप्रिल रोजी सोलापूरला जाईल.'

यावेळी कार्याध्यक्ष बापूसाहेब जगताप, सरचिटणीस आशिष गांगुर्डे, राजा सरवदे, नवनाथ कांबळे, अशोक गायकवाड, जगन्नाथ ठोकळे, उत्तम कांबळे आदींसह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर पुणे या पाच जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी महाविद्यालयात रॅगिंगनंतर दगडफेक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयात सीनिअरच्या विद्यार्थ्यांनी एका विद्यार्थ्याचे ​रॅगिंग करण्याचा प्रकार घडला. यानंतर झालेल्या दोन गटातील तुफान दगडफेकीत एका मोटारसायकलची मोडतोड करण्यात आली. दगडफेक करून होस्टेलच्या सर्व खोल्यांच्या काचा फोडण्यात आल्या. रात्री उशीरापर्यंत हे प्रकरण मिटवण्याचे प्रयत्न सुरू राहिल्याने गुन्हा दाखल झाला नाही.

कृषी महाविद्यालयातील सीनिअर आणि ज्युनिअर विद्यार्थ्यांच्या गटात वाद आहे. शनिवारी एका विद्यार्थ्याने शर्ट इन केला होता. यावरून सीनिअर विद्यार्थ्यांने त्याचे रॅगिंग केले. सीनिअर विद्यार्थ्यांनी दादागिरी करत विद्यार्थ्यांना मारहाण केली. दोन्ही गटांनी तुफान दगडफेक केली. मोटारसायकलची मोडतोड करण्यात आली. होस्टेलच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. दरम्यान, याकडे महाविद्यालय प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ शनिवारी सायंकाळी विद्यार्थी होस्टेल सोडून घरी गेले. रॅगिंग झालेल्या विद्यार्थ्यांने भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष संदीप देसाई यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्यासह भाजपाचे माजी नगरसेवक सुभाष रामुगडे यांनी सोमवारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. जी. खोत यांची भेट घेतली. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने रॅगींग केलेल्या पाच विद्यार्थ्यांना बोलावून घेऊन त्यांचा माफीनामा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवक, सावकारही गोत्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विम्याचे ३५ कोटी रुपये हडपण्यासाठी आजरा-आंबोली रस्त्यावरील लक्ष्मी ओढ्यात मोटार पेटवून खून केल्याच्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित अमोल पवार याच्याशी आर्थिक व्यवहार करणारे नगरसेवक आणि खासगी सावकर दोषी आढळले तर त्यांनाही सहआरोपी करू' असे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या प्रकरणातील दोषींची सुटका होऊ देणार नाही असे ते म्हणाले.

अमोल पवारने विम्याचे ३५ कोटी रुपये हडपण्यासाठी स्वतःचा खुनाचा बनाव केला होता. खोदाई करणारा कामगार रमेश नाईक याचा खून करून त्याचा मृतदेह मोटारीत घातला. मोटार डिझेल ओतून पेटवून दिली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. बँका आणि पतसंस्थांनी कर्ज देताना त्याच्या आर्थिक स्थितीची माहिती घेतली होती का? याचा तपास सुरू आहे. बँकांनी नियमबाह्य कर्ज दिले असेल तर सखोल तपास करू. अमोलला २४० टक्के व्याजाने कर्ज देणाऱ्या नगरसेवक आणि खासगी सावकारांची युद्धपातळीवर चौकशी करण्यात येत आहे.

अमोलचे वय पाहता, त्याच्याकडे इतकी संपत्ती कशी आली याचा अभ्यास वित्तीय संस्थांनी केलेला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. ३५ कोटींचा विमा उतरवणारे बँकेचे अधिकारी, एजंटाकडेही चौकशी केली जाणार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास तीन पातळीवर सुरू आहे. आजरा, गड​हिंग्लज आणि कोल्हापुरात तीन पथके कार्यरत आहेत.

दरम्यान पोलिसांनी नगरसेवकांच्या चौकशीचे संकेत दिल्याने खळबळ उडाली आहेत. अमोलला पतपुरवठा करणारे आणखी तीन नगरसेवक असल्याची चर्चा आहे. त्याची पोलिस खातरजमा करत आहेत. पोलिसांनी दैवज्ञ बोर्डिंगमधील त्याच्या कार्यालयातील कागदपत्रे जप्त केली. अमोलच्या तीन महिन्यांचे कॉल डिटेल्स तपासण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुल्लाचे पोलिसांशी लागेबांधे ?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये सापडलेल्या तीन कोटी रुपये रक्कमेबाबतचे गुढ सोमवारी तिसऱ्या दिवशीही कायम पाहिले. प्राप्तीकर खात्याचे वरिष्ठ निरीक्षक एस. व्ही. देसाई आणि शेखर कुमार यांनी ही रक्कम तपासली. मात्र ताब्यात घेतली नाही.

दरम्यान, संशयित मोहिद्दीन मुल्ला याने खरेदी केलेल्या दोन बुलेटपैकी एक बुलेट पोलिस कर्मचाऱ्याच्या नावावर असल्याने या प्रकरणाशी पोलिसांचे लागेबांधे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संबंधितबुलेट वितरकाने कोणताही कागदोपत्री पुरावा न घेता रोख पैसे घेऊन एका दिवसात बुलेट दिल्याने या वितरकाचीही पोलिस कसून चौकशी करीत आहेत. यासंदर्भात तपास अधिकारी, पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट म्हणाले, हे पैसे कोणाचे याची ठोस माहिती नाही. रक्कम चोरीचीच असल्याचा निष्कर्ष आम्ही तपासात काढला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या कारवाईच्या हालचाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हेरिटेज असलेला शाहूकालीन पाण्याचा हौद आणि झाडे बेकायदेशीररित्या तोडल्याप्रकरणी ४५ जणावर कारवाई होण्याच्या हालचाली आहेत. पोलिस प्रशासनाकडून या संदर्भात गोपनीयरित्या माहिती संकलित केली जात आहे.

महापालिकेच्या मालकीच्या इमारतीची नासधूस झाल्यामुळे महापालिका प्रशासनाला आंदोलकावर कारवाई करणे भाग आहे. मात्र जकात नाका इमारत आणि पाण्याची हौद पाडण्यात महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक अग्रभागी होते, त्यांच्या विरोधात पाऊल कसे उचलायचे या पेचात प्रशासन सापडली आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाकडे अहवाल सादर करून ते जबाबदारी ढकलण्याच्या प्रयत्नात आहेत.

शाहूकालीन पाण्याचा हौद, या भागातील इमारती, पूल व झाडांचा परिसर हेरिटेज वास्तूमध्ये समावेश आहे. महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाण्याचा हौद पाडण्यास परवानगी दिली नव्हती. मात्र शनिवारी कोल्हापूर शहर हद्दवाढ कृती समिती, कार्यकर्त्यांनी आ​​णि महापालिकेच्या पदा​धिकाऱ्यांच्या उपस्थितीत हौद पाडला. जकात नाक्याची इमारत, पाण्याचा हौद यावर महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनीच हातोडा चालविला. आंदोलनात महापौर, उपमहापौर, स्थायी समिती चेअरमन, नगरसेवक, राष्ट्रवादीचे आजी माजी शहराध्यक्ष, भाजप महानगरचे माजी पदाधिकारी, कृती समितीचे पदाधिकारी मिळून ४५ जणांना या प्रकरणी जबाबदार धरण्यात आले आहे. आंदोलनातील घटना, फोटो, व्हिडीओ चित्रीकरण संकलित केले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुप्रीम’ कंत्राटदार ब्लॅकलिस्ट करणार’

$
0
0

म. टा. विशेष प्रतिनिधी

'कोल्हापूर - सांगली रस्त्याचे काम करणाऱ्या सुप्रीम कंपनीला यापुढे कोणतेही काम दिले जाणार नाही. कंपनीला ब्लॅकलिस्ट केले जाईल' अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, या रस्त्यावर टोलमुक्ती होणार नाही असेही मंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम गेली चार वर्षे सुरू आहे. याबाबत तारांकित प्रश्नाद्वारे सोमवारी विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी रस्त्याचे काम करणा-या सुप्रीम कंपनीला काळ्या यादीत टाकणार का? असा सवाल आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला. आमदार सर्वश्री उल्हास पाटील, राजेश क्षीरसागर, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत सरकारला धारेवर धरले. या रस्त्याचे काम केंद्र सरकारच्या निधीतून करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. त्याचे काय झाले अशी विचारणा यावेळी आमदारांनी केली.

या प्रश्नावर माहिती देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सुप्रीम कंपनीला यापुढे कोणतेही काम दिले जाणार नाही असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान समितीने जागा विकली

$
0
0

बेकायदेशीर विक्रीचा 'प्रजासत्ताक'चा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'श्री करवीर निवासिनी देवी अंबाबाई मालकी हक्कातील मोरेवाडी येथील आठ एकर जमीन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने बेकायदेशीरपणे विक्री केली आहे. या प्रकरणाबाबत सरकारने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी परवानगी दिली आहे. या प्रकरणाची विशेष शोध पथकातर्फे चौकशी करून कारवाई करावी' अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. या व्यवहारात समितीतील तत्कालीन सदस्य दिंगबर निळकंठ यांची सही डुप्लीकेट असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिलीप देसाई म्हणाले, 'महसूल मंत्रालय आणि देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संगनमताने हा व्यवहार केला आहे. अंबाबाई मालकी हक्कातील रि. स. नं ३२ व ४५ क्षेत्रातील ही जमीन विक्री करु नये, असा स्पष्ट आदेश सरकारने दिला आहे. मात्र या जागेची विक्री बेकायदेशीपणे झाली आहे.या जमिनीची किंमत दहा हजारापेक्षा अधिक आहे. सरकारी नियमानुसार वर्ग तीनच्या जमिनीचे खरेदी विक्रीच्या व्यवहाराला परवानगी नाही. मात्र तरीही आदेश डावलून पदाधिकाऱ्यांनी व्यवहार केला आहे. देवस्थानची मोरेवाडी-पाचगांव परिसरात ९० एकर जमिन आहे. पैकी पहिल्या टप्प्यात ८ एकराचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप-शिवसेना सरकारच्या काळात हा गैरव्यवहार झाला आहे. दोन्ही सरकारच्या काळात समितीचे पदाधिकारी आणि जबाबदार सरकारी अधिकाऱ्यांनी या गैरव्यवहाराला पाठबळ दिले आहे.'

देसाई म्हणाले, 'या प्रकरणाला जबाबदार धरुन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करावी. १३ डिसेंबर, २०१० समितीच्या झालेली सभा संशयास्पद आहे. त्यांच्या सह्या, हजेरी बुकातील खाडाखोड आणि विक्री दस्तावर केलेल्या सह्या शंकास्पद आहेत. सन २००२-०३ पासून हा गैरव्यवहाराचा प्रकार सुरु आहे. समितीने सरकारच्या शर्ती आणि अटींचा भंग केला आहे. बेकायदेशीरपणे जमिनी विक्रीला स्थगिती घेतली जाणार आहे. विद्यमान समिती बरखास्त करावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भगवेकरणाला विरोधामुळे कन्हैया टार्गेट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशातील मुलभूत प्रश्नावरून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमातून आरएसएस अजेंडा राबवत आहेत. छुप्या अजेंड्यातून शिक्षणाच्या भगवीकरणाला 'जेएनयू'च्या कन्हैया कुमारने विरोध केल्याने त्याला देशद्रोही ठरवले जात आहे. 'जेएनयू'च्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरवण्याचा कट संघाच्या कार्यालयामध्ये शिजला असून, याला सामुदायिक विरोध करण्याची आवश्यकता आहे,' असे मत 'एआयएसएफ'चे सुशील लाड यांनी व्यक्त केले. कन्हैया कुमारच्या भाषणाच्या 'कन्हैया काय म्हणाला' पुस्तिकेच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रमिक प्रतिष्ठानचे मिलिंद यादव होते.

दसरा चौक येथील शाहू स्मारकच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रकाश सोहळा पार पडला. पत्रकार विश्वास पाटील यांनी कन्हैया कुमारच्या भाषणाचा अनुवाद या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.

यावेळी बोलताना लाड म्हणाले, 'एफटीआय, हैद्राबादमधील रोहीत वेमुला आणि 'जेएनयू'मधील विद्यार्थ्यांना लक्ष करून शिक्षणाचे भगवीकरण करण्याचा डाव टाकला जात असून, त्याला संघटीतपणे विरोध करण्याची आवश्यकता आहे. दलित संघटना, समाजवादी आणि परिवर्तनवादी संघटना एकत्र आल्यास धर्मांधतेच विचारांना ब्रेक लागू शकतो. कन्हैयाने मांडलेले विचार पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांना उचलावी लागेल.'

अध्यक्षस्थानावरून बोलताना मिलिंद यादव म्हणाले, 'शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येतात. मात्र, अशा मिरवणुका विचारांच्या नसतात. यासाठी त्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.

यावेळी उदय नारकर, उमा पानसरे, मेघा पानसरे, बाबुराव कदम, व्यंकाप्पा भोसले, शिवाजीराव परुळेकर, डॉ. सुनील पाटील, दिलीप पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे यांनी केले. ज्योती भालक यांनी सूत्रसंचालन केले, तर चिंतामणी मगदूम यांनी आभार मानले.

'देशविरोधी घोषणा नाही'

आपल्या वैयक्तीक कामासाठी प्रभाकर आरडे दिल्ली येथे दाखल झाले आहेत. पुस्तिका प्रकाशनाची माहिती मिळताच त्यांनी 'जेएनयू'तील प्रा. दिनेश वार्सने यांच्याशी संपर्क साधून त्यांनी माहिती दिली. यावेळी बोलताना वार्सने यांनी 'जेएनयू'मध्ये कन्हैया किंवा विद्यार्थ्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत, तर बाहेरील विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या नसून, कन्हैयाला मोहरा बनवले जात आहे. भाजप व आरएसएसचे षडयंत्र असून जात, धर्माधर्मामध्ये संघर्ष निर्माण केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी चोरी रोखण्यासाठी दोन पथके

$
0
0

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून होत असलेली पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. आता जलवाहिनीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पथकावर राहणार आहे.
दोन दिवसांपूर्वी टाकळी-सोरेगाव योजनेच्या जलवाहिनीतून पाण्याची चोरी होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन त्या बाबतचे कडक आदेश दिले. टाकळी-सोरेगाव आणि उजनी-पाकणी या दोन्ही योजनेच्या जलवाहिन्यांना अनेक ठिकाणी गळती असून, त्यामुळे पिण्याचे पाणी वाया जात आहे. सध्या उन्हाळा असून, पाण्याची स्थिती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी गळती आणि पाणी चोरी रोखण्याच्या उपायांवर भर देण्याचे ठरवले आहे. ज्या जलवाहिनीवर नैसर्गिक गळती आहे. जलवाहिनी जीर्ण झाल्याने गळती निर्माण झाली आहे. त्या गळत्या शोधून दुरुस्त करण्याची सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी पाण्याची चोरी करण्यासाठी जाणीवपूर्वक जलवाहिनी फोडली जाते. त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
धरणातून सोडलेले पाणी शहरात येते किती आणि वितरण होते किती या बाबतची माहिती घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश उपमहापौर प्रवीण डोंगरे यांनी दिले होते. त्यासाठी उपअभियंता संजय धनशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांना नोटीस
टाकळी-सोरेगाव जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी होण्याचा प्रकार नवा नाही. यापूर्वी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना या बाबतची माहिती देण्यात आली होती. तरीही त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला असताना या चोरीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांना नोटीस बजावली.
विजापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
कर्नाटकचे शेतकरी चिंचपूर बंधाऱ्यातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करतात. हा उपसा थांबवावा, अशी विनंती करणारे पत्र महापालिका आयुक्तांनी विजापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमआयएम’चा पराभव

$
0
0

सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील भारत सहकारी गारमेंटच्या निवडणुकीत शफी इनामदार यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी विकास पॅनलने एमआयएमचे प्रमुख व परिवर्तन पॅनलचे तौफिक शेख यांच्या पॅनेलचा धुव्वा उडविला. विकास पॅनलचे सर्व १७ उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले. तर परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांचा दारून पराभव झाला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर एमआयएमचे तौफिक शेख यांना अल्पसंख्याक समाजाने दुसरा दणका दिल्यामुळे एमआयएमची हवा आता ओसरल्याचे चित्र आहे.
भारत सहकारी गारमेंट मुस्लिम समाजाची एकमेव संस्था असून, यंदा संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलकडून रस्सीखेच दिसून आली. एमआयएमला शिरकाव करायचा होता. त्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली होती. इनामदार यांच्या विकास पॅनेलला कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एनटीपीसीच्या पाइपलाइनचेकाम तातडीने पूर्ण करा’

$
0
0

सोलापूर : एनटीपीसी पाइपलाइनचे काम मार्चअखेर पूर्ण करावे. पंपिगसाठी महावितरणचे कनेक्शन त्वरीत देऊन लवकरात लवकर यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित टंचाई व विविध विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, एनटीपीसी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चोक्कलिंगम यांनी पाइपलाइनच्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेतली. तसेच सदरचे काम त्वरित पूर्ण करण्याबाबत सूचना केल्या. याबाबत महापौर, पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली असल्याचे सांगितले. बैठकीत विभागीय आयुक्तांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील पाणीसाठा चालू वर्षाची व मागील काही वर्षांपासूनची पावसाची सरासरी, सध्याच्या पाणी पातळीची स्थिती, संभाव्य टंचाई, पाण्याची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत कोर्टाचा हस्तक्षेप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झालेली मतमोजणी सदोष व संस्थापक पॅनेलला अन्यायकारक ठरणारी असल्यामुळे या मतमोजणीबाबत आम्ही मागितलेली कागदपत्रे देण्यास निवडणूक यंत्रणेने टाळाटाळ केली होती. या बाबत हायकोर्टात आम्ही दाद मागितल्यानंतर कोर्टाने मागणीप्रमाणे आवश्यक ती कागदपत्रे देण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिल्यामुळे हायकोर्टाचा निकाल हा सत्ताधाऱ्यांना चपराक असल्याचे मत अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले आहे. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्यात सराफांचा मूक मोर्चा

$
0
0

सातारा
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात सराफ व्यावसायिकांच्या खरेदी विक्री व्यवहारात उत्पादन शुल्क लागू करून काही जाचक अटी आणल्याच्या निषेध करण्यासाठी साताऱ्यात सराफांनी मूक मोर्चा काढला. उत्पादन शुल्कमुळे सराफ-सुवर्णकारांच्या व्यावसायावर संकट उभे राहिले आहे. त्यातच सातारा जिल्ह्यातील सुवर्ण कारागीर, गलाई, आटणीवाले, बंगाली कारागीर, पॉलिश कामगार, जोडवी कारागीर, झारी कारागीर, गटाई कारागीर, सराफी दुकानातील नोकर व अवलंबून असणारे घट यांना मागील १५ दिवसांपासून सुरु असलेल्या बेमुदत बंदची झळ पोहचत आहे. यावर तोडगा निघत नाही म्हणून काही सुवर्ण कारागीर हतबल होऊन गावाकडे गेले आहेत. त्यामुळे हे सर्वजण दुहेरी संकटात सापडे आहेत. सरकारने सर्वांच्या उदरनिर्वाहासाठी काही उपाययोजना करावी, अशी मागणी करून सातारा येथील सुवर्णकार संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्याचा काटकसरीने वापर करा

$
0
0

सातारा

पैशाप्रमाणे पाण्याचाही कुठे कुठे आपण वापर करतो, याचा हिशोब ठेवून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे.
सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या वतीने जलजागृती सप्ताहाचा प्रारंभ येथील नियोजन भवनात जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हस्ते उरमोडी, वेण्णा, कृष्णा, कोयना आणि तारळीच्या जलपूजनाने करण्यात आला.
मुद्गल म्हणाले, नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण टाळणे. त्यांची क्षमता वाढविणे आणि लोकसहभाग वाढवून जनजागृती करणे जलजागृती सप्ताहाचा उद्देश आहे. अलनिनोमुळे खूपच कमी पाऊस पडला. पुरेशाप्रमाणात पाऊस पडत नसल्याने काटकसरीशिवाय पर्याय नाही. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी राहिली आहे. त्याचे परिणामही दिसून येत आहे. अनेक गावांतील टँकरची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. पीक पद्धतीत बदल करावे लागतील. त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हापूस उत्पादकांना अवकाळी फटका

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड
पाटण तालुक्यातील मोरणा परिसरात हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणावर मोहोर आला होता. त्यामुळे हापूस उत्पादक शेतकरी आनंदात होते. मात्र, नुकत्याच झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिठीमुळे आंब्यांच्या झाडांचा मोहोर गळून पडला आहे. परिसरातील गावांमधील आंब्यांच्या बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि नुकसानभरपाई द्या, अशी मागणी या विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य बशिर खोंदू यांनी केली आहे.
पाटण तालुक्यातील कोकिसरे, मोरगिरी, धावडे, आंबेघर तर्फ मरळी,गोकूळ तर्फ पाटण, दिक्षी, पाचगणी, गुरेघर, नाटोशी, माणगाव, वाडीकोतावडे, कोरडेवाडी, भांब्रग आदी गावातील शेतकरी दर वर्षी हापूस आंब्याचे उत्पादन घेतात. हापूस आंब्याला बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे शेतकरी हापूस आंबा बागांची फार काळजी घेऊन जतन करतात. महागडी रासायनिक औषधे व खते यांचा वापर करून हापूस आंबा उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतो. अशातच गेल्या आठवड्यात सलग झालेला पाऊस व गारपिठीमुळे हापूस आंबा झाडांच्या मोहोर गळून पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आहे. पाटण तालुक्यातील हापूस आंबा नुकसानीची माहिती सरकारपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. मात्र, महसूल प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून त्या बाबतचा अहवाल पाठवून द्यावा, अशी मागणी खोंदू यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरतपासणीत आशिष भोसले सीए

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, कराड
कराड तालुक्यातील शंभरांवर घरे असलेल्या भोसलेवाडी आशिष भोसले या तरुणाने सीएची परीक्षा दिली होती. मात्र, निकाल नापास म्हणून आला होता. पण आपण पास होणार असा ठाम आत्मविश्वास त्याला होता. त्याने फेरतपासणीचा अर्ज केला आणि फेरतपासणीत आशिष सीए झाल्याचा निकाल आला. बारावीनंतर आशिषने पुण्यात राहून कमवा-शिका योजनेत काम करून शिक्षण घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘वारणे’तील टिप्सर कोण?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा/सांगली

बहुचर्चित तीन कोटी रुपयांच्या रोकड चोरी प्रकरणातील मोहिद्दीन उर्फ मैनुद्दीन मुल्ला याचा ताबा गुरुवारी कोडोली पोलिसांनी घेतला. त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर सांगली पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले. कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावताच कोडोली पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेतले.

रात्री उशीरा त्याला कोडोलीत आणण्यात आले. दरम्यान, मुंबईतील सांताक्रुझ परिसरातील सात कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी मुल्लाचा ताबा मिळावा म्हणून मुंबई पोलिसही सांगलीपर्यंत आले होते. पुणे सीआयडीनेही तीन कोटी प्रकरणाची सविस्तर माहिती गुरुवारी घेतली. दरम्यान, मोहद्दीनला कोणी 'टिप' दिली याचा शोध सुरू झाला आहे.

वारणेपासून जवळ जाखले (ता. पन्हाळा) येथे मुल्लाचे घर आहे. तो निष्णात चालक असल्याने अनेकजण त्याला खाजगी मोटारीवर चालक म्हणून बोलवतात. तो काम प्रमाणिक करीत असल्याने काहींचा तो गळ्यातील ताईत बनला. चालक म्हणून वावरताना त्याची ओळख वारणा शिक्षण मंडळातील काहीजणांशी झाली. या ओळखीचा फायदा त्याने चलाखीने घेतला. मंडळातील एका कर्मचाऱ्याचे आणि मुल्ला याचे संबध अधिक घट्ट आहेत. सांगली पोलिसांतही त्याचे संबंध घट्ट आहेत. त्याची चौकशी सुरू झाली आहे.

मुल्ला वरचेवर वारणा परिसरात येत होता. मात्र, तो कोणाच्याही नजरेत आला नव्हता. त्याला कॉलनीच्या एका खोलीत एवढी रक्कम असल्याचा सुगावा कसा लागला याचा उलगडा होऊ शकलेला नाही. चोरी प्रकरणात तो एकटा नाही. त्याला माहिती पुरविणारे आणखी काहीजण असावेत असा संशय आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुल्लाच्या सांगलीतील ‘कनेक्शन’ची चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा/सांगली मिरजेतील बेथेलहेमनगरमधील साध्या घरात तीन कोटी ७ लाख ६३ हजारांची रोकड ठेऊन चैन करणाऱ्या मुल्लाच्या कारनाम्याचा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी छडा लावला. कोडोली पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल असल्याने गुरुवारी त्याचा ताबा कोडोली पोलिसांनी घेतला आहे.

कोडोली पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्याचा तपास होणार हे क्रमप्राप्त आहे. मात्र मुल्ला आणि सांगलीतील एका पोलिसाचे नाते कोणते ? याचा तपास होणेही गरजेचे आहे. मुल्लाने चोरलेल्या पैशातून घेतलेली बुलेट एका पोलिसाच्या नावावर असल्याचे यापूर्वीच तपासात समोर आले आहे. त्या पोलिसाचे काय झाले?, त्याने कोणत्या नात्याने बुलेट स्विकारली, याचा उलगडा होणे आवश्यक आहे.

वारणा शिक्षण मंडळाच्या आवारातील शिक्षक कॉलनीत साडेचार कोटींच्या चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या मैनुद्दीन मुल्लाला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी सात वाजता कोडोलीत आणले. शाहुवाडी विभागाचे पोलीस अधिक्षक सूरज गुरव यांनी त्याच्याकडे चौकशी केली. चोरीचा गुन्हा कोल्हापूरकडे गुन्हा वर्ग केल्याचे गुरव यांनी सांगितले. मुल्ला याला उद्या पन्हाळा कोर्टात हजर केले जाईल. त्याचा साथीदार रेहान अन्सारी फरारी असून त्याच्या शोधासाठी पथके कार्यरत आहेत. वारणानगरात सापडलेले १ कोटी ३५ लाख स्टेट बँकेच्या शाखेत जमा असून याबाबत आयकर विभाग माहिती घेत आहे. दरम्यान, सांगली आणि कोल्हापूर पोलिसांनी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी केली. मैनुद्दीन मुल्लाने रेहान अन्सारीच्या मदतीने चोरी केल्याचे उघड असले तरी रेहान अन्सारी याचे पूर्ण नाव आणि पत्ता अद्याप पोलिसांना समजलेला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावणेनऊ कोटींची जबाबदारी निश्चित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रवी बँकेच्या आर्थिक स्थैर्य धोक्यात आणणारी कर्जाची थकबाकी ८ कोटी ६८ लाख रुपये निश्चित केली आहे. बँकेची एकूण थकबाकी ८६१.६७ लाख रक्कमेपैकी ५६२.३७ लाख रुपये थकबाकी कॅश क्रेडिट कर्जाची आहे. बँकेने कॅश क्रेडिट कर्ज मंजूर करताना कोणत्याही अटीचे पालन केलेले नाही. कर्ज वसुलीसाठी विशेष प्रयत्न न करता निष्काळजीपणा दाखविला आहे. त्यासाठी संचालक मंडळच जबाबदार आहे असा निष्कर्ष चौकशी अधिकार रंजन लाखे यांनी काढला आहे.

दरम्यान, संचालकांच्या नातेवाईकांनी पुरेसे तारण न घेता कर्ज मंजूर केले आहे. नातेवाईकांची थकबाकीची रक्कम ६६. ७९ लाख निश्चित केली आहे. नातेवाईकांच्या ७ खात्यांवर थकबाकी आणि थकव्याजाची ही रक्कम आहे. रोखता आणि तरलता न ठेवल्यामुळे बँकेस झालेल्या दंडाची रक्कम १०. २६ लाख आहे.

दरम्यान, व्याज आणि सूट रक्कम ५.१६ इतकी आहे. व्याज कमी करण्यात आलेल्या खात्यांची चौकशी करुन ६ लाख ७ हजार रुपयांचा ठपका ठेवला आहे. पांजरपोळ शाखेची इमारत खरेदी करण्यापूर्वी बँकेने खात्याची मंजूरी घेतलेली नाही. इमारतीचे बांधकामही अपूर्ण आहे. त्यामुळे रवि बँकेने इमारत खरेदी अॅडव्हान्स व संबधित रक्कम २८.५७ लाख इतकी आहे. याला जबाबदार असलेल्यांकडून आर्थिक नुकसान व्याजासह वसूल केले जाणार आहे.

सरकारी रोख्यातील गुंतवणूकीत ३६ हजार रुपयांचा तोटा झाला आहे. अॅडव्हॉन्स अगेस्ट चेक ओव्हरड्राफ्टची दीड लाखांची रक्कम आहे. त्यामुळे सर्व व्यवहाराची जबाबदारी ३३ जणांवर निश्चित केली आहे.

दरम्यान, चौकशी अधिकाऱ्यांच्या या कारवाईमुळे आगामी काळात या संचालक, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. चौकशी अधिकाऱ्यांच्या निकषानुसार पुढील प्रक्रीया केली जाईल. ज्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली आहे, त्यांच्याकडून कार्यवाही कशी केली जाईल यावर आगामी काळातील घडामोडी अवलंबून असतील. बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे सिद्ध झाले असले तरी त्याची वसूली कशी केली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images