Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरच्या महिला...लई भारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरात आल्यानंतर मला लई भारी वाटलं. मी कोल्हापूरविषयी खूप ऐकलं आहे. इथली माणसं खूप प्रेम करणारी आहेत. कोल्हापुरातल्या महिला तर सगळ्या क्षेत्रांत पुढे असतात. महिला दिनानिमित्ताने महिला एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येतात हेच खूप चांगले आहे. एक दिवस आपल्यासाठी साजरा करताना महिला म्हणून मला तुमच्यासोबत अतिशय आनंद झाला...अशा मऱ्हाठमोळ्या शब्दांत अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी कोल्हापूरच्या महिलांशी संवाद साधला.

जागतिक महिला दिनानिमित्त महापालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित केलेल्या जागर महिला शक्तीचा या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या उपक्रमांतर्गत केशवराव भोसले नाट्यगृहात मंगळवारी सकाळी​ मिसेस कोल्हापूर आणि मिस युवती या स्पर्धाही डिंपल यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाल्या. त्यानंतर दिवसभर या स्पर्धांनी महिला दिनाचा दिवस गाजवला.

दरम्यान, सकाळी साडेनऊ वाजता गांधी मैदान येथून महिलांनी रॅली काढून या कार्यकमाला सुरुवात केली. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार सतेज पाटील, प्रतिमा पाटील, उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगी रंगातील फुगे आकाशात सोडून रॅलीचे उदघाटन झाले. यावेळी महिला सुरक्षितता, लेक वाचवा, आम्हालाही स्वातंत्र्य द्या, आदींसह स्वच्छता, पर्यावरण, पाणी वाचवा अशा संदेश फलकांनी रॅलीला सामाजिक कोंदण मिळाले.

कोल्हापुरातील विविध संघटना, महिला संस्था, महिलांचे ग्रुप मोठ्या संख्येने रॅलीत उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी अनेक महिलांनी हिरव्या साड्या आणि कोल्हापुरी फेटे असा पारंपरिक पोशाख परिधान करून लक्ष वेधून घेतले. गांधी मैदान, बिनखांबी गणेशमंदिर, महाद्वार रोड यासह प्रमुख मार्गावरून फिरून रॅली केशवराव भोसले नाट्यगृह येथे आली. याठिकाणी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा डिंपल कपाडिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


केडीसीसी संचालकांचा मंगळवारी अंतिम फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या नवीन वटहुकूमानुसार विभागीय सहनिबंधकांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपात्र संचालकांना पाठवलेल्या नोटिसीवर मंगळवारी सुनावणी झाली. संचालक मंडळाच्यावतीने अॅड. लुईस शहा यांनी म्हणणे मांडण्यासाठी पुढील तारखेची मागणी केली. त्यानुसार विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी मंगळवारी (ता. १५) सुनावणीचे आदेश दिले. त्यामुळे संचालकांना आठ दिवसांचा तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी पुढील सुनावणीत अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.

२००६ नंतर विमासंरक्षण असलेल्या बँकांवर प्रशासक नियुक्त असल्यास त्यांना दहा वर्षे बँकेची निवडणूक लढवण्यास बंदी घालणारा वटहुकूम काढला आहे. सरकारच्या वटहुकूमाला कोल्हापूर जिल्हा बँकेसह राज्यातील इतर बँकेच्या अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या संचालकांनी स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान, नवीन वटहुकूमानुसार अपात्र ठरणाऱ्या संचालकांना विभागीय सहनिबंधकांनी 'अपात्र का ठरवू नये' अशी नोटीस बजावली होती. विभागीय सहनिबंधकांकडे सुनावणी सुरू होण्यापूर्वी संचालक मंडळावर कोणतीही कारवाई करु नये असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते.

सुनावणी दरम्यान संचालकांच्यावतीने अॅड. शहा यांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली. दरम्यान, जिल्हा बँक संचालकांवर १४५ कोटींची जबाबदारी निश्चित करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या: सुनावणी २९ पर्यंत तहकूब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे हत्या खटल्याची सुनावणी २९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सनातन संस्थेचा प्रमुख आरोपी समीर गायकवाड याच्या वकिलांनी दुसऱ्यावेळी जामिनावर अर्ज केला असून १४ मार्च रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. तपास यंत्रणेकडून मुंबई हायकोर्टात अहवाल सादर करणार असल्याने आजची सुनावणी २० दिवस तहकूब करण्यात आली.

मंगळवारी न्यायाधीश बिले यांच्यासमोरील सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी २९ फेब्रुवारी रोजी मुंबई हायकोर्टात स्मीता पानसरे आणि कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेची माहिती दिली. पानसरे हत्येच्या तपासासाठी तपास यंत्रणांना २८ मार्चपर्यंत वेळ द्यावा असा आदेश कोर्टाने दिला आहे. त्यामुळे समीरवर आरोप निश्चित करण्यात येऊ नये अशी मागणी केली. सरकारी वकील बुधले यांच्या युक्तीवादावर समीरचे वकील एस. एस. पटवर्धन आक्षेप घेतला. मुंबईतील याचिकेत समीर गायकवाड हा तक्रारदार नाही. पोलिसांनी त्याच्यावर कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. त्याच्यावर आरोप निश्चित न करता कारागृहात न ठेवणे म्हणजे मानवी हक्काची पायमल्ली आहे. आरोप निश्चित केल्यानंतरही तपास करता येतो. सरकारी पक्ष वेळकाढूपणा करत आहे. समीर जामीन नाकारला आहे. जर आरोप निश्चित केले नाहीत आणि चार वर्षांनी समीर निर्दोष सुटला तर त्याच्यादृष्टीने तो अन्याय ठरेल. खटल्याची सुनावणी सुरू असताना पुरावा कोर्टात सादर करता येतो असा युक्तीवाद त्यांनी केला.

सरकारी वकील बुधले यांनी मुंबई हायकोर्टात २८ मार्च रोजी सुनावणी आहे, याकडे कोर्टाचे लक्ष वेधले. मुंबई हायकोर्ट दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाचे निरीक्षण करत आहे. विशेष तपास पथक, सीबीआय, कर्नाटक सीआयडी यांची पानसरे, दाभोलकर व कलबुर्गी तपासासंदर्भात १० मार्च रोजी बैठक होणार आहे. सध्या तपास हा प्रगतीपथावर आहे.

समीरवर पानसरे यांच्या हत्येच्या खुनाचा व कटाचा आरोप आहे. त्यामुळे हा खटला हायकोर्टाच्या निर्णयापर्यंत तहकूब करावा, अशी विनंती बुधले यांनी केली. कोर्टाने त्यांची मागणी मान्य करत पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होईल असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम बांधवांची शिवजयंती मिरवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सांगलीत शुक्रवारी ठिकठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. आमदार सुधीर गाडगीळ, महापौर हारुण शिकलगार, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त अजीज कारचे, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांनी शिवाजी मंडईतील आश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केले. सायंकाळी समस्त मुस्लिम समाजाने ढोल-ताशाच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह त्यांच्या आरमारात महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या मुस्लिम सरदारांच्या भूमिकेत अनेकांनी घोड्यावर, उंटावर स्वार होऊन जंगी मिरवणूक काढून सांगलीकरांचे लक्ष वेधले.
शिवजयंतीच्या निमित्ताने शुक्रवारी सकाळी उत्साही मोटारसायकल स्वारांनी भलेमोठे भगवे घेऊन सांगलीच्या विविध भागातून रॅली काढली. शास्त्री चौक, सिव्हिल चौकातील रिक्षा चालकांनी प्रत्येक रिक्षाला भगवा ध्वज लावून रिक्षा थांब्याच्या ठिकाणी छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन केले. शिवाजी मंडईतील पुतळ्याला रिपब्लिकन पार्टी, भारतीय विद्यार्थी संसद यांच्यासह विविध संघटनानी
अभिवादन केले.
सायंकाळी सांगलीतील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विद्युत्त रोषणाईबरोबरच फटाक्यांची आतषबाजी करीत शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक निघाली. यामध्ये संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलसह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फौजेत सर्वच जातीधर्मांचे मावळे होते. मराठा आरमाराचा गौरव सिद्धी हिलाल, शिवरायांच्या आरमाराचा प्रमुख दर्या सारंग, सिद्धी मिस्त्री यासह अन्य सरदारांचा इतिहास डिजीटलवर मांडून ते फलक मिरवणुकीत वाहनांवर लावण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनामुळे सोलापुरातील विडी उद्योग ठप्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
धूम्रपानविरोधी कायद्यातून विडी उद्योगाला वगळण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी दहा हजार विडी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. विडी कामगारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. आज (बुधवार) सकाळी रेल रोको आंदोलन होणार आहे.
मागील दहा दिवसांपासून सोलापुरातील विडी उत्पादकांनी पुकारलेल्या संपामुळे दर रोज सुमारे पाच कोटी विड्यांचे उत्पादन ठप्प झाले आहे. विडी उद्योगात काम करणाऱ्या सुमारे दीड लाख विडी कामगारांची रोजी-रोटी बुडाली आहे. विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दहा दिवस आंदोलन करुन सुद्धा सरकारने कोणत्याही प्रकारचे लक्ष न घातल्यामुळे कारखानदार आणि कामगारांच्या पदरी निराशाच पडली आहे. धरणे, निदर्शने आणि महामोर्चानंतर आज (बुधवार) हजारो विडी कामगार सोलापुरात रेल रोको करणार आहेत.
विडीच्या बंडलावर असलेल्या वेस्टनावरील ८५ टक्के भागामध्ये विडी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा छापण्याची अधिसूचना केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने काढल्यामुळे देशभरातील विडी उत्पादकांनी या निर्णयाला विरोध करण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून विडी कारखाने बंद ठेवले आहेत.
१ एप्रिल २०१६ पासून या धूम्रपान कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. कायदा न पाळणाऱ्या कारखानदारांना शिक्षेची तरतुद केल्यामुळे विडी उत्पादकांचे धाबे दणाणले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात एका मिनिटाचे रेल रोको आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
केंद्र सरकारने धूम्रपान कायद्यात विडी उद्योगाचा समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ गेल्या दहा दिवसांपासून विडी उत्पादकांनी आंदोलन सुरू केले होते. बुधवारी बाळे स्टेशन येथे एका मिनिटाच्या रेल रोकोच्या स्टंटबाजीनंतर आंदोलन समाप्त करण्यात आले. महासंघाच्या विनंतीवरून सोलापूर-पुणे पॅसेंजर बाळे स्थानकात दोन मिनिटांसाठी थांबल्यानंतर केवळ एका मिनिटात रेल्वे समोर बसून कारखानदार व कामगारांनी फोटो सेशन करून रेल्वेला वाट करून दिली.
धूम्रपान विरोध कायद्यानुसार विड्यांच्या वेस्टनावरील ८५ टक्के भागात विडी आरोग्याला धोकादायक असल्याचा इशारा देण्याची अधिसूचना केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने काढली असून, १ एप्रिल २०१६पासून हा नियम आमलात येणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीने १५ ते २४ फेब्रुवारी, असे दहा दिवस आंदोलन करण्यात आले. कारखानदारांनी सर्व १५ कारखाने बंद ठेवल्यामुळे सुमारे दीड लाख कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. प्रतिदिन सुमारे पाच कोटी या प्रमाणे दहा दिवसांत ५० कोटी विडीचे उत्पादन ठप्प झाले होते. शिवाय लाखोंच्या घरात मजुरी बुडाली आहे.
दरम्यान, बुधवारी ३००हून अधिक विडी कामगार व कारखानदार रेल रोको करण्यासाठी बाळे रेल्वे स्थानक येथे पोहोचले. परंतु, आंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या जास्त होती. त्यामुळे आंदोलकांना रेल्वे स्थानकापासून खूपच मागे रोखले गेले. आंदोलकांच्या विनंतीवरून केवळ २० जणांना फोटो काढण्याची परवानगी देण्यात आली. त्यांची नावे घेऊन त्यांना परवानगी देण्यात आली. रेल्वे स्थानकावर सरकारच्या विरोधात अर्धा तास घोषणाबाजी झाली. त्या नंतर बरोबर बारा वाजता सोलापूर-पुणे पॅसेंजर बाळे स्थानकात आली. गाडीने दोन मिनिटांचा थांबा घेतला इंजिनच्या समोर रुळावर केवळ एकच मिनिटे बसून रेल रोकोची स्टंटबाजी करून आंदोलक कारखानदार व कामगार बाजूला झाले. रेल्वे इंजिनवर कोणीही चढू नये म्हणून रेल्वे पोलिसांनी इंजिनचा ताबा घेतला होता. एक मिनिटाच्या आंदोलनानंतर पॅसेंजर पुण्यातच्या दिशेने मार्गस्थ झाली.
दहा दिवसांच्या आंदोलनात कोणत्याही प्रकारचे आश्वासन पदरात पडले नाही. तरीही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सकारात्मक पाऊल
उचलण्याचे सूतोवाच केल्यामुळे धूम्रपान कायद्यातून विडी उद्योगाला वगळण्यात बाबत योग्य निर्णय होईल, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलनासाठी आम्ही रस्त्यावर येऊ, विष्णू कारमपुरी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘उजनी’ने गाठला तळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
दुष्काळाचा सगळ्यात मोठा फटका उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ज्यांनी धरण उभारणीसाठी गावेच्या गावे आणि उभे संसार पाण्याखाली घालवले, त्यांनाही शेतातील उभे पिक जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. डोळ्या समोरून धरणातील पाणी लांब-लांब जाताना दिसते पण, धरणग्रस्त शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहे.
सध्या धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या सोलापूर शहर आणि परिसरासाठी सोडल्यामुळे धरणाने तळ गाठला आहे. जलाशयातील पाणीसाठा कमालीचा खालावल्याने या हजारो शेतकऱ्यांना आपली पिके वाचविण्यासाठी आता चर खोदून डबके तयार करून त्यात साचलेले पाणी उपसा करावा लागत आहे. हे चित्र सध्या इंदापूर तालुक्यातील अनेक जलाशया शेजारील गावांत दिसत आहे. एका लहान डपक्यामधून शेकडो मोटारींने पाणी उचलेले जात आहे. ज्यांना पाणीच नाही त्यांचे दुःख वेगळे, मात्र ज्यांच्या डोळ्यासमोर कायम पाण्याचा अथांग जलाशय बघायची सवय आहे, त्यांना रोज झपाट्याने कमी होत चाललेले पाणी पाहून वर्षभराचे मांडलेले गणित डोळ्यासमोर उधळताना दिसत आहेत. या पाण्याच्या जीवावर शेतातील पिकासाठी काढलेली लाखोंची कर्जे आता भूत बनून मानगुटीवर बसली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायब सिंथेटिक टाक्यांची चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात जिल्हावासियांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी सामाजिक संस्था, सहकारी संस्थांनी जिल्हा प्रशासनाला हजारो सिंथेटिक टाक्या दिल्या होत्या. दुष्काळ हटल्यानंतर सिंथेटिक टाक्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले होते. बहुतेक ठिकाणाच्या टाक्या आता गायब झाल्या आहेत. या गायब झालेल्या टाक्या कुठे गेल्या. याचा तपास करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात सध्या टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा योजनांवर भर दिला आहे. तसेच पाणी पुरवठ्याच्या अन्य योजनांदेखील राबवण्यात येत आहेत. तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी ८०० टँकरच्या माध्यमातून जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत होता. पाण्याची मागणी वाढत असल्याने टँकरमधील पाणी विहिरीत टाकले जात होते. टँकरने विहिरीत पाणी टाकल्यानंतर ते पाणी गढूळ होत होते. यावर उपाय शोधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील बँका, पतसंस्था, सहकारी संस्था, साखर कारखान्यांनी वाड्या-वस्त्यांवर सिंथेटिक टाक्या द्याव्यात, असे आवाहन केले होते. त्यानुसार आणि सामाजिक संस्थांनी हजारो सिंथेटिक टाक्या प्रशासनास दिल्या होत्या. सहकारी संस्था आणि सामाजिक संस्थांनी दिलेल्या टाक्या दुष्काळ हटल्यानंतर गायब झाल्या आहेत. आता पुन्हा जिल्ह्यात टंचाई निर्माण झाली आहे. त्या अनुशंगाने सिंथेटिक टाक्यांचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२१०० टन बेदाण्याची नासाडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
तीव्र दुष्काळातही विकतच्या पाण्यावर लाखो रुपये खर्चून जपलेली अव्वल दर्जाची द्राक्षे बेदाणा बनविण्यासाठी जुनोनी येथील शेडवर ठेवली असताना ​बुधवारी रात्री ​अचानक ​झालेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका जुनोनी परिसराला बसला. जवळपास २१०० टन बेदाण्याची नासाडी झाल्याने हा बळीराजा उद्ध्वस्त होणार आहे.
सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या जुनोनी येथे अनेक द्राक्ष बागायतदार आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन बेदाणा प्रक्रिया करणारे ३०० मोठी शेड उभी केली आहेत. येथील कोरडी हवा आणि कमी दमट वातावरण असल्याने गेली अनेक वर्षे जुनोनी परिसरात फार मोठ्या प्रमाणात बेदाणा प्रक्रिया व्यवसाय चालतो. दोन्ही जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार आपला बेदाणा बनविण्यासाठी येथे माल आणून टाकत असतात.
वादळी पावसाने याच्या संरक्षणाला बांधलेली नेट ची कपडे फाटून गेली आणि काही शेड चे पत्रे उडून गेल्याने चांगल्या प्रती​चा बेदाणा पावसात भिजून गेला आहे . यामुळे त्याच्या वळायची प्रक्रिया पूर्ण होण्याची सायकल तर बिघडलीच असून शिवाय आता याला काळपट रंग येण्याची शक्यता असल्याने दरात मोठी घसरण होणार आहे . हा भिजलेला माल जास्त दिवस आता वळवायला शेड मध्ये राहिल्याने या पावसाळी वातावरणात बागेतून शेड वर येणाऱ्या मालाचे वेळापत्रक आता कोलमडून जाणार आहे . शिवाय हा माल जास्त दिवस बागेत राहिल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे . अशा पावसाळी हवेत द्राक्षांवर फवारणीसाठी लाखो रुपये खर्चातही वाढ होणार आहे.
दरम्यान काल रात्री वादळी वार्यात वीज पडून सांगोला तालुक्यातील मानेगाव येथे १५ मेंढ्या मेल्या आहेत . प्रशासनाने नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात केली असून सांगोला तालुक्यात अनेक ठिकाणी विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात स्थायीसाठी काँग्रेसचे धक्कातंत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर
सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी शुक्रवारी काँग्रेसने अचानक रियाज हुंडेकरी यांची उमेदवारी घोषित केली. या निर्णयामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीनला (एमआयएम) शह दिल्याचे मानले जात आहे. हुंडेकरी यांच्यासाठी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे समर्थक आणि पद्मशाली समाजाचे नेते मेघनाथ येमूल यांचा पत्ता कापण्यात आला.
नगरसेवक येमूल आणि याच समाजाचे नगरसेवक अनिल पल्ली यांच्यात या पदासाठी तीव्र चुरस होती. मात्र, या दोघांच्या भांडणात सभापतिपद हुडंकेरी यांच्या पारड्यात पडले. गुरुवारपर्यंत येमूल यांचेच नाव सभापतिपदासाठी निश्चित होते. शुक्रवारी सकाळी अचानक काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकीय घडामोडी घडल्या आणि येमूल यांच्याऐवजी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी नगरसेवक हुंडेकरी यांचे नाव सभापतिपदासाठी जाहीर करून येमुल आणि पल्ली यांना अनपेक्षित धक्का दिला.
शिक्षण मंडळाचे सभापती प्रा. एस. एस. कटके यांनी मुदत संपूनही सभापतिपदाची खुर्ची रिकामी न केल्यामुळे काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे. स्थायीचे सभापतिपद काँग्रेसला गेल्यास परिवहन समितीचे सभापतिपद राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि गटनेते दिलीप कोल्हे यांनी लावून धरली होती. त्यामुळे अखेर काँग्रेसने स्थायी घेतले तर राष्ट्रवादीला परिवहन समिती देण्यात आली आहे. नुकतेच सदस्य बनलेले राजन जाधव यांच्या हातात परिवहन समितीचे सुकाणू जाणार हे निश्चित आहे.
दरम्यान, पक्षीय बलाबलानुसार शनिवारी रियाज हुंडेकरी यांची स्थायीच्या सभापतिपदी निवड निश्चित आहे. भाजपने विरोधकाची भूमिका पार पाडत हुंडेकरी यांच्याविरोधात नगरसेविका कांचना यन्नम यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती निवडीकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळापूरच्या पुरातन अर्धनारीनटेश्वर मंदिराला नोटीस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर
वेळापूर (ता. माळशिरस) येथील १३व्या शतकातील प्रसिद्ध पुरातन अर्धनारी नटेश्वर मंदिराला महसूल प्रशासनाने अतिक्रमणाची नोटीस पाठविल्याने खळबळ उडाली आहे. मंदिर पाडण्याबाबतची नोटीस बजावल्याने महसूल विभागाबाबत संतापाची भावना निर्माण झाली आहे.
संबधित मंदिर भारत सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून, त्याचे सर्व पुरावे आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेवून भारत सरकारने ते ताब्यात घेतले आहे. महसूल प्रशासनाने याची माहिती न घेताच नोटीस बजावत कागदपत्रे सदर न केल्यास मंदिर पडण्याची नोटीस बजावली आहे. दौलताबादचे राजा रामदेवराय यादव यांनी इ. स. १३व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे पुरावे देखील मिळाले आहेत. हे मंदिर त्यांच्याही पूर्वीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. असे असताना प्रशासनाने अशा पद्धतीची नोटीस देण्यापूर्वी वस्तुस्थिती का पहिली नाही, असा सवाल भाविक करीत आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार १९६० नंतर उभारलेली अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने या मंदिरासह वेळापूर आणि परिसरातील अनेक मंदिरांना या नोटीसा बजावल्या आहेत. वेळापूर येथील सर्व पुरातन मंदिरे ही सध्या भारत सरकारच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असून, या मंदिराच्या देखभाल दुरूस्तीसाठी केंद्र सरकार कोट्यावधी रुपयांचा खर्च करते. या मंदिराजवळून जाणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते हे गेल्या ५० वर्षांत झाले आहेत. त्यामुळे ही सर्व मंदिरे आधीची आहेत व रस्ते नंतर तयार झाले आहेत, असे असतानाही महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाने तहसील कार्यालय, माळशिरस यांचे पत्र क्रमांक जबाबी/कावि/२७८/२०१६ माळशिरस २/३/२०१६ अन्वये अनधिकृत धार्मिक स्थळ निष्कासीत करण्याचे आदेश काढले आहेत. या मंदिराच्या पुराव्याबाबतची माहिती http://www.asimumbaicircle.com/m_solapur.html या वेबसाइटवर भारतीय पुरातत्व खात्याने प्रसिद्ध केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माळढोक अभयारण्यातील खासगी जमीन निर्बंधमुक्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील माळढोक अभयारण्य क्षेत्रातील एकूण १२२९.२४ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ८८२.८४ चौरस किलोमीटर खासगी क्षेत्रातील जमीन खरेदी-विक्रीला सरकारच्या वन विभागाने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार तसेच मुनगंटीवार यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे हा निर्णय झाला आहे. सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी व जमीन मालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
माळढोक अभयारण्यातंर्गत खासगी क्षेत्रात वन्यजीव अधिनियमाच्या तरतुदी लागू होत असल्याने हे क्षेत्र सरकारच्या माळढोक अभयारण्य पुनर्गठन अधिसूचनेतून वगळण्यात आले आहे. माळढोकचे सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील एकूण क्षेत्र १२२९.२४ चौरस किलोमीटर इतके असून, त्यामध्ये ८८७.६५ चौरस किलोमीटर खासगी क्षेत्र आहे. यापैकी ४.८० चौरस किलोमीटर क्षेत्र अत्यावश्यक क्षेत्रांतर्गत संपादित करून उर्वरित ८८२.८४ चौरस किलोमीटर क्षेत्राच्या जमीन खरेदी-विक्रीला सरकारने परवानगी दिली आहे.
माळढोक अभयारण्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर खासगी क्षेत्राचा समावेश झाल्यामुळे व या क्षेत्रास वन्यजीव (संरक्षण) अधिनियमाच्या तरतुदी लागू होत असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री, जमीन गहाण ठेवणे, बँकेचे कर्ज घेणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येत होत्या. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील खासगी क्षेत्रातील जमीन मालकांनी तक्रारी केल्या होत्या. या बाबत पालकमंत्री देशमुख यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. दरम्यान, सुप्रीम कोर्टाचा निर्णय विचारात घेऊन व राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीने शिफारशी केल्याप्रमाणे राज्याच्या महसूल व वनविभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

असा झाला निर्णय

२७ फेब्रुवारी २०१२च्या अधिसूचनेनुसार १२२९.२४ चौरस किलोमीटर क्षेत्र माळढोक अभयारण्य म्हणून अधिसूचीत करण्यात आले. ज्यामध्ये ३२३.९ चौरस किलोमीटर वनक्षेत्र, १८.५० चौरस किलोमीटर गायरान व सरकारी क्षेत्र तसेच ८८७.६५ चौरस किलोमीटर खासगी क्षेत्राचा समावेश होता. या १२२९.२४ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी राखीव वनाचे क्षेत्र आणि क्षेत्रासंदर्भात सोलापूर, माढा व कर्जतचे उपविभागीय अधिकारी यांनी वन्यजीव अधिनियम १९७२च्या कलमांतर्गत चौकशी पूर्ण करून अभयारण्यात समाविष्ट करण्यात आलेल्या ८८७.६४ खासगी क्षेत्र अभयारण्यामधून ४.८० चौरस किलोमीटर खासगी क्षेत्र संपादनाची शिफारस केली व तसेच गायरान आणि इतर सरकारी क्षेत्र ४७.१५ चौरस किलोमीटर (४७१५.२२ हेक्टर) अभयारण्यात समाविष्ट करण्याबाबत शिफारस केली. त्यानंतर माळढोक अभयारण्याचे क्षेत्र १२२९.२४ चौरस किलोमीटरवरुन ३६६.६६ चौरस किलोमीटर करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली तसा प्रस्तावही २०१४ मध्ये राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्यात आला होता.

प्रस्ताव राष्ट्रीय वन्य जीव मंडळाच्या स्थायी समितीच्या २०१५च्या ३३ व्या बैठकीत चर्चेस आला. त्याबाबत राज्य सरकारला पुनर्विचार करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानंतरही राज्य सरकारने अभयारण्याचे क्षेत्र ३६६.६६ चौरस किलोमीटर करण्याबाबतची आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या स्थायी समितीने हा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘थकबाकी नको; पण फ्लेक्स आवरा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
कराची थकबाकी असणाऱ्यांची नावे नगरपालिकेने सोमवार पेठेत फ्लेक्स बोर्डावर जाहीर करताच, या करदात्यांची अवस्था थकबाकी नको; पण फ्लेक्स आवरा अशी झाली. या मोहिमेमुळे सोमवारी दिवसभरात पालिकेत ६५ लाख रुपयांची थकबाकी वसूल झाली.
कराड पालिकेने नुकतीच थकबाकीदारांची नावे फ्लेक्स बोर्डावर प्रसिद्ध केली. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सात प्रभागांत सुमारे ६,६१६ थकबाकीधारक आहेत. सोमवारी दुपारपर्यंत १९ लाख रुपयांची रोख रक्कम आणि १६ लाख रुपयांचे चेक पालिकेत जमा करण्यात आले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ६५ लाख रुपये थकबाकी पालिकेत जमा झाली.
शहरातील घरपट्टी व पाणीपट्टीसह एकूण संकलित कर भरणाऱ्यामध्ये डॉक्टर, व्यापाऱ्यांसह नगरसेवकांच्या नातेवाइकांचा समावेश आहे. थकबाकीदारांची नावे असलेल्या फ्लेक्स बोर्डवर आपल्या नातेवाईकांची नावे असल्याचे समजताच, ती काढून टाकण्यासाठी सध्या नगरसेवकांकडून पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना फोनवरून विनवणी केली जात असल्याची चर्चा पालिका वर्तुळात ऐकावयास मिळत आहे. थांबा...साहेब,आमची कराची रक्कम भरतो, पण आमचे नाव टाकू नका, असे सांगत थकबाकीधारक आपल्या कराची रक्कम पालिकेत येऊन भरत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीचा गळा चिरून जवानाची आत्महत्या

$
0
0

सातारा : गोडोली परिसरातील राजयोग हॉटेलमध्ये पत्नीचा गळा चिरून जवानाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली. श्रीकांत बाळासाहेब निमज (वय ३०) व नयना श्रीकांत निमज (वय २५, रा. कुमठे आसनगाव) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत श्रीकांत व नयना या दोघांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. श्रीकांत हा भारतीय सैन्य दलात सिग्नल विंग डेहराडून येथे कार्यरत होता. या दोघांना दोन वर्षाचा मुलगाही आहे. श्रीकांत व नयना यांच्यात वाद सुरू होता. याप्रकरणी नयना हिने सातारा शहर पोलिस ठाण्यात ४९८ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी श्रीकांत सुटी काढून सातारा येथे आला होता. बुधवारी श्रीकांतने नयना हिला बरोबर घेऊन गोडोली येथील राजयोग हॉटेलमध्ये राहिला. दोघे पती-पत्नी उशिरापर्यंत खाली आले नाहीत, याबाबत हॉटेल प्रशासनाने पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी रुम उघडली असता, नयनाचा मृतदेह बेडवर गळा कापलेल्या अवस्थेत आढळून आला तर श्रीकांतचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनास्थळावर डीवायएसपी खंडेराव धरणे, पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, विनायक वेताळ व पोलिस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचे पंचनामे करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी बंद असल्याने विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
येथील एसटी आगारातील अनेक कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनासाठी नागपूरला गेल्यामुळे आगारातील ३२ बस आगारातच उभ्या आहेत. ऐन परीक्षेच्या काळात या बस थांबून राहिल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. मिळेल ते वाहन किंवा वडापवर त्यांना अवलंबून राहावे लागत आहे.
कर्मचाऱ्यांच्या अधिवेसनामुळे वाहक, चालकांची कमतरता भासत आहे. परिणामी, आगाराचे वेळापत्रकच कोलमडले आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात बारावीची तर एक मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षेसाठी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी व पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी एसटी बसने प्रवास करावा लागतो. नेमक्या याच वेळेला येथील आगारातील अनेक कर्मचारी नागपूर येथे असलेल्या आपल्या संघटनेच्या अधिवेशनासाठी गेले आहेत. कर्मचारीच नसल्यामुळे आगारातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील अनेक मार्गांवरील बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत.
परीक्षेच्या कालावधीत आलेल्या या अधिवेशनाबद्दल प्रवासी वर्गांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कराड आणि मलकापूर भागात मोठ्या संख्येने कॉलेज आणि शैक्षणिक संस्था आहेत. कराड तालुक्यासह कडेगाव, उंब्रज, पाटण, ढेबेवाडी भागातून विद्यार्थी येेथे शाळा-कॉलेजसाठी येतात. अनेक गावांतील विद्यार्थ्यांची एसटी बसअभावी अडचण झाली आहे. पालकांना मुलांना वेळेवर परीक्षेला सोडण्याचे काम करावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरवळजवळ चार तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ अवैध प्रवासी वाहतूक करणारी (वडाप) भरधाव जीप गुरुवारी पहाटे उलटून चार जण ठार आणि एक जण जखमी झाला. सर्व मृत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रहिवासी आहेत.
ही जीप शिरवळहून भोरकडे निघाली असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्यालगतच्या कठड्याला धडकून उलटली. त्यात जीपमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण जखमी झाला आहे. मृतामध्ये प्रशांत अंकुश राऊत (वय २५, रा. राऊतवाडी ता. भोर) गणेश गुलाब बोणे (वय १५, रा. सारोळा ता. भोर) दस्तगीर नबीलाल नाणकेकर (वय २८, रा. सारोळा ता. भोर) अतुल नंदकुमार बरकडे (वय ३०, रा. गुणंद ता. भोर) यांचा समावेश आहे. हणमंत अंकुश निगडे (वय २८, रा. भोंगवली ता. भोर) असे गंभीर जखमीचे नाव असून, त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्व युवक भोरमधील रहिवासी असून ते बुधवारी शिरवळला आले होते. रात्री परतीच्या मार्गावर असताना साडेबारा वाजता शिरवळजवळील ट्यूबवेल कंपनीसमोर त्यांच्या जीपला अपघात झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराडला यशवंतरावांच्या विचारांचा वारसा - पृथ्वीराज चव्हाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
'कराडला यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा लाभलेला असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्याचे काम कराड पंचायत समितीच्या माध्यमातून केले जात आहे. पंचायत समितीच्या माध्यमातूनच खर्या अर्थाने ग्रामीण भागात विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे,' असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी काढले.
कराड पंचायत समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे नूतनीकरण व संकेतस्थळाच्या आरंभप्रसंगी ते बोलत होते. आमदार चव्हाण म्हणाले, राज्यातील ग्रामपंचायतीच्या विकासासाठी अर्थसंकल्पात चौदाव्या वित्त आयोगाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. त्यातून ग्रामपंचायतींचा विकास करण्यात येणार आहे. मात्र,यावर्षी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.पाणी बचतीबरोबरच शिक्षण व आरोग्याच्या सुधारणेचे मोठे आव्हान राज्यासमोर आहे.
या वेळी सभापती देवराज पाटील,आमदार आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.पंचायत समिती गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी स्वागत केले. सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी आभार मानले.

प्रीतिसंगम बागेचे रूप पालटणार
येथील कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या रस्त्याच्या कामाचे व कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे व तेथे असलेल्या प्रीतिसंगम बागेच्या नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजनही आमदार चव्हाण यांनी केले. यावेळी कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, विधान परिषद सदस्य आनंदराव पाटील, कराडच्या नगराध्यक्षा संगीता देसाई, मुख्याधिकारी विनायक औंधकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या रस्त्याच्या कामासाठी आमदार चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतानच्या काळात ११ कोटी रुपयांचा निधी
दिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दासनवमीनिमित्त सज्जनगडावर सोहळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
रामदास स्वामी संस्थान व समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने गुरुवारी सज्जननगडावर दासनवमी साजरी करण्यात आली. या निमित्त गेले दहा दिवस चाललेल्या महोत्सवात दासबोध पारायण, प्रवचन, कीर्तन, संगीत महोत्सव आदी कार्यक्रमांची रेलचेल होती.
यंदा राज्यभरातून लाखावर भाविक गडावर दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी आले होते. समर्थ रामदास स्वामींच्या ३३४व्या पुण्यतिथीनिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, मिरज येथून वेण्णास्वामी, समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांची पालखी तसेच समर्थांचे जन्मस्थळ असलेल्या जांब व अन्य ठिकाणाहून शेकडो समर्थ भक्तांसह पायी दिंड्या सज्जनगडावर आल्या होत्या.
दासनवमी उत्सवानिमित्त गुरुवारी पहाटे दोन वाजता काकडआरती झाली. चार वाजता स्वामींच्या समाधीस रामदास स्वामींचे वंशज, अधिकारी व अध्यक्ष दुर्गाप्रसाद स्वामी व समर्थ भक्तांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. सकाळी साडेसहा ते दहा वेळात गडावर सांप्रदायिक भिक्षेचा कार्यक्रम झाला. दहा वाजता पारंपारिक पोषाखातील मानकरी तसेच छत्र, चामर, दंड, अब्दागिऱ्या, शिंग तुताऱ्यांच्या निनादात छबिना काढण्यात आला. साडेअकरा ते बारा वेळेत समाधी मंदिरास १३ प्रदक्षिणा घालून जयजय रघुवीर समर्थचा जयजयकार करण्यात आला. .
समर्थ भक्त मोहनुबवा रामदासी यांनी निर्वाण कथेचे वाचन केले. रामभक्त हनुमान आणि शिवसमर्थाची भेट व समर्थांनी शिवरायांना दाखवलेला दगडातील जिवंत बेडकीचा दाखला असे समर्थांच्या शेजघरापुढे उभारलेले भव्य पुतळे विशेष आकर्षण ठरत होते. विद्युत रोषणाई तसेच फुलांची सजावट यामुळे गडावर चैतन्यमय वातावरण होते. दासनवमी उत्सवाची सांगता शुक्रवारी (४ मार्च)लळिताच्या कीर्तनाने होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंच, अत्याचारी पित्याला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा
स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पीडित मुलीबरोबर बांधून फटके मारण्याची शिक्षा देणाऱ्या गोपाळ जात पंचायतीच्या चार पंचांसह अत्याचारी पित्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. पाचवड (ता. वाई ) येथे गुरुवारी फटके मारण्याचा प्रकार घडला होता. दरम्यान, जात पंचायतीचे अस्तित्व हे न्याय व्यवस्थेलाच आव्हान आहे, अशा शब्दांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकारावर टीका केली आहे.
गोपाळ समाज भटकी जमात आहे. पाचवड येथील एका पित्याने आपल्या तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच जात पंचायत बोलावण्यात आली. त्याला मुलीचे कुटुंबीय आणि काही नातेवाइकांनाही बोलावण्यात आले होते. जात पंचायतीत संबंधित पित्याला व त्याच्या मुलीला दोरखंडाने बांधून दोघांनाही फटके मारण्यात आले. या अमानुष घटनेची माहिती उघड होताच सारा जिल्हा हादरला.
जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून शिक्षा सुनावणारे चारही पंच आणि मुलीवर अत्याचार करणारा पिता यांना अटक केली आहे. पंच शिवाजी पवार, दत्तू चव्हाण, सर्जेराव चव्हाण, राजाराम पवार अशी अटक करण्यात आलेल्या पंचांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारे जात पंचायतीने शिक्षा देणे म्हणजे न्याय व्यवस्थेला आव्हानच असल्याचे समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी घटनास्थली भेट दिली. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम मंजूर केला असताना अशी घटना घडणे निंदनीय आहे, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे. पेरले (ता. कराड) येथील गोपाळ समाजाचा आदर्श घेत सगळीकडे जात पंचायती बंद कराव्यात, असे आवाहनही समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभमेळ्याच्या धर्तीवर कराडला ‘कन्यागत’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड
नाशिक कुंभमेळ्याच्या धर्तीवर येत्या ऑगस्टमध्ये येथे 'कन्यागत पर्व' होणार आहे. या निमित्ताने शहरातील अष्टतीर्थांचा तसेच संत सखू मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपरिषदेतील सत्ताधारी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष व उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील यांनी दिली.
कराडमध्ये कृष्णा आणि कोयना या नद्यांचा उराउरी संगम होतो. या ठिकाणाला प्रीतिसंगम म्हटले जाते. असाच संगम कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथेही आहे. तेथही कन्यागत पर्वावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने शहरातील धार्मिक ठिकाणांच्या विकासाची योजना आखण्यात आली आहे.
या बाबत माहिती देताना सुभाष पाटील म्हणाले, 'कराड शहराला प्राचीन वारसा असून, येथे गरुडतीर्थ, हाटकतीर्थ, भैरवतीर्थ, गणेशतीर्थ, नागतीर्थ, लक्ष्मीतीर्थ, नृसिंहतीर्थ, मार्कंडेयतीर्थ अशी आठ तीर्थे शहरात आहेत. कालौघात नष्ट होणाऱ्या या तीर्थांचा विकास करण्याचे नगरपरिषदेने ठरविले आहे. वारकरी संप्रदायात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या येथील संत सखू मंदिर परिसराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात येणर आहे. सध्या या मंदिराचा विकास स्थानिक समितीमार्फत सुरू आहे.'

'कन्यागत' म्हणजे काय?
गुरू ग्रह प्रत्येक राशीत तेरा महिने थांबतो. हा ग्रह ज्या राशीत असतो, तेथे महापर्वकाळ सुरू होतो. १२ ऑगस्ट २०१६ पासून गुरू कन्या राशीत प्रवेश करत असल्याने त्याा कन्यागत पर्व म्हणतात. तेव्हापासून कृष्णा नदीच्या संगमांवर धार्मिक विधींसाठी गर्दी होते. या पर्वात गंगा नदी कृष्णा नदीला भेटते आणि कृष्णा गंगा स्वरूपाने वाहते, अशी भावना आहे. त्यामुळे या पर्वात संगमावर धार्मिक विधी, होमहवन, स्नान, जप, तप, श्राद्ध आदी विधी करणे पुण्यकारक समजले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images