Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अपात्रता नोटिसींची आज सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने नवीन काढलेल्या वटहुकूमानुसार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपात्र संचालकांना 'अपात्र का ठरवू नये' काढलेल्या नोटिसीवर मंगळवारी (ता.८) विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

वटहुकूमाला स्थगिती देण्यासाठी संचालकांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विमा संरक्षण असलेल्या सहकारी संस्थावर २००६ नंतर प्रशासक नियुक्त झालेल्या संचालकांना दहा वर्षे कोणत्याही बँकेची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याचा वटहुकूम जानेवारी २०१६ रोजी काढला होता. सहकार खात्यातातील नवीन वटहुकूमानुसार जिल्हा बँकेच्या ११ अपात्र संचालकांना 'अपात्र का ठरवू नये' अशी नोटीस काढून १५ फेब्रुवारी रोजी म्हणने मांडण्याची संचालकांना संधी दिली होती. संचालकांच्यावतीने अॅड. लुइ शहा यांनी युक्तीवाद केल्यानतर सुनावणीची तारीख दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिळकतींचे सोमवारपासून फेर सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने येत्या सोमवार (ता.१४)पासून शहरातील सर्व मिळकतींचे फेर सर्वेक्षण होणार आहे. हे काम खासगी संस्थेमार्फत होणार आहे. प्रत्येक मिळकतीचे छायाचित्र, प्रॉपर्टी कार्डसंबंधी कागदपत्रे व ओळखपत्रांचे स्कॅनिंग होणार आहे. हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे बंधनकारक आहे. फेर सर्व्हेक्षणामुळे जवळपास २० हजार नव्या मिळकतींचा शोध लागणार असून महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडणार आहे. दरम्यान, घरफाळा दंडावरील रकमेत ७५ टक्के सवलत देता येणार नाही, असे आयुक्त शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

एलबीटी बंद झाल्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. प्रशासनाने, उत्पन्नवाढीचा भाग म्हणून शहरातील मिळकतींचा शोध घेऊन घरफाळा नोंद, तसेच जुन्या मिळकतींचे नव्याने अॅसेसमेंट करून घरफाळा निश्चित केला जाणार आहे. मिळकतींच्या फेरसर्वेक्षणाचे काम सायबर टेक कंपनीला दिले आहे, अशी माहिती आयुक्तांनी दिली. कंपनीचे ६० कर्मचारी सोमवारपासून (ता.१४ मार्च) मिळकतींची मोजदाद, छायाचित्र आणि कागदपत्रांचे स्कॅनिंग करणार आहेत. मिळकतींची मोजदाद करतानाच अपार्टमेंटचे सर्वेक्षणही होणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध माहितीच्या आधारे त्या मिळकतीच्या मोजमापसंबंधीची शहानिशा होणार आहे. त्यानंतर नागरिकांच्या हरकती घेऊन अंतिमतः नव्याने घरफाळा आकारणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संध्यामठाचे सांजपर्व

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जाणारा संध्यामठ कोसळण्याच्या मार्गावर आहे. या वास्तूचे दगड पायापासून निखळत आहेत. दगडी खांब धोकादायक अवस्थेत आहेत. छताचा भाग कमकुवत बनला आहे. महापालिका आणि जिल्हा प्रशासन उठसूट पर्यटनवाढीच्या बाता मारत असतात. पण संध्यामठच्या संवर्धनासाठी निधीची तरतूद करण्यात दोघांकडूनही दरिद्रीपणा दाखविला जात आहे. संध्यामठ पूर्ववत सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी तीस लाखांची आवश्यकता आहे. एकाचवेळी इतक्या निधीची तरतूद करून संध्यामठच्या संवर्धन कामाला सुरूवात करणे गरजेचे असताना संबं​धित घटकाकडून हात आखडता घेतला जात आहे. जिल्हा नियोजन समितीने एकरकमी तीस लाखाची तरतूद केल्यास अथवा महापालिकेने स्वनिधीतून संपूर्ण रक्कम खर्ची केली तर हा कलात्मक ठेवा जपला जाईल.

रंकाळा तलावाच्या पूर्व बाजूला संध्यामठची कलात्मक वास्तू आहे. दगडी छत, कोरीव खांब आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम आकर्षण ठरते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या बांधकामाच्या काळातच संध्यामठचे बांधकाम झाले असण्याचे अभ्यासकांचे मत आहे. हे बांधकाम साधारण ८०० ते १००० वर्षांपूर्वीचे असावे, असा अंदाज आहे. मात्र देखभाल आणि दुरूस्तीअभावी संध्यामठची दुरवस्था झाली आहे. घडीव दगड,कोरीव खांब, पायालगतचे बांधकाम निसटत आहे. तलावत ठिकठिकाणी दगड विखुरले आहेत.

रंकाळा तलावातील साठा कमी झाल्याने संध्यामठची दुरूस्ती करणे सोपे जाणार आहे. त्याच्या संवर्धनाचा भाग म्हणून महापालिकेने आराखडाही केला आहे. सूरत अंजली असोसिएटसने पुरातत्वीयदृष्ट्या संवर्धन आराखडा तयार केला आहे. महापालिका, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत पुरातन वास्तू जतन संवर्धनमधून तीस लाखाचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा नियो​जन समितीने एकाचवेळी तीस लाख रुपये उपलब्ध करून दिले तर संध्यामठ दुरूस्ती काम सलगपणे होणार आहे. पालकमंत्री, शहराच्या आमदारांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संध्यामठचे महत्व ओळखून निधीची तरतूद केली तर कोसळण्याच्या मार्गावर असलेली वास्तू टिकू शकेल.

...............

असा आहे आराखडा

तीन टप्प्यात संध्यामठ संवर्धनाचे काम

संध्यामठचे पुरातत्वीय रुप 'जैसे थे' राहणार

पहिल्यांदा संध्यामठचे स्ट्रक्चरल ऑडिट

प्रत्यक्ष संवर्धनाचे काम करण्याअगोदर संध्यामठभोवती कॉपर डॅम (तात्पुरता बंधारा)

बांधकाम करताना तलावातील पाण्याचा अडथळा येऊ नये म्हणून डॅम

पहिल्यांदा पाया मजबुतीकरण

कोरीव खांब, दगडी मंडप दुरूस्ती

संध्यामठभोवती संरक्षण, लँडस्केपिंग

संवर्धनाचे काम पूर्ण झाल्यानंतर आकर्षक विद्युत रोषणाई

..............
संध्यामठसाठी काय करणे गरजेचे?

जिल्हा नियोजन समिती अथवा महापालिकेकडून एकाचवेळी तीस लाखाची तरतूद

स्ट्रक्चरल ऑडीटनंतर प्रत्यक्ष कामास सुरूवात

दुरूस्तीचे काम सलगपणे करणे गरजेचे

दुरूस्ती झाली नाही तर येत्या पावसाळ्यात संध्यामठ धोकादायक स्थितीत

===

संध्यामठच्या संवर्धनासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून अधिकाधिक निधी मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत. जिल्हा​धिकारी कार्यालयकडून प्रस्ताव सादर करण्यास कळविले आहे.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राखीव बटालियन कासारवाडीत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य राखीव दलाची बटालियन जागेअभावी कोल्हापुरातून इतरत्र हलवण्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र जिल्हा प्रशासनासह राज्य राखीव दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील जागेला पसंती मिळाली आहे. सध्या जागेची मोजणी सुरू आहे. लवकरच बटालियनचे काम कासारवाडीतील जागेत सुरू होईल, अशी शक्यता आहे.

राज्य राखीव दलाच्या बटालियनसाठी रेंदाळ आणि दिंडनेर्ली नागरिकांनी विरोध केल्यानंतर बटालियनला जागेसाठी खूपच यातायात करावी लागली होती. अखेर २६ जानेवारीच्या ग्रामसभांत काही गावांनी जागा देण्याचा ठराव केल्याने बटालियन पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात राहण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. नव्याने ठराव करून बटालियनसाठी जागा देण्याचा निर्णय घेणाऱ्या कासारवाडी (ता. हातकणंगले) गावातील जागेला जिल्हा प्रशासनाकडून आणि बटालियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही पसंती मिळाली आहे. कासारवाडी परिसरात सलग १०० एकर जागेची उपलब्धता असल्याने प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी जागेची पाहणी करून मोजणी सुरू केली आहे.

कोल्हापूर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव पुणे-बेंगळुरू महामार्गापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या ठिकाणाला पसंती मिळाली आहे. राज्य राखीव दलाच्या डीआयजीपदी सध्या विजयसिंह जाधव आहेत. जाधव यांनी यापूर्वी कोल्हापुरात जिल्हा पोलिस अधीक्षक पदावर काम केले असल्याने ते बटालियनबाबत तातडीने निर्णय घेतील, असा स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वास आहे. सोमवारी (ता. ७) कासारवाडी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी बटालियनच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली आहे. जिल्हा प्रशासनानेही गतीने जागेची मोजणी करून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तात करण्याचे काम सुरू केले आहे, त्यामुळे लवकरच याबाबतच अंतिम निर्णय होईल आणि कासारवाडीत राखीव बटालियन साकारेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

स्थापना दिन दौंडमध्ये

राज्य राखीव दलाचा स्थापना दिन रविवारी (ता. ६) होता, मात्र कोल्हापुरात जागेअभावी स्थापना दिनाचे कार्यक्रम करता आले नाहीत. राखीव बटालियनचे अधिकारी आणि काही जवानांनी दौंड येथील कार्यालयात जाऊन स्थापन दिन साजरा केला. बटलियनसाठी जवानांची भरतीप्रक्रियाही सुरू आहे. कोल्हापुरातील जागेअभावी दौंडमधून भरती प्रक्रियेचे कामकाज सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनगरी ढोल पथक दिल्लीला रवाना

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टिम

दिल्लीत होणाऱ्या 'विश्व संस्कृती महोत्सव'साठी कोल्हापूर परिसरातील धनगरी ढोल पथक आज, रेल्वेने दिल्लीला रवाना झाले. या पथकामध्ये १०५० धनगरी ढोल वादक सहभागी झाले आहेत. येत्या ११, १२ आणि १३ मार्च रोजी

हा महोत्सव होत आहे.

'आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत 'विश्व संस्कृती महोत्सव' महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जगभरातील सांस्कृतिक लोककला लोप पावत आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात कोल्हापूर परिसरातील ३५ गावांमधील १०५० धनगरी ढोलवादक आपली कला सादर करणार आहेत. १२ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता पारंपरिक वाद्यांचा कार्यक्रम होईल. त्यात कोल्हापूरचे धनगरी ढोल पथक आपली वाद्य कला सादर करणार आहे. कार्यक्रमात धनगरी ढोल सादरीकरणासाठी ७ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. जागतिक स्तरावर आपली पारंपरिक कला सादर करण्यासाठी वादक उत्सुक आहेत.

दिल्लीतील कार्यक्रमात व्यापक भारतीय संस्कृती अनुभवता येणार आहे. १५५ देशातील पारंपरिक व सांस्कृतिक कला यावेळी सादर होणार आहेत. या वर्ल्ड कल्चर फेस्टिवलमध्ये देशातून ३५ लाख लोक उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसांच्या या भव्य कार्यक्रमात हाजारो कलाकार, मान्यवर उपस्थितीत राहणार असून त्यासाठी नऊ एकरचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन होणार असल्याचे सांगून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवानी, मनोहर पर्रीकर आदी मान्यवरांसह सुरीनाम, झिम्बाब्वे, इंडोनेशिया, अल्बेनिया, ‌श्रीलंका, नेदरलंड, फ्रान्स, नॉर्वे, यूए अशा देशातील सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळ्यात दंड सवलत नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळ्याच्या दंडावरील रक्कमेत ७५ टक्के सवलत देण्यात येणार नसल्याचे आयुक्त पी. ​शिवशंकर यांनी मंगळववारी स्पष्ट केले. त्याचवेळी बड्या थकबाकीधारकांनी मुदतीत घरफाळ्याचा भरणा केला नाही तर नियमानुसार त्यांच्या मिळकतीवर (प्रॉपर्टी) बोजा चढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. काही मिळकती सीलबंद करत कारवाईस सुरूवात झाली आहे.

कोल्हापुरातील अनेक मिळकतधारक व संस्थांनी वर्षानुवर्षे घरफाळ्याचा भरणा केला नाही. एकेका मिळकतधारकांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. घरफाळ्याच्या थकीत रकमेचा आकडा दहा कोटीच्या घरात आहे. सातत्याने नोटीसा पाठवूनही त्यांनी घरफाळाची थकीत रक्कम भरली नाही. ६० मिळकतधारकांकडे प्रत्येकी १५ लाख रुपयाहून अधिक थकबाकी आहे. थकीत घरफाळाप्रश्नी काही मिळकतधारकांच्या सुनावणी घेतल्या आहेत. थकबाकी भरण्यासाठी त्यांना काही दिवसाची मुदत दिली आहे. संबंधित मिळकतधारकांनी मुदतीत थकीत घरफाळा भरला नाही तर बड्या थकबाकीधारकांच्या मिळकतींवर बोजा चढविण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सां​गितले.

दरम्यान थकीत घरफाळा वसुलीसाठी दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्याचा निर्णय स्थायी स​मितीच्या सभेत घेण्यात आला होता. मात्र स्थायीचा हा निर्णय मान्य करता येणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. सलग दोन वर्षी घरफाळा वसुलीत सवलत देता येत नाही. असे आयुक्तांनी निदर्शनास आणले. महापालिकेचे यंदाचे बजेट ११ मार्चला स्थायी समितीला सादर केले जाणार आहे.

जुन्या दराप्रमाणेच घरफाळा आकारणी

महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणालीचा स्वीकार केला आहे. यंदापासून रेडीरेकनरच्या दरानुसार घरफाळा आकारणी करण्यात येणार होती. महासभेने प्रशासनाचा हा प्रस्ताव फेटाळून जुन्या दराप्रमाणेच घरफाळा आकारणी करण्यात यावी यावर ठाम आहे. घरफाळा वाढीचा नामंजूर ठराव आणि माजी महापौर सुनील कदम यांना स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्याचा फेटाळलेला ठराव अजून आयुक्त कार्यालयाकडे आला नाही. या सगळ्या प्रक्रियेत घरफाळा आकारणी जुन्या दराप्रमाणेच होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केडीसीसी संचालकांचा मंगळवारी फैसला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या नवीन वटहुकूमानुसार विभागीय सहनिबंधकांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अपात्र संचालकांना पाठवलेल्या नोटिसीवर मंगळवारी सुनावणी झाली. संचालक मंडळाच्यावतीने अॅड. लुईस शहा यांनी म्हणणे मांडण्यासाठी पुढील तारखेची मागणी केली. त्यानुसार विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी मंगळवारी (ता. १५) सुनावणीचे आदेश दिले. त्यामुळे संचालकांना आठ दिवसांचा तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी पुढील सुनावणीत अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे.

२००६ नंतर विमासंरक्षण असलेल्या बँकांवर प्रशासक नियुक्त असल्यास त्यांना दहा वर्षे बँकेची निवडणूक लढवण्यास बंदी घालणारा वटहुकूम काढला आहे. सरकारच्या वटहुकूमाला कोल्हापूर जिल्हा बँकेसह राज्यातील इतर बँकेच्या अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या संचालकांनी स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान, नवीन वटहुकूमानुसार अपात्र ठरणाऱ्या संचालकांना विभागीय सहनिबंधकांनी 'अपात्र का ठरवू नये' अशी नोटीस बजावली होती. विभागीय सहनिबंधकांकडे सुनावणी सुरू होण्यापूर्वी संचालक मंडळावर कोणतीही कारवाई करु नये असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते.

सुनावणी दरम्यान संचालकांच्यावतीने अॅड. शहा यांनी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितली. दरम्यान, जिल्हा बँक संचालकांवर १४५ कोटींची जबाबदारी निश्चित करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

मुख्य न्यायालयाकडे याचिका वर्ग केल्यानंतर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात कोणतेही स्पष्ट आदेश नसल्याने मंगळवारी होणारी सुनावणी अंतिम ठरेल अशी शक्यता आहे.'

राजेंद्र दराडे, विभागीय सहनिबंधक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परीक्षा केंद्र बदलल्याने गोंधळ

$
0
0

कोल्हापूर ः कोल्हापूर हायस्कूलमधील दहावी परीक्षेची बैठक व्यवस्थेत इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र अचानक बदलल्यामुळे विद्यार्थी, पालकांचा गोंधळ झाला. बीजगणित पेपरला सांगलीतील एक तर साताऱ्यामधील ३ कॉपीचे गैरप्रकार उघडकीस आले आहेत.

परीक्षेसाठी महाराष्ट्र हायस्कूल हे मुख्य तर कोल्हापूर हास्कूल उपक्रेंद्र होते. ४६ इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांचे पहिले तीन पेपर कोल्हापूर हायस्कूलमध्ये झाले. मंगळवारी बीजगणित पेपरला विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र महाराष्ट्र हायस्कूल केले होते. याबाबत कल्पना नसल्याने पावणेअकराच्या सुमारास मोठा गोंधळ झाला. मुख्य केंद्र संचालकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलणार असल्याची कल्पना देणे आवश्यक होते. मात्र, अचानक झालेल्या बदलामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास अनेक विद्यार्थ्यांना उशीर झाला. जे विद्यार्थी उशिरा पोहचले, त्यांना दहा मिनिटे जादा देण्यात आली. यासंदर्भात केंद्र संचालकांना तोंडी समज देऊन अहवाल मागविल्याचे सचिव शरद गोसावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सराफ संघाचा शुक्रवारी मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अबकारी कराला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सराफ संघ व कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या सराफ बाजार सलग सातव्या दिवशी बंद राहिला. बेमुदत बंदमध्ये सर्व सराफ व्यावसायिक सहभागी झाल्याने सराफ बाजार पूर्णपणे थंडावला आहे. बंदच्या सातव्या दिवसीही आंदोलनाची दखल न घेतल्याने शुक्रवारी (ता. ११) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय अर्थसंकल्पात लागू केलेल्या अबकारी कराला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सराफ संघ आणि कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे विविध स्तरावर आंदोलन केले जात आहे. बंदमुळे मोठ्या प्रमाणावरील उलाढालीवर परिणाम तर होत आहेच. शिवाय या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या घटकांना आर्थिक अडणचींचा सामना करावा लागत आहे. सात दिवसांच्या बंदमुळे विवाह समारंभासाठी लागणाऱ्या सोने-चांदी दागिन्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरम्यान, सराफ संघाच्या बंदला झारी संघटना, छावा संघटना, हुपरीच्या सिल्व्हर ऑर्नामेंटस मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने पाठिंब्याचे पत्र दिले. सचिव कुलदीप गायकवाड, उपाध्यक्ष राजेश राठोड, संचालक किरण गांधी आदी सदस्य उपस्थित होते.

जेम्स अँड ज्वेलर्सच्यावतीने केंद्रीयस्तरावर लढा सुरू आहे. स्थानिक पातळीवरही आंदोलन तीव्र करण्यासाठी असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार आहे असे अध्यक्ष गायकवाड व भरत ओसवाल यांनी सांगितले.



११ हजार रुपये दंड करू

बंद सर्व सदस्य आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठीच आहे. हक्कांसाठी लढाई सुरू असताना सदस्य दुकाने उघडणार असतील तर त्यांना याच्यापुढे ११ हजार रुपये दंड करण्यात येईल. शिवाय त्यांचे संस्थेचे सदस्यत्वही रद्द केले जाईल. अशा स्वरुपाचा ठरावही केल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष गायकवाड यांनी सांगितले.



तर बांगड्यांचा आहेर देऊ

बेमुदत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे सर्व सदस्यांना केले आहे. मात्र संघटनेचे काही सदस्य आपली दुकाने उघडत आहेत. त्यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत नाही तर संघाच्यावतीने भाजी आणि बांगड्यांचा आहेर देणार असल्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंब्यातील गाळ काढायला मिळेना यंत्रणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाणी साठा पूर्ण संपुष्टात आल्याने कळंबा तलावातील गाळ उपसा करण्याचा निर्णय झाला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानुसार सोमवारपासून (ता.७) पाटबंधारे विभागाची यंत्रणा गाळ काढण्यासाठी उपलब्ध होणार होती. मात्र मंगळवार अखेरही पाटबंधारे विभागाकडून मशिनरीज आल्या नाहीत. दरम्यान शेतकरी व आसपासच्या भागातील नागरिकांनी खासगी मशिनरी आणून गाळ नेण्यास सुरूवात केली आहे. दोन दिवसात १५० डंपरच्या आसपास गाळ उपसा करण्यात आला. पाटबंधारे विभागाची यंत्रसामग्री बुधवारी (ता.९) दुपारपासून मिळणार आहे.

आमदार सतेज पाटील यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, पाटबंधारे विभाग आणि करवीरचे तहसीलदा यांची संयुक्त बैठक घेऊन गाळ उपसा करण्याचे नियोजन केले होते. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारपासून यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले होते. तथापि या विभागाचे अन्यत्र काम सुरू असल्याने बुधवारी यंत्रसामुग्री उपलब्ध होईल अशी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

गाळवर कसलीही रॉयल्टी आकारण्यात येणार नाही. हा गाळ मोफत देण्यात येणार आहे असे करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कळंबा आणि आसपासच्या गावातील शेतकऱ्यांनी सोमवारपासून खासगी यंत्रणेच्या माध्यमातून गाळ उपसा करून नेण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी १०० तर मंगळवारी ५० डंपर गाळ उपसा करण्यात आल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे उपजल अभियंता प्रभाकर गायकवाड यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हद्दवाढीबाबत सरकारच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी हद्दवाढ कृती समिती व्यापक करण्याबाबत प्रमुख कार्यकर्त्यांची मंगळवारी बैठक घेण्यात आली. यावेळी अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याबरोबरच इतर पाठपुरावा करण्याची प्राथमिक चर्चा करण्यात आली.

निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, दिलीप पवार, सतिश कांबळे, दिलीप देसाई, बाबा इंदूलकर, नंदकुमार वळंजू, अनिल घाटगे, सुनील देसाई, अवधूत अपराध, जयकुमार शिंदे यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी हद्दवाढ कृती समिती हद्दवाढीबाबत काम करत आहेच. पण त्याचवेळी ही समिती आणखी व्यापक करण्यासाठी ही बैठक झाली. यामध्ये सर्वपक्षांमधील कार्यकर्त्यांचा समावेश करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार विविध नावांची यादी तयार करण्यास सुरुवात केली. अधिवेशनाच्या कालावधीत मुख्यमंत्र्यांना भेटून हद्दवाढीबाबतची भूमिका मांडण्याबाबतही चर्चा झाली. त्यासाठी लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार आहे. याशिवाय बुधवारी समितीच्यावतीने आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेण्यात येणार आहे. त्यामध्ये शहराशी निगडीत महत्वाच्या असलेल्या शिवाजी पुलाच्या रखडलेल्या बांधकामाबाबत चर्चा करण्यात येणार आहे. तेथील झाडे, पाण्याची टाकी यांच्याबाबत निर्णय घेण्याची आग्रही मागणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मुलींचा गळा दाबून मातेचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0

सोलापूर: देशभरात मंगळवारी जागतिक महिला दिन साजरा होत असताना सोलापूरच्या भवानी पेठेतील मड्डीवस्ती भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन्ही मुलींचा गळा दाबून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत दीड वर्षांच्या मुलीचा अंत झाला असून, बचावलेल्या दुसऱ्या मुलीला उपचारासाठी दाखल केले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे भवानी पेठ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राम आणि रेश्मा सुरवसे हे पती पत्नी मड्डी वस्तीत राहतात. त्यांना रुतिका आणि ऋतुजा या दोन मुली आहेत. राम हा बिगारी म्हणून काम करतो. सकाळी राम घराबाहेर पडला तेव्हा पत्नी रेश्मा हिने घराचा दरवाजा बंद करून रुतिका हिचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर ऋतुजा हिचाही तिने गळा दाबला आणि त्यानंतर रेश्मा गळफास घेण्याच्या प्रयत्नात असतानाच पती राम घरी पोहोचला. घराचा दरवाजा ठोठावूनही कोणीही उघडत नाही. हे पाहून रामने घराच्या खिडकीतून आत डोकावून पाहिले असता पत्नी रेश्माही गळफास घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने आजूबाजूच्या लोकांना आरडा-ओरडा करून बोलावून घेतले. पोलिसांना पाचारण करून दरवाजा तोडून रेश्माला ताब्यात घेतले. रुतिका हिचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या खोलीत नेऊन गळा दाबून मारण्याचा प्रयत्न झालेली ऋतुजा मात्र जीवंत असल्याचे लक्षात आले. तातडीने तिला मार्कंडेय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुधारत आहे. रेश्माला ताब्यात घेऊन पोलिसांनी उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये आणले आहे.

दरम्यान, घरातील प्रापंचिक अडणचींमुळे रेश्माने आपल्या दोन मुलींचा खुनाचा प्रयत्न करून स्वत:ही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. घरगुती अडचणींमुळे पती-पत्नींमध्ये वाद होता, अशीही माहिती पुढे येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्या खटल्याची सुनावणी तहकूब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे हत्या खटल्याची सुनावणी २९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सनातन संस्थेचा प्रमुख आरोपी समीर गायकवाड याच्या वकिलांनी दुसऱ्यावेळी जामिनावर अर्ज केला असून १४ मार्च रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. तपास यंत्रणेकडून मुंबई हायकोर्टात अहवाल सादर करणार असल्याने आजची सुनावणी २० दिवस तहकूब करण्यात आली.

मंगळवारी न्यायाधीश बिले यांच्यासमोरील सुनावणीवेळी विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी २९ फेब्रुवारी रोजी मुंबई हायकोर्टात स्मीता पानसरे आणि कुटुंबियांनी दाखल केलेल्या याचिकेची माहिती दिली. पानसरे हत्येच्या तपासासाठी तपास यंत्रणांना २८ मार्चपर्यंत वेळ द्यावा असा आदेश कोर्टाने दिला आहे. त्यामुळे समीरवर आरोप निश्चित करण्यात येऊ नये अशी मागणी केली. सरकारी वकील बुधले यांच्या युक्तीवादावर समीरचे वकील एस. एस. पटवर्धन आक्षेप घेतला. मुंबईतील याचिकेत समीर गायकवाड हा तक्रारदार नाही. पोलिसांनी त्याच्यावर कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. त्याच्यावर आरोप निश्चित न करता कारागृहात न ठेवणे म्हणजे मानवी हक्काची पायमल्ली आहे. आरोप निश्चित केल्यानंतरही तपास करता येतो. सरकारी पक्ष वेळकाढूपणा करत आहे. समीर जामीन नाकारला आहे. जर आरोप निश्चित केले नाहीत आणि चार वर्षांनी समीर निर्दोष सुटला तर त्याच्यादृष्टीने तो अन्याय ठरेल. खटल्याची सुनावणी सुरू असताना पुरावा कोर्टात सादर करता येतो असा युक्तीवाद त्यांनी केला.

सरकारी वकील बुधले यांनी मुंबई हायकोर्टात २८ मार्च रोजी सुनावणी आहे, याकडे कोर्टाचे लक्ष वेधले. मुंबई हायकोर्ट दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाचे निरीक्षण करत आहे. विशेष तपास पथक, सीबीआय, कर्नाटक सीआयडी यांची पानसरे, दाभोलकर व कलबुर्गी तपासासंदर्भात १० मार्च रोजी बैठक होणार आहे. सध्या तपास हा प्रगतीपथावर आहे.

समीरवर पानसरे यांच्या हत्येच्या खुनाचा व कटाचा आरोप आहे. त्यामुळे हा खटला हायकोर्टाच्या निर्णयापर्यंत तहकूब करावा, अशी विनंती बुधले यांनी केली. कोर्टाने त्यांची मागणी मान्य करत पुढील सुनावणी २९ मार्च रोजी होईल असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगणीमध्ये अल्पवयीन क्रौर्य

$
0
0


सातारा : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या कोमल सुनील चिकणे (वय ८) या चिमुकलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी १५ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. अत्यंत थंड डोक्याने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आले आहे.
कोमलचा मृतदेह राहत असलेल्या नंदनवन कॉलनीतील अन्सारी व्हॅलीमधील सी-१४० या बंगल्यातील पाण्याच्या टाकीत आढळून आला. या बाबत पाचगणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, पोस्टमार्टम अहवालात कोमलवर बलात्कार झाल्याचे व त्यानंतर तिला पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोमल रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास आईला नंदनवन कॉलनीत खेळायला जाते, असे सांगून गेली होती. सात वाजेपर्यंत ती बंगल्याच्या परिसरात खेळत होती. मात्र, त्यानंतर ती बेपत्ता झाली. उशिरापर्यंत ती घरी न आल्यामुळे तिच्या आईने संपूर्ण नंदनवन कॉलनीमध्ये शोध घेतला पण, ती आढळून आली नाही. परिसरातील लोकांनी रात्रभर कोमलचा शोध घेतला होता. सोमवारी सकाळी बंगल्याच्या लगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पाण्यात कोमलचा मृतदेह आढळून आला.
मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर रात्री बेपत्ता झालेल्या कोमलचा मृत्यू कसा झाला? असा एकच प्रश्न सर्वांना पडला होता. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर या बाबतच माहिती पाचगणी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून सातारा येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. याचा अहवाल मंगळवारी आला. त्यात कोमलवर बलात्कार झाल्याचे व त्यानंतर पाण्यात बुडवून मारल्याचे निष्पन्न झाले.
कोमल रविवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर बेपत्ता झाल्यानंतर सकाळी तिचा मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. हा मृत्यू संशयास्पद असल्याने कोमलची हत्या झाल्याची चर्चा सुरू होती. ही चर्चा अखेर खरी ठरली. या बाबत कोमलचे वडील सुनील राजाराम चिकणे (वय ३५) यांनी पाचगणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीत आढळले चाळीस बॉम्ब

$
0
0



बेळगाव : संकेश्वर येथील शेतातील विहिरीतून गाळ काढत असताना चाळीस बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या शेतात हे बॉम्ब सापडले आहेत.
माजी मंत्री मल्हारीगौडा पाटील यांच्या शेतातील विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. गाळ काढताना सायंकाळी कामगारांना काही बॉम्ब आढळले. कामगारांनी घाबरून लगेच त्याची माहिती मालकांना दिली. मालकांनी पोलिसांना कळविल्यावर पोलिस तत्काळ दाखल झाले. त्यांनी तेथे सापडलेले चाळीस बॉम्ब ताब्यात घेतले. बराच काळ बॉम्ब पाण्यात राहिल्यामुळे गंजून गेले आहेत. सापडलेल्या बॉम्बची पाहणी मराठा लाइट इन्फंट्रीचे अधिकारी करणार आहेत. त्यांना या विषयी कळविण्यात आले आहे. त्यांनी पहिल्या नंतरच बॉम्ब कोणते आणि कोठून आले असावेत यावर प्रकाश पडणार आहे. प्राथमिक माहितीनुसार कोम्बिंग ऑपरेशन करताना अशा तऱ्हेच्या बॉम्बचा वापर करण्यात येतो, असे समजले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रयत शिक्षण संस्थेला सातारा भूषण प्रदान

$
0
0


सातारा : 'आज नवा विचार व बदलती काळाची गरज लक्षात घेऊन शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेने अभिप्रेत असणारा डीजिटल इंडिया हा खरोखर मध्यमवर्गीय तसेच तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवला आहे. गेली ९६वर्षे तळागाळातील विद्यार्थ्यांची असलेली ही संस्था कर्मवीर अण्णांनी स्थापन करून असंख्य ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानाची कवाडे खुली केली आहेत. ही संस्था साताऱ्याचे सर्वांर्थाने भूषण आहे,' असे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी काढले.

सातारा येथील रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट व सातारकर नागरिकांतर्फे प्रतिवर्षी सातारा भूषण पुरस्काराने गौरविले जाते. यंदाचा हा रौप्य महोत्सवी पुरस्कार प्रथमच रयत शिक्षण संस्था, या संस्थेला प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून केतकर बोलत होते. वाय. सी. कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या समारंभाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संशोधक व उद्योजक डॉ. अशोक जोशी होते. या वेळी गोडबोले ट्रस्टचे विश्वस्त अरुण गोडबोले उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना डॉ, अनिल पाटील म्हणाले, हा पुरस्कार माझा नसून तो स्वर्गिय अण्णा आणि वहिणींचा आणि संस्थेच्या १५ हजार कर्मचाऱ्यांचा आहे. घरच्या मातीतला हा सत्कार मला अधिक मोठा वाटतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुतात्मा बँक मुंबईत शाखा उघडणार

$
0
0


इस्लामपूर : वाळवा येथील हुतात्मा सहकरी बॅँकेला रिझर्व्ह बॅँकेने राज्याचे कार्यक्षेत्र मंजूर केल्याने बॅँक आता लवकरच मुंबईत शाखा उघडणार असल्याची माहिती बॅँकेच संस्थापक वैभव नायकवडी यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रात ग्राहकांना उच्च दर्जाच्या सोयीसुविधा देणारी अग्रगण्य बॅँक म्हणून या बॅँकेकडे पाहिले जाते. रिझर्व्ह बँकेने या बँकेला मोबाइल बँकींग सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बॅँकेने अर्धवर्ष अखेरीस ३९०कोटींचा व्यवसाय केला असून, बँकेला एक कोटी ९६ लाखांचा नफा झाला आहे. बँकेकडे २५ कोटी ५२ लाख इतका राखीव निधी आहे. बँक रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे तंतोतंन पालन करीत असते. त्यामुळे बँकेला लेखा परीक्षणात सतत अॅडीट वर्ग अ मिळाला आहे. विद्यार्थ्यांना १२ टक्के सवलतीच्या दरात तर उद्योगासाठी १३ टक्के आणि घर बांधणीसाठी बँक १२ टक्के दराने कर्जपुरवठा करते. बँकेच्या सध्या १२ शाखा आहेत. सध्या पेठ वडगांव, कराड व विटा येथील शाखांना रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. या शाखा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई शाखेच्या मान्यतेमुळे बँकेला नवी ऊर्जा मिळाली आहे. मुंबई शाखा सुरू केल्यावर बँकेच्या व्यवसायामध्ये मोठी वाढ होईल, असा विश्वास वैभव नायकवडी यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळाकडे दुर्लक्ष : चव्हाण

$
0
0



सातारा : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लातूर-सोलापूर शहरांना पाणी मिळत नसल्याने लोक स्थलांतर करीत आहेत. सरकारला कसलेही भान राहिलेले नाही, अत्यंत निष्ठूर असलेले सरकारने जनावरांच्या छावण्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळी भागात केवळ पाहणी दौरे काढून दुष्काळी पर्यटन करणारे महंमद तुघलकी सरकार हटविण्याची वेळ आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार अल्पमतात येणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासून निवडणुकीसाठी तयार रहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर बाचल यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश आणि जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री पतंगराव कदम होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, सतेज उर्फ बंटी पाटील उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, 'पंधरा वर्षे राज्यात आणि देशात असलेल्या आघाडी सरकारला जनता कंटाळली होती, विरोधी पक्षांपेक्षा मित्र पक्ष आपल्याला जास्त त्रास देत होते, ते काय त्रास देत होते, याची चर्चा मी येथे करणार नाही. वास्तविक नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपने केलेल्या दिखाव्यामुळे आणि दिवास्वप्नांना जनता भूलली आणि त्यांना केंद्रात-राज्यात त्यांची सत्ता आली. गेल्या दीड वर्षांत जनता या सरकारांना कंटाळली आहे. त्यांना कसलेही सोयरसुतक राहिलेले नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात सुद्धा हातचलाखी केली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कृषी व सिंचन क्षेत्रासाठी हजारो कोटी रुपयांची तरतूद केल्याचे दाखविले जात असले तरी ते खरे नाही. आघाडी सरकारच्या काळात केलेल्या तरतुदी निव्वळ बदलून आकडेमोड केली आहे. केंद्र सरकार रस्ते आणि रेल्वेसाठी विशेषत: बुलेट ट्रेनसाठी लाखो कोटी रुपयांची तरतूद करीत आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी तरतूद करायला यांना वेळ नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत, केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन यांनी स्वत: २०१५ सालामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची कबुली संसदेत दिली आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार, बेटिंगही झाले अॅक्टिव्ह

$
0
0

satish.ghatage @timesgroup.com

कोल्हापूर : ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धा, आयपीएलच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट बेटिंगसाठी कोल्हापुरातील बुकीमालक सरसावले आहेत. तर कला, क्रीडा सांस्कृतिक केंद्रांच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अंदर-बाहरची पिसणी सुरू झाली आहे.

कोल्हापूर शहरात व्हिनस टॉकीज व उमा टॉकीज परिसरातील जुगार क्लब फेमस आहेत. त्याचबरोबर राजाराम चौक, संभाजीनगर पेट्रोलपंप, कळंबा, लक्षतीर्थ वसाहत, शाहूपुरी, राजारामपुरीत जुगार अड्ड्यावर पत्याची पिसणी सुरू आहे. अधिकारी कोणीही येवो, पण कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील शिनोळीचा जुगार अड्डा बंद करण्यात प्रशासन अपयशीच ठरले आहे.

कोल्हापुरात कला, क्रीडा, सांस्कृतिक क्लबच्या नावाखाली ८० क्लबची नोंदणी आहे. रमी खेळण्यासाठी या क्लबना परवानगी आहे. पैसे लावून रमी खेळणे हा प्रकार जुगारात मोडला जातो. रमीच्या नावाखाली तीन पानी जुगार, बल्लारी (अंदर-बाहर) या नावाने जुगार खेळला जातो. वस्तूतः रमी क्लबवर सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे. रमी खेळताना पैशाचा वापर होतो का हे सीसीटीव्हीत दिसू शकते. मात्र क्लबमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीत अॅडजेस्टमेंट केली जाते. पाच वर्षांपूर्वी व्हिनस टॉकीज येथील क्लबवर पोलिसांनी छापा टाकला होता. कारवाईची व्याप्ती वाढवण्यासाठी पोलिसांनी बाहेरून गांजा आणून क्लबमध्ये ठेवला आणि कारवाई केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिस गांजा ठेवत असल्याचे चित्रण बाहेर पडल्यानंतर त्या पोलिसांची बोबडी वळली. या घटनेनंतर या क्लबवर कारवाई करण्याचे पोलिसांचे धाडस होत नाही.

पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या कारकीर्दीत जुगार अड्ड्यांवर धाडी टाकल्या गेल्या. त्यामुळे अनेक जुगार अड्डे बंद झाले. शर्मा यांच्या बदलीनंतर पुन्हा जुगार अड्डे जोमाने सुरू झाले आहेत. संभाजीनगर आणि राजाराम चौकातील जुगार अड्ड्याच्या हिश्यावरून गेल्या महिन्यात रात्रभर गुंडांचा धुडगूस सुरू होता. मात्र पोलिसांनी कागदोपत्री कारवाई करत प्रकरण बंद केले.

बेटिंगने रोवले पाय

जुगारबरोबर क्रिकेट बेटिंगचे चांगलेच पाय रोवले आहेत. कोल्हापुरातील सिंडिकेट थेट मुंबईपर्यंत आहे. इथले बेटिंग घेणारे थेट क्रिकेट सामने पाहण्यासाठी परदेशात जातात. बेटिंगचा धंदा हा मोबाइलवर असल्याने असे अड्डे शोधण्यासाठी पोलिसांना फार कष्ट घ्यावे लागतात. राजारामपुरीतील 'मुरली', पेठेतील 'सम्राट', गुजरीतील 'संतोष' हे बेटिंगमधील मास्टर आहेत. दोन वर्षापूर्वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी तत्कालिन पोलिस अधीक्षक शर्मा यांनी तिघा मास्टरांना बेटिंग बंद करण्याचे फर्मान काढले होते. काही मटका, जुगार व बेटिंग घेणाऱ्या बुकींना थेट शाहूपुरी पोलिस ठाण्यात बोलवून खाक्या दाखवला होता. मुरलीवर थेट गुन्हाही दाखल झाला होता. आगामी ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत त्यांची दुकाने सुरू झाली आहेत.

जुगार अड्ड्यांमधून गरीब कुटुंबांची धूळधाण उडत आहे. जुगारात अडकलेल्या व्यक्तीची बदनामी तर होतेच, पण त्याच्या कुटुंबाला अनेक संकटांशी सामना करावा लागतो. क्रिकेट बेटिंगकडेही तरूणाई वळत आहे. समाजविघातक जुगार अड्डे व बेटिंग अड्ड्याची पाळेमुळे खणण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली पाहिजेत.

-अवधूत पाटील, सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील मिळकतींचे सोमवारपासून फेर सर्वेक्षण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने येत्या सोमवार (ता.१४)पासून शहरातील सर्व मिळकतींचे फेर सर्वेक्षण होणार आहे. हे काम खासगी संस्थेमार्फत होणार आहे. प्रत्येक मिळकतीचे छायाचित्र, प्रॉपर्टी कार्डसंबंधी कागदपत्रे व ओळखपत्रांचे स्कॅनिंग होणार आहे. हे काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचे बंधनकारक आहे.

फेर सर्वेक्षणामुळे जवळपास २० हजार नव्या मिळकतींचा शोध लागणार असून महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नातही भर पडणार आहे. दरम्यान, घरफाळा दंडावरील रकमेत ७५ टक्के सवलत देता येणार नाही, असे आयुक्त शिवशंकर यांनी स्पष्ट केले आहे.

एलबीटी बंद झाल्यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. प्रशासनाने, उत्पन्नवाढीचा भाग म्हणून शहरातील मिळकतींचा शोध घेऊन घरफाळा नोंद, तसेच जुन्या मिळकतींचे नव्याने अॅसेसमेंट करून घरफाळा निश्चित केला जाणार आहे. फेरसर्वेक्षणाचे काम सायबर टेक कंपनीला दिले आहे. कंपनीचे ६० कर्मचारी मिळकतींची मोजदाद करणार आहेत. मिळकतींची मोजदाद करतानाच अपार्टमेंटचे सर्वेक्षणही होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images