Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हलविलेल्या यंत्रसामग्रीबाबत अहवाल तयार करा

$
0
0
आमदार संजय काका पाटील अध्यक्ष असलेल्या गणपती जिल्हा संघाने तासगाव-पलूस सहकारी साखर कारखान्यातील हलविलेल्या यंत्रसामग्रीबाबतचा अहवाल तयार करण्यासाठी संनियंत्रण समिती स्थापन करण्याचे आणि या समितीने सात दिवसांच्या आत अहवाल देण्याचा आदेश सहकार खात्याच्या अवर सचिवांनी दिला आहे.

वीरशैव बँकेच्या रुपे एटीएम कार्डचा प्रारंभ

$
0
0
वीरशैव बँकेने लोकांची विश्वासार्हता जपली आहे. या बँकेने सहकारात दीपस्तंभासारखे काम केले आहे. बँकेच्या शिस्तीमुळेच बँक सध्या स्पर्धेच्या युगात टिकली असल्याचे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी केले.

शिवसेनेचा पिंपळगाव येथे 'रास्ता रोको'

$
0
0
भुदरगड तालुक्याच्या बेडीव धनगरवाडा येथे अतिवृष्टी व उपासमारीमुळे शेकडो जनावरे दगावली. त्याचा तेथील धनगर कुटुंबीयांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार शिल्पा ओसवाल यांना दिले.

ढेबेवाडी भागात बिबट्याचा धुमाकूळ

$
0
0
पाटण तालुक्यातील जिंती येथील शालन अंकुश नेवगे या अंधारीचा वड नावाच्या शिवारात गुरे व शेळ्या चारावयास गेल्या असता, बुधवारी दुपारी बिबट्याने शेळीवर हल्ला करून शेळीसह जंगलात पळ काढला.

मल्हार पानसरे जर्मनीला रवाना

$
0
0
युरोपमध्ये २६ ऑगस्ट ते २८ ऑक्टोबर या कालावधीत जर्मनीत होणाऱ्या ब्युरो फ्यूर कुल्तुर उन्द मिदिएनप्रोजेक्ते या संस्थेच्यावतीने बालनाट्य महोत्सवात कोल्हापुरातील मल्हार पानसरे जर्मनीला रवाना झाला.

शाहूंच्या स्मारकासाठीची डिझाइन स्पर्धा बेकायदेशीर

$
0
0
‘शाहू मिल येथील नियोजित राजर्षी शाहू आंतरराष्ट्रीय स्मारक उभारणीसाठी महापालिकेने घेतलेली उत्कृष्ट डिझाइन स्पर्धा बेकायदशीर आहे. अर्किटेक्चर कायद्याचा भंग करून व कौन्सिलर ऑफ अर्किटेक्चर परवानगी न घेता स्पर्धा आयोजित करून महापालिका व राज्य सरकार फसवणूक करत आहे.’

चारा छावण्यांमध्ये चार कोटींचा घोटाळा

$
0
0
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण तालुक्यातील चारा छावण्यांमध्ये सुमारे चार कोटी रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराबाबत भारतीय जनता पक्षातर्फे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील यांनी दिली.

सांगली-कोल्हापूर चौपदरीकरण रखडले

$
0
0
सांगली-कोल्हापूर रस्ता चौपदरीकरणाचे काम जयसिंगपूर येथे रखडले आहे. येथील पिलरवरील उड्डाणपुलाचा विषयही अद्याप अधांतरीच आहे. तर अंकली टोल नाका ते हातकणंगले दरम्यानच्या रस्त्याचे काम मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

आठशेवर कृषिपंप 'डिसकनेक्ट'

$
0
0
महावितरणने शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत कृषिपंपांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी धडक मोहीम राबविली आहे. त्यानुसार थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. जयसिंगपूर विभागांतर्गत कृषिपंपांची थकबाकी दीड कोटी रुपये असून, त्याच्या वसुलीची मोहीम गतिमान केली आहे.

भाकरे यांच्या मृत्यूबाबत पोलिसांनी चौकशी करावी

$
0
0
महापालिकेचे कामगार अधिकारी नितीन भाकरे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींची पोलिसांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे दिलीप देसाई यांनी केली आहे. यासंदर्भात पोलिस अधिक्षक विजयसिंह जाधव व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना निवेदन देण्यात आले.

निर्मल ग्राम पुरस्काराने गिजवणे ग्रामपंचायतीचा गौरव

$
0
0
औरंगाबाद येथे सोमवार (दि. २६) रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय निर्मलग्राम पुरस्कार २०११’ अंतर्गत गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यपाल के. शंकरनारायणन् यांच्या उपस्थित राज्यातील ४४२ गावांना निर्मल ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आले.

डीजे, ड्रान्स ट्रूपने दहीहंडीला ग्लॅमर

$
0
0
नेत्रदिपक रोषणाई, डि. जे. ची धूम, डान्स ट्रूपची धमाल व सिनेतारकांची उपस्थिती अशा वातावरणाने शहरातील दहीहंडीचे वातावरण ग्लॅमरस बनले. यामुळे शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळ व गुजरीतील न्यू गुजरी मित्र मंडळाच्या दहीहंडींमध्ये रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरु होता.

मंडळांकडून खड्ड्यांसाठी 'मापात पाप'

$
0
0
गणेशाच्या स्वागतासाठी शहरातील मंडळे सज्ज झाली असून, शहरात मंडप उभारणी सुरू झाली आहे. महापालिकेकडून प्रत्येक खड्ड्यासाठी २५० रुपये आकारले जात असले तरी मंडळांकडून चार खड्ड्यांचे पैसे भरून जादा खड्डे मारून ‘मापात पाप’ केले जात आहे.

नायकवडींचा अर्ज जिल्हा कोर्टाने फेटाळला

$
0
0
सांगली - मिरज - कुपवाड महापालिकेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास जिल्हा कोर्टाने नकार दिला आहे. मिरज येथे महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून साहित्याची मोडतोड केल्याप्रकरणी नायकवडी यांच्यासह १६ आरोपींना मिरज कोर्टाने सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली होती.

वकिलांचे जिल्हाभर धरणे आंदोलन

$
0
0
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत बंदला जिल्हाभर प्रतिसाद मिळाला. जयसिंगपूर व कुरूंदवाड आणि पेठवडगाव येथील न्यायालय इमारतींसमोर संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर खंडपीठासाठी साता-यात असहकार

$
0
0
कोल्हापूर येथे खंडपीठाची निर्मिती व्हावी, या मागणीसाठी साताऱ्यातील वकिलांनी गुरुवारपासून बेमुदत बंद पुकारून असहकार आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन व्हावे, अशी गेल्या २५ वर्षांपासून मागणी आहे.

२३ शाळकरी मुलांना मधमाशांचा चावा

$
0
0
वडरगे (ता. गडहिंग्लज) येथील परिसर भेटीसाठी गेलेल्या २३ शाळकरी मुलांवर मधमाशांनी हल्ला चढविला. उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

मारहाण प्रकरणी उद्या गडहिंग्लज बंद

$
0
0
गडहिंग्लज येथील नारळ व्यापारी मलगोंडा रामगोंडा पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेतील सहा जणांची चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मारहाणीच्या घटनेचा निषेध म्हणून येथील सर्व व्यापाऱ्यांनी शनिवार (दि.३१) बंद पुकारण्यात आला आहे.

तरुणाच्या कथित अपहरणाने घबराट

$
0
0
कनाननगर येथे एका तरुणाचे अपहरण झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये बुधवारी दिल्याने खळबळ उडाली. ज्याच्यावर अपहरणाचा संशय घेण्यात आला त्याच्या मोबाईलवर पोलिसांनी संपर्क साधला असता ते दोघेही फिरायला बाहेर गेल्याचे स्पष्ट झाले.

प्रा. नलगे यांचा उद्या सत्कार सोहळा

$
0
0
ज्येष्ठ लेखक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या लेखनास पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल चंद्रकुमार नलगे सुवर्ण महोत्सवी लेखनपूर्ती गौरव सोहळा शनिवारी (३१ ऑगस्ट) आयोजित केला आहे. साहित्यक्षेत्रातील ज्येष्ठ आणि नामवंतांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवनमध्ये हा सोहळा होणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images