Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘साखर दरवाढीशिवाय शेतकऱ्यांना लाभ नाही’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'साखरेच्या दरात वाढ झाल्याशिवाय ऊसउत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार नाही. साखरेचे दर वाढले, तर त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका न बसता शेतकऱ्याला न्याय देण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे,' असे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शिराळा येथील यशवंत सहकारी दूध उत्पादित प्रक्रिया संघाच्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी, कोल्ड स्टोरेज उद्घाटन व मशिनरी बसविणे या कामांचा शुभारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, 'राज्यात ऊस शेती पिकविणाऱ्या क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या साखर कारखान्याद्वारे ऊसाचे गाळप निर्धारित वेळेत न झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्यामुळे साखर कारखान्यांची संख्या वाढविणे आवश्यक बाब आहे. तथापि, सहकारातील दोन सहकारी साखर कारखान्यामधील अंतराच्या नियमामुळे नवीन कारखाने उभारण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्य पातळीवर दोन सहकारी साखर कारखान्यामधील नियमानुसारचे अंतर कमी करून नवीन सहकारी साखर कारखाने उभारण्याबाबत लवकरच सहकार कायद्यात याबाबतचा बदल करण्यावर राज्याच्या मंत्रिमंडळात निर्णय करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणार आहे,' असे आश्वासन पाटील यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फॉ​रेन्सिक लॅब एक एप्रिलपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कावळा नाका येथील जीवन प्राधिकरणाच्या इमारतीत एक ​एप्रिलपासून फॉरेन्सिक लॅब सुरू होत आहे. फॉरेन्सिक लॅबसाठी २४ लाखांचा निधी मंजूर केला असून, पायाभूत सुविधांचे काम सुरू झाले आहे,' अशी माहिती राज्याच्या तांत्रिक व न्यायिक विभागाच्या पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. फॉरेन्सिक लॅबचा फायदा कोल्हापूरसह सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पोलिस दलाला गुन्ह्याचा तपास करताना होणार आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सरकारने घेतला होता. कोल्हापूर व नांदेड येथे फॉरेन्सिक लॅब सुरू करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप महायुतीचे सरकार सत्तेवर आले. फॉरेन्सिक लॅबचे महत्त्व लक्षात घेऊन गुन्हे तपासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी फॉरेन्सिक लॅब कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने मे २०१५ मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.

फॉरेन्सिक लॅब उभारणीसाठी गेले आठ महिने जागेचा शोध सुरू होता. शेंडा पार्क, करवीर प्रांताधिकारी कार्यालय व जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील खोल्यांमध्ये तात्पुरती फॉरेन्सिक लॅब उभारण्याची तयारी दर्शवली होती; पण तांत्रिक व न्यायिक विभागाने या जागांना नकार दिला. कावळा नाका येथील जीवन प्राधिकरणाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर साडेतीन हजार स्क्वेअर फुटांवरील जागा भाड्याने घेण्यात आली आहे. तीन वर्षे मासिक अडीच लाख रुपये भाडे देण्यात येणार आहे. तसेच कायमस्वरूपी फॉरेन्सिक लॅबची इमारत उभारणीसाठी गोळीबार मैदान व केर्ली येथील जागेची पाहणी पोलिस महासंचालक बोरवणकर यांनी केली. त्यांच्यासमवेत पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

गृहखात्याने कोल्हापूर फॉरेन्सिक लॅबसाठी ५४ जणांचा स्टाफ मंजूर केला आहे. त्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट काम करणार आहेत. फर्निचरचे काम सुरू झाले असून जीवशास्त्र, विषशास्त्र, दारूबंदीशास्त्र व विश्लेषण शास्त्र हे चार विभाग राहणार आहेत. मुंबई फॉरेन्सिक लॅबचे उपसंचालक रा. ना. कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले आहे.

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना संधी

राज्यातील क्राइम रेट कमी होण्यासाठी महायुती सरकारने फॉरेन्सिक लॅबला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन फॉरेन्सिक लॅब व त्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नव्याने होणाऱ्या फॉरेन्सिक लॅबमध्ये विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.

फॉरेन्सिकल लॅबचे फायदे

खुनाच्या गुन्ह्याच्या तपासासाठी मृताचे रक्त, हत्यार आणि कपड्यावरील रक्ताचे डाग, घटनास्थळावरील मातीत पडलेले रक्ताचे नुमने तपासासाठी पाठवले जातात. बलात्काराच्या गुन्ह्यात फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टवरच अवलंबून राहावे लागते. रक्त व अन्य घटकांच्या तपासणीनंतर डीएनएवरून गुन्ह्याचा तपास केला जातो. अनोळखी व बेवारस व्यक्तीच्या मृत्यूचा शोधही डीएनवरूनच घेतला जातो. एखाद्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली असेल तर बॅलेस्टिक रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जातो. हाताचे ठसे, हस्ताक्षराचे नमुनेही पाठवले जातात. कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब झाल्यास पोलिसांना अहवाल प्राप्त होताच गुन्ह्याचा तपास वेगाने होऊ शकतो.

गोळीबार मैदानातील दोन एकर जागा निश्चित

गोळीबार मैदानातील दोन एकर जागा फॉरेन्सिक लॅबसाठी निश्चित केली आहे. केर्ली व गोळीबार मैदान या दोन जागा लॅबसाठी सुचविण्यात आल्या होत्या. निधी उपलब्ध झाल्यानंतर लॅबची इमारत उभारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कणेरी मठावरील ५१ लाखाच्या चोरीचा छडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कणेरी मठावरील ५१ लाखाच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. लखन कृष्णा माने (वय २२, रा. वंदूर ता. कागल) असे या प्रकरणात अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. अदृश्य काडसिद्धेश्वर महाराजांच्या निवासस्थानी चोरी करून त्याने लंपास केलेली रोख ५० लाखाची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ५१ लाख ४६ हजार ७६६ रूपयाचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पो​लिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली.

काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या जुन्या निवासस्थानात सोमवारी (२९ फेब्रुवारी) सकाळी सहा वाजता चोरीची घटना उघडकीस आली होती. चोरट्याने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून निवासस्थानात प्रवेश करून तिजोरीतील आठ लाख ५४ हजार २३२ रूपये चोरून नेले होते. याबाबत मठाचे सेवेकरी भास्कर पांडुरंग केसरकर यांनी गोकुळ शिरगांव पोलिस ठाण्यात यांनी फिर्याद दिली होती. याप्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा व पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या सुचनेनुसार तीन तपास पथके तयार करण्यात आली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक डी. एन. मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला. पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडीत, गजानन पालवे यांना रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती मिळाली. त्यांनी संशयित लखन कृष्णा माने याला शुक्रवारी, ४ मार्चला रात्री सव्वा एक वाजता गोकुळ शिरगांव येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोटारसायकल, कटावणी व रोख रककम मिळाली. अधिक चौकशी केली असता त्याने कणेरी मठ येथे चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेली रक्कम व दागिने त्याने वंदूर (ता. कागल) येथील स्वतःच्या नव्या घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या पायात पुरून ठेवले होते. पोलिसांनी रोख ५० लाख रूपये व दोन तोळे सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने हस्तगत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लागतोय भूलभुलय्याचा फास

$
0
0

Satish.Ghatage @timesgroup.com

कोल्हापूर ः जिल्ह्यातील अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. व्हिडिओ पार्लरमधील करमणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगारातून लोकांचे पैसे रिकामे होऊ लागले आहे. व्हिडिओ पार्लरमधील हाऊसफुल्ल गर्दीकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आक्षेप आहे.

दोन वर्षापूर्वी तत्कालिन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी कोल्हापुरातील सर्व अवैध धंद्यावर चाप बसवला होता. ऑक्टोबर २०१५ मध्ये इचलकरंजीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या केलेला तो पोलिस व्हिडिओ पार्लरमधील जुगारात पैसे हरला होता.

एखाद्या पोलिसाची ही अवस्था होत असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल असा विचार करायला हवा. या प्रकारानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि जुना राजवाडा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील व्हिडिओ पार्लवर छापा टाकला होता. शर्मा यांची बदली झाल्यानंतर आता पुन्हा व्हिडिओ पार्लर चालकांनी डोके वर काढले आहे. फेब्रुवारी महिन्यात लक्ष्मीपुरी आणि मध्यवर्ती बसस्थानकावरील व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी छापे टाकले. तेथे एक लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली होती. तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या आशिर्वादाने व्हिडिओ पार्लर सुरू आहेत.

व्हिडिओ पार्लरमध्ये खेळण्याच्या नादात अनेकदा काहीजण आपल्या वस्तूही गहाण टाकतात. हातातील घड्याळापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत वस्तू गहाण टाकून त्यातून पैसे उभारले जातात. मात्र चलाखीतून पैसे कधीच हाती येत नाहीत. अपवादात्मक स्थितीत एखाद्याला जॅकपॉट लागतो. मात्र, पैसे मिळण्याची आशा असल्याने त्यात अनेकजण गुंतून जातात. मात्र तसे होत नाही. त्यामुळे आणखी खेळण्यासाठी उधार-उसनवारी करून पैसे जमवले जातात. व्हिडिओ पार्लर चालकांचे पोलिस अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांशी लागेबांधे असल्याने कडक कारवाई केली जाते. कारवाई झाल्यानंतर कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूरसह तालुक्यांच्या शहरात पुन्हा व्हिडिओ पार्लर सुरू होत आहेत. करमणूक विभागाची परवानगी मनोरंजनासाठी असते. मात्र, त्याऐवजी फसवणुकीचा धंदा चालतो. त्यामुळे पोलिसांच्याकडूनही अधुनमधून कारवाई केली जाते. त्याची धास्तीही असते. मात्र, लागेबांधे असल्याने नंतर फारसे काही होत नाही. पुन्हा असे प्रकार सुरूच राहतात.

व्हिडिओ पार्लरचे मालक कॉईनची किंमत दाखवून जुगार खेळण्यास प्रोत्साहित करतात. विशिष्ट रक्कम भरून खेळणाऱ्याला दिले जाते. खेळात जो जिंकतो, त्याला रक्कम दिली जाते. जॅकपॉटमध्ये मोठी रक्कम मिळते. जॅकपॉटच्या नावाखाली अनेकजण जुगार खेळण्यासाठी येतात. पण व्हिडिओ पार्लरच्या मालकांनी मशिन सेटिंग केली असल्याने खेळणाऱ्या व्यक्तीला जिंकण्याची कमी संधी मिळते.

एक हजार रुपये जुगार खेळणारा माणूस चारशे ते पाचशे रुपये गमावून जातो. अनेक ठिकाणी रुपयांच्या पटीत व्हिडिओ पार्लरवर खेळला जातो. एक रुपयाला ३६ ते ७० रूपये असा दर असतो. १०० रुपयाला सात हजार रुपयाचे बक्षिस असते. जुगाराची तल्लफ असणारी मंडळी, एका दिवसात दहा हजार रुपयांपासून ५० हजार रुपये व्हिडिओ पार्लरमध्ये उधळतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ संघाचा संप सुरूच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एक टक्का वाढीव एक्साईज ड्युटी वाढीच्या विरोधात सराफ व्यवसायिकांचा बेमुदत संप सुरूच असून, कायद्यातील जाचक अटी सरकार जोपर्यंत रद्द करत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार सराफ व्यवसायिकांनी केला आहे. यासंदर्भात १० मार्चला पुण्यात विभागीय आयुक्तालयावर राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यात सराफ व्यवसायिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघ यांनी केले आहे.

सराफ व सुवर्णकार संघाची रविवारी येथील आंबा भवन येथे बैठक झाली. त्यात १० मार्चच्या मोर्चाच्या नियोजनाची माहिती देण्यात आली. तसेच संघाच्या तालुका पातळीवरील संघटनांनी त्यांच्या तालुक्यात तहसीलदारांना या संदर्भात निवेदन द्यावे, अशी सूचना संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल यांनी बैठकीत सदस्यांना केली. पुण्यातील मोर्चात राज्यभरातून लोखोंच्या संख्येने व्यवसायिक सहभागी होणार आहेत. त्यात जिल्ह्यातील सर्व सराफांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ढणाल यांनी बैठकीत केले. बैठकीस उपाध्यक्ष केरबा खापणे, पांडुरंग कुंभार, अमर गोडबोले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रस्ते बांधणीसाठी आठ हजार कोटी’

$
0
0

कोल्हापूर ः 'राज्यात रस्ते विकासाचा भरीव कार्यक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. आगामी साडेतीन वर्षात राज्यातील रस्त्यांचे बहुतांशी प्रश्न मार्गी लागतील', असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भारतीय इतिहास संकलन समितीच्यावतीने कसबा बीड (ता. करवीर) येथे आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात बोलत होते.

मंत्री पाटील म्हणाले, 'रस्त्याच्या कामांसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येत असून ८ हजार कोटी रुपयांचा रस्ते विकासाचा कार्यक्रम हाती घेण्याचा मानस आहे.'

यावेळी प्रा. आनंद दामले लिखित 'कसबा बीड एक ऐतिहासिक नगर' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गो. ब. देगलूरकर होते. कार्यक्रमाठी पाहुणे आमदार चंद्रदीप नरके, जिल्हा परिषद अध्यक्षा विमलताई पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलला साकारले श्रीराम मंदिर

$
0
0

Uddhav.Godase @timesgroup.com

कोल्हापूर ः आग्रा येथील ताजमहालसाठी वापरलेल्या राजस्थानातील मकराना येथील शुभ्र संगमरवरातून कागलमधील श्रीराम मंदिरात जीर्णोद्धार केला आहे. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून साकारलेले आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह, छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आणि लोकसहभागातून स्थापत्यशास्त्रातील आगळे मंदिर साकारले आहे. गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेले काम पूर्णत्वास येत असून, ९ ते ११ मार्च यांदरम्यान विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांनी मंदिराचा लोकार्पण होईल. कागल येथील मध्यवर्ती खर्डेकर चौकातील श्रीराम मंदिराची जुनी इमारत जीर्ण झाल्याने दहा वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धाराची संकल्पना स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी मांडली. आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह कागलच्या नागरिकांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. २००७ मध्ये याचे भूमीपूजनाने करून जीर्णोद्धाराच्या कामाला सुरूवात झाली. अहमदाबादच्या प्रसिद्ध अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर कागलमधील श्रीराम मंदिर बांधण्याचे ठरल्यामुळे तेथील वास्तूविशारद देवदत्त त्रिवेदी यांच्याकडून मंदिराचे डिझाइन तयार करून घेण्यात आले. कागलमधील वास्तूविशारद अमर चौगुले यांच्या देखरेखीखाली हे काम आले.

मंदिरासाठी सहा कोटी रुपयांचा खर्च आला असून यातील २ कोटी ३२ लाख रुपये आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने सरकारकडून मिळाले. ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी छत्रपती शाहू कारखान्याचे सभासद, कर्मचारी, कंत्राटदार आणि इतर देणगीदारांनी दिला. कागलच्या नागरिकांनीही मंदिरासाठी मोठा हातभार लावला. १२ गुंठे जागेतील मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी वापरलेले संगमरवर राजस्थानमधील मकराना येथून मागवले आहे. तळमजल्यावर चार हजार स्क्वेअर फुटांचे ध्यानमंदिर व प्रवचन हॉल आहे.

मुख्य मंदिरासाठी २२ मोठे नक्षीदार खांब वापरले असून, मुख्य गाभाऱ्यासह मंदिरात दहा मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. श्रीराम, सीता, लक्ष्मण, मारुती, गणपती, दत्त, महालक्ष्मी, शंकर, पार्वती आणि नंदी या दहा देवतांच्या मूर्ती राजस्थानातील जयपूरहून मागवल्या आहेत. मंदिराचा सहा फुटी पितळी कळस आणि ध्वजदांडा बडोद्याहून मागवला आहे. ९ ते ११ मार्च दरम्यान लोकार्पण सोहळा आयोजित केला आहे. यासाठी ती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, उद्योजक प्रवीणसिंह घाटगे नियोजन करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी कपातीच्या उंबरठ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध उपयुक्त पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पंचगंगेसह अन्य नद्यांचेही पात्र कोरडे पडत आहे. शिरोळ तालुक्यातसाठी पंचगंगा नदीत पुरेसे पाणी नसल्याने काही गावांतील पाणी योजनांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनेही पाणी कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये केवळ ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याने पुढील आठवड्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शहराच्या पाणीकपतीचा निर्णय होईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पांसह जलाशयांमध्ये झपाट्याने पाण्याची घट होत आहे. पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाण्याच्या वापरावर पाळी पद्धतीने उपसाबंदी लागू केली असली तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा खुपच कमी असल्याने पाणी कपातीचे संकट वाढले आहे.

जिल्ह्यात सध्या उपयुक्त पाणीसाठा फक्त ३५ टक्केच आहे. गेल्या पाच वर्षांत याच दिवसात सरासरी ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक रहात होता. यंदा अपुऱ्या पावसाने पाण्याची चिंता वाढली आहे. कोल्हापूर शहरासाठी सध्या दररोज सरासरी १२ कोटी लिटर पाणीउपसा केला जातो. वर्षभरात ४३ हजार ८०० एमएलडी पाणी शहरासाठी वापरले जाते. आणखी तीन महिने पाणी पुरविण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे.

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या दूधगंगा धरणात सध्या ८.११ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा एकूण पाणीसाठ्याच्या केवळ २७.९५ टक्के आहे. उर्वरित पाण्यातील जवळपास १ टीएमसी पाणी कर्नाटकच्या वाट्याचे आहे, तर शेतीसाठीही पाण्याचा वापर करावा लागणार आहे. वीज निर्मिती आणि शेतीसाठी सध्या दररोज १६०० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो. ज्या गतीने पाणी पातळीत घट होत आहे ते पाहता जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवणे जिकीरीचे ठरणार आहे. त्यामुळेच पाणी कपातीबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.

दृष्टिक्षेपात पाणीटंचाई

कोल्हापूर जिल्ह्यातील उपयुक्त पाणीसाठा ः ३५ टक्के

कोल्हापूर शहरातील रोजचा पाणी उपसा ः १२ कोटी लिटर

वर्षभरातील शहरातील पाण्याची गरज ः ४३,८०० एमएलडी

काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातील पाणी ः २७.९५ टक्के

एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत उपलब्ध पाणी ः २७.९५ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


...अन्यथा तुमच्या गळ्याला फास: नाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सरकारी कर्मचाऱ्यांनी संप केले की सरकारचे काम अडते, शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही कुणाचेच काही अडत नाही. पण हाच फास उद्या तुमच्या गळ्यात अडकविला तर काय करणार? शेतकरी हा समाजाचा हिस्सा आहे, देशाचा भाग आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केलात, मात्र शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला नाही' अशा शब्दात अभिनेता नाना पाटेकर यांनी राजकारण्यांना टोला लगाविला. शेतीला पाणी, मालाला भाव, मुबलक वीज इतक्याच शेतकऱ्यांच्या माफक अपेक्षा असून राजकारण्यांनो या सुविधांची उपलब्धता करत शेतकऱ्यांप्रती गमाविलेली विश्वासार्हता पुन्हा संपादन करा' असा सल्ला दिला.

नूतनीकरणानंतर संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाचे उदघाटन रविवारी झाले. यावेळी अभिनेते पाटेकर यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

पाटेकर यांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांच्या कुटुबांची फरफट, महिलांना तरूण वयातच आलेल्या वैधव्याची करुण कहाणी ऐकताना सभागृह हेलावले. पाटेकर म्हणाले, 'मी कुठल्याच पक्षाचा नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी सगळ्यासमोर हात जोडायला आवडेल. सत्तेच्या सारीपाटात कुणाचाही कोंबडा आरवू दे, पण शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगतीची पहाट उगवू दे. शेतकऱ्यांना बि बीयाणांचा खर्च नव्हे तर कुटुबांतील व्यक्तींचे आजारपण, औषधे परवडत नाहीत. मनाने

खचणाऱ्या लोकांना दिलासा देण्याचे काम नाम फाउंडेशनने केले. 'नाम'मार्फत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरासाठी सरकारी योजनेत तीस टक्के निधी भरण्याची तयारी आहे.'

कानफटात ठेवा

पाटेकर म्हणाले, 'केशवराव'च्या रंगमंचावर माझ्या कलेचा पिंड येथे जोपासला आहे. येथे मी माझ्या भाकरीचा तुकडा खूप वेळा मोडला आहे. नूतनीकरणानंतर कोल्हापुरात सुसज्ज नाट्यगृह साकारले आहे. नाट्यगृहाची देखभाल आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रेक्षक म्हणून साऱ्यांची आहे. नाट्यगृहात कुणी गैरप्रकार, तंबाखू खाणे, खुर्च्याची मोडतोड करायचा प्रयत्न केल्यास कानफटात मारा असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बँकेच्या चौकशी अहवालात कडक ताशेरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दि प्राथामिक शिक्षक सहकारी बँकेची चौकशी करुन चौकशी अधिकारी जिल्हा विशेष लेखा परीक्षक (वर्ग दोन) डी. पी. टेकवडे यांनी चौकशी अहवाल जिल्हा विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब यादव यांच्याकडे सुपूर्द केला. बँकेच्या कारभाराबाबत अहवालात गंभीर ताशेरे ओढले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याने बँकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत. सहकार विभागाच्या चौकशीनंतर गेल्या चार दिवसांपासून रिझर्व्ह बँकेचे पथक बँकेच्या कागदपत्रांची तपासणी करत आहे.

प्राथमिक शिक्षक बँकेचा मार्च २०१५ चा ताळेबंद शंकास्पद असल्याने शहानिशा व्हावी, बोगस नफा दाखवून तत्कालीन चेअरमन आणि संचालक मंडळाने निवडणुकीमध्ये दिशाभूल केली असल्याची तक्रार सभासद प्रसाद पाटील यांनी केली होती.

टेकवडे यांनी बँकेच्या पंधरा वर्षातील कागदपत्रांची तपासणी केली. सहकार विभागाची चौकशी पूर्ण होताच रिझर्व्ह बँकेकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार रिझर्व्ह बँकेनेही चौकशी सुरू केली आहे. हे पथक गेल्या चार दिवसांपासून कागदपत्रांची तपासणी करत आहे. एका सहकारी बँकेची दोन विभागांमार्फत स्वतंत्र चौकशी सुरू असल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी कपातीच्या उंबरठ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये उपलब्ध उपयुक्त पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे पंचगंगेसह अन्य नद्यांचेही पात्र कोरडे पडत आहे. शिरोळ तालुक्यातसाठी पंचगंगा नदीत पुरेसे पाणी नसल्याने काही गावांतील पाणी योजनांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेनेही पाणी कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये केवळ ३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा असल्याने पुढील आठवड्यात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शहराच्या पाणीकपतीचा निर्णय होईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्पांसह जलाशयांमध्ये झपाट्याने पाण्याची घट होत आहे. पाटबंधारे विभागाने शेतीसाठी पाण्याच्या वापरावर पाळी पद्धतीने उपसाबंदी लागू केली असली तरीही गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा खुपच कमी असल्याने पाणी कपातीचे संकट वाढले आहे.

जिल्ह्यात सध्या उपयुक्त पाणीसाठा फक्त ३५ टक्केच आहे. गेल्या पाच वर्षांत याच दिवसात सरासरी ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक रहात होता. यंदा अपुऱ्या पावसाने पाण्याची चिंता वाढली आहे. कोल्हापूर शहरासाठी सध्या दररोज सरासरी १२ कोटी लिटर पाणीउपसा केला जातो. वर्षभरात ४३ हजार ८०० एमएलडी पाणी शहरासाठी वापरले जाते. आणखी तीन महिने पाणी पुरविण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे.

कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या दूधगंगा धरणात सध्या ८.११ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा एकूण पाणीसाठ्याच्या केवळ २७.९५ टक्के आहे. उर्वरित पाण्यातील जवळपास १ टीएमसी पाणी कर्नाटकच्या वाट्याचे आहे, तर शेतीसाठीही पाण्याचा वापर करावा लागणार आहे. वीज निर्मिती आणि शेतीसाठी सध्या दररोज १६०० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग होतो. ज्या गतीने पाणी पातळीत घट होत आहे ते पाहता जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाणी पुरवणे जिकीरीचे ठरणार आहे. त्यामुळेच पाणी कपातीबाबत चर्चा करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉरिडॉरमधून कोल्हापूर वगळले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मुंबई-बेंगळुरू आर्थिक कॉरिडॉरमधून राज्य सरकारने कोल्हापूर जिल्ह्याला वगळल्याने उद्योगक्षेत्राच्या हाती पुन्हा एकदा निराशा पडली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेल्या एका ट्विटमध्ये कॉरिडॉरसाठी सातारा, सांगली, सोलापूरची शिफारस केल्याचे म्हटले आहे. यामुळे कोल्हापूर क्षेत्रातील उद्योजकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारने दिल्ली-मुंबई आणि मुंबई-बेंगळुरू कॉरिडॉरची घोषणा केली होती. त्यात आता राज्य सरकारने पुढाकर घेऊन सांगली, सोलापूरचा समावेश करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला कॉरिडॉरच्या माध्यमातून फायदा व्हावा, यासाठी हा निर्णय घेत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यापूर्वी प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, धारवाड, दावणगिरी, हावेरी, चित्रदुर्ग आणि तुमकूर या जिल्ह्यांचा समावेश होता. दरम्यान, मी यापूर्वीच कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळण्याच्या हालचाली सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. सरकारने पुन्हा कोल्हापूरच्या विकासाच्या विरोधात का निर्णय घेतला' अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली.

मी एका कार्यक्रमात व्यग्र असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉरिडॉर संदर्भात केलेल्या ट्विटविषयी मला अद्याप कोणतीही माहिती नाही. मंगळवारी (ता. ८ मार्च) माझी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी भेट होणार आहे. त्यावेळी यासंदर्भात माहिती घेईन.- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लागतोय भूलभुलय्याचा फास

$
0
0

Satish.Ghatage@timesgroup.com

कोल्हापूर ः जिल्ह्यातील अवैध धंद्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. व्हिडिओ पार्लरमधील करमणुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगारातून लोकांचे पैसे रिकामे होऊ लागले आहे. व्हिडिओ पार्लरमधील हाऊसफुल्ल गर्दीकडे पोलिसांकडून जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात असल्याचा आक्षेप आहे.

दोन वर्षापूर्वी तत्कालिन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी कोल्हापुरातील सर्व अवैध धंद्यावर चाप बसवला होता. ऑक्टोबर २०१५ मध्ये इचलकरंजीतील एका पोलिस कर्मचाऱ्याने खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या केलेला तो पोलिस व्हिडिओ पार्लरमधील जुगारात पैसे हरला होता.

एखाद्या पोलिसाची ही अवस्था होत असेल तर सर्वसामान्यांची काय अवस्था होत असेल असा विचार करायला हवा. या प्रकारानंतर नोव्हेंबर २०१५ मध्ये कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी

आणि जुना राजवाडा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील व्हिडिओ पार्लवर छापा टाकला होता.

शर्मा यांची बदली झाल्यानंतर आता पुन्हा व्हिडिओ पार्लर चालकांनी डोके वर काढले आहे. फेब्रुवारी महिन्यात लक्ष्मीपुरी आणि मध्यवर्ती बसस्थानकावरील व्हिडिओ पार्लरवर पोलिसांनी छापे टाकले. तेथे एक लाख रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली होती. तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या आशिर्वादाने व्हिडिओ पार्लर सुरू आहेत.

व्हिडिओ पार्लरमध्ये खेळण्याच्या नादात अनेकदा काहीजण आपल्या वस्तूही गहाण टाकतात. हातातील घड्याळापासून ते सोन्याच्या दागिन्यांपर्यंत वस्तू गहाण टाकून त्यातून पैसे उभारले जातात. मात्र चलाखीतून पैसे कधीच हाती येत नाहीत. अपवादात्मक स्थितीत एखाद्याला जॅकपॉट लागतो. मात्र, पैसे मिळण्याची आशा असल्याने त्यात अनेकजण गुंतून जातात. मात्र तसे होत नाही. त्यामुळे आणखी खेळण्यासाठी उधार-उसनवारी करून पैसे जमवले जातात.

व्हिडिओ पार्लर चालकांचे पोलिस अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांशी लागेबांधे असल्याने कडक कारवाई केली जाते. कारवाई झाल्यानंतर कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूरसह तालुक्यांच्या शहरात पुन्हा व्हिडिओ पार्लर सुरू होत आहेत. करमणूक विभागाची परवानगी मनोरंजनासाठी असते. मात्र, त्याऐवजी फसवणुकीचा धंदा चालतो. त्यामुळे पोलिसांच्याकडूनही अधुनमधून कारवाई केली जाते. त्याची धास्तीही असते. मात्र, लागेबांधे असल्याने नंतर फारसे काही होत नाही. पुन्हा असे प्रकार सुरूच राहतात.

व्हिडिओ पार्लरचे मालक कॉईनची किंमत दाखवून जुगार खेळण्यास प्रोत्साहित करतात. विशिष्ट रक्कम भरून खेळणाऱ्याला दिले जाते. खेळात जो जिंकतो, त्याला रक्कम दिली जाते. जॅकपॉटमध्ये मोठी रक्कम मिळते. जॅकपॉटच्या नावाखाली अनेकजण जुगार खेळण्यासाठी येतात. पण व्हिडिओ पार्लरच्या मालकांनी मशिन सेटिंग केली असल्याने खेळणाऱ्या व्यक्तीला जिंकण्याची कमी संधी मिळते.

एक हजार रुपये जुगार खेळणारा माणूस चारशे ते पाचशे रुपये गमावून जातो. अनेक ठिकाणी रुपयांच्या पटीत व्हिडिओ पार्लरवर खेळला जातो. एक रुपयाला ३६ ते ७० रूपये असा दर असतो. १०० रुपयाला सात हजार रुपयाचे बक्षिस असते. जुगाराची तल्लफ असणारी मंडळी, एका दिवसात दहा हजार रुपयांपासून ५० हजार रुपये व्हिडिओ पार्लरमध्ये उधळतात.

असा असतो खेळ

व्हिडिओ पार्लरमध्ये एका तासाला विशिष्ट रक्कम भरून कॉईन घेतले जाते. हे कॉईन टाकून हार-जितचा खेळ खेळला जातो. ज्या कॉईनला बक्षिस मिळते, त्याला जादा कॉईन असे या खेळाचे स्वरूप आहे. विशिष्ट रक्कम भरली की अर्धा ते एक तासांचा खेळ असतो. व्हिडिओ गेमच्या मशिनमध्ये एक ते आठ क्रमांक असतात. त्यातील विशिष्ट क्रमांकावर कॉइन आल्यास जॅकपॉट लागतो. पार्लरचे चालक खेळातील वेळेऐवजी थेट कॉईनला रक्कम ठरवून जुगार खेळायला लावतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिक्षण सेवक’चा निकाल बरोबरीत

$
0
0

मिरज : शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची निवडणूक चुरशीने पार पडली. मतमोजणीत सत्ताधारी आणि विरोधकांना ९-९ अशा समान जागा मिळाल्या.
सत्ताधारी पॅनेलचे सुभाष केरु कदम, रवींद्र राजाराम गवळी, दीपक भीमराव गायकवाड, संताजी भाऊराव घाडगे, चंद्रकांत यशवंत जाधव, उदयसिंह यशवंत पाटील, राजाराम श्रीरंग पाटील, संदीप भगवान पाटील, अंजनी भगवानराव साळुंखे हे नऊ उमेदवार तर विरोधी परिवर्तन पैनेलचे अजित तुकाराम चव्हाण, राजेंद्र सुभाष नागरगोजे, तानाजी आप्पासो पवार, धोंडीराम निवृत्ती माने, धनपाल पांडुरंग यादव, अमृतकुमार महिपती पांढरे, सुलभा विठ्ठल पाटील आणि राजेंद्र शिवदास खांडेकर हे नऊ उमेदवार विजयी झाले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेच्या सात जणांना कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन गटांतील राड्याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी सोमवारी माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह सात जणांना अटक केली. या सर्वांना दहा मार्चपर्यंत कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. जखमी जिल्हाप्रमुख तानाजी सावंत, रोहित घुबडे, दयानंद मलपे, संदीप टेंगले अद्यापही हॉस्पिटलमध्ये आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात फिर्यादी दिल्यानंतर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमवून हाणामारी करताना घातक शस्त्राचा वापर केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरुन वाद उफाळून आल्याने रविवारी रात्री सांगलीतील राजवाड्यात माजी आमदार शिंदे यांच्या घरोसमोरच जोरदार राडा झाला होता. पोस्टवरुन निर्माण झालेला वाद आपसात मिटवून शिंदेच्या घरातून दोन्ही गट बाहेर पडत असताना संदीप टेंगलेने जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांना बोलवून घेऊन रोहित घुबडेला दमात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळेच धुमश्चक्रीला सुरुवात झाली. रोहितच्या पाठीत चाकूचा वार झाल्यानंतर पुन्हा जोरदार हाणामारी, चारचाकींची तोडफोड झाली होती. या प्रकरणी रोहित घुबडेने दिलेल्या फिर्यादीत तानाजी आकाराम सावंत, संदीप तुकाराम टेंगले, दयानंद महादेव मलपे, राहूल अर्जुन माने, कुमार पोपट सावंत आदींसह पंधरा जणांनी हल्ला केल्याचे म्हटले आहे तर संदीप टेंगले याने दिलेल्या फिर्यादीत माजी आमदार शिंदे, रोहित घुबडे, प्रदीप तानाजी निकम, चेतन सतीश भोसले, अस्लम बशीर शेख, ओंकार सुरेश पवार, स्वाती नितीन शिंदे आदींसह पंचवीस जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचे पोलिसांना सांगितले.
शहर पोलिसांनी सोमवारी माजी आमदार शिंदे (वय ५३), प्रदीप निकम (वय २६, कोल्हापूर रोड), चेतन भोसले (वय २८, वसंतनगर, कुपवाड रोड), अस्लम शेख (वय २६, सांगलीवाडी), ओंकार पवार (वय १९, खणभाग) या शिंदे गटाच्या सावंत गटाच्या राहुल माने (वय २०, भारतनगर), कुमार सावंत (वय २२, सावरकर कॉलनी) अशा सात जणांना अटक केली आहे. कोर्टाने या सर्वांना दहा मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जत्रांवरील खर्च टाळा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
'शिराळा तालुक्यात टंचाई परिस्थितीचा विचार करून गावागावांत सुरू होणाऱ्या गाव जत्रांवरील अनावश्यक खर्चावर निर्बध आणून वीजबिले भरा,' असे आव्हान आमदार शिवाजीराव नाईक यांनी केले आहे. शिराळा येथे झालेल्या आमसभेवेळी ते बोलत होते. या वेळी तहसीलदार दीपक वजाळे, गटविकास अधिकारी यशवंत भांड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ अडसूळ उपस्थित होते.
नाईक म्हणाले, 'शिराळा तालुक्यातील वारणा-मोरणा नद्यांच्या काठावरील गावात दुष्काळ नाही, मात्र, तालुक्यातील इतर ४५ गावे टंचाईग्रस्त जाहीर झाली आहेत, त्या गावांना दुष्काळाचे निकष लावून सोयी-सुविधा पुरविल्या जातील. वाकुर्डे योजनेच्या पाण्यासाठी वेळेत वीजबिले भरणे गरजेचे आहे. जे शेतकरी बिले भरणार नाहीत, त्याची कनेक्शन तोडावीत, चोरून वीज घेतली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. गुंठेवारी बाबत सरकारचे सकारात्मक धोरण असताना शिराळा येथील दुय्यम निबंधक अधिकारी लोकांची विनाकारण कुचंबना करीत आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई करावी.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटका ओपन, कारवाई क्लोज

$
0
0

Satish.Ghatage @timesgroup.com

कोल्हापूर ः वरिष्ठ अधिकाऱ्यांची मूक संमती असल्याने आता कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पुन्हा जोमाने मटका सुरू झाला आहे. शहराच्या सीमेवरील उपनगरात मटका घेण्यासाठी खोकी थाटली गेली आहेत. त्यामुळे गोरगरीबांच्या संसाराचे दुष्टचक्र पुन्हा सुरू झाले आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी मोबाइलवरून मटका घेतला जात असल्याने त्याचे जाळे पसरले आहे.

मटका, जुगार, मॅच फिक्सिंगमुळे तरुण पिढी जुगारकडे ओढली गेली होती. तीन वर्षांपूर्वी अवैध धंद्यांना चांगलाच ऊत आला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद झाले होते. अवैध धंद्यांसंदर्भात नागरिक थेट पोलिस अधीक्षकांना फोन करत असल्याने पोलिसांचे छापे पडायचे. त्याकाळात मटका सुरू व्हावा म्हणून बुकी मालकांनी राजकारणी व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवले होते. पण त्यांच्या काळात मटका बंदच राहिला.

शर्मा यांची बदली झाल्यानंतर नुतन पोलिस अधीक्षकांनी पदभार स्वीकारताच पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी, साहेबांनी मटका सुरू करायला सांगितले आहे असे मेसेज केले. वस्तूतः त्यावेळी पोलिस अधीक्षकांनी मटका बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे काही ठिकाणी कारवाईचे नाटक झाले. पोलिस अधीक्षकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी थेट खालच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून मटका सुरू मेसेज दिला आहे. त्यामुळे सध्या खुलेआम मटका सुरू आहे. गल्ली बोळात ओपन काय, क्लोज काय याची उघडउघड सुरू झालेली चर्चा दिसत असल्याने मटका सुरू झाल्याची साक्ष मिळू लागली आहे.

एक रुपयाला सात रुपये हा मटक्याचा दर असल्याने सर्वसामान्य लोक मटक्याच्या आहारी पटकन जातात. झोपडपट्टी, मध्यमवर्गीयांच्या मटक्याची क्रेझ मोठी आहे. मटका लागल्याची माऊथ पब्लिसिटी जास्त होत असल्याने आपणही नशिब आजमावू म्हणून अनेकजण पैसे लावत असतात. अनेकजण फोन आणि मोबाइलवर मटका लावतात. सध्या उपनगरात खोकी थाटली असून ओपन मटका घेतला जात आहे. मोबाइलवर मटका घेणे सोपे असले तरी त्यामध्ये उलाढाल कमी असल्याने ओपन मटका घेणारी सोयीची ठिकाणे वाढली आहेत. आता हळुहळू खोक्याची संख्या वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तमाशा कलावंत इरळीकर कालवश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
प्रसिद्ध तमाशा कलावंत विनोदवीर नामा इरळीकर (वय ९८) यांचे सोमवारी राहत्या घरी निधन झाले. तमाशा क्षेत्रात ते नामा इरळीकर नावाने सर्वपरिचित होते. त्यांचे मूळ नाव नामदेव हरी यादव, असे होते. उपेक्षितपणाचे जीणे वाट्याला आले तरी वयाच्या अखेरीपर्यंत ते तमाशासाठी जगले. वयाच्या अखेरीस वसंत घरकुलमधून मंजूर झालेले घरही त्यांना निधीअभावी पूर्ण करता आले नाही. राज्यभरात नामा मावशी, या नावाने त्यांनी अनेक फड गाजविले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील नामदेव यादव यांना लहानपणापासूनच कलेचे वेड होते. गावात आणि पंचक्रोशीत येणारा प्रत्येक तमाशा पाहिल्यानंतर त्यांच्यातला कलाकार जागा झाला. सुरुवातील साहित्य उचलण्यासाठी हमाल म्हणून त्यांना तमाशात प्रवेश मिळाला. नंतर तुणतुणे किंवा छोटी झांज हाता धरायला मिळाली. त्या काळी ध्वनीक्षेपक अस्तित्वातच नसल्याने रसिकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने सूर लावताना घशातून रक्त पडायचे, अशा काळात त्यांनी तमाशा कलेला जवळ केले. पुढे ते सोंगाड्या म्हणून नावारुपाला आले. स्वतःचा फडही उभा केला होता.
नामा इरळीकरचा तमाशा म्हटले की, तमाशारसिकांची झुंबड उडायची. टकलावर लटकणारे मोजकेच केस, त्याला फुंकर मारत नामा रंगमंचावर अवतरला की, रसिकांची हसून पुरेवाट होई.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'भाजप सरकारला कोल्हापूरचे वावडे'

$
0
0

कोल्हापूर ः मुंबई बेंगलुरु कॉरिडॉरमधून कोल्हापूरला भाजप सरकारने हेतुपुरस्सर वगळून सापत्नभावाची वागणूक दिली आहे. येथील लोकप्रतिनिधींनी त्याकडे दुर्लक्ष केले असून भाजप सरकारला कोल्हापूरचे वावडे का आहे? असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

तीन एमआयडीसी असल्याने येथील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी काँग्रेस सरकारने कोल्हापूरचा समावेश कॉरिडॉरमध्ये केला होता. पण भाजप सरकारने सांगली, सातारा, सोलापूर यांचा समावेश करण्याबाबत शिफारस केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे. याबाबत हा कॉरिडॉर ५० किलोमीटर सरकवण्याची तरतूद येथील उद्योजकांना विश्वासात न घेता केल्याने भाजप सरकारचा यापूर्वीच निषेध केला असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा कॉरिडॉर विकसीत करण्याचे नियोजन केले होते, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक उपक्रमांनी महाशिवरात्र साजरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील महादेव मंदिरात विविध धार्मिक उपक्रमांनी महाशिवरात्री साजरी करण्यात आली. अभिषेक, प्रसादवाटप, भजन, कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्रीनिमित्त मंदिरांवर रोषणाई करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.

ऋणमुक्तेश्वर, ब्रह्मेश्वर, वटेश्वर, अतिबलेश्वर, कैलासगडची स्वारी, उत्तरेश्वर यासह शहरातील प्रमुख महादेव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त दहीभात लिंपणासह बेलपत्रांनी पूजा बांधण्यात आली. सकाळी अभिषेक करण्यात आले.

ऋणमुक्तेश्वर मंदिरात महादेव उत्सवमूर्तीची भव्य ​मिरवणूक काढण्यात आली. तसेच छत्रपती मालोजीराजे यांच्याहस्ते पालखीपूजन करण्यात आले. नागमंदिराच्या आकारात पालखी सजवण्यात आली होती. मंगळवार दि. आठ मार्च रोजी ऋणमुक्तेश्वर मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, विविध मंदिरांमध्ये केळीवाटप, ​खिचडी वाटप करण्यात आले. निवृत्ती चौक येथील ब्रह्मेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील मुले व महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच वटेश्वर मंदिर येथे बचतगटांच्या महिलांनी भाविकांना फळ वाटप केले. कैलासगडची स्वारी मंदिर परिसरात भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.यानिमित्त धार्मिक कार्यक्रमही झाले. रावणेश्वर मंदिर येथे सकाळपासून भाविकांनी अभिषेकासाठी गर्दी केली. मंदिरांच्या परिसरात गर्दी झाल्याने वाहतुकीच्या कोंडीचे चित्रही ठिकठिकाणी दिसून येत होते. वडगणे येते महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images