Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जातिआधारित भेदाभेदाच्या समस्यांचा वेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वंचित समाजाच्या समकालीन समस्यांचा संशोधनाच्या माध्यमातून वेध घेणारे व त्यावर उपाय शोधू पाहणारे 'कास्ट डिस्क्रीमिनेशन' आणि 'कास्ट-बेस्ड एक्स्क्लुजन' या दोन महत्त्वपूर्ण इंग्रजी ग्रंथांचा प्रकाशन समारंभ शनिवारी (दि. ५ मार्च) सायंकाळी ५ वाजता येथील दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. समाजशास्त्रज्ञ डॉ. जगन कराडे यांनी हे ग्रंथ संपादित केले आहेत. जी. बी. अंबपकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दोन्ही ग्रंथ नवी दिल्लीच्या रावत प्रकाशनने प्रकाशित केले आहेत. डॉ. कराडे सध्या शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागात कार्यरत आहेत.

शनिवारी दिल्लीच्या भारतीय सामाजिक शास्त्रे सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि माजी कुलगुरू, समाजशास्त्रज्ञ डॉ. उत्तमराव भोईटे यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते दोन्ही संपादित ग्रंथांचे प्रकाशन होईल. मुंबई विद्यापीठाचे प्रा. डॉ. पी. जी. जोगदंड अध्यक्षस्थानी असतील. यावेळी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे प्रा. डॉ. विकास जांभूळकर, कोल्हापूरच्या नाईट कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. हरिष भालेराव आणि कोल्हापूर जिल्ह्याचे समाजकल्याण अधिकारी विजय गायकवाड यांचे व्याख्यान होईल. कोल्हापुरातील फुले-आंबेडकर विचारधारा संघटना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबोधिनी, सांगलीच्या दीपस्तंभ सांस्कृतिक संघ, श्रावस्ती विहार, डॉ. आंबेडकर नगर मित्र मंडळ आणि बारामतीच्या बहुजन शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम होईल.

पत्रकार परिषदेस प्रा. सिद्धार्थ पद्माकर, अशोक चोकाककर, प्रा. विनय कांबळे, प्रकाश हुलस्वार, रघुनाथ मांडरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगली पालिकेला विशेष अनुदान देऊ - मुख्यमंत्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेतील विविध योजनांसाठी विशेष अनुदान देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी महापालिकेच्या शिष्टमंडळाला दिले. उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने यांच्यासह नगरसेवकांनी मुंबईत जाऊन महापालिका कार्यक्षेत्रातील विविध समस्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला अनुदानाबाबत आश्वासन दिले.
या बाबत माहिती देताना घाडगे म्हणाले, सांगलीतील योजनांसदर्भात लवकरच मुंबईत महापौर, आयुक्त, प्रमुख पदाधिकारी आणि नगरविकास सचिवांची बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. एलबीटी हटविल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज, घरकुल, पाणी योजनेसह विविध योजनांसाठी स्वनिधी घालण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे योजना अपूर्ण राहण्याचा धोका आहे. या सर्व गोष्टीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
ते म्हणाले, महापालिकेला मंजूर विशेष अनुदानापैकी पूर्वीचे ४ कोटी रुपयांचे अनुदान थकित असल्याचेही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. प्रमुख अधिकाऱ्यांची १४ पदे रिक्त असल्याने निरनिराळ्या योजनांकडे कोणाचेही लक्ष नाही. सरकारने प्रतिनियुक्तीवर तत्काळ अधिकारी द्यावेत, अशी मागणी आम्ही केली. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर याही यावेळी उपस्थित होत्या. काळ्या खणीच्या प्रस्तावा संदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्याची माहितीही घाडगे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकीदारांचे पाणी तोडणार

$
0
0

कुपवाड : सांगली महापालिकेने अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्ट्या बंद करुन केवळ वसुलीवर लक्ष दिले आहे. मार्च अखेरीपर्यंत दहा कोटी रुपये थकीत पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट ठेवले आहे. पाच, दहा हजार रुपयांची थकबाकी असलेल्या ग्राहकांचा पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील यांनी गुरुवारच्या आढावा बैठकीत दिले. ज्यांची पाणी मिळत नसल्याची तक्रार असेल त्यांना त्वरित नवीन कनेक्शन दिले जाणार आहे. त्याचबरोबर बिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आल्याचेही पाटील म्हणाले.
सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे एलबीटीचे उत्पन्न कायमचे बंद झाल्याने आता प्रशासनाने घरपट्टी, पाणीपट्टी वसूलीवर जोर दिला आहे. सुमारे सतरा कोटी रुपये पाणीपट्टी थकीत आहे. गेल्यावर्षभरात चौदा कोटी रुपयांचा वसूल झाला आहे आणि आता एका महिन्यात दहा कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. आढावा बैठकीनंतर सभापती पाटील यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी आक्रमक होण्याचे आदेश दिले.
कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेऊ नका. थकित बिलापोटी पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई झाल्यानंतर परस्पर कोणी पाणी सुरू करून घेतले तर संबधितांवर थेट फौजदारी दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यास न करताच रंकाळा अहवाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावासंदर्भात प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने नेमलेल्या खासगी कंपनीचा राष्ट्रीय सरोवर संवर्धन प्रकल्प-२चा १२५ कोटी रुपयांचा प्रस्तावित प्रकल्प अहवाल हा अभ्यास न करता केलेला तसेच अनावश्यक, अवाजवी आहे. त्याची अंमलबजावणी करणे अयोग्य असल्याचे ताशेरे ओढणारा अहवाल बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाने राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या (एनजीटी) खंडपीठासमोर गुरुवारी सादर केला. तसेच प्रकल्पांबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता दिसून येत नसल्याचाही ठपका त्यामध्ये ठेवला आहे. त्यावर महापालिकेला बाजू मांडण्यासाठी २९ मार्चपर्यंत सुनावणी तहकूब केली.

याचिकेवर एनजीटीच्या न्या.यू. डी. साळवी व सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांनी शहरातून व विशेषतः रंकाळा परिसरातील रहिवाशी वसाहतीतून बेसुमार सांडपाणी तलावात मिसळते. त्यास अटकाव करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. त्यामुळे रंकाळ्याला अवकळा आली आणि तलावाची पर्यावरणीय हानी झाल्याचा आरोप याचिकेत केला आहे. त्यांच्यावतीने वकील वल्लरी जठार यांनी युक्तिवाद केला. या​चिकेवर महापालिकेने रंकाळ्याबाबत केलेल्या कामाच्या चौकशीसाठी बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठाला नेमले होते. त्यानुसार महिन्याच्या अभ्यासानंतर विद्यापीठाने अहवाल सादर केला. त्यामध्ये महापालिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. त्याचवेळी महापालिकेने सर्व सांडपाणी मिसळणारे नाले बंद केले असल्याचाही निर्वाळा दिला आहे. रंकाळ्यातील पर्यावरणीय स्थिती बरी असल्याचा निष्कर्ष नोंदवला आहे.

अहवालात दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्प अहवालात सुमारे ४५ कोटी रुपये केवळ रंकाळा तलावातील गाळ काढण्यासाठी आवश्यक आहे असे खासगी कंपनीने म्हटले आहे. त्यावर अहवालात कडक ताशेरे ओढले आहेत. हा प्रकार अतिशय अविचारी व अनावश्यक आहे. हा खर्चसुद्धा प्रचंड असल्याचे म्हटले आहे. निसर्ग अभ्यास केंद्राचा उद्देश साध्य होत नसल्याचा निष्कर्ष काढला आहे. महापालिकेकडे रंकाळ्यातील पाण्याची पातळी मोजण्याची यंत्रणा नसल्याचे मांडत ही यंत्रणा तत्काळ बसविली जावी अशी शिफारस केली आहे. या आवश्यक बाबी साधारण ५ कोटी रुपये खर्चाच्या असल्याचे अहवालात म्हटले आहे. महापालिकेच्या प्रस्तावित २५ कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राची जागा योग्य नसून त्यासाठी अधिक अभ्यास करून योग्य जागा निवडावी, असेही अहवालात म्हटले आहे. दुधाळी नाल्यावरचा सध्याचा ४३ दशलक्ष लिटरचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला तर या २५ कोटींच्या नव्या सांडपाणी प्रकल्पाची गरजच नसल्याचे स्पष्ट केले.

प्रस्तावित प्रकल्प अहवाल खासगी कंपनीने दिला. त्याची अंतर्गत तपासणी करण्याची तसदीही महापालिकेने घेतली नसल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच धोबीघाट, जनावरे धुण्याची व्यवस्था आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या जागेबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचे दिसून आल्याची नोंद विद्यापीठाने केली आहे. रंकाळ्याच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस मोजण्याची यंत्रणा तत्काळ उभारावी. रंकाळ्यातून जे पाणी ओव्हरफ्लो होते त्या नाल्यासाठीसुद्धा कोणतेही व्यवस्थापन महापालिकेकडे नसल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. ह्या अहवालावर महापालिकेचे वकील धैर्यशील सुतार व याचिकाकर्त्याचे वकील जठार यांनी म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. खंडपीठाने या अहवालावर अभ्यास करून बाजू मांडण्याचा आदेश देऊन सुनावणी २९ मार्चपर्यंत तहकूब केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेजवळ दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड, मिरज :

मिरज तालुक्यातील बिसूर येथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब आढळला आहे. बिसूर-कवलापूर रस्त्यावरील एका शेतात ही घटना घडली. सांगलीच्या बॉम्बशोध आणि नाशक पथकाने तेथे धाव घेतली. अप्पर पोलिस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक धीरज पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा केल्यानंतर संबंधित बॉम्बसेल स्वतंत्र ठिकाणी ठेवण्यात आला. हा बॉम्बसेल लष्करी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती लक्ष्मीकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बिसूर रस्त्यालगतच्या सुकुमार अष्टेकर यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरट केली जात असताना बॉम्बसदृश वस्तू वर आल्याचे ट्रॅक्टरचालकाला दिसले. ही माहिती समजताच सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप जाधव घटनास्थळी पोहचले. गोल्डी या श्वानासह बॉम्बशोध आणि नाशक पथकही तेथे पोहचले. तज्ञांनी या बॉम्बसेलची हाताळणी केली. हा सेल किमान चाळीस वर्षांपूर्वींचा असून सरकारमान्य कारखान्यातूनच उत्पादित झालेला आहे. पण या शेतात कसा आला, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तो जीवंत की मृत आहे, याची शाहनिशा अद्याप केलेली नाही. या बॉम्बसेलची लष्करी अधिकाऱ्यांमार्फत तपासणी केल्यानंतर संबंधित बॉम्बसेलबाबत नेमकी माहिती पुढे येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन वर्षांनंतर ‘केशवराव’चा पडदा उघडणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन वर्षापासून नूतनीकरण आणि सुशोभिकरणासाठी बंद असलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह खुले होण्यासाठी सज्ज झाले आहे. दहा कोटी रुपये खर्चून शाहू खासबाग मैदान आणि केशवराव नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मूळ बांधकामाला धक्का न लावता अत्याधुनिक बांधकाम शैलीतून या दोन्ही वास्तू नव्या रुपात आल्या आहेत. नाटकाचा प्रयोग करावा तर कोल्हापुरातच आणि रसिकांची दाद घ्यावी तीही या कलेच्या माहेरघरातच अशी इच्छा असलेल्या रंगकर्मींना आता केशवराव भोसले नाट्यगृहाच्या मंचावर अभिनयाचे वेध लागले आहेत. दोन वर्षांपासून व्यावसायिक नाट्यपर्वणीला मुकलेल्या रसिकांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नाना पाटेकर आणि दहा मल्ल

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते रविवारी (ता. ६ मार्च) नाट्यगृहाच्या उदघाटनाचा सोहळा होईल. प्रशासनाकडून नाट्यगृहाच्या उदघाटन सोहळ्यानिमित्त सहा ते नऊ मार्च या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. खासबाग मैदानाचे नूतनीकरण तीन कोटी रुपये खर्चून केले आहे. खासबाग मैदानाचे कुस्तीशी पिढ्यानपिढ्या असलेले समीकरण, कुस्ती परंपरेशी जुळलेले बंध दृढ करत मैदानाचे उदघाटन दहा नामवंत पैलवानांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे.

प्रवास नाट्यगृहाचा, नूतनीकरणाचा

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्याईने उभारलेल्या या 'पॅलेस थिएटर'चे उदघाटन १९१५ साली युवराज राजाराम महाराज यांच्या हस्ते झाले होते. स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे 'संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह' असे नामकरण झाले. हे नाट्यगृह १९७१ साली सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कोल्हापूर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. नाट्यगृहाचे सर्वांत पहिले नूतनीकरण झाले १९८४ साली. पुढे २००३ मध्ये ७४ लाख खर्चून पुन्हा नूतनीकरण झाले. त्यानंतर मात्र नाट्यगृहाकडे दुर्लक्षच झाले. त्यानंतर सहा वर्षापूर्वी नूतनीकरणाचा घाट घालण्यात आला. मात्र अपेक्षित बदल या प्रक्रियेत झाला नसल्याचे दिसून आले. तीन वर्षांपूर्वी अभिनेते विक्रम गोखले यांनी जाहीर टीका केल्यानंतर महापालिकेने यात लक्ष घातले. नाट्यगृह व खासबाग मैदानाचा २२.५० कोटी रुपयांचा विस्तृत आराखडा बनविण्यात आला. सरकारने दिलेल्या दहा कोटी निधींपैकी मूळ नाट्यगृहासाठी सात कोटी तर खासबाग मैदानासाठी तीन कोटी तरतूद करण्यात आली होती. दोन ते सव्वा दोन कोटी रूपयांच्या निधीची तरतूद फक्त स्टेज, पडदे, विंगा, लाइट, साउंड सिस्टम खुर्च्यांसाठी केली आहे. नूतनीकरणासाठी नाट्यगृह १५ जानेवारी २०१४ पासून बंद ठेवण्यात आले असले, तरी वर्कऑर्डर निघून प्रत्यक्ष कामाला १५ मार्च २०१४ पासून सुरुवात झाली. एस अँड जे बिल्डकॉम या कंपनीकडे नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे कंत्राट देण्यात आले होते. कॉँट्रॅक्टरना एक वर्षात नूतनीकरणाची मुदत होती.

उदघाटनाचा ताकतुंबा

नाट्यगृह केशवराव भोसले यांच्या १२५ व्या जयंतीदिनी, ९ ऑगस्ट २०१५ रोजी खुले करण्याचे प्रयत्न महापालिकेचे होते. मात्र हा मुहूर्त हुकला. त्यानंतर महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी नाट्यगृहाच्या उद्‍घाटनासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र, नाट्यगृहाशी संबंधित काही कामे अपूर्ण असल्याने ऐनवेळी हे उद्‍घाटन पुढे ढकलण्यात आले. नंतर आचारसंहिता लागू झाल्याने कामकाज थांबले. महापालिकेची निवडणूक संपल्यानंतर, ५ नोव्हेंबर २०१५ रोजी रंगभूमीदिनाच्या औचित्याने केशवराव नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची चर्चा सुरू झाली. मात्र त्यावेळीही काही झाले नाही. त्यानंतर दहा डिसेंबर २०१५ रोजी उदघाटनासाठी प्रयत्न झाले. मात्र विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे पडघम वाजायला लागल्यामुळे ती कार्यवाहीही थांबली. नव्या वर्षात उदघाटनासाठी आमदार सतेज पाटील यांनी आठ फेब्रुवारी हा मुहूर्त जाहीर केला. मात्र तीही केवळ वल्ग्नाच ठरली. अखेर मार्च महिना उजाडला तो नाट्यगृहाच्या उदघाटनासाठी.

सुरक्षेचाही टच

नूतनीकरणात नाट्यगृहाच्या सर्व दगडी भिंतींवर अॅसिड ट्रीटमेंट करण्यात आली आहे. या भिंतीवर एकही झुडूप, रोप उगवणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. घडीव दगडांचा वापर केल्यामुळे पुढच्या शंभर वर्षापर्यंत नाट्यगृहाला काहीही धोका पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. नूतनीकरणाच्या प्रक्रियेत नाट्यगृहाची अंतर्गत डागडुजी, गळती काढणे, दगडी बांधकाम मजबूत करणे, बाल्कनी, वातानुकूलन यंत्रणाही स्टेज, ड्रेपरी रूम, पॅनेलिंग, सिलिंग आणि साऊंड सिस्टीमचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात आले. खासबाग मैदानाच्या आत दगडी बांधकाम करण्यात आले असून खास पद्धतीने लॉन तयार करण्यात आले आहे. मैदानाच्या पडझड झालेल्या भिंती पुन्हा उभारण्यात आल्या आहेत. बाहेरच्या भिंतींच्या खाचा भरून त्यांचे मजबूतीकरण करण्याचे कामही आराखड्यातील रचनेनुसार करण्यात आले आहे.



कोट...

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर केशवराव भोसले नाट्यगृह खुले होत आहे ही सर्व रंगकर्मींसाठी खूप चैतन्यदायी गोष्ट आहे. हे नाट्यगृह म्हणजे कोल्हापुरातील नाट्य चळवळीचा श्वास आहे. त्याच्या नूतनीकरणाची गरज होतीच. मध्यंतरी काही अडचणी आल्यामुळे या प्रक्रियेला विलंब झाला. आता नव्याने कोल्हापुरात रसिकांना चांगली नाटकं पाहण्याची संधी मिळेल. गेल्या दोन वर्षात रंगमंचावर अनेक नवी नाटकं आली आहेत. कलाकार आणि रसिक हा प्रवाह आता पुन्हा सुरू होईल.

संजय मोहिते, अभिनेता

नूतनीकरणामध्ये अनेक चांगल्या आधुनिक सुविधा केल्या आहेत. त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. नाट्यगृहाच्या भाड्यात वाढ करण्यात आली तरी प्रायोगिक रंगकर्मी, हौशी नाट्यसंस्था यांच्यासाठी काही सवलत असावी. अन्यथा चांगले नाट्यगृह प्रयोगाच्या अनुभवापासून लांब राहिल. प्रायोगिक नाट्यही लांब राहिल. नाट्यगृहामध्ये विविध प्रयोग केले जावेत अशी अपेक्षा आहे.

डॉ. शरद भुथाडिया

कामाचे समाधान मिळाले. एक वर्षात होणारे काम पूर्ण होणाऱ्या कामासाठी दीड ते पावणेदोन वर्षाचा कालावधी लागला. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या वास्तूला शाहू महाराजांच्या सहवासाचा संदर्भ आहे. त्यामुळे कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घेतली गेली. यानिमित्ताने एक चांगले काम केल्याची भावना आहे.

अनुराधा वांडरे, प्रकल्प अधिकारी, केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण सहसंचालकांसमोर ‘सुटा’तर्फे निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पीएचडी वेतनवाढी, वेतनप्रणालीची नियमबाह्य वर्गवारी आदी मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघातर्फे (सुटा) शुक्रवारी शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार शारीरिक शिक्षण संचालकांच्या स्थाननिश्चितीचा प्रश्न प्रलंबित आहे. त्याबाबत शिक्षण सहसंचालकांनी अनेकदा आश्वासने देऊनही कार्यवाही केलेली नाही. वेतनात ऑफलाइन आणि ऑनलाइन असा भेद केला जात आहे. सर्वांनाच ऑनलाइन पद्धतीने वेतन दिले जावे. १४ हजार ९४० ची वेतननिश्चिती करावी आदी मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रा. रघुनाथ ढमकले म्हणाले, 'शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून प्राध्यापकांना ठोस आश्वासने दिली जात नाहीत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांच्या समोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. कार्यालयात अनेक टेबलवर गैरव्यवहार चालतो. हा गैरव्यवहार तोंडी भाषेत सुरू आहे. एककीडे ऑनलाइन कारभाराच्या घोषणा केल्या जात आहे. तर शिक्षण सहसंचालक कार्यालयात गैरव्यवहार सुरू आहे. त्याला चाप लावण्याची गरज आहे.'

आंदोलनात प्रा. यू. एम. वाघमारे, सुटाचे सहकार्यवाह डॉ. आर. जी. कोरबू आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महामंडळाची २४ एप्रिलला निवडणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सन २०१६ ते २०२१ या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ८ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती महामंडळाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष अॅड. के. व्ही. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. निवडणुकीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असल्याचेही अॅड. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

निवडणूक समितीचे अध्यक्ष अॅड. पाटील म्हणाले, 'सभासदांची कच्ची मतदार यादी ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महामंडळाच्या कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयासह मुंबई, पुणे येथील शाखा कार्यालयात प्रसिद्ध केली जाईळ. यादीवरील हरकती, दोष, दुरुस्ती स्वीकारण्याची प्रक्रिया २२ मार्चपर्यंत कोल्हापूर कार्यालयात सुरू राहिल. २६ मार्च रोजी सभासदांची पक्की यादी मुख्य कार्यालयात प्रसिद्ध होईल. २८ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. मुख्य आणि शाखा कार्यालयांत उमेदवारी अर्ज उपलब्ध असतील. २ एप्रिल रोजी दाखल उमेदवारी अर्जांची यादी मुख्य कार्यालयात प्रसिद्ध होईल. ४ एप्रिल रोजी दाखल अर्जांची छाननी मुख्य कार्यालयात होईल. अर्ज माघारीसाठी ७ ते ११ एप्रिलपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत ही प्रक्रिया मुख्य कार्यालयात पार पडेल. १२ एप्रिलरपासून निवडणूक प्रक्रियेत रंगत येईल. यादिवशी पात्र उमेदवारांच्या नावांची चिन्हांसह अंतिम यादी मुख्य कार्यालयात प्रसिद्ध होईल. पुढचे बारा दिवस उमेदवारांचा प्रचार रंगेल. २४ एप्रिल रोजी कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथे मतदान होईल. २६ एप्रिल रोजी कोल्हापुरात मतमोजणी आणि निकाल जाहीर होईल.'

पत्रकार परिषदेला समिती सदस्य अॅड. प्रशांत पाटल, आकाराम पाटील, पद्माकर कापसे, अॅड. पी.जे अतिग्रे आदी उपस्थित होते.

सभासद साडेतीन हजार

महामंडळाच्या विद्यमान संचालकांची मुदत १२ डिसेंबर २०१५ रोजी संपली. ६ जानेवारी २०१६ रोजी महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक आणि विरोधी कृती समिती यांच्यातील गोंधळामुळे महामंडळाचे कामकाज चर्चेत आले. दरम्यान, त्यावेळी अध्यक्ष विजय पाटकर यांनी एप्रिलमध्ये निवडणूक जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते. गेल्या निवडणुकीत २०७२ सभासदांनी निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला होता. यंदा ही संख्या साडेतीन हजारांवर गेली आहे. निर्माता, प्रदर्शन वितरण, दिग्दर्शन, अभिनेता, संगीत गायन, लेखन, कलाप्रसिदधी, स्थिर​चित्रण, संकलन, रंगवेशभूषा, ध्वनी, अभिनेत्री, निर्मिती व्यवस्था आणि कामगार या गटांतून प्रत्येकी एक संचालक निवडला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मिस्टर महाराष्ट्र’ची रंगत आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने घेण्यात येत असलेली 'मिस्टर महाराष्ट्र' बॉडी बिल्डिंग स्पर्धा उद्या (ता. ५ मार्च) कोल्हापुरातील गांधी मैदानात रंगणार आहे. स्पर्धेसाठी राज्यातून सुमारे दोनशेहून अधिक शरीरसौष्ठवपटू कोल्हापुरात दाखल झाले आहेत. शुक्रवारी त्यांची वजन तपासणी घेण्यात आली. तसेच स्पर्धकांचे प्री-जजिंग करण्यात आले.

प्रदीर्घ कालावधीनंतर कोल्हापुरात होत असलेल्या या स्पर्धेविषयी कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे उद्या गांधी मैदानात स्पर्धेचे साक्षीदार होण्यासाठी व्यायामप्रेमींची गर्दी उसळणार आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' स्पर्धेचे मीडिया पार्टनर आहेत. स्पर्धेला पहिल्यांदाच अमेरिकेतील अॅलिओ इंटरनॅशनल आणि प्रो-टेन या कंपन्यांनी दहा हजार अमेरिकी डॉलरचे प्रायोजकत्व दिले आहे.

गेल्या २० वर्षांत मिस्टर महाराष्ट्र स्पर्धा कोल्हापुरात झाली नव्हती. त्यामुळे यंदा ही स्पर्धा कोल्हापुरात होण्यासाठी न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशने पुढाकार घेतला. त्याला 'रग्गेडियन' या क्लबने सहकार्य केले. या पूर्वी क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी रग्गेडियन क्लबने अनेक उपक्रम राबवले आहेत. यात रग्गेड सह्याद्री, सायकल रेस, ऑबस्टॅकल रेस, ट्रेकचा समावेश आहे. कोल्हापूरचा सुपूत्र असलेला मिस्टर वर्ल्ड संग्राम चौगुले यंदाच्या स्पर्धेचे मुख्य आकर्षण असणार आहे. तसेच मधुकर तळवळकर आणि श्वेता राठोडही प्रमुख आकर्षण असतील. ५५ किलो ते ८५ किलोवरील गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

विजेत्यास दीड लाखांचे बक्षीस

स्पर्धेत 'मिस्टर महाराष्ट्र'चा बहुमान पटकावणाऱ्यास दीड लाख रुपयांचे रोख बक्षीस, तर उपविजेत्यास ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच विविध गटांमधील विजेत्यांना पाच हजार रुपयांपासून १५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेत एकूण सहा लाख रुपयांच्या बक्षिसांचे वितरण होणार आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी राजेश वडाम जीम व जयेंद्र चौगुले परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुनर्वसनासाठी सकारात्मक पाऊल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाद्वार चौक ते पापाची तिकटी, भवानी मंडप ते बिंदू चौक या परिसरात पट्टे मारून फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. ताराबाई रोडवरही पट्टे मारून फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्याचा निर्णय नगरसेवक, अधिकारी आणि फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत झाला. दरम्यान या बैठकीवेळी महाद्वार रोड, ताराबाई रोड आणि भाऊसिंगजी रोडवरील व्यापारी अनुपस्थित होते. व्यापाऱ्यांनी यापूर्वीच मंदिर परिसरात फेरीवाला क्षेत्र अंमलबाजणी नको म्हणून कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने या मार्गावर फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाला १७ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. जोतिबा रोडवरील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. महाद्वार रोडवर काही दुकानदारच स्टॉल थाटून व्यवसाय करतात त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली.

बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौकपर्यंतचा मार्ग फेरीवाला मुक्त असणार आहे. तथापि महाद्वार चौक ते पापाची तिकटी या मार्गावरील फेरीवाल्यांचे याच मार्गावर पट्टे मारून पुनर्वसनाचा मुद्दा रेटला. फेरीवाल्यांना शिस्त लावत, ठराविक जागेत व्यवसाय करू देण्याची मागणी संघटनांनी केली. वाहतुकीची कोंडी, रहदारीला अडथळा, फेरीवाल्यांचे अतिक्रमण असे मुद्दे नगरसेवक अजित ठाणेकर, ईश्वर परमार यांनी निदर्शनास आणले. अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित झाला. जोतिबा मंदिर रोडवरील मंदिरा लगतच्या हार व फुलवाल्यांच्या पुनर्वसनाचा पर्याय निघत नाही, तोपर्यंत सध्याच्या जागेवरच त्यांना व्यवसाय करण्यास मुभा देण्यात आली.

भवानी मंडप ते बिंदू चौक (करवीर नगर वाचन मंदिरमार्गे )या मार्गावर रस्त्याच्या एका बाजूला पट्टे मारून फेरीवाल्यांची सोय करण्याचा पर्याय पुढे आला आहे. या मार्गावर पर्यटकाकडून पार्क करण्यात येणारी वाहने, बिंदू चौक परिसरातील 'पे अँड पार्क'येथे वळविण्यात येणार आहेत. लक्ष्मीपुरीतील येथील धान्य बाजार हलवून या परिसरात काही ठिकाणी फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे असा पर्याय गणी आजरेकर यांनी मांडला. रवी बँक ते परमाळे सायकल दुकान मार्गावरील पुनर्वसनाचा पर्याय पुढे आला आहे. पद्मा टॉकीज, अयोध्या टॉकीज परिसरातील फेरीवाल्यांनाही सध्याच्या ठिकाणीच मागे सरकून व्यवसाय करण्यास सवलत द्यावी. रात्री व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची सध्याच्या ठिकाणी पुनर्वसन करावे असे या बैठकीत ठरले.

अधिकारी संजय भोसले, प्रमोद बराले यांनी वादग्रस्त ठिकाणाबाबत आयुक्तांशी चर्चा नंतरच निर्णय होईल असे स्पष्ट केले. चर्चेत फेरीवाले संघटनेचे महंमदशरीफ शेख, समीर नदाफ, प्र. द. गणपुले, किरण गवळी आदींनी सहभाग घेतला. नगरसेवक अ​फजल पिरजादे, उमा बनछोडे, हसीना फरास, मेहजबीन सुभेदार, शेखर कुसाळे, किरण शिराळे, राहुल माने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढ प्रस्तावातून पाच गावेही वगळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने शहराच्या हद्दवाढीसाठी दोन एमआयडीसींसह २० गावांच्या दिलेल्या प्रस्तावाबाबतचा अभिप्राय देताना आणखी पाच गावे जिल्हाधिकाऱ्यांनी वगळणे योग्य असल्याचे नमूद केले आहे. ही बाब नगरविकास विभागाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून स्पष्ट झाली आहे. यामुळे हद्दवाढीबाबत १३ गावांचा विचार होण्याची शक्यता आहे.

शिये, वडणगे, आंबेवाडी, शिरोली, नागाव या पाच गावांचा त्यामध्ये समावेश आहे. महापालिकेने जून २०१५ मध्ये दिलेल्या प्रस्तावात १८ गावे व दोन एमआयडीसींचा समावेश होता. त्यानुसार नगरविकास विभागाने त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय मागितला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी १६ फेब्रुवारीला सरकारकडे अभिप्राय दिला. त्यावेळी त्यांनी दोन एमआयडीसी वगळल्या जाव्यात, असे प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केले होते. मात्र डॉ. सुजीत मिणचेकर यांचे शिरोली ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर करण्याबाबतचे पत्र पाठवल्यानंतर नगरविकास विभागाने पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याबाबतचा अभिप्राय मागणीचे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये अभिप्रायाबरोबरच महापालिकेच्या प्रस्तावाबाबत दिलेल्या अभिप्रायाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे दोन एमआयडीसी व पाच गावांच्या वगळण्यामुळे आता सरकारपुढे १३ गावांच्या समावेशाबाबतचा प्रस्ताव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात दिवसाआड पाणी

$
0
0

कोल्हापूर ः धरणातील साठा कमी झाल्याने संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून नजीकच्या काळात शहरात दिवसाआड पाणी पुरवठा तसेच आठवड्यातून एक दिवस पुरवठा बंद असे उपाय योजावे लागणार आहेत. या संदर्भात नियोजन सुरू असल्याची माहिती प्रशासनाने स्थायी समिती सभेत दिली. सभापती मुरलीधर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. पाटबंधारे विभागाशी जुलैपर्यंत पाणी पुरविण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. धरणातून नदीमध्ये पाणी सोडण्याच्या कालावधीत वाढ केल्याने उन्हाळ्यातील पुरवठ्याबाबत नियोजन केले आहे का? अशी विचारणा नगरसेवक सत्यजित कदम, सुनील पाटील व सूरमं​जिरी लाटकर यांनी सुरूवातीलाच केली. त्यावर धरणातील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करते. पाणीसाठा कमी असल्याने रोटेशनप्रमाणे पाणी मिळायला वेळ लागतो. त्याचा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. महापालिकेचे टँकर मर्यादित असल्याने टंचाई काळात टँकर भाड्याने घ्यावे लागणार आहेत. नगरसेवकांनी टंचाईच्या काळात टँकर उपलब्ध करून दिल्यास पाणी भरून देण्याची व्यवस्था केली जाईल, असा पर्याय प्रशासनाने ठेवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदी सरिता पाटील

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
कर्नाटकसह महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी मराठी भाषक सरिता पाटील आणि उपमहापौरपदी संजय शिंदे यांची निवड करण्यात आली. या निमित्ताने मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा महानगरपालिकेवर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.
निवडणुकीत सरिता पाटील यांना ३२ तर त्यांच्या प्रतिस्पर्धी कन्नड-उर्दू गटाच्या जयश्री माळगी यांना २५ मते मिळाली. उपमहापौर निवडणुकीत संजय शिंदे यांना ३१ तर त्यांचे प्रतिस्पर्धी महांतेश कागतीकर यांना २५ मते मिळाली. मराठी भाषक नगरसेवकांनी बेळगाव विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन निवडणूक लढवली होती. निवडणूक अधिकारी म्हणून प्रादेशिक आयुक्तपदाचा पदभार सांभाळणारे जिल्हाधिकारी एन. जयराम उपस्थित होते.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यावर शुक्रवारी सकाळी महापौर आणि उपमहापौर निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. महापौरपदासाठी नऊ अर्ज दाखल करण्यात आले होते. महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने नगरसेवक पिंटू सिद्दकी यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. चार मराठी भाषक नगरसेविकांनी उमेदवारी मागे घेतली. विरोधी कन्नड-उर्दू गटाच्या अनुश्री देशपांडे यांनीही उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे महापौरपदासाठी सरिता पाटील आणि जयश्री माळगी यांच्यात सरळ लढत झाली.
उपमहापौरपदासाठी मराठी भाषक गटातर्फे नागेश मंडोळकर, संजय शिंदे आणि मोहन बेळगुंदकर यांनी आणि विरोधी गटातर्फे महांतेश कागतीकर यांनी अर्ज दाखल केले होते. मराठी गटातर्फे नागेश मंडोळकर यांचे नाव जवळजवळ निश्चित झाले होते; पण अखेरच्या क्षणी काही सूत्रे फिरली आणि नगरसेवक पंढरी परब आणि मावळते महापौर किरण सायनाक यांनी मंडोळकर यांना त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. त्यामुळे मंडोळकर आणि मोहन बेळगुंदकर यांनी आपले अर्ज मागे घेतले. शिंदे आणि कागतीकर यांच्यात लढत झाली.
महापौर आणि उपमहापौर यांची निवड जाहीर झाल्यावर आमदार संभाजी पाटील ,आमदार फिरोज सेठ यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली महापालिकेसमोर मूत्रविसर्जनाचा इशारा

$
0
0

कुपवाड : महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांसंदर्भात सांगली महापालिकेने कसूर केलेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याबरोबरच कोणत्याही वेळी महापालिकेच्या मुख्यालयासमोर सामुदायिक मूत्रविसर्जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सांगली जिल्हा सुधार समितीने शुक्रवारी सांगलीत दिला.
समितीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कार्याध्यक्ष अॅड. अमित शिंदे म्हणाले, 'सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात महिलांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता आहे. महिलांसाठी केवळ तीन स्वच्छतागृहे आहेत. त्यांची दुरवस्था पाहवत नाही. ही गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. राईट टू पी या नावाने दोन वर्षे आंदोलन केले. तरीही सुधारणा झालेली नाही. महापालिकेने ही स्वच्छतागृहे बांधण्यासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद केली. समितीने स्वच्छतागृहासाठी पंधरा ठिकाणे सुचविली; परंतु अद्याप एक रुपयाही खर्च करण्यात आलेला नाही. उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना महिलांच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बांधकामांपासून ते देखभालीपर्यंतच्या ३१ मार्गदर्शक सूचना देऊन त्यांची अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी समिती स्थापन करून कार्यवाहीचा अहवाल आठ मार्च पर्यंत उच्च न्यायालयात दाखल करण्यास बजावले आहे.. परंतु अद्यापही महापालिकेच्या प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे महापालिकेने कर्तव्यास कसूर करुन उच्चन्यायालयाचा अवमान केला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्वसमावेशक अंदाजपत्रक हवे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामावेशक अंदाजपत्रकाची आवश्यकता असते. महाराष्ट्राच्या आगामी अंदाजपत्रकात रस्ते व रेल्वे वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्राच्या विकासावर भर असेल,' अशी अपेक्षा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व नियोजन मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र अधिविभागात आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र बजेट २०१६-१७ प्री-बजेट कन्सल्टेशन' विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अर्थशास्त्र अधिविभाग, चेअर बॅंक ऑफ इंडिया आणि समर्थन - सेंटर फॉर बजेट स्टडीज यांच्या वतीने कार्यशाळा झाली. डॉ. पाटील म्हणाले, 'महाराष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी कररचनेतील सुधारणा, नवीन कर पद्धती, संपत्तीचे समान वाटप, शैक्षणिक सुविधासह संशोधनासाठी पूरक नियोजनाची गरज आहे. आगामी अंदाजपत्रकाचे नियोजन करताना नागरिकांच्या मते, दृष्टीकोन वा धोरणांच्या सूचनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्याच्या निर्णय चांगला आहे. नागरिकांतील आर्थिक जागरुकता व आर्थिक ज्ञान हे प्रभावी व सर्वसमावेशक अंदाजपत्रकासाठी उपयोगी ठरू शकेल.' नरेंद्र माने यांनी 'कोल्हापूर उद्योग' व 'मेक इन महाराष्ट्र' या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, 'कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रात ऑटोमोबाईल इंडस्ट्री, कोल्हापूर एम.आय.डी.सी., सौरशक्ती, चर्मोद्योग, चांदी निर्मिती उद्योग, टेक्स्टाईल इंडस्ट्री, कृषी आदाने व गूळ निर्मिती उद्योग यासारख्या उद्योगांच्या विस्तारामुळे मेक इन महाराष्ट्राच्या उभारणीसाठी निश्चितच हातभार लागेल.'
प्राचार्या डॉ.पुष्पा रानडे म्हणाल्या, 'महिला सबलीकरणासाठी महिलांच्या शिक्षण, आरोग्य, संरक्षण, कौशल्य, व्यवस्थापन आदी घटकांच्या विकासासाठी अंदाजपत्रकात विशेष तरतुदीची आवश्यकता आहे.'
प्रा. डॉ. पी. एस. कांबळे यांनी 'प्रॉब्लेम बिफोर द इकॉनॉमी ऑफ महाराष्ट्र अँड एक्सपेक्टेशन फ्रॉम बजेट विषयावर, प्रा. डॉ. आर. जे. दांडगे यांनी 'सोशल इनक्लुजन अँड बजेट' , प्रा.बालाची सुरवसे यांनी 'कोकण अँड महाराष्ट्र' या विषयावर मार्गदर्शन केले. समर्थन सेंटर फॉर बजेट स्टडीजचे संचालक प्रवीण महाजन यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ.व्ही. बी. ककडे यांनी कार्यशाळेची माहिती सांगितली. या वेळी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन पाटील, कार्यशाळेचे समन्वयक डॉ.एम.एस.देशमुख, डॉ.पुष्पा रानडे उपस्थित होते. प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा.शशिकांत पंचगल्ले यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठात उलगडले उद्यानांमागील विज्ञान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'उद्याने आदर्श मार्गदर्शक आहेत. उद्यानातील कल्पकता घेऊन प्रत्येक मुलाने घरी उद्यान बनविण्यासाठी प्रयत्न करावेत,' असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र अधिविभाग, गार्डन्स क्लब, इंडियन वूमन सायंटिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने 'उद्यान आणि विज्ञान' या विषयावर झालेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या निलांबरी सभागृहात ही कार्यशाळा झाली.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, 'प्रत्येक मनुष्यात विचारांचे वैविध्यपूर्ण उद्यान असते. त्या विचारांचे प्रयत्नपूर्वक ज्ञानात रुपांतर करून कृतीशीलपणे अंमलात आणण्याची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान आहे. लिड बॉटॅनिकल गार्डनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठासारखे मोठे मंच उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुलांना काही क्षण निसर्गाच्या सान्निध्यात राहून जैवविविधितेची माहिती घेणे शक्य झाले आहे.'
याप्रसंगी सामाजिक वनीकरणचे उपसंचालक टी.पी.पाटील, डॉ. मंजुषा देशपांडे, विजयसिंह सावंत व डॉ. एस.आर. यादव यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर विभागातील चार तारांकित शाळांचा, चार ग्रीन सोल्जर्सचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेत जिल्ह्यातील ५० निवडक शाळांतील हरित सेना, विद्यार्थी व शिक्षक अशा २०० जणांनी सहभाग घेतला.
पर्यावरण समस्येवर मात करण्यासाठी अनेक उपायांची जगभर होणारी चर्चा व वैज्ञानिक हरित प्रयोगाची चर्चा कार्यशाळेत झाली. यावेळी शौमिका महाडिक, डॉ.धनश्री पाटील उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते उद्यान आणि विज्ञान पुस्तिकेचे प्रकाशन झाले. इंडियन वुमन सायंटीस्ट असोसिएशनच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी कार्यशाळेचे संयोजन केले. गार्डन क्लबच्या अध्यक्ष डॉ.धनश्री पाटील यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालक मंत्र्यांचा आंदोलकांना गुंगारा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

जत तालुक्याच्या दौऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता आडवल्याचे समजताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मार्ग बदलून जत गाठले. परंतु संघटनेने जतकडे धाव घेत पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी निदर्शने केली. त्यानंतर पालकमंत्र्यांनी त्यांचे निवेदन स्वीकारून दोन दिवसांत म्हैसाळचे पाणी जतसाठी सोडण्याचे आश्वासन देत दौरा पुढे सुरू ठेवला.

पालकमंत्री पाटील दोन दिवसांच्या सांगली दौऱ्यावर आले असून, त्यांनी दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील बालगाव येथे मुक्काम ठोकला आहे. त्याच गावात आढावा बैठक घेतल्यानंतर काही निर्णयही जागेवरच घेणार आहेत. दौऱ्यात त्यांच्याबरोबर खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख हेही आहेत.

म्हैसाळ योजनेचे बटण दाबताना जत तालुक्याला पाणी देण्यासाठी पालकमंत्र्यांनी नकार दिला आहे, असा दावा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महेश खराडे, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, रमेश माळी, दिनकर संकपाळ, राजू पुजारी, महावीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली डफळापूर येथे रास्ता रोको केला. परंतु पालकमंत्र्यांचा ताफा पर्यायी मार्गाने जतमध्ये पोहोचला. पालकमंत्री दुसऱ्या मार्गाने गेल्याचे समजताच कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी पालकमंत्री भेटीला येईपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा पवित्रा घेतला.

पोलिसांनी मध्यस्थी करून पालकमंत्र्यांची जतमध्ये भेट घडवून आणली. त्या ठिकाणीही संतप्त कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पळपुटे आहेत, अशी घोषणाबाजी करत निदर्शने केली. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांने संघटनेचे निवेदन स्वीकारून चर्चा केली. दोन दिवसात जतसाठी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण समितीकडे पाठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षण हक्क कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नव्याने अस्तित्वात येणाऱ्या शिक्षण समिती आणि समितीच्या कार्यकक्षेबाबत नगरसेवकही अनभिज्ञ आहेत. शिक्षण समितीचे सर्वाधिकार आयुक्तांना असल्यामुळे शिक्षण समितीमध्ये सदस्यपदी निवड होऊनही सभापती व उपसभापतिपदासाठी नगरसेवकांत उत्साह दिसत नाही. धोरणात्मक आणि आर्थिक निर्णयाचे अधिकार समितीला नसल्यामुळे महापालिकेत इतर पदासाठी नगरसेवकांत स्पर्धा असते, येथे मात्र उलटी परिस्थिती आहे. महापालिका प्रशासनाने, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडीचा कार्यक्रम मागविला आहे. या आठवड्यात कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे वृत्त आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सभापतिपद तर काँग्रेसकडे उपसभापतिपद असणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून शिक्षण मंडळ सभापतिपद काँग्रेसला देणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शिक्षण सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक पुढील आठवडण्यात होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या २० फेब्रुवारीला रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्राथमिक शिक्षण मंडळ समितीसाठी नऊ सदस्यांची नावे जाहीर केली. नगर सचिव विभागाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याबाबतची मागणी केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्तावाटपानुसार शिक्षण समितीचे सभापतिपद राष्ट्रवादीकडे तर काँग्रेसकडे उपसभापतिपद आहे. राष्ट्रवादीकडून महेश सावंत आणि अजिंक्य चव्हाण हे दोन सदस्य समितीवर आहेत. सावंत यांनी यापूर्वी स्थायी समिती सभापतिपदी काम केले आहे. अजिंक्य चव्हाण पहिल्यांदाच निवडून आले आहेत.

स्थायी, प​रिवहन आणि महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भाजप-ताराराणी आघाडीने निवडणूक लढविली होती. ​शिक्षण मंडळामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे मिळून पाच तर भाजप, ताराराणी आघाडीची सदस्य संख्या चार इतकी आहे. बहुमत दोन्ही काँग्रेसकडे आहे. मात्र भाजप आघाडीच्या सूत्रांकडून ही निवडणूक लढविली जाईल असे सांगितले. मात्र कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अधिकृत चित्र स्पष्ट होणार आहे.

समिती सदस्यत्वाविषयी निरुत्साह

प्राथमिक शिक्षण मंडळ बरखास्त करून सगळे अधिकार आयुक्तांना दिले आहेत. धोरणात्मक निर्णय, शिक्षण मंडळाशी संबंधित आर्थिक निर्णय, शैक्षणिक गुणवत्ता नियंत्रणापासून शिक्षण मंडळाच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवरही समितीचा पूर्वीसारखा वचक राहणार नाही. शिक्षकांवर दंडात्मक कारवाई, निलंबन, बालकांचा शिक्षणाचा हक्क, त्या संदर्भातील तक्रारी, शाळा मान्यता, मान्यता रद्द करणे हे सगळे अधिकार आयुक्तांच्या कार्यकक्षेत समाविष्ट केले आहेत. आर्थिक निर्णय स्थायीच्या माध्यमातून होणार आहेत. यामुळे नगरसेवकांत शिक्षण समितीविषयी फारसा उत्साह दिसेनासा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंच, अत्याचारी पित्याला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास पीडित मुलीबरोबर बांधून फटके मारण्याची शिक्षा देणाऱ्या गोपाळ जात पंचायतीच्या चार पंचांसह अत्याचारी पित्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. पाचवड (ता. वाई ) येथे गुरुवारी फटके मारण्याचा प्रकार घडला होता. दरम्यान, जात पंचायतीचे अस्तित्व हे न्याय व्यवस्थेलाच आव्हान आहे, अशा शब्दांत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकारावर टीका केली आहे.

गोपाळ समाज भटकी जमात आहे. पाचवड येथील एका पित्याने आपल्या तेरा वर्षांच्या मुलीवर अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच जात पंचायत बोलावण्यात आली. त्याला मुलीचे कुटुंबीय आणि काही नातेवाइकांनाही बोलावण्यात आले होते. जात पंचायतीत संबंधित पित्याला व त्याच्या मुलीला दोरखंडाने बांधून दोघांनाही फटके मारण्यात आले. या अमानुष घटनेची माहिती उघड होताच सारा जिल्हा हादरला.

जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून शिक्षा सुनावणारे चारही पंच आणि मुलीवर अत्याचार करणारा पिता यांना अटक केली आहे. पंच शिवाजी पवार, दत्तू चव्हाण, सर्जेराव चव्हाण, राजाराम पवार अशी अटक करण्यात आलेल्या पंचांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारे जात पंचायतीने शिक्षा देणे म्हणजे न्याय व्यवस्थेला आव्हानच असल्याचे समितीचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी घटनास्थली भेट दिली. दोनच दिवसांपूर्वी राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार प्रतिबंध अधिनियम मंजूर केला असताना अशी घटना घडणे निंदनीय आहे, असे समितीच्या निवेदनात म्हटले आहे. पेरले (ता. कराड) येथील गोपाळ समाजाचा आदर्श घेत सगळीकडे जात पंचायती बंद कराव्यात, असे आवाहनही समितीने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१४४ वर्षांनंतर आढळला दुर्मिळ साप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राधानगरी, आंबोली व गोव्याच्या काही भागातील सह्याद्री घाटामध्ये 'मेलानोफिडीयम खैरेरी' या दुर्मिळ सापाची जात अस्तित्वात असल्याचे शिक्कामोर्तब झाले. तब्बल १४४ वर्षानंतर आढळलेल्या सापाची ही जात नवीनच असून त्याबाबतचे संशोधन नुकतेच 'झूटॅक्सा' या सायंटिफिक जनरलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. डॉ. वरद गिरी व अशोक कॅप्टन यांनी या परिसरात भेटी देऊन संशोधन केले आहे.

नॅचरल हिस्ट्री म्युझियम, नॅशनल सेंटर फॉर बायॉलॉजीकल सायन्सेस, आयएचएस, बॉम्बे ​नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संयुक्त प्रयत्नातून या संशोधनाला यश आले. नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे डॉ. डेव्हीड गोव्हर यांनी २००१ मध्ये मुंबईला भेट दिली. त्यावेळी त्यांनी १४४ वर्षापूर्वी मिळालेल्या या सापाच्या जातीची पाहणी करुन त्याला 'मेलानोफिडीयम पंक्टॅटम' असे नाव दिले होते. त्यावेळी या शोधामध्ये त्यांना मार्क विल्कील्सन्स, डॉ. वरद गिरी, अशोक कॅप्टन यांचे सहकार्य मिळाले होते. 'ब्लॅक शिल्डटेल' या नावाच्या तीन आणखी जाती सह्याद्री घाटामध्ये अस्तित्वात होत्या. त्यामुळे गिरी व अशोक कॅप्टन यांनी आंबोली, राधानगरी व गोव्याच्या काही भागात भेटी देऊन संशोधन केले. या संशोधनानंतर या सापाची जात वेगळीच असल्याचे ​समजले. त्यामुळे अन्य तीन जाती व ही जात वेगळ्या असल्याचे सांगण्यात आले.

हा साप जमीनीखाली राहणारा असून अतिशय कमी वेळ तो जमिनीवर येतो. गांडुळ हे त्याचे मुख्य खाद्य असून तो बिनविषारी आहे. तो सदाहरित जंगलामध्ये आढळून येतो. त्याची जास्तीत जास्त लांबी ५५० मिलीमीटर इतकी असू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images