Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पुनर्वसनासाठी विभागीय अजेंडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला पहिल्या टप्प्यात विरोध झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात संबंधित घटकांत थेट चर्चा घडणार आहे. महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील नगरसेवक, अधिकारी आणि फेरीवाले संघटनांचे प्रतिनिधी एका व्यासपीठावर येऊन फेरीवाला झोनप्रश्नी चर्चा करणार आहेत. गुरूवारी (ता.३) गांधी मैदान विभागीय कार्यालय येथे बैठक होणार आहे. हा फॉर्म्युला कितपत यशस्वी होतो याकडे फेरीवाल्यांचे लक्ष आहे.

महापालिका प्रशासनाने, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर ​शहरात ७४ फेरीवाला क्षेत्र आणि ५२ ना फेरीवाला क्षेत्र घोषित केले आहेत. आयुक्त पी. शिवशंकर आ​णि शहर फेरीवाला समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत फेरीवाला धोरणाचा कार्यक्रम निश्चित झाला. प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरूवात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाला विरोध केला. महाद्वार रोड, ताराबाई रोड, जो​तिबा रोड, भाऊसिंगजी रोड, शिवाजी चौक परिसर 'नो हॉकर्स झोन' मध्ये समाविष्ठ आहेत. दरम्यान महापालिकेत झालेल्या बैठकीत ताराबाई रोड व सारडा दुकान ते पापाची तिकटी या मार्गावर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचे ठरले आहे. मात्र या परिसरातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाला विरोध केला व महापालिकेच्या निर्णयाविरोधात कोर्टात जाऊन स्थगिती मिळवली.

आजपासून विभागनिहाय बैठका

ठिकठिकाणच्या विरोधामुळे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणीला विलंब होत आहे. नगरसेवकांनी प्रभागात फेरीवाल्यांचे पुनर्वसन करताना विश्वासात घेण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता नगरसेवक, अधिकारी आणि फेरीवाले प्रतिनिधी यांच्यामध्ये थेट चर्चा होणार आहे. हे तीनही घटक एकत्र येऊन फेरीवाला झोन, फेरीवाल्यांचे पुनर्वसन, कोणत्या ठिकाणी फेरीवाल्यांची सोय करायची यासंबंधी चर्चा करणार आहेत. त्यानुसार गुरूवारी गांधी मैदान विभागीय मार्केट कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रभागाचे नगरसेवक, परिसरातील फेरीवाले प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शुक्रवारी (ता.४) शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय तर शनिवारी (ता.५) राजारामपुरी मार्केट कार्यालय आणि ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत बैठका होणार आहेत. प्रत्येक विभागीय कार्यालयाची स्वतंत्र बैठक होणार आहे.

निर्णय पुढील आठवड्यातच

चारही विभागीय कार्यालयमार्फत या आठवड्यात बैठका घेऊन फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाबाबत चर्चा होणार आहे. मात्र फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा अंतिम निर्णय हा पुढील आठवड्यातच होणार आहे. आयुक्त पी. शिवशंकर हे आठ मार्चपर्यंत रजेवर आहेत. ते पुन्हा रुजू झाल्यावर फेरीवाला झोनचा निर्णय होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


द्राक्ष, डाळिंब, आंबा संकटात

0
0

टीम मटा, पुणे
सांगली जिल्ह्यातील शिराळा, इस्लामपूर, सांगली शहर, कवठेमहांकाळ, जत. पूर्ण सोलापूर जिल्हा आणि साताऱ्यातील काही भागांत बुधवारी सायंकाळी दमदार पाऊस झाला. अवकाळी पावसाने द्राक्ष, डाळिंब, आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरबऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार पुरते झोपले आहेत. सांगोला तालुक्यात अवकाळीने डाळिंब बागायतदार संकटाच्या खाईत सापडला आहे. सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यावर आता अवकाळीचे दुसरे संकट कोसळल्यामुळे बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे.
सोलापूर शहरात सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. मोठा पाऊस झाल्यामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपट उडत आहे. तर सायकाळी पावसामुळे व वाऱ्यामुळे वीज गायब झाल्यामुळे अनेक भागांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. तर दक्षिण सोलापूर तालुक्यात द्राक्ष बागायतदारांवर संकट ओढवले आहे. वारे आणि पावसामुळे द्राक्षाचे घड जमीनदोस्त झाले आहेत. उत्तर सोलापूर तालु्क्यालाही पावसाने कांहीअंशी झोडपले आहे. त्याठिकाणी द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. मेघगर्जनेसह सांगोला तालुक्यात तब्बल दोन ते तीन तास मुसळधार पाऊस झाला असून, या ठिकाणी डाळिंबावर संक्रांत आली आहे. डाळिंबाचे माहेरघर म्हणून सांगोला तालुक्याला ओळखले जाते. पंढरपूर तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे द्राक्षाबरोबरच अन्य पिकांचही नुकसान झाले आहे. बार्शी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. करमाळा तालु्क्याच्या पश्चिम भागातील उंदरगाव, केत्तुर, पारेवाडी, मांजरगाव, भगतवाडी तसेच हिंगणी या गावांमध्ये हलका पाऊस झाला असला तरी आंब्याला आलेला मोहोर पूर्णपणे धुवून गेला आहे. तर कापणीला आलेल्या गव्हाचेही नुकसान झाले आहे. एकूणच दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना आता अवकाळीने दणका दिल्यामुळे बळीराजा पुरता हबकून
गेला आहे.

वीज पडून महिलेचा मृत्यू
सातारा : जिल्ह्याच्या विविध भागात मंगळवारी सायंकाळी उशिरा सलग तिसऱ्या दिवशी वादळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. हिंगणगाव (ता. फलटण) येथे वीज अंगावर कोसळून एका ऊसतोडणी कामगार महिलेचा मृत्यू झाला.
माणमधील म्हसवड, दहिवडी, मलवडी, गोंदवले, फलटणमधील सांगवी, खटावमध्ये पुसेगाव, बुध, डिस्कळ परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. हिंगणगाव येथे वीज पडून ऊसतोडणी महिला कामगाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघी जखमी झाल्याची नोंद लोणंद ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली. सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जना करीत पावसाने सुरुवात केली. त्यामुळे न्यू फलटण शुगर वर्क्सच्या तोडणी कामगारांनी काम थांबवून निवाऱ्याकडे धाव घेतली. रस्त्याने जात असताना अचानक जयश्री सुरेश थोरात
(वय ४०, रा. नेटनूर ता. जि. बीड) यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. संगिता यशवंत देवगुडे, कौशाबाई दादासाहेब देवगुडे, द्रौपदी रामहरी कानडे या भाजल्याने जखमी झाले.

कराड परिसरात गारांचा पाऊस
कराड : कराड, पाटणसह जावली, महाबळेश्वर आणि वाई तालुक्यांना मंगळवारी सायंकाळी गारांचा पाऊस झाला. कराड तालुक्यातील काळेवाडी येथे पिकअप शेडची भिंत कोसळली तर कुसूर येथे ऊसतोड मजुरांच्या झोपडीत पाणी शिरल्याने मजुरांचे संसार उघड्यावर पडले. फलटणमध्ये अंगावर वीज पडल्याने एक गाय तर वाई येथे एक म्हैस मृत्युमुखी पडली. या सर्वच तालुक्यांत गहू, रब्बी ज्वारीचे पीक भुईसपाट झाले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांबावरील तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

पाटणमध्ये आंब्याच्या बागांना फटका
पाटणमध्ये अवकाळी पावसाचा शिडकावा झाला. सुमारे तासभर झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण करून वातावरणात थंडावा निर्माण केला. मोरगिरी, कोयना, मणदुरे, मल्हारपेठ, मरळी विभागात पावसाने हजेरी लावली. पाटण तालुक्यातील हापूस आंबा बागायतदारांना या पावसाने चिंतेत टाकले. आंबा झाडांना मोहोर आला आहे. त्यातच गारांसह पडलेल्या वादळी पावसाने मोहोर झडून गेला आहे. वीटभट्टीधारकांनी आपल्या भट्ट्या प्लॅस्टिक कागद टाकून झाकून ठेवल्या. मोरगिरी भागातही जोरदार पाऊस झाला. कोयना परिसरात मात्र किरकोळ सरी कोसळल्या.

जतमध्ये रब्बी पिकांचे नुकसान
कुपवाड : सांगली-मिरज परिसरात बुधवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याआगोदर सांगोला तालुक्याच्या परिसरात जोरदार पाऊस कोसळला. जत, कवठेमहांकाळ तालुक्याच्या काही भागातही रात्री पावसाची रिमझीम सुरू झाली. वारा आणि पाऊस एकत्रित असल्याने रब्बी आणि बागायतदार शेतकरी हबकला आहे. ज्वारी, गहू, हरभरा या सारख्या रब्बी पिकांना अवकाळीचा फटका बसण्याची
शक्यता आहे.
सांगोला तालुक्यातील घेरडी, डिस्कळ, पारे या भागाला बुधवारी अवकाळीने झोडपले. आमक्या भागात मोठा पाऊस झाल्याची चर्चा सुरू असतानाच जत आणि तालुक्यातील अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू झाली. अनेक ठिकाणी पावसाने पाणीपाणी केले. कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव, चोरोची परिसरातही रात्री उशीरा पाऊस सुरु झाला होता. सांगली साडेसात वाजण्याच्या सुमारास वाऱ्याबरोबर पावसाला सुरुवात झाली. परंतु काही वेळातच पावसाने विश्रांती घेतली. शहरातील वीजही काहीवेळ गायब झाली होती.
बुधवारी दुपारनंतर पावसाचे वातावरण अधिक गडद होऊ लागल्यानंतर विविध कामांच्या निमित्ताने शहरांकडे आलेल्या शेतकऱ्यांनी गावाकडे धाव घेतली. कोणाच्या शेतात गहू काढणी करून टाकलेला होता तर काही हरभऱ्याचे ढिग लावून ठेवले होते. अनेक भागात ज्वारीची मळणी सुरू आहे. ज्यांची मळणी झाली आहे, त्यांना कडबा व्यवस्थित रचून त्याचा पावसापासून बचाव करायचा होता.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमध्ये अनमोल भारत करडे या सहा महिने वयाच्या बालकाच्या आतड्यावरील गुंतागुंतीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि डॉ. शिवप्रसाद हिरूगडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

अनमोल याला जन्माच्या दुसऱ्या महिन्यापासून उलटी त्रास होत होता. त्यामुळे त्याचे वजन वाढत नव्हते. त्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले. त्याला खोकला व फुफ्फुसाचा जंतुसंसर्ग होत होता. डॉ. हिरुगडे यांनी अन्ननलिकेची तपासणी केली असता अन्ननलिकेचा शेवटचा भाग अर्धवट असल्याचे दिसून आले. अन्न जठरातून पुन्हा अन्ननलिकेत जात असल्याचे दिसून आले. बालकाचे वजन वयाच्या मानाने खूप कमी असल्याने बालकाचे वजन वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले. बालकाच्या फुफ्फुसाचा जंतसंसर्ग कमी झाल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नातेवाईकांबरोबर चर्चा करून शस्त्रक्रियेच्या धोक्याची कल्पना ​देण्यात आली. शस्त्रक्रियेत अन्ननलिकोचा शेवटचा भाग पोटात ओढून त्यावर जठराचा भाग जोडण्यात आला. शस्त्रक्रियेनतंर कृत्रिम श्वासोश्वासासाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये चार दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर पुन्हा सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या बालकाची प्रकृती उत्तम असून त्याचा त्रास पूर्णपणे बंद झाला आहे.

ही शस्त्रक्रिया डॉ. शिवप्रसाद हिरुगडे, भूलतज्ज्ञ डॉ. मारूती पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या निवेदिता पाटील यांच्यासह बालरोग शल्य चिकीत्सक टीमचे सहकार्य लाभले. डॉ. दिनेश कित्तूर, डॉ. वसंतराव देशमुख, डॉ. रामानंद यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंब्यातील गाळ सोमवारपासून उपसणार

0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

कळंबा तलावातील गाळ उपसा करण्यास सोमवारपासून सुरूवात होणार आहे. आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी सायंकाळी अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधीसोबत तलाव परिसरातील विकास कामाचा आढावा घेतला. यावेळी आमदार पाटील यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधत कामाची माहिती दिली. शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना जलदगतीने कामाच्या सूचना केल्या. जलसंपदा विभागाकडून आवश्यक ती यंत्रसामुग्री मिळेल. तलावात ३० हजार घनमीटर गाळ आहे. गाळ मे महिन्यापर्यंत काढण्यात येईल.

जलसंपदा विभागाकडून सोमवारपासून गाळ काढण्यासाठी एक डोझर आणि इतर यंत्रसामुग्री असणार आहे. रोज २०० ट्रॉली गाळ उपसा होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेतून गाळ उपसा करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे यांत्रिकी विभागातील उप जलअभियंता विकास हुंचेकर, संग्राम पाटील यांनी दिली. करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांनी गाळाची रॉयल्टी माफ असल्याचे सांगितले. पाहणीवेळी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, सभागृह नेता प्रविण केसरकर, उपायुक्त विजयकुमार खोराटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता मनीष पवार उपस्थित होते.

दरम्यान, 'तलावाती पाणी साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढण्यात येणार आहे. तलावातील गाळ शेतीला पूरक आहे. लोकांनी गाळ नेऊन सहकार्य करावे' असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे व गटविकास अधिकारी भालेराव यांनी आसपासच्या गावातील तलाठ्यांशी संपर्क साधून गावकऱ्यांना गाळ नेण्यासाठी प्रवृत्त करावे असे यावेळी ठरले.

सुशोभिकरणाचे चाळीस टक्के काम

सध्या कळंबा तलाव परिसराचे दहा कोटी रुपयांतून सुशोभिकरण सुरू आहे. बंधाऱ्याचे पिचींग, मनोऱ्याचे काम, सायकल व वॉकिंग ट्रॅकचा समावेश आहे. आतापर्यंत ४० टक्के सुशोभिकरणाचे काम झाले आहे. चार महिन्यात सुशोभिकरणाचे काम पूर्ण होईल अशी माहिती कंत्राटदार एस जे अँड बिल्डकॉनतर्फे देण्यात आली. आमदार पाटील यांनी बंधारा पिचींग व मनोऱ्याचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. पाटील यांनी माजी नगरसेवक मधुकर रामाणे, आदिल फरास, कळंब्याचे सरपंच अजय सावेकर, उपसरपंच दिपक तिवले यांच्याशी चर्चा केली. यावेळी नगरसेविका प्रतीक्षा पाटील, छाया पोवार, सदस्य विश्वास गुरव, पूजा पाटील, दत्तात्रय हळदे, शशिकांत तिवले आदी उप​स्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्कील फेअरला प्रचंड प्रतिसाद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
राज्यातील पहिल्या विद्यापीठीय कौशल्य मेळाव्यास शिवाजी विद्यापीठात सुरुवात झाली. अडीच हजारांवर विद्यार्थ्यांनी मेळाव्यात नोंदणी केली. त्यात मुलींचे प्रमाण लक्षणीय होते. नोकरी मिळविण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ८५ हून अधिक कौशल्यांची माहिती घेतली. गुरुवार (ता. ३) पर्यंत मेळावा सुरू राहणार आहे.
महाराष्ट्र सरकारचा रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग, विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र, विद्यापीठ कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र आणि युवक कल्याण कक्ष यांच्यातर्फे कौशल्य मेळावा झाला. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन झाले.
कुलगुरू शिंदे म्हणाले, 'समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे साधन म्हणजे कौशल्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कौशल्यप्राप्ती करून घेऊन जीवनात यश मिळविण्याचा प्रयत्न करावा. कौशल्य विकास आणि रोजगार संधींची उपलब्धता अशा दुहेरी पातळ्यांवर विद्यार्थ्यांना मेळाव्यातून पाठबळ मिळाले आहे.'
राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या पुणे विभागीय कार्यालयाचे उपसंचालक दिलीप पवार म्हणाले, 'तरुणांना योग्य मार्ग व संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकासाची अत्यंत आवश्यकता लक्षात घेऊन मेळावे आयोजनाला प्राधान्य देण्यात येत आहे. स्कील मॅपिंग, मॉड्युलर एम्पलॉयमेंट स्कीम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, करिअर गायडन्स कौन्सिलिंग सेंटर तसेच रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यांचेही प्रभावीपणे आयोजन केले जात आहे.'
परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, सहाय्यक संचालक सचिन जाधव, डॉ. सुरेश शिखरे उपस्थित होते. समन्वयक डॉ. ए.एम. गुरव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस.एस. कोळेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बलभीम’ संचालकांवर कारवाई अटळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बलभीम बँकेचे अपना बँकेत विलिनीकरण झाले आहे. तसेच ही बँक मल्टिस्टेट असल्याने सहकार अधिनियमाच्या कलम ८८ नुसार संचालकांवर जबाबदारी निश्चित होऊन शकत नसल्याचा तांत्रिक मुद्दा अॅड. दीपक पाटील यांनी पाच संचालकांच्यावतीने पीठासन अधिकाऱ्यांसमोर मांडला. सुनावणीदरम्यान तांत्रिक मुद्दा उपस्थित करुन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला असला तरी संचालकांवर जबाबदारी निश्चित होणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. इतर १५ संचालकांनी पुन्हा कागदपत्रांची मागणी केल्याने पुढील सुनावणी शुक्रवारी (ता.११) होणार असल्याचे चौकशी अधिकारी सुनील शिरापूरकर यांनी सांगितले.

बलभीम बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या दोषी संचालकांवर रक्कम निश्चितीची सुनावणी चौकशी सुरू आहे. सुरुवातीच्या दोन सुनावणीला अनुपस्थित असणाऱ्या सर्व संचालकांसह बुधवारच्या सुनावणीला सर्व दोषी संचालक व अधिकारी उपस्थित होते. १५ संचालकांच्यावतीने अॅड. अभिजीत कापसे यांनी बाजू मांडली. या संचालकांवर चार कोटी ८३ लाख रुपयांची जबाबदारी निश्चित होणार आहे. त्यामुळे या रकमेच्या थकीत कर्जाच्या कागदपत्रांची मागणी त्यांनी केली. वसुलीचे दाखले मिळत नसल्याचेही चौकशी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. अशीच मागणी संचालक वसंतराव तडवळे यांच्यावतीने अॅड. के. डी. पवार यांनी केली. त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी अशी सुमारे १३०० कर्जप्रकरणे असल्याने यासाठी आठवड्याची मुदत देण्यात दिली.

अॅड. दीपक पाटील यांनी मात्र तांत्रिक मुद्दा उपस्थित केला. बलभीम बँक अपना बँकेत विलीन झाल्याने आणि अपना बँक मल्टीस्टेट असल्याने कलम ८८ नुसार संचालकांना जबाबदार ठरवता येत नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला.

शेअर्स वधारणार

बलभीमच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्या दोषी संचालकांवर ७२(३) अंतर्गत जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया सुरू आहे. संचालकावर जबाबदारी निश्चित होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत असल्याने संचालकांकडून वसूल झालेल्या रकमेतून तोटा भरुन निघणार आहे. ही पूर्ण रक्कम वसूल झाल्यास जुन्या सभासदांना कायद्यातील तरतुदीनुसार अपना बँकेचे सभासदत्व द्यावे लागणार आहे. त्यामुळे बलभीम बँकेप्रमाणेच अपना बँक शिवाजी पेठेची अस्मिता बनेल, असे कॉ. चंद्रकांत यादव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हैसाळच्या कालव्यावर गस्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
मिरज तालुक्यातील लांडगेवाडीनजीक लिंगणूर कालव्यातून पुढे जाणारे पाणी रोखण्यासाठी कालव्यावर बांध घातल्याचे शनिवारी उघडकीस आले होते. याप्रकरणी पाटबंधारे विभागाने मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रारी अर्ज दिला आहे. या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेऊन कालव्यावर मंगळवारपासून पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
पाटबंधारे विभागाने बनविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे म्हैसाळच्या कालव्यातून पाण्याचे वितरण सुरू आहे. मात्र काही स्थानिकांनी लिंगणूर कालव्यातू पूढे जाणारे पाणी आरग एम. आय. टँककडे वळविण्यासाठी या कालव्यावर बांध घातल्याचे उघडकीस आले. पाटबंधारे विभागास या बाबत माहिती मिळाल्यानंतर बांध हटवून कालव्यातील प्रवाह पूर्ववत करण्यात आला. घडल्या प्रकाराबाबत पाटबंधारे अधिकाऱ्यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रारी अर्ज दिला आहे.
कालवा फोडणे अथवा अशा प्रकारे बांध घालण्याच्या प्रकारामुळे पाणी वितरणाचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. पाटबंधारे विभागाच्या तक्रारीनंतर या कालव्यांवर पोलिसांची गस्त सुरू करण्यात आली आहे. पोलिसांच्या पथकांनी मंगळवारपासून कालव्यावर गस्त सुरू केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन खासगी सावकारांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरी पोलिसांनी खासगी सावकर प्रमोद शेंडगे (रा. चौथी गल्ली, राजारामपुरी) व बापू नावाच्या सावकाराविरोधात बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. दोन्ही सावकरांविरोधात एका प्रॉपर्टी एजंटाने आणि एका रिक्षा व्यावसायिकाने फिर्याद दिली.

प्रॉपर्टी एजंट अतुल हरी कांबळे (वय ३२, रा. नवीन वसाहत, राजेंद्रनगर) यांनी शेंडगे व बापूकडून दहा हजार रुपये घेतले होते. त्याला दरमहा दोन हजार रुपये व्याज होते. दोन्ही सावकारांनी कांबळे यांच्याकडून कोरे धनादेश आणि एका कोऱ्या कागदावर सही घेतली होती. कांबळे यांनी दोघांनाही ४६ हजार रूपये परत करूनही आणखी तीस हजार रुपयांसह व्याजाची मागणी केली जात होती. कर्ज न दिल्यास सोडणार नाही अशी धमकी शेडंगे यांनी कांबळे यांना स्वतःच्या घरात बोलावून दिली.

रिक्षा व्यावसायिक दिनेश सुधाकर हासूरकर (रा. तिसरी गल्ली, राजारामपुरी) यांनी शेंडगे आणि बापूकडून २० सप्टेंबर २०१४ रोजी वीस हजार रुपये घेतले होते. त्याला महिना चार हजार रुपये व्याज होते. शेंडगे आणि बापूने हासूरकर यांच्याकडून कोरे धनादेश व कोऱ्या कागदावर सही घेतली. हासूरकर यांनी कर्ज व व्याजापोटी ६८ हजार रुपये दिले होते. मात्र या सावकारांनी त्यांच्याकडे आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली. तरीही त्यांच्याकडे पैशाचा तगादा सुरू होता. दोघांविरोधात पोलिसांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजरा परिसरात झाडे उन्मळून पडली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी पाऊस झाला. आजरा परिसरात जोरदार वारे आणि वीज आणि गडगडाटात आलेल्या पावसामुळे परिसर चिंब झाला. आर्दाळपासून आजऱ्याकडे व बेलेवाडी घाटापासून पिंपळगाव परिसरात पावसाचा जोर होता. गवसे येथील साखर कारखाना परिसराला पावसाने झोडपून काढले. त्या परिसरात काही झाडे उन्मळून पडली. यामुळे वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. आजरा बाजारपेठेत तारांबळ उडाली.

कागल : कागल शहरासह तालुक्यात हलका पाऊस झाला. कापशी परिसर आणि कागल शहरासह परिसरात गडगडाटासह पाऊस झाला. तत्पूर्वी आलेल्या वादळाने वीज गेली आणि काही गावातील यात्रेवर परिणाम झाला.

गारगोटी आणि परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण होते.आज सकाळ पासूनच वातावरणातील बदलामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास विजांचा प्रचंड कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाने सुरुवात केली. हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे प्रचंड उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध मुलांचा सप्तरंग ऑर्केस्ट्रा

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
शहरातील सर्वधर्म समभाव अंध व अपंग सेवाभावी संस्थेने, अंध मुलांचा सहभाग असलेल्या सप्तरंग ऑर्केस्ट्राच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बालगंधर्व नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. रसिक श्रोत्यांची या कार्यक्रमास दाद मिळाली.
संस्थेतर्फे अंध मुलांच्या जीवन चरितार्थ चालविण्यासाठी तसेच त्यांच्या वसतीगृहाच्या खर्चासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध वाद्ये वाजविणारी व गाणारी अशी आठ ते दहा अंध मुले एकत्र येऊन त्यांनी सप्तरंग ऑर्केस्ट्राची निर्मिती केली आहे. संस्थेचे सालम नदाफ, सिद्धनाथ खोत, अर्जुन वाघमोडे, स्वप्नाली, कय्युम, मंदार व मकरंद पारवे आदी अशा मुलांचा हा ऑर्केस्ट्रा आहे.
अंध मुलांनी सादर केलेल्या बहारदार गायन व वादनाने रसिक श्रोते भारावून गेले. मुलांनी हिंदी व मराठीतील अनेक लोकप्रिय गिते सादर केली. शांताबाई.., या गाण्यास श्रोत्यांची दाद मिळाली. या गाण्यावर अनेकांनी नाट्यगृहात ठेका धरला. संस्थेचे अध्यक्ष दावल शेख यांच्यासह श्रीधर भस्मे, निलेश भिसे, शंकर भोसले, रशिद मोमीन आदींनी संयोजन केले. सूत्रसंचालन स्वप्नील पाटील व योगेश देसाई यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वटहुकुमावरील सुनावणी मुख्य न्यायाधिशांकडे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकार विभागाने काढलेल्या वटहुकुमाला स्थगिती देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मोहता यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षाच्यावतीने वरिष्ठ अॅड. अनिल साखरे यांनी सदरच्या सर्व याचिका मुख्य न्यायाधिशांकडे वर्ग करण्याची मागणी केली. त्याला न्यायमूर्ती मोहता यांनी मान्यता दिल्याने यापुढील सुनावणी मुख्य न्यायाधिशांसमोर होणार आहे. याचिका मुख्य न्यायाधिशांसमोर वर्ग केल्याने बोर्डावर सुनावणी निश्चित होईपर्यंत जिल्हा बँक संचालकांना दिलासा मिळाला आहे.

जानेवारी २००७ नंतर प्रशासक नियुक्त बँकेवरील संचालकांना पुढील दहा वर्षे निवडणूक बंदीचा वटहुकुम राज्य सरकारने काढला होता. वटहुकुमाला स्थगिती देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा बँकेसह नाशिक जिल्हा बँकेच्या संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तर धुळे, जळगाव बँकेच्या संचालकांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. कोल्हापूर व नाशिक येथील संचालकांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ न्यायमूर्ती मोहता यांच्यासमोर एकत्र सुनावणी सुरू होती.

पहिल्या दोन सुनावणीमध्ये सरकार पक्षाच्यावतीने कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली होती. बुधवारी याबाबतची सुनावणी झाली. मात्र सरकार पक्षाचे अॅड. साखरे यांनी याचिका मुख्य न्यायाधिशांकडे वर्ग करण्याची मागणी केली. त्यानुसार वटहुकुमाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेल्या सर्व याचिका घेवून जाण्याचे आदेश देण्यात आले. संचालकांच्यावतीने ज्येष्ठ अॅड. जहागिरदार व अॅड. पटवर्धन यांनी काम पाहिले.

सहनिबंधकांच्या सुनावणीकडे लक्ष

राज्य सरकारने नवीन वटहुकुम काढल्यानंतर विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी जिल्हा बँकेच्या संचालकांना अपात्र का ठरवू नये अशी नोटीस लागू केली होती. मात्र, नोटिसीनुसार कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला मनाई केली आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीच्या सुनावणीमध्ये सात मार्च सुनावणीची तारीख दिली होती. याच दिवसी महाशिवरात्रीची सुटी असल्यामुळे सुनावणी मंगळवारी (ता. ८) होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये संचालकांवर कारवाई करु नये असे स्पष्ट आदेश नसल्यामुळे विभागीय सहनिबंधकांकडे होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्जुनीमध्ये नव्या एमआयडीसीचा प्रस्ताव

0
0

raviraj.gaikwad@timesgroup.com

कोल्हापूर परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत कागल तालुक्यात अर्जुनी येथे नव्या एमआयडीसीचा प्रस्ताव आहे. सध्या प्राथमिक पाहणीच्या पातळीवर हा प्रस्ताव असला, तरी ही एमआयडीसी झाल्यास कोल्हापुरातील उद्योजकांना विस्तारासाठी थोडीफार जागा उपलब्ध होण्याची आशा आहे.

कोल्हापूरच्या उद्योगनगरीच्या विस्ताराला सध्या खीळ बसली आहे. जागतिक मंदीचा परिणाम येथील उद्योगांवर दिसत आहे. नवे उद्योग सुरू होण्यातही मर्यादा येत असल्याबाबत महाराष्ट्र टाइम्सने प्रकाशझोत टाकला होता. या पार्श्वभूमीवर ओद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी अशोक चव्हाण यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी नवा उद्योग उभारण्यासाठी जागा उपलब्ध होणे शक्य आहे. त्यासाठी एमआयडीसी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

अर्जुनी येथील प्रस्तावीत एमआयडीसी २४३ हेक्टरमध्ये असणार आहे. परिसरातील नापेर आणि बिगरशेती जमिनीचा यामध्ये विचार करण्यात येत आहे. एमआयडीसीचे अधिकारी त्याबाबतची पाहणी करीत आहेत. ही प्रस्तावित एमआयडीसी झाल्यास कोल्हापुरात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या बाहेरच्या उद्योजकांना जागा उपलब्ध होणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातच विस्तार करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना एक पर्याय उपलब्ध होणार आहे. प्रस्तावित एमआयडीसी इंजिनीअरिंग उद्योगासाठी असणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

याबाबत चव्हाण म्हणाले, 'एखाद्या परिसरात एमआयडीसी उभारणीसाठी २०० हेक्टर जागा लागते. जागेची सलगता आणि पडीक बिगर शेती जमीन हा प्राधान्यक्रम असतो. जिल्ह्यात अशा कोणत्याही ठिकाणी एमआयडीसी उभारणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.'

'हलकर्णी'त टेक्सटाइल प्रोजेक्ट

चंदगड तालुक्यातील हलकर्णी एमआयडीसीमध्ये कापड उद्योग क्षेत्रातील कॉर्न-चेम इंटरनॅशनल या अमेरिकेतील कंपनीने प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे. मुंबईत झालेल्या 'मेक इन इंडिया' उद्योग मेळाव्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याशी करार केला आहे. या करारानुसार येत्या दोन महिन्यांत कंपनी उभारणीचे काम सुरू होणार आहे. कॉर्न-चेम इंटरनॅशनल कंपनी हलकर्णीमध्ये साठ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, या माध्यमातून २०० तरुणांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे.

=======
येत्या काही दिवसांत विकासवाडी, नेर्ली, तामगाव परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास विकासवाडी परिसरात एमआयडीसी निश्चितच होईल.

अशोक चव्हाण, विभागीय अधिकारी, एमआयडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनावणी होणार मुख्य न्यायाधीशांसमोर

0
0

कुपवाड : सहकारी बँकेच्या बरखास्त संचालक मंडळातील संचालकांना पूर्वलक्षी प्रभावाने अपात्रता लागू करण्याचा अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेची सुनावणी आता हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर होणार आहे. सरकारच्या कायद्यालाच आव्हान देणारी ही याचिका असल्याने याची सुनावणी खंडपीठासमोर करण्यास बुधवारी सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. त्यांचा आक्षेप मान्य करीत न्या. धर्माधिकारी आणि न्या. सोनक यांच्या खंडपीठाने याचिका मुख्यन्यायाधिशांकडे वर्ग करण्यात येत असल्याचा निर्णय दिला.
राज्य सरकारने सहकारी बँकांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या व पुन्हा संचालक म्हणून निवडून येऊन कारभार करणाऱ्यांना चाप बसावा यासाठी नवा कायदा केला आहे. या कायद्याने बरखास्त संचालक मंडळातील व्यक्तीस किमान दहा वर्षे कोणत्याही बँकेचा संचालक होता येणार आहे. त्यानुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षांसह सात जणांना अपात्रेतेच्या नोटीसा संचालक मंडळाने बजावल्या आहेत. सहकार विभागाने दिलेल्या नोटीसांना संचालकांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. पूर्वलक्षी प्रभावाने अपात्रता आदेश लागू करण्याच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विलासराव शिंदे, मोहनराव कदम, सिकंदर जमादार, महेंद्र लाड, बी. के. पाटील यांनी एकत्रित तर आमदार अनिल बाबर यांनी स्वतंत्रपणे दाखल केली आहे. सांगलीसह नाशिक व इतरही काही ठिकाणांहून अशा याचिका दाखल झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मिसाइल ग्रुप आणि कुकी दो ज्युदो कराटे ऑर्गनायझेशन यांच्यावतीने महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संकटकाळी किंवा असुरक्षित ठिकाणी प्रतिकार करण्याचा प्रसंग महिलांवर आला तर त्यांच्याजवळ असलेल्या वस्तूंचाच स्वसंरक्षणासाठी शस्त्र म्हणून कसा वापर करता येईल याची प्रात्यक्षिकासह माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. १३ मार्च रोजी दुपारी तीन ते सहा यावेळेत दसरा चौक येथील नेहरू हायस्कूल येथे ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सतर्फे या कार्यशाळेसाठी माध्यम प्रायोजक म्हणून सहकार्य करण्यात आले आहे.

सध्या कामाच्या निमित्ताने महिलांचे शहरात फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा रात्री उशीरा महिलांना एकटीने प्रवास करावा लागतो. उपनगरात राहणाऱ्या महिला, युवती यांना दुपारी व रात्रीच्यावेळी घरी एकटीने जावे लागते. गेल्या काही दिवसात एकट्या महिलांवर अत्याचार, बलात्काराचा प्रयत्न होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशापरिस्थितीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही अनुचित प्रकार घडला तर प्रतिकार करण्यासाठी महिलांना तातडीने शस्त्र उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे महिलांच्या वापरातील काही वस्तूंचाच वापर शिताफीने स्वसंरक्षणासाठी करता येऊ शकतो. यासंदर्भात या कार्यशाळेत माहिती व अशा नित्य वापरातील वस्तूंचा रक्षणासाठी वापर करण्याच्या टिप्स देण्यात येणार आहेत.

ज्युदो कराटेतील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सतीश वडणगेकर आणि अविनाश पाटील, मिसाइल ग्रुपचे संस्थापक सद्दाम मुजावर हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या महिला व युवतींनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीसाठी सतीश वडणगेकर (९८५००४५५३७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफ व्यावसायिकांचा बंद

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
केंद्रीय अर्थसंकल्पात सराफी व्यवसायावर एक टक्का अबकारी कर सुरू केल्यामुळे सराफी व्यावसायिकांनी बुधवारपासून बेमुदत पुकारला आहे. हा अबकारी कर रद्द होईतोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलन देशव्यापी असल्याची माहिती सांगली सराफ असोसिएशनचे अध्यक्ष बाबूराव जोग, तसेच महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर पंडीत यांनी दिली.
पंडीत, हा कर सुरू झाल्याने व्यवसाय अडचणीत आला आहे. युपीए सरकारनेही पूर्वी असाच कर लादला होता, त्या वेळीही देशव्यापी बेमुदत बंद पाळून आवाज उठविण्यात आला होता. या करामुळे सराफ व्यावसियाकांना आणखी एका करासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. त्याच्या नोंदी ठेवणे, फायली करण्याची कामे वाढणार आहेत. सोन्याच्या दरातही वाढ होईल. आधीच प्राप्ती कर, विक्रीकर, शॉप अॅक्ट, अशा कार्यालयांना चकरा माराव्या लागतात. त्यात आता केंद्रीय अबकारी कार्यालयाची भर पडणार आहे.
सांगली जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार सराफ व्यावसायिक बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. या शिवाय या वर अवलंबून असणारे कारागीर, गलाई कामगार, असे सुमारे १५ हजार जण आंदोलनात सहभागी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रामाणिक व्यापाऱ्यांवर अन्याय नको
एलबीटी निर्धारणामुळे प्रामाणिक व्यापाऱ्यांवर अन्याय होता कामा नये. नियमित कर भरणारे आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांना एकाच पारड्यात तोलू नये, अशी मागणी राज्य विक्रीकर संघटनेचे माजी अध्यक्ष व एल. बी. टी. सल्लागार समितीचे सदस्य किशोर लुल्ला यांनी केली आहे. हजारो व्यापाऱ्यांना असेसमेंट करण्यासाठी नोटीसा काढण्यात आल्या आहेत. या करीता महापालिकेने सी. ए. राजेश भाटे, सुनील बुकटे, कृष्णा चनानी यांची नियुक्ती केली आहे. २०१३-१४, २०१४-१५ आणि २०१५-१६ या तीन वर्षांकरिता हे असेसमेंट होणार आहे. मालखाते पत्रक, नफातोटा पत्रक व ताळेबंद, आयकर आणि वॅट ऑडिट रिपोर्ट, खरेदी-विक्री रजिस्टरचा आढावा, मूल्यवर्धित कर आदींची माहिती द्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा कोटींची उलाढाल थांबली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोन्यावरील एक टक्का एक्साइज ड्युटी रद्द करावी, आयत शुल्क कमी करावे, पॅनकार्ड सक्ती दहा लाख रुपयांच्या व्यवहारावर करावी आदी मागण्यांसाठी राज्य सुवर्णकार व सराफ फेडरेशनने बुधवारपासून पुकारलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील सराफ बाजार पूर्णपणे थंडावला.

ग्रामीण भागातही बंद उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने सोने-चांदी व्यवसायातील कोट्यवधींची उलाढाल बंद झाल्याची माहिती जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल यांनी पत्रकार बैठकीत दिली. तर शहराध्यक्ष सुरेश गायकवाड व जिल्हाध्यक्ष भरत ओसवाल यांनी दहा कोटींची उलाढाल थांबल्याचे पत्रकात म्हटले आहे. जिल्हा सराफ संघासह ग्रामीण भागातील सुमारे १५०० व्यावसायिकांनी बंदमध्ये सहभाग घेऊन दुकाने बंद ठेवली.

अध्यक्ष ढणाल म्हणाले, 'केंद्र सरकारने दोन लाख रुपयांच्या सोने व्यवहारासाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिकांसह ग्राहकांचीही अडचण झाली आहे.' बहुतांशी व्यावसायिक ग्रामीण भागात असल्याने त्यांना नोंदी ठेवणे जिकिरीचे जाणार आहे. याच दरम्यान एक्साइजच्या छापे पडल्यास व्यावसायिक अडचणीत येणार आहेत, असे मत राज्य उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत यांनी व्यक्त केले.

सराफ बाजार आणखी दोन दिवस बंद

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने पुकारलेला बंद आज, उद्याही राहणार आहे. दरम्यान, अबकारी करासंदर्भात व्यावसायिकांना चार्टर्ड अकाउंटंट चेतन ओसवाल, दीपेश गुंदेशा आणि अमृता विनोद बांदिवडेकर यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांच्या दणक्याने मणक्याचे आजार

0
0

Sachin.Yadav @timesgroup.com

कोल्हापूर ः दुचाकी आणि चारचाकी वाहनांची कामे अधिक पाहिजे असतील, हाडे खिळखिळी आणि मणक्याचे आजार हवे असतील तर एकदा नक्की क्रांतिसिंह नाना पाटीलनगर रिंगरोडची सफर वाहनधारकांनी करायला हरकत नाही. ढीगभर धूळ, धोकादायक वळणे आणि नियोजित रस्त्यापैकी अर्धा रस्ताच पूर्ण केलेला असल्यामुळे हा रोड भयंकर धोक्याचा बनला आहे. कोल्हापूर-राधानगरी आणि कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणची वळणे आणि अयोध्या पार्क ते फुलेवाडी जकात नाक्यापर्यंतचा रस्ता जीवघेणा झाला आहे. नगरोत्थान योजनेतील हा रस्ता आहे.

आपटेनगर पाण्याच्या टाकीपासूनच रिंगरोडचा धोकादायक प्रवास सुरू होतो. या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने अवजड वाहने कोल्हापूर-राधानगरी रस्त्यावर येताना कसरत करावी लागते. या ठिकाणी केएमटी बसस्टॉप आणि रिक्षा थांबा आहे. आपटेनगर केएमटी बसस्टॉप ते भवानी सांस्कृतिक भवनपर्यंतचा रस्ता चांगला आहे. या सांस्कृतिक भवनासमोरील काही रस्ता दुभाजकांसाठी नियोजित आहे. मात्र सध्या दोन्ही रस्त्याच्या मध्येच हा रस्ता कच्चा ठेवला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील रिंग रोडवरील मगदूम किराणा दुकानापासून ते फुलेवाडी जकात नाक्यापर्यंतचा प्रवास मात्र धोक्याचा बनला आहे. या ठिकाणापासून रिंग रोडच्या एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला आहे. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी या ठिकाणी जाणवते. केएमटी, ट्रक आणि टॅक्टरची वाहतूक सुरू झाल्यास अन्य वाहनांना मोठी कसरत करावी लागते. पेट्रोल पंपासमोरच धोकादायक वळण आहे. या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत. आपटेनगर ते बोंद्रेनगर केएमटी बसस्टॉपपर्यंत ठिकठिकाणी खड्ड्यातून मार्ग काढावा लागतो.

रिंग रोडवरील खरी वाहतुकीची कसरत आणि अडथळ्याची शर्यत अयोध्या कॉलनी ते फुलेवाडी जकात नाक्यापर्यंत सुरू होते. सुमारे एक किलोमीटरचा कच्चा रस्ता, धुळीचा आणि खड्ड्यांचा आहे. चांगला रस्ता शोधण्याच्या प्रयत्नात अनेक वाहनधारकांना अपघात घडले आहेत. शाहू चौकातही अनेकदा अपघाताला निमंत्रण मिळते. शाहू चौकापासून ते कोल्हापूर-गगनबावडा रोडवर प्रवेश करेपर्यंतचा रस्ता कच्चा आहे. या परिसरातील रहिवाशीही रस्त्याचे काम होत नसल्याने वैतागले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील ज्येष्ठ नागरिक संघाने आणि परिसरातील रहिवाशांनी रस्त्यासाठी अनेकदा आंदोलने केली. त्यानंतर अयोध्या कॉलनीपर्यंतचा सुमारे पन्नास फूट रुंदीचा आणि दीड किलोमीटर लांबीचा रस्ता केला. मात्र अजूनही नियोजित शंभर फूटाचा रस्ता झालेला नाही.

शिंगणापूरची पाइपलाइन

वर्षभरापूर्वी शिंगणापूरला जोडणारी पाइलपलाइन खोदण्यात आली. काही ठिकाणी नवीन पाइप टाकण्यात आल्या. या कामामुळे वर्षभर जीवघेणा प्रवास करावा लागला. अजूनही या जुन्या पाइपलाइनच आहेत. त्याच्या देखभाल- दुरुस्तीचे कोणतेही नियोजन नाही. विशालनगर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीतही पुरेशा दाबाने पाणी येत नसल्याच्या तक्रारी येथील रहिवाशांत आहेत. अनेक ठिकाणी उखडलेला रस्ता आणि त्यावर उडणाऱ्या धुळीच्या लोटांमुळे नागरिकांचा त्रास कायम आहे.

या रस्त्याने प्रवास करताना घरात सुखरूप परत येईल की नाही, याची खात्री नाही. महापालिकेला परिसरातील रहिवाशांचे काहीच देणे घेणे नाही. अपघात झालाच तर दोनच दिवस रिंग रोडला शिस्त लावण्याचे काम केले जाते. मात्र त्यासाठी ठोस कार्यवाही केली जात नाही. -गजानन विभूते, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर

गेले दोन वर्षे अयोध्या कॉलनी ते फुलेवाडी रिंगरोडपर्यंत रस्ता नाही. घरात येताना धूळ, मणक्याचे आजार घेऊन यावे लागते. दुचाकी वाहनांना सर्वाधिक फटका बसू लागला आहे. रस्ता करण्याची राजकीय मानसिकता अजितबात दिसत नसल्याचे चित्र आहे. -अक्षय मोरे, अयोध्या कॉलनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मद्यतस्करीचा खुश्कीचा मार्ग

0
0

satish.ghatage @timesgroup.com

कोल्हापूर ः गोव्याहून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी खुश्कीचा मार्ग म्हणजे कोल्हापूर जिल्हा आहे. गगनबावडा, राधानगरीमार्गे गोव्याला हजारो पर्यटक जातात, पण याच मार्गावरून संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मद्य तस्करी केले जाते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून होणाऱ्या कारवाया या हिमनगाचे टोक असून लाखो लिटर मद्याची तस्करी कोल्हापूरमार्गेच होत राहते.

दरवर्षी ३१ डिसेंबरपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा, आंबोली, आजरा, तिलारी व कागल, निढोरी रस्त्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तपास नाके उभारले जातात. यावेळी प्रत्येक वाहन तपासले जाते. पण ३१ डिसेंबर किंवा निवडणूक आचारसंहिता वगळता वर्षभर तपास नाके नसल्याने चोरटी वाहतूक करणारी मंडळी वर्षभर मोकाटच असतात. मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर विभागाने ३८ लाख रूपये किमतीचे मद्य पकडले. ट्रकमध्ये टेलिफोन केबलच्या लाकडी स्टँडच्या आडोशाखाली मद्याचे बॉक्स लपवले होते. दोन आठवड्यांपूर्वी नागाळा पार्क येथील रचना अपार्टमेंटमधील फ्लॅटवर छापा टाकून चार ​लाख किमतीचे महागडे मद्य जप्त केले होते. फ्लॅटमालक प्रमोद महादेव देशपांडे व मंगेश पांडुरंग नाडकर्णी या सासरा व जावयाला अटक केली होती. काही महिन्यांपूर्वी कोरोची येथे बनावट मद्य तयार करण्याच्या कारखान्यावर कारवाई केली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाया फारच कमी असतात. रोज हजारो लिटर गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी होत असते.

गोव्यामध्ये दारू, बिअर व रमवर कर नसल्याने विदेशी मद्य स्वस्त आहे. गोव्यात व्हिस्कीची क्वॉटर ४० रूपयाला मिळते. तीच कॉटर कोल्हापूर जिल्ह्यात १०९ रूपयाला मिळते. गोव्यापेक्षा महाराष्ट्रात विदेशी मद्य १६० ते १७३ टक्के महाग मिळते. महाराष्ट्रात विदेशी मद्यावर मोठ्या प्रमाणावर उत्पादन शुल्क लावले जाते. विदेशी मद्य महाग असल्याने गोव्यातून महाराष्ट्रात त्याची चोरटी वाहतूक सुरू असते. गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबई असा चोरट्या दारूचा मार्ग आहे.

कारवाईवेळी मद्य तस्करी करणाऱ्या चालकाला अटक केली जाते, पण तस्करी कोणासाठी केली जाते, याचा शोध मात्र उत्पादन शुल्क विभाग घेत नाही. तस्करी करणारी मंडळी चोरीच्या वाहनांचा तस्करीसाठी वापर करतात. जप्त केलेली वाहने नेण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. मद्य तस्करीमधील लाखो रूपयांचा फायदा होत असल्याने तस्करी करणारी मंडळी मद्य वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पाणी सोडतात आणि पुन्हा नव्याने तस्करी सुरू राहते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांसाठी १३ रोजी स्वसंरक्षण कार्यशाळा

0
0

कोल्हापूर : मिसाइल ग्रुप आणि कुकी दो ज्युदो कराटे ऑर्गनायझेशन यांच्यावतीने महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. संकटकाळी किंवा असुरक्षित ठिकाणी प्रतिकार करण्याचा प्रसंग महिलांवर आला तर त्यांच्याजवळ असलेल्या वस्तूंचाच स्वसंरक्षणासाठी शस्त्र म्हणून कसा वापर करता येईल, याची प्रात्यक्षिकासह माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. १३ मार्च रोजी दुपारी तीन ते सहा यावेळेत दसरा चौक येथील नेहरू हायस्कूल येथे ही कार्यशाळा होणार आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लबअंतर्गत ही कार्यशाळा होत आहे.

सध्या कामाच्या निमित्ताने महिलांचे शहरात फिरण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा रात्री उशीरा महिलांना एकटीने प्रवास करावा लागतो. उपनगरात राहणाऱ्या महिला, युवती यांना दुपारी व रात्रीच्यावेळी घरी एकटीने जावे लागते. गेल्या काही दिवसांत एकट्या महिलांवर अत्याचार, बलात्काराचा प्रयत्न होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा परिस्थितीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही अनुचित प्रकार घडला तर प्रतिकार करण्यासाठी महिलांना तातडीने शस्त्र उपलब्ध होईलच असे नाही. त्यामुळे महिलांच्या वापरातील काही वस्तूंचाच वापर शिताफीने स्वसंरक्षणासाठी करता येऊ शकतो. यासंदर्भात या कार्यशाळेत माहिती व अशा नित्य वापरातील वस्तूंचा रक्षणासाठी वापर करण्याच्या टिप्स देण्यात येणार आहेत.

ज्युदो कराटेतील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सतीश वडणगेकर आणि अविनाश पाटील, मिसाइल ग्रुपचे संस्थापक सद्दाम मुजावर हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या महिला व युवतींनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी सतीश वडणगेकर (९८५००४५५३७) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टाउनशीपचा श्रीगणेशा करणारे हरिपूजापूरम्

0
0

Anuradha.kadam @timesgroup.com

गल्लीमध्ये एकमेकांना लागून असलेली बैठी घरं, पेठांमधील पारंपरिक वातावरण ही चौकट मोडत कोल्हापुरात पहिली टाउनशीप करण्याचा प्लॅन दहा वर्षापूर्वी करण्यात आला. फाटक ओलांडून आत आलं की सुटसुटीत रचना असलेल्या घरांसोबत, अंतर्गत रस्ते, चौक, क्लबहाउस, मंदिर, जीम अशा सुविधांनी परिपूर्ण असलेली टाउनशीप त्यापूर्वी मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये रूजली होती. कोल्हापूरसारख्या पारंपरिक चेहरा असलेल्या शहरात ही संकल्पना प्रत्यक्षात पहिल्यांदा आकाराला आली ती सोसायटी होती हरिपूजापूरम्. खऱ्या अर्थाने बदलू पाहत असलेल्या, राहणीमानाची कूस बदलणाऱ्या कोल्हापूरचे नवे रूप दाखवणारी ही सोसायटी घडीला दहा वर्षाची झाली. शहर स्तरावरील आदर्श सोसायटीचा पुरस्कारही या हरिपूजापूरम कॉलनीला मिळाला आहे.

दसरा चौक ओलांडून बावड्याच्या दिशेला नागाळा पार्क, ताराबाई पार्क यांच्या सीमारेषेवर डावीकडे पाहिलं की दहा वर्षापूर्वी दिसणाऱ्या शेतवडीची जागा आता हरिपूजापूरम आणि अनिता वंदन यासारख्या नियोजित सोसायटींनी घेतली आहे. दसरा चौकापर्यंतच काय ती गजबज, त्यानंतरचा हा पट्टा निर्जन. जैन बोर्डिंगच्या पुढच्या चौकात उजवीकडे वळल्यानंतर दिसणारी काही घरे सोडली तर महावीर कॉलेज परिसरात येईपर्यंत वसाहतच नव्हती. हे चित्र मागच्या बारा ते पंधरा वर्षातले. शिवाजी पेठेतील सरनाईक घराण्याच्या मालकीची शेती या परिसरात होती. सन २०००च्या सुमारास ही सगळी शेतवड बिगरशेतीची प्रक्रिया करून ​विकली. काही भागात अनितानंदन तर काही भागात पूजा बिल्डर्सतर्फे हरिपूजापूरम या सोसायटीचा पाया रचला गेला. चार ते पाच वर्षात साधारणपणे चार एकर जागेत हरिपूजापूरम नगर वसले.

मुख्य रस्त्यालगत डावीकडे या नियोजित कॉलनीचा रस्ता सुरू होतो. 'अनितानंदन' असे लिहलेली कमान ओलांडून पन्नासेक पावले आत आल्यानंतर हरिपूजापूरमचे फाटक लागते. चकचकीत रस्ते, एका रांगेत उभे असलेले टुमदार बंगले, रो बंगल्यांची आटोपशीर तरीही आखीवरेखीव अशी रचना, सभोवती उभ्या असलेल्या पाचमजली चार अपार्टमेंट, या सगळ्या आवाराच्या मध्यभागी प्रसन्न असे तिरूपती बालाजीचे मंदिर, क्लब हाऊस, जिम या टाउनशीपमध्ये आवश्यक असलेल्या सुविधा, पार्किंगची नियोजनबद्ध जागा, प्रत्येक बंगल्यासमोरील रिकाम्या जागेत झाडे, सोसायटीतील गार्डनमध्ये लॉन ही या परिसराची वैशिष्ट्ये.

दहा वर्षापूर्वी, जेव्हा नुकतेच कोल्हापुरात अपार्टमेंट कल्चर रूजत होते, तेव्हा चार एकर परिसरात उभी राहिलेली ही पहिली टाउनशीप. बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल यांनी अत्यंत नियोजनबद्ध ही टाउनशीप वसवली. मुळात कोल्हापुरातील पेठेत राहणाऱ्या कुटुंबीयांना राहणीमानात थोडा बदल व्हावा असे वाटत असतानाच शहराच्या पश्चिमेला ​एक नियोजित शहरच उभं राहिलं. टाउनशीपच्या संकल्पनेला सामोरे जाताना आजही या सोसायटीमध्ये नव्या-जुन्या संस्कृतीचा चांगला मेळ जपला जात आहे.

हरिपूजापूरम नावाचे एक छोटेसे गावच सोसायटीमध्ये वसलेले दिसते. १६० कुटुंब या सोसायटीमध्ये राहतात. यात ३६ रोबंगले तर १२० फ्लॅटस आहेत. एक हजार रहिवाशांच्या आसपास असलेल्या या टाउनशीपमधील सोसायटीच्या सदस्यांनी अतिशय चांगली शिस्तही लावली आहे. आठ वर्षांपूर्वीच प्रत्येक घरातून एकदाच मेंटेनन्सची रक्कम जमा केली. ती साधारणतः एक कोटी रुपये जमली. हे पैसे बँकेत मुदतठेव म्हणून ठेवण्यात आले. त्यातून येणाऱ्या व्याजाच्या रकमेतून सोसायटीमधील सामूहिक खर्च केला जातो. यामध्ये सुरक्षा रक्षकाचा पगार, सोसायटीतील कचरा व्यवस्थापन व स्वच्छता, मंदिराची देखभाल, अंतर्गत झाडांची, लॉनची देखभाल हा खर्च केला जातो. शिवाय सण, उत्सव, विविध स्पर्धा, कार्यक्रम या माध्यमातून सोसायटीमध्ये सतत उपक्रमांचे आयोजनही केले जाते. सोसायटीच्या आवाराचा तरूण मुलांकडून 'कट्टा' होणार नाही याकडेही लक्ष दिले जाते. तसेच सीसीटिव्ही कॅमेरे लावून हा परिसर येथील रहिवाशांनीच सुरक्षित बनवला आहे.

हरिपूजापूरममध्ये राहणाऱ्या दीडशेहून अधिक कुटुंबाचे वैशिष्ट म्हणजे सर्व धर्माचे, पंथाचे रहिवासी येथे आहेत. उपक्रमांच्या निमित्ताने एकजूट राहते. कोल्हापूरचा बदलता चेहरा अशी ओळख जपत असताना संस्कृती, परंपरा यांची नाळ तुटणार नाही याची काळजी याठिकाणी घेतली जाते. सोसायटीतील लहान मुले, तरुण, महिला यांच्यासाठी सतत उपयुक्त कार्यक्रम घेण्यासाठी सोसायटीचे सदस्य पुढाकार घेतात. नोकरदार, अधिकारी यांच्यासह व्यावसायिक अधिक असल्यामुळे सोसायटीतील एकमेकांना काही मदत लागल्यास, सेवा हवी असल्यास संपर्क यंत्रणेतून सहकार्य करणे हा या कॉलनीतील नियमच आहे.

घरफाळ्यातून दिले पाच लाख रुपये

एकीकडे महापालिका शहरात घरफाळा वसुली मोहिम राबवत असताना, हरिपूजापूरम सोसायटीतील रहिवाशांनी महापालिकेच्या वसुली अधिकाऱ्यांना सोसायटीमध्ये बोलवून कॅम्प राबवला. त्यातून एकरकमी घरफाळ्याचे पाच लाख २३ हजार रुपये महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. नव्याने सोसायटी वसलेली असल्यामुळे येथील नागरिकांची मतदारसंघात नोंदणी झाली नव्हती. त्यासाठीही सोसायटीतील सदस्यांनी पुढाकार घेत मतदार नोंदणी शिबिर राबवले. आधार कार्ड कॅम्प, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर अशा समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून कार्यक्रम सुरू असतात.

महापालिकेकडून हव्यात सुविधा

सोसायटीतील रहिवाशांकडून जमा होणाऱ्या देखभाल वर्गणीतून परिसरातील कचरा व्यवस्थापन केले जाते. टाउनशीपच्या अखत्यारित सोसायटीची स्वत:ची स्ट्रीट लाइट आहे. बोअर असल्यामुळे महापालिकेचे पाणी वापरले जात नाही. मात्र तरीही सोसायटीतील रहिवासी महापालिकेला कर देतात. परंतु पावसाच्या पाण्याची निर्गत होण्यासाठी कॉलनीपासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याला गटर्स नसल्यामुळे पाणी साचण्याची समस्या आहे. त्यासाठी गटर्स केले पाहिजेत अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images