Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग दाखल करणार - पृथ्वीराज चव्हाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सलग आठ वर्षे तूर डाळीचे साठे करण्यावर निर्बंध घालायला आम्ही काय खुळे होतो काय? असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डाळींबाबत सभागृहाला चुकीची माहिती दिली असल्याने येत्या अधिवेशनात त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करणार असल्याचा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिला.
काँग्रेसच्या मेळाव्यासाठी सांगलीत आलेले माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, 'आघाडी सरकारच्या काळातील राज्यावरच्या कर्जाचा बाऊ करणाऱ्या यूती सरकारने त्या कर्जातला एक रुपया जरी फेडला तर आपण राजकारण सोडून देऊ. तूर डाळीच्या साठेबंदीवरील निर्बंध उठविण्याचे नेमके कारण सरकारने दिलेले नाही. अत्यंत चुकीची माहिती सभागृहाला दिली आहे. बंदी उठविल्याच्या कालावधित ग्राहकाला ४२०० कोटी रुपयांचा फटका ग्राहकांना बसला आहे. ग्राहकांना फटका बसलेल्या संपूर्ण रक्कमेचा थेट फायदा व्यापाऱ्यांना झाला आहे. हा सरकारचा एक घोटाळाच आहे. केवळ व्यापाऱ्यांचा फायदा करण्यासाठीच सरकारने तो निर्णय घेतला होता. निर्णय घेताना मंत्रिमंडळात चर्चा नाही. कक्ष अधिकारी, अन्नपुरवठ्याचे सचिव या दोघांनीही डाळ साठ्यांवरची बंदी उठविण्यास नकार दिल्यानंतर दोन महिन्यांत सेवानिवृत्त होणारे पणन सचिवांची नोट घेऊन मुख्यमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्र्यांनी परस्परच साठ्यांवरचे निर्बंध उठविले.' लोकप्रियतेसाठी घेतलेले निर्णय सरकारच्या अंगलटी आले आहेत. एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेऊन सहा हजार कोटी रुपयांच्या कर बुडवून स्मार्टसिटी योजनेतून शंभर कोटी रुपयांची भिकेची वाट पाहण्याची वेळ आणली आहे, असा आरोपीही चव्हाण यांनी केला.

'दुष्काळाबाबत सरकार अ‌संवेदनशील'
कुपवाड : दुष्काळाची तीव्रता वाढत असताना त्यावर उपाययोजना करण्याऐवजी सरकार अधिकच असंवेदनशील होऊ लागले आहे. आम्ही दुष्काळाचे राजकारण करू इच्छित नाही. परंतु, या वर्षांत तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मेक इन इंडियाचा कार्यक्रम करण्यासाठी सरकारकडे यंत्रणा आहे, पण केंद्रांकडून दुष्काळग्रस्तांसाठी आलेले चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची मानसिकता दिसत नाही, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केला. चव्हाण म्हणाले, 'कर्जमाफीबाबत टाळाटाळ केली जाते. चारा छावणी बंदचा निर्णय आमच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर मागे घेतला. अशा प्रकारचे निर्णय घेतले जात असतील जनतेने काय करायचे? हा सवाल काँग्रेसचाच नाहीतर हायकोर्टानेही सरकारला विचारला आहे. कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतरही सरकार गप्प आहे.

'राष्ट्रवादीने सरकार पाडले'
खंजीर हा शब्द आपण वापरत नाही, पण दहा दिवसांकरीता का असेना पण राष्ट्रवादीने आपले सरकार पाडले. राज्यपालांनी पत्र देवून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याचे आदेश दिले होते. तरीही राष्ट्रपती राजवटच लागू करावी, असा प्रयत्न राष्ट्रवादीने केला. या अगोदर एकदा वसंतदादा पाटील यांचे आणि अलिकडे आपले अशी दोन सरकारे मित्रांनीच पाडली. गेल्या निवडणुकीत आगोदरच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने संभ्रमावस्था निर्माण केली होती. राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्याची संधी आपण काहीवेळा गमावली असल्याचेही चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयंतीच्या कार्यक्रमाकडे इस्लामपूरच्या नगरसेवकांची पाठ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
इस्लामपूर परिसर आणि वाळवा तालुक्यात उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. इस्लामपूर नगरपालिकेने उभा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला सकाळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते आणि दोन माजी नगराध्यक्षांनी अभिवादन केले. विविध संस्था आणि संघटनांनी पुतळयाचे विधिवत पूजन करून जयंती साजरी केली. रात्री काही मंडळांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूकही शहरातील प्रमुख मार्गावरुन काढली.
इस्लामपूर नगरपालिकेच्या वतीने इस्लामपूर शहरात अत्यंत भव्य आणि देखणा, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. मात्र, शुक्रवारी जयंतीच्या कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, विरोधी पक्षनेते विजय कुंभार, माजी नगराध्यक्ष विजय पाटील व अरुणादेवी पाटील यांच्या शिवाय एकही नगरसेवक फिरकला नाही. नगरपालिकेचे कर्मचारी आणि मोजके पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या पुतळयाचे पूजन करून अभिवादन केले. नगरसेवकांना मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा विसरच पडला. इस्लामपूर नगरपालिकेचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा आहे. तरीही नगरसेवक गैरहजर राहिल्याने शहरात चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा इन्फंट्री’त जयंती साजरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे स्फूर्तीस्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवतीर्थ येथे शानदार कार्यक्रम आयोजित करून शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवतीर्थावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उपस्थित जवान आणि अधिकारी यांनी शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
दर वर्षी मराठा लाइट इन्फंट्रीचे कमांडट यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले जाते पण यंदा ब्रिगेडियर प्रवीण शिंदे यांनी पूजेचा आणि पुष्पहार अर्पण करायचा मान एका जवानाला दिला. जवानाच्या हस्ते पुष्पहार घालून पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी जवानांनी पोवाडे सादर केले. कर्नाटक सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून शिवजयंती सरकारी पातळीवर साजरी करण्यात येते. यंदाही जिल्हा प्रशासनातर्फे शिवजयंती छत्रपती शिवाजी उद्यान येथे साजरी करण्यात आली. मिरवणुकीत खासदार सुरेश अंगडी, महापौर किरण सायनाक, जिल्हाधिकारी एन. जयराम आदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून पुष्पहार अर्पण केला.

मुस्लिम बांधवांमध्ये उत्साह
खानापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमात मुस्लिम बांधवांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजाला दिला. दर वर्षी आंबेडकर ब्रिगेडतर्फे शिवजयंती साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला इम्तियाझ काझी आणि लक्ष्मण मादार यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले. शिवजयंती निमित्त सरकारी हॉस्पिटलमध्ये फळे वाटप करण्यात आले. डोंबारी वस्तीतील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेणचे वितरण देखील करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हल्लेखोरांकडून दोन दिवस रेकी

$
0
0

तीश घाटगे, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांनी हल्ल्याआधी दोन दिवस म्हणजे १४ फेब्रुवारीपासून पाळत ठेवली होती. प्रतिभानगर परिसरात हल्लेखोरांनी रेकी केली होती. प्रतिभानगर येथील आजरा बँक शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन्ही हल्लेखोरांचे चित्रण पोलिसांना मिळाले आहे. पोलिसांनी ते पुराव्यादाखल कोर्टात सादर केले आहे.

पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे यागंभीर जखमी झाल्या. उपचार सुरू असताना २० फेब्रुवारीला पानसरे यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी २५ पथके तयार केली होती. तसेच हल्ल्याच्यावेळी उपस्थित लोकांकडून माहितीही घेण्यात आली. परिसरातील सीसीटीव्ही तपासले होते. शहरातील अनेक ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले होते.

हल्ला झाला त्या ठिकाणच्या सरस्वतीबाई चुनेकर विद्यालयातील तीन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हल्लेखोरांचे चित्रण मिळाले. तसेच धीरज कन्स्ट्रक्शनमधील सीसीटीव्हीचे फुटेजही मिळाले होते. या फुटेजमध्ये दोन हल्लेखोर मोटारसायकलवर चालवत असल्याचे दिसून आले. त्यांनी पानसरे यांना पत्ताही विचारल्याचे शूटिंग मिळाले होते. चारही ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज १६ फेब्रुवारीच्या सकाळी ७.५७ वा. ते ९.४४ दरम्यानचे आहे.

प्रतिभानगर हुतात्मा स्मारक ते राजारामपुरी शाहू चौक मार्गावर आजरा बँकेचे कार्यालय आहे. या बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्येही दोन्ही हल्लेखोरांचे चित्रणही मिळाले आहे. १४ फेब्रुवारीला सायंकाळी ६. २७ वाजताचे हे चित्रण असून दोघेही हल्लेखोर मोटारसायकलवर होते. त्यामुळे हल्ला होण्यापूर्वी दोन दिवस आधी ते परिसराची रेकी करत होते अथवा पानसरेंवर हल्ला करण्यासाठी संधी शोधत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पानसरे यांचे हल्लेखोर दोन दिवस परिसरात फिरत असल्याचा पुरावा मिळाला असला तरी दोन दिवस त्यांनी कोल्हापुरात कुठे भेटी दिल्या. ते कुठे रहात होते. त्यांना आणखी कुणी मदत करत होते का याचा तपास करण्यात मात्र पोलिस अपयशी ठरले आहेत. हल्लेखोरांनी या परिसरातून मास्टर माइंड व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांशी मोबाइल व फोनवरून संपर्क साधल्याची शक्यता आहे. पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी, सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याच्याकडे मोबाइल व सीमकार्ड सापडले आहेत. हल्लेखोरांना मदत करणाऱ्यांना पोलिसांनी शोधून काढल्यास या गुन्ह्यात आणखी पुरावा मिळू शकतो.

मिळालेल्या फुटेजची माहिती अशी

कॅमेरा लोकेशन फुटेज तारीख व वेळ

सरस्वती चुनेकर विद्यालय कॅमेरा १ १६ फेब्रुवारी ०९.२५.०३ डबलसीट मोटारसायकलस्वार

सरस्वती चुनेकर विद्यालय कॅमेरा ६ १६ फेब्रुवारी ०७.५७.३० डबलसीट मोटारसायकलस्वार

सरस्वती चुनेकर विद्यालय कॅमेरा ६ १६ फेब्रुवारी ०८.०२.३४ डबलसीट मोटारसायकलस्वार

धीरज कन्स्ट्रक्शन १६ फेब्रुवारी ०९.४४.११ डबलसीट मोटारसायकलस्वार

आजरा बँक कॅमेरा ५ १४ फेब्रुवारी १८.२७.४४ डबलसीट मोटारसायकलस्वार

(या सर्व ठिकाणी डबलसीट मोटारसायकलस्वार दिसतात.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॉरेन्सिक लॅबलाही मिळेना जागा

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

गुन्ह्याचा तपासात महत्त्वाची भूमिका असलेल्या फॉरेन्सिक लॅबची उभारणी जागेअभावी रखडली आहे. पर्यायी जागेत फॉरेन्सिक लॅब उभारणीसाठी पुणे फॉरेन्सिक लॅबकडून चालढकल होत असल्याने कोल्हापुरातील गुन्ह्याच्या तपासाचा वेग मंदावरणार आहे. त्यामुळे यापुढेही महत्त्चाच्या गुन्ह्याच्या तपासातील चाचण्यांसाठी मुंबई किंवा पुण्याच्या लॅबवर अवलंबून राहावे लागणार आहे. पर्यायाने गुन्ह्यांचा तपास रखडतच जाणार आहे. नऊ कोटींचा निधी मंजूर होऊनही लॅबसाठी पाहिजे तशी उपलब्ध होईनाशी झाली आहे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात फॉरेन्सिक लॅब सुरू करण्याचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीने घेतला होता. कोल्हापूर व नांदेड येथे फॉरेन्सिक लॅब सुरू करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली होती. सत्ताबदल होऊन भाजप महायुतीचे सरकार सत्तेवर आले. फॉरेन्सिक लॅबचे महत्व लक्षात व गुन्हे तपासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी फॉरेन्सिक लॅब कोल्हापुरात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारने मे २०१५ मध्ये राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

फॉरेन्सिक लॅबसाठी पोलिस प्रशासनाने जागेचा शोध घेतला, पण जागा मिळाली नाही. त्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी जिल्हाधिकारी अमित सै​नी यांच्याकडे जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत झाल्यावर जुना राजवाडा परिसरातील करवीर प्रातांधिकारी कार्यालय नवीन इमारतीत आले. त्यामुळे तेथील खोल्या रिकाम्या झाल्या. तीन खोल्या फॉरेन्सिक लॅबसाठी उपलब्ध करून दिल्या पण पुणे फॉरेन्सिक लॅबने या जागेला नकार दिला. त्यानंतर जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील दोन खोल्या फॉरेन्सिक लॅबसाठी उपलब्ध करून दिल्या पण त्यालाही पुणे फॉरेन्सिक लॅबने नकार दिला.

राज्यातील क्राइम रेट कमी होण्यासाठी महायुती सरकारने फॉरेन्सिक लॅब तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. नवीन फॉरेन्सिक लॅब व त्यांच्या अत्याधुनिकरणासाठी नऊ कोटींचा निधीही मंजूर केला आहे. नव्याने होणाऱ्या फॉरेन्सिक लॅबमध्ये विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. पण कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब सुरू व्हावी यासाठी प्रशासकीय व राजकीय पातळीवरही प्रयत्न होण्याची गरज आहे.

फॉरेन्सिक लॅबचे फायदे

खुनाच्या गुन्ह्यात मृताचे रक्त, हत्यार आणि कपड्यावरील रक्ताचे डाग, घटनास्थळावरील मातीत मिसळलेले रक्त तपासासाठी पाठवले जातात. बलात्काराच्या गुन्ह्यात फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टवरच अवलंबून रहावे लागते. रक्त व अन्य घटकाच्या तपासणीनंतर डीएनएवरून गुन्ह्याचा तपास केला जातो. अनोळखी व बेवारस व्यक्तीच्या मृत्यूचा शोधही डीएनवरूनच घेतला जातो. एखाद्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली असेल तर बॅलेस्टिक रिपोर्ट फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जातो. हाताचे ठसे, हस्ताक्षराचे नमुनेही पाठवले जातात. कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब झाल्यास गुन्ह्यांचा तपास वेगाने होऊ शकतो.

सध्या पुण्याचीच फेरी

सध्या कोल्हापूर पोलिसांना पुण्यातील फॉरेन्सिक लॅबकडे नमुने पाठवावे लागतात. त्यासाठी पोलिस ठाण्याचा कर्मचारी नमुने स्वतः घेऊन जातो. कोल्हापुरात सर्वांत जास्त नमुने रक्ताचे असतात. पुण्यातील लॅबमध्ये अनेक जिल्ह्यांतून नमुने येत असल्याने गंभीर गुन्ह्यांतील नमुन्यांचा अहवाल मिळवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना स्वतः संपर्क साधावा लागतो. तो अहवाल मिळाल्यानंतरच तपासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळते. तसेच हा अहवाल न्यायालयात सर्वांत सबळ पुरावा म्हणून ग्राह्य मानला जातो.


कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब उभारणीची घोषणा झाली आहे. त्यासाठी काही पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. तातडीने फॉरेन्सिक लॅब उभारणीसाठी पाठपुरावा केला जाईल.

प्रदीप देशपांडे, पोलिस अधीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा गर्भलिंगनिदान रोखण्याचे ‘नेटवर्क’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

समाजात जनजागृती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गर्भलिंगनिदान करणाऱ्या सेंटर्सवर छापे, कारवाई, कोर्ट मॅटर असे प्रकार करुनही मुलींचा जन्मदर वाढवण्याच्यादृष्टीने फार फरक पडलेला नाही. पोर्टेबल मशिनसारखी यंत्रणा बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्यांच्या हातात असल्याने सेंटर्सवरील तंत्रज्ञान, कारवाई कुचकामी ठरत आहे. त्यामुळे बेकायदेशीर गर्भलिंगनिदान करणाऱ्यांवर वॉच ठेवण्याबरोबरच त्यांची माहिती यंत्रणांपर्यंत पोहचवणारे नेटवर्क करण्यावर प्रशासन भर देत आहे. गर्भवतींकरिता काम करणाऱ्या 'आशा' वर्कर्स व पोलिस पाटील या दोन घटकांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे.

'आशा' वर्कर्सना गावातील गर्भवतींची माहिती असते. त्यांच्यापर्यंत काही बेकायदेशीर सोनोग्राफी करणाऱ्यांची माहिती आली तर त्यांच्या माहितीच्या आधारे कारवाई करणे सोपे होईल. इतर ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर प्रकार या घटकांच्या माध्यमातून मिळेल, अशी अपेक्षा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एस. साठे यांनी व्यक्त केली.

नोंदणीकृत सोनोग्रोफी केंद्रावर लक्ष आहेच. पण पोर्टेबल मशिनच्या माध्यमातून गर्भलिंगनिदान होत असल्याचे प्रकार ज्या ठिकाणी होतात त्याची माहिती वेळेवर मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आशा वर्कर्सचा उपयोग करुन घेणे, त्या परिसरातील घडामोडींवर लक्ष असलेल्या पोलिस पाटील यांचीही फार महत्त्वाची मदत मिळणार आहे. त्यांच्यामार्फतच गावागावांत नेटवर्क उभे करण्याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांनी सतर्क राहून माहिती दिली तर अशा बेकायदेशीर यंत्रणेला चाप बसवणे सोपे जाणार आहे.

डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजापूरजवळ अपघातात आयकर निरीक्षक पत्नीसह ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूरजवळील वाटूळ गावाजवळ टेंपोच्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. राकेशकुमार मीना (वय २९, सध्या रा. शाहूपुरी, मूळ गाव बुंदी, राजस्थान) व त्यांची पत्नी आशा (वय २७) अशी त्यांची नावे आहेत. राकेशकुमार हे कोल्हापुरातील आयकर कार्यालयात निरीक्षक पदावर काम करत होते.

मीना दाम्पत्य शनिवारी सायंकाळी दुचाकीवरून सहाच्या सुमारास गोव्याकडे निघाले होते. त्यावेळी वाटूळ गावाजवळ समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली. त्यात राकेशकुमार जागीच ठार झाले. त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. त्यांना राजापूर येथील हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरीला हलवण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात आणीबाणीपेक्षा भयंकर स्थिती

$
0
0

म. टा.प प्रतिनिधी, कोल्हापूर
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे आज देशात कुणी काय बोलावे, काय खावे आणि काय लिहावे? याबाबतचे निर्बंध आणले जात आहेत. ‌शिक्षणव्यवस्थेवरील वर्चस्वासाठी जेएनयू प्रकरणाचा कट रचला जात आहे. या परिस्थितीमुळे देशात आणीबाणीपेक्षाही भयंकर स्थिती निर्माण झाली आहे,' असा आरोप मार्क्सवादी पक्षाचे सरचिटणीस, खासदार ‌सीताराम येच्युरी यांनी शनिवारी केला.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या स्मृतिजागर कार्यक्रमात ते बोलत होते. दसरा चौकात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

विदेशी आर्थिक नीतीने देशाला साम्राज्यवादाचा धोका निर्माण झाल्याचे मत व्यक्त करून येच्युरी म्हणाले, 'भाजप सरकार आरएसएसचा अजेंडा राबवत आहे. महत्त्वाच्या पदांवर आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे धर्मांधता, विदेशी आर्थिक नीती आणि राज्यघटनेवर हल्ला करीत नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचे काम सुरू आहे. विदेशी कंपन्यांना सवलती देऊन देशात नवा आर्थिक साम्राज्यवाद आणला जात आहे. राज्यघटनेचा अर्थ बदलून हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी भाजप सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.'

दिल्लीतील 'जेएनयू'मधील वादावर बोलताना येच्युरी यांनी केंद्र सरकारचा महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांवर वर्चस्व मिळवण्यासाठी सुरू असलेला हा कट असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'देशभरातील अशा शैक्षणिक संस्थांवर वर्चस्व मिळाले की र इतिहास बदलून धार्मिक शिक्षणाचे धडे अभ्यासासाठी लावण्याचा हेतू साध्य करता येतो. त्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे.'

जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांनी देशाच्या विरोधात घोषणाबाजी केली नसल्याचे स्पष्ट करून येच्युरी म्हणाले, 'साम्राज्यवाद, संघवाद आणि धर्मांधतेविरोधात ही घोषणाबाजी होती. मात्र संसद अधिवेशनापूर्वी देशातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच जेएनयू प्रकरणाचा नियोजनबद्ध कट रचला आहे.'

देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर खासदारांच्या बैठका घेण्याची औपचारिकता पार पाडली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलतात एक आणि करतात दुसरेच. मोदी यांनी घोषणापाठोपाठ घोषणाच केल्या प्रत्यक्ष कृत्य शून्य आहे, असा आरोप त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरफाळावाढ फेटाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका प्रशासनाने सुचवलेली भांडवली मूल्यावर आधारित घरफाळावाढ सर्वसाधारण सभेत फेटाळण्यात आली. सभागृहात शनिवारी या प्रश्नावर सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी, विरोधी भाजप-ताराराणी व शिवसेना सदस्यांची एकी दिसून आली. सर्वपक्षीय सदस्यांनी घरफाळा विभागाच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढत प्रशासनावर टीकेची झोड उठवली. अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या.

सभेच्या कार्यपत्रिकेवर तीस विषय होते. घरफाळावाढीचा विषय दहाव्या क्रमांकावर असतानाही सदस्यांच्या मागणीवरून या प्रश्नांवर सुरुवातीलाच चर्चा झाली. काँग्रेसचे भूपाल शेटे यांनी शहरातील मिळकतीचा लेखाजोखा सादर करत अधिकारी आणि कर्मचारी सुपारी घेऊन घरफाळा बसवत नाहीत. घरफाळा विभागाला घुशी लागल्या आहेत. औषध घालून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, अशी मागणी करत आयुक्त करवाढीचे हस्तक आहेत, असा आरोप केला.

पाच वर्षांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने भांडवली मूल्यावर आधारित घरफाळावाढीला मंजुरी दिली होती, असा आरोप विरोधी पक्षनेते संभाजी जाधव यांनी केला. महेश सावंत यांनी शहरात रेडिरेकनर वेगवेगळा असल्याने घरफाळावाढ अन्यायकारक पद्धतीने होत असल्याने नागरिकांत असंतोष आहे, याकडे लक्ष वेधले तर विलास वास्कर यांनी दौलतनगरातील सहाशे मिळकतधारक घरफाळा लावून घेण्यासाठी तयार असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.

पाच वर्षांपूर्वी सरकारी योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळतो असे सांगून भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा प्रणाली लावून फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी प्रशासनावर केला. पण झालेली चूक लक्षात घेऊन पुढील पाच वर्षे घरफाळा वाढ होऊ देणार नाही, असे निक्षून सांगितले. सूरमंजिरी लाटकर यांनी ड वर्ग महापालिकेमुळे शहरातील मिळकतदारांवर घरफाळावाढीने बोजा पडत असल्याने हद्दवाढीची गरज व्यक्त केली. घरफाळा चुकवणारे व दरवर्षी वाढीव बांधकाम करणाऱ्यांवर कर लावून उत्पन्न वाढवावे, अशी सूचना केली.

राष्ट्रवादीचे प्रा. जयंत पाटील यांनीही प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. सभागृह सर्वोच्च असल्याने घरफाळावाढ रद्दचा प्रस्ताव सभागृहाने नामंजूर केल्यानंतर प्रशासनाने सरकारचे मत मागवता कामा नये. नगरोत्थान योजनेसाठी अनुदान हवे असेल तर भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा प्रस्ताव मंजूर करून पाच वर्षांपूर्वी प्रशासनाने फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला. वर्षातून दोनवेळा घरफाळा बिले द्यायची असताना गेल्या वीस वर्षांत कधीही दोन वेळा घरफाळा बिले मिळत नाहीत. तरीही घरफाळा विभागाकडून अन्यायी दंडाची वसुली केली जाते. महापालिकेत अधिकाऱ्यांची संख्या वाढली असतानाही कार्पोरेट ऑफिसमध्ये बसून घरफाळा कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

चर्चेत स्थायी सभापती मुरलीधर जाधव, सत्यजित कदम, निलोफर आजरेकर, रूपाराणी निकम, सुरेखा शहा, पूजा नाईकनवरे,नियाज खान, विजय सूर्यवंशी, अशोक जाधव, अर्जुन माने, तौफिक मुल्लानी, राजाराम गायकवाड, दिलीप पोवार, वहिदा सौदागर, प्रविण केसरकर, सुनील पाटील, विजय खाडे यांनी भाग घेतला. आयुक्त पी. शिवशंकर मुंबईला बैठकीला गेले असल्याने अनुपस्थित होते.

शिवसैनिकांनी भिरकावली पत्रके

घरफाळा वाढ रद्द करावी या मागणीसाठी शिवसैनिकांनी प्रेक्षक गॅलरीतून पत्रके भिरकावली. महासभा असल्याने शिवसेनेने महापालिकेवर मोर्चा काढला होता. मोर्चात सहभागी झालेले शिवसेनेचे नगरसेवक राहुल चव्हाण, प्रतिज्ञा निल्ले, अभिजित चव्हाण व नियाज खान यांनी घरफाळावाढीच्या विरोधात घोषणा देत सभागृहात प्रवेश केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवालाप्रश्नी व्यापारी-नागरिक आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फेरीवाला झोनच्या अंमलबजावणी सुरू होण्याआधीच संघर्ष सुरू झाला आहे. व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी दारात फेरीवाले नकोत, अशी भूमिका घेतल्याने नवी समस्या निर्माण झाली आहे. वायल्डर ममोरियल चर्चसमोर फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाला विरोध करत स्थानिकांनी रास्ता रोको करून आयुक्तांच्या बंगल्यावर मोर्चा नेला. महाद्वार रोडवरही पट्टे मारण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना व्यापाऱ्यांनी हुसकावून लावले. महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोडवर पुनर्वसन नको अशी भूमिका येथील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. फेरीवाला झोननुसार रविवारी शहरात ठिकठिकाणी फेरीवाल्यांना जागा निश्चिती करताना वाद झाले. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर महापालिका अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक होत आहे.

राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी शहरातील ७४ ठिकाणे फेरीवाला क्षेत्र म्हणून तर ५२ ठिकाणे ना फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. आयुक्त पी. शिवशंकर व शहर फेरीवाला समिती यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत यावर तोडगा निघून सोमवारपासून फेरीवाला झोनची अंमलबजावणी करण्याचे ठरले.त्यानुसार महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाने शहरातील 'फेरीवाला क्षेत्र'वर फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी रविवारी पट्टे मारण्यास सुरूवात केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईचे २६ प्रवासी बचावले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देवदर्शनासाठी मुंबईहून कोल्हापूरला प्रवासी घेऊन आलेल्या आरामबसला पन्हाळ्याजवळील बांबरवाडीजवळ झालेल्या अपघातात २६ प्रवासी जखमी झाले. यातील एका प्र‍वाशाला गंभीर दुखापत झाली आहे. सर्व प्र‍वासी मुंबईतील भांडुप, विरार, घाटकोपर आणि डोंबिवली परिसरातील आहेत. जखमींवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मुंबईतील हे सर्वजण शनिवारी (ता.२०) जोतिबा आणि अंबाबाईच्या दर्शनासाठी रात्री उशिरा (एमएच ०४ एफके ४६४९) या खासगी आरामबसमधून ठाण्यातून निघाले होते. रात्रभर प्र‍वास करून सकाळी जोतिबा डोंगरावर पोहोचल्यानंतर दर्शन घेऊन ते पन्हाळगडावर गेले. तेथून कोल्हापूरकडे येताना बांबरवाडीजवळील वळणावर चालकाशेजारी बसलेल्या प्रवाशाचा हात स्टेअरिंगमध्ये अडकला. त्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस रस्त्यावरून वीस फूट खाली घसरली आणि एका झाडाला धडकून उलटली. या अपघातात ४ ते १२ वयोगटातील ५ मुलांसह १० महिला आणि ११ पुरुष जखमी झाले आहेत. बांबरवाडीतील काही स्थानिक नागरिकांसह अन्य प्रवाशांनी जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी वेदा सचिन जड्यार (वय ४) या मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. बसचालक रोशन प्रभाकर परब यांनी सीपीआर पोलिस चौकीत घटनेची नोंद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला कैदी वळणार प्रसादाचे लाडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, येरवडा

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात भाविकांना देण्यात येणारा प्रसादाचा लाडू बनवण्याचे काम तेथील कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडे देण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या विचाराधीन आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि समितीचे अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी याबाबत कारागृह अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.

'कळंबा कारागृहात पन्नास महिला कैदी आहेत. शिक्षेच्या काळात त्यांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी डॉ. सैनी यांनी पुढाकार घेतला आहे. महालक्ष्मी मंदिराला रोज तीन हजारांवर लाडू लागतात. सणांच्या दिवशी आणि नवरात्रात ही संख्या दहा हजारांवर जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणवर लाडू बनविण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणावर गरज असल्याने कारागृहातील महिलांना हे काम देण्याचा प्रस्ताव आहे. तो मंजूर झाल्यास महिलांना कायमस्वरूपी रोजगार आणि शासननियमाप्रमाणे मानधन मिळेल,' अशी माहिती कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक शरद शेळके यांनी दिली.

कळंबा कारागृहात १६०० सोळाशे कैदी आहेत. त्यात ५० महिला आहेत. कारागृहातून सुटका झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारीकडे न वळता स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने जीवन जगावे, या उद्देशाने शिक्षेच्या काळात कैद्यांना कारागृह प्रशासनाकडून विविध रोजगारांचे प्रशिक्षण दिले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळच्या संचालकांना हुडहुडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जाट आंदोलनाचा फटका अनेक प्रवाशांना बसला. त्यात गोकुळच्या संचालकांचाही समावेश आहे. थंडीचा कडाका आणि त्यातच प्रचंड वाहतूक कोंडी अशा प्रतिकूल परिस्थितीत संचालकांना चोवीस तास माहामार्गावरच घालवावे लागले. हरियाणा येथे इंडियन डेअरी असोसिसिएशनच्या (आयडीए) चर्चासत्रासाठी संचालक गेले होते. याच परिस्थितीत संचालकांना चोवीस तास घालवावे लागले. त्यानंतर ते रविवारी दिल्लीत पोहोचले आणि रात्री विमानाने पुण्यात दाखल झाले.

सर्व संचालक करनाल (हरियाणा) येथे आयडीएच्या चर्चासत्रासाठी गेले होते. त्यात चेअरमन विश्वास पाटील यांच्यासह संचालक अरुण नरके, रवींद्र आपटे, पी. डी. धुंदरे, बाळासो खाडे, रामराजे कुपेकर, अनुराधा पाटील, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, संजय दिंडे, सुरेखा शेगुणशी यांचा समावेश होता. चर्चासत्रानंतर घाणेकर वगळता इतर सर्वजण परतीच्या प्रवासाला लागले होते. त्याचवेळी जाट आरक्षण आंदोलनाने ठिकठिकाणी केलेल्या रस्तारोकोमुळे वाहतूक खोळंबून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी मुरताल येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकवर रास्ता रोको केला. त्यामुळे दिल्लीकडे येणारे सर्व संचालक महामार्गावरच अडकून पडले.

आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने सर्वांची घालमेल वाढली होती. अख्खा दिवस प्रतीक्षेत गेला. त्यातच सायंकाळी झोंबणारा वारा आणि बोचऱ्या थंडीमुळे त्यांच्या अस्वस्थेत भर पडली. त्याचवेळी महामार्गावरील सुखदेव सिंग या ढाबा चालकाने सर्व प्रवाशांची नाष्ता, जेवण व निवासाची व्यवस्था केली. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला. परिस्थिती लक्षात घेऊन धाबाचालकाने अनेक प्रवाशांना मोफत सुविधा दिली.

हरियाणा सरकारशी आंदोलकांची चर्चा झाल्यानंतर आंदोलन अंशतः आंदोलन मागे घेण्यात आले आणि रविवारी पहाटे वाहतूक सुरळीत झाली. दिल्लीत पोहोचल्यानंतर सर्वांनी निश्वास सोडला. सर्वजण विमानाने तातडीने पुण्यात दाखल झाले आणि तेथून कोल्हापूरकडे रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरारच्या महिलेची कोल्हापुरात आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हातकणंगले-इचलकरंजी फाट्यावर विष पिऊन सोनी मनिष विनायक (वय ३५, रा. विरार, जि. पालघर) या महिलेने आत्महत्या केली आहे. त्यांचा सहकारी अरूण प्रल्हाद नाईक (वय ३२, रा. विरार) हा अत्यवस्थ असून त्याच्यावर सीपीआर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोघांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचचलं असावं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

सोमवारी सकाळी साडेसहा वाजता प्रभाकर ओंबाळे यांच्या शेतात दोघे अत्यवस्थ अवस्थेत दिसले. ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहिलं, तेव्हा सोनी विनायक यांचा मृत्यू झाला होता. अरूण नाईक यांची अवस्था अत्यंत गंभीर होती. पोलिसांना घटनेची माहिती कळवून नाईक यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये ताबडतोब उपचारास दाखल करण्यात आलं. हातकणंगले पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत काँग्रेसच्या नगरसेवकाचे पद रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक सुरेश आवटी यांचे नगरसेवकपद जिल्हा कोर्टाने सोमवारी रद्द ठरविले. नैतिक अधःपतन केल्याचा ठपका ठेवून २०१२मध्ये कोर्टाने आवटी यांना शिक्षा सुनावली होती. शिक्षेमुळे सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र असतानाही आवटी निवडणूक लढवून मिरजेतील प्रभाग ९ ब मधून ते विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात तत्कालीन राष्ट्रवादीचे उमेदवार आबा पाटील यांनी कोर्टात धाव घेतली होती.
दरम्यान, नैतिक अधःपतनप्रकरणी शिक्षा झाल्याने काही दिवसापूर्वी माजी मैनुद्दीन बागवान यांचे नगरसेवक पद रद्द झाले होते. आता आवटीनंतर आणखी एका महिला नगरसेविकेच्या पदावर टांगती तलवार आहे.
सांगली जिल्हा कोर्टातील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश बी. एस. गारे यांनी सोमवारी आवटी यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचा निर्णय दिला. आवटी यांच्या विरोधात खटला दाखल करणारे आबा पाटील यांची बाजू अॅड. एस. एस. शेठ यांनी मांडली. आवटी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास जिल्हा कोर्टाने नकार दिल्यानंतर आवटी यांनी हायकोर्टात धाव घेऊन शिक्षेला स्थगिती आणली. परंतु ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढविली त्यावेळी ते निवडणुकीस पात्र नव्हते, असा युक्तीवाद ग्राह्य मानून कोर्टाने आवटींचे पद रद्द करण्यात आल्याचा निर्णय सोमवारी दिला.
नगरसेवक या नात्याने विश्वस्त म्हणून महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्याऐवजी आंदोलनाच्या नावाखाली २००८मध्ये दगडफेक करून महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रकार मिरजेत घडला होता. या प्रकरणी मिरजेतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी दुर्गाप्रसाद देशपांडे यांनी अठ्ठावीस पैकी सव्वीस जणांना शिक्षा सुनावली होती. या शिक्षा झाल्याने संबधित सर्वजण किमान सहा वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले. परंतु त्यानंतरच्या महापालिका निवडणुकीत सहा जणांनी निवडणूक लढविली. काहींच्या उमेदवारी अर्जावर हरकत आल्याने त्यांचे अर्ज छाननीत अवैध ठरले. ज्यांच्या अर्जावर हरकत नव्हते, असे काहींजण विजयी झाले. त्यात आवटींचा समावेश होता. निवडणुकीनंतर त्यांच्या पात्रतेवर हरकत घेण्यात आली.
फेब्रुवारीत पार पडलेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत आवटी यांनी या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने संतप्त आवटींनी महापौर पदासाठी मुलगा निरंजन यांचा उमेदवारी दाखल करुन बंडाचे निशान फडकाविले. आपल्या गटाच्या नगरसेवकांना सहलीवर धाडून त्यांनी काही काळ पक्षाला आव्हान दिले. अखेरच्या क्षणीमात्र त्यांनी दहा महिन्यानंतर संधी देण्याच्या पक्षाच्या आश्वासनानंतर माघार घेतली होती. आवटींना आपले पद रद्द होणार असल्याची कुणकुण लागली होती. त्यामुळेच त्यांनी महापौरपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते, अशी आता चर्चा रंगली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिराळा तालुक्यातील ४९ पैकी २४ तलाव कोरडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
मुसळधार पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात पाण्याच्या ४९ तलावांपैकी २४ तलाव कोरडे पडले आहेत. वीस गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १ कोटी ६ लाख रुपयाचा टंचाई आराखडा तयार केला आहे.
शिराळा तालुक्यात सरासरी १0000 मि. मी. पाऊस पडतो. मात्र या वेळी ६0६ मि. मी. पाऊस पडला आहे. हा पाऊस अनेक दिवसांच्या फरकाने पडल्याने या पाण्याचा योग्य साठाही झाला नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची तीव्र टंचाई जानेवारी महिन्यापासूनच जाणवू लागली आहे. १७ विहिरींसाठी १0 लाख २0 हजार, तर टॅँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी १४ गावे १८ वाड्या अशा ३२ गावांखाली ७५ लाख रुपये, असा एकूण एक कोटी सहा लाख रुपये खर्चाचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला. शिराळा तालुक्यात फेब्रुवारी महिन्यातच तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. शिंदेवाडी येथे पाण्याचा टॅँकर सुरू करण्यात आला आहे. टंचाई आराखड्यानुसार ४३ गावांपैकी वीस गावांमध्ये येत्या काही दिवसांत पाणी टंचाई तीव्र होणार आहे. गेली १२ वर्षे पाणी टंचाईला तोंड देणाऱ्या शिंदेवाडी गावाला या वर्षीही दोन महिने अगोदर पासूनच पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या गावाला टॅँकरने पाणीपुरवठा चालू झाला आहे. तालुक्यात टंचाई आराखड्यात ४३ गावांचा समावेश असून, ही संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन या गावाजवळ असणाऱ्या तलावामध्ये पिण्यासाठी पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. यामध्ये एक युनिट
म्हणजे दहा हजार लिटर्स या प्रमाणे टाकवे तलाव (३0१७ युनिट), मानकरवाडी तलाव (५८५७ युनिट), वाकुर्डे बुद्रुक तलाव (८0१८ युनिट), शिवणी तलाव (१0६0 युनिट), मोरणा प्रकल्प (१९७३३ युनिट) असा एकूण ३७६८५ युनिट पाणी आरक्षित करण्याची मागणी पंचायत समितीच्या छोटे पाटबंधारे विभागाने केली आहे. या आरक्षित पाण्यामुळे गिरजवडे, पणुंब्रे तर्फ शिराळा, घागरेवाडी, निगडी, अंत्री बुद्रुक, वाकुर्डे खुर्द, औंढी, वाकुर्डेबुद्रुक, शिराळा तडवळे, बिऊर, कोंडाईवाडी, मादळगाव, धामवडे, शिरसी, आंबेवाडी या गावांना दिलासा मिळणार आहे. औंढी गावात सध्या तीव्र पाणीटंचाई असून, टंचाई काळात शिराळा, एम. आय. डी. सी. कडील उपलब्ध पाणी साठ्यातून या गावाला पाणी पुरवठा करावा, असा प्रस्ताव प्रशासनाने सादर केला आहे.

सांगलीतही अल्प पाणीसाठा
सांगली : सांगली जिल्ह्यात सध्या अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. जेमतेम महिना पार पडेल, अशी अवस्था आहे. आतापासूनच कडक उन्हाळा सुरू झाला आहे. एप्रिल-मे-जून हे तीन महिने कसे जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोयना व वारणा धरणातील पाणीसाठ्यामुळे नदीकाठच्या भागाचे कसेतरी निभून जाईल, पण पूर्व दुष्काळी भागावर मात्र पाण्यासाठी दाही दिशा करण्याची पाळी येणार आहे.आहेत. त्यामध्ये सध्या केवळ १९ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येते. त्यातील ५ मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या ४.१८ द.ल.घ.फू. म्हणजे ८ टक्के आणि ७९ लघु प्रकल्पांमध्ये १८.८८ द.ल.घ.फू. म्हणजे ११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. म्हैसाळ सिंचन योजना सुरू झाल्याने प्रमुख्याने कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव तालुक्यांतील काही भागाचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशात भाजपचे नव्हे संघाचे सरकार

$
0
0

'देशात भाजपचे नव्हे संघाचे सरकार'
मिरज : 'धार्मिक उन्माद निर्माण करून देशात असहिष्णूतेचे वातावरण तयार करण्याचा जाणीवपूर्वक प्रय्तन सुरू आहे. पंतप्रधान मोदीही संघाच्या व्यवस्थेपुढे हतबल झाले आहेत. त्यांचा रिमोट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाती आहे. देशात भाजपचे नव्हे तर आरएसएसचे सरकार आहे,' अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.
कवाडे म्हणाले, देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले असल्याने मोदी सरकार देशाला कोणत्या वळणावर घेऊन जात आहे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दाभोळकर, पानसरे व कलबुर्गींची हत्या, रोहित वेमुलाची आत्महत्या व जेएनयू प्रकारण या गोष्टी सरकारचे समर्थन प्राप्त असणाऱ्यांकडून केल्या जात आहेत. सांस्कृतिक दहशतवादाच्या माध्यमातून देशातील दलित, आदिवासी व अल्पसंख्यांकामध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांवर अन्याय
देशातील उद्योजकांची मोठ-मोठी कर्जे माफ केली जात आहेत. मात्र, शेतकऱ्यांची कर्जे सरकार माफ करीत नाही. हेट इन इंडिया, हे सूत्र असणारे मेक इन इंडियाबद्दल सांगत आहेत. मात्र, यांच्या मेक इन इंडियामध्ये शेतकरी कुठे आहेत. मेक इन इंडियातून सरकारने शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले असाही प्रश्न प्रा. कवाडे यांनी उपस्थित केला. देशातील मोठ्या उद्योजकांची कर्जे माफ करण्यात आल्याच्या प्रकारणाची न्यायालयीन चौकशी करावी. अशा उद्योजकांची नावे जाहीर करावीत, अशीही मागणी प्रा. कवाडे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्लामपुरात महिला मेळावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
कुटुंबात वेळेचे व्यवस्थापन सर्वात उत्तम प्रकारे सांभाळणाऱ्या महिलांनी दुग्ध व्यवसायातही वेगवेगळ्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन बारामतीच्या शरयू ग्रुप ऑफ कंपनीजच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.
राजारामबापू दूध संघाच्या वतीने माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दुग्धदिन व महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
उद्योजक श्रीनिवास पवार, आनंदचे अध्यक्ष सुभाष मांडगे, आमदार जयंत पाटील, अभिनेत्री सुरभी हांडे, संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील उपस्थित होते.
शर्मिला पवार म्हणाल्या, घर संसार चालवण्यासाठी दुग्ध व्यवसाय हा राज्यातील प्रत्येक कुटुंबात जोडधंदा म्हणून चालवला जातो. या दुग्ध व्यवसायावर महिलांची बारीक नजर असते. त्यामुळे जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळण्यासाठी महिलांनी गोठा व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करावा. जेणेकरुन कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळेल. प्रत्येक महिलेने कोणत्या तरी व्यवसायात आपला ठसा उमटवणार, अशी खुणगाठ मनाशी बाळगत वाटचाल करावी.
जयंत पाटील म्हणाले, शर्मिला पवार व श्रीनिवास पवार या दांपत्याने राजकीय घराण्यात जन्म घेवूनही उद्योगधंद्यात मोठी भरारी घेतली आहे. राजारामबापू दूध संघानेही ३ लाख ७५ हजार लिटर दूध संकलन करुन दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीनिवास पवार यांनी मनोगत व्यक्त केले. दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी विविध योजनांची माहिती दिली. वाळवा धनलक्ष्मी दुग्धोत्पादन स्पर्धा २०१६मध्ये जास्तीत जास्त गाय दूध उत्पादन घेणाऱ्या संजय तानाजी कुंभार, रामचंद्र संतू गिरीगोसावी, संजय संभाजी सावंत, शिला कुमार शिंदे यांना अनुक्रमे बक्षीसे देवून गौरवण्यात आले. म्हैस दूध उत्पादनात कैलास कृष्णा पाटील, भाऊसाहेब किसन सावंत, शिवाजी बाळू पाटील, संजय शामराव शिणगारे यांना अनुक्रमे बक्षीस देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिर सुरक्षेतील ढिलाई धोकादायक

$
0
0

satish.ghatage @timesgroup.com

कोल्हापूर : जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात दररोज येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षिततेच्या दृष्टीने काटेकोर तपासणी करण्यात येत असताना अंबाबाई मंदिरातील सुरक्षितेत ढिलाईचे चित्र पहायला मिळत आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाप्रमाणे मंदिराची सुरक्षिततेतही काटेकोरपणा यावा अशी मागणी भाविकांकडून होत आहे. रविवारी भाविकांच्या प्रवाशी बॅगेच्या अफवेच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिराच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उभारले आहे.

पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी पदभार स्वीकारल्यावर पोलिस अधीक्षक कार्यालयाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यालयाच्या इमारतीतील तळमजल्यातील पार्किंग व्यवस्थेला शिस्त लावली आहे. कर्मचारी व नागरिकांना शिस्तीची सवय होण्यासाठी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली आहे. तसेच शस्त्रधारी पोलिसांना खास पोषाख देण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या नोंदीसाठी डायरी ठेवली आहे. तसेच येणाऱ्या व्यक्तीची बॅग व पिशव्या तपासल्या जातात. तसेच हँड मेटल डिटेक्टरने तपासली केल्यानंतर त्या व्यक्तीला कार्यालयात सोडले जाते.

याउलट अंबाबाई मंदिर दहशतवादाच्या हिटलिस्टवर असल्याने मंदिराची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असायला हवी. मात्र तेथे सुरक्षेचा दिखावा केला जातो. मंदिराच्या चारही दरवाजावर मेटल डिटेक्टर उभारण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक दरवाजावर तीन पोलिसांची नियुक्ती केली असून त्यामध्ये एक महिला कर्मचारी असते. पोलिसांकडे मेटल हँड डिटेक्टर असते. पण हे कर्मचारी फक्त दरवाजात बसून असतात. कोणत्याही भाविकाची तपासणी केली जात नाही. फक्त हाय अलर्टचा आदेश केला की भाविकांची तपासणी केल्याचे नाटक केले जाते. पोलिस अधीक्षक कार्यालयात शिस्त पाळण्यासाठी येणाऱ्या नागरिकाची तपासणी करणे योग्यच आहे. पण अंबाबाई मंदिर संवेदनशील असताना तिथे सुरक्षिततेचा फक्त दिखावा केला जातो. तेथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.

सुरक्षा ऑडीटकडे दुर्लक्ष

अंबाबाई मंदिर दहशतवाद्याच्या हिटलिस्टवर असल्याने मंदिराचे सुरक्षा ऑडीट केले जाते. गेल्यावर्षी मंदिराची आय. बी. (इंटलिजन्स ब्युरो), एसआयटीच्या (राज्य गुप्तवार्ता विभाग) अधिकाऱ्यांनी अडीच तास तपासणी करून पोलिसांना सूचना दिल्या होत्या. महिलांची तपासणी करण्यासाठी चारही दरवाजाजवळ स्वतंत्र कक्ष उभारावेत, मंदिराच्या सरंक्षक भिंतीवर तारेचे कुंपण घालावे, सीसीटीव्हीची संख्या वाढवावी, बॅग स्कॅनरची सोय करावी, मंदिराच्या आतील व मंदिराबाहेरील अतिक्रमणे हटवावीत, मंदिर परिसरातील पार्किंगची सोय अन्य ठिकाणी करावी, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावेत या सुरक्षा ऑडिटच्या सूचना दुर्लक्षित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राष्ट्रवादीला नंबर वन बनवू’

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्याने नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरुन मते दिली आहेत. मात्र अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून काहीजणांनी जनतेची दिशाभूल केली. अच्छे दिन आलेले नाहीत. पुरोगामी जिल्हा असूनही जिल्ह्यातील सहा-सात आमदार जातीयवादी पक्षांचे आहेत. जिल्ह्याची पुरोगामीत्वाची ओळख कायम ठेवायची असल्याने आगामी नऊ नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ताकदीने लढवून पक्ष पुन्हा नंबर वन करुया' असा निर्धार पक्षाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केला.

दुष्काळ आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पाच मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, 'दुष्काळामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्याची झळ विद्यार्थ्यांनाही बसू लागली आहे. शेतकरी सरकारच्या मदतीकडे डोळे लावून बसलेला असताना कृषी, अभियंता आणि इतर विद्यार्थ्यांना जानेवारी महिना संपूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. सरकारच्या धोरणामुळे ईबीसी सवलतपात्र विद्यार्थीही अडचणीत आले आहेत. हे प्रश्न मांडण्यासाठी मोर्चाचे आहे. १९७२ पेक्षा भीषण स्थिती असताना सर्वच प्रश्नाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पाच मार्च रोजी दसरा चौकातून सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येईल. सरकारला या प्रश्नाचे गांभीर्य जाणवून दिले जाईल. त्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येत आहे. '

माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, 'आरएसएसच्या माध्यमातून इतिहास बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.' यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबूराव हजारे, पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, महापालिकेचे गटनेते सुनील पाटील, आदिल फरास, परिक्षित पन्हाळकर, पंडितराव केणे, बी. एन. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक रणजीत पाटील, हंबीरराव पाटील, वहिदा मुजावर, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे आदी उपस्थित होते. विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांनी प्रास्ताविक केले. दर्शन चव्हाण यांनी आभार मानले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांना वेळ नसतो

'निवेदन देण्यास गेलेल्या शिष्टमंडळाला भेट देण्यास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना वेळ नसतो. त्यांचे कार्यबाहुल्य अधिक आहे' असा टोला जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनी लगावला. यापुढील काळात आंदोलने करताना त्यांना उपस्थितीसाठी आधी पत्र देऊ असे यावेळी माने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images