Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लक्ष्मीपुरीत आग : ३२ लाखांचे साहित्य खाक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपुरी सुभाष रोडवरील खाटिक समाज संस्थेच्या इमारतीच्या ११ गाळ्यांना मंगळवारी (ता. १६) पहाटे आग लागली. आगीत अकरा दुकान गाळ्यांमधील ३२ लाख ५० हजाराचे साहित्य खाक झाले. खाटिक समाज संस्थेचे केटरिंग साहित्यही जळाले. वीज वाहिन्यांच्या शॉर्टसर्किटमधून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अग्नीशमन विभागाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठी हानी टळली.

फोर्ड कॉर्नरला खाटिक समाज संस्थेची जुनी इमारत आहे. मंगळवारी(ता. १६) पहाटे इमारतीला आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन विभागाला कळवले. मात्र तोपर्यंत इमारतीतील कटलरी, कॉस्मेटिकचे साहित्य, कपडे यामुळे आग वाढली. यातच जुन्या इमारतीत लाकडी साहित्याचा वापर अधिक असल्याने आग पसरत गेली. आगीत यशवंत एन्टरप्रायजेस, पाखरे टेलरिंग, श्री लक्ष्मी ग्रायडिंग मिल, अरुण निगवेकर यांचे रंगाचे दुकान, पद्माकर निकम यांचे स्क्रॅप दुकान यासह खाटिक समाज संस्थेचे साहित्यही जळून खाक झाले आहे. व्यापारी दुकानांमधील ३० लाखांचे साहित्य आणि खाटिक समाजाचे अडीच लाखांचे केटरिंगचे साहित्य जळाले आहे.

अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नाने दीड तासांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. खाटिक समाज संस्थेचे शैलेंद्र बाळासाहेब घोटणे यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली असून. नुकसानीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलिसांनी महावितरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही पंचनामा करण्यास सांगितले आहे. यानंतर नेमके नुकसान किती झाले ते लक्षात येईल, तसेच आगीचे कारणही समजेल, अशी माहिती लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘म्हैसाळ’ सुरू होणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
मंत्रालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या दालनातील दोन तासांच्या दीर्घ चर्चेनंतर २० फेब्रुवारी रोजी म्हैसाळ योजनेचे पाणी सुरू करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी सकाळी आकरा वाजता पंप सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
म्हैसाळ योजनेचे पाणी सोडले नसल्याने मिरज पूर्व, कवठेमहांकाळ आणि पुढे जत तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यात पैसे भरल्याशिवाय पाणी नाही, अशी ताठर भूमीका सरकारने घेतल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त भावना उमटली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्का जामचा इशारा दिला होता. तर काँग्रेसने सांगलीत एल्गार मेळावा बोलविला आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्रालयात मंत्री महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार पतंगराव कदम, आमदार जयंत पाटील, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत, मकरंद देशपांडे यांच्या उपस्थित बैठक झाली. साडेतीन कोटी रुपये त्वरीत भरुन उर्वरित दीड कोटी रुपये लवकरच भरण्याची आणि यापुढे नियमित पाणीपट्टी वसुलीची हमी दिल्यानंतरच ऊर्जा मंत्री बावणकुळे यांनी वीज देण्याची सहमती दिली असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी ताकारी, टेंभूप्रमाणे म्हैसाळच्या लाभार्थींनीही पाणीबील भरावे, यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आश्वासन या वेळी दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉरिडॉर स्थलांतराचा कोल्हापूरला दणका

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आघाडी सरकारने जाहीर केलेल्या मुंबई-बेंगळुरू औद्योगिक कॉरिडॉरला सेना-भाजप सरकारने पन्नास किलोमीटर पूर्वेला हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे कोल्हापूरसह परिसरातील उद्योगांना मोठा फटका बसणार असून, कोट्यवधींची गुंतवणूक इतरत्र जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ऐन मंदीत राज्य सरकारने हा निर्णय घेतला जात असल्याने कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींसह उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई-बेंगळुरू दरम्यान औद्योगिक गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई-बेंगळुरू औद्योगिक कॅरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. हा कॉरिडॉर मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, बेंगळुरू असा एक हजार किलोमीटरचा होता. जपान सरकारच्या मदतीने यामध्ये तीन लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित होती. फाउंड्री, साखर, आयटी. गॅस, टेक्स्टाइल, पॉवर जनरेशन आणि कृषीपूरक उद्योगातून किमान २५ लाख रोजगार निर्माण होणार होते. कॉरिडॉर कोल्हापुरातून पुढे जाणार असे नियोजन होते, त्यामुळे कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला याचा मोठा फायदा होणार होता. यासाठी दोन वर्षांपूर्वीच कोल्हापुरात उद्योजकांचा मेळावाही आयोजित केला होता.

उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांनी मुंबई येथे औद्योगिक कॅरिडॉरवरील चर्चासत्रात बोलताना ही माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-बेंगळुरू कॉरिडॉर नियोजित ठिकाणाहून पन्नास किलोमीटर पूर्वेला सरकल्यास याचा मोठा फटका पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना बसणार आहे. या परिसरातील सुपिक जमिनीमुळे भूसंपादनात अडचणी येतील अशी सरकारला भीती आहे. मात्र प्रत्यक्षात हे कारण तकलादू असून, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करण्यासाठीच कॉरिडॉरचे स्थलांतर केले जात असल्याचा आरोप माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. दुष्काळी भागात जमीन उपलब्ध असली तरीही पाणी, वीज आणि दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने या कॉरिडॉरबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

चौकट

तोटा काय होणार

औद्योगिक वाढीस ब्रेक लागणार

तीन लाख कोटींची गुंतवणूक इतरत्र जाणार

मोठे उद्योग येणार नाहीत

लाखो रोजगारांची संधी जाणार

आर्थिक विकास मंदावणार



प्रस्तावित औद्योगिक कॉरिडॉर इतरत्र हलवण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय कोल्हापूरच्या विकासाला खो बसणार आहे. स्थानिक नागरिकांना विश्वासात न घेताच हा निर्णय घेतला जात आहे हे दुर्दैव आहे. कोल्हापूरला दिली जाणारी ही वागणूक सापत्नभावाची असल्याने या निर्णयाचा निषेध करतो.

आमदार सतेज पाटील



या कॉरिडॉरमुळे परिसरातील उद्योजकांना मोठ्या आशा होत्या. उद्योगांना चालना देण्याच्या घोषणा करणाऱ्या राज्य सरकारने कॉरिडॉरमधून कोल्हापूरला वगळण्याच्या हालचालींमुळे मोठा धक्का बसला. मंदीच्या काळातील हा निर्णय उद्योगांसाठी मारक ठरेल.

देवेंद्र दिवाण - अध्यक्ष, गोशिमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सांगलीत यापुढे बीओटी नाही’

0
0

सांगली : महापालिकेत यापुढे कोणत्याही 'बीओटी' प्रस्तावांना थारा मिळणार नाही महापलिकेच्या मालमत्ता विकसित करायच्या असतील तर त्या सरकारच्या किंवा स्वनिधीतूनच होतील, असे मत उपमहापौर विजय घाडगे यांनी व्यक्त केले.
महापालिकेचा सर्वच कारभार पारदर्शक हवा. भ्रष्ट कारभाराला पाठिशी घातले जाणार नाही. प्रशासनापुढेही ही भूमिका मांडली आहे. त्याचे परिणाम येत्या काळात निश्वित दिसतील. ७० एमएलडीची पाणी योजना येत्या जुलैपर्यंत पूर्ण होईल. ५६ एमएलडीची दुसरी योजना फेब्रुवारी २०१७ पर्यंत पूर्ण होईल. धुळगाव योजनेस ९० लाख रुपये खर्चून ओढ्यात पाणी सोडले जाणार आहे. आराखडाबाह्य ड्रेनेज कामांची जबाबदारी प्रशासनाचीच आहे. ड्रेनेज कामे आराखड्यानुसार झाली पाहिजेत. शाळा समिती स्थापनेचा प्रस्ताव महासभेपुढे आणला जाईल. महापालिकेच्या ताब्यातील १८७ भूखंडावर लवकरच महापालिकेचे पलक लागतील. ड्रेनेज ठेकेदाराला हमीपत्र व करारपत्र दिल्याशिवाय बिले मिळणार नाहीत, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना उपमहापौरांनी सांगितले. 'बीओटी'वरून सांगतील बरेच आरोपप्रत्यारोप झाले होते. त्यामुळे योजना वादात सापडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा लाखाच्या रकमेसह चौघांवर गुन्हा

0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

पैसे डब्बल करण्याचे आमीष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरोधात नेसरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. आनंदा गोविंद पाटील (वय ४०, रा.हेळेवाडी), सदाशिव संतोबा गाडे (वय ५०, रा.शिप्पूर), पांडुरंग हरी गुरव (वय ४२, बटकणगले, ता.गडहिंग्लज) व शिवाजी मारुती पिटुक (वय ३२, माणगाव, ता.चंदगड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून दहा लाखाच्या रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर पाटील व पोलिस उपनिरीक्षक हमीद शेख गस्तीसाठी फिरत होते. यावेळी कोवाड फाटा येथे हे ‌चौघे संशयित आढळले. त्यांच्याकडे रोख दहा लाख, दोन मोटारसायकल, कलर प्रिंटर सापडले. या संदर्भात हटकले असता याबाबत स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता उचगाव (जि.बेळगाव) येथील संजय तात्यासाहेब देसाई यांच्याकडून काल सायंकाळी सातच्या सुमारास दहा लाखांची रक्कम डब्बल करून देण्याच्या बोलीवर घेतल्याचे सांगितले. मात्र तसे न झाल्याने संजय यांनी फसवणूक झाल्याची तक्रार नेसरी पोलिसात दिली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीएस, महाद्वार रोड होणार फेरीवालामुक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी सोमवारपासून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. 'नो हॉकर्स झोन' अंतर्गत महाद्वार रोड, सीबीएस परिसरातील फेरीवाल्यांचे अन्यत्र पुनर्वसन करून हे परिसर फेरीवालामुक्त करण्यात येणार आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने महापालिका आणि फेरीवाला संघटना प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. बैठकीत शहरातील पाच प्रमुख मार्गावरील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनावर तोडगा काढण्यात आला. आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारपासून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणार असल्याचे सां​गितले.

महाद्वार रोड, ताराबाई रोड, सीबीएस, पापाची तिकटी ते रंकाळा टॉवर या मार्गावरील पुनर्वसनावरून प्रशासन आणि शहर फेरीवाला समिती यांच्यात एकमत होत नव्हते. बुधवारी चार तास झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाला. महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांचे पुनर्वसन सारडा दुकान ते पापाची तिकटी तसेच ताराबाई रोडवर दोन्ही बाजूला पट्टे मारून केले जाणार आहे. विरोधी पक्ष नेते संभाजी जाधव, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, सुभाष वोरा, नंदकुमार वळंजू, महंमदशरीफ शेख, राजेंद्र महाडिक, चेंबर ऑफ कॉमर्सचे आनंद माने, इजिनीअ​रिंग असोसिएशनचे राजेंद्र सावंत आदींनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीदरम्यान महापालिका अधिकारी व फेरीवाला संघटनेचे प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले आणि फेरीवाला संघटनेचे सुभाष वोरा यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.

मध्यवर्ती बसस्थानक परिसर

मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा कॉम्रेड दिलीप पोवार यांनी लावून धरला. या परिसरातील १८१ फेरीवाल्यांचे पुनर्वसन सह्याद्री हॉटेल व महाराजा हॉटेल समोरील मोकळ्या जागेवर करण्यात येणार आहे. दोन टप्प्यात फेरीवाले येथे व्यवसाय करतील. प्रत्येकी ९० फेरीवाल्यांचा एक गट असणार आहे.

.........

शहरातील फेरीवाले ८६००

ओळखपत्र असलेले फेरीवाले ३६००

हॉकर्स झोनची ठिकाणे ७४

नो हॉकर्स झोनची ठिकाणे ५२


फेरीवाला झोनसाठी शनिवारी सोडत

महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातंर्गत फेरीवाला झोन निश्चित केले आहेत. पुनर्वसनासाठी शनिवारी (ता.२०) रोजी सोडत काढण्यात येणार आहे. ज्या फेरीवाल्यांकडे बायामेट्रिक कार्ड आहे त्यांना चिठ्ठी काढताना प्राधान्य दिले जाईल.


फेरीवालामुक्त मार्ग....

बिनखांबी गणेश मंदिर ते जोतिबा मंदिर मार्ग (महाद्वार रोड)

वटेश्वर मंदिर ते मध्यवर्ती बस स्थानक परिसर

पापाची तिकटी गंगावेश, रंकाळा स्टँड, जाऊळाचा बाल गणेश मंदिर ते फुलेवाडी


फेरीवाल्यांचे पुनर्वसन कुठे होणार

महाद्वार रोडवरील सारडा दुकान ते पापाची तिकटी मार्गाच्या दोन्ही बाजूला पट्ट्याच्या आत (संख्या १६४)

ताराबाई रोडवर दोन्ही बाजूनी पट्टे मारणार (महाद्वार चौकपासून ताराबाई रोडवर)

पाच बंगला परिसरातलील पाण्याची टाकी ते कोरगांवर कंपाउंडलगत फेरीवाल्यांचे पुनर्वसन (संख्या ३६४)

नागोजीराव पाटणकर हायस्कूल समोरील चौकापासून ते दुधाळीकडे जाणारा रस्ता

अंबाबाई मंदिराच्या भिंतीलगतच्या फुलवाल्यांना हटवून त्याच ठिकाणच्या लोखंडी रेलिंगलगत बसविणार (१८ संख्या)

महाद्वार रोड, ताराबाई रोडवरील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाठी रविवारी पुन्हा संयुक्त पाहणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरला अंडासेलमधून बाहेर काढण्यास नकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी समीर गायकवाड याला अंडासेलमधून बाहेर काढण्यास कळंबा कारागृह प्रशासनाने असमर्थता दर्शवली आहे. दोन दिवसांपूर्वी कोर्टाकडून यासंदर्भात कारागृहाला पत्र आले आहे.

समीरचे मानसिक खच्चीकरण होत असल्याने त्याला अंडासेलमधून बाहेर काढावे, अशी मागणी समीरचे वकील एस.एस. पटवर्धन यांनी सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांच्याकडे केली होती. त्यावर कारागृह अधीक्षकांकडे विचारणा करून निर्णय दिला जाईल, असे कोर्टाने सांगितले होते. त्यानुसार कोर्टाचे पत्र दोन दिवसांपूर्वी कारागृह प्रशासनाला मिळाले. समीर हा पानसरे हत्येतील प्रमुख आरोपी असल्याने सुरक्षेच्यादृष्टीने त्याला अंडासेलमधून बाहेर काढण्यात कारागृहाने नकार देण्याचे ठरवले आहे.

पुण्यातील समन्वय बैठकीत पुराव्यांवर चर्चा

पुणे ःडॉ. नरेंद्र दाभोलकर, पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी पुण्यात समन्वय बैठक घेतली. या बैठकीत संशयितांसह उपलब्ध पुराव्याबाबत चर्चा झाली करण्यात आली.

या तिन्ही हत्येच्या प्रकरणांचा तपासावर हायकोर्टाचे लक्ष आहे. हायकोर्टाच्या आदेशानुसार या घटनेचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी एकत्रित बैठक घेऊन तपासाबाबत चर्चा करणे अपेक्षित होते. त्यानुसार बैठक झाल्याचे अप्पर पोलिस महासंचालक आणि पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाचे प्रमुख संजय कुमार यांनी सांगितले.

बैठकीसाठी सीबीआयच्या विशेष पोलिस महानिरीक्षक नीना सिंह, कर्नाटकचे विशेष पोलिस महानिरीक्षक हेमंत निंबाळकर, कोल्हापूरचे अधीक्षक प्रदीप देशपांडे, 'सीबीआय'चे अधीक्षक नंदकुमार नायर, एस. आर. सिंह, सहायक आयुक्त गणपत माडगुळकर उपस्थित होते.

'सीबीआय'च्या अधिकारी सिंह यांनी दाभोलकरांची हत्या झालेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे चौकशी केली.

दोघांची पॉलिग्राफिक टेस्ट

दरम्यान, दाभोलकर हत्येप्रकरणी दोन संशयितांची पॉलिग्राफ टेस्ट घेण्यास कोर्टाने परवानगी दिली. या दोन्ही संशयितांनी ही चाचणी करण्याची तयारी दर्शविल्यानंतर कोर्टाने सीबीआयतर्फे दाखल करण्यात आलेला अर्ज बुधवारी मंजूर केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांच्या कोर्टाने हा अर्ज मंजूर केला. निलेश शिंदे (रा. मंगळवार पेठ, कमला नेहरू रुग्णालयाजवळ) आणि हेमंत शिंदे (रा. शिवाजीनगर गावठाण) या दोघांची पॉलिग्राफ चाचणी करण्यात येणार आहे. गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार लाखांचे बनावट विदेशी मद्य जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या नागाळा पार्क येथील रचना अपार्टमेंटमधील फ्लॅट आणि कारमधील चार लाख किमतीचा बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी फ्लॅटमालक प्रमोद महादेव देशपांडेना (वय ७२) अटक केली आहे. राज्य विद्युत मंडळातून निवृत्त झालेले देशपांडे सध्या सिव्हिल इंजिनीअर म्हणून काम करतात. देशपांडेंचा जावई मंगेश पांडुरंग नाडकर्णी (मूळ गाव पणजी, सध्या रा. फ्लॅट नं.२०१, रचना अपार्टमेंट) फरारी आहे. उत्पादन शुल्क विभागाने चार लाखाचे मद्य आणि तीन कार असा ३५ लाखांचा माल जप्त केला आहे.

रचना अपार्टमेंट परिसरात बेकायदेशीर विदेशी मद्य साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला एक महिन्यापूर्वी मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी परिसरात पाळत ठेवली होती. बुधवारी कोल्हापूरच्या विभागीय आयुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई सुरू केली. पावणेतीन वाजता नागाळा पार्क येथे पोलिसांनी देशपांडे यांच्या फ्लॅटमध्ये तपास सुरू केला. त्यावेळी फ्लॅटमध्ये मद्याचे चार बॉक्स आणि रिकामे ५० ते ६० बॉक्स मिळाले. अपार्टमेंटच्या दारातील तीन महागड्यांमध्ये आठ बॉक्स मिळाले. विनापरवाना मद्याचा साठा केल्याबद्दल देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली.

देशपांडे यांना दोन मुली असून मूळचा बेळगावचा व सध्या पणजीत रहात असलेला मंगेश नाडकर्णी गोव्यातून महागड्या किमतीचे मद्य कोल्हापुरात घेऊन येत असे. अॅटीक्युटी ब्ल्यू, टीचर्स हायलॅन क्रीम, बकार्डी या कंपनीच्या मद्याचे बॉक्स कारवाईत मिळाले. गोव्यात दोन लिटर मद्याच्या बाटलीची किमत अडीच हजार रूपये असून महाराष्ट्रात या मद्याची किंमत साडेपाच ते सहा हजार रूपये आहे. कारवाईत पोलिस निरीक्षक मारूती पाटील, उप निरीक्षक पंकज कुंभार, डी.एस. कोळी, अमित तांबट, अनिल यादव, सुहास वरूटे, मोहन पाटील यांचा सहभाग होता.

व्यवसायातील नुकसानीमुळे तस्करी

नाडकर्णीला व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने मद्य तस्करी सुरू केली होती, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. देशपांडे व नाडकर्णी यांनी साठा केलेले मद्य महाग आहे. बिअर बार व परमिट रूममध्ये जात नाहीत ती मंडळी देशपांडे-नाडकर्णीकडून महागडे मद्य खरेदी करत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. ते गेली चार वर्षे मद्य तस्करी व मद्य विक्री करत होते. देशपांडे व नाडकर्णी यांच्याकडून मद्यविक्री करणाऱ्या आणखी तीन ते चार तरूणांचा तपास पोलिस करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हद्दवाढीच्या निर्णयाचा सरकारला अधिकार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कायदेशीर प्रक्रिया राबवून हद्दवाढीबाबत सरकारने निर्णय घ्यावा, असे सांगत सरकारला हद्दवाढीबाबत अध्यादेश काढण्याचा आदेश देण्यास मात्र हायकोर्टाने बुधवारी नकार दिला. त्यामुळे प्रारुप, हरकती सूचना न घेता महापालिकेचा हद्दवाढीचा प्रस्ताव आता सरकार थेट नाकारु शकणार नाही. परिणामी सरकारला महापालिकेच्या प्रस्तावानुसार प्रक्रिया राबवावी लागेल. सरकारच्यावतीने हद्दवाढीबाबत सरकार लवकर निर्णय घेईल, असे हायकोर्टासमोर सांगण्यात आले.

न्यायमूर्ती एन. एच. पाटील व ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. महापालिकेची हद्दवाढ न करण्याचा १३ मार्च २०१५ रोजीचा सरकारचा निर्णय रद्द करावा. तसेच ११ जून २०१५ रोजी महासभेत मंजूर केलेल्या ठरावाप्रमाणे सरकारला हद्दवाढीची प्रक्रिया राबण्याचे आदेश देण्यासाठी आर. के. पोवार, बाबा पार्टे, अजित सासने, किशोर घाटगे यांच्यामार्फत अॅड. युवराज नरवणकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. दरम्यान हद्द्वाढ विरोधी कृती समितीच्यावतीने अॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी खंडपीठासमोर सुनावणी झाली.

त्याबाबतची माहिती देताना अॅड. नरवणकर यांनी सांगितले की, हद्दवाढीबाबत महापालिका सातत्याने प्रस्ताव सादर करते व सरकारकडून निर्णय होत नाही. त्यानंतर कालावधी गेल्यानंतर नवीन आकडेवारीसह प्रस्ताव सादर करण्यास सांगितले जाते. मार्चमध्ये सरकारने केवळ एका पत्राद्वारे पुन्हा हा प्रस्ताव फेटाळला. तो निर्णय रद्द करुन सरकारला हद्दवाढीची अधिसूचना काढण्याचे आदेश द्या, अशी मागणी याचिकेत केली होती. एकदा नाकारला म्हणून परत मागणी अथवा प्रस्ताव सरकारला सादर करायचा नाही असे होणार नाही. शहरवासीय ती मागणी करु शकतात.'

विरोधी कृती समितीच्यावतीने २१ गावातील ग्रामस्थांच्यावतीने नाथाजीराव पवार व इतर ग्रामस्थांच्यावतीने अॅड. राजीव चव्हाण व अॅड. धैर्यशील सुतार यांनी बाजू मांडली. नुकतीच हद्दवाढ रद्द केली असताना पुन्हा राज्य सरकारला अधिकार वापर करण्याचे आदेश देता येणार नसल्याचा युक्तिवाद केला. हायकोर्ट हस्तक्षेप करून हद्दवाढ करावी असा आदेश देऊ शकत नाही व तशी अधिकारकक्षा नसल्याचे सांगितले. सरकारलाही आता केवळ एका ओळीचे पत्र देऊन प्रस्ताव नाकारता येणार नाही. त्यासाठी प्रारुप प्रसिद्ध करण्याबरोबरच त्यासाठी हरकती, सूचना मागवाव्या लागतील व नंतर निर्णय घ्यावा लागणार आहे, असे अॅड. नरवणकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपुरात चार लाख भाविकांची मांदियाळी

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । पंढरपूर

चार लाख भाविकांच्या उपस्थितीत आज पंढरपूर येथे माघ एकादशीचा सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सपत्निक माघ एकादशीची शासकीय नित्यपूजा केली. विठुरायाच्या पुजेला जिल्हाधिकारी मुंढे यांच्या समवेत महापुजेस बसण्याचा मान सांगली जिल्ह्यातील दादू कवाळे या दाम्पत्याला मिळाला.

आज भल्या पहाटेपासून चंद्रभागेच्या पवित्र स्नानासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दर्शनाची रांग मंदिरापासून ५ किलोमीटर अंतरावरील गोपाळपूर यात्रा शेडपर्यंत पोहोचली होती. प्रशासनाच्या अंदाजापेक्षा यावर्षी यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दीडपट वाढ झाली. मात्र मंदिर प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. माघी यात्रेनिमित्त पहिल्यांदाच विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे .



दरम्यान, दर्शनाला १५ ते १८ तासापर्यंत अवधी लागत असताना दर्शन रांगेत अनेक ठिकाणी घुसखोरी होत असल्याच्या तक्रारी भाविकांकडून करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रॉयल्टी’साठी पाइपलाइन रोखली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइनच्या मार्गातील अडथळ्यांची शर्यत संपायला तयार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर पुन्हा कामाला सुरूवात झाली. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या या प्रकल्पात आता राधानगरी आणि करवीर तहसिलदार कार्यालयाकडून पाइपलाइन मार्गावरील खोदकामाची रॉयल्टीची मागणी करत कामाला ब्रेक लावला आहे. या सरकारी कार्यालयाकडून गुरूवारी ठेकेदारांना काम थांबविण्याचे पत्र दिले आहे. एक किलोमीटरसाठी एक कोटी रुपयांची रॉयल्टी भरण्याची सूचना केल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून काम सुरू ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. काम बंद न ठेवता तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राधानगरी तहसीलकडून दंडासह रॉयल्टी मागितली आहे.

पाइपलाइन योजना ५२ किलोमीटरची आहे. राधानगरी आणि करवीर तहसीलदार कार्यक्षेत्रातून पाइपलाइन जाणार आहे. करवीर तहसिलदार कार्यालयाच्या अखत्यारित आठ किलोमीटरच्या मार्गाला मान्यता दिली आहे. राधानगरी तालुक्यातही खोदकाम सुरू आहे. गुरूवारी राधानगरी तहसीलदार कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी योजनेच्या प्रतिनिधींची भेट घेऊन रॉयल्टीची मागणी केली. तसे पत्रही दिले. वाशी, हळदी, ठिकपुर्ली या भागात पाइपलाइनचे काम सुरू आहे. मात्र करवीर आणि राधानगरी या दोन्ही कार्यालयाकडून रॉयल्टीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील काम बंद राहिले. पाइपलाइन योजनेचे काम सुरू होऊन काही महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर रॉयल्टीची मागणी पुढे आली आहे. परिणामी पुन्हा एकदा कामात अडथळा निर्माण झाला आहे.


अजब मागणी

राधानगरी व करवीर तहसीलदार कार्यालयाकडून रॉयल्टीची मागणी केली आहे. एका कार्यालयाकडून एक किलोमीटर खोदकामाची दंडासह एक कोटी रॉयल्टी मागितली आहे. वास्तविक थेट पाइपलाइन योजना सरकारी आहे. पाइपलाइन योजनेसाठी खोदाकाम होत असून माती आणि मुरूमाची विक्री केली जात नाही. विक्री होणार नसल्याने रॉयल्टीची मागणी कशासाठी? असा प्रश्न उप​स्थित होत आहे.


या योजनेतील पाणी नागरिकांना विकत देण्यात येणार आहे. त्यामुळे सर‌कारी नियमानुसार महापालिकेला खोदकामाची रॉयल्टी द्यावीच लागेल. यासंदर्भात महापालिकेला सूचना केल्या आहेत.

योगेश खरमाटे, तहसीलदार करवीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीत गरजणार धनगरी ढोल

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आर्ट ऑफ लि‌व्हिंगचा ३५ वा वर्षपूर्ती सोहळा दिल्लीत होणार आहे. त्यानिमित्त ११ ते १३ मार्चअखेर जागतिक सांस्कृतिक महोत्सव साजरा होत आहे. या कार्यक्रमात कोल्हापूर व सांगली परिसरातील अकराशे धनगरी ढोलवादक सहभागी होणार आहेत. ही पारंपरिक कला यानिमित्ताने देशाच्या राजधानीत सादर करण्याची संधी मिळणर असून, त्याची रंगीत तालीम २१ फेब्रुवारीला सायंकाळी ४.३० वाजता पोलिस परेड ग्राउंडवर होणार असल्याची माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगच्या डिंपल गजवाणी यांनी पत्रकार बैठकीत दिली.

त्या म्हणाल्या, 'दिल्लीतील कार्यक्रमात व्यापक भारतीय संस्कृती अनुभवता येणार आहे. १५५ देशातील पारंपरिक व सांस्कृतिक कला यावेळी सादर होणार आहेत. या वर्ल्ड कल्चर फेस्टिवलमध्ये देशातून ३५ लाख लोक उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसांच्या या भव्य कार्यक्रमात हाजारो कलाकार, मान्यवर उपस्थितीत राहणार असून त्यासाठी नऊ एकरचे व्यासपीठ तयार करण्यात येणार आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‍घाटन होणार असल्याचे सांगून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लालकृष्ण अडवानी, मनोहर पर्रीकर आदी मान्यवरांसह सुरीनाम, झिम्बाब्वे, इंडोनेशिया, अल्बेनिया, ‌श्रीलंका, नेदरलंड, फ्रान्स, नॉर्वे, यूए अशा देशातील लोकही सहभागी होणार असल्याचे गजवानी यांनी सांगितले.

या तिन्ही दिवशी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर एक शांती ध्यान घेणार असून जगभरातील लाखो लोक एकाच वेळी करणार असल्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केली जाणार आहे.

धनगरी ढोल सादरीकरणासाठी ७ मिनिटांचा कालावधी दिला असून त्याची रंगीत तालीम रविवारी सायंकाळी ४ वाजता होणार आहे.

पत्रकार परिषदेला मंदिर चव्हाण, राजश्री पाटील, अनिमा दहिभाते, प्रशांत पाटील, मानसिंग जाधव, आप्पा लाड, अजय किल्लेदार, धनगर समाजाचे अध्यक्ष रामचंद्र डांगे, गणपतराव सायगावे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुपांतरीत कराचा तिढा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महसूल विभागाने शहरातील १७ हजार मिळकतधारकांना रुपांतरीत करापोटी नोटिसा पाठवल्या आहेत. या नोटिसा बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचा आरोप करीत मिळकतधारकांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. यातच काही पक्ष आणि संघटनांनी रुपांतरीत कराविरोधात भूमिका घेतल्याने मिळकतधारक विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू झाला आहे. दंडाच्या नोटिसा मागे घेण्यास प्राशासन तयार नाही तर मिळकतधारकांनीही याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिल्याने या कराचा तिढा वाढला आहे.

महाराष्ट्र महसूल अधिनियम कयदा १९६६ नुसार राज्य सरकारने कर आकारणीचे वर्गीकरण केले आहे. या कायद्यानुसार मिळकतधारकांनी मिळकतीचा वापर अन्य कारणांसाठी केल्यास त्यास चाळीसपट दंडाची तरतूद केली आहे. कायदा अस्तित्वात असला तरीही राज्य सरकारने या कायद्याची अंमलबजावणी मात्र केली नसल्याचा व्यापाऱ्यांचा दावा आहे. त्याचबरोबर चाळीसपट दंडाच्या वसुलीला सरकारनेच स्थगिती दिल्याचा युक्तिवाद व्यापाऱ्यांनी आणि मिळकतधारकांनी केला आहे. २००४ ते २०१५ या काळात एकही नोटीस महसूल विभागाने मिळकतधारकांना पाठवली नाही. महसूल वाढीच्या उद्दिष्टासाठी महसूल अधिकाऱ्यांच्या डोक्यातून रुपांतरीत कराची कल्पना आल्याने कोणतीही पूर्वसूचना न देताच मि‍ळकतधारकांना नोटिसा पाठवल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. यातही चाळीसपट दंडाची वसुली म्हणजे स्थगित असलेल्या नियमाचा आधार घेऊन मिळकतधारकांची पिळवणूक करण्याचा प्रकार असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.

कर निश्चिती कायद्यानुसार शहरातील विभागांचे अ, ब, क, ड, इ असे वर्गीकरण करून निवासी, वाणिज्य आणि औद्योगिक कराच्या आकारणीची तरतूद करता येते, मात्र महसूल विभागाने शहरातील मिळकतधारकांना सरसकट चाळीसपट दंडाची आकारणी करून नोटिसा पाठवल्याचा मिळकतधारकांचा आरोप आहे. याबाबत करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, रुपांतरीत करवसुलीला स्थगिती नसल्याचे सांगितले. चाळीस पट दंड आकारणीचा अपप्रचार असून, जितक्या वर्षांचा कर भरलेला नाही तितक्या वर्षांचा कर भरावा लागत असल्याने मिळकतधराकांना रक्कम मोठी वाटत आहे. निवासी कराच्या दीडपट वाणिज्य कर आणि दुप्पट औद्योगिक कर अशी रचना आहे.'

या करात सवलत देण्याची कोणतीही तरतूद नसल्याने कर वसुली होणारच, अशी भूमिका महसूल अधिकाऱ्यांनी घेतली आहे. महसूलच्या या भूमिकेला मिळकतधारकांनीही जोरदार विरोध सुरू केला आहे. शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी यांची स्थापनाच व्यापारी पेठा म्हणून झाली आहे. त्यामुळे या पेठांना पुन्हा कर लागू होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. त्याचबरोबर रुपांतरीत करामुळे मिळकतधरकांना दुहेरी कर भरावा लागत असल्याने याला विरोध वाढला आहे. शिवसेनेसह व्यापारी संघटनांनीही याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे निवेदने दिली आहे.

१७ हजार नोटिसा

शहरात सुमारे चाळीस हजार मिळकतधारक आहेत. यातील १७ हजार मिळकतधारकांना महसूल विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. गेल्या महिन्याभरात १३८ मिळकतधारकांनी रुपांतरीत करापोटी सुमारे २७ लाखांहून अधिक रक्कम महसूल विभागाकडे जमा केली आहे. ज्या मिळकतधारकांचा आक्षेप असेल त्यांनी पुरावे सादर करण्याचे आवाहन महसूल अधिकाऱ्यांनी केले आहे.


४८ कोटींचा रुपांतरीत कर

मिळकतींचा मूळ वापराव्यतिरिक्त इतर कारणांसाठी वापर होत असल्याच्या १७ हजार मिळकती महसूल विभागाने निर्धारित केल्या आहेत. अजूनही तपासणी सुरूच असून आणखी किमान पाच हजार मिळकतींचा गैरवापर होत असल्याचा अंदाज आहे. रुपांतरीत करातून महसूल विभागाला तब्बल ४८ कोटी रुपये अपेक्षित आहेत. त्यामुळे हा कर वसूल करण्यासाठी महसूलचे अधिकारी आग्रही आहेत.


सन २००४ पासून एकाही मिळकतधरकाला रुपांतरीत कराची एकही नोटीस महसूल विभागाने पाठवलेली नाही. या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती असतानाही जबरदस्तीने वसुली करणे अन्यायकारक आहे. त्यामुळेच आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे कैफियत मांडणार आहे.

सदानंद कोरगावकर

अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

रुपांतरीत कर कायद्याला स्थगिती असल्याचा अपप्रचार आहे. आम्ही नियमानुसारच नोटिसा पाठवल्या आहेत. काही मिळकतधराकांनी कराची रक्कम भरायला सुरूवातही केली आहे. कराला विरोध करणे शहराच्या विकासाला बाधक असल्याने याबाबत सर्वांनीच सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे.

योगेश खरमाटे
तहसीलदार, करवीर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झोपडपट्टीतील महिलांसाठी ‘शाहू’चा जागर

0
0

janhavi.sarate @timesgroup.com

कोल्हापूर ः वाचनसंस्कृती ही एक चळवळ आहे. वाचनातून जीवन समृद्ध बनते. वाचनातून प्रेरणा घेतलेल्या अनेकांनी जीवन समृद्ध केले आणि दुसऱ्यांसाठीही ते प्रेरणा देत राहिले. सदर बाजार आणि विचारेमाळ परिसरातील लोकांची परिस्थिती पाहिली तर अनेकांनी ‌आ‌र्थिक अडणीमुळे ५ ते ९ वीपर्यंतच शिक्षण घेतलेले. तरीही या परिसरातील महिलांत वाचनाची गोडी कायम आहे. ही गोडी आणखी वाढविण्यासाठी या परिसरातील शाहू कॉलेजने खास येथील महिलांसाठी ग्रंथालयाचे दरवाजे खुले केले आहेत. या माध्यमातून वाचन चळवळ समृद्ध करण्यासाचा प्रयत्न चालविला आहे.

कदमवाडी रोड येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजने परिसरातील झोपडपट्टींमधील महिलांसाठी जानेवारीपासून विशेष मोफत ग्रंथालयाची सोय केली आहे. ४५ ते ५० महिला सध्या ग्रंथालयाच्या सदस्या आहेत. दर शनिवारी दुपारी २ ते ५ यावेळेत ह्या महिलांसाठी त्यांच्या आवडीची पुस्तके दिली जातात. तर काही पुस्तके आठवड्यासाठी घरीही दिली जातात. या मोफत ग्रंथालयात सहभागी होण्यासाठी केवळ महिलांकडून अर्ज भरून घेतला जातो. या अर्जामध्ये आवडीच्या विषयासंदर्भात म्हणजे आरोग्य, घरकाम, बचतगट, चरित्र, व्यवसाय, पाककला, मासिके, भाषणे, कादंबरी, वर्तमानपत्र यांमधील ज्या विषयात रस आहेत अशी पुस्तके त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिली जातात. कॉलेजच्या ग्रंथालयात ५० हजार पुस्तके आहेत. ग्रंथालय सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.

ऑडिओ-व्हिडिओ ग्रंथालय

लहानपणीच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी फिरते ग्रंथालय सुरू केले आहे. ग्रंथालयात गप्पा, गोष्टी, गाणी, खेळ आणि पुस्तकांच्या माध्यमातून वाचन संस्कार रुजविले जात आहेत. यामध्ये ३ री ते १० पर्यंतची दीडशेवर मुले सहभागी झाली आहेत. विशेष म्हणजे काही मुले ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरील पुस्तकांची मागणी करतात. याचबरोबर लहान मुलांसाठी व. पु. काळे, पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार यांचे कथाकथन आणि 'जाणता राजा' महानाट्याचे व्हिडिओही दाखविले जातात.

शाहू कॉलेजचे ग्रंथालय हे केवळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नाही. ते प्रत्येकासाठी खुले आहे. फक्त विद्यार्थ्यांवरच फोकस न करता तळागाळातील महिलांत वाचनसंस्कृती रुजविण्याचा प्रयत्न ग्रंथालयच्या माध्यमातून केला जात आहे.

प्रा. एस. बी. कोरडे, ग्रंथपाल, शाहू कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजेत आजपासून लघुपट महोत्सव

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
मिरजेत शुक्रवारपासून तीन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. बालगंधर्व नाट्यगृहात महोत्सवातील लघुपटांचे सादरीकरण होणार असून, येथेच सकाळी ११ वाजता आमदार सुरेश खाडे, महापौर हारुन शिकलगार, महापालिका आयुक्त अजिज कारचे, पोलिस उप अधीक्षक धीरज पाटील, अभिनेते शरद भुताडिया, नगरसेवक सुरेश आवटी, अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे उपस्थिती राहणार आहेत.
मिरजेतील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या आवाहनास प्रतिसाद देत या महोत्सवासाठी सुमारे २५० लघुपटांची नोंदणी झाली होती. निवड समितीने त्यापैकी ६० लघुपटांची निवड केली आहे. तीन दिवस चालणाऱ्या महोत्सवात विविध विषयांवरील ६० लघुपट दाखविण्यात येणार आहेत. दोन मिनिटांपासून ४० मिनिटांपर्यंतचे लघुपट यात सहभागी झाले आहेत. या महोत्सवामुळे स्थानिक लघुपट तयार करणाऱ्यांना संधी मिळणार असून, मिरजमधील प्रेक्षकांना दर्जेदार लघुपट पहाता येणार आहेत. प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नव्या पॅसेंजरचे मिरज येथे स्वागत

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
मिरज-सोलापूर रेल्वेमार्गावर गुरुवारपासून नव्याने सुरू झालेल्या पॅसेंजर गाडीचे रेल्वे प्रवासी संघ, रेल्वे प्रवासी सेनेतर्फे मिरज रेल्वे स्थानकात स्वागत करण्यात आले. प्रवासी संघटनांतर्फे रेल्वेच्या चालकांचा सत्कार करून दुपारी रेल्वे पुन्हा सोलापूरला रवाना करण्यात आली. मिरज-सोलापूर मार्गावर नवी पॅसेंजर सुरू झाल्याने दुपारच्या वेळेत प्रवाशांची सोय झाल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघ व प्रवासी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
मिरज-सोलापूर रेल्वेमार्गावर सकाळी सहा वाजता सुटणाऱ्या मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजर नंतर थेट सायंकाळी सहा वाजता मिरज-पंढरपूर पॅसेंजर ही रेल्वेगाडी आहे. मिरज स्थानकातून या मार्गावरील स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना दुपारच्या वेळेत कोणतीही गाडी उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने या मार्गावर दुपारच्या वेळेत रेल्वे सुरु करण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली होती. अनेक दिवसांची ही मागणी रेल्वेच्या सोलापूर विभागाने नवी रेल्वे सुरू केल्याने पूर्ण झाली आहे.
ही रेल्वे गुरुवारीया मार्गावर धावली. सोलापूर येथून सकाळी सहा वाजता सुटलेली रेल्वे मिरजेत दुपारी बारा वाजता पोहोचली. मिरज स्थानकातून ही रेल्वे दुपारी साडेतीनला पुन्हा सोलापूरसाठी रवाना झाली. या वेळी रेल्वे प्रवासी संघ व रेल्वे प्रवासी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वेचे स्वागत केले.
रेल्वे प्रवासी संघातर्फे रेल्वेच्या इंजिनाला फुलांनी सजविण्यात आले होते. तसेच रेल्वेच्या चालकांना गांधी टोपी, श्रीफळ, पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रेल्वे प्रवासी संघाचे ए. ए. काझी, रोहित चिवटे, सुनीता कोकाटे, रूपाली गाडवे, चंदन बुटे, माणिक कोलप, प्रा. प
प्रमोद इनामदार, जीहर मुजावर, शहील पिरजादे, नामदेव भोसले, अमोल धर्माधिकारी, युसुफ मेस्त्री व रेल्वे प्रवासी सेनेचे किशोर भोरावत, संदीप शिंदे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपचे नेते ब्रिटिशांचे दलाल

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
'देशावर अनेक वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांचे दलाल असणाऱ्या संघधार्जिण्या भाजपच्या हातात देशाची, राज्याची सत्ता गेली आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही दलाली करीत असलेल्या ब्रिटिशांना आम्ही देशाच्या बाहेर हाकलले आहे. तिथे तुम्ही कोण लागून गेलात ? येणारा काळच ठरवेल कोणाच्या मनगटात किती ताकद आहे,' असा सज्जड इशारा अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी गुरुवारी सांगलीत दिला.
सांगली शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र व राज्यातील दिशाहिन सरकारच्या विरोधात सांगलीत एल्गार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण होते. या वेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक विनायकराव देशमुख, जयश्रीताई मदन पाटील,आमदार पी. एन. पाटील, आमदार आनंदराव पाटील, जिल्हाध्यक्ष मोहन कदम उपस्थित होते. आमदार सतेज पाटील, महापौर हारुन शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सायकलपटू हुसेन कोरबू यांचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. या वेळी वर्षभरातील काँग्रेसच्या आंदोलनाच्या आढावा पुस्तिकेचेही प्रकाशन करण्यात आले.
मोहन प्रकाश म्हणाले, 'स्वातंत्र्यपूर्व काळात संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी झगडत असताना काही मंडळी ब्रिटिशांची दलाली करण्यातच स्वतःला धन्य मानत होती. अशाच लोकांच्या हातात सत्ता गेल्याने त्यांना शेतकरी व सर्वसामान्यांबद्दल काहीही देणं-घेणं नाही. हे सरकार आल्यापासून शेतमालाचे भाव घसरले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या.काँग्रेसच्या काळात ६० रुपयांना किलो मिळणारी डाळ महाग वाटत होती, ती आता २०० रुपयांनी घ्यावी लागत आहे. कापसाला योग्य भाव देणारी काँग्रेसच वाईट. आता त्यांनी मात्र भाव कमी केला. काँग्रेसने गेल्या ६० वर्षांत शिक्षण, आरोग्य, रोजगार हमी योजना, अन्न सुरक्षा अशा विविध योजना आणून सर्वसामान्यांना न्याय दिला. न्याय व माणुसकीचे राज्य काँग्रेसने आणले त्याची तोडफोड करण्याचे काम हे दलाल करीत आहेत. मागासवर्गीयांच्या काँग्रेसने भरीव शिष्यवृत्ती योजना सुरू ठेवली मात्र या सरकारने त्यामध्ये ५० टक्के कपात केली. आता काँग्रेसने दिलेले आरक्षण संपवण्याचा घाट या सरकारने घातला आहे. निवडणुकीसाठी शिक्षणाची अट घातली जात आहे. या माध्यमातून मागील दाराने सर्वसामन्य, गोरगरिबांचे अधिकार काढण्याचाच या सरकारचा प्रयत्न आहे. हे जनतेने वेळीच ओळखले पाहिजे.'
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 'राज्यातील भाजप सरकारने वर्षभरात केवळ घोषणाच दिल्या. जनतेला काहीही दिले नाही. भयानक दुष्काळ पडला आहे. तीन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, हे शासन काहीही मदत करण्यास तयार नाही. अशावेळी काँग्रेस मूग गिळुन गप्प असणार नाही. सरकारची डेड लाईन संपली आहे. शेतकऱ्यांना मदत व राज्यातील जनतेचे प्रशन सोडवण्यासाठी रस्तावर उतरून या सरकारला जाब विचारेल.'
माजी मंत्री डॉ. कदम म्हणाले, 'सर्वांना सोबत घेऊन काँग्रेसचे काम करू. आवश्यक तेथे ऑपरेशन करू मात्र परिणामकारक काम करू. अडचणीत मदत करणे हे सरकारचे कामच आहे रडून उपयोग नाही. दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. लोकांमध्ये असंतोष आहे. त्याला तोंड फोडण्याची जबाबदारी आपली आहे.'
माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणाले, 'टोल माफी,देव-धर्म यासाठी खर्च करण्यास या सरकारकडे पैसे आहेत. मात्र सर्वसामान्य शेतकरी अडचणीत सापडला असताना त्यांना मदत करण्यास पैसा नाही. म्हैसाळसाठी पैसा शेतकरी-कारखानादारांनी भरला आणि पाणी सुरू करण्यास मात्र यांचे मंत्री हे चुकीचे आहे. या सरकारच्या विरोधात एल्गार पुकारणेच गरजेचे आहे.'

'मुख्यमंत्री केविलवाणे'
मंत्रिमंडळात ताळमेळ नाही. अधिकाऱ्यांना डावलून हट्टाने निर्णय घेतले जातात. अनेक समस्या असतानाही मुख्यमंत्री ठोस निर्णय घेत नाहीत. उलट प्रत्येक वेळी अधिकारी ऐकत नाहीत, असे उत्तर मुख्यमंत्री देतात. इतके केविलवाणे मुख्यमंत्री मी आजपर्यंत पाहिले नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोळी, पुंगळ्या CBIने घेतल्या ताब्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर झाडलेल्या गोळ्यांच्या पाच रिकाम्या पुंगळ्या सीबीआयच्या पथकाने कोल्हापूर पोलिसांकडून ताब्यात घेतल्या. गोळी व पुंगळी दिल्लीतील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार आहे. सीबीआयने कोर्टाकडे पुंगळ्या व गोळीची मागणी केली होती.

सीबीआयकडे प्रतिनियुक्तीवर असलेले सहआयुक्त सतीश देवरे व वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत घोडके गुरूवारी कोल्हापुरात आले. त्यांनी पोलिस मुख्यालयात राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांच्याकडून एक गोळी व पुंगळी ताब्यात घेतली. ताब्यात घेतलेल्या पुंगळया नवी मुंबईत नेण्यात येणार असून त्यानंतर तपासणीसाठी दिल्लीतील फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येतील, असे पोलिस अधिकारी देवरे यांनी सांगितले.

डॉ नरेंद्र दाभोलकर व कॉ. पानसरे यांच्या हत्येत साम्य असल्याचे तपासात पुढे आले आहे. पानसरे, दाभोलकर व डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येत वापरण्यात आलेल्या गोळ्या समान असल्याचा निष्कर्ष कर्नाटक सीआयडीने काढला आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआयचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस.आर. सिंग यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल.डी. बिले यांच्या कोर्टात गोळी व पुंगळ्या ताब्यात मिळाव्यात असा अर्ज केला होता. कोल्हापूर पोलिसांनी सीबीआयला गोळी व पुंगळ्या द्याव्यात असा आदेश दिला होता. त्यानुसार गुरूवारी सीबीआयच्या पथकाने गोळी व पुंगळ्या ताब्यात घेतल्या. दाभोलकर व पानसरे हत्येचा तपास मुंबई हायकोर्टाच्या निरीक्षणाखाली व्हावा यासाठी याचिका दाखल केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरेंवर दोन पिस्तुलांतून गोळीबार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर दोन पिस्तुलातून गोळीबार झाला होता. त्यामुळे हल्लेखोर दोघेजण होते हे बॅलेस्टिक रिपोर्टवरून स्पष्ट झाले आहे. बुधवारी पुण्यातील बैठकीत पिस्तूल आणि गोळ्या समान असल्या तरी पानसरेंवर गोळ्या झाडणारे हल्लेखोर दोन होते यावर चर्चा झाली.

पानसरे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर व डॉ. एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येत वापरलेली पिस्तूल व गोळ्या समान असल्याचा अहवाल कर्नाटक सीआयडीने तयार केला आहे. तिन्ही घटनेत साम्य असल्याने हल्लेखोर समान असावेत, असा अंदाज कर्नाटक सीआयडीने व्यक्त केला आहे. दाभोलकर हत्येत घटनास्थळी सापडलेल्या चार पुंगळ्यांचा अहवाल सीबीआयकडे आहे. पानसरे हत्येचा तपास करताना पाच पुंगळ्या सापडल्या असून एसआयटीकडे त्याचा अहवाल आहे. कलबुर्गी हत्येवेळी दोन पुंगळ्या सापडल्या असून कर्नाटक सीआयडीने बेंगळुरू फॉरेन्सिक लॅबकडून अहवाल प्राप्त केला आहे. या ‌तीनही घटनेतील ११ पुंगळ्या ७.६५ एमएमच्या असून त्या पुंगळ्यावर 'एफसी' असा उल्लेख आहे. त्यामुळे तीनही हत्येत समान पिस्तूल वापरल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पानसरे हत्येत घटनास्थळी पाच पुंगळ्या मिळाल्या तर पानसरे यांच्या शरीरात एक गोळी मिळाली. कोल्हापूर पोलिसांनी या पुंगळ्या मुंबईच्या फॉरेस्निक लॅबला पाठवल्या होत्या. ९ मार्च २०१५ ला लॅबचा अहवाल मिळाला. त्यात पानसरे यांच्यावर दोन पिस्तुलातून गोळीबार झाला होता, असे म्हटले होते. एक व तीन क्रमांकाच्या पुंगळ्या एका पिस्तुलातून तर दोन, चार व पाच क्रमांकाची पुंगळी दुसऱ्या पिस्तुलातील आहे, असा अहवाल आहे. त्यामुळे पानसरे यांच्यावर मोटारसायकलवर बसलेल्या दोघांनी पिस्तुलातून गोळीबार केला आहे. एक गोळी पानसरे यांच्या शरीरात मिळाली. ती १०२ सेमी लांब व ०.७ सेमी व्यासाची आहे. पाच पुंगळ्या व एका गोळीवर केएफ ७.६५ मार्क आहे. पिस्तूल बनावट असले तरी वापरलेल्या गोळ्या खडकी फॅक्टरीतील असल्याचे सिद्ध झाले आहे. खडकी फॅक्टरीतून गोळ्या बाहेर कशा येतात याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे.

पानसरे यांच्यावर दोघांनी हल्ला केला असला तरी दाभोलकर व कलबुर्गी यांच्यावर एकाच पिस्तुलात हल्ला झाला असावा. तिनही घटनेत पिस्तुल समान व पुंगळ्या समान आहेत. त्यामुळे हल्लेखोरही एकच आहेत असा संशय व्यक्त केला जात आहे. पण पानसरे यांच्यावर हल्ला करणारे दोघे आहेत. तसेच पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याला अटक करण्यात आले आहे. प्रत्यक्ष १४ वर्षाच्या मुलानेही ओळख परेडमध्ये समीरला ओळखले आहे. तरीही पानसरेवर हल्ला करणारा दुसरा हल्लेखोर, पिस्तुल व मोटार सायकल हा पुरावा शोधण्यात गेले वर्षभर पोलिसांना अपयशच आले आहे.

पिस्तूल क्रमांक १ - १ व ३ क्रमांकाची पुंगळी

पिस्तुल क्रमांक २ - २, ४,५ क्रमांकाची पुंगळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळावाढीला मिळणार टोला

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रस्तावित घरफाळा वाढीविरोधात समाजातील सर्वच घटकातून तीव्र भावना उमटत आहेत. राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी घरफाळ्याच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. महापालिकेतील ८५ नगरसेवक घरफाळाप्रश्नी एकवटले आहेत. त्यांनी संयुक्तपणे जनतेसोबत असल्याची स्पष्ट ग्वाही देत घरफाळावाढीला विरोध केला जाईल, असे सांगितल्याने सभागृह घरफाळा वाढीला टोला देईल, असे चित्र आहे. शिवसेनेतर्फे घरफाळा वाढीला विरोध करण्यासाठी शनिवारी (ता.२०) सर्वसाधारण सभेवेळी महापालिकेवर लाटणे मोर्चा काढण्यात येणार आहे.

महापालिकेने पाच वर्षाोपूर्वी भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली आहे. गेल्या पाच वर्षाोत एकदाही घरफाळा वाढ झालेली नाही. यंदा रेडीरेकनरवर घरफाळा आकारणीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेच्या शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजुरीसाठी ठेवला आहे. रेडीरेकननुसार सध्याच्या घरफाळ्यामध्ये दहा ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढ होणार आहे. घरफाळावाढीने सामान्य जनतेचे कंबरडे मोडणारे असून नागरिकांवर ही करवाढ लादू देणार नाही, अशी भूमिका सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी घेतली आहे.

नगरसेवकांनी सभागृहात घरफाळावाढीचा ठराव फेटाळला तर प्रशासन राज्य सरकारला त्याचा अहवाल देऊन प्रशासनाच्या अखत्यारित घरफाळावाढ लादू शकते. हा धोका ओळखून गेले काही दिवस सर्वच पक्षांनी घरफाळावाढीविरोधात मोहीम उघडली आहे. महापौर अश्विनी रामाणे यांनी ही वाढ कदापी लादू देणार नाही, असे सांगितले आहे. शिवसेनच्या एका गटाने प्रशासनाकडून घरफाळा वाढ करण्याचा डाव आखण्यात आला तर सोमवारी कोल्हापूर बंद पुकारण्यात येईल, असा इशारा दिला आहे. शनिवारी होणाऱ्या सभागृहावर जनमताच्या भावनांचा दबाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images