Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये अमित निकम ‘६३’वे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्री-आयएएस सेंटरचे विद्यार्थी अमित वसंत निकम हे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांनी ६३ वी रॅँक मिळविली. त्यांना तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. ते सावळज (ता. तासगाव) येथील आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसची २०१५ मध्ये परीक्षा घेतली. लेखी परीक्षा १४०० आणि तोंडी परीक्षा ३०० गुणांची झाली. मुलाखतीसाठी ३० विद्यार्थी पात्र ठरले होते. यामध्ये मुलाखतीसाठी प्रि- आयएएस सेंटरचे चार विद्यार्थ्यांचा समावेश होता. दिल्ली येथे १८ जानेवारी ते ९ फेब्रुवारी पर्यंत उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात निकम यांनी यश मिळविले.

परीक्षेचा निकाल ११ फेब्रुवारीला जाहीर करण्यात आला. देशभरातून या परीक्षेत ११० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांनी बी. ई मेकॅनिकल पदवी घेतली. सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनही काही महिने काम केले. त्यानंतर सावंतवाडी येथे एसबीआय मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून नोकरी केली. निकम यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीनदा प्रयत्न केले. २०१२, २०१४ आणि २०१५ मध्ये प्रयत्न केले.

दुसऱ्या प्रयत्नात त्यांना मुलाखतीत यश मिळाले नाही. मात्र त्यांनी प्रयत्नपूर्वक अभ्यास सुरू केला. प्रि-आयएएस सेंटरमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर परीक्षेची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यशाची बाजी मारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीत ‘नो व्हेईकल डे’

$
0
0

कुपवाड : एक पायडल मारुन तर पहा... असे जनतेला आवाहन करीत १८ फेब्रुवारी रोजी सांगलीत 'नो व्हेईकल डे' चे आयोजन करण्यात आले आहे. सांगलीत येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाने आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावून पुढील प्रवास एसटी बसने करायचा आहे तर शहरातील वाहनधारकांनी त्या दिवशी सायकलीचा वापर करायचा आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अवैध मेडिकल प्रॅक्टिस विरोधी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र धेंडे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केले.
आरोग्य सेवांच्याबातीत कोणाची अडवणूक, नाडवणूक होऊ नये, या साठी ही समिती काम करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी बरोबरच प्रदूषणाला आळा बसावा म्हणून समितीने 'नो व्हेईकल डे' चे आयोजन केले आहे. त्या विविध कामांच्या निमित्ताने आपले खासगी वाहन घेऊन सांगलीकडे येणाऱ्या प्रत्येकांसाठी शहरात येणाऱ्या नऊ रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून एसटीची सोय करण्यात आली आहे. त्या दिवशी एसटीचे नियंत्रक अधिकारी प्रत्येक चौकात थांबणार आहेत. त्यामुळे कोणाला एसटी उपलब्ध झाली नाही, असे होणार नाही. रिक्षा चालकांनीही शेअर ए रिक्षा पद्धती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांनी तर सायकलच वापरायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक कोटी सूर्यनमस्कार संकल्पाची सांगता रविवारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली शिक्षण संस्थेच्या एक कोटी सूर्यनमस्कार संकल्पाची सांगता रविवारी १४ रोजी होत आहे. सुमारे ११ हजार विद्यार्थी जिल्हाभरात सूर्यनमस्कार घालतील. त्यातला मुख्य उपक्रम येथील आयर्विन पुलाच्या परिसरात कृष्णा काठावर होईल. सकाळी आठ ते साडेआठ या वेळेत संस्थेच्या शाळांतील सहा हजारावर विद्यार्थी त्यात सहभागी होतील.
आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त अजिज कारचे, पोलिस अधीक्षक सुनील फुलारी, उद्योजक रामभाऊ वेलणकर यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन होईल. ही माहिती संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यांनी दिली. ते म्हणाले, संस्थेने यापूर्वी महा लेझीमचा उपक्रम केला होता. त्यानंतर गतवर्षी २६ जानेवारीला तरूण भारत व्यायाम मंडळ क्रीडांगणावर साडेचार हजार विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले होते. त्याचवेळी पुढील मकर संक्रांतीपर्यंत एक कोटी सूर्यनमस्कार घातले जातील, असा संकल्प पूर्ण केला होता. त्यानंतर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी हा संकल्प तडीस नेताना गेल्या १२ जानेवारीला एक कोटी ५ लाख सूर्यनमस्कार घातले. या उपक्रमांची सामूहिक सांगता व्हावी यासाठी रविवारच्या सांगता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. एकाचवेळी सहा हजार विद्यार्थी सूर्यनमस्कार घालतील. एक विद्यार्थी १५ सूर्य नमस्कार घालणार आहे, म्हणजे त्यादिवशी केवळ सांगलीत ९० हजार सूर्यनमस्कार घातले जातील. या शिवाय रविवारी सूर्यनमस्काराच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. २१०० विद्यार्थी त्यात भाग घेतील. त्यांनी यासाठी आपली नावे नोंदविली आहेत. सांगली, तासगाव, विटा विभागातील शाळांमध्ये या स्पर्धा होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेक इन इंडिया’त तंतुवाद्य

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
मुंबई येथे १३ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या मेक इन इंडिया प्रदर्शन भरत आहे. मिरजेत निर्मिती होणाऱ्या संगीत वाद्यांपैकी असलेल्या सतार, तंबोरा आणि तबला या वाद्यांची प्रतिकृती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
मिरजेची ओळख असणाऱ्या तंतुवाद्यांचे प्रतीक म्हणून सार्वजनिक कार्यक्रमात या वाद्यांची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मेक इन इंडिया उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंबईत आजपासून (१३ ते १८) मेक इन इंडिया सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या प्रदर्शनात विविध क्षेत्रातील नवनवीन उत्पादने मांडण्यात येणार आहेत. सांगली जिल्ह्यातील तीन उद्योगांचा या प्रदर्शनात सहभाग आहे.
यात मिरजेतील सतार, तंबोरा व तबला या तीन संगीत वाद्यांची एकत्रित प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. शहरातील प्रसिद्ध सतारमेकर बाळासाहेब मिरजकर, मोहसिन मिरजकर यांनी या संगीत वाद्यांची आकर्षक प्रतिकृती बनविली आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रमात पाहूण्यांच्या स्वागत व सत्कारासाठी या तीन वाद्यांची प्रतीक असलेली प्रतिकृती भेट दिली जाते. या बरोबरच मिरज औद्योगिक वसाहतीतील हिंदुस्तान नायलॉन कंपनीची उत्पादने ठेवण्यात येणार आहेत.
शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या शिवाजी केन प्रोसेसर्स प्रा. लि. च्या वतीने बनविण्यात येणारी केमीकल फ्री असलेली गुळ व साखरही या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे.
औद्योगिक वसाहतीचे कार्यकारी संचालक प्रमोद शेटके यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे. संगीत वाद्य प्रतिकृती निर्मितीबाबत बोलताना मोहसीन सतारमेकर म्हणाले, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात पाहुण्यांना भेट देण्यासाठी, सत्कारासाठी मिरजेची ओळख असेलली सतार, तंबोरा आणि तबला असलेल्या प्रतिकृतीला मागणी आहे. प्रदर्शनात या प्रतिकृतीची किंमत ५,५५५ रुपये ठेवण्यात आली आहे. ठेवण्यात आली आहे. ही वाद्यांची प्रतिकृती मेक इन इंडिया सप्ताह प्रदर्शनात ठेवण्यात येणार असल्याने मिरजेतील सतारमेकर बंधूची मान उंचावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुढे पाचगणी पठारावर वाय-फाय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
शिराळा तालुक्यातील गुढे पाचगणी पठारावर वाय-फाय सेवा सुरू झाली आहे. गावातील काही होतकरू तरुण आणि बीएसएनएलच्या सहकार्याने ३० जानेवारीपासून सुविधा सुरू झाली आहे. काही मोठ्या शहरांबरोबरच काही मोठी गावे वाय-फाय झाली आहेत. मात्र साडेबाराशे लोकसंख्या असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील गावात वाय-फाय सेवा सुरू झाल्यामुळे चांदोली अभयारण्याच्या आणि चांदोली धरणाच्या शेजारी असणारा गाव आता जगाशी जोडला गेला आहे. गावातील बहुतांशी लोक मुंबई-पुणे सारख्या शहरात नोकरी वा इतर व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर आहेत. या पूर्वी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी १०-१२ कि. मी. पायपीट करून आरळा किंवा शेडवाडी गावात जावे लागत होते. गाव शिराळा तालुक्यात येत असले तरी कराड व पाटण तालुकेही या गावांना जवळ आहेत. अनेक सुविधांची वानवा असणारे गाव, अशी गावाची या पूर्वी ओळख होती. आठवीपर्यंत शिक्षणाची गावात व्यवस्था आहे. गुढे-कोकरूड या मार्गावर बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. आजही वैद्यकीय उपचारासाठी १५ किलोमीटरवर असणाऱ्या आरळा किंवा बारा किलोमीटरवर असणाऱ्या शेडगेवाडीला जावे लागत आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या पाचगणी गावाने वाय-फाय सेवा जिल्ह्यात पहिल्यांदा सुरू केली आहे. संदीप पाटील, अमर पाटील, शरद पाटील, या प्रमुख मंडळींसह अक्षय चव्हाण, अंकुश इनामदार, सुरज पाटील, विजय पाटील, गणेश पाटील, प्रवीण पाटील, सिद्धिविनायक चव्हाण यांनी गावातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना जगाशी जोडले जावे, यासाठी प्रयत्न केले आहेत. फ्री वाय-फाय इंटरनेट सुविधा बीएसएनएलच्या सहकार्याने सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एव्हीएच’ आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

$
0
0

'एव्हीएच' आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'चंदगडमधील एव्हीएच प्रकल्पाविरोधात आंदोलन करताना अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. 'मेक इन इंडिया' 'शायनिंग इंडिया'तून ते वेळ देतील,' अशी कोपरखळीही आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावली. कंपनीला पाठबळ देणारे तपस नंदी व मिराशे या अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली असून त्याचा पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले.

एव्हीएच प्रकल्प स्थलांतर होण्याबाबत आमदार मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉ. बाभुळकर यांची बदनामी करणाऱ्यांना सायबर क्राइम गुन्ह्याखाली अटक झाल्याचे गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. पत्रकार बैठकीला राष्ट्रवादीचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष बी. एन. मुगळीकर, उदय जोशी, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे यांच्या जनअंदोलन कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.



विनाशकारी प्रकल्पाविरोधातील लढाईला काही विघ्नसंतोषी लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र जनतेने दिलेल्या पाठबळामुळे प्रकल्प हद्दपार करण्यात यश आले आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर



सहकारमंत्र्यांचा स्वभाव भावतो

नवीन अध्यादेशाचा आधार घेऊन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील संचालकांवर कारवाईची धमकी देत आहेत. न्यायालयीन निकालपूर्वीच बँकेवर प्रशासक नेमला असल्याची माहिती देत आहेत. त्यांनी दिलेली सर्व माहिती न्यायालयात सादर केली आहे. ते अत्यंत प्रामाणिक असून त्यांचा स्वभाव भावतो, अशी कोपरखळी आमदार मुश्रीफ यांनी मारली. 'पूर्वलक्षी प्रभावाने कोणताही कायदा तयार करता येत नसल्याने न्यायालयात सहकारातील नवीन कायद्याला स्थगिती मागितली आहे. दोन्ही सुनावणीवेळी अॅडव्होकेट जनरल उपस्थित राहिले नसल्याने सुनावणी दोन मार्चपर्यंत पुढे गेली आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बादशहा बागवानची ‘व्हिआयपी’ चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

विनापरवाना सावकारी आणि खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल असलेला माजी नगरसेवक बादशहा बागवान याची शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी चार तास चौकशी केली. बंद खोलीत झालेल्या या चौकशीचा तपशील देण्यास मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी नकार दिला. न्यायालयाने बागवान याला पोलिसांना तपासकामात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार चौकशी करण्यात आली. याप्रकरणी अटक केलेल्या महंमदशफिक संजापुरेला जामीन मंजूर झाला आहे.

खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना चकवा देणाऱ्या बादशहा बागवानला न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तपास कामात सहकार्य करण्याबरोबरच चार तास पोलिस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलिसांनी बागवान याच्या कार्यालयातून सुमारे १९ लाख ८० हजाराची रोकड, ४० चेकबुक, भिशीची बुके, अनेक सातबारा उतारे, प्रॉपर्टी कार्ड तसेच बक्षिसपत्रे, अन्य दस्तऐवज जप्त केला आहे. प्रसारमाध्यमांनी पोलिसांच्या तपास कामावर टीकेची झोड उठविल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार याप्रकरणी आणखी तक्रारदांना पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले. मात्र लतिफ मुल्ला यांच्याशिवाय बागवान कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर मिरजमध्ये खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल बागवान याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन करून तपासकामात सहकार्य करण्याबरोबरच २० फेब्रुवारी रोजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

व्हिआयपी चौकशी

खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांची बागवान याच्यावर मेहेरनजर आहे. पोलिस ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बंद खोलीत बागवान याची चौकशी केली गेली. सर्वसामान्यांना गुन्हेगारांना दिली जाणारी ही वागणूक बागवान याच्यापासून दूरच राहिली. वरिष्ठांकडे तक्रार होऊनही बागवान याना मिळणारी व्हिआयपी वागणूक व चौकशी अनेकांच्या नजरेत भरते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुष्काळावर बचत गटांचा ‘मार्ग’

$
0
0



Maruti.Patil @timesgroup.com

कोल्हापूर : अपुऱ्या पर्जन्यमानामुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असतानाच याचा फटका मोलमजुरी करणाऱ्या कामागार वर्गाला बसत आहे. पाऊसमान कमी झाल्याने शेतातील कामेच मिळत नसल्याने विविध कामांसाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ सर्वसामान्य कुटुंबांवर आली आहे. काम करण्याची इच्छा असूनही काम मिळत नसल्याने बचत गटाच्या माध्यमातून चार पैसे मिळवण्यासाठी खानदेशातील महिला थेट साडेसहाशे किमीचे अंतर कापून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित बचत गटाच्या प्रदर्शन व विक्री महोत्सवामध्ये सहभागी झाली आहेत. किमान दररोजची मजुरी तरी मिळेल या आशेवर बचत गटाच्या महिला या महोत्सवामध्ये सहभागी झाल्या आहेत.

रावेर व जामनेर हे जळगाव जिल्ह्यातील केळी व कापूस उत्पादनामध्ये राज्यात अग्रेसर तालुके. सुपिक जमीन आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून येथील शेतकरी उत्पादन घेण्यास माहिर. मात्र येथील शेतकरीच अपुऱ्या पावसामुळे हवालदिल झाले असल्यामुळे शेतमजूरही अत्यंत अडचणीत आले आहेत. शेतातील मजुरीच मिळणे बंद झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्यांना दाहीदिशा धुंडाळाव्या लागत आहेत.

निसर्गाची अवकृपा झाली असली, तरी यावर मात करण्यासाठी बचत गटांनी मात्र कंबर कसली आहे. त्यामुळे पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवासाठी जास्तीत-जास्त आर्थिक फायदा मिळवण्यासाठी हे बचत गट साडेसहाशे किमीचे अंतर पार करुन कोल्हापुरात दाखल झाले आहेत. जळगाव, पुणे व कोल्हापूर असा एक दिवस व एक रात्रीचा प्रवास करुन खास सागापासून बनवलेले आकर्षक पोळपाट लाटणे, मांडे (पुरणपोळी) यासह साठवणीचे पदार्थ असे सुमारे ३५ हजार रुपये किंमतीचे साहित्य घेवून दाखल झाले आहेत.

'भाड्याच्या घरात राहत असताना शेतामध्ये काम करुन किमान कुटुंबाचा उदरनिर्वाह करता येत होता. मात्र पाऊस पडला नसल्याने मजुरीचे साधनच बंद झाले आहे. म्हणूनच बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेले साहित्य विक्रीसाठी घेवून आले आहे. जळगावचा प्रमुख पदार्थ असलेले मांडे खरेदी करुन कोल्हापूरकर मदत करतील अशी आशा आहे.

नजीमा पिंजारी, अडावत, जळगाव

'मोलमजुरी करुन कुटुंबाची गुजराण करावी लागत आहे. शेतमध्ये दिवसभर काम करुन रात्रीच्यावेळी बचत गटाचे काम करत आहे. मात्र सलग दोन वर्षे पावसाने हुलकावणी दिल्याने शंभर रुपयांचा रोजगार मिळणेही मुश्कील झाले आहे. येथे किमान तिनशे रुपये मिळतील अशी अपेक्षा असल्याने इतक्या दूरवर बचत गटाचा स्टॉल टाकला आहे.

छायाबाई बारी, शेंदुर्णी, जळगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाविकाकडून दोन लाख

$
0
0

म. टा. वृतसेवा, पन्हाळा

श्री जोतिबा मंदिरातील दक्षिण महाद्वारातील नगारखान्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एका भाविकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दोन लाख रुपयांची देणगी सिंधिया देवस्थान ट्रस्टकडे दिली. देणगीमुळे आता नगारखान्याला झळाळी प्राप्त होणार आहे. जोतिबा मंदिरात वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला पुरातन असा नगारखाना आहे. यामध्ये दररोज पाच वेळा नगारा वाजविला जातो. मंदिरातील नित्य धार्मिक कार्यक्रमावेळी हा नगारा वाजविला जातो. मंदिराच्या दक्षिण दरवाजावर असणारा हा नगारखाना सध्या मात्र दुरवस्थेत आहे. शिल्पकला व नक्षीकाम पुसट झाले आहे. या नगारखान्यातील वाढलेले गवत पाहून एका भाविकानेच दोन लाख रुपयांची देणगी देऊन याला गतवैभव प्राप्त करून देण्याची इच्छा व्यक्त केली. जोतिबा मंदिरातील सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे व्यवस्थापक मेजर आर. सी. कदम यांच्याकडे दोन लाख रुपयांची देणगी सुपूर्द केली. नगारखाना नूतनीकरण कामाचा प्रारंभ श्रींचे मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कदम यांनी चैत्र यात्रेपूर्वी काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराबाई पार्कात सात लाखाची घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ताराबाई पार्क येथील रेसिडन्सी क्लबसमोरील बंगला फोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि महागडे मोबाइल असा सव्वाचार लाखाचा ऐवज लंपास केला. मुलीच्या कॉलेजची फी भरण्यासाठी जमा केलेले रोख दोन लाख रूपयेही चोरट्यांनी नेले. याबाबतची फिर्याद प्रकाश बळीराम शिंदे (वय ५८, रा. यशोविद्या अपार्टमेंट, बंगला नंबर १, ताराबाई पार्क) यांनी दिली आहे.

शिंदे हे पत्नी साधना यांच्यासोबत बंगल्यात राहतात. त्यांची मुलगी सौदामिनी सांगलीत शिक्षण घेते. त्यांनी मुलीच्या कॉलेजची फी भरण्यासाठी दोन लाख रूपये जमा करून बेडरूममधील कपाटात ठेवले होते. तिला भेट देण्यासाठी ८० हजार किमतीचा मोबाइलही खरेदी केला होता.

शिंदे दाम्पत्य २३ जानेवारीला मुंबईला विवाहित मुलीच्या घरी गेले होते. ते १२ फेब्रुवारीला परतले. त्यांनी बंगल्याचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण तो आतून बंद होता. त्यांनी आजबाजूला पाहिले असता मागील दारात लावलेल्या मोटारीच्या बॉनेटवर पायाचे व्रण दिसले. त्यांनी जावई यश सोळंकी यांना वरच्या मजल्यावर जायला सांगितले. ते मोटार व ग्रीलवरून पहिल्या मजल्यावर गेले. त्यावेळी पहिल्या मजल्यावर ग्रीलचा खालील बाजूचा एक कोपरा उचकटलेला व काच फोडलेली दिसली. त्यामुळे घरात कुणीतरी येऊन गेले आहे अशी शंका आली. त्यांनी घराचा मुख्य दरवाजा जोरात ढकलून उघडला. आत जाऊन पाहिले असता बेडरूममधील दोन्ही कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. चोरट्यांनी ८८ हजार आणि दहा हजाराचा मोबाइल, रोख दोन लाख रूपये, प्रत्येकी एक तोळ्याच्या दोन बांगड्या, एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन चेन, मंगळसूत्र आणि सहा ग्रॅमच्या तीन रिंगांचे जोड लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिंदे यांच्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर आकारणीत पारदर्शकता हवी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कर आकारणीत सुलभता आणि पारदर्शकता आणणे गरजेचे आहे,' असे विक्रीकर तज्ज्ञ अॅड. दीपक बापट शनिवारी येथे व्यक्त केले. दि चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंट (मुंबई), इन्कमटॅक्स बार असोसिएशन (कोल्हापूर) व टॅक्स कन्सल्टंट असोसिएशन (कोल्हापूर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर विषयक सेमिनारमध्ये ते बोलत होते.

कोल्हापुरातील हॉटेल वुडलँड येथे आयोजित या सेमिनारला जिल्ह्यातील दीडशेहून अधिक टॅक्स क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लावली होती. यात तीन सत्रांत झालेल्या सेमिनारमध्ये मुंबईतील प्राप्तीकर तज्ज्ञ अॅड. के. गोपाल, विक्रीकर तज्ज्ञ अॅड. दीपक बापट, सीए अभय आरोलकर यांनी मार्गदर्शन केले.

अॅड. बापट म्हणाले, 'चाणक्य नीतीमध्ये राजाने कर कसा गोळ करावा, याविषयी अतिशय उत्तम उदाहरण देण्यात आले आहे. मधमाशी जशी फुलाला कोणताही धक्का न पोहचवता, त्रास न देता मध गोळा करते, त्याचप्रमाणे राज्य सरकारनेही सुलभ आणि पारदर्शक करप्रणाली आणली पाहिजे.' याचबरोबर बापट यांनी व्हॅट आकारणीत सामोरे जावे लागणाऱ्या विविध प्रश्नांसंदर्भात मार्गदर्शन केले.

के. गोपाल यांनी प्राप्तिकर आकारणी करताना उत्पन्नात जी वाढ केली जाते. त्यामुळे करदात्यावर येणारा बोजा कसा टाळता येईल, याची माहिती दिली. सीए आरोलकर यांनी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशीप संदर्भात मार्गदर्शन केले.

सेमिनारला उपस्थित मान्यवरांमध्ये मुंबईतील चेंबर ऑफ टॅक्स कन्सल्टंटचे अध्यक्ष सीए अविनाश लालवाणी, इन्कमटॅक्स बार असोसिएशनचे सीए हेमंत परब, अॅड. आर. आर. दोशी, टॅक्स कन्सल्टंट असोसिएशनचे कोल्हापूरचे अध्यक्ष एस. डी. हेर्लेकर आदी उपस्थित होते.

सेमिनार यशस्वी होण्यासाठी अॅड. धीरज शहा, अॅड. अरुण बाहेती, सीए मयुरेश जोशी, विक्रिकर सल्लागार प्रकाश चव्हाण व संजय साळुंखे यांनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एव्हीएच गाशा गुंडाळणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'चंदगड येथील एव्हीएच कंपनी कर्नाटकातील बेल्लारी येथे स्थलांतर करणार आहे. इप्सिलॉन कार्बन कंपनी या नावाने हा प्रकल्प स्थलांतर करण्यासाठी कंपनीनेच असिस्टंट कमिशनर ऑफ सेंट्रल एक्साइज विभागाला पत्र पाठवले आहे. कंपनीचे पत्र चंदगड जनअंदोलन कृती समितीच्या हाती लागले असून, या पत्राद्वारे हा प्रकल्प हद्दपार होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे,' अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत दिली. गेल्या तीन वर्षांपासून चंदगड तालुक्यातील जनतेने या कंपनीविरोधात दिलेल्या लढ्याचे यश असून लढ्याचे नेतृत्व केलेल्या डॉ. नंदिनी बाभुळकर यांचा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमार्फत लवकरच जाहीर सत्कार करणार असल्याचे सांगितले.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'एव्हीएचने नाव बदलून प्रकल्प स्थलांतर करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. ११ जानेवारीला सेंट्रल एक्साइज विभागाला दिले आहे. बेल्लारी (कर्नाटक) येथे प्रकल्प स्थलांतर करण्याची मागणी केली असून अॅक्सेस बँकेचे कर्ज एकरकमी भरावे लागू नये अशी शक्यता यामागे दिसून येत आहे. विनाशकारी प्रकल्पामुळे तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असता. म्हणून जनअंदोलनाच्या माध्यमातून डॉ. बाभुळकर यांनी लढा उभा केला. ११ जानेवारीला सेंट्रल एक्साइजला पत्र देऊनही २९ जानेवारीला नागपुरात कशासाठी बैठक घेतली? याचाच अर्थ कंपनीला सरकारचे काही अधिकारी मदत करत आहे.'

मुश्रीफ यांनी दिलेल्या माहितीबाबत एव्हीएचच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता या अधिकाऱ्याने काहीही बोलण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा नेमबाज जितेंद्रला सुवर्ण

$
0
0

कोल्हापूर : आसामची राजधानी गुवाहटी येथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (सॅग) कोल्हापूरच्या जितेंद्र विभुते याने शनिवारी नेमबाजीत वैयक्तिक ब्रॉन्झ आणि सांघिक सुवर्णपदक पटकावले. जितेंद्रचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आजवरचे हे सर्वांत मोठे यश आहे.

कुवैत येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये अवघ्या काही गुणांनी जितेंद्रचे पदक हुकले होते. ती कसर या स्पर्धेत भरून काढल्याची भावना जितेंद्रने व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलसंकटाची चाहूल

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकला पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी वरदान ठरलेल्या दूधगंगा धरणात केवळ ३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील एकूण जलाशयांत केवळ ५२ टक्के पाणी ‌शिल्लक आहे. पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात यंदा केवळ ४८ टक्के पाऊस झाला. त्यामुळे पावसाळा संपताच पाणी पुरवण्याचे आ‍व्हान निर्माण झाले होते. उन्हाळ्याची सुरुवात होताच पाणीटंचाईचे आव्हान आणखी गहिरे बनले आहे. जिल्ह्याच्यादृष्टीने महत्त्वाच्या अशा दूधगंगा धरणात केवळ ९.८० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी याच धरणात ५३२ द.ल.घ.मीटर पाणीसाठा होता. आज मात्र २८१ द.ल.घ.मीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उर्वरित साडेतीन महिने पाणी पुरवण्याचे आव्हान असेल. दूधगंगेतील उपलब्ध ९.८० टीएमसी पाण्यातील वापरायोग्य साठा ८.५४ टीएमसीच आहे. यातील जवळपास दीड टीएमसी पाणी कर्नाटकच्या वाट्याचे आहे. उर्वरित पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी वापरावे लागणार आहे.

जिल्ह्यातील सर्व जलाशयांमधील मिळून वापरायोग्य पाणी ६४ टीएमसी होते. यातील ५१ टीएमसी पाणी सिंचनासाठी आहे तर ९ टीएमसी पाणी पिण्यासाठी आहे. २.४३ टीएमसी पाणी कर्नाटकसाठी दिले जाते. पाच टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते. गरजेनुसार उपलब्ध पाण्याचा हिशेब केल्यास साडेतीन टीएमसीची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे जलसंकटाची चाहूल आत्तापासूनच लागली आहे. कागल, हातकणंगले, गडहिंग्लज आणि शाहूवाडी तालुक्यांमध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पांची पातळीही घटल्याने मे अखेरपर्यंत शेतीसाठी पाणी पुरवण्याचे आव्हान आहे.


उपयुक्त पाणीसाठा ५२ टक्के

सर्व जलाशयांमधील पाणीसाठा ५८ टक्के असला तरीही यातील उपयुक्त साठा केवळ ५३ टक्केच आहे. दूधगंगा धरणात एकूण ३९ टक्के साठा आहे. यातील केवळ ३४ टक्के साठा उपयुक्त असल्याने दूधगंगा धरणाच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे.


४ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली

जिल्ह्यात खरीप, रब्बी, उन्हाळी आणि बारमाही अशी एकूण चार लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. राधानगरी, दूधगंगा आणि वारणा या तीन धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. यातील राधानगरी आणि वारणा धरणातील साठा समाधानकारक आहे. मात्र दूधगंगा धरणासह जिल्ह्यातील लघु प्रकल्प आणि तलावांमध्ये पाणी पातळी कमालीची घटली आहे.


प्रकल्पनिहाय सिंचन

राधानगरी - ४४ हजार ४३८ हेक्टर

दूधगंग - ३९ हजार २७९ हेक्टर

वारणा - २७ हजार ६९१ हेक्टर

पाटगाव - ९ हजार ८८४ हेक्टर

कासारी - ८ हजार ६२७ हेक्टर

चित्री - ८ हजार ८१२ हेक्टर

कुंभी - ८ हजार १६ हेक्टर

लघु प्रकल्पांसह तलाव - २१ हजार हेक्टर

०००००००००००००

उपलब्ध पाणीसाठा - (टीएमसीमध्ये)

जलाशय सध्याचा गतसालचा

राधानगरी ४.१७ ५.४०

दूधगंगा ८.४१ १७.३५

वारणा १६.३६ २१.५५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हद्दवाढ अभिप्राय आज पाठवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या हद्दवाढीबाबत राज्य सरकारने मागवलेला जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय तयार झाला असून, यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यात सोमवारी(ता. १५) सविस्तर चर्चा झाली. हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या गावांची लोकसंख्या आणि मिळणाऱ्या निधीचा आढावा घेऊन तयार केलेला अभिप्राय मंगळवारी(ता.१६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला जाणार आहे. शहराच्या हद्दवाढीसाठी राज्य सरकारकडे पाठवलेले प्रस्ताव तीनदा नाकारल्याने शहराची हद्दवाढ रखडली आहे. आता नव्याने महापालिकेने पाठवलेल्या प्रस्तावावर राज्य सरकारने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांचा अभिप्राय मागवल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हद्दवाढीसंदर्भात अभ्यासपूर्वक अभिप्राय तयार केला आहे. शहराच्या हद्दीत सतरा गावांचा समावेश होणार की, वीस गावांचा समावेश होणार याबाबत उत्सुकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्रायव्हरला हार्टअॅटॅक

$
0
0

कोल्हापूर : हृदयविकाराचा झटका आल्याने चालकाचा एसटी बसवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात, ३५ प्रवासी जखमी झाले. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आवळी (ता. पन्हाळा) येथील वळणावर सकाळी सव्वा दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अपघातात एसटी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाबूराव सावंत (४५) असे त्यांचे नाव आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळा वाढीला विरोध

$
0
0

घरफाळा वाढीला विरोध

आयुक्तांना महापालिका प्रवेश बंदीचा नगरसेवकांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षीय मतभेद बाजूला ठेवत महापालिकेतील सर्व नगरसेवक संभाव्य घरफाळा वाढीविरोधात एकवटले आहेत. नगरसेवक घरफाळा वाढीविरोधात ठामपणे उभे असून येत्या वीस तारखेच्या सर्वसाधारण सभेत घरफाळावाढीचा ठराव रद्द केला जाईल. नागरिकांवर कोणत्याही प्रकारची घरफाळा लादली जाणार नाही, अशी घोषणा करताना एका पैची वाढ करू देणार नाही, असा इशारा महापौर अश्विनी रामाणे यांनी पत्रकार बैठकीत दिली. महासभेने घरफाळा वाढीचा ठराव फेटाळूनही, आयुक्तांनी त्यांच्या विशेष अधिकारात घरफाळा वाढ केल्यास नगरसेवक त्यांना महापालिकेत प्रवेश करू देणार नाहीत, असा इशारा काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी, ताराराणी आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. शिवसेनेचाही घरफाळा वाढीला विरोध आहे. महापालिकेतील ८५ नगरसेवक घरफाळावाढीविरोधात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

महापौर रामाणे म्हणाल्या, 'जानेवारी २०११ ते जानेवारी २०१५ या कालावधीत भांडवली मूल्य प्रतीवर्षी साधारण दहा टक्क्यांप्रमाणे वाढले आहे. जानेवारी २०१५ च्या भांडवली मूल्याचा विचार केला तर मागील कराच्या चाळीस टक्क्यांपर्यंत वाढ होईल. नागरिक आधीच महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. त्यातच घरफाळा वाढीमुळे जनतेचे कंबरडे मोडेल. सर्वसाधारण सभेत आयुक्तांकडून आलेल्या प्रस्तावावर चर्चा होऊन गेल्या वर्षातील कराच्या दराप्रमाणे करआकारणी कायम ठेवण्यास तसेच २०११ च्या भांडवली मूल्यावरच फाळा निश्चित करण्यात येणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात येऊ नये असा निर्णय घेण्यात येणार आहे.'

ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम म्हणाले, 'चाळीस टक्क्यांपर्यंतची फाळा वाढ मान्य नाही. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने मिळकतींचे सर्वेक्षण आवश्यक आहे. शहरातील

१५ ते २० हजार मिळकतींना अद्यापही घरफाळा लागू झालेला नाही.'

पत्रकार परिषदेला महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, लाला भोसले, संभाजी जाधव, प्रविण केसरकर, सुनील पाटील, प्रतिक्षा पाटील, अफलजल पिरजादे, छाया पोवार, राजसिंह शेळके उपस्थित होते.


शहरातील मिळकतीच्या सर्वेसंदर्भात स्थायी समितीत निर्णय घेतला आहे. यामुळे नवीन मिळकतीच्या माध्यमातून घरफाळ्यात निश्चित वाढ होईल. सर्वेक्षणात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी योग्य कार्यप्रणाली अवलंबून काम व्हावे. शहरातील एकही मिळकत करआकारणीविना राहू नये, असे काम प्रशासनाने केल्यास उत्पन्नात वाढ होईल.

मुरलीधर जाधव (स्थायी समिती सभापती)


सर्व नगरसेवक नागरिकांच्या भावनांशी सहमत आहेत. घरफाळा वाढ होणार नाही, याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. फाळा वाढीला आम्ही सर्व ताकदीनिशी विरोध करणार आहोत.

अश्विनी रामाणे, महापौर

महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली आहे. घरफाळा वाढ ही कायदा आणि नियमानुसार होत आहे. महापालिकेचे कामकाज हे नियमानुसार चालते. कायदा आणि नियमांच्या अंमलबजावणीला प्राधान्य असेल. सभागृहाने घरफाळावाढीचा ठराव फेटाळला तर राज्य सरकारकडे योग्य मार्गदर्शन मागविले जाईल.

पी. ​शिवशंकर, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीबीआय तपासणार दाभोलकर-पानसरे हत्या कनेक्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येवेळी मारेकऱ्यांनी वापरलेल्या शस्त्रांमध्ये साम्य असल्याने कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येतील रिकाम्या पुंगळ्यांसह गोळीची तपासणी करण्यासाठी सीबीआयने त्या आपल्याकडे देण्याची मागणी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडे केली होती. मंगळवारी कोर्टाने या तपासणीला परवानगी दिली. सीबीआयकडून डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येतील शस्त्रांमधील साम्य तपासले जाणार आहे. याची तपासणी दिल्लीच्या सेन्ट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये होणार आहे. याचा अहवाल २९ फेब्रुवारीला हायकोर्टात मांडला जाणार आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २ ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या झाल्यानंतर आठ महिन्यांनी १६ फेब्रुवारी २०१५ ला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या झाली होती. दोन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याने यामागे एकाच प्रकारची शक्ती असावी असा संशय डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यामुळेच या दोन्ही हत्यांचा तपास एकत्रित आणि उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली व्हावा अशी मागणीही केली होती. यानुसार तपास करणाऱ्या यंत्रणांनी दोन्ही हत्यांमधील साम्य शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. दोन्ही हत्यांमध्ये वापरात आलेले पिस्तूल आणि गोळ्यांमध्ये समानता आढळली आहे, त्यामुळेच सीबीआयचे अप्पर पोलिस अधीक्षक एस. आर. सिंग यांनी पानसरे हत्येतील पाच रिकाम्या पुंगळ्या आणि एक गोळी तपासणीसाठी मिळावी यासाठी जिल्हा सरकारी वकील दिलीप मंगसुळे यांच्याकरवी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्याकडे सोमवारी अर्ज केला होता. मंगळवारी या अर्जावर सुनावणी होऊन पाच रिकाम्या पुंगळ्या आणि एक गोळी तपासणीसाठी सीबीआयच्या ताब्यात देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.


पाच पुंगळ्या आणि एक गोळी

कॉम्रेड पानसरे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांना घटनास्थळावर पाच रिकाम्या पुंगळ्या आणि एक गोळी मिळाली होती. ७.६५ एमएम आकाराच्या पाच पुंगळ्या आणि ७.६५ एमएम आकाराची गोळी मिळाली होती. या पुंगळ्या आणि गोळ्या सीबीआयने ताब्यात घेतल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाउंड्री उद्योगला मिळणार बुस्टर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईत सुरू असलेल्या 'मेक इन इंडिया'च्या पहिला उद्योग मेळाव्याच्या माध्यमातून कोल्हापूरच्या उद्योगांना विशेषतः फाउंड्री उद्योगाला बुस्टर डोस मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. येत्या वर्षभरात या व्यवसायाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा उद्योजकांना आहे.

'मेक इन महाराष्ट्र'मधून होणाऱ्या गुंतवणुकीत कोल्हापूरसाठी मोठ्या उद्योगाची घोषणा झालेली नसली, तरी पुणे आणि इतर ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या मोठ्या कारखान्यांच्या माध्यमातून कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगाला अच्छे दिन येणार असल्याचे मत उद्योजकांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केले. तसेच कोल्हापूरला फाउंड्री हब घोषित करण्यासाठीही उद्योजकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही उद्योजकांनी सांगितले.

मुंबईतील मेळाव्यास 'स्मॅक', 'गोशिमा', 'मॅक' या तिन्ही औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी आणि उद्योजकांनी भेट दिली. मेळाव्यात कोल्हापूरसाठी कोणत्याही मोठ्या उद्योगाची घोषणा झालेली नाही. गुंतवणुकीचा ओघ पुणे जिल्ह्यात चाकण आणि विदर्भात मिहान प्रकल्पात आहे. मात्र, चाकणमधील गुंतवणूक कोल्हापूरच्या फाउंड्री उद्योगाच्या फायद्याची असल्याचे उद्योजकांनी सांगितले. ही गुंतवणूक वेगाने झाली, तर येत्या वर्षभरात फाउंड्री उद्योगाचे चित्र पालटेल, अशी आशा उद्योजक व्यक्त कर आहेत.


पुण्यात उभ्या राहणाऱ्या कारखान्यांना छोटे मोठे पार्टस् आयात करणे खर्चिक होणार आहे. त्यातच कास्टिंगबाबत कोल्हापूर जगभरात प्रसिद्ध असल्याने साहजिकच हे कारखाने कोल्हापूरला प्राधान्य देतील.

- एच. एस. धोत्रे, फाउंड्री उद्योजक


महामार्गावर सहापदरीचे काम सुरू असल्याने पुण्यात होणारी गुंतवणूक कोल्हापूरच्या दारात आल्यासारखी आहे. पुण्यातील गुंतवणूक आणि प्रस्तावित मुंबई-बेंगळुरू इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचा कोल्हापूरला निश्चितच फायदा होईल.

- सुरेंद्र जैन, अध्यक्ष 'स्मॅक'


कोल्हापूर परिसरात मोठ्या उद्योगासाठी जागा उपलब्ध नसल्याने मोठ्या उद्योगाची घोषणा झाली नाही. सध्या 'मेक इन इंडिया' चा थेट फायदा दिसत नसला, तरी भविष्यात अच्छे दिन नक्कीच येणार आहेत.

- संजय जोशी, अध्यक्ष 'मॅक'

कोल्हापुरात आयटी पार्क

मुंबईतील 'मेक इन इंडिया' मेळाव्यात मनोरमा इन्फोसोल्युशन्सच्या सीइओ अश्विनी दानिगोंड यांनी राज्यातील गुंतवणूक आणि रोजगारवाढी संदर्भात एक प्रेझेंटेशन केले आहे. यात महाराष्ट्रात आयटी उद्योगासाठी पोषक वातावरण असल्याचे नमूद करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्यांनी कोल्हापुरात आयटी उद्योगाला चालना देण्याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे भविष्यात पुण्याप्रमाणेच कोल्हापुरातही आयटी उद्योग येण्याची आशा निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयडीसी वगळून हद्दवाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली हद्दवाढ झालीच पाहिजे, अशा अभिप्रायासह हद्दवाढीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मंगळवारी सरकारकडे सादर केला. प्रस्तावातून गोकुळ शिरगाव व शिरोली एमआयडीसी वगळल्या आहेत. त्यामुळे १८ गावांचा समावेश या प्रस्तावात केला आहे. आता सरकारकडून निर्णयाची प्रतिक्षा आहे.

शहराच्या हद्दवाढीसाठी यापूर्वी ४० गावांचा, त्यानंतर १९ गावांचा प्रस्ताव महापालिकेने सरकारकडे सादर केला होता. सरकारने ते दोन्ही प्रस्ताव फेटाळले होते. सध्या नवीन सरकार आल्यानंतर महापालिकेच्यावतीने या प्रस्तावाला पुन्हा चालना देण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन हद्दवाढ करण्याची मागणी केल्यानंतर शहराच्या हद्दीपासून एक किलोमीटरच्या आतील जी गावे आहेत त्यांचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार पुन्हा नव्याने केलेल्या प्रस्तावात दोन एमआयडीसींचा समावेश होता. यानुसार नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांचा अभिप्राय मागवला होता. दरम्यान आलेल्या विविध निवडणुकांमुळे अभिप्रायास बराच कालावधी लागला होता.

प्रस्तावाची माहिती देताना सैनी म्हणाले, 'अभिप्राय देण्यापूर्वी लोकप्र​तिनिधी, पालकमंत्र्यांशी चर्चा केली. शहराची हद्दवाढ झाली नसल्याने विस्तार झालेला नाही. परिणामी शहरात उंच इमारती होत असून हद्दवाढीमुळे शहराचा विस्तार होईल. सीमेवरील गावांचा समावेश झाल्यानंतर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून फंड मिळणार नाहीत. त्यासाठीचे नियोजन महापालिका पातळीवर होण्याची आवश्यकता आहे. तेथील विकास निधीबाबतची दक्षता महापालिकेकडून घेण्याची गरज आहे.'

सरकारकडे सादर केलेला हा तिसरा प्रस्ताव आहे. महापालिकेने प्रस्ताव तयार करताना एक किलोमीटरच्या अंतरावरील गावांचा समावेश केला आहे, पण त्याबरोबरच ज्या गावातील लोकसंख्येची घनता जास्त जास्त आहे तसेच शेतीव्यतिरिक्त व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची टक्केवारी पाहून त्या गावांचाही समावेश केला आहे.

०००००००

महापालिकेच्या ११ जून २०१५ च्या सभेमध्ये प्रस्ताव मंजूर

१२ जून २०१५ रोजी सरकारकडे सादर

महापालिकेच्या प्रस्तावानुसारची गावे

एक किलोमीटरच्या अंतरातील गावे

शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिंगे, वाडीपीर, मोरेवा​डी, पाचगाव, कळंबा, शिरोली, उचगाव, शिंगणापूर, गोकुळ शिरगाव

लोकसंख्या व विकासाच्या वेगाच्या आधारित समाविष्ट गावे

नागाव, वळीवडे गांधीनगर, गड मुडशिंगी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images