Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘इंग्रजी’तील चुकांनी विद्यार्थी बेजार

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या बी. कॉम. भाग १ च्या अनिवार्य इंग्रजीच्या पुस्तकात प्रचंड मुद्रण चुका आढळून येत आहेत.

निधी अन्य ठिकाणी वळवला

$
0
0
‘वारणा भारतीय सेना मदत निधी’ अन्य कामांसाठी वळविलेला आढळतो, असे मत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. डी.वाय. चंद्रचूड आणि एस.सी.गुप्ते यांनी व्यक्त केले आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक नारायण पोवार व न्यायालयात याचिका दाखल केलेले शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत यांनी दिली.

पुन्हा रिपरिप

$
0
0
आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दिवसभर हजेरी लावली. सकाळपासून पडत असलेल्या हलक्या सरींमुळे शहरात पावसाळी वातावरणाने गारवा निर्माण झाला आहे.

पक्षकार अनुभवणार ‘तारीख पे तारीख’

$
0
0
खंडपीठाच्या मागणीसाठी गुरुवारपासून न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याच्या वकिलांच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील दिवाणी, फौजदारी, ग्राहक, सहकार, धर्मादाय आदी सर्वच न्यायालयांचे कामकाज बंद राहणार आहे.

आरटीई कायद्यांतर्गत ३१ ऑक्टोबर डेडलाईन

$
0
0
शाळांमधील मूलभूत सुविधांच्या विकासाकरिता केंद्र सरकारने आरटीई कायद्यातंर्गत घालून दिलेल्या १० अटींची पूर्तता ३१ ऑक्टोबरपर्यंत न केल्यास संबंधित शाळांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे.

‘रंकाळा’प्रश्नी विशेष सभा बोलवा

$
0
0
रंकाळा तलावातील प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजना व भविष्यात तलावाच्या विकासासंबधी आखलेले धोरण यासंबधी नागरिकांना माहिती मिळावी यासाठी महानगरपालिकेने विशेष सभेचे आयोजन करावे, अशी मागणी रंकाळा तलाव संवर्धन व सरंक्षण आंदोलन समितीने आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे केली. समितीच्यावतीने आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

आता बारकोडेड रेशनकार्ड

$
0
0
स्वस्त दरात धान्य देणाऱ्या अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची तयारी असून याअंतर्गत बारकोड रेशनकार्ड देण्याची योजना आहे. कुटुंबातील महिलेच्या नावाने हे कार्ड तयार करण्यात येणार असून तिचा फोटोही त्यामध्ये छापण्याचे नियोजन आहे.

आता पोलिस घेणार ऑनलाइन फिर्याद

$
0
0
आता पोलिसांत तक्रार नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष पोलिस ठाण्यात जाण्याची गरज पडणार नाही. कारण, तक्रार ऑनलाइन नोंदवण्याची सुविधा कोल्हापूर पोलिस उपलब्ध करून देणार आहेत.

सुरक्षा मंडळाकडून संरक्षण घ्या

$
0
0
‘आयआरबी’ला टोल वसुलीसाठी संरक्षण पुरवण्यास असमर्थ असल्याचे प्रतिज्ञापत्र जिल्हा पोलिस अधीक्षक विजयसिंह जाधव यांच्या वतीने बुधवारी मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आले.

हायकोर्टाच्या खंडपीठासाठी एल्गार

$
0
0
हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.२९) कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ‌या सहा जिल्ह्यातील वकिलांचा बेमुदत बंद सुरू होणार आहे.

अतिक्रमणे न काढल्यास फौजदारी

$
0
0
महालक्ष्मी मंदिरात करण्यात आलेले रचनात्मक फेरबदल दुरूस्त करण्याबाबत तसेच मंदिरातील अतिक्रमणे हटविण्याबाबत १५ दिवसांत कारवाई न केल्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीविरुद्ध उच्च न्यायालयात फौजदारी दाखल करण्यात येईल, असा इशारा अॅड. नरेंद्र गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मूल दत्तक घेण्यासाठी वेटिंग

$
0
0
मुलगी दत्तक घेण्यासाठी किमान अडीच तर मुलासाठी किमान सहा वर्षे प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे बालकल्याण संकुलातील शिशुगृह तसेच शिशु आधार केंद्रात सध्या ७० पालक मूल दत्तक घेण्यासाठी वेटिंगवर आहेत. त्यातील सर्वच पालक दत्तक म्हणून जास्तीत जास्त सहा महिन्यापर्यंतच्याच बाळाचाच आग्रह धरतात.

अंधांच्या पुनर्वसनाला ऑर्केस्ट्राचा आधार

$
0
0
वसत‌िगृहाचा महिन्याचा खर्च २५ हजार रूपये भागविण्यासाठी दानशूर व्यक्तींच्या मदतीबरोबर आपणही प्रयत्न केले पाहिजेत, या भावनेतून अंध विद्यार्थ्यांनी आर्केट्रा व बेंजोचा आधार घेतला आहे. हणबरवाडी येथील अंध युवक मंचच्यावतीने या आर्केस्ट्रा व बेंजोची निर्मिती करण्यात आली आहे.

भवनमधील सेंद्रिय खत प्रकल्प सुरू

$
0
0
शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी भवन येथील विद्यार्थ्यांनी वाया जाणाऱ्या अन्नापासून खत बनवण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. यामुळे वाया जाणारे अन्न कोठे टाकायचे हा प्रश्नही निकालात निघाला असून सेंद्रिय खतही उपलब्ध झाले आहे.

यंदाही लाभणार मूर्तिदानाला प्रतिसाद

$
0
0
उत्सवाला सामाजिक प्रबोधनाची जोड देत, पर्यावरणपूरक उत्सवाची साद घालत शहरवासीयांनी गणेशमूर्ती दान उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला. शहरवासीयांच्या पावलावर पाऊल टाकत ग्रामीण भागातील नागरिकांनी आम्ही तुमच्याबरोबर असल्याचे दाखवून दिले.

‘कॅम्पस’ फॉर यू!

$
0
0
कॉलेजमध्ये अगदी सर्रास विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूचे प्रोग्रॅम होत असतात. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होण्यासारखे दुसरे भाग्य असत नाही. कारण पास होण्यापूर्वीच नोकरी पदरात पडलेली असते. पण कॅम्पस क्रॅक करणे तेवढे सोपे नसतेच.

अजय शेंडगे, पृथ्वीराज पाटील कुस्ती स्पर्धेत विजयी

$
0
0
मोतीबाग तालीम येथे सुरू असलेल्या शहरस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत १४ वयोगटातील ५५ किलो गटात विद्यापीठ हायस्कूलच्या अजय शेंडगेने तर १७ वयोगटातील १०० किलो गटात वि. स. खांडेकर हायस्कूलच्या संग्राम पाटीलने प्रथम क्रमांक पटकावला. शहर व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाने स्पर्धेचे आयोजन केले आहे.

वकिलाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी संशयित तरूणीला अटक

$
0
0
नागाळा पार्क येथे एका वकिलाचा युवतीकडून खून करण्यात आल्याच्या संशयाने पोलिसांनी तिला गुरुवारी सकाळी अटक केली. नसिर युसुफ काझी (वय ५४, चौरंगी अपार्टमेंट, नागाळा पार्क) असे संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या वकिलाचे नाव आहे.

आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा क्रीडादिनी सत्कार

$
0
0
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय व कोल्हापूर जिल्हा हॉकी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील आजी-माजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. हॉकीतील जादूगार मेजर ध्यानचंद यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

ग्राहक चळवळ व्यापक लोकचळवळ

$
0
0
‘ग्राहकांच्या हक्कासाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत असल्याने ग्राहक चळवळ आता एक व्यापक लोकचळवळ म्हणून पुढे येत आहे,’ असे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष संजय हुक्केरी यांनी केले. राधानगरी येथे आयोजित तालुका मेळाव्यात ते बोलत होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images