Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नगरसेवकांच्या कृपेने फूटपाथवरही केबीन्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील वाहतुकीला शिस्त आणि चौक अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासन एकीकडे फेरीवाला धोरण आणि पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणीच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे शहरात दररोज अनधिकृत खोक्यांची भर पडत आहे. शहर स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका असणाऱ्या नगरसेवक, माजी लोकप्रतिनिधींनी अनधिकृत खोकीधारकांना पाठीशी घातले आहे. आजी-माजी नगरसेवकांच्या आशिर्वादाने ​शहरात बेकायदेशीर खोकी, टपऱ्या वाढत आहेत. कायदेशीर खोक्यांच्या संख्येत बेसुमार वाढ होत असताना अतिक्रमण निर्मूलन पथकाची कारवाई मात्र ढिम्म आहे.

दसरा चौक, महाराणा प्रताप चौक, बिंदू चौक, ताराबाई रोड, मिरजकर तिकटी परिसर, रंकाळा तलाव परिसर, खाऊ गल्ली, कसबा बावडा मुख्य रोड, महावीर कॉलेज परिसर, महावीर उद्यान, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, सायबर चौक, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूल परिसरात महापालिकेच्या नियमांना फाट्यावर बसवून अनधिकृत खोकी सुरू होत आहेत. यावर कारवाई करायला अतिक्रमण निर्मूलन पथकावर मर्यादा आहेत. अतिक्रमण निर्मूलन पथकाचे अ​धिकारी कारवाईला पुढे सरसावल्यानंतर बहुतांश ठिकाणी आजी-माजी नगरसेवकांकडून आडकाठी आणली जाते.

बेकायदेशीर खोकीधारकांना लगाम घालण्याऐवजी नगरसेवक उलटा पवित्रा घेत अधिकाऱ्यांनाच दमदाटी करतात. दोन दिवसांपूर्वी महावीर उद्यान परिसरात दोन खोकी बसवण्याचे काम बेकायदेशीररित्या सुरू होते हे पथकाच्या निदर्शनास आल्यावर कारवाईसाठी कर्मचारी गेले. मात्र या भागातील नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांनाच दमदाटी करत कारवाई रोखली.

फूटपाथवरही केबीन

पादचाऱ्यांच्या सोयीसाठी फूटपाथ बांधण्यात आले. शहरातील विविध भागातील फूटपाथवर केबिन थाटून फूटपाथ अडवले आहेत. फूटथावरच केबिन थाटून व्यवसाय सुरू आहेत. दसरा चौक, स्वयंभू गणेश मंदिर चौक, बिंदू चौक येथे तर फुल विक्रेते, नारळ विक्रेते, चायनिज सेंटर विक्रेत्यांनी फूटपाथवर अतिक्रमण केले आहे. खाऊ गल्लीत तर अनधिकृत खोकी वाढल्या आहेत. या ठिकाणी खोकीधारकांना व्यवसाय सुरू करताना कसलेही नियम पाळले नाहीत. वाढती खोकी, वाहनांचे पार्किंग आणि नागरिकांची गर्दी यामुळे संध्याकाळी सात नंतर या परिसरात वाहतुकीचा फज्जा उडतो. अनेकजण रस्त्यावर वाहने पार्क करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

फेरीवाला संघटनांची दुटप्पी भूमिका

शहरात फेरीवाल्यांच्या विविध संघटना कार्यरत आहेत. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी संघटना प्रयत्नशील आहेत. महापालिका प्रशासनाने, सुरळीत वाहतूक आणि पार्किंगची कोंडी टाळण्यासाठी गर्दीचे आणि रहदारीचे मार्ग 'नो हॉकर्स झोन'म्हणून निश्चित केले आहेत. मात्र याच ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी मिळावी असा फेरीवाला संघटनांचा आग्रह आहे. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी आग्रही असणाऱ्या संघटना मात्र शहरातील अनधिकृत खोकीबद्दल बोलायला तयार नाही. रस्त्यावर काम करण्याचा प्रत्येकाला अ​​धिकार आहे अशी भू​मिका मांडत नेते मंडळी अनधिकृत खोकीधारकप्रश्नी अंग झटकत आहेत.

आयुक्तांकडे अहवाल

अनधिकृत केबिन, फेरीवाले, खोकीधारक यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. पोलिस बंदोबस्तात कारवाईचे नियोजन आहे. कारवाईचा बडगा उगारला नाही तर खोकी बेसुमार वाढतील असा अहवाल अधिकाऱ्यांनी शहर अभियंता कार्यालयाकडे सादर केला आहे. या आठवड्यात आयुक्तांशी चर्चा करून कारवाईचा निर्णय होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विमानतळासाठी आणखी निधी देणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे ः 'राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात येणार असून, विमानतळाच्या विकासासाठी अत्यावश्यक निधी दिला जाणार आहे,' असे राज्याचे वित्त आणि नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी सांगितले. कोल्हापूरने केलेल्या अतिरिक्त ९३ कोटी ६० लाख रुपयांच्या मागणीबाबत आवश्यक ती तपासणी केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. अंबाबाई मंदिर परिसराचा कालापालट करण्यासाठी नव्याने मंदिर परिसर विकास आराखडा देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

विधानभवनात जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारूप आराखड्याच्या बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, जलसंपदामंत्री विजय शिवतारे, कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनिल पोरवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, आमदार उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार आदी उपस्थित होते.

'कोल्हापूरने केलेल्या अतिरिक्त ९३ कोटी ६० लाख रुपयांच्या मागणीबाबत आवश्यक ती तपासणी केल्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे. महालक्ष्मी देवस्थानामुळे कोल्हापूरला विशेष महत्त्व असून, कोल्हापूर जिल्ह्याने केलेला महालक्ष्मी मंदिर परिसर विकास आराखडा पुन्हा दोन टप्प्यात करावा. त्यामध्ये धर्मशाळा, मंदिर परिसराचा पादचारी मार्ग विकास, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा यंत्रणा विकास, निर्माल्यापासून खतनिर्मितीसाठी संयंत्र बसविणे, पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर आदी बाबींचा विचार करण्यात यावा,' असे मुनगंटीवर म्हणाले.

कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येणार आहे. आमदार विकास निधी हा रस्ते, दळणवळणाच्या सुविधा निर्माण करणे, रोजगारनिर्मिती करणे आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी उपाययोजनांवर खर्च करावा, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील क्षारपड जमिनींचा प्रश्न पाहता लोकांना जलशिक्षण देण्याची विशेष आवश्यकता आहे. क्षारपड विकासासाठी सेंद्रीय शेतीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. वनक्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सुचविले.

जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कोल्हापूरच्या जिल्हा वार्षिक योजना २०१६ १७ चे सादरीकरण केले. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २१६ कोटी १९ लाख रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजना १०० कोटी ८१ लाख रुपये, तर आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेसाठी एक कोटी ८० लाख ६८ हजार रुपयांची मागणी आहे. कोल्हापूर जिल्ह्याची एकूण वार्षिक योजना ३१८ कोटी ८० लाख रुपयांची आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ९३ लाख ६० लाख रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


निरुपयोगी योजनांवर खर्च नको!

नावीन्यपूर्ण योजनांचा कितपत उपयोग जनसामन्यांसाठी होणार आहे, याचा साकल्याने विचार करूनच अशा योजनांवर पैसा खर्च करावा. उपयोगी नसलेल्या योजनांवर पैसा खर्च करू नका, अशी सूचना वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सांगली जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारूप आराखड्याच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवकाच्या मुलासह पाच जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाजीनगर-सुधाकर जोशी नगरातील जुगार अड्ड्यातील वाटणीवरून झालेल्या मारामारीप्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलासह पाच जणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. रविवारी रात्री ही घटना घडली होती.

सागर खंडू कांबळे (वय २२), सुशांत मनोहर वाघमारे (२०, दोघे रा. राजेंद्रनगर), विश्वनाथ उर्फ बिल्डर सौदागर कांबळे (१९, रा. जवाहरनगर), मार्शल मुकुंद गडदे (४५, रा. दुसरी गल्ली, राजारामपुरी), अभिजित संतोष लोखंडे (२०, रा. राजेंद्रनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणातील फिर्यादी दिगंबर गोविंद पाटील (२२ रा. लक्षतीर्थ वसाहत) याचा जुगारअड्डा असून त्यात सागर खंडू कांबळे यांची पार्टनरशीप आहे. जुगार अड्ड्यातील वाटणीवरून दिगंबर व सागर यांच्यात वाद झाला. या वादातून सागर आणि अन्य चौघांनी दिगंबरला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. जुगार अड्ड्याचे नुकसान केले. दरम्यान, जुगार अड्ड्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असून पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांनी परिसरातील अड्डे बंद करावेत, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केट यार्ड उड्डाणपुलासाठी पाहणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू मार्केट यार्ड आणि टेंबलाईवाडी परिसरातील नवीन मार्केट यार्ड यांना जोडण्यासाठी या भागात उड्डाणपूल उभारणीचा विचार सुरू आहे. या बाबत मार्केट कमिटी व सहकार विभागाच्यावतीने पाहणी करण्यात आली. त्याचा लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना अहवाल देण्यात येणार आहे.

शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी टेंबलाईवाडी परिसरात धान्य व्यापाऱ्यांसाठी मार्केट यार्डची बांधणी झाली आहे. लक्ष्मीपुरीतील व्यापाऱ्यांना याठिकाणी स्थलांतरित करण्याचे प्रस्तावित आहे. शाहू मार्केट यार्ड व टेंबलाईवाडी मार्केट यार्डमधील कनेक्टिव्हीटी वाढावी, नवीन यार्डात व्यापाऱ्यांनी स्थलांतरित व्हावे यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याकरिता दोन्ही मार्केट यार्डना जोडण्यासाठी उड्डाणपूल किंवा फाटक उभारणीचा विचार आहे.

जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे, बाजार समिती सभापती परशुराम खुडे, उपसभापती विलास साठे, संचालक सदानंद कोरगावकर, नंदकुमार वळंजू, अमित कांबळे, कृष्णात पाटील यांच्यासह इंजिनीअर यांनी या परिसराची पाहणी केली. उड्डाणपूल आणि फाटक ​निर्मितीचा अहवाल तयार केल्यानंतर पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली जाणार आहे.प्रस्ताव तयार झाल्यानंतर पालकमंत्रीसह, रेल्वे खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरले आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करावा अशी बाजार समितीची मागणी आहे. यासह बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांसाठी निवास व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह, चांगल्या दर्जाचे रस्ते या कामाविषयी चर्चा झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनता बझारवर प्रशासक ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑप कंझ्युमर स्टोअर्सच्या कारभारात असलेल्या अनियमितता व मिळकतींबाबत असलेल्या संशयास्पद व्यवहाराबाबत जिल्हा उपनिबंधकांनी प्रशासक नेमण्याच्यादृष्टीने प्रक्रिया सुरू केली. करवीरच्या सहाय्यक निबंधकांना प्रशासक नेमण्यापूर्वीची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जनता बझारचा विषय पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत.

प्रजासत्ताक सा​माजिक सेवा संस्थेच्यावतीने जनता बझारवर प्रशासक नेमण्याची मागणी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे केली होती. मागणीसोबत संस्थेच्या अनियमिततेची कागदपत्रे जोडली आहेत. जनता बझारने महापालिकेशी केलेल्या कराराचा पोटभाडेकरु नेमून केलेला भंग, पोटभाडेकरुंचे उत्पन्न न दाखवणे, लेखापरीक्षकांना राजारामपुरी येथील जमिनीचा व्यवहार व करार झाल्याचे दाखवले होते. पण मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडून तसा व्यवहारच झाला नसल्याचे पत्र दिले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पंचनाम्यात दुसऱ्याच व्यक्ती मिळकतीत व्यवसाय करत असल्याचे नोंदवले आहे. इतर मिळकतीबाबतही असाच व्यवहार झाला असण्याची शक्यता आहे. त्याचे पुरावे जोडल्याने संस्थेवर प्रशासक नेमून कारभाराची चौकशी करण्याची मागणी प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी केली होती. त्याचा विचार करून जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकशीत दिरंगाईबद्दल हायकोर्टाचे ताशेरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील चौकशीत होणारी दिरंगाई म्हणजे न्यायदान प्रक्रियेची पायमल्ली आहे, असे ताशेरे मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश साधना जाधव यांनी ओढले. पानसरे हत्या सुनावणीची प्रक्रिया कोल्हापूरबाहेर राबवावी, या मागणीसाठी पानसरे हत्येतील प्रमुख आरोपी समीर गायकवाडचे वकील संजीव पुनाळकर यांनी याचिका दाखल केली आहे.

सरकारच्यावतीने अॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे व अॅड. मानकुंवर देशमुख यांनी बाजू मांडली. चौकशीत दिरंगाई होत आहे असे निरीक्षक कोर्टाने नोंदवले. दरम्यान याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी पानसरे कुटुंबियांचे मत विचारात घ्यावे, असा अर्ज अॅड. अभय नेवगी यांनी दिला. पानसरे कुटुंबियांचा अर्ज कोर्टाने मंजूर केला. या खटल्यात सरकारने सादर केलेले प्रतिज्ञापत्र सोमवारी मिळाले असल्याने मुदत मिळावी, अशी मागणी समीरचे वकील पुनाळकर यांनी केली. त्यानुसार पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.


समीरला अंडासेलमधून हलविण्याची मागणी

दरम्यान, समीरचे मानसिक खच्चीकरण होत असल्याने त्याला कळंबा कारागृहातील अंडा सेलमधून बाहेर काढावे, अशी मागणी त्याचे वकील एस.एस. पटवर्धन यांनी कोल्हापुरात सत्र न्यायाधीश एम.डी. बिले यांच्याकडे केली. त्यावर कारागृह अ​धीक्षकांचे मत घेऊन याबाबत निर्णय दिला जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले. पुढील सुनावणी २३ फेब्रुवारीला होणार आहे. मंगळवारी दुपारी न्यायाधीश बिले यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. सुरक्षेच्या कारणावरून समीरला कोर्टात न आणता सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे घ्यावी, असा अर्ज पोलिस प्रशासनाच्यावतीने देण्यात आला. या मागणीला समीरचे वकील पटवर्धन यांनी आक्षेप घेतला.

कलबुर्गींच्या हत्येचा तपास निष्कर्षापर्यंत

बेळगाव ः दरम्यान, ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू असून, पुराव्या आधारे एका निष्कर्षापर्यंत पोलिस लवकरच पोचतील, असा विश्वास कर्नाटकचे कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अलोक मोहन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कर्नाटक पोलिस गोवा आणि महाराष्ट्राच्या पोलिसांच्या संपर्कात असून, त्यांच्याशी माहितीची देवाणघेवाण सुरू आहे. ही माहिती कोणती ते उघड करता येणार नाही, तसे केल्यास तपासात अडथळे निर्माण होऊ शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आहे तिथेच पुनर्वसनाचा हट्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नो हॉकर्स झोन'मधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी पर्यायी जागांचा शोध सुरू असताना फेरीवाला संघटनांच्या प्र​तिनिधींनी सध्याच्या ठिकाणीच व्यवसाय सुरू ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेऊन ज्या-त्या मार्गावर सध्याच्या जागेपेक्षा मागे सरून व्यवसाय प्रशासनाने मान्यता द्यावी असा प्रस्ताव फेरीवाला संघटनांच्या प्रतिनिधींनी ठेवला. आगामी तीन दिवसात अधिकृत फेरीवाल्यांची माहिती एकत्र करून पुन्हा बैठक घेण्याचे ठरले.

दरम्यान, फेरीवाल्यांकडून पुनर्वसन व पर्यायी जागेसंदर्भात सूचना मागविल्या आहेत. पुढील दिशा ठरविण्यासाठी संघटनेच्या प्रतिनिधींची १२ फेब्रुवारी रोजी पुन्हा बैठक होणार आहे. तर प्रशासनासोबत १५ फेब्रुवारी रोजी बैठक होईल. शहर फेरीवाला कृती समितीचे नेते सुभाष वोरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीवरून गेले काही दिवस प्रशासन आणि फेरीवाला संघटनांत एकमत होत नाही. प्रशासनाने महाद्वार रोड, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक, शिवाजी चौक, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, मिरजकर तिकटीसह ७४ ठिकाणे 'नो हॉकर्स झोन' म्हणून घो​षित केली आहेत. मात्र फेरीवाल्यांचा याच जागेसाठी हट्ट आहे. यावेळी बोलताना वोरा यांनी फेरीवाले उद्धवस्त होणार नाही, ही समितीची भूमिका कायम राहील असे स्पष्ट केले. चर्चेत माजी महापौर नंदकुमार वळंजू, कॉम्रेड दिलीप पोवार, महंमदशरीफ शेख, अशोक भंडारे, राजेंद्र महाडिक, किरण गवळी यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीक्षान्त समारंभ २७ फेब्रुवारीला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या ५२ व्या दीक्षान्त समारंभाची तयारी सुरु झाली आहे. हा समारंभ येत्या २७ फेब्रुवारीला करण्याचे नियोजन आहे. या पदवीदान समारंभासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. डी. यादव आणि केंद्रीय राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांचे नावही चर्चेत आहे. विद्यापीठात मंगळवारी झालेल्या बैठकीत मात्र ज्येष्ठ शास्त्रज्ञ जी. डी. यादव यांचे नाव निश्चित केल्याचे समजते.

मूळचे अर्जुनवाडा (ता. राधानगरी) चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. डी. यादव यांनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. 'इन्स्टि्ट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नियुक्त केले गेलेले डॉ. जी. डी. यादव कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. डॉ. यादव केमिकल इंजिनीअर म्हणून प्रसिद्ध आहेतच; शिवाय ग्रीन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, एनर्जी इंजिनीअरिंग आणि कॅटॅलिक सायन्स यांसारख्या विषयांत त्यांनी केलेल्या मूलभूत संशोधनामुळे एक विख्यात शास्त्रज्ञ म्हणूनही प्रसिद्ध आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी संशोधनाला चालना देत आहेत. त्यासाठी डॉ. जी. डी. यादव यांनी निमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांच्याकडे कौशल्य विकास आणि उद्योजकता असा स्वतंत्र कार्यभार आहे. त्यांनीही निमंत्रित करण्याची चर्चा आहे.

पदवीदान समारंभ १५ फेब्रुवारीच्या दरम्यान करण्याचे नियोजन होते. मात्र विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांचा परदेश दौरा आणि प्रमखु पाहुणे निश्चित झाले नसल्याने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा समारंभ निश्चित करण्यात आला आहे. या पदवी समारंभात ५० हजार स्नातकांनी पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षक संघाच्या मालकीचे गुऱ्हाळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षक संघावर आमचाच हक्क अशा वल्गना पुन्हा एकादा शिक्षक संघटनांच्या नेत्यांतून सुरू झाल्या आहेत. राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नावाखाली राज्यात तीन संघटना कार्यरत आहेत. शिक्षक नेत्यात सुरू असलेले राजकारण, वाद, इर्ष्या आणि राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्याने संघटनेत धुसफूस सुरू आहे. शिक्षक संघाच्या मालकीसाठी धर्मादाय आयुक्ताकडे हेलपाटे सुरू झाले आहेत.

संघाच्या राजकारणात एकमेंकांचे जीवलग मित्र असलेले कट्टर शत्रू झाले आहेत. सध्या थोरात गटाविरोधात शिवाजीराव पाटील आणि राजाराम वरुटे एकत्र आले आहेत. थोरात गट आणि पाटील-वरुटे गटात हेवेदावे सुरू झाले आहेत. शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील, राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, सरचिटणीस केशव जाधव यांना पदावरुन कमी केल्याचा दावा थोरात गटाने दावा केला आहे. त्याजागी २४ ऑगस्ट, २०१४ ला नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

दरम्यान याविरोधात पाटील आणि वरुटे गटाने दावा केला आहे की, थोरात गटाने केलेल्या निवडी बेकायदेशीर आहेत. आम्ही कोणत्याही पदाचे राजीनामे दिलेले नाहीत. पदावरून कमी केल्याची कोणतीही सूचना दिलेली नाही. या साऱ्या प्रकरणावरुन शिक्षक संघटनेच्या नेत्यांचे धर्मादाय आयुक्त कार्यालयात हेलपाटे सुरु झाले आहेत. अद्याप या प्रकरणी कोणतीही सुनावणी झालेली नाही.

शिक्षक नेते शिवाजीराव पाटील आणि संभाजीराव थोरात यांच्यात गेल्या काही वर्षापासून वाद सुरू आहे. माजी आमदार शिवाजीराव पाटील यांची शिक्षक नेते आणि राजाराम वरुटे यांची राज्याध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीचे अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रलंबित असल्याचे समजते. त्यामुळेतच थोरात गटाला नवी मुंबईत झालेल्या त्रैवार्षिक अधिवेशनात नवीन पदाधिकारी निवडी जाहीर करण्यास मनाई करण्यात आली.

तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या होत्या. शिवाजीराव पाटील, राज्याध्यक्ष राजाराम वरुटे आणि सरचिटणीस केशव जाधव अशा निवडीची नोंद धर्मादाय कार्यालयात करण्यास अर्जही केले. मात्र ते अर्ज अद्यापही प्रलंबित असल्याची चर्चा शिक्षक संघटनेत आहे. अर्ज दाखल झाल्यापासून वर्षभरात या संघटनेत फूट पडून तीन गट स्थापन झाले.

निधीसह पदाधिकारी निवडीचा वाद

अधिवेशनाचा निधी, पदाधिकारी निवडीवरुन प्राथमिक शिक्षकांत संघात हेवेदावे सुरू झाले आहेत. राज्य प्राथमिक शिक्षक संघ, पुणे या नावाने राज्यातील प्राथमिक शिक्षकांची संघटना पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहे. याच नोंदणीवर राज्यात सध्या शिक्षक नेते शिवाजीराव पाटील, राजाराम वरुटे आणि संभाजीराव थोरात यांच्या तीन संघटना कार्यरत आहेत. शिक्षक नेत्यांत सुरू असलेला अंतर्गत वाद आणि दि प्राथमिक शिक्षक संघातील सत्ता, अधिवेशनाचा निधी आणि पदांसाठी संघात वाद सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कदंबाच्या झाडाचे पुनर्रोपण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

रस्ता करायचा, पाइपलाइन टाकायची, गटार व ड्रेनेज करायचे आहे. त्यामध्ये झाड तुटले जाणार असेल तर त्याच्यावर सहज कुऱ्हाड चालवली जाते. पण शिवाजी पार्कमधील असेच पाण्याच्या लाइनवर येणारे कदंबाचे झाड न तोडता पुनर्रोपण करण्याचा प्रयत्न यशस्वी करण्यात आला. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच ही प्रक्रिया केली.

नगरसेवक आशिष ढवळे यांनी शिवाजी पार्कमध्ये कदंबाचे झाड लावले होते. त्याच्याखाली पाइपलाइन होती. त्यावेळी ती लक्षात आली नव्हती; पण आता त्या पाइपलाइनला गळती उद्भवल्याने त्याची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे झाड तोडण्याऐवजी ढवळे यांनी पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांना बोलावून चर्चा केली. त्यावेळी झाडाचे पुनर्रोपण करण्याचे ठरले. त्यानुसार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे झाड काढून शिवाजी पार्कमधील शाहूपुरी जिमखान्यासमोर लावण्यात आले. यात नगरसेवक ढवळे, उदय गायकवाड, प्रतिमा राजघाट व वृक्ष प्राधिकरणाचे कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हैसाळच्या पाण्यासाठी ‘महांकाली’कडून एक कोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
म्हैसाळ योजनेचे पाणी लवकर सुरू व्हावे, यासाठी पाणीपट्टीचा अॅडव्हान्स म्हणून महांकाली शेतकरी साखर कारखान्याने बुधवारी एक कोटी रुपये भरले. अध्यक्ष विजय सगरे यांनी या रक्कमेचा धनादेश कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याकडे सुपूर्द केला. यामुळे योजना सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
म्हैसाळ योजनेचे पाणी मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात फिरल्याने ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली आहे. वीजबील भरायला पैसे नाहीत म्हणून योजना बंद पडायला नको यासाठी सगरे यांनी पुढाकार घेतला आहे.
क्रांती, सोनहिरा, केन अॅग्रो आणि उदगिरी साखर कारखान्यांनी अॅडव्हान्स पैसे भरुन ताकारी योजना अविरतपणे चालू ठेवली आहे. याच धर्तीवर आपणही म्हैसाळ योजना चालवूया, असे आवाहन त्यांनी केले होते.
बुधवारी कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांनी अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांच्याकडे दिला. या वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोज सगरे, सरपंच सुनील माळी, उपसरपंच चंद्रशेखर सगरे, दिपकराव ओलेकर, नामदेव करगणे, किशोर पाटील, बाळासाहेब पाटील, दिलीप पाटील, रवी गाडवे, हमीद मुल्ला, कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे, उपअभियंता टी. के. देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ‘संगीत शारदा’ प्रथम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
पंचावन्नाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सांगलीच्या देवल स्मारक मंदिरच्या 'संगीत शारदा' नाटकाने प्रथम क्रमांक पटकाविला. या नाटकाला ७५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. मुंबईच्या एमसीजीएम व कला अकादमीच्या 'धाडीला राम तिने का वनी' या नाटकाला पन्नास हजाराचे द्वितीय तर रत्नागिरीच्या राधाकृष्ण कला मंचच्या 'संगीत सुवर्णतुला' या नाटकाला पंचवीस हजाराचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. ही स्पर्धा रत्नागिरीच्या केंद्रावर
पार पडली. दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक संगीत शारदा नाटकासाठी चंद्रकांत धामणीकर यांना तर द्वितीय पारितोषिक संगीत धाडीला राम तिने का वनी, या नाटकासाठी सुवर्णगौरी घैसास यांना देण्यात आले आहे. नेप्पथ्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सांगलीच्या मुकुंद पटवर्धन यांना कट्यार काळजात घुसली, या नाटकाकरीता तर व्दितीय पारितोषिक संगीत सुवर्णतुला, या नाटकासाठी प्रशांत साखळकर यांना देण्यात आले आहे. नाट्यलेखनाचा प्रथम क्रमांक सम्राज्ञी मराठे (नाटक-संगीत अहम देवयानी), द्वितीय क्रमांक विद्या काळे (नाटक-संगीत हार-जीत), संगीत व गायन रोप्यपदके- अनुप बापट (सुवर्णतुला), मिलिंद करमरकर, अपर्णा हेगडे (धाडीला राम तिने का वनी), अंकीता आपटे (शारदा). उत्कृष्ठ अभिनयाची रोप्यपदक-प्रमोद मांद्रेकर (एकच प्याला), नितीन जोशी (कुरमनी), निवेदिता पुणेकर (ययाती आणि देवयानी), कोमल कोल्हापुरे (लावणी भूलली अभंगाला). संगीत दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक अंनंत जोशी (नाटक-शांतिब्रम्ह), द्वितीय जयश्री सबनीस (हारजीत). ऑर्गन-विशारद गुरव (नाटक-बावणखणी), ओंकार पाठक (हारजीत). तबला- दत्तराज शेट्टये (एकच प्याला), हेरंब जोगळेकर (संगीत सौभद्र).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केडीसीसीची उद्या सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने नवीन लागू केलेल्या सहकार कायद्याला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अकरा संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात स्थगिती मिळण्यासाठी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर शुक्रवारी (ता. १२) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यात अकरा संचालकांचे भवितव्य ठरणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होणार आहे. पूर्वलक्षी प्रभावाने अपात्रेच्या नोटिसा लागू करता येत नसल्याच्या मुद्दावर संचालकांनी न्यायालयात दाद मागितली आहे.

राज्य सरकारने वटहुकूमाद्वारे २००६ पासून प्रशासक नियुक्त विमा संरक्षण असलेल्या बँकेच्या संचालकांना पुढील दहा वर्षे निवडणूक बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीने वटहुकूम लागू झाल्यानंतर बँकेच्या अकरा संचालकांना विभागीय सहनिबंधकांनी नोटीस लागू केली आहे. मात्र, विभागीय सहनिबंधकांच्या नोटीस मिळण्यापूर्वीच संचालकांनी न्यायालयात धाव घेवून वटहुकूमाला स्थगिती देण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती.

याचिकेवर २९ जानेवारी रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांच्या नोटीस प्राप्त झाल्यानंतर दाद मागण्याची सूचना केली होती. राज्य सरकराने काढलेल्या वटहुकूम न्यायालयात टिकावा यासाठी राज्य सरकारने तीन आठवड्यांचा अवधी घेतला होता. सरकारने अपात्र संचालकांना कोणत्याही स्थिती दिलासा मिळू नये यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. राज्याचे अॅडव्होकेट जनरल शुक्रवारच्या सुनावणीवेळी मत मांडतील. त्यामुळे बँकेचे विद्यमान चेअरमन हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक महादेवरराव महाडिक, पी. एन. पाटील, के. पी. पाटील, विनय कोरे, ए. वाय. पाटील यांच्या भवितव्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

१४७ कोटीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. जबाबदारी निश्चितीची विभागीय सहनिबंधकांची नोटीस कायम करण्यासाठी सरकार पक्षाच्यावतीने बाजू मांडण्यासाठी काही दिवसांची अवधी देण्याची मागमी सरकारच्यावतीने केली होती. त्याबाबतची सुनावणी मंगळवारी पार पडली. मात्र सुनावणीमध्ये कोणताही निकाल लागला नसला, तरी शुक्रवारी अपात्रतेच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झाल्यास जबाबदारी निश्चितेच्या प्रक्रियेला वेग येणार असल्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराफांचा उत्स्फूर्त बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन लाख रुपयांच्या सोने-चांदी खरेदीसाठी केंद्र सरकारने केलेल्या पॅनकार्ड सक्तीच्या नियमांना विरोध करत कोल्हापूर जिल्हा सराफ संघटनेने बुधवारी पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदमुळे कोल्हापुरात दहा कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये स्थानिक संघटनांनी निदर्शने करून केंद्र शासनाचा निषेध केला. तहसीलदारांना निवेदन दिले. कोल्हापुरात सराफ व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून गुजरीत निदर्शने केली व निषेध फेरी काढली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने करण्यात आली. यामध्ये बाबा महाडिक, राजेश राठोड, कुलदीप गायकवाड, किरण गांधी, धर्मपाल जिरगे, विजयकुमार भोसले, संजय पाटील, कुमार दळवी, हिम्मत ओसवाल, दिनकर लाळगे, मनोज राठोड, नागेश मंत्री आदींसह व्यावसायिक सहभागी झाले होते.

याबाबात कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश सुरेश गायकवाड म्हणाले, 'केंद्र सरकारने केलेल्या पॅन कार्ड सक्तीचा विरोध म्हणून आम्ही व्यावसायिकांनी दुकाने बंद करून शासनाचा निषेध केला आहे.'

जिल्हा सराफ संघटनेचे अध्यक्ष भरत ओसवाल म्हणाले, 'पहिल्यांदा ५० हजार, १ लाख आणि आता दोन लाख रुपयांवरील खरेदीसाठी पॅनकार्ड सक्तीचे केले आहे. शिवाय ६० व ६१ नंबरचे फॉर्म भरून घेणे सक्तीचे केले आहे. काळा पैसा रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी या निर्णयाचे तोटे अधिक आहेत. पॅनकार्ड नसल्यामुळे रोख स्वरूपातील खरेदीला चालना मिळेल. रोख रकमेचा वापर वाढू लागला, तर व्हॅट आणि आयकरामध्येही तूट येऊ शकते. अडचणीच्या काळात आधारासाठी सर्वसामान्य माणूस बचत करून सोने खरेदी करतो. पॅनकार्ड सक्तीमुळे त्यावरही मर्यादा येईल.'

दहा कोटींची उलाढाल ठप्प

एक जानेवारीपासून पॅन कार्ड सक्तीमुळे ३० टक्के व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच आजच्या बंदमुळे शहर आणि जिल्ह्यातील एकूण सराफ व्यवसायातील दहा कोटींच्या उलाढालीवर परिणाम झाल्याचे भरत ओसवाल यांनी सांगितले.

देशभरात जवळपास ८० टक्के लोकांकडे पॅनकार्ड नाहीत. त्यामुळे दोन लाखांवरील सोने खरेदी करणे ग्राहकांना शक्य होणार नाही. याशिवाय ग्राहकांकडून फॉर्म भरून घेणे किचकट होईल. कित्येक व्यावसायिक अगदी छोट्याशा जागेत आपला व्यवसाय करतात. तेथे सहा वर्षे कागदपत्रांचे जतन करणे कसे शक्य होईल?

- भरत ओसवाल, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा सराफ संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलभीम बँकेची उद्या सुनावणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बलभीम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहकार कलम ८८ नुसार १९ संचालक व दोन व्यवस्थापकांना चौकशी अधिकारी सुनील शिरापूरकर यांनी शनिवारी (ता. ६) नोटीस बजावली. नोटीसीवर शुक्रवारी (ता. १२) शिवाजी पेठेतील अपना बँकेत सुनावणी होणार आहे. संचालकांवर ४ कोटी ८३ लाख रुपये बँकेचे नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे. बचाव कृती समितीने केलेल्या तक्रारीनंतरच चौकशी सुरू झाली असल्याने उद्याच्या होणाऱ्या सुनावणीत बचाव कृती समिती काय म्हणणे मांडणार याकडे बँकेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे.

बलभीम बँकेला गैरव्यवहार करून आर्थिक अडचणीत आणल्याप्रकरणी बचाव कृती समितीच्या काँ. चंद्रकांत यादव, चंद्रकांत सूर्यवंशी, शिवाजीराव तावडे, दिलीप मोरे यांनी तक्रार दाखल केली होती. कृती समितीने नेटाने पाठपुरवा केल्यानंतर बँकेच्या चौकशीला पाच वर्षापूर्वी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र अधिकारी शिरापूरकर यांनी चौकशीला सुरुवात केली नव्हती. त्यामुळे चौकशीचे कागद धूळ खात पडले होते.

सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सहकारी संस्थांच्या प्रलंबीत प्रकणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर चौकशीच्या कागदपत्रांवरील धूळ बाजूला गेली. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर शनिवारी संचालकांना नोटीस लागू केल्या होत्या. नोटीसा लागू झालेल्या अॅड. अशोकराव सोळोखे, बाळासाहेब ऊर्फ रवींद्र सासने, अशोकराव जाधव यांनी बँकेला वाचण्यासाठी कृती समितीला मदत केली होती. त्यामुळे या संचालकांची भूमिका सुनावणीवेळी महत्त्वाची ठरेल. सुनावणीदरम्यान विरोधी गटाला लांब ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे शिवाजी पेठ परिसराचे लक्ष लागले आहे.

चौकशी अधिकाऱ्याचीच चौकशी

विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या आदेशाने विभागीय चौकशी समितीच्या उपसचिव प्रणाली चिटणीस तत्कालिन जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची चौकशी करत आहेत. चौकशीमध्ये सादरकर्ता अधिकारी म्हणून विभागीय उपनिबंधक रंजन लाखे असून सातारा जिल्ह्याचे उपनिबंधक डॉ. महेश कदम व चंद्रकांत खोंद्रे यांची साक्ष होणार आहे. चौकशीत रवी बँकेच्या कर्जदारांना दिलेली सूट आणि सरकारी महसूल बडवल्याचा ठपका शिरापूरकर यांच्यावर ठेवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दगडावरील रॉयल्टीत पन्नास टक्के सवलत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने गौण खनिजावरील (दगड) रॉयल्टीमध्ये प्रतिब्रास दोनशे रुपयांची वाढ करून हा दर चारशे रुपये केला होता. खाण मालक आणि क्रशरधारकांच्या मागणीनंतर राज्य सरकारने वाढवलेल्या रॉयल्टीतील पन्नास टक्के रॉयल्टी कमी केली आहे. त्यामुळे आता दगड या गौण खनिजाची रॉयल्टी प्रतिब्रास तीनशे रुपये झाली आहे.

राज्य सरकारने गौण खनिजांवरील रॉयल्टीमध्ये सर्रास वाढ करून हा दर प्रतिब्रास चारशे रुपये केला होता. दगड, मुरूम, माती या प्रकारच्या गौण खनिजांना ही दरवाढ केली होती. त्यामुळे राज्यभरातील खाणमालक आणि क्रशरधारकांनी निर्णयाला जोरदार विरोध करून जानेवारी महिन्यात कामबंद आंदोलन केले होते. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौण खनिजावरील रॉयल्टीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. समितीचा निर्णय येईपर्यंत केवळ दगड या गौण खनिजाच्या रॉयल्टीत १०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढ केलेल्या रकमेतून पन्नास टक्के रकमेची कपात झाली. मात्र सरकारने नेमलेल्या समितीचा निर्णय अंतिम असेल अशी अटही घालण्यात आली आहे.

समितीने दरवाढ रद्द करण्याची शिफारस केल्यास मात्र खाणमालक आणि क्रशरधारकांकडून मूळ रॉयल्टीची रक्कम वसूल केली जाणार आहे. रॉयल्टी कपातीचा हा निर्णय केवळ दगडासाठीच लागू असल्याने इतर गौण खनिजांची रॉयल्टी मात्र पूर्वीप्रमाणेच कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरोगामी नगरीत प्रतिगामी शक्तींमध्ये वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशाला आणि राज्याला ज्या जिल्ह्याने पुरोगामीतत्वाचा विचार दिला, त्याच जिल्ह्यात प्रतिगामी शक्तीमध्ये वाढ होत आहे ही गंभीर बाब आहे' अशी खंत शेकापचे आमदार, भाई जयंत पाटील यांनी केले. स्वातंत्रसैनिक व माजी नगराध्यक्ष के. बी. जगदाळे (तात्या) यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते.

आमदार पाटील म्हणाले, 'प्रतिगामी विचारांना लगाम घालण्यासाठी सामाजिक, आर्थिक रचनेमध्ये बदल करून पुन्हा पुरोगामी विचार रुजवण्याची आवश्यकता आहे. विचार आणि चळवळीची दिशा ज्या भूमीने दिली, त्याच भूमीत प्रतिगामी शक्तींमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब आहे. प्रतिगामी शक्तींना पाठिंबा देवून सरकार संविधान बदल्याचा प्रयत्न करत आहे. राजर्षी शाहू महाराजांनंतर के. बी. जगदाळे यांच्यासारख्या मार्क्सवादी विचारांच्या व्यक्तींनी विचार आणि चळवळींचा इतिहास निर्माण करून कोल्हापूरची स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्या कष्टकरी, गरीबांचे विचार रुजवण्यात यश मिळवले, त्याच विचारांना दाबण्याचे प्रयत्न केले जात आहे.'

आमदार पाटील म्हणआले, 'शहराची वेगळी संस्कृती असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जगदाळेंच्या कार्याचे एक टक्काही पालन होत नाही. जगदाळे यांचे कार्य नव्या पिढीला माहिती होण्यासाठी शहरात त्यांचे स्मारक व संपुर्ण पुरोगामी ग्रंथालय उभारुया. स्मारकांसाठी महापालिकेने केवळ जागा द्यावी. निधी पक्षाच्यावतीने उभा करू.'

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, 'जिल्ह्याची ओळख पुरोगामी असली, तरी सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही. सामाजिक स्थिती बदलल्याने कोणत्या पद्धतीने निवडणुका होतात. याची प्रचिती प्रत्येक निवडणुकीत येते. निवडणुका सर्वसामान्य लोकांच्या राहिलेल्या नाहीत.'

यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, क्रांती अग्रणी जी. डी. लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अरुण लाड, माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, रमेश गवळी, किशोर नैनवाणी, प्रसाद जाधव यांचा शाल, स्मृतीचिन्ह देवून गौरव केला. यावेळी उद्योजक सुनील ऊर्फ भैय्या घोरपडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमास संभाजी जगदाळे, माजी आमदार सुरेश साळोखे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, माजी महापौर शिवाजीराव कदम, बाबुराव कदम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक निवासराव साळोखे यांनी केले. अनिल घाटगे यांनी स्वागत केले. अशोक पोवार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्टेशन रोड येथील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाने ऑनलाइन निविदा मागवल्या आहेत. नवीन इमारतीसाठी तीन कोटी ४३ लाख १२ हजार रुपये खर्च येणार असल्याचे निश्चित झाले आहे.

२००९ मध्ये रस्ते विकास प्रकल्पात स्टेशन रोडवरील अनेक इमारतींवर हातोडा पडला होता. शाहूपुरी पोलिस ठाण्याची इमारतीची पहिली खोली रस्ता रुंदीकरणात पाडली जाणार होती. मात्र महापालिकेने कारवाई केली नाही. शाहूपुरी पोलिस ठाण्याची नवीन इमारत बांधण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. पण ही इमारत हेरिटेज असल्याचे स्पष्ट झाल्याने बांधकामाबाबत कोणताच निर्णय घेतला गेला नाही. इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे शिफ्टिंग रेल्वे स्टेशनजवळील निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीत करण्यात आले आहे.

महायुती सरकारने शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या ​नवीन इमारतीसाठी तीन कोटी ४३ लाख १२ हजार रुपयांची तरतूद केली आहे. इमारत बांधण्यासाठी ऑनलाइन निविदा काढण्यात आली. पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी सरकारने नवीन निकष लागू केले आहेत. त्यानुसार इमारतीचे बांधकाम होणार आहे. इमारतीत रिसेप्शनीस्ट काउंटर, प्रत्येक अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र खोल्या, तक्रार दाखल करून घेण्यासाठी हवालदारांची कक्ष, तपास, चौकशीसाठी स्वतंत्र खोली असेल. पोलिस कोठडी, वायरलेस, सीसीटीएनएस, रेकॉर्ड, स्टोअर व विश्रांतीसाठीची खोली अशी रचना असेल. पोलिस कोठडीत २४ तास सीसीटीव्हीची सोय करण्यात येणार आहे. पोलिसांना विश्रांतीसाठी रेस्ट रूमही करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एटीएम फोडताना सिलिंडरचा स्फोट

$
0
0

गारगोटी ः स्टेट बँकेचे पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील एटीएम मशीन फोडत असताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने मशीनला आग लागली. त्यात मशीनसह सर्व साहित्य खाक झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे चोरट्यांनी वाहनातून तत्काळ पलायन केले. या घटनेत अडीच लाखाचे नुकसान झाले. मशिनमधील सर्व रक्कम सुरक्षित आहे. एक वर्षापूर्वी हेच मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला होता. शिवाजीनगरत शिवाजी डाकरे यांच्या मालकीच्या गाळ्यात हे एटीएम आहे. मंगळवारी रात्री एकच्या सुमारास अचानक मोठा आवाज आल्याने श्री.डाकरे जागे झाले त्यावेळी आग लागल्याचे लक्षात आले. श्री.डाकरे व त्यांच्या पत्नीने जोरदार आरडाओरड केल्यामुळे आसपासचे लोक धावून आले. यामुळे चोरट्यानी तत्काळ वाहनांतून पलायन केले. ग्रामस्थांनी पोलीसांना कळविल्यानंतर पोलिस निरिक्षक सुर्यकांत सुर्वे यांनी घटनास्थळी भेट दिली.आज सकाळी पोलिस उप अधीक्षक सागर पाटील यांनी भेट दिली. श्वानपथकाने चर्चरोडची दिशा दाखविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोनेदराला झळाळी

$
0
0

कोल्हापूर ः सोन्याच्या दराने बुधवारी प्रति दहा ग्रॅमला २८ हजार ३०० रूपयांचा टप्पा गाठला. गेल्या तीन महिन्यांत सोने दरात अडीच हजार रूपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, लग्नसराईच्या तोंडावर दरात वाढ झाल्याने ग्राहकांचे सोने खरेदीचे नियोजन बिघडले आहे. गेल्या तीन महिन्यात सोनेदर प्रति दहा ग्रॅम किमान २५ हजारापर्यंत खाली उतरला होता. मात्र त्यानंतर तो २६ हजार ते २८ हजारांच्या दरम्यान वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीचा हा परिणाम असल्याचे व्यापारी वर्गातून सांगितले जात आहे. लग्नसराईच्या तोंडावर ग्राहकांकडून सोन्याच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून लग्नसराई सुरू होत असल्यामुळे सराफ बाजारपेठेत सोने खरेदीला गर्दी आहे. गेल्यावर्षीच्या सुरूवातीला सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम ३० हजारांच्या घरात होता. त्यानंतर सोने दरात घसरण होऊन तो २८ हजारापर्यंत खाली आला होता. तर गेल्या तीन महिन्यापूर्वी २५हजारांच्या आवाक्यात सोनेदराची घसरण झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images