Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भाजपचा चमत्कार घडलाच नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीने स्थायी, परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीसाठी प्रचंड फिल्डींग लावली. शिवसेनेच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी सेनेच्या वरिष्ठांशी संपर्क साधला.

विरोधकांच्या ताकतीचा अंदाज आल्याने सत्तारूढच्या नेत्यांनीही यामध्ये लक्ष घालत सेनेचा विरोधी भाजप, ताराराणी आघाडीला फायदा होणार नाही या पद्धतीने राजकीय खेळी केल्या. दुसरीकडे भाजप आघाडीने प्रयत्न सोडले नाहीत. सेनेच्या सदस्यांकडे शेवटपर्यंत पाठपुरावा करत पाठिंब्यासाठी रात्र जागवली. पण सेनेकडून विरोधी आघाडीला पाठिंबा देण्याचा साक्षात्कार घडला नाही, परिणामी चमत्काराविनाच निवडणुका पार पडल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कारभाऱ्यांची गर्दी

समिती आणि प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुका सत्ताधारी घटकांनी प्रतिष्ठेची बनवली होती. विरोध गट प्रबळ असल्याने शेवटपर्यंत सदस्यांवर लक्ष होते. सर्किट हाऊस येथे बैठक झाल्यानंतर कारभारी मोटारीमधूनच सर्व सदस्यांसहित महापालिकेत दाखल झाले. प्रत्येक सदस्याला शेवटपर्यंत सूचना देणे सुरू आहे. शहराध्यक्ष राजू लाटकर, प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख, सुभाष बुचडे, आदिल फरास, मधुकर रामाणे ही सारी मंडळी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून होती.

सकाळपर्यंत सत्ताधाऱ्यांची अस्वस्थता

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी 'जनता बझार'प्रकरणावरून थेट निशाणा साधत मुरलीधर जाधव यांच्या विरोधात भूमिका घेतली. यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीत अस्वस्थता होती. जयश्री चव्हाण या 'स्थायी' सदस्या आहेत. चव्हाण यांची समजूत काढण्यासाठी प्रा. जयंत पाटील, मुरलीधर जाधव यांनी गुरूवारी रात्री त्यांची भेट घेतली. पण चव्हाण यांचा राग मावळला नव्हता. शुक्रवारी सकाळी हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी चव्हाण यांंंची समजूत काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपकडे आरएसएसचा अजेंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गांधी कुटुंबीयांना देशातून हद्दपार केल्याशियाव आरएसएसची विचारप्रणाली देशात राबवणे शक्य नसल्याने भारतीय जनता पक्ष त्यांना टार्गेट करत आहे. गेल्या दोन वर्षात सरकारने विकासाभुमिख काम न केल्याने झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना केवळ सत्तेच्या माध्यमातून आरएसएसचा अजेंडा राबवायचा आहे' अशी टीका अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमरींदसिंग राजा ब्रार यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या युवक काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष विश्वजित कदम होते.

ब्रार म्हणाले, 'पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, सरचिटणीस राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांवर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून कारवाई सुरू आहे. भाजप सत्तेच्या माध्यमातून आरएसएसची विचारप्रणाली लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आरएसएस राष्ट्रपिता महात्मा गांधींना देशाबाहेर हाकलून देण्याची रणनिती अवलंबत आहेत. आता नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्याचा डाव आखला आहे. गोडसेची मंदिरे निर्माण केल्यास ती उद्ध्वस्त करण्याचे काम युवक करतील.'

'पंतप्रधान मनमोहनसिंग कमी बोलत होते, मात्र कामात अग्रेसर होते,' असे सांगून अध्यक्ष ब्रार म्हणाले, 'हे सरकार बोलतण्यात पटाईत आहे. हे सुटाबुटातील सरकार व्यापाऱ्यांचे आहे. त्यामुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. व्यापम् घोटाळा, ललित मोदी प्रकरण आणि महाराष्ट्रातील चिक्की घोटाळा यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. त्यांच्यावर पांघरुण घालण्यासाठी राहुल वेमुलासारख्या प्रकरणांना जन्म दिला जात आहेत.'

विश्वजित कदम म्हणाले, 'खोटी आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या भाजपने धनगर समाजाची आरक्षणाच्या मुद्दावर फसवणूक केली. मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षणाचा फायदा मिळू नये, यासाठी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यास दिरंगाई केली.'

आमदार सतेज पाटील, म्हणाले, 'शेतकरी, बेरोजगारी, शिक्षण क्षेत्रातील समस्या तशाच आहेत. मेक इन इंडिया केवळ कागदावर आहे. सरकार विरोधात एल्गाराची हीच वेळ आहे. तर 'युपीए सरकारने सुरू केलेली अन्नसुरक्षा योजना बंद पाडून नागरिकांच्या अच्छे दिनाचा चक्काचूर सरकारने केला. अच्छे दिन केवळ पंतप्रधानांना आले. ते त्यांच्या परदेश दौऱ्यावर दिसते' असा टोल जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी लगावला.

कार्यक्रमास प्रदेश प्रभारी हिम्मतसिंग, विद्याधर गुरंबे, रुपाली पाटील, प्रल्हाद चव्हाण, ऋतुराज पाटील, जयराज पाटील, इंद्रजित साळोखे, सोमानाथ भोसले, बाजीराव खाडे, राहुल खंजिरे, नगरसेवक तौफिक मुल्लाणी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष शंभुराजे देसाई प्रास्ताविक केले. विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आरक्षणाचा भाजपला विसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी विधानसभेत चर्चा होत असताना तत्कालिन भाजपचे नेते सत्ता दिल्यास आरक्षणाचा प्रश्न चुटकीसारखा सोडवण्याची वल्गना करत होते. मात्र, सत्ता आल्यानंतर भाजपला मराठा समाजाच्या आरक्षणाचा विसर पडला आहे. कोर्टाचा निर्वाळा देत मराठा समाजाला आरक्षणापासून जाणीवपूर्वक डावलेले जात आहे' अशी टीका अखिल भारतीय महासंघाचे राज्यउपाध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली. कोल्हापूर जिल्हा मराठा महासंघाच्यावतीने आयोजित मराठा आरक्षण मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक होते. मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला.

पाटील म्हणाले, 'सत्तेवर येण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी कोल्हापूर टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले. वर्षानंतर का असेना कोल्हापूरच्या जनतेची टोलमधून मुक्तता केली. मात्र आश्वासन देवूनही मराठा आरक्षणाच्या मुद्याला बगल दिली जात आहे. मराठा युवक आरक्षणापासून वंचित राहिल्याने समस्यांनी गुरफटला आहे. त्यातून सुटका करण्यासाठी एकजूट हवी. राजकारणामध्ये मराठा समाजाचा अधिक प्रभाव असल्याने मतांच्या राजकारणामध्ये विधानसभेत योग्य भूमिका मांडली जात नाही. आरक्षणाच्या मुद्यावर लढाई करताना केवळ ज्येष्ठांचा सहभाग असून उपयोग नसून युवकांनी यामध्ये अधिक सहभागी होण्याचे आवाहन केले. सोशल मीडियाच्या जाळ्यातून भविष्याच्या लढाईसाठी सज्ज रहा.'

जिल्हाध्यक्ष मुळीक म्हणाले, 'मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने पुन्हा लढाईला सुरुवात करणार करावी लागणार आहे. यासाठी जिल्ह्यातील बारा तालुक्यात मेळाव्याचे आयोजन केले आहे. रविवारी करवीर व राधानगरी तालुक्यात १५ महासंघाच्या शाखांची स्थापना करण्यात येणार आहे. राणे समितीच्या शिफारसीनुसार मराठा समाजातील ५६ टक्के विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा झाला. मात्र नंतरच्या स्थगितीमुळे त्यांची अडचण झाली आहे. त्यासाठी पुन्हा लढा उभा करण्याची आवश्यकता आहे. लवकरच विराट रॅली काढणार आहे.'

शाहीर मिलिंद सावंत यांनी कवन सादर केले. मेळाव्यास अंजली समर्थ, शिवाजीराव गराडे, डॉ. शिवाजीराव हिलगे, शिवाजीराव पाटील, डॉ. प्रदीप पाटील, एकनाथ जगदाळे, उत्तम पोवार, संतोष सावंत, प्रकाश पाटील, दादा पाटील, सुनील पाटील, उत्तम जाधव, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष संदीप पाटील यांनी स्वागत केले. करवीर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जप्त केलेले वाळूचे ट्रक पळवले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

तहसील कार्यालयाने विनापरवाना वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक पकडून जप्त केल्यानंतर शु्क्रवारी मध्यरात्री हे जप्त ट्रक कागल तहसील कार्यालयातून वाळूसह पळवून नेण्यात आले. याबाबत तहसीलदार शांताराम सांगडे यांनी कागल पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी निवासी नायब तहसीलदार शिवाजी गवळी यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने बाराचाकी ट्रक (एमएच ४८ टी ७३७६) आणि चालक प्रविण पाटील (रा. कवठेमहाकाळ) आणि एमएच १० झेड ४४७१चा चालक महंतेश महामाने (रा. मंगळवेढा) यांच्यावर कारवाई केली होती. बेगमपूर येथून सुळकूडमार्गे कागलकडे येणारे हे दोन्ही वाळूचे ट्रक पकडून त्यांच्यावर ३ लाख ४० हजार रुपयांची दंडाची कारवाई केली. मात्र, काल रात्री हे दोन्ही ट्रक अचानक गायब झालेत. तहसील कार्यालयाच्या आवारातून दोन्ही ट्रक रात्रीत वाळूसह गायब झाल्याने तहसीलदार सांगडे यांनी कागल पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, ट्रक गायक होण्याच्या प्रकारात काळेबेरे असल्याचा आक्षेप कागल तालुका व कोल्हापूर जिल्हा ट्रक मालक वाळू वाहतूक संघटना, जिल्हा लॉरी असोसिएशनने घेतला आहे. तसे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पन्हाळ्यात ४२ भूखंडधारकांची सुनावणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

पन्हाळा नगरपरिषद हद्दीतील ९९ वर्षांच्या कारारावर दिलेल्या ४२ भूखंडधारकांची सुनावणी शनिवारी झाली. यात कागदपत्रे, नकाशे अन्य बाबींची तपासणी रात्री उशिरापर्यंत पन्हाळा प्रांत कार्यालयात सुरू होती. चौकशी अधिकारी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी कुणाल खेमनार यांनी तपासणी केली.

यावेळी लीजधारकांनी वकिलांचा मोठा फौजफाटा आणला होता. यापूर्वी भूखंडधारकांच्या जागेची पाहणी केली होती. आज भूखंड धारकांचे कागदपत्रे ताब्यात घेवून त्यांची मते माहिती करून घेतली तक्रारदार माजी नगराध्यक्ष बाळासाहेब भोसले यांची मते आजमावण्यात आली. कोणते निकष लावून हे भूखंड दिले यांची माहिती घेतली. पन्हाळा येथील मुलकीपड जमिनीपैकी सरकारच्या मालकीचे ४२ भूखंड १९४८ ते १९६५ या कालावधीत काही अटींवर तर काहींना लीजवर दिले होते. त्या अटींचा भंग झाला का याचीही अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. यावेळी पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चौबे, मुख्याधिकारी श्याम गोसावी, तलाठी, भूमी अभिलेख अधिकारी, नगराध्यक्ष आसिफ मोकाशी उपस्थित होते.

प्राथमिक बाबींची माहितीच्या आधारे अहवाल तयार करून लीजधारकांना मत मांडण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. अहवालानंतर फेरसुनावणी होईल. त्यानंतर अंतिम अहवाल निर्णय घेईल. हे भूखंड परत सरकारच्या ताब्यात आल्यास लाखो रुपयांचा महसूल सरकारला जमा होईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे. अटी भंग झालेले भूखंड सरकारने परत घ्यावेत यासाठी आमदार सत्यजित पाटील यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.



आज सर्व भूखंडधारकांची सुनावणी झाली. काहींनी आपली मते मांडली. काहीजणांना फेरसुनावणीसाठी ११ फेब्रवारीला मुदत दिली आहे. या सुनावणीनंतर अहवाल तयार करून अंतिम निर्णय घेतला जाईल. - कुणाल खेमनार. चौकशी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदगावला अकरा एकर ऊस जळाला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

उदगाव (ता. शिरोळ) येथे अकरा एकर क्षेत्रातील ऊसाला शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीत नऊ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. याची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. चिंचवाड रस्त्यालगत गट क्रमांक ५३९ मध्ये नेमीनाथ तातोबा मगदूम यांची शेत आहे. शेतात महावितरणचे विद्युत रोहित्र आहे. शनिवारी सकाळी वीजपुरवठा खंडीत झाला होता. दुपारी साडेबारा वाजता वीज सुरू झाल्यावर रोहित्रातून ठिणग्या पडल्याने मगदूम यांच्या उसाला आग लागली. ऊसाने पेट घेतल्याचे निदर्शनास येताच परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग झपाट्याने पसरली. यात नेमीनाथ मगदूम यांचा दीड एकर ऊस, ठिबक सिंचनाचे साहित्य जळाले. याशिवाय गुंडू बापूसाहेब कोरे, कुबेर आण्णा मगदूम, शितल श्रीपाल मगदूम, तुकाराम बाळकृष्ण कंदले, सर्जेराव बापू कदम, निवृत्ती शंकर कदम, दिनकर गणपती पाटील, अमोल मगदूम या शेतकऱ्यांचाही ऊस जळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेपत्ता जवानांचा शोध सुरूच

$
0
0

नवी दिल्ली : सियाचिन येथील लष्करी तळावर हिमस्खलनानंतर बेपत्ता झालेल्या दहा जवानांचा शोध सुरूच असून, या मोहिमेमध्ये आणखी आधुनिक उपकरणे वापरण्यात येत आहेत. शहीद झालेल्या जवानांमध्ये साताऱ्यातील सुनील विठ्ठल सूर्यवंशी यांचाही समावेश आहे.

सियाचिन येथे बुधवारी पहाटे ही दुर्घटना घडली होती. तेव्हापासून बेपत्ता दहा जवानांचा शोधमोहीम सुरू असल्याचे लष्कराच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. शहीदांमध्ये साताऱ्यातील माण तालुक्यातील कुकुडवाडनजीकच्या मस्करवाडी येथील सुनील सूर्यवंशी यांचाही समावेश आहे. शुक्रवारी रात्री ही बातमी कळताच कुकुडवाडमध्ये शोककळा पसरली आहे.

बचावकार्य मोहिमेमध्ये लष्कर आणि हवाई दलातील विशेष तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, या परिसरात दिवसा उणे २५ तर रात्री उणे ४२ अंश सेल्सिअस तापमान असते, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. जगातील सर्वांत उंच युद्धभूमी असणाऱ्या या भागात पारा उणे साठ अंशापर्यंत घसरत असल्याने हिमस्खलनाच्या घटना वारंवार घडत असतात. गेल्या महिन्यात लेह येथे झालेल्या अशाच एका हिमस्खलनात लष्कराचे चार जवान मृत्युमुखी पडले होते. १८८४ पासून सियाचिनमध्ये ९०० जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.

बारशासाठी येणार होते...

शहीद जवान सुनील सूर्यवंशी यांचे वडील विठ्ठल सूर्यवंशी आणि आईने मोलमजुरी करून सुनील यांचे शिक्षण पूर्ण केले. गरीबीच्या झळा सोसत सुनील हे सैन्यदलात भरते झाले होते. एक लहान मुलगी, पत्नी, आई वडील असा त्यांचा परिवार असून, सुट्टीवर आल्यानंतर मुलीचे बारसे आणि नव्याने बांधण्यात आलेल्या घराची वास्तूशांती करण्याचा त्यांचा बेत होता. परंतु, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगी सावकारीप्रकरणी शिवाजी कवाळेला अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मंडप व्यवसायासाठी हातउसने घेतलेल्या रकमेपोटी जादा पैसे घेवून जादा व्याजाची मागणी करत बेकायदा सावकारी प्रकरणी शनिवारी शिवाजीनगर पोलिसांनी कोल्हापूरचा माजी नगरसेवक शिवाजी आनंदराव कवाळे (रा. राजारामपुरी) याला अटक केली. या प्रकरणी पाचजणांवर गुन्हा नोंद असून पैकी दोघांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी एक संशयित जयकुमार देवमोरे याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

येथील बंडगर माळ परिसरातील वर्षा व त्यांचे पती सतिश म्हस्कर यांनी व्यवसायासाठी जयकुमार देवमोरे, शिवाजी कवाळे, महादेव आमणे आणि नितीन टोणपे यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. ही रक्कम परतफेड करुनही चौघांकडून तसेच आमणे यांच्याकडून व्याजाच्या मागणीसाठी अस्लम शेख असे पाचजण धमकावत होते. या त्रासाला कंटाळून म्हस्कर यांनी गेल्या आठवड्यात शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. यापैकी शेख याला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली आहे.

चेहरा लपविण्याचा प्रयत्न

दरम्यान. न्यायालयात नेण्यात येत असताना कवाळे यांनी माध्यमांपासून चेहरा लपवण्यासाठी टोपीचा व कार्यकर्त्यांचा आधार घेतला. पोलिस अधिकाऱ्यांसमोरच कवाळे समर्थक अक्षरश: आडवे येऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांना सापडत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी मध्यस्थामार्फत सर्व सहकार्य करण्याच्या अटीवर फोन करून हजर करून घेतले. त्यामुळे त्याच्या बचावासाठी पोलिसही प्रयत्न करताना दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंद्रकांत पाटील फॅन्सी नंबर प्लेटने अडचणीत

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । सोलापूर

गाड्यांवरील नंबर प्लेटच्या मूळ उद्देशाला हरताळ फासून 'फॅन्सी' नंबर प्लेट लावणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अशाच नंबर प्लेटच्या कारकडे मात्र संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केलं आहे.

पाटील यांनी शनिवारी सोलापूर दौऱ्यावर असताना जी कार वापरली होती ती त्यावरील नंबर प्लेटमुळे चर्चेत आली आहे. या कारचा क्रमांक एमएच १३ सीएफ ८११० असा होता. हा क्रमांक 'BJP' भासावा अशाच पद्धतीने लिहिण्यात आला होता. मात्र, पाटील यांच्यासोबत असलेले पोलीस वा अन्य कुणीच त्यावर आक्षेप घेतला नाही. त्यामुळे सामान्यांना ज्या कायद्यांची सक्ती केली जाते ते कायदे मंत्र्यांना लागू होत नाहीत का?, असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. पाटील यांनी वापरलेल्या या कारवर लाल दिवाही लावण्यात आला होता. मात्र ही कार त्यांच्या मालकीची होती की अन्य कुणाची, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून पाटील यांनी वापरलेल्या कारवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या कारवर कारवाई झाल्यास त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी पडू शकते, असेही बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा सराईत चोरांना बेळगावात अटक

$
0
0

बेळगाव : शहर पोलिसांनी गेल्या काही दिवसात घडलेल्या चोऱ्या, सोनसाखळी चोरी प्रकरणांचा तपास करून चौदा गुन्हेगारांना अटक केली आहे. शहापूर, माळमारुती, एपीएमसी, खडेबाजार पोलिस स्थानकाच्या हद्दीत त्यांनी गुन्हे केले होते. त्यांच्याकडून नऊ लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने, १३ लाख रुपयांचे मोबाइल, आठ मोटारसायकली, लॅपटॉप आदी वस्तू त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त अनुपम अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सोनसाखळी चोरणाऱ्या इराणी टोळीतील गुन्हेगार आणि इतर चोरट्यांना शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. इराणी टोळीतील दोन गुन्हेगार अद्याप फरार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या चोरीचे सोने संबंधितांना अगरवाल यांच्या हस्ते एपीएमसी पोलिस ठाण्यात परत देण्यात आले. काही दिवसांपूर्वी एक मोबाइलचे दुकान फोडून चोरट्यांनी १३ लाख रुपयाचे मोबाइल लंपास केल होते. चोरीची घटना झाल्यावर केवळ १५ दिवसांतच विशेष पथकांनी चोरांचा छडा लावून त्यांना अटक करून मोबाइल हस्तगत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिर विकास आराखडा मार्गी लावणार

$
0
0

म. टा. प्रति​निधी, कोल्हापूर

'कोल्हापूरची टोलमुक्ती हा माझा विजय नाही. कोल्हापूरची जनताच या विजयाची खरी शिल्पकार आहे. हा विजय जनतेला अर्पण करतो,' असे भावपूर्ण उद‍्गार काढताना मुख्यमंत्री देंवेद्र फडणीस यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकासासाठी २५० कोटींच्या विकास आराखड्याला मार्चपूर्वी मान्यता देऊन येत्या अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करण्याची घोषणा रविवारी केली. दरम्यान, टोल व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकार नवे धोरण आणत असून सरकारच्यावतीने रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक सिस्टिम कार्यान्वित केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पंचगंगा नदी शुद्धीकरणासाठी कोल्हापूर आणि इचलकरंजीने प्रस्ताव सादर करावेत. त्यासाठी अमृत योजनेतून निधी देऊ. तसेच कोल्हापुरातील खंडपीठासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून यासाठी ११०० कोटी रुपये अर्थसहाय्य करण्याची तयारी केल्याची घोषणा करत कोल्हापूरकरांना 'अच्छे दिन' येणार असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. कोल्हापूर शहर व जिल्हा टोलविरोधी कृती समितीच्यावतीने कोल्हापूर टोलमुक्त केल्याबद्दल विजयोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, टोलविरोधी कृती समितीचे नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्याहस्ते नागरी सत्कार करण्यात आला. अंबाबाईची मूर्ती, राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा, शाल व श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप होते. प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर समारंभ झाला.

टोलविषयी लवकरच नवे धोरण

'महाराष्ट्रात टोलमध्ये मोठा झोल झाला असून टोलचा पैसा विकसकाच्या​ खिशात जात आहे. त्यामुळे टोल व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकार नवे धोरण आणत असून सरकारच्यावतीने रस्त्यावर इलेक्ट्रॉनिक सिस्टिम कार्यान्वित केली जाणार आहे. वाहनांची मोजदाद करण्यासाठी रस्त्यावर यंत्रणा बसविण्यात येईल. यामुळे टोलमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती उपलब्ध होईल. सात ते आठ वर्षांत रकमेचा परतावा झाल्यास उर्वरित कालावधीतील ९० टक्के रक्कम सरकारकडे जमा होईल. त्यातून आ​णखी विकासकामे केली जातील. दहा टक्के वाटा विकसकाकडे जमा होईल,' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

विजय माझा नव्हे, जनतेचा

मुख्यमंत्री म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचा शब्द दिला होता. टोलमुक्तीच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील यांनी यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळे जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू शकलो. आयआरबीच्या टोलमुक्तीमधून कोल्हापूर शहराची मुक्ती हा माझा विजय नाही. पालकमंत्री पाटील, बांधकाममंत्री शिंदे यांचेही श्रेय नाही. खरेतर, हा जनतेच्या लढ्याचा विजय आहे. कोल्हापूरच्या जनतेच्यावतीने हा सत्कार मी स्वीकारतो. हा सत्कार कोल्हापूरच्या जनतेला अर्पण करतो. लोकांशी निगडीत एखाद्या प्रश्नावर लढा कसा उभा राहू शकतो आ​णि लोकबळावर तो यशस्वी होतो याचे आदर्श उदाहरण म्हणजे टोलमुक्तीचा लढा होय.'

.......

नदी शुद्धीकरणासाठी 'अमृत' निधी देऊ

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी शहराच्या सांडपाण्याकडे लक्ष वेधले. पंचगंगा नदीत कोल्हापूर शहरातून मिसळणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण ४८ टक्के, इचलकरंजीतून १५ टक्के आणि कारखानदारीतील सांडपाण्याचे प्रमाण दहा टक्के आहे. नदी स्वच्छ ठेवण्यासाठी हे सांडपाणी थांबवले पाहिजे. कोल्हापूर आणि इचलकरंजीने सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या आराखड्याचे प्रस्ताव सादर करावेत. अमृत योजनेतून त्यासाठी निधी दिला जाईल. राज्यातील नदी-नाले ९० टक्के प्रदूषणांनी व्यापले आहेत. नदी शुद्धीकरणासाठी केंद्राची मदत घेणार असून यासाठी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना भेटणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

..................

आंदोलकांवरील गुन्हे माफ

कोल्हापुरात टोलविरोधात सातत्याने आंदोलन सुरू होते. आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत. लोकप्रतिनिधींसह आंदोलकांनीही गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. जनतेच्या भावनेची दखल घेत टोल आंदोलकांवरील गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. जिल्हा पोलिस अधीक्षकांना तत्काळ गुन्हे माघारीचा प्रस्ताव सादर करावा, असा आदेशही त्यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खंडपीठासाठी ११०० कोटी खर्चाची तयारी

$
0
0

कोल्हापूर ः कोल्हापूरच्या खंडपीठाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळेच राज्य सरकारने खंडपीठासाठी ११०० कोटी रुपये देण्याची तयारी ठेवली आहे. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या खंडपीठाबाबत लवकर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोल्हापूर येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ स्थापन करण्यासाठी सहा जिल्ह्यातील वकिलांनी ३० वर्षे प्रदीर्घ लढा दिला आहे. या लढ्यामुळे राज्य मंत्रीमंडळाने त्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव संमत केला. त्यानंतर मुख्य न्यायमूर्तींनी अहवाल देणे अपेक्षित होते. त्यानुसार तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांनी अहवाल दिला. तो सकारात्मक असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी सध्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती आहेत. मुख्य न्यायमूर्ती आल्यानंतर सरकारकडूनही त्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, खंडपीठ झाल्यास पायाभूत सुविधा तसेच अन्य बाबींसाठीचा प्रस्ताव तयार आहे. त्यासाठी जवळपास ११०० कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सरकारच्यावतीने अर्थसहाय्य देण्याची तयारी करुन ठेवली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही सरकारने खंडपीठाबाबत तयारी करुन ठेवली आहे. फक्त सुप्रीम कोर्टाकडून मंजुरीची प्रतिक्षा आहे असे सां​गितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरे हत्याप्रकरणी तपासात लक्ष घालू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासकामाबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. या प्रकरणातील संशयित आरोपीचे वकील संजीव पुनाळेकर यांच्याकडून धार्मिक तेढ वाढविण्याबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्याबाबत शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची रविवारी रेसिडन्सी क्लबमध्ये भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

पानसरे हत्याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. पोलिसांनी अटक केलेला सनातनचा साधक समीर गायकवाड याच्याकडून फारशी माहिती समोर आलेली नाही. हत्येच्या प्रकरणातील शस्त्र वगैरे काहीच मिळालेले नाही. या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीच्यावतीने हिंदू जनजागृती सभा घेतली. त्यामध्ये वक्त्यांनी पुरोगामींवर जोरदार तोफ डागली होती. तसेच गायकवाड हा जरी दोषी असला तरी त्याला पाठिंबा असेल असे वक्तव्य पुनाळेकर यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या रविवारच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी समितीने भेट घेऊन निवेदन दिले.

मेघा पानसरे, उदय नारकर, सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, बाबूराव कदम, रघुनाथ कांबळे, चंद्रकांत यादव, एस. बी. पाटील, सुवर्णा तळेकर, शिवाजीराव परुळकेर, सुभाष वाणी, दिलदार मुजावर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पानसरे हत्या प्रकरणातील परिस्थिती मांडली. वर्ष होत आले तरी अद्याप हत्येतील शस्त्र सापडलेले नाही. तसेच पुनाळेकर हे पानसरे यांच्यावर वाट्टेल तसे आरोप करून समाजभावना भडकवत आहेत. समाजात धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. ते धर्मनिरपेक्ष राष्ट्राला हिंदू राष्ट्र करणार असे जाहीर करत आहेत. धर्मनिरपेक्ष राष्ट्राला हिंदू किंवा मुस्लिम राष्ट्र बनवू इच्छिणारे देशद्रोही आहेत. त्यांना अटक करून खटला भरावा.

तसेच सनातनचे साधक म्हणवणारे हस्तक बॉम्बस्फोटात सापडले आहेत. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सनातननेच रमेश गडकरी व विक्रम भावे यांना दहा वर्षाची शिक्षा झाली. मडगाव बॉम्बस्फोटात सहा साधकांवर आरोप होऊन रुद्र पाटील फरारी आहे. वाशी बॉम्बस्फोटात सनातनच्या साधकांना अटक झाली. पनवेल येथील बॉम्बस्फोटात सनातनच्या हस्तकावर दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे संस्थेवर बंदी घालावी, अशीही मागणी करण्यात आली. या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पानसरे प्रकरणात स्वतः लक्ष घालतो असे आश्वासन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भविष्यात रोबोटिक आर्मचा फायदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणाऱ्या भारतातील तसेच अन्य देशातील सर्जन्सला भविष्यात रोबोटिक आर्म तंत्रज्ञानाचा फायदा होणार आहे,' असे मत डॉ.सुरेश देश्पांडे यांनी व्यक्त केले.

सयाजी हॉटेलमध्ये कोल्हापूर सर्जिकल सोसायटी आणि महाराष्ट्र सर्जन असोसिएशनतर्फे आयोजित 'मॅसिकॉन २०१६' या शल्यचिकित्सक परिषदेच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्र‌ताप वरूटे होते.

डॉ. देशपांडे म्हणाले, 'सध्या रो‌बोटिक आर्ममध्ये आयआयटी, पवई या संस्थेतील तज्ज्ञ काम करत असून काही काळात त्याला महत्त्वाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. रोबोटिक आर्म हे एक म‌शिन असून ते मनुष्याच्या हाताप्रमाणे काम करते. याचा वापर शस्त्रक्रियेच्या दरम्यान एखाद्या असिस्टंटसारखा होतो. या रोबोटिक आर्ममध्ये अत्याधुनिक बदल करण्याचा प्रयत्न सुरू असून आवाजावर चालणारे म‌‌शिन करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत.'

डॉ. अमित मायदेव यांनी स्वादूपिंड आजार व उपचार पद्धत यावर मार्गदर्शन करत इंडोस्कोपीचा वापर ही एक महत्त्वाची उपचार पद्धत असल्याचे सांगितले. डॉ.संजय आग्रवाल, डॉ.पी.टी.जमदाडे, डॉ.स्नेहल मालगावे, डॉ.अनिल गवळी, डॉ.अजय चौगुले यांनी पोटविकाराचे आजार व उपचार यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात एमएस करणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर शोधनिबंध सादर केले.

नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रताप वरुटे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले. यावेळी डॉ. प्रकाश शहापूरकर, अध्यक्ष डॉ. सुनील नाडकर्णी, सचिव वैभव मुधाळे, मानसिंग आडनाईक, अनंत कामत, वैशाली गायकवाड, लक्ष्मण कुकरेजा, प्रियदर्शनी घोटगे, रवींद्र खोत आदी उपस्थित होते. परिषदेला गोवा, तमिळनाडू, आंध्र, कर्नाटकसह महाराष्ट्रातील एकूण १२००हून अधिक सर्जन्स उपस्थित आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाइपलाइनचे काम मार्गी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थेट पाइपलाइन योजनेच्या मार्गावरील गावांच्या अडचणी समजून घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी महापालिकेचे अधिकाऱ्यांनी गावागावात बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या गावात योजनेचे काम बंद पाडण्यात आले, त्या ठिकपुर्ली गावात शुक्रवारी महापालिकेच्यावतीने बैठक घेण्यात आली. त्यांच्याशी चर्चा करुन अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले. गावातून जाणाऱ्या योजनेला पर्यायी मार्ग ग्रामस्थांनी सुचवला. त्यानंतर आता रखडलेल्या अनेक ठिकाणी थेट पाइपलाइनचे काम सुरू झाले आहे.

महापालिकेच्या थेट पाइपलाइन योजनेबाबत धरणापासून शहरापर्यंतच्या मार्गावरील गावांमध्ये असंतोष आहे. जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतींमधून या योजनेला विरोध केला जात आहे. गेल्या आठवडयात तर योजनेचे ठिकपुर्ली ग्रामस्थांनी काम बंद पाडले. यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर महापालिकेला प्रत्येक गावात जाऊन अधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी. त्यामध्ये तेथील अडचणी, शंका जाणून घ्याव्यात असे आदेश दिले. त्यानुसार सोमवारपासून महापालिकेने या गावांमध्ये बैठक घेण्यास सुरुवात केली आहे.

योजनेच्या मार्गावर २५ गावे आहेत. प्रत्येक अधिकाऱ्याला पाच या प्रमाणे पाच अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली आहे. त्या अधिकाऱ्याकडून अन्य अधिकाऱ्यांच्या सोबतीने त्या गावात ग्रामस्थांच्या बैठकीचे नियोजन केले जात आहे. ठिकपुर्ली येथे ग्रामस्थांनी काम बंद पाडले होते. तेथील ग्रामस्थांच्या समस्या विचारल्या. जिल्हा परिषदेचे सदस्य हिंदुराव चौगुले यांच्याबरोबर सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ तर महापालिकेचे शाखा अभियंता ए. व्ही. साळुंखे, आर. बी. गायकवाड तसेच श्रीनिवासन, आर. बी. पाटील उपस्थित होते. येथील गावाबाहेरील काम पूर्ण झाले आहे. गावठाणातून जाताना लाईन कोठून जाणार, ती टाकत असताना इतर पाइप फुटल्या तर दुरुस्त करुन दयाव्या लागणार, एमएसईबीचे पोल स्थलांतरीत करावे लागणार अशा अनेक सूचना केल्या. तसेच पर्यायी मार्गही सुचवला. यातून ८०० ते ९०० मीटर जादा अंतर होते. त्याबाबतही चर्चा झाली. ग्रामस्थांना काही अडचण आली तरी साईट इंजिनीअरशी संपर्क साधा. त्यातून काही तोडगा न निघाल्यास आम्हापर्यंत संपर्क साधा असे साळुंखे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंडपीठासाठी सबुरीने घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'खंडपीठासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना खूप विचार करून घ्यावा लागतो. तो केवळ तात्कालिक निर्णय नसून, पुढच्या दोनशे वर्षांचा विचार करून हा निर्णय घ्यावा लागत असतो. या संदर्भात सरकार सकारात्मक आहे. आशा करुया की न्यायव्यवस्थाही या संदर्भात सकारात्मक विचार करेल,' असे प्रतिपादन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरकरांना खंडपीठाबाबत अप्रत्यक्षपणे सबुरीचा सल्ला दिला.

जिल्हा व सत्र न्यायालयाच्या भव्य इमारतीचे उदघाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे, महेश सोनक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हा न्यायाधीश एस. जी. वेदपाठक (क्रमांक एक) प्रमुख उपस्थित होते. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'राज्यातील न्यायालयांमध्ये सर्वांत सुंदर इमारत कोल्हापूरची ठरेल. मात्र, इमारत हे साधन आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळावा, हे साध्य आहे. कोल्हापुरात राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्यायदानाचे पर्व सुरू केले. तेव्हापासून न्यायदानात कोल्हापूर अग्रेसर आहे. लोकशाहीमध्ये न्यायपालिका हा महत्त्वाचा स्तंभ आहे. सध्या अनेक संस्थांवरचा विश्वास डळमळीत होत असताना न्यायव्यवस्था ही अशी एकमेव व्यवस्था आहे की जिच्यावरचा सामान्यांचा सर्वाधिक विश्वास आहे. न्यायपालिकवरील विश्वास वृद्धींगत झाला पाहिजे.'

'मेक इन इंडिया'च्या व्यवस्थेसाठी चांगली कायदा-सुव्यवस्था हवी, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'चीननंतर भारताला जगाची फॅक्टरी होण्याची संधी आहे. भारतात गुंतवणूक वाढविण्यासाठी कायदा-सुव्यवस्था चांगली हवी. यात पोलिसांबरोबरच न्यायपालिकेचीही भूमिका महत्त्वाची आहे. राज्यात न्यायव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी सरकार, मुख्यमंत्री म्हणून काहीही कमी पडू देणार नाही.'

मुंबईचे उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी म्हणाल्या, 'कोल्हापूर अत्यंत वैभवशाली गौरवपूर्ण शहर आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या संस्थानकालीन शहराला करवीरनिवासनी अंबाबाईचे आशीर्वाद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची परंपरा लाभली आहे. कोल्हापूर शहरात संस्कृती व शिक्षणाचा संगम झाला आहे. कोल्हापूरव् संस्थानकाळात उच्च व सर्वोच्च न्यायव्यवस्था निर्माण करून न्यायदानाची परंपरा निर्माण केली. सरकारने इमारत उभारणीसाठी निधी देवून जबाबदारी पूर्ण केली. आता न्यायव्यवस्थेला न्यायादानाची जबाबदारी पूर्ण करावी लागेल. लोकशाही व्यवस्थेत जनतेला न्याय देण्यासाठी न्यायव्यवस्थेत वकील हा घटक महत्त्वाचा आहे. पक्षकार, वकील न्यायव्यवस्थेची महत्त्वाची चाके आहेत. आजच्या समारंभामुळे न्यायव्यवस्थेने महत्त्वाचे पान उलघडले गेले आहे. पारदर्शकतेसह न्यायदानाची उंची वाढवण्याची जबाबदारी आता पूर्ण करावी लागेल.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजीत मोरे, महेश सोनक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र अवचट यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मनीष आपटे व माहेश्वरी गोखले यांनी केले. जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीच्या भत्त्यावर डल्ला

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com

कोल्हापूर : नवीन मतदारांची नोंदणी, दूरध्वनी क्रमांक संकलन, मतदारांचे ओळखपत्र वाटप अशी निवडणूकविषयक कामे सन २०१० पासून अंगणवाडी सेविकांनी केली. त्यासाठी निवडणूक कार्यालयाने त्यांचे मानधनही निश्चित केले होते. मात्र ते मानधन अंगणवाडी सेविकांना न देता भुदरगड तालुक्यातील काही व्यक्तींची नावे टाकून करवीर प्रांताधिकारी आणि तहसील कार्यालयातील लिपिकांनी हडप केल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे. गेल्या दोन वर्षापासून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील २५ अंगणावाडी सेविका मानधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. लिपिकांच्या या कृत्याला वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असल्याने अंगणवाडी सेविका हतबल झाल्या आहेत.

अंगणवाडी सेविका म्हणून काम करताना अनेक महिला आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांना जादा आर्थिक मदत व्हावी यासाठी सरकारच्या विविध योजनांच्या अमंलबजावणीचे काम त्यांना दिले जाते. अशाच प्रकारे कोल्हापूर उत्तर (क्रमांक २७६) आणि कोल्हापूर दक्षिण (क्रमांक २७४) या दोन विधानसभा मदारसंघातील निवडणुकीची कामे त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. २०१० मध्ये अंगणवाडी सेविकांनी सकाळी अंगणवाडीतील मुलांचा सांभाळ केल्यानंतर दुपारी ही निवडणुकीची कामे केली. निवडणुकीची कामे करण्यासाठी त्यांची रितसर नेमणूकही झाली होती. २०१० मध्ये वर्षाला तीन हजार रुपये याप्रमाणे सहा महिन्यांचे मानधन दिले गेले. त्यानंतर त्यांनी पुन्हा निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली.

२०१० ते २०१३ या कालावधीपैकी सेविकांना दोन वर्षाचे मानधन अदा केले गेले. मात्र नंतरच्या दोन वर्षांच्या मानधनावर डल्ला मारल्याचा प्रकार घडला आहे. सलग चार वर्षे काम करत असताना नंतरची दोन वर्षे भुदरगड तालुक्यातील महिलांची नावे लावून प्रत्यक्षात काम केलेल्या सेविकांचे मानधन परस्पर लाटले गेले आहे. शहर मतदारसंघातील सेविकांना मानधन मिळाले. मात्र कोल्हापूर दक्षिणमधील सेविकांना मानधन मिळाले नसल्याने त्यांनी वारंवार जिल्हाधिकारी आणि करवीर प्रांतकार्यालयाशी संपर्क साधला आहे. ज्या लिपिकाकडे हे निवडणुकीचे काम आहे, त्यांच्याकडे विचारणा केल्यावर अनुपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे सांगून त्यांना हेलपाटे मारण्यास भाग पाडले जात आहेत. काम करुनही मानधन मिळत नसल्याने सेविकांनी लोकशाही दिनात तक्रार दाखल केली. तीनवेळा तक्रारीनंतर करवीरच्या प्रांताधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी संबंधीत लिपिकाला याबाबतची सूचना केली. तरीही सेविकांना मानधन देण्यात आलेले नाही.

रजिस्टर नोंदणीवर नावे नसल्याने मानधन देण्यात येणार नसल्याचे त्यांना सांगितले गेले आहे. जर असा प्रकार असेल तर मग निवडणुकीची कामे कोणी केली असा सवाल अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला आहे. काम केलेल्या व्यक्तींच्या नावांची मागणी अंगणवाडी सेविकांनी केल्यावर संबंधीत लिपिकांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली गेल्याचे सेविकांनी सांगितले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बार असोसिएशनला मुख्यमंत्र्यांचे २५ लाख

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

न्यायसंकुल या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीमध्ये कोल्हापूर डिस्ट्रिक बार असोसिएशनच्या लायब्ररीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन स्वीकारून तत्काळ २५ लाख रुपये मंजूर केले. त्याचवेळी हायकोर्टाच्या फिरत्या खंडपीठासाठी सरकार सकारात्मक आहे. नवे मुख्य न्यायमूर्ती आल्यानंतर त्यांच्याकडे पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरच्या खंडपीठाच्या मागणीसाठी सहाही जिल्ह्यातील वकिलांनी आजवर आंदोलन केले आहे. त्याच मागणीसाठी कोर्टाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय सहा जिल्ह्यांतील वकिलांनी घेतला आहे. त्यामुळे रविवारी न्यायसंकुलाच्या उदघाटनावेळीही वकील उपस्थित नव्हते. मात्र कार्यक्रम झाल्यानंतर रेसिडन्सी क्लबवर मुख्यमंत्री निवेदन स्वीकारण्यासाठी थांबले होते. तेथे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्यावतीने त्यांना निवेदन देण्यात आले. हायकोर्टाचे फिरते खंडपीठ स्थापन करण्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर येथील वकील व पक्षकारांनी ३० वर्षे लढा दिला आहे. नवीन मुख्य न्यायमूर्ती आल्यानंतर पाठपुरावा करून तातडीने निर्णय व्हावा अशी मागणी केली. नव्या इमारतीमध्ये लायब्ररीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी लायब्ररीसाठी २५ लाख रुपये मंजूर करत असल्याचे सांगितले.

शिष्टमंडळाने राज्य ग्राहक मंचचा कॅम्प बंद असल्याची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवली. मुख्यमंत्र्यांनी तो कॅम्पही पुन्हा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र चव्हाण, सचिव अॅड. रविंद्र जानकर, अॅड. के. ए. कापसे, अॅड.माणिक मुळीक, अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. अजित मोहिते, अॅड. प्रशांत शिंदे, अॅड. मिलिंद जोशी, अॅड. सुस्मित कामत आदी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भैय्यासाहेब घोरपडे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रसिद्ध उद्योगपती आणि अर्थमूव्हर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील ऊर्फ भैय्यासाहेब आनंदराव घोरपडे (वय ५४) यांचे रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. हॉटेल आणि अर्थमुव्हिंग व्यवसायातील एक अग्रगण्य व्यक्ती तसेच पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. भैय्यासाहेब या टोपणनावाने ते परिचित होते. दुपारी तीन वाजता पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घोरपडे यांनी अर्थमुव्हर्स असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यात वृक्षसंवर्धनाचे काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वन विभागाने त्यांना वृक्षमित्र पुरस्काराने गौरविले होते. अर्थमुव्हर्स असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष होते. याशिवाय त्यांनी हॉटेल जोतिबा, बायना होस्टेलची स्थापना केली. घोरपडे गेली अनेक वर्षे दर रविवारी सकाळी चालत जोतिबा दर्शनासाठी जात. रविवारी सकाळी मित्रांसोबत ते जोतिबा दर्शनासाठी गेलेे. सकाळी साडेसहा वाजता सुमारास गायमुख येथे वाहन थांबवून पायी दर्शनासाठी निघाले असताना चक्कर येऊन ते कोसळले. मित्रांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले. मात्र, उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. ते माजी नगरसेवक सतीश घोरपडे यांचे मोठे बंधू, नगरसेविका सविता घोरपडे यांचे दीर होत.

स्मशानभूमीत खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी आमदार बजरंग देसाई, मालोजीराजे छत्रपती, कणेरी मठाचे महाराज अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज, अर्थमुव्हर्स असोसिएशनचे रवी पाटील आदींनी त्यांना आदरांजली वाहिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट अन्नधान्याची सर्रास फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात राजरोसपणे तांदळावर केमिकल्स फवारणी, हायब्रीड ज्वारीचे बदललेले बारदाण आणि हलक्या प्रतीची तूरडाळ यांची विक्री होत आहे. अशा विक्रीतून ग्राहकांची फसवणूक होत असली, तरी याबाबत तक्रार द्यायला कोणीच पुढे येत नसल्याने पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल होत नाहीत. याचा फायदा घेऊन शहराच्या विविध भागात बनावट धान्यांची विक्री सुरूच आहे.

विक्री रोखण्यास अन्न व औषध प्रशासनाला अपयश येत आहे. ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती आणि अन्न व औषध प्रशासनाने भरारी पथकांची स्थापना करण्याची मागणी होत आहे.

बाजारात बार्शी शाळूला अधिक मागणी असते. याचा फायदा घेत बार्शी शाळूच्या बारदाणामधून हायब्रीड ज्वारीची विक्री केली जाते. शाळूचा दर सरासरी ४० रुपये किलो असताना २० रुपये किलोची हायब्रीड ज्वारी ३० रुपये किलोने विकली जाते. त्यावर ग्राहकांच्या उड्या पडतात. आंध्रप्रदेशातून पन्नास किलोच्या बारदाणात ४० किलोच ज्वारी भरली जाते. त्यामुळे अशा दुहेरी नफ्यातून फसवणूक करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. असाच प्रकार आयात तुरडाळीबाबत घडला होता. तुरडाळीचे दर अचानक वाढल्यानंतर लहान आकाराची डाळ अवघ्या १५० रुपये किलो दराने विक्री केली जात होती. स्टीम केलेली तुरडाळ ग्राहकांना आकर्षित करत असल्याने त्यातून ग्राहकांची फसवणूक झाली होती.

गेल्या चार महिन्यापासून तकुडा बासमती तांदळाच्या नावाखाली कणी तांदुळ माथी मारले जात होते. यात एकदा विक्री केलेल्या ठिकाणी पुन्हा विक्री केली जात नाही. त्यामुळे फसवणुकीचा फंडा यशस्वी होतो. बनावट धान्यवाहतूक करणारी वाहने चेकपोस्टवरील पोलिसांना चिरीमिरी देवून आत आणली जात असल्याने फसवणुकीचे प्रकार वारंवार घडतात. शनिवारी सापडलेल्या तांदुळ विक्रेत्यांनी पोलिसांना चिरीमिरी दिल्याची जाहीर कबुलीच दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images