Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शोषणमुक्तीसाठी लढा अखंड हवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील सामाजिक क्षेत्रात आणि पुरोगामी चळवळींमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. ज. रा. दाभोळे यांच्या वयाच्या पंच्याहत्तरीनिमित्त डॉ. ज. रा. दाभोळे गौरव ग्रंथ समितीकडून डॉ. दाभोळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना दाभोळे यांनी 'शोषणमुक्तीचा लढा यापुढेही सुरू ठेवायला हवा' अशी गरज व्यक्त केली.

'डॉ. ज. रा. दाभोळे यांनी कोल्हापूरच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेली ५० वर्षे मोलाचे काम केले आहे. तत्त्वनिष्ठा आणि विज्ञाननिष्ठा स्वतःच्या आचरणातून त्यांनी दाखवून दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या डॉ. दाभोळेंनी नव्या विचाराचे अनेक विद्यार्थीही घडवले' अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. दाभोळे यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि समविचारी संस्थांनी डॉ. ज. रा. दाभोळे गौरव ग्रंथ समिती स्थापन केली आहे. समितीच्यावतीने सोमवारी शाहू स्मारक भवनात डॉ. भारत पाटणकर, इंदुताई पाटणकर आणि स्वातंत्र्यसैनिक माधवराव माने यांच्या हस्ते डॉ. दाभोळेंचा सपत्निक सत्कार झाला.

यावेळी त्यांना मानपत्र, पुस्तके आणि ७५ हजार रुपयांची थैली सुपूर्द करण्यात आली. डॉ. दाभोळे यांनी गौरव समारंभातून मिळालेल्या पैशांमध्ये स्वतःकडील पाच हजार रुपये घालून आठ ग्रंथालयांना ८० हजार रुपयांची मदत दिली. अस्मिता दिघे आणि शोभा चाळके यांनी संपादित केलेले गौरव ग्रंथाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. दाभोळे यांनी समाजातील शोषणाविरोधात सुरू असलेली लढाई यापुढेही सुरू ठेवण्याची गरज व्यक्त केली. दिवसा ढवळ्या होणाऱ्या विचारवंतांच्या हत्यांवरही त्यांनी नाराजी व्यक्त करीत, विचार संपवण्याचा धोका वाढल्याचे सांगितले.

'सामाजिक पुनर्रचनेसाठी तत्वज्ञान' या विषयावरील परिसंवादात बोलताना डॉ. भारत पाटणकर, इंदुताई पाटणकर आणि डॉ. रमेश कांबळे यांनीही समाजातील धर्मांधता आणि आर्थिक विषमतेकडे लक्ष वेधले. डॉ. व्ही. के. दुबुले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अनिल म्हमाणे यांनी प्रस्ताविक केले. अस्मिता दिघे यांनी आभार मानले. यावेळी अॅड. पंडितराव सडोलीकर, एम. बी. शेख, डॉ. जे. एफ. पाटील, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्थायी’साठी धनिकांची लढाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी दोन धनवंतामध्ये लढाई होणार आहे. सत्तारूढ काँग्रेस आघाडीकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक मुरलीधर जाधव यांना भाजप आघाडीतील ताराराणी आघाडीचे नगरसेवक सत्यजित कदम यांचे कडवे आव्हान आहे. स्थायी, परिवहन, महिला बालकल्याण स​मिती आणि चार प्रभाग समित्यांच्या सभापतिपदासाठी सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडीने उमेदवारी अर्ज दाखल केले. सातही जागांसाठी निवडणूक होणार असल्याने दोन्ही गटातील राजकीय संघर्ष आणखी चिघळणार हे स्पष्ट झाले.

'स्थायी'तील बहुमतासाठी दोन्ही बाजूंनी कंबर कसल्याने प्रत्येक सदस्याला मोल प्राप्त झाले आहे. या निवडणुकीत सेनेच्या मताला अनन्य साधारण महत्व असल्याने त्यांची राजकीय किंमत वाढली आहे. पाच फेब्रुवारी रोजी निवडी होणार आहेत. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीकडून मुरलीधर जाधव यांचे नाव निश्चित झाले. त्यांच्या विरोधात भाजप, ताराराणी आघाडीचा उमेदवार कोण ? याकडे नजरा लागल्या होत्या. भाजप आघाडीने सत्यजित कदम यांच्या रूपाने सर्वार्थाने तगडा उमेदवार देत सत्तारूढ गटाला चांगलेच आव्हान दिले आहे.

कदम यांच्यासह ताराराणी आघाडीच्या रुपाराणी निकम यांनीही स्थायी समिती सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला. 'स्थायी'त काँग्र्रेस, राष्ट्रवादीचे मिळून आठ सदस्य आहेत. तर भाजप, ताराराणी आघाडीची सदस्य संख्या सात इतकी आहे. शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले या एकमेव सदस्य आहेत. सेनेने अजून पाठिंबा जाहीर केला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंदू जनजागृती सभेची रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिंदु धर्मजागृती सभेच्या गुरुवारी होत असलेल्या (ता. ४ फेब्रुवारी) मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी शहरातून वाहन रॅली काढण्यात आली. राजारामपुरीतल शाळा क्रमांक नऊच्या मैदानावरून बांधकाम व्यावसायिक भय्या शेटके आणि रोहित अण्णीगीरी यांच्या उपस्थितीत फेरीला प्रारंभ झाला.

हिंदु जनजागृती समितीच्यातर्फे गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता राजारामपुरीतील लकी बाजाराशेजारील शाळा क्रमांक नऊच्या मैदानावर सभा होत आहे. सभेच्या निमित्ताने प्रचार आणि प्रसारासाठी सकाळी वाहन रॅली काढण्यात आली. शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, बिंदू चौक, आझाद चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मी रोड, फोर्ड कॉर्नर, उमा ‌टॉकीज, आझाद चौकमार्गे पुन्हा राजारामपुरीत रॅलीची सांगता झाली. फेरीत १२५ दुचाकी आणि ३ चारचाकी वाहने सहभागी झाली होती. वाहनांवर भगव ध्वज लावण्यात आले होते. फेरीतील सर्वांनी भगव्या टोप्या आणि फेटे घातले होते. यावेळी 'हर हर महादेव, जयतु जयतु हिंदु राष्ट्रम' अशा घोषणा दिल्या जात होत्या.

या फेरीत शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, त्यांचे पती महेश, शिवसेनेचे कमलाकर जगदाळे, भीमराव पाटील, नंदकिशार आहिर, उपशहरप्रमुख रघुनाथ टिपुगडे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु एकता आंदोलनाचे कमलाकर किलकिले, शिवाजीराव ससे, हिंदुस्थान नागरी एकता संघटनेचे संजय वसे, धर्माभिमानी उत्तम कांबळे, काका पाटील, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, राजन बुणगे, सनातन संस्थेच्या डॉ. शिल्पा कोठावळे, संगीता कडूकर, विजया वेसणेकर आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कलानिकेतन’मध्ये वार्षिक कलोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूरची ओळख कलापूर अशीच आहे. अनेक दिग्गज कलाकार करवीरनगरीला लाभले आहेत. त्यांचा वसा जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी कला विकसित केली पाहिजे' असे प्रतिपादन अॅस्टर आधार हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. अमोल कोडोलीकर यांनी केले. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालयाचे वार्षिक कलाप्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

कलानिकेतनचे अध्यक्ष जयसिंगराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्य सुनील पोवार, उपाध्यक्ष धनंजय जाधव संचालक अमृत पाटील, सतिश पाटील, विजय टिपुगडे, विजयसिंह चव्हाण, शामकांत जाधव, राजू राऊत, रघु जाधव, अनिल पोतदार, विजयमाला मेस्त्री, जीएस वैभव कोळी यांच्या उपस्थितीत झाले.

डॉ. कोडोलीकर म्हणाले, 'विद्यार्थ्यांनी पैशाच्या मागे न धावता कलेच्या मागे धावल्यास पैसा आपल्या मागे येईल. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कलेचा फायदा व्यावसायिकदृष्ट्या अधिक होईल.'

प्रदर्शनामध्ये फाउंडेशन, उपयोजित कला विभाग व एटीडी विभागातील सव्वादोनशे विदयार्थ्यांच्या चारशेहून अधिक कलाकृती मांडल्या आहेत. रेखाचित्र, निसर्गचित्र, मॅनमेड, ऑब्जेक्ट, रंग डिझाइन या विषयांच्या वैशिष्टपूर्ण कलाकृती सादर केल्या आहेत. आर्ट टिचर डिप्लोमाच्या कलाकृतीमध्ये प्रामुख्याने रचनाचित्रे, स्टिल लाइफ, मानवाकृती ड्रॉइंग, पारंपारिक रचनाचित्रे व पिओपी माध्यामधील कलाकृती रसिकांचे मन वेधून घेतात. प्रदर्शन ३ फेब्रुवारीपर्यंत कलानिकेतनच्या सभागृहात सकाळी दहा ते सायंकाळी सात यावेळेत खुले राहणार आहे. यावेळी प्राजक्ता वेलणकर यांनी प्रास्ताविक केले. सत्य‌जित शिर्के यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य सुनील पोवार यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लॅटफॉर्मची ‘उंची’ खुंटलेलीच !

$
0
0

Udaysing.patil @timesgroup.com

कोल्हापूर : कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या सर्वाशे वर्षांच्या इतिहासात केवळ दोन व तीन क्रमांकाचा प्लॅटफॉर्म, एक पादचारी पूल व काही रेल्वे सोडल्यास काही पदरात पडलेले नाही. भाजपच्या केंद्र सरकारमधील रेल्वेमंत्री महाराष्ट्रातील व तेही जवळ असलेल्या कोकणातील असल्याने कोल्हापूर रेल्वे स्टेशनबरोबरच्या विकास योजनांना चालना मिळेल अशी आशा होती. मात्र या वर्षभरात रखडलेल्या विकासकामांना चालना मिळाली असे दिसत नाही. रेल्वेमंत्र्यांचा ठसा दिसणारी व चेहरामोहरा बदलणाचा कामांबाबत निराशा झाली आहे.

राजर्षी शाहू छत्रपतींनी रेल्वे सेवेला सुरूवात करून इतिहास रचला. परिसराच्या विकासाबाबत प्रचंड दूरदृष्टी असलेल्या या राजाने रेल्वे स्वखर्चाने संस्थानात आणली. पण त्यानंतर १२५ वर्षाच्या कालावधीत या शाहू महाराजांच्या या दूरदृष्टीचा राज्यकर्त्यांना विसरच पडला आहे. कोल्हापूरसाठी आवश्यक असणाऱ्या रेल्वेच्या छोट्या छोट्या विकास कामांसाठी झगडा करावा लागत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक असलेल्या व खर्चाच्यादृष्टीने कमी असलेल्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचे काम अजूनही पूर्ण करता आले नाही. यामुळे ​रेल्वेमध्ये चढताना व उतरताना यंग ​सीनिअर्स व लहान मुलांच्या जिवाला धोका होणार नाही याची सतत भीती असते.

संस्थानकाळात एकमेव प्लॅटफॉर्म असलेल्या कोल्हापूर रेल्वे स्टेशनमध्ये आता तीन प्लॅटफॉर्म झाले आहेत. प्राथमिक सुविधांच्यादृष्टीने पाहिल्यास या प्लॅटफॉर्मवर अजून बऱ्याच सुधारणांची गरज आहे. एक क्रमांकाचा प्लॅटफॉर्म लांबीने छोटा असल्याने तिथे पॅसेंजर रेल्वे उभ्या केल्या जातात. दोन व तीन क्रमांकावर एक्सप्रेस रेल्वे येतात. या तीनही प्लॅटफॉर्मची उंची डब्यांच्या तुलनेने फारच कमी आहे. पॅसेंजर उभ्या राहणाऱ्या अनेक छोट्या स्टेशनवर जसे डबे उंच व प्लॅटफॉर्मची उंची कमी असते, तशीच परिस्थिती येथे आहे. तीन क्रमांकाचा प्लॅटफॉर्म अगदी अलिकडे तयार करण्यात आला. पण त्याची उंची कमी असल्याने डब्याच्या तीन पायऱ्या चढाव्या व उतराव्या लागतात. यंग सीनिअर्स व लहान मुलांसाठी ही बाब अतिशय धोकादायक आहे. पाय घसरुन प्लॅटफॉर्मवर पडल्याच्या अनेक घटना आहेत. पण यापेक्षाही डबा व प्लॅटफॉर्मच्या रिकाम्या जागेतून थेट डब्याखाली जाण्याचीही भीती आहे.

एक व दोन क्रमांकाचे प्लॅटफॉर्म जुने आहेत. दोन क्रमांक प्लॅटफॉर्मची लांबी वाढवत असताना एक नंबरची लांबी वाढली. आता या दोन्ही ठिकाणी शेड होऊन मोठा परिसर झाला आहे. मात्र दोन क्रमांकावरील जुन्या स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची उंची कमी आहे. या प्लॅटफॉर्मवर महत्वाच्या रेल्वे येत असल्याने याची उंची वाढवण्यासाठी सातत्याने मागणी होत होती. यापूर्वी उंची वाढवण्याची कामे करण्यात आली. पण तीन पायऱ्या अजूनही उतराव्या लागत आहेत. तसेच प्लॅटफॉर्म व डबा यामध्ये असलेल्या पोकळीतून सहज एक व्यक्ती रेल्वे लाईनपर्यंत खाली पडू शकते. यामुळे या प्लॅटफार्मवरील रेल्वेमध्ये चढताना तसेच शेजारुन चालत जातानाही धोका आहे. सध्या एक व दोन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची उंची नवीन शेडमध्ये वाढवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे दोन पायऱ्याच उतराव्या लागतात. पोकळीही भरपूर कमी झाली आहे. यामुळे याच पद्धतीने उर्वरित ठिकाणीही उंची वाढवण्याची आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधकाम परवाना सुलभ करू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी महापालिका कटिबद्ध राहील. शहराचा सर्वांगीण आणि संतुलित विकासासह कोल्हापूर अधिक स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न केले जातील', अशी ग्वाही महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली. 'क्रिडाई'तर्फे आयोजित 'दालन २०१६' प्रदर्शनाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. शाहूपुरी जिमखाना मैदानावरील प्रदर्शनाला हजारो नागरिकांनी भेट दिली.

आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, 'काही कामे नियमांच्या चौकटीत राहूनच करावी लागतात. तरीही बांधकाम व्यावसायिकांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याचा विचार सुरू आहे. तांत्रिक कारणांनी बांधकामाचे ऑनलाइन परवाने थांबले. मात्र, काही दिवसांत हा परवाना ऑनलाइन आणि मॅन्युअल दोन्ही पद्धतीने दिला जाणार आहे. भविष्यात कायमस्वरुपी बांधकाम परवाना ऑनलाइन करण्यात येईल. ६० दिवसांत हा परवाना द्यावा, असे आदेशही कर्मचाऱ्यांना दिले आहेत. आपत्कालिन परिस्थितीत टर्न टेबल लॅडरसाठी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवू. भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा घेतला जाईल. त्यामुळे घरफाळा कमी होणार नाही, मात्र यात समतोल साधला जाईल. येत्या काही दिवसांत शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यातून अधिकाधिक सुलभ कामकाज होईल.'

कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक एम. के. राव म्हणाले, 'शहर स्मार्ट, इको आणि ग्रीन सिटीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्बन ग्रीन पार्क होण्यासाठी सर्वच घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून इको सिटी करण्यासाठी मदत केली जात आहे. यासाठी सरकारच्या विविध योजना आहेत. उत्तमराव पाटील बायोडायर्व्हसिटी आणि मुलीचा जन्म झालेल्या कुटुंबात स्वखर्चांने १० रोपे लावली जाणार आहेत.'

क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, 'दालनमध्ये ३३ जणांनी ऑन दी स्पॉट प्लॅट नोंदणी केली. महापालिकेने बांधकाम परवान्याची प्रक्रिया सोपी करावी. रुपांतरित कराचा प्रश्न मार्गी लावावा. अन्य शहरांत २० टक्के मालमत्ता कर घेतला जातो. कोल्हापुरात हा कर ७२ टक्के आहे. तो कमी व्हावा. तुकडाबंदी कायदा झाला. मात्र लेआऊटमध्ये दहा टक्के खुली जागा सोडावी, असा नियम आहे. त्यात सवलत द्यावी.'

व्यासपीठावर क्रीडाईचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राजीव परीख, करवीरचे प्रांताधिकारी सुशांत पाटील, सचिव विद्यानंद बेडेकर, क्रिडाईचे उपाध्यक्ष सुजय होसमणी, दालनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, महालक्ष्मी इस्पातचे जितेंद्र गांधी, दालनचे सचिव संजय डोईजड आदी उपस्थित होते. चारुदत्त जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या सत्काराने टोलमुक्तीचा विजयोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टोलमुक्त कोल्हापूरने पाच वर्षे लढा दिला. जनतेच्या भावनांची दखल घेत राज्य सरकारने कोल्हापूर टोलमुक्त केले आहे. टोलमुक्तीचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा रविवारी (ता. ७) नागरी सत्कार होणार आहे.

मिरजकर तिकटी येथील हिंदू एकता आंदोलन कार्यालयात सोमवारी सायंकाळी टोलविरोधी कृती समितीची बैठक झाली. समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी आंदोलनाचा आढावा घेतला. टोलमुक्तीत मुख्यमंत्री फडणवीस, बांधकाममंत्री शिंदे, पालकमंत्री पाटील यांची भूमिका मोलाची ठरली. जनतेच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्याचे ठरले. कृती समितीचे नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या हस्ते रविवारी प्रायव्हेट हायस्कूल येथील मैदानावर दुपारी बारा वाजता सत्कार सोहळा होईल असे साळोखे यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार संजय घाटगे, रामभाऊ चव्हाण, बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, बाबासाहेब देवकर, उद्योगपती चंद्रकांत जाधव, लाला गायकवाड, दीपा पाटील मेळाव्याला उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेट घालणार दुबार खर्चाला आळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक उत्पन्नाच्या मर्यादा, रद्द करण्यात आलेली एलबीटी, प्रकल्प पूर्णत्वाची कसोटी अशा आव्हांनाना सामोरे जात महापालिका आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकाची तयारी करत आहे. आर्थिक उत्पन्न वाढीसाठी भरीव प्रयत्न करतानाच अनाठायी खर्चाला फाटा घातला जाणार आहे. एखाद्या कामासाठी दुबार खर्च करण्याच्या पद्धतीला चाप घातला जाणार आहे. महापालिकेकडून वीस फेब्रुवारीला अर्थसंकल्प स्थायीला सादर होण्याची शक्यता आहे.

आगामी आ​र्थिक वर्षात महापालिकेपुढे उत्पन्न वाढीचे मोठे आव्हान असणार आहे. एलबीटीसारखा आर्थिक उत्पन्नाचा मुख्य मार्ग बंद झाल्याने महापालिकेच्या तिजोरीवर ताण पडत आहे. महापालिकेकडील उपलब्ध निधी आणि विकास कामांसाठी खर्चाची तरतूद करताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.घरफाळा वाढ, महापालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्यांची भाडेवाढ अपरिहार्य आहे. रेडीरेकनरच्या धर्तीवर दुकानगाळ्यांना भाडे आकारणी केली जाणार आहे. या व्यतिरिक्त पाणी पट्टीची दरमहा आकारणी केली जाणार आहे.

लाइट विभाग, पाणीपटटी विभागातील दुबार खर्चाना आळा घातला जाणार आहे. एखाद्या कामासाठी दोनदा पैसे खर्ची पडणार नाहीत या पद्धतीने नियोजन केले जाईल. त्या कामातील त्रुटी शोधतानाच, कामाची गुणवत्ता, टिकावूपणा याबाबीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी अ​धिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केल्या आहेत. व्यवस्थापनातील कमतरता शोधून कार्यक्षमता सुधारणेला प्राधान्यक्रम असणार आहे. प्रकल्पाचे काम मुदतीत पूर्ण होण्यासाठी कार्यक्रम आखला जाईल. प्रकल्पाच्या कामास विलंब लावणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरू आहे. एसटीपी प्रकरणी आतापर्यंत दहा कोटीपर्यंत दंडात्मक कारवाई झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंजरस ड्रायव्हिंगचे धोके

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात विद्यार्थ्यांच्या लाइफ स्टाइलचा वेगही वाढला आहे. शाळा, क्लासेसचे टाइमटेबल व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांची पळापळही होते. सकाळच्या सत्रात शहरातील बहुतांश क्लासेसमध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. काही इंग्रजी माध्यमाच्या आणि खासगी शाळाही सकाळी आठ ते नऊ या कालावधीत भरतात. आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना सायकल चालवायला येत असल्याने त्यांचा ओढा दुचाकीकडे असतो. त्यातच पालकांचा धाक नसल्याने अथवा त्यांचाच पाठिंबा असल्याने सकाळी क्लासेस तसेच शाळांसमोर दुचाकीचा पार्किंग स्टँड भरलेला दिसतो.

सकाळी क्लास आणि शाळेला जाण्यासाठी आठवी ते दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या दुचाकीच्या वापरामुळे अपघातांचे धोके वाढू लागले आहेत. पालक, शाळा, क्लासेसचे प्रमुख आणि पोलिस अशा चारही घटकांकडून दुर्लक्ष होत असल्याने डेंजरस ड्रायव्हिंगला पायबंद कोण घालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ज्यांचे पाय जमिनीवर पोचत नाहीत, अशी मुले सकाळच्या सत्रात वेगवान दुचाकी चालवत असल्याचे चित्र शहरात पहायला मिळते. काही मुले तर बाइक रेसही लावतात. ट्रीपल सीट ड्रायव्हिंग तर हमखास दिसते. काही नववीत शिकणारे विद्यार्थी आठवीच्या विद्यार्थ्याला बिनदिक्कत बाइक चालविण्यास शिकवत असल्याचे चित्र रस्त्यावर पाहायला मिळते. लहान मुलांच्या या बाइक वेडामुळे गल्ली-बोळात छोटे-मोठे अपघात होत आहेत.

दोन वर्षांपूर्वी पाचबंगला परिसरातून क्लास संपवून ताराबाई पार्कात घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला होता. दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती डिव्हायडरला धडकल्याने या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला होता. सकाळच्या सत्रात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस रस्त्यावर नसल्याने विद्यार्थ्यांना वाहने चालवण्याचे रान मोकळेच असते. अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेने खास नियोजन करण्याची गरज आहे.

दहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांचे वय १६ ते १८ असते. १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला वाहन चालविण्याचे लायसन्स मिळते, पण लायसन्स नसलेले शहरातील ९० टक्के विद्यार्थी मोटारसायकल व मोपेड चालवतात. वेगवान बाइकचीही क्रेझ विद्यार्थ्यांमध्ये आहे. मैत्रिणींचा पाठलाग करणे, स्टंट करणे असे प्रकार सकाळी दिसतात. लायसन्स नसल्याने सिग्नल चुकवून अन्य पर्यायी मार्गाने ये-जा करण्याचा पर्याय विद्यार्थी निवडतात. काही विद्यार्थी तर पोलिस अडवतील म्हणून सिग्नल तोडून जातात.

शहरातील काही शाळा, क्लासेसमध्ये बाइक, मोपेडला बंदी आहे. पण पालकांच्या आशिर्वादाने विद्यार्थी शाळेजवळील मित्राच्या दारात दुचाकी पार्क करतात. काही विद्यार्थी शाळेच्या आवारातील मैदाने, मोकळ्या जागेत लावतात. क्लास, शाळेला चालत जाण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे लागतात. सायकलवरून जाण्यासाठी दहा मिनिटे लागतात. पाच मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी अनेक पालकच विद्यार्थ्यांना बाइक, मोपेड चालविण्यास मुभा देतात. काहीजण तर स्टेटससाठी मुलांना दुचाकी देतात. मात्र नकळत्या वयातील ही गैरसवलत जीवावर बेतू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अवनि’तील मुलींचा सुझॅन स्टाइल लूक

$
0
0

कोल्हापूर : युरोपमध्ये काम करत असताना, पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळते. मात्र, भारतात येऊन 'अवनि' सारख्या संस्थेसाठी थोडं जरी काम केलं, तर त्याचं समाधान अधिक मिळतं, अशी भावना व्यक्त केलीय जर्मनीच्या सुझॅन सेड्रिक यांनी. व्यवसायाने हेअर स्टायलिस्ट असलेल्या सुझॅन यांनी नुकतीच 'अवनि' संस्थेला भेट दिली. सुझॅन यांनी संस्थेतील मुलींची हेअर स्टाइल बदलून एक सुंदर लूकही दिला. त्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी संवाद साधला. त्यात त्यांनी आपल्या भारत भेटीविषयीचा उद्देश स्पष्ट केला.

मूळच्या जर्मनीच्या सुझॅन झ्युरिच या स्वित्झर्लंडमधील शहरात हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करतात. २००९ च्या सुमारास त्यांची भेट जर्मनीतील स्टीव्ह यांच्याशी झाली. स्टिव्ह हे जर्मनीत एक छोटी स्वयंसेवी संस्था चालवतात. स्टिव्ह यांनी त्यांना महात्मा गांधी यांचे नातू डॉ. अरुण गांधी यांच्या फाउंडेशनची माहिती दिली. त्या माध्यमातून सुझॅन यांना 'अवनि'बद्दल माहिती मिळाली. २०११ मध्ये त्यांनी पहिल्यांदा 'अवनि'ला भेट दिली. विशेष म्हणजे सुझॅन यांनी चार वर्षांनंतर 'अवनि'ला भेट दिली असली तरी 'अवनि'तील मुलांची नावे त्यांना लक्षात आहेत.

सुझॅन म्हणाल्या, 'पहिल्यांदा 'अवनि'ला भेट दिल्यानंतर आपली ही शेवटची भेट नक्कीच नाही, असे माझे मत झाले होते. चार वर्षांनंतर पुन्हा कोल्हापुरात 'अवनि' संस्थेसाठी आले, पण आता येथून पाय निघत नाही. येथील मुलांसाठी काही ना काहीतरी करावेसे वाटते.'

आफ्रिकन देशांमध्येही कुपोषण, लैंगिक शोषण, बालमजुरी यांसारख्या समस्या आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवी संस्थांकडून काम सुरू आहे. मग भारतातच येऊन समाजकार्य करण्याचा निर्णय कसा घेतला, यावर सुझॅन म्हणाल्या, 'आफ्रिकेत निश्चित वाईट परिस्थिती आहे. मात्र, महात्मा गांधी आणि मदत तेरेसा यांच्याविषयी मी खूप काही वाचले आहे. त्यामुळे कदाचित भारताविषयी आकर्षण होते. त्यामुळेच भारतात येण्याचा आणि येथील संस्थांसाठी काहीतरी करण्याचा निर्णय झाला.' भारतातही खूप चांगले काम सुरू आहे. मात्र, जर्मनी किंवा युरोपात भारताविषयी खूप चुकीची माहिती सांगितली जात असल्याचे सुझॅन यांनी सांगितले. हणबरवाडी येथे 'अवनि' संस्थेच्या मुलांसाठी इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. त्याचीही सुझॅन यांनी पाहणी केली. या शाळेसाठी लागणाऱ्या खर्चात योगदान देण्याचा इरादा सुझॅन यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलासक्तांच्या कल्पनांना आले रंग

$
0
0

कोल्हापूर : कॅनव्हासवर कुंचल्यातून तर मातीतून घडणाऱ्या आकारातून, कुणी कॅमेऱ्यात टिपलेल्या अफलातून छायाचित्रातून तर रचनाचित्रांमधून उलगडणाऱ्या नेमकेपणातून...भविष्यातील कलाकारांमधील कलासक्त कल्पनांना कलानिकेतनच्या कलाकृती दालनात अनोखे रंग मिळाले आहेत. अभ्यासक्रमात शिकलेल्या कलेच्या थिअरीला मुलांच्या आय‌डियाजची जोड मिळाल्यानंतर आकाराला आलेल्या कलांचा उत्सव पाहण्यासाठी रसिकांच्या गर्दीने प्रदर्शन फुलून गेले आहे.रा. शि.गोसावी कलानिकेतन महाविदयालय येथे मुलांच्या कलाकृती प्रदर्शनाला सोमवारपासून सुरूवात झाली. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे हे प्रदर्शन सुरू आहे. कलाकार म्हणून भविष्यात व्यापक काम करण्याची दृष्टी सजग व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.

थ्रीडी कोलाज हटकेकलेचा विद्यार्थी म्हटले की वेगळा विचार हवाच. त्याची प्रचिती प्रदर्शनातील थ्रीडी कोलाज या आर्टप्रकारात येते. चित्रात थ्रीडी इफेक्ट हा वेगळा प्रयोग कलाविदयार्थ्यांनी केला आहे. ब्लॅक अँड व्हाइट शेडसमध्ये केलेला हा प्रयोग आकर्षण ठरत आहे.

फाउंडेशन आणि उपयोजित कला या विभागातील मुलांनी मांडलेल्या कलाकृती व्यावसायिक कौशल्य अधोरेखित करणाऱ्या आहेत. यामध्ये रचना चित्रांमधील मॉडेल्स लक्ष वेधून घेत आहेत. मानवाकृती रेखाटन हा अभ्यासक्रमाचा विषय मुलांनी इतक्या कलात्मकरित्या प्रयोगशीलपणे मांडला आहे की कॅनव्हास, कुंचला आणि रंग काय कमाल करू शकतात याची प्रचिती या प्रदर्शनातील कामाकडे पाहताना रसिकनजरेत भरत आहे. शिवाय रेखाचित्रे, स्टिल लाइफ यातील बारकावे आणि नेटके काम यामधून विद्यार्थ्यांनी कमावलेली निरीक्षण शक्तीही ठळकपणे दिसत आहे. आर्ट टिचर या विभागातील विदयार्थ्यांनी आपले काम स्वतंत्रपणे मांडले आहे. भविष्यातील चित्रकार घडवणारे हे अव‌लिया मॅनमेड, रंगडिझाइन, पीओपी माध्यमातील चित्रे यावरची पकड मजबूत करत आहेत.

आज शेवटचा दिवसकलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रदर्शनीय दालन ३ फेब्रुवारीपर्यंत खुले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटचे निव्वळ कागदी घोडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या नागरी सुविधांचा विचार करून महापालिका दरवर्षी अंदाजपत्रक तयार करते. पायाभूत सुविधांची पूर्तता करताना नाविन्यपूर्ण प्रकल्पांची घोषणा केली जाते. शहरवासियांची मने जिंकण्यासाठी लोकप्रतिनिधी आकर्षक योजना मांडतात. अंदाजपत्रकात निधीची तरतूद केली जाते. प्रत्यक्षात काही प्रकल्पांसाठी निधी खर्चीच पडत नाही. घोषणा कागदावरच राहतात. यंदाही महापालिकेचे घटलेले उत्पन्न, विविध प्रकल्पांसाठी स्वनिधीतील गुंतवणूक आणि प्रकल्पांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीची तरतूद, आस्थापनेवरील खर्च आणि पायाभूत सुविधासाठी करावी लागणारी तरतूद या गोष्टीवरच निधी खर्च पडला आहे. अंदाजपत्रकात तरतूद केलेले बहुतांश प्रकल्प मूर्त रुपात येताना दिसत नाहीत.

रस्ते, गटर आणि विद्युत सुविधा

महापालिकेत प्रशासकीय पातळीवर बजेटची सध्या तयारी सुरू आहे. आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिन्यांचा कालावधी उरला असताना गेल्या दहा महिन्यांतील कामकाजावर दृष्टिक्षेप टाकल्यास पायाभूत सुविधांवरच जादा निधी खर्ची पडल्याचे सामोरे आले आहे. शहर विकासाला गती देणाऱ्या, सौंदर्यात भर घालणाऱ्या गोष्टी कागदावरच राहिल्या. भरीव आर्थिक उत्पन्नाअभावी रस्ते, गटर्स, विद्युत सुविधा अशा पायाभूत सुविधावर महापालिकेची नि​म्मी तिजोरी खर्ची पडली आहे. या गोष्टी टाळण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी महापालिकेचे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ याची सांगड घालून योजनांच्या अंमलबजावणीचा कृती आराखडा तयार केला तर जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता शक्य आहे.

पगार, मानधनावरच भार

महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, मानधन यावर दरवर्षी १७२ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम खर्ची पडते. यंदा तर महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यात आल्याने आर्थिक डोलारा कमकुवत झाला आहे. महापालिकेने यावर्षी ११० कोटी रुपये महसूल एलबीटीमधून अपेक्षित असल्याचे प्लानिंग केले होते. राज्य सरकारने १ ऑगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द केला. एलबीटी व मुंद्राक शुल्कच्या माध्यमातून जानेवारी अखेर ९३ कोटी रुपये महसूल मिळाला. आता घरफाळा, पाणी पुरवठा, नगरचना आणि मार्केट ही उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. सध्या एलबीटी बंद आहे, सरकारी अनुदानात नियमितता नाही. यामुळे या विभागावर आर्थिक उत्पन्नाचा भार आहे.

नोव्हेंबरअखेर जमा महसूल (रुपयांत)

३३ कोटी मुरतात इथे

महापालिकेच्या आस्थापना विभागातंर्गत कर्मचाऱ्यांचे वेतन, मानधन आणि पेन्शन यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च पडतो. पगार, पेन्शनसाठी दरवर्षी १७२ कोटी रुपयांची तरतूद केली जाते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या सहा हजारच्या आसपास आहे. दरमहा तेरा कोटी रुपयेपर्यत रक्कम पगारासाठी खर्ची पडते. याशिवाय लाइटबिल, दुरूस्ती, सुविधा याकरिता वीस कोटी रुपयांची तरतूद करावी लागते.

निधीअभावी हॉस्पिटल्स बकाल

महापालिकेच्या दवाखान्यांच्या इमारती दुरुस्त करून चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली. त्या माध्यमातून सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसाठी तीस लाख, पंचगंगा रुग्णालयासाठी २० लाख, सर्व वॉर्ड दवाखाना दुरुस्तीसाठी १५ लाख आणि पंचगंगा रुग्णालय येथे दंतचिकित्सा विभाग सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली. मात्र, निधीअभावी या सगळ्या सेवासुविधा कागदावरच राहिल्या.

'खासबाग'ला 'सब-वे'ची घोषणाच

खासबाग मैदान परिसर, मिरजकर तिकटी, श्री शाहू मैदान चौक परिसरातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, मुलांच्या जीविताची सुरक्षिततेला प्राधान्यक्रम देताना या भागात सब-वे प्रकल्प उभारणीची घोषणा झाली. अंदाजपत्रकात याकरिता दीड कोटी रुपयांची तरतूद झाली. आणि उर्वरित दीड कोटी रुपये 'बांधा, वापरा व हस्तांतरण' (बीओटी) या तत्वावर उभे करण्याचे ठरले. मात्र गेल्या वर्षभरात यापैकी एकही गोष्ट घडली नाही.

महोत्सव लटकला, पुरस्कारही नाही

कोल्हापूर महोत्सव, पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कार्यक्रम, स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन याकरिता 'कोल्हापूर महोत्सव'साजरा करण्याचे ठरले. याकरिता अंदाजपत्रकात २५ लाखांची तरतूद झाली. पदाधिकारी बदलले, नवीन अधिकारी आले, पण महोत्सव पाहायला मिळाले नाही. उल्लेखनीय काम​गिरी करणाऱ्या महिलांना महापालिकेतर्फे रणरागिनी छत्रपती ताराराणी यांच्या नावांनी पुरस्कार देण्याची घोषणा झाली. या पुरस्कारांसाठी पूर्वी ५१,००० रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामध्ये वाढ करून पुरस्काराची रक्कम एक लाख करण्यात आली. पण प्रत्यक्षात पुरस्कार सोहळा काही झाला नाही.

प्रशासनाकडून स्थायी समितीला सादर झालेले बजेट पायाभूत सुविधा नजरेसमोर ठेवून तयार केलेले असते. स्थायी समिती शहर विकासाच्या संकल्पना, शहराचे सौंर्दय वाढविणे, आणि शहरवासियांच्या अपेक्षा जाणून त्यामध्ये नवीन कामे सुचवते. ते अंदाजपत्रक सभागृहापुढे सादर करते. मात्र त्यातील कामांची अंमलबजावणी होत नाही. त्याला प्रशासनाच्या कामकाजातील दिरंगाईपणा कारणीभूत ठरतो. प्रशासकीय पातळीवर फायलींचा निपटारा जलदगतीने होत नाही. वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या अंमलबजावणीसाठी वेगळी टीम असायला हवी. मात्र महापालिकेकडे मनुष्यबळाचा अभाव आहे. त्याचाही फटका बसतो. जलद कामकाज आणि निर्णयक्षमता या दोन्ही गोष्टी प्रशासकीय पातळीवरून व्हायला पाहिजेत. सरकारने एलबीटी रद्द केल्याने महापालिकेसमोर आर्थिक आव्हान उभे ठाकत आहे.

- आदिल फरास, माजी स्थायी समिती सभापती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर जिल्हा परिषदच अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदांसाठी ठेवण्यात आलेल्या यशवंत पंचायत राज अभियानामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद पुणे विभागीय स्तारावर अव्वल ठरली आहे. तर राधानगरी पंचायत समिती विभागीयस्तार द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे.

ग्रामपंचायत गटात कसबा उत्तुर (ता. आजरा) प्रथम तर पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) तृतीय स्थान पटकावले आहे. पंचायत राज अभियानामध्ये पुणे विभागात अव्वल ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे. पुणे विभागीय पातळीवर जिल्हा परिषद सलग दुसऱ्यांदा अव्वल ठरली आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समितीने मंगळवारी विभागीयस्तराचे निकाल जाहीर केले.

राज्यात पंचायत राज संस्थामधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणा-या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींसाठी विभाग व राज्य स्तरावर यशवंत पंचायत राज अभियान पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. यशवंत पंचायत राज अभियान २०१५-१६ अंतर्गत जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांनी सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मुल्यमापन करण्यासाठी पुणे विभागस्तरीय समितीमार्फत द्वीसदस्यीय समितीने १३ व १४ जानेवारी २०१६ रोजी क्षेत्रीय तपासणी केली होती. विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील विभागस्तरीय पडताळणी समितीने निकाल जाहीर केला.

पुणे विभागस्तरावर पंचायत समितीच्या मुल्यमापनामध्ये पंचायत समिती राधानगरीने द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून विभागस्तरावरील सात लाख रुपये व स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र मिळण्यास पात्र झाली आहे. ग्रामपंचायत कसबा उत्तुर तालुका आजरा प्रथम क्रमांक व ग्रामपंचायत शिरोली पुलाची ता. हातकणंगले तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून अनुक्रमे तीन लाख व एक लाख रुपये तसेच स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मिळण्यास पात्र आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेने गेल्यावर्षी सन २०१४-१५ मध्येही विभागस्तर व राज्यस्तरावर प्रथम येवून २५ लाख तसेच केंद्र स्तरावर ३० लाखांचे पारितोषिक प्राप्त केले होते. गेल्यावर्षी पंचायत समिती कागलला विभागस्तरावर प्रथम क्रमांकाचे दहा लाख व राज्य स्तरावर तृतीय क्रमांक दहा लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले होते. पंचायत समिती, गडहिंग्लजला विभागस्तरावर द्वितीय क्रमांकाचे सात लाखांचे पारितोषिक मिळाले होते. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी गणेश देशपांडे व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख, इतर अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात शल्यचिकित्सकांची उद्या परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मॅसिकॉन २०१६'अंतर्गत कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्यावतीने शल्यचिकित्सकांची परिषद गुरुवारपासून (ता. ४ ) सात फेब्रुवारीपर्यंत सयाजी हॉटेलमध्ये होणार आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते उद‍घाटन होईल. उद‍घाटन समारंभास बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

डॉ. शहापूरकर म्हणाले, 'असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया या शिखर संस्थेशी सलग्न असलेल्या कोल्हापूर सर्जिकल सोसायटीच्यावतीने परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेसाठी एक हजार २०० शल्यचिकित्सकांनी नोंदणी केली आहे. परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. सुनील नाडकर्णी यांची बिनविरोध निवड केली आहे. परिषदेच्या माध्यमातून याच दिवसी निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, मदुराई व दिल्ली येथे १५ नामवंत डॉक्टरांची व्याख्याने आयोजित केली आहेत. दुपारी चार वाजता होणाऱ्या 'ट्रेड फेअर' कार्यक्रमाचे उद‍्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेतंर्गत शुक्रवारी (ता.५) ऑपरेशन विषयावर कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळे दरम्यान अन्ननलिका, पित्ताशय, हार्नियाच्या २० रुग्णावर सीपीआरमध्ये होणाऱ्या शस्रक्रियांचे प्रेक्षपण केले जाणार आहे. यावेळी सर्जन्स ऑपरेशन करणाऱ्या सर्जनशी संवाद साधणार आहेत.'

परिषदेच्या ६ व ७ रोजी विविध विषयावरील २०० शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. पत्रकार परिषदेला डॉ. रवींद्र खोत, दीपक पाटील, डॉ. वसंत देशमुख, डॉ. विजय कासा, डॉ. आनंद कामत, मानसिंग आडनाईक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पदूम’ निबंधकांना खुलाशाचे आदेश

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com

कोल्हापूर : सहकारी दूध संस्थांच्या निवडणुकीत शासकीय नियमापेक्षा संस्थाकडून केलेली जादा वसुली, निवडणुकीचा हिशोब देण्यास केलेली दिरंगाई आणि मनमानी कारभार केल्याबद्दल सहकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. ए. बी. जोगदंड यांनी जिल्ह्याचे पशू, दूध आणि मत्स (पदूम) विभागाचे सहाय्यक निबंधक अरुण चौगले यांना दहा दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. चौगुले यांनी दूध संस्थांच्या निवडणुकीत गैरकारभार केल्याच्या तक्रारी सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत खुलासा करण्याचे आदेश सहकार सचिवांनी दिले आहेत.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीपूर्वी आणि त्यानंतर जिल्ह्यातील १२०० दूध संस्थांच्या निवडणुका सहाय्यक निबंधक चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. या संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी चार खासगी लेखापरीक्षकांची नेमणूक केली होती. चार लेखापरीक्षकांनी तालुक्यांची विभागणी करून निवडणूका घेतल्या. त्याचा हिशोब अद्याप निवडणूक प्राधिकरण आणि संस्थांना सादर केलेला नाही. निवडणुकीचा खर्च धनादेशाद्वारे वितरीत केलेला नाही, निवडणूक अधिकाऱ्यांकडून कोऱ्या व्हाउचरवर स्वाक्षरी घेतल्या गेल्या आहेत. नियमांपेक्षा कार्यालयीन खर्च जादा दाखवल्याच्या तक्रारी सहकार निवडणूक प्राधिकरणचे आयुक्त मधुकर चौधरी यांच्याकडे दाखल झाल्या होत्या.

आयुक्त चौधरी यांनी सर्व तक्रारी सचिव डॉ. जोगदंड यांच्याकडे प्रस्तावित केल्या. सचिव जोगदंड यांनी सहाय्यक निबंधकांच्या या कारभाराची दखल घेऊन दहा दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८१ नुसार खुलासा न केल्यास शिस्तभंगाची कारवाई का करुन नये ? असे सुचित केले आहे. सहाय्यक निबंधक चौगले यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेनेच्या महिला शाखेने आंदोलन करून तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेवूनच चौगले यांना पुणे येथे कागदपत्रांसह खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तूरडाळ अद्याप दीडशेवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कमी पर्जन्यमान आणि मागणीमध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे तूरडाळींसह इतर डाळींच्या दरामध्ये सातत्याने वाढच होत असल्याचे चित्र आहे. मध्यंतरी साठेबाजारांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर डाळींच्या दरांमध्ये घट झाली होती. विशेषतः तूरडाळीचा दर २०० रुपयावरुन १२० पर्यंत कमी झाला होता. मात्र गेल्या आठवड्यापासून यामध्ये पुन्हा वाढ होऊन तूरडाळीचा दर १५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तूरडाळीबरोबरच मसूरडाळ व हरभरा डाळीच्या दरातही वाढ झाली आहे.

यावर्षी पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाल्यानंतर दसरा व दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तूरडाळीच्या दरामध्ये अचानक वाढ झाली होती. ८० ते ९० रुपयांवरुन टप्प्याटप्प्याने २०० रुपये किलोपर्यंत दर गेल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. सणाच्या तोंडावर व्यापाऱ्यांनी तूरडाळीचे दर वाढवल्याने राज्याच्या पुरवठा विभागाने छापे टाकून डाळींचे साठे जप्त केले होते. त्यानंतर डाळीच्या दरामध्ये घट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र टप्प्याटप्प्याने डाळींचे दर कमी झाले तरी शंभर रुपयाच्या खाली दर आलेले नव्हते.

डाळीचे दर शंभर रुपयाच्या आत आणण्यासाठी सरकारी पातळवीर प्रयत्न झाले, पण त्याला फारसे यश आले नाही. परदेशातून डाळ आयात करुनही दरावर कोणताही परिणाम झाला नाही. देशातील डाळींचे उत्पादन कमी होणार असल्याने केंद्र सरकारने बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दर कमी व्हायला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.



डाळ किलो क्विंटल

तूरडाळ १५० १३०००

मसूरडाळ ८० ७५००

हरभरा डाळ ६८ ६४०० ते ६८००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्ल्स गुंतवणूकदारांना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्ल्स अॅग्रो​टेक कार्पोरेशन लिमिटेडच्या योजनांच्या आमिषाला बळी पडून जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केलेले सुमारे ६०० कोटी रुपये परत मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. जवळपास ५५ हजार गुंतवणूकदारांनी 'पर्ल्स' मध्ये गुंतवणूक केली आहे. रोज हेलपाटे, अधिकाऱ्यांशी वाद, मोर्चा आणि आंदोलन करुनही हाती फारसे न लागलेल्या गुंतवणूकदांराना घाम गाळून कमावलेला पैसा परत कसा मिळवायचा याची चिंता होती. सुप्रीम कोर्टाने गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिल्याने हे कष्टाचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.

जनलोक प्रतिष्ठानच्यावतीने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने ही समिती स्थापण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सेबीचा एक अधिकारीही सहभाग असेल. ही समिती गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्यासाठी कंपनीची संपत्तीही विकण्याचे पाऊल उचलू शकते. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून ६०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक झाली आहे.

शाहूपुरी कुंभार गल्लीत १९९३ साली सुरू झालेल्या 'पर्ल्स' ने सहा वर्षांत दामदुप्पट व साडेसहा हजार रूपयाचे सहा हप्ते भरले की एक एकर जमीन नावावर करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यात ५५ हजाराहून अधिक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली. एजंटांना जिल्ह्यातून महिन्याला चार कोटी गुंतवणुकीचे टार्गेट देण्यात आले. तसेच कमिशनही १५ ते ३० टक्के भरभक्कम मिळत असल्याने एजंटांनीही नातलग आणि मित्रांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. दुप्पट रक्कम मिळाल्याने ठेवीदार व गुंतवणूकदारांचा ओढा पर्ल्सकडे वाढला होता. त्यामुळे एजंटांनी मित्र, पाहुण्यांबरोबर दुकानदार, कामगार, शेतकऱ्यांनाही जाळ्यात ओढले. त्यातील अनेकांनी आयुष्यभराची मिळकत पर्ल्समध्ये गुंतवली. १२ टक्के व्याज मिळत असल्याने पर्ल्सच्या नावाचा दबदबाही वाढला. यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत राहिली.

मात्र पर्ल्सकडून गेल्या दीड वर्षात पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार होत होत्या. त्यामुळे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांनी स्टेशन रोडवरील पर्ल्सच्या कार्यालयावर धडक मोर्चाही काढला होता. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. गुंतवणूकदारांकडून आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर कंपनीच्या पुण्यातील अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना धमकी दिल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले होते. पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास गुन्हा दाखल होईल. कोर्टप्रकरणामुळे पैसे मिळणार नाहीत, अशी भीती गुंतवणूकदांना दाखवण्यात येत होती. त्यातून गुंतवणूकदार एकत्र येण्याची प्रक्रिया थंडावली. पण देशभरातील पर्ल्सचे गुंतवणूक एकत्रित येऊ लागल्याने सेबीकडून कारवाई होऊ लागली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कन्यागत’साठी १२१.६४ कोटी मंजूर

$
0
0

जयसिंगपूर ः श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे आगामी वर्षात होणाऱ्या कन्यागत महापर्वासाठी १२१.६४ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत ही यासंबंधीच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली.

नृसिंहवाडी येथे दर बारा वर्षांनी कन्यागत महापर्व सोहळा साजरा होतो. वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा तसेच अन्य राज्यातून लाखो भाविक येतात. यंदा ऑगस्ट२०१६ पासून हा सोहळा होणार आहे. भाविकांना सोयी, सुविधा पुरविण्यासाठी निधीची गरज होती. त्यासाठी आराखडा सरकारकडे सादर केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सहकार, पणन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून प्रस्तावास मान्यता मिळाल्याचे आमदार उल्हास पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली महापौरपदासाठी

$
0
0

म. . वृत्तसेवा, कुपवाड
एका पदासाठी एकच उमेदवारी अर्ज या काँग्रेस पक्ष निरीक्षकांच्या दाव्याला मंगळवारी सांगलीत धक्का बसला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून महापौरपदासाठी हारुण शिकलगार, उपमहापौरपदासाठी विजय घाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ते बाहेर पडताच निरंजन आवटी यांनी महापौरपदासाठी आणि प्रदीप पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकविले. मंगळवारी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी सहाजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत सत्तेत असलेल्या काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याबद्दल प्रचंड उत्सुकता ताणली होती. पक्षनिरीक्षक, ज्येष्ठ नेते, स्थानिक नेते आणि पक्षाचे नगरसेवक, त्यांचे समर्थक यांच्यात भेटीगाठींची आणि मुलाखतींची मॅरेथॉन दोन दिवस चालली होती. उर्वरित अडीच वर्षांसाठी महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी असल्याने प्रत्येकी दहा महिन्याचा कालावधी अशी तिघांना संधी देण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला. तरीही महापौरपदाची उमेदवारी कोणाला द्यायची, यावर एकमत होत नव्हते. सांगलीचे ज्येष्ठ नगरसेवक हारुण शिकलगार आणि मिरजेचे सुरेश आवटी यांच्यातील रस्सीखेच अखेरच्या क्षणापर्यंत कायम होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर काहीवेळ काँग्रेसने त्या दोघांना एकत्रित बसून चर्चा करून निर्णय देण्याची संधी दिली. त्यांच्यातही एकमत झाले नाही. अखेर पक्षाने शिकलगार यांना महापौरपदाचे आणि विजय घाडगे (कुपवाड) यांना उपमहापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषित करून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले.
काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून शिकलगार आणि घाडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काहीवेळ शांत बसलेल्या सुरेश आवटी गटाने पुन्हा उचल खाल्ली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही मिनिटांचा अवधी उरला असताना आवटी हे धावत-पळत उपमहापौरांच्या दालनात आले. तेथे दरवाजा बंद करून काही सदस्यांशी बोलले आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नगरसचिवांच्या कार्यालयात धावले. वेळ संपल्याचे सांगण्यात येत असतानाही अद्याप दोन मिनिटे आहेत, असा दावा करत त्यांनी अनुमोदक, सुचकांना बोलवून त्याच ठिकाणी स्वाक्षऱ्या घेतल्या. महापौरपदासाठी निरंजन आवटी आणि उपमहापौरपदासाठी प्रदीप पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी दाखल केल्यानंतर सुरेश आवटी यांनी पक्षनिरीक्षक आणि स्थानिक नेते यांच्यात एकमत झाले नाही. निरीक्षकांनीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याचा दावा केला. परंतु त्यांचा दावा गटनेते, पक्षनिरीक्षक, पक्षाचे नेते यांनी फेटाळला आहे.
महापौरपदासाठी विरोधी पक्ष राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी, मैनुद्दीन बागवान, विष्णु माने यांनी तर स्वाभिमानी विकास आघाडीतर्फे स्वरदा केळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीकडून राजू गवळी, संगीता हारगे यांनी तर स्वाभिमानी विकास आघाडीकडून संगीता खोत, स्वरदा केळकर आदींनी अर्ज दाखल केले आहेत.


बिनविरोधसाठी प्रयत्न
ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम, पक्षनिरीक्षक आमदार आनंदराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, महापालिकेच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील, विशाल पाटील, विश्वजीत कदम यांनी मंगळवारी पुन्हा सहा इच्छुकांच्या स्वतंत्ररित्या मुलाखती घेतल्या. निरीक्षकांनी विद्यमान महापौर मिरजेचा असल्याने आता सांगलीला संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिकलगार आणि आवटी यांना दोघांत चर्चा करून निर्णय देण्याचे आवाहन केले. त्यांच्यात एकमत न झाल्याने निरीक्षकांनी महापौरपदासाठी शिकलगार आणि उपमहापौरपदासाठी घाडगे यांच्या नावांची घोषणा केली. बंडखोरी करणाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्याचाही आमचा प्रयत्न राहणार आहे, असे काँग्रेसचे गटनेते किशोर जामदार म्हणाले.

महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवार सर्वांना विश्वासात घेऊनच निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित तीस महिन्यांत प्रत्येकी दहा महिने अशी तिघांना महापौर आणि तिघांना उपमहापौरपदावर काम करण्याची संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. बंडखोरी होऊ नये यासाठी त्यांच्याशी चर्चा करणार आहे, असे महापालिका नेत्या जयश्रीताई पाटील यांनी सांगितले.
काँग्रेसच्या उमेदवारीबाबत पक्ष निरीक्षक आणि स्थानिक नेते यांच्यात एकमत झालेले नाही. त्यामुळे दोन्ही पदांसाठी अर्ज भरण्यास सांगितले आहे. त्यानुसार आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केले असून, बुधवारी आपली भूमिका जाहीर करणार आहे, असे सुरेश आवटी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळगावात मराठी टायगर्स प्रदर्शित नाहीच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वेदना आणि महाराष्ट्रात येण्यासाठी आजवर दिलेल्या लढ्यावर आधारित मराठी टायगर्स चित्रपट ५ फेब्रुवारी रोजी बेळगावात प्रदर्शित होण्याची शक्यता मावळल्यात जमा आहे. बेळगावातील चित्रपटगृहाच्या मालकांनी तसेच चित्रपट वितरक यांनी हा चित्रपट प्रदर्शित करू नये, यासाठी दबावतंत्र वापरण्यात आले असल्याचा आरोप चित्रपटाचे निर्माते अभिजित ताशिलदार यांनी केला आहे.
बेळगावच्या जनतेला मराठी टायगर्स चित्रपट बघायला मिळावा यासाठी कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील शिनोळी गावात वातानुकुलीत तंबूत चित्रपट दाखविण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती अभिजित ताशिलदार यांनी दिली. शिनोळी येथे होणाऱ्या चित्रपटाच्या पहिल्या खेळाला अभिनेते अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत .
मराठी टायगर्स चित्रपट बेळगावात प्रदर्शित होऊ नये यासाठी कन्नड संघटना आणि तथाकथित नेत्यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री यांना निवेदने दिली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यास शहरातील शांततेला बाधा येऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असा कांगावा केला होता. एका महाभागाने तर कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई करण्याची मागणी केली होती, पण उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कोणताही गोंधळ होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याची सूचना केली. त्यानंतर कर्नाटक शासनाने आपले दबाव तंत्र वापरून चित्रपट प्रदर्शित होणार नाही याची व्यवस्था केली आहे. येळ्ळूर मारहाण प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चौकशी सुरू केल्यामुळे कर्नाटक सरकारचे धाबे दणाणले आहे .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images