Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वीज प्रकल्पातून भागली गणपतीची वर्गणी

$
0
0
कचरा टाकायला जागा मिळत नसल्याचा फटका आता महापालिकेला आणि पर्यायाने प्रत्येक नागरिकाला बसणार आहे. इतर शहरात वीज निर्मितीसाठी कचरा विकत घेतला जात असताना कोल्हापुरात मात्र, कचराही घ्या आणि पैसेही घ्या म्हणत पालिकेने हात सैल सोडले आहेत.

सावकाराचा तगादा : तरुण घरातून बेपत्ता

$
0
0
पाच लाख रुपयांसाठी महिन्याला पन्नास हजार रुपये व्याज घेणाऱ्या खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून मंदार गोखले हा तरुण गेल्या पाच दिवसांपासून घर सोडून गेला आहे.

आज-यासाठी ‘प्रांत’चे दोन दिवस

$
0
0
आजरा तालुक्याचा गडहिंग्लज तालुक्याशी व्यापारी, शैक्षणिक, न्यायालयीन, आरोग्य विषयक तसेच सरकारी कामासाठी नियमित संबंध येतो.

पाणी माणसांसाठीही विषारी

$
0
0
मायक्रोसिस्टिस या शेवाळाच्या प्रचंड वाढीमुळे रंकाळा तलावातील पाण्यात घातक द्रव्ये तयार झाली आहेत. या द्रव्यांचा माणूस व प्राण्यांच्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम करतात. यकृतावरही विपरित परिणाम होतो.

पोलिसांना तपासासाठी १५ कोटी

$
0
0
‘गुन्हे आणि घटनांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना खर्चाचा परतावा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी यंदा पंधरा कोटी रुपयांची तरतूद करुन त्यास मंज‌‌‌ुरी देण्यात आली आहे’ अशी माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील दिली.

विनापरवाना आंदोलन : ७ अटकेत

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाची परवानगी नसताना कॅम्पसमध्ये धरणे आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी करणाऱ्या सातजणांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

कोंडके चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष

$
0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय कोंडके यांची निवड करण्यात आली. १४ संचालक मतदारांपैकी कोंडके व त्यांचे प्रतिस्पर्धी विजय पाटकर यांना प्रत्येकी सात मते मिळाली.

साताऱ्यात हॉस्पिटलची तोडफोड

$
0
0
विष प्राशन केलेल्या एका महिलेचा सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. निवासी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत हॉस्पिटलची तोडफोड केली.

पॅरासाइटना बसणार चाप

$
0
0
विद्यापीठात शिकायला नाही, कोणत्याही अधिविभागाला प्रवेश नाही तरीसुध्दा होस्टेलमध्ये बिनधास्त वास्तव्य करणाऱ्यांच्यावर प्रशासन आता केवळ करडी नजर ठेवणार नाही, तर पॅरासाईटसच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईबरोबरच होस्टेलमध्ये शिस्त निर्माण करण्याबाबतही पावले उचलली जाणार आहेत.

मूल दत्तक घेण्यासाठी वेटिंग

$
0
0
मुलगी दत्तक घेण्यासाठी किमान अडीच तर मुलासाठी किमान सहा वर्षे प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे बालकल्याण संकुलातील शिशुगृह तसेच शिशु आधार केंद्रात सध्या ७० पालक मूल दत्तक घेण्यासाठी वेटिंगवर आहेत.

रंकाळा स्वच्छतेचा तात्पुरता उतारा

$
0
0
विषारी रंकाळा वाचवण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले असले तरी ड्रेनेज लाइनचे काम पूर्ण होण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. रंकाळ्यात पोहणे, म्हशी धुणे, मासेमारीसाठी जनजागृती व कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गी उपसणे, ब्लीचिंग पावडरचा मारा करण्याची उपायोजना सुरू आहे.

वाट कर्तव्याची दावतोय रिक्षावाला

$
0
0
‘रिक्षावाल्यांकडून अरेरावी केली जाते’, ‘अव्वाच्या सव्वा भाडे वसूल केले जाते’, ‘इच्छित स्थळी येण्यासाठी नकार दिला जातो,’ अशा एक ना अनेक तक्रारी आणि अनुभव अनेकांनी घेतला असला, तरी निपाणीतील एक रिक्षाचालक मात्र यास अपवाद आहे.

प्राध्यापकांचे आंदोलन बेकायदा

$
0
0
राज्यातील सर्वच महाविद्यालयातील प्राध्यापकांना येण्या जाण्याची नोंद करणे सक्तीचे केलेले असताना मिरज महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागातील २५ प्राध्यापकांनी त्यास नकार दिल्याने त्यांचे अडीच महिन्याचे वेतन रोखले आहे.

मुलीला पळवून नेणाऱ्या मांत्रिकास पोलिस कोठडी

$
0
0
भूतबाधा दूर करण्याचा बहाणा करून एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणे, तिच्यावर बलात्कार करणे आदी आरोपाखाली अब्दुल शेख (३०) या मांत्रिकाला अटक करून त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

‘यंदाच्या हंगामात अनेक कारखाने बंद पडतील’

$
0
0
‘ज्या महाराष्ट्रात खासगीकरणातून सहकारीकरण करण्याचे काम केले, त्याच ठिकाणी काही समाजकंटक सहकारी संस्थांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

नामकरण विधीचा खर्च वीरकन्येच्या शिक्षणासाठी

$
0
0
सांगली जिल्ह्यातील पाडळी (ता. शिराळा) येथील चंद्रकांत पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी मुलाच्या नामकरण विधीसाठीचा अनावश्यक खर्च टाळून कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील शहीद जवान कुंडलिक माने यांची कन्या करिष्मा हिच्या शिक्षणासाठी दिला.

सोलापर जिल्हाधिकाऱ्यांचा वाळू माफियांना दणका

$
0
0
भीमा आणि माण नदीतून वाळू उपसा करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील वाळू माफियांच्या विरोधात जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी फास आवळला असून, मंगळवारी १४ हजार ब्रास वाळू साठ्यावर कारवाई करण्यात आली.

महिलांच्या सुरक्षेसाठी कल्पनाराजे आक्रमक

$
0
0
‘सातारा जिल्ह्यातील महिला सुरक्षित राहिल्या नसून त्यांना कोणी वालीच उरला नाही. कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर गेली असून, नागठाणे येथील नवविवाहितेच्या खून प्रकरणाच्या पंचनाम्यात पोलिसांनी हलगर्जीपणा केला.

नातेवाइकांकडून हॉस्पिटलमध्ये तोडफोड

$
0
0
विष प्राशन केलेल्या एका महिलेचा सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय जिल्हा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला.

राशिवडेत ४३ हजारांचा गुटखा जप्त

$
0
0
गुटख्याची विक्री व साठा करणाऱ्या राशिवडे (ता. राधानगरी) येथील एका किराणा मालाच्या दुकानावर बुधवारी सायंकाळी राधानगरीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली माने यांच्या पथकाने धाड टाकली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images