Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भीमा कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशी आणि विदेशी बनावटीची कृषी औजारे, बी-बीयाणे, खते, कीटकनाशके, हलगी घुमक्याच्या तालावर नृत्य करणारे घोडा आणि बैल, रंगीबेरंगी पोपट, पंढरपुरी म्हैस, देशी गाय असा सुरेल संगम भीमा कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनासाठी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसीही प्रचंड गर्दी झाली होती.

दुपारच्या सत्रात कृषी महाविद्यालयाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आसवले यांनी 'दुभत्या जनावरांची निवड, संगोपन, विविध आजार व उपाय' या विषयावर तर 'नैसर्गिक, सेंद्रीय शेती काळाची गरज व आव्हाने' या विषयावर विठा (कराड) येथी नेचर केअर फर्टिलायझर्सच्या जयदेव बर्गे यांनी मार्गदर्शन केले. मंगळवारी (ता.२६) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. प्रदर्शनामध्ये घेण्यात आलेल्या जातीवंत जनावरे, खाद्य महोत्सव स्पर्धेतील विजेत्यांना पालकमंत्र्याच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे. समारोप समारंभास आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमित सैनी, बसवराज मास्तोळी, धैर्यशील बावसकर, वीरेंद्र जमदाडे उपस्थित राहणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक व अरुंधती महाडिक यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यार्थ्यांकडून पुतळ्यांची स्वच्छता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाने प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वदिनी शहरातील २० पुतळ्यांची व परिसराची स्वच्छता केली. विद्यापीठ आणि कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) आणि महापालिकेच्या सहकार्याने राबविलेल्या या उपक्रमात सुमारे एक हजार एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले.

बिंदू चौकापासून सकाळी आठ वाजता स्वच्छता उपक्रमाची सुरुवात झाली. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी डॉ. शिंदे म्हणाले, 'सदोदित चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत राहावी, यासाठी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा उभारल्या जातात. त्यांची स्वच्छता करण्यासह मनाच्या स्वच्छतेचाही संस्कार या उपक्रमाच्या माध्यमातून सर्वांनी रुजवावा.' बिंदू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुतळ्यांसह स्मृतिस्तंभ परिसराची कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, एनएसएस समन्वयक डॉ. सुरेश शिखरे यांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. महापालिकेचे आरोग्य निरीक्षक टी. डी. पाडळकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उपक्रमात सहभाग घेतला. त्यांनी पुतळा स्वच्छतेसाठी दोन टँकर दिले.

स्वच्छ केलेले पुतळे व सहभागी कॉलेज

बिंदू चौक - देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, पै. खाशाबा जाधव (भवानी मंडप) व संत गाडगेबाबा (जोतिबा रोड) - डॉ. डी. शिंदे सरकार महाविद्यालय, राजमाता जिजाऊ (गंगावेस) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कोल्हापूर महापालिका) - यशवंतराव चव्हाण के. एम. सी. महाविद्यालय, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार (राजारामपुरी) - कमला महाविद्यालय, छत्रपती शाहू महाराज (दसरा चौक) व छत्रपती राजाराम महाराज (व्हीनस कॉर्नर),

आईसाहेबांचा पुतळा (अयोध्या टॉकीजजवळ) - श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, ताराराणी पुतळा (कावळा नाका), राजीव गांधी (वटेश्वर मंदिराजवळ) - राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालय, आईचा पुतळा (माउली चौक) - राजाराम महाविद्यालय, महात्मा गांधी (गांधी मैदान), जी. कांबळे (खासबाग मैदान) - न्यू कॉलेज, श्रीपतराव बोंद्रे (गोकुळ हॉटेल) - महावीर महाविद्यालय. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, डॉ. आप्पासाहेब पवार, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘केडीसीसी’वर प्रशासक शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने काढलेल्या नवीन अध्यादेशातून पळवाट काढण्यासाठी राजीनामा देवून वारसदारांची वर्णी लावण्याच्या मनसुब्यांना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून 'खो' बसणार आहे.

प्राधिकरणाच्या मान्यतेशिवाय कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या स्वीकृत संचालकपदाची नियुक्ती बेकायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे के. पी. पाटील यांचे चिरंजीव आणि ए. वाय. पाटील यांच्या पत्नीची स्वीकृत संचालक म्हणून केलेली नियुक्ती रद्दबातल ठरणार आहे. नवीन अद्यादेशाप्रमाणे बँकेच्या विद्यमान अकरा संचालकांच्या पदावर गंडातर येवून बँक अल्पमतात जाणार असल्याने बँकेवर प्रशासक नियुक्तीची शक्यता दृढ बनली आहे.

२१ जानेवारी २००६ पासून प्रशासक नियुक्त झालेल्या सहकारी संस्थेच्या संचालकांना पुढील दहा वर्षे कोणत्याही संस्थेची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याच्या निर्णयाचा जिल्हा बँकेच्या संचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. शनिवारी (ता.२३) संचालक के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिल्यानंतर गुपचूपपणे के. पी. पाटील यांचा मुलगा रणजित तर ए. वाय. पाटील यांच्या पत्नी अर्चना यांची बँकेच्या स्वीकृत संचालकपदी नियुक्ती केली आहे. मात्र अशी नियुक्ती करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांमार्फत सहकार प्राधिकरणाची मान्यता घेण्याची आवश्यकता असते. अशी कोणतीही परवानगी जिल्हा बँकेने घेतलेली नसल्याने दोन्ही निवडी बेकायदेशीर ठरणार आहेतत.

गुरुवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी वटहुकमावर स्वाक्षरी केली असून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. संचालकांना नोटीस लागू होण्यापूर्वी पदाचा राजीनामा देवून स्वीकृत संचालक निवडीचा घाट घातला जात आहे. संचालक मंडळाच्या निर्णयावर सहाकामंत्री पाटील विभागीय सहनिबंधकांना कारवाईचे कोणते निर्देश देणार याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीईटीची तारीख बदलू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कर्नाटककडून अडथळे आणले जात असलेल्या जत भागातील २५ मराठी शाळा तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. तसेच सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या सोईसाठी महाराष्ट्रातील सीईटीची तारीखही बदलण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यातून कर्नाटक सरकारला आमचा आक्रमकपणा दाखवू. सीमावासियांच्या मागण्यांप्रमाणे निर्णय घेतले जातील. सरकारही स्वतःहून काही निर्णय घेतील', असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

'राज्य सरकारची सीमाप्रश्नाबाबत आक्रमक भूमिका आहे हे विविध निर्णयातून कर्नाटकला दाखवून देऊ' असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, 'सरकारकडून सीमावासियांना विश्वास देण्यासाठी टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्यात येतील. आता बोटचेपी भूमिका घेतली जाणार नाही.'

मराठी सिनेमाला कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील म्हणाले, 'राज्याचे धोरण रचनात्मक पद्धतीवर असेल. ते विरोध करतात म्हणून कन्नड सिनेमांना येथे विरोध करण्याचे धोरण अवलंबणार नाही. ज्या मराठी सिनेमांना कर्नाटकात दाखवले जात नाही, त्या सिनेमांना येथे जास्तीत जास्त टॅक्स फ्री करुन अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचवू.'

मंत्री पाटील म्हणाले, 'सुप्रीम कोर्टात दिलेल्या वकीलांना सरकारकडून योग्य ती माहिती उपलब्ध करुन देऊ.'

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी पाटील यांनी या प्रश्नात कर्नाटकने आडमुठे धोरण व महाराष्ट्राने नको तितकी बोटचेपी भूमिका स्वीकारल्याचे परिणाम सीमावासिय भोगत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'दोन राज्याचे मुख्यमंत्री केंव्हाही भेटले नाहीत. सलग अकरावेळा सीमाभागात मराठी ​भाषिक निवडून दिले आहेत. त्याशिवाय येथील जनता आणखी काय वेगळी इच्छा व्यक्त करणार. आता या जनतेने आर या पारची लढाई हाती घेतली आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारकडून कोर्टात व कोर्टाबाहेर सर्व शक्तीनिशी ताकद लावली जाईल, अशी अपेक्षा आहे.'

या बैठकीस वसंतराव पाटील, राम आपटे, राजाभाऊ पाटील, अॅड. शिवाजी जाधव, अॅड. माधवराव चव्हाण, दिपक दळवी, मनोहर किणेकर, दिगंबर पाटील, अरविंद पाटील, निंगोजी हुद्दार, सरकारचे उपसचिव रियाज शेख उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रंकाळा परिसरातील मूळ वास्तूला धक्का नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सुशोभिकरणाच्या नावाखाली रंकाळा तलाव परिसरातील मूळ वास्तूला धक्का लावू नका, विकासकामांची अंमलबजावणी करताना रंकाळा तलावाचे पर्यावरणपूरक महत्व टिकले पाहिजे. रंकाळा तलाव हा पर्यावरणपूक व ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचा आहे,' अशा सूचना चौकशी समिती सदस्यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत केल्या.

आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी सदस्यांची चर्चा झाली. यावेळी आयुक्तांनी रंकाळा तलावाच्या विकास आराखड्याशी निगडीत कागदपत्रे समिती सदस्यांना दिली. हरित लवादच्या आदेशानुसार महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा येथील डॉ. उपेंद्र पटेल व डॉ. निर्मल शहा चौकशी करत आहेत. त्यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासोबत चर्चा केली. तसेच महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, ड्रेनेज विभागाचे उप जल अभियंता एस. बी. कुलकर्णी, अंजली सूरत असोसिएटसचे अंजली जाधव यांच्यासोबत चर्चा केली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत डॉ. पटेल व डॉ. शहा यांनी चर्चा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त, विभागीय आयुक्तांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पाचही स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडी कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहेत. स्वीकृत नगरसेवक पद निवडीची प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवली असून त्यासाठी निवडणूक घेता येत नाही. सात गटातून 'स्वीकृत'ची निवडणूक होण्याऐवजी संस्था गटातूनच पाचही जणांसाठी निवड प्रक्रिया राबविल्याचा आक्षेप घेत याप्रकरणी महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या सचिवांना भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहर अध्यक्ष सुरेश पोवार यांच्यावतीने अॅड. युवराज नरवणकर यांनी नोटीसा लागू केल्या आहेत.

राज्य सरकारने महापालिकेकडून स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा सादर केलेला ठराव विखंडीत केला नाही तर सरकारच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील युवराज नरवणकर यांनी सांगितले. महापालिकेच्या वीस जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधरण सभेत काँग्रेसकडून तौफिक मुल्लाणी, मोहन सालपे, राष्ट्रवादीकडून प्रा. जयंत पाटील, भाजपकडून किरण नकाते यांची स्वीकृत नगरसेवकपद निवडीची शिफारस मान्य केली. कुरघोडीच्या राजकारणातून ताराराणी आघाडीचे उमेदवार व माजी महापौर सुनील कदम यांच्या निवडीचा प्रस्ताव सभागृहाने बहुमताच्या जोरावर फेटाळला होता.

कदमांनी घेतली आयुक्तांची भेट

माजी महापौर सुनील कदम यांनी माझ्यावर ३०७ कलमान्वये गुन्हा नोंद झाला नव्हता याचा पुरावा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे दिला आहे. माजी महापौर कदम, ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी सोमवारी आयुक्तांची भेट घेतली. कदम यांनी सादर केलेला पुरावा नगरविकास विभागाला कळविल्याचे आयुक्तांनी सांगितले.

महापालिकेने मार्गदर्शन मागवले

स्वीकृत नगरसेवकसाठी पक्षांकडून उमेदवारांचा प्रस्ताव सादर करायचा असतो. त्यानुसार सभागृहाकडे नावांची शिफारस केली. मतदानासंबंधीचा अधिकार हा सभागृहाचा आहे. त्याबद्दल मी काही बोलणार नाही. सात निकषांपैकी कुठल्याही एका निकषामधून प्रस्ताव सादर करता येतो. महासभेच्या मान्यतेनुसार चौघांच्या नगरसेवकपदाच्या मान्यतेचा ठराव नगरविकास विभागाकडे सादर केला आहे. सुनील कदम यांच्याप्रश्नी मार्गदर्शन मागविल्याचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर रुद्रप्रमाणे समीरही फरार होईल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य असल्याचा निष्कर्ष कर्नाटक पोलिसांनी काढला आहे, त्यामुळे पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा आहे. समीरला जामीन मंजूर झाल्यास मडगाव स्फोटातील आरोपी रुद्र पाटीलप्रमाणे तोही फरार होऊ शकतो, त्यामुळे त्याचा जामीन मंजूर होऊ नये,' असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी केला. दरम्यान, पुरवणी तपासातील तीन साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी सादर करण्याचा प्रयत्न केला मात्र, न्यायाधीशांनी नवीन जबाब घेण्यास नकार दिला.

जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एल. डी. बिले यांच्यासमोर सोमवारी झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांनी बाजू मांडली. निंबाळकर यांनी समीर गायकवाड आणि रुद्र पाटील यांच्यातील मैत्रीचा संदर्भ देत समीरच्या जामिनास विरोध केला. समीर रुद्रप्रमाणे फरार होईल, शिवाय डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या कर्नाटक पोलिसांना दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येमध्ये शस्त्र, गोळ्या आणि हत्येच्या पद्धतीत साम्य असल्याचे निदर्शनास आल्याचे अॅड. निंबाळकर यांनी सांगितले. समीरला जामीन मिळाल्यास साक्षीदारांवरील दबाव वाढण्याची भीती व्यक्त करीत पुरवणी तपासात महत्त्वाची माहिती मिळत असल्याने समीरला जामीन देऊ नये अशी विनंती अॅड. निंबाळकर यांनी केली. अॅड. निंबाळकरांनी पावणे दोन तास केलेल्या युक्तिवादात अनेक खटल्यांचे दाखले देत आरोपीच्या वकिलांचे मुद्दे खोडून काढले.

समीरचे वकील अॅड. समीर पटवर्धन यांनी युक्तिवाद करताना समीरच्या तपासात ठोस पुरावे मिळाले नसल्याचा दावा केला. पोलिसांनी समीरच्या अटकेबाबत लावलेल्या विलंबावर प्रश्न उपस्थित करीत दाखल केलेल्या आरोपपत्रावरही शंका घेतली. ७७ साक्षीदारांपैकी केवळ दोनच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत आणि यातही दोघांच्या साक्षीत विसंगती असल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. अल्पवयीन साक्षीदाराने दिलेली साक्ष म्हणजे पोलिसांनीच तयार केलेली कहाणी असल्याचे सांगत, गुन्ह्यातील शस्त्र, बाइक, सहआरोपी यातील पोलिसांच्या हाती काहीच कसे लागले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोबाइलवरील संभाषणातून बढाई मारल्याचा पुरावा त्याला दोषी ठरवू शकत नाही. गुन्ह्यात त्याचा सहभाग नसल्यामुळेच तो ब्रेन मॅपिंगला नकार देत आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे सांगत पोलिसांच्या तपासावरच अॅड. पटवर्धन यांनी शंका उपस्थित केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सीमाप्रश्नी महाराष्ट्राची आक्रमक भूमिका’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'समन्वयक मंत्री झाल्यानंतर सीमाप्रश्नासाठी स्वतंत्र विभाग तयार केला आहे. त्यामध्ये उपसचिव दर्जाचे स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या विभागाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात सीमावासीयांकडून लढणाऱ्या व​किलांना योग्य ती माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कर्नाटक सरकारला आक्रमकपणे उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता आक्रमक भूमिका घेतली आहे,' अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होईलच. शिवाय दिल्लीतही राज्यातील सर्व खासदारांची एकत्रित बैठक घेणार आहेत. त्यांना लोकसभेत व राज्यसभेत सीमाप्रश्नाबाबत आक्रमकपणे भूमिका मांडण्याचे आवाहन करणार आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनानंतर पंतप्रधानांचीही भेट घेण्यात येणार आहे. त्यावेळी सीमावासीयांच्यावतीने मुख्यमंत्री पंतप्रधानांना साकडे घालणार असून, आता केंद्राने बघ्याची भूमिका सोडावी. यामध्ये मत मांडण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येणार आहे.'

मंत्री पाटील म्हणाले, 'सरकार सीमावासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, हे दाखवण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेण्यात येणार आहेत. मध्यंतरी सरकारकडून दुर्लक्ष झाले असले तरी आता सीमावासीयांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी हे निर्णय असतील. कर्नाटक सरकारला महाराष्ट्र आता बोटचेपी भूमिका स्वीकारणार नाही हा संदेशही दिला जाणार आहे.'

प्रा. डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, 'सीमावासीयांबाबतचा दावा आता निर्दोष पातळीवर आणल्याने भूमिका स्ट्राँग झाली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार खडबडून जागे झाले आहे. आपली बाजू कोसळणार हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता सारे चाळे सुरू केले आहेत. सीमाभागातील जनतेने निर्णय घेतला असून आता सरकारच्या सक्रिय सहानभूतीची, मदतीची गरज आहे. या प्रश्नाबाबत सीमावासीयांची जशी तळमळ, कळकळ आहे, तितकीच सरकारची राहील, कोणतीही अडचण येणार नाही अशी भूमिका घेतली जाईल, असे सरकारच्यावतीने सांगितले आहे. न्याय मिळवण्यासाठी पराकाष्ठा केली जाईल, हे आश्वासन धीर देणारे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिसांची मानसिकता ‘ऑफलाइन’च

$
0
0

satish.ghatage @timesgroup.com

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांत सीसीटीएनएस (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम) यंत्रणा सुरू झाली आहे. त्यामुळे पारंपरिक डायरी बंद झाली असून संगणकांशी फटकून वागणाऱ्या पोलिसांचे चांगलेच हाल होऊ लागले आहे. एरव्ही रूबाबात आवाज मारणाऱ्या पुरूष पोलिस कर्मचाऱ्यांना ऑनलाइन डायरीमुळे संगणकावर ऑनलाइन डायरीचे काम करणाऱ्या त्यातही महिला पोलिसांकडे मनधरणी करावी लागत आहे.

गेले दोन वर्षे सीसीटीएनएसमध्ये सर्व नोंदी कशा नोंदवाव्यात यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असले तरी सराव नसल्याने ८० टक्क्याहून अधिक कर्मचाऱ्यांना सीसीटीएनएसवर नोंदी करता येत नाहीत. नवीन भरती झालेल्या महिला कर्मचाऱ्यांनी सीसीटीएनएसवर चांगलेच प्रभुत्व मिळवले. एरवी पारंपरिक डायरीला हात लावू न देणाऱ्या हवालदारांना सीसीटीनएसमध्ये नोंदीसाठी महिला व तरूण पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे.

गेल्या वर्षापासून ऑनलाइन डायरी व पारंपरिक डायरी एकत्रित लिहिली जात होती. सर्व्हर डाऊन झाल्यावर पारंपरिक डायरीचा आधार घेतला जात होता. त्यामुळे पोलिसांना घडलेल्या घटनांची माहिती जागेवरच मिळत होती, पण ऑनलाइन डायरी सुरू झाल्याने सर्व नोंदी संगणकांवर होत आहेत. नोंदी पाहण्यासाठी ऑनलाइन डायरीच पहावी लागत असल्याने ती कशी सुरू करायची व नोंदी कुठे असतात याचे ज्ञान अनेक पोलिसांना नाही. एक जानेवारीपासून जुना राजवाडा, करवीर, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी पोलिस ठाण्यासह २९ पोलिस ठाण्यांत ऑनलाइन डायरीचे काम सुरू झाले आहे. सीसीटीएनएसवर स्टेशन डायरी, एफआयर रजिस्टर, आर्म रजिस्टर, नोंदवही, लॉगबुक अशा ४७ प्रकारच्या नोंदी केल्या जातात. अशा नोंदी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जवळजवळ पूर्ण झाले असले तरी सराव नसल्याने कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत.

'अद्याप नोंदी सुरू आहेत...'

कोणत्याही पोलिस ठाण्यात एखादी माहिती विचारली असता सीसीटीएनएस सुरू करायला वेळ लागतो, सीसीटीएनएनएसवर नोंदी केल्या जात आहेत, असे उत्तर मिळते. एकीकडे ऑनलाइन डायरी सुरू असली तरी पोलिस निरीक्षक व सहाय्यक पोलिस निरीक्षक ऑनलाइन डायरीपासून फटकून आहेत. ऑनलाइन डायरी संगणकाच्या स्क्रीनवर पाहण्याऐवजी डायरीच्या प्रिंट काढून पेपरलेस ऑफिस योजनेला हारताळ फासत आहेत. सीसीटीएनएसवर प्रत्येक नोंद वेळीच करावयाचे असल्याने एकादा गुन्हा दाबून ठेवता नसल्याने पोलिसांची तगमग वाढू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हाने परतवण्याची प्रेरणा शिवछत्रपतींमुळेच

$
0
0

गारगोटी ः छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखविलेला मार्ग आणि प्रशासकीय नीतीचा अवलंब करुन राज्य सरकारची वाटचाल सुरू आहे. सरकार चालवत असताना समोर येणाऱ्या आव्हानांचा मुकाबला करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या राज्यकारभारातून मिळते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

शिवप्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या श्रीरांगणागड ते भुदरगड धारातीर्थ यात्रा मोहिमेचा सांगता समारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गारगोटी येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. समारंभास पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे (गुरूजी) आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते, आदर्श राजे होते. त्यांनी सामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून राज्यकारभार केला, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी जलनियोजन, सागरी सुरक्षा नियोजन, सागरी किनारपट्टींचे संवर्धन आणि संरक्षण, जंगल नियोजन, सामान्यांचे हित अशा सर्व गोष्टींचे सूक्ष्म नियोजन करुन राज्यकारभार केला. राष्ट्रासमोर ज्यावेळी आव्हाने उभे राहतात त्यावेळी छत्रपतींचे कार्य, विचार आणि नीती आदर्श मानून त्या आव्हानांचा सामना करण्याचा मार्ग मिळतो.'


भुदरगडसाठी ११ कोटींची योजना

सर्व गडकिल्ल्यांच्या विकासाचा प्रयत्न असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, भुदरगड किल्ल्याच्या विकासासाठी ११ कोटींचा प्रस्ताव पर्यटन मंत्रालयाला सादर केला आहे. किल्ल्यावरील तलाव सुशोभिकरणासाठी ४४ लाखाचे अंदाजपत्रक तयार आहे. गडावरील सर्व रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घेतली जातील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक व्यवस्था तातडीने सुधारा

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त पार्किंगमुळे शहरवासियासह भाविक, पर्यटकांना त्रास होत आहे. या वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेला क्रेन उपलब्ध करून द्याव्यात, अशा आशयाचे पत्र महापौर अश्विनी रामाणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना दिले आहे.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, श्री जोतिबा मंदिर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी, खिद्रापूरसह जिल्ह्यातील ऐतिहासिकस्थळांना भेटी देण्यासाठी भाविक, पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र शहरात पार्किंग व्यवस्था नीट नसल्याने वाहतुकीची कोंडी वाढत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे भाडेतत्वावर क्रेन होत्या. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून या क्रेन बंद आहेत. सीपीआर ते भवानी मंडप, महाद्वार रोड, ताराबाई रोड, मंदिर परिसर, बालगोपाल तालीम परिसर, ​मिरजकर तिकटी, बिंदू चौक, शिवाजी चौक, या मार्गावर वर्दळ असते. वाहनधारक वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने पार्किग करत आहेत. दुकानासमोर वाहने लावण्यात आल्याने वारंवार वादाचे प्रसंग उद्भवत आहेत. याकडेही महापौरांनी लक्ष वेधले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकलाकारांनी दिला पर्यावरण जागृतीचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पाण्याची टंचाई, पावसाने फिरवलेली पाठ, झाडांची कत्तल, मानवाचे निसर्गावर होत असलेले आक्रमण अशा विविध विषयांवर नाटकातून खरमरीत भाष्य करणाऱ्या बालकलाकारांनी रसिकांना अंतर्मुख केले. इकोफोक्स, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ व 'प्रतिज्ञा नाट्यरंग' यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणात्मक बालनाट्य स्पर्धेच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शालेय मुलांमध्ये पर्यावरणविषयक जागृती निर्माण व्हावी या हेतूने गेल्या नऊ वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. बुधवारी शाहू स्मारक भवनमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत शहरी व ग्रामीण विभागातून तब्बल २३ शाळांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या स्पर्धेसाठी ग्लोबल वॉर्मिंग, निसर्गाने दिलेली भेट व मानवाने निर्माण केलेल्या अडचणी, प्रदूषण व त्याचे निराकरण असे विषय सहभागी संघांना देण्यात आले होते. माधव बापट आणि प्रसाद बुरांडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले.

स्पर्धेत एमएलजी, विद्यापीठ, वि.स.खांडेकर प्रशाला, जरगनगर विद्यामंदिर, शीलादेवी डी. शिंदे हायस्कूल, सेंट झेवियर्स, आदर्श गुरुकुल विद्यालय, ग्रीन व्हॅली, महाराष्ट्र हायस्कूल, बागल हायस्कूल, चाटे स्कूल, वसंतराव चौगुले विद्यालय, आदर्श विद्यालय, यशोदा इंग्लिश मिडियम स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, शाहू बालसंस्कार केंद्र, भैरवनाथ हायस्कूल भुयेवाडी, घोटवडे हायस्कूल, सरनोबत गर्ल्स हायस्कूल, एम. आर. पाटील विद्यानिकेतन, साईदिशा अकॅडमी या शाळांमधील विदयार्थ्यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्याणकारी मंडळाचा प्रश्न मार्गी लावू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वृत्तपत्र व्यवसायामध्ये वृत्तपत्र विक्रेता महत्त्वाचा घटक आहे. सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडलेल्या या घटकांचे जीवनमान उंचावण्यासा स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करू. मंडळाच्या स्थापनेसाठी नऊ फेब्रुवारीला मुंबईत संबंधीत खात्याचे मंत्र्यांसमवेत राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊ' असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता आणि जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेने अधिवेशन झाले. अधिवेशनात महत्त्वपूर्ण ठराव झाले.

नागपूरच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणकारी मंडळासंदर्भात सुतोवाच केले होते. तो धागा पकडून पालकमंत्री पाटील म्हणाले, 'आम्ही भाषणाऐवजी कामाला प्राधान्य देतो. मंत्रालयात फाइल दिरंगाई असते अशी स्थिती असली तरी आमची कामाची पद्धत वेगळी असल्याने कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी वेगाने हालचाली करू. मोलकरीण, बांधकाम, ऊस तोडणी कामगारांचे कल्याणकारी मंडळ स्थापन झाले आहे. त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांचे मंडळ स्थापण्यास अडचण नाही. त्यासाठी नऊ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊ. कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेपूर्वी विक्रेत्यांनी अटल पेन्शन योजनेत सहभागी व्हावे. पाच हजार रुपयांपर्यंतच्या पेन्शन योजनेत जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांची पन्नास टक्के रक्कम स्वःता देऊ.'

महापौर अश्विनी रामाणे म्हणाल्या, 'लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्राकडे पाहिले जाते. प्रत्येक ऋतुमध्ये येणाऱ्या अडचणींवर मात करत विक्रेते वृत्तपत्रे पोहोचविण्याचे काम करतात. अशा विक्रेत्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. संघटनेच्या माध्यमातून समस्यांची निर्गत होऊ शकते. सरकारने या समुदयाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहायला हवे. महापालिकेच्यावतीने वृत्तपत्र व्यावयासिकांना पाठबळ देत सर्व सुविधा दिल्या जातील.

राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी त्रैवार्षिक कार्यक्रमाची घोषणा केली. यात स्थानिक जिल्हा संघटनांनी कामगार आयुक्तांना निवेदन देवून त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावी अशी सूचना केली. संघटनेच्या विभागवार जिल्हाध्यक्षांना कार्यक्रमाची रुपरेषा प्रदान केली. अधिवेशनात जिल्हा अध्यक्ष रघुनाथ कांबळे, बालाजी पवार, हरिश्चंद्र पवार यांची भाषणे झाली. अण्णा पोतदार, भाऊ सूर्यवंशी या ज्येष्ठ विक्रेत्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांचा अकरा हजार रुपये देवून सत्कार झाला.

अधिवेशनाला विभागीय उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, राज्य खजिनदार गोरख भिलारे, स्वाभिमानी जिल्हा वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे अध्यक्ष किरण व्हणगुत्ते, कामगार आयुक्त सुहास कदम गोपीनाथ चव्हाण, शिरीष जैन, नरहरी आवटे, दीनेश उके, आण्णासाहेब जगताप, गोपाळ चौधरी, ज्ञानेश्वर धुमाळ, शंकर चेचर, रवी लाड, श्रीपती शियेकर, राजाराम पाटील, परशुराम सावंत आदी उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवगोंडा खोत यांनी प्रास्ताविक केले. विभागीय सचिव कांबळे यांनी स्वागत केले. व्हणगुत्ते यांनी आभार मानले.

मार्ग दणाणला...

सकाळी मिरजकर तिकटी येथील हुतात्मा स्तंभापासून रॅली काढण्यात आली. बिंदू चौक येथे राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कॉमर्स कॉलेजमार्गे रॅली अधिवेशनस्थळी दाखल झाली. 'कल्याणकारी मंडळाची स्थापना झालीच पाहिजे' या घोषणेने रॅलीचा मार्ग दणाणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याला कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सांगलीतील आरोग्य सेवक पेपरफुटीप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील वर्ग दोनचा तांत्रिक अधिकारी सागर महादेव जंगम (वय ३१) याला पोलिसांनी अटक केली. मूळचा शिराळा तालुक्यातील इंगरुळ येथील राहणारा सागर याने नजर चुकवून चोरलेली प्रश्नपत्रिका शिराळा तालुक्यातील एका परिक्षार्थीला चार लाख रुपयांना विकल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांना दिली.
सांगली जिल्हा परिषदेकडील आरोग्यसेवक भरती करीता २५ नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचे पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर ही परिक्षा रद्द करण्यात आली. याच परिक्षेसाठी २४ नोव्हेंबर रोजी तयार करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची कच्ची प्रत सागर जंगम याने चोरली. प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार करणाऱ्या समितीमध्ये दोन उपजिल्हाधिकारी, दोन प्रशिक्षणार्थी तहसीलदार, एक प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी, दोन तांत्रिक अधिकारी आणि एक सहाय्यक तांत्रिक अधिकारी आदींचा समावेश होता. त्यामुळे तांत्रिक अधिकारी या नात्याने समितीमध्ये समावेश असल्याची संधी साधून अन्य सदस्यांची नजर चुकवून त्याने चोरलेली प्रश्नपत्रिकेची कच्ची प्रत परिक्षार्थीला चार लाख रुपयांना विकल्याचे समोर आले. सागरला मंगळवारी अटक करण्यात आली असून, सांगली कोर्टाने त्याला एक फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तो सध्या सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील प्रफुल्ल अपार्टमेंटमध्ये रहात आहे. आरोग्य सेवक आणि औषध निर्माण अधिकारी पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडल्याचे चव्हाट्यावर आल्यापासून आतापर्यंत चौदा संशयितांना अटक केली आहे. जंगम याचे रॅकेट पूर्णतः वेगळे असून रॅकेटची पाळेमुळे खणली जाणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा कळंबा आटला

$
0
0

कोल्हापूर ः शहरातील पाचगाव आणि आरकेनगरच्या काही भागांसह कॉलनींना पुरवठा करणाऱ्या कळंबा तलावातील पाणीसाठा संपला आहे. त्यामुळे उपनगराचा पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. या परिसराला यापुढे टँकरने पुरवठा करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठा व्यवस्थेवर ताण येणार आहे. याआधीपासून कळंबा आणि पाचगाव परिसरातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. त्यात आता तलाव आटल्याने आणखी कॉलनींना फटका बसण्यास सुरूवात झाली आहे. कळंबा तलाव आटल्याने परिसरातील बोअरवेलनाही पाणी कमी येत आहे. जेथे किमान एक तास बोअर चालत होती तिथे वीस मिनिटे ते जास्तीत जास्त अर्धा तासच बोअर चालत आहे. पाचगावसाठी पेयजल योजनेतून आर. के. नगरहून पाइपलाइन तसेच टाकी बांधण्याचे काम सुरू होते. त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. या परिसराचा पाणीप्रश्न मिटणार असला तरी कळंबावर आधारित विहीरी आणि बोअरवर मात्र विपरित परिणाम झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर झाले ‘निर्मल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत २६ जानेवारीपर्यंत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. त्याचा एक भाग म्हणून शौचालयांची सुविधा उपलब्ध नसणाऱ्या ठिकाणांवर महापालिकेने मोबाइल टॉयलेट्ल्सची सोय केली आहे. उघड्यावर शौचास बसल्याचे निदर्शनास आल्यास ना​गरिकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. महापालिकेने त्यासाठी ११ गुड मॉर्निंग पथके कार्यान्वित केली आहेत.

महापालिकेच्या वीस जानेवारीच्या सर्वसाधारण सभेत प्रजासत्ताकदिनापासून कोल्हापूर शहर हागणदारीमुक्त करण्यासंदर्भातील ठराव मंजूर केला होता. महापौर अश्विनी रामाणे यांनी आता याची घोषणा केली आहे. 'येथून पुढील काळात शहरामध्ये कोणीही उघड्यावर शौचास बसणार नाही याची नैतिक जबाबदारी सर्वांची आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानास यश प्राप्त व्हावे याकरिता महापालिका प्रयत्नशील आहे.'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' या तत्वावर शहरातील गरजेच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधणी होणार आहे.' अशी माहिती महापौर रामाणे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

सरकारी अनुदान

शौचालय बांधणीसाठी केंद्र सरकारकडून चार हजार रुपये, राज्य सरकारकडून ८००० आणि महापालिकेकडून ३००० रुपयांचे मिळून एकूण १५,००० रुपयांचे अनुदान दिले जाते. तसेच शहरातील खराब शौचालयांची दुरूस्ती केली जाणार आहे. चौदाव्या वित्त आयोगा अंतर्गत प्राप्त निधीतून रक्कम उपलब्ध केली जाणार आहे. तसेच शेल्टर असो​सिएटस या सेवाभावी संस्थेतर्फे शहरात ड्रेनेजची सोय असलेल्या झोपडपट्टीतील भागात मोफत शौचालय बांधणी सुरू आहे. ज्या ठिकाणी नागरिक उघड्यावर शौचास बसतात, शौचालय बांधणीसाठी जागा उपलब्ध आहे पण ड्रेनेजची सोय नाही अशी ठिकाणे निश्चित केली आहेत. याठिकाणी शौचालये बांधणीचे प्रयोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धान्य बाजार स्थलांतराची ‘कोंडी’

$
0
0

Maruti.Patil @timesgroup.com

कोल्हापूर : शहरातील होलसेल धान्य बाजार टेंबलाईवाडी येथे स्थलांतरीत करण्यासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने व्यापाऱ्यांना प्लॉट दिले. मात्र काही मोजक्याच व्यापाऱ्यांनी बांधकाम सुरू केले असल्याने धान्य बाजार स्थलांतराचे घोंगडे भिजत पडले आहे. पायाभूत सुविधांवरून दोन्ही घटक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागल्याने या प्रश्नाने आता जटील स्वरुप धारण केले आहे. धान्य बाजाराचे स्थलांतर रखडल्याने शहराच्या वाहतुकीवर मोठा ताण पडत असून त्यामुळे लक्ष्मीपुरी परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत आहे. दोन्ही घटकांनी यावर सामंजस्याने तोडगा काढल्यास १९८१ पासून निर्माण झालेल्या प्रश्न निकालात निघणार आहे.

व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी राजर्षी शाहू महाराजांनी शाहूपुरी व्यापारी पेठेची स्थापना केली. वाढत्या शहरीकरणामुळे वाहतुकीवर ताण येऊ लागल्यानंतर धान्य बाजार स्थलांतर करण्याचा मुद्दा समोर आला. समितीच्यावतीने २० एकर ३८ गुंठ्यात नियोजित बाजारासाठी १९८१ मध्ये जागा संपादन केली. मात्र प्रत्यक्षात महापालिकेकडून २००६ मध्ये आराखडा मंजूर करण्यात आला. २००७ मध्ये प्रत्यक्षात व्यापाऱ्यांना जागा देण्यात आल्या. मात्र पायाभूत सुविधांचा मुद्दा समोर करुन व्यापाऱ्यांनी बाजार स्थलांतर करण्यास बगल दिली आहे.

समितीच्यावतीने लाइट, पाणी, रस्ते अशा सुविधा दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात २१३ पैकी केवळ सात प्लॉटवर आठ वर्षांत बांधकाम पूर्ण झाले आहे. सात प्लॉटवर बांधकाम सुरू आहे. नियोजित जागेवर सुरक्षा रक्षक नसल्याने बांधकाम साहित्यांची चोरी होत असल्याच्या घटना वारंवार होत आहेत. तर पूर्ण झालेल्या बांधकामाच्या दरवाजे, खिडक्यांची मोडतोड झाली आहे. व्यापाऱ्यांनी पूर्ण क्षमतेने बांधकाम सुरू केले नसल्याने सुरक्षा रक्षक पुरवणे समितीला जिकिरीचे बनत आहे. यामुळे शहरातील वाहतुकीचा मात्र पुरता बोजवारा उडत आहे. अवजड वाहनांना ठराविक वेळेचे बंधन असले तरी, इतर वाहनाप्रमाणे धान्य वाहतूक करणारी वाहने सर्रास शहरात आणली जात आहेत. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. ट्रकमधून पोती उतरताना येथे वाहतूक खोळंबून राहते. त्यामुळे वाहनधारकांना ताटकळत रहावे लागते.

होलसेल मार्केटसाठी व्यापारी जायला तयार आहेत. मात्र सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरवली जात नाही. त्यामुळे अनेकवेळा बांधकाम साहित्यांची चोरी होते. समितीने सर्व पायाभूत सुविधा पुरवल्यास व्यापारी त्वरित जायला तयार आहेत.

- वैभव सावर्डेकर, संचालक, ग्रेन मर्चंट असोसिएशन

महापालिकेचा डीपी रोड गेल्याने धान्य बाजाराची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्यांची चोरी होत असून तो मद्यपींचाही अड्डा बनला आहे. साहित्याच्या सुरक्षेसाठी गस्त सुरु केली आहे. दोन मार्केट जोडण्यासाठी रेल्वे विभागाकडून परवानगी घेण्याचे काम सुरू आहे.

- सदानंद कोरगावकर, समिती संचालक व व्यापारी

व्यापाऱ्यांना सर्व सुविधा दिल्या आहेत. मात्र अनेक व्यापाऱ्यांनी बांधकाम सुरू केलेले नाही. व्यापारी तेथे आल्यास उर्वरित सुविधा दिल्या जातील. बांधकाम साहित्यांची चोरी रोखण्यासाठी दोन सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत.

- परशराम खुडे, सभापती, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णा व्हॅलीत राष्ट्रीय विक्रेते प्रदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जिल्ह्यातील उद्योजकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्यातून २९ व ३० जानेवारी रोजी चेंबरच्या संकुलात राष्ट्रीय विक्रेते विकसन प्रदर्शन आयोजित केले आहे. मेक इन महाराष्ट्रातून मेक इन इंडियांच्या दिशेने पडणारे उद्योजकांचे पाऊल यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून चेंबरने ही एक महत्वपूर्ण संधी उपलब्ध करून दिल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू व संस्थेचे कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील यांनी दिली.
प्रदर्शनाचे उद्‍घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. खासदार संजय पाटील, भाजपचे पश्चिम महाराष्ट्रचे समन्वयक मकरंद देशपांडे उपस्थित राहणार आहेत. मालू म्हणाले, केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालयातर्फे (एमएसएमई) कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्रथमच हे प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. या प्रदर्शनामध्ये जिल्ह्यातील सहभागी उद्योगांच्या उत्पादित वस्तूंची मांडणी करून त्यांची माहिती देणार आहे. नामांकित उद्योगांनी सहकार्य केल्यास, मंदीमुळे अडचणीत आलेल्या येथील उद्योजकांना याचा लाभ होणार आहे. या प्रदर्शनामुळे स्पर्धक, विक्रेते, ग्राहक यांचा थेट संपर्क होणार आहे.
केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार २० टक्के उत्पादित माल सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांकडून घेणे बंधनकारक केले असल्याने, प्रदर्शनातील सहभागी उद्योग चांगली भरारी घेतील, असा विश्वास मालू यांनी व्यक्त केला.
शिवाजी पाटील म्हणाले, या प्रदर्शनातून एमबीए आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना करिअरसाठी मार्गदर्शन केंद्राची सोय केली आहे. या प्रदर्शनासाठी उभारण्यात येणाऱ्या स्टालची नोंदणी पूर्ण झाली आहे. या प्रदर्शनासाठी पश्चिम रेल्वे, कोकण रेव्ले, एचपीसीएल, बीपीसीएल, जेएनपीटी, एनटीपीसी, आदी मोठ्या युनिटसह आर्थिक संस्थाही उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रशासनाकडून सांगलीचे ब्रँडिंग सुरू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
सांगली जिल्ह्याच्या ब्रँडिंगसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या माध्यमातून जिल्ह्याला आधुनिक चेहरा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, ग्वाही जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात दिली. ६६व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर सरकारी ध्वजारोहण सोहळा झाला. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, पोलिस अधीक्षक सुनील फुलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, महानगरपालिका आयुक्त अजीज कारचे, अपर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गायकवाड म्हणाले, देशभक्ती, क्रांती, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सहकार अशा विविध क्षेत्रात जगभर नावलौकिक असणारा सांगली जिल्हा आहे. सांगलीची ओळख बनू पाहतील, अशा पारंपरिक कृषी संस्कृती, खाद्य संस्कृती, कला संस्कृती, उल्लेखनीय व प्रेक्षणीय पर्यटन स्थळे या सगळ्यांचे डिजिटल इंडियाच्या निमित्ताने ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न प्रशासनामार्फत सुरू आहे. संचलनामध्ये पोलिस दल, गृहरक्षक दल, अग्निशमन दल, वनरक्षक दल, नॅशनल कॅडेट कोअर पथक अशा एकूण ३८ पथकांनी सहभाग घेतला. ज्युबिली कन्या शाळा मिरज, श्रीमती सुंदराबाई दडगे गर्ल्स हायस्कूल सांगली, ईम्यॅन्युअल स्कूल सांगली, पोद्दार इंग्लिश स्कूल सांगली या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
सांगली महापालिकेत महापौर विवेक कांबळे, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा परिषदेत अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्याहस्ते ध्वाजारोहण करण्यात आले. नवभारत शिक्षण मंडळाच्या शांतिनिकेतन लोक विद्यापीठात खासदार राजू शेट्टी, रणधीर नाईक आणि शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील यांच्या उपस्थितीत तर सुंदराबाई दडगे गर्ल्स हायस्कूलमध्ये आभाळमाया फाउंडेशनचे प्रमोद चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
गुणवंतांचा सन्मान
राष्ट्रपती पदक विजेते पोलिस हवालदार विठ्ठल पाटील, नक्षलग्रस्त क्षेत्रात खडतर सेवेसाठी दहा पोलिस उपनिरीक्षकांना विशेष सेवा पदक, राष्ट्रीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन व प्रकल्प स्पर्धा २०१५मध्ये सहभागी बालवैज्ञानिक शुभम गोरे, १२ हजार फळ बियाणे संकलनाबद्दल सानिया बिलाल बुबनाळे यांचा सन्मान करण्यात आला. अल्पबचत भवनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाकडून विविध योजनेंतर्गत सरकारी कर्जमाफी योजनेचा लाभ न घेता विहित मुदतीत कर्जाची व्याजासह परतफेड केलेल्या प्रमोद धनसरे (मिरज), शरद रणखांबे (सांगली), जनाबाई कांबळे (इनाम धामणी), जयश्री कांबळे (इनाम धामणी), शांताबाई कांबळे (इनाम धामणी), रेणुका कांबळे (इनाम धामणी) अशा लाभार्थींचा प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कबड्डी खेळाडू नितीन मदने, वेटलिफ्टिंग खेळाडू मोहिनी चव्हाण, ऋत्विक चिवटे, विजया दुधाणी हे गुणवंत खेळाडू, मार्गदर्शक जीवन मोहिते, क्रीडा संघटक महावीर कुंभोजे यांना सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबातील जैवसाखळी संपणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थानिक तसेच स्थलांतरीत पक्ष्यांचा मोठा आधार असलेल्या कळंबा तलावात अगदी काही दिवसच पाण्याचे अस्तित्व राहण्याची परि​स्थिती आहे. पाणी संपल्यामुळे येथील पक्षी अन्य ठिकाणी स्थलांतरित होत आहेत. त्याचबरोबर माशांचे प्रकार, शिंपले, किडे यांचे ​जीवनच धोक्यात आले आहे. त्यामुळे परिसरातील जैवसाखळी विस्कटण्याचा धोका आहे. त्याचा परिणाम सर्व सजीवांवर होणार आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. या तलावावर पाचगाव, कळंबा गावाबरोबरच शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. सततच्या पाणीपुरवठ्याने पाणीसाठा संपला आहे. अगदी मोजके दिवसच तलावात पाणी राहील, अशी स्थिती आहे. यामुळे ​दोन गावांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहेच. पण त्याशिवाय पर्यावरणदृष्ट्याही मोठा धोका निर्माण झाला आहे. पाणीच नसल्याने येथे कायम वास्तव्यास असलेले पक्षी तसेच स्थलांतरित पक्षी इतर पाणथळ ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. सध्या येथे पक्षी दिसतात. दलदलीच्या परिसरातील किडे, माशांचे प्रकार हे त्यांचे खाद्य आहे. पाणी संपल्यानंतर मात्र त्यांना खाद्य आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार आहे. आता अनेक शिंपले उघडे पडले आहेत. पाणी संपल्यानंतर त्यातील जीव जिवंत राहण्याची शक्यता कमी आहे.

स्थलांतरित पक्षी खाद्यासाठी इतर पाणथळ जागा निवडतील. एका वर्षाच्या या परिस्थितीने या ठिकाणी यायचे थांबतील, असे दिसत नसल्याचे पक्षी निरीक्षक बंडा पेडणेकर यांचे मत आहे. पण जे स्थानिक पक्षी आहेत, ते मात्र रहिवासच इतर ठिकाणी हलवतील की काय, अशी भीती आहे. पाणी संपल्याने किडे, मासे असे खाद्य संपणार आहे. ते नसल्याने त्याच्यावर अवलंबून असलेले छोटे पक्षी येथून दुसरीकडे जातील. त्या छोट्या पक्ष्यांवर अवलंबून असणारे इतर पक्षीही येथून निघून जातील. या प्रकारे जैवसाखळीच संपण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच हाही एक पर्यावरणीय धोका आहे. हा धोका थेट मानवी जीवनावर परिणाम करणार नसला तरी त्याचे अदृश्य परिणाम होऊ शकतात.



लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे महत्व आहेच, पण तलावातील जलचरांच्या, त्यावर अवलंबून असलेल्या इतर जिवांच्या दृष्टीने विचार कधी होणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे काही पाणीसाठा राखीव ठेवण्याची आवश्यकता होती. त्याचे नियोजनच झालेले नाही. त्यामुळे हा पर्यावरणीय धोका तयार झाला आहे.

अनिल चौगुले, निसर्ग मित्र.

....



रंकाळ्याच्या परिसरात वाहने आणि लोकांची गर्दी झाली आहे. तेथील शांतता संपली आहे. त्यामुळे परताळ्याच्या परिसरात रहिवास करणारे पक्षी देवकर पाणंद ते सुर्वेनगरच्या टापूत असलेल्या ओढ्याकाठीच्या झाडांवर रहिवास करत आहेत. याप्रकारे हळूहळू हे पक्षी शहराबाहेर जातील.

सागर दळवी, पर्यावरण अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images