Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अश्रुधूर नळकांडीचा स्फोट

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

दंगल काबू नियंत्रण मोहीम सुरू असताना येथील लिंबू चौक परिसरात अश्रुधूर नळकांडीचा स्फोट होऊन त्यामध्ये पाचजण जखमी झाले. त्यातील रेहान फरीद नदाफ (वय १०) व शिवपुत्र शिवलिंगाप्पा निंबाळ (वय ४०, दोघे रा. गुरुकन्नननगर) यांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर पोलिसांची पुरती तारांबळा उडाली. या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत याबाबत पोलिसांत कोणतीच झालेली नव्हती.

शहरातील लिंबू चौक परिसरात शिवाजीनगर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी दंगलकाबू नियंत्रण मोहिमेची प्रात्यक्षिक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वच पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी दंगल काबू योजनेची प्रात्यक्षिके करताना अश्रुधुराची दोन नळकांडी फेकली; पण त्यापैकी एका नळकांडीचा स्फोट हवेतच स्फोट होऊन त्यामध्ये शिवपुत्र निंबाळ यांच्या उजव्या कानाला मोठी दुखापत झाली, तर रेहान नदाफ हाही जखमी झाला असून त्याला गंभीर इजा पोहोचली आहे. त्याचबरोबर मुश्रा रियाज पठाण (वय ८), शंकर महालिंग ससरटे (५०, रा. जुना चंदूर रोड), पांडुरंग माळसिंग रजपूत (५३, रा. लिंबू चौक) अशी किरकोळ जखमींची नावे आहेत.

प्रात्यक्षिकावेळी दुर्घटना घडल्याने ही मोहीम अर्ध्यावरच आटोपती घेत पोलिस अधिकाऱ्यांनी जखमींना आपल्या वाहनातून तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. लिंबू चौक हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जात असला तरी या परिसरात मोठी नागरी वस्ती आहे. असे असतानाही पोलिसांनी कोणतीही सुरक्षा यंत्रणा न उभारता याठिकाणी अशाप्रकारचे प्रात्यक्षिक करण्याचा निर्णय का घेतला, अशी विचारणा नागरिकांतून होत आहे. या घटनेचे वृत्त क्षणार्धात शहरात वाऱ्यासारखे पसरले. मात्र, नेमका कशाचा स्फोट झाला याची माहिती नसल्याने बॉम्बस्फोट झाल्याच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, घटनेनंतर जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्याऐवजी पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केले.

गुणवत्ता तपासावी

दंगल नियंत्रण मोहिमेची प्रात्यक्षिके सुरू असताना अश्रुधुराची नळकांडी फोडणारा पोलिस अनुभवी असावा असा नियम आहे. मात्र, नळकांडी फोडणाऱ्या पोलिसाचा अंदाज चुकल्यामुळे ही नळकांडी रिकाम्या जागेऐवजी नागरिकांच्या अंगावर पडली. जमिनीवर पडल्यानंतर त्यातून धूर येतो. मात्र, या घटनेत नळकांडीचा हवेतच स्फोट झाल्याने या अश्रुधुराच्या नळकांडीची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर आली आहे.

चौकशी करणार

प्रात्यक्षिकावेळी दोघेजण गंभीर जखमी झाल्यामुळे या भागातील नागरिक संतप्त झाले आहेत. हा गुन्हा पोलिसांच्या हातून घडल्याने वरिष्ठ अधिकारीही सावधपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. नागरिकांचा रोष ओढला जाऊ नये यासाठी या प्रकरणाची वरिष्ठांनी आदेश दिल्यास चौकशी करणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चांदी उद्योग भेसळीने बेजार

$
0
0

प्रवीण कांबळे, हुपरी

चंदेरीनगरी हुपरी येथे गेल्या शेकडो वर्षांपासून परंपरागत व्यवसाय म्हणून चांदी व्यवसाय केला जातो, तेव्हापासून हा व्यवसाय अत्यंत पारदर्शी तसेच प्रामाणिकपणे फक्त विश्वास व शब्दावर लाखो रुपयांचे व्यवहार होतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून झटपट पैसे मिळविण्याच्या नादात अनेक मोठ्या धनिक, उद्योगपतींनी व उद्योजकांच्या नातेवाइकांनी चांदीमध्ये भेसळ केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.

सर्वसामान्य धडी उत्पादकाला लूटण्याच्या घटना वारंवार घडू लागल्यामुळे अशा भेसळ करणाऱ्यांवर चांदी उद्योगधंद्याचे न्यायालय समजले जाणाऱ्या चांदी कारखानदार असोसिएशनने ज्या-त्या वेळी पायबंद घातला नसल्यामुळे येत्या काळात या भेसळीने चांदी उद्योग अडचणीत येणार असून, भेसळ करणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करावी अशी मागणी धडी उत्पादकांतून होत आहे.

हुपरी (ता. हातकणंगले) येथे शेकडो वर्षांपासून चांदी व्यवसाय केला जातो. संपूर्ण देशात चांदीचे दागिने बनवून देण्यासाठी हुपरीतील व्यावसायिक, कारागीर मोठ्या कुशलतेने दागिने बनवित असतात.

चांदी व्यवसायामध्ये फक्त शब्द आणि विश्वास यावर लाखो रुपयांच्या उलाढाली होत असतात. हुपरी परिसरातील दहा ते बारा खेड्यांमध्ये चांदी व्यवसाय प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात केला जातो.गेल्या काही वर्षांत चांदीत मोठ्या प्रमाणावर भेसळ करण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे विश्वासावर चाललेल्या या उद्योगाला अविश्वासाची झालर आल्यामुळे चांदी उद्योगावर भेसळीच्या संकटामुळे सर्वसामान्य धडी उत्पादकाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

तसेच जागतिक मंदीमुळे चांदीचा दर कमालीचा घसरल्यामुळे सर्व चांदी उद्योग अडचणीत आलेला असताना दोन दिवसांपूर्वी घडलेल्या चांदी भेसळीमध्ये गावातील काही तरुणांनी चांदीच्या पाटल्यांमध्ये भेसळ केल्याचे निदर्शनास आल्याने धडी उत्पादकांच्या संतप्त भूमिकेने सर्व व्यावसायिकांनी हुपरी बंद पाळला, तसेच चांदी उद्योगाशी निगडित अन्य घटकांची बैठक बोलवली होती. या गंभीर घटनेकडे चांदी कारखानदार असोसिएशनसह अन्य चांदी व्यवसायातील पूरक घटकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे असून, अशा प्रकारांमुळे चांदी उद्योग रसातळाला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.

अशी होते चांदीत भेसळ

चांदीच्या पाटल्यांमध्ये भेसळ करताना इतर धातू, केमिकल व पावडरचे मिश्रण घालायचे आणि पाटल्याचे वजन वाढवायचे. त्यानंतर हा पाटला व्यवसायासाठी वापरला जाऊन कालांतराने पाटल्याची आटणी काढून दागिने तयार होतात. त्या दागिन्यांचा टंच शुद्धता काढला असता टंचमध्ये फरक जाणवतो. त्यामुळे या भेसळीचा दणका चांदी धडी उत्पादकाला बसतो. महिनाभर राबून त्याच्या हाती काहीच लागत नाही. त्या दागिन्यांसाठी केलेला मेळ एक असतो आणि टंच दुसरा येतो. अशा प्रकारांमुळे पाटल्यांत झालेली भेसळ सिद्ध करता येत नाही. त्यामुळे चांदी उत्पादक देशोधडीला लागला असून, चांदी भेसळ करणारी टोळी मोकाट फिरत असून, याबाबत तक्रार देण्यासाठी चांदी व्यावसायिकांनी पुढे येण्याची गरज आहे.

चांदीत होणारी भेसळ ही व्यवसायाला लागलेली कीड असून, अशा प्रवृत्तीविरोधात सर्व घटकांनी एकत्र येऊन त्याचा मुकाबला करणे गरजेचे आहे. त्यामुळे चांदी कारखानदार असोसिएशन भेसळखोरांवर कारवाई करेल.

- दिनकरराव ससे, संचालक चांदी कारखानदार असो.हुपरी

चांदी भेसळीमुळे धडी उत्पादक तसेच अन्य घटकांसह सराफ व्यावसायिकही अडचणीत आले असून, या भेसळखोरांवर कारवाई करणे गरजेचे आहे. यासाठी सराफ व्यवसाय संघटनाही सर्वांच्या बरोबरीने येईल.

- संजय माने, खजिनदार, हुपरी परिसर सराफ असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. काँग्रेसकडून 'स्वीकृत'साठी इच्छुक उमेदवार विजय देसाई यांना डावलल्यामुळे फुलेवाडी रिंगरोड प्रभागातील नगरसेविका रिना कांबळे यांनी नगरसेविकापदाचा राजीनामा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्याकडे दिला आहे. काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांचा जवळचा कार्यकर्ता म्हणून देसाई यांची ओळख आहे. कांबळे यांच्या​ विजयासाठी देसाई यांनी प्रयत्न केले होते. दरम्यान, सर्वच पक्षात समिती सदस्य निवडीच्या हालचाली वेगावल्या आहेत. राष्ट्रवादीत स्थायी समिती सभापतिपदासाठी चुरस आहे. सदस्य निवडीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, ताराराणी आघाडी आणि शिवसेनेची मंगळवारी (ता.१९) स्वतंत्रपणे बैठका होणार आहेत.

महापालिकेची बुधवारी सर्वसाधारण सभा होत आहे. सभेत स्थायी, परिवहन आणि महिला व बालकल्याणसाठी सदस्यांची नावे सादर करावयाची आहेत. परिवहन आणि बाल कल्याणपेक्षा प्रत्येक नगरसेवक स्थायी समितीत वर्णी लागावी यासाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी सायंकाळी पाच वाजता सर्किट हाऊस येथे बैठक होणार आहे. राष्ट्रवादीकडून स्थायी समिती सभापतिपदासाठी गटनेते सुनील पाटील, मुरलीधर जाधव, सूरमंजिरी लाटकर, संदीप कवाळे इच्छुक आहेत. राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.

काँग्रेसने इच्छुकांची मते आजमावली

आमदार सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महापौर अश्विनी रामाणे, गटनेते शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस कमिटी येथे नगरसेवकांची बैठक झाली. या बैठकीत वनिता देठे, छाया पोवार, अर्जुन माने, माधुरी लाड, जयश्री चव्हाण आणि सुरेखा शहा यांनी स्थायी समिती सदस्यत्वाची मागणी केली आहे.

सेनेसाठी दोघांचीही फिल्डींग

स्थायी समिती सभापती निवडीत शिवसेनेला महत्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसने सेना आपल्यासोबत राहील असा दावा केला आहे तर भाजप आघाडीकडून सेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थायीत सेनेचा एक सदस्य असणार असून नगरसेवक नियाज खान, राहुल चव्हाण यांच्यापैकी एकाला संधी मिळण्याची शक्यता आहे.

भाजप, ताराराणीची स्वतंत्र बैठक

भाजपच्या नगरसेवकांची बैठक सकाळी ११ वाजता होणार आहे. यामध्ये सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब होईल. भाजपकडून विविध समितीवर नव्या नगरसेवकांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर ताराराणी आघाडीची बैठक दुपारी तीन वाजता स्वरूप महाडिक यांच्या उपस्थितीत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पाटील यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी चित्रपटांमधून खानदानी मराठमोळ्या स्त्रीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आणि अनेक चित्रपटांतील आईच्या भूमिकेमुळे अजरामर झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पाटील यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. शाहूपुरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आशा पाटील यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील खानदानी मराठमोळे व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्यावर रात्री उशिरा पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

१९६० मध्ये माधव शिंदे दिग्दर्शित 'अंतरिचा दिवा' या चित्रपटातील भूमिकेने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या आशा पाटील यांनी अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. मूळच्या रुकडी(ता. हातकणंगले) येथील आशाताईंनी १५० हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. 'साधी माणसं', 'कामापुरता मामा', 'सामना', 'तुमचं आमचं जमलं', 'बन्याबापू', राम राम गंगाराम', 'चांडाळ चौकडी', 'सुळावरची पोळी', 'उतावळा नवरा', आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.

चित्रपटांसह रंगमंचावरही त्यांनी खूप काम केले होते. 'तो मी नव्हेच' या नाटकातील त्यांची भूमिका उल्लेखनीय ठरली होती. अनेक चित्रपटांतील भूमिकांबद्दल त्यांना उत्कृष्ठ अभिनयाचे पारितोषिकही मिळाली आहेत. डॉ. काशीनाथ घाणेकर, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, आशोक सराफ, विक्रम गोखले, अलका कुबल, प्रिया अरुण, वर्षा उसगावकर अशा आघाडीच्या कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते.

अवघ्या चित्रपटसृष्टीची 'आई'

अनंत माने, दादा कोंडके आणि यशवंत भालकर यांच्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या आशाताई पाटील अवघ्या मराठी चित्रपट सृष्टीत आई म्हणूनच ओळखल्या जात होत्या. उत्स्फूर्त अभिनय आणि लक्ष्यवेधी संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका सहजसुंदर वाटायच्या. ज्या पद्धतीने त्या चित्रपटातील सोज्वळ आणि प्रेमळ आईची भूमिका साकारत त्याच पद्धतीने त्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातही जगत होत्या. कौटुंबिकदृष्ट्या काहीसा खडतर प्रवास करावा लागलेल्या आशाताईंना अखेरची दीड वर्षे कोल्हापुरातील मातोश्री वृद्धाश्रमात राहावे लागले. मणका आणि किडनीचा त्रास असलेल्या आशा पाटील यांना त्यांची कन्या तेजस्विनी भंडारी या सहा महिन्यांपूर्वीच सोबत घेऊन गेल्या होत्या. आठवड्याभरापूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सोमवारी संध्याकाळी चारच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

आशा पाटील यांचे चित्रपट

अंतरीचा दिवा, माणसाला पंख असतात, शाहीर परशुराम, प्रीतिविवाह, रंगल्या रात्री अशा, निवृत्ती ज्ञानदेव, कामापुरता मामा, साधी माणसं, करावं तसं भरावं, सामना, तुमचं आमचं जमलं, बन्याबापू, पदराच्या सावलीत, राम राम गंगाराम, सोयरीक, बोट लाविन तिथं गुदगुल्या, चांडाळ चौकडी, सासुरवाशीण, मंत्र्याची सून, सुळावरची पोळी, उतावळा नवरा, गावरान गंगू, पळवा पळवी, शुभ बोल नाऱ्या, माहेरची साडी, सासरचं धोतर, पुत्रवती, वाजवू का, घे भरारी, माहेरची पाहुणी, आदी चित्रपटांसह 'तो मी नव्हेच' आणि 'एकच प्याला' या नाटकातही त्यांनी काम केले.

'आशाताईंनी त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे वृद्धाश्रमात चैतन्य निर्माण केले होते. शारीरिक व्याधींचा त्रास होता तरीही त्यांनी सर्वांसमोर कधीच दुःखाचे प्रदर्शन केले नाही. - वैशाली राजशेखर, मातोश्री वृद्धाश्रम

'सालस आणि सरळ स्वभावाच्या आशाताईंनी अनेक चित्रपटांमध्ये खानदानी मराठमोळ्या महिलेच्या व्यक्तिरेखा साकारल्या. - सुभाष भुर्के, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ

'आशाताईंच्या जाण्याने मराठी चित्रपटांमधील एक काळ गाजवलेल्या चरित्र अभिनेत्रीला मराठी रसिक मुकले आहेत. माणूस म्हणून अतिशय प्रेमळपणे जगलेल्या आशाताईंनी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान नेहमीच स्मरणात राहील. - भास्कर जाधव, दिग्दर्शक

'आशाताईंच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील आशेचे किरण मावळले. त्यांचं दिसणं आणि असणं हे दोन्हीही रसिकांच्या मनावर भुरळ घालणारं होतं. - यशवंत भालकर, दिग्दर्शक



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकाराला पाठबळ द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सहकार ही समाजातील दुबळ्या घटकांसाठी चालविली जाणारी चळवळ आहे. सहकारी बँका या समाजातील उपेक्षित वर्गाला पाठबळ देण्याचे काम करीत असतात. अशा बँकांच्या बाबतीत रिझर्व बँकेने सहानुभूतीचा दृष्टीकोन स्वीकारला पाहिजे. सामान्य माणसाला मदत करणाऱ्या, हित जपणाऱ्या सहकारी बँकांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे,' असे आवाहन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केले.

दि कोल्हापूर अर्बन को-आपरेटिव्ह बँकेच्या शताब्दी सोहळ्याच्या सांगता समांभात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, महापौर अश्विनी रामाणे प्रमुख उपस्थित होते. यावेळी बँकेच्या शंभर वर्षातील वाटचालीवर प्रकाश टाकणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.

पवार म्हणाले,' केंद्र सरकारने देशातील खासगी बँकांना नऊ हजार कोटींची मदत केली, मात्र दुर्बलांच्या मदतीसाठी सुरू झालेल्या सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. रिझर्व्ह बँकेचे धोरण सहकार विरोधी बनत असताना दुर्बल आणि उपेक्षितांकडे पाहण्याचा खासगी बँकांचाही दृष्टिकोन फारसा समाधानकारक नाही. अशावेळी सरकारनेच सहकाराच्या पाठिशी राहिले पाहिजे. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांच्या सक्षमतेसाठी काम करून दुर्बलांना मदत करावी. दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्यातील सहकाराची सुरूवात झाली. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सहकारी बँकांनी कर्जवाटप केल्यानंतर त्याच्या वसुलीसाठी बँकांच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे. कर्ज वितरणात बँकेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग किती आणि कसा याचीही तपासणी करावी.'

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले,' सहकाराच्या प्रत्येक क्षेत्रातील २५ चांगल्या संस्था निवडून त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. सहकारी संस्थांमधील ५ लाखांपर्यंतची डिपॉझिट सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पावले उचलणे आवश्यक आहे. सहकारी बँकांनी नवनवीन प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकांनीच उद्योजकांना मार्गदर्शन करावे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना खासगी बँकांनी कर्जरुपाने मदत करण्यासाठी विशेष निधी राखीव ठेवावा, अशा सूचना दिल्या आहेत.

बँकेचे अध्यक्ष नामदेव कांबळे यांनी स्वागत केले. शिरीष कणेरकर यांनी बँकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी बँकेचे संचालक, जिल्हा परिषद अध्यक्षा विमलताई पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने यांच्यासह बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पटले तर पाठीशी, नाहीतर ...

'एखादी बाब पटली की, तिच्या पाठीशी राहायचे आणि नाही पटली तर मात्र हातात पायताण घ्यायचे या कोल्हापुरी स्वभावाने बँकेच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. अर्बन बँकेचे कामकाज पटल्यामुळे सभासद बँकेच्या पाठिशी राहिले. कर्जवसुलीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्यानेच बँकेचा एनपीए शून्य टक्के राहिला,' असे विशेष कौतुक पवार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पूल बनलाय मृत्यूचा सापळा

$
0
0

शिवाजी पूल बनलाय मृत्यूचा सापळा

कोल्हापूर : कोकणातून कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी शिवाजी पूल हा एकमेव मार्ग असल्याने वाहनांच्या वाढत्या गर्दीमुळे शिवाजी पूल ते सीपीआर चौक रस्त्यावर नित्याचीच वाहतुकीची कोंडी असते. शिवाजी पुलावर एखादे वाहन बंद पडले तर शिवाजी पूल ते पन्हाळा मार्गावर वाहनांच्या रांगा चार ते पाच किलोमीटर लागलेल्या असतात. नवीन शिवाजी पूल पूर्णत्वास आल्यावर वाहतुकीच्या कोंडीवर उतारा पडू शकतो.

कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गावरील शिवाजी पूल हा एकमेव मार्ग होता. जयगड बंदराकडे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. जोतिबा, पन्हाळा, पैजारवाडी, आंबा, वारणेकडे जाण्यासाठी शिवाजी पुलावरून जावे लागते. रविवारी जोतिबा व पन्हाळ्याला मोठ्या प्रमाणावर पर्यटक व भाविकांची वाहने असतात. त्यामुळे सीपीआर चौक ते शिवाजी पूल हा रस्ता दिवसभर हाउसफुल्ल असतो. पंचगंगा नदीपलीकडे असलेल्या वडणगे, निगवे, आंबेवाडी, प्रयाग चिखली या गावांतील नागरिक कोल्हापुरात नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने व विद्यार्थी शिक्षणानिमित्त मोठ्या संख्येने शहरात येत असतात. सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत शिवाजी पूल परिसरात वाहनांची मोठी संख्या असते.

पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले व वारणा, कुडित्रे येथील कुंभी व कसबा बावड्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्यातील ऊस वाहतूक नोव्हेंबर ते मार्च कालावधीत दोन्ही बाजूंनी या मार्गावर २४ तास सुरू असते. शाहूवाडी येथील बॉक्साइट ट्रकच्या नंबर मिळवण्यासाठी जीवघेणी वाहतूक सुरू असते. मलकापूर, शाहूवाडी वडाप वाहनांची वर्दळ या मार्गावर दिवसभर सुरू असते. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सातत्याने कोंडी होत असते. तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ, भगतसिंग तरुण मंडळ, सोन्या मारुती चौकात जोडणारे अनेक मार्ग असल्याने वाहनांची गर्दी असते. या मार्गावर शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालय, टाउन हॉल बसस्टॉप, पंचगंगा स्मशानभूमी असल्याने हा मार्ग सातत्याने वर्दळीचा असतो.

शिवाजी पूल परिसरातील वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पर्यायी नवीन शिवाजी पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे काम ८० टक्क्यांहून अधिक झाले आहे; पण शिवाजी पूल नाक्याजवळील शाहूकालीन पाण्याचा हौद व तीन ते चार मोठी झाडे तोडावयाची असल्याने पुलाचे काम थांबले आहे. शिवाजी पुलाला नवीन पर्यायी पूल झाल्यावर या मार्गावरील ५० टक्के वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. तसेच खानविलकर पेट्रोल पंप ते ब्रह्म्पुरी टेकडी हा शंभर फुटी रस्त्या झाल्यावर तोरस्कर चौक, जुना बुधवार पेठ मार्गावरील ताण कमी होऊ शकतो. पण हे पर्याय वापरण्यास कालावधी लागणार असल्याने या परिसरात काही मार्ग एकमार्गी करण्याची करण्याची गरज आहे. सिध्दार्थनगर ते जुना बुधवार, शिवाजी पूल ते ब्रह्म्पुरी पिकनिक पॉइंट या पर्यायी रस्त्यांचा वापर जास्त झाल्यास या रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी होऊ शकते.

शिवाजी पुलावर कोकण व जोतिबा-पन्हाळ्याकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते. नवीन पूल झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होईल. सध्या एकाच पुलामुळे किरकोळ व गंभीर अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर सीपीआर ते शिवाजी पूल व पंचगंगा स्मशानभूमी ते सिद्धार्थनगर हे एकेरी मार्ग करावेत असा प्रस्ताव दिला होता. त्याची अमंलबजावणी झाल्यास वाहतुकीची कोंडी कमी होऊ शकते.

- प्रवीण डांगे, डांगे गल्ली



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोड्याचा ‘फ्लेवर्ड ढेकर’

$
0
0

Raviraj.Gaikwad @timesgroup.com

पोटात अजीर्ण झाल्यानंतर किंवा दुपारचं जेवण खूपच जड झाल्यानंतर सोडा पिऊन ढेकर द्यायची आणि पोट हलकं करून घायचं...या सोड्यामध्ये लिंबू आणि पाचक मसाला टाकून एक पाचक पेय म्हणून सोड्याचा आधार घेतला जायचा. या पाचक पेयाला आता फळांच्या फ्लेवरची जोड मिळाली आहे. त्यामुळे सोड्याबरोबर आपल्या आवडत्या फळाची चव घेत, त्याची फ्लेवर्ड ढेकर देण्याकडे कोल्हापूरकरांचा कल वाढू लागला आहे. जणू कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीचा हा भाग बनला आहे.

विशेषतः भवानी मंडपात केएमटीचा थांबा होता. त्याकाळात या सोड्याच्या गाड्या खूप होत्या. बाटलीच्या तोंडाला असलेली गोटी रबराच्या साह्याने काढताना त्याचा विशिष्ट आवाज यायचा. लिंबू, मसाला आणि सोडा हा गाडीवरचा प्रकार कोल्हापूरकरांच्या पसंतीचा होता. या सोड्याच्या बाटलीची ग्लास खूपच जाड असायची. त्यामुळं एखाद्याचा चष्मा जाड काचेचा असेल, तर त्याला सोडा वॉटर म्हणून हाक मारली जायची. काळाच्या ओघात सोडा बनविणारी मशीन आल्याने गोटी सोडा इतिहासजमा झाला. त्याचबरोबर गोल्ड स्पॉट म्हणून ओळखला जाणारा ऑरेंज सोडा लोकप्रिय होता. त्याच्या जोडीला लेमन डायजेस्टिव्ह (थोडी गोड चव) आणि मसाला डायजेस्टिव्ह (सॉल्टेड) आवडीचा प्रकार होता. उन्हाळ्यात वाळा आणि सोडा याला मागणी असायची.

सध्याच्या घडीला डायजेस्टिव्ह आणि ऑरेंज सोड्याबरोबरच कोल्हापुरात २० ते २५ प्रकाराचा फ्लेवर्ड सोडा आपल्याला मिळतो. यात कॉफी बिअर, ऑरेंज बिअर, अमेरिकन कोलासह मॅँगो, ब्लू बेरी, पायनापल, पुदिना, स्ट्रॉबेरी, ग्रीन अॅपल, असे नानाविविध सोड्याचे फ्लेवर आपल्याला उपलब्ध आहेत. पूर्वी फ्लेवरच्या यादीत कोकम सोडा एक वेगळा प्रकार म्हणून परिचित होता. आता मात्र, प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आवडीचा फेल्वर सोड्यातून घेण्याचा ऑप्शन खुला आहे.

फ्लेवर आले असले, तरी पाचक मसाला सोड्याची परंपरा आजही कोल्हापुरात कायम आहे. त्याला मागणीही तशीच आहे. या डायजेस्टिव्ह मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, जिरे, मिरे, यांचे मिश्रण असते जे पचनासाठी अतिशय चांगले असल्याचे सांगितले जाते. थंडीचे दिवस असल्याने सोड्याचा थंड प्लेवर चाखण्यात कोणाला रस नसेल, असा काहींचा समज होऊ शकतो. मात्र, कोल्ड्रिंक्स हाउस आणि सोडा मिळणाऱ्या ठिकणी माणसांची ये-जा पाहिली, तर हा समज दूर होईल.



कोठे मिळेल?

पर्यटकांच्या मध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात नाव असलेल्या कोल्हापुरातील सोळंकी कोल्ड्रिक्स हाउसमध्ये सोड्याचे डायजेस्टिव्ह फ्लेवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर अयोध्या टॉकीज समोरील बंगाली कोल्ड्रिक्स हाउसही फ्लेवर्ड सोड्यासाठी अनेक वर्षांपासून फेमस आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झालेल्या 'सोडा कॉर्नर'मध्ये तरुणांची फेल्वर्ड सोड्यासाठी तरुणांची गर्दी असते.



सोडा विथ आईस्क्रिम

सोड्याच्या फ्लेवरबरोबर त्याला आईस्क्रिमची जोड देऊन फ्युजनचा स्वाद घेण्याकडेही अनेकांचा कल असतो. यात अमेरिकन कोला विथ चॉकलेट आईस्क्रिम हा एक युनिक प्रकार कोल्हापुरात मिळतो. कॉमर्स कॉलेजसमोरील सोळंकी कोल्ड्रिंक्स हाउसमधील हा प्रकार तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. सोड्यामध्ये विरघळून जात असलेले आईस्क्रिम स्ट्रॉ आणि चमच्याच्या साह्याने खाण्याची मजा कॉलेजिन्स घेत असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, मटा सायक्लोथॉनला

$
0
0

कोल्हापूर : महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने आयोजित केलेल्या सायकल सफरीत सहभागी होण्यासाठी जोरदार प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूरकरांना २४ जानेवारीला हा आरोग्यदायी अनुभव घेता येणार आहे. रन, राइड अँड रॉक अशी टॅगलाइन असलेल्या एक्स्प्लोर कोल्हापूर संस्थेच्या सहसंयोजनातून आयोजित केलेल्या या राइड विथ प्राइड उपक्रमासाठी जोतिरादित्य इस्टेट डेव्हलपर्स असोसिएट स्पॉन्सर आहेत.

सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी नोंदणी करावी. मोबाइल क्रमांक व वेबसाइटवरही नोंदणी करता येईल. धकाधकीच्या काळात आयुष्याला वेग आला असला तरी, या धावपळीत माणसाचे आणि समाजाचे स्वास्थ्य जपणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. हाच विचार महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित केलेल्या एक्स्प्लोर कोल्हापूर या सायकल सफरमधून कृतीत आणण्याची संधी मिळणार आहे. या माध्यमातून भविष्यात सहा सायकलिंग राइडची मोफत सेवा देण्यात येणार आहे.

मटा साक्लोथॉनमध्ये सहभाग घेता यावा यासाठी सर्व शाळा आणि महाविद्यालयांत फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. शाळेतूनच अर्ज संकलित केले जातील, त्यामुळे मुलांनाही याचा आनंद घेता येणार आहे. सायक्लोथॉनसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा असलेल्या तरुण, तरुणींनीही संपर्क साधण्याचे आवाहन एक्स्प्लोअर कोल्हापूरचे अध्यक्ष सिद्धार्थ साळोखे यांनी केले आहे.

२४ जानेवारीच्या सायकल राइडची सुरूवात सायबर चौक येथील मटा हॅपी स्ट्रीटमधून सकाळी आठ वाजता होणार आहे. या दिवशीही सकाळी सात वाजता रजिस्ट्रेशन करता येणार आहे. सध्याही नावनोंदणी सुरू आहे. १२ वर्षांपासून पुढील वयोगटातील पुरूष व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात.

सायबर चौक, आर्मी एरिया रोड, शिवाजी विद्यापीठमार्गे ही राइड सायबर चौक येथे विसर्जित करण्यात येणार आहे. यासाठी सायकल स्वतः आणायची आहे, अशी माहिती एक्स्प्लोर कोल्हापूरचे अध्यक्ष सिद्धार्थ साळोखे यांनी दिली.

टीम एक्स्प्लोअर कोल्हापूरमध्ये विक्रम भोसले, नरेंद्र गवळी, राजेश शिंदे, रमजान गणीभाई हे कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी ८९५६६५५००१ व ९८२३०१३४९३ या मोबाइल क्रमांकावर अथवा http//ridewithpride.doattend.com या वेबसाइटवर नोंदणी करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाले वळविण्याचा प्रस्ताव कागदावरच

$
0
0

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे ठरले. पहिल्या टप्प्यात कसबा बावडा परिसरात ७६ एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प उभारण्यात आला. याठिकाणी रोज ५५ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. मात्र शहरातील बारा नाल्यातील सांडपाणी अडविणे आणि दोन ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारणीचा प्रस्ताव निधीअभावी कागदावरच आहे. अठरा कोटीचा हा प्रकल्प आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न आजही ज्वलंत आहे. रोज हजारो लिटर सांडपाणी कसलेही प्रक्रिया न करता नदीत मिसळते. शहरातील विविध भागातील सांडपाणी, औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाण्याचाही त्यात समावेश आहे. याव्यतिरिक्त मैलामिश्रीत सांडपाणी, खरमाती, प्लास्टिक कचराही ​नदीत सोडले जाते. नाल्याद्वारे थेट नदीत पाणी सोडल्यामुळे पाण्याच्या प्रदूषणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. राष्ट्रीय नदी कृती योजनेंतर्गत नदी प्रदूषणमुक्त बनविण्यासाठी योजना आहेत. या माध्यमातून पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याची योजना आहे. शहरातील बारा नाल्यांचे पाणी अडविले जाणार आहे. लाइन बाजार आणि बापट कँम्प येथे एसटीपी केंद्र उभारण्याचे प्रस्तावित आहे. दुधाळी येथे १७ एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्पाची उभारणी सुरू आहे.

शहरातील बारापैकी दोन नाल्यावर पंपिंग स्टेशनची उभारणी आणि अन्य आठ नाले अडवून त्यातील सांडपाणी कसबा बावडा परिसरातील एसटीपी प्रकल्पाकडे वळविण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आखला आहे. जवळपास १८ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. लक्षतीर्थ वसाहत, सिद्धार्थनगर, सीपीआर, नागाळा पार्क, रमणमळा, जामदार क्लब, ड्रीम वर्ल्ड परिसरातून वाहणाऱ्या नाल्यातील पाणी अडवून ते एसटीपी प्रकल्पाकडे वळविण्यात येणार आहे. या​शिवाय राजाराम बंधाऱ्याच्या खालच्या भागातून वाहणारा नाला अडवून सांडपाणी एसटीपीकडे वळविण्याचे नियोजन आहे. जयंती नाल्यासारखे पंपिंग स्टेशन बापट कँम्प आणि लाइनबाजार येथे बांधण्यात येणार आहे. बापट कँम्प सांडपाणी केंद्रासाठी अजून जागेचा शोध सुरू आहे. लाइनबाजार येथील कामही अंधातरीच आहे. वास्तविक राष्ट्रीय नदी कृती योजनेंतर्गत उपलब्ध ७४ कोटी रुपयातून कसबा बावडा एसटीपी प्लँट आणि बापट कँम्प, लाइन बाजार येथील पंपिंग स्टेशन उभारणीचा समावेश आहे.

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. नाले अडवून तेथील सांडपाणी अडविण्याचा आराखडा तयार केला आहे. जीवन प्रधिकरणनेही या तां​त्रिक मंजुरी दिली आहे. नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासंदर्भात प्रदूषण नियंत्रणच्या सक्त सूचना आहेत. अमृत योजना किंवा नगरोत्थान योजनेतंर्गत निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

- आर. के. पाटील, पर्यावरण अभियंता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगचे पेपर ऑनलाइन तपासणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाने ऑनलाइन उत्तरपत्रिकांची तपासणीची तयारी सुरू केली आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून विद्यापीठाने इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणार आहे.

कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात ३६ इंजिनीअरिंग कॉलेज असून १८ शाखा आहेत. या कॉलेजमध्ये २ हजार प्राध्यापक आहेत. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर, इंटरनेटची सुविधा, बैठक व्यवस्था असल्याने पहिल्या टप्प्यात इंजिनीअरिंगच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीची तयारी पूर्ण झाली आहे. अभियांत्रिकी विद्याशाखेतील पहिल्या टप्प्यात इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासणीचा प्रयत्न आहे. या अभ्यासक्रमांच्या सुमारे दहा हजार उत्तरपत्रिका असतील.

अभियांत्रिकी शाखेच्या दुसऱ्या सत्रात होणाऱ्या दोन परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ही पद्धत अवलंवबिली जाणार आहे. ऑनलाइन तपासणीमुळे वेळेची बचत होणार असून निकालही वेळेत लागण्यास मदत होईल. प्रक्रियेत पारदर्शकपणा येईल. विद्यार्थ्यांना पुर्नमूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घ्यावी लागणार नाही. त्यामुळे ऑनलाइनवर उत्तरपत्रिका विद्यार्थी पाहू शकतात. या प्रक्रियेत उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंग होणार असल्याने विद्यार्थ्यांने शुल्क भरल्यास ती प्रत त्यांच्या ई-मेलवर दिली जाणार आहे. ऑनलाइन तपासणीच्या पद्धतीत यश मिळाल्यानंतर प्रथम अभियांत्रिकी शाखेच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना ही पद्धत लागू करण्याचा विचार सुरू आहे.

काय आहे पद्धत

उत्तरपत्रिका तपासणी केंद्रीय मूल्यमापन पद्धतीने (कॅप) एक केंद्रावर केली जाते. या केंद्रातच उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासल्या जाणार आहेत. परीक्षा झाल्यानंतर "कॅप' केंद्रावर उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून संगणकावर टाकल्या जातील. संगणक प्रणालीतर्फे प्रत्येक परीक्षकाला उत्तरपत्रिकांचे संच तपासण्यास दिले जातील. या प्रणालीद्वारेच गुणांकन केले जातील. इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये संगणक लॅबची सुविधा आहे. त्यासाठी २५ ते ४० संगणकांची लॅब तयार केली जाईल. परीक्षकांना सुरक्षिततेसाठी लॉग-इन आणि पासवर्ड दिले जाणार आहेत.

असे राहील गुणांकन

या पद्धतीच्या तपासणीत मुख्य प्रश्न, त्याचे उपप्रश्न पूर्ण तपासून गुण द्यावे लागतील. प्रत्येक प्रश्नाला गुणांकन करावे लागणार असल्याने प्रश्न विसरुन चालणार नाही. प्रश्नाला कमी किंवा अधिक गुण दिल्यास संगणक तत्काळ फेरतपासणीचा संदेश देणार आहे. उत्तरपत्रिकांच्या तपासणीनंतर दिलेले गुण परीक्षा विभागातील निकाल प्रक्रियेला आपोआपच उपलब्ध होतील. त्यामुळे वेळेत निकाल लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढला आजारांचा धोका

$
0
0

कोल्हापूर

किमान तापमानाची गेल्या आठवड्यापासून घसरण सुरू असल्याने कडाक्याच्या थंडीची शक्यता असताना सोमवारपासून मात्र वातावरणाचा नूर एकदमच पालटला. अचानकच ढगाळ वातावरण तयार झाले असून मंगळवारीही दिवसभर पावसाळ्यासारखे ढगाळ वातावरण राहिले. दिवसभरात चुकूनच सूर्यदर्शन झाले. सूर्यप्रकाश अंगावर घेऊन थंडी थोडी कमी करण्याची संधी या ढगाळ वातावरणामुळे गमावली. यामुळे दिवसभर हवेत गारवा होता. थंडीचे वातावरण आरोग्यदायी समजले जाते. पण या अचानक बदललेल्या वातावरणाने विषाणूजन्य आजारांनी तोंड लगेचच वर काढले.

जानेवारी सुरू झाल्यापासून थंडी कमी अधिक प्रमाणात आहे. पहिल्या आठवड्यात पंधरा अंशावर खाली आलेले किमान तापमान पुन्हा १८ ते १९ अंशावर पोहचले. गेल्या आठवड्यात मात्र ते पुन्हा कमी होण्यास सुरुवात झाली. १६ अंशावर पोहचलेल्या वातावरणाने हुडहुडी जाणवत होती. तशातच वाऱ्याचेही प्रमाण असल्याने दिवसभर गारवा होता. त्यावेळी सूर्यप्रकाशात गेल्यानंतर थंडी थोडी कमी होत असे. सोमवारी सकाळपासून मात्र वातावरण एकदमच बदलले. पावसाळ्यासारखे ढगाळ वातावरण तयार झाले. पाऊस पडण्याआधी आभाळ भरुन येते, त्याचप्रमाणे दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीचे प्रमाण थोडे कमी झाले. मंगळवारी सकाळी काही काळ सूर्यप्रकाश मिळाला. पण त्यानंतर ढगाळ वातावरणच राहिले.

सूर्यदर्शन झाले नाही. तसेच वाऱ्याचेही प्रमाण असल्याने दिवसभर हवेत गारवा जाणवत होता. कोंदट वातावरण झाले होते. अचानक बदललेले वातावरण अनेकांना आजाराचे निमंत्रण देणारे ठरले. हे वातावरण विषाणूंना पोषक असल्याने सोमवारी दिवसभरातच अनेकांना विषाणूजन्य आजारांनी गाठले. सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होणारे अनेक रुग्ण दवाखान्यात मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. विषाणूजन्य आजार संसर्गजन्य असल्याने त्याची अनेकांना लगेचच लागण होते. यामुळे विविध ठिकाणच्या दवाखान्यांमध्ये सर्दी, तापाचे रुग्ण होते. या वातावरणाचा रब्बी पिकांवर फारसा परिणाम होणार नसला तरी काही अंशी आंब्याच्या मोहराला फटका बसण्याची शक्यता आहे.

विषाणूजन्य आजारांत वाढ

अचानक बदललेले हे ढगाळ वातावरण विषाणू वाढण्यास पोषक आहे. त्यामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये सोमवारीच मोठी वाढ झाली. लहानांसह अनेकजणांना या आजारांनी गाठले आहे. खोकला, ​शिंकण्यामधून विषाणूंचा संसर्ग होऊन या आजाराचे रुग्ण वाढतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळणे महत्वाचे आहे. तसेच विश्रांती व सकस आहार घ्यावा. - डॉ. अमोल माने.



द्राक्ष बागांना किडीच्या प्रादुर्भावाची भीती

आपल्या परिसरात उसाचे प्रमाण जास्त आहे. रब्बी पिकांवर या वातावरणाचा फारसा ​परिणाम होत नाही. आंब्याच्या मोहराला काही प्रमाणात फटका बसू शकतो. पण नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या मोहरावर या वातावरणाने फार परिणाम होणार नाही. या वातावरणाने द्राक्ष बागांना किडीचा प्रादुर्भाव होण्याची जास्त भीती असते. - विजयेंद्र धुमाळ, उपविभागीय कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळा तीरी बहरली नगरी

$
0
0

satish.ghatage@ timesgroup.com

रंकाळा तलावाच्या पश्चिम बाजूला शांत व निसर्गरम्य वातावरणात अंबाई टँक आणि हरिओम छोटी-छोटी नगरे सुंदर बंगले, अपार्टमेंट्सनी सजली आहेत. रंकाळा तलावाचा सुंदर नजारा, पश्चिमेकडून येणारे थंडगार वारे, संस्थानकालीन शालिनी पॅलेसची वास्तू, दुर्मिळ पक्ष्यांचा वावर, भक्तीमार्गाचे प्रसार करणारे इस्कॉन केंद्र यामुळे या परिसरात वेगळेच वलय निर्माण झाले आहे. अंबाई टँक परिसरात ६२ अपार्टमेंट्स आहेत तर हरिओम नगरात आता नव्याने सात मजली अपार्टमेंट्स होऊ लागली आहेत.

कोल्हापूर शहरातील पहिली वसाहत म्हणजे फुलेवाडी. महात्मा जोतिराव फुले सोसायटीमुळे फुलेवाडी हे नाव परिसराला पडले. रंकाळ्याच्या पश्चिमेकडील सर्व जागा श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज यांची. नंतर हा परिसर श्रीपतराव बोंद्रे यांच्या महात्मा फुले हौसिंग सोसायटीकडे आला. १९६८ मध्ये महात्मा फुले हौसिंग सोसायटीने 'संत अँड माजनाळकर' यांनी परिसरात प्लॉटचे ड्राईंग काढले. त्यानंतर लिलावाने प्लॉटची विक्री झाली. १९७६ मध्ये नवीन सिलिंग अॅक्ट लागू झाल्यानंतर २० हजार स्क्वेअर फुटांवर अपार्टमेंट्स उभारण्यात आल्या. नागनाथ सोसायटी आणि करवीर निवासिनी सोसायटीच्या माध्यमातून 'वनरुम किचन ३६०० रुपयांत' अशी जाहिरातबाजीही त्याकाळी करण्यात आली. नंतर 'असावे घरकुल छान' अशीही या परिसराचे महत्त्व सांगणारी जाहिरात होती. कोल्हापूर महानगरपालिकेच्या जलतरण तलावाचे नाव अंबाई टँक असल्याने तेच नाव या परिसराला लागू झाले. बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांनी या परिसरात 'दया', 'क्षमा', 'शांती', 'रिद्धी', 'सिध्दी' अशा पाच अपार्टमेंट बांधल्या. पूर्वी दोन मजली अपार्टमेंट्मध्ये बारा फ्लॅट होते. त्यानंतर या परिसरात भराभर अपार्टमेंट्स उभारल्या जाऊ लागल्या. मध्यमवर्गीय, नोकरदार मंडळींनी या परिसरातला पसंती दिली. ज्यांचे प्लॉट होते, त्यांनी बंगले बांधले तर काहींनी अपार्टमेंट संस्कृती स्वीकारली. नंतर 'आम्रपाली', 'पांचाली', 'राधिका', 'व्दारका', 'प्रियदर्शनी', 'मि​थिला', 'राधेय', 'अयोध्या', 'पंचोध्या' अशा अपार्टमेंट्स भराभर उभ्या राहिल्या.

त्याकाळात पाणीपुरवठ्याची व्यवस्था महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे होती. रंकाळा ते शालिनी सिनेटोन अशी मोठी जलवाहिनी होती. त्या जलवाहिनीतून अपार्टमेंट्स, बंगल्यांना पाणीपुरवठा होत होता. या परिसरातला बोंद्रे यांचा 'हॅपी होम' हा टुमदार बंगलाही आजही चांगल्या स्थितीत आहे. आधीच निसर्गरम्य असलेल्या परिसरात बंगले आणि अपार्टमेंटधारकांनी वृक्षारोपणाला गती दिली. महानगरपालिकेने त्यासाठी सहकार्याचा हात पुढे केला. नागरिकांच्या गरजा ओळखून दुकाने सुरू झाली. मात्र परिसराला कमर्शिअल लूक आला तो रंकाळा पदपथ उद्यानामुळे. रंकाळा पदपथ उद्यानातील गर्दी लक्षात घेऊन काही ठिकाणी अपार्टमेंट्सचे रिन्यूएशन झाले. तळमजल्यांतील गाळ्यात खाद्यपदार्थांची दुकाने, छोटी उपाहारगृह, आईस्क्रीम पार्लर सुरू झाली. या परिसरात एकच दवाखाना आहे. मात्र औषधाचे एकही दुकान या परिसरात नाही. औषधे घेण्यासाठी इथल्या नागरिकांना शहराच्या गावठाण भागात धाव घ्यावी लागते. या परिसरात एकही हायस्कूल नाही. शालिनी पॅलेस येथे थोडा काळ शहाजी कॉलेज होते, तोच या परिसराचा एकमेव शिक्षणाशी संबंध. येथे बांधण्यात आलेल्या दत्त मंगल कार्यालयामुळे शहरातील नागरिकांना विवाह समारंभांसाठी मोठा हॉल उपलब्ध झाला. शालिनी पॅलेस येथे काहीकाळ पंचतारांकित हॉटेल होते, मात्र ते काही काळानंतर बंद पडले. आजही ते बंद अवस्थेत आहे.

सध्या या परिसरात रोटरी बालवाडी, निसर्ग निकेतन या दोन बालवाड्या आहेत. इथल्या नागरिकांना स्वच्छ हवा व पाणी या दोन गोष्टींची चांगली उपलब्धता आहे. सकाळी आणि संध्याकाळी फिरण्यासाठी रंकाळा पदपथ उद्यानाची साथ आहे. पदपथ उद्यानामुळे इथे गर्दी वाढली असल्याने शांतता धोक्यात आल्याचे काही मंडळींचे म्हणणे आहे. तर या परिसरातील वस्ती वाढल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. सध्या संध्याकाळी चार ते रात्री दहापर्यंत परिसर गजबजलेला असतो. दत्त मंदिराच्या पिछाडीस नवीन अपार्टमेंट्स, बंगल्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा परिसर आणखी विस्तारणार आहे.

अंबाई टँक परिसराला जोडूनच हरिओमनगर हे बांधकाम व्यावसायिकांच्या दृष्टीनेही नवे डेस्टिनेशन झाले आहे. रंकाळा पदपथ उद्यानासमोर सध्या सात मजली अपार्टमेंट्सची उभारणी सुरू आहे. अतिशय रम्य परिसरातील अपार्टमेंट्स, बंगल्यांना ग्राहकांची पसंती मिळू लागली आहे. हरिओमनगर परिसराचा विकास नियोजनबद्ध असल्याने ते विकसित उपनगर होऊ लागले आहे. मुख्य रस्त्याला जोडणारे संलग्न आखिव-रेखिव रस्ते आहेत. संलग्न रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बंगले आहेत. हरिओमनगरात एकूण १८ गल्ल्या. या परिसरात पायाभूत सुविधा हळूहळू विकसित होत आहेत. उच्च मध्यमवर्गीयांनी हरिओमनगर परिसरातला पसंती दिली आहे. त्यामुळे या परिसरात जागोजागी देखणे बंगले पाहायला मिळतात. परिसरात इस्कॉन मंदिरामुळे हरिओमनगराला वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. या भागात वृक्षारोपणाची मोहीम सामूहिक पद्धतीने सुरू आहे.

इस्कॉनचे हरे कृष्ण मंदिर

हरिओमनगरमधील इस्कॉन मंदिर हे कृष्णभक्तांचे स्थान झाले आहे. १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघाची (इस्कॉन) शाखा सम्राटनगर येथे सुरू झाली. त्यानंतर हे इस्कॉनचे केंद्र शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिरात सुरू झाले. मात्र भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन इस्कॉनने २००४ मध्ये हरिओमनगरातील पाच एकर जागेत हरे कृष्ण मंदिर बांधले. मंदिरात राधा-कृष्णाची मूर्ती असून दर रविवारी 'संडे फिस्ट'मध्ये भगवदगीतेवर विविध वक्त्यांची व्याख्याने असतात. लहान मुले, महाविद्यालयीन युवक युवती, वृद्धांसाठी स्वतंत्र उपक्रम राबविले जातात. वर्षभरात जन्माष्टमी, रामनवमी, राधाअष्टमी, गौर पोर्णिमा, शरद पोर्णिमा, नित्यानंद त्रयोदशी, नृसिंह चुतर्दशी यादिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मोबाइल ग्रुपचे समाजकार्य

अंबाई टँक परिसरात मोबाइल ग्रुपच्यावतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. रक्तदान शिबिर, आरोग्य, शिबिराचे आयोजन केले होते. अवजड वाहनांच्याविरोधात या परिसरात आंदोलन करण्यात आले. दरवर्षी २५ डिसेंबर रोजी अंबाई टँक फेस्टिव्हल आयोजित केला जातो. फेस्टिव्हलमध्ये बचत गटांना प्राधान्य देऊन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, अशी माहिती अमोल पालोजी यांनी दिली.

हरिओम मंचचे हजारी वृक्षारोपण

​'हरिओम नगर कला, क्रीडा, सांस्कृतिक मंचच्यावतीने कार्यकर्त्यांनी एक हजार झाडे लावून हा परिसर हिरवागार करण्याचा निर्धार केला आहे', अशी माहिती अध्यक्ष प्रा. टी.बी. पाटील यांनी दिली. 'मंचाचा वर्धापनदिन एक मे रोजी असतो. त्या दिवशी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे आयोजन केले जाते', अशी माहिती सचिव अमरसिंह पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकांच्या तोंडाला ऊर्जामंत्र्यांकडून पाने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्रातील उद्योगांसाठीचे वीजदर शेजारील राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुंबईत बैठक झाली. बैठकीला राज्यातील उद्योजकांच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात ऊर्जामंत्र्यांनी उद्योजकांपुढे दीड रुपयाने स्वस्त असलेल्या रात्रीच्या विजेचा वापर करण्याचा पर्याय ठेवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. बैठकीत विजेचे दर कमी करण्याबाबत निर्णय होईल, अशी उद्योजकांना अपेक्षा होती; मात्र रात्री वीज वापरा, असा पर्याय पुढे ठेवून ऊर्जामंत्र्यांनी उद्योजकांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत.

कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड या शेजारील राज्यांमध्ये उद्योगांसाठी महाराष्ट्रापेक्षा स्वस्त वीज मिळत आहे. त्यामुळे सीमाभागातील अनेक उद्योजकांनी या राज्यांमध्ये उद्योग विस्ताराचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री देसाई यांनी पुढाकार घेऊन राज्यातील उद्योजक आणि ऊर्जामंत्री बानवकुळे यांच्या बैठकीचे नियोजन केले होते; मात्र या बैठकीत उद्योजकांच्या हाती ठोस काही लागले नाही.

राज्यात विजेचे दर महाराष्ट्र वीज नियामक मंडळ ठरवते, असा मुद्दा ऊर्जामंत्र्यांनी बैठकीत मांडला. तसेच वीजनिर्मिती, पारेषण व वितरण या तीन कंपन्यांवर मिळून ४० हजार कोटींचे कर्ज आहे. तसेच वीजनिर्मितीसाठी लागणारा कोळसा आंध्र प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमधून आणावा लागतो. त्यामुळे सध्या विजेचे दर कमी करण्याचा निर्णय शक्य नाही; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे उद्योगांसाठी वीज दर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र तोपर्यंत उद्योजकांनी सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत दीड रुपयाने स्वस्त दिली जाणारी वीज वापरावी, असे आवाहन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी बैठकीत उद्योजकांना केले. दरम्यान, ऊर्जामंत्र्यांनी दिलेला पर्याय कितपत व्यवहार्य आहे, यावर उद्योगजगतातून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही.
चर्चेतून अनेक पर्यायपुढे आले. त्यात रात्रीच्या वीज वापराचा एक पर्याय आहे. एकूणच बैठक सकारात्मक झाली.

- सुरेंद्र जैन, अध्यक्ष स्मॅक, (शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन,कोल्हापूर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणमंत्र्यांनी मागवला लेखाजोखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी सरकारकडून निधी घेण्यापूर्वी महानगरपालिकेने स्वतःहून काय केले? याची विचारणा करत पुढाकार घेऊन स्वनिधीतून किती खर्च केला याचा लेखाजोखाच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महानगरपालिकेकडे मंगळवारी मागितला. गेल्या वर्षभरात महापालिकेने निधीची किती तरतूद केली आणि त्यातील प्रत्यक्ष कामावर किती खर्च केला याची तपशीलवार माहिती देण्याचे आदेश कदम यांनी दिले असून त्याबाबत पुढील महिन्यात पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे.

पंचगंगा व कृष्णा नदीमध्ये काविळीचे विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये या प्रश्नाबाबत सरकारच्यावतीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्री कदम यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये बैठक झाली. यासाठी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जलअभियंता मनीष पवार, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी वाय. बी. सोनटक्के, इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व जलअभियंता उपस्थित होते.

महापालिकेच्यावतीने पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी, नाल्यांवरील पंपिंग स्टेशन, नाला जोडण्याचा प्रकल्प यांची माहिती देण्यात आली. बापट कॅम्प व लाइन बाजार येथील पंपिंग सुरू झाल्यानंतर व १२ नाले जोडण्याचे काम संपल्यानंतर पंचगंगा नदीतील प्रदूषणाचा बहुतांश प्रश्न संपेल, असेही सांगण्यात आले. फक्त नाला जोडण्याच्या प्रकल्पासाठी सरकारकडे १८ कोटी रुपयांची मागणी केली आहे. तर शहरातील ड्रेनेज लाइनचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी 'अमृत' योजनेमध्ये प्रस्ताव पाठवला असल्याचे यावेळी मंत्र्यांसमोर मांडण्यात आले. रंकाळ्यातील प्रदूषण रोखण्यासाठीही प्रयत्न केले जात असल्याची माहितीही दिली. सरकारच्या मदतीवर महापालिकेने प्रदूषण रोखण्याचे काम चालवले असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने स्वतः काय केले? अशी विचारणा केली.

००००००

चौकट

महापालिकेची अडचण

स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या वार्षिक अंदाजपत्रकाच्या २५ टक्के निधी पर्यावरणावर खर्च करण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत किती तरतूद केली व त्यातील खर्च किती झाला याची तपशीलवार माहिती देण्यास सांगितले. अमृत व नगरोत्थानमधून निधी न घेता स्वनिधीतून किती खर्च केला आहे याची विचारणा केली. यामुळे महापालिकेची अडचण झाली आहे. मुळात महापालिकेकडे उत्पन्नाचे स्त्रोत मर्यादित असल्याने विकासासाठी स्वनिधी तुटपुंजा आहे. त्यातून पर्यावरणावर ठराविक निधी खर्च करण्यास अडचण येत आहे. मात्र पर्यावरण मंत्र्यांनीच आता किती निधी खर्च केला याची विचारणा केल्याने आता महापालिकेसमोर मोठी अडचण उभी राहिली आहे.

महापालिकेचे भांडवली बजेट ३१२ कोटी

त्यातील आतापर्यंतचा प्रत्यक्ष खर्च १२३ कोटी

प्रत्यक्ष खर्चाच्या १८ टक्के पर्यावरणावर खर्च

त्याची अंदाजित रक्कम २२ कोटीवर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा. बेळगाव
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या साहित्य संमेलनात बेळगाव हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्र सरकार आणि जनता सीमावासियांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे, असे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले.
मराठी मराठी टायगर्स चित्रपट बेळगावात दाखवणारच, असेही अभिनेते अमोल कोल्हे यांनी बेळगावात ठणकावून सांगितल्याचे कन्नड संघटनांच्या नेत्यांना चांगलेच झोंबले आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी बेळगाव हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे, असे केलेले वक्तव्य जिव्हारी लागल्याचे दिसते. त्यामुळे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी कित्तूर चन्नम्मा चौकात जमून फडणवीस यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. त्यांच्या स्टंटबाजीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता.

केंद्रीय मंत्री अनंतकुमार फडणवीस यांची भेट घेणार
केंद्रीय खात आणि रसायन खात्याचे मंत्री अनंतकुमार यांनी फडणवीस यांना लक्ष केले, 'बेळगाव, निपाणी आणि कारवार हे कर्नाटकाचे अविभाज्य भाग आहेत आणि ते कर्नाटकातच राहतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंधळ निर्माण करणारी वक्तव्ये करू नयेत. मी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे.
आजचा अखंड कर्नाटक हा संघर्ष करून निर्माण झालेला आहे. महाजन अहवाल कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना बांधील असेल, असे खुद्द महाजन यांनी नमूद केले आहे. आज जर त्या अहवालाबाबत कोणाचे वेगळे मत असेल तर ती चुकीची बाब आहे,' असेही अनंतकुमार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


संभ्रम टाळण्यासाठी काँग्रेसचा मेळावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेसमधील संभ्रवस्था दूर करण्याचा मुहूर्त अखेर निश्चित झाला. महापौर बदलाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या चर्चा, व्यक्त होत असलेले अंदाज हे आधारहीन असल्याचे काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि गटनेते किशोर जामदार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. मदन पाटील यांच्या निधनानंतर पहिली बैठक आमदार पतंगराव कदम आणि जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थित २१ जानेवारीला होत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले.
माजी मंत्री मदन पाटील यांच्या निधनानंतर महापालिकेतील सत्तेचे नेतृत्व कोणी आणि कसे करायचे? कोणाला बरोबर घ्यायचे? या बाबत काँग्रेसमधील कोणीच आजवर भाष्य केले नव्हते. त्याचबरोबर सदस्यांची एकत्रित बैठक बोलवून त्यांना पुढची दिशा सांगण्यात आली नव्हती. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव जयश्रीताई पाटील यांनी सत्तेची सूत्रे सांभाळण्याचा निर्णय घेऊन खडतर प्रवासात पाऊल टाकले होते. मदन पाटील यांच्यानंतर त्यांच्या मातोश्रींचेही निधन झाले. त्यामुळे काँग्रेसमधला सूर जुळायला बराच कालावधी गेला.
पत्रकारांशी बोलताना महापालिकेतील गटनेते किशोर जामदार म्हणाले, आपण स्वतः महापौरपदासाठी इच्छुक नाही. अद्याप या पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे पक्षाने कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्याचा विषयच नाही. परंतु गेले काही दिवस ज्या चर्चा समोर आल्या आणि आराखडे मांडले जात आहेत, त्याला कोणताही आधार नाही.
२१ जानेवारी रोजी मिरजेतील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात डॉ. कदम आणि जयश्रीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थित पक्षाच्या सर्व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यावेळीही महापौरपदाबाबत कोणतीही चर्चा किंवा मुलाखती होणार नाहीत. हा केवळ स्नेहमेळावा आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर एकत्रित बैठक घेता आली नव्हती. म्हणून ही बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजयसिह मोहिते-पाटील यांना पुरस्कार

$
0
0

कुपवाड : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टतर्फे देण्यात येणारा सहकार तपस्वी गुलाबराव पाटील पुरस्कार यंदा माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना जाहीर झाला आहे. दुसरा गुलाबराव पाटील ऋणानुबंध सन्मान पुरस्कार बाजीराव नाना पाटील (अंकलखोप) यांना देण्यात येणार असल्याची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्थापन केलेल्या गुलाबराव पाटील प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या दहा पुरस्कारांची घोषणा बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मंगळवारी संयुक्तपणे केली.
सहकार चळवळीतील अग्रगण्य नेते, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार गुलाबराव पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या नावे पुरस्कार देण्यात येत आहेत. ट्रस्टच्या पुरस्कारांचे यंदाचे पाचवे वर्ष आहे तर जिल्हा बँकेने स्थापन केलेल्या प्रतिष्ठान या वर्षांपासून उत्कृष्ठ तीन विविध कार्यकारी सोसयट्या, तीन सचिव, बँकेची एक शाखा, तीन अधिकारी, कर्मचारी, असे दहा पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. २१ जानेवारी रोजी जिल्हा बँकेतील वसंतदादा पाटील सभागृहात या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजी नगरपालिकेत तणाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करून इचलकरंजीचे मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी, जाहीर नोटीस मंगळवारच्या वृत्तपत्रात प्रसिध्द केली. या नोटिसीमुळे संतप्त झालेले विहिंप, बजरंग दलासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते पालिकेत आले. मुख्याधिकारी डॉ. रसाळ कामासाठी मुंबईला गेल्याने कार्यकर्ते अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेले. पण त्याही कार्यक्रमासाठी बाहेर गेल्याने कार्यकर्ते संतप्त बनले.

शिष्टमंडळाला प्रशासनाची भूमिका समजावून सांगण्यासाठी प्रशासकीय अधिकारी निवृत्ती गवळी व नगरअभियंता भाऊसाहेब पाटील अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आले. त्यावेळी बाळ महाराज, दिलीप माणगांवकर, संतोष हत्तीकर, शिवजी व्यास आदींनी गवळी व पाटील यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. एकाही धार्मिकस्थळाला हात लावू नये अन्यथा शहराला हिंसक वळण लागेल, असा इशारा देत पालिका अधिकारी केवळ जातीय तेढ निर्माण करण्यासाठीच ही कारवाई करत असल्याचा आरोप केला. य

यावेळी एका कार्यकर्त्याने गवळी व पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. घोषणाबाजी सुरू राहिल्याने अधिकाऱ्यांनाही उत्तर देताना अडचण निर्माण झाली.

दरम्यान, गवळी व पाटील यांच्या अंगावर शाई फेकल्याची बातमी पालिकेत पसरताच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाकडे धाव घेतली. यावेळी केवळ दोन पोलिस कर्मचारी हजर होते. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवताच पोलिसांची कुमक पालिकेत दाखल झाली. या घटनेचा निषेध करत पालिका कर्मचाऱ्यांनी सभागृहात बैठक घेऊन कामबंद आंदोलन पुकारले. पालिका कर्मचारी व हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रवेशद्वारात आमनेसामने आले. दरम्यान, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या दालनात झालेल्या बैठकीतही कोणताच तोडगा निघाला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमिक विभागाला जि.प.तून बाहेर काढा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य आणि देशपातळीवर कोल्हापूर जिल्हा परिषद विविध पुरस्कारांवर मोहोर उमटवत असताना माध्यमिक शिक्षण विभागाने या सर्व कामांना गोलबोट लावले आहे. माध्यमिक शिक्षण विभागातून अभ्यागतांची वेळेवर कामे होत नसून शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली आहे. त्यामुळे विभागाचे दोन कर्मचारी लाचलुचपतच्या ‍विभागाच्या जाळ्यात अडकले असून, अशी बदनामी होण्यापेक्षा हा विभागाच जिल्हा परिषदेच्या कार्यायालयातून बाहेर काढावा, अशी मागणी सदस्य शिवप्रसाद तेली यांनी केली.

माध्यमिक विभागाकडे आलेल्या प्रस्तावांची वेळेत निर्गत होत नसल्याने अनेकांची महत्त्वपूर्ण कामे रखडली आहेत. त्यामुळे अनेक शिक्षक वेतनश्रेणीपासून वंचित राहिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतरही निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याचे तेली यांनी निदर्शनास आणून दिले. अर्थपूर्ण घडामोडी घडल्यानंतर अशा प्रकरणाचा त्वरित निपटारा होत असल्याचे तेली यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

सदस्य बाजीराव पाटील यांनी शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विभागाविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. स्थायी समितीच्या बैठकीवेळी रजा न देताच त्या गैरहजर राहिल्या आहेत. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण असते, याचा खुलासा करण्याची मागणी केली. लाच घेतलेल्या अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. मात्र, जिल्हा परिषदेला माध्यमिक विभागावर कारवाई करता येत नाही; पण त्यांना सहायक स्टाफ दिला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी स्पष्ट केले.

काही सदस्य 'मॅनेज'

शिक्षणाधिकाऱ्यांना स्थायी समितीमधून कार्यमुक्त करण्याचा ठराव झाला होता. यानंतर त्यांच्या खासगी एजंटाने अनेक सदस्यांना भेटून आपल्यावरीलकारवाई रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. सभागृहात माध्यमिक विभागाच्या विषयाला तोंड फुटल्यानंतर मॅनेज झालेले अनेकजण विषयाला बगल देऊन दुसऱ्या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे केवळ माध्यमिक विभागाच भ्रष्टाचारामध्ये सहभागी नसूल यामध्ये सदस्यही मॅनेज झाल्याचे दिसून येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय बिलांबाबत गलथान कारभार

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वर्षभरात झालेल्या वैद्यकीय खर्चावरील बिलांना जिल्हा शल्यचिकित्सक मंजुरी आदेश देतात. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्याने सादर केलेल्या प्रस्तावावरील व शल्यचिकित्सकांनी मंजुरी दिलेल्या आदेशावरील तारखेमध्ये तफावत आढळल्याने सात महिन्यानंतर वैद्यकीय बिलाचा प्रस्ताव कृषी आयुक्त कार्यालयाने परत पाठवला आहे. परत पाठवलेल्या प्रस्तावामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांसह कृषी अधीक्षक कार्यालयातील लेखाधिकाऱ्यांचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. या गलथान कारभाराचा फटका सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्याने वैद्यकीय बिलांसाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे जानेवारी २०१५ मध्ये प्रस्ताव पाठवला होता. १८ जानेवारी २०१४ रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला दाखला, फॉर्म ए. सी व डी, रुग्णालयातील वास्तव्याचा पुरावा, डिस्चार्ज कार्ड आदी कागदपत्रे सादर केली होती. जिल्हा शल्यचिकित्सकांनी १५२६ चा मंजुरी आदेश काढताना आदेशावर १८ जानेवारी २०१५ असा उल्लेख करुन मंजुरी आदेश कृषी अधीक्षक कार्यालयाच्या लेखाधिकाऱ्यांकडे पाठवला. लेखाधिकाऱ्यांनी वैद्यकीय खर्च प्रतीपुर्ती देयक तपासणी सूची एक ते १४ नुसार तपासणी न करता विभागीय कृषी कार्यालयाकडे सादर केला. विभागीय कार्यालयानेही प्रस्तावाची खातरजमा न करता प्रस्ताव कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठवला.

जुलै २०१५ रोजी कृषी आयुक्तांच्याकडे प्रस्ताव दाखल झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने याबाबतचा पाठपुरवा केला. प्रत्यक्षात आयुक्त कार्यालयात प्रस्तावाची तपासणी झाल्यानंतर मंजुरी आदेश आणि प्रस्तावावरील कालावधीमध्ये तफावत असल्याचे स्पष्ट होऊन प्रस्ताव दुरुस्तीसाठी पुन्हा जिल्हा कृषी अधीक्षकांकडे पाठवण्यात आला आहे. आयुक्त कार्यालयानेही सात महिन्यांतर त्रुटी काढल्याने कर्मचारीही आश्चर्यचकीत झाले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सकांपासून दोन्ही कृषी कार्यालयातील लेखाधिकाऱ्यांनी गलथान कारभार केल्याचा फटका संबंधित कर्मचाऱ्याला बसला आहे. सीपीआरमध्ये वैद्यकीय बिले मंजुरीसाठी वर्षभराचा कालावधी लागत असताना वैद्यकीय बिलाचा पुन्हा प्रस्ताव पाठवावा लागणार असल्याने सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना चांगल्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

छाननी न करताच प्रस्ताव

जिल्हा शल्यचिकित्सकांनी मंजुरी आदेश पाठवल्यानंतर लेखाधिकाऱ्यांनी तपासणी करुन प्रस्ताव विभागीय कृषी कार्यालयास पाठवण्याची आवश्यकता होती. मात्र त्यांनी प्रस्तावाची छाननी न करताच तो सादर केल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सात महिन्यानंतर परत आला आहे. ठिबक सिंचनचे अनुदान एकाच व्यक्तीला दोनवेळा वितरीत केले होते. याबाबत त्यांना विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images