Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

डंपरच्या धडकेत युवक ठार

$
0
0

जमावाने पेटविला डंपर; लाठीमाराने जमाव पांगवला


म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी
इचलकरंजी-सांगली रस्त्यावर भरधाव डंपरने दिलेल्या गुरुवारी धडकेत युवक जागीच ठार झाला. संतोष सोपान पोळ (वय २८ रा. सहकारनगर) असे युवकाचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करुन तो पेटवून दिला. ही घटना दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर अपघातस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, संतप्त जमावाने गर्दीतील एकाला डंपरचा चालक समजून बेदम मारहाण केली.


याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सहकारनगर येथील राहणारा संतोष पोळ हा आपला मित्र नितीन बाळू तिवडे याच्यासोबत जयसिंगपूरकडे ग्लॅमर या मोटरसायकलवरुन निघाला होता. इचलकरंजी-सांगली रस्त्यावर पार्वती औद्योगिक वसाहतीसमोर संतोष हा लघुशंकेसाठी थांबला होता. याचवेळी इचलकरंजीहून जयसिंगपूरकडे निघालेल्या डंपर (क्र. एमएच ०७ - २७६) ने संतोष याला जोराची धडक दिली. धडकेनंतर डंपरने संतोषला काही अंतरापर्यंत फरफरट नेले. त्यामुळे संतोष हा जागीच ठार झाला. तर मोटरसायकलसह थांबलेला नितीन तिवडे हा सुदैवाने बचावला. अपघातानंतर डंपर रस्त्याच्या बाजूस असलेल्या चरीत गेला. या अपघाताचे वृत्त तिवडे याने संतोषच्या नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर संतोष याच्या नातेवाईकांसह नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.


संतप्त नागरिकांनी डंपरवर जोरदार दगडफेक केली. तर काही तरुणांनी डिझेलची टाकी उघडून त्याच डिझेलने डंपर पेटवून दिला. या दरम्यान, गर्दीतील स्वप्नील नामक तरुणास डंपरचा चालक असल्याच्या संशयावरुन जमावाने बेदम मारहाण केली. मोबाइलवर फोटो घेणाऱ्यासही मारहाण करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चंदगडचा ३७ लाखांचा आराखडा

$
0
0

संपत पाटील, चंदगड


चंदगड तालुक्यामध्ये निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केली आहे. त्यामुळे मुबलक पाणी पुरवठा होतो. मात्र, यावर्षी दरवर्षीच्या तुलनेच पाऊस कमी झाला असला तरी सद्यस्थितीला चंदगड तालुक्यातील कोणत्याही गावात किंवा वाडीवस्तीवर पाणीटंचाई जाणवत नाही. सध्या नद्यांच्या पाणीपातळीत घट होत असल्याने प्रशासनाने टंचाई आराखडा तयार केलो आहे. २४ गावे व १९ वाड्यावस्त्यांसाठी संभावित ३७ लाख २८ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.


तालुक्यामध्ये ताम्रपर्णी, घटप्रभा नद्या व तलावांना मुबलक पाणी आहे. पाणी पुरवठा विभागाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेवून नवीन विंधन विहीरी, नळपाणी पुरवठा योजना दुरुस्ती, तात्पुरती पाणी पुरवठा योजना व विधन विहीर दुरुस्तीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. राज्याच्या काही भागात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून हा टंचाई आराखडा तयार केला आहे. यासाठी संभावित टंचाई जाणवेल अशा गावातील ग्रामसवेकाकडून ग्रामपंचायतींचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.


या प्रस्तावांचे एकत्रीकरण करुन अंदाजित रकमेसह मुंजुरीसाठी पाठविला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या वतीने ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पहिला, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च दुसरा व एप्रिल, मे व जून तिसरा अशा तीन टप्यात आराखडा तयार केला जातो. तालुक्यात फक्त तिसऱ्या टप्यामध्ये काही प्रमाणात पाणीटंचाई जाणवते. तालुक्यातील काही गावांना जिवंत झऱ्यांच्या माध्यमातून मुबलक पाणी पुरवठा होतो.

तालुक्यामध्ये सार्वजनिक विंधन विहिरी : मिरवेल, विंझणे, तुडये, कागणी, घुल्लेवाडी, मळवीवाडी, कल्याणपूर, वाळकोळी, जक्कनहट्टी.


खासगी विहीरी अधिग्रहण करणे : बोजुर्डी, मोरेवाडी, देवरवाडी, सुंडी, कौलगे, तुडये पैकी महादेवनगर.


नळ पाणी योजना पूर्ण करणे : सुंडी, होसूर, बुक्कीहाळ.


नवीन विंधन विहिरी : वाघोत्रे, लक्कीकट्टे, कोरज, मिरवळे, नामखोल, पारगड, तेऊरवाडी, गुडवळे, किंदळीतळ, बांद्राई, नगरगाव, खळणेकरवाडी, शिंदेवाडी, सातेरीटेक.


योजना दुरुस्ती : शिवनगे, हजगोळी, शिंदेवाडी.


तात्पुरती योजना राबविणे : नागरदळे व चिंचणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस कॉन्स्टेबलला लाच घेताना अटक

$
0
0

हुपरीत लाचलुचपत प्रतिबंधची कारवाई


म. टा. वृत्तसेवा, हुपरी


हुपरी-कागल मार्गावर वडाप रिक्षा वाहतूक करणाऱ्या चालकाकडे कारवाईची भीती घालून ४०० रूपये लाच म्हणून स्वीकारताना हुपरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल धनाजी महादेव पाटील व खासगी एजंट राजेंद्र केशव बोंगार्डे यांना लाचलुचपत विभागाने हुपरी पोलिस ठाण्याच्या बाहेर रंगेहाथ पकडले. गुरूवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हुपरी-कागल मार्गावर वडाप रिक्षा वाहतूक करणाऱ्या एकाकडे हुपरी पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल धनाजी पाटील यांने रिक्षावर कारवाई करण्याची भीती घालून त्याच्याकडून प्रत्येक महिन्याचे ३०० रूपये प्रमाणे दोन महिन्यांची रक्कम देण्याचे सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने सहा जानेवारी रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.


याबाबत लाचलुचपत विभागाच्यावतीने कॉन्स्टेबल धनाजी पाटील याने लाचेच्या मागणीकरण्यासंदर्भात पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदारच्या रिक्षावर कारवाई न करण्यासाठी धनाजी पाटील याने ४०० लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. ती लाच स्वीकारताना धनाजी पाटीलचा पंटर राजेंद्र केशव बोंगार्डे याला हुपरी पोलिस ठाण्याबाहेर रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल धनाजी पाटील याला ताब्यात घेवून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला.


या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक शिरीष देशपांडे, अप्पर पो‌लिस अधीक्षक अर्जुन संगगुंडे, उपाधीक्षक उदय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपधीक्षक श्रीमती पद्मा कदम व पोल‌िस निरीक्षक प्रवीण पाटील, पोल‌िस हावलदार अमर भोसले, मनोज खोत, संदीप गुरव आदींनी या कारवाईमध्ये भाग सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरीत कडकडीत बंद

$
0
0

चांदीत भेसळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी; उत्पादकांची आज बैठक

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

हुपरीत गेल्या काही वर्षांपासून चांदीच्या विटा (पाटले) यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करण्याचे प्रकार वाढत आहेत. कालच अशा प्रकारची घटना उघडीकस आलेने या प्रवृत्तीच्या विरोधात चांदी व्यवसायिकांनी गाव बंद करून रॅली काढत या घटनेचा निषेध नोंदविला. आजच्या बंदला गावातून मोठा प्रतिसाद मिळाला. पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना यावेळी घडली नाही. या घटनेमुळे चांदी व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून या भेसळीमध्ये मोठी टोळी कार्यरत असून या टोळीवर लवकरच गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान वारंवार चांदीमध्ये भेसळ करण्याचा घटनांमध्ये वाढ होत असल्यामुळे चांदी उत्पादक व्यवसायिकांनी अशा भेसळखारोंवर कडक कारवाई व भविष्यात असे प्रकार होवू नयेत यासाठी चांदी कारखानदार असोसिएशनने ठोस निर्णय घेण्यासाठी आज (ता.८) बैठक घेण्यात येणार असून यामध्ये मागील वर्षी चांदीमध्ये भेसळ करणाऱ्या अनेक मोठया उद्योगपती, चांदी उद्योजकांचे नातेवाईक यांच्यावर गुन्हे दाखल न करता छोटया-मोठया भेसळखोरांवर केलेल्या कारवाईमुळे नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

उद्योजकांनी पुकारलेल्या या बंदमुळे हुपरीतील सर्व व्यवहार बंद राहिले. दिवसभर सर्व उद्योजकांनी व्यवहार बंद ठेवले. सर्व व्यवहार बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.हुपरी येथे शेकडो वर्षांपासून परंपरागत चांदी व्यवसाय केला जातो. हुपरीमध्ये तयार झालेले चांदीचे दागिने संपूर्ण देशभर मजूरीवर बनवून देण्याचे काम येथील चांदी उद्योजक करत असतात. पंरतु गेल्या काही वर्षांपासून या चांदी उद्योगाला भेसळीचे ग्रहण लागले असून भेसळीच्या माध्यमातून झटपट लाखो रूपये मिळविण्याचा उद्योग काही अपप्रवृतींच्यामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये चांदीच्या पाटल्यांमध्ये इतर धातूंची भेसळ करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या भेसळीमुळे सर्वसामान्य चांदी उत्पादक (धडी) व्यवसायिक अडचणीत येवून त्यास मोठया आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. तसेच सध्या जागतिक मंदीमुळे चांदीच्या दरामध्ये घसरण चालू असल्यामुळे चांदी उद्योग अडचणीतून जात आहे. अशातच पुन्हा चांदी भेसळीच्या घटना काल उघडकीस आल्या त्यामुळे संतप्त झालेल्या चांदी उत्पादक व्यवसायिकांनी चांदी कारखानदार असोसिएशनमध्ये बैठक घेवून भेसळीच्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी हुपरी बंदची हाक दिली होती. आज दिवसभरात हुपरीकर जनतेने बंदच्या पार्श्वभूमीवर आपले व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला. चांदी उत्पादकांनी गावातून मोटरसायकल रॅली काढून भेसळ करणाऱ्या टोळी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावर्डे बुद्रुकमध्ये शाळा झाली डिजिटल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल


डोंगराळ भागातील विद्यार्थ्याच्या अंगी प्रचंड बुद्धीमत्ता असून मुलांच्या प्रगतीसाठी खेडोपाडी शाळांमधून संगणकीय ज्ञान देवून प्राथमिक पाय मजबूत करणे गरजेचे आहे. विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक,आई, वडील यांच्या बरोबरच गावाचे सहकार्य महत्त्वाचे असते. विद्येच्या मंदिरामध्ये खरा माणूस घडत असतो, त्यामुळे गावातील मंदिराबरोबरच शाळांचाही विकास साधावा, असे प्रतिपादन डाएटचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी व्यक्त केले.


ते सावर्डे बुद्रुक (ता.कागल) येथील प्राथमिक शाळेत उद्योगपती श्रीकांत जिरगे यांच्या मदतीने साकारलेल्या सरस्वती संगणक कक्ष प्रदान कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी चंद्रकात बोडर होते. प्रारंभी डॉ. विलास पाटील व वास्तुविशारद, उद्योगपती श्रीकांत जिरगे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात आव्हाने पेलणारा विद्यार्थी तयार व्हायला हवा या उद्देशाने सध्या मुंबईमध्ये असणारे सावर्डे बुद्रुकचे सुपुत्र वास्तुविशारद व उद्योगपती श्रीकांत जिरगे यांनी प्राथमिक शाळेच्या संगणक कक्षासाठी तीन लाख, ३० हजार रुपये देऊन दातृत्व दाखवत सामाजिक बांधिलकी जोपासली.


यामधून सहा संगणक, डिजीटल सुसज्ज हॉल, इंटरनेट, प्रोजेक्टर, ई-लर्निंग प्रणाली, व्हिडिओ कॉन्फरन्सची सोय, सुस्पष्ट आवाजासाठी माइकसह साऊंड सीस्ट‌िम, शाळेच्या संपूर्ण आवारात सीसीटीव्ही आदी अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त प्रशस्त संगणक कक्ष तयार करण्यात आला आहे. यावेळी श्रीकांत जिरगे व शुभांगी जिरगे यांचा विद्यार्थी व ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी बोलताना जिरगे म्हणाले, प्राथमिक शिक्षण हा पाया आहे. येथूनच विकसित भारताचे स्वप्न साकार करणारी पिढी घडते. ज्या मातीत जन्मलो, त्या मातीचे समाजाचे काही तरी देणे लागतो, त्या ऋणातून उतराई होण्यासाठी गावातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल बनविण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहीन. रतन टाटा यांनी ग्रामीण भागातील शाळेत ई लर्निंग सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देण्याचा संकल्प केला.


कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत बोडर, विस्तार अधिकारी आर. एस. गावडे, ए. बी. पाटील. शुभांगी जिरगे, प्राचार्य एस. आय. पाटील, सरपंच इंद्रजित पाटील, प्रताप पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देहदान चळवळीत सहभागी व्हा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

मृत्युनंतर देह मातीतच मिसळतो. मात्र या देहाचा सदुपयोग व्हावा व समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून देहदानाची संकल्पना समाजात रुजत आहे. देहदान चळवळीत सहभाग घेऊन देहाचे सोने करण्यासाठी देहदान करा, असे आवाहन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शरीररचना शास्त्र विभागप्रमुख डॉ. रजनी जोशी यांनी केले.


येथील अनुराधा गोकाककर यांच्या स्मृतीदिनानिमित्त सुरु झालेल्या देहदान चळवळीच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी गडहिंग्लजमधून दुसरे देहदान करणाऱ्या कै. प्रभाकर शहा यांच्या कुटुंबियांचा डॉ. जोशी यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पालिकेच्या शाहू सभाग्रहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. श्रीपतराव शिंदे होते.


डॉ. जोशी म्हणाल्या, गडहिंग्लज सारख्या ठिकाणी देहदानासारखी चळवळ सुरु आहे याचे विशेष कौतुक वाटते. भावी डॉक्टर्सना शरीररचना अभ्यासासाठी देहाची आवश्यकता असते. देहदान प्रक्रियेतील सर्व माहिती गोपनीय ठेवण्यात येते असेही त्या म्हणाल्या. अॅड. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी देहदान संकल्प केलेल्या रामचंद्र खोराटे, मारुती चोथे, तानूबाई चौगुले, केरबा पाटील, तुकाराम पाटील यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुमारे तीस इच्छुकांनी देहदान संकल्पपत्र भरून दिले.


कार्यक्रमास डॉ. सुरेश संकेश्वरी, प्रवीण शहा, मीना शहा, अनघा गोकाककर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पुस्तके समाजभान देतात’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

आजच्या तंत्रज्ञान युगात वाचनसंस्कृती लोप पावत आहे. त्यामुळे एकूणच सामाजिक आकलन कमी होत आहे. अशा काळात वाचन कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून जर चांगली पुस्तके वाचायला मिळाली तर त्यातून आपले समाजभान विकसित होईल असा विश्वास जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी व्यक्त केला.


येथील डॉ.घाळी महाविद्यालयांच्या मराठी विभागामार्फत आयोजित वाचन कट्टा या उपक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी ते बोलत होते. वाचनकट्टा बहुद्देशीय संस्था (कोल्हापूर), एम. एन. कोल्हापुरे ग्रंथालय व ग्रंथ कॉर्नर प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तहसीलदार हनुमंतराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.सतीश घाळी अध्यक्षस्थानी होते.


तहसीलदार पाटील यांनी वाचनाचे महत्त्व आणि आयुष्यात वाचनाने कसे घडविले याबद्दल मनोगत व्यक्त केले. वाचन कट्टा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष युवराज कदम यांनी चळवळीबद्दल माहिती दिली. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात श्रुती पाटील हिने 'पालावरच जग' धनश्री माळी हिने 'विसविशीत जगण्याच्या उंबरठ्यावरून', कोमल नेवडे हिने 'श्रीमान योगी' व भाग्यश्री शिंदे हिने 'कोल्हाट्याच पोर' या पुस्तकांची मांडणी केली. कार्यक्रमास ग्रंथ कॉर्नरचे सुभाष पाटील, संस्थेचे पदाधिकारी आय. जी. फुटाणे, प्राचार्य एस. आर. पाटील, प्रा. अनिल उंदरे, डॉ. रमेश तिबिले, डॉ. शशिकांत संघराज, प्रा. शिवाजी भुकेले, प्रा. सरला आरबोळे आदींसह प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. दत्ता पाटील यांनी स्वागत केले. प्रा. नीलेश शेळके यांनी परिचय करून दिला. प्रा. बसवराज मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल राजेंद्र सावेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दत्त’च्या ऊस पीक स्पर्धेत पाटील प्रथम

$
0
0

ठिबकद्वारे एकरी घेतले १२६ टन उत्पादन

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या सन २०१४-१५ मधील ऊस पीक स्पर्धेत एकरी १२६ टन उत्पादन घेवून कागवाड येथील जोतीकुमार सिदगोंडा पाटील यांनी (प्रथम) क्रमांक पटकाविला. ११३ टन उत्पादन घेवून चंदूरच्या चंद्रकला बाळासो पाटील (व्दितीय), तर १०९ टन ऊस उत्पादन घेवून शेडबाळच्या सूरगोंडा रायगोंडा पाटील यांनी (तृतीय) क्रमांक मिळविला.


दत्त साखर कारखान्यात झालेल्या कार्यक्रमात विजेत्यांना अनुक्रमे एक लाख व ६० हजार रूपयांचे बक्षीस चेअरमन गणपतराव पाटील, व्हाइस चेअरमन सिदगोंडा पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञ डॉ. डी. डी. पवार म्हणाले, पिकांना ठिबक सिंचनाद्वारे पाण्याबरोबरच खते व औषधेही दिली पाहिजेत. यामुळे वीज, पाणी, मजुरी, खत यांची बचत होते. ठिबक सिंचन योजना प्रभावीपणे राबविल्यास उत्पादन विक्रमी होईल. बदलत्या काळात कमी क्षेत्रात अधिकाधिक ऊस उत्पादन घेतले पाहिजे. राज्यात पाण्याची उपलब्धता आहे, मात्र त्याचा योग्य वापर होत नाही. शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्याची पद्धत बदलली पाहिजे. पिकांना ठिबकद्वारे पाणी देण्याबरोबरच पिकात पाचटाचे आच्छादन केल्यास उत्पादनात वाढ होईल.


डॉ. बाळकृष्ण जमदग्नी म्हणाले, एकरी १५५ टन ऊस उत्पादन घेणे शक्य आहे. दुष्काळग्रस्त स्थितीत शेतकऱ्यांनी ऊस पिकास पाचटाचे आच्छादन करावे.


चेअरमन गणपतराव पाटील म्हणाले, दत्त साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांनी विक्रमी ऊस उत्पादन घेवून राज्यात आदर्श निर्माण केला आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी दत्त साखर कारखाना नवनवे तंत्रज्ञान त्यांच्या बांधापर्यंत पोहाचवेल.


यावेळी बाळासाहेब कतगर, अशोक केरीपाळे, सरदार बोरगे, राजेंद्र ऐनापुरे, कुबेर वाडकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, अरूण देशमुख, रमाकांत गोळे, विजय माळी, सुनील पाटील यांनी ठिबक सिंचन पद्धतीची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सभापती-अधिकाऱ्यांत वाद

$
0
0

आजरा पं. स. सभेतील प्रकार; अधिकाऱ्याला सभेतून हाकलले

म. टा. वृत्तसेवा, आजरा


पंचायत समिती कार्यालयातील नेहमीची अनुपस्थिती, प्रतिनियुक्ती स्थळीही अनुपस्थिती आणि याबाबत विचारणा केल्यानंतरच्या उद्धट व अरेरावी वर्तनामुळे संतापलेल्या सभापती विष्णू केसरकर यांनी येथील सहायक गटविकास अधिकारी शरद भोसले यांना सभागृहातून अक्षरश: हाकलून दिले. जोपर्यंत भोसले कार्यालय क्षेत्रामध्ये रहात नाहीत तोपर्यंत त्यांचा पगार व घरभाडे भत्ता रोखण्याचा ठराव घेण्यात आला. या कार्यवाहीबाबत उपसभापती दीपक देसाईंसह सर्व सदस्यांनीही सभापतींच्या या ठरावाला संमती दिली. आजरा पंचायत समितीच्या इतिहासात कोणाही अधिकाऱ्यास विशेषत: बीडीओ दर्जाच्या अधिकाऱ्यावर अशा प्रकारची वेळ येण्याचा हा पहिलाच प्रसंग होता.
सभापतींच्या या आदेशामुळे भोसले यांनी सभागृह सोडले. सभेच्या प्रारंभीच घडलेल्या या प्रकाराने सारे सभागृहच अवाक झाले. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती केसरकर होते.


या पंचायत समितीच्या गेल्या अनेक सभांमधून विविध विभागप्रमुखांच्या गैरहजेरीचा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता. येथील दोन विस्तार अधिकाऱ्यांपैकी एक अनुपस्थित होते. त्याबाबतची विचारणा सुरू असतानाच भोसले यांच्यावरही अनुपस्थिती व कामचुकारपणाबाबत विचारणा केली. त्यावेळी भोसले यांनी पुराव्याची मागणी केली. सभापती व उपसभापती याबाबत केलेल्या पाहणीच्या तारखा व वेळेच्या नोंदी असल्याचे सांगूनही भोसलेंनी आवाज वाढवत विचारणा केली. त्यामुळे संतापलेल्या केसरकर यांनी त्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. कार्यालयातील अनुपस्थितीमुळे ग्रामस्थांची कामेच होत नाहीत. ग्रामपंचायतींच्या पाहणीची कामे रेंगाळली आहेत. या परिस्थितीत पदाधिकाऱ्यांनी कामे करायची काय, असा सवाल करीत मग तुम्ही फक्त सह्या करून पगार उचलण्यासाठी व स्वत:ची खासगीतील कामे करण्यासाठीच येथे आहात का? अशी संतप्त विचारणा करीत हेडक्वार्टरला रहायला येत नाही तोपर्यंत पगार व भत्ते बंद करण्याचा ठराव करण्यात आला.


मंगळवारी रात्री राज्य पिरवहनच्या वाहतूक नियंत्रकास मारहाण झाल्याच्या घटनेबाबत विचारणा झाली. किटवडे बसफेरी ऐनवेळी रद्द केल्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी ही मारहाण केल्याचे सांगितले. तालुक्यातील निर्लेखन जालेल्या शासकीय इमारतींच्या पुढील कार्यवाहीबाबत गतिमानता नसते. प्रस्ताव पाठवून अधिकारी जबाबदारी संपल्याप्रमाणे वागतात. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीपर्यंत असे प्रस्ताव पोहोचल्याशिवाय कार्यवाही होत नसते. याची जाणीव ठेवण्याबाबत बांधकामसह संबंधित विभागांना सुनावण्यात आले. सदस्य कामिना पाटील, अनिता नाईक, तुळशीराम कांबळे व निर्मला व्हनबट्टे यांनी चर्चेत सहभाग घेतला. गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांनी प्रशासन सांभाळले.


'प्रोटोकॉल'वरून बीडीओही धारेवर

१४ व्या वित्त आयोगाच्या अनुषंगाने पंचायत समितीमध्ये घेतलेल्या बैठकीला सभापती व उपसभापतींना निमंत्रण दिले नसल्याच्या कारणामुळे सभापती कसरकर संतापले होते. पंचायत प्रशासनाचे लोकप्रतिनिधी या नात्याने प्रमुख असलेल्यांना डावलून येथील प्रशासनाने काय साध्य केले, असा प्रश्न उपस्थित केला व येथील बैठकांबाबतचे साधे प्रोटोकॉलही पाळता येत नाहीत काय, अशी विचारणा करीत गटविकास अधिकारी ए. डी. कांबळे यांनाही केसरकर यांनी धारेवर धरले.

नव्या इमारतीत दुर्गंधीचे साम्राज्य


पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे बांधकाम दोन वर्षापूर्वी झाले आहे. पण आतील अनेक दालनांमधील प्रसाधनगृहांचे काम निकृष्ट झाले आहे. यासाठी वापरण्यात आलेले पाईप्स व भांडी डागाळलेली आहेत. यामुळे सभापती-उपसभापतींच्या दालनामध्येही दुर्गंधीचे साम्राज्य आहे. याबाबतची कामे संबंधीत कंत्राटदाराकडून व प्लंबरकडून करून घेणे गरजेचे असतानाही बांधकाम विभाग गंभीर नाही. पैसे खिशातील वापरल्यासारखे अधिकारी वागण्यामागील कारण समजत नाही. याबाबत नुसती चर्चेची गुऱ्हाळे सुरू आहेत. तातडीने ही कामे करून घ्या, अन्यथा दगड घालून भांडी व पाईप्स फोडण्यात येतील. असा इशारा सभापतींनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवमाध्यमांमुळे आव्हाने वाढली

$
0
0

डॉ. सुधीर गव्हाणे यांचे प्रतिपादन


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर


'नवमाध्यमांमुळे पत्रकारितेपुढील आव्हाने वाढली आहेत. त्यासह पारंपरिक माध्यमांचा आकृतीबंधही बदलावा लागणार आहे. सद्यस्थितीत नागरिकच समाजमाध्यमांतून ब्रेकिंग न्यूज देत आहेत. यामुळे पत्रकारितेचे स्वरुप गतीने बदलत आहे,' असे प्रतिपादन डॉ.सुधीर गव्हाणे यांनी येथे केले. शिवाजी विद्यापीठाचा वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभाग, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय आणि वारणा महाविद्यालय, ऐतवडे खुर्द यांच्यातर्फे आयोजित पत्रकार दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर होते.


डॉ. गव्हाणे म्हणाले, 'डिजीटल युगामध्ये पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी नवी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे. काळाबरोबर माध्यमे वेगाने बदलत आहेत. मनोरंजन व माध्यम क्षेत्र विस्तारत असताना सकस पत्रकारिता मात्र हरवत असल्याचे चित्र आहे. अतिव्यापारीकरणामुळे बातमीच्या मुखवट्यांनी माध्यमांमध्ये जाहिराती येण्याने पत्रकारितेला धोका निर्माण झाला आहे. बातम्यांमध्ये अचूक समतोल साधणे गरजेचे आहे. सध्या २० टक्के लोक इंटरनेट वापरतात. भारतात ५० कोटी मध्यमवर्ग असून तो ७० कोटींवर जाण्याची शक्यता आहे. त्याचा भारतामध्ये डिजीटल साक्षरता वाढण्यास निश्चित मदत होईल.'


कोरियामधील 'ओह माय न्यूज' या वृत्तपत्राचे उदाहरण देऊन डॉ. गव्हाणे म्हणाले, 'या वृत्तपत्रातील २६ हजार वार्ताहर हे सिटीझन जर्नालिस्ट आहेत. डिजीटल माध्यमे ही कुठेही, कधीही अन् केव्हाही सर्वांसाठी उपलब्ध असल्याने डिजीटल साक्षरता वाढत आहे. पाहणी व विविध अहवालांचा आधार घेऊन डाटा जर्नालिझमच्या माध्यमातून सक्षम पत्रकारिता सद्यस्थितीत अपेक्षित आहे.'


यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. गव्हाणे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रताप पाटील, माहिती अधिकारी एस.आर. माने, माजी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले.


डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. श्रीहरी देशपांडे, प्रा. सुलोचना श्रीधर तसेच महावीर महाविद्यालय व वारणा महाविद्यालयाच्या पत्रकारिता विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. विभाग प्रमुख डॉ. निशा पवार यांनी प्रास्ताविक केले. जयश्री देसाई, शीतल माने यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद ठाकूर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवीस हजार जणांनी सोडली गॅस सबसिडी

$
0
0

'गिव्ह इट अप' योजनेला जिल्ह्यात ग्राहकांचा प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर


जिल्ह्यातील एकूण साडेसात लाख ग्राहकांपैकी २५ हजार ग्राहकांनी गॅस अनुदान नाकारले आहे. गेल्या नऊ महिन्यात सिलिंडरच्या दरात चढ-उतार झाले असून डिसेंबरनंतर दरात प्रचंड वाढ झाली. याचा फटका नव्या वर्षात गृहिणींच्या बजेटवर झाला आहे. नुकतीच विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी ५० रुपये जादा वाढ झाली आहे.


गेल्या काही महिन्यांत तिसऱ्यांदा घरगुती विनाअनुदानित गॅस सिलिंडरचे दर वाढवले आहेत. ज्या ग्राहकांना अनुदान मिळते त्यांनाही सिलिंडर खरेदी करताना विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीनेच खरेदी करावी लागते. अनुदानाची रक्कम नंतर बँक खात्यात जमा होते. त्यामुळे सामान्य ग्राहकांना वाढीव दरानेच सिलिंडर खरेदी करावा लागणार आहे.

जिल्ह्यात एकूण साडेआठ लाख सिलिंडर ग्राहक आहेत. त्यापैकी एक लाखांपर्यंतच्या ग्राहकांचे कनेक्शन बंद केले आहे. सबसीडी देण्यास सुरूवात झाल्यानंतर आतापर्यं‌त जिल्ह्यातील २५ हजार ग्राहकांनी अनुदान नको म्हणून अर्ज केला आहे. सिलिंडरची मूळ किंमत ४७३ रूपये इतकी असून कर आणि एलबीटी आकारली जाते. गेल्या वर्षभरात जूननंतर दर उतरत गेले आणि डिसेंबर-जानेवारीत दराने उच्चांक गाठला आहे.

वर्षभरातील सिलिंडरचे दर
जानेवारी - ४६६
फेब्रुवारी ४६८, ६५५.५०
मार्च ४७१.५०, ६६१
एप्रिलपासून सबसीडी लागू
एप्रिल - ६६१ रूपये
मे - ६६४
जून - ६७५
जुलै - ६५८.५०
ऑगस्ट - ६३३
सप्टेंबर - ६०५.५०
ऑक्टोंबर - ५५९
नोव्हेंबर - ५८९
डिसेंबर - ६५६
जानेवारी २०१६ - ७१०


सिलिंडर ग्राहकांची एकूण संख्या
७ लाख ५० हजार
बंद करण्यात आलेल्या ग्राहकांची संख्या
१ लाख
अनुदानित ग्राहकांची संख्या
७ लाख २५ हजार
विनाअुनदानित (गिव्ह इट अप)
ग्राहकांची संख्या
२५ हजार
दोन गॅस जोडणी धारक
३ लाख ०६ हजार ९१७
एक गॅस जोडणी धारक
२ लाख ५५ हजार ७०३


कोल्हापुरात साडेसात लाख सिलिंडर ग्राहक असून त्यापैकी २५ हजार ग्राहकांनी अनुदानाचे गिव्ह इट अप केले आहे. सबसीडीशिवाय जादा सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना आणि विनाअनुदानित ग्राहकांना ५० रूपये जादा आकारून सिलिंडर खरेदी करावे लागणार आहे.
- विवेक आगवणे , जिल्हा पुरवठा अधिकारी

वर्षभरात सिलिंडर दरात प्रचंड वाढ झाली आहे. गेल्यावर्षी सिलिंडर साडेचारशे रूपयांनी खरेदी केलेले यंदा ७१० रूपयांनी खरेदी करावे लागत आहे. सरकार आवश्यक वस्तूंचे दर कमी करण्याऐवजी वाढ‌वत आहे. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडत आहे.
- सुजाता काटकर, कोल्हापूर

एक सिलिंडर महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी प्रयत्न केला जातो. वर्षभरात दहा सिलिंडर पुरवठा पडत नसल्याने जादा सिलिंडर घेताना जादा किंमत मोजावी लागते. कर आणि एलबीटी आकारणी ग्राहकांच्या माथ्यावर मारली जात असल्यामुळे सिलिंडरसाठी अधिक पैसे मोजावे लागतात.
- पूनम कदम, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावड्यात अतिक्रमणांवर हातोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा परिसर, इंदिरानगर झोपडपट्टी व कदमवाडी परिसरातील अनधिकृत बांधकाम, पत्र्याच्या शेडवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. ताराराणी विभागीय मार्केट कार्यालय आ​णि अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्तरीत्या मोहीम राबविताना बेकायदेशीर बांधकाम हटविले.


इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात नऊ मीटर रस्त्यावर लाकडी व पत्र्याचे शेड उभारले होते. जेसीबीच्या सहाय्याने या भागातील अतिक्रमण काढण्यात आले. तसेच ई वॉर्डातील रिसनं २/क या भूखंडावरील अंतिम रेखाकनातील खुली जागा व डीपी रस्त्यावर दिनकर पाटील यांनी अनधिकृत वीट बांधकाम केले होते. तसेच पत्र्याचे शेड उभारले होते. संबंधित मालकाला बांधकाम काढण्यासंदर्भात नोटीस दिली होती. प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.


कसबा बावडा परिसरातील रिसनं ५५१ येथे तात्पुरत्या रेखांकनामध्ये विनापरवाना बांधकाम करण्यात आले होते. संबंधित विकसकाला अनधिकृत बांधकाम हटविण्याची नोटीस काढली होती. विकसक व भूखंडधारकांनी नियमानुसार बांधकाम निय​मित करून घेत असल्याचे लेखी म्हणणे मांडले. उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, बाबूराव दबडे, एम. जी. फुलारी, सुरेश पाटील, मीरा नगिमे यांनी कारवाईच्या मोहिमेत सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दमसा’ संमेलनानिमित्त आज ग्रंथदिंडी

$
0
0

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या कोल्हापुरात होणाऱ्या २७ व्या साहित्य संमेलनानिमित्त शुक्रवारी (ता. ८) ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ९ व १० जानेवारीला संमेलन होणार आहे. ग्रंथदिंडीला दुपारी तीन वाजता महाराष्ट्र हायस्कूल येथून सुरुवात होणार असून, शहरातील २५ शाळांमधील तीन हजार विद्यार्थी दिंडीत सहभागी होणार आहेत. शिक्षण विभाग, मुख्याध्यापक संघ आणि कोल्हापूर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षक संघटनेच्या सहकार्याने ही ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. महाद्वार रोड, पापाची तिकटी, लुगडी ओळमार्गे बिंदू चौकात दिंडी विसर्जित होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रॉपर्टी एक्स्पो उद्यापासून

$
0
0

कोल्हापुरात 'टाइम्स ऑफ इंडिया'तर्फे दोन दिवसांचा महामेळा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुण्यातील विविध प्रकारच्या गृहप्रकल्पांची माहिती कोल्हापुरात उपलब्ध करून देण्यासाठी टाइम्स ऑफ इंडियाने शनिवारी (ता.९) व रविवारी (ता.१०) 'टाइम्स इन्व्हेस्टमेंट फेस्टिव्हल प्रॉपर्टी एक्स्पो'चे आयोजन केले आहे. एक्स्पोची सुरुवात शनिवारी होणार असून, ताराबाई पार्कमधील धैर्यप्रसाद हॉलमध्ये रविवारीही सकाळी साडेदहा ते रात्री आठपर्यंत सुरू राहणार आहे.

विविध प्रकारच्या घरांची मागणी असणाऱ्यांसाठी एक्स्पोमधून एकाच छताखाली संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 'टाइम्स इन्व्हेस्टमेंट फेस्टिव्हल प्रॉपर्टी एक्स्पो'मध्ये महत्त्वाचे ४० डेव्हलपर्स व बिल्डर्स सहभागी होणार आहेत. ते आपले पुण्यातील ३०० हून अधिक गृहप्रकल्प एक्स्पोमध्ये मांडणार आहेत. हे प्रदर्शन पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी फार उपयोगाचे ठरणार आहे. ११ लाखांपासून ३ कोटी रुपयांपर्यंतच्या घरांची माहिती या एक्स्पोमध्ये मिळणार आहे. त्यामुळे घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध पर्याय एक्स्पोमध्ये उपलब्ध आहेत. एक्स्पोमध्ये सहभागी होणाऱ्या डेव्हलपर्स व बिल्डर्सकडून मोफत नोंदणी, स्टँप ड्यूटी, व्हॅट, सेवाकर यासह विविध आकर्षक योजनाही ग्राहकांसाठी देण्यात येणार आहेत. एक्स्पोमध्ये पुणे शहरातील विविध गृहप्रकल्पांची माहिती देण्यात येणार असल्याने ग्राहकांना विविध पर्यायांमधून आवडीचे घर निवडता येणार आहे.


लक्झरी ऑटो पॅव्हेलियन

एक्स्पोच्या निमित्ताने लक्झरी ऑटो पॅव्हेलियनचे आयोजन केले आहे. जग्वार, लँड रोव्हर या लक्झरियस कारबरोबर हार्ले डेव्हीडसन या तरुणाईचे खास आकर्षण असलेली दुचाकी एक्स्पोमध्ये प्रेझेंट करण्यात येणार आहेत.

एक्स्पोतील सहभागी...

अतुल एंटरप्रायझेस, बी. यू. भंडारी लँडमार्क, बेलवकर हाउसिंग कंपनी, डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लि., फ्युचर डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन कंपनी, गार्डियन डेव्हलपर्स, हॉरिझन शेल्टर्स, कांचन डेव्हलपर्स, कोहिनूर ग्रुप, कूल होम्स डेव्हलपर्स, महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लि., एमआरव्ही रिअॅलिटी, नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा. लि., ओम डेव्हलपर्स, परांजपे स्किम कन्स्ट्रक्शन लि., पेठकर प्रोजेक्टस, पुराणिक बिल्डर्स, रोहन बिल्डर्स प्रा. लि., सिद्धीविनायक ग्रुप्स, स्टार्क रिलेटर्स, समेरू बिल्डकॉन प्रा. लि., वसुधा लँडमार्क प्रा. लि., व्हीटीपी ग्रुप, विंडसर शेल्टर्स, झर्बिया डेव्हलपर्स या एक्स्पोमध्ये सहभागी होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या वर्षात वीकेंडची धूम

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल


नुकतेच सुरु झालेले २०१६ हे नवीन वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्या घेऊन आले आहे, तर तब्बल ९५ सुट्या या वर्षात मिळणार आहेत. २५ वर्षानंतर पुन्हा एकदा असा योग आला आहे.

डिसेंबर महिन्याचा शेवटचा टप्पा सुरु झाला की सर्वांनाच नवीन वर्षाचे वेध लागतात. नवीन वर्षाच्या विविध प्राकरच्या अणि कंपन्यांच्या दिनदर्शिकाही बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. येणारे नवीन वर्ष हे सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्यांची पर्वणी देणारे असून बरीच सणावारांची वैशिष्ट्ये घेवून आले आहे. सरत्या वर्षात दोन ते तीन वेळा आलेला अंगारकी संकष्टीचा योग या वर्षातच आलेलाच नाही.

याशिवाय नव्या वर्षात अनेक सुट्यांचा दिवस रविवारला जोडून आल्याने नोकरदार आणि सरकारी बाबूंना वर्ष चांगलेच जाणार आहे. यामुळे तब्बल सात दिवस लाँग वीकेंन्ड मिळणार आहे. नव्या वर्षात सणवार, महापुरुष जयंती, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन आणि हक्काचा व आवडीचा रविवार मिळून ९५ सुट्या मिळणार असल्याने काहीजणांनी आतापासूनच प्लॅनिंगला सुरवातही केली आहे. जोडून येणाऱ्या सुट्या आणि सणवार यांची मोजणी आतापासूनच सुरू झाली आहे.

या वर्षभरात बँकेत काम करणाऱ्यांना १२ आणि २४ तारीख तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी १४ आणि १५ तारीख आवडती ठरणार आहे. १२ मार्च आणि १२ नोव्हेंबरला दुसरा शनिवार असल्याने बँकांना सुटी आहे. तर १२ सप्टेंबर रोजी बकरी ईद आणि १२ डिसेंबरला ईद ए मिलादची सुटी आहे. १२ ऑक्टोबरला मोहरम आणि १२ नोव्हेंबरला रविवार, तर शालेय विद्यार्थ्यांना १५ जानेवारीला संक्रांत आणि १५ एप्रिलला रामनवमी शुक्रवारीच आहे.

१५ मे रविवार आणि १५ ऑगष्टला स्वातंत्र्यदिन आणि शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनलाच आहे. १४ नोव्हेंबर बालदिन आणि १४ मे आणि १४ जून रविवारी आले आहेत.


१९८८ च्या कॅलेंडरशी साम्य

१९८८ आणि २०१६ चे कॅलेंडर एकसारखेच आले आहे. २०१६ या वर्षातील प्रत्येक तारीख आणि वार १९८८ च्या तारीख आणि वाराशी साधर्म्य ठेवणारी आहे. याआधी २० व्या शतकाच्या बाबतीतही असेच योग पहावयास मिळाले. १९०४,१९३२,१९६० या वर्षांतील कॅलेंडर २०१६ प्रमाणेच होते. तसेच २०४४ आणि २०७२ या वर्षांतील कॅलेंडर समान असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जवसुलीसाठी सोमवारी गांधीगिरी

$
0
0

थकबाकीदारांच्या दारात वाजवणार सनई-चौघडा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा बँकेची थकबाकी वसूल करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ आणि संचालक मंडळाने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. एक कोटी रुपयांवरील थकबाकीदारांपैकी पहिल्या चार थकबाकीदारांच्या घरासमोर सोमवारी (ता. ११) बँकेचे कर्मचारी आणि संचालक मंडळ सनई-चौघडा वाजवून आंदोलन करणार आहेत.

एक कोटीवर थकबाकी असलेल्या कर्जदारांना पहिल्या टप्प्यात लक्ष्य केले असून, यातील पहिल्या चार कर्जदारांच्या घरासमोर जाऊन सनई-चौघडे वाजवून त्यांना कर्ज भरण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी बँकेचे काही कर्मचारी आणि संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.


पहिल्या चार थकबाकीदारांत उदयसिंगराव गायकवाड साखर कारखान्याकडे ४६ कोटी १५ लाख, कोल्हापूर जिल्हा बीजोत्पादक संघाकडे ६ कोटी ५७ लाख, तांबाळे साखर कारखान्याकडे ९ कोटी ४० लाख आणि शेतकरी सहकारी तंबाखू संघ उद्योग समूहाकडे ३८ कोटी ८१ लखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांच्या यादीतील या पहिल्या कर्जदारांकडे पहिल्या टप्प्यात सोमवारी गांधीगिरी पद्धतीने वसुली पथक जाणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.

सरकारी कारवाईनंतरही वसुली सुरूच राहणार

नवीन सहकार कायद्यानुसार बँकेच्या नुकसानीस जबाबदार धरून संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या कायद्यानुसार विद्यमान अध्यक्षांवर कारवाई झालीच तर बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कर्जवसुली सुरूच राहील. राज्य सरकारच्या कारवाईनंतर मी पदावर नसलो तरी बँकेच्या कर्जवसुलीसाठी उपस्थित राहीन, असे बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपुरात ऑनर किलिंग

$
0
0

नगराध्यक्षांच्या मुलीची तक्रार

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

ऑनर किलिंगच्या हेतूने आपल्या पतीचा खून करण्यात आला, अशी तक्रार नगराध्यक्षांच्या मुलीने केली आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना कोर्टाने गुरुवारी १२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

सोमनाथ टाकणे यांचा बुधवारी रात्री तलवारी आणि इतर धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांची पत्नी सौदामिनी या पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या कन्या आहेत. पहिला विवाह झाला असतानाही सोमनाथ यांनी अडीच वर्षांपूर्वी सौदामिनी यांच्याशी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. वर्षभर भोसले यांच्या भीतीने शहराबाहेर राहून काही महिन्यांपूर्वी हे दाम्पत्य पुन्हा पंढरपूर शहरात राहण्यास आले होते. आपल्या जीवास धोका असल्याची तक्रार सोमनाथ याने पोलिसांना दिली होती. त्यानुसार त्याच्या सोबत पोलिस देण्यात आले होते, पण काही दिवसांपूर्वी त्याने आपल्यास आता संरक्षणाची गरज नसल्याचे लेखी दिल्याने त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

सोमनाथ, सौदामिनी आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा बुधवारी रात्री दवाखान्यातून घरी परतत असताना रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान १० ते १२ जणांनी भादुले चौकात त्यांना घेरले. सोमनाथ यांच्या डोळ्यांत चटणीपूड टाकून त्यांच्यावर वार करून त्यांचा खून करण्यात आला. यावेळी त्याची पत्नी मुलाला बाजूला काढण्यात आले होते.

हल्ल्यात सोमनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. सौदामिनी यांनी आपल्या माहेरच्या भोसले कुटुंबातील १३ जणांविरोधात इन कॅमेरा तक्रार दाखल करताना आपल्या प्रेम विवाहामुळे हा खून झाल्याचे सांगितले आहे. जबाबत सौदामिनी यांनी वडील नागेश भोसले यांच्यासह इतर कुटुंबातील लोकांची नावे घेतली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणा मिनरल्स नावाच्या दोन कंपन्या हायकोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई येथील वादग्रस्त उत्खनन प्रकरणातील खटल्याला आज, शुक्रवारी हायकोर्टात वेगळेच वळण लागले. वारणा मिनरल पार्टनरशिप फर्म या कंपनीने उत्खननासाठी परवाने मिळाल्याचा दावा केला आणि यापूर्वी वारणा मिनरल इंडिया प्रा. लि. ने केलेल्या कामावर आक्षेप घेतला. याप्रकरणी हायकोर्टाने स्पष्टीकरण मागविले असून, १५ जानेवारीला पुढील सुनावणी होईल. तोपर्यंत उत्खननावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.

न्यायाधीश ए. एस. ओका आणि सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठापुढे सुरू असलेल्या सुनावणीत आज पहिल्यांदा वारणा मिनरल्स पार्टनरशिप फर्म ही कंपनी कोर्टात पुढे आली. उत्खननासाठीच्या सर्व सरकारी कागदपत्रांची पूर्तता आम्ही केली आहे. मात्र, वारणा मिनरल्स इंडिया प्रा. लि.ने तेथे उत्खनन सुरू केल्याचा आरोप वारणा मिनरल्स पार्टनरशिप फर्मने केला. ऑक्टोबर २०१४ मध्ये वारणा मिनरल्स इंडिया प्रा. लि. कंपनीने उत्खननासाठी कायदेशीर संरक्षण मिळावे म्हणून हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र, वन विभागाने या उत्खननास आक्षेप घेतला होता. दरम्यान, महसूल खात्याने जागा त्यांच्या विभागाची असल्याचा दावा करत उत्खननास परवानगी दिली. मात्र, नोव्हेंबरमध्ये सरकारने एक बैठक बोलावून संबंधित जागा वन खात्याची असल्याचे जाहीर केले. मुंबईतील बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार उपस्थित होते. सहायक सरकारी वकील ए. आय. पटेल यांनी सरकारची भूमिका कोर्टात मांडली. त्यामुळे कोर्टाने तेथील उत्खननास स्थगिती दिली. मात्र, जागा महसूल विभागाची असल्याचे पवार यांचे प्रतिज्ञापत्र कंपनीच्या वकिलांनी कोर्टात सादर केले. यासंदर्भात जिल्हाधिकारी अमित सैनी यांना विचारले असता, ते म्हणाले, 'अजित पवार यांनी १७ तारखेस प्रतिज्ञापत्र अधिकृत केले. त्यानंतर १८ डिसेंबरला ते सहायक वकिलांकडे पाठविले. नंतर त्यांनी १९ डिसेंबरला ते प्रतिज्ञापत्र वारणा मिनरल्सला दिले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवती आत्महत्येप्रकरणी पाच मैत्रिणींवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाविद्यालयीन युवतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच मैत्रिणींसह नऊ जणांविरूध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. स्मिता उत्तम खांडेकर (वय १७, रा. गयागाव महूत, ता. सांगोला, जि. सोलापूर) या बारावीत शिकणाऱ्या युवतीने सोमवारी नागाळा पार्क येथील हळदणकर बंगल्यात आत्महत्या केली होती.

विजय नरळे (रा. नरळेवाडी), राजाराम आलदर (रा. गळेवाडी चौकी, ता. सांगोला), अशोक नरळे (रा. गाय चव्हाण), अशोक नरळे (रा. लक्ष्मीनगर) या सांगोला तालुक्यातील चारजणांसह पाच अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल झाला आहे.

स्मिताने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली होती. मैत्रिणींच्या टोमण्यामुळे आत्महत्या केली असल्याचे स्मिताने लिहीले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला होता. स्मिताची आई कमल उत्तम खांडेकर यांनी फिर्याद दिली आहे. स्मिताचा कोल्हापुरातील एक मित्र होता. या मित्रांवरून तिच्या मैत्रिणी तिला सतत टोमणे मारत. हळदणकर बंगल्यात स्मितासह तिच्या गावाकडील मैत्रिणी राहत होत्या.

स्मिता अतिशय हुशार असल्याने मित्रासमवेत फिरण्यामुळे तिचे अभ्यासावरील लक्ष उडाले,, असावे अशी शंका तिच्या मैत्रिणींना येत होती. त्यांनी स्मिताच्या मित्राची माहिती पालकांना दिली. मैत्रिणींच्या पालकांनी स्मिताच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. वडिलांनी स्मिताला मित्राबद्दल जाब विचारल्याने ती चिडून होती. त्यात तिच्या मैत्रिणींनी तिच्या कोल्हापुरात शिकणाऱ्या भावालाही तिच्या मित्राची माहिती दिली. घरच्यांकडून होणारी विचारणा व मैत्रिणींच्या टोमण्यामुळे आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळला अधिकारी-कर्मचारी धारेवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ येथे तब्बल नऊ वर्षांनी आमसभा झाली. या सभेत नागरिकांनी पंचगंगा प्रदूषण, क्षारपड जमीन, विनापरवाना वाळू उपसा, रस्त्यांची दुरावस्था, रखडलेल्या पेयजल योजना, पीक आणेवारी या प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरकारी काम अन् सहा महिने थांब अशी अनुभूती नागरिकांना येत आहे. यामुळे जनतेचे सेवक असणाऱ्या अधिकाऱ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी तहसीलदारांनी कार्यशाळा घ्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी दिली.

पंचायत समितीच्या सभागृहात आमदार उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही २० वी आमसभा झाली. यावेळी तहसीलदार सचिन गिरी, जिल्हा परिषद बांधकाम सभापती सीमा पाटील तसेच सदस्य, पंचायत समिती सदस्य यासह आरोग्य, पाणीपुरवठा, पाटबंधारे, कृषी, महावितरणसह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेत महावितरणचे कार्यकारी अभियंता काळे अनुपस्थित असल्याने त्यांना निलंबित करावे, कोल्हापूर-सांगली रस्ता चौपदरीकरणाचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे, जयसिंगपूर येथे पिलरवरील उड्डाणपूल बांधावा, सरकारी रूग्णालयातील कामात कुचराई करणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, राजापूर येथे हायड्रोलिक गेट असणारा बंधारा उभारावा यासह अन्य ठराव करण्यात आले. दुपारी साडेबारा वाजता सुरू झालेली ही आमसभा सायंकाळी सातपर्यंत सुरू होती.

शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीतून होणार्या बेसुमार वाळू उपशामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. यंदा पाऊस कमी असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्यामुळे नव्या वाळू आवट्यांना मंजुरी देऊ नये. याचबरोबर विनापरवाना वाळू उपशावर महसूल विभागाने अंकुश ठेवावा अशी सूचना सभेत करण्यात आली. यावेळी तहसीलदार सचिन गिरी यांनी वाळू माफियावर केलेल्या दंडात्मक कारवाईची माहिती सभागृहास दिली. मात्र तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याकडे नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

कोल्हापूर व इचलकरंजी येथील सांडपाण्यासह विविध उद्योगांचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. शिरोळ तालुक्यात नागरिकांना हे पाणी प्यावे लागते. परिणामी साथीच्या आजारांचा फैलाव होत असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. प्रदुषण करणाऱ्या उद्योगांचा विद्युत पुरवठा खंडीत करावा अशी सूचना विजय भोजे यांनी केली. आमसभेत तसा ठरावही करण्यात आला. नदी प्रदूषण करणाऱ्या प्रोसेसवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने काय कारवाई केली असा प्रश्न प्रसाद धर्माधिकारी, विश्वास बालिघाटे यांनी उपस्थित केला.

उदगाव, चिंचवाड, कोथळी येथे होणाऱ्या बेसुमार माती उत्खननाकडेही नागरिकांनी सभागृहाचे लक्ष वेधले. माती उपशास परवानगी दिली आहे का, विनापरवाना माती उपसा करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सभेत करण्यात आली. अब्दुललाट येथे गायरान जागेवर पेयजल योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीने पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस बांधले पण सदरची जागा ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित झाली नसल्याचे उपसरपंच जयश्री पाटील यांनी सांगितले. याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही तहसीलदार गिरी यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images