Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कलाप्रदर्शनात पालव यांचे सुलेखन प्रात्यक्षिक

0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

कलासंचालनालयाच्यावतीने येथे सुरू असलेल्या ५६ व्या राज्य कला प्रदर्शनाला कलारसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कलारसिक, विद्यार्थी आणि सर्वच स्तरातील नागरिकांची प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. सर्वच कलाकृतींना दाद देत कलारसिक प्रदर्शनाचा आस्वाद घेत आहेत. बुधवारी आंतरराश्ट्रीय ख्यातीचे प्रसिध्द सुलेखनकार अच्युत पालव यांचे सुलेखन प्रात्यक्षिक झाले.

सांगली जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने कला अध्यापकांसाठी उद्बोधान वर्ग ठेवण्यात आला होता. जि. प. माध्यमिक ‌शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी मार्गदर्शन केले. शुक्रवार, (ता. ८) सकाळी साडेसात ते १२ कालावधीत बालकुमार चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या आहेत. प्रदर्शनाचा समारोप १० जानेवारीला होणार आहे. प्रदर्शनासाठी राज्य शासनाचे प्रदर्शन अधिकारी शशिकांत काकडे यांची मोलाची मदत झाल्याचे प्राचार्य प्रदीप पाटील यांनी सांगीतले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी राजारामबापू चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप पाटील, कलापुष्प शिक्षण संस्थेचे बाळासाहेब पाटील, रोझाताई किणीकर, कुलदीप पोतदार, अर्जुन जाधव, आरीफ तांबोळी, गणेश पोतदार प्रयत्नशील आहेत.

प्रदर्शनात मुलभूत अभ्यासक्रम, रेखा व रंग कला, षिल्पकला व प्रतिमानबंध, कला शिक्षक प्रशिक्षण, उपयोजित कला, कला व हस्त व्यवसाय (धातूकाम, मातकाम, अंतर्गत गृह सजावट, वस्त्रकला) आणि अपंग अशा सात विभागात सुमारे पाच हजारावर अधिक कलाकृती स्विकारण्यात आल्या होत्या. त्यापैकी सुमारे ७००कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. विविध माध्यम आणि कलाप्रकारातील कलाकृतींचा आस्वाद एकाचवेळी घेण्याची संधी या निमित्ताने रसिकांना उपलब्ध झाली आहे. प्रदर्शनात वस्तूचित्र, निसर्ग नमुना, व्दिमित व त्रिमित संकल्प, रचना मित्र, निसर्ग चित्र व्यक्तिरेखांकन, व्यक्तिचित्र, मुद्राचित्र, व्यक्तिषिल्प, जाहिरात, प्रतिबिंबीत करणाऱ्या या प्रदर्शनातील कलाकृती काळाचे भान जपणाऱ्या आजच्या पिढीच्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगली शहरात अतिक्रमणांवर हातोडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका हद्दीतील अतिक्रमणे हटविण्याचा धडाका जिल्हाधिकारी व प्रभारी आयुक्त शेखर गायकवाड अतिक्रमणमुक्त, स्वच्छ व सुंदर महापालिका बनविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंत हजारहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्यासाठी जेसीबी व इतर आवश्यक ती सर्व वाहने वापरली जात आहेत.
विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी चार उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी या कामासाठी तैनात केले आहेत. महापालिका हद्दीतील सर्व अतिक्रमणे हटलीच पाहिजेत आणि शहराला एक प्रकारची शिस्त लागायलाच हवी, असे जिल्हाधिकारी गायकवाड यांचे ठाम मत आहे. या कामात अडथळा आणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. काही लोक आपणहूनच आपली अतिक्रमणे काढून घेताना दिसत आहेत. या तिन्ही शहरांतील सर्व प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली जात आहेत.
मुख्य गोष्ट म्हणजे जिल्हाधिकारी स्वत: या कामासाठी रस्त्यावर उतरत असून, या कामावर त्यांचे जातीने लक्ष आहे. निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार, सुनील नाईक, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे, टीना गवळी, प्रशासन अधिकारी नकुल जकाते हे सर्व जण या अतिक्रमण हटाव मोहिमेवर आहेत. गेले दहा-बारा दिवस ही मोहीम सुरू असून, तो एक चर्चेचा विषय होऊन राहिला आहे.
शहरातील पार्किंगच्या सुमारे ४५० जागा मोकळ्या करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अतिक्रमण दूर करण्याबरोबरच मुरूम टाकणे, स्वच्छतेचे कामही सुरू आहे. शहरातील गटारी, नाल्यांच्या स्वच्छतेसाठी ठेकेदारांची मदत घेतली जात आहे. मोकळ्या प्लॉट धारकांनी स्वच्छता न केल्यास त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या स्वच्छता मोहिमेसाठी विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे.
तिन्ही शहरात एकाचवेळी ही मोहीम सुरू राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. पोलिस बंदोबस्तात ही मोहीम यशस्वीपणे राबविली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला माथाडींच्या मजुरीत वाढ

0
0

सांगली : सांगली मार्केट यार्ड, हळद गिरणी विभाग, कुपवाड व मिरज एमआयडीसी परिसरातील हळद व्यापारी व हळद गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या महिला माथाडी कामगारांच्या मजुरीत २३.५० टक्के वाढ करण्यात आली आहे. जिल्हा हमाल पंचायत व चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यात या मजुरी वाढीबाबत करार झाला आहे. ही माहिती हमाल पंचायतीचे नेते विकास मगदूम यांनी दिली.
मगदूम म्हणाले, मजुरी वाढीचा लाभ ९०० महिला माथाडी कामगारांना होणार आहे. हळद वेचणे, हळद निवडणे आदी कामासाठी प्रतिदिन १७० रुपयांवरून २१० रुपये व हळद पावडर चाळण माशिनवरील कामासाठी १८३ रुपयांवरून २२५ रुपयापर्यंत ही मजुरी वाढ झाली आहे. या मजुरीवर ३० टक्के लेव्हीही मालकांनी माथाडी मंडळात भरायची आहे. लेव्हीसह मजुरी अनुक्रमे २७३ व २९२ रुपये इतकी झाली आहे. या मजुरी दरवाढीच्या चर्चेत हमाल पंचायतीकडून मगदूम, बाळासाहेब बंडगर, विमल लोखंडे, शोभा कलगुटगी, प्रल्हाद व्हनमाने यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन शिक्षकी शाळेस आयएसओ मानांकन

0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या मिरज तालुक्यातील विकासनगर (बेळंकी) येथील दोन शिक्षकी शाळेने आयएसओ मानांकन मिळविले आहे. विद्यार्थीभिमुख शिक्षण आणि उपक्रमशीलता तसेच पालकांचे वेळोवळी मिळणारे सहकार्य या त्र‌िसूत्रीतून गौरवलेली शाळा म्हणून या शाळेची दखल घेतली आहे.
राज्यात शिक्षण क्षेत्राबद्दल फारसे समाधानकारक बोलले जात नाही. त्यातच खेड्यापाड्यापात वाड्या वस्त्यांवर असलेल्या शाळांबद्दल तर खूपच मार्मिक टिप्पणी होत असते. परंतु गेल्या काही वर्षांपासून नव्या दमाच्या शिक्षकांनी सर्व ती आव्हाने पेलत, प्रसंगी पदरमोड सोसत शाळेच्या सर्वांगिण प्रगतीसाठी स्वत:ला झोकून दिले आहे.
मिरजेपासून २५ किलोमीटर आंतरावर बेळंकी गाव आहे. या गावाच्या मळाभागातील विकासनगर या वस्तीवर दोन शिक्षकी शाळा आहे. सुमारे एक हजार लोकसंख्या असणाऱ्या विकासनगर शाळेचा होणारा सर्वांगिण विकास या दोन शिक्षकी शाळेत दिसून येत आहे.
पहिली ते चौथीपर्यंतच्या या शाळेची सुरुवात १९८४साली झाली. मुळात पालकांची अनास्था, विद्यार्थ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि जि. प. प्राथमिक शाळेतील शिक्षकांबद्दलची समाजातील मानसिकता याचा परिणाम गुणवत्ता आणि दर्जा खालावण्यात होत होता. अलिकडच्या नव्या पिढीतील शिक्षकांनी हे आव्हान स्वीकारुन अनेक शाळातून गुणवत्ता आणि दर्जा उंचावण्यासाठी कंबर कसली आहे.
आयएसओ मानांकन देणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी राजीव जम्मीहाल आणि त्यांचे सहकारी पथकाने विकासनगर शाळेची सर्व ती पाहणी करुन आयएसओ मानांकन बहाल केले आहे. दुष्काळी भागातील या शाळेने सलग तीन वर्षे हा बहुमान पटकाविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा जानेवारीला सांगलीत मॅरेथॉन

0
0

कुपवाड : भारती विद्यापीठाचे संस्थापक, भारती अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती आमदार पतंगराव कदम आणि कार्यवाह विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगलीत दहा जानेवारी रोजी खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुरुष गटासाठी एकवीस आणि महिला गटासाठी नऊ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठाचे मानद संचालक डॉ. एच. एम. कदम यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. या स्पर्धेतून 'रन फॉर हार्ट'चा संदेश दिला जाणार आहे.
पुरुष, महिला खुलागट, एकोणीस वर्षांखालील मुले आणि ज्येष्ठ नागरिक पुरुष अशी चार गटात दहा जानेवारी रोजी सकाळी सात वाजता भारती हॉस्पिटलजवळ मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पुरुषांच्या खुल्या गटासाठी एकवीस किलोमीटरचे आणि महिलांसाठी नऊ किलोमीटरचे अंतर निश्चित करण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन किलोमीटरचे अंतर असणार आहे. या स्पर्धेबरोबरच भारती हॉस्पिटलच्यावतीने तुरची फाटा, कडेगाव, पलूस येथे मोफत सर्वरोग निदान शिब‌िरे, राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा, साहित्य संमेलन अशा विविध उपक्रमांचे जिल्ह्याच्या विविध भागात आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणांच्या तालुक्यात पाण्यासाठी वणवण

0
0

रमेश चव्हाण, आजरा

आजरा तालुक्यात चित्री, चिकोत्रा, दाभिल या मोठ्या प्रकल्पांसह हिरण्यकेशी, चिकोत्रा आणि लहान मोठे ओहोळ असले तरी यंदा तालुक्यातील काही भागांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. चित्री, चिकोत्रा या पूर्ण झालेल्या धरणांसह आवंडी, उचंगी, अंबेओहळ, सर्फनाला हे मोठे प्रकल्प या तालुक्यात असल्याने धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो. जास्त पाऊस पडूनही या तालुक्यात यंदा दुष्काळाच्या झळा पडत आहेत. उत्तूर परिसरातील चव्हाणवाडी व बहिरेवाडीतील नैसर्गिक पाणीस्त्रोत अगदीच कमकुवत झाल्यामुळे या महिनाअखेर येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाईची शक्यता आहे. तर महागोंडवाडी, हालेवाडी, करपेवाडी, पेंढारवाडी या गावांतही पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

तालुक्यात पूर्व व उत्तर भागातील संभाव्य पाणीटंचाईच्या झळा तीव्र होण्याच्या शक्यतेने तहसील व पाटबंधारेसह ग्रामपंचायत स्तरावरून गेल्या दीड महिन्यात पाहणी व उपायाबाबत चाचपणी सुरू आहे. पाहणीनुसार भादवण, लाकूडवाडी, मुमेवाडी, चव्हाणवाडी, कासारकांडगाव, सावरवाडी व देऊळवाडी येथे पाणीटंचाईच्या शक्यता आहे. विशेषत: चव्हाणवाडी येथील सार्वजनिक विहीरीनजिकच एका माजी सैनिकाकडून खासगी विहीर खोदाई झाल्यामुळे आणि पाझर तलावाच्या गळतीमुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी येथील परिस्थितीची स्वत: पाहणी केली. चिकोत्रा प्रकल्पावरून परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. त्या योजनेमधूनच चव्हाणवाडीला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.

तालुक्यातील चित्री प्रकल्पात सध्या १२४७ दश लक्ष घन फूट म्हणजेच ६६ टक्के पाणीसाठा आहे. तर सोहाळे वगळता इतर सर्व धरणांत पाणीसाठा तुडुंब आहे. सोहाळे गळतीबाबत पंचायत समिती सभेत निर्णय होईल. मार्चपर्यंत २२ दिवसांची उपसाबंदी आहे. त्यानंतर पडलेल्या वळीवांनुसार नियोजन शिथील केले जाईल

- राम हरदे, ‌अभियंता, पाटबंधारे विभाग, आजरा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संलग्नतेमुळे हद्दवाढीसाठी आग्रही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भौगोलिक संलग्नता व नागरीकरणाचा वेग या प्रमुख बाबी डोळ्यासमोर ठेवूनच शहराच्या हद्दीपासूनच्या एक किलोमीटर अंतरावरील गावांचा समावेश हद्दवाढीत करण्यात आला आहे. या गावांमधील बहुतांश जनता कृषीक्षेत्रावर अवलंबून नसल्याचे महापालिकेच्या प्रस्तावात नमूद केलेले असल्याने शहरामध्ये समाविष्ट होण्याच्यादृष्टीने पोषक वातावरण आहे. हद्दवाढीबाबत सरकारच्या पातळीवर सकारात्मकता आहे.

१९४६ सालापासून शहराचे क्षेत्रफळ ६६.८२ चौरस किलोमीटर इतके आहे. या हद्दीशेजारील गावांमधील नागरीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. महापालिकेच्या प्रस्तावाप्रमाणे ६० टक्के नागरीकरण झाले आहे. पाचगाव, मोरेवाडी, उचगाव या गावांमधील शेतीचे प्रमाण कमी होत जाऊन नागरीकरणाचा वेग मोठा आहे. प्रस्तावातील अन्य गावांमधील रहिवाशीही मोठ्या प्रमाणावर शहरावर अवलंबून आहेत. जवळपास ८० टक्के अकृषक रोजगार आहेत. त्याचबरोबर प्रस्तावात नमूद केलेली १६ गावे व दोन एमआयडीसी यांची भौगोलिक सलगता आहे. ही दोन महत्वाच्या बाबी हद्दवाढीसाठी या शेजारील गावांचा समावेश हद्दवाढीत करण्यासाठी महापालिका आग्रही आहे.

या गावांमधील बहुसंख्य नागरिक रोजगारासाठी शहरावर अवलंबून असल्याने मर्यादित क्षेत्रफळ असलेल्या शहरावर लोकसंख्येचा, त्यांच्यासाठी लागणाऱ्या सुविधांचा बोजा पडत आहे. केएमटी सेवेबरोबर शहर हे जिल्हा मुख्यालय असल्याने जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर शहरात येत असतात. दररोज कामानिमित्त येणाऱ्या या लोकसंख्येचाही भार शहरावरच पडतो. नव्या जनगणनेनुसार शहराची साडेपाच लाख लोकसंख्या आहे. या लोकसंख्येबरोबर नोकरीनिमित्त येणाऱ्या लोकसंख्येला सामावून घेणारे रस्ते नसल्याने शहरात वाहतुकीची कोंडी, उंच इमारतींची उभारणी होत असल्याने पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत आहे. यासाठी शहराशेजारील गावांना सामावून घेऊन शहराचा विस्तार करण्याची आवश्यकता तज्ज्ञांकडूनही व्यक्त केली जात आहे. विविध सेवांचे विकेंद्रीकरण झाल्यास जुन्या शहरावरील भार आपोआपच कमी होऊ शकतो.

पालकमंत्री हद्दवाढीच्या बाजूने

जिल्हाधिकारी वा नगररचना विभागाकडून यापूर्वी हद्दवाढीबाबत सकारात्मकता दाखवण्यात आली होती. पण राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रस्तावच मागे घेण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत हद्दवाढीच्या बाजूने आहे. त्यामुळे महापालिकेच्या हद्दवाढीसाठी सरकारच्या पातळीवर त्यांचे मत महत्वाचे ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

११ संचालकांवर गंडांतर येणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेच्या चौदा विद्यमान संचालकांच्या पदावर गंडातर येण्याची शक्यता आहे. दोषी ठरलेल्या संचालकांनी न्यायालयात धाव घेतली, तरी न्यायालयीन निवड्यामध्ये जास्त वेळ जावू नये याची तयारी सरकारच्यावतीने केली आहे. विद्यमान संचालकांवरील आरोप निश्चित झाल्यास रिक्त झालेल्या जागांवर पुन्हा निवडणूक लागण्याची शक्यता आहे. सरकारच्या निर्णयामुळे मात्र संचालकांनी केलेल्या गैरकारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जिल्हा बँकेच्या संचालकांनी बेजबाबदारपणे व बँक कार्यालयीन शिफारशी डावलून हेतूपुरस्सर विनातारण कर्जाचे वाटप केले आहे. विशिष्ट व्यक्ती व व्यक्तिसमूह डोळ्यांसमोर ठेवून आणि रिझर्व्ह बँक, नाबार्ड व सहकार खाते यांनी दिलेले निर्देश डावलून मनमानी पद्धतीने कर्ज वाटप केले आहे. सहकार कलम ८८ नुसार चौकशी अधिकाऱ्यांनी जबाबदारी निश्चित केली होती. चौकशीला अनुसरुन सहकार कलम ९८ अन्वये विभागीय सहनिबंधकांनी वसुलीच्या नोटीस दाखल केल्या होत्या. निवडणुकीस अपात्र ठरु नये यासाठी काही संचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर पुन्हा सुनावणी घेण्याची आदेश सहकारमंत्र्यांना दिले होते.

महापालिका निवडणुकीच्या दरम्यान सहकार मंत्री पाटील यांनी सुनावणीचा निकाल देताना विभागीय सह निबंधक यांचा निर्णय कायम ठेवत १४७ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. त्यानंतर पुन्हा संचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये अशी तीनवेळा सुनावणी झाली आहे. पुढील सुनावणी होण्यापूर्वीच राज्य सरकारने बरखास्त झालेल्या संस्थेतील संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे.

जिल्हा बँकेच्या संचालकांवर जबाबदारी निश्चित झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. न्यायाधीश सोनक यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. दहा डिसेंबरच्या सुनावणीवेळी सरकारच्या पक्षाच्यावतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली होती. न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याने याबाबतची सुनावणी १४ जानेवारी रोजी होणार आहे.

प्रशासक नियुक्तीची टांगती तलवार

मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यमान ११ संचालकांचे पद धोक्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेचे संचालक मंडळ अल्पमतात येणार आहे. सहकार कायद्यातील तरतुदीनुसार संचालक मंडळ अल्पमतात आल्यास प्रशासकांची नियुकी करुन बँकेची निवडणूक घ्यावी लागणार असल्याचे सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थंडीमुळे द्राक्षांची मागणी घटली

0
0

सांगली : देशभरातली थंडीच्या कडाक्यामुळे चालू हंगामात द्राक्षाला पुरेशा प्रमाणात मागणी मागणी नाही. परिमाणी द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू होऊनही मालाचा अपेक्षित उठाव होत नाही.
सांगली, मिरज, कोल्हापूर, सोलापूर, पुणे अशा लोकल मार्केटमध्येही थंडीमुळे द्राक्षांना मागणी कमी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना द्राक्षाचे दर पाडण्याचे धोरण अवलंबिले आहे. प्रती चार किलो द्राक्षांना ३००रुपयांहून अधिक दर मिळणे अपेक्षित आहे. पण दर ढसळले आहेत. चार किलोला १८० ते २५० रुपये इतका दर मिळत आहे. प्रारंभी हाच दर ३०० ते ३२० रुपये इतका होता. पण जशी थंडीमुळे द्राक्षांची मागणी घटली तसे दरही उतरले. मुंबई, गोवा, केरळ आदी भागातही ही द्राक्षे पाठविली जात आहेत. दिल्लीला थंडीने उच्चांक गाठल्याने तेथे द्राक्षांना फारच कमी मागणी दिसते. तर केरळ भागात पावसाळी परिस्थितीमुळे
मागणी कमी आहे, असे सांगितले जाते. त्यामुळे सध्या तरी द्राक्ष हंगाम अडचणीतून चालला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळमध्ये शेतकरी चिंताग्रस्त

0
0

चार गावांना होणार टँकरने पाणीपुरवठा

अजय जाधव, जयसिंगपूर

यंदा पाऊस कमी झाल्याने ऐन डिसेंबरमध्ये कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत. विहीरी तसेच कूपनलिकांमधील पाण्याने तळ गाठला आहे. आतापासूनच पाणीप्रश्न भेडसावू लागल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर बनण्याची श्नयता आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्यात नद्या कोरड्या पडल्यास पिके जगवायची कशी,त्यांना पाणी आणायचे कोठून असा प्रश्न बळीराजाला पडला आहे.

शिरोळ तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टर पेर क्षेत्र आहे. कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्यामुळे येथील बहुतांशी क्षेत्र ओलिताखाली आले आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने तालुक्यातील ऊस उत्पादन तब्बल २० टक्क्यांनी घटले. रब्बी पिकांवरही परिणाम झाला. तमदलगे, निमशिरगाव, कोंडिग्रेसह अनेक गावामध्ये पेरण्या झाल्या नाहीत.

आता ऐन जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना पाणीप्रश्न भेडसावू लागला आहे. तालुक्यातील तमदलगे, चिपरी, कोंडीग्रे, निमशिरगाव, जैनापूर, हरोली, धरणगुत्ती येथे विहीरी व कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. तालुक्यातील बागायत क्षेत्रात ऊसाचे पीक अधिक आहे. याचबरोबर टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबीसह अन्य फळ व पालेभाज्या, गहू, हरभरा तसेच अन्य पिके शेतकऱ्यांनी घेतली आहेत. ऐन नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या नद्या कोरड्या पडल्या. वीजेचे भारनियमन वाढत आहे, यामुळे पिकांना पाणी द्यायचे कसे असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे.

तालुक्यातील तमदलगे, संभाजीपूर, कोंडिग्रे, मौजे आगर येथे पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. टंचाईग्रस्त म्हणून तमदलगे गावची ओळख आहे. तीन वर्षापुर्वी सरकारने हे गाव दुष्काळग्रस्त जाहीर केले होते. पावसाळ्यात येथील पाझर तलाव भरतो. या तलावामया पाझराच्या पाण्याचा लाभ तमदलगे, निमशिरगावसह परिसरातील गावांना होतो.

वीस गावांत होणार विंधन विहिरी

शिरोळ तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणेने कृती आराखडा तयार केला आहे. तमदलगे, संभाजीपूर, मौजे आगर, कोंडिग्रे येथे पाणी टंचाई प्रकर्षाने जाणवते. यामुळे या गावांना एप्रिल व मे महिन्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. याचबरोबर पाणी टंचाई असणाऱ्या २० गावामध्ये २६ लाख रूपये खर्चून जानेवारी महिन्यापासून २० विंधन विहीरींची खुदाई करण्यात येणार आहे. यामध्ये आलास, मौजे आगर, शिवनाकवाडी, संभाजीपूर, कोंडिग्रे, दानोळी, निमशिरगाव, उदगाव, टाकळीवाडी, लाटवाडी, अब्दुललाट, जैनापूर, धरणगुत्ती, शिरदवाड, नांदणी, शिरोळ या गावांचा समावेश आहे.

पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कृती आराखडा तयार केला आहे. शिरोळ तालुक्यातील चार गावांना टँकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. २६ लाख रूपये खर्चून २० गावांत विहीरींची खोदाई करण्यात येईल.

- वैभव पिलारी, नायब तहसीलदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकेच्या किल्ल्या घरातच

0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर : भ्रष्टाचार आणि अनियमित कामकाजामुळे सहकारी बँकांना अडचणीत आणणाऱ्या सहकारसम्राटांना राज्य सरकारने चांगलाच दणका दिला आहे. बँकांना दिवाळखोरीत काढणाऱ्यांना दहा वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी येणार आहे. पण यामुळे सामान्य कार्यकर्त्याला संचालक होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण या सहकार सम्राटांच्यावतीने आपल्याच वारसदारांची नावे पुढे केली जाण्याची चिन्हे आहेत. तशा हालचाली वेगावल्या आहेत. वारसदारांच्या नावामध्ये आमदार अमल महाडिक, विश्वेश कोरे, निपुण कोरे, नाविद मुश्रीफ, प्रतिमा पाटील, ऋतुराज पाटील, धैर्यशील माने, संग्राम कुपेकर, राजेश पाटील, महेश पाटील ,राहुल आवाडे अशा अनेक नावाची चर्चा आता सुरू झाली आहे.

जिल्ह्याची आ​र्थिक नाडी असलेल्या जिल्हा बँकेवर पाच वर्षांपूर्वी प्रशासक नियुक्ती करण्यात आली. ही कारवाई करताना आजीमाजी ४५ संचालकांसह दोन अधिकाऱ्यांवर गैरव्यहाराचा ठपका ठेवण्यात आला. राजकीय आकसातून ही कारवाई झाल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला. पण काही कर्जे ही वसूल न होण्यासारखीच होती. कोणतेही तारण न घेता संचालकांनी ही कर्जे दिली. यामुळे यांच्यावर १४७ कोटीची जबादारी निश्चीत करण्यात आली. या संचालकांना निवडणूक लढवतण्यावर बंदी येण्याची शक्यता होती, पण तसा निर्णय न झाल्याने ज्यांच्यावर ठपका ठेवला , त्यातीलच बरेचजण पुन्हा संचालक झाले. यातील बरेचजण तर बिनविरोध निवडून आले.

राज्य सरकारच्या नव्या निर्णयाने बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ, पी.एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार निवेदिता माने, ए.वाय. पाटील यांना दणका बसणार आहे. हे सर्व पूर्वी संचालक होते आणि आताही आहेत. नव्या आदेशाने यांचे संचालकपद गेले तर पुन्हा या पदासाठी निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना याचा दणका बसणार आहे. पण अशी कारवाई होण्याची ​भीती या संचालकांना यापूर्वीच होती. त्यामुळे तेव्हा त्यांनी काही वारसदारांची नावे पुढे केली होती. दोन्ही काँग्रेसचे सरकार असते तर कदाचित ही कारवाई झाली नसती, पण आता महायुतीचे सरकार असल्याने कारवाई होण्याचीच शक्यता जास्त आहे. त्यामुळेच बहुसंख्य संचालकांच्या वतीने त्यांच्या वारसदारांच्या हातात या बँकेच्या किल्ल्या देण्याची शक्यता आहे.

आमदार मुश्रीफ यांच्याकडून त्यांचे सुपूत्र नाविद यांचे नाव संचालकपदासाठी पुढे येऊ शकते. माजी आमदार महादेवराव महाडिक व पी.एन. पाटील यांच्याकडून आमदार अमल महाडिक व राजेश पाटील यांच्या नावाला प्राधान्य दिले जाईल. निवेदिता माने यांच्या राजकारणाचा वारसा धैर्यशील माने हे चालवत आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालकपदासाठी त्यांचेच नावे सुचवले जाईल. नरसिंग गुरूनाथ पाटील यांचा वारसा महेश पाटील, के.पी. पाटील यांचा वारसा रणजित पाटील तर प्रकाश आवाडेंचा वारसा राहुल आवाडे हेच सांभाळतील. आमदार सतेज पाटील यांच्याकडून पत्नी प्रतिमा पाटील अथवा पुतण्या ऋतुराजचे नाव बँकेच्या संचालकपदसाठी पुढे येण्याची शक्यता आहे. अरूण नरके यांच्याबरोबरच संदीप नरके यांना देखील सरकारच्या नव्या आदेशाचा फटका बसणार आहे. यामुळे येथे नरकेंना संधी नाही. राजीव आवळे यांच्याऐवजी पुन्हा जयवंतराव आवळे सहकारात येऊ शकतात. आर. वाय .पाटील, स्वप्नील शिंदे, गोरख शिंदे हे देखील बँकेच्या चाव्या घेण्यासाठी पुढे येऊ शकतात. म्हणजे चेहरे बदलले तरी त्यांचेच वारसदार बँकेच्या चाव्या घेण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने काही संचालकांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यसरकार काहीही करुन कारवाई करणार याची खात्री असल्यानेच संचालकांनी वारसदारांची नावे पुढे करण्यास सुरुवात केली आहे.

काहीजण दूर राहणार...

जिल्हा बँकेवर कारवाई होऊन अनेक संचालकांना घरी बसावे लागण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास काही संचालकांनी यापूर्वीच आपल्या वारसदारांची नावे पुढे केली आहेत. मात्र काही आजी व माजी संचालक आणि त्यांचे कुटुंब या संस्थेच्या राजकारणापासून दूर राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामध्ये व्ही.बी. पाटील,प्रा. जयंत पाटील, वसंतराव मोहिते, विजयसिंह जाधव, अमर यशवंत पाटील अशा काहींचा समावेश आहे. वि​ठ्ठलराव निंबाळकर यांचा वारसा त्यांच्या कन्येने आता सुरूही केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्हॅट, बिलावरच एलबीटी

0
0

प्रशासन आणि व्यापारी उद्योजकांची बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्थानिक संस्था कराच्या असेसमेंटबद्दल कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघ आ​णि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने महापालिका प्रशासनाशी चर्चा केली. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेअंती भरलेल्या व्हॅटवरच असेसमेंट करावे, ​जे बिल आहे, त्यावरच एलबीटी घ्यावा या व्यापाऱ्यांच्या मागण्या महापालिकेने मान्य केल्याचे व्यापारी व उद्योजक महासंघाचे सदानंद कोरगावकर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. तर एलबीटी संदर्भात सुनावणी दरम्यान व्यापारी उद्योजकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जाणार नाही अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी दिल्याचे कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटले आहे.

महापालिकेने एलबीटीच्या असेसमेंटसाठी सीए पथक स्थापन केले आहे. मात्र या पथकाच्या कामकाजाबद्दल व्यापारी व उद्योजकांच्या तक्रारी आहेत. अनावश्यक कागदपत्रांची मागणी केली जात असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर, संजय हुकिरे,संजय अंगडी, संजय शेटे, सुहास कुलकर्णी, गिरीष रायबागे, महेश धर्माधिकारी, अतुल आरवाडे आदींनी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासोबत चर्चा केली. सीए पथकाकडून असेसमेंट दरम्यान अनावश्यक कागदपत्रांची मागणी करत व्यापाऱ्यांना त्रास दिला जात आहे. हा प्रकार थांबला नाही तर या विरोधात असहकार आंदोलन केले जाईल असे आनंद माने यांनी सांगितले.

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष कोरगावकर यांनी 'असेसमेंटच्या नावाखाली व्यापाऱ्यांना त्रास देण्याची भूमिका असू नये. व्यापारी वर्गाचा जाच कमी करावा. अभय योजनेमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी भाग घेतला आहे त्यांच्याकडे जे एक आणि जे दोन फॉर्म मागू नयेत. शहराबाहेर माल विकणाऱ्यांनी बाहेरील व्हॅट नंबरची बिले, स्टॉक रजिस्टर व व्हॅट परतावा सोडून इतर कागदपत्रांची मागणी करू नये अशी भूमिका मांडली. व्यापाऱ्यांच्या मागण्या प्रशासनाने मान्य केल्याचे व्यापारी शिष्टमंडळाने सांगितले. ज्या व्यापाऱ्यांनी असेसमेंट केले नाही त्यांनी ताबडतोब असेसमेंट करून महापालिकेला सहकार्य करावे. अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करण्याची सूचना केली जाईल अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिली. बैठकीला मुख्य लेखापाल संजय सरनाईक, एलबीटी अधिकारी राम काटकर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एमटीडीसी’ कोल्हापुरातच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) प्रादेशिक कार्यालय रत्नागिरीला स्थलांतरीत केल्यानंतर उपप्रादेशिक कार्यालयसुद्धा सोलापूरला देण्याचा प्रयत्न रोखण्यासाठी सरकारच्या पातळीवर हालचाली गतीमान झाल्या आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपप्रादेशिक कार्यालय इतरत्र होऊ नये असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. तसेच लवकरच हे कार्यालय कोल्हापुरात सुरू होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात त्यादृष्टीने निर्णय होण्याची शक्यता आहे.

येथे उत्पन्न नसल्याचे कारण दाखवत एमटीडीसीचे प्रादेशिक कार्यालय वीस वर्षापूर्वी रत्नागिरी येथे स्थलांतरीत करण्यात आले होते. त्यानंतर व्यवस्थापकांकरवी येथील कार्यालयाचे कामकाज सुरू होते. पण मध्यंतरी अचानक येथील व्यवस्थापक हे पद रद्द करत केवळ बुकिंग कार्यालय ठेवण्यात आले. त्यामुळे येथून एमटीडीसीचे उपक्रम काहीही राबवले जात नाहीत. पर्यटनाबाबत जिल्ह्यात प्रचंड गुणवत्ता असताना त्यासाठीचे कार्यालयच येथे नसल्याने पर्यटनक्षेत्राची प्रगती होत नव्हती. विविध प्रकारची पर्यटनस्थळे असल्याने एकदा पर्यटक आल्यानंतर खुष होऊन जातो. पण बहुतांशजणांना येथील माहितीच मिळत नसल्याने पर्यटकांची संख्या कमी असते. एकीकडे पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असताना एमटीडीसीच्या पातळीवर मात्र येथील कार्यालय बंद कसे होईल हे पाहिले जात आहे. त्यादृष्टीने पुणे प्रादेशिक कार्यालयातंर्गत कोल्हापूरप्रमाणे असलेल्या सोलापूर जिल्ह्याला उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचे जवळजवळ निश्चित केले होते. एमटीडीसीच्या बैठकीत केवळ त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे शिल्लक होते.

याबाबत भाजपच्यावतीने जिल्हाध्यक्ष महेश जाधव, उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून या प्रकारची माहिती दिली. तसेच सोलापूर येथील कार्यालयासाठी विरोधही केला. मंगळवारी भेट झाल्यानंतर पाटील यांनी तिथूनच पर्यटन विभागाच्या सचिवांशी​ चर्चा केली. कोल्हापुरातच कार्यालय सुरू करण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी आवश्यक असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. त्यानंतर कार्यालय इतरत्र हलवले जाणार नाही. कार्यालय लवकरच कोल्हापुरात सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरस्त्याचा गोळी झाडून खून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‌‌फिरस्त्याचा गोळी घालून खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. नारायण रावबा देसाई (वय ७२, मूळ गाव खोची, ता. हातकणंगले) असे खून झालेल्या फिरस्त्याचे नाव आहे. शिवाजी पेठेतील प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयामागे हा प्रकार झाला आहे. गुरूवारी सकाळी आठच्या सुमारास मृतदेह सापडला असला तरी पोस्टमार्टम रिपोर्ट दुपारी साडेचार वाजता मिळाल्यानंतर खून झाल्याचे पोलिसांनी जाहीर केले. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

गुरूवारी सकाळी प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या पिछाडीस फिरस्त्याचा मृतदेह आढळला. ही माहिती कळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले. फिरस्त्याच्या डोक्यातून व कानाखालून रक्त आले होते. पोलिसांना दोन वडापाव, चिरमुरे फुटाणे, दारूच्या मोकळ्या बाटल्या मिळाल्या. नातेवाईकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. दारू पिऊन भिंतीवर पडून फिरस्त्याचा मृत्यू झाला असावा, असे पोलिसांनी प्राथमिक तपासात सांगितले होते.

पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर हॉस्पिटलमध्ये नेला. मृतदेहाचा एक्स रे काढला असता डोके किंवा कवटीत गोळीबाराच्या खुणा आढळल्या नाहीत. त्यानंतर डॉ. राहुल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेहाचे पोस्टमार्टम केले असता गोळी झाडल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले. बंदुकीची गोळी कपाळातून आरपार कानाखालून बाहेर पडली आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिस प्रशासन जागे झाले. सायंकाळी पाच वाजता गहहिंग्लज विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिनेश बारी, शहर पोलिस उप अधीक्षक भारतकुमार राणे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांच्यासह शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळी बंदुकीच्या पुंगळीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली. घटनास्थळी सुवर्णकार दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही असून परिसरातील तीन ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरूवात केली. पहाटे दीड ते दोनच्या सुमारास घटना घडली असावी असे पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सांगितले.

मयत नारायण देसाई यांचे भाऊ नामदेव देसाई यांनी फिर्याद दिली आहे. नारायण हे पूर्वी सुतारकाम करत होते. दारूचे व्यसन असल्याने ते गेली २० ते २५ वर्षे घरी जात नव्हते. निवृत्ती चौक परिसरात कुठेतरी काम करून मिळालेल्या पैशातून दारू पिऊन कुठेही झोपत. पूर्वी ते शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीत रहात होते. सहा वर्षापूर्वी त्यांची पत्नी वासंती यांचे निधन झाले होते. मुलगी ज्योती या पती सुहास लाड यांच्यासमवेत फुलेवाडी येथे राहतात.

दिलीप लहरिया प्रकरणाच्या आठवणी जागा

फिरस्त्याच्या मृत्यूमुळे दोन वर्षांपूर्वी शाहूपुरीतील दिलीप लहरिया घटनेची आठवण जागी झाली. लहरिया घटनेची आठवण पोलिसांना करून दिली असता फिरस्त्याचा भिंतीवर पडून मृत्यू झाल्याचे पोलिस सांगत होते, पण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांची तारांबळ उडाली. घटनास्थळावरील माती पोलिसांनी फेकून दिली होती, पण पुंगळी शोधण्यासाठी फेकून दिलेली माती चाळण्यासाठी पोलिसांना चाळण खरेदी करावी लागली. पोलिस निवृत्ती चौक परिसरात कोणाकडे पिस्तूल, रिव्हॉल्व्हर अथवा गावठी पिस्तूल आहे का याचा तपास करत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी इमारतींवर रेखाटणार चित्रे

0
0

सांगली : अतिक्रमणे दूर करून महापालिका क्षेत्र स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पहिला टप्पा म्हणून लोकसहभातून शासकीय इमारती व सांगली-मिरज रस्त्यावरील भिंतीवर विविध चित्रे रेखाटण्याची कल्पना राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी सर्व संबंधितांची एक बैठकही आयोजित केली होती.
प्रभारी महापालिका आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून सांगली-मिरज-कुपवाड या तिन्ही शहरांचे बकालपण दूर करण्याचे काम हाती घेतले आहे. अतिक्रमणे दूर करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. आता ही शहरे सुंदर करण्यासाठी त्यांनी तज्ज्ञ, कलाकारांचे सहकार्य घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महत्त्वाच्या स्थळांचे सौंदर्य कसे वाढवता येईल याचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. कला महाविद्यालयांचे विद्यार्थी, चित्रकार यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.
आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, क्रेडाईचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सचिव रवींद्र खिलारे, एम. व्ही. कुलगर्णी, इंजिनियर्स अँड आर्किटेक्टस् असोसिएशनचे सचिव प्रमोद शिंदे माजी उपमहापौर शेखर इनामदार, नगरसेवक प्रशांत पाटील-मजलेकर या बैठकीस उपस्थित होते.
रंगांचे ब्रँडिंग
सांगलीची प्रसिद्ध हळद, ऊस, द्राक्षे या उत्पादनांची ओळख म्हणून हळदीच्या पिवळ्या रंगाला 'टर्मरिक यलो' आणि ऊस, द्राक्षे यांच्या हिरव्या रंगाल 'अॅग्रो ग्रीन' असे नामाभिधान करून ब्रॅडिंग करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘वसंतदादा’वर ठिय्या आंदोलन

0
0

कुपवाड : 'ऊस उत्पादकांची दोन हंगामातील थकीत ऊस बिले आधी द्या,' असा नारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारपासून वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या दारात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. कारखान्याने थकीत बिलापोटी दिलेले चेक बँकेतून परत आल्याचा दावा करून शुक्रवारी 'भीक मागो' आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला.
एफआरपीबाबत संघटनेने रेटा लावल्यानंतर वसंतदादा साखर कारखान्याने एका आठवड्याची एफआरपी दिली आहे, परंतु २०१३-१४ आणि २०१४-१५ या दोन हंगामातील कोट्यवधी रुपयांची बिले अद्यापही दिली जात नाही. या बिलापोटी दिलेले चेक कारखान्याच्या खात्यावर पैसे नसल्याचे कारण देवून परत येत आहेत. ही शेतकऱ्यांची दिशाभूल आहे. २००४ मधील एसएमपीही थकीत आहे. कारखान्याकडून थकीत देणी हातात पडेपर्यंत कारखान्यासमोरुन उठणार नाही. कारखान्याच्या परिसरातच भीक मागून आम्ही आंदोलन पुढे सुरु ठेवणार आहोत, असे राजोबा म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत तरुणांचे ओवाळून स्वागत

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड


'भारत जोडो' अभियानांतर्गत पुणे ते छत्तीसगड सायकल प्रवास करीत असताना माओवाद्यांनी अपहरण केलेल्या तीन तरुण सुखरूप परतले आहेत. त्यापैकी श्रीकृष्ण पांडुरंग शेवाळे व आदर्श दीपक पाटील हे दोघे कराड तालुक्यातील असून, बुधवारी मध्यरात्री ते सुखरूप घरी पोहोचले. दहा दिवसांपासून त्यांची आतुरतेने वाट पाहात असलेले कुटुंबीय, नातेवाईक व मित्रांनी गळाभेट घेऊन, आरती ओवाळून साश्रुनयनांनी त्यांचे स्वागत केले.


श्रीकृष्ण शेवाळे (रा. शेवाळेवाडी-उंडाळे) व आदर्श पाटील (रा. काले) हे दोघे कराड येथील शिक्षकांची मुले असून, शिक्षणासाठी पुण्यात राहात आहेत. या दोघांसोबत पुणे येथील विकास वाळके हा तरुणही शिक्षणानिमित्त पुणे येथे राहण्यास आहेत. पुणे येथील वास्तव्यात या तिघांचाही सामाजिक व देशसेवेसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांशी संबंध आला. त्यातून त्यांना समाजसेवेची व देशसेवेची प्रेरणा मिळाली. डॉ.प्रकाश आमटे यांनी आदिवासींसाठी केलेल्या कार्याने प्रेरित होऊन तिघांनी 'भारत जोडो' अभियानांतर्गत गेल्या डिसेंबरमध्ये भारतभ्रमण करण्यासाठी पुण्यातून रवाना झाले. मजल - दरमजल करत ते नागपूरमार्गे छत्तीसगडमध्ये पोचले. तेथून त्यांचा कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क होता. मात्र, २९ डिसेंबरपासून तिघांचा संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी चिंतेत होते.


या तीन तरुणांचे २९ डिसेंबरला छतीसगडमध्ये माओवाद्यांनी अपहरण केल्यानंतर राज्य सरकारसह अनेकांनी त्यांच्या सुखरूप सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले होते. बुधवारी रात्री पुण्याहून निघालेले श्रीकृष्ण व आदर्श दोघे बुधवारी
मध्यरात्री घरी पोहोचले. दहा दिवसांपासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या कुटुंबियांसह आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रांनी गळाभेट घेऊन व आरती ओवाळून त्यांचे साश्रुनयनांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी इमारतींवर रेखाटणार चित्रे

0
0

सांगली : अतिक्रमणे दूर करून महापालिका क्षेत्र स्वच्छ व सुंदर करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पहिला टप्पा म्हणून लोकसहभातून शासकीय इमारती व सांगली-मिरज रस्त्यावरील भिंतीवर विविध चित्रे रेखाटण्याची कल्पना राबविण्याचे ठरविले आहे. त्यासाठी त्यांनी सर्व संबंधितांची एक बैठकही आयोजित केली होती.
प्रभारी महापालिका आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी गायकवाड यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून सांगली-मिरज-कुपवाड या तिन्ही शहरांचे बकालपण दूर करण्याचे काम हाती घेतले आहे. अतिक्रमणे दूर करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. आता ही शहरे सुंदर करण्यासाठी त्यांनी तज्ज्ञ, कलाकारांचे सहकार्य घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महत्त्वाच्या स्थळांचे सौंदर्य कसे वाढवता येईल याचे सादरीकरण या बैठकीत करण्यात आले. कला महाविद्यालयांचे विद्यार्थी, चित्रकार यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.


आर्किटेक्ट प्रमोद चौगुले, क्रेडाईचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सचिव रवींद्र खिलारे, एम. व्ही. कुलगर्णी, इंजिनियर्स अँड आर्किटेक्टस् असोसिएशनचे सचिव प्रमोद शिंदे माजी उपमहापौर शेखर इनामदार, नगरसेवक प्रशांत पाटील-मजलेकर या बैठकीस उपस्थित होते.


रंगांचे ब्रँडिंग


सांगलीची प्रसिद्ध हळद, ऊस, द्राक्षे या उत्पादनांची ओळख म्हणून हळदीच्या पिवळ्या रंगाला 'टर्मरिक यलो' आणि ऊस, द्राक्षे यांच्या हिरव्या रंगाल 'अॅग्रो ग्रीन' असे नामाभिधान करून ब्रॅडिंग करण्यावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर दहशतवादी हल्ले झालेच नसते

0
0

शिराळा : 'शिवाजी महाराजांना आपण डोक्यावर घेतले, मात्र जगातील १३६ देशांनी राजांचे विचार विचार डोक्यात घेतले. भारतीयांनी राजांचे विचार डोक्यात घेतले असते तर दहशतवादी हल्ले झालेच नसते,' असे मत शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी वक्त केले. शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शिराळ्यात आयोजित बाळासाहेब ठाकरे व्याख्यानमालेत महानायक राजा शिवछत्रपती या विषयवार ते बोलत होते.


प्रा. शोभाताई नाईक, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, दि. बा. पाटील उपस्थित होते. प्रा. नितीन बानुगडे म्हणाले, शिवाजी महाराजांचा इतिहास देशातील १३६ देशात युद्धतंत्र म्हणून शिकवला जातो मात्र त्यांच्याच जन्माभूमीत तो इतिहास दोन-तीन ओळींत शिकवला जातो ही शोकांतिका आहे. शत्रूंना पायचित करून मारायला हवे, असे शिवाजी राजांनी ३५० वर्षापूर्वी सांगितले. चंद्रगुप्तानंतर स्वतःचे आरमार उभारणारे शिवाजी महाराजच होते. शिवरायांच्या कामाच्या नियोजनाचे धडे अभ्यासक्रमात हवेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरोचीजवळ मिलला भीषण लाग

0
0

हुपरी ः इचलकरंजी-हातकणंगले रोडवर असणाऱ्या रमेश दत्तात्रय कुलकर्णी यांच्या मालकीच्या मल्हार टेक्सटाईल्स या कापूस बनविण्याच्या कारखान्यास आज दुपारी १२ वाजण्याचे सुमारास आग लागली. आगीने इतके रौद्ररूप धारण केले होते की शेजारी असणाऱ्या शेतातील एक एकर ऊस आगीत भस्मसात झाला. या लागलेल्या आगीमध्ये रमेश कुलकर्णी यांचे अंदाजे एक कोटी रूपयांचे नुकसान झाले. याबाबतची वर्दी सुरेश दशरथ पिष्टे यांनी हातकणंगले पोलिसात दिली.


याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, रमेश कुलकर्णी यांच्या मालकीच्या मल्हार टेक्सटाईल्स या कंपनीमध्ये कापूस पिंजण्याचा कारखाना आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कापूस पिंजण्याचे काम चालू असताना मशीनमधून अचानक धूर व बघता बघता आग लागली सर्व कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला पंरतु आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या कापसाच्या गाठी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीन रौद्ररूप धारण केल्यामुळे कारखाना परिसर व कारखानाशेजारी असलेल्या ऊस पीक असलेल्या एक एकर शेतातील ऊसही आगीमध्ये जळून खाक झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images