Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गरिबी माझ्या लेखणाची प्रेरणा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
माझी गरिबी हीच माझी लेखणासाठी प्रेरणा ठरली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक बाबा भांड यांनी केले. मिरज तालुक्यातील कर्णाळ येथे पार पडलेल्या विद्यार्थी साहित्य संमेलनात ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता नववी शिकणारी सिमरन जमादार होती. आदेश माने हा विद्यार्थी स्वागताध्यक्षस्थानी होता. संमेलनात विद्यार्थी साहित्यिकांसह कर्नाळ पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबा भांड म्हणाले, बाल वयापासूनच कष्ट करावे लागले. त्यातून पूढे वाटचाल करीत असताना जीवनाच्या विविध टप्प्यांवर माझ्या कुटुंबासहीत अनेक भली मानसे भेटली. त्यामुळेच माझा हा आजपर्यंतचा जीवन प्रवास यशस्वी होऊ शकला. यावेळी त्यांनी बालपणापासूनचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर रंगतदारपणे मांडला. तेजश्री पाटील, भुषण सुतार व किशोरी पाटील या विद्यार्थ्यांनी बाबा भांड यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत खूपच प्रभावशाली ठरली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आभाळमाया फाउंडेशनचे संचालक प्रमोद चौगुले, ज्येष्ठ साहित्यिका तारा भावाळकर, अविनाश सप्रे, महेश कराडकर, पंचायत समितीचे सभापती दिलीप बुरसे, सदस्य सतिश निळकंठ, गोविंद गोडबोले, रघुराज मेटकरी, महेश कराडकर यांच्यासह दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे गोविंद पाटील, प्रा. एकनाथ पाटील, भीमराव धुळूबुळू विशेष उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात पाठ्यपुस्तकातील सहभागी साहित्यिक नाशिक येथील विमल मोरे, अहमदनगर येथील शशिकांत शिंदे, इस्लामपूर येथील प्रा. प्रदीप पाटील यांच्याशी समृद्धी शेलार व श्रेया नरुटे यांनी गप्पा गोष्टी केल्या. पाठ्यपुस्तकातील लेखक कसा असतो आणि तो कसा लिहितो याची विद्यार्थ्यांत उत्सुकता होती. यामुळे या गप्पाही रंगल्या.
तिसऱ्या सत्रात ओंकार सिद्ध यांच्या अध्यक्षतेखाली बाल कवी संमेलन पार पडले. या संमेलनात ४२बालकवींनी आपल्या बहारदार कविता सारद केल्या. बालकवींच्या रचनांना श्रोत्यांची दाद मिळाली. कवी संमेलनाचे सूत्र संचालन शिवानी चौगुले व प्रतीक बिसुरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक संतोष पाटील यांनी रेखाटलेल्या चित्रांचेही प्रदर्शन मांडण्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सीमावासीयांचे मराठीवर अस्सल प्रेम’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव
'मराठी साहित्य संमेलने अनेक ठिकाणी आयोजित केली जातात, पण सीमाभागात आयोजित केली जाणारी संमेलने उत्साहाने, तळमळीने कळकळीने आयोजित केली जातात. अस्सल मराठी प्रेम आणि मराठी कळवळा सीमाभागातील घराघरात आढळतो. त्यामुळे सीमावासीयांचा मला अभिमान आहे,' असे उद्गार प्रा . हरी नरके यांनी काढले.
बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या १४व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून नरके बोलत होते. उचगाव साहित्य अकादमीतर्फे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . उद्घाटनाला किरण ठाकूर, लक्ष्मण होनगेकर आदी उपस्थित होते.
सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी परिपत्रके मराठी भाषेत मिळावीत आणि बेळगावसह सीमाभागाला न्याय मिळावा, असा ठराव संमेलनात
करण्यात आला.
संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत मराठी संस्कृतीचे दर्शन घडले. ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. भगवा फेटा परिधान केलेल्या मुली, मुलींचे ढोल पथक, लेझीम मेळा, हरिनामाचा गजर करणारे वारकऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात हास्य कवी संमेलन प्रा. विनायक पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यात नामवंत तसेच नवोदित कवी सहभागी झाले होते. सांगलीचे शरद जाधव यांनी तिसऱ्या सदरात हास्ययात्रा हा एकपात्री प्रयोग सादर करून मनोरंजनातून प्रबोधन केले. शेवटच्या सत्रात सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड यांनी मला भेटलेल्या लेकी आणि सुना या विषयावर श्रोत्याशी संवाद साधला. संमेलनाला रसिकांची उपस्थिती मोठी होती.
दरम्यान, महाराष्ट्र विधान सभेने दोन वेळा पारीत केलल्या ठरावाचा पाठपुरवठा करावा. सुप्रीम कोर्टात खटला प्रलंबित असेपर्यंत बेळगाव केंद्रशासित करा, अशी मागणी एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आविष्कारा’त रसिक मंत्रमुग्ध

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
प्रसिद्ध मराठी संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली मराठी चित्रपट व नाटकातील गाणी, मालिकांची शिर्षकगीते आणि झिंगल्सचे सादरीकरण. मंदार आपटे, माधुरी करमरकर, कल्याणी पांडे-साळुंखेंचे मधूर गायन, भक्ती भातोडकर हिचा नृत्याविष्कार आणि स्मिता गांवकर यांच्या प्रभावी निवेदनाने इस्लामपूरकर कलारसिक मंत्रमुग्ध झाले.
आविष्कार कल्चरल ग्रुपने १४व्या संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पत्की यांच्या 'मिले सूर मेरा तुम्हारा' या संगीतमय कार्यक्रमाचे इस्लामपूरच्या विद्यामंदिरच्या प्रांगणतात आयोजन केले होते. माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्यासह सहा हजार कलारसिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
अशोक पत्की यांनी १२५ चित्रपट, ४००नाटकातील गीते, ३०० मालिकांची शिर्षकगीते आणि सहा हजार झिंगल्स संगीतबद्ध केल्या आहेत. गेली ४० वर्षे त्यांच्या गीत, संगीताने मराठी मनावर रूंजी घातली आहे. त्यांना संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. पत्की यांनी गाणे, त्याची चाल कशी सूचते याचे अनेक किस्से सांगितले. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी तसेच आभाळमाया, या गोजिरवाण्या घरात, पिंपळपान, घडल-बिघडल आदी शिर्षकगीते तर झंडूबाम झंडूबाम, धारा धारा शुद्ध धारा आदी झिंगल्स गायक-गायिकांनी सादर केली. बासरीची शीळ आणि त्यास ढोलकी-तबल्याच्या साथीने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत ललीत यांनी केले. संदीप कुलकर्णी यांनी बासरी, प्रणव मोशंबकर यांची ढोलकी, जगदीश मयेकर यांचा तबला, विनय चिऊलकर यांनी किबोर्डची संगीत साथ केली.
आमदार जयंत पाटील, आण्णासाहेब डांगे यांच्या हस्ते संगीतकार अशोक पत्की यांचा अमृतमहोत्सवी सत्कार करण्यात आला. 'हा सहृदय सत्कार आहे. मला दोन वर्षांपूर्वी लता मंगेशकर पुरस्काराने आमदार पाटील यांच्या हस्ते सन्मानित केले. त्याची आज आठवण झाली' असे पत्की म्हणाले. आमदार पाटील म्हणाले, 'तो सरकारचा पुरस्कार होता, हा आम्हा जनतेचा सत्कार आहे.' या प्रसंगी प्र्रा. कृष्णा मंडले, बाबूराव पाटील, सर्जेराव देशमुख, राजेंद्र माळी या आविष्काराच्या पदाधिकाऱ्यांचा विविध पदावर निवड झाल्याबद्दल सत्कार केला. राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन उद्योगपती सर्जेराव यादव, तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबनुरात गॅस सिलिंडरचा स्फोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

बारशाच्या कार्यक्रमाची लगबग सुरु असताना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चारजण गंभीर जखमी झाले. कबनूर (ता. हातकणंगले) येथे रविवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इराप्पा लिंगाप्पा पुजारी (वय ३४), लक्ष्मीबाई लिंगाप्पा पुजारी (वय ६५), सुवर्णा सदाशिव हजारे व अल्लाउद्दीन तौफिक जिनाबडे (वय १७) अशी जखमींची नांवे आहेत. सुदैवाने लहान बाळ व आईला काहीच दुखापत झाली नाही. या घटनेची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर येथील पंचगंगा फॅक्टरी रोडवरील सनी कॉर्नर परिसरातील कुमार केटकाळे यांच्या घरात इराप्पा पुजारी हे कुटुंबियासह राहण्यास आहेत. रविवारी त्यांच्या घरी मुलाच्या बारशाचा कार्यक्रम होता. सुमारे १० बाय १५ आकाराचे पत्र्याची खोली असून याठिकाणी कार्यक्रमाची लगबग सकाळपासूनच सुरु होती. स्वयंपाकासाठी इराप्पा पुजारी यांनी गॅसचा सिलिंडर शेगडीला जोडला. मात्र शेगडी सुरु करताच रेग्युलटरमधून झालेल्या गॅस गळतीमुळे सिलेंडरने पेट घेतला आणि त्याचा मोठ्याने स्फोट झाला. यावेळी स्फोटामुळे सिलिंडर उडून छताला जाऊन आदळल्याने सिमेंटचे पत्रे तुटून खाली पडले. तर आगीमुळे इराप्पा यांच्यासह तेथे उपस्थित असलेली त्यांची आई लक्ष्मीबाई, शेजारी सुवर्णा हजारे व अल्लाउद्दीन हे चौघेही भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले. स्फोटाच्या आवाजामुळे भागातील नागरिकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली.

काहींनी प्रसंगावधान राखत शेगडीसह सिलेंडर बाहेर काढून माती टाकून तो विझवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्यामुळे पुजारी यांच्या घरातील सर्व प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले आहे. सर्व जखमींना तातडीने वाहनातून प्रथम एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर सर्वांना पालिकेच्या आयजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. स्फोट झाला त्यावेळी लहान बाळ व त्याची आई सीमा पुजारी हे दोघेही त्या खोलीतच होते. मात्र, या दोघांना कसलीही इजा झाली नाही. दरम्यान, गॅस गळतीचा असाच प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास यशवंत कॉलनी परिसरात घडला होता. पण तातडीने आग आटोक्यात आणली.

दिवसभर चर्चा

कबनूर येथे स्फोट झाल्यानंतर इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात सोशल म‌ीडियावरून जोरदार चर्चा सुरू होती. यामध्ये अनेकांनी अफवा पसरवणारे मेसेजही ग्रुपवर टाकले होते. त्यामुळे अनेकांनी खातरजमा करण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना फोन करून खातरजमा केली. या घटनेत सुदैवाने बाळ आणि आईला कोणतीही इजा झाली नसल्याने अनेेेकांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच तातडीने उपचार झाल्याने जखमींची प्रकृती सुधारली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करमणूक महसूल वाढणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेटटॉप बॉक्सअभावी प्रेक्षपण बंद झाल्याने सेटटॉप बॉक्स खरेदी करण्यासाठी अनेकांची केबल ऑपरेटरांकडे गर्दी झाली आहे. सेटटॉप बॉक्सची सक्ती केल्यानंतर केबलधारकांचा वस्तुनिष्ठ आकडा समोर येणार असल्याने जिल्ह्याच्या करमणूक महसुलामध्ये वाढ होणार आहे. करमणूक विभागाकडे महापालिका व नगरापालिका क्षेत्रातील ६० हजार केबलधारकांची नोंदणी आहे. प्रत्यक्षात डेडलाइननंतर ८४ हजार ५०० केबलधारकांची नोंद झाल्याने करमणूक महसुलामध्ये निश्चितच वाढ होणार आहे.

महापालिका व नगरपालिका क्षेत्रासह २३ गावांमध्ये सेटटॉप बॉक्स सक्तीचे केले आहे. या विभागातील ६० हजार केबलधारकांचा यामध्ये समावेश होता. अशा केबलधारकांना ३१ डिसेंबरपर्यंत सेटटॉप बॉक्स खरेदी करण्याची अखेरची मुदत होती. सेटटॉप बॉक्ससाठी मुदतवाढ मिळेल या आशेने अनेक ग्राहकांनी सेटटॉप बॉक्स बसवण्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र निश्चित झालेल्या डेडलाईनप्रमाणे गुरुवारी मध्यरात्रीपासून थेट प्रेक्षपण बंद झाल्याने अनेकांना करमणुकीपासून वंचित राहावे लागले. यामध्ये विशेषत: महिला वर्गाचा समावेश जास्त होता. नवीन वर्षाच्या मुहूर्ताला करमणूक थांबल्याने थेट नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शुक्रवारपेक्षा शनिवारी सेटटॉप बॉक्स खरेदी करण्याकडे केबलधारकांचा कल दिसून आला. शनिवारी पाच हजार ५०० सेटटॉप बॉक्सची विक्री झाली.

सेटटॉप बॉक्सअभावी प्रक्षेपण बंद होण्याची सूचना वेळोवेळी देऊनही अनेकजण गाफील राहिले. याबाबत पुन्हा मुदत वाढवून मिळेल अशा आशेने त्यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केले. सेटटॉप बॉक्स सक्ती केलेल्या क्षेत्रात केबल ऑपरेटर यांनी अॅफिडेव्हिटद्वारे ६० हजार केबलधारकांची नोंद केली होती. प्रत्यक्षात सेटटॉप बॉक्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याने अवैध केबल कनेक्शन असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र सेटटॉप बॉक्स सक्तीची केल्यानंतर केबलधारकांची संख्या वाढत असल्याने करमणूक महसुलामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शेजारील गावांना झळ

३१ डिसेंबरपर्यंत महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील केबलधारकांना सेटटॉप बॉक्स अनिवार्य करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासून प्रेक्षपण बंद झाले आहे. मात्र नियोजित क्षेत्राबाहेरील केबलधारकांचे प्रेक्षपण बंद झाल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. तशा अनेक तक्रारी केबल ऑपरेटर यांच्याकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ज्या केबलधारकांना सेटटॉप बॉक्सची सक्ती नाही, तेथे पुन्हा प्रेक्षपण सुरू करण्याचे शिवधनुष्य केबल ऑपरेटरना पेलावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शनशिवाय माघार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

नियमात नसणारी कारणे दाखवून कागलच्या लाभार्थ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि संजय गांधी निराधार योजना समिती करत आहे. गरीबांच्या योजनांना यामुळे हरताळ फासला जात आहे. त्यामुळे अपात्र २३३० लाभार्थी घेऊन १२ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर धरणे करणार असून लाभार्थ्यांची फेरचौकशी करुन पेन्शन सुरु करत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.

ते कागल येथे विविध योजनांतील अपात्र लाभार्थ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. धरणे आंदोलनादरम्यानची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांची असेल असे स्पष्ट करुन मुश्रीफ म्हणाले, जोपर्यंत फेरचौकशीचे आदेश मिळत नाहीत आणि गरीबांची थट्टा करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही तोपर्यंत हटणार नाही. ते म्हणाले, लाभार्थ्यांचे म्हणणे घेतल्याशिवाय कोणत्याही लाभार्थ्याला अपात्र करता येत नाही. परंतु, सुनावणीचा फार्स करुन घाईगडबडीने हातावर पोट

आणि पेन्शनच्या रकमेवर औषधोपचार असणाऱ्यांना अपात्र करण्यात आले आहे. लोकांकडे लक्ष नाही दिल्यास लोक आपल्या बाजूला रहात नाहीत त्यामुळे गरीबांची कामे करण्यासाठी सर्वानी योगदान द्यावे, असे आवाहन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केले.

योजनांचे माजी अध्यक्ष प्रताप माने म्हणाले, दुसऱ्या तालुक्याचा अधिकारी आणून चुकीचे निकष लावून गरीबांची बेकायदेशीर चौकशी करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेत असणाऱ्यांचेही नाव कमी केले आहे. ते केवळ आपल्या गटाबरोबर रहात नाहीत म्हणून कमी केले असून पेन्शन वाटपाच्या सरकारी जागाही बदलल्या आहेत. शेवटच्या दोन मिटींगला तीन हजार ५०० प्रकरणे मंजूर केली असताना दोन उपजिल्हाधिकारी नेमून ती थांबवली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी गणपतराव फराकटे, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शशिकांत खोत, उपाध्यक्ष एम. एस. पाटील, विकास पाटील यांच्यासह कार्यकर्ते व अपात्र लाभार्थी मोठ्या संख्यने उपस्थित होते. स्वागत प्रास्ताविक शिवानंद माळी यांनी केले.

लोहारांचे मुश्रीफांकडून अभिनंदन

'गोकुळ'मध्ये च्या सतेज पाटील यांनी संजय घाटगेना मदत केली. पदरमोड करुन निवडून आणले. त्यांनी पाटील यांना दगा दिला. मात्र, घाटगे यांचा विरोध डावलून पंचायत समितीचे सभापती पिंटू लोहार यांनी पाटील यांना मतदान केले. ते अभिनंदनास पात्र आहे, असे सांगून प्रताप माने यांनी लोहार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मुश्रीफ यांच्यासह सर्वांनीच टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

$
0
0

महाविद्यालयीन युवतीची आत्महत्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागाळा पार्क वारणा कॉलनी येथील हळदणकर बंगल्यात स्मिता उत्तम खांडेकर (वय १९, रा. मावत, ता. सांगोला, जि. सोलापूर) या महाविद्यालयीन युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. मैत्रिणी टोमणे मारत असल्याचा उल्लेख तिने सुसाईड नोटमध्ये केला आहे. सोमवारी सकाळी पावने नऊ वाजता आत्महत्येची घटना उघडकीस आली.

स्मिता ताराबाई पार्क येथील महाविद्यालयात बारावी सायन्समध्ये शिकत होती. वारणा कॉलनीतील हळदणकर बंगल्यातील खासगी लेडीज होस्टेलमध्ये रहात होती. तिच्या खोलीत आणखी दोन मैत्रिणी रहात होत्या. तिची मैत्रिण गावी गेली असल्याने स्मिता रविवारी एकटीच खोलीत होती. रविवारी (३ जानेवारी ) रात्री स्वतःच्या खोलीत लाईट नसल्याने ती शेजारच्या खोलीत अभ्यासाला गेली. सोमवारी सकाळी खोलीचा दरवाजा उघडला नसल्याने अन्य खोलीतील तिच्या मैत्रिणींनी हाक मारली पण तिने प्रतिसाद दिला नाही. त्यांनी बंगल्याच्या मालकांना ही माहिती दिली. सकाळी पावणे नऊ वाजता दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला असता फॅनच्या हुकाला दोरीने गळफास लावून स्मिताने आत्महत्या केल्याचे उघड झाले. दोरीचे वळ मानेवर आवळल्याने जखम होऊन रक्त पायापर्यंत ओघळले होते. तसेच बिछान्यावर प्लॅस्टीक खूर्ची होती. हाळवणकरांनी शाहूपुरी पोलिसांना आत्महत्या झाल्याची वर्दी दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलिस आले. आत्महत्येपूर्वी स्मिताने सुसाईड नोट लिहिली होती. मैत्रिणी सतत टोमणे मारत होत्या असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिली.

स्मिता गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव्य करत होती. तिचा भाऊही कोल्हापुरात शिकायला असून तो कमला कॉलेज परिसरात राहतो. स्मिताला आणखी एक लहान बहिण आहे असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. स्मिता अतिशय हुशार होती. तिला दहावी व अकरावीला ९० टक्के गुण आहेत. तिचे वडील शेतकरी असून घडल्या प्रकारामुळे खांडेकर कुटुंबाला धक्का बसला आहे. आमची कुणाच्याही विरोधात तक्रार नाही, असे स्मितांच्या कुटुंबियांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरच्या वकिलांच्या पत्राने खळबळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या शाळकरी मुलाच्या जीवितास धोका असून, त्याला पोलिस संरक्षण मिळावे. अन्यथा त्याच्या जीवाचे बरेवाईट होऊ शकते', अशा आशयाचे पत्र राजारामपुरी पोलिस स्टेशनला मिळाले आहे. हिंदू विधिज्ञ परिषदेचे पदाधिकारी आणि पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर यांनी हे पत्र पाठवले असून, यातील धमकीवजा आशयावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. पुरोगामी संघटनांनी यावर आक्षेप घेतला असून, हे पत्र म्हणजे साक्षीदारांना धमकी देऊन मानसिक दबाव वाढवण्याचा प्रकार असल्याची तक्रार पानसरे कुटुंबीयांनी केली आहे.

कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर प्रत्यक्ष साक्षीदारांपैकी एक असलेल्या शाळकरी मुलाच्या जीविताबद्दल काळजी व्यक्त करणारे पत्र राजारामपुरी पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांना २२ डिसेंबरला मिळाले होते. हे पत्र पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात आले असून, याबाबतची माहिती बाहेर पडताच एकच खळबळ निर्माण झाली आहे. हिंदू विधिज्ञ परिषदेचे पदाधिकारी अॅड. संजीव पुनाळेकर यांनी हे पत्र पाठवले आहे. पुनाळेकर हे पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाडचे वकीलही आहेत, त्यामुळे हे पत्र पाठवण्यामागचा नेमका हेतू काय आहे याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. दरम्यान, अॅड. पुनाळेकर यांच्या पत्रानंतर मेघा पानसरे आणि दिलीप पवार यांनी तातडीने मंगळवारी (ता.५) जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची भेट घेतली.

राज्य सरकारने वेळीच या संस्थांवर कारवाई केली असती, तर असे धमकीचे पत्र पाठवण्याचे त्यांचे धाडस झाले नसते.

मुक्ता दाभोलकर, अंनिस

अल्पवयीन साक्षीदाराच्या काळजीपोटीच हे पत्र आम्ही पोलिसांना पाठवले आहे. पोलिसांनी पत्राची माहिती माध्यमांना देऊन गोपनीयतेचा भंग केला आहे. साक्षीदाराला पोलिस संरक्षण मिळावे आणि तातडीने सुनावणी पूर्ण व्हावी एवढीच आमची मागणी आहे.

अॅड. संजीव पुनाळेकर, पदाधिकारी, हिंदू विधिज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हसन मुश्रीफांचे अध्यक्षपद धोक्यात?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भ्रष्टाचार आणि अनियमित कामकाजामुळे सहाकारी बँकांना अडचणीत आणणाऱ्या संचालकांना दहा वर्षे कोणत्याही सहकारी संस्थांची निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक बड्या नेत्यांना दणका बसणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचे अध्यक्षपद धोक्यात आले आहे. मुश्रीफ यांच्यासोबतच जिल्हा बँकेच्या १४ संचालकांसह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार निवेदिता माने या दिग्गज नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने घेतलेल्या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबरच भाजपचा राजकीय संघर्ष उफाळून येणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील अकरा बँकांसह हजारो पतसंस्था अवसायनात काढल्या आहेत. त्यामधील ४० संस्थांच्या संचालकांवर जबाबदारी निश्चित झाली आहे. अशा सर्व संचालकांना मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा दणका बसणार आहे. २००१ नंतर अनेक संस्थांच्या संचालकावर जबाबदारी निश्चित झालेली नाही, अन्यथा हा आकडा आणखी वाढला असता. जिल्ह्यातील अकरा बँका अवसयानात अथवा विलिनीकरण झाले आहे. या बँकाच्या संचालकांवरही जबाबदारी निश्चित झाल्यास अनेक नेत्यांना सहकारी संस्थेच्या निवडणुकीपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अपात्र, नियमबाह्य आणि विनातारण कर्जवाटपामुळे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. प्रशासकांची नियुक्ती केल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होऊन आजी-माजी ४५ संचालकांसह तत्कालीन व्यवस्थापकांवर १४५ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित केली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान न्यायालयाने स्थगिती देवून सहकारमंत्र्यांकडे अपील दाखल करण्याचे आदेश दिले होते. विभागीय सहनिबंधकांचा निर्णय कायम ठेवत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका निवडणुकीदरम्यान जबाबदारी कायम ठेवल्याने एकच खळबळ उडाली होती. मंत्री पाटील यांच्या निर्णयाविरोधात संचालकांनी याचिका दाखल केली आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्ष गोत्यात

तब्बल दीड हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक यांच्याबरोबरच बँकेचे माजी अध्यक्ष, सांगली जिल्ह्यातील माणिकराव पाटील यांचाही समावेश आहे.

यांच्यावर राहील टांगती तलवार

आमदार सतेज पाटील, विनय कोरे, के. पी. पाटील. पी. जी. शिंदे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, नरसिंगराव पाटील, राजू आवळे, प्रकाश आवाडे, संजय एस. पाटील, अरुण नरके, संदीप नरके, अमर यशवंत पाटील, वसंतराव मोहिते, अशोक जांभळे, बाबूराव हजारे, विजयसिंह जाधव, व्ही. बी. पाटील, मानसिंगराव गायकवाड, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, गणी फरास, भय्यासाहेब कुपेकर.

नाबार्डच्या अहवालानुसार ज्या सहकारी बँका बरखास्त करण्यात आल्या आहेत, त्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. गैरव्यवहार केलेल्या अनेक सहकार सम्राटांचा सहकारातील अडथळा दूर होणार आहे.

-चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री

सहकारमंत्री मला डोळ्यासमोर ठेवून कायदे करत आहेत. पूर्वलक्षी प्रभावाने असा कोणताही कायदा बनवता येत नसून राज्यपालच याबाबत योग्य निर्णय घेतील. याबाबत न्यायालयात दाद मागू.

-हसन मुश्रीफ, अध्यक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मरायचं की लढायचं...?

$
0
0

Anuradha.kadam @timesgroup.com

कोल्हापूर : एकीकडे देशाचे कणखर भविष्य म्हणून तरूणाईला मानसिक बळकटी देण्यासाठी प्रयत्न होत असताना याच देशातील यूथ आत्महत्येला कवटाळत पळपुटं बनत आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनाने तरूणाई जगणाऱ्या मंगेश पाडगावकरांच्या, 'सांगा कसं जगायचं...कण्हत कण्हत की गाणं म्हणत,' या ओळीमधील अर्थ तरूणाईला समजेनासाच झालाय. कुणी काहीही सलणारं बोललं की दे जीव, इतका जीव स्वस्त झालाय का? असा विचार करणाऱ्या नव्या दमाच्या तरूणाईने मरायचं की लढायचं हा नवा पाठ घालून घेतला तरच आयुष्य सोपं आणि आनंदी होणार आहे.

मोबाइलफोनवर किती बोलतेस म्हणून आई ओरडली ते बाबांनी अभ्यास कर म्हणाले या रागापोटी त्यांची तरूण मुलं थेट आयुष्यच संपवत आहेत. तुझा बॉयफ्रेंड काळा आहे, असा मैत्रीणीने मारलेला टोमणा इतका जिव्हारी लागत आहे की त्याचा परिणाम आत्महत्या करण्यापर्यंतचे टोक गाठत आहे. तो किंवा ती 'नाही' म्हणाली तर जगण्यात काही अर्थच नाही असे म्हणत मृत्यूला कवटाळले जात आहे. इतकेच नव्हे तर घरातील आईवडीलांच्या भांडणाचा अतिरेक असो ​किंवा परीक्षेत पेपर अवघड गेला म्हणून नापास होण्याची भीती असो, अठरा​ वीस वर्षाच्या उंबरठ्यावरची ही तरूणाई आत्महत्येची वाट धरत आहे.



ही लक्षणं दिसली तर व्हा सावध

एकलकोंडेपणा व्यक्तीला घुमा बनवतो. कुटुंबियाबरोबर बाहेर जाणं टाळतो व घरात एकटं राहणं पसंत करतो. शाळा, कॉलेजच्या ठिकाणी अनियमितपणा दिसू लागतो. कॉलेजमध्ये गेला तरी तिथं अभ्यास मन लावून करत नाही. त्याचे शिक्षणातले नैपुण्य कमी होत जाते. अशी व्यक्ती सदैव गोंधळलेली व सतत स्वत:च्याच नादात हरवलेली असते. साध्या साध्या गोष्टीवरून ही व्यक्ती संतापते, चिडचिड करते, वैतागते. सतत खिन्न, उदास किंवा वैतागलेली दिसते. भावनाप्रधान, नीरस होते. त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर, पाल्याबरोबर, नातेवाईकाबरोबर तातडीने संवाद सुरू करा.

आयुष्य हे आपलं आहे. कुणाच्या तिरकस बोलण्याने किंवा टोमण्यांनी ते पोखरलं जावं इतकं त्याला तकलादू बनवायचच कशासाठी हा प्रश्न तरूणांनी आयुष्य संपवण्याचा विचार करण्यापूर्वी स्वतःला एकदा तरी विचारावा. आयुष्यात चढउतार नसतील तर त्याला अर्थही नाही. संघर्षाची वाट नेहमी शिकवणारी आणि अनुभव देणारी असते. मान्य आहे की तरूण वय काहीसे बेभान असते. पण हाच समतोल राखणं आवश्यक आहे. नापास होण्याची भीती जितकी मनाला लागू शकते तेवढीच आत्मियता अभ्यास करण्यासाठी ठेवली तर आत्महत्येची वेळ येणार नाही. मुलांनी आई-बाबा का ओरडतात याचा सकारात्मक विचार केला तर आत्महत्या म्हणजे भ्याडपणा वाटेल. - इम्रान शेख, विवेकानंद कॉलेज

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मित्र किंवा मैत्रीण असतेच. मनाला खुपणारी कोणती गोष्ट आयुष्यात घडत असेल तर ती मनात ठेवून कुढत बसण्यापेक्षा कुणाशीतरी मनमोकळेपणाने बोलून तर बघा. अगदीच आत्महत्येच्या वाटेने जाणाऱ्या आयुष्यात जगण्याची उमेद देणारा शब्द नक्की सापडू शकतो. खरंतर आजच्या यूथमध्ये शेअरिंग आहे. पण हेच शेअरिंग केवळ फॅशन, ट्रेंडस यापलिकडे जाऊन ते आयुष्याशी निगडीत असलेल्या प्रॉब्लेम्सबाबत झाले तर त्यातून उपाय मिळू शकतो. मग हा संवाद मित्रमैत्रीणी, आईवडील किंवा नात्यातील एखादी व्यक्ती असा कुणाशीही असू शकतो. त्यामुळे परस्परांमधील संवाद वाढवायला हवाच. - बिलाल फरास, गोखले कॉलेज

आत्महत्येमागील कारणे

महत्वाच्या परीक्षेतील अपयश प्रेमभंग किंवा आवडत्या मुलाकडून किंवा मुलीकडून नकार कौंटुंबिक समस्यांचा अतिरेक कॉलेजमधील ग्रुपिझम कॉम्प्लेक्शन, फॅमिली बॅकग्राउंडबाबत न्यूनगंड सोशल मीडियावरील कमेंटस् मनात येणारे विचार बोलून न दाखवणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्तारीकरणासह विमानसेवाही रखडलेलीच

$
0
0

कोल्हापूर : विमानतळ आहे, पण विमानसेवा सुरू नाही. विमानसेवा सुरू नसल्याने उद्योजकांपासून पर्यटकांपर्यंत सारेजण कोल्हापूरला येण्यासाठी नाक मुरडतात. त्यामुळे औद्योगिकपासून पर्यटन विकासाला मर्यादा येत आहेत. जागा संपादनाअभावी विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. तसेच पाच वर्षांपासून बंद असलेली विमानसेवाही सुरू करता आलेली नाही. विमानसेवा सुरू करण्यासाठी खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव येत आहेत. पण त्यापुढे काहीच होत नसल्याने जेव्हा निर्णय होईल, तेव्हाच तो खरा अशी मानसिकता कोल्हापूरवासियांची झाली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडे असलेले विमानतळ बऱ्याच प्रयत्नानंतर भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाकडे हस्तांतरीत झाले. हे हस्तांतरण केले जात असताना पुढील तीन वर्षांच्या कालावधीत विस्तार करण्याचे ठरवण्यात आले होते. मात्र आजतागायत त्याचा मुहूर्त झालेला नाही. तत्पूर्वीपासून बंद असलेली विमानसेवा २०१४ साली विमानसेवा सुरू करण्याच्या अनेक घोषणाही करण्यात आल्या. प्रत्यक्षात आजतागायत एकही विमानसेवा सुरू झालेली नाही. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी उत्सुक असलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक बोलाविली होती. मात्र त्याबाबत निर्णय झाला नाही. त्या कालावधीतच लो कॉस्ट विमानतळ म्हणून कोल्हापूरचा समावेश केल्याने कोल्हापुरात छोटी विमानसेवा सुरू होण्याची आशा निर्माण झाली होती. पाच सीटर विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र छोट्या शहरात विमानसेवा सुरू करण्यासाठी विमान कंपन्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच केंद्रातील सरकारही बदलल्याने ही योजना कुठे लपली गेली हेच समजले नाही. या योजनेव्यतिरिक्त छोटी विमाने येथे सुरू करायचे कंपन्यांना परवडत नाही. तर मोठ्या विमानांसाठी तितके प्रवाशी मिळतील याची खात्री हवी. या कोंडीमध्ये विमानसेवा रखडली आहे. गेल्या वर्षभरात अनेक खासगी कंपन्यांची नावे समोर आली. मात्र ऐनवेळी त्यांच्याकडून नकार मिळाल्याच्या घटना आहेत.

विमानतळ विस्तारीकरणासाठी अजूनही भूमीसंपादनाचे काम सुरू आहे. वनखात्याच्या केवळ १०.९३ हेक्टर जमिनीचे संपादन रखडले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत विविध पातळीवर बैठक घेतल्या. मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही. प्रशासकीय हालचालीत गेले वर्ष गेले आहे. नवीन वर्षांत केंद्रीय पातळीवरुन ही मंजुरी मिळवावी लागणार आहे. त्यासाठी येथील लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा आवश्यक आहे. त्या जमिनीचा प्रश्न संपला तर विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध होऊन प्राधिकरण त्यावर काही काम करू शकेल, असे वाटते. मात्र प्राधिकरणाकडून या विस्तारीकरणावर किती खर्च होणार आहे, त्यासाठी किती तरतूद झाली याची माहिती येथील लोकप्रतिनिधींनाही नाही. त्यामुळे केवळ धावपट्टीचे विस्तारीकरण होणार की विमानतळावरील सुविधाही वाढवण्यात येणार हे अजून गुलदस्त्यात आहे. विमानतळाच्या विकासासाठी विस्तारीकरणाबरोबरच नाइट लँ‌डिंग सेवा महत्वाची आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत विमान येऊन प्रवाशांना सोईस्कर होईल.



हवा राजकीय पाठपुरावा

केवळ विमानसेवा सुरू करून चालणार नाही तर ती परवडणाऱ्या दरात तसेच त्यात सातत्य हवे. तरच प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल व कंपनीलाही फायदा मिळेल. विमानतळ सुरू होण्यावर येथील विकासाला चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने राजकीय पातळीवरुन पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्यामुळे आपोआपच प्रवाशांची संख्या वाढत जाईल. या सुविधेमुळे पार्किंग स्लॉट सुरू करता येणे शक्य आहे. त्यातून विमानतळाला उत्पन्नाचा मार्गही उपलब्ध होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हास्ययोग परिवार संमेलन रविवारी

$
0
0

कोल्हापूर : जीवनशैली बदलल्याने लोकांना शारीरिक व्यायामासाठीही पुरेसा वेळ देता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. शारीरिक दगदगीचा परिणाम मनावर होतो आणि मनासह शरीराला व्याधी जडतात. त्यामुळेच हास्ययोग, प्राणायाम करून तणावांपासून मुक्ती मिळवण्याकडे कल वाढला आहे. हास्ययोग प्राणायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कोल्हापुरात राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवारामार्फत रविवारी (ता. १०) जिल्हास्तरीय हास्ययोग परिवार संमेलन आयोजित केले आहे. पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

जगभरातील हास्य चळवळीला १९९८ पासून मुंबईतून सुरूवात झाली. आज ही चळवळ संपूर्ण जगभर पसरली असून, हास्याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला जात आहे. खळखळून हसण्याने होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे तपासले जात आहेत. कोल्हापुरातही गेल्या १८ वर्षांत ३० हास्य क्लब सुरू झाले आहेत. इचलकरंजी, गडहिंग्लज, कागल, जयसिंगपूर, पेठवडगाव, गारगोटी, पन्हाळा अशा अनेक ठिकाणी हास्य क्लब सुरू झाले आहेत. हसण्यासोबतच सकाळची शुद्ध हवा घेणे, हलके व्यायाम करणे, प्राणायाम करणे आणि विविध वयोगटाच्या लोकांमध्ये मिसळून मानसिक प्रसन्नता मिळवण्याचा प्रयत्न हास्य क्लबच्या माध्यमातून केला जातो. हास्य क्लब संकल्पनेची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि याची उपयुक्तता लक्षात यावी यासाठी कोल्हापुरातील राजर्षी शाहू छत्रपती हास्ययोग परिवाराने रविवारी (ता.१०) हॉटेल पॅव्हेलियन येथे जिल्हास्तरीय हास्ययोग परिवार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनासाठी ३०० हून अधिक नोंदणी झाली असून, रविवारपर्यंत ५०० हून अधिक लोक येतील असा विश्वास हास्य क्लबचे अध्यक्ष डॉ. दिलीप शहा यांनी व्यक्त केला आहे.

हास्ययोगामुळे ब्लडप्रेशर, दमा, संधीवात, डायबेटिस, अंगदुखी अशा आजारांवर नियंत्रण ठेवता येते असा दावा हास्य क्लबचे सदस्य करीत आहेत. कृत्रिम हसता हसता आपण स्वाभाविक हसायला लागतो आणि या कृतीतून शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड बाहेर टाकला जातो. अलिकडे जंकफूडच्या आहारी गेलेल्या तरुणाईलाही हास्ययोग आणि प्राणायामचे अनेक फायदे होतात, असा विश्वास कार्याध्यक्ष दिलीप कोण्णूर यांनी व्यक्त केला. रविवारी होणाऱ्या संमेलनात हास्यदिंडी, शोभायात्रा, डॉ. दिलीप शहा, डॉ. रमाकांत दगडे, यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. यावेळी हास्यसम्राट राहुल कुलकर्णी आणि नितीन कुलकर्णी यांच्या विनोदी कार्यक्रमाचे सादरीकरणही होणार आहे. प्रफुल्ल महाजन, लहू पाटोळे, डी. टी. चौधरी, सी. एम. पारेख, भीमराव दरेकर, विश्वनाथ लिगाडे आदींनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोंडीने कसबा बावड्यात अपघातांचा धोका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रीय महामार्गावरून कोल्हापुरात प्रवेश करण्याचा सोयीचा नवा मार्ग म्हणजे शिये-कसबा बावडा रस्ता. पुणे-मुंबईकडून येणारी सर्वच वाहने आता कसबा बावड्यातून शहरात प्रवेश करतात. शिरोली आणि शिये एमआयडीसीत जाणारी वाहतूकही याच मार्गाने सुरू असते. त्यामुळे सकाळी सात ते दुपारी बारा आणि संध्याकाळी चार वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण असतो. बेशिस्त पार्किंग, वाढती वर्दळ यामुळे या शहराच्या प्रवेश मार्गावर अपघातांचा धोका वाढला आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गावरून कोल्हापुरात येणारी खाजगी वाहतूक कसबा बावडामार्गेच कोल्हापुरात प्रवेश करते. रस्ते विकास प्रकल्पांतर्गत रस्त्याचे झालेले नुतनीकरण आणि कमी अंतरामुळे महामंडळाची बस वाहतूक वगळता सर्वच वाहने येथून शहरात येतात. राजाराम कारखान्याच्या फाट्यापासून ते एसपी ऑफिसपर्यंतचा मार्ग म्हणजे दिवसेंदिवस वाढत्या वर्दळीचा आणि अपघातांचा बनला आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले अतिक्रमण, वाहनांचे बेशिस्त पार्किंग, फुटपाथवर थाटलेली दुकाने आणि वाहतुकीला मोठा अडथळा ठरत असलेले चुकीच्या ठिकाणचे केएमटीचे बसस्टॉप यामुळे शहराचा एन्ट्री पॉईंट असलेला हा मार्ग दिवसेंदिवस धोक्याचा बनत आहे.

उसाच्या हंगामात राजाराम साखर कारखान्यासाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे कारखाना नाक्यावर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी असतात. ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्यांमुळेही वाहतुकीची मोठी कोंडी होते. कसबा बावड्याच्या दोन्ही बाजुने होणाऱ्या ऊस वाहतुकीसाठी मुख्य रस्त्याशिवाय दुसरा रस्ताच उपलब्ध नाही. या मार्गावरून ऊस वाहतूक सुरू असते. हंगामात अनेकदा या मार्गावर बिघाड झालेले ट्रॅक्टर्स उभे असतात. रस्त्यातच बैलगाड्या थांबतात. त्यामुळे जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.

कसबा बावडा ते एसपी ऑफिस या मार्गावर गेल्या चार महिन्यांत तीन मोठे अपघात घडले आहेत. या अपघातांना सदोष रस्ताही कारण ठरले आहे. स्थानिक नेत्यांच्या आग्रहास्तव प्रत्येक गल्लीसाठी सोयीचे दुभाजक ठेवल्याने रस्त्यांवर मध्येच वळण घेणाऱ्या दुचाकीधारकांची संख्या अधिक आहे. मध्येच अचानक एखादी दुचाकी रस्त्यावर येते आणि वाहतूक खोळंबते. थोड्या-थोड्या अंतरावर वळण घेणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक ठप्प होते. भगवा चौक ते श्रीराम पेट्रोल पंपापर्यंत काही ठिकाणी फूटपाथ नाहीत. जिथे आहेत तिथे वाहनांचे पार्किंग आणि चिकन सिक्स्टी फाइव्हच्या गाड्या उभ्या असतात.

या परिसरात दोन मोठी महाविद्यालये असल्यामुळे अनेक गल्ल्यांमध्ये क्लासेस आहेत. क्लास आणि कॉलेजला जाणाऱ्या तरुणांची गर्दी रस्त्यावर नेहमीच असते. विशेष म्हणजे माळ गल्लीपासून ते एसपी ऑफिसपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुला केएमटीचे थांबे आहेत. मुख्य बसस्टॉपच्या ठिकाणी रस्ता अगदीच अरुंद आहे. स्टॉपवर केएमटी बस उभी राहिल्यानंतर दुचाकीही कशीबशी पुढे सरकते. एसपी ऑफिससमोर असलेला बसथांबा चुकीच्या वळणावर आहे. त्यातच तेथे रिक्षास्टॉपचा अड्डा आहे. त्यामुळे येथे पितळी गणपतीकडे जाणारी वाहतूक ठप्प होते. आव्हरटेक करून पुढे जावे तर चौकात कोणते वाहन कुठून येत आहे तेही लक्षात येत नाही. पोलिस निवास स्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरही वाहतूक असते. दत्ताबाळ हायस्कूलकडे जाणारी वाहने आणि यातूनच ड्रीमवर्ल्ड वॉटरपार्ककडे जाणारी वाहनेही असतात. वाहतुकीचे नियम तोडून अस्ताव्यस्त ये-जा सुरू असते, त्यामुळे या चौकात अपघातांचा धोका वाढला आहे. एसपी ऑफिस आणि मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातील वाढत्या गर्दीमुळेही या ठिकाणी वाहनांची कोंडी होत असते.

भगवा चौकात वेग जास्त या मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे भगवा चौक. भगवा चौकातून पोलिस लाइनकडे जाणारा मार्ग प्रशस्त असला तरी या ठिकाणी कॉलेजच्या मुलांची गर्दी नेहमीच असते. अतिशय गतीने वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्यांना जीव मुठीत घेऊनच चालावे लागते.

पर्याय नक्कीच हवा मध्यवर्ती बसस्थानक, शाहूपुरीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी श्रीराम पेट्रोल पंपापासून प्रस्तावित रस्ता तयार झाल्यास मुख्य मार्गावरील वाहतुकीचा ताण नक्कीच कमी होईल. याशिवाय रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग हटवण्याची गरज आहे. फूटपाथवरील हातगाड्या आणि दुकानांचे अतिक्रमण हटवल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल. यासाठी महापालिका, वाहतूक नियंत्रण विभाग आणि स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

स्पीड ब्रेकरमुळे नियंत्रण

कसबा बावडा मार्गावर स्पीड ब्रेकर नव्हते, तेव्हा सुसाट वेगाने वाहने चालवली जात होती. यावर 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाशझोत टाकल्यानंतर महापालिकेने मार्गावर सात ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार केले आहेत. स्पीड ब्रेकरमुळे गर्दीच्या ठिकाणी वाहनांचा वेग मंदावला असून, यामुळे अपघातांची शक्यता कमी झाली आहे.

हे करता येईल

पर्यायी रस्त्याची निर्मिती अवजड वाहतूक तावडे हॉटेलमार्गाकडे वळवणे ऊस वाहतुकीसाठी दुपारी आणि रात्रीची वेळ देणे बेशिस्त पार्किंगवर कारवाई दुकानांचे अतिक्रमण काढणे काही बसस्टॉपची जागा बदलणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महामंडळाची बैठक गुंडाळली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी खर्च केलेले १३ लाख रुपये वैयक्तिक नव्हे तर महामंडळाच्या कार्यक्रमासाठीच खर्च केल्याने तो आर्थिक गैरव्यवहार होत नाही अशी भूमिका अखिल भारतीय मराठी​ चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी बुधवारी सर्वसाधारण सभेत मांडली. सभेच्या विषयपत्रिकेवरील आठपैकी सहा विषय गुंडाळत सभा संपल्याचे जाहीर केले. दोन वर्षांनी झालेल्या या सभेत चित्रपट व्यवसायाशी संबंधित एकाही विकासाच्या मुद्यावर चर्चा झाली नाही. गोंधळातच पत्रिकेवरील सर्व विषयांना आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली. एप्रिलअखेर निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

दरम्यान, महामंडळ बचाव कृती समितीने प्रतिसभेत संचालक मंडळ बरखास्तीचा ठराव करून प्रशासक नेमण्याच्या मागणीचे निवेदन धर्मादाय आयुक्तांना देण्याचा निर्णय घेतला. उद्यापासून एकाही संचालकाला महामंडळाच्या कार्यालयात येऊ न देण्याचा ठरावही केला.

दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात दुपारी तीन वाजता अध्यक्ष पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून महामंडळ बचाव कृती समिती-महामंडळ संचालक मंडळात वाद सुरू होता. त्यातून सभा होऊ न देण्याचा निर्णय कृती समितीने घेतला होता. मात्र, मंगळवारी रात्री समझोता होऊन सभा शांततेत घेण्याचा निर्णय झाला. तरीही या निर्णयाला हरताळ फासत बुधवारच्या सभेत गोंधळाचाच सिनेमा रंगला.

सभेत सुरुवातीला दोन ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या सभेच्या कार्यवृत्तांताचे वाचन झाले. २०१३-१४ आणि २०१४-१५ या वर्षांचा अहवाल, जमाखर्च व ताळेबंद पत्रके मंजूरीसाठी सभासदांसमोर मांडण्यात आली. दोन वर्षापूर्वीच्या सभेतील इतिवृत्तांतील आणि अहवालातील नोंदीप्रमाणे माजी अध्यक्ष सुर्वे यांनी मानाचा मुजरा या कार्यक्रमासाठी केलेल्या अतिरिक्त खर्चातील १३ लाख रुपयांची रक्कम भरण्याची जबाबदारी घेतली होती. पैसे बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भरत असल्याचेही जाहीर केले होते. या मुद्द्यावरून यशवंत भालकर आणि भालचंद्र कुलकर्णी यांनी त्या पैशांचा खुलासा करून १३ लाख रुपये भरल्याची नोंद आणि स्टँपपेपर दाखवावा अशी मागणी केली. त्यावरून गोंधळाला सुरुवात झाली. या मागणीला उत्तर देताना पाटकर यांनी सुर्वे यांना पाठीशी घालत १३ लाख रुपये महामंडळाच्या कार्यक्रमासाठी खर्च झाल्याने पैसे भरण्यासाठी ते बांधील नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी सभागृहात टाळ्या वाजवल्या. त्याचवेळी कृती समितीच्या सदस्यांसह अन्य सभासदांनी पाटकर यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेऊन निषेध केला.

यशवंत भालकर म्हणाले, 'अहवाल आणि ​इतिवृत्तात सुर्वे यांनी पैसे भरत असल्याचा मुद्दा नोंद असताना आणि गेल्या सभेत सुर्वे यांनी स्वःता जबाबदारी घेत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्याचवेळी हा खर्च महामंडळाच्या कार्यक्रमासाठी की स्वःतासाठी केला असा प्रश्न महामंडळ संचालकांनी त्यांना का विचारला नाही? याला आवाजी मतदानाने नव्हे तर हात वर करून मंजुरी घ्यावी.' यावर पाटकर यांनी चर्चा करू असे सांगितले. मात्र पुढच्या​ काही मिनिटांत विषयपत्रिकेतील पुढील सहा विषय मंजूर आहेत का असे विचारले. सभासदांच्या मंजूर.., मंजूर...च्या गजरात सभा संपल्याचे जाहीर केले.

पाटकर यांनी सभा संपली असे जाहीर करताच व्यासपीठावरील सर्व संचालकांनी व्यासपीठ सोडले. ते आतील कक्षात बसले. तीन वाजता सुरू झालेली सभा साडेचार वाजता गुंडाळली गेली.

सुर्वेंना क्लिन चीट?

महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी १३ लाख रुपये भरावेत असा आदेश यापूर्वीच्या सभेनंतर देणाऱ्या महामंडळाने या बैठकीत त्यांना पाठीशी घालत क्लीन चीट का दिली याची चर्चा सभास्थळी रंगली होती. दोन दिवसांपूर्वीपर्यंत एकमेकांवर आरोप करणारे प्रसाद सुर्वे, विजय पाटकर आणि विजय कोंडके व्यासपीठावर दिलजमाई झाल्याच्या आवेषात बसले होते. त्यामुळे पडद्यामागे बरीच खलबतं झाल्याचा सूर सभासदांत दिसत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंग्रजी शाळांनाही स्वस्त प्रश्नपत्रिका

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

कोल्हापूर : जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्ह्यातील इंग्रजी शाळांना सामुदायिक प्रश्नपत्रिका देण्याचा विचार सुरू केला आहे. मार्च महिन्यात जिल्ह्यातील १५० इंग्रजी माध्यमांच्या मुख्याध्यापकांच्या बैठका घेतल्या जाणार आहे. संघातर्फे एक प्रश्नपत्रिका दोन रुपयांत देण्याचा विचार आहे. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत.

मुख्याध्यापक संघाचे जिल्ह्यातील ७०२ शाळा सभासद आहेत. या शाळांना मराठी माध्यमांच्या प्रश्नपत्रिकांची छपाई करुन दिली जाते. त्यासह सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, अहमदनगर जिल्ह्यातील ३५० शाळा कोल्हापूर मुख्याध्यापक संघाकडून प्रश्नपत्रिकांची छपाई करुन घेतात. गोपनीय प्रेसमधून या प्रश्नपत्रिका संबधित मुख्याध्यापकांच्या हाती दिल्या जातात. मराठी विषयांची दहा पानांची प्रश्नपत्रिका एक रुपये किंमतीला दिली जाते. तर जादा पाने असल्यास दीड रुपया घेतला जातो. आठहून अधिक जिल्ह्यातील शाळांसाठी सुमारे सात लाख प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जाते. मराठी माध्यमांच्या शाळांत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे दीडशे इंग्रजी शाळांत प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत.

त्यासाठी पन्नासहून अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापक संघाकडे विचारणा केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची पत्ते आणि दूरध्वनी क्रमाकांची यादी मुख्याध्यापक संघाने तयार केली आहे. त्यांच्याशी संपर्क मोहिमही सुरु केली असून मार्च महिन्यात बैठक घेतली जाणार आहे. मुख्याध्यापक संघ बाजारभावापेक्षा कमी दरात या प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देण्याचा मानस असल्याने शाळांची प्रश्नपत्रिका छपाईच्या खर्चात बचत होणार आहे.

खर्च कमी होणार सध्या काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा स्वतंत्रपणे प्रश्नपत्रिकांची छपाई करतात. एकाच परिसरातील दोन ते तीन इंग्रजी माध्यमांच्या शाळा एकत्रित येऊन प्रश्नपत्रिकांची छपाईचे काम करतात. मुख्याध्यापक संघाने या सर्वंच शाळांना अत्यल्प दरात प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन दिल्यास शाळांचा खर्च कमी होणार आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कही कमी करण्याची शक्यता आहे.

इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुख्याध्यापक संघाकडे प्रश्नपत्रिकेची मागणी केली होती. सर्वच शाळांत एकसूत्रता आणि एकाच दिवशी या परीक्षा घेता येऊ शकतात. अत्यल्प खर्चात आणि दर्जेदार प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. सर्वच मुख्याध्यापकांशी संपर्क मोहिम सुरु आहे. - आर. वाय. पाटील, सेक्रेटरी, मुख्याध्यापक संघ

सध्या तीन शाळा एकत्र येऊन प्रश्नपत्रिकांची छपाई केली जाते. मुख्याध्यापक संघाकडून अशा प्रकारचा विचार असेल तर त्याबाबत इंग्रजी शाळांचे संस्थापकांची बैठक घेतली जाईल. त्यासाठी लवकरच नियोजन केले जाईल. - वसंतराव देशमुख, संस्थापक अध्यक्ष व्ही. जे. देशमुख स्कूल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा, टॅक्सीला परवाना शुल्कवाढीचा दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑटोरिक्षा व ​टॅक्सीच्या परवाना शुल्काबरोबर आता अतिरिक्त परवाना शुल्काचा झटका नवीन वर्षात बसणार आहे. ऑटोरिक्षासाठी नियमीत शुल्काबरोबर अतिरिक्त परवाना शुल्क म्हणून जादा दहा हजार तर टॅक्सी परवान्यासाठी २० हजार रुपयांचा बोजा तयार होणार आहे. यामुळे ऑटो​रिक्षा वा टॅक्सीचा नवीन परवाना घेणे फारच खर्चिक ठरणार आहे. मोटार वाहन नियमामध्ये यानुसार सुधारणा करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्याबाबतच्या हरकती व सूचना मागवल्या आहेत.

गृह विभागाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेल्या सुधारणा सरकारने नवीन नियमांचा मसुदा तयार केला आहे. त्याबाबत काही मते असतील तर त्या मांडण्याचा १६ जानेवारीपर्यंत कालावधी दिला आहे. हा नवीन नियमांचा मसुदा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांबरोबर इतर वाहनांच्या परवान्यासाठीही मोठा खर्चिक ठरणारा दिसत आहे. रिक्षांपासून टप्पा वाहतूक करणाऱ्या केएमटी, एसटी बस अशा वाहनांच्या परवान्यामध्येही वाढ करण्याचे नियोजन सरकारने केले आहे.

रिक्षा, मीटर बसवलेल्या मोटार कॅब, मॅक्सी कॅब, टप्पा वाहने, माल वाहतूक वाहने, खासगी सेवा वाहनांच्या परवान्याच्या शुल्कामध्ये चारशे रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत वाढ सुचवली आहे. या वाहनांव्यतिरिक्त पर्यटकांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या शुल्कामध्ये मोठी वाढ केली आहे. १४०० ते ४४०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. त्यामध्ये पर्यटक कॅबसाठी १४०० रुपयांची तर अन्य पर्यटक वाहनांसाठी ४४०० रुपयांची वाढ अपेक्षित आहे. एकीकडे विविध वाहनांच्या परवाना शुल्कामध्ये वाढ प्रस्तावित केली असताना रिक्षा व टॅक्सी परवान्यासाठी आणखी अतिरिक्त शुल्काची आकारणी केली जाणार आहे. मुंबई महानगरच्या क्षेत्रासाठी रिक्षा परवान्यासाठी १५ हजार रुपये तर राज्यात इतर ठिकाणी दहा हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर टॅक्सी परवान्यासाठी मुंबई परिसरात पंचवीस हजार तर इतर ठिकाणासाठी २० हजार रुपये भरावे लागण्याची परिस्थिती आहे.

परवाना शुल्क नियोजीत रिक्षा १००० मोटार कॅब १००० मॅक्सी कॅब १००० टप्पा वाहतूक १००० गुडस वाहतूक १००० पर्यटक कॅब २००० अन्य पर्यटक वाहने ५०००



फिटनेस सर्टिफिकेटसाठी दंड वा परवाना निलंबन

ज्या वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटची मुदत संपली आहे व त्यांच्या नुतनीकरणासाठी विलंब होत असल्यास येथील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने कारवाई निश्चित केली आहे. त्यासाठी गेल्या वर्षात जूनमध्ये ठराव केला आहे. त्याबाबत परवाना निलंबन​ किंवा तडजोड शुल्क स्वीकारण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार त्या त्या वाहनधारकाने परवाना निलंबन करुन घ्यायचे ठरवल्यास जोपर्यंत नुतनीकरण होत नाही, तोपर्यंत वाहन आरटीओ कार्यालयात अथवा पोलिस ठाणे, एसटी डेपो येथे लावायचे आहे. त्याची तयारी नसल्यास तडजोड शुल्क भरण्याची तरतूद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय जैन संघटनेचे रविवारी अधिवेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जैन संघटेने ११ वे द्विवार्षिक अधिवेशन यंदा कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोजगिरी (ता. हातकणंगले) येथे होणार असून, या अधिवेशनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून सुरू झालेले जैन संघटनेचे काम देशातील बहुतांश राज्यांमध्ये विस्तारले आहे. या अधिवेशनात सामाजिक कामांबरोबरच जैन समाजासमोरील अडचणींवर उत्तर शोधले जाईल.

देशातील प्रत्येक संकटात सामाजिक बांधिलकीचे भान जपून मदतीचा हात पुढे करणाऱ्या जैन संघटनेने आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. व्यवसायाच्या निमित्ताने देशभरात विखुरलेल्या जैन समाजाला एकत्र आणण्याचा आणि संघटन करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातून झाल्यानंतर याला खूप चांगला प्रतिसादही मिळाला. यातूनच भारतीय जैन संघटना निर्माण झाली असून, आज देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये या संघटनेचा विस्तार वाढला आहे. जैन समाजाला भेडसावणारे प्रश्न आणि सध्याची सामाजिक स्थिती याबत विचारमंथन करण्यासाठी भारतीय जैन संघटनेकडून अधिवेशन होत आहे.

राज्य अधिवेशन यावेळी रविवारी (ता. १०) कुंभोजगिरी (ता. हातकणंगले) या ठिकाणी आयोजित केले आहे. याआधीचे अधिवेशन नाशिक येथे पार पडले होते. कुंभोजगिरी येथील ११ व्या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा आदी उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रासह कर्नाटकमधूनही जैन बांधव या अधिवेशनाला उपस्थिती लावणार आहेत.

रविवारी दिवसभर होणाऱ्या अधिवेशनात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मनोगत होईल. विवाह पद्धतीचे बदलते रुप आणि करिअर बिझनेस डेव्हलपमेंटची गरज या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. याच अधिवेशनात नवीन वर्षासाठी राज्य अध्यक्षांची घोषणा होणार आहे. अधिवेशनाला जैन बांधवांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन राज्य जैन संघटनेचे अध्यक्ष पारस ओसवाल यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपट महामंडळाचा ‘गोंधळात गोंधळ’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी​ चित्रपट महामंडळाच्या बैठकीचा 'सिनेमा'च झाल्याचे बुधवारी दिसून आला. प्रचंड गोंधळात झालेल्या बैठकीत विषयप​त्रिकेतील आठपैकी सहा विषय कोणतीही चर्चा न होता आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. या प्रकाराचा महामंडळ बचावकृती समितीच्या सदस्यांनी जाहीर निषेध केला. दरम्यान, पंचवार्षिक निवडणूक येत्या ​एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी जाहीर केले. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या सर्वसाधारण सभा झाली.

२ ऑगस्ट २०१३ रोजी झालेल्या बैठकीनंतर महामंडळाची दि्वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत दोन वर्षांच्या जमाखर्चाच्या ताळेबंद मंजुरीसह लेखापरीक्षणाला मंजुरी देणे, महामंडळ व संचालक मंडळाविरोधातील केसीसचा निकाल लागेपर्यंत सध्याच्या कार्यकारिणीला मुदतवाढ मिळण्याबाबत चर्चा करणे, महामंडळाच्या कार्यालयासाठी नूतन वास्तू खरेदीबाबत चर्चा करणे तसेच आयत्यावेळी आलेल्या सूचनांचा विचार करणे असे मुद्दे समाविष्ट होते. ताळेबंद मंजुरीसह लेखापरीक्षण अहवालाच्या मुद्यावरूनच गोंधळाला सुरूवात झाली. वारंवार सूचना करूनही गोंधळ संपण्याची शक्यता न दिसल्याने अध्यक्षांनी निवडणुकीची तारीख जाहीर करून सभा संपल्याचे घोषित केले.

बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, सहकार्यवाह संजीव नाईक, ख​जिनदार सतीश बिडकर, सहखजिनदार अनिल निकम, यांच्यासह अलका आठल्ये, प्रसाद सुर्वे, विजय कोंडके, सतीश रणदिवे, प्रिया बेर्डे, इम्तियाज बारगीर, सदानंद सूर्यवंशी, बाळकृष्ण बारामती आदी उपस्थित होते.

विकासाच्या मुद्यावर चर्चा नाही

जयप्रभा स्टुडिओच्या जागेबाबत गेल्या तीन वर्षाच्या न्यायालयीन लढ्यानंतर ही जागा वारसास्थळांच्या यादीत समाविष्ट करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. याबाबत महामंडळाची पुढील दिशा ठरवणे बैठकीत आवश्यक होते. चित्रनगरी विकासाचा प्रश्न रखडला आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचे कोणते नियोजन केले आहे. यावर विचारमंथन होणेही आवयश्क होते. अनेक वृद्ध कलावंताच्या मानधनाचे प्रस्ताव पडून आहेत. अनुदान प्रक्रियेतील त्रुटी, पडद्यामागील तंत्रज्ञांच्या सुरक्षेसाठी विमा योजना या विकासात्मक मुद्यांना बैठकीत स्पर्शही झाला नाही.

'संचालकांना फिरकू देणार नाही'

दरम्यान, महामंडळ बचाव कृती समितीने समांतर सभा घेतली. ती संचालक मंडळ बरखास्तीचा ठराव करून प्रशासक नेमण्याच्या मागणीचे निवेदन धर्मादाय आयुक्तांना देण्याचा निर्णय घेतला. उद्यापासून एकाही संचालकाला महामंडळाच्या कार्यालयात येऊ न देण्याचा ठरावही केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर कारखान्यांवर कारवाईचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी पंचगंगा खोऱ्यातील क्षमतेपेक्षा अधिक गाळप करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. शिवाय प्रदूषण रोखण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना सक्षम करण्याच्या सूचनाही संबंधित यत्रणांना दिल्या. जिल्हाधिकारी कर्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

पंचगंगा प्रदूषणात साखर कारखान्यांचा प्रमुख वाटा असल्याने कारवाईचा आग्रह चोक्कलिंगम यांनी धरला आहे. जे कारखाने क्षमतेपेक्षा अधिक गाळप करतात, त्या कारखान्यांचे मळीमिश्रीत पाणी वारंवार थेट नदीत मिसळते. या पाण्यामुळे नदीतील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होत असल्याने अशा कारखान्यांवर तातडीने कारवाई करावी, असे आदेश त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले. शिवाय जिल्ह्यातील जे डॉक्टर वैद्यकीय कचरा उठाव करण्याच्या यंत्रणेत समाविष्ट नाहीत अशा डॉक्टर्सना वैद्यकीय कचरा उठाव करण्याची सक्ती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दवाखाने, हॉटेल्स, टेक्सटाइल यांसह औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांना स्वतःचे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प राबविण्याचे बंधनकारक केले आहे.

इचलकरंजीतील सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रीया केंद्रासाठी सध्या १५० एकर जागा उपलब्ध आहे. आणखी शंभर एकर जागेसाठी द्विपक्षीय करार केला आहे. अतिरिक्त ३५० एकर जमीन संपादनाचे काम झाले आहे. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याकामी आवश्यक त्या सर्व उपाययोजना प्राधान्याने करुन ते तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही चोक्कलिंगम दिले.

बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. अमीत सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव पी. अन्ब्लगन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी न. ह. शिवांगी, पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड आदि उपस्थित होते.



केवळ आढावाच; ठोस निर्णय नाहीच

आयुक्त चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या बैठकांत केवळ आढावा, आदेश आणि सूचनांपलिकडे काहीच झालेले नाही. गेल्या वर्षभरात केवळ कारवाईचे आदेश दिले जात आहेत. प्रत्यक्षात वर्षभरात चार ते पाच वेळा प्रदूषित पाण्याचे पंचगंगा नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मेले. शिरोळ तालुक्यात तर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला, मात्र कारवाई काय झाली याबाबतचा प्रश्न कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्खननासाठी डोंगरच आंदण

$
0
0

Udaysing.Patil@timesgroup.com

शेकडो कोटींचा महसूल मिळाल्याबद्दल सरकारकडून सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील परिसर जणू आंदण म्हणून देऊन टाकल्यासारखी परिस्थिती आहे. मंजूर झालेल्या जागात खाणकामाची सुरूवात झाल्यानंतर तेथील खोदकामावर लक्ष नसल्याने खनिज संपत्तीची भयंकर लूट सुरू आहे. ही लूट समजल्यानंतर कारवाई केली जाते, पण तोपर्यंतच्या लुटीचा हिशेबच नसतो. लुटीच्या या कारभारावर अंकुश नसल्याने पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील असलेल्या सह्याद्रीच्या घाटातील जैवसाखळीच मोडून काढली जात आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारित मंजुरीची प्रक्रिया असली तरी आता नवीन पर्यावरण कायद्यामुळे केंद्रीय मंत्रालयापासूनच्या विविध मंजुरी आवश्यक असतात. एकदा परवानगी मिळाल्यानंतर खाण कंपन्या त्या परिसरात काय करतात याची माहिती सरकारी कार्यालयांना किती असते हा संशोधनाचा भाग आहे. परवानगी देताना पर्यावरणविषयक अनेक अटींचा समावेश असतो. त्या अटींची एकावेळी नव्हे तर जोपर्यंत त्या खाणींची परवानगी आहे तोपर्यंत पूर्तता होते की नाही हे पाहण्याची गरज आहे. पण ३० वर्षांतील परवानगीच्या कालावधीत कधीतरी पाहणी करुन परिस्थिती समजत नाही.

परवानगीसाठी २००५ च्या दरम्यान २८ महिने खाणी बंद राहिल्या होत्या. त्यानंतर रितसर पाच खाणी सुरू झाल्या होत्या. त्याचदरम्यान शाहूवाडीतील दोन कंपन्यांनी अभयारण्याबाबतची खोटी माहिती दिल्याने त्यांचे परवाने रद्द करण्यात आले होते. पर्यावरण तसेच वाहतूकविषयक अनेक प्रश्न निर्माण झाल्याने २०१० सालामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना एक समिती नेमावी लागली. खाण उद्योगाकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचेच ते एक द्योतक होते. त्यातून सलग तीन वर्षे केलेल्या पाहणींमध्ये अनेक सूचना खाणींना केल्या होत्या. त्यातील मोठ्या कंपनींकडूनच ​अंमलबजावणी व्यवस्थित सुरू राहिली. इतर खाणींकडून मात्र अनेक अटी, शर्तींचा भंग झाल्याचे या जिल्हास्तरीय समितीने अहवालात नमूद केले आहे.

प्रत्येक खाणींसाठी जितकी उत्खनानाची मंजुरी असते, तितका त्याचा महसूल भरला जातो. पण त्या खाणीतून किती जागेत उत्खनन केले हे मोजणारी सरकारी यंत्रणा नाही. तसेच एका ठिकाणी केलेले उत्खनन नंतर मातीने पूर्ण झाकले जात असल्याने किती खोलीपर्यंत उत्खनन केले आहे, हे समजत नाही. तिथून किती प्रमाणात उत्खनन करुन खनिज बाहेर नेले यावर कुणाचे लक्षच नसते. महसूल यंत्रणेवर याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी असली तरी जादा उत्खनन केल्याबद्दल कारवाई केल्याचे ऐकीवातही नाही. त्यामुळे ही यंत्रणा कशा पद्धतीने काम करते हे स्पष्ट होत आहे. उत्खननामुळे उडणारी धूळ व त्याचा वनस्पतींवर बसला जाणारा थर यामुळे परिसरात नवीन जंगल वाढीची प्रक्रिया थांबत असल्याचे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. त्याचा मोठा फटका जाणवतही आहे. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील भागात जंगल व पठाराच्यादिशेने उजाड अशी स्थिती होऊ लागली आहे.

मोजदादसाठी यंत्रणा हवीच

जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून पाहणी केली जात असताना अनेक खाणींवरील कामाच्या त्रुटी लक्षात आल्या. अनेक अटीशर्ती भंग होत असल्याचे निदर्शनास आले. त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न काही खाणींनी केला. पण या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी ऑनलाइन वे ब्रीज, सक्षम पास यंत्रणा व त्याची तपासणी करणारे चेकपोस्ट या प्रशासन पातळीवर राबवायच्या खबरदारीबाबत काही होत नाही. यातून अनेक ठिकाणाहून बेकायदेशीरपणे उत्खनन होऊन जंगलाचा परिसर उजाड बनत आहे.

उदय गायकवाड, सदस्य, जिल्हास्तर समिती, खाणकाम

....

सरकारला मिळालेला महसूल

१९८५ ते २००५

१६ खाणी

५६ कोटी ३२ लाख ३५ हजार १०२ रुपये

.....

२००६ ते २०१२

९ खाणी

११३ कोटी ३० लाख ५ हजार ३७७ रुपये

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images