Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरच्या सक्रिट बेंचचा तिढा कायम

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात स्थापन व्हावे या मागणीसाठी सहा जिल्ह्यातील वकील जनआंदोलन करत आहेत. राज्य सरकारने कोल्हापुरात हायकोर्टाचे सर्किट बेंच स्थापन करण्यात यावे असा मंत्रीमंडळ ठराव हायकोर्टात पाठवला आहे, पण याबाबत चालढकल झाली. निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी मोहित शहा यांनी याबाबत कोणताच निर्णय न दिल्याने नवीन न्यायमूर्तीची नियुक्ती होईपर्यंत हा प्रश्न प्रलंबित राहणार आहे. त्यातच आंदोलनावेळी वकिलांनी मुख्य न्यायमूर्तींचा पुतळा जाळल्याने अवमान याचिकेवरील सुनावणीसाठी वकिलांना मुंबईच्या फेऱ्या कराव्या लागत आहेत.

२००८ मध्ये महाराष्ट्र व मुंबई बार कौन्सिलच्या निवडणुकीत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यातील वकील कोल्हापुरात खंडपीठ स्थापण्यासाठी एकत्रित आले. २००९ मध्ये तत्कालीन कायदामंत्री विरप्पा मोईली यांच्या कारकीर्दीत कायदा आयोगाचे न्यायमूर्ती लक्ष्मणन कमिटीने कोल्हापुरात खंडपीठ स्थापन करण्याबाबतची शिफारस केली. २०१३ मध्ये खऱ्या अर्थाने खंडपीठासाठी लढा सुरू झाला. २०१३ मध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष शिवाजीराव राणे यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट २०१३ ते २२ ऑक्टोबर या ५५ दिवसात न्यायालयीन कामावर सहा जिल्ह्यातील वकिलांनी बहिष्कार घातला. खंडपीठाच्या मागणीसाठी देशात प्रथमच ५५ दिवस बहिष्कार घालण्याचे हे एकमेव उदाहरण होते. या आंदोलनाला केवळ वकिलांचाच नव्हे तर सामान्य जनताही रस्त्यावर उतरली. आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्किट बेंचचा प्रस्ताव हायकोर्टाच्या मुख्य मुख्य न्यायमूर्तीकडे पाठवला, पण त्यावर हायकोर्टाने निर्णय घेतला नाही. त्यानंतर २०१४ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे हा प्रश्न मागे पडला.

राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार जाऊन ऑक्टोबर २०१४ मध्ये भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आले. कृती समितीने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला. हायकोर्टाने यापुढे नवीन खंडपीठ राज्यात स्थापन करणार नाही असा ठराव राज्य सरकारकडे मागितला. त्यामुळे सरकारची गोची झाली. पुण्यातही खंडपीठची मागणी होऊ लागली, पण कोल्हापुरातील खंडपीठाची मागणी न्याय व कायदेशीर असल्याने राज्य सरकारला टाळता येणे शक्य नव्हते.

अखेर १२ मे २०१५ रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने खंडपीठ स्थापन करावे असा ठराव सरकारने केला, पण या ठरावात पुण्यातही खंडपीठ स्थापन करावे, अशी उपसूचना मांडली. हा ठराव मुख्य न्यायमूर्ती मोहीत शहा यांच्याकडे पाठवला. न्यायमूर्ती शहा कोल्हापुरातील आंदोलनाशी परिचित असल्याने ते सर्किट बेंचची स्थापना करतील असे वाटत होते. सप्टेंबर २०१५ च्या पहिल्या आठवड्यात शहा निवृत्त होणार होते. तत्पूर्वी त्यांनी गोवा बार असोसिएशनला भेट दिली. त्यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला बोलावले होते, पण निवृत्तीच्या शेवटच्यादिवशी त्यांनी खंडपीठाबाबत कोणताच निर्णय न घेतल्याने सहा जिल्ह्यातील वकिलांच्या संतापाचा कडेलोट झाला. कोल्हापुरात जिल्हा कोर्टाच्या आवारात न्यायमूर्तींविरोधात घोषणा देऊन त्यांचा पुतळा जाळण्यात आला. तीन दिवस कोर्ट कामकाजावर बहिष्कार घालण्यात आला. आंदोलनाची दखल घेत हायकोर्टाने कृती समितीतील सहा जिल्ह्यातील बार असोसिएशनला हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली. या याचिकेच्या सुनावणीवेळी कोर्टाने यापुढे न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणार नाही असे लिहून घेतले. या प्रश्नांवर कोल्हापूर बार असोसिएशनच्या बैठकीतही वादावादी झाली. सध्या कॉलिजिअमच्या प्रश्नामुळे हायकोर्टाने नवीन मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती झालेली नाही. प्रभारी न्यायमूर्ती हायकोर्टाचे काम पहात आहेत तर दुसरीकडे प्रश्न सुटण्यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला तरी यापुढे न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालणार नाही असे हायकोर्टाला लिहून दिले आहे. यामुळे सध्या सर्किट बेंच स्थापनेचा प्रश्न अधांतरीच राहिला आहे.



अवमान याचिकेसंदर्भातील कागदपत्रे जमवण्याचे काम सुरू आहे. जानेवारीत नवीन न्यायमूर्तीची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नियुक्तीनंतर न्यायमूर्तीची भेटीची वेळ ठरवणे, आंदोलनाची दिशा ठरवणे याबाबत खंडपीठ कृती समितीची लवकरच बैठक घेतली जाईल.

- राजेंद्र चव्हाण, निमंत्रक, खंडपीठ कृती समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उजळणार कोल्हापूर जिल्ह्यातील वाड्या वस्त्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वातंत्र्याची ६८ वर्षे उलटली तरी, प्रगत समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात आजही ३० वाड्या-वस्त्या विजेविना अंधारात आहेत. या वस्त्यांवर वीज पोहोचविण्यासाठी महावितरणने चार कोटींचा आराखडा तयार केला होता. त्याला मंजुरी मिळली असून, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या संयुक्त योजनांमधून अंधारातील गावे या नव्या वर्षात उजळून निघणार आहेत.

जिल्ह्यातील १२३३ पैकी १२०३ गावांमध्ये वीज पोहोचली होती. मात्र स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही ३० वाड्या-वस्त्या अंधारात चाचपडत होत्या. विशेषतः दुर्गम भागातील धनगरवाडेच विजेपासून वंचित राहिले होते, त्यामुळे त्यांच्या प्रगतीलाही ब्रेक लागला होता. विजेअभावी मुलांना अभ्यासही करता येत नव्हता, त्याचबरोबर शेतीसाठीही वीज नसल्याने आधुनिक शेती करता येत नव्हती. हीच बाब लक्षात घेऊन महावितरणने जिल्ह्यातील ३० वाड्या-वस्त्यांसाठी प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानंतर चार कोटींचा निधी मंजूर झाला असून, यातून सन २०१६ मध्ये अप्रकाशित वाड्या, वस्त्या उजळणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून आठ गावांमध्ये, तर केंद्र सरकारच्या दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेतून २२ गावांमध्ये वीज पोहोचणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण १०७ किलोमीटर वीज वाहिन्यांची जोडणी केली जाणार आहे. उच्चदाबाच्या ६७ किलोमीटर, तर लघुदाबाच्या ४० किलोमीटर वीज वाहिन्यांची जोडणी होणार आहे.

जानेवारी २०१६ पासून या कामाला सुरुवात होणार असून, येत्या वर्षभरात सर्व गावांमध्ये वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. केवळ महावितरणच्या उत्पन्नवाढीसाठी ही योजना नसून, गेल्या अनेक वर्षांपासून अंधारात जगणाऱ्या लोकांची घरे प्रकाशमान करण्यासाठी ही योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी सांगितले.







योजनानिहाय होणारा खर्च

जिल्हा नियोजन समिती - एक कोटी ३४ लाख

दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना - दोन कोटी ७४ लाख





'संपूर्ण जिल्हा प्रकाशमान करण्याच्या दृष्टीने महावितरणचे काम सुरू आहे. तीस वाड्या-वस्त्या विजेपासून वंचित होत्या. आता नवीन योजनेतून तेथे वीज जोडण्याचे काम सुरू होणार आहे. लवकरच संपूर्ण जिल्ह्यात वीज पोहोचेल आणि एकही गाव विजेपासून वंचित राहणार नाही.'

शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांमध्ये पुन्हा ई-लर्निंग

$
0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

कोल्हापूर : आनंददायी शिक्षणाबरोबर त्याचे सोपे आणि सहज ज्ञान अवगत होण्यासाठी जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये ई-लर्निंग शिक्षण पद्धतीला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा दिल्यानंतर सरकारी अनुदान थांबवल्यामुळे या प्रक्रियाला 'खो' बसला होता. मात्र, त्यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेने सामाजिक संस्थांसोबत करार करुन जिल्हा परिषदेच्या २०० शाळांमध्ये ई-लर्निंग प्रणाली देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ७० लाख रुपयांची तरतूद केली आहे. सरकारच्यावतीनेही प्रलंबित अनुदान पुन्हा देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून ई-लर्निंग प्रणालीला पुन्हा गती येणार आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागवी, गळतीचे प्रमाण कमी व्हावे आणि संगणक साक्षरतेमध्ये वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ई-लर्निंग प्रणाली देण्यास सुरुवात झाली होती. जिल्हा परिषदेच्या २५० शाळांमध्ये ई-लर्निंग प्रणाली दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. ऑडिओ व्हिज्युअल्समुळे उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना आणि कमी क्षमतेच्या विद्यार्थ्यांना अधिक फायदा झाला होता. टप्प्याटप्प्याने सर्व शाळा ई-लर्निंगद्वारे जोडण्याचे नियोजन होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून सरकराकडून त्यासाठीचे अनुदान मिळण्याचे बंद झाले आहे.

सरकारी अनुदानाबरोबरच अनेक शाळांमध्ये लोकसहभागातून ही प्रणाली उपलब्ध झाली होती. लोकसहभागाला मिळालेल्या प्रतिसादानंतर सामाजिक संस्थांकडून अशी प्रणाली मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पहिल्याच टप्प्यात एका सामाजिक संस्थेने ५० लाख रुपये किंमतीचे सॉफ्टवेअर देण्याचे मान्य केले आहे. याबरोबरच सरकारी अनुदानही मिळणार असल्याने ई-लर्निंग देण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.



जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी गेल्या शैक्षणिक वर्षापासून विविध उपक्रमांना सुरुवात केली आहे. त्याचबरोबर माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला आहे. त्यामुळे शाळांची पटसंख्या वाढली आहे. लोकसहभागातून ई-लर्निंग प्रणालीचा स्वीकार केल्यानंतर आता सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

अभिजित तायशेटे, सभापती, अर्थ व शिक्षण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी पॉझिटिव्ह पाऊल

$
0
0

janhavi.sarate @timesgroup.com

कोल्हापूर : सरकारच्या अनेक चांगल्या योजना तळागाळपर्यंत पोहोचत नाहीत आणि पोहोचल्या तर किचकट कागदपत्रांमुळे त्याचा लाभ गरजूंना मिळत नाही. मात्र सरकारने एचआयव्हीसह जगणाऱ्यांसाठी नव्या वर्षात पॉझिटिव्ह पाऊल उचलले आहे. संजय गांधी निराधार योजनेतील अटी शिथिल केल्याने कोल्हापुरातील १७ हजारांहून अधिक एचआयव्हीसह जगणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील एचआयव्हीसह जगणाऱ्यांचा टक्का कमी झाला असला तरी राज्याच्या तुलनेत कोल्हापूरचा टक्का अधिकच आहे. गेल्या पाच वर्षात कोल्हापुरात हे प्रमाण कमी करण्यासाठी यश आले आहे. जिल्ह्यात सध्या १७ हजारांहून अधिक एचआयव्हीसह जगणारे लोक आहेत. एचआयव्हीसह जगणाऱ्यांना सामाजिक संस्थांमार्फत रुग्ण व नातेवाईकांना विविध सोयी सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जातो. यात सरकारच्या संजय गांधी, श्रावण बाळ, बालसंगोपन इत्यादी योजना मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पहिल्या टप्प्यात या योजनेचा लाभ घेण्यासाठी पाचशे अर्ज भरण्यात आले आहेत. सर्वसामान्यांप्रमाणे अधिक कागदपत्रांच्या कचाट्यात न अडकवता केवळ संस्थेचे पत्र आणि रेशकार्डाची प्रत इतकीच कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागणार आहे. सरकारच्या या पॉझिटिव्ह स्टेपमुळे त्यांच्या जीवनातील थोडा का असेना पण दिलासा मिळणार आहे.

सध्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारिरीक व मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके आदींसाठी राज्य सरकारच्यावतीने मासिक साडेसातशे रुपये अर्थसाह्य दिले जाते. आता योजनेत एचआयव्हीसह जागणाऱ्यांसाठी कागदपत्रांची अट शिथिल केली गेली आहे. त्यामुले सर्व एचआयव्हीसह जगणाऱ्यांना योजनेचा लाभ लवकरच मिळणार आहे. याचे नियोजन करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी व जिल्हा एड्स नियंत्रक विभागाची बैठक शुक्रवारी होणार आहे.



कोल्हापूर जिल्ह्यात सतरा हजारांहून अधिक एचआयव्हीसह जगणारे लोक आहेत. या सर्वांना सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केला जाणार आहे. त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचली जात आहेत. लवकरच या योजनेचा लाभ एचआयव्हीसह जगणाऱ्यांना मिळणार आहे.

- दीपा शिपूरकर, कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजांसोबत आता ऑनलाइन संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाने प्रशासनाचा कारभार अधिक पर्यावरणपूरक व गतिमान करण्याचा संकल्प नव्या वर्षांत केला आहे. विद्यापीठाचा संलग्नित कॉलेजांसोबत होणारा सर्व कार्यालयीन पत्रव्यवहार यापुढे पेपरलेस होईल. त्यासाठी इ-मेलचा वापर करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. विद्यापीठाने सर्व कॉलेजला '@unishivaji.ac.in' या डोमेनसह स्वतंत्र अधिकृत ई-मेल तयार करून दिले आहेत. या इमेलवनरुनच पत्रव्यवहार करण्यात येणार आहे.

शिवाजी विद्यापीठातील विभागप्रमुख तसेच विद्यापीठाशी संलग्नित कॉलेजचे, मान्यताप्राप्त संस्थांचे सर्व प्राचार्य, संचालक यांना विद्यापीठाकडून वेळोवेळी विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भात पत्रव्यवहार, परिपत्रके पाठविली जातात. ही पत्रे, परिपत्रके काही वेळेला कॉलेजला मिळत नाहीत. काही वेळेला वेळाने मिळतात. राज्य सरकारकडूनही विद्यापीठ कार्यालयास विद्यापीठाशी व कॉलेजची संबधित विविध विषयांची आवश्यक माहिती तत्काळ इ- मेलद्वारे मागविली जाते. त्या वेळी कॉलेजकडून माहिती वेळेत न मिळाल्यास सरकारडे पाठविण्यासही विलंब होतो.

'विद्यापीठ प्रशासन वेळोवेळी कॉलेजकडून इ-मेल आयडीची मागणी केली. मात्र इ-मेल आयडी कॉलेजकडून पाहिजे जात नसून काही इ-मेल आयडी प्राचार्य व संबंधित सेवकांचे व्यक्तिगत असतात. त्यावेळी संबंधितांची बदली झाल्यास इ-मेलचे उत्तर मिळत नाही. त्याचा परिणाम विद्यापीठ कामकाजावर होत असतो. यासाठी विद्यापीठाने सर्व अधिविभाग, कॉलेज आणि मान्यताप्राप्त संस्थांना अधिकृत स्वतंत्र इ-मेल आयडी दिले आहेत' अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी दिली.



पर्यावरणपूरक व गतिमान प्रशासनासाठी कॉलेजांना त्यांचे स्वतंत्र, अधिकृत इ-मेल अकाऊंट निर्माण करून देण्याचा निर्णय घेतला. या इ-मेल अकाऊंटचा वापर कॉलेजांतील जबाबदार व्यक्तीला हाताळण्यासाठी देण्याचे संपूर्ण अधिकार प्राचार्यांकडे असतील. यापुढे विद्यापीठाची सर्व सामायिक परिपत्रके, पत्रे याबाबतचा व्यवहार इ-मेलद्वारेच केला जाईल.

डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटकांसाठी ‘हाऊज खास’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्यटनासाठी दुसऱ्या शहरात भटकंती करून परतल्यानंतरही पर्यटकांना घरी आल्याची अनुभूती देणारा हाऊज खास हा ट्रेंड कोल्हापुरातही सुरू झाला आहे. पर्यटनासाठी निवडलेल्या शहरातील या हाऊज खास अपार्टमेंटमधील अख्खा फ्लॅट पर्यटनकाळात पर्यटकांच्या मालकीचा होतो. चहा नाष्टा किंवा जेवण करता येईल असे साहित्य इथल्या स्वयंपाकघरात असल्यामुळे पर्यटकांना अगदी घरची चवही मिळू शकते. टुरिझममधील हा ट्रेंड कोल्हापुरात राजेंद्रनगर येथे सुरू झाला आहे. दोन महिन्यांपासून पर्यटकांसाठी सुरू झालेल्या या 'हाऊस खास'मधील प्रत्येक फ्लॅट हाऊसफुल्ल आहे.

पर्यटनाचा बेत ठरला की नियोजनाची सुरुवात होते. ज्या ठिकाणी फिरायला जायचे आहे, तिथे राहण्याची व्यवस्था कशी आहे हे पाहून आणि त्यावर आर्थिक खर्चाची मांडणी केली जाते. त्यातही सहकुटुंब पर्यटनासाठी जाणार असेल तर हॉटेलचा खर्चच एकूण पर्यटनाच्या बजेटच्या निम्मा असतो. त्यामुळे हॉटेलचा खर्च वाचवण्यासाठी पर्यटक यात्री निवास, धर्मशाळेचा शोध घेतला जातो. मात्र पर्यटकांना पर्यटनस्थळी निवासाचा आनंदही मिळावा या हेतूने विस्तारत असलेल्या शहरांमध्ये हाऊज खास ही संकल्पना नावारुपाला येत आहे. सध्या हैदराबाद, नाशिक, पुणे, कोकण, गोवा याठिकाणी पर्यटकांचा प्रतिसाद लाभत असलेला हा ट्रेंड कोल्हापुरातही आकाराला आला आहे. कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी आणि पर्यटकांच्या पसंतीसाठी हाऊस खास या संकल्पनेवर आधारित अपार्टमेंट भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.

सुटसुटीत बुकिंग प्रक्रिया

हाऊज खास अपार्टमेंटचे व्यवस्थापन वेबसाइट तयार करते. ज्या शहरात पर्यटनासाठी जायचे आहे तेथील हाऊज खासचे बुकिंग ऑनलाइन करायचे असते. आर्थिक व्यवहार ऑनलाइन होतो आ​णि पर्यटनशहरात आल्यानंतर थेट किल्लीच पर्यटकांच्या हातात मिळते. कुटुंबातील कितीही सदस्य असले तरी सगळा फ्लॅट राहण्यासाठी वापरता येतो. या ट्रेंडला पर्यटकांचा प्रतिसाद मिळत आहे.



जगभरात प्रवास केल्यामुळे मला हाऊस खास या संकल्पनेची माहिती होती. पर्यटकांसाठी अतिशय उपयुक्त आणि सोयीची अशी ही सुविधा कोल्हापूरसारख्या शहरातही आकाराला यावी या उद्देशाने जागा डेव्हलप करण्याचा निर्णय घेतला. किशोर आहिरे यांच्या पुढाकाराने हाऊस खास या सर्व्हिस अपार्टमेंट संकल्पना राबवणाऱ्या माध्यमाशी जोडले गेलो आणि त्यातून कोल्हापुरात पहिले हाऊस खास पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले. या संकल्पनेमुळे कोल्हापूरच्या पर्यटन संस्कृतीला चालना मिळेल.

- विश्वास कदम, संचालक, हाऊज खास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उचगांव येथे महाविद्यालयीन युवकाचा खून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उचगांव (ता. करवीर) येथे राजवर्धन उर्फ नन्ह्या संभाजी गवळी (वय १८, रा.गवळी गल्ली, शनिवार पेठ) या महाविद्यालयीन तरूणांचा खून झाला. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. महाविद्यालयातील वादाच्या कारणावरून चाकूचा घाव वर्मी बसल्याने खुनाची घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

नववर्षानिमित्त राजवर्धन हा शिवराज अनिल कुलगुटकी (१९), ओंकार सूर्यकांत दीक्षित (१९, दोघे, रा. शनिवार पेठ), योगेश राजेंद्र नलवडे (वय १९, रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) या मित्रांसोबत मोटारसायकलवरून मॅकडोनाल्ड फूडकडे निघाले होते. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील उचगांव ब्रीजच्या खाली राजवर्धनला त्याचा मित्र शिवा पोवार भेटला. त्याने मित्रांना थांबायला सांगितले. मोटारसायकलवरून उतरून राजवर्धन व शिवा ब्रीजच्या बाजूला गेले. यावेळी शिवा व राजवर्धन यांच्यात वाद झाला. शिवाने राजवर्धनच्या जांघेत चाकूचा वार केल्याने तो खाली कोसळला. त्यानंतर शिवा पळून गेला. त्याच्या तिघा मित्रांनी राजवर्धनला उपचारास दाखल करण्यासाठी रिक्षाने राजारामपुरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. वार वर्मी बसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. राजवर्धनवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

ही घटना कळताच राजवर्धनच्या मित्रांनी राजारामपुरीतील हॉस्पिटलसमोर मोठी गर्दी केली. राजारामपुरी पोलिसही हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी राजवर्धनाच्या मित्रांकडून घटेनची माहिती घेतली. राजवर्धन विवेकानंद महाविद्यालयात अकरावी आर्टसमध्ये शिकत होता. तसेच तो शहाजी महाविद्यालयात जात होता. दोन दिवसांपूर्वी त्याचा व शिवाचा वाद झाला होता, पण तो मिटला होता असे त्याच्या मित्रांनी सांगितले. राजवर्धनच्या पश्चात वडील, भाऊ, आई असा परिवार आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फेरीवाला हटाव’ वर आयुक्त ठाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नो फेरीवाला झोनमध्ये व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर सोमवारपासून (४ जानेवारी) कारवाई करण्यावर आयुक्त पी. शिवशंकर ठाम आहेत. निर्णय झालेला नसताना प्रशासन प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगून प्रशासन गडबडीने जर कारवाई करणार असेल तर संघर्षाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा ​फेरीवाल्यांकडून दिल्याने पुन्हा महापालिका व फेरीवाल्यांमध्ये संघर्ष सुरू होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, महापौर अश्विनी रामाणे यांनी सोमवारपासून कारवाई सुरू करु नये, चर्चा करुन सामोपचाराने निर्णय घेण्यासाठी पुन्हा बैठक बोलवावी, असे पत्र आयुक्तांना देणार असल्याचे सांगितले. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी असल्याने त्यांच्याशीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी महापालिकेत आयुक्त व फेरीवाल्यांची चर्चा झाली. तत्पूर्वी सर्व संघटनांची महाराणा प्रताप चौकात बैठक झाली. महापालिकेला सहकार्य करण्याची भूमिका आहे. पण मनमानी पद्धतीने कारवाई होणार असेल तर संघर्ष करावा लागेल, अशी चर्चा झाली.

प्रभाग व शहर समितीच्या मंजुरीनंतर शहरातील ७४ ठिकाणे फेरीवाल्यांसाठी निश्चित करण्यात आली. तर ७६ रस्त्यांवर फेरीवाल्यांना निर्बंध घालण्यात आले आहेत, असे महापालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार सोमवारपासून जे फेरीवाले नो फेरीवाला झोनमध्ये व्यवसाय करतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याकरिता दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पथक फिरणार आहे. याबाबत झालेल्या बैठकीत फेरीवाल्यांच्यावतीने आर. के. पोवार यांनी शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, शिवाजी चौक, जोतिबा रोड, मध्यवर्ती बसस्थानक या ठिकाणचा फेरीवाल्यांचा प्रश्न मोठा आहे. त्यांच्या जागांसाठी चर्चा करण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले आहे. त्यातील महाद्वार रोडवर सारडापासून पुढे पट्टे मारुन दिल्याप्रमाणे व्यवसाय करतील. जो​तिबा रोडच्या फूल विक्रेत्यांना भवानी मंडपातील जागेत बसवायचे असेल तर ट्रस्टची परवानगी घेऊन द्या. तसेच मध्यवर्ती बसस्थानकाजवळील ​नवीन काढलेला रस्ता वाहनांना बंद करुन फेरीवाल्यांसाठी जागा द्या. त्यानुसार उद्यापासून पट्टे मारुन दिल्यास सहकार्य करण्यास तयार आहोत, असे सांगितले.

दिलीप पवार, महमदशरीफ शेख, नंदकुमार वळंजू, समीर नदाफ यांनी मते व्यक्त केली. प्रशासनाला सहकार्य करु, पण कोणतीही मंजुरी दिलेली नाही, असा साऱ्यांचा सूर होता. त्यामुळे चर्चा पूर्ण होण्यापूर्वी कारवाई करणे योग्य नसल्याचे सांगितले. यावेळी इस्टेट अधिकारी संजय भोसले यांनी पूर्वी सर्व चर्चा झाली असून काही जागांबाबत फक्त चर्चा करायची होती, असे नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले. तर महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांना इराणी खणीजवळ जागा दिल्याचे समजल्याने फेरीवाल्यांमध्ये असंतोष आहे. त्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन ​पुनर्वसनाची जागा योग्य आहे का हे पहावे असे आयुक्तांना राजेंद्र महाडिक यांनी सांगितल्याने शेवटी आयुक्तांनी ४ तारखेपासून अंमलबजावणी होणार. तसेच ज्या ठिकाणी पुनर्वसन केले आहे, तिथे जर नको असेल तर त्यांच्या चिठ्ठ्या टाकून जागा दिल्या जातील. तिथे जावे लागेल, असे सांगत बैठक संपवली. यामुळे फेरीवाल्यांनी महापौरांची भेट घेतली. त्यामध्ये ही परिस्थिती सांगितल्यानंतर आयुक्तांना चार तारखेपासून कारवाई करु नये. त्यासाठी चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे पत्र देण्याचे आश्वासन दिले.

बैठकीस सुरेश जरगा, अशोक भंडारे, रघुनाथ कांबळे, रमाकांत उरसाल, सुमन घोसे, मारुती भागोजी, किरण गवळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इस्लामपूर डॉक्टर दाम्पत्याचा खून चोरीसाठी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
इस्लामपूर येथील डॉक्टर दाम्पत्याचा खून चोरीच्या उद्देशाने झाल्याचा दावा शुक्रवारी सांगली पोलिसांनी केला. या प्रकरणी शुक्रवारी आणखी एका संशयिताला अटक करण्यात आली असून, तो अल्पवयीन असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकारांना सांगितले. कोणत्याही गुन्ह्याच्या तपासातील माहितीला ठोस पुराव्यांची गरज असते. त्यामुळे माहिती देताना काळजी घेणे आवश्यक आहे. इस्लामपूरच्या दुहेरी खुनाच्या घटनेचा तपास अद्याप सुरू आहे, असेही ते म्हणाले.
इस्लामपुरात डॉ. प्रकाश आणि डॉ. अरुणा कुलकर्णी या दाम्पत्याची अत्यंत निदर्यीपणे हत्त्या करण्यात आल्याची घटना २० डिसेंबर रोजी उघडकीस आली. या घटनेने सर्वत्र खळबळ माजली होती. दाम्पत्याच्या अंगावरील दागिने आणि घरातील अन्य वस्तू जिथल्या तिथे असल्याने ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली नसावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. त्यानंतर जस-जसे दिवस वाढत जातील तस-तसे हत्येचे गुढही वाढतच राहिले. अखेर पोलिसांनी पत्रकारांना बोलवून डॉक्टर दाम्पत्याच्या हत्येप्रकरणी नर्ससह तिघांना अटक केल्याचे जाहीर केले. परंतु हत्येचे कारण गुलदस्त्यातच ठेवले.
सध्या या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्याकडे आहे. २ जानेवारीला अटक केलेल्या तिघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आहे. याचवेळी घनवट यांनी चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे स्पष्ट केल्याने या प्रकरणाच्या तपासाची दिशाच बदलल्याचे समोर येत आहे.
पर्स चोरी हेच खुनामागील मुख्य कारण
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वर्षभरातील पोलिस कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर शुक्रवारी पत्रकारांनी इस्लामपूरमधील डॉक्टर दाम्पत्याच्या हत्येचा विषय काढला. त्यावेळी तपास अधिकारी घनवट म्हणाले, 'हे हत्याप्रकरण चोरीच्या उद्देशाने झाल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी एका बालगुन्हेगाराला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या घरातून एक पर्स चोरीला गेली होती. त्यामध्ये रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि मोबाईल होता. या खुनाला पर्स चोरी हेच कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत अनेकांकडे चौकशी झाली करण्यात आली आहे. तीन संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारपर्यंत आहे. चोरीच्या प्रकरणाचा आणि हत्या प्रकरणाचा घटनाक्रम विस्ताराने सांगण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्लामपुरात होणार स्त्री जन्माचे स्वागत

$
0
0

इस्लामपूर : राजारामबापू सह. साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिवंगत राजारामबापू पाटील यांचे खंदे सहकारी, ज्येष्ठ नेते बाबासो (दादा) पाटील यांच्या ८८व्या जयंतीनिमित्त साखराळे ग्रामपंचायतीच्या वतीने येत्या वर्षभरात गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या जन्माचे स्वागत करून या मुलींच्या नावे ठेव पावती करण्याचा उपक्रम राबविणार असल्याची घोषणा करण्यात आली.
तसेच जोतिर्लिंग सह. पाणीपुरवठा संस्था विक्रमी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचा बाबासो दादांच्या जयंतीदिनी 'कृषी भूषण' पुरस्काराने सन्मान करणार आहे. या प्रसंगी साखराळे बहेरोड रस्त्यावर स्वागत कमानीच्या कामाचे भूमीपूजन करून प्राथमिक शाळा, अंगणवाड्यातील मुलांना फळांचे वाटप करण्यात आले. राजारामबापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील समारंभाच्या
अध्यक्षस्थानी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआर हॉस्पिटलमध्ये तीन हजारांत अँजिओग्राफी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआर हॉस्पिटलमध्ये हृदयशस्त्रक्रिया विभागातील अँजिओग्राफीचा दर सहा हजार रूपयावरून तीन हजार रूपये करण्यात आला आहे, अशी माहिती राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाविद्यालय व सीपीआर हॉस्पिटलच्या प्रशासनात सुसूत्रता आणण्यासाठी दोन उपअधिष्ठाता पदाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सीपीआरमध्ये सुविधा उपलब्ध करून गतवैभव प्राप्त करून द्यावे या मागणीसाठी सीपीआर बचाव कृती समितीसह विविध पक्ष व संघटनांनी यापूर्वी आंदोलन केले आहेत. डॉ. रामानंद यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लक्ष घातल्याने सुविधा पुरवण्यावर भर दिला जात आहे. सीपीआर हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफीचा दर सहा हजार रूपये तर खासगी हॉस्पिटलमध्ये तीन हजार हजार होता. अँजिओग्राफीचा दर कमी करावा अशी मागणी होत होती. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार एक जानेवारीपासून अँजिओग्राफीचा दर तीन हजार रूपये करण्यात आला आहे.

तसेच सीपीआरमध्ये दोन व्हेंटिलेटर उपलब्ध झाले असून त्याचा वापर आयसीयूमध्ये करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून दोन व्हेंटिलेटर खरेदीला सरकारची प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच आणखी दोन व्हेंटिलेटर सीपीआरमध्ये दाखल होतील. सिटी स्कॅन मशिनसह खोली तयार करण्यासाठी ६ कोटी ५१ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला असून साडेतीन महिन्यात सिटी स्कॅनची सोय होऊ शकते. ट्रामा केअर सेंटरचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.

महाविद्यालय कार्यकारिणी बैठकीत प्रा. डॉ. दत्ता पावले व डॉ. वसंत देशमुख यांची उपअधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोघेही कोल्हापूरचे असून सीपीआरमधील सुविधांबाबत ते प्रयत्नशील असतात. डॉ. पावले महाविद्यालयीन तर डॉ. देशमुख हे सीपीआर हॉस्पिटलकडे लक्ष देतील. डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी, विद्यार्थी अशा २१०० स्टाफसह सीपीआरमध्ये रूग्णांना सुविधा देण्यास प्रयत्न केले जातील असे डॉ. रामानंद यांनी सांगितले.

अतिक्रमणांवर लवकरच बडगा

सीपीआरमधील वाढत्या अतिक्रमणांवर लवकरच बडगा उगारला जाईल, असे डॉ. रामानंद यांनी सांगितले. सीपीआरमध्ये अतिक्रमण वाढले असून अतिक्रमण करणारे सीपीआरची लाईट व पाणी फुकट वापरतात याकडे लक्ष वेधण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनेते दत्ता पवार यांचे सांगलीत निधन

$
0
0

कुपवाड : सूत्रधार, कळतय पण वळत नाही, फटाकडी, आंटीने वाजवली घंटी यासह ३०हून अधिक हिंदी मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलेले ज्येष्ठ अभिनेते दत्ता पवार (६५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, एक मुलगा, पत्नी बंधू असा परिवार आहे.
सांगलीतील नाट्य आणि सिनेक्षेत्रातील एक गुणी चेहरा हरपला. गिरीश कर्नाड, नाना पाटेकर, स्मिता पाटील, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबर सूत्रधार व इतर गाजलेल्या चित्रपटात लक्षवेधक भूमिका त्यानी साकारली होती. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांनीही दत्ता पवार यांच्या अभिनयाचे कौतुक केले होते. राजर्षी शाहूसह अनेक मराठी मालिकांमध्ये त्यानी काम केले. राज्य नाट्य स्पर्धाही त्यानी गाजवल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यानी त्याना अभिनय पाहून मुंबईत रहायला येण्याचे सूचवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजमधील सुविधांचे होणार ‘ऑडिट’

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

आमच्या कॉलेजमध्ये वसतिगृह, क्रीडांगण, ग्रंथालय, पुरेसा प्रशिक्षित स्टाफ आहे. गुणवत्ता आणि भौतिक सुविधांनी परिपूर्ण कॉलेज असल्याचा भूलभुलैया अॅडमिशन प्रक्रियेवेळी कॉलेजकडून केला जातो. माहितीपत्रकांत तशी बरीच माहिती दिली जाते. आता याच माहितीची उलटतपासणी शिक्षण सहसंचालक कार्यालय करणार आहे. सीनिअर कॉलेजनी खोटी माहिती दिल्यास कॉलेजचे वेतन थांबविले जाणार आहे. त्यामुळे कागदावरच शंभर टक्के सुविधा दाखविणारे कॉलेज अडचणीत येणार आहेत. येत्या १५ जानेवारीपर्यंत अनुदानित सीनिअर कॉलेजकडून ही माहिती मागविली आहे.

सीनिअर कॉलेजमध्ये अधिक सुविधा असल्याची भुलभुल्लय्यांची जाहिरात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील काही कॉलेजकडून केली जात होती. प्रत्यक्षात विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ग्रंथालय, वसतिगृह, क्रीडांगणाची आणि प्रशिक्षित स्टाफ नसल्याचा अनुभव येतो. त्याबाबतच्या अनेक तक्रारी विद्यार्थ्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण सहसंचालक कार्यालयाने तीन जिल्ह्यातील कॉलेजला स्वतःच्या बेवसाइटवर कॉलेजमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधांची माहिती अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. कॉलेजमधील विद्यार्थी संख्या, प्रशिक्षित प्राध्यापक, ग्रंथालयात उपलब्ध असलेली ग्रंथसंपदा, क्रीडांगण, अध्यापन केल्या जाणाऱ्या शाखा, तुकडीची संख्या, स्वच्छतागृहे, इमारती, त्यात उपलब्ध असलेल्या खोल्या, प्राध्यापकांची शैक्षणिक पात्रता, कॉलेजमधील ग्रीन कॅम्पस, दुचाकी, चारचाकी पार्किंग स्टँण्ड, सीसी टिव्ही कॅमेरे, वाय-फायची सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा यांसह कॉलेजमधील उपलब्ध असलेल्या सर्व भौतिक आणि शैक्षणिक माहिती बेवसाइटवर टाकावी लागणार आहे. कॉलेजने दिलेली ही माहिती शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून तपासली जाणार आहे. उपलब्ध असलेल्या सुविधा नसल्यास आणि खोटी माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कॉलेजचे वेतन थांबविले जाणार आहे.

.......

कोट

सर्वच सीनिअर कॉलेजला वेबसाइटवर माहिती टाकण्याचे आदेश दिले आहेत. शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून ही माहिती तपासली जाणार आहे. माहिती जमा केल्याचे पुरावेही मागितले जाणार आहेत. सुविधा तपासणीसाठी एक समिती नेमण्यात येईल. दिलेल्या माहितीत तफावत आढळल्यास कॉलेजची वेतन रोखले जाईल.

डॉ. अजय साळी, शिक्षण सहसंचालक

...............

पितळ पडणार उघडे

कॉलेजच्या माहितीपत्रकातून विविध सुविधा उपलब्ध असल्याची माहिती प्रवेशित विद्यार्थ्यांना दिली जात होती. यातील काही सुविधा केवळ माहितीपत्रकावरच उपलब्ध होत्या. काही विद्यार्थी खोट्या सुविधांच्या भूलभुलैयात अडकले. नव्या शैक्षणिक वर्षांत मात्र वेबसाइटवरील माहितीची उलटतपासणी आणि प्रत्यक्षात कॉलेजमधील सुविधांची पाहणी केली जाणार आहे.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपरफुटीप्रकरणी दोन जण निलंबित

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली
जिल्हा परिषदेतील आरोग्य सेविका पेपरफुटी प्रकरणातील मुद्राणालयातील कर्मचारी रामदास फुलारे व शिपाई सतीश मोरे यांना यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी दोघांवर निलंबनाची कारवाई केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण चौघांवर निलंबनांची कारवाई झाली आहे.
पेपरफुटी प्रकरणाबाबत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेल्या किरण कदम (बांधकाम कनिष्ठ लिपिक), मंदार कोरे (आरोग्य सेवक, भोसे), शीतल मुगलखोड (आरोग्य सेवक भोसे), संजय कांबळे ( आरोग्य देवक, कवलापूर) या चौघांना २४ तासांत खुलासा करा, अशी नोटीस जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी बजावली आहे.
जिल्हा परिषदेचे हे पेपरफुटी प्रकरण गेले सव्वा महिने गाजत आहे. शाहीन जमादार (कंत्राटी आरोग्य सेविका, करगणी) व शाकीरा उमराणी (आरोग्य सेविका कवलापूर) यांना अटक झाल्याने यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संस्कृती टिकवण्याची गरज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
'घराघरांतील संवाद दुर्मिळ होत आहे. माणसांमाणसांतले अंतर कमी होण्याऐवजी वाढतच आहे. अशा कठीण काळात पूर्वीच्या एकत्र कुटुंब पद्धतीची भारतीय संस्कृती वाढवणे आणि जपणे ही काळाची गरज आहे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
मिरज तालुक्यातील आरग-लक्ष्मीवाडी येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या १३व्या पारिवारिक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते.
डॉ. लवटे म्हणाले, 'जुन्या आणि नव्या पिढीच्या संघर्षात घरातले घरपण नाहीसे होत आहे. खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांना मोठ्या कष्टाने शिकवले वाढवले. परंतु दुर्दैवाने ज्या मातीशी आपली नाळ जोडली आहे त्याच मातीशी तुटत जाणारी नाळ पाहून खेद वाटतो. दुर्दैवाने नको इतक्या पाश्चिमात्यांच्या अनुकरणात आपण गुरफटल्याने सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पूर्वी आणि आजही स्त्री हीच घरातील प्रमुख होती व आहे. अशा आपल्या समाजातील घराघरातील संवाद हरवत चालला आहे, ही शोकांतिका आहे. घराघरांत सहिष्णुता वाढली पाहिजे, असे सांगून खेड्यापाड्यात भरत असलेल्या छोट्या मोठ्या साहित्य संमेलनातून सहिष्णुता दिसते, ती वाढली पाहिजे.'
या वेळी पहिला गो. मा. कुलकर्णी पुरस्कार नामवंत समीक्षक अविनाश सप्रे यांना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच दयासागर बन्ने यांना चैतन्य माने पुरस्कार, डॉ. स्वाती शिंदे यांना शैला सायनाकर पुरस्कार, डॉ. विनोद कांबळे यांना अंजनकुमार उत्कृष्ठ वाड्मय पुरस्कार आणि मनिषा पाटील यांना शिवार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हाळवणकरांनी केली जनतेची फसवणूक

$
0
0

इचलकरंजी: काळम्मावाडी थेट नळपाणी योजना राबविली नाहीतर आमदारकी लढविणार नाही अशी जाहीरपणे घोषणा करणाऱ्या आमदार सुरेश हाळवणकर यांनी शब्द फिरवून जनतेची फसवणूक केली आहे. वारणा योजना राबविण्याचा आग्रह आम्ही धरला असताना त्यांनी त्याला शह देऊन काळम्मवाडीचा प्रस्ताव पुढे आणला. आता ते वारणा योजना राबविण्याची भाषा करीत असून आम्हांला पाणी प्रश्नात राजकारण करायचे नाही. तथापि, इचलकरंजीतील जनता, पालिकेवर कसलाही आर्थिक बोजा न लादता शंभर टक्के शासकीय अनुदानातून हाळवणकर यांनी ही योजना राबवावी, असे आव्हानात्मक मत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आवाडे म्हणाले, काळम्मवाडी योजना व्यवहार्य ठरणार नाही अशी भूमिका आपण सुरुवातीलाच स्पष्टपणे मांडली होती. वारणा व दूधगंगा हे कमी खर्चाचे पर्याय सुचविले होते. ५५ कोटी रुपये खर्चाची वारणा पाणी योजना राबविण्याचा ठराव पालिकेच्या सभेत मंजूरही करण्यात आला होता. तथापि आमदार हाळवणकर यांनी मात्र काळम्मावाडी योजना राबविण्याची भूमिका मांडली. ही योजना पूर्ण केल्याशिवाय विधानसभेची निवडणूक लढविणार नाही अशी भाषाही त्यांनी जाहीरपणे केल्याचे वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झाले होते. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीचा संदर्भ देऊन हाळवणकर यांनी इचलकरंजी नगरपालिकेवर आर्थिक बोजा न पडता ही योजना राबविणार असल्याचे त्यांनी घोषित केले होते. आता मात्र ते काळम्मवाडी योजनेऐवजी वारणा नळपाणी योजना राबविण्याची भूमिका घेत आहेत. याचा अर्थ आम्ही जी वारणा योजना राबविली जावी असे म्हणत होतो. तीच भूमिका हाळवणकर यांना घेणे भाग पडत आहे.

पाणी योजनेमध्ये राजकारण करायचे नाही, असा उल्लेख करुन आवाडे म्हणाले, वारणा योजना राबविण्याच्यावेळी युआयडीएसएसएमटी योजनेचा दुसरा टप्पा वा अन्य प्रकारच्या योजना होत्या. त्यामध्ये केंद्र शासन ८० टक्के, राज्य शासन १० टक्के व पालिका १० टक्के असा आर्थिक हिस्सा होता. आता केंद्राच्या योजनांचे स्वरुप बदललेले आहे. वारणा नळपाणी प्रकल्प अमृत योजनेतून घेण्याचा मनोदय व्यक्त केला जात असून त्यासाठी केंद्र ५० टक्के , राज्य २५ टक्के व पालिका २५ टक्के असा आर्थिक हिस्सा असणार आहे. वारणा योजना जरुर व्हावी. पालिकेवर कसलाही खर्च न टाकता अनुदानातून होण्यासाठी हाळवणकर यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागलमध्ये पाणीबाणी

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

चिकोत्रापाठोपाठ वेदगंगा नदी कोरडी पडल्याने आणि तलाव व ‌वहिरींनी तळ गाठल्याने कागल तालुक्यातील २५ गावात ६० ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. यापैकी तीन गावांमध्ये नळपाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. बाकीच्या ठिकाणी विंधन वि‌हिरींची गरज असून त्यासाठी ४१ लाख रुपयांची प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे. टंचाई सुचविलेल्या प्रत्येक गावातील वाड्या- वस्त्या,वसाहती आणि माळभाग,रहाते अड्डे अशा ठिकाणी पाणीटंचाई जाणवत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सहकारी अहवालात काही ठिकाणी विहिरी खोदाव्या लागतील असे नमूद केले आहे.

समृध्द कागल तालुक्यात वेदगंगा, दूधगंगा आणि चिकोत्रा अशा तीन नद्या आहेत. परंतु यावर्षी पाऊसच पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पडल्याने मार्च अखेरपर्यंत प्रचंड पाणीटंचाई जाणवणार आहे. ग्रामपंचायतींनी ठराव करुन पाणीटंचाई जाणवत असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाला कळवले आहे. परंतु बऱ्याच ग्रामपंचायतींना उपलब्ध पाण्याचा अंदाजच येत नसल्याने या पाणीटंचाईमध्ये अजून वाढच होण्याची शक्यता आहे. याचा सर्व्हे जरी पूर्ण झाला असला तरी तो भविष्यातल्या पाण्याच्या कमतरतेचा अंदाजच नसल्याने तो परिपूर्ण नसल्याचे अधिकाऱ्यांचेच मत आहे. कागल तालुका तसाच पाण्याच्या बाबतीस सुदैवी समजला जातो. मात्र, यंदा पाऊसमान कमी झाल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. चिकोत्रा खोऱ्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य कधीच जाणवले नव्हते. यंदा पाऊस कमी झाल्याने चिकोत्रा धरण निम्मेही भरले नाही. तर वेदगंगा नदीत काळम्मावाडी धरणातून पाणी न सोडल्याने दोन्ही नदीकाठावरील गावांना पाणीसंकटाला सामोरे जावे लागणार आहे.

तहान लागल्यावर विहीर

तालुक्यात सध्या सावर्डे बुद्रुक, सोनाळी, बेलवळे खुर्द, केनवडे, मळगे बुद्रुक, यमगे, हळदी, हमिदवाडा, शिंदेवाडी, बोळावी, माद्याळ, वडगाव, हसुर बुद्रुक, हसूर खुर्द, आलाबाद, करड्याळ, लिंगनूर कापशी, कासारी, साके, खडकेवाडा, कापशी बाळीक्रे, बाळेघोल, अर्जुनवाडा, नंद्याळ आणि जैन्याळ अशा २५ गावांत ६० ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे. यापैकी करड्याळ, लिंगनूर कापशी आणि खडकेवाडा या ठिकाणी नळपाणीपुवठा योजना दुरुस्त केल्यास पाणीटंचाई निवारण होऊ शकते असे प्रशासनाचे म्हणणे आहे. इतर सगळ्या ठिकाणी विंधन विहिरी खोदण्याचा उपाय सुचवण्यात आला असून यासाठी ४१ लाख पाच हजार खर्च अपेक्षित आहे. हा प्रकार म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदायला घेण्यातला आहे.

सरकारी आकडेवारीचा घोळ

पंचायत समितीने जरी सरकारी आकडे प्रसिद्ध केले असले असले तरी प्रत्यक्षात यापेक्षाही जास्त गावात पाणीटंचाई जाणवत आहे. गोरंबेसारख्या गावात सर्व काही व्यवस्थित असूनही सार्वजनिक विहीरीतले पाणी गावाला पुरेनासे झाले असल्याने एक दिवसाआड तोही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. बानगे गावात पाणी योजनेचे कामच निकृष्ठ झाल्याच्या तक्रारी होवूनही दुर्लक्ष केल्याने याठिकाणी थेट नदीतले पाणी येवून दुषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अशा कित्येक गावात पाणीटंचाई असूनही ग्रामपंचायतींनी कळवले नाहीच शिवाय प्रशासनाच्या सर्व्हेतही या गावांची पाणीटंचाई आलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी चित्रपट महामंडळाचा ‘सिनेमा’

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

कोल्हापूरः ​सिनेमाक्षेत्रातील विकासाबाबत निर्णायक काम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी महामंडळाचे संचालक आणि पदाधिकारीच सध्या आठ न्यायालयीन दाव्यांसाठी कोर्टाच्या पायऱ्या ​​झिजवत आहेत. आठपैकी कोणत्या ना कोणत्या खटल्याची तारीख महिन्याभरात येत असल्याने पंधरा दिवस सुनावणीला हजर राहणे आणि वकिलांशी चर्चा करण्यातच निघून जात आहेत. गेल्या दोन वर्षात चित्रपट महामंडळाचे तीन अध्यक्ष झाले. मात्र, या कोर्टाच्या फेऱ्या सुरूच आहेत. या कोर्टकचेरीवर महामंडळाचा दोन वर्षात लाखो रुपयांचा खर्च झाला आहे.

चित्रपट व्यवसायातील सिनेमा निर्मात्यांपासून ते स्पॉटबॉयपर्यंत प्रत्येकाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी महामंडळ काम करते. मात्र, गेल्या तीन वर्षापासून महामंडळाच्या कारभाराला गालबोट लागले आहे ते न्यायालयीन खटल्यांसाठी होणाऱ्या हेलपाट्यांचे. यामध्ये महामंडळाचा वेळ आणि पैसे खर्ची पडत आहेत. संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांच्याच मतभेदांतून महामंडळावर न्यायालयीन खटले चालवण्याची वेळ आली आहे, तर महामंडळाच्या विद्यमान संचालक मंडळाच्या आर्थिक कारभारावर आक्षेप घेत महामंडळ कृती समितीनेही न्यायालयात महामंडळाविरोधात खटला दाखल केला आहे. जयप्रभा स्टुडिओच्या जागेसाठी महामंडळाने कोर्टाचे दार ठोठावले आहे, तर माजी अध्यक्षांनाच बाहेरचा रस्ता दाखवल्याने त्यांनी महामंडळावर अविश्वास ठराव दाखल करत कोर्टात खेचले आहे. काही खटले मुंबईतील कामगार आयुक्त न्यायालयात दाखल करण्यात आले असून दोन कामगारांनीच महामंडळाला घरचा आहेर दिला आहे.

महामंडळ कृती समितीचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी चित्रपट महामंडळाच्या विद्यमान संचालक मंडळविरोधात चॅरिटी कमिशनमध्ये खटला दाखल केला आहे. गेल्या तीन वर्षातील महामंडळाच्या आ​र्थिक गैरकारभार आणि भ्रष्टाचाराबाबत राजेभोसले यांनी महामंडळाला प्रतिवादी बनवले आहे. या खटल्यात महामंडळाच्या माजी अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला असून संचालक मंडळावरही ताशेरे ओढण्यात आले आहेत. या खटल्याच्या सुनावणीसाठी महामंडळाचा संचालक मंडळ प्रतिनिधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे.

महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी 'मानाचा मुजरा' या कार्यक्रमावर लाखो रुपयांचा अवाजवी खर्च केल्यावरून महामंडळावर टीकेची झोड उठली होती. तसेच याच माजी अध्यक्षांवर महामंडळाच्या महत्त्वाच्या कामासाठीचे कारण सांगून सात लाख ३४ हजार रुपये महामंडळाच्या खात्यातून परस्पर घेतल्याचा आरोप सर्वसाधारण सभेत झाला होता. संबं​धित रक्कम भरण्याची प्रक्रिया माजी अध्यक्षांनी केली असली तरी त्यावेळी महामंडळातर्फे सुर्वे यांच्याविरोधात न्यायालयात केस दाखल केली. या केसची सुनावणीही सुरू आहेत. सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा आलेले विजय कोंडके यांनीही अध्यक्षपदाची मुदत संपता संपता महामंडळाला थेट कोर्टात खेचले. गेल्यावर्षी महामंडळकृती समितीतील एका महिलेने महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला. तत्कालीन अध्यक्ष विजय कोंडके यांना अध्यक्षपदावरून हटवले. कोंडके यांच्याकडून महामंडळावर अध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून आणखी दोन खटलेही दाखल करण्यात आले आहेत.

कोर्टाचा फेरा संपणार?

जयप्रभा स्टुडिओची जागा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी विक्रीस काढल्यानंतर हा स्टुडिओ वाचविण्यासाठी महामंडळाने मंगेशकर यांच्याविरोधात कोर्टात केस दाखल केली आहे. तीन वर्षापासून हा लढा सुरू आहे. सध्या उच्च न्यायालयाने जयप्रभा स्टुडिओ हेरिटेजमध्ये समाविष्ट करण्याचा निकाल दिला असला तरी मंगेशकर या सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजूनही कोर्टाचा फेरा संपणार नाही.

कोंडकेंकडून आव्हान

माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे असोत किंवा विजय कोंडके, काही वर्षापूर्वी संचालक मंडळात एकत्र काम करणाऱ्या या दोन माजी अध्यक्षांची महामंडळाशी कोर्टात आमनेसामने भेट होते. सुर्वे यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत सभेत कृती समितीला हवाला देण्याऱ्या महामंडळाला सुर्वे यांच्याविरोधातच लढावे लागत आहे, तर सुर्वे यांच्यानंतर कोंडके यांची अध्यक्षपदी एकमताने निवड करणाऱ्या संचालक मंडळाला कोंडके यांनीच न्यायालयीन आव्हान दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रंकाळा रस्त्याचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सात वर्षांपासून बंद असलेल्या रंकाळ्याजवळील रस्ता होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. डांबरी रस्ता करण्याचे २ कोटी ८० लाखांचे टेंडर चारजणांनी भरले असून, शनिवारी ते निश्चित केले जाणार आहे. श्री राजे संभाजी तरुण मंडळाच्या शिष्टमंडळास आयुक्तांनी २६ जानेवारीच्या आत काम सुरू झालेले असेल, असे आश्वासन दिले.

आयआरबीचे काम सुरू होण्यापूर्वी ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी सुरु करण्यात आलेले काम रखडल्याने रस्ते प्रकल्पातून रस्त्याचे काम झाले नाही. चार महिन्यांपूर्वीपर्यंत ड्रेनेज लाइनचे काम सुरू होते. त्यावेळी नगरसेवकांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काम पूर्ण करण्यात आले; पण त्यानंतर रस्त्याचे काम रखडले. रस्ता काँक्रिटचा की डांबरी, यामध्ये टेंडर थांबले. त्यानंतर टेंडर प्रसिद्ध करुनही कुणी भरले नसल्याने काम थांबले. याबाबत आंदोलन झाल्यानंतर तितका प्रशासनाकडून निधी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे डांबरी रस्ताच करण्याचे ठरवण्यात येऊन दोन कोटी ८० लाखाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. चौघांनी टेंडर भरले आहे. शनिवारी हे टेंडर उघडण्यात येणार आहे; पण अजून स्थायी समिती स्थापन झालेली नसल्याने त्याला रितसर मंजुरी देताना अडथळा येणार आहे.

याबाबत श्री राजे संभाजी तरुण मंडळाचे शरद तांबट, प्रमोद सासने यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी २६ जानेवारीच्या आत काम सुरू होईल, असे आश्वासन दिले. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुटुंबकलहाचा फटका मुलांना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घराच्या हालाकीच्या परिस्थितीत कौटुंबिक वाद आणि त्या घरातील नात्यांमध्ये असलेले संघर्षामुळे आज हजारो मुले-मुली निवासी संस्थांमध्ये दाखल होत असल्याचे भीषण वास्तव पुढे आले आहे. पुरोगामी विचारांच्या याच राज्यात ९९४ बालगृहे आणि ६० निरीक्षणगृहे कार्यरत असून यामध्ये सुमारे ९० हजार मुले-मुली या निवासी संस्थांमध्ये दाखल होत असल्यामुळे बालकांच्या बालमनावर अनेक आघात होऊन त्यांची भावनिक घुसमट होत असल्याचे आभास फाउंडेशनच्या सर्वेक्षणात पुढे आले आहे.

घरची परिस्थिती नसल्यामुळे एकीकडे वडील दारूच्या नशेत स्वतःची जबाबदारी आणि सर्वस्व हरवलेले असतात, तर दुसरीकडे महिला घरची धुणी-भांडी करून पोटाची खळगी भरण्याचा प्रयत्न करते. पण कौटुंबिक वाद टोकाला पोहोचल्यानंतर कुटुंबातील मुले-मुली समस्येच्या चक्रात गुरफटत चालली आहेत. आई आणि वडील दोघेही पालक हयात असूनही मुले-मुली मात्र निवासी संस्थांमध्ये दाखल होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

आजही अनेक गरजू बालके समाजात आहेत, त्यांच्या बालहक्कासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यातील अनेक मुला-मुलींपर्यंत सरकारच्या योजनाही पोहोचलेल्या नाहीत. राज्यात आजही शेकडो बालके कुपोषणामुळे मृत्युमुखी पडत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही ही कोवळी पानगळ थांबलेली नाही. याबाबत सरकारची मोठी जबाबदारी आहे; पण सरकारकडून त्या पूर्ण होत नसल्यामुळे बालहक्काची घुसमट होते. त्यावर दाद मागण्यासाठी बालहक्क आयोग कायदा केला; पण आयोगामध्ये पदाधिकारी नियुक्त करायचे राहिले, याला आता चार वर्षे झाली. राज्य सल्लागार समिती नियुक्त केलेली नाही.

'राज्यातील काही निरीक्षणगृहांमधील मुलांशी बोलले असता, घरातील संघर्षच या मुलांना निवासीगृहापर्यंत आल्याचे दुर्दैव समोर येत आहे. एकीकडे आई-वडील असूनही त्यांची साथ नाही, तर दुसरीकडे सरकार बालहक्काबाबत दुर्लक्ष करत आहे.'

- प्राजक्ता देसाई, सचिव, आभास फाउंडेशन, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images