Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आढावा सरत्या वर्षाचा - २०१५

$
0
0

२०१५ हे वर्ष प्रत्येक क्षेत्रासाठी धामधुमीचे गेले. जिल्ह्याचे राजकारण असू दे अथवा सांस्कृतिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रात मोठ्या उलथापालथी झाल्या. गोकुळ, जिल्हा बँक, महापालिका निवडणुकांनी जिल्हा ढवळून निघाला. टोलविरोधी आंदोलन, कॉ. पानसरे यांची हत्या, खंडपीठ आंदोलन आणि काही दिवसांपूर्वी घडलेल्या ऑनर किलिंग प्रकरणामुळे कायदा सुव्यवस्थेबाबतही कोल्हापूर धगधगते राहिले. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपल्या क्रीडा कौशल्याचा डंका सर्वदूर वाजवला. तर राज्य नाट्य, बालनाट्य स्पर्धांमुळे सांस्कृतिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण राहिले. मात्र कोल्हापूरच्या सांस्कृतिक विश्वातील मानदंड असलेल्या वास्तूंचा विकास जैसे थे राहिला.

सत्तासंघर्षाने ढवळले राजकारण

गोकुळ, राजाराम कारखाना, जिल्हा बँक, बाजार समिती, महापालिका, विधानपरिषद आणि कुंभी साखर कारखाना यांच्या निवडणुकांनी २०१५ वर्ष गाजले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात भाजपला प्रवेशाची संधी मिळाली. मात्र राष्ट्रवादीची ताकद वाढवणारे आणि काँग्रेसच्या दुहीला बळ देणारे हे वर्ष शिवसेनेला मात्र फारसे चांगले गेले नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेची चौकशी, बाजार समितीवरील कारवाईने सहकार क्षेत्रातील राजकारण गा​जले. नेत्यांमधील वादाने राजकीय वातावरण वर्षभर गरमच राहिले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व बाजार समितीच्या निवडणुकीत यश मिळवत राष्ट्रवादीने या दोन्ही महत्वाच्या संस्था ताब्यात ठेवल्या. जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी एकत्र येत आपापल्या जागा बिनविरोध करून घेतल्या. महाडिक, कोरे, पी. एन पाटील, सतेज पाटील असे दिग्गज नेते बि​नविरोध निवडून आले. ​पी. एन. पाटील यांना अध्यक्ष करण्याचा पालकमंत्री पाटील यांचा डाव कोरे यांच्यामुळे उधळला गेला. बाजार समितीत मात्र राष्ट्रवादी व जनसुराज्यची एकतर्फी सत्ता आली.

महाडिक-सतेज वाद कायम

विधानसभा निवडणुकीत नव्याने सुरू झालेला आमदार महाडिक-सतेज पाटील यांच्यातील वाद वर्षभर धुमसत राहिला. गोकुळ, राजाराम कारखाना, महापालिका अशा निवडणुकीत हे दोन गट आमने-सामने आले. महापालिकेतील यशाने पाटील विधानपरिषद निवडणुकीत उतरले. निवडणुकीच्या पलिकडे जाऊन या दोन गटातील वाद सतत धूमसत राहिल्याने जिल्ह्यातील राजकारण सतत तणावपूर्ण राहिले. विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने तर दोघे थेट आमने-सामने आहेत.

'गोकुळ' महाडिकांचेच

जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या गोकुळवर पुन्हा आमदार महाडिक, पी. एन. पाटील यांनी विजयाचा झेंडा फडकवला. या संस्थेत शिरकाव करण्यासाठी सतेज पाटील यांनी विनय कोरे, प्रा. संजय मंडलिक यांच्या मदतीने बरेच प्रयत्न केले. त्यांना फारसे यश आले नाही. त्यांच्या दोन जागा आल्या, पण त्यापैकी सुभाष बोंद्रे यांचे निधन झाले. गोकुळच्या तज्ज्ञ संचालकपदी बाबा देसाई यांची नियुक्ती करत महाडिक यांनी संघात भाजपला प्रवेश दिला. काँग्रेसची सत्ता असतानाही भाजपला जवळ करण्याची नीती येथूनच सुरू झाली.

शिवसेनेला प्रतीक्षा मंत्र‌िपदाची

नव्या वर्षात भाजपने शिवसेनेला मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले. तब्बल सहा आमदार असल्याने सेनेला जिल्ह्यात मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. पहिल्या विस्तारात ही संधी मिळाली नाही. नंतर विस्तारच न झाल्याने वर्ष संपले तरी सेनेला, जिल्ह्याला दुसरे मंत्रीपद मिळाले नाही. राज्यात सत्ता मिळवल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढवण्यासाठी भाजपने पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन कोल्हापुरात घेतले. पक्षाच्या वातावरणनिर्मितीला अ​धिवेशन पूरक ठरले. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने जिल्ह्यात भगवा सप्ताह साजरा केला.

दिग्गज राज‌कीय नेते हरपले

ज्येष्ठ कामगार नेते, गोविंदराव पानसरे यांच्या हत्येने पुरोगामी कोल्हापूर बदनाम झाले. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, सहकारातील ज्येष्ठ नेते विक्रमसिंह घाटगे, माजी आमदार सा. रे. पाटील यांना यावर्षी जिल्हा मुकला. संघर्ष हेच जीवनाचे सूत्र मानलेल्या मंडलिकांनी साखर कारखान्याची स्थापना करून सहकारातही काम केले. सहकारातील हिंदकेसरी विक्रमसिंह घाटगे यांचेही आकस्मिक निधन झाले. कागलच्या शाहू कारखान्याच्या माध्यमातून घाटगे यांनी सहकाराची बीजे घट्ट केली. माजी आमदार आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांचेही निधन झाले.

मु्स्लिम महिलांना निवडणूक संधी

मुस्लिम ​महिलांनी महापालिकाच नव्हे तर कोणतीच निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याचा अजब फतवा कोल्हापुरातील मुस्लिम धर्मगुरूंनी काढला. महाराष्ट्र टाइम्सने याबाबत वृत्त प्रसिध्द केल्याने मोठी खळबळ उडाली. देशभर गाजलेल्या या प्रकरणाने धर्मगुरुंना आपला फतवा मागे घ्यावा लागला. 'मटा'च्या वृत्ताची दखल घ्यावी लागली. फतवा मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर १८ मुस्लिम महिलांनी महापालिका निवडणूक लढवली. तब्बल पाच महिला निवडून आल्या आणि विशेष बाब म्हणजे शमा मुल्ला या मुस्लिम महिलेला उपमहापौर होण्याची संधी मिळाली.

संघर्षामुळे विकास मंदावला

महापौरपदाच्या व्यक्तीवर झालेले लाचखोरीचे आरोप, एलबीटी रद्द झाल्यामुळे आर्थिक उत्पन्नावर पडलेल्या मर्यादा आणि पंचवार्षिक निवडणुकीनंतर पहिल्यांदाच विरोधकांचे उभे राहिलेले कडवे आव्हान हे सारे २०१५ मध्ये महापालिकेने अनुभवले. सत्तासंघर्षाच्या राजकारणामुळे विकासाचा वेग मर्यादित राहिला. मात्र नगरोत्थान योजनेंतर्गत रस्ते, शाहू समाधीस्थळाचा विकास या जमेच्या बाजू ठरल्या.

महापौरपदाची प्रतिमा लाचखोरीने मलीन

जानेवारी महिन्याच्या शेवटी तत्कालिन महापौर तृप्ती माळवी यांच्यावर लाचखोरीचा आरोप झाला. माळवी यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपानंतर महापालिकेत पुन्हा एकदा गटातटाच्या राजकारणाने उचल खाल्ली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एका बाजूला तर माळवी एका बाजूला असे चित्र निर्माण झाले. दोन्ही काँग्रेसच्या नगरसेवकांनी माळवी यांच्यावर बहिष्कार टाकला. सत्तासंघर्ष चिघळला, प्रकरण कोर्टापर्यंत गेले. सभागृहाने माळवी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची शिफारस करणारा ठराव मंजूर केला. सभागृहाच्या शिफारस ठरावानुसार राज्य सरकारने माळवी यांचे नगरसेवक पद रद्द केले. महापौरपदावरील व्यक्तीवर लाचखोरीचा आरोप झाल्याने पदाची प्रतिमा खालावली.

नगरसेवक विरूद्ध प्रशासन-आयुक्त चित्र

जानेवारी २०१५ मध्ये आयुक्तपदी रूजू झालेले पी. शिवशंकर आणि मावळत्या सभागृहाचे वर्षभरात फारसे पटले नाही. नियमानुसार काम करण्याच्या आयुक्तांच्या भूमिकेमुळे नगरसेवक आणि प्रशासन-आयुक्त असा संघर्ष उभा राहिला. दुकानगाळ्यांचा करार, रेडीरेकनरनुसार मार्केटगाळ्यांना भाडे आकारणी, आरक्षित जागा संपादन यावरून थेट आयुक्त आणि नगरसेवक एकमेकासमोर उभे ठाकल्याचे सभागृहाने अनुभवले.

एलबीटी रद्द, आर्थिक उत्पन्नावर मर्यादा

व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारने ऑगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द केला. एलबीटीच्या माध्यमातून महापालिकेला वर्षाकाठी १०० कोटींच्या आसपास उत्पन्न मिळायचे.एलबीटी रद्द झाल्याने महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा पडल्या. राज्य सरकारकडून आता दरमहा आता साडेसहा कोटीपर्यंतचे अनुदान दिले जात आहे. मात्र हक्काचे उत्पन्न हातातून निसटल्याने महापालिकेचे आर्थिक उत्पन्न चांगलेच घटले आहे. त्याचा परिणाम पायाभूत सुविधांवर झाला.

काँग्रेसची सत्ता कायम, विरोधकांचे आव्हान

महापालिकेतील सोयीच्या राजकारणाला आणि बहुमताच्या बळावर सर्व काही रेटून नेण्याच्या कामकाज प्रवृत्तीला आता चाप बसणार आहे. कारण महापालिकेत पहिल्यांदाच विरोधकांचे तगडे आव्हान निर्माण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महापालिका नि​वडणुकीत सत्ता राखण्यात काँग्रेस, राष्ट्रवादीला यश आले. पण या निवडणुकीत भाजप, ताराराणी आघाडीच्या माध्यमातून प्रबळ विरोधक समोर आले. महापालिकेत राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले. तर भाजपाची सदस्य संख्या वाढली. ताराराणी आघाडीनेही ताकद सिद्ध केली.

कही खुशी कही गम

कलापूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात गेल्या वर्षभरात सांस्कृतिक क्षेत्रात विविध घडामोडी झाल्या. मात्र कोल्हापूरच्या सांस्कृतिक विश्वातील मानदंड असलेल्या वास्तूंचा विकास जैसे थे राहिला. चित्रनगरीपासून ते शाहू स्मारक असो किंवा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील वाद असो किंवा जयप्रभा स्टुडिओच्या जागेचे ग्रहण असो. सांस्कृतिक प्रश्न सोडवण्यात यंदाही प्रशासन आणि राजकीय नेतृत्व अयशस्वीच झाल्याने प्रश्न रखडलेलेच असेच चित्र राहिले. मात्र दुसरीकडे चित्रपट महोत्सव, राज्यनाट्य स्पर्धा, बालनाट्य व्यासपीठ, सांस्कृतिक कलागुणांची उधळण, युवा कलाकारांची घोडदौड यामध्ये कोल्हापूरचे नाव अव्वल ठरले.

गेल्या दीड वर्षांपासून नूतनीकरणासाठी बंद असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा यंदाच्या वर्षातही उघडलाच नाही. उदघाटनाचा 'सोहळा' करण्याच्या हट्टापायी आचारसंहितेचे कारण पुढे करत नाट्यगृह आणि रसिक यांच्यातील पडदा पडलेलाच राहिला. तर शाहू मिलच्या जागेवर होणाऱ्या शाहू स्मारकचा आराखडा यंदाही कागदावरच राहिला. चित्रपट महामंडळ यावर्षीही अनेक वादांनी गाजले. नव्या अध्यक्षांच्या काळात महामंडळाने फारसे उपक्रम केले नसले तरी वृद्ध कलावंताच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लागला हेही नसे थोडके. गेल्या तीस वर्षांपासून सुरू असलेला चित्रनगरी विकासाचा मुद्दा यंदाही राजकीय उदासीनतेचा बळी ठरला. लोकेशन उभारण्याची घोषणा हवेतच विरली आणि चित्रनगरीच्या कामाबाबत नेमलेल्या समितीची वर्षभरात एकही बैठक न झाल्याने हा विषय यंदाच्या वर्षीही पुढे गेला नाही.

कोल्हापूरच्या सिनेमानिर्मितीचा स्रोत असलेला जयप्रभा स्टुडिओ हा हेरिटेजयादीतच राहील हा यावर्षीच उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कोल्हापूरसाठी सुखावह असला तरी अद्याप जयप्रभाच्या जागेला लागलेले व्यावहारिक ग्रहण पूर्ण सुटले असे म्हणता येणार नाही. या स्टुडिओच्या मालक गायिका लता मंगेशकर यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय अजूनही खुला असल्यामुळे ग्लास अर्धा भरलेला आणि अर्धा रिकामा अशी अवस्था ठेवूनच सरते वर्ष जयप्रभाबाबत दोलायमान राहिले.

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने चार वर्षे यशस्वी करून दाखवत यावर्षी जागतिक चित्रपट महोत्सवाच्या यादीत आपले नाव कोरले. केंद्राच्या स्वच्छ भारत अभियान आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या लोगोसाठी देशभरातून कोल्हापूरच्या 'निर्मिती' जाहीरात संस्थेचे अनंत खासबारदार यांच्या लोगोची निवड झाल्यामुळे कोल्हापूरचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. यंदाच्या राज्यनाट्य व बालनाट्य स्पर्धेची चळवळ नव्या जोमाने बहरली.

कोल्हापूरकर खेळाडूंचा डंका

कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेला क्रीडा नगरीचा वारसा जपता सर्वच खेळांत येथील खेळाडूंनी डंका वाजवला. फेब्रुवारीमध्ये केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महिला कुस्तीपटूंनी देदिप्यमान कामगिरी केली. स्थानिक क्रिकेट स्पर्धेत युवा क्रिकेटपटूंनी आपली छाप पाडली. अनेक फुटबॉल खेळाडूंनी व्यावसायिक क्लबला पसंती दिली, मात्र मैदानावरील झालेल्या हाणामारीमुळे स्थानिक फुटबॉल हंगामाला ब्रेक लागला. प्रो-कबड्डीसारख्या व्यावसायिक स्पर्धेत तुषार पाटील, सागर खटाळे यांनी विविध संघात स्थान मिळवले.

उत्तरप्रेदश येथे झालेल्या महिला कुस्ती स्पर्धेत रेश्मा मानेने विजेतेपद पटकावल्यानंतर केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महिला कुस्तीपटूंनी यशाची कमान चढती ठेवली. मुरगुड येथे सराव करणाऱ्या नंदिनी साळोखे, तेजश्री मेंडके, प्रीयांका येरुडकर, स्वाती शिंदे यांनी पदकांना गवसणी घातली. महिलांची अशी कामगिरी होत असताना ब्राझिल येथील ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत भारत पाटील आणि सोनबा गोंगाणे यांनी यशाची पुनरावृत्ती केली. त्याचवेळी युवा नेमबाज खेळाडू अनुष्का पाटीलने सातत्यपूर्ण कामगिरी करत अनेक स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी केली. राज्य शूटिंग असोसिएशनच्यावतीने घेतलेल्या स्पर्धेत अनुष्काने सुवर्णपदक पटकावले. पोलिस कॉन्स्टेबल जयश्री बोरगेने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावत सन्मानाने तिरंगा फडकवला. ऑक्टोबरमध्ये राज्य सरकारच्यावतीने राज्य शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये कोल्हापूरच्या तब्बल आठ खेळाडूंनी पुरस्कारावर मोहर उमटवली. राष्ट्रकुल पदकविजेता चंद्रकांत पाटील, कुस्तीपटू रणजीत नलवडे, विशाल माने, राही सरनोबत, वीरधवल खाडे, उज्ज्वला जाधव, संघटक आर. व्ही. शेटगे आदींचा यामध्ये समावेश होता.

हंगाम अर्धवटच ...

अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना मैदानावर झालेल्या हाणामारीमुळे फुटबॉल हंगाम अर्धवट अवस्थेत संपुष्टात आणावा लागला. पोलिस ठाण्यापर्यंत गेलेल्या हाणामारीमुळे सर्वसामान्य फुटबॉल शौकिनांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. तरीही चार विजेतेपदाबरोबर लीगचे उपविजेतेपद पटकावत दिलबहार तालीम मंडळाने आपली हुकूमत दाखवून दिली. तर पीटीएमने लीग विजेतेपदासह तीन उपविजेतेपदे पटकावत करामत करुन दाखवली.

निव्वळ चर्चा; प्रश्न तिथेच

जिल्ह्यातील व्यापार, उद्योग आणि सहकार क्षेत्रास मावळते वर्ष फारसे लाभदायी ठरलेले नाही. खूप अपेक्षांसह २०१५ चे स्वागत करण्यात आले होते, मात्र सहकारातील चुरशीच्या निवडणुका आणि व्यापार, उद्योगांमधील जुन्याच प्रश्नांची नव्याने चर्चा करण्याशिवाय या वर्षात फारसे काहीच हाताशी लागलेले नाही. उद्योगांचे स्थलांतर, वीजदरवाढ, वस्त्रोद्योगांचे प्रलंबित प्रश्न तसेच आहेत. वाढलेले वीजदर आणि छुप्या करांच्या बोजामुळे हैराण झालेल्या उद्योजकांनी कोल्हापुरातील उद्योग कर्नाटकात स्थलांतरित करण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिला होता. उद्योजकांना राज्यात थांबवण्यासाठी नवीन सरकारने अनेक आश्वासनांचे डोस दिले. जानेवारी २०१५ मध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात येऊन उद्योजकांसोबत चर्चा केली होती. वीज दर कमी करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले होते, मात्र दिलेली आश्वासने पाळण्याऐवजी सरकारकडून मागच्या दाराने उद्योजकांवर करांचा बोजा लादण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. दखल घ्यावी असे मोठे नवीन उद्योग वर्षभरात आलेच नाहीत. उद्योगवाढीसाठी आवश्यक असणारा विमानतळाचा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र वर्षभरात केवळ आश्वासनांशिवाय हाती काहीच लागलेले नाही. इचलकरंजीतील वस्त्रोद्योग लक्षात राहिला तो कामगारांच्या बंद आंदोलनामुळे. वस्त्रोद्योगाला कोट्यवधींचा फटका बसल्यानंतरही समाधानकारक तोडगा निघालेला नाही. व्यापारामध्ये बऱ्याच प्रतीक्षेनंतर एलबीटी रद्दचा निर्णय हाच एक दिलासा देणारा निर्णय ठरला आहे. व्यापाराचे विस्तारीकरण करण्यासाठी नव्यानेच सुरू झालेल्या जयगड बंदराचे स्वागत केले जात आहे.

सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचा वरचष्मा

सहकार प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रचंड ईर्षेने झाल्या. सोयीस्कर आघाडी करत अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने वरचष्मा राखला. गोकुळच्या निवडणुकीमध्ये आमदार महादेवराव महाडिक आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी वर्चस्व राखले. मात्र त्यानंतर झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शेती उत्पन्न बाजार समिती, शेतकरी सहकारी संघावर आपले वर्चस्व राखले. त्याचवेळी जिल्हा बँकेच्या संचालकांवर निश्चित केलेली जबाबदारी आणि बाजार समितीवर नेमलेल्या प्रशासक नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच दणका बसला. राजाराम कारखान्यावर महाडिक यांनी आपली सत्ता अबाधित राखली. त्याबरोबरच सहकारातील अनेक अधिकारी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतल्याचे स्पष्ट झाले. हातकणंगले निबंधक लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्याने त्यांच्यावर निलबंनाची कारवाई झाली. तर तत्कालिन जिल्हा उपनिबंधक सुनील शिरापुरकर अद्यापही चौकशीच्या फेरीत अडकले आहेत. तर विभागातील ३७ जिल्हा उपनिबंधकांची सुनावणी प्रक्रिया सुरू आहे.

पानसरे हत्या आणि खंडपीठ आंदोलन

मटका, जुगार यासारख्या अवैध धंद्यांवर चाप लावणाऱ्या पोलिस दलापुढे ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे हत्या व तपास हे शिवधनुष्य पोलिसांना पेलावे लागत आहे. कसबा बावडा येथील ऑनर किलिंग प्रकरणाने कोल्हापूर हादरून गेले. यावर्षी कोल्हापुरात सर्कीट बेंच स्थापन होणार हे जवळजवळ नक्की वाटत असताना न्यायमूर्तींनी कोणताच निर्णय न घेतल्याने संतापाचा कडेलोट झालेल्या वकिलांनी थेट न्यायमूर्तींच्या पुतळ्याचे दहन करत संतापाला मोकळी वाट करून दिली.

पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी अवैध धंद्यांना चाप लावल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत होती. पण १६ फेब्रुवारी २०१५ रोजी कॉ. पानसरे यांच्या घराजवळ हल्लेखोरांनी पानसरे व उमा पानसरे यांच्यावर गोळीबार केला. त्यामध्ये पानसरे यांचा २० फेब्रुवारीला मृत्यू झाला. हल्लेखोरांना अटक करण्यासाठी पोलिसांच्यावर दबाव वाढला. राज्य सरकारने एसआयटी स्थापना केली. दरम्यान, कोल्हापूर पोलिसांनी पानसरे हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला अटक केली. त्याने मैत्रीण व मानलेल्या बहिणीशी केलेल्या संभाषणात पानसरे हत्येचा उल्लेख आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी ३९२ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. पण पोलिसांना आणखी ठोस पुरावे, समीरचे सहकारी व मुख्य सुत्रधार यांना अटक करण्यास अपयश आले आहे.

डिसेंबर महिन्यात कसबा बावडा येथील इंद्रजित व मेघा कुलकर्णी यांच्या ऑनर किलिंग प्रकरणाने कोल्हापूर हादरून गेले. इंद्रजित व मेघाने आंतरजातीय विवाह केल्याने मेघाच्या दोन भावांनी दोघांचा निर्घुण खून केला. पोलिसांनी दोघा भावांसह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यासाठी पावले उचलली आहेत.

कोल्हापुरात हायकोर्टाचे सर्किट बेंच स्थापन करावे या असा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे. या प्रस्तावाला मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा हे मान्यता देवून सर्किंट बेंचची घोषणा करतील याकडे कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकिलांचे डोळे लागले होते. पण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवृत्तीच्या दिवशी त्यांनी कोणताच निर्णय न घेतल्याने वकिलांनी त्यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. त्यामुळे खंडपीठ व सर्किंट बेंचचा प्रश्न कधी सुटणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रतिष्ठेची लढत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी विधानपरिषद निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. केवळ ३८२ मतदारांच्या हातात राजकारणाची दिशा असल्याने या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व अपक्ष उमेदवार महादेवराव महाडिक यांच्यात होत असलेल्या या लढाईत या दोघाबरोबरच अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने काँग्रेसला मतदान करण्यासाठी व्हीप जारी केला आहे. रात्री शिवसेनेने आघाडी धर्म पाळण्याचा निर्णय घेत महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, प्रा. संजय मंडलिक हे सतेज पाटील यांच्यासोबत आहेत.

विधानपरिषद निवडणुकीसाठी दुरंगी लढत होत आहे. महाडिक आणि पाटील गटातील प्रचंड इर्षेमुळे या निवडणुकीत मोठी उलाढाल झाली. दोन्ही गटाने मतदारांना सहलीवर पाठवले होते. तेथून ते पुणे व कराडला आणले आहे. पाटील गटाने पुण्यात सर्व मतदारांची सायंकाळी बैठक घेतली. सतेज पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आमदार हसन मुश्रीफ, पी.एन. पाटील, विनय कोरे, सत्यजित देशमुख, रमेश बागवे, ए.वाय. पाटील निवेदिता माने, समरजित घाटगे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, मालोजीराजे छत्रपती, आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रा. जयंत पाटील यांनी मतदारांशी संपर्क साधला. शिवसेनेने महाडिक याना पाठिंबा जाहीर केला असला तरी पक्षाचे सहसंपर्क प्रमुख संजय मंडलिक बैठकीस उपस्थित होते. महाडिक गटाच्या मतदारांना कराडला ठेवण्यात आले असून रात्री महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्यासह अनेकांनी त्यांची भेट घेतली.

रविवारी सकाळी आठ ते चार दरम्यान जिल्ह्यात बारा ठिकाणी हे मतदान होणार आहे. कोल्हापुरात उद्योग भवन येथे मतदान होणार आहे. मतदानाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. सतेज पाटील यांना मतदान करण्याबाबतचा व्हीप राष्ट्रवादीने बजावला आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्यास कारवाईचा इशारा सरचिटणी​स अनिल साळोखे यांनी दिलेल्या व्हीपव्दारे दिला आहे.

महाडिक व पाटील यांच्यात प्रथमच थेट लढत होत आहे. सर्वच पक्षाच्या मतदारात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादीने व्हीप जारी केला असला तरी काँग्रेससह कोणत्याच पक्षाने तो ​जारी केलेला नाही. गुप्त मतदान असल्याने त्याचा काहीही उपयोग होणार नाही. या निवडणुकीतील विजयाने जिल्ह्याच्या राजकारणाचे नवे समीकरण बनणार आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी दोन्ही उ​मेदवारांनी जंगजंग पछाडले आहे. पाटील गटाचे मतदार सकाळी सहा वाजता पुण्यातून निघणार आहेत. महाडिक गटाचे आठनंतर कराड सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे साधारणतः दहानंतरच मतदान सुरू होण्याची चिन्हे आहेत. पाटील गटाकडे २२० तर महाडिक गटाकडे १६२ मते असल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही बाजूने क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता गृहित धरून त्यादृष्टीने फिल्डींग लावली आहे.

........

दोन्ही काँग्रेस व जनसुराज्य एकदिलाने ही निवडणूक लढवत असल्याने माझा विजय निश्चित आहे, असा दावा सतेज पाटील यांनी केला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी मतदार आपल्यालाच कौल देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मैदान मारण्यासाठीच मैदानात उतरलो आहे. मतदार माझ्याच बाजूने असून या निवडणुकीत मैदान मारणारच असा दावा महाडिक यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नर्ससह तिघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

येथील डॉ. प्रकाश कुलकर्णी व डॉ. अरूणा कुलकर्णी या दाम्पत्याच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना आज अटक केली. पोलिसांनी खुनाचे कारण स्पष्ट केले नसले तरी हे खून जमिनीच्या किंवा संपत्तीच्या वादातूनच झाले असावेत, असा अंदाज आहे. हॉस्पिटलमधील नर्स सीमा बाळासो यादव (वय ३६, रा. शिवनगर) व तिचा मित्र निलेश भास्कर दिवाणजी (वय २९, रा. इंदिरा कॉलनी) आणि अर्जुन रमेश पवार (वय १९, रा. सरकारी दवाखान्यामागे, हनुमाननगर, इस्लामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शनिवारी, १९ रोजी रात्री साडेआठ ते दहाच्या दरम्यान डॉक्टर दाम्पत्याचा गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणात आणखी सहा जणांवर संशय आहे. या सर्वांना लवकरच अटक करू, त्यानंतर खुनाचे कारण स्पष्ट होईल, असा विश्वास अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एस. पी. लक्ष्मीकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. दरम्यान अटक केलेल्या तिघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना शनिवार, ता. २ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सांगलीच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख विश्वनाथ घनवट यांनी पोलिस अधिक्षक सुनील फुलारी व अप्पर पोलिस अधिक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्षनाखाली तपास करून आठ दिवसांत संशयितांना अटक केली. या प्रकरणात झालेल्या खुनाची पद्धत पाहता हे एकट्याचे काम नाही हे लक्षात येत होते. त्यामुळे पोलिसांनी चोहोबाजूंनी तपास करून प्रत्यक्ष सहभागी असलेल्या या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात जमिनीचा वाद, आर्थिक देवघेव किंवा खंडणी यांपैकी कोणतेही कारण असू शकते. पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

अप्पर पोलीस अधिक्षक लक्ष्मीकांत पाटील म्हणाले, 'या प्रकरणात आणखी ५ ते ६ जणांचा सहभाग असावा, असा अंदाज आहे. आणखी काहीजणांचे पाठबळ आहे का याबाबत चाचपणी सुरू आहे. खुनानंतर डॉक्टरांचा मोबाइल व अन्य काही वस्तू तसेच काही कार्डस चोरीला गेली आहेत. त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. यातील अर्जुन पवार याच्यावर यापूर्वी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. प्रत्यक्ष घटना घडली त्यात अर्जुनचा सहभाग आहे.'

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी विश्वनाथ घनवट, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली षिंदे, इस्लामपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विश्वनाथ राठोड व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात थंडीचा कडाका कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन दिवसांपासून तापमानात सुरु असलेली घट कायम आहे. येथील किमान तापमान १५ अंशावर असून त्याबरोबर वाऱ्याचेही प्रमाण असल्याने या बोचरी थंडी जाणवत आहे. सायंकाळनंतर हे प्रमाण वाढत असल्याने रस्त्यावरील वर्दळ कमी होत आहे.

राज्यभरात थंडीचा वाढत असल्याने कोल्हापूरमधील तापमानही दोन दिवसात कमी होऊ लागले आहे. दोन आठवड्यापूर्वी १६ अंशावर तापमान आले होते. पण त्यावेळी ढगाळ वातावरण झाल्याने वातावरणात फरक पडला होता. या आठवड्यात मात्र गुरुवारपासून थंडीचे वातावरण पुन्हा तयार झाले. १९ अंशावर असलेले तापमान एका दिवसात १६ अंशावर आले. त्यानंतरही आणखी एक अंशाने तापमान घसरले. वाऱ्याचेही प्रमाण कायम राहिल्याने बोचरी थंडी जाणवू लागली. उन्हामध्ये उभे राहिले तर चटका बसतो, पण सावलीत आले की थंडी जाणवत असल्याचा विचित्र अनुभव शहरवासीय घेत आहेत. राज्यात इतर ठिकाणी थंडीचे प्रमाण वाढतच असल्याने येथील तापमानही आणखी कमी होण्याची शक्यता आहे. बोचऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपड्यांचा वापर केला जात आहे. पण सायंकाळनंतर अनेक रस्त्यावरील गर्दीही कमी झाल्याचे जाणवत आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. यापूर्वी कोल्हापूरच्या कमीत कमी तापमानाची नोंद ९ अंशापर्यंत झाली आहे. एखादा दिवस हे तापमान असले तरी त्याचे परिणाम आठवडाभर जाणवतात. त्यामुळे ही थंडीही पुढील आठवडाभर राहण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारतीय जैन संघटनेचे १० रोजी अधिवेशन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी ,कोल्हापूर

भारतीय जैन संघटनेचे राज्य अधिवेशन १० जानेवारीत कुंभोजगिरी तीर्थ येथे होत आहे. या अधिवेशनात सुमारे चार हजार कार्यकर्ते सहभागी होत असल्याची माहिती भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्याध्यक्ष पारस ओसवाल म्हणाले, अधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आमंत्रित केले आहे. दोन वर्षातून एकदा राज्य अधिवेशन आयोजित केले जाते. राज्यातील सर्वच स्तरातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक असे सुमारे पाच हजार जण उपस्थित राहतील. गेली तीस वर्षे देशभर विखुरलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे काम जैन संघटना करीत आहे. बीजेएस स्टुडंटस् असेसमेंट प्रोग्रॅम, युवती सक्षमीकरण, बीजेएस डेव्हलपमेंट, करिअर गायडन्स माध्यमातून कार्यरत आहे. राज्यातील बीजेएसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे जाळे, संघटन सक्षमीकरण, संघटनेचे कार्य विस्तारण्यासाठी अधिवेशन होत आहे. अधिवेशनात दोन वर्षात बीजेएसने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात येईल. बीजेएसचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख मार्गदर्शन करीतल. विवाह पद्धतीचे बदलते रुप, करिअर, बिझनेस डेव्हलपमेंट समाजाची गरज, आदी विषयावर चर्चा होईल. पुढील दोन वर्षाच्या कामकाजाचे नियोजन आणि नवीन राज्याध्यक्षांची घोषणा होईल. विविध समितीच्या माध्यमातून अधिवेशनाची तयारी सुरु आहे. या वेली बीजेएसचे राज्य सचिव अभिनंदन खोत, मीना दोशी,, प्रकाश मुगळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मैत्रिणींची धमालमस्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिलखेचक अदा आणि नृत्याच्या ठेक्यावर कलर सीझन्स ७ ची डान्सर वैष्णवी पाटील हिच्या तालावर मैत्रीण मंचाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांनी धमाल केली. माजी नगरसेविका माधुरी नकाते यांच्या मैत्रीण मंचतर्फे संभाजीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. यामध्ये विविध स्पर्धा, लहान मुलांना खेळणीपार्क आणि खवय्यांसाठी खाद्यजत्रा भरवण्यात आली होती.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी वैष्णवी पाटील हिने एकापेक्षा एका डान्स सादर करत सारे मैदान डोलवले. डोळे दीपवणारे लाइफ इफेक्टस आणि वैष्णवीच्या अदाकारीने रसिकांचे मनमुराद मनोरंजन केले. तसेच महिलांनीही मैत्रीण मंचच्या व्यासपीठावर एकपात्री अभिनय, लावणीनृत्य, ना​टिका अशा कलागुणांची उधळण केली. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे संचालक विजय भोसले यांनी महिलांना उद्योजिकतेचे धडे देत स्पॉटगेम्समधून वातावरण खुलवले, तर लहान मुलांनी खेळणीपार्कमध्ये मनसोक्त धमाल केली. महिला व मुलांसाठी या महोत्सवाने दोन दिवस जल्लोषाची पर्वणी दिली.

रविवारी महिलांसाठी विविध स्पर्धा झाल्या. एक मिनिट, प्रश्नमंजूषा या स्पर्धांचा महिलांनी आनंद घेतला. दोन दिवस या महोत्सवात सहभागी झालेल्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. छोटा भीम, मोटू पतलू, डोरेमॉन या कार्टुन कॅरेक्टरनी या महोत्सवात बच्चेकंपनीचे जोरदार मनोरंजन केले. रविवार असल्यामुळे महोत्सवातील खाद्यपदार्थच्या स्टॉलवर खवय्यांनी गर्दी केली. महोत्सवाच्या निमित्ताने सर्वसामान्य महिलांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि मनोरंजनातून त्यांच्यातील उद्योजिकतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती मैत्रीच मंचच्या अध्यक्षा माधुरी नकाते यांनी सां​गितले. स्पर्धांमधील विजेत्या महिलांना रविवारी पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चांदोली पाहण्यासाठी वारणावतीत मिळणार पास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शिराळा
चांदोली (वसंत जलसागर) धरण पाहण्यासाठी आता धरणाजवळील वारणावती कार्यालयात पास मिळू लागले आहेत. त्यामुळे चांदोली अभयारण्यासह शिराळा तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांना आता एकाच वेळी चांदोली धरणही पाहता येणार आहे. पर्यटकांना होणाऱ्या अडचणींबद्दल महाराष्ट्र टाइम्सने २० ऑक्टोबरच्या अंकात संबधित वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठवला होता.
धरण व्यवस्थापनाची जबाबदारी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून जलसंपदा विभागाकडे गेल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली (ता. पन्हाळा) येथील धरणापासून सुमारे ७० किलोमीटरवर असणाऱ्या कार्यालयात पास मिळण्याची व्यवस्था होती. धरण सांगली जिल्ह्यात आणि धरणाचे व्यवस्थापन कोल्हापूर जिल्ह्यात असल्यामुळे धरणाची देखभाल दुरुस्ती जलसंपदा विभागाचे कार्यालय असलेल्या कोडोली येथून होत आहे. शिराळा तालुक्यातील वारणावती येथे जलसंपदा विभागाची उपशाखा आहे. मात्र, त्यांच्याकडे फारसे अधिकार नाहीत. आता पास देण्यापुरते अधिकार तरी मिळाले आहेत. त्यामुळे चांदोली अभयारण्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता धरण पाहण्यासाठीचा परवाना वारणावती कार्यालयातून देण्याची सोय झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स २० आक्टोबरच्या अंकात 'धरण व्यवस्थापनाचा बोजवारा' अशा माथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी पर्यटकांची मागणी लक्षात घेऊन आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे पास वारणावती कार्यालयात मिळावेत, अशी मागणी केली असल्याचे वारणा पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उत्तम मोहिते यांनी सांगितले होते. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन अधिकृत आदेशाने आता
परवाना चांदोली धरणाजवळील वारणावतीच्या कार्यालयातून द्यावेत, असे पत्र दिले आहे. त्यामुळे पर्यटकांचा नाहक त्रास आता वाचला आहे.
चांदोली परिसरात पर्यटनाला मोठा वाव आहे. मात्र, वाहतूक, हॉटेल आणि इतर सोयीसुविधा नसल्यामुळे पर्यटनाचा विकास खुंटला आहे. या परिसराचा आता सह्याद्री प्रकल्पात समावेश करण्यात आल्यामुळे विकासाला पुन्हा खो बसणार आहे. शिवाय प्रकल्पाच्या जाचक
अटींमुळे इतर सुविधा निर्माण करण्यालाही मर्यादा येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘क्राऊन उद्योगामुळे मिळणार रोजगार’

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
क्षारपड व नापिक जमिनीवर औद्योगिक संकुल उभे करण्याचे पाऊल उचलून क्राऊन उद्योग समुहाने ग्रामीण जीवनमान उंचावण्याचा योग्य प्रयत्न केला आहे. एखादा उद्योग आणण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात, अशा या संधीचा कवठेपिरान व पंचक्रोशीतील गावांच्या विकासासाठी निश्चितच फायदा होईल, असे मत माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. एमआरजे औद्योगिक संकुलाच्या भूमीपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला खासदार संजय पाटील उपस्थित होते.
मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे क्राऊन उद्योग समुह आणि लायकीस लिमिटेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या एमआरजे औद्योगिक संकुलाचा भूमीपूजन सोहळा जयंत पाटील यांच्या शुभहस्ते व खासदार संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी कवठेपिरान येथे पार पडला.
खासदार पाटील म्हणाले, या प्रकल्पामुळे बेरोजगार हाताना मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे. या संकुलातील साबण निमिर्ती, बिस्किटे, सौंदर्य प्रसाधने व पॅकेजिंग या चार कारखान्यांमुळे महिलांसाठीही रोजगार निमिर्ती होणार आहे. एमआरजे औद्योगिक संकुलाचे प्रवर्तक मोहनभाई जैन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या प्रकल्पातील सर्वच उत्पादने शंभर टक्के निर्यात होणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, सरपंच सोनाताई गायकवाड, दत्ता आण्णा पाटील, उद्योजक भालचंद्र पाटील, मनोहर मंडपाळे, उद्योजक सचिन पाटील, पवन गुप्ता व तासिरभाई ध्रोलिया व क्राऊन उद्योग समूहाचे विजय घोसर, निमेश हरिया आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साखर संघाच्या कामगारांवर अन्याय

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर
एका बाजूला राज्य सरकार व साखर संघ साखर कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रतील मोदींचे सरकार कामगार कायदेच बदलू पहात आहे. अशा परिस्थितीत साखर कामगारांना संघटनेच्या माध्यमातून संघटीतपणे लढा उभारावा लागेल, असा इशारा महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सचिव शंकरराव भोसले यांनी राजारामनगर येथे बोलताना व्यक्त केली.
आज (दि.२८) मुंबई येथे होणाऱ्या त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत काय निर्णय होईल, यावर दोन जानेवारीपासून करावयाच्या बेमुदत संपाचा निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली.
वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार प्रतिनिधी मंडळ (इंटक)च्या वार्षिक सभेत साखर कामगारांच्या प्रश्नांचा आढावा मांडताना ते बोलत होते. मंडळाचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष तानाजी खराडे अध्यक्षस्थानी होते.
भोसले म्हणाले, 'आज सर्वात कमी पगार कोणत्या क्षेत्रात असतील, तर ते साखर उद्योगात. तरीही आमचा कामगार प्रामाणिकपणे कष्ट करीत आहे. पूर्वी कामगार हा सभासद आहे. आपल्या कुटुंबातील घटक आहे. अशी वागणूक सहकारातील बुजुर्गांच्याकडून मिळत होती. आज काटकसर व अडचणींच्या नावाखाली प्रथम कामगारांच्यावर अन्याय होत आहे. त्रिपक्षीय समितीची मुदत संपल्यानंतर आम्ही हेलपाटे घातले. शरद पवार यांनी कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका, अशी भूमिका मांडली होती. आमदार जयंत पाटील यांनी सहकार्य केले. मात्र श्रेयवादी राजकारणामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात समिती झाली नाही. भाजपा-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर संघटना व पवार साहेबांच्या प्रयत्नांनी त्रिपक्षीय समिती स्थापन झाली. आतापर्यंत चार बैठका होऊनही निर्णय झालेला नाही. संघ व सरकार कामगारांच्या प्रश्नापासून पळ काढीत आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजातील संवेदनशीलता बोथट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज
समाजाची निकोप वाढ व्हायची असल्यास संस्कार मूल्यांची जपणूक करणे काळाची गरज आहे. हे काम संवेदनशील साहित्यिक व कलावंतच करू शकतात, असा विश्वास प्रसिद्ध कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी व्यक्त केला. मिरज तालुक्यातील बेळंकी येथील दुसऱ्या इरादा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरुन प्रा. पाटील बोलत होत. ज्येष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन, डॉ. मोहन पाटील, विधानसभेतील ग्रंथ व संशोधन अधिकारी बाबा वाघमारे व उद्घाटक ज्ञानेश्वर कोळी यांच्या उपस्थितीत संमेलनाचे उद‍्घाटन झाले.
प्रा. पाटील म्हणाले, महाराष्ट्राला विचारांची व संस्कारांची मोठी परंपरा आहे. तसेच लोकसाहित्याचेही मोठे योगदान आहे. आज साहित्य क्षेत्रात खूप मोठे बदल घडत आहेत. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, ग. दि. माडगूळकर, चारुतासागर, डॉ. मोहन पाटील, जी. के. ऐनापूरे यांच्या सारख्या विविध प्रवाहातील साहित्यिकांनी साहित्याचे मूल्य जोपासले आहे. दुर्दैवाने आज समाजाची संवेदनशीलता बोथट होत असून, अशा परिस्थितीत साहित्यिकांनी गांभिर्याने व जबाबदारीचे भान ठेऊन लिहिले पाहिजे. भौतिक सुखाच्या शोधात खरे व निर्मळ जगणे विसरुन चाललो आहे.
यावेळी ग्रामीण जीवन व ग्रामीण साहित्य तसेच युवा स्पेशल या विषयावर दोन परिसंवाद झाले. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात डॉ. मोहन पाटील, प्रा. संतोष काळे, डॉ. भीमराव पाटील यांनी सहभाग घेतला. युवा स्पेशन या कार्यक्रमात राजा माळगी, इरफान मुजावर, राहुल कदम यांनी सहभाग घेतला. दयासागर बन्ने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात अभिजित पाटील, डॉ. अनिता खेबूडकर, प्रा. अनिलकुमार पाटील, रुचा वाघमारे, मनिषा पाटील, ज्ञानेश्वर कोळी, प्रा. संतोष काळे आदींनी सहभाग घेतला.
ज्येष्ठ कथाकथनकार आप्पासाहे खोत यांचे बहारदार कथाकथन झाले. त्यांच्या कथेस श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला. स्वागत रवी कुंभार यांनी केले. प्रास्ताविक नायब तहसीलदार मदन जाधव यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटपाथ फळमार्केट तेजीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन-तीन वर्षांपासून शहरातील फुटपाथवर फळविक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सांगलीतील फळ मार्केटमधून होलसेल खरेदी केलेली फळे कोल्हापुरात आणून विकली जात आहेत. परिणामी कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळांच्या खरेदी-विक्रीवर याचा परिणाम झाला आहे, तर फुटपाथवरील फळ मार्केटमुळे शहरात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

कोल्हापूर शहरातील कोणत्याही रस्त्याने गेले तरी फुटपाथवर बसलेले फळ विक्रेते हमखास दिसतात. तजेलदार फळे आणि परवडणारे दर यामुळे मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी फुटपाथवरील विक्रेत्यांकडे होत आहे. मंडईंच्या आसपास असलेला वाहन पार्किंगचा प्रश्न आणि फुटपाथवरील फळांचे परवडणारे दर यामुळे नागरिकांचा कल फुटपाथवरील फळांच्या खरेदीकडेच आहे. सहज जाता-जाता होणाऱ्या आणि खिशाला परवडणाऱ्या खरेदीबरोबरच ताजी फळे मिळत असल्याने नागरिकांची फुटपाथवरील फळ खरेदी वाढली आहे.

कोल्हापुरातील फुटपाथवर फळ विकणारे सुमारे १०० विक्रेते सांगली जिल्ह्यातील कोळे, चळे, जुनोनी या परिसरातील आहेत. दररोज सांगलीतील विष्णुआण्णा पाटील फळ मार्केटमध्ये फळांची होलसेल खरेदी केली जाते. वीस टेम्पोंमधून ही फळे कोल्हापुरात दाखल होतात. कोल्हापुरातील त्यांच्या विक्रेत्यांकडे फळे पोहोच केल्यानंतर शहरातील सर्वच मुख्य मार्गांवरील फुटपाथवर दुकाने थाटली जातात. दररोज ताजी फळे विक्रीसाठी येत असल्याने ग्राहकही या फळांच्या खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. कोल्हापूर शहरासह गांधीनगर, इचलकरंजी, पेठवडगाव, कागल, इस्लामपूरसह कोल्हापूर-सांगली मार्गावरही या विक्रेत्यांची दुकाने वाढली आहेत.

एकीकडे फुटपाथवरील व्यापाऱ्यांचा धंदा तेजीत असताना दुसरीकडे कोल्हापूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ मार्केटला मात्र मोठा फटका बसला आहे. दररोज कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी सुमारे ४० लाखांची उलाढाल २० ते २५ लाखांवर आली आहे. याचा फटका स्थानिक फळ विक्रेत्यांनाही बसत आहे.

उलाढाल १५ लाखांची

फुटपाथ फळ मार्केटची दररोजची उलाढाल जवळपास पंधरा लाख रुपयांची आहे. यावर शंभरहून अधिक कुटुंबांचे अर्थार्जन सुरू असून, दिवेसंदिवस हे मार्केट वाढतच आहे. ताजी आणि परवडणारी फळे मिळत असल्याने नागरिकांसाठीही हे मार्केट फायद्याचे ठरत आहे.

मी गेल्या आठ वर्षांपासून कोल्हापूर शहरात फळांची विक्री करीत आहे. दररोज सांगलीतून येणारी ताजी फळे विकण्यावर आमचा भर असतो. जास्त नफा मिळवण्यापेक्षा जेवढी फळे आणली आहेत, तेवढी विकण्याचे उद्दिष्ट असते. ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादामुळेच विक्रेत्यांची संख्या वाढली आहे.'

-विष्णू आलदर, फळ विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणासाठी पेटून उठा

$
0
0

मराठा महासंघातर्फे आरक्षण मेळावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तत्कालीन आघाडी सरकारने आरक्षणाची स्वप्ने दाखविली तर सत्ताधारी युती सरकारही मराठा आरक्षणावर मूग गिळून गप्प आहे. गेली पंचवीस वर्षे सुरु असलेल्या आरक्षणाची लढाई आता आर-पार करायची आहे. या आरक्षण रॅलीची सुरुवात कोल्हापुरात होत आहे. प्रचंड रॅली काढून कोल्हापूरची ताकद मुंबईत दाखवा. आरक्षणासाठी पेटून उठा,' असे आवाहन मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी केले. अखिल भारतीय मराठा महासंघ, मराठा स्वराज्य भवन ट्रस्टतर्फे रविवारी मराठा आरक्षण मेळावा आणि मराठा दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उद्योजक दिलीप पाटील होते. राजर्षी शाहू स्मारक भवनात हा मेळावा झाला.

'मराठा आरक्षण सद्यस्थिती आणि पुढील दिशा' या विषयावर बोलताना कोंढरे म्हणाले, 'गेली पंचवीस वर्षे आरक्षणाचा लढा सुरु आहे. मात्र त्यातून ठोस काहीच निर्णय झालेला नाही. सध्या आरक्षणाची याचिका प्रलंबित आहे. आरक्षणासाठी राजकीय इच्छाशक्ती अजूनही कमी पडत आहे. राजकारण्यांनी या आरक्षणाची अवस्था बेवारसासारखी केली आहे.'

दिलीप पाटील म्हणाले, 'मराठा समाज शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक अशा सर्वंच पातळीवर पिछाडीवर आहे. भविष्यातील पिढ्या टिकविण्यासाठी आरक्षणाची गरज आहे.' महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, 'मराठा स्वराज्य भवनासाठी कोल्हापुरात हजारोजणांचा मेळावा घेतला जाईल.'

मान्यवरांच्या हस्ते पहिली दिनदर्शिका शहीद जवानांच्या स्मृतीसाठी मेजर हरी पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी इंद्रजित महाजन, सत्यजित इंगळे यांचा सत्कार झाला. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. प्रतापराव वरुटे, एस. एस. पोवार, सुरजितसिंह पोवार, प्रा. शिवाजीराव सावंत आदी उपस्थित होते. शंकरराव शेळके यांनी स्वागत केले. शहराध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत पाटील यांनी आभार मानले.

सजगता, प्रगल्भता दाखवा

कोंढरे म्हणाले, 'उच्च शिक्षणातून मराठा समाजाची मुले पद्धतशीर पणे बाहेर पडतील, अशी व्यूहरचना करुन अनेक परिपत्रके काढली जात आहेत. बहुतांश मराठा समाज आर्थिदृष्ट्या मागास आहे. शिक्षणातही मराठा समाजाचा टक्का कमी आहे. मराठा समाजाने ही परिस्थिती बदलून सजगता, प्रगल्भता दाख‍विण्याची गरज आहे. मराठा समाजाने सोसायटीच्या निवडणूकीतून बाहेर पडून आरक्षणासाठी रस्त्यावरची लढाई ताकदीने लढवण्याची गरज आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरोचीत बनावट मद्याच्या कारखान्यावर छापा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोरोची (ता. हातकणंगले) येथे बनावट विदेशी मद्य तयार करण्याच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूरच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून मद्य तयार करण्याचे साहित्य, दोन मोटारीसह ४१ लाख ४४ हजार ३१० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी जगदीश आप्पासो केसरकर (वय ४०, रा. नांगनूर, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), श्रीनिवास मुन्नीस्वामी आप्पा (४२, रा. रामोहोली, ता. किंगेरी, जि. हुबळी), नागराज नारायण आप्पा (५१, रा. विवेकानंद कॉलनी, कनकपुरा रोड, जेपीनगर बेंगळरू), टी. राज गोपाल (४०, रा. भाटामती गिरी, डिकनी कोटा अंधवेळणा पल्ली, ता. केगिली जि. कृष्णागिरी, तामिळनाडू), संजय धोंडीराम माने (रा. कोरोची, ता. हातकणंगले), मारूती भैरू माने (रा. गायकवाडी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) या संशयितांना अटक केली आहे.

कणेरीवाडी (ता. करवीर) येथे राज्य उत्पादन शुल्क विभगाने संशयित संजय माने याला चारचाकीसह तीन लाख दोन हजार ८०० रूपये किंमतीच्या बनावट मद्याची वाहतूक करताना अटक करून गुन्हा नोंद केला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता कोरोची येथील घरात बनावट मद्य तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कोल्हापूर विभागाचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली संजय माने याच्या घरावर छापा टाकला. पोलिस उपअधीक्षक संजय पाटील, निरीक्षक राजाराम खोत व पन्नास कर्मचाऱ्यांनी घराची तपासणी केली असता माने याच्या खानावळीच्या मागे असलेल्या शेडमध्ये बनावट मद्याचा कारखाना उघडकीस आला. मद्य तयार करण्यासाठी लागणारे स्पिरिट, बॉटलिंग मशिन, रिकाम्या बाटल्या. कॅरेमल, विविध ब्रॅडच्या महाराष्ट्र, कर्नाटक, व आंध्र प्रदेश राज्यातील मद्य कंपनाची लेबल्स, बुचे साहित्याचा साठा जप्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फळ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजेंद्रनगर साळोखे पार्क येथे एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीत अजय आण्णासो कदम (वय २३, रा. एस.एस.सी बोर्ड ऑफीजवळ) या फळविक्रेत्यावर कोयता व कुकरीने हल्ला झाला. जखमी कदम याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.

अजय हा सायबार चौकात फळे विक्री करतो. रविवारी सायंकाळी अजय साळोखे पार्क येथील भारतनगर येथील मित्राला भेटायला गेला होता. यावेळी त्याची जब्बीन शेख व गुंड्या यांच्याशी वाद झाला. त्यानंतर त्याला जब्बीन, गुंड्या, आदम शेख, दस्तगीर शेख यांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. गुंड्या व जब्बीनने कोयता व कुकरीने वार केले. अजयच्या डोके, हात व पोटावर वार झाले आहेत. अजयचा​ मित्र सनी पोळ असून त्याने दोन दिवसापासून धमकीचे फोन येत होते अशी माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

दोन स्क्रॅप विक्रेते ताब्यात

कोल्हापूरः लक्ष्मीपुरी पोलिसांनी संशयावरून विकास रामचंद्र काळे व अजित विकास किरूळकर या दोन स्क्रॅप विक्रेत्यांना ताब्यात घेतले. त्यांनी जुन्या बाजारात रिक्षाने स्क्रॅप विक्रीस आणले होते.

पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर विकासने रिक्षातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. रविवारी दुपारी ही घटना घडली. दोघांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

विष पिऊन आत्महत्या

कोल्हापूरः तळंदगे (ता. हातकणंगले) येथील सुकुमार पिरगोंडा पाटील (वय २८) यांनी ​विष पिऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (ता. २५) त्यांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले होते. उपचार सुरू असताना रविवारी दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. सीपीआर पोलिस चौकीत मृत्यूची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी विद्यार्थ्यांचा टक्का वाढणार

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

शिवाजी विद्यापीठाने पाच बंगला परिसरातील एक बंगला परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. वसतिगृहासाठी विद्यापीठ परिसरातीलच एका बंगल्याचे सुमारे पंधरा लाख रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे इंडियन काऊन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन (आयसीसीआर)ची विद्यार्थी वसतिगृहाची अट शिवाजी विद्यापीठ पूर्ण करणार असल्याने परदेशी विद्यार्थ्यांचा टक्का वाढणार आहे. हा टक्का वाढणार असल्याने विद्यापीठाचा दर्जा जागतिक नकाशावर ठळक होणार आहे.

नव्या वसतिगृहात किमान ६० विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. येत्या जून २०१६ पासून परदेशी विद्यार्थ्यांच्यासाठी वसतिगृह खुले करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू के. बी. पवार यांच्या काळात परदेशी विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव तयार झाला होता. मात्र हा प्रस्ताव मागे पडला. परदेशी विद्यार्थी शिवाजी विद्यापीठात अधिकाधिक येण्यासाठी आता विद्यापीठाने त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृहासाठी एक इमारत देण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षणाचे माहेरघर आणि 'ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट' असा गौरव मिळालेल्या पुण्यालाच परदेशी विद्यार्थी शिक्षणसाठी पसंती देतात. मुंबई आणि पुणे विद्यापीठाच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठात गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. मात्र आयसीसीआरच्या अटीत परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहाची अट होती. आता ही अट शिवाजी विद्यापीठ पूर्ण करणार असल्याने विद्यापीठाला मुबलक विद्यार्थी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. आयसीसीआरने परदेशी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घातलेल्या अटींची पूर्तता शिवाजी विद्यापीठ करण्यासाठी ठोस प्रयत्न सुरु केले आहेत.

अन्य राज्यातील विद्यापीठाच्या तुलनेत विद्यापीठाने परदेशी विद्यार्थ्यांचे ३०० डॉलरवरुन १०० डॉलर शुल्क केले आहे. शिवाजी विद्यापीठाने पंचवीसहून अधिक देशासमवेत सामंजस्य करार केले आहेत. परदेशी विद्यार्थी शिवाजी विद्यापीठात येण्यासाठी मार्केटिंगवर अधिक भर दिला जाणार आहे. वेबसाइटवर स्वतंत्र विभाग करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. लिव्हरपुल जॉन मुर्रस विद्यापीठाप्रमाणेच माहिती पत्रिकेची मार्केटिंगची पद्धत राबविण्यात येणार आहे.

'इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स'च्या माध्यमातून (आयसीसीआर) तीन हजार शिष्यवृत्तीधारक परदेशी विद्यार्थी २०१४ मध्ये शिक्षणासाठी भारतात आले. पैकी ९०० विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेत आहेत. परदेशातून शिक्षणासाठी भारतामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 'आयसीसीआर'तर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. या अंतर्गत जगभराच्या ४२ देशांतील ३ हजार विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभार्थी ठरले. पुणे विद्यापीठात अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबर आखाती देशांसह, ऑस्ट्रेलिया, जर्मनीतील विद्यार्थी आहे. विविध देशांतील भारतीय दूतावासात शिक्षणासाठी भारतामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत हे विद्यार्थी भारतामध्ये येतात. यात पारंपरिक शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य, योगा, आयुर्वेद या विषयांचा अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचा कल आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागात श्रीलंकेतील एक विद्यार्थीही शिक्षण घेत आहे. त्यासह इकॉनॉनिक्स विभागात तीन विद्यार्थी आणि लॉ चे एक विद्यार्थी अध्ययन करीत आहे. नायजेरिया, केनिया, युगांडा या देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परदेशी विद्यार्थ्यांना दरमहा साडेपाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती आणि निवास खर्चापोटी साडेचार हजार असे प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दरमहा दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली जाते. विद्यार्थ्यांला वर्षांतून एकदा पुस्तकांच्या खरेदीसाठी पाच हजार रुपये दिले जातात.

पारंपरिक शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम, ऑनलाइन अभ्यासक्रम परदेशी विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात येणार आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या आवडीनुसारचे अभ्यासक्रम विद्यापीठात निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

-डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्पादन शुल्कात १६ टक्के वाढ

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात नऊ महिन्यात १६ टक्के अधिक महसूल जमा झाला आहे. कोल्हापूर व कागल तालुक्यातील मद्य निर्मिती करणाऱ्या तीन कारखान्यातून शंभर कोटींहून अधिक महसूल जमा झाला आहे. २३ डिसेंबर २०१५ अखेर जिल्ह्यात १०५ कोटी ४१ लाख ५३ हजार २४१ रूपये महसूल जमा झाला आहे.

राज्याच्या तिजोरीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सर्वात जास्त निधी मिळतो. कोल्हापूर जिल्ह्याला १७० कोटी ४० लाखाचे उद्दिष्ट दिले आहे. या विभागाला मद्यनिर्मिती कारखान्यातून प्रति बाटलीमागे महसूल जमा होता. कोल्हापूर जिल्ह्यात मद्य निर्मितीचे एकूण तीन कारखाने आहेत. त्यातील दोन कारखाने हे शिरोली नाका येथे तर एक कारखाना कागल येथे आहे. देशी व विदेशी मद्य या कारखान्यात तयार होते. जिल्हा कोषागार कार्यालय अथवा ई चलनाव्दारे महसूल जमा होत असतो.

एप्रिल २०१५ ते २३ डिसेंबर २०१५ अखेर १०५ कोटी ५४ लाख ५३ हजार २४१ रूपये महसूल जमा झाला आहे. गतवर्षी डिसेंबर २०१४ अखेर ९१ कोटी १६ लाख ८५ हजार ९८२ रूपये महसूल जमा झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत १६ टक्के महसूल जादा झाला आहे. २०१५ या आर्थिक वर्षात तीन कारखान्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात ३८ टक्के, ऑक्टोबर महिन्यात २७ टक्के, डिसेंबर महिन्यात २२ टक्के तर मे महिन्यात २५ टक्के जादा महसूल जमा झाला आहे.

याशिवाय जिल्ह्यातील देशी व विदेशी मद्य दुकानाच्या परवाना शुल्कातून व कारवाईत जप्त केलेल्या मालाच्या लिलावातून पाच टक्के महसूल जमा होतो. जिल्ह्यात १३५२ देशी विदेशी मद्य विक्रीची दुकाने आहेत. गतवर्षी चोरटी विदेशी मद्याची आयात केल्याप्रकरणी भरारी पथकाने १६४६ कारवाया केल्या होत्या. त्यामध्ये ८६९ आरोपींना अटक झाली होती, तसेच ६७ वाहने जप्त केली होती. जप्त केलेल्या मुद्देमालाच्या लिलावातून एक कोटी ३६ लाख ६६ हजार ५१४ रूपये मिळाले होते.

चोरटी वाहतूक करणारी वाहनेही बेवारस

मद्याची चोरटी वाहने करणाऱ्या वाहनेही बेवारस असतात. वाहनांचा नंबर बोगस असतो तर चासिस नंबरही बोगस असतो. जप्त केलेली वाहने नेण्यासाठी कोणीच पुढे येत नाहीत. त्यामध्ये ट्रक, टेंपोसारखी अवजड वाहनेही असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिट्टी की बावड्यात दिवाळी?

$
0
0

Gurubal.Mali @timesgroup.com

कोल्हापूरः विधानपरिषद निवडणुकीत बुधवारी आमदार महादेवराव महाडिकांची विजयी शिट्टी वा​जणार की सतेज पाटील यांच्या विजयाने कसबा बावड्यात चौथी दिवाळी साजरी होणार हे विनय कोरे, प्रकाश आवाडे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर समर्थकांच्या हातात आहे. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने या तिघांच्या भूमिकेला अतिशय महत्व होते. येथे क्रॉस व्होटिंग किती प्रमाणात झाले यावरच निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. या तीन गटाची मते फुटली नसतील तर बावड्यात दिवाळी निश्चित मानली जात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाल्यानेच काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चार नेत्यांनी जंग जंग पछाडले होते. कारण ही उमेदवारी म्हणजे किमान दिडशेपेक्षा जास्त मताची बेगमी असल्याने आणि विजयाचे गणित येथेच पक्के होणार असल्याने तिकीटासाठी मोठी फिल्डींग लागली होती. यामध्ये सतेज पाटील यांनी बाजी मारली आणि निम्मी लढाई त्यांनी तेथेच जिंकली. नंतर जनसुराज्यची शक्ती त्यांच्याबरोबर गेल्याने पाटील यांच्या सहलीत २४० पेक्षा अधिक मतदार दाखल झाले. याउलट पहिल्या टप्यात कागदावर १४० मते आपल्याडे फिक्स आहेत, याची जाणीव जेंव्हा महाडिक गटाला झाली तेंव्हाच त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. २४० मधील ५० मते फोडण्याचा चंग बांधून पंधरा दिवस पायाला भिंगरी बांधली. ही मते फोडताना त्यांची मदार राहिली ती कोरे, आवाडे आणि यड्रावकरांवरच.

महाडिक आणि पाटील यांच्याकडील हक्काच्या मताच्या आकडेवारी प्रत्येकी दीडशेच्या आसपास होती. यापुढे निकाल अवलंबून होता तो बाहेरून किती मते मिळवणार यावरच. यामुळेच कोरे, यड्रावकर आणि आवाडे यांच्या हातात निकाल होता. मतदानानंतरही ते स्पष्ट झाले. यामुळे दोन्ही उमेदवारांनी दहा वेळा या तिघांच्या घराच्या ​पायऱ्या झिजवल्या. या तिघांकडे मिळून ९० मते होती. ही मतेच विजयाला हातभार लावणार असल्याने या मतांवरच दोघांचा डोळा होता. कारण समरजित घाटगे, विद्याताई पोळ, जयराम पाटील, करणसिंह गायकवाड या गटाची मते पाटील यांनाच मिळणार हे उघडसत्य होते. याउलट रणजित पाटील, डांगे, संजय घाटगे, श्रीपतराव शिंदे, भरमू सुबराव यांच्यासह काही गटाची बहुसंख्य मते महाडिक यांच्या हक्काची होती, त्यामुळे या गटाच्या फोडाफोडीत दोघांनीही म्हणावा तेवढा रस घेतला नाही. उमेदवारी न मिळाल्याने आवाडे गट नाराज असेल, यड्रावकरांना वरून आदेश येईल या आशेवर तो गट फोडण्यात महाडिक गटाने अधिक रस दाखवला. राष्ट्रवादीची मते फुटू नयेत, सेनेची अधिकाधिक मते आपल्याच पारड्यात पडावीत यासाठी पाटील गटाने फिल्डींग लावली. यात यश कोणाला आले हे बुधवारी कळणार आहे.

कोल्हापूर, पन्हाळा, हातकणंगले केंद्रस्थानी

मतदानासाठी ज्या गटाच्या वतीने मतदार आले ते पाहता कोल्हापूर, पन्हाळा, कागल व हातकणंगलेत सतेज पाटील यांना मताधिक्य मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण या तीनच मतदान केंद्रांवर महाडिक यांच्यापेक्षा साठहून अधिक मतदार पाटील यांच्या बा​जूने आले. येथे जर क्रॉस व्होटिंग जादा झाले नाही तर बावड्यात चौथी दिवाळी साजरी होण्याची शक्यता आहे. जर येथे याउलट स्थिती झाली असेल तर महाडिकांची शिट्टी घुमण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

राष्ट्रवादीत उभी फूट

राष्ट्रवादीने सतेज पाटील यांना पाठिंबा दिला असला तरी या पक्षात उभी फूट पडली होती. पाटील यांचा विधानसभेचा पैरा फेडण्यासाठी मुश्रीफ अतिशय प्रामाणिकपणे पाटील यांच्या निवडणुकीची सूत्रे हलवत होते. पण या पक्षाचे इचलकरंजी, मुरगूड, पेठवडगाव, कुरूंदवाड आणि शाहूवाडीचे २५ पेक्षा अधिक नगरसेवक उघडपणे महाडिक यांच्या कळपात होते. राष्ट्रवादी फुटल्याचे लक्षात आल्यानेच जनसुराज्य शक्ती मिळावी म्हणून पाटील गटाने प्रचंड प्रयत्न केले. यड्रावकर तर तारणहार ठरले. या दोघांच्या मतावरच सतेज पाटील यांचा विजय अवलंबून राहण्याची शक्यता आहे. शिवसेनेने आघाडी धर्म पाळत महाडिक यांना पाठिंबा दिला असला तरी मतदारांनी मात्र आपल्या सोयीने मतदान केल्याने सेनेत क्रॉस व्होटिंग झाले. 'गोकुळ' च्या राजकारणामुळे संजय घाटगे, भरमू सुबराव पाटील, बजरंग देसाई या गटाने महाडिक यांना मदत होईल अशी कामगिरी बजावली. पक्षाच्या नेत्यांना टाळण्याच्या त्यांच्या भूमिकेवरूनच ते स्पष्ट होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलाल कुणाला?

$
0
0

कोल्हापूर विधानपरिषदेसाठी चुरशीने मतदान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यापासून मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी गेल्या महिनाभरापासून काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व अपक्ष असलेले महादेवराव महाडिक यांच्यात सुरू असलेली चुरस रविवारी मतदारांनी मतपेटीत बंद केली. साऱ्या नेत्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाल्याने सर्व म्हणजे ३८२ मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यास लावला. दोन आठवड्यापासून सहलीवर पाठवलेल्या मतदारांना जिल्ह्यातील त्या त्या मतदान केंद्रावरच थेट पोहचवण्यात आले. सारी मौजमजा लुटून मतदार प्रामाणिक राहिले की गद्दारी केली याचा निकाल आता बुधवारी, (ता.३०) लागणार आहे. हातकणंगले मतदान केंद्रासमोर महाडिक व पाटील समर्थक आमनेसामने आल्याने जोरदार घोषणाबाजी झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

बुधवारी (३० डिसेंबर) शासकीय तंत्रनिकेतन येथे सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होणार आहे. जास्तीत जास्त दुपारी बारापर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सतेज पाटील व आमदार महाडिक दोघांनीही विजयाचा दावा केल्याने येथील निकालाची राज्यभरात उत्कंठा ताणली गेली आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात बारा ठिकाणी मतदान केंद्रे होती. त्यातील सर्वाधिक मतदान उद्योग भवन, हातकणंगले (प्रत्येकी ९३), शिरोळमध्ये ५३ तर कागलमध्ये ४४ असे मतदान होते. पन्हाळा (२६), गडहिंग्लज (२५), शाहूवाडी (२४) येथे दोन आकडी मतदान होते. उद्योग भवन व हातकणंगलेत मोठी चुरस दिसून येत होती. इतर ठिकाणी दुपारी एकपर्यंत मतदान संपले होते. फक्त गडहिंग्लज व कोल्हापूर येथीलच मतदान पूर्ण झाले नव्हते. सर्वांत शेवटी दुपारी तीनला कोल्हापुरातील मतदान पूर्ण झाले.

उद्योग भवनासमोर पोलिसांनी मोठा बंदोबस्त होता. सर्व मतदार मतदान करुन बाहेर पडेपर्यंत महावीर उद्यानातही पोलिसांनी कुणाला सोडले नव्हते. केवळ मतदारांनाच मतदान केंद्रासमोरील रस्त्यावर सोडले जात होते. महाडिक व पाटील समर्थकांना थांबण्यासाठी दोन वेगवेगळ्या जागा दिल्या होत्या. महाडिक समर्थकांचे मतदान झाल्यानंतर या गटाकडील समर्थक कमी झाले होते. सर्वांत उशिरापर्यंत पाटील गटाचे मतदान झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी होती.

सकाळी आठला मतदानाला प्रारंभ झाला असला तरी महाडिक त्यापूर्वी उपस्थित होते. नऊच्या सुमारास महापालिकेतील भाजप व ताराराणी आघाडीचे ३२ नगरसेवक मतदान केंद्रावर आले. येथे सर्वांत पहिले मतदान भाजपचे संभाजी जाधव यांनी केले. ​जिल्हा परिषदेतील एस. आर. पाटील, विलास पाटील, बाजीराव पाटील हे शिवसेनेचे ​सदस्य दहा वाजता तिथे पोहचले. हे सारे मतदान करुन बाहेर पडल्यानंतर सतेज पाटील यांच्या समर्थकांची प्रतिक्षा होती. तत्पूर्वी शिवसेनेच्या चार नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक महाडिक समर्थकांसाठी राखीव ठेवलेल्या जागेतून स्वतः महाडिक मतदान केंद्रावर घेऊन आले. त्यानंतर सतेज पाटील यांच्या समर्थकांसाठी ठेवलेल्या जागेतून उर्वरित दोन नगरसेवक आले. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदानही वाटून घेतले की काय अशीच चर्चा होती.

सतेज पाटील सकाळी इचलकरंजी, हातकणंगले येथे जाऊन आले. त्यांचे मतदार सकाळी अकरा वाजेपर्यंत येणार अशी चर्चा असताना प्रत्यक्षात पावणेदोन वाजले. भगवे फेटे परिधान करुन आलेल्या मतदारांसोबत सतेज पाटील, हसन मुश्रीफ, संजय डी. पाटील, प्रा. जयंत पाटील, आर. के. पोवार, प्रल्हाद चव्हाण उपस्थित होते. ५३ मतदारांपैकी ४४ महापालिकेतील तर ९ जिल्हा परिषदेतील होते. त्याचवेळी भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांसोबत न आलेले सत्यजीत कदम मतदानासाठी आले. पाटील गटाच्या मतदारांना नमस्कार करण्यासाठी महाडिक उभे होते. पण त्यांच्याकडे कुणी पाहिले नाही.

मतदानासाठी महापालिकेतील चाल

महापालिकेत पूर्वी गुप्त मतदान असताना कुणी मतदान केले की नाही हे समजण्यासाठी सांकेतिक खुणा तसेच कोणत्या ठिकाणी चिन्ह उमटवायचे हे ठरलेले असायचे. तीच पद्धत यावेळी पाटील गटाकडून वापरण्यात आली. मोठ्या प्रमाणावर असलेल्या मतदारांकडून मतदान फुटू नये यासाठी प्रत्येकाला आपल्या उमेदवारासमोरच्या चौकटीत कोणत्या ठिकाणी एक हा क्रमांक लिहावा हे सांगितले होते. तसेच मतदानासाठी पसंतीक्रम असला तरी केवळ पहिल्या क्रमांकाचे मत देण्याचे आदेश असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाला कंटाळून आत्महत्या

$
0
0

कुपवाड : कर्जबाजारीपणाला कंटाळून तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील माणिक जनार्दन पाटील (वय ४८) या शेतकऱ्याने सोमवारी आत्महत्या केली. सोसायटीचे आणि हातउसने असे पाच लाखाचे कर्ज, पाणीटंचाईने वाळून जात असलेला ऊस अशा कात्रीत सापडलेल्या पाटील यांना डिप्लोमाला शिकणाऱ्या मुलाचे शिक्षण कसे होणार याची चिंता लागली होती, अशी माहिती समोर आली आहे.

माणिक पाटील यांची आत्महत्या ही या महिन्यातील दुसरी शेतकरी आत्महत्या आहे. सोमवारी सकाळी त्यांनी गावातील औषध दुकानातून विषारी औषध खरेदी केले. दुकानाच्या बाहेरच ते पिऊन घर गाठले. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावकारीला कंटाळून कुटुंब संपवले!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या करण्याची हृदयद्रावक घटना रविवारी वाळवा तालुक्यातील बनेवाडी येथे घडली. दोन्ही मुलांचे गळे दाबून नंतर या पती-पत्नीने गळफास घेतला.. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितही हेलावून गेले. घटनेची नोंद इस्लामपूर पोलिस ठाण्यात झाली आहे. संजय भीमराव यादव (वय ४५), त्यांची पत्नी जयश्री (३०), मुलगा राजवर्धन (४) व मुलगी समृध्दी (४ महिने) अशी यांतील मृतांची नावे आहेत.

संजय यादव यांचे ताकारी येथे बेकरी उत्पादने विक्रीचे दुकान आहे. या दुकानासाठी त्यांनी खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. अनेकदा मुद्दलाइतकी रक्कम भागवूनही व्याजासह कर्जाइतकीच रक्कम शिल्लक दिसायची. सावकाराच्या तगाद्याने त्यांना मानसिक त्रास होत होता. या त्रासातूनच या दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलले असावे.

संजय यादव यांना रोज सकाळी नदीवर पोहायला जायची सवय होती. आज सकाळी पोहायला जाणाऱ्या ग्रुपमधील काहींनी साडेपाचच्या सुमारास त्यांना आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता नळाला पाणी आले. तरीही यादव कुटुंबीयांचे दार उघडले नाही. म्हणून शेजाऱ्यांनी हाका मारल्या. दार ठोठावले तरीही प्रतिसाद न मिळाल्याने काहींनी खिडकीतून डोकावून पाहिले तर दोघांचे मृतदेह लटकताना दिसले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण गाव जमा झाला. पोलिस पाटील पोपट साटपे यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दरवाजा उघडून मृतदेह खाली उतरवले. पंचनामा करून मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

बनेवाडी येथील जुन्या गावठाणात संजय यादव यांचे चार खोल्यांचे घर आहे. जमीन नसल्याने त्यांनी वीस गुंठे जमीन खंडाने केली होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी सावकारी कर्ज घेऊन ताकारीत बेकरी व्यवसाय सुरू केला होता. यासाठी घेतलेले कर्ज दिवसेंदिवस वाढत चालले होते. त्यामुळे सावकाराचा तगादा सुरू होता. याला कंटाळूनच या दाम्पत्याने मुलांसह आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना वाऱ्यासारखी सांगली जिल्ह्यात पसरली. उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली शिंदे व सहायक पोलिस निरीक्षक संगीता पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

संजय यादव याची पहिली पत्नी नऊ वर्षांपूर्वी मयत झाली आहे. तिचा खून संजयने केला असावा म्हणून त्याच्यावर खटला सुरू होता. मात्र त्यातून संजय निर्दोष सुटला होता. गेल्या पाच सहा वर्षांपूर्वी पडवळवाडीतील जयश्री यांच्याशी त्याचा विवाह झाला होता.

कोण पाटणकर आप्पा?

संजय यादव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलाच्या शाळेच्या पाटीवर मजकूर लिहिला होता. तो असा 'पाटणकर आप्पा हे आम्हाला त्रास देत आहेत. त्यांची चौकशी व्हावी.' पाटीवरील या मजकुराने त्याच्याच नावाची घटनास्थळी चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images