Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

समुपदेशनचा पर्याय योग्य

0
0

बालगुन्हेगार सुधारणा विधेयकाबाबत मते

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यसभेत बाल गुन्हेगारी न्याय (सुधारणा) विधेयक मंजूर झाल्याने गुन्हेगारीस आळा बसणार असून युवती व महिलांवरील अत्याचाराचा घटना कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचवेळी १६ ते १८ या वयोगटातील युवकांचे समुपदेश करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.

महिला व युवतीवरील अत्याचार रोखण्यासाठी गुन्हेगाराचे वय १८ वरून १६ वर्षापर्यंत करण्यात आले आहे. हे विधेयक राज्यसभेत आवाजी मताने मंजूर झाले. नव्या कायद्यानुसार बलात्कार, खून, अॅसिड हल्ला अशा अत्यंत गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या १६ वर्षांवरील गुन्हेगार प्रौढ ठरणार आहेत. १८ वर्षाखालील मुले व मुली यापूर्वी विधीसंघर्ष गुन्हेगार म्हणून ओळखली जात होती.

सध्या मोबाइल चोरी व पैशाची बॅग पळवण्याच्या गुन्ह्यात लहान मुलांचा वापर केला जात आहे. लहान मोठे गुन्हे करून गंभीर गुन्हे करण्यास मुले प्रवृत्त होतात. या पार्श्वभूमीवर नवीन कायद्याचे स्वागत पोलिस दलातून होत आहे.

पळवाटांना वाव मिळायला नको

अॅड. शिवाजी राणे म्हणाले, 'यापूर्वी घटनादुरूस्ती करून गुन्हेगाराचे वय १६ वरून १८ वर्षे केले होते. आता १६ वर्षांवरील गुन्हेगार प्रौढ ठरणार आहे. पण या कायद्यातही पळवाट काढण्यात आली. १६ वर्ष पूर्ण झालेल्या गुन्हेगारांना २१ वर्षांपर्यंत कठोर शिक्षा देऊन नका, अशी पळवाट काढली आहे. गुन्हेगारांना शिक्षा देण्याऐवजी १६ ते १८ वयोगटातील मुले व मुलींना समुपदेशनाची गरज आहे. कडक कायदे करून प्रश्न सुटत नाहीत. १६ वर्षे पूर्ण झालेला गुन्हेगार प्रौढ ठरत असेल तर १६ वर्षाच्या मुलांना मतदानाचा अधिकार द्या अशी मागणीही होऊ शकेल.

मूळ प्रश्नाला हात घालायला हवा

कायदे कडक केल्याने व वय कमी केल्याने गंभीर गुन्हे थांबणार नाहीत. प्रगत राष्ट्रात प्रौढ गुन्हेगाराचे वय १६ वरून १८ केले जात असताना भारतात मात्र उलटा प्रकार घडत आहे. गुन्हे घडण्यासाठी येथील भौतिक वातावरण कारणीभूत आहे. १६ ते १८ वयोगटातील मुले मोठ्यांचे अनुकरण करतात. ते पोर्नोग्राफी व ब्ल्यू फिल्मच्या नादाला लागले आहेत. वय कमी करून प्रश्न सुटणार नाही तर या प्रश्नांच्या मूळ गाभ्याला हात घातला पाहिजे. मुलांना चांगले व योग्य शिक्षण दिल्यास गंभीर गुन्हे कमी होऊ शकतील.

अनुराधा भोसले, जिल्हा निमंत्रक, स्वाभिमानी बाल हक्क अभियान

गुन्ह्यांना चाप

मुलींची छेडछाड करणे, फूस लावून मुलींना पळवणे यासारख्या गुन्ह्यात १८ वर्षाखालील मुले कायद्याच्या पळवाटेतून सुटत असत. मुलींची छेडछाड, चेष्ठा मस्करी करणारे तरूणही १६ ते १७ वयोगटातील असतात. या नवीन कायद्यामुळे अशा गुन्ह्यांवर चाप बसू शकेल.

अमृत देशमुख, निरीक्षक, राजारामपुरी पोलिस ठाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजेंद्रनगरमध्ये होणार घरोघरी शौचालय

0
0

१६,६७० कुटुंबांकरिता वैयक्तिक शौचालयाचे नियोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील प्रत्येक कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय उपलब्ध करण्यासाठी महापालिका प्रशासनाची पावले पडत आहेत. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात राजेंद्रनगर झोपडपट्टीतील ५०० घरांमध्ये वैयक्तिक शौचालय बांधून देण्यात येणार आहेत. शेल्टर असोसिएटस आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम हाती घेतली आहे. शेल्टर असोसिएटस शौचालय उभारणी करून देणार आहे. तर महापालिकेकडून शौचालयचे कनेक्शन ड्रेनेज लाइनला जोडण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना शौचालय उभारणीसाठी फक्त गवंडी कामाची मजुरी द्यावी लागणार आहे. नजीकच्या काळात सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या १६,६७० कुटुंबांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

'स्वच्छ भारत अभियान' अंतर्गत प्रत्येक घरी शौचालय उभारणीचा संकल्प आहे. या मोहिमेतंर्गत ३१ डिसेंबरपर्यंत घरोघरी शौचालय उभारणीचे ठरले होते. यामध्ये शहरातील गरीब लोकवस्तीत घरटी शौचालय बांधणीचा प्रस्ताव होता. कोल्हापूर शहरात आजही ११३ कुटुंबाकडे शौचालये उपलब्ध नाहीत. राजेंद्रनगर, भारतनगर, टेंबलाई नाका परिसरातील काही कुटुंबांचा समावेश आहे.

बोंद्रेनगरमध्ये बायो गॅस टँक

बोंद्रनगर परिसरातही ४० कुटुंबाना वैयक्तिक शौचालय बांधली जात आहेत. शेल्टर असोसिएटसकडून शौचालय उभारणी सुरू आहे. येथे ड्रेनेज लाइनची सुविधा नसल्याने बायो गॅस टँकची बांधणी केली जाणार आहे. शौचालयचे कनेक्शन टँकशी जोडण्यात येणार असून त्या माध्यमातून गॅस निर्मितीचा प्रकल्प आहे.

आकडेवारी

शहरातील कुटुंबांची संख्या १ २८, २११

वैयक्तिक शौचालय असणाऱ्या कुटुंबांची संख्या १,११,४६६

सार्वजनिक शौचालयाचा वापर करणारी कुटुंबे १६,६७०

उघड्यावर शौचास बसणाऱ्या कुटुंबांची संख्या ११३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्झरी, अवजड वाहनांना बंदी

0
0

सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे नियोजन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चार दिवस सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर शहराच्या वाहतुकीच्या नियोजनासाठी शहर वाहतूक शाखेने कंबर कसली असून खासगी प्रवासी बसेस व अवजड वाहनांना भाऊसिंगजी रोडवर बंदी घातली आहे. तसेच होणारी गर्दी लक्षात घेऊन रस्त्यांवर बसणारे विक्रेते, अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेला पत्र पाठवले आहे. वाहतूक पोलिसांच्या मदतीला रोज ५० पोलिस मित्र मदत करणार आहेत.

गुरूवारी ईद ए मिलाद, शुक्रवारी ख्रिसमस, चौथा शनिवार व रविवार अशा सलग चार दिवस सुट्या आहेत. तसेच रजा व सुट्या यामुळे ही गर्दी ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतुकीचे व पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी प्रवासी बसेस दसरा चौकात अडवण्यात येणार आहेत. बसेससाठी दसरा चौक, खानविलकर पेट्रोल पंप शंभर फुटी रस्ता, सिध्दार्थनगर कमान, गांधी मैदान येथे पार्किंगची सोय केली आहे.

शहरात होणारी गर्दी लक्षात घेऊन शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांवरून अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवावी, असे आवाहनही जिल्हा लॉरी असोसिएशनला केले आहे. त्यांनीही पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. भाविक व पर्यटकांची गर्दी अंबाबाई मंदिर व भवानी मंडप परिसरात होण्याची लक्षात घेऊन दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. शाळा बंद असल्याने मेन राजाराम व प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर चारचाकी व दुचाकी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेकडे लक्ष्मीपुरीतील सुसर बागेची मागणी करण्यात आली आहे.

एकीकडे पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन होत असले तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शहर वाहतूक शाखेने महानगरपालिका प्रशासनाला पत्र पाठवले आहे. वाहनांची गर्दी लक्षात घेऊन अंबाबाई मंदिर परिसरात अतिक्रमण मोहिम राबवण्याची सूचना केली आहे. भाऊसिंगजी रोड व महाव्दार रोडवरील विक्रेत्यांना शिस्त लावण्याची सूचनाही केली आहे. यावेळी महापालिकेकडून सहकार्य मिळू शकेल, अशी आशा पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

रिक्षाचालकांना सूचना

चार दिवस होणारी गर्दी लक्षात घेऊन रिक्षाचालकांनी गर्दीच्या ठिकाणी रिक्षा पार्क करू नयेत अशी समज दिली आहे, असे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक आर.आर. पाटील यांनी सांगितले. पर्यटक व भाविकांशी सौजन्याने वागावे. मीटरनुसार बिल आकारावे अशा सूचना केल्या आहेत. गर्दी व कोंडी झाल्यास रिक्षाचालकांना माळकर तिकटीपासून भवानी मंडपाकडे जाण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनयभंगप्रकरणी डेंटिस्टला चोप

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

उपचारासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याच्या कारणावरुन डेंटिस्टला नागरिकांनी बेदम चोप देत दवाखान्याची प्रचंड मोडतोड केली. डॉ. जितेंद्र शहा असे डॉक्टरचे नांव असून शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसातून मिळालेली माहिती अशी, येथील जवाहरनगर परिसरात डॉ. जितेंद्र शहा याचा जयराज डेंटल क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. कबनूर (ता. हातकणंगले) येथील जयहिंदनगर परिसरातील युवती शहा याच्याकडे उपचारासाठी १७ डिसेंबर रोजी आपल्या मामीसोबत आली होती. यावेळी डॉ. शहा याने उपचार केल्यानंतर संबंधित युवतीला बाहेर बसण्यास सांगितले आणि आत थांबलेल्या मामीचा विनयभंग केला. त्यावेळी डॉक्टरचे वय पाहून व त्याचा बोलण्याचा स्वभावच तसा असावा म्हणून सदर प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ डिसेंबर रोजी ही युवती पुन्हा उपचारासाठी आली होती. त्यावेळी शहा याने तिचाही विनयभंग केला. संबंधित युवतीच्या घरी समारंभ असल्याने दोघींनीही त्याची वाच्यता केली नव्हती. मात्र बुधवारी सकाळी घडला प्रकार नातेवाईकांना समजल्यानंतर शहा याला जाब विचारला. त्यावेळी वाद झाल्याने संतप्त नातेवाईकांनी दवाखान्यातील साहित्याची मोडतोड करीत नासधूस केली. तसेच शहा यालाही मारहाण केली व पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित युवतीच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. शहा याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाईसाठी ‘स्विपींग मशिन’

0
0

महापालिका घेणार दोन मशिन, ३०० घंटागाड्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराचा वाढता विस्तार, उपनगरांची पडणारी भर यामुळे रस्त्यांची साफसफाई आणि स्वच्छता ठेवणे जिकिरीचे बनत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सगळ्याच रस्त्यांची साफसफाई होत नाही. मात्र यावर महापालिकेने उपाय शोधत शहरातील रस्त्यांची सफाई करण्यासाठी 'स्विपींग मशिन' घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन स्विपींग मशिन खरेदीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्प्यात एक स्विपींग मशिन व ३०० घंटागाड्या घेतल्या जाणार आहेत. 'स्विपींग मशिन'मुळे रस्त्याची सफाई जलदगतीने होईल. तसेच कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होणार आहे.

चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेला सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दोन स्विपींग मशिन, ३०० घंटागाड्या आणि कचरा वाहून नेण्यासाठी सहा मोठी वाहने (आरसी) खरेदी केली जाणार आहेत. विधानपरिषदेची आचारसंहिता संपली की, रितसर प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. निविदा काढून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शहरात रोज १७० टनाच्या आसपास कचरा निर्माण होता. घंटागाड्या आणि कंटेनरच्या माध्यमातून कचरा जमा होऊन त्याचा उठाव केला जातो. कंटेनरमधून कचरा वाहून नेण्यासाठी सहा मोठी वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन वाहनाची ऑर्डर दिली आहे.

घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. सध्या महापालिकेकडे २१० घंटागाड्या आहेत. त्यापैकी जवळपास ७० घंटागाड्या दुरूस्तीला आल्या आहेत. शहर आणि उपनगरात जादा घंटागाड्यांची आवश्यकता आहे. उपनगरे आणि कॉलन्यांची संख्या वाढली आहे. प्रभागांची संख्या ८१ इतकी आहे. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे उपलब्ध घंटागाडीद्वारे कचरा गोळा करण्यास ​उशीर लागतो. कचरा उठावासाठी आणखी ३०० घंटागाड्या खरेदी केल्या जाणार आहेत . यामुळे कचरा उठावाला गती येणार आहे. नियमितपणे कचरा उठाव करणे शक्य होणार आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फतच शहरातील रस्त्यांची सफाई केली जाते. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सगळ्याच रस्त्यांची झाडलोट नियमितपणे होत नाही. पहिल्या टप्प्यात एक मशिन खरेदी केली जाणार आहे. एका मशिनची किंमत तीस लाखापर्यंत आहे.नवीन ३०० घंटागाड्यामुळे 'घर टू घर' कचरा उचलणे शक्य होईल.

नाला सफाईसाठी मशिन

शहरातील नाले सफाईसाठी मशिनचा अवलंब होणार आहे. नाले आ​णि ड्रेनेजलाइनची सफाई करताना काही ठिकाणी अडचणी येतात. अरूंद व तुंबलेले नाले, दुर्गंधी यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका पोहचतो. मशिनरीज अभावी काही ठिकाणी नाले सफाईत अडचणी येत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी मशिन घेतले जाणार आहेत. वित्त आयोगाकडून उपलब्ध निधीतूनच मशिन घेतले जाणार आहे.

वित्त आयोगाकडून सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. यंत्रसामग्रीची खरेदी होणार आहे. शहरातील रस्त्यांच्या साफसफाईसाठी स्विपींग मशिन खरेदीचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. पहिल्यांदा एक मशिन घेतले जाणार आहे. निविदा प्रक्रिया राबवून, मान्यता घेऊनची मशिनरी घेतल्या जाणार आहेत. ​स्विपींग मशिनमुळे सफाईकामाला गती येणार आहे.

डॉ. विजय पाटील, आरोग्य निरीक्षक, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचा टोल रद्द!

0
0

म. टा. प्रतिनिधी,नागपूर

टोल देणार नाही, हेच एकमेव उद्दिष्ट ठेवत टोलला हद्दपार करण्यासाठी पाच वर्षांपासून कोल्हापूरकरांनी सातत्याने चालवलेल्या आंदोलनाला अखेर बुधवारी यश आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा टोल रद्द केल्याची घोषणा केली. याबाबतचे पैसे रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) आयआरबीला दिले जातील. त्यासाठी सरकारकडूनही मदत दिली जाणार असून याबाबतचा निर्णय येत्या चार दिवसांत घेण्यात येणार आहे. तसेच टोल रद्दचे नोटिफिकेशनही दोन दिवसांत काढण्यात येणार आहे.

पाच वर्षांच्या कालावधीत विराट मोर्चा, कोल्हापूर बंद, बेमुदत उपोषण तसेच टोल नाके पेटवणे, फोडणे, वसुली थांबवणे, निदर्शने, कर्मचाऱ्यांना पळवून लावण्यासारख्या सातत्यपूर्ण आंदोलनाने कोल्हापूर राज्यातील टोलविरोधी आंदोलनाचे केंद्र बनले होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर कोल्हापूरमध्ये टोल विरोधी कृती समिती, भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी साखर वाटप करुन विजयोत्सव साजरा केला. त्याचवेळी शिरोली टोल नाक्यावरील आयआरबीच्या फलकांना काळेही फासण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी टोल रद्द करत असल्याची घोषणा केली असून प्रकल्पाच्या मूल्यांकनानुसार पैसे देऊ असे स्पष्ट केले आहे. आयआरबीने केलेली मागणी मान्य नसून सरकारने नेमलेल्या समितीकडून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू आहे. मूल्यांकनानुसार झालेल्या अहवालाप्रमाणे पैसे देण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. सरकारने नेमलेल्या सचिव तामसेकर समितीच्या अहवालातील ४६१ कोटी रुपयांच्या मूल्यांकनाला आधार मानून आयआरबीशी पुढील चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर तडजोडीची रक्कम निश्चित करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ही रक्कम भागवण्यासाठी कोल्हापूरकरांवर कोणत्याही कराचा भार पडू नये यासाठी महापालिकेने दिलेल्या टेंबलाईवाडी येथील जागेबरोबरच अन्य जागांची विक्री हा पर्याय सरकारसमोर आहे.

शहरातील ४९ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी २००९ मध्ये प्रकल्प सुरू झाला. कामाचा दर्जा योग्य नसल्याचे व शहरांतर्गत रस्त्यांसाठी टोल लागू करण्याच्या ​धोरणाला विरोध करण्यासाठी डिसेंबर २०११ पासून ​टोलविरोधी कृती समितीची स्थापना झाली. तेव्हापासून सातत्याने टोलनाक्यांची मोडतोड, जाळपोळ करण्यात आली. कोल्हापूर बंदसारख्या निर्णयांबरोबर टोल बंद करण्याच्या सातत्यापूर्ण आंदोलनांमुळे काँग्रेस आघाडी सरकारच्या पातळीवर वेगवेगळ्या समिती स्थापन करण्यात आल्या. मुख्यमंत्री, मंत्र्यांशी सातत्याने चर्चा करुन टोल वसुलीला अनेकदा स्थगिती देण्यात आली. आयआरबीकडून हे प्रकरण न्यायालयात ओढल्यानंतर पोलिस बंदोबस्तात टोल वसुलीचे आदेश दिले होते. त्यामुळे कोल्हापूरकरांनीही त्या आदेशाचा मान राखत आंदोलनाची धग सातत्याने पेटवत ठेवली होती. यादरम्यान मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या घरांवर मोर्चेही काढले होते.

या पार्श्वभूमीवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेनेच्यावतीने टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सातत्याने टोलविरोधी समितीसोबत बैठक घेऊन मूल्यांकन करण्याची प्रक्रिया गतीमान केली. त्यामुळे या वर्षभरात आंदोलनाच्या पातळीवर शांतता होती. पण ३१ डिसेंबरपर्यंत टोलवसुलीला स्थगिती असल्याने त्यानंतर पुन्हा टोल वसूल होऊ नये यासाठी आंदोलनाला सुरुवात केली होती. अधिवेशन संपण्यापूर्वी टोल रद्दची घोषणा व नोटिफिकेशन काढण्यात यावे, अशी मागणी होती. त्यानुसार गेल्या आठवड्यात सरकारच्या मूल्यांकन समिती, आयआरबी यांच्याशी मंत्रीपातळीवर चर्चा होऊन सरकार टोल यापूर्वी कोल्हापूर टोल नाका कायमचा बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली.

एमएसआरडीसीला सरकारच मदत

टोल रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर टोल किती जमा झाला, आतापर्यंत आयआरबीने प्रकल्पासाठी महापालिकेला किती रक्कम दिली, किती व्याज झाले या सर्वांची बेरीज वजाबाकी करुन आयआरबीला द्यायची अंतिम रक्कम निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी सरकारने नेमलेल्या सचिव तामसेकर यांच्या समितीचा अहवाल आधार मानण्यात येणार आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना नागरिकांवर कोणताही कराचा बोजा न टाकता हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेने आयआरबीला दिलेल्या प्लॉटचे मूल्यांकन महापालिकेने १०७ कोटी केले आहे. त्यावरील बांधकामासह प्लॉट आयआरबीने एमएसआरडीसीला द्यायचे ठरवले आहे. त्याची जवळपास रक्कम २२५ कोटी रुपये होईल, असा अंदाज आहे. त्यावरील ८० टक्के काम पूर्ण करुन हा प्लॉट व बांधकाम विकून किंवा भाड्याने देऊन एमएसआरडीसी पैसे उभे करु शकते. आयआरबीला उर्वरित रक्कम देण्यासाठी सरकार मदत करणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार दोन दिवसात नोटिफिकेशन काढले जाईल.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

गेल्या सरकारमधील मंत्री व पालकमंत्र्यांनी टोल रद्दचा शब्द दिला नव्हता. पूर्वीच्या राजकर्त्यांना जनमताची कदर नव्हती. ते नतद्रष्ट निघाले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या जनमताची कदर करत कायदेमंडळात टोल रद्दची घोषणा केली. जनतेला आश्वस्त केले. त्यामुळे त्यांची ही घोषणा गांभीर्याने व विश्वासानेच घेतो. ३१ डिसेंबरपूर्वी नोटिफिकेशन काढले नाही व १ जानेवारीला आयआरबी आली तर त्यांना फेकून देऊ. कोल्हापूरवासियांनी संयमाने, लोकशाही प्रक्रियेचा आदर राखत लढा दिला. कधीही एकाही कार्यकर्त्याने नैराश्येतून सुपारीइतका खडा फेकला नाही. सरकारी अधिकारी असो वा यंत्रणेला कधीही त्रास दिलेला नाही. कोल्हापूरकरांनी या आंदोलनातून टोलविरोधातील कर्तव्य पार पाडून राज्याला संदेश दिला आहे. टोल रद्दची घोषणा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन व धन्यवाद!

प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेते, टोलविरोधी कृती समिती

४९ किलोमीटरचे रस्ते

९ टोल नाके

प्रकल्पाची मूळ किंमत २२० कोटी

सध्या आयआरबीकडून ८०० कोटीचा दावा

सरकारकडून ४६१ कोटींचे मूल्यांकन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेस्टिनेशन कोल्हापूर

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

इअरएंडसाठी फिरण्याची हौस भागवणाऱ्या चार दिवसांच्या सलग सुट्टीचे पट्टीच्या पर्यटकांनी सोने केले आहे. २३ डिसेंबरच्या रात्रीपासूनच कोल्हापुरात पर्यटकांची मांदियाळी सुरू झाली असून कोल्हापुरातील पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत. विद्यार्थ्यांच्या सहलीही कोल्हापुरात डेरेदाखल झाल्यामुळे अख्खं कोल्हापूर गजब​जून गेले आहे.


गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मुंबई येथील पर्यटकांची संख्या जास्त आहे. गर्दीमुळे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर, रंकाळा, टाउनहॉल म्युझियम, न्यू पॅलेस या परिसरात पर्यटकांचा ओघ वाढला आहे. रविवारपर्यंत कोल्हापुरात पर्यटकांची वर्दळ असणार आहे, त्यामुळे पार्किंगसह मुलभूत सुविधा, निवासव्यवस्था देणाऱ्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

दोन दिवसांचे पॅकेज

गुरूवारी सकाळपासूनच कोल्हापुरात पर्यटनाचा महोल तयार झाला आहे. सकाळी अंबाबाई दर्शन, भवानी मंडप परिसर फेरी, टाउन हॉल म्यु​झियम, रंकाळा, न्यू पॅलेस पाहिल्यानंतर पर्यटकांची स्वारी पन्हाळ्याच्या दिशेने जात आहे. तर दुसऱ्या दिवशी ​नृसिंहवाडी, ​​​​खि​द्रापूर, कणेरीमठ असा प्रवास केला जात आहे. यासाठी कोल्हापूर दर्शन ही सुविधा काही रिक्षा, कार व्यावसायिकांकडून पर्यटकांना देण्यात येत आहेत. स्वत:च्या कारने येणाऱ्या पर्यटकांनीही दोन दिवसांच्या नियोजनात एक दिवस शहरी पर्यटन तर दुसरा दिवस जिल्ह्यातील पर्यटनासाठी असे नियोजन केले आहे. त्यामुळे शहरच नव्हे तर येत्या चार दिवसात जिल्ह्यातही विविध ठिकाणी पर्यटकांचा मुक्काम असणार आहे.

व्यावसायिकांची जय्यत तयारी

पर्यटनस्थळांवर पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन स्थानिक पर्यटन ‌व्यावसायिकांनी जय्यत तयारी केली आहे. हॉटेल व्यावसायिकांसह धर्मशाळा, अतिथीगृहे सज्ज आहेत. मुक्कामासाठी येणाऱ्या लोकांसाठी गरम पाण्याच्या सुविधेसह कपल, ग्रुप, कुटुंब याप्रमाणे विविध प्रकारच्या स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरची खासीयत असणाऱ्या खाद्य पदार्थांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यात तांबडा, पांढरा रस्सा, मटण, कोल्हापुरी ‌मिसळ, बिर्याणी, गुळाचे पदार्थ आदींचा समावेश आहे. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी कोल्हापूरची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या वस्तूंच्या विक्रीची बाजारपेठ सजली आहे. पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका, कोल्हापुरी चप्पल, फेटा, कोल्हापुरी साज, नथ, कोल्हापुरी मसाला, चटणी अशा गोष्टींची विविधता बाजारपेठेत एकवटली आहे.

कोल्हापुरात आल्यानंतर ज्या हॉटेलवर उतरणार तेथील निवास व्यवस्था, नाष्टा-जेवणापासून ते कोल्हापूर दर्शन घडवण्यासाठीच्या पॅकेज टुरिझम येथे सुरू झाले आहे. हॉटेलपासून पर्यटनासाठी 'पिकअप टू ड्रॉप व्हॅन' मागणीच्या ट्रेंडसाठी पर्यटकांची पसंती वाढत आहे. गुजरात, नागपूर, हैदराबाद, बेंगळुरू आणि मुंबईच्या पर्यटकांची संख्या येथे मोठी आहे. खाद्यपदार्थांसाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. येथील बटाटेवडा, मिसळ, नृसिंहवाडीची बासुंदी, मांसाहारीचे वेगवेगळे पदार्थ चाखण्याचीही संधी मिळते.

हंगामी पर्यटनासाठी हवे नियोजन

वर्षभरात कोल्हापूरच्या पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी दसरा, दिवाळीपासून हा हंगाम सुरू झाला आहे. यापुढील काळात नाताळ आणि उन्हाळी सुटीच्या कालावधीत आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी अधिक नियोजनाची गरज आहे.

पर्यटनांच्या विविधतेने परिपूर्ण अशा कोल्हापूर जिल्ह्याने स्वत:च्या अनेक वैशिष्ट्यांनी पर्यटकांना भुरळ घातली आहे. रांगडे पण प्रेमळ आदरातिथ्य, मिरचीपासून तयार करण्यात आलेला झणझणीत तांबडा, पांढरा रस्सा, मटण भाकरी, गूळ, यासह अनेक वैशिष्ट्यांची विविधता एकवटली आहे. त्यामुळेच वर्षभर कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या लाखोच्या घरात पोहोचली आहे. ऐतिहासिक रंकाळा, करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा या धार्मिक पर्यटनासह दाजीपूर, पन्हाळ्यापासून सुरू होणारे गडकोटाचे, जंगलभ्रमंतीचे पर्यटन आकर्षण ठरणारे आहे.

कोल्हापुरात पर्यटनासाठी दिवाळी सणात, दसरा व नवरोत्सवाच्या काळात आठ ते दहा दिवस, नाताळच्या सुट्टीत पाच दिवस आणि उन्हाळी सुटीत मोठा पर्यटनाचा हंगाम असतो. वर्षभरात सुमारे २५ ते ३० दिवस पर्यटनाचा हंगाम असतो. या कालावधीत पर्यटनाचा हंगाम कॅश करण्यासाठी हॉटेल चालकांसह व्यावसायिक सज्ज असतात. जिल्ह्यातील हॉटेल्सची संख्याही वाढत आहे. शहरात हॉटेल्सची संख्या ४००च्या आसपास आहे. शिवाय लॉजिंग बोर्डिंग, धर्मशाळा, यात्री निवासांची संख्याही मोठी आहे. दिवाळी, दसरा, नाताळ या कालावधीत कोल्हापूरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. यामुळे काहीवेळा हॉटेल्स अपुरी पडतात. भविष्यात कोल्हापूरचे पर्यटन अधिक विकसित होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे पर्यटकांसाठी आवश्यक सर्वप्रकारच्या सोयीसुविधांची उपलब्धता गरजेची आहे.

००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोल परतावा ४५९ कोटीचा?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा टोल रद्द केल्याची घोषणा केली. पण त्यासाठी आयआरबीला किती रक्कम द्यावी लागणार याची माहिती स्पष्ट नव्हती. अजूनही त्या रकमेबाबत आयआरबीशी चर्चा करण्यात येणार असून सरकारला जवळपास ४५९ कोटी रुपये द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी टेंबलाईवाडी येथील महापालिकेच्या भूखंडाची किंमत महत्त्वाची ठरणार असून त्यावर इतर रक्कम कशी उभी करायची याचे नियोजन केले जाणार आहे. महापालिकेचा आणखी एखादा भूखंड विकावा लागेल, अशी स्थिती आहे. तसेच सरकारकडे काही प्रस्ताव तयार सादर करुन त्यातून निधी मिळवण्याचा प्रयत्नही असेल.

या शहरांतर्गत रस्ते प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया राबवताना २२० कोटींचा आकडा समोर आला होता. त्यात वेगवेगळ्या टप्प्यावर झालेल्या विविध प्रकरणानंतर हा प्रकल्प राज्यभरात वादग्रस्त म्हणून ओळखला जाऊ लागला. अनेकदा टोलला स्थगिती देण्याबरोबरच ती उठवण्यात आली. महिनाभरापूर्वी सरकारी बैठकीत आयआरबीकडून ८०० कोटीचा खर्च मिळावा यासाठीची मागणी असल्याचे सांगण्यात आले. सध्या सरकारी पातळीवर आयआरबीकडून एक हजार ५९ कोटीवर खर्च झाल्याचे सांगण्यात येत असल्याचे समजते. ही रक्कम कशी वाढली हा प्रश्न आता दुय्यम असून मुख्यमंत्र्यांकडूनही त्यांच्या मागणीनुसार रक्कम दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर सचिव तामसेकर समितीच्या अहवालाला महत्व दिले जात आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेता ४५९ कोटी रुपये सरकारकडून आयआरबीला दिले जातील असे दिसते. याबाबत आयआरबीशी सरकार पातळीवरुन सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. गेल्या पाच वर्षांत प्रकल्पाबाबत त्यांना विविध पातळीवर करावा लागलेला झगडा त्रासदायक वाटत असल्याने लवकर सुटका व्हावी असे त्यांचे मत असल्याचे समजते. त्यासाठी टेंबलाईवाडीतील जागा बांधकामासह परत देण्याची तयारीही कंपनीने केल्याचे समजते. या साऱ्या प्रयत्नातून उभी राहणारी रक्कम रस्ते विकास महामंडळाकडून कंपनीला देण्यात येणार आहे. पण त्यातही काही तूट आल्यास काही नवीन प्रस्ताव सरकारला सादर करुन त्याद्वारे महापालिकेला रक्कम देण्याचे नियोजन केले जाऊ शकते. तसेच आणखी एखादा भूखंड विकावा लागेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सरकार पातळीवरुन टोल रद्दबाबत आयआरबी सहकार्य करेल, असे सांगण्यात येत असल्याने फार अडचणी येणार नाहीत असे दिसते.

००००००००

हे मुद्दे महत्त्वाचे

प्रकल्पावर झालेला खर्च

त्याचे व्याज

महापालिकेला निगेटिव्ह ग्रँट म्हणून दिलेली रक्कम

टोल वसुली

देखभालीचा खर्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‌‌सिलिंडर स्फोटात सातजण जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निगडेवाडी (ता. करवीर) येथील मोहित ट्रेडर्स या दुकानात गॅस सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात सातजण जखमी झाले. यातील तीन गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या दुर्घटनेमुळे अवैध गॅस भरण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

निगडेवाडीत मुख्य रस्त्यालगत मोहित ट्रेडर्स हे गॅस शेगड्या आणि गॅसकिटचे स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी दुकानातील कर्मचारी १९ किलो वजनाच्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरत होते. यावेळी गॅस गळती सुरू होती. याचदरम्यान एका कर्मचाऱ्याने पंखा बंद करण्यासाठी बटण बंद केले. यावेळी झालेल्या स्पार्किंगच्या ठिणग्या उडून स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की दुकानातील सर्व व्यक्ती बाहेर फेकल्या. सर्व वस्तूही बाहेर फेकल्या. दुकानाचे छतही खराब झाले आहे. स्फोटानंतर भडकलेल्या आगीत बाजूच्या दुकानाचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने सीपीआरमध्‍ये दाखल केले. जखमींमध्ये प्रकाश मधुकर माने (वय ३२, रा. निळपण, ता. पन्हाळा), संतोष बाबा पाटोळे (वय २४, रा. यवलूज, ता. पन्हाळा), सतीश दत्तात्रेय खिलारे (वय ३२, रा. मलकापूर, ता. कराड), युवराज आण्णासाहेब पाटील (वय २४, रा. अंबप), सुरेश महादेव पाटील (वय ४८, रा. अंबप), जितेंद्रसिंग राधेसिंग (वय २२, मूळ रा. दिल्ली, सध्या गांधीनगर), सागर यशवंत माने (रा.मानेवाडी कोतोलीपैकी) यांचा समावेश आहे. यातील जितेंद्रसिंग, सागर माने आणि संतोष पाटोळे हे तिघे गंभीर जखमी आहेत. यांपैकी जितेंद्रसिंग आणि संतोष पाटोळे हे दोघे दुकानातील कर्मचारी आहेत. सतीश खिलारे हा कराडहून साहित्य खरेदीसाठी आला होता.

प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना त्यांच्या नातेवाकांनी उपचारासाठी खासगी दवाखान्यात हलवले. घटनेची नोंद गांधीनगर पोलिस स्टेशनमध्ये झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानपरिषदेसाठीच्या मतदारांची ‘सहल’ उद्या परतणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​विधानपरिषदेसाठी रविवारी मतदान होणार असल्याने सर्व मतदारांना शुक्रवारी परत आणण्यात येणार आहे. मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. निवडणूक प्रचंड चुरशीची होणार असल्याने एकेक मत फोडण्यासाठी उमेदवाराबरोबरच नेतेही आटोकाट प्रयत्न करत आहेत. समर्थक मतदारांना मिरवणुकीने आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व अपक्ष, आमदार महादेवराव महाडिक यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. दोघांनीही आपापल्या समर्थकांना सहलीवर पाठवले आहे. सहलीवर गेलेल्यांमध्ये पाटील यांच्याकडील मतदारांची संख्या अधिक आहे. राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला असला तरी या पक्षाचे अनेक नगरसेवक महाडिक समर्थकांच्या सहलीत सहभागी झाले आहेत. यामुळे दोन्ही गटात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे. हे गृहित धरून प्रत्येक मतदाराला नजरकैदेत ठेवले आहे.

सहलीवरील मतदार शुक्रवारी परत येणार आहेत. महाडिक समर्थकांना कराडला तर पाटील समर्थकांना बेळगाव येथे ठेवण्यात येणार आहे. तेथून रविवारी सकाळी मतदानाच्या ठिकाणी आणण्यात येईल. यादरम्यान विरोधी गटाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. काही मतदारांनी सौदत्ती यात्रेला हजेरी लावली. पण यातील बरेच कट्टर समर्थक असल्याने त्यांना देवीच्या दर्शनासाठी मुभा देण्यात आल्याचे समजते.

जयसिंगपूर, इचलकरंजी अशा महत्त्वाच्या ठिकाणी कारभाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. तेथे मतदार नसले तरी त्यांचे नेते व पै-पाहुणे असल्याने त्यांच्या माध्यमातून ही फोडाफोडी सुरू आहे. रविवारी सकाळी आठपासून मतदान सुरू होणार आहे. या मतदानाला सर्व मतदारांना त्या त्या गटाच्या वतीने एकाचवेळी मिरवणुकीने आणण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानासाठी मतदार मिरवणुकीने येणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​विधानपरिषदेसाठी रविवारी मतदान होणार असल्याने सर्व मतदारांना शुक्रवारी परत आणण्यात येणार आहे. मतदानाला दोनच दिवस शिल्लक राहिल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. निवडणूक प्रचंड चुरशीची होणार असल्याने एकेक मत फोडण्यासाठी उमेदवाराबरोबरच नेतेही आटोकाट प्रयत्न करत आहेत. समर्थक मतदारांना मिरवणुकीने आणण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील व अपक्ष, आमदार महादेवराव महाडिक यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. दोघांनीही आपापल्या समर्थकांना सहलीवर पाठवले आहे. सहलीवर गेलेल्यांमध्ये पाटील यांच्याकडील मतदारांची संख्या अधिक आहे. राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा दिला असला तरी या पक्षाचे अनेक नगरसेवक महाडिक समर्थकांच्या सहलीत सहभागी झाले आहेत. यामुळे दोन्ही गटात क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता आहे. हे गृहित धरून प्रत्येक मतदाराला नजरकैदेत ठेवले आहे.

सहलीवरील मतदार शुक्रवारी परत येणार आहेत. महाडिक समर्थकांना कराडला तर पाटील समर्थकांना बेळगाव येथे ठेवण्यात येणार आहे. तेथून रविवारी सकाळी मतदानाच्या ठिकाणी आणण्यात येईल. यादरम्यान विरोधी गटाशी कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोल परतावा ४५९ कोटी?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा टोल रद्द केल्याची घोषणा केली. पण त्यासाठी आयआरबीला किती रक्कम द्यावी लागणार याची माहिती स्पष्ट नव्हती. अजूनही त्या रकमेबाबत आयआरबीशी चर्चा करण्यात येणार असून सरकारला जवळपास ४५९ कोटी रुपये द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी टेंबलाईवाडी येथील महापालिकेच्या भूखंडाची किंमत महत्त्वाची ठरणार असून त्यावर इतर रक्कम कशी उभी करायची याचे नियोजन केले जाणार आहे.

महापालिकेचा आणखी एखादा भूखंड विकावा लागेल, अशी स्थिती आहे. तसेच सरकारकडे काही प्रस्ताव तयार सादर करुन त्यातून निधी मिळवण्याचा प्रयत्नही असेल. या शहरांतर्गत रस्ते प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया राबवताना २२० कोटींचा आकडा समोर आला होता. त्यात वेगवेगळ्या टप्प्यावर झालेल्या विविध प्रकरणानंतर हा प्रकल्प राज्यभरात वादग्रस्त म्हणून ओळखला जाऊ लागला. अनेकदा टोलला स्थगिती देण्याबरोबरच ती उठवण्यात आली. महिनाभरापूर्वी सरकारी बैठकीत आयआरबीकडून ८०० कोटीचा खर्च मिळावा यासाठीची मागणी असल्याचे सांगण्यात आले. सध्या सरकारी पातळीवर आयआरबीकडून एक हजार ५९ कोटीवर खर्च झाल्याचे सांगण्यात येत असल्याचे समजते. ही रक्कम कशी वाढली हा प्रश्न आता दुय्यम असून मुख्यमंत्र्यांकडूनही त्यांच्या मागणीनुसार रक्कम दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर सचिव तामसेकर समितीच्या अहवालाला महत्व दिले जात आहे. त्यातील महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेता ४५९ कोटी रुपये सरकारकडून आयआरबीला दिले जातील असे दिसते. याबाबत आयआरबीशी सरकार पातळीवरुन सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. सरकार पातळीवरुन टोल रद्दबाबत आयआरबी सहकार्य करेल, असे सांगण्यात येत आहे.

हे मुद्दे महत्त्वाचे!

प्रकल्पावर झालेला खर्च

त्याचे व्याज

महापालिकेला निगेटिव्ह ग्रँट म्हणून दिलेली रक्कम

टोल वसुली

देखभालीचा खर्च

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिलिंडर स्फोटात सात जखमी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निगडेवाडी (ता. करवीर) येथील मोहित ट्रेडर्स या दुकानात गॅस सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात सातजण जखमी झाले. यातील तीन गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या दुर्घटनेमुळे अवैध गॅस भरण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

निगडेवाडीत मुख्य रस्त्यालगत मोहित ट्रेडर्स हे गॅस शेगड्या आणि गॅसकिटचे स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. गुरुवारी दुकानातील कर्मचारी १९ किलो वजनाच्या सिलिंडरमधून छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरत होते. यावेळी गॅस गळती सुरू होती. याचदरम्यान एका कर्मचाऱ्याने पंखा बंद करण्यासाठी बटण बंद केले. यावेळी झालेल्या स्पार्किंगच्या ठिणग्या उडून स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की दुकानातील सर्व व्यक्ती बाहेर फेकल्या. सर्व वस्तूही बाहेर फेकल्या. दुकानाचे छतही खराब झाले आहे. स्फोटानंतर भडकलेल्या आगीत बाजूच्या दुकानाचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. जखमींमध्ये प्रकाश मधुकर माने (वय ३२, रा. निळपण, ता. पन्हाळा), संतोष बाबा पाटोळे (वय २४, रा. यवलूज, ता. पन्हाळा), सतीश दत्तात्रेय खिलारे (वय ३२, रा. मलकापूर, ता. कराड), युवराज आण्णासाहेब पाटील (वय २४, रा. अंबप), सुरेश महादेव पाटील (वय ४८, रा. अंबप), जितेंद्रसिंग राधेसिंग (वय २२, मूळ रा. दिल्ली, सध्या गांधीनगर), सागर यशवंत माने (रा.मानेवाडी कोतोलीपैकी) यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुशल कामगारांची वानवा

0
0

जाचक कायद्यांमुळे उद्योगांपुढे अडथळ्यांची शर्यत

Raviraj.Gaikwad@timesgroup.com

कोल्हापूर : एखाद्या उद्योगासाठी जसे भांडवल महत्त्वाचे असते, तसेच त्या उद्योगाच्या उभारणीसाठी कामगार हा घटकही तितकाच महत्त्वाचा. मात्र, कागल एमआयडीसीमध्ये सध्या कुशल कामगारांची वानवा आहे. उपलब्ध अकुशल कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावे लागत असल्याने उद्योजक दुहेरी कोंडीत सापडले आहेत. या समस्येवर मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन ऑफ हातकणंगले अॅन्ड कागल (मॅक) स्वतः पुढाकार घेऊन प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यास तयार आहे. मात्र, अशा प्रकराच्या प्रयत्नांसाठी जागेची अडचण सतावत आहे.

महाराष्ट्रातील सीमाभागातील उद्योग कर्नाटकच्या वाटेवर असण्यामागे कामगारांचे वेतन हाही एक प्रमुख मुद्दा असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कामगारांना १५ ते २० टक्के जादा पगार द्यावे लागत असल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले. याचा परिणाम थेट उत्पादन किंमतीवर होत असतो. त्यातच कागल एमआयडीसी परिसरात येणारे कामगार प्रशिक्षित किंवा कुशल नाहीत. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजकांनाच वेळ, पैसा खर्च करावा लागतो. मात्र, त्यांना कायद्यानुसार किमान वेतन द्यावे लागते.

एमआयडीसीत एमआयडीसी परिसरातील गावांमधून कामगार येतो. लेखा विभाग आणि इतर संगणकीय कामांसाठी कोल्हापुरातून मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. मात्र, प्रत्यक्ष कारखान्यांमध्ये काम करणारा वर्ग आसपासच्या गावातीलच आहे. सध्या महाराष्ट्र सरकारने केलेल्या किमान वेतन कायद्यात पूर्वीचे झोन काढून टाकले आहेत. त्यात शहराच्या २० किलोमीटर परिसरातील उद्योगांमध्ये शहरातील पागारांनुसारच पगार देण्याची अट आहे. त्यामुळे कागल एमआयडीसीत ग्रामीण भागातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोल्हापूरप्रमाणे पगार द्यावे लागतात. यातील बहुतांश कामगार कुशल किंवा प्रशिक्षित नाही. पुढील महिन्यात किमान वेतन कायद्याची फेररचना होण्याची शक्यता असल्याने उद्योजकांच्या चिंतेत भर पडली आहे.



अरेरावीने वातावरण कलुषित

एमआयडीसीबरोबर काही कागलमध्ये काही कामगार संघटनाही उदयास आल्या आहेत. यातून होणारी अरेरावी उद्योजकांना तापदायक ठरत आहे. यातील राजकीय हस्तक्षेप ही चिंतेची बाब आहे. केवळ पाच ते दहा टक्के कामगारांमुळे संपूर्ण कारखान्यातील आणि त्या अनुषंगाने एमआयडीसीतील वातावरण कलुषित होते. याचा प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष परिणाम एमआयडीसीच्या उत्पादन क्षमतेवर होत असतो, असे उद्योजकांनी सांगितले.



परप्रांतीय गेले माघारी

कागल एमआयडीसीमध्ये सुरुवातीला परप्रांतीय कामगारांची संख्या जास्त होती. मात्र, बिहारमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमुळे यातील बरेचसे कामगार माघारी गेले आहेत. तसेच स्थानिक विरुद्ध परप्रांतीय या वादाची किनार देखील याला कारणीभूत आहे.



मॅक कॉलेज सुरू करणार

एमआयडीसीतील कामगारांसाठी एक छोटे कॉलेज सुरू करण्याचा `मॅक`चा प्रयत्न आहे. त्यासाठी सध्याच्या `मॅक`च्या कार्यालयाबाजूचीच जागा एमआयडीसीकडे मागण्यात आली आहे. दहा हजार स्केवअर फूट जागेत कॉलेज उभारण्याचा `मॅक`चा विचार आहे. सध्या शिरोली एमआयडीसीमध्ये `स्मॅक`च्या माध्यमातून एक कॉलेज सुरू आहे. त्याच धर्तीवर कागलमध्ये कामगारांसाठी कॉलेज सुरू करण्यात येणार आहे. या जागेसाठी एमआयडीसीकडून तत्वतः मंजुरी मिळाली आहे. कॉलेज उभारणीसाठी कंपन्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटीतून (सीएसआर) निधी देखील उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. केवळ जागा ताब्यात मिळण्याची प्रतीक्षा आहे.

- संजय जोशी, अध्यक्ष

महाराष्ट्रातील कायद्यामुळे कामगारांना द्यावे लागणारे किमान वेतन जास्त आहे. कर्नाटकातील कायद्यानुसार तेथे यासाठी आमचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे आम्ही कर्नाटकमध्ये विस्ताराचा निर्णय घेतला.

- आशिष महाजन,

मुख्य व्यवस्थापक, सोक्टास

कायद्यांच्या जाचक अटींचा परिणाम आमच्या वार्षिक उत्पन्नावर होत आहे. या खर्चांच्या वाढत्या यादीत नफा शोधणे मुश्कील झाले आहे. कारखान्यांतील किरकोळ खर्च वाचवून, नफा मिळवणे शक्य नसते. त्यासाठी मुख्य खर्चांवरच नियंत्रण आणावे लागते. त्यासाठी कायदे सुटसुटीत हवेतट

- एच. एस. धोत्रे, डायनॅमिक मेटल वर्क्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारशेचा बल्ब शंभर रुपयांत

0
0

कोल्हापूरः निर्माण केलेल्या विजेची बचत व्हावी आणि उपलब्ध विजेचा फायदा अधिकाधिक ग्राहकांना घेता यावा यासाठी केंद्र सरकार आणि महावितरण एकत्रितपणे वीज बचतीचे अभियान राबवत आहेत. या अंतर्गत महावितरणकडून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ४४ लाख एलईडी बल्बची विक्री होणार आहे. विशेष म्हणजे बाहेर चारशे रुपयांना मिळणारा एक बल्ब महावितरणकडून केवळ १०० रुपयांत मिळणार आहे. जानेवारी महिन्यापासून एलईडी बल्बची विक्री सुरू होणरा आहे. या उपक्रमामुळे विजेची बचत होणार असून, ग्राहकांनाही याचा फायदा होणार आहे.

विजेची बचत करण्यासाठी केंद्र सरकारने एचईडी बल्बच्या वापरास प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले आहे. या धोरणानुसार ग्राहकांना सवलतीच्या किमतीत एलईडी बल्ब उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांसाठी जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत ४४ लाख बल्बची विक्री केली जाणार आहे.

बल्ब उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने एक एजन्सी नेमली असून, ही एजन्सी आणि महावितरण यांच्याकडून संयुक्तपणे बल्ब विक्रीची मोहीम राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे बाहेर ४०० रुपयांना मिळणारा बल्ब या योजनेतून केवळ १०० रुपयांना मिळणार आहे. प्रत्येक ग्राहकाला चार बल्ब दिले जाणार आहेत. जे ग्राहक एकदम चारशे रुपये खर्च करू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी हप्त्याने बल्ब विक्रीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

दर महिन्याला प्रति बल्ब केवळ दहा रुपयांचा हप्ता ग्राहकांच्या वीज बिलात जोडला जाणार आहे. रोख रकमेने बल्ब घेणाऱ्या ग्राहकांना १०० रुपये, तर हप्त्याने बल्ब घेणाऱ्यास दहा रुपये जादा द्यावे लागणार आहेत. शहरासह जिल्ह्यामध्ये स्टॉल उभारून बल्बची विक्री केली जाणार आहे. ही सवलत योजना केवळ ग्राहकांसाठीच असल्याने वीज बिल दाखवणाऱ्या ग्राहकांनाच बल्ब दिले जाणार आहेत.

सध्याच्या सीएफएल बल्बपेक्षा सात वॅटच्या एलईडी बल्बमुळे विजेच्या वापरात किमान ५० टक्के बचत होईल असा अंदाज महावितरणच्या अधिकाऱ्यांचा आहे. राज्यातील दुष्काळामुळे विजेच्या निर्मितीवर मर्यादा आल्या आहेत, या स्थितीत बीज बचत महत्त्वाची ठरत असून एलईडी बल्बमुळे भारनियमनावर काही अंशी दिलासा मिळणार आहे. महावितरणचे दरवर्षी दहा लाख ग्राहक नव्याने वाढत आहेत. एलईडी बल्बच्या वापरामुळे बचत झालेल्या विजेतून नवीन ग्राहकांना वीज उपलब्ध होणार आहे, त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या योजनेवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे.

कमी विजेत अधिक प्रकाश

सध्याचे १४ वॅटचे सीएफएल बल्ब जितका प्रकाश देतात तितकाच प्रकाश एलईडीचे ७ वॅटचे बल्ब देतात, त्यामुळे एलईडीच्या वापराने किमान ५० टक्के विजेची बचत होणार आहे. याचा ग्राहकांना थेट फायदा होणार असून, विजेचे बिलही कमी होणार आहे.

''वीज बचत ही काळाची गरज बनली आहे, त्यामुळे कमीत कमी विजेच्या वापरात अधिक प्रकाश देणारे एलईडी बल्ब वापराचा आग्रह केंद्र सरकारने धरला आहे. महावितरणनेही वीज बचतीसाठी पाऊल उचलले असून, जानेवारीपासून सवलतीच्या दरातील बल्ब उपलब्ध केले जातील.''

फुलसिंग राठोड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

> महावितरणकडून सुरू होणार स्टॉल

> चार बल्बचा हप्ता चाळीस रुपये

> पन्नास टक्के विजेची होणार बचत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विनयभंगप्रकरणी डेंटिस्टला चोप

0
0

दवाखान्यातील साहित्याची मोडतोड
डॉ. जितेंद्र शहा

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

उपचारासाठी आलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याच्या कारणावरुन डेंटिस्टला नागरिकांनी बेदम चोप देत दवाखान्याची प्रचंड मोडतोड केली. डॉ. जितेंद्र शहा असे डॉक्टरचे नांव असून शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



या प्रकरणी पोलिसातून मिळालेली माहिती अशी, येथील जवाहरनगर परिसरात डॉ. जितेंद्र शहा याचा जयराज डेंटल क्लिनिक नावाचा दवाखाना आहे. कबनूर (ता. हातकणंगले) येथील जयहिंदनगर परिसरातील युवती शहा याच्याकडे उपचारासाठी १७ डिसेंबर रोजी आपल्या मामीसोबत आली होती. यावेळी डॉ. शहा याने उपचार केल्यानंतर संबंधित युवतीला बाहेर बसण्यास सांगितले आणि आत थांबलेल्या मामीचा विनयभंग केला. त्यावेळी डॉक्टरचे वय पाहून व त्याचा बोलण्याचा स्वभावच तसा असावा म्हणून सदर प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ डिसेंबर रोजी ही युवती पुन्हा उपचारासाठी आली होती. त्यावेळी शहा याने तिचाही विनयभंग केला. संबंधित युवतीच्या घरी समारंभ असल्याने दोघींनीही त्याची वाच्यता केली नव्हती. मात्र बुधवारी सकाळी घडला प्रकार नातेवाईकांना समजल्यानंतर शहा याला जाब विचारला. त्यावेळी वाद झाल्याने संतप्त नातेवाईकांनी दवाखान्यातील साहित्याची मोडतोड करीत नासधूस केली. तसेच शहा यालाही मारहाण केली व पोलिसांच्या स्वाधीन केले. संबंधित युवतीच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. शहा याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सफाईसाठी ‘स्विपींग मशिन’

0
0

महापालिका घेणार दोन मशिन, ३०० घंटागाड्या

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराचा वाढता विस्तार, उपनगरांची पडणारी भर यामुळे रस्त्यांची साफसफाई आणि स्वच्छता ठेवणे जिकिरीचे बनत आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सगळ्याच रस्त्यांची साफसफाई होत नाही. मात्र यावर महापालिकेने उपाय शोधत शहरातील रस्त्यांची सफाई करण्यासाठी 'स्विपींग मशिन' घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन स्विपींग मशिन खरेदीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. पहिल्या टप्प्यात एक स्विपींग मशिन व ३०० घंटागाड्या घेतल्या जाणार आहेत. 'स्विपींग मशिन'मुळे रस्त्याची सफाई जलदगतीने होईल. तसेच कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होणार आहे.

चौदाव्या वित्त आयोगातून महापालिकेला सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून दोन स्विपींग मशिन, ३०० घंटागाड्या आणि कचरा वाहून नेण्यासाठी सहा मोठी वाहने (आरसी) खरेदी केली जाणार आहेत. विधानपरिषदेची आचारसंहिता संपली की, रितसर प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. निविदा काढून ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शहरात रोज १७० टनाच्या आसपास कचरा निर्माण होता. घंटागाड्या आणि कंटेनरच्या माध्यमातून कचरा जमा होऊन त्याचा उठाव केला जातो. कंटेनरमधून कचरा वाहून नेण्यासाठी सहा मोठी वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन वाहनाची ऑर्डर दिली आहे.

घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो. सध्या महापालिकेकडे २१० घंटागाड्या आहेत. त्यापैकी जवळपास ७० घंटागाड्या दुरूस्तीला आल्या आहेत. शहर आणि उपनगरात जादा घंटागाड्यांची आवश्यकता आहे. उपनगरे आणि कॉलन्यांची संख्या वाढली आहे. प्रभागांची संख्या ८१ इतकी आहे. शहराच्या वाढत्या विस्तारामुळे उपलब्ध घंटागाडीद्वारे कचरा गोळा करण्यास ​उशीर लागतो. कचरा उठावासाठी आणखी ३०० घंटागाड्या खरेदी केल्या जाणार आहेत . यामुळे कचरा उठावाला गती येणार आहे. नियमितपणे कचरा उठाव करणे शक्य होणार आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फतच शहरातील रस्त्यांची सफाई केली जाते. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सगळ्याच रस्त्यांची झाडलोट नियमितपणे होत नाही.

पहिल्या टप्प्यात एक मशिन खरेदी केली जाणार आहे. एका मशिनची किंमत तीस लाखापर्यंत आहे.नवीन ३०० घंटागाड्यामुळे 'घर टू घर' कचरा उचलणे शक्य होईल.



नाला सफाईसाठी मशिन

शहरातील नाले सफाईसाठी मशिनचा अवलंब होणार आहे. नाले आ​णि ड्रेनेजलाइनची सफाई करताना काही ठिकाणी अडचणी येतात. अरूंद व तुंबलेले नाले, दुर्गंधी यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका पोहचतो. मशिनरीज अभावी काही ठिकाणी नाले सफाईत अडचणी येत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी मशिन घेतले जाणार आहेत. वित्त आयोगाकडून उपलब्ध निधीतूनच मशिन घेतले जाणार आहे.

वित्त आयोगाकडून सात कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्या माध्यमातून शहर स्वच्छतेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत. यंत्रसामग्रीची खरेदी होणार आहे. शहरातील रस्त्यांच्या साफसफाईसाठी स्विपींग मशिन खरेदीचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. पहिल्यांदा एक मशिन घेतले जाणार आहे. निविदा प्रक्रिया राबवून, मान्यता घेऊनची मशिनरी घेतल्या जाणार आहेत. ​स्विपींग मशिनमुळे सफाईकामाला गती येणार आहे.

डॉ. विजय पाटील, आरोग्य निरीक्षक, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्यावेळी धर्मरथाचा चालक कोण?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सनातन संस्थेच्या धर्मरथावरील वाहन चालकांच्या १४ ते २१ फेब्रुवारीअखेरच्या नोंदी गायब असल्याचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाला आढळले आहे. या प्रकरणी सनातनचा पूर्णवेळ कार्यकर्ता समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल झाले असून पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये धर्मरथासंबंधीचा तपशील आहे. विशेष म्हणजे, पानसरेंचा खून झाल्याच्या काळात आपण धर्मरथावर होतो, असे गायकवाडने यापूर्वी पोलिसांना सांगितले होते. पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारीला गोळ्या झाडण्यात आल्या आणि २० फेब्रुवारीला त्यांचा मृत्यू झाला. नेमक्या याच काळात धर्मरथावर कोण चालक होता, याबद्दल कोणतीही नोंद उपलब्ध नसल्याचे तपासात समोर आले आहे.

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या कालावधीत सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड हा धर्मरथावर गैरहजर होता, असा पुरावा पोलिसांनी आरोपपत्रात सादर केला आहे. धर्मरथातील डायरी व फाडलेली पानेही पोलिसांनी जप्त केली आहेत. मानसशास्त्रीय चाचणीत गायकवाड चौकशीवेळी काही माहिती दडवत होता, असा अहवालही प्राप्त झाला आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी. डांगे यांच्याकडे या प्रकरणातील तपास अधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी १४ डिसेंबरला आरोपपत्र सादर केले. पोलिसांनी समीरला १६ सप्टेंबर २०१५ला अटक केली होती. त्यांच्या सांगलीतील घरावर व ठाण्याच्या खोलीत छापा टाकला होता. समीरजवळ सनातन संस्थेचे साहित्य आणि डायरी सापडली होती. या डायरीत काही पुरावे पोलिसांना मिळाले होते.

गायकवाड सनातन संस्थेच्या (एमएच १७,एए १९४५) या धर्मरथावर चालक म्हणून काम करत होता. धर्मरथावरील साहित्य, पुस्तके विक्रीस मदतनीस म्हणून काम करत होता. काम करताना तो डायरीत नियमित मीटर रिडिंग व भेट दिलेल्या ठिकाणाच्या नोंदी करीत असे, असे पोलिसांना तपासात आढळून आले आहे. तसेच धर्मरथावर चालक कोण होता यांच्या नोंदीही घेतल्या जातात. १४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत कोणत्याही चालकाचे नाव डायरीत नमूद केलेले नाही. पोलिसांनी डायरी व फाडलेली पाने जप्त केली आहे. याच काळात चालक म्हणून समीर नव्हता. या कालावधीतच (१६ फेब्रुवारी) पानसरे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यामुळे या कालावधीत समीर धर्मरथावर चालक म्हणून काम करत नसल्याचा पुरावा पोलिसांनी आरोपपत्रात दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानपरिषदेसाठी आज मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजकीय ईर्ष्येमुळे उत्सुकता शिगेला पोहचलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानासाठी केवळ चोवीस तास उरले आहेत. राजेशाही सहलीनंतर मतदार परतले असून फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आमदार महादेवराव महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेचा निर्णय आज, शनिवारी होणार आहे. रविवारी अकरानंतरच बेळगाव व कराडहून मतदारांना कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. दरम्यान, मतदानासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे.

विधानरिषद निवडणुकीत आर्थिक उलाढालीने उच्चांक गाठला आहे. प्रत्येक मताला काही लाखाचा दर निघत असून आता अं​तिम टप्प्यात तो वाढतच आहे. एकही मत फुटू नये, यासाठी दोन्ही गटाकडून काळजी घेतली जात आहे. नेते व कारभारी दिवसभर स्थानिक नेत्यांची भेट घेऊन शेवटची विनंती करत आहेत. स्वाभिमानी संघटना राज्यात सत्तेत आहे. भाजपने महाडिक यांना पाठिंबा दिल्याने अखेर स्वाभिमानीने शुक्रवारी त्यांना पाठिंबा जाहीर केला.

काँग्रेसचे निरीक्षक सत्यजित देशमुख यांनी कोल्हापुरात तळ ठोकला आहे. त्यांनी व जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांनी शुक्रवारी अनेक मतदारांशी संपर्क साधला. काँग्रेसलाच मतदान करण्याची सूचना त्यांनी केली​. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सर्व मतदारांना पुण्याला आणण्यात आले आहे. या सर्वांना शनिवारी पक्षाचे काही प्रमुख नेते भेटणार आहेत. त्यासाठी सर्व मतदारांची बैठक घेण्यात येणार आहे. सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे हेही पुण्याला रवाना झाले. शनिवारी दिवसभर मतदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत. महाडिक गटाच्या मतदारांना कराडला आणण्यात येणार आहे. तेथे या गटाचे नेते त्यांना भेटणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

द्राक्ष खरेदी-विक्रीसाठी परवाना आवश्यक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

द्राक्ष खरेदी-विक्री करणाऱ्या दलालांना कृषी बाजार समितीचे परवाने घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दलालांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी, हे पाउल उचलण्यात आल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले.

गायकवाड म्हणाले, द्राक्ष हंगामात दलालांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याच्या अनेक तक्रारी आजवर झाल्या आहेत. म्हणून त्यांनी कृषी बाजार समितीचे परवाने घेणे बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात द्राक्ष दलालांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांचे पदाधिकारी, द्राक्ष बागायतदार संघाचे प्रतिनिधी यांची बैठक झाली, त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

द्राक्ष उत्पादक शेतकरी बाजार समितीचा सेस टाळण्यासाठी परवाने घेत नाहीत तसेच दलालांकडेही खरेदीचा परवाना नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास दाद कोणाकडे मागायची? हा प्रश्न निर्माण होतो. तथापि सांगली व तासगाव बाजार समित्यांनी शेतकऱ्यांकडील द्राक्ष सेस घेणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे खरेदीदार दलाल यापुढे समितीकडून परवाने घेतील, अशी अपेक्षा समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images