Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूर-जयगडची वाट खडतर

$
0
0

Raviraj.Gaikwad@timesgroup.com

कोल्हापूर : प्रचंड गाजावाजा करून रत्नागिरी जिल्ह्यात जयगड येथे खासगी बंदर सुरू करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रासाठी व्यापारीदृष्ट्या हे बंदर वरदान ठरेल, अशी घोषणाबाजी राजकीय नेत्यांनी केली. प्रत्यक्षात बंदराकडे जाण्यासाठी अद्याप चांगला रस्ता नसल्याने कोल्हापुरातील उद्योजकांसाठी हे बंदर 'असून अडचण नसून खोळंबा' झाल्याचे चित्र आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण होईपर्यंत मुंबई बंदराशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट आहे.

महाराष्ट्रातील सगळ्या ऋतुंमध्ये चोवीस तास सुरू असणारे खोल पाण्यातील पहिले बंदर, अशी जयगड बंदराची नानाविध वैशिष्ट्ये सांगितली जातात. विशेष म्हणजे अवघ्या २० महिन्यांत बंदराचे काम पूर्ण झाले. त्यानंतर या बंदराचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. प्रत्यक्षात कोळशाची आवक करण्याव्यतिरिक्त बंदराचा काहीच उपयोग होत नसल्याचे दिसते.

कोल्हापूर ते जयगड बंदर अंतर १७५ किलोमीटर आहे. रत्नागिरी ते नागपूर व्हाया कोल्हापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव आहे. मात्र, तो अद्याप कागदावरच आहे. त्यासाठी राजकीय पातळीवर कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. सद्यस्थितीत कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक धोकादायक पद्धतीनेच सुरू आहे. घाटातून ही वाहने नेताना अडथळे येतात. त्यामुळे १७५ किलोमीटरसाठी अनेकदा दीडपट वेळ लागतो. पुढे मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी फाट्यावरून जयगडसाठी आत जावे लागते. परिसरात स्थानिक नागरिकांच्या अरेरावीमुळे ट्रक चालकांना सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत या मार्गावर जाता येत नसल्याचे वाहतूकदारांनी सांगितले. निवळी फाट्यापासून बंदरापर्यंत एकपदरी रस्ता आहे. रस्त्यावर छोट्या वाड्या-गावे आहेत. ट्रकचालकांमुळे अपघात होत असल्याची तक्रार करत गावकऱ्यांनी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत ट्रक नेण्यास परवानगी नाकारली आहे.

गावकऱ्यांच्या या भूमिकेमुळे ट्रक चालकांना सायंकाळी सहा वाजेपर्यंत निवळी फाट्यावर ट्रक थांबवावा लागतो. त्यानंतरही ट्रक बंदराच्या दिशेने जाताना त्याच्या वेगावरून गावकरी वाद घालतात. प्रसंगी ड्रायव्हरला जबर मारहाण होते. त्यामुळे या मार्गावर ट्रक चालविण्यास अनेकजण तयार होत नसल्याची माहिती मालवाहतूकदार संघटनेकडून देण्यात आली.

जयगडमधून येतो कोळसा

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील टेक्स्टाइल उद्योगातील मोठ्या ब्रॉयलरसाठी कोळसा लागतो. इंडोनेशियामधून भारतात कोळशाची आवक होते. सध्या जयगड बंदरामार्गे हा कोळसा कागल आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये उपलब्ध होऊ लागला आहे.

जेएनपीटी वेळखाऊ

नवी मुंबईजवळील जेएनपीटी बंदर कोल्हापुरातील उद्योजकांना सर्वांत जवळचे. मात्र, ते बंदर गाठण्यासाठी कंटेनरला किमान दहा ते बारा तास लागतात. हा प्रवास धोक्याचा, तितकाच वेळ खाऊ आहे. जहाजांमध्ये माल चढविण्यासाठी नंबर मिळण्यातही अडथळे येतात. एखादा कंटेनर वेळेवर न पोहोचल्यास पदरी नुकसान पडते. पंधरा मिनिटे उशीर झाला, तर माल कार्गो विमानाने पाठविण्याची वेळ येते. त्यासाठी प्रसंगी दहापट खर्च द्यावा लागतो. तुलनेत गुजरातमधील वापी येथील उद्योजकांचे कंटेनर जवळपास चार तासांत जेएनपीटीला पोहोचतात. त्यामुळे वेळेच्या स्पर्धेला तोंड देताना कसरत करावी लागत असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

जयगड रस्त्यावर अनेकवेळा ट्रकचालकांना माराहणीचे प्रकार झाले आहेत. रस्ता एकेरी आहे. स्थानिकांना ओव्हरटेक करण्यास दिले नाही, तर गाडी थांबवून मारहाण करतात. पोलिसांकडे तक्रार करूनही दाद मिळत नाही.
- विक्रम पाटील, ट्रकमालक



स्थानिकांच्या सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेच्या अटीमुळे निवळी फाट्यावर ट्रकचालकांना थांबून रहावे लागते. तेथील पेट्रोल पंपचालक, धाबा मालकांकडूनही पार्किंगसाठी सहकार्य मिळत नाही. त्यामुळे ट्रक सायंकाळी सहापर्यंत निवळीला पोहोचेल, या हिशेबानेच इथून सोडावा लागते.
- हेमंत डिसले, सचिव, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन



जयगड बंदरातून कोळसा वेळेत उपलब्ध होऊ लागला आहे. यासाठीचा आमचा वाहतुकीवरचा खर्च पन्नास टक्क्यांनी कमी झाला, ही समाधानाची बाब. मात्र, सरकारकडून आउटपूट देणाऱ्या गोष्टींवर मदतीची अपेक्षा आहे. आम्हाला मालाच्या निर्यातीसाठी जयगड बंदर उपलब्ध झाले, तर अधिक फायद्याचे ठरेल. त्यासाठी कोल्हापूर-जयगड बंदर चौपदरी रस्ता हवा.
- बी. डी. मुतगेकर, चिफ इंजिनिअर, इंडो काउंट इंडस्ट्रिज लि.



फेब्रुवारी २०१५ मध्ये आम्ही कागल एमआयडीसीतील उद्योजकांनी जयगड बंदराला भेट दिली होती. तेथील सुविधा चांगल्या आहेत. मात्र, तेथपर्यंतचा रस्ता नीट नसल्याने बंदर आम्ही उद्योजकांसाठी उपयोगाचे नाही. आम्हाला उत्पादने शिपिंगसाठी लवकरात लवकर पोहोचवणे गरजेचे असते. त्यामुळे जेएनपीटीपेक्षा जयगड जास्त सोयीचे होणार आहे; पण रस्त्यांची सुविधा नीट झाल्याशिवाय ते शक्य नाही.
- मोहन कुशिरे, डायनॅमिक इंडस्ट्रिज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आशियाई क्रीडास्पर्धेसाठी कोल्हापूरचा 'शुभंकर'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आसाममध्ये येथे फेब्रुवारीत महिन्यात होणाऱ्या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी केंद्र सरकारने 'शुभंकर' संकल्पनेसाठी (मॅस्कॉट) स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये कोल्हापूरच्या निर्मिती ग्राफिक्सने पाठविलेल्या 'एकशिंगी गेंडा' या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाल्याची माहिती 'निर्मिती'चे अनंत खासबारदार यांनी दिली.

अनंत खासबारदार म्हणाले, 'आसाममध्ये ही स्पर्धा होत आहे. त्यानिमित्त सप्टेंबर २0१५ मध्ये 'शुभंकर' या संकल्पनेची स्पर्धा केंद्र सरकारने आयोजित केली होती. यामध्ये देशातील ४५0 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. आसाममध्ये एकशिंगी गेंडा हे शुभ प्रतीक मानले जाते. या स्पर्धेत भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, भूतान, श्रीलंका या देशांसाठी २६ क्रीडाप्रकार असणारी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यामध्ये तिखोर (मस्तीखोर) गेंडा या संकल्पेनला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यामुळे हा तिखोर सर्व सहभागी देशांमध्ये झळकणार आहे. एकशिंगी गेंडा हे प्रतिक शुंभकर म्हणून भारतीय खेल निगमने स्वीकारले आहे. मस्तीखोर, अल्लड व चपळ असणारा तिखोर हा शुभंकर स्पर्धेच्या सर्वच ठिकाणी झळकणार असून व्यापक प्रसिद्धी होणार आहे. गुवाहाटी येथे झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय क्रीडामंत्री सोनोवाल व आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगाई यांच्या उपस्थितीत तिखोरचे उदघाटन झाले. शुभंकर तयार करण्यात त्यांना संकल्पक शिरीष खांडेकर, सुशांत सासने या सहकाऱ्यांनी साथ दिली. 'निर्मिती'ने सादर केलेल्या संकल्पनेला प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकीय भाष्यावर सिनेमाचे मौनच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आज समाजातील प्रत्येक समस्येचा वेध घेणारा, समाजातील चांगल्यावाईटावर बोलणारा सिनेमा सध्याच्या राजकीय उलथापालथीतून निर्माण होत असलेल्या लोकशाहीवरील तरंगांवर भाष्य करण्यासाठी धजावत नाही. राजकीय भाष्यावर अद्यापही सिनेमा माध्यमाने मौनच बाळगले आहे' अशा शब्दात लेखक कृष्णात खोत यांनी खंत व्यक्त केली.

चौथ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत शाहू स्मारक येथे रविवारी १९१३ ते २०१४ या काळातील मराठी चित्रपट सूचीचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि निर्माते किरण शांताराम यांच्या हस्ते झाले. लेखकाच्या दृष्टिने सिनेमा याविषयावर खोत यांनी विवेचन केले.

कृष्णात खोत म्हणाले, 'तीन दशकांपूर्वीचा सिनेमा हा प्रेक्षकांच्या स्वानुभवांपासून लांब होता. सध्या सिनेमातून मांडण्यात येणारे विषय हे माणसाच्या रोजच्या जगण्याशी जोडलेले असल्यामुळे प्रेक्षक आणि सिनेमाच्या पडद्यावरची कथा यांच्यातील दरी कमी होत आहे. आपण रोज पाहणाऱ्या घटना सिनेमाचा विषय बनत असल्यामुळे आपल्याच नजरेचा कॅमेरा झाला आहे का अशी भावना प्रेक्षकांच्या मनात ठळकपणे आकाराला येत आहे. जगातील विविधांगी संस्कृतीचे दर्शन सिनेमांतून होते. त्याअर्थाने संस्कृतीचा मेळ साधण्याचे काम अशा महोत्सवातून सक्षमपणे होत आहे.'

दरम्यान दिवसभरात महोत्सवात दाखवण्यात आलेल्या सिनेमांना प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. आजपासून शॉर्टफिल्मचे दालन खुले झाले. व्ही. शांताराम यांच्या आत्मचरित्रातील निवडक प्रकरणांचे अ​भिवाचन दिलीप प्रभावळकर यांनी केले. दिलीप बापट, चंद्रकांत जोशी उपस्थित होते.

पुढच्या वर्षापासून फिल्म अॅप्रिसिएशन कोर्स

'चित्रपट महोत्सवातून सिनेमा पाहण्याची दृष्टी प्रगल्भ करण्याचे काम चोख होत असताना भविष्यात सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये समीक्षणाचे कौशल्यही तयार होण्याची गरज आहे. प्रेक्षकांकडून त्या सिनेमाचे मूल्यमापन होणे ही सिनेमा बनवणाऱ्यांसाठी एक वेगळी पावती ठरू शकते. त्यामुळे पुढच्या वर्षी या किफच्या निमित्ताने महोत्सवकाळात फिल्म ​अॅप्रिसिएशन हा कोर्स प्रेक्षकांसाठी खुला करू' असे किरण शांताराम यांनी जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्लामपुरात डॉक्टर दाम्पत्याचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

येथील डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (वय ६२) व त्यांची पत्नी डॉ. अरूणा कुलकर्णी (वय ५८) या दोघांचा शनिवारी रात्री धारदार शस्त्राने गळा चिरून व इतरत्र वार करून खून करण्यात आला. रविवारी सकाळी खुनाची बातमी समजताच इस्लामपूरसह परिसर हादरून गेला. ही घटना शनिवारी रात्री नऊनंतर घडली असावी असा पोलसांचा अंदाज आहे. याबाबत डॉ. प्रकाश यांचे बंधू संदीप कुलकर्णी यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवारी सकाळी दरवाजा फोडून प्रत्यक्ष पाहिल्यावर हा प्रकार उघड झाला. मारेकरी घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजातून आत आले असावेत. गॅलरीतील दरवाजाची जाळी कापून आत हात घालून कडी काढली आहे. घटनेनंतर संशयितांनी त्याच मार्गाने पलायन केले असावे. कारण पाठीमागील पाइपची मोडतोड झाल्याची दिसते. खुनाचा प्रकार चोरीच्या उद्देशाने झाला असावा अशी चर्चा होती. मात्र घरातील एकही वस्तू जागची हलवलेली नाही. दागिने, रोख रक्कम सर्व सुरक्षित आहे. मारेकऱ्यांनी अत्यंत निघृणपणे दोघांची हत्या केली आहे. डॉ. प्रकाश कुलकर्णी यांच्या गळयावर, छातीवर, पोटावर, डोक्यात असे अठरा ठिकाणी वार आहेत. तर त्यांच्या पत्नी डॉ. अरूणा यांच्या शरीरावर आठ वार आहेत. दरवाजा उघडल्यानंतर डॉ. प्रकाश हे त्यांच्या बेडरूममध्ये तर पत्नी डॉ. अरूणा किचनमध्ये रक्ताच्या थारोळयात पडल्याचे दिसून आले.

इस्लामपुरात पंधरा वर्षांपासून व्यवसाय

इस्लामपूर शहरातील जावडेकर चौकात गेल्या १५ वर्षांपासून हे कुलकर्णी दाम्पत्य धरित्री क्लिनीक नावाच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. दोघेही बीएएमएस असून डॉ. प्रकाश हे जनरल फिजीशयन तर डॉ. अरूणा या स्त्रीरोगतज्ञ आहेत. या क्लिनीकच्या वरच्या मजल्यावरच ते राहतात. त्यांचा मुलगा आदित्य हा बेळगांव येथील केएलई रूग्णालयात एमडीचे शिक्षण घेत आहे तर सून सौ. रचना या केएलईमध्ये अधिव्याख्याता आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदस्य निवडीत आचारसंहितेचा घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता असताना कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या समिती सदस्य आणि सभापती निवडीची प्रक्रियाही करण्यात आली. मात्र, कोल्हापूर महानगरपालिकेने जिल्हा निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवूनही उत्तर न मिळाल्याने समिती सदस्य, सभापती निवडी, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी आणखी महिनाभर लटकणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थातील एका घटकाला एक न्याय तर दुसऱ्या घटकाला वेगळा न्याय अशा प्रकारासह दोन्ही प्रशासनांच्या बेफिकीरीचा फटका महापालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांना बसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांत सदस्य निवडीची प्रक्रिया शनिवारी केली गेली. तत्पूर्वी कोल्हापूर महापालिकेचे नवीन सभागृह १६ नोव्हेंबर रोजी अस्त्वित्वात आले. त्यानंतर महिनाभरात सदस्य निवडी आ​णि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी होणे अपेक्षित होते. महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत या निवडी शक्यही होत्या. तत्पूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.

महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षण निवडीचा घोळ घातलेल्या प्रशासनाने ताकही फुंकून पिण्यासाठी 'आचारसंहितेच्या कालावधीत सदस्य निवडीची प्रक्रिया राबविता येते का' संदर्भात जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे विचारणा केली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात काहीच उत्तर महापालिकेला मिळाले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडेही महापालिकेने मार्गदर्शन मागविले. त्यांच्याकडूनही अद्याप उत्तर न आल्याचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने पहिल्या सर्वसाधारण सभेवेळी सदस्य निवडी घेतल्या नाहीत.

ज्या सदस्य निवडी व सभापती निवडींमुळे विधानपरिषद निवडणुकीवर परिणाम होणार नाही, अशा निवडी घेण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे नगरपालिकांमधील निवडी रितसर झाल्या आहेत. महापालिकेने कशाबाबत मार्गदर्शन मागविले आहे ते पाहू.
- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वाभिमानी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

एफआरपीच्या ८०-२० फॉर्म्युल्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले आंदोलन हे राष्ट्रवादी पुरुस्कृत आणि सदाभाऊ खोत यांच्या गटाचे होते. खासदार राजू शेट्टी यांनी २००४ मध्ये जे पेरले तेच बळीराजा शेतकरी संघटनेमुळे पहिल्यांदा आणि आता खोत यांच्या आंदोलनामुळे दुसऱ्यांदा उगवले आहे. त्यामुळे स्वाभिमानी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.

'काँग्रेसच्या राजवटीत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांच्यानंतर तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे शेट्टी यांचे आंदोलन पूर्ण शक्तीने यशस्वी करत होते. ही गोष्ट राष्ट्रवादीच्या ध्यानात आल्यानंतर आताच्या खेळ्या सुरू झाल्या आहेत. एक नोव्हेंबरला सांगलीत पत्रकार बैठक घेऊन आमच्या संघटनेने चालू हंगामातील ऊसाला पहिली उचल म्हणून दोन हजार रुपये द्यावी, अशी मागणी केली होती. ही रक्कम एफआरपीच्या ८० टक्क्यांच्या आसपासच होती. परंतु, त्यावेळी 'रक्ताचे थेंब पडले तरी चालतील पण एफआरपी घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जना खासदार शेट्टी यांनी केली होती. त्यांनी गर्जना केली पण ते यासाठी रस्त्यावर उतरले नाहीत. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे ११ डिसेंबरला बैठक घेऊन ८०-२० फॉर्म्युला शेट्टी यांच्या गळी उतरवला. त्याच ठिकाणी शेट्टी यांनी २००९ मध्ये एफआरपीबाबत केलेल्या कायद्याचे स्वतःच तुकडे पाडले,' असा आरोप कोले यांनी पत्रकात केला आहे.

ते पत्रकात म्हणातात की, 'आम्ही पूर्वी म्हटल्याप्रमाणे 'सर्वांना अल्पकाळ फसवता येते, सर्वकाळ नाही याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. केवळ जवाहर सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन १७०० रुपये उचल दिली म्हणून स्वाभिमानीच्या नेत्यांना न विचारता हुपरी परिसरातील रांगोळी गावच्या शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्यानंतर घाईघाईने राष्ट्रवादीने सदाभाऊ खोत यांना गाठून १८ डिसेंबरला चक्का जाम आंदोलन जाहीर करण्यास भाग पाडले. कोल्हापूरात राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ कारखानदारांची बैठक घेऊन फॉर्म्युला मान्य असल्याचे जाहीर करतात.'

'या संपूर्ण घडामोडींतून एक गोष्ट उघड झाली आहे की, आताच्या आंदोलनात खासदार शेट्टी यांचे बिनीचे शिलेदार रस्त्यावर उतरलेच नाहीत. खोत यांच्या आदेशाने आंदोलनात उतरलेली टीम अगदीच किरकोळ होती. स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे, असेच मानावे लागेल,' असा दावा कोले यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्लामपुरातील खुनाचे गूढ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

डॉ. प्रकाश कुलकर्णी व त्यांची पत्नी डॉ. अरूणा कुलकर्णी डॉक्टर दाम्पत्याचा खून झाल्याचे समजताच इस्लामपूरसह वाळवा तालुक्यात खळबळ माजली. दिवसभर सोशल म‌ीडियाच्या माध्यमातून या खून प्रकरणाची चर्चा होती. जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी यांनी दुपारी येऊन घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मृतसेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. कुलकर्णी यांच्या मुलग्याला आई वडिलांचा अपघात झाला असून तातडीने येण्याचा निरोप दिला. अखेर मुलगा आदित्य दुपारी घरी आल्यानंतर त्याला प्रचंड धक्का बसला. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ. कुलकर्णी यांच्या रूग्णालयाचे गेल्या आठ दिवसापासून नुतनीकरणाचे काम सुरू आहे. नुतनीकरणाचं काम सुरू असल्याने ते बाळंतपणाचे रूग्ण घेत नव्हते. मात्र, त्यांचा बाह्यरूग्ण विभाग सुरू होता. शनिवारी साप्ताहिक सुटी असते. ते शनिवारी दिवसभर घरात निवांत होते. हॉस्प‌िटलमधील स्टाफला त्यांनी शक्यतो पेशंट घेऊ नका, अशी सूचना दिली होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजता डॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी स्वतः रूग्णालयात नुतनीकरणाचे काम करणाऱ्या कामगारांना घरातून चहा बनवून नेऊन दिला होता. चहा दिल्यानंतर परत एकदा बाळंतपणाचा पेशंट आला तर घेवून नका. मात्र, नुतनीकरण कामसंदर्भात सुतार येणार आहेत, ते आले तर मला सांगा अशा सूचना देऊन ते वरच्या मजल्यावरील घरात गेले. काही वेळातच डॉ. कारंजकर हे त्यांना वैयक्त‌िक कामासाठी भेटून निघून गेले. यावेळी लीना यादव या सिस्टर कामावर होत्या. त्यांनी रात्रपाळीसाठी आलेल्या सुचित्रा घनश्याम सोहोली या सिस्टरांना डॉक्टरांचा निरोप देऊन त्या घरी गेल्या. नऊनंतर एक बाळंतपणाचा रूग्ण आला. त्यांनी रूग्णाच्या नातेवाईकांच्या विनवणीवरून डॉक्टरांशीं फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. परत त्या वरच्या मजल्यावर जाऊन डॉक्टरांना दार वाजवत निरोप देण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉक्टरांनी कोणतेही उत्तर न दिल्याने त्यांनी पेशंटला परत पाठवले.

रविवारी पावणे दहाच्या सुमारास लीना यादव पुन्हा कामावर आल्या. डॉक्टर दार उघडत नाहीत, दुधवाल्याने दूध आणून ठेवले आहे. याबरोबरच पेपरही खालीच आहे. अशी माहिती यादव यांना दिली. त्यानंतर लीना यादव, सुरज जाधव, मंगल वाघमारे हे कर्मचारी वरच्या मजल्यावर गेले. डॉक्टरांचा दरवाजा ठोठावला कोणताही प्रतिसाद मिळत नाही, म्हटल्यावर त्यांनी जावडेकर चौकात असलेल्या जोतिर्लिंग मेडिकलचे मालक नितीन सुतार यांना हाक मारली. नितीन सुतार आल्यानंतर त्यांनी त्यांचे बंधू संदीप कुलकर्णी यांना फोन केला. ते आल्यावर सर्वांनी दरवाजी उघडून आतील प्रकार पाहिला. त्यानंतर संदीप कुलकर्णी यांनी घटनेची माहिती पोलीसांनी दिली. या प्रकाराने इस्लामपूरसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काटा पेमेंटमुळे दलाली मोडीत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

ऊस दरापाठोपाठ भातपिकालाही योग्य हमीभाव मिळवून देण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजरा तालुक्यातील भातदराची कोंडी फोडत स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. भात-उत्पादक शेतकऱ्यांना रोखीने काटा-पेमेंट देत मापात पाप करून शेतकऱ्यांना नागविणाऱ्या दलालांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चांगलीच जिरवली आहे. तालुक्याच्या पस्चिम बागातील पन्नास टन भाताची खरेदी करून उत्पादकांना हमीभाव मिळवून दिला आहे. यासाठी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी आर्थिक मदत केल्याचे तालुकाध्यक्ष तानाजी देसाई यांनी सांगितले.

आजरा तालुक्यात उसानंतर जे पीक प्राधान्याने घेतले जाते ते भातपीक. सुमारे ६५ टक्क्यांपर्यंत शेतकरी या उत्पादनावर उदरनिर्वाह करतात. पण दहा-पंधरा वर्षांपूर्व‌ी‌ कारखाना जो दर ठरवेल तोच दर घेत शेतकरी निमूटपणे बसायचा. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केल्यानंतर एकूणच शेतमालाबाबत शेतकऱ्यांध्ये जागृती निर्माण झाली. तरीही आजही भाताला हमीभाव मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. यावर्षी तर निचांकी पावसामुळे भातशेतीही आतबट्ट्याची ठरली आहे. अशा स्थितीत उत्पादीत भाताला रास्त भाव मिळणे क्रमप्राप्त होते. पण त्याबाबत दलालांच्या साखळीकडून भाव ठरवून कोंडी फोडली जात नव्हती. उत्पादन खर्चाइतकाच दर मिळत होता. म्हणूनच या प्रश्नी स्वाभिमानी काही वर्षे लक्ष घालते आहे. बांबवडेपाठोपाठ येथेही भातपरिषदा झाल्या आहेत. पण त्याचा म्हणावा तसा फायदा शेतकऱ्यांना झालेला नव्हता. पण काही दिवस अशीच कोंडी करून शेतकऱ्यांना नागविण्याचे दलालांचे मनसुबे होते.

या पार्श्वभूमीवर मागील वर्षी खासदार राजू शेट्टी यांना तालुक्यातील भात-उत्पादन व त्याच्या दर्जाबाबत माहिती देण्यात आली. जयसिंगपूर परिसरातील जैन व लिंगायत धर्मियांना भाताची गरज असल्याने यावर्षी स्वाभिमानी दूध संघाच्या (जयसिंगपूर) यांच्या आर्थिक पाठिंब्यावर येथील इंद्रायणी, दप्तरी व घनसाळची साठ टन भात खरेदी करण्यात आली. यावर्षीची ही खरेदी ट्रायल बेसवर होती. येथील भाताला तेथे मिळणारा प्रकतिसाद पाहून व जयसिंगपूपाठोपाठ चिकोडी, निपाणी, इंचलकरंजी, वाळवा, शिरोळ, सांगली दरम्यानची बाजारपेठ व ग्राहक उपलब्ध होत असल्याने पुढील वर्षी मोठे नियोजन करून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

आजरा तालुक्यातील भाताचे उत्पादन पाहता दलाल व व्यापा‍ऱ्यांचे मोठे जाळे तयार होते. त्यामुळे शेतक‍ऱ्यांना त्यांच्यावरच अवलंबून राहावे लागते. नव्या पद्धतीमुळे ही मक्तेदारी संपुष्टात आली आहे. यंदा उत्पादन असले तरी चांगल्याची दराची अपेक्षा आहे.

दलालांनाही द्यावा लागेल चढा भाव

यावेळच्या भात-खरेदी हंगामात दलालांना संगनमत करून शेतकऱ्यांना नागविण्याचे धोरण आखले होतेच. त्यामुळे गावांमद्ये येऊन त्यांनी १७००-१८०० रूपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला होता. पण दरम्यान स्वाभिमानी कर्यकर्त्यांनी गावच्या संस्कार वाहिनींवरून जादा दराने संघटना भात-खरेदी करणार असल्याचे घोषित केले. त्यानुसार इंद्रायणी भाताला-२०००, दप्तरीला-२४०० तर घनसाळला-३५०० रूपये प्रतिक्विंटल दर देत भातखरेदी केली. यामुळे भात-उत्पादकांची यावेर्षी चांदीच झाली आहे. सुमारे तीस लाखाहून अधिक रूपयांची उलाढाल झाली. आता दलालांनाही या चढ्या दरानेच भातखरेदी करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाळूची वाहने जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यात शनिवारी रात्री उशिरा बेकायदेशीर वाळू वाहून नेणाऱ्या दोन व लाकूड वाहतुकीच्या एक वाहन जप्त करण्यात आले. प्रांताधिकारी किर्ती नलवडे यांनी ही कारवाई केली. त्यानंतर याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. नलवडे यांनी माफियांना माहिती मिळणार असल्याचे गृहीत धरून कारवाईबाबत गुप्तताप पाळली. या कारवाईने वाळू ‌माफियांचे धाबे दणाणले आहे.

या कारवाईत परवाना काढलेल्या लाकूड ट्रक चालकाचा परवाना तहसील कार्यालयात होता. मात्र, वाळू वाहतूक करणाऱ्यांवर आधीच दंडात्मक कारवाई झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उद्या फौजदारी कारवाईसह दंडात्मक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले.

शनिवारी हिरण्यकेशी नदीपात्रातील वाळू काढून चोरटी वाहतूक होत असल्याबद्दलचे दूरध्वनी प्रांताधिकारी नलवडे यांना आल्यानंतर रात्री उशिरा संबंध‌ित परिसरात त्यांनी शोध घेतला. परिसराची माहिती नसल्याने स्थानिकांनी त्यांची चांगलीच दिशाभूल केली मात्र अखेर सोहाळे फाट्यावर सूतगिरणीनजीक वाळूने भरलेला ट्रॅक्टर त्यांना पकडला. यानंतर वाळू ट्रॅक्टर व साळगावनजीक लाकूड ट्रक सापडला. याबाबत पुन्हा आजर तहसील कार्यालयामध्ये येऊन श्रीमती नलवडे यांनी वाहतूक परवाने तपासले. त्यावेळी लाकूड वाहतूकदार ख्वाजा मयुद्दीन पटेल यांनी परवाना काढला होता. पण ताब्यात न नेता वाहतूक केल्याचे समोर आले.

मात्र वाळू वाहतूक करणारे संतोष कृष्णा मोहिते व उत्तम कृष्णा मोहिते यांना याआधीही त्यांच्या इतर चार साथीदारांसह वाळू वाहतूक करताना कारवाई झाली होती. यासाठी एक लाख, ४० हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यापैकी संबंधितांनी केवळ ७० हजार रूपये दंड भरला होता. आता पुन्हा ते या कारवाईत सापडल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचे श्रीमती ठोकडे यांनी सांगितले.

प्रशासनाची डोळेझाक

आजरा तालुक्यात नदी, ओहोळ व नाल्यांची संख्या मोठी आहे. येथे काही ट्रॅक्टर व ट्रकचालक वाळू उपसा करीत असतात तर काही व्यावसायिक बेकायदेशीर वाळू उपसा करतात. याला अटकाव करण्यासाठी स्थानिक पातळीवरील तलाठी, कोतवाल अथवा अन्य यंत्रणेने दक्ष राहणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नाही. अनेकदा गावपातळीवरच समझोत्यातून ही प्रकरणे मिटत असतात. परिणामी वरिष्ठ अधिका‍ऱ्यांना त्यांची माहिती मिळत नाही. त्यामुळे वाळू उपसा सुरूच राहतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदस्य निवडीत आचारसंहितेचा घोळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता असताना कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या समिती सदस्य आणि सभापती निवडीची प्रक्रियाही करण्यात आली. मात्र, कोल्हापूर महानगरपालिकेने जिल्हा निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागवूनही उत्तर न मिळाल्याने समिती सदस्य, सभापती निवडी, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी आणखी महिनाभर लटकणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थातील एका घटकाला एक न्याय तर दुसऱ्या घटकाला वेगळा न्याय अशा प्रकारासह दोन्ही प्रशासनांच्या बेफिकीरीचा फटका महापालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांना बसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांत सदस्य निवडीची प्रक्रिया शनिवारी केली गेली. तत्पूर्वी कोल्हापूर महापालिकेचे नवीन सभागृह १६ नोव्हेंबर रोजी अस्त्वित्वात आले. त्यानंतर महिनाभरात सदस्य निवडी आ​णि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी होणे अपेक्षित होते. महापालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत या निवडी शक्यही होत्या. तत्पूर्वी विधानपरिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.

महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षण निवडीचा घोळ घातलेल्या प्रशासनाने ताकही फुंकून पिण्यासाठी 'आचारसंहितेच्या कालावधीत सदस्य निवडीची प्रक्रिया राबविता येते का' संदर्भात जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे विचारणा केली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात काहीच उत्तर महापालिकेला मिळाले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडेही महापालिकेने मार्गदर्शन मागविले. त्यांच्याकडूनही अद्याप उत्तर न आल्याचे कारण पुढे करत महापालिका प्रशासनाने पहिल्या सर्वसाधारण सभेवेळी सदस्य निवडी घेतल्या नाहीत.

ज्या सदस्य निवडी व सभापती निवडींमुळे विधानपरिषद निवडणुकीवर परिणाम होणार नाही, अशा निवडी घेण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे नगरपालिकांमधील निवडी रितसर झाल्या आहेत. महापालिकेने कशाबाबत मार्गदर्शन मागविले आहे ते पाहू.

- डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर दाम्पत्याचा खून

$
0
0

म.टा.वृत्तसेवा, इस्लामपूर

येथील डॉ. प्रकाश वामन कुलकर्णी (वय ६२) व त्यांची पत्नी डॉ. अरूणा कुलकर्णी (वय ५८) या दोघांचा शनिवारी रात्री धारदार शस्त्राने गळा चिरून व इतरत्र वार करून खून करण्यात आला. रविवारी सकाळी खुनाची बातमी समजताच इस्लामपूरसह परिसर हादरून गेला. ही घटना शनिवारी रात्री नऊनंतर घडली असावी असा पोलसांचा अंदाज आहे. याबाबत डॉ. प्रकाश यांचे बंधू संदीप कुलकर्णी यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवारी सकाळी दरवाजा फोडून प्रत्यक्ष पाहिल्यावर हा प्रकार उघड झाला. मारेकरी घराच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजातून आत आले असावेत. गॅलरीतील दरवाजाची जाळी कापून आत हात घालून कडी काढली आहे. घटनेनंतर संशयितांनी त्याच मार्गाने पलायन केले असावे. कारण पाठीमागील पाइपची मोडतोड झाल्याची दिसते. खुनाचा प्रकार चोरीच्या उद्देशाने झाला असावा अशी चर्चा होती. मात्र घरातील एकही वस्तू जागची हलवलेली नाही. दागिने, रोख रक्कम सर्व सुरक्षित आहे. मारेकऱ्यांनी अत्यंत निघृणपणे दोघांची हत्या केली आहे. डॉ. प्रकाश कुलकर्णी यांच्या गळयावर, छातीवर, पोटावर, डोक्यात असे अठरा ठिकाणी वार आहेत. तर त्यांच्या पत्नी डॉ. अरूणा यांच्या शरीरावर आठ वार आहेत. दरवाजा उघडल्यानंतर डॉ. प्रकाश हे त्यांच्या बेडरूममध्ये तर पत्नी डॉ. अरूणा किचनमध्ये रक्ताच्या थारोळयात पडल्याचे दिसून आले.

इस्लामपुरात पंधरा वर्षांपासून व्यवसाय

इस्लामपूर शहरातील जावडेकर चौकात गेल्या १५ वर्षांपासून हे कुलकर्णी दाम्पत्य धरित्री क्लिनीक नावाच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. दोघेही बीएएमएस असून डॉ. प्रकाश हे जनरल फिजीशयन तर डॉ. अरूणा या स्त्रीरोगतज्ञ आहेत. या क्लिनीकच्या वरच्या मजल्यावरच ते राहतात. त्यांचा मुलगा आदित्य हा बेळगांव येथील केएलई रूग्णालयात एमडीचे शिक्षण घेत आहे तर सून सौ. रचना या केएलईमध्ये अधिव्याख्याता आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरचे उद्योग निघाले कर्नाटकात

$
0
0

Raviraj.Gaikwad@timesgroup.com

कोल्हापूर : राज्यातील विजेच्या दरांमुळे इतर राज्यांमधील उद्योजकांशी असलेल्या स्पर्धेला तोंड देताना नाकी नऊ येत असल्याने महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात कागल, हातकणंगले पट्ट्यातील मोठ्या वस्त्रोद्यजकांनी आपली पावले कर्नाटककडे वळविली आहेत. कर्नाटक सरकारकडून तेथील उद्योगांना देण्यात येणाऱ्या वीज दरामुळे उत्पादन किंमतीत मोठी बचत होणार असून, बाजारात गुजरातमधील उद्योगपतींच्या स्पर्धेला तोंड देणे शक्य होणार आहे. यामुळेच हा निर्णय घेतल्याने कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांनी सांगितले. मात्र, येथील युनिट बंद न करता कर्नाटकमध्ये विस्तार करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोल्हापुरात फाउंड्री आणि स्टिल कास्टिंगचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. टेल्को, अशोक लेलँड यासारख्य बड्या कंपन्यांना कास्टिंग सप्लाय होणारे ठिकाण म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या उद्योगांसाठी वीज हाच कच्चा माल असतो. त्यामुळे विजेच्या दरात एक-दोन रुपयांचा जरी फरक पडला, तर उत्पादन खर्चात लाखो रुपयांची वाढ दिसते. ही वाढ इतर कोणत्याही मार्गाने रोखणे किंवा नियंत्रणात आणणे शक्य नसते. त्यामुळे परवडत नसेल, तर काम थांबविणे किंवा आपला व्यवसाय इतरत्र हलविणे हा पर्याय उद्योजकांपुढे आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये तुलनेत दोन ते अडीच रुपयांनी स्वस्त मिळणारी वीज वापरून तेथे नव्याने व्यवसाय उभारण्याचा निर्णय काही उद्योजकांनी घेतला आहे.

या संदर्भात येथील काही उद्योजकांशी संवाद साधला असता गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या मोठ्या राज्यांबरोबरच गोवा सारख्या छोट्या राज्यातही विजेचे दर कमी असल्याचे त्यांनी सांगितले. तेथे उद्योजकांना कमी दराने वीज मिळत असल्याने त्यांचा उत्पादन खर्च कमी राहतो. त्यामुळे बाजारपेठेत त्यांच्या मालाची किंमत कमी दिसते. निव्वळ किंमतीच्या जोरावर इतर राज्यांतील उद्योजक ऑर्डर्स आपल्याकडे खेचून घेण्यात यशस्वी ठरतीत. त्यामुळे बाजारपेठेतील स्पर्धेत टिकण्यासाठी आम्ही स्वतःलाच विचारण्याची वेळ आल्याचे काही उद्योजकांनी स्पष्ट केले.

कागल नको, कर्नाटकात जाऊ

कागल एमआयडीसी झाल्यानंतर गोकुळ शिरगाव एमआयडीसीमधील अनेक उद्योजकांनी विस्तारासाठी तेथे प्लॉट घेतलो होते. आता विजेच्या प्रश्नामुळे कागलमधील प्लॉट विकून टाकावा आणि कर्नाटकमध्ये जागा घेऊन तेथे विस्तार करावा, असा निर्णय काही उद्योजकांनी घेतला आहे. कागलमधील सोक्टास या वस्त्रोद्योगातील आघाडीच्या कंपनीने कर्नाटकमध्ये विस्ताराचा निर्णय जाहीर केला आहे.

०००

प्रवास स्थलांतराचा

विजेच्या प्रश्नामुळे दीड वर्षांपूर्वी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योजकांनी कर्नाटकमधील मंत्री आणि सचिवांची भेट घेतली होती. त्यांच्याकडूनही तातडीने सकारात्मक प्रतिसाद मिळाला. निपाणीजवळ स्तवनिधी घाटाजवळील जवळपास ८०० एकर जागा कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या उद्योजकांसाठी निश्चित केली आहे. त्याचे जमीन हस्तांतरण होऊन शिक्केही पडले आहेत. सहा महिन्यांत तेथे काम सुरू होणार असल्याचे उद्योजकांनी सांगितले. महाराष्ट्रातून सुमारे चारशे ते पाचशे उद्योग तेथे नवी सुरुवात करतील अशी शक्यता आहे. गोकुळ शिरगावमधील जवळपास १०० उद्योजकांनी त्यासाठी अर्जही केले आहेत.



ऑगस्ट २०१२ मध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वीज दरवाढ झाली. तेव्हापासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड देताना राज्यातील सगळ्याच उद्योगांची अवस्था वाईट झाली आहे. सरकार या प्रश्नावर ढिम्म आहे. नेते केवळ घोषणाबाजी करतात. हा प्रश्न आताच दुरुस्त केला नाही, तर विकासाची पुन्हा कोणतीही संधी आपल्याला मिळणार नाही.

- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना


उद्योजकांनी कर्नाटकात जाण्याचा निर्णय जाहीर केला, त्याची सरकारने गंभीर दखल घ्यायला हवी होती. आपला भाग सीमेवर असल्याने तेथील बदल पटकन दिसतो. तेथील कामगार कायदे वेगळे आहेत. विजेचे दर आपल्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळेच उद्योजक कर्नाटककडे आकर्षित होत आहेत.

- सदानंद गुप्ता, सीओओ, सोकटास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात १३३ हॉस्पिटल्सच्या कागदपत्रांत त्रुटी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हॉस्पिटल्सच्या आवारातील पार्किग, फायर सेफ्टीसह विविध सोयी सुविधा संदर्भात महापालिकेकडून तपासणी सुरू आहे. या सुविधांची पूर्तता करणाऱ्या हॉस्पिटल व्यवस्थापनाना व्यवसाय परवाना व नूतनीकरणासाठी 'ना हरकत दाखला' दिला जातो. शहरातील हॉस्पिटल व्यवस्थापनकडून प्रशासनाने या संदर्भातील माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. कागदपत्रांच्या आधारे सर्व सुविधांची एकाच छताखाली छाननी करण्यासाठी सोमवारी कॅम्प झाला. यात ३२ हॉस्पीटल्सनी कागदपत्रांची पूर्तता केल्याने त्यांना एनओसी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. तर १३३ हॉस्पिटल्सच्या कागदपत्रात त्रुटी आढळल्या आहेत.

महापालिकेतर्फे आयोजित कॅम्प वैद्यकीय व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरले. शहर परिसरातील १६५ हॉस्पिटल्सकडून कागदपत्रे सादर करण्यात आली होती. बांधकाम परवाना, भोगवट प्रमाणपत्र, पार्किंगची सुविधा, फायर सेफ्टीची यंत्रणा, रूंद जिना अशा विविध घटकांची उपलब्धता आहे का याची खातरजमा केली जाते. या सुविधेसंदर्भात महापालिकेने हॉस्पिटल्सना नोटिसा काढल्या होत्या. या संदर्भातील कागदपत्रे ३१ डिसेंबरपर्यंत सादर करण्याची मुदत हॉस्पिटलना दिली होती. दुसरीकडे वैद्यकीय व्यावसायिकांना या कागदपत्रांचे सादरीकरण व छाननीसाठी सोमवारी आयोजित कॅम्पमध्ये १६५ हॉस्पीटल्स सहभागी झाले. नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, अग्निशमन विभागाचे अधिकारी रणचित चिले. चारही विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यशाळा झाली. ज्या हॉस्पीटल्सकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नाही त्यांना तत्काळ ते सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

होणार शुल्क आकारणी

शहरातील मध्यवस्तीत आणि अपार्टमेंटमध्ये हॉस्पीटल्स आहेत. काही हॉस्पीटल्सची उभारणी २५-३० वर्षापूर्वी झाली आहे.काही हॉस्पीटलच्या आवारात पार्किंगसाठी जागा नाही. इमारतीत अरूंद जिने, पाण्याची टाकी नाही, पार्किंगची सुविधा नाही अशा हॉस्पिटल्सकडून शुल्क आकारणी केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किफमध्ये शॉर्टफिल्ममधून उलगडले अंतरंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चौथ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (किफ) तिसऱ्या दिवशी देश-विदेशातील चित्रपट आणि शॉर्टफिल्म दाखविण्यात आल्या. कोल्हापुरातील स्थानिक कलावंतांनी तयार केलेल्या शॉर्टफिल्म खास आकर्षण ठरल्या. दर्जेदार शॉर्टफिल्मसमुळे तिसऱ्या दिवशी त्याचीच चर्चा रंगली.

'किफ' महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात विदेशी चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली. डेन्मार्कमधील 'सेक्स, ड्रग्ज आणि टॅक्सेशन', इटलीतील 'द बेस्ट ऑफर', 'सिनेमा पॅराडाईज', जर्मनीतील 'वोम्ब', दक्षिण आफ्रिकेतील 'फ्री स्टेट', मेक्सिकोतील 'इनोसन्ट व्हॉइस' हे चित्रपट दाखवण्यात आले. यासह 'पुनश्च' ही बंगाली फिल्मही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. विदेशी चित्रपटांमधील अमेरिकेतील 'द बुक थिफ' हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भावला. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एका शालेय मुलीच्या नजरेतून टाकलेला दृष्टिक्षेप या चित्रपटात मांडला आहे. दुपारनंतरच्या सत्रात 'भिडू' आणि 'रिंगण' या दोन मराठी चित्रपटांनी गर्दी खेचली आणि वाहवाही मिळवली. सत्यजित रे यांच्या 'पथेर पांचाली'ने पुन्हा एकदा अभिजात कलाकृतीचा आनंद प्रेक्षकांना दिला. उदय नारकर यांची 'नाना परीट, पांगरी', मयूर कुलकर्णी यांची 'ओरिजिन' आणि स्वप्नील राजशेखर यांच्या 'एकला चलो रे' या तीन शार्टफिल्मसनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आणि विचारही करायला भाग पाडले. स्थानिक कलाकारांच्या दर्जेदार कलाकृतींची किफमध्ये विशेष चर्चा रंगली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांच्या सर्व्हेवर बजरंग दलाचा आक्षेप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेची शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्याची भूमिका ही संशयास्पद आहे. प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतलेल्या १३० धार्मिक स्थळासंदर्भात बजरंग दलाच्या कोल्हापूर शाखेतर्फे स्वतंत्र हरकती दिल्या जाणार आहेत. प्रशासनाने धा​र्मिक स्थळाबाबत केलेला सर्व्हे चुकीचा आहे असा आरोप बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख संभाजी साळुंखे, शहरप्रमुख महेश उरसाल यांनी पत्रका परिषदेत केला. याबाबत मुख्यमंत्र्यांना ई-मेल केल्याचे त्यांनी सांगितले.

साळुंखे म्हणाले, 'महापालिकेने शहरातील प्राचीन मंदिराचा समावेश निष्कासित करावयाच्या यादीत केला आहे. अधिकाऱ्यांनी चुकीच्या सर्व्हेच्या आधारे धार्मिक स्थळांची यादी केली. त्याला विरोध आहे. यासंदर्भात प्रत्येक धार्मिक स्थळाच्या अनुषंगाने स्वतंत्र हरकती मंगळवारी आयुक्तांकडे सादर करू. मुळात सुप्रीम कोर्टाच्या एक जून २०११ रोजी मिळालेल्या आदेशाची अंमलबजावणी चार वर्षानी का? असा प्रश्न आहे.

उरसाल म्हणाले, 'प्रशासनाने, धार्मिक स्थळांना नोटिसा देण्यापूर्वी लोकप्रतिनिधी, दक्षता समिती, शांतता समिती सदस्यांची एकत्र बैठक का घेतली नाही. तत्कालिन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात आदेश काढला असता तर जनक्षोभ वाढून मतदानावर परिणाम होईल म्हणून तो दडवून ठेवला होता का ? हाही प्रश्नच आहे. हा प्रश्न संवेदनशील असून प्रशासनाने गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा.'

पत्रकार परिषदेला सुधाकर सुतार, राजेंद्र सुर्यवंशी, सुशिल भादिंगरे, राज अजुर्नीकर, सागर कलगघटगी, किरण पडवळ आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘हकिकत सिनेमाची’मधून रसिकांची अभिरुची घडेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आपल्याकडे साहित्य कलाकृतींच्या समीक्षणाची मोठी परंपरा आहे. चित्रपटांबाबत मात्र समिक्षणाचा प्रकार फारसा गांभीर्याने हाताळला गेलेला दिसत नाही. याला अपवाद ठरणारे 'हकिकत सिनेमाची' हे पुस्तक चित्रपट समीक्षेच्या क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण करेल. प्रेक्षकांची अभिरुची घडवेल', असा विश्वास समीक्षक डॉ. हिमांशू स्मार्त यांनी सोमवारी व्यक्त केला. सतीश जकातदार लिखित 'हकिकत सिनेमाची' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

शाहू स्मारक भवनात सुरू असलेल्या चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सतीश जकातदार लिखित 'हकिकत सिनेमाची' या पुस्तकाचे प्रकाशन 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय जाधव, समीक्षक डॉ. स्मार्त आणि 'किफ'चे समन्वयक दिलीप बापट यांच्या हस्ते झाले.

डॉ. स्मार्त यांनी चित्रपट समीक्षेचे महत्त्व अधोरेखित करून, जकातदार यांच्या लेखनशैलीचे कौतुक केले. ते म्हणाले, 'सतीश जकातदारांकडे चित्रपटविषयक प्रगल्भ जाण असल्याने त्यांनी जगभरातील प्रमुख चित्रपटांवर प्रकाश टाकला आहे. चित्रपटात न दिसणारे कंगोरे सुजाण वाचकाला उलगडून सांगण्याचा प्रयत्न पुस्तकाने केला आहे. हे पुस्तक भविष्यातील चित्रपट कलांच्या शक्यतांचे भांडार असल्यामुळे कला समीक्षेच्या दिशाही दिग्दर्शित करणारे ठरेल', असा विश्वास डॉ. स्मार्त यांनी व्यक्त केला.

यावेळी पुस्तकाच्या निर्मितीबद्दल सतीश जकातदार यांनी काही आठवणी सांगितल्या. 'शालेय वयातच चित्रपट पाहण्याची आवड लागल्यानंतर दर्जेदार इंग्रजी चित्रपटांचे अक्षरशः वेड लागले. पाश्चिमात्य चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज दिग्दर्शकांचे सिनेमे पाहून १९८५ मध्ये पुण्यात फिल्म क्लब सुरू केला. या क्लबच्या माध्यमातून सिनेमाप्रेमी मंडळी एकत्रित आली. त्यातूनच चित्रपटांचे परीक्षण लिहायला सुरुवात केली. जगभरातील चित्रपटांचे परीक्षण आणि चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या मांडल्याने हे पुस्तक अभ्यासकांना उपयुक्त ठरेल' असे जकातदार यांनी सांगितले. पुण्याच्या धर्तीवर 'चित्रपट रसास्वादा'चा प्रयोग कोल्हापुरातही सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

'महाराष्ट्र टाइम्स'च्या कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक विजय जाधव पुस्तकाबद्दल म्हणाले, 'जकातदार यांनी त्रयस्थपणे भारतीय चित्रपट संस्कृती मांडली आहे. प्रेक्षकांना न गवसलेली अनेक शक्तीस्थळे पुस्तकाच्या माध्यमातून सशक्तपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी चित्रपटसृष्टीच्या चार दशकांची आस्वादक समीक्षा केली आहे. चित्रपट महोत्सवाचे औचित्य साधून पुस्तकप्रकाशनाच्यानिमित्ताने झालेली चर्चा उदबोधक ठरेल. 'किफ'चे दिलीप बापट यांनी स्वागत केले. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी चित्रपट महामंडळाचे सचिव सुभाष भुर्के, चंद्रकांत जोशी, मिलिंद अष्टेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभूराजांचे थोरपण रंगमंचावर मांडू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'इतिहासाची पाने पलटताना छत्रपती संभाजीराजेंच्या करारी व्यक्तिमत्वाने मराठी माणूस प्रेरित व प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. बच्चा- बच्चा म्हणून जरी ते शिवशाहीत दिसत असले तरी संभाजीराजे हे शिवाजी महाराजांसारख्या सिंहाचा बच्चा होता. त्यामुळे ते छावेपण त्यांनी अगदी मनापासून पेलले. हे थोरपण समाजातील नव्या पिढीला समजणे गरजेचे आहे. या प्रेरणेतूनच हे नाटक करण्याचा चंग बांधला आणि नाट्य व्यवसायापेक्षा इतिहासातील काही पुसट पाने उलगडण्यासाठी शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रपंच मांडला आहे' असे डॉ. अमोल कोल्हे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

कोल्हापुरात २३ डिसेंबरपासून सहा दिवस 'शिवपुत्र संभाजीराजे' या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. महाराष्ट्रात ७२ प्रयोगाची घोडदौड करत हे नाटक आता कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियमवर भव्यतेचा जागर करणार आहे. डॉ. कोल्हे महानाट्यात संभाजीराजेंची मुख्य भूमिका साकारत आहेत. आजवर त्यांनी शिवाजी महाराजां व्यक्तिरेखा जितक्या ताकदीने जिवंत केली, त्याच उर्मीने संभाजीराजेंच्या भूमिकेतही प्राण ओतल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवले.

महानाट्याच्या अनुषंगाने संभाजीराजेंच्या भूमिकेबाबत बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, '‌छत्रपती शिवाजी या मालिकेवेळी संभाजीराजेंबाबत संदर्भ आले होते. यानिमित्ताने शंभूराजे या व्यक्तिमत्वात डोकावण्याची संधी मिळाली. ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच्यामार्फत संभाजीराजे या भूमिकेबाबत विचारणा झाली, तेव्हा दडपण आले होते. संभाजीराजांबाबत इतिहासात वेगवेगळे संदर्भ असल्यामुळे एक संभ्रम आहे. त्यांचा इतिहास खऱ्या-खोट्या, पोकळ चर्चेत अडकला आहे. त्यामुळे या भूमिकेचे शिवधनुष्य पेलताना नट आणि माणूस म्हणून जबाबदारीचे भान आवश्यक होते.'डॉ. कोल्हे म्हणाले, 'कोल्हापुरातील इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या लेखनातून संभाजीराजे हे व्यक्तिमत्व मला प्रभावित करून गेले. संभाजी महाराजांच्या पराक्रमी वर्णनाने माझ्यावर गारूड केले. हा इतिहास महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला समजला पाहिजे असे मला मनापासून वाटले.मग नाटक हा पर्याय समोर आला आणि मी स्वस्थ बसलोच नाही. शालेय स्तरावर संभाजीराजेंबाबत सांगायचे तर दोन पानाच्या एका प्रकरणात त्यांचा इतिहास संपतो. परीक्षेतील मार्कांपुरते त्यांचे कर्तृत्व सिमीत नाही. ते जगता आले पाहिजे. शालेय विदयार्थी, तरूण यांच्यापर्यंत संभाजीराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठीच या महानाट्यातून ही व्यक्तिरेखा साकारताना आनंद होतोय.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजकल्याण अधिकाऱ्यांवर गुन्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, इस्लामपूर

समाज कल्याण विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सरकारची साडेसात कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने सोमवारी दोघा अधिकाऱ्यांवर इस्लामपूर पोलिसांत फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. पुण्याचे प्रादेशिक उपायुक्त अनिल पांडुरंग कांबळे व सहाय्यक आयुक्त मनीषा देवेंद्रप्रसाद फुले अशी फसवणूक केलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत सोमवारी दिनकर दत्तात्रय पाटील (वय ५६, रा. पंढरपूर) यांनी फिर्याद दिली. दोन्ही सरकारी अधिकाऱ्यांनी लोकसेवक म्हणून काम करताना, संगनमताने इस्लामपूर येथे १२१ गुंठे जमीन खरेदी केली. इस्लामपूर येथील मोहन हरी फार्णे व अलका मोहन फार्णे यांच्याकडून ४८ लाख ४० हजार रुपयांना ही जमीन खरेदी केली. यानंतर केवळ आठ महिन्याच्या कालावधीत या दोघांनी सरकारला मुलां-मुलींचे वसतिगृह बांधण्यासाठी ही जमीन सात कोटी नऊ लाख सहा हजार रुपयांना विकली. या व्यवहारात दोन्ही अधिकाऱ्यांनी सहा कोटी ६९ लाख सहा हजार ७७४ रुपये नफा मिळवला. तसेच शिराळा तालुक्यातही मुलां-मुलींचे सरकारी वसतिगृह बांधण्याच्या व्यवहारात सरकारचीही ३२ लाख ९९ हजार २५० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

पंढरपूर येथील दिनकर पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. पाटील यांनी माहितीच्या अधिकाऱ्यात माहिती घेऊन सर्व दस्ताऐवजांच्या सत्यप्रती घेऊन पोलिसांत फिर्याद दाखल केली. इस्लामपूर पोलिसांनी सर्व दस्ताऐवज आणि कागदपत्रे पाहून गुन्हा नोंद केल्याचे इस्लामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ राठोड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमटीडीसीकडून कोल्हापूरला सापत्नभाव

$
0
0

एमटीडीसीकडून कोल्हापूरला सापत्नभाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या सोलापूरला नवीन उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आहेत. पूर्वी प्रादेशिक कार्यालय असलेल्या कोल्हापूरऐवजी सोलापूरचा विचार केल्याने कोल्हापूरच्या पदरात पुन्हा उपेक्षाच आली आहे. पर्यटनस्थळांनी परिपूर्ण कोल्हापुरात प्रादेशिक नव्हे तर उपप्रादेशिक कार्यालयही होणार नसल्याची दुर्देवी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पर्यटन वाढीच्यादृष्टीने कोल्हापूरचे महत्व असल्यानेच यापूर्वी एमटीडीसीचे प्रादेशिक कार्यालय सुरू केले होते. मात्र १५ वर्षांपूर्वी ते अचानक बंद करून रत्नागिरीत स्थलांतरित केले होते. तरीही येथील व्यवस्थापकपद कायम होते. ते पदही दोन वर्षांपूर्वी अचानक हलवण्यात आले. तेव्हापासून येथे फक्त माहिती व आरक्षण केंद्र सुरु आहे. प्रादेशिक कार्यालय हलवण्यात आले तेव्हापासून ते कार्यालय येथे पूर्ववत सुरू करण्याच्यादृष्टीने फारशा हालचाली झाल्या नाहीत. प्रारंभीच्या काळात काही निवेदने देण्यात आली, पण आजतागायत त्यावर कुणी काहीही केलेले नाही. सध्या पर्यटन वाढवण्याच्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने पर्यटन महोत्सव घेण्याचा विचार सुरू आहे. या परिस्थितीत ८ डिसेंबरला एमटीडीसीने पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला सोलापूर येथे उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याचे पत्र दिले आहे. संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर त्याची कार्यवाही सुरू होणार आहे.

व्यवस्थापकीय संचालकांच्या मान्यतेने हा प्रस्ताव सादर केला असल्याने संचालक मंडळाच्या मान्यतेची केवळ औपचारिकता असल्याचे सूत्रांचे मत आहे. त्यामुळे जवळपास सोलापूरला उपप्रादेशिक कार्यालय होणार हे निश्चित झाले आहे. कार्यालय हलविण्यामागे येथे उत्पन्न नसल्याचे कारण दाखवल्याचे समजते. पण सोलापूरला कार्यालय देताना कोणता निकष लावला आहे हे स्पष्ट होण्याची नीतांत आवश्यकता आहे. सध्या तरी केवळ धार्मिक पर्यटन हा एकमेव निकष दिसत असला तरी येथे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिराचे महत्व देशभरात आहे. कोल्हापूरच्या पर्यटनवाढीच्यादृष्टीने प्रादेशिक कार्यालय आवश्यक असून त्यातून येथील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. त्यासाठी आता जोर लावला तरच प्रादेशिक कार्यालय सुरु होण्याची शक्यता आहे.

...

भाजपचा विरोध

सोलापुरात उपप्रादेशिक कार्यालय झाले तर कोल्हापूरला प्रादेशिक कार्यालय होण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सोलापूरच्या प्रस्तावाला विरोध करुन कोल्हापुरात पूर्ववत प्रादेशिक कार्यालय सुरु करावे, अशी मागणी भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडेही निवेदनाद्वारे केली आहे.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरात ख्रिसमस फिव्हर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस म्हणजेच नाताळचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने ख्रिस्ती बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे. घराघरांत येशूच्या जन्माचा प्रसंग साकारण्यात ख्रिस्ती बांधव मग्न आहेत. सर्व चर्चमध्येही रंगरंगोटी आणि रोषणाई सुरू आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आणि परस्परांना शुभेच्छा देण्यासाठी ख्रिस्ती बांधवांच्या रात्री जागू लागल्या आहेत.

ख्रिस्ती बांधवांचा सर्वांत मोठा आणि सर्वाधिक उत्साहाचा सण म्हणजे ख्रिसमस. कोल्हापुरातही मोठ्या उत्साहात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी ख्रिसमस साजरा केला जातो. मुख्य दिवस जवळ येऊन ठेपल्याने ख्रिस्ती बांधवांमध्ये चैतन्याचे त आहे. शहरातील सर्वच चर्च आकर्षक रोषणाईने सजले आहेत. चर्चच्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि फेस्टिव्हलचेही आयोजन केले आहे. वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम रंगत असून, रात्री उशिरापर्यंत भक्तीसंगीत आणि नाटिकांच्या माध्यमातून येशूप्रती प्रेम, आदर व्यक्त केला जात आहे. चर्चच्या आवारात मीना बाजारचे आयोजन केले असून, यातून ख्रिस्ती बांधवाची खाद्य संस्कृती, कपडे, सौंदर्य प्रसाधने यांचे दर्शन घडत आहे. चर्चच्या आवारातच धार्मिक पुस्तके आणि येशू जन्माचे प्रसंग साकारण्यासाठी आवश्यक असणारे साहित्यही विक्रीसाठी उपलब्ध केले आहे.

चर्चप्रमाणेच कौटुंबिक पातळीवरही येशूच्या जन्माच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. येशूचा जन्म गव्हाणीत झाला होता. त्यामुळे घरात येशू जन्माचा प्रसंग साकारला जात आहे. गवत, माती, पुतळे आणि चित्रांच्या साहायाने जन्मप्रसंग साकारण्यात ख्रिस्ती बांधवांच्या रात्री जागू लागल्या आहेत. अनेकांच्या घरांवर चांदण्या आणि आकाशकंदीलही झळकले आहेत. रात्रीच्या वेळी मित्र आणि आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याची परंपरा ख्रिस्ती समाजात आहे, त्यामुळे रात्री दहा वाजल्यानंतर तरुणांचे ग्रुप वाद्यांसह मित्रांच्या घरी जाताना दिसत आहेत. यावेळी त्यांची भक्तीगीते लक्ष वेधून घेत आहेत. सांताक्लॉजचा वेश धारण करून लहान मुलांना खेळणीही दिली जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images