Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खोट्या प्रतिष्ठेपायीच ‘किलिंग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घटना क्रमांक एक : स्थळ - कसबा बावडा, गणेश कॉलनी, ता. १६ डिसेंबर २०१५, वेळ - रात्री दहाच्या सुमारास, गुन्हा - आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून दोघा सख्ख्या भावांकडून बहिणीचा खून.

घटना क्रमांक दोन : स्थळ - गंगावेश, ता. ५ ऑगस्ट २०१५, वेळ - रात्री ८ च्या सुमारास, गुन्हा - फॅशनेबल कपडे घालते आणि मोबाइलवरून मुलांशी बोलते म्हणून सख्ख्या भावाकडून बहिणीचा खून.

घटना क्रमांक तीन : स्थळ - इस्लामपूर (साखराळे), वेळ - सुमारे १५ वर्षांपूर्वी, गुन्हा - आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून आई-वडिलांनी मुलीला जिवंत जाळून मारले.

पोलिस रेकॉर्डवर आलेल्या या प्रातिनिधिक घटना. ज्या घटनांची वाच्यताच झालेली नाही, अशाही अनेक घटना घडत असतात. मुलीचे मनाविरुद्ध लग्न लावून देऊन तिच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आणि तिच्या अधिकारांचा गळा घोटण्याचे काम तर दररोज कुठे ना कुठे घडतच असते. पुरोगामी म्हणवणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातही प्रतिष्ठेपायी स्वतःच्याच पोटच्या गोळ्यांना संपविण्याच्या घटना घडत असल्याने उत्तर भारतातील ऑनर किलिंगचे लोण इथेही धडकल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सख्खा बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाचा राग मानत धरून स्वतःच तिची जीवनयात्रा संपवायची आणि प्रतिष्ठेला लागलेला बट्टा पुसल्याची शेखी मिरवायची, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. कसबा बावड्यात गुरुवारी (१६ डिसेंबर) रात्री घडलेली घटना हा अशाच ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचे पुढे आले आहे. दोन्ही तरुणांनी अतिशय शांत डोक्याने केलेल्या या खुनामुळे बहीण-भावाच्या नात्याला कलंक लागल्याची प्रतिक्रिया आहे.

उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये ऑनर किलिंगच्या घटना वारंवार घडत असतात. तिथे असलेला जात पंचायतीचा प्रभाव, जमीनदार आणि मजुरांमधील वाढती दरी आणि खोट्या प्रतिष्ठेचे वलय यामुळे जातीबाहेर लग्न करणाऱ्या मुलींना जीवे मारण्याच्या घटना घडतात.

राजर्षी शाहू महाराजांनीच आंतरजातीय विवाहांसाठी प्रोत्साहन दिले होते. मात्र, अलीकडच्या काळात खोट्या प्रतिष्ठेला खतपाणी घालण्याचेच प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याने अशा घटना वाढत असल्याचे समाज अभ्यासकांचे मत आहे.

१६ डिसेंबर रोजी कसबा बावडा येथे घडलेल्या घटनेने चौघांच्या आयुष्याची राखरांगोळी केली. इंद्रजित आणि मेघा कुलकर्णी या दाम्पत्याचे आयुष्य तर संपलेच, पण मेघाचे सख्खे भाऊ गणेश आणि जयदीप पाटील या दोघांचेही भविष्य अंधःकारमय बनले आहे. थेरगावच्या पाटील कुटुंबासाठी हा दुहेरी धक्का बसला आहे. पोटची मुलगी जीवानिशी गेली आणि दोन तरुण मुलं पोलिस कोठडीत पडली आहेत. शहरापेक्षा ग्रामीण भागात खोट्या प्रतिष्ठेला कवटाळून बसण्याचे प्रकार घडतात.

सामाजिक प्रतिष्ठेला लागलेला धक्का, नातलग, पै-पाहुण्यांकडून होणारी हेटाळणी आणि पुरुषप्रधान मानसिकतेतून असे प्रकार घडले आहेत. कसबा बावडा येथील घटनेतही नेमके हेच घडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न होत आहे. त्यामुळे खोट्या प्रतिष्ठेतूनच अशा घटना वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.



जिवंतपणीच मुलीचे श्राद्ध

सहा महिन्यांपूर्वीच कोल्हापुरातील एका उपनगरात मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून तिच्या वडिलांनी मुलगी जिवंत असतानाच तिचे श्राद्ध घातले होते. मुलीच्या छायाचित्रासह एक फलक चौकात लावून त्यावर 'आमची मुलगी आमच्यासाठी मेली' असा मजकूरही त्यावर लिहिला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सांगलीत शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, कुपवाड.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपी किमतीसाठी शुक्रवारी सांगली जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन छेडले होते. कारखानदारांनी ८०-२० चा फॉर्म्युला मान्य करावा अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी होती. ती पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी दिला होता. पण कारखानदारांनी हा फॉर्म्युला मान्य केल्यामुळे अवघ्या दोन तासांतच हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा खोत यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच केली.
अगदीच किरकोळ वाद वगळता जिल्ह्यातील मोजक्याच ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. संघटनेने आंदोलन मागे घेईपर्यंत कारखानदारांच्या नव्हे तर पोलिसांच्या जीवात जीव नव्हता.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे साखर कारखानदार एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिला हप्ता म्हणून देण्यास चालढकल करत आहेत, असा दावा करून संघटनेने गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. शुक्रवारी चक्काजामसाठी संघटना रस्त्यावर येऊ लागली. सांगली इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथे संघटनेचे नेते खोत सकाळी दहा वाजता पोहचले. आंदोलन सुरू झाले. वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. त्यातूनही मार्ग काढत आपल्या कामाला गाठ घालू पाहणाऱ्या एक-दोन मोटारसायकलस्वारांना कार्यकर्त्यांच्या थोबाडीत खाव्या लागल्या. तोपर्यंत सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांचा खोत यांना फोन आला. ८०-२० हा फॉर्म्युला आम्हाला मान्य आहे. सर्व कारखान्यांच्या अध्यक्षांशी आपण चर्चा केली आहे. आठ दिवसांत संबधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल,असे कदम यांनी सांगताच खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
सांगली जिल्ह्यात सर्वप्रथम एफआरपीच्या ८० टक्के म्हणजे दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय खासदार संजय पाटील यांनी एफआरपीची कोंडी फोडल्याचा दावा यशवंत शुगर अँड पॉवर लिमिटेडच्या कार्यकारी संचालकांनी पत्रकाव्दारे केला. त्यानंतर दुपारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांनी संयुक्तपणे पत्रकार बैठक घेतली. खोत म्हणाले, 'दिलीप पाटील यांनी सर्व कारखानदारांशी बोलून यावर तोडगा काढला आहे. सध्या बाजारात साखरेचा दर २८५० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे कारखानदारांना ८० टक्के एफआरपी त्वरित देण्यात अडचण नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. परंतु, सांगली जिल्ह्यात होत नव्हता. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला होता. आता आम्ही आंदोलन मागे घेतलेले आहे.' दिलीप पाटील म्हणाले, 'यामध्ये जिल्हा बँकेची भूमिकाही महत्त्वाची आहे. खोत यांनी साखरेचा दर वाढल्याचे सांगितले असले तरी राज्य सहकार बँकेकडून एक डिसेंबर रोजी आलेल्या साखरेच्या मुल्यांकनानुसार बँकेने २३८५ रुपयेच दर गृहित धरला आहे. या मूल्यांकनानुसार बँक प्रतिटन १४०० रुपयेच उचल देऊ शकते. त्यामध्ये वाढीव उताऱ्यानुसार जादा साखरेचे ६०० रुपये, मळीचे १६०, बगॅसचे ८० आणि प्रेसमेडचे २० रुपये अशी वाढ धरून कारखान्याना एफआरपीच्या ८० टक्के रकमेचा पहिला हप्ता देणे शक्य होणार आहे.' संघटनेने व्यवहार्य भूमिका घेऊन आंदोलन मागे घेतल्याबद्दल पाटील यांनी संघटनेला धन्यवाद दिले.
चौकट
पैसे न दिल्यास आंदोलन
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सर्वांत आगोदर सुरू झाला आहे. परंतु, अद्यापही त्यांनी पहिला हप्ता दिला नाही. याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, 'त्या कारखान्याचे कर्ज थकीत असल्याने त्यांनी बँकेकडे पैशाची मागणी केलेली नाही. या हंगामात तयार झालेल्या साखरेशी बँकेचा संबध नाही. त्यामुळे ती साखर विकून ते पहिला हप्ता देऊ शकतात. सरकारच्या निर्णयाची त्यांनी वाट पाहिली असेल. मार्चपूर्वी त्यांच्याकडील कर्जांची वसूली होईल, याची आपल्याला खात्री आहे.' सदाभाऊ खोत म्हणाले, 'वसंतदादा कारखान्याने पहिला हप्ता वेळेत दिला नाहीतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांची साखर जप्त करून त्याची विक्री करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत. अन्यथा संघटना आंदोलनात उतरेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ​दिमाखदार प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केवळ मनोरंजनाचे माध्यम या चौकटीतून सिनेमाकडे न पाहता त्यातून जाणीवा प्रगल्भ करणारी दृष्टी बनली पाहिजे. धंदेवाइक गल्ल्यावर सिनेमाचे यश मोजण्यापेक्षा सिनेसृष्टी आणि रसिकतेची मान उंचावणाऱ्या सिनेमांमधूनच रसिकता सजग राहू शकते. त्याचे भान देण्यासाठी सिनेमांचा महोत्सव गरजेचा आहे. अशा महोत्सवांना रसिकांचे पाठबळ मिळाले तरच ही चळवळ जोमाने वाढू शकते' असा विश्वास प्रख्यात अ​भिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केला. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात शुक्रवारी सायंकाळी चौथ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दिमाखदार प्रारंभ झाला. महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी पालेकर यांनी सिनेमा माध्यम आणि रसिकतेची नाळ दृढ करणाऱ्या विचारांची मांडणी केली.

महोत्सवाच्या उदघाटनसोहळ्यात प्रख्यात कन्नड सिनेमांचे दिग्दर्श्यक गिरीश कासारवल्ली यांना अमोल पालेकर यांच्याहस्ते कलामहर्षी बाबूराव पेंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी लेखिका, दिग्दर्शिका संध्या गोखले, बँक ऑफ​ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक आर. गणेशन, अ​खिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट आदी उपस्थित होते. २५ डिसेंबरपर्यंत महोत्सव सुरू राहिल.

अमोल पालेकर म्हणाले, 'भारतीय चित्रपटसृष्टीची शताब्दी साजरी केली म्हणजे आपण काय केले याचा विचार करायला हवा. करमणूकप्रधान सिनेमाने शंभर कोटी क्लबमध्ये कसा गल्ला जमवला याचे व्यावहारिक यश साजरे करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. या साजरेकरणाच्या संकल्पनेत सिनेमाच्या माध्यमात मानदंड निर्माण करणाऱ्या अनेक सिनेमांची शताब्दी सोहळ्यात आठवणही उरली नाही ही रसिक म्हणून मंथन करायला लावणारी गोष्ट आहे. सिनेसृष्टीच्या विकासाच्या गोष्टी करताना गल्ला मिळवणाऱ्या सिनेमाच्या यशाचा आलेख नजरेत आणला जातो, मात्र कलात्मकदृष्ट्या ​शिखरे पादाक्रांत करणारा सिनेमा विस्मरणात जातो हे रसिकतेचे द्योतक नाही. अशावेळी रसिकत्वाची जाणीव ठामपणे दाखवण्याची वेळ आली आहे. अशा स्थितीत महोत्सवांच्या दालनात ही रसिकता जपली जाते आणि ती पुढच्या पिढीकडे आपुलकीने दिली जात असते ही सुखावह जाणीव आहे.

पुरस्काराबाबत भावना व्यक्त करताना गिरीश कसरावल्ली म्हणाले, 'भारतीय सिनेमाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या बाबूराव पेंटर यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना समाधान वाटते. कला आणि कलाकार हे समाजातील चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवणारे आणि त्याबाबत परिवर्तन घडवण्याचे सामर्थ्य असलेले घटक आहेत. समाजातील वास्तवावर भाष्य करणारे घटक म्हणून ही माध्यम सशक्त करण्याची ताकद रसिकांमध्ये आहे. वाद, प्रतिवाद आ​णि वितंडवाद याकडे ज्ञानग्रहण करणारी साधने म्हणून पाहता आले पाहिजे. मात्र कलात्मक आणि व्यावसायिक अशी वर्गवारी चुकीची आहे. सिनेमा हे अभिव्यक्तीचा प्रभावी मार्ग आहे. समाजव्यवस्थेत राहून त्यातील त्रुटींवर टिकात्मक भाष्य करण्याची भूमिका या क्षेत्रात फार मोलाचे काम करू शकते.'

फिल्म सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, 'भारतीय बनावटीचा कॅमेरा तयार करून सिनेमा बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आनंदराव पेंटर यांच्या स्मृतिशताब्दीवर्षात त्यांच्या कर्तृत्वाची साधी दखलही राज्य सरकारने घेतली नाही. सिनेमा नावाचे जग समृद्ध करण्यासाठी ज्यांनी पाया रचला, त्या पेंटर यांच्याबाबत ही राजकीय उदासीनता खंतदायक आहे.' मनीषा राजगोळकर यांनी कासरवल्ली यांच्या मानपत्राचे वाचन केले. संध्या गोखले यांच्या हस्ते पोस्टर प्रदर्श्नाचे उदघाटन झाले.


ही तर मुस्कटदाबी

अभिनेता शाहरूख खान याने असहिष्णुतेबाबत केलेल्या विधानांचा निषेध म्हणून शुक्रवारी कोल्हापुरातील 'दिलवाले' या सिनेमाचा खेळ रद्द करण्यात आला. 'बाजीराव मस्तानी' यासिनेमातील बाजीराव, काशीबाई यांच्या पडद्यावर दाखवण्यात आलेल्या नृत्यावर आक्षेप घेत या सिनेबाबतही निषेधाचा सूर आहे. या दोन्ही घटनांवर अमोल पालेकर यांनी यावेळी परखड मत व्यक्त केले. 'आपल्या भावना दुखावल्या जातात म्हणून दुसऱ्याच्या भावनांचा अनादर करणेही मुस्कटदाबी आहे. ​रसिक म्हणून अशाप्रकारची प्रतिक्रिया निंदनीय आहे' असे पालेकर म्हणाले. तर 'कोर्ट' सिनेमा ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेल्याचा इतका बाऊ कशासाठी? ऑस्करला निवडला गेला नाही म्हणून एखाद्या सिनेमाची गुणवत्ता कमी होत नाही' असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदन पाटील यांच्या वारसांनी मांडली बाजू

$
0
0

कुपवाडः माजी मंत्री मदन पाटील यांचे दोन वारस व चार संचालकांनी शुक्रवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४ कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाच्या सुनावणीबाबत बाजू मांडली. अद्याप एक वारस व तीन माजी संचालकांचे म्हणणे मांडणे बाकी आहे. पुढील सुनावणी ३० डिसेंबरला होणार आहे.

जिल्हा बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने काही प्रकरणात चुकीचे निर्णय घेतल्याने बँकेचे ४ कोटी १८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी विशेष लेखा परीक्षक श्रीधर कोल्हापुरे करीत आहेत. आतापर्यंत अनेक संचालकांनी बाजू मांडली आहे. मात्र याच दरम्यान मदन पाटील यांचे निधन झाले. त्यांनतर त्यांच्या वारसांना याबाबत बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार त्यांच्या वारसांनी काल बाजू मांडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावात पाण्याचा दुष्काळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर शहरातील काही भागात चोवीस तास पाणी देता, तर काही भागात चार-पाच पाणी मिळ‍ते. मात्र, लगतच्या पाचगावसह उपनगरात पाणी नाही. महापालिकेतर्फे सध्या काही कॉलन्यात पाणी मिळते. कळंबा तलावातील पाणी संपल्याने पाचगावात पाणीटंचाई आहे. त्यामुळे जादा पाणी मिळण्याची गरज आहे अशी मागणी शिवसेनेसह ग्रामस्थांनी शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. पाचगावच्या जीवन प्राधिकरण योजनेचे सुरू असलेले काम पूर्ण होईपर्यंत महापालिकेने पाणी द्यावे असे साकडे घालण्यात आले. महापालिकेने पाचगावातील टाकीत पाणी सोडावे. तेथून गावाला पाणी देणे सोयीचे होईल अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गाडगीळ यांनी केली.

यावेळी जल अभियंता मनीष पवार यांनी तांत्रिकदृष्ट्या पाचगावच्या टाकीत पाणी सोडणे शक्य नाही. एका टाकीत पाणी सोडायचे झाल्यास कोल्हापुरातील २५ टक्के पाणीपुरवठा बंद करावा लागेल. तरीही प्रशासन पाचगावला पाणी देण्यास सकारात्मक आहे' असे सांगितले. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी, सध्या महापालिकेकडून पाचगावच्या दहा कॉलन्यांना पाणी दिले जाते. उर्वरित भागासाठी रोज दोन टँकर पाणी दिले जात असल्याचे सांगितले.

शिवसेना जिल्हाप्रमुख पवार यांनी, 'पाचगावातील टंचाई लक्षात घेऊन महापालिकेने आठवड्यातून तीन दिवस पाणी द्यावे आणि गावासाठी पाणी वितरणाची सोय करावी' अशी मागणी केली. शिष्टमंडळात सुचित चव्हाण, विराज पाटील, हर्षल सुर्वे, जितू पाटील, आदित्य शेटके, सुशांत गवळी, हिंदुराव पोवार, शैलेश पुणेकर आदींचा समावेश होता.

आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

गिरगावच्या पाणी पुरवठा संस्थेतून पाचगावला पाणी देण्याचा प्रस्ताव तयार आहे. त्याला मंजुरीसह निधी द्यावा यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ शनिवारी जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांना भेटणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्तांनी एकत्र बैठक घेऊन पाणीप्रश्नी तोडगा काढावा अशी मागणी यावेळी करण्यात येईल.

अन्य सदस्यांची पाठ

ग्रामस्थ पाण्यासाठी धावपळ करत पाचगाव ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांपैकी बहुसंख्य सदस्य महापालिकेच्या भेटीकडे फिरकले नाहीत. भिकाजी गाडगीळ हे एकमेव सदस्य शिष्टमंडळासोबत होते. टोकाचे राजकारण करणारे ग्रामपंचायत सदस्य गायब असल्याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांनी केली प्रश्नांची सडेतोड मांडणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

म​हापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराविक सदस्यांनी बोलायचे आणि इतरांनी माना डोलवायच्या. त्यावर अधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे द्यायची. कधी आरडाओरड तर कधी गोंधळ अशी स्थिती यापुढे कमी दिसण्याची शक्यता आहे. नव्या सभागृहात पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करीत असलेल्या ६२ सदस्यांपैकी बहुतांश सदस्यांनी प्रभागातील प्रश्नांना अभ्यासाची जोड दिल्याचे गुरुवारच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत दिसले. नव्या सदस्यांच्या 'फ्रेश'लूकला प्रभाग, शहराच्या प्रश्नांची, त्याच्या मुद्देसुद मांडणीची, अभ्यासाची जोड असल्याचे सभागृहात मांडलेल्या प्रश्नांतून सामोरे आले.

गुरुवारच्या सर्वसाधारण सभेनंतर प्रश्न मांडलेल्या सदस्यांनी सभागृहातील कामकाजाचा फॉलोअप घेण्याचे ठरविल्याचे मटाशी बोलताना सांगितले. सभागृहात सूचनेनंतर प्रशासनाने काय कार्यवाही केली याची माहिती ठराविक दिवसात नगरसेवकांना मिळावी यासाठी कृती कार्यक्रम आखला जाईल. तर काही नगरसेवकांनी लोकांच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांनी साधलेला संवाद, केलेल्या पत्रव्यवहाराचे रेकॉर्ड ठेवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले. नव्या सभागृहात पदवीधर, एमबीए, वकील, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रातील तरुण सदस्यांचा भरणा आहे. सभागृहात नव्या सदस्यांनी दिखावूपणा, निव्वळ आकांडतांडव न करता शहरांशी निगडीत प्रश्नांची मुद्देसूद मांडणी केली. महिला सदस्यांच्या कामकाजातील प्रत्यक्ष सहभागाने पुढच्या पाच वर्षांतील 'महिला राज'चची झलक दाखवली.

अनुभवी सदस्यांवर जबाबदारी

सभागृहात ६२ नगरसेवक नवे आहेत. त्यांची सभागृहावर छाप राहिल. यापूर्वी महापालिकेतील विविध पदांवर काम केलेले उर्वरीत नगरसेवकही आहेत. शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, संभाजी जाधव, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, राजाराम गायकवाड, किरण शिराळे, सुभाष बुचडे, महेश सावंत, निलेश देसाई आदी सीनिअर सदस्यांना सभागृहात अनुभवाच्या जोरावर हाताळणीची जबाबदारी पार निभवावी लागेल.

सदस्य म्हणाले...

सभागृहात सदस्यांनी मते मांडली की ​अधिकाऱ्यांनी ऐकून घ्यायचे आणि सभा संपल्यावर 'पुन्हा ये रे माझ्या मागल्या...' अशी स्थिती नक्कीच बदलेले. लोकहिताच्या प्रश्नांची सोडवणूक झालीच पाहिजे. त्यासाठी आम्ही सारे एकत्र आवाज उठवू. प्रशासनाकडून कामाचा रिझल्ट हवा. थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही. प्रभागाबरोबरच शहर विकासाचा आमचा अजेंडा आहे.
- पूजा नाईकनवरे, शाहूपुरी तालीम

संघटनेतील कामाचा अनुभव पाठीशी असल्याने सभागृहात वस्तुनिष्ठ, पुराव्यानिशी बोलण्यावर माझा भर राहिल. शहरातील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. त्याची तीव्रता समजावी म्हणून स्वच्छतागृहाचे फोटो काढून ते सभेत सादर केले. आता प्रशासनाने चार दिवसांची मुदत दिली आहे. या प्रश्नाबाबत प्रशासनाला पत्रही देणार आहे.
-राजू दिंडोर्ले, आपटेनगर, तुळजाभवानी

लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी अधिकाऱ्यांशी साधलेला संवाद, केलेला पत्रव्यवहार याचे रेकॉर्ड ठेवत आहे. रस्ते, पाणी, गटर, खराब विद्युत दिव्यांची दुरुस्ती हे प्रश्न महिनाभर प्रलंबित राहण्याऐवजी दोन-चार दिवसांतच सुटावेत. प्रश्न सोडवणुकीसाठी कालबद्ध कार्यक्रम पाहिजे. त्याच प्रश्नांवर दरवेळी संघर्षाची वेळ येऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी अशी अपेक्षा आहे.
- नियाज खान, जवाहरनगर शास्त्रीनगर

सभागृहात नवीन चेहरे अधिक असल्याने त्यांच्यात उत्साह आहे. मात्र त्यांनी वॉर्ड कमिटी, स्थायी समितीतील प्रश्न सर्वसाधारण सभेत मांडून सभागृहाचा वेळ घालवू नये यासाठी आम्ही नवीन सदस्यांची रंगीत तालीम घेतली. प्रश्न विचारण्याबाबत दिलेल्या प्रशिक्षणाचा फायदा झाला.
- विजय सूर्यवंशी , गटनेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिलवाले’चा एक खेळ बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बऱ्याच दिवसांनी पडद्यावर एकत्र दिसणाऱ्या शाहरूख खान आणि काजोल या जोडीचा बहुचर्चित दिलवाले या सिनेमाचा पहिला खेळ कोल्हापुरात रद्द करण्यात आला. देशातील असहिष्णुतेबाबत अभिनेता शाहरुख खान याने केलेल्या कथीत वक्तव्याच्या निषेधार्थ त्याच्या 'दिलेवाले' या सिनेमाबाबत गेल्या काही दिवसांपासून विरोधी सूर उमटत होता.

शुक्रवारी या सिनेमाच्या रिलिजवेळी कोल्हापुरात निषेधाचे पडसाद उमटले. पार्वती मल्टिप्लेक्स, पद्मा टॉकीज, अयोध्या आणि प्रभात टॉकीज येथे या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो रद्द करण्यात आला. तर ​चित्रपटगृहाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 'दिलवाले' सिनेमाचा खेळ रद्द करण्याची मागणी कोल्हापुरातील पतितपावन संघटना व बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली. त्यानुसार चित्रपटगृह संचालकांनी शो रद्द केल्याचे जाहीर केले. दरम्यान, प्रभात टॉकीजमध्ये हाऊसफुल बुकिंग होते. मात्र शो रद्द झाल्याने प्रेक्षकांना तिकीटाचे ५० हजार रुपये परत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावच्या टंचाईबाबत पालकमंत्र्यांचे आदेश धाब्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचवीस हजार लोकवस्तीच्या पाचगावसाठी महापालिकेकडून दररोज दोन टँकर पाठवून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू असताना जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ टँकरग्रस्त यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील एकही गाव येऊ नये, दर आठवड्याचा अहवाल निरंक जावा याच अट्टाहासापोटी या दोन्ही यंत्रणांनी पाचगावला पाणी देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्र्यांनी दिलेला आदेशही या यंत्रणांनी धुडकावला आहे.

पाचगाव ग्रामपंचायतीने गावठाण भागाला पाणी देण्यासाठी तेथील दोन बोअर ताब्यात घेतले आहेत. त्यांचे पाणी परिसराला मिळते. याशिवाय महापालिका सद्यस्थितीत पाचगावातील १० कॉलन्यांमध्ये नळाद्वारे आठवड्यातून दोन दिवस पाणी देते. तर उर्वरीत भागात दोन टँकर पाणी देते. त्याचा उपसाही कळंबा फिल्टर हाऊसमधून पाणी दिले जाते. सद्यस्थितीत पाचगावला पाणी देण्यासाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून दोन तर जिल्हा परिषदेच्या सदस्या मनीषा वास्कर यांनीही स्वखर्चातून दोन टँकरची सोय केली आहे. महाडिक यांच्याकडून कळंबा गावातून टँकरद्वारे पाणी आणले जाते. ते सध्या पाणी मिळत नसलेल्या पाचगावच्या पश्चिम उपनगरांतील कॉलन्यांना पुरविले जाते. वास्कर यांच्याकडून महापालिकेच्या कळंबा फिल्टर हाऊसमधून पाणी उपसा करण्यात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सतेज यांच्यासोबत कोरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीत अखेर जनसुराज्य शक्ती पक्षाने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीतील घोडेबाजार थांबवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पक्षाचे नेते विनय कोरे यांनी जाहीर केले. दरम्यान, शिवसेनेच्या प्रा. संजय मंडलिक यांनी पाटील यांना मदत करण्याची भूमिका घेतल्यानंतर संजय घाटगे मात्र आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत राहण्याची शक्यता आहे. निवडणूक जवळ आल्याने बहुसंख्य मतदार सहलीला रवाना होत आहेत. मतदारांना दोन्ही गटाकडून 'दक्षिणा' देण्याची मोहीम सुरू झाली आहे.

जनसुराज्यच्या पाठिंब्यासाठी गेले १५ दिवस दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू होते. यासाठी अनेकदा माजी मंत्री विनय कोरे यांच्या भेटी झाल्या. कोरे यांनी रात्री वारणेत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. या पक्षाकडे ३८ मतदार आहेत. राष्ट्रवादी आणि जनसुराज्यच्या पाठिंब्यामुळे पाटील यांना मोठी मदत होणार आहे.

आमदार महाडिक यांनी सकाळी संजय घाटगे यांची भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार महादेवराव महाडिक निलंबित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी केलेले आमदार महादेवराव महाडिक यांना निलंबित करण्याची कारवाई महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली आहे. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेले जिल्हा परिषद सदस्य व पक्षप्रतोद शहाजी पाटील यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनेही कारवाईचा बडगा उगारला आहे.

आमदार महाडिक हे गेले अठरा वर्षे आमदार आहेत. त्यात दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर तर एकदा ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. ते काँग्रेसचे असले तरी त्यांचे चिरंजीव अमल महाडिक भाजपचे आमदार तर दुसरे चिरंजीव स्वरूप महापालिकेत ताराराणी आघाडीचे अध्यक्ष आहेत. महापालिका निवडणुकीत त्यांनी भाजपबरोबर आघाडी केली होती. भाजप ताराराणी आघाडीची महापालिकेवर सत्ता यावी यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. पण काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करत सत्ता मिळवली.

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी महाडिक यांनी मुंबई व दिल्ली पातळीवर प्रयत्न केले. पी.एन. पाटील व प्रकाश आवाडे यांना सोबत घेऊन आमच्या तिघांत कुणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याकडे केली, पण पक्षविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांना उमेदवारी मिळाली नाही.

विधानपरिषदेची सतेज पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यानंतर महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना आता भाजपने पाठिंबा दिला आहे. भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणे ही बाब पक्षशिस्तीचा भंग करणारी बाब असल्याने प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी त्यांना निलंबित केले आहे. तशी नोटीस पक्षाचे सरचिटणीस गणेश पाटील यांनी महाडिक यांना काढली आहे.

महाडिक यांनी विधानपरिषदेचा अर्ज भरला तेव्हा त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य शहाजी पाटील हेही होते. त्यांनी महाडिक यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केली आहे. जिल्हा परिषदेत पाटील काँग्रेसचे पक्षप्रतोद आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला सूचक झाल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तीन दिवसांत याबाबत लेखी म्हणणे प्रदेश कार्यालयास कळवावे अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे या नोटीसीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा टँकरनंतरही टंचाई नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचवीस हजार लोकवस्तीच्या पाचगावसाठी महापालिकेकडून दररोज दोन टँकर पाठवून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू असताना जिल्हा परिषदेसह जिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. केवळ टँकरग्रस्त यादीत कोल्हापूर जिल्ह्यातील एकही गाव येऊ नये, दर आठवड्याचा अहवाल निरंक जावा याच अट्टाहासापोटी या दोन्ही यंत्रणांनी पाचगावला पाणी देण्याकडे दुर्लक्ष केले आहे. जिल्हा नियोजन समितीत पालकमंत्र्यांनी दिलेला आदेशही या यंत्रणांनी धुडकावला आहे.

पाचगाव ग्रामपंचायतीने गावठाण भागाला पाणी देण्यासाठी तेथील दोन बोअर ताब्यात घेतले आहेत. त्यांचे पाणी परिसराला मिळते. याशिवाय महापालिका सद्यस्थितीत पाचगावातील १० कॉलन्यांमध्ये नळाद्वारे आठवड्यातून दोन दिवस पाणी देते. तर उर्वरीत भागात दोन टँकर पाणी देते. त्याचा उपसाही कळंबा फिल्टर हाऊसमधून पाणी दिले जाते. हे पाणी

सद्यस्थितीत पाचगावला पाणी देण्यासाठी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार अमल महाडिक यांनी स्वखर्चातून दोन तर जिल्हा परिषदेच्या सदस्या मनीषा वास्कर यांनीही स्वखर्चातून दोन टँकरची सोय केली आहे. महाडिक यांच्याकडून कळंबा गावातून टँकरद्वारे पाणी आणले जाते. ते सध्या पाणी मिळत नसलेल्या पाचगावच्या पश्चिम उपनगरांतील कॉलन्यांना पुरविले जाते. वास्कर यांच्याकडून महापालिकेच्या कळंबा फिल्टर हाऊसमधून पाणी उपसा करण्यात येतो.

सध्या महापालिका पाचगावातील १० कॉलन्यांना पाणी देत आहे. याशिवाय गेल्या आठवड्यापासून दररोज दोन टँकरने पाणी देण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. मात्र ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाचगावच्या टाकीत थेट पाणी सोडणे शक्य नाही.

- पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दिलवाले’चा एक खेळ बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बऱ्याच दिवसांनी पडद्यावर एकत्र दिसणाऱ्या शाहरूख खान आणि काजोल या जोडीचा बहुचर्चित दिलवाले या सिनेमाचा पहिला खेळ कोल्हापुरात रद्द करण्यात आला. देशातील असहिष्णुतेबाबत अभिनेता शाहरुख खान याने केलेल्या कथीत वक्तव्याच्या निषेधार्थ त्याच्या 'दिलेवाले' या सिनेमाबाबत गेल्या काही दिवसांपासून विरोधी सूर उमटत होता.

शुक्रवारी या सिनेमाच्या रिलिजवेळी कोल्हापुरात निषेधाचे पडसाद उमटले. पार्वती मल्टिप्लेक्स, पद्मा टॉकीज, अयोध्या आणि प्रभात टॉकीज येथे या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो रद्द करण्यात आला. तर ​चित्रपटगृहाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 'दिलवाले' सिनेमाचा खेळ रद्द करण्याची मागणी कोल्हापुरातील पतितपावन संघटना व बजरंग दलाच्यावतीने करण्यात आली. त्यानुसार चित्रपटगृह संचालकांनी शो रद्द केल्याचे जाहीर केले. दरम्यान, प्रभात टॉकीजमध्ये हाऊसफुल बुकिंग होते. मात्र शो रद्द झाल्याने प्रेक्षकांना तिकीटाचे ५० हजार रुपये परत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाचगावला दुष्काळाच्या झळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर शहरातील काही भागात चोवीस तास पाणी देता, तर काही भागात चार-पाच पाणी मिळते. मात्र, लगतच्या पाचगावसह उपनगरात पाणी नाही. महापालिकेतर्फे सध्या काही कॉलन्यात पाणी मिळते. कळंबा तलावातील पाणी संपल्याने पाचगावात पाणीटंचाई आहे. त्यामुळे जादा पाणी मिळण्याची गरज आहे अशी मागणी शिवसेनेसह ग्रामस्थांनी शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. पाचगावच्या जीवन प्राधिकरण योजनेचे सुरू असलेले काम पूर्ण होईपर्यंत महापालिकेने पाणी द्यावे असे साकडे घालण्यात आले. महापालिकेने पाचगावातील टाकीत पाणी सोडावे अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य भिकाजी गाडगीळ यांनी केली.

यावेळी जल अभियंता मनीष पवार यांनी तांत्रिकदृष्ट्या टाकीत पाणी सोडणे शक्य नाही. एका टाकीत पाणी सोडायचे झाल्यास कोल्हापुरातील २५ टक्के पाणीपुरवठा बंद करावा लागेल. तरीही प्रशासन पाचगावला पाणी देण्यास सकारात्मक आहे' असे सांगितले. यावेळी आयुक्त पी. शिवशंकर यांनी, सध्या दहा कॉलन्यांसह दोन टँकरने पाणी दिले जात असल्याचे सांगितले. सेनेचे जिल्हाप्रमुख पवार यांनी, 'महापालिकेने आठवड्यातून तीन दिवस पाणी द्यावे' अशी मागणी केली. शिष्टमंडळात सुचित चव्हाण, विराज पाटील, हर्षल सुर्वे, जितू पाटील, आदित्य शेटके, सुशांत गवळी, हिंदुराव पोवार समावेश होता.

कलेक्टरना भेटणार

गिरगावच्या पाणी पुरवठा संस्थेतून पाचगावला पाणी देण्याचा प्रस्ताव तयार आहे. त्याला मंजुरीसह निधी द्यावा यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ शनिवारी जिल्हाधिकारी अमितकुमार सैनी यांना भेटणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयुक्तांनी एकत्र बैठक घेऊन पाणीप्रश्नी तोडगा काढावा अशी मागणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपी किमतीसाठी शुक्रवारी सांगली जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन छेडले होते. कारखानदारांनी ८०-२० चा फॉर्म्युला मान्य करावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. ती पूर्ण होईपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी दिला होता. पण कारखानदारांनी हा फॉर्म्युला मान्य केल्यामुळे अवघ्या दोन तासांतच हे आंदोलन मागे घेतल्याची घोषणा खोत यांनी आंदोलनाच्या ठिकाणीच केली.

अगदीच किरकोळ वाद वगळता जिल्ह्यातील मोजक्याच ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. संघटनेने आंदोलन मागे घेईपर्यंत कारखानदारांच्या नव्हे तर पोलिसांच्या जीवात जीव नव्हता.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे साखर कारखानदार एफआरपीच्या ८० टक्के रक्कम पहिला हप्ता म्हणून देण्यास चालढकल करत आहेत, असा दावा करून संघटनेने गेल्या तीन दिवसांपासून आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता. शुक्रवारी चक्काजामसाठी संघटना रस्त्यावर येऊ लागली. सांगली इस्लामपूर रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथे संघटनेचे नेते खोत सकाळी दहा वाजता पोहचले. आंदोलन सुरू झाले. वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. त्यातूनही मार्ग काढत आपल्या कामाला गाठ घालू पाहणाऱ्या एक-दोन मोटारसायकलस्वारांना कार्यकर्त्यांच्या थोबाडीत खाव्या लागल्या. तोपर्यंत सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम यांचा खोत यांना फोन आला. ८०-२० हा फॉर्म्युला आम्हाला मान्य आहे. सर्व कारखान्यांच्या अध्यक्षांशी आपण चर्चा केली आहे. आठ दिवसांत संबधित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल,असे कदम यांनी सांगताच खोत यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

सांगली जिल्ह्यात सर्वप्रथम एफआरपीच्या ८० टक्के म्हणजे दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्याचा निर्णय खासदार संजय पाटील यांनी एफआरपीची कोंडी फोडल्याचा दावा यशवंत शुगर अँड पॉवर लिमिटेडच्या कार्यकारी संचालकांनी पत्रकाव्दारे केला. त्यानंतर दुपारी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील आणि स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांनी संयुक्तपणे पत्रकार बैठक घेतली. खोत म्हणाले, 'दिलीप पाटील यांनी सर्व कारखानदारांशी बोलून यावर तोडगा काढला आहे. सध्या बाजारात साखरेचा दर २८५० रुपयांपर्यंत गेला आहे. त्यामुळे कारखानदारांना ८० टक्के एफआरपी त्वरित देण्यात अडचण नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला. परंतु, सांगली जिल्ह्यात होत नव्हता. त्यामुळे आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला होता. आता आम्ही आंदोलन मागे घेतलेले आहे.' दिलीप पाटील म्हणाले, 'यामध्ये जिल्हा बँकेची भूमिकाही महत्त्वाची आहे. खोत यांनी साखरेचा दर वाढल्याचे सांगितले असले तरी राज्य सहकार बँकेकडून एक डिसेंबर रोजी आलेल्या साखरेच्या मुल्यांकनानुसार बँकेने २३८५ रुपयेच दर गृहित धरला आहे. या मूल्यांकनानुसार बँक प्रतिटन १४०० रुपयेच उचल देऊ शकते. त्यामध्ये वाढीव उताऱ्यानुसार जादा साखरेचे ६०० रुपये, मळीचे १६०, बगॅसचे ८० आणि प्रेसमेडचे २० रुपये अशी वाढ धरून कारखान्याना एफआरपीच्या ८० टक्के रकमेचा पहिला हप्ता देणे शक्य होणार आहे.' संघटनेने व्यवहार्य भूमिका घेऊन आंदोलन मागे घेतल्याबद्दल पाटील यांनी संघटनेला धन्यवाद दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सदस्य सहलीवर, बोट नियमांवर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

जिल्ह्यातील पन्हाळा वगळता आठ नगरपरिषदांच्या विषय समित्यांच्या निवडी आज होणार असून विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण आले आहे. सदस्य सहलीवर गेल्याने सदस्य निवडी होणार का? सभापती निवडीचे काय होणार याबाबत उत्सूकता लागली आहे. सदस्य सहलीवर गेल्याने सभापतींच्या निवडीसाठी वेगळी बैठक बोलवावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यातील कागल,इचलकरंजी,जयसिंगपूर,कुरुंदवाड, पेठवडगाव, गडहिंग्लज, मलकापूर आणि मुरगूड या नगरपालिकांचे मिळून १८९ नगरसेवक आहेत.विधानपरिषदेच्या पर्श्वभूमीवर त्यांना मोठे महत्त्व आल्याने बऱ्यापैकी नगरसेवक सहलीवर गेले आहेत. प्रशासनाने मात्र १९६६ मधील नियम क्रमांक तीन अन्वये सभापती निवडीत नगरसेवकांना कोंडीत पकडण्याचे मनसुभे रचले होते. मात्र २००६ चा नियमाकडे बोट दाखवत नगरसेकांनीच हुशारी दाखवली आहे.

आपले अर्ज भरुन पक्षप्रतोदांकडे सुपूर्त करुन ठरवून बाकीचे ठराविक नगरसेवक पालिकेत राहून सर्वजण सहलीवर गेले आहेत. त्यामुळे केवळ सदस्य निवडी करुन सभापतीसाठी वेगळी बैठक बोलवावी लागणार आहे. बांधकाम, आरोग्य, पाणीपुवठा, मागासवर्गीय कल्याण, फायर ब्रिगेड, महिला बालकल्याण, वाचनालय अशा समित्यांच्या निवडीत सभापतीने मात्र स्वत: अर्ज करावा लागतो. त्याने सर्व कर आणि पाणीपट्टी भरणे बंधनकारक आहे. अन्यथा अर्ज अपात्र ठरतो.

मात्र, सहलीवरुन आल्यावर काही नगरसेवक मागील तारखेचा चेक देवून वेळ निभावून नेतात असेच आतापर्यंतचे चित्र आहे. एक सदस्या चार समित्यावर नियुक्त होवू शकतो. 'अ' वर्ग महानगरपालिकांना सहा समित्या तर इतरांना तीन ते चार असतात. निवडीवेळी जास्तीत जास्त सभापतीसह सहा सदस्य असणे बंधनकारक आहे. विधानपरिषदेची धामधूम सुरू असताना सभापत‌िपदाची संधी सोडायची कशी अशा ‌द्विधा मनस्थितीत सापडलेल्या नगरसेवकांनी चतुरपणा दाखवत बाजी मारली आहे. कुठल्याच पातळीवर नुकसान होऊ नये यासाठी दक्षता घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिलवालेची पोस्टर फाडली

$
0
0

इचलकरंजीत हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील गुरु चित्रमंदिर फॉर्च्युन प्लाझा येथे प्रदर्शित शाहरुख खान अभिनीत 'दिलवाले' चित्रपट बंद पाडत हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाचे पोस्टर फाडले. संतप्त कार्यकर्त्यांनी शाहरुख खान विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत पोस्टरही जाळले. दरम्यान, फॉर्च्युन प्लाझामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक व पोलिसांत शाब्दिक वाद झडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर चित्रपटाचे सुरु असलेले खेळ बंद करण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्लाझा समोरच रस्त्यावर ठिय्या मारल्याने सांगली रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. असहिष्णूतेबाबत अमिर खान याने केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. हिंदुत्ववादी संघटनांनी त्याचा निषेध करीत अमिर खान, शाहरुख खान यांचे चित्रपट चालू न देण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार येथील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी प्रथम स्टेशन रोडवरील गुरु चित्रमंदिरात जाऊन चित्रपटाचे प्रक्षेपण बंद पाडत चित्रपटगृहावर लावलेले पोस्टर फाडून टाकले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी फॉर्च्युन प्लाझाकडे मोर्चा वळवला. मात्र याठिकाणी चित्रपटाचे पोस्टर लावण्यात आले नसले तरी पोलिस बंदोबस्तात चित्रपटाचे खेळ सुरु होते. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी फॉर्च्युन प्लाझामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले. त्यामुळे आंदोलक व पोलिसात शाब्दिक वाद झडला. त्यामुळे चित्रपट बंद पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्लाझासमोरील मुख्य रस्त्यावर ठिय्या मारुन आंदोलन सुरु केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वाहतूक ठप्प झाली. अखेरीस शहा यांनी चित्रपटाचे खेळ बंद ठेवण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात संतोष कोळी, जवाहर छाबडा, संतोष हत्तीकर, अमर माने, इराण्णा सिंहासने, पंढरीनाथ ठाणेकर, शिवजी व्यास यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धामणी’ला मिळेना मुहूर्त

$
0
0

गगनबावडा: गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा या तीन तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांचे डोळे लागलेल्या राई (ता. राधानगरी) येथील धामणी प्रकल्प (मध्यम) प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ १६ नोव्हेंबर, २००० रोजी झाला खरा. मात्र, अजूनही या प्रकल्पाकडे सरकारचे लक्ष गेलेले नाही. त्यामुळेच धरण केवळ उद्घाटनापुरतेच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

१५ वर्षे पूर्ण झाली तरी अजूनही हा प्रकल्प अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या पंधरा वर्षात प्रकल्पाच्या परिसरातील सहा गावांच्या समस्या वाढल्या आहेत. प्रकल्पाचे कामकाज होण्यासाठी आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर यांनी पुढाकार घेण्याची मागणा येथील जनतेतून होत आहे. धामणी प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाचे स्वागत येथील शेतकऱ्यांनी दारात गुढया उभारुन केले होते. सुरुवात थाटामाटात झाली असली तरी या ना त्या कारणांनी प्रकल्पाला ग्रहण लागले. सुरुवातीस १२० कोटी किंमत असणाऱ्या या प्रकल्पाची किंमत ९०० कोटी रुपये झाली आहे.

प्रकल्पाची किंमत वाढत गेल्याने निधींची कमतरता हेच काम रखडण्यामागचे मूळ कारण आहे. त्यातच सिंचन घोटाळयात याही प्रकल्पाचा समावेश असल्याने येथील लोकांची घोर निराशा झाली आहे. या प्रकल्पावर अनेकांनी शेतकऱ्यांना स्वप्ने दाखविली. अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली येणार, धामणी नदी बारमाही वाहणार, पर्यायाने हरितक्रांती होणार हे स्वप्नच ठरले. हे स्वप्न आता दिवास्वप्न ठरणार की काय, अशा शंका व्यक्त केली जात आहे. धुंदवडे व धामणी खोऱ्यातील तब्बल २५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

प्रकल्पाच्या वाहतुकीसाठी गारीवडे फाट्यापासून प्रकल्पस्थळापर्यंत २००० मध्ये रस्त्याचे खडीकरण झाले होते. त्यानंतर त्याकडे कुणीच पाहिले नाही. त्यामुळष रस्ता पूर्णत: उखडला आहे. राई चौके दरम्यान मुख्य नदीवरील बंधारा मोडल्याने साकवावरुन नदी पार करावी लागते. त्यामुळे राई, चौके, मानबेट, मांडवकरवाडी, कंदलगाव, सुतारवाडा या सहा गावांची अधोगती झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टस्करने ठोकला सुळेरानमध्ये तळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

तालुक्यात पुन्हा एकदा सहा महिन्यानंतर परतलेल्या टस्कराने सुळेरान येथील बाबुराव महादेव पाटील यांच्या शेतातच तळ ठोकला आहे. यादरम्यान पाटील यांच्या केळी, ऊस, पामच्या रोपांचे मोठे नुकसाना त्याने आरंभले आहे. पाटील यांचे शेतातच घर असल्याने व परिसरात कोणी सहसा वर्दळ करीत नसल्याने आलेल्या टस्कराला हुसकावण्याचे धाडससुद्धा केले जात नाही. त्यामुळे टस्कराकडून होणारे नुकसान बघत बसण्याशिवाय इलाज नाही. दरम्यान टस्कराच्या हुसकावणीसाठी सुळेरानसह परिसरातील वस्त्यांमधील ग्रामस्थांनी एक पथक बनविले आहे. फटाके, ढोल-ताशे आणि आराओरडा करून टस्कर हुसकावण्याचा प्रयत्न हे पथक करणार आहे.

सुळेराननजिकच्या घाटगरवाडी जंगलातून टस्कर पाटील यांच्या शेतातच उतरत आहे. परिसरातच धनगरमोळा प्रकल्पाचा जलाशय असल्याने हा परिसर दरवर्षी त्याच्या मुक्कमाचा बनला आहे. पण यावेळी त्यांने पाटील यांच्या शेतामध्येच तळ ठोकला आहे. गेल्या चार दिवसात त्याने पाटील यांच्या ऊस, केळी आणि पामच्या झाडांचे मोठे नुकसान केले. रात्री घाटगरवाडी जंगलातून उतरलेल्या टस्कराने एक एकर शेतातील ऊस, ४० केळीची झाडे आणि ६०-७० पामच्या झाडे उद्ध्वस्त केली आहेत. वनविभागही नेहमीप्रमाणे केवळ नुकसानीचे पंचनामे करीत आहे. विशेष म्हणजे पामच्या झाडांची नुकसान भरपाई देण्याबाबत शासनाचे निर्देश नसल्याने ती मिळू शकणार नाही, असे वनविभाग सांगतो. दरम्यान हा टस्कर माजाला आल्याप्रमाणे पिके खाण्यापेक्षा नुकसान करण्याचाच प्रयत्न करीत आहे. त्यामुळे उपसरपंच प्रकाश मोरूसकर यांनी ग्रामस्थांचे पथक बनवून वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भीक मागतच सोडला तिने प्राण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काहीतरी कामधंदा मिळेल या आशेवर पतीसह काखेत लहान मुलाना घेऊन ती कोल्हापुरात आली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर मंदिराच्या फुटपाथवर पोटात भुकेचा आगडोंब उसळल्याने लहान मुलासह ती बसली. मंदिरातील भाविकांनी तिला पैसेही टाकले. मात्र, पैसे घेण्याचे धाडस होत नव्हते, पण पोटाच्या आगीपुढे भीकही स्वीकारावी लागली आणि भीक मागण्याची ही सवय आयुष्यभर जडली. गेली १७ वर्षे भीक मागणाऱ्या पारू वाघवेने भीक मागतच शुक्रवारी फुटपाथवर जीव सोडला. मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारापर्यंत त्यांची परवड सुरूच राहिली.

पारू वाघवे या गडहिंग्लज येथून १७ वर्षांपूर्वी कोल्हापुरात आल्या. वटेश्वर मंदिराच्या फुटपाथवर गेली १७ वर्षे त्या भीक मागत होत्या. थोड्या दिवसांनी बहीण त्यांच्यासोबत आली. मुलगा, पती, बहीण भीक मागून गुजराण करत होते. गेले काही दिवस त्या दम्याने त्रस्त होत्या. त्यांना सीपीआरमध्ये जाण्याचा सल्ला अनेकांनी दिला, पण त्यांनी ऐकला नाही. शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता फुटपाथवर त्यांचा मृत्यू झाला.

आईच्या मृत्यूचे दुःख अनावर झाल्याने १७ वर्षांचा मुलगा व त्याची बहीण रडू लागले. पारू यांचे पतीही बाहेर गेले होते. पारू यांच्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे याची त्यांना चिंता सतावत होती. फुटपाथजवळ ये-जा करणाऱ्यांची गर्दी जमू लागली. कांबळे नावाच्या व्यक्तीने ५०० रुपये अंत्यसंस्कारासाठी दिले. काही नागरिकांनी व्हाईट आर्मीशी संपर्क साधला; पण फुटपाथवर मृत्यू झाल्याने पोलिसांचा पंचनामा आवश्यक होता. शाहूपुरी पोलिसांशी दुपारी एक वाजता संपर्क साधला, पण तब्बल दोन तासांनंतर तीन वाजता पोलिस आले. त्यांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळा विभागाचा सावळागोंधळ

$
0
0

घरफाळा भरूनही नोंद नाही

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळा भरूनही पुन्हा वाढीव बिलांची आकारणी, मिळकती, दुकानगाळ्यांचे हस्तांतरण होऊनही मूळ मालकाच्या नावावर घरफाळा, रेकॉर्ड अद्ययावत न केल्याने दरवर्षी घरफाळा बिलात होणारी वाढ अशाप्रकारे घरफाळा विभागाच्या या सावळागोंधळमुळे मिळकतधारकांची डोकेदुखी वाढली आहे. मिळकतीची छाननी करून योग्य बिल आकारण्यासाठी नागरिक घरफाळा विभाग आणि विभागीय कार्यालयात हेलपाटे मारतात. पण अपुरे मनुष्यबळ, सक्षम अधिकाऱ्याचा अभाव आणि काही कर्मचाऱ्यांचा चालढकलपणा यामुळे वर्षानुवर्षे घरफाळ्याचा प्रश्न 'जैसे थे' आहे. काही ठिकाणी तर कर्मचारी आणि मिळकतधारकातील संगनमतामुळे नव्या मिळकतींची नोंद झाली नाही. वर्षानुवर्षे हा प्रकार चालू असून, महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर डल्ला मारण्याचा उद्योग काहीजण करत आहेत.

कोल्हापूर शहरात गेल्या दहा-पंधरा वर्षात मिळकतीत मोठ्या संख्येने वाढ झाली. उपनगरे, कॉलन्यांमध्ये वाढ झाली. पण घरफाळा विभागाकडून सगळ्या मिळकतधारकांची नोंद झाली नाही. घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांनी संबंधित मिळकतधारकांशी संगनमत करून मिळकतीच्या नोंदीच करत नसल्याच्या तक्रारी आहेत. आर्थिक इंटरेस्ट ठेवून घरफाळा नोंद, मिळकतीची योग्य माहिती नोंदविली जात नाही. रहिवासी, वाणिज्य, औद्योगिक मिळकतींच्या नोंदीतही तफावती आहेत. घरफाळा विभागातील अनियमितता, वसुलीतील सावळागोंधळाचे लेखा परीक्षणादरम्यान वाभाडे काढले. घरफाळा विभागाने रेकॉर्ड अद्ययावत न केल्याने नियमित घरफाळा भरणा करणाऱ्या मिळकतधारकांची नावे थकबाकीधारकांच्या यादीत समाविष्ट झाली आहेत. यामुळे विनाकारण अनेकांना मानहानीस सामोरे जावे लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

कस्टमर सर्व्हिसच्या धर्तीवर सुविधा हवी

महापालिकेच्या घरफाळा विभागाकडून मिळकतीचे हस्तांतरण झाल्यानंतरही रेकॉर्ड अपडेट होत नाही. विनाकारण लोकांच्या तक्रारी वाढत जातात, वाढीव बिलाच्या आकारणीने नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अधिकाऱ्यांना भेटायचे म्हटले तर साहेब फिरतीवर आहेत अशी उत्तरे दिली जातात. दुपारी या, संध्याकाळी असे सांगत नागरिकांना हेलपाटे मारायला लावण्यात काही कर्मचारी धन्यता मानतात. जुन्या बिलांची चौकशी करायला गेल्यानंतर वेळेवर माहिती मिळत नाही. प्रशासनाने कार्यालयात अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करून मिळकतधारकांना भेटण्याच्या वेळा निश्चित केल्या पाहिजेत. मिळकतधारकांच्या तक्रारी असतील त्या संदर्भात कस्टमर सर्व्हिस सुरू करावे. एकाच ठिकाणी तक्रारींची सोडवणूक व्हावी अशी मिळकतधारकांची मागणी आहे.

शहरातील अनेक मिळकतींचे रिव्हायझेशन झाले नाही. घरफाळा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटूनही चुकीचे बिले कमी केली जात नाहीत. पूर्वी बिले भरूनही पुन्हा त्याच रकमेची वाढीव बिले दिली जात आहेत. काही मिळकतींवर चुकीचा घरफाळा लावला आहे. शहानिशा करून योग्य बिले द्यावीत, त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी राहणार नाहीत. प्रशासनाने या विभागाला सक्षम, पूर्ण वेळ अधिकाऱ्याची नेमणूक करावी.'

-राहुल चोरडिया, हॉटेल व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images