Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘संभाजी’ना जाणण्याची महानाट्यातून पर्वणी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित पहिले महानाट्य अशी ओळख असलेल्या '‌शिवपुत्र संभाजी' या महानाट्यातून शंभूराजे यांना जाणून घेण्याची पर्वणी कोल्हापूरकरांना ​मिळणार आहे. हे नाटक युवापिढीपर्यंत पोहोचावे यासाठी हा प्रपंच मांडला असून इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेवर प्रकाशझोत टाकण्याचा हा प्रयत्न आहे,' अशी प्रतिक्रिया अ​भिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

​​जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्याहस्ते या महानाट्याच्या ​तिकीट अनावरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी महानाट्य आणि त्यातील संभाजी महाराजांच्या भूमिकेबाबत डॉ. कोल्हे यांनी मुक्त संवाद साधला. यावेळी नाट्यवितरक प्रफुल्ल महाजन उपस्थित होते.

२३ ते २८ डिसेंबर या कालावधीत शिवाजी स्टे‌डियम येथे हे महानाट्य सायंकाळी सहा वाजता होणार आहे. शिवाजी महाराज व शंभूराजे यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. तसेच हत्ती, घोडे व बैलगाड्यांमुळे या नाटकाला भव्यता येणार असून रंगमंचावर जहाजाचा वापर करून जंजिरा मोहीम दृश्य दाखवण्यात येणार आहे. शंभर फुटी स्टेज व शंभरहून अधिक कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट असा शाही थाट अशी पर्वणी या महानाट्यांच्या माध्यमातून अनुभवता येणार असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी दिली.

जगदंब प्रॉडक्शन प्रस्तुत व राजदीप प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचा दौरा कोल्हापुरात आयोजित केला आहे. शाहीर महेंद्र महाडिक यांनी या नाटकाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. आलमगीर औरंगजेबाच्या भूमिकेत रवी पटवर्धन, तर शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत कोल्हापूरचे हर्षल सुर्वे आहेत.

‌विद्यार्थ्यांना खास सवलत

महानाट्याच्यानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना तिकीटदरात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे, तर २३ व २४ डिसेंबरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेजच्या ओळखपत्रावर तिकीटदरात २० टक्के सवलत मिळेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्ट्रक्चरल ऑडिट अंतिम टप्प्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलावाच्या संरक्षक भिंतीच्या होत असलेल्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने या भिंतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे चालवलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच शेवटचा टप्पा सुरु करण्यात येत असून त्यानंतर ऑडिटचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार भिंतीला ताकद देण्यासाठी काय आवश्यक आहे याचे नियोजन केले जाणार आहे.

रंकाळा तलावाभोवती बांधण्यात आलेली संरक्षक भिंत पश्चिमेच्या बाजूस सातत्याने ढासळत आहे. यापूर्वीही भिंतीचे बांधकाम नव्याने करण्यात आले होते. पण ते नवीन बांधकामही पुन्हा ढासळले. याशिवाय पूर्वेकडील भिंतीची उंची ड्रेनेजच्या व रस्त्याच्या भरावामुळे कमी झाली आहे. अनेक ठिकाणी या कामांमुळे धक्काही पोहचला आहे. अनेक ठिकाणचे दगड निखळले आहेत. त्याचबरोबर रंकाळा टॉवर असलेल्या बांधकामामध्ये मोठ्या भेग निर्माण होत आहेत. या सर्वांमुळे रंकाळ्याच्या संरक्षक भिंतीमध्ये पाण्याचा दाब सहन करण्याची ताकद शिल्लक आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने रंकाळ्याच्या पूर्ण संरक्षक भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यासाठी प्रसिद्ध स्ट्रकवेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट प्रा. लि. या कंपनीला काम सोपवण्यात आले. रंकाळा हा एक ऐतिहासिक ठेवा म्हणून कंपनी कमी खर्चामध्ये काम करण्यास तयार झाल्याचे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले. या कंपनीकडून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आतापर्यंत भिंतीचा प्राथमिक सर्व्हे करण्यात आला आहे.

आता भिंतीच्या पायाजवळील महत्वाची परि​स्थिती जाणून घेण्याचा टप्पा आहे. त्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये आधुनिक यंत्रणेमार्फत कंपने सोडून भिंतीची ताकद पडताळली जाणार आहे. ही प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार असल्याचे सरनोबत यांनी सांगितले. यातून संरक्षक भिंतीबरोबर रंकाळा टॉवरच्या बांधकामाचीही ताकद तपासण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोलारा मोठा, यंत्रणा कमकुवत

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळा विभागाच्या कामकाजाचा डोलारा मोठा आहे; पण या विभागाकडे सक्षम यंत्रणाच नाही. कराची आकारणी करण्यापासून ते बिलाच्या वसुलीची कामे मोजक्याच कर्मचाऱ्यांमार्फत केली जातात. परिणामी नव्या मिळकतींचा शोध, कराची आकारणी या साऱ्या घटकांवर मर्यादा पडत आहेत.

विभागाला पूर्ण वेळ सक्षम अधिकारीही नाही. येत्या एक एप्रिलपासून घरफाळ्यात वाढ होणार आहे. साहजिकच उत्पन्नाचे लक्ष्य ५५ कोटींपर्यंत पोहोचेल. मिळकतीच्या फेर सर्व्हेनंतर नव्या मिळकती वाढतील. वाढीव कामकाज विचारात घेता प्रशासनाकडून हा विभाग सक्षम करण्यासाठी हालचाली झाल्या तर ते उत्पन्नवाढीसाठी पूरक ठरणारे आहे.

५५ कोटी अपेक्षित उत्पन्न

साधारणपणे ३० ते ४० टक्के घरफाळा वाढ झाल्यानंतर घरफाळ्यातून मिळणारी रक्कम ५५ कोटींपर्यंत अपेक्षित धरण्यात आली आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ४२ कोटी रुपये अपे​क्षित आहे. एप्रिल २०१५ ते नोव्हेंबरअखेर १८ कोटी रुपये घरफाळा वसूल झाला आहे. गेल्या वर्षी घरफाळ्यातून ३७ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे यंदाही मोठा डोलारा सांभाळण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे.

एलबीटी बंद झाल्याने घरफाळा हाच आर्थिक उत्पन्नाचा मुख्य स्रोत असणार आहे. महापालिकेने २०११ पासून भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली आहे. रेडीरेकनरच्या दरावर मूल्य आकारणी निश्चित होणार आहे. साधारणपणे दरवर्षी आठ ते दहा टक्के इतकी रेडीरेकनरमध्ये वाढ होते. २०११ पासून हिशेब केला तर साधारणपणे चाळीस टक्क्यापर्यंत वाढ अपेक्षित आहे. प्रशासनाने रेडीरेकनरवर आधारित मूल्य आकारणी प्रस्ताव तयार करून तो लागू करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वसाधारण सभेची मान्यता घ्यावी लागणार आहे. दरम्यान, भांडवली मूल्य आकारणी रेडीरेकनरचा दर (चौरस फुटावर आधारित), वापरातील बांधकामाचे एकूण क्षेत्र, वापर (रहिवासी की वाणिज्य), प्रकार (आरसीसी, साधे) फ्लोअर फॅक्टर (किती मजली), वयोमन या सूत्रावर केली जाते. भांडवली मूल्य x ०.२५ (रहिवासी क्षेत्रासाठी लागू) या पद्धतीने कर आकारणी केली जाते. उदाहरणार्थ भांडवली मूल्य १००० रुपये निश्चित झाले तर २५० रुपये घरफाळा आकारणी रहिवासी विभागासाठी होते.वाणिज्य विभागासाठी हे प्रमाण ०.५० टक्के इतके आहे.

पाणीपट्टीप्रमाणे घरफाळ्याचेही स्पॉट बिलिंग

महापालिकेकडून सध्या प्रायोगिक तत्त्वावर पाणीपट्टीचे स्पॉट बिलिंग करण्यात येत आहे. नवीन वर्षापासून सर्वच विभागांतून पाण्याचे स्पॉट बिलिंग होणार आहे. दोन महिन्यातून एकदा पाणीपट्टी वसूल केली जाते. भविष्यकाळात दरमहा पाणीपट्टी वसुलीचे नियोजन आहे. पाणीपट्टीप्रमाणेच घरफाळा वसुली ही स्पॉट बिलिंगचा प्रस्ताव आहे. पाणीपट्टी वसूल करणाऱ्या कर्मचाऱ्यामार्फतच घरफाळा वसूल करण्याचे प्रस्तावित आहे. वर्षातून एकदा घरफाळा वसूल केला जातो. पाणी बिलाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांचा मिळकतधारकांशी दोन महिन्यातून एकदा संपर्क येत राहिल्यास त्या माध्यमातून घरफाळा वसुलीला गती मिळू शकेल.

विभागात सुसूत्रतेचा अभाव

शहराचा विस्तार वाढला आहे. नव्या मिळकती तयार झाल्या आहेत. मात्र, सध्या कराची आकारणी करण्यासाठी ११ आणि वसुलीसाठी १० असे मोजके कर्मचारी आहेत. प्रत्येक प्रभागासाठी एक वसुली कर्मचारी आणि सात प्रभागांसाठी एक कर आकारणी करणारा कर्मचारी नेमला तर कामकाज गतिमान होणार आहे. घरफाळा विभागाचे कामकाजही प्रभारीवर अवलंबून आहे. सहायक आयुक्तांकडे हा विभागाचा पूर्णवेळ कामकाज सोपविले तर कामकाजात सुसूत्रता येणार आहे. त्याचबरोबर बांधकाम विभागाने संबंधित ​मिळकतधारकाला परवाना दिल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र घरफाळा विभागाकडे सादर केले तर नव्या मिळकती आपोआप नोंदल्या जातील. मात्र, महापालिकेच्या दोन विभागांतच यासंबंधी समन्वय घडत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ कोटींचा आराखडा लवकरच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चित्रपटाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातील चित्रपटनिर्मितीला गती येण्याच्या दृष्टीने राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयात सकारात्मक घडामोडी सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर ​​चित्रनगरीच्या ७५ एकर जागेत सिनेमाच्या चित्रीकरणासाठी आवश्यक असलेल्या सेटअपचा आराखडा करण्यासाठी १५ कोटी रूपयांची निविदा लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे, अशी माहिती दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी दिली.

​अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नूतन कार्यकारिणीसाठी येत्या दोन महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. महामंडळाच्या निवडणुकीत यंदा मांजरेकर यांच्यातर्फे पॅनेल उभे केले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. 'नटसम्राट' या सिनेमाच्यानिमित्ताने कोल्हापुरात आलेल्या मांजरेकर यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी या चर्चेला दुजोरा दिला.

​मांजरेकर म्हणाले, 'चित्रनगरीचा प्रश्न गेल्या दहावर्षापासून रखडला आहे हे विकासाच्यादृष्टीने चांगले द्योतक नाही. त्यामुळे चित्रनगरीच्या परिसरात चित्रीकरणासाठी आवश्यक सेटअप उभा राहणे ही पहिली गरज आहे. कोल्हापूर हे ​चित्रीकरणासाठी अतिशय पोषक शहर आहे. येथे कुशल तंत्रज्ञ उपलब्ध होतात. सिनेमानिर्मितीच्या कामाची जाण असलेले मनुष्यबळ कोल्हापुरात सहज मिळते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलमुक्तीसाठी बुधवारी धरणे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टोल वसूल होणार नाही या कोल्हापूरच्या जनतेला दिलेल्या शब्दाप्रमाणे वाटचाल करण्यासाठी जोपर्यंत टोलमुक्ती होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसता येणार नाही. त्याकरिता अधिवेशन काळात सरकारला टोलमुक्तीसाठी निर्णय घेण्यासाठी भाग पाडण्यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय टोल विरोधी कृती समितीच्यावतीने १६ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनात काही निर्णय घेतला नाही तर त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी ठरले.

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टोल विरोधी कृती समितीच्या बैठकीत टोल वसुलीला दिलेली स्थगितीची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपते. तोपर्यंत विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करुन टोलमुक्तीचा निर्णय टाळता येणार नाही असे सरकारला सुनावत तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले.

याबाबत प्रा. पाटील म्हणाले, '२३ डिसेंबरपर्यंत अधिवेशन चालेल असेही गृहित धरणे चुकीचे आहे. त्यानंतर जर आंदोलन केले व निर्णय घेण्याची मागणी केली तर त्याला कमी वेळ मिळेल. त्यानंतर १ जानेवारीला टोल सुरु होण्याचा धोका टाळण्यासाठी अधिवेशन संपेपर्यंत स्वस्थ बसता येणार नाही. त्यासाठी सरकारला लवकरात लवकर काही पाऊले उचलण्यासाठी १६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. टोलमुक्तीच्यादिशेने निर्णय घ्यावा असे निवेदन देण्यात येईल.

त्यानंतर सरकारकडून काही घोषणा झाली नाही तर पालकमंत्री पाटील यांच्या घरावर मोर्चा घेऊन जाऊ.'

समितीचे निमंत्रक निवास साळोखे म्हणाले, 'डिसेंबरअखेरची मुदत संपत येत आहे. अशावेळी आचारसंहिता धुडकावून निर्णय घेतला पाहिजे. यासाठी सर्वांनी मिळून कृती कार्यक्रम हाती घेऊ.' आर. के. पोवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याची सूचना केली. याप्रसंगी चंद्रकांत यादव, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, सुरेश जरग, लालासाहेब गायकवाड यांचीही भाषणे झाली.



पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर तातडीने आयआरबीने ८५० कोटी खर्चाचा आकडा पुढे आणला. या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीचा संदर्भ घेत पाटील म्हणाले, 'आयआरबीने किती रक्कम सांगितली, त्याचे व्याज कसे पकडले या चर्चेच्या पुढे जाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठक घेतल्यानंतर आतापर्यंत सरकारने काय केले व ३१ डिसेंबरच्या आत टोलमुक्ती कशी होणार हेही प्रश्न कोल्हापूरवासियांकडून यापुढे विचारले जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार ‘राजा’ला पॅरिस टूर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषदेसाठी महाडिक विरुद्ध पाटील गटाची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने मतदारांना आता सहलींचे नियोजन खुणावू लागले आहे. उमेदवारांकडून सदस्यांना लवकरच सहलीवर पाठवण्याचे नियोजन केले जात आहे. एका गटाकडून मतदारांना पॅरिस टूरवर पाठविण्यात येणार आहे तर दुसऱ्या गटाकडून सहलीसाठी एखादा आयलँड निवडला जाणार आहे. परदेश दौऱ्यासाठी मतदारांकडे पासपोर्ट असल्याची विचारणा करण्यात येत आहे. याशिवाय देशातील विविध पर्यटनस्थळांच्या सहलीचेही नियोजन केले जात आहे. मोबाइलची रेंज येणार नाही अशा काही ठिकाणांची चाचपणी सुरु आहे. महिला आरक्षणामुळे महिला मतदारांची संख्या मोठी असून त्यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे सहकुटुंब सहलीची मेजवानीच ठरणार आहे.

महाडिक व पाटील गट आमनेसामने उभे ठाकले असल्याने ही लढत अतिशय काटाजोड होईल, असा अंदाज बांधला जात आहे. जितकी चुरस जास्त तितकी मतदारांची बडदास्त जास्त असे समीकरण असते. त्यामुळे ही लढत इर्षेने झाली पाहिजे, यासाठी अनेक मतदार देव पाण्यात ठेवून बसले होते. सतेज पाटील यांना तिकिट दिल्याने महा​देवराव महाडिक यांनी अपेक्षेप्रमाणे बंडखोरी जाहीर केली. ही बंडखोरीच मतदारांच्या पथ्यावर पडली आहे. बिनविरोध अथवा कमजोर उमेदवार समोर असता तर मतदारांना फारशी किंमत मिळाली नसती. पण या दोन पारंपारिक विरोधकांमुळे पूर्वीपासून दर वाढला होताच. आता तर मतदार खऱ्या अर्थाने 'राजा' झाला आहे. सारेच मतदार सहलीवर जातील याची शक्यता कमी आहे. काहींना 'लाभ' मिळाल्यास त्यांच्या सहलीचा प्रश्न येणार नाही.

त्यामुळे पहिल्या टप्प्यात आपल्या गटातील हक्काचे मतदार सुरक्षित ठेवण्याचे नियोजन उमेदवारांकडून करण्यात आले आहे. त्यांना कुठे पाठवायचे, कुणावर त्याची जबाबदारी सोपवायची, ते बाहेरच्या संपर्कात कसे येणार नाहीत याच्या खबरदारीचे नियोजन सुरु आहे. काहींचे मतदार वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचे तर काहींचे एकाच ठिकाणी सर्वांना पाठवण्याचे नियोजन सुरु आहे. परदेश दौऱ्यावर पाठवण्यासाठी पासपोर्टची माहिती जमवण्याचे काम सुरु आहे. जर पासपोर्ट उपलब्ध झाले तर परदेशवारीची संधी मतदारांकडे चालून येणार आहे. एका गटाकडून जिथे संपर्काची साधने कमी आहेत अथवा संपर्क होणार नाही अशा ठिकाणांची चाचपणी सुरु आहे.



महिला सदस्यांची सहकुटुंब सहल

महापालिकेत ४१ सदस्य महिला आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेतही महिला आरक्षणामुळे महिला सदस्यांची मोठी संख्या असल्याने या मतदारांची मात्र सहकुटुंबच सहल होणार आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सध्या मतदार फोडाफोडीची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर आपले सदस्य विरोधकांच्या हातात जाणार नाहीत याची मोठी दक्षता घेतली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरही प्रदूषितच

0
0

Raviraj.Gaikwad@timesgroup.com

कोल्हापूरची हवा छान आहे ना...स्वच्छ आहे... कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांचं किंवा महालक्ष्मीच्या भाविकांचं एक ढोबळ मत. प्रत्यक्षात तशी परिस्थिती आहे का? तर उत्तर नाही, असं आहे. सध्या दिल्ली आणि पुण्यातील प्रदूषणाची चर्चा सुरू आहे. कोल्हापुरात परिस्थिती तितकी गंभीर नसली, तरी ती कोल्हापूरकरांना विचार करायला लावणारी नक्कीच आहे.

कोल्हापूर : चीनमध्ये राजधानी बीजिंग आणि भारतात राजधानी दिल्ली, ही जगातील सर्वांत वायू प्रदूषित आहेत. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सम आणि विषम क्रमांकाची वाहने रस्त्यावर आणण्याचा विचार सध्या सुरू आहे. त्यावर उलट-सुलट मते व्यक्त होत असली, तरी तेथील प्रदूषणाची स्थिती गंभीर असल्यावर सगळ्यांचेच एकमत आहे. पुण्यातही वायू प्रदूषणाचा विषय गंभीर आहे, हेही कुणी नाकारणार नाही.

दिल्ली आणि पुण्याच्या तुलनेत कोल्हापूर सर्वच अंगांनी छोटे शहर असले, तरी येथील हवाही प्रदूषितच असल्याचे दिसत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घालून दिलेल्या मानकांपैक्षा येथील प्रदूषणाची पातळी काही ठिकाणी कमी आहे, तर काही ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे भविष्यात ही परिस्थिती निश्चितच प्रत्येकाला विचार करायला लावणारी आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने शहरातील तीन ठिकाणी वायू प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या जातात. यात मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील दाभोळकर कॉर्नर, शिवाजी विद्यापीठ आणि वर्दळीच्या महाद्वार रोडचा समावेश आहे. यातील शिवाजी विद्यापीठ परिसरातील प्रदूषणाची पातळी धोक्याची नसली, तरी दाभोळकर कॉर्नर आणि महाद्वार रोड येथे धुलीकणांचे प्रमाण धोक्याच्या पातळी पुढे गेले आहे.

या तीन ठिकाणांबरोबरच कावळा नाका, राजारामपुरी, महापालिका चौक, बिंदू चौक, पार्वती टॉकिज, उमा टॉकिज परिसर, आईसाहेब महाराज चौक, गंगावेश, रंकाळा स्टँड, शिवाजी चौक, संभाजीनगर, मिरजकर तिकटी, सोन्या मारुती चौक, कसबा बावडा येथे वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे ही ठिकाणे देखील वायू प्रदूषणाच्या दृष्टीने संवेदनशील बनत आहेत.

पर्यावरणशास्त्र विभागाकडून मानवी शरीर, प्राणी आणि वनस्पतींसाठी हानीकारक असलेल्या नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइडच्या नोंदी घेतल्या जातात. त्याचबरोबर हवेत धुलीकणांचे प्रमाण किती आहे, याचीही नोंद घेतली जाते. यात संपूर्ण धुलीकण आणि नाकाद्वारे शरीरात जाणारे धुलीकण असे स्वतंत्र वर्गीकरण केले जाते.

प्रमुख कारणे

शहराची वाढती लोकसंख्या (सुमारे ५ लाख ७५ हजार)

या लोकसंख्येत शहर परिसरातून रोज शहरात येणाऱ्यांची आणि पर्यटकांची भर पडते

लोकसंख्येचा तुलनेत वाहनांची वाढलेली संख्या

सध्या घरटी किमान दोन मोटारसायकली असतात

राजकीय वादात अडकलेला शहराच्या हद्दवाढीचा विषय

वाहतुकीचे अयोग्य व्यवस्थापन

रस्ते विकास प्रकल्प आणि रस्त्यांच्या रुंदीकरणावेळी झालेली शहरातील झाडांची कत्तल

उपाय कोणते?

वाहनांचा कमीत कमी वापर करणे

जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा किंवा पायी जाण्याचा पर्याय

वाहने सुयोग्य स्थितीत ठेवणे आणि जुनी वाहने हद्दपार करणे

शहर वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन

वृक्षतोड थांबवून नवीन झाडे लावणे

हवा प्रदूषणाबाबत लोकजागृती आणि प्रबोधन

कुणाला सर्वाधिक फटका

वाहतूक पोलिस

फेरीवाले

रिक्षावाले, दुचाकीस्वार

मुख्य चौकांतील व्यावसायिक

शाळकरी मुले

प्रदूषकांचा थेट फुफ्फुसावर परिणाम होतो. यामुळे न्यूमोनिया, अस्थमा, अॅलर्जीसारखे विकार होतात. ज्यांना पूर्वीपासून श्वसानाचे विकार आहेत त्यांचा त्रास वाढतो. प्रदूषित ठिकाणी सतत वावर असल्यास हे विकार कॅन्सरपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी काम करणाऱ्या पोलिस आणि रिक्षाव्यावसायिकांनी सक्तीने मास्क वापरायला हवेत. तसेच त्यांच्या वारंवार आरोग्य तपासण्या करून श्वसन विकार आढळल्यास त्यांची बदली करायला हवी.

डॉ. संजय देसाई, एमडी मेडिसीन

दाभोळकर कॉर्नर आणि महाद्वार रोडसारखी परिस्थिती शहरातील इतर अनेक चौकांमध्ये दिसू लागली आहे. दाभोळकर परिसरातील वाहनांच्या वर्दळीवर उपाय गरजेचा आहे. शहरात वाहतुकीचे व्यवस्थापन आणि पार्किंग या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रंकाळा, पंचगंगा या प्रश्नांइतकाच हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

जय सामंत, पर्यावरणतज्ज्ञ

शहरी आणि शहरबाह्य प्रदूषण अशी विभागणी केली, तर शहरातील प्रदूषणात वाहने हा प्रदूषकीय घटक वाढविणारा सर्वांत मोठा स्रोत असतो. प्रदूषकीय घटक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मानंकापेक्षा कमी असले, तरी ते घातकच असतात. त्यामुळे त्याचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतातच.

प्रा. डॉ. प्रकाश राऊत,

प्रमुख, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ

पर्यावरणशास्त्राच्या हवा प्रदूषण मापन प्रकल्पाच्या अभ्यासानुसार दरवर्षी सल्फर आणि नायट्रोजन डॉयऑक्साइड तसेच धुलीकण या प्रदूषकांची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे आणि यापुढे आणखी भोगावे लागणार आहेत.

- डॉ. संदीप मांगेलकर, पर्यावरणशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्योतिष दिंडीचे उत्साहात उद‍्घाटन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बृहन्महाराष्ट्र ज्योतिष मंडळातर्फे २१ व्या ज्योतिष दिंडीचे उद्घाटन उपमहापौर शमा मुल्ला यांच्या हस्ते झाले. ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, तीन दिवसीय अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी सांगितले.

ज्योतिषशास्त्राबाबत समाजात माहिती व्हावी यासाठी पोस्टर, पालखीमध्ये ज्योतिष ग्रंथ व ज्योतिषशास्त्राच्या घोषणांनी दिंडी उत्साहात पार पडली. ही दिंडी दसरा चौक, बिंदू चौक, महालक्ष्मी मंदिरमार्गे येऊन तिचा दसरा चौकात समारोप करण्यात आला. यावेळी अॅड. मालती शर्मा, संयोजन समिती अध्यक्ष अमरनाथ स्वामी, राजेश सणगर, अरुण देशपांडे यांच्यासह दोनशेहून अधिक ज्योतिष दिंडीत सहभागी झाले होते.

२१ व्या अ‌खिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते होणार आहे, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रतापसिंह जाधव असणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर रामाने यांच्या हस्ते होणार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आणेवारी कागदोपत्रीच

0
0

गरजू शेतकरी लाभापासून नेहमीच वंचित; अनेक गावांचा आणेवारीवर आक्षेप आणेवारी वाढली कशी?

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर : नेहमीच कामाच्या व्यापात असलेल्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांची अपवादानेच माहिती मिळते. सरकारकडून शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कितीही योजना राबविल्या जात असल्या तरी, प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने योजनांपासून शेतकरी दूरच असतात. आणेवारीच्या बाबतीतही असेच झाले आहे.

गावचावडीत बसून किंवा एखाद्या पुढाऱ्याच्या घरातूनच कागदोपत्री कामकाज पार पाडले जाते, त्यामुळे सरकारी कार्मचाऱ्यांच्या अजब कामाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यंत्रणेने केलेल्या या आणेवारीवर जिल्ह्यातील अनेक गावांचा आक्षेप आहे.

हंगामात तीनवेळा पाहणी

सर्व निकष गुंडाळून ठेवून विशिष्ट सरकारी मानसिकतेतून काम करणाऱ्या सरकारी यंत्रणेची अनास्था शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे. रब्बी आणि खरीप या दोन्ही पिकांची आणेवारी काढण्यासाठी हंगामात तीनवेळा पीक पाहणी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.



बागायती शेतीसाठी आणेवारीचा संबंध येत नाही. मात्र, जिरायती शेतीतील उत्पन्न ठरवण्यासाठी आणेवारी महत्त्वाची ठरते. प्रत्येक गावातील किमान दहा शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन निकषांनुसार प्रत्यक्षात पिकांची पाहणी, मळणी करावी आणि पिकांचा उतारा, प्रतवारी तपासावी असे नियम सांगतात. पिकांची वाढ, उपलब्ध पाणी, परिसरातील पिकांचा उतारा या बाबी लक्षात घेऊन नुकसानीचे आकडे काढले जातात. मात्र, महसूल विभागासह कृषी विभागाच्याही अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे पीक आणेवारी काढण्याचे काम कागदोपत्रीच उरकले जाते.

धरणगुत्ती(ता. शिरोळ) येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार नोंदवली आहे. पिकांची वाढ होणाऱ्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात शिरोळ तालुक्यात अनुक्रमे ८.८ आणि ८.१३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पूर्ण पावसाळ्यात एकूण २७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन, भुईमूग आणि भात पिकाचे नुकसान झाले आहे. धरणगुत्ती गावातील १००८ हेक्टर शेतजमिनीवर ७० टक्के जिरायती शेती आहे. २००९ आणि २०१३ मध्ये गावाची आणेवारी ४० टक्के होती, तर यावेळी ५० टक्क्यांपेक्षा अधिक कशी, असा संतप्त सवाल केला आहे.

जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, कागल आणि गडहिंग्लज तालुक्यांमध्ये कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यांतील भाजी पिकाला कमी पावसाचा फटका बसला आहे. अपुऱ्या पावसामुळे जिरायती शेतीला फटका बसला असून, पुढे बागायती शेतीलाही याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तवली जात आहे.क्रमश:

धरणगुत्ती गावातील सत्तर टक्के जिरायती शेतीचे नुकसान झाले आहे. २००९ आणि २०१३ मध्ये पावसाचे प्रमाण यावर्षापेक्षा बरे होते. शिरोळमध्ये केवळ २७ टक्के पाऊस पडला आहे, तरीही शेतीची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

- शेखर पाटील, सरपंच, धरणगुत्ती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉर्निंग वॉकला जाताना हल्ला

0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

शहरातील यल्लामा चौक परिसरातील व्यापारी रमेश परिसनाथ शेटे (वय ५६) यांच्यावर गुरुवारी सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना दोघांनी हल्ला केला. शेटे यांच्या मानेवर कोणत्या तरी वस्तूचा प्रहार करून हल्लेखोर ते दुचाकीवरून पसार झाले. रमेश शेटे यांच्यावर कोल्हापूर येथील ऑस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

दरम्यान त्यांच्या पत्नी सुनिता शहा-शेटे यांनी रमेश यांच्या मानेवर सुईसारख्या टोकदार हत्याराने टोचून त्यांच्या शरीरात कोब्राचे (नाग) विष सोडले आहे. डॉक्टारांनीही त्यांच्यावर त्याच पद्धतीचे उपचार

केल्याचे सांगितले.

रमेश शेटे गुरुवारी सकाळी सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले होते. स्टॅँड रोडवरील लिपारे कॉर्नर जवळ ते आले असता त्यांच्याजवळ दुचाकीवरून येऊन दोघेजण थांबले. त्यांनी रमेश यांना स्टॅँडला जायला रस्ता कोणता आहे, अशी विचारणा केली. त्यांनी रस्ता सांगितला आणि रमेश चालू लागले इतक्यात दुचाकीवरील दोघांनी त्यांच्या मानेवर काहीतरी मारले आणि दोघेजण दुचाकीवरून वेगात स्टॅँडच्या दिशेला न जाता विरूद्ध दिशेला संभाजी चौकाच्या बाजूने निघून गेले. सकाळी थोडासा अंधार असल्याने रमेश शेटे यांनी त्या दोघांना ओळखले नाही. त्यांच्या गाडीचा नंबरही पाहिला नाही. ते निघून गेल्यावर रमेश नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले. मॉर्निंग वॉकवरून घरी आल्यावर त्यांना चक्कर येऊ लागली, अंग लूज पडले, जीभ जड झाल्याने बोलायला येत नव्हते. म्हणून त्यांना एका कागदावर त्यांच्या पत्नी सुनिता यांच्यासाठी संदेश लिहून ठेवला त्यात, 'मला सुई टोचली आहे' असे म्हटले आहे. त्यानंतर सुनिता यांनी त्यांना तातडीने डॉ. अनिरूद्ध उमराणी यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांनी प्राथमिक उपचार करून रमेश यांना तातडीने कोल्हापूर येथे आधार हॉस्पिटलमध्ये हलवले. गुरुवारपासून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे. त्यांची प्रकृती आता

स्थिर आहे.

याबाबत रमेश शेटे यांच्या पत्नी सुनिता म्हणाल्या, 'आमची कोणाशीही दुश्मनी नाही. मात्र, आमचे दोन-तीन वाद कोर्टात सुरू आहेत. काहींचे निकाल आमच्या बाजूने लागले आहेत. गुरुवारी सकाळी फिरायला जाताना रमेशवर हल्ला झाला. त्यांना तातडीने डॉ. उमराणी यांच्याकडे हलवले. डॉ. म्हणाले, 'त्यांच्या मानेवर दुखापत नाही. मात्र काहीतरी टोचले आहे त्याच्यातून विष त्यांच्या शरीरात भीनत आहे. त्यांना कोल्हापूर येथील ऑस्टर आधार हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुस्लिम धर्मियांचा कराडमध्ये निषेध मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

अखिल भारतीय हिंदू महासभा, लखनौचे कार्याध्यक्ष कमलेश तिवारी यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मदसाहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखाविणारे पत्रक प्रसिद्ध करून ते उत्तर प्रदेशमधील विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केले. या घटनेचा निषेध करण्यासाठी कराड शहर व परिसरातील हजारो मुस्लिम बांधव शुक्रवारी दुपारी रस्त्यावर उतरले. इदगाह मैदानातील मशिदीपासून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून त्यांनी प्रांताधिकारी किशोर पवार यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुखही उपस्थित होते.

इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मदसाहेब हे फक्त मुस्लिमांचेच आदरणीय पैगंबर नसून, ते संपूर्ण जगाचे महामानव आहेत. परमेश्वराने त्यांना फक्त मुस्लिम समाजापुरतेच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांच्या कल्याणाकरीता व उद्धारासाठी पाठविलेले आहे. त्यानी संपूर्ण विश्वातील मानवजाती करीता शांततेचे व सद्भावनेचा संदेश दिलेला असल्यामुळे ते सर्वांनाच आदरणीय आहेत, अशा या आदरणीय महामानवाबाबत तिवारी यांनी अपमानास्पद, खोटी, निराधार शेरेबाजी व वक्तव्य प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करीत असल्याचे प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शिक्षकांचा सांगली बँकेकडे ओढा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड
कमी व्याजदराबरोबरच इतर कपातींमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठीच प्राथमिक शिक्षकांचा जिल्हा बँकेकडे कर्जासाठी ओढा वाढत असल्याचा दावा करीत गुरुवारी झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीत शिक्षकांसह नोकरदारांना जिल्हा बँकेने चार कोटी चौथीस लाखांचे कर्ज मंजूर केले. बैठकीत संचालकांनी तावून-सुलाखून आलेल्या वेगवेगळ्या योजनांखालील विविध प्रस्तावांमधील सुमारे दहा कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोअर कमिटीची बैठक बँकेचे अध्यक्ष दिलिप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत कर्ज प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. नव्याने आलेल्या कर्ज प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. कायदेशीर बाबी व आवश्यक सर्व पूर्तता याची पूर्ण खात्री करूनच संबधित कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये शिक्षकांसह नोकरदार, शेती, मध्यम व दिर्घ मुदत, वाहन कर्ज, गाय-म्हैशींसाठीचे कर्ज, बचत गट, सरळ कर्ज पुरवठा या योजनांअतर्गंत असणाऱ्या कर्ज प्रकरणांचा समावेश होता. मोठे कारखाने, उद्योगधंदे यांचे मोठ्या रक्कमेची कर्ज प्रकरणांचा यामध्ये सहभाग नव्हता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'कर्जांची पाच पटीने वसुली'

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

शेती कर्जाला मुद्दला इतकेच व्याज घेणे कायद्याने बंधनकारक असतानाही अनेक शेतकऱ्यांची कर्जे पाच पटीने वसुली केली गेली आहेत. याची दखल घेऊन संबधित शेतकऱ्यांना त्वरीत न्याय द्यावा. दाम दुप्पटीने कर्जाची परतफेड करण्यास तयार असणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्थावर मालमत्तेचे संस्थेने केलेले लिलाव त्वरीत रद्द करावेत, अन्यथा कोल्हापुरातील सहनिबंधक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने दिला आहे.

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विविध सहकारी बँका, सोसायट्या, पतसंस्थांमधून शेतीसाठी कर्जे घेतली आहेत. शेती कर्जे दाम दुप्पटीपेक्षा अधिक पटीने वसूल करता येणार नाहीत. त्याबाबतचा कायदा असल्याची परिपत्रके राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहेत. हायकोर्ट, सुप्रीम कोर्टानेही त्या संदर्भात निकाल दिले आहेत. सहाय्यक निबंधक कार्यालयांनी १०१चा दाखला देताना कर्ज परतफेडीच्या कायद्याचा विचार न करता वसुली दाखले दिले आहेत. हे कृत्य बेकायदा असल्याने त्या विरुद्ध कोल्हापूर सहनिबंधक कार्यालयाकडे अपिल दाखल केले जाते. परंतु आपले कार्यालयही निकाल देताना दामदुप्पट दराचा विचार करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल घेऊन वेळीच कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संजय कोले यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठही ‘ग्यान’ प्रकल्पात

0
0

'हिंदी'च्या विद्यार्थ्यांना मिळणार परदेशी नोकरीची संधी

Sachin.Yadav@timesgroup.com

केंद्र सरकारच्या ग्लोबल एनिशिटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क इन हायर एज्युकेशनच्या (ग्यान) प्रकल्पातंर्गत हिंदी विभागाने सादर केलेल्या एका अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली आहे. देशातील दहा विद्यापीठांतून शिवाजी विद्यापीठाची निवड झाली आहे. त्यामुळे राष्ट्रभाषा असलेल्या हिंदी भाषेचे महत्व आता ग्लोबल होत असून हिंदीच्या राज्यातील सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

हिंदी भाषेचे पदवी, पदवीधर, एम. फिल आणि संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याना हा सात दिवसाचा अभ्यासक्रम उपयोगी ठरणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभाग आणि संगणकशास्त्र विभागाने भाषा आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून हिंदी भाषा आणि विदेशी शिक्षण या विषयाचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठविला होता. हिंदी विभागात सातहून अधिक परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विभागाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील कनेक्टिव्हिटी लक्षात घेऊन यूजीसीने या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सुरु केलेल्या ग्यान प्रकल्पात देशातील दहा विद्यापीठात शिवाजी विद्यापीठाला मान मिळाला आहे.

शिवाजी विद्यापीठात अध्यापन केला जाणारा या अभ्यासक्रमाचा कालावधी सात दिवसांचा हा अभ्यासक्रम असून त्यासाठी १४ तास घेतले जाणार आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये या अभ्यासक्रम अध्यापनाची सुरुवात होईल. हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी इटलीच्या तुरीन विद्यापीठाच्या भाषा आणि मानव्यशास्त्र विभागाच्या प्रोफेसर अॅलेस्नॅड्रा कान्सुलारो अध्यापन करणार आहेत. ऑडिओ, व्हिडीओ, चित्र, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून परदेशात हिंदी कशी शिकविली जाऊ शकते, बिझनेस हिंदीचे महत्व समजावून दिले जाणार आहे. व्यावहारिक हिंदीसह दुभाषाकार, हिंदी राजभाषा अधिकारी, हिंदी शिक्षकांचा परदेशात रोजगार उपलब्ध होणार आहे. परदेशात भाषेचे अध्यापन करण्यासाठी त्या देशातील भाषा शिकण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रमाची सोयही करुन दिली आहे.

चॉईस बेसड् क्रेडिट सिस्टिमनुसार विद्यार्थ्यांना मार्कलिस्टमध्ये क्रेडिट मिळणार आहे. सध्या विदेशी भाषा हिंदी पाठ्यक्रमाची सुविधा आग्रा येथे उपलब्ध आहे. हिंदी अधिविभागाने पाच ते सहा देशांशी सामंजस्य करार केले आहेत. त्याचा फायदा हिंदीच्या विद्यार्थ्यांना होणार आहे. इटली येथील पाच विद्यापीठात, पोलंड, रशिया, हेलसिंकी, जर्मनीसह काही देशांत हिंदी भाषेचा मोठा उपयोग केला जातो. त्या पार्श्वभूमीवर भाषेच्या विद्यार्थ्यांना परदेशात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

कर्नाटक, गोवा या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी आमंत्रित केले जाणार आहे. सुमारे ५० विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. यात २५ विद्यार्थी अन्य विद्यापीठातील असतील. जगात १५२ देशांत हिंदी भाषेचा उपयोग होत असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकेल.

- पद्मा पाटील, हिंदी विभागप्रमुख

भाषा विषयात हायटेक तंत्रज्ञानही आहे. भाषा अधिक समद्ध होण्यासाठी आणि नव्या तंत्रज्ञानाची सांगड घालून या अभ्यासक्रमाचा प्रस्ताव यूजीसीकडे दिला होता. त्याला मान्यता मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरला पोषक वातावरण मिळणार आहे.

- डॉ. आर. के. कामत, समन्वयक

देशातील दहा विद्यापीठात शिवाजी विद्यापीठाचा समावेश झाल्याने विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भाषा विषयाचे विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण आणि नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. ग्यान मधील पहिल्याच प्रकल्पात विद्यापीठात निवड झाल्याने हिंदीचे विद्यार्थी सातासमुद्रापार पोहोचतील.

- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडाप, बसरुटमुळे कोंडी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आधी रस्त्यावर आलेले दुकानदारांचे फलक, मग दुचाकीचे पार्किंग, त्याच्यापुढे येऊन थांबणाऱ्या हातगाड्या, आणि सगळ्यात शेवटी रिक्षा यातून बाहेर पडून जर सुरळीत मार्ग काढता आला तरच सीपीआर ते शिवाजी चौक मार्गावर ये-जा करता येते अशी सध्या स्थिती आहे. बस, रिक्षांसह चारचाकी गाड्यांच्या चुकीच्या ठिकाणी असलेल्या थांब्यांमुळे या मार्गावर वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. अनेकवेळा येथे ट्रॅफिक जॅम असे चित्र असते.

बसरुट, वडाप वाहनांची वर्दळ, सीपीआरमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या अॅम्ब्युलस, दुचाकी, चारचाकी गाड्या, करवीर तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, कोर्ट यांच्या दैनंदिन कामाकाजासाठी मोठी गर्दी होते.

महाराणा प्रताप चौकातून महापालिकेकडे जाणारा रस्ता आणि भाऊसिंगजी रोडवरून शिवाजी चौकात जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची नेहमीच कोंडी असते. सीपीआर हॉस्पिटलच्या आवारात बेकायदेशीर पार्किंग नेहमीच दिसते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला टू व्हिलर मधूनच रुग्णवाहिकांना ये-जा करावी लागते. खाद्यपदार्थांच्या, चहाच्या टपऱ्या, रिक्षास्टॉप, हातगाड्या, चारचाकी गाड्यांचे पार्कींग यामुळे हा रस्ता नेहमीच वाहतुकीमुळे ब्लॉक झालेला दिसून येतो. सातत्याने वाहने आणि पादचाऱ्यांची ये-जा सुरू असल्यामुळे ट्रॅफिक जॅमचा अनुभव नेहमीच येतो. बेशिस्त वाहनचालक, वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा अभाव आणि अडथळे निर्माण करणाऱ्या बाबींमुळे वाहतुकीच्या कोंडीत वाढच होत आहे.

सकाळी नऊ ते दुपारी एक आणि सायंकाळी पाच ते आठ अशा आठ तासांच्या कालावधीत या रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असते. रस्त्यावर अनेक हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, झेरॉक्स सेंटर अशी विविध दुकाने असल्याने तेथील वर्दळीचाही वाहतुकीला अडथळा होतो. सीपीआर ‌परिसरातील दोन बसस्टॉपमुळे रस्त्यावर केएमटी थांबते. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या वाहनांना थांबावे लागते.

सीपीआर ते शिवाजी चौक मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. पार्किंग, हातगाड्यांमुळे हा रस्ता अरूंद झाला आहे. रुग्णांना वेळेत नेण्यासाठी वाह‌तुकीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावर वाहतुकीचे त्वरीत नियोजन करणे आवश्यक आहे.

- संजय भालेकर, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तालुक्याचे नेते लावणार निकाल

0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर : काहीपण मागा, कितीही मागा... सेवेला हजर आहे... अशी स्थिती विधानपरिषदेच्या निवडणुकीची झाली आहे. जेवढे महत्व मतदारांना, तेवढेच महत्व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या तालुकास्तरीय नेत्यांना आले आहे. एकेका मतासाठी या नेत्यांभोवती पिंगा घालण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे. तालुक्याचे नेतेच या निवडणुकीचा निकाल ठरवणार आहेत, त्यामुळेच मतदाराबरोबरच काही ठिकाणी त्यांचाही 'दर' निघत असल्याचे समजते.

राजकारणात जिल्ह्याच्या नेत्याने आदेश द्यायचा आणि त्यानुसार तालुक्यातील नेत्यांनी त्याची अंमलबजावणी करायची अशी पद्धत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात टिकण्यासाठी हा आदेश मानला जात असला तरी आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही.

विधानपरिषद निवडणुकीत तर या नेत्यांना अतिशय महत्व आले आहे. हे नेते गोकुळ, जिल्हा बँक, साखर कारखाना, बाजार समितीच्या माध्यमातून विविध नेत्यांच्या जवळ आहेत. त्यांच्यावर गटाचा शिक्काही आहे. मात्र हा शिक्का बाजूला ठेवत तालुक्यातील नेत्यांकडील मते आपल्याला मिळावीत यासाठी आमदार महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. मतदाराला भेटण्यासाठी ते या नेत्यांना सोबत घेऊनच जात आहेत.

तालुक्यातील आमदार, माजी आमदार, साखर कारखान्याचे अध्यक्ष अशा प्रत्येक नेत्याकडे पाच-दहा मते आहेत. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे सदस्य या नेत्यांकडे आहेत. कागल तालुक्यात संजय घाटगे, प्रा. संजय मंडलिक यांच्याकडे दहापेक्षा अधिक मते आहेत. समरजित घाटगे, रणजीत पाटील यांच्याकडेही तेवढीच मते आहेत. त्यामुळे चारही नेत्यांच्या भूमिकेला महत्व आहे. रणजीत पाटील हे महाडिक यांच्याकडे आणि इतर तिघे सतेज पाटील यांच्यासोबत राहतील. भुदरगड तालुक्यातील बजरंग देसाई महाडिक यांचा प्रचार करतील. चंदगडमध्ये भरमू सुबराव पाटील व नरसिंग गुरुनाथ पाटील हे गोकुळमुळे महाडिक यांना मदत करण्याची शक्यता आहे. पेठवडगावमध्ये विद्याताई पोळ या सजेत पाटील यांच्या प्रचारात उतरल्या आहेत.

आजऱ्यातील उमेश आपटे, राधानगरीत के. पी. पाटील, ए. वाय. पाटील तर शाहूवाडीत सत्यजित पाटील हे पाटील यांच्याबरोबर असणार आहेत. गडहिंग्लजचे श्रीपतराव शिंदे, आमदार चंद्रदीप नरके, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या भूमिकेकडे जिल्हयाचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील हे नेते निर्णायक भूमिका घेतील. त्यामुळे पक्षाच्या पलिकडे जाऊन त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी दोन्ही नेते धडपडत आहेत. यातील काही नेत्यांनी आपला दरही काढला आहे. त्याची परिपूर्ती करण्याची मोहीम उमेदवारांनी सुरू केली आहे.

पी. एन., आवाडे, मुश्रीफ, कोरेंवरही नजरा

तालुका पातळीवरील नेत्यांकडे पाच ते दहा मते आहेत. हा आकडा कमी वाटत असला तरी अटीतटीच्या निवडणुकीत एकेक मत महत्वाचे ठरेल. याशिवाय जिल्हा स्तरावर निर्णयाक ठरणाऱ्यांत पी. एन. पाटील, आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे, विनय कोरे या नेत्यांच्या भूमिकेवर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. मात्र त्यांच्याइतकेच महत्व तालुक्यातील नेत्यांना आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जवाहर’वर २५ मिनिटे खलबते

0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर चर्चा आणि वेगवान घडामोडींना ऊत आला आहे. इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात मतदान असल्याने आणि प्रकाश आवाडे यांनी उमेदवार अर्ज दाखल केल्याने घडामोडींचे केंद्र जवाहर साखर कारखाना ठरले आहे. सकाळी आमदार महा‌देवराव महाडिक यांनी आवाडे यांची भेट घेतल्यानंतर दुपारी जवाहर साखर कारखान्यावर सतेज पाटील यांनी आवाडे यांची भेट घेत माघारीसाठी मन वळविले. २५ मिनिटे या दोघांची चर्चा झाल्यानंतर आवाडे यांनी तत्काळ कोल्हापूर गाठत माघार घेतली.

विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने सतेज पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे इच्छुक असलेल्या विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांच्यासह माजी मंत्री प्रकाशराव आवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महाडिक यांनी सतेज पाटील यांना अडचणीत आणण्यासाठी आवाडेंना बळ देत असल्याची चर्चा होती. मात्र, आवाडे यांनी सतेज पाटील यांच्याशी चर्चा करून अर्ज माघार घेतला. शुक्रवारी प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी काँग्रेस कमिटीमध्ये नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक बोलाविली होती. या बैठकीवेळी उमेदवार सतेज पाटील जवाहर साखर कारखान्यावर दाखल झाल्याची माहिती मिळताच प्रकाश आवाडे बैठक अर्ध्यावर सोडून तत्काळ हुपरीमध्ये आले. सतेज पाटील व प्रकाश आवाडे यांच्यामध्ये २५ मिनीटे चर्चा झाली. यानंतर उपस्थितांसमोर उमेदवार पाटील यांचा सत्कार करून या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरून आपणाला निवडून आणू, अशी ग्वाही आवाडे यांनी सतेज पाटील यांना दिली. यावेळी सतेज पाटील यांनी प्रकाश आवाडे यांच्यामुळे माझा विजय सुकर झाला असल्याचे सांगितले. कारखाना स्थळावर इचलकरंजी शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश मोरे, अशोक आरगे, अशोक सौंदत्तीकर, राहुल आवाडे, प्रकाश सातपुते, विलास गाताडे आदींसह अनेक जण उपस्थित होते.

आवाडे जिल्हाध्यक्ष?

विधान परिषदेसाठी उमेदवार सतेज पाटील यांच्या विरोधात प्रकाश आवाडे हे बंडखोरी करणार अशी अटकळ बांधली असताना काल सतेज पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेवून प्रकाश आवाडे यांना कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्याबाबत चर्चा केल्याचे समजते. या भेटीत आवाडे यांना जिल्हाध्यक्ष पदाचे आश्वासन मिळाल्याने आवाडेंनी माघार घेतली.

इचलकरंजी काँग्रेस पाटील यांच्यासोबत

इचलकरंजी : विधानपरिषद निवडणूकीतून उमेदवारी माघार घेऊन काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय शुक्रवारी काँग्रेस भवन येथे झालेल्या प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला.

विधानपरिषद निवडणूकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी संदर्भात चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी येथे पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे होते. प्रथमत: उपस्थित सदस्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यानंतर बोलताना माजी मंत्री आवाडे यांनी, इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी व आवाडे परिवार नेहमीच काँग्रेस पक्षासोबत राहिला असून पक्षाने दिलेल्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन करण्याची परंपरा राखली आहे. आवाडे यांची उमेदवारी माघार घेऊन पक्षाचे अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. या बैठकीस प्रदेश काँग्रेस सचिव प्रकाश सातपुते, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास गाताडे, पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, सतिश डाळ्या, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, अशोकराव सौंदत्तीकर, अशोकराव आरगे, धोंडीलाल शिरगांवे, अहमद मुजावर, राहुल आवाडे यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकास-एक लढतीसाठी प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी कारखान्यांवरील चेअरमन चंद्रदीप नरके यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी एकास-एक उमेदवार देण्याची व्युवरचना आकाराला येत आहे. काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, जनसुराज्य पक्ष, कुंभी-कासारी बचाव मंच आदींनी एकत्र येवून पॅनेल उभारणीस सुरुवात केली आहे. पॅनेलची उभारणी करताना एकही दिग्गज नेत्यांचा सहभाग नसला, तरी दुसऱ्या फळीतील सर्व कार्यकर्ते एकत्रीत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी सभासदांमधून दबाव येत असून विरोधी पॅनेलचे उमेदवार ठरवण्याची जबाबदारी त्या-त्या विभागातील सभासदांना देण्यात आली आहे. विरोधी गटाच्या या हालचालीमुळे कुंभी-कासारीमध्ये एकास-एक लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. विरोध आक्रमक झाले असताना, चेअरमन नरके मात्र अधिवेशानामध्ये व्यस्त असले, तरी त्यांचेही दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते संपूर्ण धुरा सांभाळत आहेत.

जानेवारी २०१५ पासून मुदत वाढ मिळालेल्या कुंभी-कासारी कारखान्याची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी आणि गगनबावडा तालुक्यात सभासद असलेल्या कारखान्याच्या निवडणुकीला वेगळे वळण मिळत आहे. 'एक व्यक्ती एक पद' असा नारा देत नरके कुटुंबीयातील संदीप नरके यांनी बंडा झेंडा उभा करत थेट विरोधकांच्या आघाडीत सामील झाले आहेत. कारखानाच्या अस्तित्वाचा प्रश्न पुढे करत बाजीराव खाडे यांनी 'कुंभी-कासारी' बचाव कृती समितीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून प्रयत्न सुरू केले होते. खाडे यांच्यासोबत गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा विमल पाटील यांचे पती पुंडलीक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती शामराव सूर्यवंशी वैकुंठ भोगावकर, आदी मंडळी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

सर्वच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना याबाबतचा हिरवा कंदील मिळाल्याने विरोधी पॅनेल करण्याच्या हालचाली अधिक गतीमान झाल्या आहेत. विरोधी पॅनेलमध्ये उमेदवार निवडीचे अधिकार त्या-त्या भागातील सभासदांच्यावर सोपवण्यात आली आहे. सर्व नेत्यांमध्ये एक-दोन दिवसांत बैठक होण्याची शक्यता आहे.

विरोधकांनी हालचाली गतिमान केल्याने चेअमरन नरके यांनी सावध पवित्रा घेतला आहे. विरोधकांच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवत पॅनेल रचनेबाबत अधिक दक्षता घेत आहेत. यासाठी त्यांची दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते प्रत्येक घडामोडीचा कानोसा घेत आहेत. मंगळवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने सोमवारी अथवा मंगळवारी सकाळी दोन्ही पॅनेलची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाच जणांची माघार

कुंभी-कासारी निवडणुकीच्या अर्ज माघार घेण्याच्या प्रक्रियेला तीन डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. सत्तारुढ आणि विरोध पॅनेल रचनेमध्ये व्यस्त आहेत. पॅनेलमध्ये स्थान मिळेल या आशेवर अनेकजणांनी निवडणूक रिंगणातून अद्याप माघार घेतलेली नाही. पहिल्या दोन दिवसांत महिला गटातून दोन महिलांनी माघर घेतल्यानंतर अनुसूचित गटातून एका उमेदवारांनी माघार घेतली. शुक्रवारी शेतकरी सहकारी संघाचे विद्यमान संचालक एम. एम. पाटील यांच्यासह कुंभी बँकेचे विद्यमान संचालक शिवा रामू पोवार यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतली. २७१ पैकी पाच जणांनी माघार घेतल्याने अद्याप २६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाटील यांच्या जयसिंगपुरात बैठका

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी शुक्रवारी जयसिंगपूर व शिरोळ येथे स्थानिक नेते व नगरसेवकांची भेट घेतली. याचदरम्यान आमदार अमल महाडिक यांनीही जयसिंगपुरात नगरसेवकांशी चर्चा केली.

सतेज पाटील यांनी तालुका बहुजन विकास आघाडीचे नेते माधवराव घाटगे, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, जयसिंगपूर नगरपालिकेचे पक्षप्रतोद संजय पाटील यड्रावकर तसेच विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले नगरसेवक चंद्रकांत खामकर यांच्यासह सूचक नगरसेवकांची भेट घेतली.

माधवराव घाटगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस शिरोळ बहुजन विकास आघाडीचे प्रमुख दलितमित्र अशोकराव माने, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनील यादव, कुरूंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, चंद्रकांत खामकर यासह जयसिंगपूर व कुरूंदवाडचे १६ नगरसेवक उपस्थित होते.

यानंतर यड्रावकर चेंबर्समध्ये सतेज पाटील यांनी पक्षप्रतोद संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेतली. यावेळी नगराध्यक्ष सुनील पाटील मजलेकर, नगरसेवक संभाजी मोरे, अर्जुन देशमुख, रामदास धनवडे, राहूल बल्लाळ आदी उपस्थित होते. प्रारंभी दत्त कारखान्यावर गणपतराव पाटील यांची भेट घेवून सतेज पाटील यांनी सुमारे वीस मिनीटे बंद खोलीत चर्चा झाली. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारीणी सदस्य प्रकाश सातपुते, अनील यादव, महेंद्र बागी, नितीन बागी उपस्थित होते. दरम्यान अमल महाडिक यांनी दुपारी साडेतीनच्या सुमारास नगरसेवक अशोक कोळेकर यांमया निवासस्थानी नगरसेवक चंद्रकांत खामकर यांच्यासह आठ ते नऊ नगरसेवकांची भेट घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतेज यांनी माघार घ्यावी

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची बंडखोरीची तयारी असल्यास माघार घेऊन मी त्यांना पाठिंबा देण्यास तयार आहे, असा प्रस्ताव आमदार महादेवराव ‌महाडिक यांनी देत सतेज पाटील यांनीही माघार घेऊन आवाडे यांना बिनविरोध निवडून द्यावे, अशी गुगली शुक्रवारी टाकली. मात्र, काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी जवाहर साखर कारखान्यावर अध्यक्ष प्रकाश आवाडे यांची भेट घेतल्यानंतर आवाडे यांनी कोल्हापुरात येऊन माघार घेत आपली प‌क्षनिष्ठा पुन्हा एकदा सिद्ध केली.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोल्हापूर स्थानिक प्राधिकार मतदारसंघासाठी जोरदार चुरस निर्माण झाली असून सतेज पाटील, महादेवराव महाडिक, प्रकाश आवाडे, अशोकराव जांभळे, प्रकाश मोरबाळे, ध्रुवती दळवाई हे रिंगणात आहे. महाडिक यांनी कालपासून इचलकरंजीत व्युहरचना आखण्यास सुरुवात केली असून त्यांनी दळवाई यांची काल भेटली. शुक्रवारी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी येथे येऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांची भेट घेत बंडखोरी केल्यास पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केला. आवाडे यांनी निवडणूक लढवावी, त्याच्या विजयासाठी प्रयत्नशील राहू. मला तिकिट मिळणार नाही हे निश्चितच होते. पण बंडखोरी करावी तर महाडिकांनीच असे सांगून ते म्हणाले, 'मी, पी. एन. पाटील अथवा प्रकाश आवाडे या तिघांपैकी एकाला तिकिट देण्याची मागणी केली होती.

त्यातही वरिष्ठाच्या निकषावर आवाडेंना तिकिट मिळेल, अशी अपेक्षा होती. पण आता स्थिती वेगळी आहे. म्हणूनच आवाडे यांनी बंडखोरी केल्यास आपण माघार घेऊ आणि आवाडेंच्या पाठीशी राहू असे सांगितले. त्याचबरोबर सतेज पाटील यांचा थेट नामोल्लेख टाळत, आता तिकडे मदत केल्यास पुढे पश्चाताप होईल, असेही ते म्हणाले.

त्यावर नगरसेवक शशांक बावचकर यांनी, १९८० पासून आवाडे घराणे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहे. अनेक प्रसंग ओढवले पण पक्षाशी गद्दारी केली नाही. पण आजची स्थिती वेगळी असून आता बंडखोरी केल्यास आवाडे पूर्णत: मागे राहतील, असे सांगितले. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस प्रकाशराव सातपुते, शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, विलास गाताडे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, सतिश डाळ्या, अशोकराव आरगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images