Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अंबाबाई शालूचा लिलाव पुन्हा होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाईला तिरूपती देवस्थानकडून दसऱ्यासाठी येणारा मानाचा शालू लिलाव न होता देवस्थानच्या तिजोरीतच ठेवण्याची वेळ मंगळवारी आली. देवस्थानने या ​लिलावासाठी मूळ बोली ५ लाख ४२ हजार रुपयांनी सुरू केल्यामुळे शालू खरेदी करण्यासाठी आलेल्या भक्तांनी पुढची बोलीच लावली नाही. नियमानुसार इच्छुक भक्तांना अर्ध्या तासाचा वेळ दिल्यानंतरही बोली लावण्यासाठी कुणीही पुढे न आल्यामुळे लिलाव प्रक्रिया स्थ​गित करण्यात आली.

मंगळवारी दुपारी तीन वाजता शालूच्या लिलावासाठी वेळ निश्चित करण्यात आली होती. त्यासाठी देवस्थान व्यवस्थापनने मंदिराच्या आवारातील गरूड मंडप येथे व्यवस्था केली होती. सुरूवातीला शालूचे पूजन करण्यात आले. लिलाव बोलण्यासाठी नऊ भक्तांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार नऊजणांच्या उपस्थितीत पहिली बोली ५ लाख ४७ हजार रूपये जाहीर करण्यात आली. मात्र नऊजणांपैकी एकाही व्यक्तीने या रकमेच्यापुढे बोली लावली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उंडाळे खूनप्रकरणी तीन जणांना अटक

$
0
0

कराड : कराड तालुक्यातील उंडाळे गावातील विजयसिंह उर्फ अधिकराव पाटील या युवकाचा खून वडाप वाहतूक स्पर्धेच्या वादातून झाल्याचे सातारा गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून, एकजण फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गुन्ह्यात वापरलेली जीप व इतर हत्यारेही आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहेत.

तानाजी यशवंत पाटील (रा. वारूंजी, ता. कराड), महिपती आबा भोसले (रा. मलकापूर, मूळ रा. येळगाव), शिवाजी संभाजी कोल्हाळे (रा. मलकापूर) व सचिन चंद्रकांत पवार (मूळ रा. मलकापूर, सध्या रा. मुंबई)अशी आरोपींची नावे आहेत. यातील तानाजीच्या मामाचा मुलगा सचिन पवार फरार आहेत. उंडाळेतील विजयसिंह सुखदेव पाटील (वय २८) या युवकाचा अपहरण करून खून करण्यात आला होता. कवठे महांकाळ तालुक्यातील नागज घाटात विजयसिंहची गाडी आढळून आली होती. गाडीत रक्ताचे डाग होते. तसेच तेथून काही अंतरावर रक्ताने माखलेल्या स्थितीत मोबाइल व लोखंडी कमानपाटा आढळून आला होता. पनवेल येथील खाडीत मृतदेह सापडला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हमद्या नदाफला पोलिस कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगलीत खून करून कर्नाटकात पसार झालेला अट्टल गुन्हेगार महमद जमाल उर्फ म्हमद्या नदाफ याला बुधवारी सांगली कोर्टांने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आपल्या खुनाची सुपारी दिल्याच्या कारणावरुनच महमद्याने मनोज माने याचा खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. बेडकीहाळ (चिकोडी) येथे पोलिसांना पाहताच त्याने मोटारसायकलवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी त्याच्या मोटारसायकलला धडक मारून त्याला पाडून अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.

खंडणीच्या गुन्ह्यात फरार असतानाच महमद्या नदाफने ९ नोव्हेंबर रोजी मनोज माने याचा खून करून पलायन केले होते. कुडची, इचलकरंजी, रत्नागिरी या भागात आसरा घेत घेत त्याने इचलकरंजी येथील एकाच्या मध्यस्थीने बेडकीहाळ येथे दोन दिवसांपूर्वी एक खोली भाड्याने घेतली होती. सांगली पोलिस दलाकडील पाच पथके त्याचा शोध घेत होती. मोबाइल लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांना तो बेडकीहाळमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पथक पोहचले त्यावेळी महमद्या एका पानपट्टीवर मावा घेत होता. पथकाच्या गाडीला नंबर प्लेट नसल्याने त्याला पोलिसांचा संशय आला नाही. शिवाय पोलिसांची गाडी सरळ पुढे निघून गेली. ती गाडी पुन्हा परत येताच मात्र त्याने मोटारसायकलवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

महमद्याला आता पूर्वीच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेली आहे. त्या गुन्ह्याच्या तपासानंतर खुनात त्याला अटक केली जाणार आहे. फरारी काळात त्याला आश्रय, पैसा देणारांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे फुलारी यांनी स्पष्ट केले आहे. या शिवाय आतापर्यंत्त पाच गुन्ह्यांत त्याला कोर्टाने जामीन दिलेला आहे. जामीन देताना घातलेल्या नियमांचा भंग त्याच्याकडून झाला असल्याने त्याचे जामीन रद्द करण्याची विनंतीही पोलिसांनी कोर्टाला केली आहे. त्याला पकडणाऱ्या पथकाला अधीक्षकांनी पंचवीस हजारांचे बक्षीस दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची प्रतिष्ठा लागली पणाला

$
0
0

काँग्रेसची प्रतिष्ठा लागली पणाला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रचंड गटबाजी असलेल्या काँग्रेस पक्षाची विधानपरिषदेसाठी उमेदवारी सतेज पाटील यांना मिळाली आहे. विद्यमान आमदार महादेवराव महाडिक व पक्षाचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सतेज पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या पण पक्षाबरोबर प्रामाणिक राहण्याचा इतिहास असणाऱ्या पी. एन. पाटील यांच्याबरोबरच प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेला महत्व राहिल.

विधानपरिषेदच्या उमेदवारीसाठी प्रथमच मोठी चुरस निर्माण झाली आहे. चारही इच्छुकांनी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र सतेज पाटील यांनी बाजी मारली. आमच्या तिघांत कोणालाही उमेदवारी द्या, असे म्हणत महाडिक, आवाडे व पी. एन. यांनी पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला. एकीकडे आमच्यात कोणालाही उमेदवारी द्या, म्हणत दुसरीकडे स्वतःच्या उमेदवारीसाठी प्रत्येकाने जोरदार प्रयत्न केले. या निमित्ताने पक्षात गटबाजी असल्याचे दिसले. या चौघांबरोबर जयवंतराव आवळे यांचा एक गट असल्याचे पुढे आले. पाच प्रमुख गटांत ​विभागलेल्या या पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अपेक्षेप्रमाणे बंडखोरी झाली आहे.

महाडिक व आवाडे यांनी बंडखोरी केली असली तरी आवाडेंची बंडखोरी टिकणार नाही. पक्षाच्या विरोधात जाण्याचा त्यांचा स्वभावही नाही. फक्त त्यांची मदत विभागली जाईल अशी शक्यता आहे. ते पक्षाच्या विरोधात काम करणार नाहीत. मात्र त्यांचे समर्थक त्यांच्यासोबत शंभर टक्के राहतील असे चित्र नाही. आवाडे पक्षासोबत राहण्याचीच शक्यता जास्त असल्याने त्याचा फायदा सतेज पाटील यांना होईल. आवाडे आणि महाडिक यांचे संबंध चांगले आहेत. त्याचाही फायदा महाडिक यांना काही प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

पी. एन. पाटील हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार होते. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. सतेज पाटील व त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. मात्र त्याचा त्यांना फटका बसण्याची चिन्हे नाहीत. पी. एन. पाटील हे पक्षाच्या विरोधात जाण्याची अजिबात शक्यता नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांचीच राहणार आहे. त्यामुळे ते पाटील यांना मदत करतील यात शंका नाही. त्यांचे महाडिक यांच्याशी फारच चांगले संबंध आहेत. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न महाडिक नक्की करतील. त्यामुळे आवाडे आणि पी. एन. यांच्या भूमिकेला अतिशय महत्व आहे.

गटबाजीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत बंडखोरी झाली आहे. ती टाळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले. महापालिका निवडणुकीत दणदणीत यश मिळवल्यानंतर आता विधानपरिषदेत काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे. गटबाजीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांना यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी आणि जनसुराज्य सोबत असल्याने त्यांचा विजय सुकर होईल असे असले तरी महाडिकांच्या चालीमुळे हा प्रवास मात्र खडतर असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवार’ला थंडा प्रतिसाद

$
0
0

५६ कोटीतील अवघे १७ कोटी खर्च

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूरः राज्य सरकारने पाणी टंचाईवरील उपाययोजनांसाठी राज्यभरात सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला जिल्ह्यात अगदीच थंडा प्रतिसाद मिळाला आहे. वर्षभरात केवळ १७ कोटींचा निधी खर्च करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे, तर मंजूर निधीतील अजून ३९ कोटी रुपये शिल्लक असल्याने मार्च अखेरपर्यंत निधी खर्च करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.

राज्य सरकारने डिसेंबर २०१४ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाला सुरुवात केली. कृषी, वन, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण, सिंचन विभागांसह इतर विभागांकडून कामांची मागणी करून जिल्ह्यातील आवश्यक त्या ठिकाणी जलस्रोतांचे सक्षमीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६९ गावांमधील २०४० कामांचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ५६ कोटी ५३ लाख रुपयांच्या कामांना सुरुवात करून जवळपास एक वर्ष उलटले आहे. शाहूवाडी आणि पन्हाळा या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक अनुक्रमे १२ आणि ११ कामांचे नियोजन केले आहे. २०४० कामांमधील सुमारे ४०० कामे पूर्ण झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. सुरुवातीची कामे अगदीच लहान स्वरुपाची होती, त्यामुळे पूर्ण कामांची संख्या अधिक दिसत असली तरी, यावर खर्च झालेली रक्कम अवघी १७ कोटी रुपयांची आहे.

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत जिल्हा प्रशानाकडून कामांची मागणी झाल्यानंतर अगदीच कमी प्रतिसाद मिळाला आहे, त्यामुळे कामांची यादी वाढवून अधिकाधिक काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नव्याने कामांची मागणी करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात काम होऊन जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत वाढावेत आणि भूजलपातळी वाढावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पुढाकार घेतला आहे. यावर्षीच्या कमी पावसामुळे जिल्ह्यातील तलावांमधील गाळ काढण्याची मोहीम जलयुक्त शिवार अभियानांतर्गत हाती घेतली जाणार आहे. गावांकडून कामांची मागणी वाढावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभाग, पाटबंधारे विभाग, सामाजिक वनीकरण आणि जिल्हा परिषदेला नव्याने कामांचे प्रस्ताव देण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. ५६ कोटींची रक्कम मार्च २०१६ पर्यंत खर्ची घालण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनामोर आहे.

गाळ काढण्यासाठी दोन जेसीबींची खरेदी

जिल्ह्यातील रिकाम्या तलावांमधील गाळ काढण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून ८० लाखांच्या दोन जेसीबींची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इंधनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गाळ घेणाऱ्यांसाठी रॉयल्टीही माफ करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी घेतला आहे.

मंजूर सर्व निधी उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यात कामांची मागणी कमी असल्याने खर्चावर मर्यादा आली आहे. सध्याची जिल्ह्यातील तलावांची स्थिती पाहता गाळ काढण्याची मोहीम सुरू करणार असून, संबंधित गावांनी यामध्ये पुढाकार घ्यावा.'

-डॉ. अमित सैनी, जिल्हाधिकारी

अभियानातील समाविष्ट गावांची संख्या - ६९

कामांची संख्या - २०४०

मंजूर रक्कम - ५६ कोटी ५३ लाख रुपये.

खर्च रक्कम - १७ कोटी रुपये.

शिल्लक रक्कम - ३९ कोटी रुपये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेसाठी स्वतंत्र कोर्टाची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेशी संबंधित दाव्यांची मोठी संख्या, वर्षानुवर्षे प्रलंबित खटले यामुळे विविध प्रकल्प आणि कामकाजावर होणारा परिणाम या साऱ्या बाबींचा विचार करत महापालिकेकरिता स्वतंत्र कोर्ट स्थापन करण्याची भूमिका प्रशासनाने मांडली आहे. स्वतंत्र कोर्टाची स्थापना झाली तर जलदगतीने निवाडा होण्याची महापालिकेला अपेक्षा आहे. आयुक्त पी.शिवशंकर यांनी या संदर्भात राज्य सरकारकडे स्वतंत्र कोर्टाची मागणी केली आहे. सोबत महापालिकेशी निगडीत दाव्यांचा अहवाल जोडला आहे.

आरक्षित जागा संपादन, खासगी जागेवर आरक्षण, बेकायदेशीर बांधकाम यासह महापालिकेशी कामकाजाशी निगडीत नागरिकांच्या मोठ्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या विरोधात काहीजणांनी कोर्टाची पायरी चढली आहे. तर काही प्रकरणात महापालिकेने कोर्टात दाद मागितली आहे. जिल्हा पातळीवरील कोर्टात महापालिकशी निगडीत दाव्यांची संख्या ६०० च्या आसपास आहे. प्रलंबित दाव्यांची संख्या मोठी आहे. मगार आणि प्रशासनातील संघर्षही कोर्टात पोहचला आहे.

अनेक दावे वर्षानुवर्षे प्रलं​बित आहेत. दिवाणी, फौजदारी, कामगार, औद्योगिक कोर्टात या केसेस आहेत. सुनावणीप्रसंगी महापालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही हजर राहावे लागते. कोर्ट कामासाठी महापालिकेच्या फेऱ्या वाढल्या आहेत. हायकोर्टात साठहून अधिक दावे सुरू आहेत.जिल्हा पातळीवरील कोर्टात महापालिकेतर्फे युक्तीवाद करण्यासाठी आठ वकिलांची मानधनावर नियुक्ती केली आहे. तर हायकोर्टात पाच वकील महापालिकेच्या पॅनेलवर आहेत. महापालिकेचे कोर्ट कामकाजावर

'महापालिकेकडील दाव्यांच्या निवाड्यासाठी स्वतंत्र कोर्ट स्थापले झाले तर जलदगतीने निर्णय होणार आहे. महापालिकेच्या कोर्ट फेऱ्या कमी होतील. प्रलंबित दावे सुटू शकतील या भूमिकेतून महापालिकेत स्वतंत्र कोर्ट स्थापन करावे, असा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. सप्टेंबर महिन्यात या संबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे.

जागेचा प्रस्ताव

महापालिकेच्या मुख्य इमारतीत रेकॉर्ड ऑफीस आह. मुख्य इमारतीतील रेकॉर्ड ऑफीस शाहू क्लॉथ मार्केट येथे हलविण्यात येणार आहे. पूर्वीच्या केएमटी ऑफीसमध्ये रेकॉर्ड ऑफीस होणार आहे. रेकॉर्ड ऑफीस हलविण्याचे काम सुरू आहे. मुख्य इमारतीतील रेकॉर्ड ऑफीसची जागा मोकळी झाल्यानंतर त्या ठिकाणी स्वतंत्र कोर्टासाठी जागा उपलब्ध होईल. यासंबंधीही सरकारला माहिती दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाळा बंद’ला संमिश्र प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी शाळा बंद आंदोलन झाले. या आंदोलनाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना कोणतीही लेखी नोटीस न देता शाळांनी बंद केल्याने अनेक विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. इंग्रजी माध्यमांच्या शाळा मात्र सुरु राहिल्या. कोल्हापूर जिल्ह्यात २२४ प्राथमिक शाळा आणि ९१५ माध्यमिक शाळा बंदमध्ये सहभागी झाल्या.

गुरुवारी (ता.१०) देखील शाळा बंद आंदोलन सुरु राहणार आहे. काही शाळांत पालकांच्या माहितीसाठी सकाळी तासभर काही शिक्षक तैनात करण्यात आले. तर काही शाळांत दोन दिवस शाळा बंद मध्ये सहभागी झाल्याच्या फलक लावण्यात आले. जिल्ह्यातील ८५० शाळा या बंदमध्ये सहभागी झाल्याचा दावा जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने केला आहे. मराठी माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, इंग्रजी माध्यमांच्या शाळा बंद राहिल्या. शाळा दोन दिवस बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टीच मिळाली आहे. माध्यमिक शाळांच्या सतरा मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अर्पणा मोरे यांना निवेदन देण्यात आले.

सरकारने माध्यमिक शाळांच्या मागण्यांची दखल घ्यावी. अन्यथा १६ डिसेंबरला नागपूर विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यातही मागण्यांच्या पूर्तता झाली नसल्यास यापुढे बेमुदत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संच मान्यता, पूर्णवेळ शिक्षक यासह अन्य मागण्यासाठी शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाचा हा पाचवा टप्पा आहे. राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या आदेशानुसार जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संघटनाची संयुक्त संघटना असलेल्या जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्यावतीने आंदोलन सुरु आहे.

अशैक्षणिक निर्णय संस्था, शाळा आणि व्यवस्थापनाला मारक असल्याने जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाने टप्याटप्याने लढा उभारला आहे. निवेदनात १७ मागण्या केल्या आहेत. २८ ऑगस्टचा संच मान्यतेचा निर्णय रद्द करा, शिक्षकेतर कर्मचारी अहवाल मान्य करा, खासगी शिक्षण संस्थाची स्वायत्तता कायम करा, कला, क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, वेतनेतर अनुदान द्या, प्राथमिक शाळांत लिपिक आणि सेवकांची पदे भरा, शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबवा, शाळाबाह्य कामे नकोत आदी मागण्या केल्या आहेत.

शिष्टमंडळात जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सभाध्यक्ष एस. डी. लाड, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. बी. पोवार, जिल्हा संस्था चालक संघाचे अध्यक्ष वसंतराव देशमुख, संघाचे सचिव आर. वाय. पाटील, खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, बी. व्ही. देशमुख, व्ही. जी. पोवार, डी. एस. घोगरे, ए. डी. देसाई, सी. एम. गायकवाड, आर. डी. पाटील आदींचा समावेश होता.

दोन दिवस शाळा बंद राहिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठीचे मार्गदर्शन राज्य शिक्षण विभागाकडे मागितले आहे. त्यांच्याकडून आलेल्या सूचनांनुसार शाळांवर कारवाई केली जाईल.

- मकरंद गोंधळी, शिक्षण उपसंचालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानपरिषदेच्या अर्ज भरण्याची उत्सुकता अन् तणाव

$
0
0


विधानपरिषदेच्या अर्ज भरण्याची उत्सुकता अन् तणाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी तीन तास उत्सुकता आणि तणावाचे नाट्य अनुभवायला मिळाले. इच्छुक उमेदवारांपासून, समर्थक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठीही ते तीन तास उत्सुकतेसह तणावाचे ठरल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केवळ आणि केवळ उमेदवारी अर्ज भरण्याचीच चर्चा रंगली.

कॉँग्रेसने अखेरपर्यंत उमेदवारी जाहीर करण्यास लावलेला विलंब आणि वरिष्ठ पातळीवरून कमालीची गोपनियता पाळल्याने उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. कॉँग्रेसमधील मातब्बर चार नेत्यांनी उमेदवारीसाठी गेली पंधरा दिवस अक्षरशः जंग-जंग पछाडले होते. प्रचंड चुरस निर्माण झाल्यानेच कॉँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांसमोरही मोठा पेच निर्माण झाला होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना पक्षाने हिरवा कंदिल दिल्याने त्यांनी मतदार आणि समर्थकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज भरण्याचे नियोजन केले होते.

सकाळी अकरा वाजल्यापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात समर्थक आणि कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. बारा वाजेपर्यंत गर्दी इतकी वाढली की, बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना कार्यालयाचे मुख्य गेट बंद करावे लागले. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना दहा सूचकांची गरज असल्याने कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभोवती वाहने पार्क केल्याने वाहतूकही मंदावली होती.

दुपारी बाराच्या सुमारास भाजपचे उमेदवार विजय सूर्यवंशी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे महेश जाधव यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी हजेरी लावली. सव्वाबाराच्या आसपास सतेज पाटील यांनी शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. पाठोपाठ कॉँग्रेसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनीही अर्ज दाखल केला. पक्षाकडून एएबी फॉर्म मिळाला नसतानाही प्रकाश आवाडे यांनी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. याच दरम्यान कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनीही हजेरी लावली.

अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांनी 'कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या एकीमुळे सहज विजय मिळेल' असा विश्वास व्यक्त केला. प्रकाश आवाडे यांनीही 'पक्षाकडून एएबी फॉर्म मिळेल' असा विश्वास व्यक्त केला. कॉँग्रेसने डावलल्यानंतर महादेवराव महाडिक स्वतःचा अर्ज भरणार की पुत्र स्वरुप यांना पुढे करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, दुपारी दीडच्या सुमारास अपक्ष अर्ज दाखल करून महादेवराव महाडिकांनी लढतीचे चित्र स्पष्ट केले. गोकुळचे अरुण नरके आणि इतर समर्थकांसह महादेवराव महाडिक यांनी दिमाखात एन्ट्री केल्यानंतर वातावरण आणखी गंभीर झाले होते. प्रसार माध्यमांशी बोलताना महाडिकांनी अतिशय कौशल्याने बंडखोरीचेही समर्थन केले. 'सर्वपक्षीय उमेदवारी आहे. यात कॉँग्रेसचाही समावेश आहे' असे त्यांनी सांगितल्याने एकदमच हशा पिकला. महाडिकांच्या या वक्तव्याने सतेज गटात अस्वस्थता वाढली आहे.


चर्चा फक्त सतेज विरुद्ध महाडिक

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १० उमेदवारांनी १९ अर्ज दाखल झाले तरी, खरी चर्चा रंगली ती सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्याच अर्जांची. गेल्या दहा वर्षांपासून राजकीय मतभेद आणि इर्ष्या असलेले दोन्ही उमेदवार पुन्हा आमने-सामने येत असल्याने या दोघांमधील लढतीची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरू होती.


महाडिकांच्या पाठीशी भाजप ?

भाजपकडून विजय सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही बराच वेळ भाजपचे काही नगरसेवक आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात थांबले होते. महादेवराव महाडिक यांनी अर्ज भरल्यानंतरच त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे भाजप आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घेऊन भाजप महाडिक यांना मदत करणार अशीही चर्चा रंगली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काँग्रेस, भाजपचे समर्थकांसह शक्तिप्रदर्शन

$
0
0

काँग्रेस, भाजपचे समर्थकांसह शक्तिप्रदर्शन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसबरोबर भाजपच्या उमेदवारांनी अर्ज सादर करत असताना समर्थकांचे शक्तीप्रदर्शन करत आपापल्या ताकदीची चुणुक दाखवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित राहून आघाडीतील एकजुट दाखवण्यात यशस्वी झाले. पण भाजपबरोबर असणाऱ्या शिवसेनेचे कुणी पदाधिकारी अर्ज भरताना पहायला मिळाले नाहीत.


बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास काँग्रेस उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर दोन तासात सतेज पाटील यांनी समर्थकांना एकत्र करून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासह महापालिकेतील महापौरांसह प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक, जिल्हा​ परिषदेतील प्रमुख पदाधिकारी, सदस्य तर सहभागी होतेच. पण त्याशिवाय संजय पाटील, ऋतुराज पाटील, प्रतिमा पाटील, पेठवडगावच्या विद्या पोळ, माजी खासदार जयवंतराव आवळे, गुलाबराव घोरपडे, पंचायत समिती, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. महापालिकेत व या निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आर. के. पोवार, शहर अध्यक्ष राजू लाटकर, उपमहापौर शमा मुल्ला यांची उपस्थिती आघाडीतील एकजूट दर्शवत होती.


त्यांच्यापाठोपाठ प्रकाश आवाडे यांनी अर्ज सादर केला. त्यावेळी त्यांच्यासोबत इचलकरंजी नगरपालिकेतील नगरसेवक उपस्थित होते. आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत त्यांचे बंधू नाना महाडिक, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक अरुण नरके, रणजीतसिंह पाटील, विश्वास जाधव, धैर्यशील देसाई, रामराजे कुपेकर, नगरसेवक ईश्वर परमार, वसंत नंदनवाडे आदी उपस्थित होते. स्वरुप महाडिक यांनी अर्ज भरताना सत्यजित कदम, सतीश घोरपडे, निलेश देसाई, राजसिंह शेळके उपस्थित होते.


एकीकडे काँग्रेसमधून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठी गर्दी झालेली असताना भाजपकडून अर्ज दाखल करण्यास आलेल्या विजय सूर्यवंशी यांच्यासोबत मोजके नगरसेवक तसेच काही पदाधिकारी होते. त्यामध्ये भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव, अॅड. संपतराव पवार पाटील, आर. डी. पाटील, राहुल ​चिकोडे, विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, नगरसेवक अजित ठाणेकर, आशिष ढवळे, संतोष गायकवाड, विजय खाडे, विजय जाधव, सदानंद कोरगावकर, मारुती भागोजी यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हवा दातृत्वाचा हात

$
0
0

Balasaheb.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : निवृ‌त्तीनंतरचे आयुष्य निवांत जगावे.. अशी अनेकांची मनीषा असते. मात्र, मरणाच्या दारात असलेली पत्नी, करिअर करण्यासाठी धडपडत असलेली मुले आणि अस्वस्थ करणारा भूतकाळ, असे ओझे घेऊन सध्या उत्तरू (ता. आजरा) येथील आनंद मोरे जगत आहेत. या अस्वस्थ भूतकाळातूनच त्यांनी मुलांच्या शिक्षणात खंड पडू यासाठी उत्तूरसारख्या ठिकाणी भाड्याच्या घरात वसतिगृह सुरू केले आहे. आता मुलांसाठी स्वत:चे वसतिगृह असावे यासाठी त्यांनी स्वत:च्या तीन गुंठे जागेत बांधकाम सुरू केले आहे. मात्र, आत्तापर्यंत त्यांनी भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅज्युइटीची रक्कम खर्च केली आहे. ज्ञानेश्वर मुळे यांच्य मदतीने विशिष्ट टप्प्यापर्यंत कामही आले, मा‌त्र आता हतबल जालेल्या आनंद मोरे यांना हातावर हात ठेवून गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही. मुलांच्या शिक्षणासाठी धडपडत असलेल्या मोरे यांना हीच गोष्ट अस्वस्थ करत आहे.

एकवेळच्या जेवनाची भ्रांत असताना आजी-आजोबांनी काबाडकष्ट करून शिकविले. शाहू कॉलेजमध्ये ज्ञानेश्वर मुळेंसारखा वर्गमित्र लाभला. मात्र, ऐन तारुण्यात कॅन्सरने गाठले. त्यावर मात करून शिक्षण घेतले. मुंबई महानगरपालिकेत ३० वर्षे सेवा करून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आपल्याला शिक्षण घेताना जे टक्के टोणपे खावे लागले ते धडपड्या मुलांना लागू नयेत यासाठी त्यांनी प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युइटीची रक्कमेतून उत्तूर (ता. आजरा) येथे वसतिगृह उभारले. भाड्याच्या घरात हे वसतिगृह सुरू असताना स्वत:ची इमारत असावी यासाठी आनंद मोरे यांनी धडपड सुरू केली आहे.

मोरे मुळचे भादवणवाडी (ता. आजरा) येथील आनंद मोरे परिस्थिती नसल्याने उत्तरू येथे मामाच्या गावी शिक्षणासाठी आले. प्राथमिक व माध्यामिक शिक्षणानंतर ते कोल्हापुरात राजर्षी शाहू कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आले. तेथे त्यांचे वर्गमित्र ज्ञानेश्वर मुळे यांच्याशी त्यांची भेट झाली. मोरे शिक्षणात हुशार असल्याने त्यांना मुळे यांनी मदत केली. मात्र, त्याचवेळी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले. मुळे यांनी त्यांना मुंबईला नेले आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. अखेर मोरे यांनी या सगळ्यावर मात करत शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई महानगरपालिकेत रूजू झाले. ३० वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी कौटुंबिक कारणाने स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांच्या पत्नीचे आठवड्यातून तीन वेळा डायलेसिस करावे लागते. अशा वेळी त्यांना त्यांचा भूतकाळ अस्वस्थ करतोय. या अस्वस्थतेतूनच त्यांनी ज्ञानेश्वर मुळे अकादमीअंतर्गत राजर्षी शाहू वसत‌िगृह सुरू केले. उत्तूरमध्ये एक घर भाड्याने घेतले.

परिसरातील मुलांना त्यांनी आवाहन केले. गेल्या तीन वर्षांपासून या वसतिगृहात १० मुले आहेत. त्यांच्या निवास आणि भोजनाचा खर्च मोरे स्वत: करतात. यासाठी त्यांना निवृत्तीवेतनही पुरत नाही. मग त्यांनी १० टक्के व्याजाने कर्ज घेण्यास सुरूवात केली आहे.

सध्या मी निवृत्त आयुष्य जगत असलो तरी, मला माझा भूतकाळ आठवतो. परिस्थितीअभावी शिक्षण थांबू नये. मी मदत करत असलेला एक जरी मुलगा मोठा झाला तरी मला समाधान आहे. मला जितके करता आले तेवढे मी केले. यापुढे मदतीची गरज आहे.

- आनंद मोरे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी तिघे अटकेत

$
0
0

म टा. वृत्तसेवा, राधानगरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या सहा आरोपीपैकी रणजीत बाजीराव वारके, (वय १९ ) अजित पांडुरंग खाडे, (वय २२ ) तुषार बाळासो फराकटे (वय २२) (रा. सर्वजण बोरवडे, ता. कागल) या तीन मुख्य आरोपीना राधानगरी पोलिसांनी आज (बुधवार) पहाटे मुरगूड नाक्यावर अटक केली. दुपारी त्यांना कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता न्यायाधीश श्रीमती आदिती कदम यानी त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे येथील पीडित तरुणी दोन नोव्हेंबर रोजी बोरवडे येथे आपल्या नातेवाईकाकडे गेली होती. त्यावेळी रणजित वारके व अन्य पाच मित्रांनी तिच्यावर सलग तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली होती. घरी परतल्यावर पीडित मुलीने या घटनेची माहिती दिल्याने घरच्या मंडळीनी दोन दिवसांपूर्वी पोलिसात फिर्याद दिली होती. तेव्हापासून राधानगरी पोलिस संशयितांच्या मागावर होते. आज सकाळी सहापैकी तीन आरोपी पहाटे तीन वाजता मुरगूड नाक्यावर असल्याची माहिती सूत्राकडून मिळताच राधानगरी पोलिसांनी त्याना मोठ्या शिताफीने पकडले.

आज दुपारी त्याना कोल्हापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता दिवाणी न्यायाधीश कदम यानी सर्व आरोपीना २२ डिसेंबर अखेर १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशी दरम्यान याप्रकरणी उमेश आनंदा साठे, प्रशांत संभाजी चव्हाण, अभिजीत अशोक फराकटे आदी आरोपींची नावेही निष्पन्न झाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गर्भपातप्रकरणी डॉक्टरांकडे चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेकायदेशीर गर्भपात केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी मिरजकर तिकटी येथील​ सिद्धी ​नर्सिंग होमच्या डॉ. सारिका सावंत यांच्याकडे बुधवारी तीन तास कसून चौकशी केली. मंगळवारी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी डॉ. सावंत यांच्या पदवीची अधिकृत कागदपत्रे, गर्भपात केंद्राची परवानगी कागदपत्रे, रजिस्टरची तपासणी केली. तसेच डॉ. सावंत यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पोलिस कारवाई करणार आहेत. डॉ. सावंत यांच्यावर डॉ. मानसिंग बापू पाटील (वय ६३, रा. नवीन वाशी नाका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

गर्भपात झालेली पिडीत महिलेला २६ नोव्हेंबर रोजी डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटल येथे उपचारास दाखल करण्यात आले. तिची तपासणी केली असता तिच्या गर्भाशयाला व मोठ्या आतड्याला इजा झाल्याचे निदर्शनास आले. तेथील डॉ. शशिकांत कुलकर्णी यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांना बेकायदेशीर गर्भपात झाला असावा असे लेखी पत्राव्दारे कळवले. बेकायदेशीर गर्भपात मिरजकर तिकटी येथील डॉ. सारिका सावंत सिध्दी नर्सिंग होम येथे झाल्याचा दाट संशय व्यक्त केला होता. डॉ. सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आदेश जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रॅगिंग नव्हे मारहाण’

$
0
0

कोल्हापूरः आपल्यावर रॅगिंग नव्हे तर मारहाण झाली होती, अशी लेखी कबुली जयंत रमेश तोंडे (वय २०, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर) या रॅगिंगची तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांने अँटी रॅगिंग समितीपुढे दिल्याने रॅगिंगची घटना गुंडाळण्यात आल्याची चर्चा सीपीआर परिसरात सुरू होती. बुधवारी रात्री उशिरापर्यंत रॅगिंग समितीकडून घटनेतील विद्यार्थी व साक्षीदारांची चौकशी सुरू होती.

राजर्षी शाहू सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेंडा पार्क येथील होस्टेलवर रॅगिंगची घटना घडली होती. रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याने जयंत तोंडे याच्यासह तिघे जखमी झाले होते.

दरम्यान, बुधवारी अँटी ​रॅगिंग समितीची दुपारी चार वाजता बैठक झाली. बैठकीत जखमी जयंत तोंडे याच्याकडे चौकशी करण्यात आली. सोमवारी झालेली घटना ही गैरसमजातून झाली असून हा रॅगिंगचा प्रकार नव्हता तर मारहाणीचा प्रकार होता अशी त्याने कबुली दिली. कबुलीचे लेखी पत्र तोंडे याने दिले. तक्रार करणाऱ्या १४० विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळातील प्रमुखांच्याकडे समितीच्या सदस्यांनी चौकशी केली. भावनेच्या भरात आम्ही रॅगिंगचा आरोप केला असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच घेणाऱ्या पोलिसास एक वर्षाची कैद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चार हजार रूपयाची लाच घेणाऱ्या शाहूपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचारी शैलेश गोविंद वाळके (वय ३१, रा. स्वामी समर्थ कॉलनी, आर.के. नगर) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. बोचे यांनी एक वर्ष कैद व चार हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. जानेवारी २०१३ मध्ये ही घटना घडली होती.

रूईकर कॉलनी येथील इंडिया अॅटोमोबाईल येथे दोन खासगी बसेस पार्किंगमध्ये ठेवल्या होत्या. १४ डिसेंबर २०१२ मध्ये सकाळी सात वाजता सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिस कर्मचारी शैलेश वाळके व त्याचा सहकारी यांनी बसची तपासणी केली. बसमध्ये रॉकेलचे ३५ लिटरचे दोन कॅन भरून ठेवले होते. रॉकेलचा वापर करून बस चालवत असल्याने तुमच्यावर केस केली जाईल असे सांगून खलील अजीज खान याला दोन्ही बसेस बुधवार पेठेतील शहर पोलिस उअधीक्षक कार्यालयात आणण्यास सांगितल्या. खलील खान दोन्ही बसेस कार्यालयात नेल्या. आमचे साहेब आल्यावर केस करतो अशी धमकी वाळकेने दिली. शेख यांनी केस करू नये यासाठी विनवणी केल्यावर वाळके याने पाच लाख रूपयांची मागणी केली. तडजोडीनंतर दीड लाख रूपये लाच देण्याचे ठरले. अजिज खान याने सकाळी आठ वाजता एक लाख रूपये तर दुपारी बारा वाजता ७५ हजार रूपये दिल्यावर वाळकेने दोन्ही बसेस सोडून दिल्या. त्यानंतर वाळके याने शिल्लक पाच हजार रूपये देण्यासाठी तगादा लावला. खान यांनी एक हजार रूपये दसरा चौकात दिले. राहिलेले शिल्लक रक्कम देण्यापूर्वी त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. १५ जानेवारी २०१३ रोजी खानविलकर पेट्रोल पंपाजवळ चार हजार हजार रूपयाची लाच स्वीकारताना वाळके याला रंगेहाथ पकडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचिग मशिनप्रकरणी सहाजणांना नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टिंबर मार्केट परिसरातील अग्निशमन दल विभागाच्या कार्यालयातील हजेरी मशीन चोरीला गेल्या प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मशिन चोरीला गेल्याचा आक्षेप ठेवत सहा जणांना नोटीस काढली आहे. दोषी व्यक्तींकडून मशिनची किंमत वसूल केली जाणार आहे.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणी चौकशी करून ज्यांनी म​शिन चोरीला नेले आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. चोरी एक जण करणार आणि शिक्षा दुसऱ्यांना नको असे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पंचिग मशिनमुळे कर्मचाऱ्यांची नेमकी हजेरी नोंदविली जाणार आहे. महापालिकेतील काही विभागातील कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार आहे. कार्यालयीन वेळेतही अनेकजण ऑफीस बाहेर असतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पानसरे हत्या तपासाचे आव्हान

$
0
0

अधीक्षकांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागणार

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूरः ज्येष्ठ नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासाचे मोठे आव्हान नूतन पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्यासमोर राहणार आहे. गेली २२ ​महिने कोल्हापूर जिल्हा मटका, जुगारमुक्त ठेवण्याचे कौशल्य शर्मा यांनी दाखवले होते. हेच कौशल्य नूतन पोलिस अधीक्षकांना दाखवावे लागणार आहे.

पानसरे हत्येच्या तपासात शर्मा यांचा कस लागला होता. एकीकडे सत्ताधारी पक्ष व दुसरीकडे पुरोगामी पक्षांचा दबाव असतानाही शर्मा यांनी सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याला पानसरे हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्याचे धाडस दाखवले. समीरवर आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया लवकरच होणार असल्याने त्यात लक्ष घालण्याचे काम पोलिस अधीक्षक देशपांडे यांना करावे लागणार आहे. तसेच पानसरे हत्येचा पुढील तपास करताना मुख्य सूत्रधारांपर्यंत पोचण्यासाठी सहकाऱ्यांच्यात आत्मविश्वास वाढवून काम करावे लागणार आहे.

मनोजकुमार शर्मा यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी लैगिंक शोषणाच्या आरोपामुळे कोल्हापूर पोलिस दलाची प्रतिमा बिघडली होती. अवैध धंद्याचा सुळसुळाट होता. शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलिसांचे मनोबल उंचावून अवैध धंद्यांवर चाप बसवला. यापुढे कोल्हापूर जिल्हा अवैध धंद्यापासून मुक्त ठेवण्यासाठी देशपांडे यांना काम करावे लागणार आहे.

जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे. उसाच्या एकरकमी एफआरपी दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने सरकारला अल्टीमेटम देताना १३ डिसेंबरला चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. नूतन पोलिस अधीक्षक देशपांडे यांना पदभार स्वीकाराताना पहिल्यांदा शेतकरी संघटनेचे आंदोलन हातळण्याचे शिवधनुष्य पेलवावे लागणार आहे.

जिल्ह्यातील राजकारण हे गटातटाचे असल्याने त्याचे पडसाद तालुका व जिल्ह्याच्या राजकारणावर पडतात. विधापरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून पुन्हा माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्यात टोकाचे राजकारण रंगणार आहे. यापूर्वी दोन्ही गटाच्या राजकारणामुळे 'गॅंग्ज ऑफ पाचगाव' सारख्या घटना घडल्याने पोलिस दलाला सरत्या वर्षात व नवीन वर्षात सावध रहावे लागणार आहे. नूतन पोलिस अधीक्षकांना नवीन वर्षात पानसरे हत्येचा तपास, ऊस आंदोलन, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफाळावाढ एप्रिलपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधत असताना प्रशासनाने शहरातील मिळकतींचा शोध घेण्याचे ठरविले आहे. शहरातील हजारो मिळकतींची अद्याप नोंद नाही, परिणामी त्या मिळकतींवर घरफाळा आकारला नाही. यासाठी खासगी संस्थेचा आधार घेण्यात येईल. फेब्रुवारी, मार्च महिन्यात हा सर्व्हे पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक एप्रिलपासून भांडवली मूल्यावर आधारित करप्रणालीनुसार वाढीव दराने घरफाळा आकारणी होणार आहे.

एलबीटी बंद झाल्यामुळे आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आहेत. घरफाळा, पाणीपट्टी, बांधकाम परवाना, नगररचना आणि व्यवसाय परवाना हे उत्पन्नाचे प्रमुख मार्ग आहेत. प्रशासनाने, घरफाळा ​उत्पन्नात वाढ होण्यासाठी नवीन मिळकतींचा शोध घेण्याचे ठरविले आहे. खासगी संस्थेमार्फत ​मिळकतींचा शोध घेतला जाणार आहे. कोल्हापुरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात बांधकामे झाली, मात्र अनेक मिळकतींची महापालिकेकडे नोंद नाही. मात्र दुसरीकडे संबंधित भागातील नागरिक महापालिकेच्या सगळ्या सोयी सुविधांचा लाभ घेत आहेत. त्याचा परिणाम पायाभूत सुविधावर पडत आहे. जानेवारी महिन्यात स्थायी समितीसमोर प्रस्ताव ठेवला जाणार आहे. त्यानंतर सर्वेक्षण सुरू होईल.

तीस ते पस्तीस टक्क्यांनी घरफाळा वाढ

महापालिकेने २०११ मध्ये भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली स्वीकारली आहे. या कर प्रणाली अंतर्गत दर पाच वर्षानी घरफाळ्यात वाढ होणार आहे. एप्रिल २०१६पासून वाढीव घरफाळा लागू करताना २०१५-१६ या वर्षातील रेडीरेकरन विचारात घेतला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रंकाळा’ लवादाला मुदतवाढ

$
0
0

कोल्हापूरः रंकाळा तलावाच्या प्रदूषणमुक्तीसाठीच्या प्रस्तावांच्या चौकशीबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून (एमपीसीबी) बुधवारी थेट तयारी न दाखवल्याने राष्ट्रीय हरित लवादाने पुन्हा मुदत दिली आहे. यापूर्वी बारा दिवसांची मुदत देऊनही एमपीसीबीला बुधवारच्या सुनावणीत ठोस म्हणणे मांडता आले नाही. पुढील सुनावणी १४ डिसेंबर रोजी होणार आहे. लवादाचे न्या. व्ही. आर. किंगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने चौकशीचे आदेश दिले होते. पण त्यांना मोठ्या प्रमाणात फी द्यावी लागणार असल्याने सक्षम सरकारी यंत्रणेकडून चौकशी केल्यास हा खर्च वाचू शकेल, असे मत महापालिकेकडून मांडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौंदत्तीसाठी एसटीकडून पॅकेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूर शहरातून जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने यंदाही पॅकेज सुविधा दिली आहे. भाविकांना सौंदत्ती बरोबरच त्या परिसरातील आणि वाटेवर असणाऱ्या पर्यटनस्थळांनाही भेट देता यावी, यासाठी सात मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार त्या पॅकेजची किंमत ठरविण्यात आली आहे.

सौंदत्तीला जाणारे भाविक सौंदत्तीबरोबरच, संकेश्वर, गोकाक धबधबा, हिडकल डॅम, चिंचणी मायाक्का, कागवाड, नृसिंहवाडी अशी पर्यटन यात्राही करतात. भाविकांच्या आर्थिक क्षमतेनुसार यातील पर्यटन स्थळांची निवड केली जाते. त्यामुळे एसटी महामंडळानेही भाविकांसाठी सात वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत. त्यांना पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. भाविकांकडून आकारण्यात येणारी रक्कम गेल्या वर्षीप्रमाणेच असणार आहे. यात्रेसाठी गाड्यांची संख्या पुरेशी आहे. यंदा सोलापूर, पुणे, सांगली, सातारा येथून गाड्या न मागवता जिल्ह्यातील आगारांमध्ये उपलब्ध गाड्यांमधूनच सोय करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

बुकिंग वाढण्याची अपेक्षा

गेल्यावर्षी संभाजीनगर बसस्थानकामधून सौंदत्ती यात्रेसाठी १२५ गाड्यांचे बुकिंग झाले होते, तर मध्यवर्ती बसस्थानकातून ४० गाड्यांचे बुकिंग झाले होते. यंदा ही संख्या वाढविण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.

सौंदत्ती यात्रेसाठीच्या प्रासंगिक करारमध्ये यंदा कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. भाविकांनी लवकरात लवकर आपल्या गाडीचे बुकिंग करून घ्यावे, असे आवाहन आम्ही करत आहोत.

-अभय कदम, प्रमुख, मध्यवर्ती बसस्थानक, कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसची प्रतिष्ठा लागली पणाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रचंड गटबाजी असलेल्या काँग्रेस पक्षाची विधानपरिषदेसाठी उमेदवारी सतेज पाटील यांना मिळाली आहे. विद्यमान आमदार महादेवराव महाडिक व पक्षाचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सतेज पाटील यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या पण पक्षाबरोबर प्रामाणिक राहण्याचा इतिहास असणाऱ्या पी. एन. पाटील यांच्याबरोबरच प्रकाश आवाडे यांच्या भूमिकेला महत्व राहील.

माघारीनंतर लढत स्पष्ट

दरम्यान, भाजपचे उमेदवार विजय सुर्यवंशी यांनी उमेदवारी भरली असली तरी दोन दिवसांत होणाऱ्या घडामोडींवर उमेदवार निश्चित होणार आहे. सुर्यवंशी माघार घेणार की अपक्ष म्हणून रिंगणात राहणाऱ्या महाडिक यांना की ताराराणी आघाडीचे स्वरुप महाडिक यांना भाजप, शिवसेना युती पाठिंबा देऊन पुरस्कृत करणार हेही स्पष्ट होईल.

ए बी फॉर्मवर माझेही नाव असेल हा माझा विश्वास होता म्हणून अर्ज भरला. ए बी फॉर्म मिळाला नाही तर नंतर निर्णय घेतला जाणार आहे.

- प्रकाश आवाडे

ही बंडखोरी नसून माझी सर्वपक्षीय उमेदवारी आहे. सर्वपक्षीय जनतेची ही उमेदवारी आहे. यात इतर पक्षांबरोबर काँग्रेसमधील घटकही असू शकतात.

- महादेवराव महाडिक

किमान तीनशे मते ही माझ्याबरोबर राहतील, असा पूर्ण विश्वास आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील सोबत आहेत. आवाडेंनीही माझ्यासोबत राहण्याचा शब्द दिला आहे.

- सतेज पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images