Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

वृद्धाश्रमातील आजीआजोबा करणार कन्यादान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या अस्सल आिण रांगडा बाज जपणाऱ्या शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात सोमवार दिनांक सात डिसेंबरच्या पाच वाजून २५ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर तेजस आिण ऋतुजा यांचा अनोखा विवाहसोहळा रंगणार आहे. वधू ऋतुजाचे कन्यादान करण्यासाठी वृद्धाश्रमातील आजीआजोबा येणार आहेत, तर अंध वाजंत्री बँड वाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. फुलांच्या अक्षतांची उधळण होणार असून अनाथाश्रमातील मुले आिण रिक्षाचालक वऱ्हाडी बनून निमंत्रातांचे स्वागत करणार आहेत.

रिक्षा संघटनेचे माजी अध्यक्ष आिण सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांचा मुलगा तेजस याच्या विवाहानिमित्त हा अनोखा सोहळा आयोजित केला आहे. निवृत्ती चौकात या विवाहाच्या तयारीला जोर आला आहे. ऋतुजा हिचे कन्यादान करण्यासाठी वृद्धाश्रमातील आजीआजोबांना मान देण्यात येणार आहे. तर विवाह म्हटले की बँडबाजा आलाच. या विवाहासाठी वाजंत्री वाजवण्याची जबाबदारी कोल्हापुरातील अंध कलाकारांनी घेतली आहे. अनाथाश्रमातील मुले नटूनथटून स्वागतासाठी उभी राहणार आहेत. तर कोल्हापुरातील रिक्षाचालक यजमान बनून वऱ्हाडीमंडळीचे स्वागत करणार आहेत.

आहेराची रक्कम मदतीसाठी

या विवाहसोहळ्याला कोल्हापूरकरांना आग्रहाचे निमंत्रण वरपिता राजेंद्र जाधव तर वरमाता अर्चना यांनी दिले आहे. लग्नासाठी येणाऱ्यांना आहेर आणण्याचा आग्रह नाही, पण जर कुणाला आहेर द्यायचाच असेल तर त्यांनी तो रोख स्वरूपात द्यावा. आहेर म्हणून जमा होणारी रोख रक्कम अंधशाळा, वृद्धाश्रम आिण अनाथाश्रमाला मदत म्हणून दिली जाणार आहे असेही पित्रकेत लिहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपनंतर स्वाभिमानी भूमिका ठरवणार- राजू शेट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेससोबत सत्तेत असलो तरी राज्यात भारतीय जनता पक्ष आमचा मित्र पक्ष आहे. भजपसोबत आमची मैत्री कायम राहणार असल्याने विधानपरिषदेत भाजपचा उमेदवार असेल तर त्यांना पाठिंबा देवू. अन्यथा आम्हाला पूर्ण मोकळीक आहे. त्यामुळे प्रथम भाजपची भूमिका स्पष्ट होऊ त्यानंतरच आम्ही आमची भूमिका जाहीर करु असे स्पष्ट मत स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी आम्हला पांगळ बनवले असल्याने विधानसभेतील आमचा आवाज क्षीण झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोपळ्यापासून बनले घरटे

$
0
0

दरेवाडी प्राथमिक शाळेतील मुलांचा उपक्रम

कोल्हापूर टाइम्स टीम

पटसंख्या अवघी २९.. उणेपुरे दोनच शिक्षक, त्यापैकी एकांकडे मुख्याध्यापकपदाची जबाबदारी तर दुसरे हाताने अपंग... शाळा गावापासून तीन किलोमीटर अंतरावर... मुलं रोज पायपीट करून शाळेत येतात...अशा अनेक अडथळे पार करत मुलांनी शिक्षकांच्या मदतीने शाळेभोवती वेलाला लागलेल्या दुधी भोपळ्याला वाळवून पक्ष्यांसाठी घरटी बनवली आहेत. या घरट्यात येणाऱ्या पक्ष्यांच्या किल‌‌​बिलाटाने ही शाळकरी चिमुकलीही आनंदून गेली आहेत.

गोंगाटापासून दूर असलेल्या या शाळेभोवती खूप झाडे आहेत. साहजिकच पक्ष्यांचा वावरही तितकाच जास्त आहे. शाळेच्या परिसरात दुधी भोपळयाचे वेल असून कायम दुधीने लगडलेल्या झाडांकडे पाहिल्यानंतर मुख्याध्यापक गोपाळकृष्ण कालेकर यांनी या भोपळ्यापासून काय प्रयोगशील करता येईल का याचा विचार केला. परिसरात असलेल्या पक्ष्यांची संख्या लक्षात घेऊन त्यांनी भोपळ्यापासून घरटी बनवण्याची कल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला पसंती दिली आ​णि पक्ष्यांसाठी घरट्यांनी आकार घ्यायला सुरूवात केली. या भोपळ्याच्या कवचाची जाडी चार ते पाच मिलीमीटर इतकी असल्यामुळे पक्ष्यांसाठी हे घरटे सुर​िक्षत ठरत आहे.

या उपक्रमांतर्गत परिसरातील झाडावर पूर्ण तयार झालेले दुधीभोपळे काढून ते वाळवण्यात आले आहेत. आतील पक्ष्यांच्या पिल्लांसाठी हवा खेळती रहावी आ​णि प्रकाश यावा यासाठी वि‌शिष्ट अंतरावर ‌छिद्र पाडण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात २० घरटी बनवली असून ही घरटी शाळेच्या परिसरातील झाडांवर लावली आहेत.

शाळेच्या परिसरात असलेल्या हिरवाईत दुधीच्या वेलांवरील भोपळ्यांनी मुलांना निर्मितीचा आनंद तर दिला आहेच. शिवाय पर्यावरणपूरक शिक्षणाचा पाठही शिकवला आहे. आता मुले परिसरातील झाडांपासून पर्यावरणाशी निगडीत कोणते उपक्रम राबवता येतील, याचा विचार स्वतःच करू लागली आहेत. या छोट्याशा उपक्रमातून मुलांमधील ​जिज्ञासेला चालना देण्याचे काम केले आहे.

- गोपाळकृष्ण कालेकर, मुख्याध्यापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना कन्यादानाचा मान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूरचा अस्सल आणि रांगडा बाज जपणाऱ्या ​शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात सोमवारी (ता.७) पाच वाजून २५ मिनिटांनी गोरज मुहूर्तावर तेजस आणि ऋतुजा यांचा अनोखा विवाहसोहळा रंगणार आहे. वधू ऋतुजाचे कन्यादान करण्यासाठी वृद्धाश्रमातील आजीआजोबा येणार आहेत, तर अंध वाजंत्री बँड वाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. फुलांच्या अक्षतांची उधळण होणार असून अनाथाश्रमातील मुले आणि रिक्षाचालक वऱ्हाडी बनून निमंत्रितांचे स्वागत करणार आहेत.

रिक्षा संघटनेचे माजी अध्यक्ष आ​णि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव यांचा मुलगा तेजस याच्या विवाहानि​मित्त हा अनोखा सोहळा आयोजित केला आहे. निवृत्ती चौकात या विवाहाच्या तयारीला जोर आला आहे. ऋतुजा हिचे कन्यादान करण्यासाठी वृद्धाश्रमातील आजीआजोबांना मान देण्यात येणार आहे. तर विवाह म्हटले की बँडबाजा आलाच. या विवाहासाठी वाजंत्री वाजवण्याची जबाबदारी कोल्हापुरातील अंध कलाकारांनी घेतली आहे. अनाथाश्रमातील मुले नटूनथटून स्वागतासाठी उभी राहणार आहेत. तर कोल्हापुरातील रिक्षाचालक यजमान बनून वऱ्हाडीमंडळीचे स्वागत करणार आहेत. या अनोख्या विवाहसोहळ्यासाठी निवृत्ती चौक परिसरातील स्थानिक नागरिक जाधव कुटुंबियांना तयारीसाठी मदत करत आहेत. यानिमित्ताने या परिसरात लगीनघाई सुरू झाली आहे.

आहेराची रक्कम मदतीसाठी

या विवाहसोहळ्याला कोल्हापूरकरांना आग्रहाचे निमंत्रण वरपिता राजेंद्र जाधव तर वरमाता अर्चना यांनी दिले आहे. लग्नासाठी येणाऱ्यांना आहेर आणण्याचा आग्रह नाही, पण जर कुणाला आहेर द्यायचाच असेल तर त्यांनी तो रोख स्वरूपात द्यावा. आहेर म्हणून जमा होणारी रोख रक्कम अंधशाळा, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमाला मदत म्हणून दिली जाणार आहे असेही प​त्रिकेत लिहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णराजची वेगाशी मैत्री

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मोहितेज रेसिंग ट्रॅकमुळे कोल्हापुरातील नव्या क्रीडा प्रकाराला सुरुवात झाली. वेग आणि वाऱ्याशी मैत्री करत यामध्ये अनेकांनी कौशल्य मिळवले. मन, बुद्धी आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर चित्तेश मंडोडी, ध्रुव मोहिते, कृष्णराज महाडिक अशा खेळाडूंनी गो-कार्टिंग आणि फॉर्म्युला रेसिंगमध्ये देदिप्यमान यश मिळवले. याची पुनरावृत्ती करताना कृष्णराजने दिल्लीतील बुद्ध सर्किटवर बीएमडब्ल्यू फॉर्म्युलामध्ये तिसरे स्थान मिळवले. तर एलजीबीमध्ये चौथे स्थान मिळवत इंग्लंड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.

कृष्णराजने वयाच्या आठव्या वर्षापासून कार रेसिंगला सुरुवात केली. मोहिते रेसिंग ट्रॅकवर गो-कार्टिंगचा सराव करताना त्याची याच क्रीडा प्रकाराशी घट्ट मैत्री जुळली. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी असल्याने त्याने नियमितपणे सरावाला सुरुवात केली आणि पहिल्याच गो-कार्टिंग रेसमध्ये तृतीय स्थान मिळवले. पहिल्याच रेसमध्ये यश मिळाल्याने खास मलेशियावरुन गो-कार्टिंगसाठी लागणारी गाडी खरेदी केली. पहिल्या रेसपासून त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याने सातत्याने २००९ पासून २०१४ पर्यंत प्रत्येक गो-कार्टिंग स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले.

राष्ट्रीय गो-कार्टिंगमध्ये मिळवलेल्या यशामुळे त्याने २०१२ व १३ मध्ये भारतीय संघात स्थान मिळवले. अमेरिका येथील आंतरराष्ट्रीय गो-कार्टिंगमध्ये ४९ वे वर्ल्ड रॅकिंग मिळवले. जे. के. टायरकडून प्रतिनिधीत्व करताना फॉर्म्युला फोर रेसमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. गो-कार्टिंगप्रमाणेच त्याने फॉर्म्युला फोरमध्ये यशाला गवसणी घातली. दिल्ली येथे झालेल्या रेसमधील पात्रता फेरी सहज पूर्ण करत मुख्य फेरीत पात्रता मिळवली. वर्षभरातील कामगिरीच्या जोरावर कृष्णराजने बी. एम. डब्ल्यू, एफ. बी. ओ. टू स्पर्धेत तृतीय स्थान पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे आशियाई आणि जागितक स्पर्धेतील सहभागाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गो-कार्टिंग स्पर्धेप्रमाणे वर्षातील कामगिरीच्या आधारावर फॉर्म्युला फोरमध्ये तृतीय स्थान पटकावले आहे. यशामुळे इंग्लंड येथे होणाऱ्या बीआरडीसी फॉर्म्युला एस-फोर रेसची तयारी सुरू केली आहे. एप्रिलमध्ये स्पर्धा असल्याने सरावाला कालावधी जास्त मिळणार असल्याने यश खेचून आणणार आहे.

- कृष्णराज महाडिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रॅगिंगचे गॅँगरिन

$
0
0

प्रतिबंधक कायद्यानंतरही सुरू आहे रॅगिंग

कोल्हापूर टाइम्स टीम

रॅगिंगच्या प्रकाराने चार विद्यार्थ्यांना अटक झाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्था असून, याआधीच्या घटनांबाबत तक्रार देण्यास कोणीही पुढे आलेले नाही. या घटनेच्या निमित्ताने महाविद्यालयांमधील रॅगिंग प्रतिबिंधक समित्यांच्या कामाबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रॅगिंगचे हे गॅँगरिन पसरतच आहे.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच महाविद्यालयांमध्ये रॅगिंग प्रतिबंधक समिती स्थापन केली जाते. या समितीत विद्यार्थी प्रतिनिधी,प्राध्यापक प्रतिनिधींसह कायदेतज्ज्ञ आणि पोलिस प्रतिनिधीही असतात. या समित्यांनी अतिशय काळजीपूर्वक काम करणे अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षात देशात रॅगिंगने विद्यार्थ्यांचे बळी घेतल्यानंतर याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. रॅगिंग प्रतिबंधक कायदा १९९१ आणि १९९९ नुसार युजीसीने देशातील सर्व महाविद्यालयांना रॅगिंग प्रतिबिंधक समित्या स्थापन करणे बंधनकारक केले आहे. ज्या ठिकाणी रॅगिंगचे प्रकार वारंवार घडतात, त्या ठिकाणी महाविद्यालय आणि वसतिगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा सूचना दिल्या आहेत. या समित्या केवळ कागदोपत्री कामकाज पार पाडतात, त्यामुळे रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचे फावले आहे अशा प्रतिक्रिया विद्यार्थी संघटनांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

अभाविप देणार निवेदन

सात विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सोमवारी (ता.७) नाशिक येथे आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात येणार आहे. या प्रकाराची १५ दिवसात सखोल चौकशी करावी आणि संबंधित दोषी विद्यार्थ्यांना कडक शासन करावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने केली आहे.

तीन वर्षात १५७२ तक्रारी

संपूर्ण देशात तीन वर्षांत एकूण १५७२ तक्रारींचा नोंद झाली आहे. रॅगिंगविरोधात विद्यार्थ्यांना तक्रार मांडता यावी यासाठी युजीसीने महाविद्यालयीन पातळीपासून ते वेबसाईटवरही स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. निनावीही तक्रार देता येते. तक्रार केल्यानंतर अवघ्या तीन सेकंदात संबंधित अधिकारी आणि प्राध्यापकांकडे तक्रार पोहोचते.

रॅगिंगच्या प्रकाराची सखोल चौकशी करून यातील तथ्य समोर यावे. खरेच रॅगिंगमधून हा प्रकार घला असेल, तर मात्र दोषींचा महाविद्यालयातून हकालपट्टी केली पाहिजे. असे प्रकार रोखण्याची जबाबदारी महाविद्यालयांमधील स्थानिक रॅगिंग प्रतिबंधक समित्यांवर आहे.

- अवधूत अपराध, पदाधिकारी, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना

'विद्यापीठ अनुदान आयोगाने रॅगिंग रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहेच. काही ठिकाणी याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसेल तर, विद्यार्थी याचा गैरफायदा घेतात. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे.

- प्रा. डॉ. डी. के. गायकवाड, विद्यार्थी कल्याण संचालक, शिवाजी विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंडाळ्याच्या तरुणाचा खून नागज घाटातच

$
0
0

कराड : उंडाळे (ता. कराड) गावातील अधिकराव ऊर्फ विजयसिंह पाटील याच्या खून प्रकरणाचा तपास करताना कराड ग्रामीण पोलिसांनी प्रचंड गोपनीयता ठेवत चार स्वतंत्रे पथके नियुक्त केली आहेत. आर्थिक, अनैतिक, व्यावसायिक आणि राजकीय कारणांच्या शक्यता गृहीत धरून पोलिस तपास सुरू झाला आहे. दरम्यान, कवठेमहांकाळ येथील नागजच्या घाटातच त्याचा गेम झाल्याचे शवविच्छेदन अहवालावरून पोलिसांनी स्पष्ट केले.

तपासाबाबत पोलिसांनी अत्यंत गोपनीयता ठेवली आहे. अधिक पाटीलचा मृतदेह पनवेलजवळ समुद्र खाडीत सापडल्यावर पोलिसांच्या तपासाला गती आली आहे. अधिकच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मारेकऱ्यांनी नियोजनबद्ध कट रचून पाच जिल्ह्यात प्रवास केला. मात्र अधिकचा खून नेमका कोणत्या ठिकाणी झाला असावा, याची माहिती मिळत नव्हती. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांना प्राथमिक अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार मृतदेह समुद्रात टाकण्यापूर्वी सहा ते सात तास अगोदरच त्याचा खून केल्याचे समोर येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन अपघातांत दोन महिला ठार

$
0
0

इचलकरंजी : रुई व घुणकी (ता. हातकणंगले) येथे झालेल्या अपघातात कोल्हापूरच्या महिलेसह अन्य एका महिलेचा मृत्यू झाला. वैशाली उत्तम बिरांजे (वय ३५, रा.राजारामपुरी, कोल्हापूर) व सविता तानाजी माने (रा. मजकरवाडी, ता. कराड) अशी मृत महिलांची नावे आहेत.तर तिळवणी येथे झालेल्या अपघातात अरुणा अशोक केटकाळे (वय २०, रा. सनी कॉर्नर, कबनूर), सुमित अशोक दणाणे (वय २५, रा. किणी) यांच्यासह ४ वर्षाची मुलगी (नाव समजू शकले नाही) हे जखमी झाले. जखमींपैकी अरुणा केटकाळे व सुमित दणाणे यांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत पोलिसात नोंद करुन घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

कोल्हापूरहून वैशाली बिरांजे या रुईकडे आपल्या माहेरी येत होत्या. यावेळी रुई बाजार परिसरात आले असताना मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने बिरांजे यांच्या मोपेडला पाठीमागील बाजूस जोराची धडक दिली. या धडकेत वैशाली बिरांजे यांचा जागीच मृत्यू झाला.

तर नुकताच साखरपुडा झाल्याने खरेदीसाठी कोल्हापूरला गेलेले अरुणा केटकाळे व सुमित अशोक दणाणे हे अल्टो कार (क्र. एमएच ०९ बीएम २८५०) ने कबनूरकडे परतत होते. याचवेळी एका कार्यक्रमासाठी कोल्हापूरकडे निघालेल्या जयदीप चंद्रकांत ऐव्हळे (रा. रांगोळी) यांच्या सुमो (क्र.एमएच ०६ डब्ल्यू ९०२५) याच्यात तिळवणी गावानजिक समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, अल्टो कारच्या समोरील भागाचा चक्काचुरा झाला.

घुणकीजवळ कराडची महिला ठार

हुपरी : घुणकी (ता.हातकणंगले) येथे पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकला ओव्हरटेक करताना धडक लागून मोटरसायकल वरील एक महिला जागीच ठार झाली तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सविता तानाजी माने (वय ४४, रा. मजकरवाडी ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. नरसिंग बाबूराव जगताप (वय ६०) रूपाली तानाजी माने (वय १६) हे दोन जण गंभीर जखमी झाले. मजकरवाडी (ता. कराड) येथून नरसिंग जगताप, सविता माने, रूपाली माने हे होंडा ड्रीम मोटारसायकलवरून रविवारी सकाळी जोतिबा दर्शनासाठी निघाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हत्तींमुळे शेतकरी झाले हतबल

$
0
0

संपत पाटील, चंदगड

शेतकऱ्यांना अनेक संकटांना तोंड देत शेती करावी लागते. वाढती महागाई व शेतीसाठी येणारा खर्च यांचा मेळ घालताना शेतकरी मेटाकुटीला येतो. खर्च व उत्पन्न यांचा मेळ घालताना नाकीनऊ येत असताना शेतात आलेले उभे पिक घरी आणण्याच्या वेळी जंगली प्राण्याकंडून फस्त केले जात आहे. जंगली प्राण्यांनी पिकांची केलेली अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळत आहेत. यावर्षी कमी पावसामुळे शेतकरी अगोदरच संकटात असताना चंदगड तालुक्यामध्ये हत्ती व गव्यांच्याकडून उभे पिके जमीनदोस्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी पुरता उद्ध्वस्थ झाला आहे. जगायचे कसे असा प्रश्न दिवसागणिक त्यांच्यासमोर उभा रहात आहे. जंगली प्राण्यांकडून नुकसानीमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे.

चंदगड तालुक्यामध्ये हत्ती, गवे व अस्वलाकडून माणसांना इजा झाल्या आहेत. २००४ मध्ये पहिल्यांदा कर्नाटक राज्यातून होसूर (ता. चंदगड) येथे हत्तींनी प्रवेश केला. त्यावेळेपासून हत्तींचा वावर चंदगड तालुक्यात आहे. तालुक्यामध्ये फाटकवाडी, जांबरे, हेरे, जेलुगडे, तिलारी, जंगमहट्टी, लक्कीकट्टे असे प्रकल्प व लहान-मोठे तलाव आहेत. यामध्ये बारमाही पाणी उपलब्ध असलेने हत्तींना मुबलक पाणी मिळते.

ऊस, भात, नाचना, केळीच्या बागा, नारळ यांचे प्रमाण अधिक असल्याने हत्तींना रोजच्या खाण्यासाठी पुरेसे खाद्य मिळत असल्याने चंदगडला हत्तींचा मुक्काम आहे. साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये हत्तींचे चंदगड तालुक्यात आगमन होते. या काळात हत्तींना खाण्यासाठी मुबलक पिके व डुंबण्यासाठी पाणी उपलब्ध असल्यामुळे त्यांचा मुक्काम असतो. गेल्या अकरा वर्षात हत्तींनी आपला येण्या-जाण्याचा क्रम अनेकदा बदलला आहे.

गेली दहा वर्षे ते मे अखेरपर्यंत पुन्हा माघारी दोडामार्गच्या दिशेने तिलारी जंगलातून जात होते. मात्र मागील वर्षांपासून या भागात हत्तींचा कळप तळ ठोकून आहे. रात्री अपरात्री चंदगडमधील अनेक गावांमध्ये प्रवास करणे देखील धोकादायक ठरले आहे. अनेकदा हत्ती धावून येण्याचे प्रसंग घडत असल्याने रात्री आठनंतर रस्ते रिकामे असतात.

हत्तींना रोखण्याचे प्रयत्न

हत्ती मानवी वस्तीत येऊ नयेत, मनुष्य व पिकांना हाणी पोहोचू नये, यासाठी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात येते. गावांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सभा घेऊन हत्तीविषयी जनजागृती वनकर्मचारी करत असल्याचा दावा केला जात आहे. हत्तींना हुसकावण्यासाठी वनकर्मचारी सुरबाण, फटाके, ढोल व स्पीकर लावून हत्तींना रोखण्याचे काम केले जाते. वनविभागाकडून हत्तींना जंगलातच रोखण्यासाठी जंगलाभोवती चर खोदण्यात आली होती. ही खर्चीक बाब आहे. चंदगड तालुक्यामध्ये सुमारे ३५०० मीमी पाऊस पडतो. त्यामुळे दोन ते तीन वर्षात पावसामुळे ही चर बुजते.

वनविभाग हतबल

हत्तीना रोखणे वनविभागाला अशक्य होत आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्याकडील यंत्रणा तोगडी पडत आहे. हत्तींचा कळप रोज आपले ठिकाण बदलत असल्यामुळे वनकर्मचाऱ्यांना चकवा देतात. हत्तींनी केलेली नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यातच वनविभाग धन्यता मानत आहे.

उपद्रवाखालील क्षेत्र

तालुक्याच्या पश्चिम भागातील हेरे, कळसगादे, गुडवळे, वाघोत्रे, पार्ले, नागवे, कोकरे, उमगाव, माळी, झांबरे, भोगोली, पिळणी, कानूर, काळगोंडवाडी, बुझवडे ही गावे जंगलाला लागून आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलाला लागून शेती आहे. त्यामुळे या भागात हत्ती रमतात. दिवसभर जंगलात फिरायचे व सायंकाळच्या वेळी शेतकरी शेतातून घरी गेल्यानंतर हत्ती चाऱ्याच्या शोधात शेतामध्ये घुसतात. खाद्य मिळविण्यासाठी वाटेत मिळेल ते पायाखाली घालत खाद्य मिळवतात. खाण्यापेक्षा हत्तीकडून पिकांतून जात असताना हत्तींचे पायामुळे सर्वाधिक नुकसान होते. वरील परिसरामध्ये हत्तींपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वारंवार हत्तींकडून याच परिसरात नुकसान होते.

ठोस उपाययोजनांची गरज

हत्तींच्या रोजच्या नुकसानीने शेतकरी वर्ग वैतागला आहे. नुकसान कितीही झाले तरी कागदपत्रांचा ससेमीरा मात्र अधिक असल्यामुळे शेतकरी त्रासून गेला आहे. नुकसान भरपाईपेक्षा कागदपत्राचा खर्चच अधिक असल्यामुळे शेतकरी काहीवेळा भरपाई मिळविण्याच्या फंदात पडत नाही. सात-बारा, आठ-अ च्या उताऱ्यासाठी साठी तलाठी व ग्रामसेवक भेटत नसल्यामुळे अनेकदा नुकसानीची प्रकरणे अर्धावर सोडली जातात. यासह कृषी सहाय्यक व वनरक्षकांच्या पंचनाम्यावर सह्या लागत असल्याने त्यांना शोधण्यात अधिक वेळ जातो. हे सगळे करत असताना यावर्षीपासून ही सर्व प्रकरणे ऑनलाइन केली जात असल्यामुळे त्यासाठी वेगळा खर्च आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माध्यमिक’चे कारनामे जोरात

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूरः शाळेकडून पेन्शनचे आलेले प्रस्ताव, प्रभारी मुख्याध्यापक नियुक्ती, रजा नुतनीकरण, शिष्यवृत्ती देयक, शाळांच्या नावामध्ये बदल यासह आलेल्या कोणत्याही प्रस्तावावर त्वरीत निर्णय घेतला जात नाही. प्रस्ताव जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून मध्यस्थांमार्फत चिरीमिरीची मागणी करत असल्याची तक्रार शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याविरोधात दाखल झाली आहे. याच तक्रारीमुळे सामाजिक संघटनांनी जिल्हा परिषदेमध्ये तोडफोड केली. तोडफोडीच्या प्रकारानंतर शिक्षणाधिकारी शिंदे यांच्या कारनाम्याच्या प्रकारांची चर्चा कार्यालयात होवू लागली आहे. याची दखल घेत सीईओनी त्यांना चांगलेच खडसावून कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वेळेत मिळत नसल्याने आंदोलनाची पूर्वसूचना दिली होती. मात्र अभ्यागतांप्रमाणे आंदोलकांना टाळण्याच्या वृत्तीमुळे तोडफोड झाली. तोडफोडीनंतर शिक्षणाधिकारी यांच्या कारनाम्याची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. पेन्शनसाठी आलेले प्रस्ताव प्रलंबित ठेवणे, प्रभारी मुख्याध्यापकांच्या नियुक्ती, रजा नुतनीकरणाचे अनेक प्रस्ताव त्यांच्या कार्यालयात धूळखात पडून आहेत. मात्र अशा कोणत्याही लिपिकास टिपणी लिहण्यास त्यांनी मज्जाव केला आहे. टिपणीसाठी शिंदे आणि अधीक्षक शेख यांच्याशी चर्चा केल्याशिवाय टिपणी लिहिली जात नसल्याने अनेक प्रस्तावावरील धूळच झटकली जात नाही. प्रस्तावाबाबत विचारणा केल्यास का आलात ? वेळ मिळाल्यानंतर सही करते, पुन्हा भेटू नका, अशी उद्धट उत्तरे दिली जातात. शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारदार नरेंद्र मुळीक यांनी सीईओ यांच्याकडे तक्रारच दाखल केली.

अभ्यागतांना भेटण्यास वेळ नसलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांचा सर्वात जास्त फटका पेन्शनसाठी प्रस्ताव पाठवलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बसत आहे. सेवानिवृत्तीच्या ३ ते ४ महिन्यापूर्वी शाळांकडून माध्यमिक विभागाकडून निवृत्तीवेतनासाठी प्रस्ताव पाठवला जातो. शिक्षणाधिकाऱ्यांच्या मान्यतेने मुंबई येथील ऑडिट विभागाकडे सादर केला जातो. मात्र यासाठी शिक्षणाधिकारी चिरीमिरी घेतल्याशिवाय सही करत नसल्याची चर्चा आहे. सेवा पुस्तकाच्या प्रत्येक टप्प्यावर मोल मोजावे लागत आहे. यासाठी एक साखळीच तयार झाली आहे.

सापळा फसला

निलंबित मुख्याध्यापकाच्या जागेवर प्रभारी मुख्याध्यापकांची मंजुरी देण्यासाठी एका संस्थेने प्रस्ताव दाखल केला होता. यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी मध्यस्त वकिलांमार्फत लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली. किरकोळ काम असल्याने संस्था अध्यक्षांनी थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याची कुणकुण लागल्याने शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे फिरकल्याच नसल्याने एसीबीचा सापळा फसला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेच्या हत्येप्रकरणी संशयितास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागाळा पार्क येथील बेपत्ता महिला मालती रामगोंडा पाटील (वय ५०) यांचा मृतदेह रांगणा किल्ला (ता. भुदरगड) येथील दरीत सापडला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी संशयित आरोपी संतोष गंगाराम मर्गज (वय ३५, रा. संभाजीनगर, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली.

नागाळा पार्क येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या समोरील गायत्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मालती रामगोंडा पाटील आणि विलास आनंदराव ठोमके (वय ६३) हे दोघे गेल्या सात वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आरोपी संतोष गंगाराम मर्गज हा याच ठिकाणी घरकामासाठी राहिला होता. संतोष हा मालती पाटील यांच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता.

संतोषने १४ नोव्हेंबरला मालती पाटील यांना देवदर्शन आणि वनस्पती औषध आणण्याच्या निमित्ताने भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर नेले. त्या ठिकाणी गेल्यावर संतोषने मालती पाटील यांना किल्ल्यावर गुप्तधन असल्याची बतावणी केली. संतोषने मालती पाटील यांच्या बहिणीच्या मुलीच्या नावावर ठेवलेले पैसे आपल्याला मिळावेत असा आग्रह धरला. परंतु मालती पाटील यांनी याला विरोध केल्याने संतोषने त्यांना मारहाण केली आणि रांगणा किल्ल्याच्या कड्यावरून ढकलून दिले.

यानंतर संतोष हा नागाळा पार्क येथील घरात राहत होता. याबाबत विलास ठोमके यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून संतोष मर्गजला अटक केली आहे. पोलिसांनी रविवारी व्हाईट आर्मीच्या जवानांच्या मदतीने रांगणा येथील दरीतून मृतदेह बाहेर काढला. आरोपी संतोष मर्गज याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टसाठी वर्षाला ७० लाख

$
0
0

जिल्ह्यापासून हायकोर्टापर्यंत महापालिकेच्या फेऱ्या

Appasaheb.mali@timesgroup.com

कोर्टात वर्षानुवर्षे प्रलंबित दावे, बांधकाम परवान्यापासून अतिक्रमणावरून महापालिकेशी सुरू असलेला संघर्ष, कामगारांनी न्याय हक्कासाठी कोर्टात घेतलेली धाव यामुळे महापालिकेच्या कायदेशीर कामासाठी फेऱ्या वाढल्या आहेत. जिल्हा कोर्टापासून हायकोर्टापर्यंतच्या कायदेशीर कामासाठी महापालिकेने स्वतंत्ररित्या वकिलांच्या नेमणुका केल्या आहेत. वकीलांचे मानधन, फी आणि इतर कारणासाठी खर्च होणारी रक्कम दरवर्षी ७० लाखाच्या आसपास पोहचली आहे. जिल्हापातळीवर विविध कोर्टात मिळून सुमारे ६०० दावे दाखल आहेत.

महापालिकेशी संबंधित अनेक दावे वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. काही दाव्याच्या सुनावणीवेळी हायकोर्टा पॅनेलवरचे वकील गैरहजर राहतात. तब्येतीचे कारण पुढे करत महापालिकेची बाजू प्रभावीपणे मांडत नाहीत. ज्येष्ठ वकील सुनावणीवेळी उपस्थित न राहता कनिष्ठ वकिलांना कोर्टात पाठवितात. अशा तक्रारी नगरसेवकांनी केल्या होत्या. जागेविषयीचे दावे तर २०-२५ वर्षे सुरू आहेत. ज्येष्ठ वकिलांना दरमहा १५,००० रुपये मानधन तर वरिष्ठ वकिलांना दरमहा १२,००० मानधन आहे.

एकेका वकिलाकडे दहा ते बारा केसेस

टोल प्रश्न, पंचगंगा नदी प्रदूषण, हद्दवाढ, तावडे हॉटेल बांधकाम प्रकरण, नगरसेवक पद रद्द यासह सुमारे ६० केसेस महापालिकेशी निगडीत आहेत. हायकोर्टात महापालिकेची बाजू मांडण्यासाठी पाच वकिलांची पॅनेलवर नियुक्ती केली आहे. एका केससाठी एका वकिलाला २५,००० रुपये दिले जातात. दावा दाखल झाल्यापासून निकाल लागेपर्यंत संबंधित वकिलांनी महापालिकेची बाजू मांडायची असते. प्रत्येक वकील महापालिकेचे दहा ते बारा केसेस लढवित आहे.

महापालिकेचा लाखो रुपयांचा निधी कोर्ट कामावर खर्ची पडत आहे. वर्षानुवर्षे दावे प्रलंबित असल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान वाढत आहे. काही दाव्यांत वकील आणि अधिकाऱ्यांचे संगनमत आहे. नियमानुसार कामकाजातही वकिलांचा अभिप्राय आवश्यक असल्याचे शेरे मारले जातात. काही वकिलांची महापालिकेत मक्तेदारी निर्माण झाली आहे.

भूपाल शेटे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यात सत्ताबदल झाल्यापासून बरेच प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूचे पालकमंत्री म्हणून काही महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. या हिवाळी अधिवेशनात शहरातील टोलमुक्तीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल. पंचगंगा घाट सुशोभीकरणाचा नीधी, विमानतळाचे टेकऑफ आणि शिवडाव घाटाच्या कामाबाबतही महत्त्वाचे निर्णय होतील', असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना सांगितले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'राज्य सरकारने सत्तेत आल्यापासून राज्यातील बरेच प्रश्न हाती घेतले आहेत. राज्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन, पाण्याच्या नियोजनाबात काही निर्णय घेतले जातील. याचा फायदा कोल्हापूरसाठीही होईल. कोल्हापुरात कमी पाऊस झाल्याने मे-जून महिन्यात पाणी टंचाई जाणवू शकते, त्यामुळे आत्तापासूनच उपाययोजना करण्यात येणार आहेत. जिल्ह्याचा पर्यटन आराखडा अंतिम टप्प्यात आहे. संपूर्ण जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा आराखडा मंजूरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यटनविषयक नव्याने काही धोरण निर्माण केले जात आहे, यातून कोल्हापूर पर्यटन विकासाला चालना मिळेल. टोलचा प्रश्न शहरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. टोल हद्दपार करण्याचा दिलेला शब्द राज्य सरकारकडून शंभर टक्के पाळला जाणार.'

मंत्री पाटील म्हणाले, 'पंचगंगा नदी घाट सुशोभिकरणाला मोठ्या प्रमाणात निधी मिळवून शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे ठिकाण विकसित करण्यासाठी निधी देऊ. गारगोटीपासून कोकणात उतरण्यासाठी शिवडाव घाटातून रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव मार्गी लागणार आहे. विमानतळ नव्याने सुरू होण्यासाठी किरकोळ बाबी शिल्लक राहिल्या आहेत. राज्यात उसाच्या एफआरपीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. याबाबत तोडगा निघेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरणोत्सव मार्ग ‘नो डेव्हलपमेंट’

$
0
0

समितीच्या पाहणी अहवालानंतर अंतिम निर्णय शक्य

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिराच्या वै​शिष्ट्यपूर्ण बांधकामशैलीमुळे वर्षातून दोनवेळा होणाऱ्या किरणोत्सव सोहळ्यात या मार्गातील उंच इमारतींसह वाढीव व नूतन बांधकामाचा अडथळा ठरत आहे. यासाठी महाद्वार ते ताराबाई रोडमार्गे रंकाळा टॉवर या किरणोत्सव मार्गावर कोणतेही उंच बांधकाम नव्याने करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. किरणोत्सव सोहळा कोणत्याही अडथळ्या​शिवाय व्हावा यासाठी महापालिकेच्यावतीने नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या पाहणी अहवालानंतर याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून किरणोत्सव सोहळ्यात अडथळे येत आहे. यामध्ये हवामानाच्या अडथळ्यासोबत मानवी अडथळ्यांचाही समावेश आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने समिती नेमण्यात आली आहे. प्रा. किशोर हिरासकर, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, अर्किटेक्ट जीवन बोडके, सूरज जाधव, महापालिकेचे नगररचना सहाय्यक संचालक धनंजय खोत, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांचा या समितीमध्ये समावेश आहे. या मार्गातील अडथळे निमूर्लनाचा अभ्यास महापालिकेने नियुक्त केलेल्या या तज्ज्ञांच्या समितीमार्फत शनिवारी करण्यात आला.

शनिवारी समितीच्या सर्व सदस्यांनी महाद्वाराच्या कमानीपासून पाहणी अभ्यासाला सुरूवात केली. यामध्ये अंबाबाई गाभारा ते महाद्वार आ​णि महाद्वार ते ताराबाई रोडमार्गे रंकाळ्यापर्यंतच्या किरणोत्सव मार्गातील इमारतींची पाहणी करण्यात आली.

यामध्ये मूळ इमारतींच्या उंचीसह वाढीव बांधकाम, इमारतीवरील पाण्याच्या टाक्या, शेड, पत्रा यासंदर्भातही नोंदी करण्यात आल्या आहेत. किरणोत्सव मार्गावरील जमिनीचा उंचसखल भाग आणि त्यावर उभ्या असलेल्या इमारतींच्या उंचीचे मोजमापन करण्यात आले. या पाहणीअंतर्गत केलेल्या नोंदीनुसार किरणोत्सव मार्ग विकास नियंत्रण नियमावली तयार करण्यात येणार आहे.

या मार्गावर भविष्यात बांधकाम करण्यास अटकाव करण्याबाबतचा निर्णय घेण्याच्यादृष्टीनेही काम होण्याची शक्यता आहे. तसेच शहरात अकरा मजली इमारतींना जरी परवानगी देण्यात आली तरी हा नियम किरणोत्सव मार्गातील इमारत बांधकामाच्या बाबतीत लागू न करण्याची नियमावली बनवण्याच्यादृष्टीनेही समिती सदस्यांच्या चर्चेत मुद्दे मांडण्यात येणार आहेत. याबाबत विकास नियंत्रण नियमावलीची रचना करण्यात आली आहे.

समितीने किरणोत्सव मार्गातील इमारती, वाढीव बांधकामाच्या उंचीची पाहणी केली. बांधकाम सुरू असलेल्या इमारतींच्या उंचीबाबत नियंत्रण ठेवण्याबाबत समितीच्या पाहणी अहवालात नोंदी करण्यात आल्या. येत्या एक ते दहा जानेवारी या कालावधीत समितीतर्फे टोटल स्टेशन सर्व्हे करण्यात येणार असून यामुळे नव्या वर्षातील किरणोत्सव विनाअडथळा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

- उदय गायकवाड, समिती सदस्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांचे अखेरचे डावपेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरायला अवघे ती तीन दिवस उरले असतानाही अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसल्याने काँग्रेसमधील इच्छुकांत अस्वस्थता आहे. या वातावरणात या मैदानात रविवारी भाजप, शिवसेना युतीही उतरली. त्यामुळे आता काँग्रेसमधील उमेदवाराबरोबर युतीचा उमेदवार कोण असेल, याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.

युतीकडून सध्या भाजपचे नगरसेवक विजय सुर्यवंशी यांचे नाव पुढे केले जात असले तरी भाजपबरोबरची आमदार महादेवराव महाडिक यांची जवळीक, काँग्रेसमधून त्यांची उमेदवारी कापली जाण्याची चर्चा तसेच राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेमुळे युतीचे उमेदवार यड्रावकर की महाडिक यांची चर्चा सुरू आहे. काँग्रेसमधून कुणाची उमेदवारी जाहीर होते त्यावर भाजपचा उमेदवार ठरेल, असे दिसते.

काँग्रेसमधील इच्छुक सतेज पाटील, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, आमदार महादेवराव महाडिक यांनी दिल्लीपर्यंत प्रयत्न केले. राहुल गांधी यांच्याकडून नाव जाहीर होणार असल्याने इच्छुकांतील घालमेल वाढली आहे. सतेज पाटील व महाडिक यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी टाळण्यासाठी पी. एन. पाटील यांचा पर्याय अवलंबला जाणार असल्याची चर्चा आहे. हा निर्णय हायकमांड पातळीवर असल्याने साऱ्याच इच्छुकांना प्रतिक्षेशिवाय पर्याय नाही. रविवारीच काँग्रेसच्या

उमेदवारांची नावे जाहीर झाली असती पण रविवारी राष्ट्रवादीची जागांबाबत मुंबईत बैठक असल्याने ही नावे जाहीर झाली नाहीत. रात्रीपर्यंत त्यांची खलबते सुरु होती.

दरम्यान, भाजप व शिवसेना या दोघांनीही विधानपरिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. भाजपकडे कोल्हापूरची जागा असल्याने मंत्री पाटील यांनी सकाळी नगरसेवक सुर्यवंशी यांच्याशी चर्चा करुन उमेदवारी अर्ज घेण्याची सूचना केली. त्यानुसार सुर्यवंशी सोमवारी अर्ज नेणार आहेत. बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. काँग्रेसमधून सतेज पाटील यांना उमेदवारी दिल्यास महाडिक यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत, पण पाटील यांच्याऐवजी अन्य पर्याय पुढे आला तर महाडिक काय करणार? हा प्रश्न आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची मध्यंतरी भेट घेतली. त्यामुळे भाजपने उमेदवारांची चाचपणी करुन ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.

पक्षाकडून अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच अर्ज भरणार आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाली नाही तर सोमवारी अर्ज भरणार नाही.

- सतेज पाटील

उमेदवारी जाहीर करण्याचे आता पक्षाच्या हातात आहे. त्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. आपल्याला उमेदवारी दिली तर ठिकच अन्यथा पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी राहणार आहे.

- पी. एन. पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


१३ डिसेंबरला आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'एकरकमी एफआरपी देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे टनामागे ४०० ते ५०० रुपयांची वाढ होणार असली तरीही कारखानदार रडगाणे पुढे करून एफआरपी देण्यासाठी टाळाटाळ करू लागले आहेत. उत्पादकांना एफआरपी मिळवून देण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असतानाही ते कारखानदारांना पाठिशी घालत आहे. त्यामुळे रविवारी (ता.१३) चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे,' अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार बैठकीत केली.

जयसिंगपूर ऊस परिषदेत एफआरपीप्रश्नी सहा डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता, याचा पुनरुच्चार करून शेट्टी म्हणाले, 'केंद्र व राज्य सरकारने पोषक निर्णय घेतले आहेत. एफआरपीसाठी आणखी १०० ते २०० रुपयांची आवश्यकता भासणार आहे याची हमी सरकारने घ्यावी. तरीही कारखानदार एफआरपीनुसार दर देत नाहीत. एफआरपीचे तुकडे पाडल्यास उत्पादकांचे पीककर्ज वसूल होणार नाही. त्यामुळे त्यांना सवलतीपासून मुकावे लागणार आहे.मुख्यमंत्री आठवड्याभरात सर्व साखर उद्योगाशी संबंधित घटकांची बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर साखर आयुक्तांना आरआरसींतर्गत कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत. सध्या बाजारात साखरेचे दर २५०० ते २६०० रुपयापर्यंत असल्याने महिन्याभरात उत्पादित साखर जप्त करुन बिले द्यावीत.'

कारखानदार मंत्र्यांचे पाय धरतात

सरकारमधील काही मंत्र्यांना कारखानदारांची तिरकी चाल कळत नाही. याचा फायदा घेत कारखानदार विधान भवनाच्या पाचव्या मजल्यावरील केबिनमध्ये मंत्र्यांचे पाय धरुन साखर उद्योग संकटात असल्याचे सांगतात. तेथून बाहेर पडले की यांना शेतीतील काही कळत नसल्याचे सांगितात. त्यांची दुटप्पी भूमिका सरकारने लक्षात घेऊन कारवाईचा बडगा उगावारा अशी मागणी करत, माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यापेक्षा जास्त मदत सध्याच्या सरकारने कारखानदारांना केल्याचे शेट्टींनी सांगितले.

आठ दिवसांत उत्पादक प्रादेशिक सहसंचालकांकडे तक्रार देणार

साखर जप्त करावी अन्यथा रणसंग्राम अटळ

पुढील टप्प्यात कारखानदारांना लक्ष्य करणार

विधानसभेत आमचा आवाज क्षीण

शपथविधी झाला तरी एफआरपीसाठी आंदोलन अटळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढत्या वाहनसंख्येने वाहतुकीत ब्रेक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वाहनांअभावी शहरातील दळणवळण गतीमान होणार नसले तरी नियोजनच नसल्याने या वाहनांच्या वाढत चाललेल्या संख्येमुळे दळणवळणाला लगाम घातला जात आहे. लोकसंख्या वाढेल तशी वाहन संख्या वाढणार, जिल्ह्यातून परजिल्ह्यातून वाहने येणार हे अपेक्षित असले तरी त्यांच्यासाठी रस्त्यांची रुंदी, पार्किंगबाबतचे नियोजन कोलमडत चालले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील निम्मे वर्ष सरत असतानाच दुचाकी वाहनांच्या संख्येत ४२ हजारांनी वाढ झाली आहे. इतर सर्व वाहनांची संख्या १० हजारांनी वाढली आहे. त्यामुळे दुचाकींच्या संख्येत होत असलेली ही भाराभर वाढच वाहतुकीच्या अनेक समस्या वाढवत आहे.

शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीची अवस्था वाईट आहेच, पण गल्लीतील दहा फुटी रस्त्याची अवस्था पाहिल्यास रस्त्यावरील चारचाकी, दुचाकी पार्किंगने वाहनधारक मेटाकुटीला येत आहेत. हा अनुभव सामान्य नागरिकांनाबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही येत असूनही याबाबत वाहतूक नियोजनाबाबत काहीच हालचाली होत नसल्याची परिस्थिती फारच भयावह आहे.

शहर हे जिल्ह्याचे मुख्यालयाचे ठिकाण आहे. त्यामुळे येथे असलेल्या सरकारी कार्यालयातील कामासाठी जिल्ह्यातून नागरिक ये जा करतात. त्याचबरोबर कोकणात जाण्यासाठी कोल्हापूर हे प्रवेशद्वार समजले जाते. तर व्यापार, व्यवसायासाठी कोकणातील अनेक भाग कोल्हापूरसारख्या परिसरावर अवलंबून असतो. यामुळे शहराचे महत्व असल्याने लोकसंख्या वाढत आहे. या लोकसंख्येसाठी भासणाऱ्या वाहनांच्या गरजेमुळे वाहनसंख्याही वाढत चालली आहे. पण या वाढणाऱ्या वाहनसंख्येमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीची सोडवणूक करण्यासाठी कोणतीच यंत्रणा प्रयत्न करताना दिसत नाही.

दुचाकींच्या संख्येत होत असलेली कमालीची वाढ हा मोठा प्रश्न बनत आहे. त्याबाबत सरकारी यंत्रणा फार गांभीर्याने घेतच नाही. कोणत्याही रस्त्यावरील परिस्थिती पाहिल्यास अन्य वाहनांपेक्षा मोटरसायकल, स्कूटरेट यांचीच संख्या जास्त दिसते. पण त्यांच्या वाहतुकीबाबतचे, पार्किंगचे नियोजन योग्य होत असेल तर वाढणारी संख्या त्रासदायक होणार नाही. पण ते नियोजनही दिसत नाही. अजून निम्मे वर्षच झाले असताना दुचाकी वाहनांच्या संख्येत झालेली वाढ या प्रश्नाचे मूळ दिसत आहे. वाहनांचा थेट संबंध शहर वाहतूक नियंत्रण शाखेशी दिसत असल्याने नागरिक पोलिसांना दोष देत असले तरी त्यांच्याकडे वाहतुकीच्या नियमनाचा एक भाग आहे.

गल्लीतील वाहनांची रांग वाढत आहे

गल्लीत पूर्वी एखादी चारचाकी उभी असलेली पहायला मिळायची. आता गल्लीतील बहुतांश भाग चारचाकी वाहनांनी जवळपास व्यापलेला पहायला मिळत आहे. दुचाकीही रस्त्यावरच असल्याने वाहनांची संख्या वाढलेली सहज पहायला मिळते. त्यामुळे जोपर्यंत वाहन स्वतःच्या जागेत, वाहतुकीला अडथळा ठरणार नाही अशा ठिकाणी उभे करण्याची सोय नाही, तोपर्यंत वाहन खरेदी करता येणार नाही अशा प्रकारच्या नियमांचा अवलंब भविष्यात झाला तर कुठे या संख्येवर नियंत्रण आणणे शक्य होईल.

छोट्या रस्त्यांवरही पार्किंग

मोठ्या रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग केले जात आहेच. पण शहरातील अनेक गल्ल्यांतील छोट्या रस्त्यांवरील पार्किंग फार डोकेदुखी बनत आहे. मोठ्या रस्त्यांवर पोलिसांकडून काहीवेळा पार्किंग काटेकोरपणे करण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण या छोट्या रस्त्यांवरील पार्किंगकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष असते. जुन्या पेठांमधील गल्ली अशा पार्किंगची मोठी उदाहरणे आहेत. एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने चारचाकी वाहनांची रांग रस्त्यावर पहायला मिळते. दोन्हीबाजूला या वाहनांमुळे गरज नसतानाही वाहनधारकांना झिगझॅग स्टाईलने वाहन चालवावे लागत असल्याची परिस्थिती आहे. काही रस्ते वाहनांसाठी बंद करण्याची आता आवश्यकता झालेली असताना त्याबाबत प्रयत्न होत नाहीत.

महापालिकेची यंत्रणा अपुरी

महापालिकेचीही मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही यंत्रणांकडून मात्र वाहतुकीचा प्रश्न प्रभावीपणे हाताळला जात असल्याचे अजिबात दिसत नाही. महापालिकेची यंत्रणा केवळ परवानगी देण्याशिवाय इतर काही विचारच करत नसल्याची ​परिस्थिती आहे. निवासी इमारती, व्यावसायिक संकुलांची परवानगी देत असताना तिथे येणाऱ्या वाहनधारकांच्या पार्किंगचे नियोजन काटेकोरपणे पाहिले जात नसल्याने ही वाहने रस्त्यावर येत आहेत. प्रत्येक रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने पार्किंग केलेली पाहायला मिळत आहेत. त्यातून महापालिकेकडून पार्किंगचे नियोजन होत नाही. तसेच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना पार्किंगची पुरेशी व्यवस्था देऊ शकलेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्याय संकुल विनापरवाना बांधले

$
0
0

परवाना नसल्याचा प्रजासत्ताक संस्थेाचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा रस्त्यावरील उदघाटनाच्या प्रति​क्षेत असलेल्या न्याय संकुलाचे बांधकाम विनापरवाना करण्यात आल्याचा आरोप प्रजासत्ताक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत केला. 'या इमारतीच्या उदघाटनाला आमचा विरोध नाही. मात्र कायदा डावलून इमारतीचा वापर केला झाला तर दखलपात्र गुन्हा दाखल करू', असे देसाई यांनी सांगितले.

देसाई म्हणाले, 'सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारच्या निधीतून न्याय संकुल उभारले आहे. नऊ एप्रिल २००९ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजत इमारतीसाठी बांधकाम परवान्याची मागणी महापालिकेकडे केली. जिल्हा न्यायाधीशांनी २६ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे त्याबाबतचा विनंती अर्ज केला आहे. मात्र महापालिकेने इमारतीच्या बांधकामासाठी परवानगी दिलेली नाही. बांधकाम परवानगीबाबतच्या त्रुटी २९ मे, एक ऑगस्ट आणि २४ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविल्या आहेत. महापालिकेने न्याय संकुलाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अटकाव केला नाही ही गंभीर चूक आहे. इमारतीचे बांधकाम ज्या ठिकाणी झाले, त्या भुखंडांचे रेखांकन झालेले नाही. भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी होऊन हद्द व क्षेत्र निश्चित झालेले नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीन बिगरशेती वापरण्याच्या अनुषंगाने आवश्यक परवानगी मागितलेली नाही. न्यायसंकुलासाठी चार हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर बांधकाम झाल्याने नियमानुसार एसटीपी प्लांटच्या व्यवस्थेचे पालन झालेले नाही. पर्यावरण विभागाकडून ना हरकत दाखला घेतलेला नाही. या भुखंडातील ९३ गुंठे जमीन बळकावली गेली असल्याची तक्रार करवीर प्रांताधिकारी यांच्याकडे प्रलंबित आहे. ९३ गुंठे जागा बळकावली गेल्याची माहिती प्रजासत्ताक संस्थेने यापूर्वी उघड केली आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ नुसार भुखंडाचा विनापरवाना वापर, वापरात बदल, विनापरवाना बांधकाम, विनापरवाना विकास या सर्व बाबी दखलपात्र गुन्हा असून त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. न्याय संकुलाचे बांधकाम बेकायदेशीर आहे. त्याचा वापर करणेही बेकायदेशीर ठरेल. या जागेत न्यायालय त्वरीत सुरू व्हावे असे वाटत असेल तर उदघाटनापूर्वी सर्व परवानग्या पूर्ण कराव्यात.' यावेळी अरविंद साळोखे, सचिव बुरहाण नायकवाडी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांची मानसिकता नाही

विनापरवाना बांधकामाबाबत यापूर्वी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही तक्रार दिली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत याबाबत चर्चा केली पाहिजे. मात्र त्यांची तशी मानसिकता नसल्याने विनापरवाना बांधकाम झालेल्या न्यायसंकुलाच्या उदघाटनासाठी हालचाली सुरू आहेत' असा आरोप दिलीप देसाई यांनी केला.

न्याय संकुलाच्या बांधकामांसाठी आम्ही परवानगी घेतलेली आहे. याबाबत जर प्रजासत्ताक संस्थेकडून दिलीप देसाई यांनी आमच्या विभागाला नोटीस पाठविली तर आम्ही त्यांना उत्तर देण्यास बांधील आहोत.

- एस. बी. शेख, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोट्या सहीने मोटार परस्पर विकली?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खोटी सही करून चारचाकी मोटार विकल्याच्या प्रकरणाचा तपास करण्याबरोबरच अशा प्रकरणांचा छडा लावण्यासाठी छत्रपती ताराराणी विकास आघाडी व दलित सेनेने सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या प्रकरणाची पोलिस चौकशी करण्याबाबत लेखी पत्र देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अज्ञात चोरट्यांनी गणेशवाडी येथील सुवर्णा रामदुर्ग यांच्या मालकीची विंगर ही चारचाकी मोटार भाड्याने पाहिजे असे सांगत रंकाळा परिसरात बोलवले. ड्रायव्हरला धमकी दाखवून चोरट्यांनी ती मोटार चोरून नेली. तसेच रामदुर्ग यांची खोटी सही करुन ती गाडी परस्पर विकली. या फसवणुकीबाबत लोकशाही दिन, मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांकडे तक्रार केली होती. तहसीलदारांनी आरटीओ व पोलिस निरीक्षकांना कारवाई करण्याबाबतचे पत्र दिले होते. मात्र, यामध्ये काहीच प्रगती होत नसल्याने दोन्ही संघटनांनी लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सुवर्णा रामदुर्ग, प्रसाद धर्माधिकारी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी आरटीओ कार्यालयाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे हे सांगली दौऱ्यावर होते. त्यांच्याशी चर्चेशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने सायंकाळी दराडे कार्यालयात आल्यानंतर आंदोलकांशी चर्चा झाली. त्यावेळी याबाबत पोलिस चौकशी सुरू करण्याचे लेखी पत्र देण्याचे आश्वासन दराडे यांनी दिले. त्यानुसार सात वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. यामध्ये संजय कुरुंदवाडे, पांडुरंग पवार, सिद्राम बागडी, सत्यान्ना चौगुले, प्रविण रामदुर्ग आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘देवस्थान’चा गैरव्यवहार दडपला

$
0
0

महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील चौकशीची प्रत्येक दिवशी माहिती देणाऱ्या एसआयटीचे प्रमुख संजयकुमार हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मूग गिळून गप्प आहेत. ही माहिती दाबून ठेवण्यासाठी त्यांना बारामतीवरुन की अन्य कोणाकडून पैसे आले का?' असा आरोप श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचार विरोधी कृती समितीचे सल्लगार वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

'अंबाबाई मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील शौचालय हटवून कुंड भाविकांसाठी तत्काळ खुले न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. 'देवस्थान समितीतील भ्रष्टाचार प्रकरण उघडकीस आणले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी पानसरे यांची हत्या झाली का' याविषयी साशंकता आहे. भ्रष्टाचार प्रकरणावरील हिंदुत्ववादी संघटनांचे लक्ष वळविण्यासाठी काही प्रयत्न झाले का?' असाही संशयही त्यांनी व्यक्त केला.

इचलकरंजीकर म्हणाले, 'देवस्थान समितीच्या कारभारातील घोटाळे हिंदू विधिज्ञ परिषदेने पुराव्यांसह उघड केले. त्याची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक करत आहे. पण त्या पथकाचे नेतृत्व करणाऱ्या संजयकुमार यांनी याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. उलट त्यानंतर पानसरे यांची हत्या झाल्यानंतर त्यातील संशयित म्हणून अटक केलेल्या समीर गायकवाड याची इत्यंभूत माहिती ते दररोज देत होते. त्यातून त्यांना देवस्थानमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण दाबायचे होते असे स्पष्ट होते. त्यासाठी त्यांना पैसे दिले गेले असण्याची शक्यता आहे. अंबाबाईच्या भक्तांची संख्या मोठी आहे की पानसरेंच्या समर्थकांची संख्या मोठी आहे हे आम्हाला समजून येत नाही.'

'मनकर्णिका कुंडाबाबत देवस्थान समितीने भाविकांच्या भावनांशी हेळसांड केली आहे' असा आरोप करून इचलकरंजीकर म्हणाले, 'सन २०१३ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेऊन शौचालय काढून टाकण्याचे आणि कुंड पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. तत्कालिन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी ते शौचालय काढून टाकण्यात यावे असे आदेश दिले होते. त्याबाबत पाठपुरावा केल्यावर देवस्थान समिती, जिल्हाधिकारी कार्यालयाने पत्राची साधी पोहोच दिली नाही. पुरातत्व खात्यानेही दुर्लक्ष केले आहे. कुंड पूर्ववत सुरू केले नाही तर आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राज्य गुन्हे अन्वेषण चौकशीतून काय समोर आले याचा पाठपुरावा करण्यासाठी समितीचे शिष्टमंडळ लवकरच त्या विभागास भेटणार आहे.' यावेळी सुनील घनवट, महेश उरसाल, संभाजी साळुंखे, प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images