Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्हा परिषदेत रिपब्लिकन सेनेचा राडा

0
0



अधिकारीच उपस्थित नसल्याने संताप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिष्यवृत्तीप्रश्नी दीर्घकाळ प्रतीक्षा करूनही निवेदन स्वीकारण्यास अधिकारी जागेवर नसल्याने संतप्त झालेल्या रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, समाजकल्याण अधिकारी आणि शिक्षण सभापती दालनाची मोडतोड केली. कार्यकर्त्यांनी तेथील फलकांचीही मोडतोड केली.

९ वी व १० वीत शिकणाऱ्या मुला-मुलींना शिष्यवृत्ती न मिळाल्याने निदर्शने करणार असल्याची पूर्वसूचना संघटनेने बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी, समाजकल्याण व शिक्षण विभागाला दिली होती. मात्र गुरूवारी सकाळी ११पासून १ वाजेपर्यंत अधिकारीच जागेवर नव्हते. कधी समाजकल्याण विभाग तर कधी शिक्षण सभापती तर कधी शिक्षणाधिकाऱ्यांकडे बोट दाखवत कार्यकर्त्यांना दोन तास टोलवाटोलवी करण्यात आली. त्यामुळे संपप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या कचेरीवर हल्ला केला आणि घोषणाबाजी सुरू केली. त्यांच्या दालनाच्या दरवाजा आणि नामफलकाची मोडतोड केली. दरम्यान, जिप सदस्य सुरेश कांबळे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे जागेवर नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी शिक्षण विभाग अधीक्षक एस.ए.शेख यांना धारेवर धरले. आठवडाभरात मुख्याध्यापकांची बैठक घेऊन दोषींवर कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. एक महिन्यात शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वसान उपाध्यक्ष श‌शिकांत खोत, समाजकल्याण सभापती किरण कांबळे व समाजकल्याण अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी रिपब्लिकन सेना शहर प्रमुख राजेंद्र कांबळे, जितेंद्र कांबळे, शैलेश कांबळे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायसंकुल इमारत उद‍‍‍‍‍‍‍‍‍‍्घाटनावर बहिष्कार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे, या मागणीसाठी मुख्य न्यायमूर्तीच्या १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या न्यायसंकुल इमारतीच्या उद्घान सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हायकोर्टातील अवमान याचिकेबाबत म्हणणे मांडण्यासाठी एक महिन्याची मुदत मागण्याचा निर्णयही घेतलयाची माहिती माहिती खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी साताऱ्याचे जेष्ठ विधिज्ज्ञ धैर्यशिल पाटील होते.

न्यायालय अवमान याचिकेबाबत सहा जिल्ह्यांचे म्हणणे मांडण्याबाबत आयोजित केलेल्या बैठकीत कोल्हापूर बार असोसिएशनमधील दुफळी दिसून आली. अध्यक्ष राजेंद्र चव्हाण व माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांच्यातील शाब्दिक खडाजंगी, आव्हान-प्रतिआव्हाने देण्याची भाषा करत एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याच्या घटनेमुळे ज्येष्ठ वकिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खंडपीठ कृती समितीत जिल्हा बारच्या राजकारणाचे पडसाद उमटले, तर यापुढे पाठिंबा देणाऱ्या पाच जिल्ह्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही दिला. बैठकीला कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूरचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मांची तडकाफडकी बदली

0
0

गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपासावर प्रश्नचिन्ह; प्रदीप देशपांडे यांची नियुक्ती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास करणारे प्रमुख अधिकारी व पानसरे हत्येप्रकरणी संशयित, सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याला अटक करण्याचे धाडस दाखवणारे पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची मुंबई पोलिस उपायुक्तपदी बदली झाली. त्यांच्याजागी नाशिक सीआयडी अधीक्षक प्रदीप देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, पानसरे प्रकरणानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार व अतिरिक्त पोलिस ​अ​धीक्षक अंकित गोयल यांच्या बदलीपाठोपाठ शर्मा यांचीही बदली केल्याने उलटसुलट चर्चेला वेग आला आहे.

समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू असतानाच शर्मा यांची तडकाफडकी बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या बदलीचे वृत्त गुरूवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलिस मुख्यालयात धडकताच सन्नाटा पसरला. पानसरे यांच्या हत्येनंतर शर्मा यांनी अत्यंत कुशलेतेने परिस्थिती हाताळत तपास केला होता. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार असताना सनातन संस्थेचा प्रमुख साधक गायकवाडला अटक करण्याचे धाडस दाखवल्याबद्दल पुरोगामी चळवळीतील नेते व कार्यकर्त्यांत त्यांच्याविषयी आदर होता. समीर गायकवाडवर आरोपपत्र दाखल करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच समीरने पोलीसांच्यावर केलेल्या आरोपाची चौकशी करुन त्याचा अहवाल कोर्टाला द्यावा असा आदेश एसआयटीचे संजयकुमार यांनी शर्मा यांना दिला आहे.

शर्मा यांनी २० फेब्रुवारी २०१४ मध्ये अधीक्षकाचा पदभार स्वीकारला होता. पोलिस दलातील लैगिंक शोषण प्रकरणामुळे कोल्हापूर पोलिसांच्या प्रतिमेला धक्का बसला असल्याने ही प्रतिमा सुधारण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. कर्मचाऱ्यांची घराजवळ बदली, पोलिसांचे आरोग्य, पोलिसांच्या अडचणी यावर त्यांनी विशेष लक्ष देऊन पोलिसांची कार्यक्षमता वाढवली होती. सीसीटीएनएस, व्हॉटस् अपॅरवर तक्रारी हे उपक्रम त्यांनी राबवले. त्यांच्या २२ महिन्याच्या कारकीर्दीत अवैध धंद्यावर पूर्णपणे चाप बसवला होता. मटका, जुगार अड्डे, बेटिंगवर कारवाई केल्याने कोल्हापुरात मटका व जुगार बंद होता.

लागोपाठ तिसऱ्या अधिकाऱ्याची बदली

पानसरे यांच्या हत्येनंतर कोल्हापूर देशात गाजले. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अचानक दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार व अतिरिक्त पोलिस ​अ​धीक्षक अंकित गोयल यांचा समावेश होता. तेव्हाच या बदलीविषयी संशय व्यक्त करण्यात आला होता. आता शर्मा यांचीही अचानक बदली केल्याने संशयात भर पडली आहे. त्यांच्या बदलीसंदर्भात उलट सुलट चर्चा सुरू असताना शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता बदलीसाठी विनंती अर्ज केला होता असे सांगितले. सरकारने मागणी मान्य केली. कोल्हापुूरच्या जनतेने मला खूप प्रेम व आदर दिल्याने मला घरी असल्याचे जाणवायचे. कारकीर्दीत लोकसभा व विधानसभा निवडणुका शांततेत पार पाडल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्याय संकुलाला उद‍्घाटनाची प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कमानींच्या रचनेमुळे सौंदर्याने नटलेल्या न्याय संकुलाची इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे हस्तांतरणाची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. मुंबई हायकोर्टानेही उदघाटनाच्या तारखेबाबत जिल्हा न्यायाधीशांच्याकडे विचारणा केली असून प्रशासन व जिल्हा बार असोसिएशन यांच्यात चर्चा सुरू आहे.

कसबा बावडा रोडवर २५ हजार ३३० स्केअर मीटरवर न्यायसंकुलाची सहा मजली इमारत पूर्ण झाली असून कमानीमुळे इमारतीचे सौंदर्य खुलले आहे. प्रशस्त व्हरांडे, हवेशीर व प्रकाश देणाऱ्या खिडक्या यामुळे या इमारतीत विजेची बचत होणार आहे. या इमारतीत ४३ कोर्ट असल्याने न्यायाधीश वकील, कर्मचारी, पक्षकार हे एका छताखाली येण्यास मदत होणार आहे. पार्किंगसाठी मोठी जागा असल्याने वाहतुकीची कोंडी टळणार आहे. सीपीआर हॉस्पिटलसमोरील जिल्हा न्यायालयाच्या आवारातील सर्व न्यायालये व शहरात अन्य ठिकाणी असलेली न्यायालये नवीन न्याय संकुलात आणली जाणार आहेत. २००९ मध्ये कामांची वर्कऑर्डर काढण्यात आली. तब्बल सहा वर्षात ही इमारत पूर्ण झाली आहे.

इमारत उभारणी प्रक्रिया

७ सप्टेंबरर २००७ रोजी न्याय संकुल उभारण्याचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

१४ ऑगस्ट २००९ रोजी बांधकाम विभागाकडून कामाची वर्कऑर्ड

तत्कालिन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडून ३१ कोटी रूपयांचा निधी मंजूर

१४ ऑगस्ट २०११ मध्ये काम पूर्ण करण्याची मुदत

निधीच्या अडचणीमुळे काम करण्याची मुदत २०१३ पर्यंत वाढवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवपुत्र संभाजी महानाट्य २३ पासून कोल्हापुरात

0
0

शंभरावर कलाकार, शंभरफुटी स्टेज

कोल्हापूर टाइम्स टीम

संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित पहिले महानाट्य अशी ओळख असलेल्या ‌शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग २३ ते २८ डिसेंबर या कालावधीत शिवाजी स्टे‌डियम येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहेत. शंभरफूटी स्टेज व शंभरहून अधिक कलाकारांसह हत्ती, घोडे, उंट असा शाही थाट अशी पर्वणी या महानाट्यांच्या माध्यमातून अनुभवता येणार असल्याची माहिती या नाटकात संभाजी राजेंची भूमिका करणाऱ्या डॉ.अमोल कोल्हे यांनी पत्रकार प‌रिषदेत दिली.जगदंब प्रॉडक्शन प्रस्तुत व राजदीप प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचा दौरा कोल्हापुरात आयोजित केला आहे. शाहीर महेंद्र महाडिक यांनी या नाटकाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. आलमगीर औरंगजेबाच्या भूमिकेत रवी पटवर्धन तर शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आहेत. स्थानिक कलाकारांनाही या महानाट्यात संधी मिळणार असून इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.



शिवाजी महाराज व शंभू राजे यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा

हत्ती, घोडे व बैलगाड्यांचा प्रत्यक्ष वापर

रंगमंचावर जहाजाचा वापर करून जंजिरा मोहीम दृश्य

किल्ल्याची हुबेहुब फिरती प्रतिकृती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तणावमुक्तीसाठी योगसाधना आवश्यक’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'तणावमुक्त जगण्यासाठी योगसाधना अत्यावश्यक आहे,' असे मत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व्ही. बी. पायमल यांनी व्यक्त केले. राज्य मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळ कर्मचाऱ्यांसाठी आयोजित योगसाधना शिबिराच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

अध्यक्ष पायमल म्हणाले, 'कामाचा व्याप, ताणतणाव आणि वेळेवर आहार नसल्याने अनेक रोगांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेकांची शारीरिक आणि मानसिक स्थिती बिघडते. त्यासाठी योगसाधना हा चांगला उपाय आहे.'

मंडळाचे सचिव शरद गोसावी म्हणाले, 'आरोग्यदायी जीवनशैलीमुळे कार्यक्षमतेत दुप्पटीने वाढ होते. नियमित प्राणायाम आणि योगासने केल्यास अनेक रोगांना सहजपणे दूर ठेवणे शक्य आहे.'

योगप्रशिक्षक प्रा. शशिकांत कापसे यांनी प्रात्याक्षिकांचे सादरीकरण केले. शिबिरात सहभागी झालेले सुरेश कारंडे, राजेश सावंत, भाऊसाहेब आंबी, प्रभाकर कुलकर्णी, दत्तात्रय हंकारे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सहायक सचिव बाळासाहेब शेटे, लेखाधिकारी दिलीप कदम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवेकानंद कॉलेजची हॅट्ट्रिक

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठ महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धेत विवेकानंद कॉलेजच्या 'विवेक' नियतकालिकाने सलग तिसऱ्या वर्षी पहिला क्रमांक मिळवित हॅट्ट्रिक साधली.

विवेक अंकाची उत्कृष्ट छपाई, उत्कृष्ट मुखपृष्ठ, उत्तम साहित्य, छायाचित्रांचा निकषावर यश मिळाले आहे. या अंकासाठी लेखन केलेल्या ९ विद्यार्थ्यांना उत्कृष्ट साहित्य लेखन व विविध कलाकौशल्यासाठी विद्यापीठाची पारितोषिक जाहीर झाली. भाग्यश्री रेडेकर (कविता लेखन), सायली कांबळी (आत्मकथनात्मक लेख) ,गीता कुलकर्णी (हिंदी मुलाखत, संस्कृत वैचारिक लेख), स्वाती खुर्दाळे (हिंदी आत्मकथा), नेहा ऐवळे (हिंदी यात्रा वर्णन), सचिन गडकरी (इंग्रजी लेख), मोहिनी जाधव (इंग्रजी लेख), अमित माळकरी (चित्रकला) यांना पारितोषिक जाहीर झाली.

प्राचार्य हिंदुराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंकासाठी विभागीय संपादक डॉ. डी. ए. देसाई, डॉ. एस. एम. जाधव, प्रा. एस. एम. रुईकर, बी. के. गोसावी, डॉ. टी. पी. गौपाले, कनिष्ठ विभागीय संपादक पी. एम. गवळी, एम. ए. पिरजादे, एस. एस. जगताप, एस. बी. लाड यांनी काम पाहिले. छायाचित्रण विभागासाठी प्रा. किरण पाटील, एस. जी. शिंदे, संदीप पाटील यांनी काम पाहिले. अंकाचे प्रमुख संपादक म्हणून प्रा. नंदकुमार रानभरे यांनी काम पाहिले. अंकाच्या निर्मितीसाठी विद्यार्थी प्रतिनिधी आशिष ढाले, विद्यार्थी संसद मंडळाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांचे प्रोत्साहन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आक्कासाहेबां’सोबत आज मनमुराद गप्पा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'पुढचं पाऊल' मालिकेत 'आक्कासाहेब' ही भूमिका वठवणाऱ्या अ​भिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्यासोबत गप्पा मारण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळणार आहे.

महाराष्ट्र टाइम्सतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.५) सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी पार्क येथील हॉटेल के ट्री येथे हा कार्यक्रम रंगणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांना कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. हर्षदा यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आयो​जित कार्यक्रमात मर्यादित प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच हा कार्यक्रम रसिकांसाठी मोफत आहे.

'दामिनी' मालिकेतील भूमिकेपासून अभिनयाच्या क्षेत्रात लोकप्रिय ठरलेल्या खानविलकर यांची 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेतही महत्त्वाची भूमिका होती. सध्या त्या 'पुढचं पाऊल' या मालिकेत आक्कासाहेब सरदेशमुख ही भारदस्त व्यक्तिमत्वाची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे या मालिकेतील सरदेशमुख हे प्रस्थ कोल्हापुरातील प्रख्यात उद्योजक असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेतून रसिकांना कोल्हापूरशी संबंधित संदर्भ अनुभवता येत आहेत.

गप्पांतून हर्षदा खानविलकर यांच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल जाणून घेता येणार आहे. तसेच ​सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांमधील त्यांच्या भूमिकेतील अनुभवांबाबतही कोल्हापूरकर त्यांना बोलतं करू शकतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधीअभावी चौक उजाड

0
0

सुशोभिकरण रेंगाळल्याने विद्रुपीकरणात भर

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरात ठिकठिकाणी महापुरूषांची स्मारक साकारली आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर रहावा हा त्या मागील उद्देश आहे. महापुरूषांच्या या पुतळा परिसराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली. मात्र निधीअभावी पुतळे आणि परिसर सुशोभिकरणाचे काम रखडले आहे.

दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज पुतळा आणि लक्ष्मीपुरीतील आईसाहेब महाराज यांचा पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या धर्तीवर अन्य पुतळे आणि परिसर विकसित करण्याची आवश्यकता आहे. यामुळे शहर सौंदर्यातही भर पडणार आहे.

कावळा नाका, व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ अशा ​​विविध परिसरात महापुरूषांची पुतळ्यांची स्थापना, स्मारक साकारले आहेत. राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, महात्मा फुले, छत्रपती ताराराणी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा पुतळा, व्हीनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज यांचा पुतळा या परिसराचे सुशोभिकरण, सौंदर्य खुलविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. पुतळा परिसरात आकर्षक प्रकाश योजना, एलइडी दिव्यांची सोय, परिसराचे सुशोभिकरण प्रस्तावित आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली.

दरम्यान, महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे मार्ग आटल्याने विविध विकास कामासाठी तरतूद केलेल्या निधीला कात्री लागत आहे. यामुळे चौक सुशोभिकरण, पुतळा व परिसर सौंदर्य खुलविण्याच्या प्रस्तावासाठी सध्या निधी मंजूर केलेला नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येते. शहरातील विविध चौकातील आयलँडची दुरवस्था झाली आहे. राजारामपुरीतील माऊली पुतळा परिसराची दुरवस्था झाली आहे. गोलाकार आकारात कारंजाची बांधणी झाली, पण गेले काही महिने कारंजा बंद आहे. बागल चौकातील स्तंभाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. महापुरूषांच्या पुतळा परिसराचे सुशोभिकरण, एलडी दिव्यांची आकर्षक मांडणी ही कामे झाली नाहीत.

नगरसेवकांचा हलगर्जीपणा

चौक सुशोभिकरण आणि लोकसहभागातून प्रभागातील आयलँड उभारणीत स्थानिक नगरसेवकांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. त्यांनी पुढाकार घेतला तर कामे मार्गी लागू शकतात. मात्र त्याकडे अनेकजण लक्ष देत नाहीत. चौक सुशोभिकरणात स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेतला तर परिसराचा कायापालट होऊ शकतो. महापालिकेच्या निधीतून दसरा चौक परिसरातील राजर्षी शाहू महाराज पुतळा व लक्ष्मीपुरीतील आईसाहेब महाराज चौक पुतळा परिसराचे सुशोभिकरण याचे उत्तम उदाहरण आहे. इतर ठिकाणीही नगरसेवकांनी पुढाकार घेतला तर, शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

अंबाबाई मंदिरावरही आकर्षक रोषणाई !

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर, छत्रपती संभाजी महाराज पुतळा, संत गाडगे महाराज पुतळासह विविध महापुरूषांच्या पुतळा परिसरात रोषणाई आणि एलइडी दिव्यांची आकर्षक रचना करण्यासाठी आर्थिक तरतूद केली होती. अंबाबाई मंदिरावर एलइडी दिव्यांच्या रोषणाईसाठी पुरातत्व खात्याकडे परवानगीचा प्रस्ताव देवस्थान समितीच्या पातळीवर सुरू आहे. महापालिका प्रशासन या संदर्भातील प्रस्ताव तयार करत आहे. माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी अंदाजपत्रकात पुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी निधीची तरतूद केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापक मारहाणीचे पडसाद

0
0

महाविद्यालयाचे कर्मचारी; विद्यार्थ्यांकडून निषेध

इस्लामपूर : कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील प्रा. डॉ. नितीन शिंदे यांना गुरुवारी परीक्षा प्रक्रियेदरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेचा शुक्रवारी निषेध नोंदवण्यात आला. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून कामकाज केले. आज (शनिवार) तहसीलदारांना मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असताना गुरुवारी कॉपी पकडल्याच्या रागातून मानसिंग पाटील याने डॉ. नितीन शिंदे यांना मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर प्राचार्य डॉ. जे. के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा झाली. महात्मा फुले शिक्षण संस्थेचे सदस्य भाई एस. टी. माने, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे धनाजी गुरव, निवृत्त उपप्राचार्य एल. डी. पाटील, डॉ. नितीन शिंदे, अंनिसचे राज्य सरचिटणीस संजय बनसोडे, एस. टी. गायकवाड, प्रा. एकनाथ पाटील उपस्थित होते.

एन. डी. पाटील, सरोज पाटील पोलिस ठाण्यात

गुन्हा दाखल होऊन २४ तास उलटून गेले तरी पोलिसांनी संबंधित आरोपीला का अटक केली नाही. त्याला तातडीने अटक करून त्याच्यावर कारवाई करा, अशी आग्रही मागणी ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील आणि त्यांच्या पत्नी सरोज पाटील यांनी स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन केली. पोलिसांनी या प्रकरणात टाळाटाळ केली म्हणून स्वतः एन. डी. पाटील व सरोज पाटील यांच्यासह कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचा सर्व स्टाफ उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना भेटला. प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, 'गुरुवारपासून आतापर्यंत पोलिस कारवाई थंड का आहे. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी. गुन्हेगारांना पाठिशी घालायला नको, त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा त्याला व्हायलाच हवी. '



कुलगुरू इस्लामपुरात

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे व परिक्षा विभाग प्रमुख महेश काकडे यांनी शुक्रवारी महाविद्यालयाला भेट देऊन चर्चा केली. सदर घटनेची आणि या कॉपी प्रकरणाची तपशीलवार माहिती असणारा अहवाल महाविद्यालयाने विद्यापीठाला सादर करावा. विद्यापीठ नियमानुसार संबंधितांवर कारवाई करेल, असेही शिंदे म्हणाले. महाविद्यालयाने परीक्षेसाठी पोलिस संरक्षण मिळावे, असे पत्र पोलिसांना दिले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रांगा लागल्यास टोल न घेता वाहने सोडा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

ग्वाल्हेर-बेंगळुरू आशियाई महामार्गावरील टोल व टोल नाक्यांविषयी जनतेत मोठा रोष आहे. येथील टोल नाक्यांवर मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या रांगा टोल व्यवस्थापनाने बंद होण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा लांबच्या लांब रांगा लागल्यास टोल न घेता वाहने सोडा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुद्‍गल यांनी दिले आहेत.

महामार्गाच्या सहापदरीकरण कामकाजाबाबत जिल्हाधिकारी अश्विन मुद्‍गल यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी वरील निर्देश देतानाच सहापदरीकरणाचे काम करणाऱ्या रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत आनेवाडी व कराडजवळील तासवडे हे दोन टोलनाके लागतात. या टोलनाक्यांवरील गचाळ व्यवस्थापनामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होऊन लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. यामधून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मदत पुरवूनही कामात कुचराई : अभिनव देशमुख

बैठकीला उपस्थित असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, आवश्यक त्यावेळी आणि त्याठिकाणी पोलिस यंत्रणा देण्यात येते. परंतु आपल्याकडून कामात कुचराई केली जाते. अनेक ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे. त्याठिकाणी अत्यंत अरुंद मार्ग आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आणि अतिशय उंच असे स्पीडब्रेकर निर्मिती केली आहे. वळणाच्या ठिकाणी फलक लावावेत, रेडियम लावावे, पुलाच्या ठिकाणी रेडियम आणि रिफ्लेक्टर लावावेत. याचा आढावा वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन शाखेने घ्यावा, असेही देशमुख म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात ‘सिद्धेश्वर समिती’

0
0

सोलापूर : जानेवारी महिन्यात होणाऱ्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेबाबत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि सिद्धेश्वर देवस्थान कमिटी यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मंदिर परिसरात मॅट आणि आपत्कालीन रस्त्यांबाबत मुंढे आग्रही आहेत.

दरम्यान, वस्तुस्थिती स्पष्ट करण्याबरोबरच प्रशासनाच्या भूमिकेबाबत दिशा ठरविण्यासाठी शनिवारी दुपारी दोन वाजता सिद्धेश्वर भक्तांची महत्वाची बैठक बोलविण्यात आली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरीक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

सुमारे ९०० वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर यात्रेला आडकाठी आणून जिल्हाधिकारी मुंढे यात्रेची परंपरा खंडीत करत असल्याचा आरोप मंदिर समितीकडून करण्यात येत आहे. परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यासाठी संघर्षाची तयारी ठेऊन यात्रा यशस्वी करण्याचा निर्धार केला असल्याचे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादा यांनी सांगितले.

मॅट व आपत्कालीन रस्त्याला मंदिर समितीचा विरोध असून, मॅटमुळे धुळीचा त्रास संपणार नाही. उलट त्यावरुन पाय घसरुन पडण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय नंदीध्वज धारकालाही अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यात्रेला बाधा निर्माण होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित करून मॅटऐवजी धुळीचा त्रास रोखण्यासाठी होम मैदानावर पाणी मारुन व रोलर फिरवून धुळीचा त्रास कमी करणे शक्य होणार असल्याचे काडादी यांनी सांगितले. या उपरही जिल्हा प्रशासनाकडून त्रास होणार असेल तर संघर्ष हाच यावरचा पर्याय मंदिर समितीसमोर आहे, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर फुटीवर शिक्कामोर्तब

0
0

कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश; आर्थिक उलाढाल

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवकाच्या परीक्षेत निव्वळ कॉपी झाली नाही तर सरळ सरळ पेपर फुटल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. कॉपी करणारी आणि तिला मदत करणाऱ्या दोघींना अटक करण्यात झाली आहे. या पेपर फुटी प्रकरणात तीन आरोग्य सेवक अडकले असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर आधिकारीही या साखळीत असण्याची शक्यता आहे. यामध्ये मोठ्या रकमेची अर्थिक उलाढाल झाली असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा निवड समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य सेवकांच्या परीक्षेत महिला उमेदवार शाहिन अजमुद्दीन जमादार (करगणी, आटपाडी) ही कॉपी करताना सापडली. ग. रा. पुरोहित कन्या शाळेत प्रश्नपत्रिका देण्यापूर्वीच तिने उत्तरपत्रिका भराभर सोडवायला सुरुवात केल्याने तिची कॉपी दिसली. तिने पायजम्यावर सत्तर गुणांची उत्तरे तंतोतंत लिहून आणली होती. कॉपी पकडल्यानंतर ती घाईघाईने स्वच्छता गृहात गेली. तेथे तिला मदत करणारी शाकीरा उमराणी (कायम आरोग्य सेविका) होती. शाहीन ही पायजमा बदलून येऊन पुन्हा परीक्षेला बसली होती. तिच्या कॉपीने खळबळ माजली. दोघींच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी शाहीन ही बेशुद्ध पडू लागली. या संपूर्ण गोंधळानंतर २५ नोव्हेंबरची परीक्षा रद्द करुन २९ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली.

शहर पोलिसांनी आतापर्यंत्त केलेल्या तपासात २५ नोव्हेंबरच्या परीक्षेच्यावेळी केवळ कॉपी झाली नाही तर पेपर फुटला होता, हे स्पष्ट झाले आहे. शाहीन आणि शाकीरा या दोघींना गुरुवारी अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यांची जामिनावर सुटका झाली. या दोघींवर यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली असून, शाहीन हिला हंगामी सेवेतून बडतर्फ तर शाकीरा हिला निलंबित करण्यात आले आहे. त्यांना अटक केल्यानंतर झालेल्या चौकशीत पेपर फुटीत तीन आरोग्य सेवकांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एका उमेदवाराला सात लाखांचा दर

परिक्षेच्यापूर्वी आरोग्य खात्यातील काहीजण पैसे देणाऱ्या उमेदवारांच्या शोधात होते. एका उमेदवाराला सर्वसाधारणपणे सात लाख रुपये मोजून प्रश्न उत्तराची प्रत मिळवावी लागते. अशा किती उमेदवारांनी एजंटाकडे पैसे मोजलेत हे अद्यापही समोर आलेली नाही. पण हा आकडा खूप मोठा असल्याचा अंदाज पोलिस उपधीक्षकांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

म्हाताऱ्या सिंहाची कॅन्सरशी झुंज

0
0

सोलापूर : सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील शंकर नामक २३ वर्षांच्या म्हाताऱ्या सिंहाची कॅन्सर रोगाशी झुंज सुरू आहे. या रोगातून या सिंहाला बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची शिकस्त करण्यात येत आहे. दिवस-रात्र डॉक्टरांची एक टीम सिंहावर उपचार करीत आहे.

गेल्या १४ वर्षांपासून सिंह बालगोपाळांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला आहे. २००१ साली ९ वर्षांचा असताना सांगली येथून हा नर जातीचा सिंह प्राणी संग्रहालयात आणण्यात आला आहे. जंगलात रहात असताना सिंहाचे आयुष्य १७ ते १८ वर्षे असते. परंतु या सिंहाचे वय २३ असून, हा सिंह कायम कोणत्या ना कोणत्या आजाराशी सामना करीत आहे. वृद्धत्वामुळे सिंहाला उभारताही येत नाही. गुदद्वारावर ट्यूमर असल्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत असून, आजारी प्राण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पिंजऱ्यात सिंहाला ठेऊन या पूर्वीच ट्यूमर काढण्यात आला आहे.



संग्रहालयाची मान्यता धोक्यात

प्राणी संग्रहालयामध्ये असलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्लीचे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणचे डॉ. ब्रिजकिशोर गुप्ता यांचे पथक येणार आहे. प्राण्यांचे घर व सुविधा, नैसर्गिक वातावरण, स्वच्छता व निगा, आपत्कालीन व पुनर्वसन व्यवस्था, प्रेक्षकांसाठी सुविधा, मनुष्यबळ आदींसाठी १०० मार्क आहेत. यात प्राणीसंग्रहालय प्रशासन नापास झाल्यास प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द होण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहन चालवताय? एवढे कराच

0
0

prasanna.jakate@timesgroup.com

कोल्हापूर ः वाहन चालविताना काही 'बेसिक' गोष्टींचे पालन केलेच पाहिजे. मोटार वाहन कायद्यामध्ये तशी तरतूदच आहे. हे नियम न पाळल्यामुळे आपल्याला वाहतूक पोलिस अडवितो आणि बरेचदा त्याच्याशी वादाचा प्रसंग निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने काही खबरदारी घ्यायलाच हवी. कोणती ही खबरदारी व कोणते ते नियम याबद्दल...



लायसन्स

वाहन चालविताना शिखात ड्रायव्हिंग लायसन्स असलेच पाहिजे. समजा तुमच्याकडे दुचाकीचे लायसन्स असेल तर दुचाकीच चालवा. त्यातही लायसन्स घेताना आपण कोणत्या दुचाकीचे घेतले आहे, त्याचे भाव ठेवा. उदाहरणार्थ मोटरसायकल विनाऊट गिअर असेल तर स्कुटी, लुना अशी वाहने चालविणे अपेक्षित आहे. हे लायसन्स असताना तर बाइक चालवत असाल तर पोलिसवाला नक्कीच दंड ठोठावेल. लायसन्सचे प्रकार कोणते त्यावर नजर टाकू. लायसन्सवर त्याचा कोड नमूद असतो. त्याचे विवरण लायसन्सच्या मागील बाजूलाही असते.

 मोटार सायकल विनाऊट गिअर - मोटार सायकल विथ गिअर - लाइट मोटर व्हेईकल (नॉन ट्रान्सपोर्ट) म्हणजे कार. - लाइट मोटर व्हेईकल (ट्रान्सपोर्ट) म्हणजे हलकी मालवाहू वाहने. - थ्री व्हीलर, ट्रॅक्टर, थ्री व्हीलर ट्रान्सपोर्ट - ट्रान्सपोर्ट व्हेईकल (बस, मिनी बस) - रोड रोलर, क्रेन, प्रायव्हेट बस, इतर.



पीयूसी प्रमाणपत्र

प्रदूषण प्रमाणपत्र सोबतच असणे गरजेचे आहे. प्रत्येक प्रमाणपत्राची मुदत सहा महिन्यांची असते. त्यामुळे प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वी दुसरे तातडीने काढून घ्यावे. ४० रुपयांपासून ते सहज मिळते.



रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र

आरटीओकडून वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र दिले जाते. अगोदर त्याला आरसी बुक म्हटले जायचे. नंतर स्मार्ट कार्ड दिले जाऊ लागले. आता पुन्हा एका कागदावर म्हणजे सिंगल पेपर रजीस्ट्रेशन प्रमाणपत्र दिले जाते. मोटार वाहन कायद्यानुसार हे सोबतच असणे गरजेचे आहे. अगदी तुम्ही चालवित असलेले वाहन तुमच्या मालकीचे नसले तरी. चोरी केलेली वाहने चटकन सापडावी म्हणून याची तपासणी गरजेची असते.

इन्शुरन्स

वाहनाचा थर्ड पार्टी इन्शुरन्स असायलाच हवा. अपघातप्रसंगी ते तुमच्यासाठीच मदतीचे ठरु शकते. इंन्शुरन्स असेल तर अपघातांच्या घटनांमध्ये दोन्ही विमा कंपन्या परस्पर नुकसान भरपाईचे दावे निकाली काढतात. हे तपासण्याचा अधिकारी पोलिस व आरटीओ दोघांनाही आहे.



सीटबेल्ट, हेल्मेट

कोर्टाने बंधनकारक केल्यानुसार प्रत्येक चारचाकी वाहन चालकाने सीटबेल्ट बांधणे बंधनकारक आहे. तर दुचाकी चालकाने हेल्मेट वापरणेही कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. हे कोर्टाचेच आदेश असल्याने पोलिस यात हमखास कारवाई करतात.

आणखी थोडी सावधगिरी

१. अगदी थोडेसे अंतर जरी जायचे असेल तरी राँग साइड वाहन चालवू नकाच. जाऊद्या थोडे पेट्रोल खर्ची पण यू-टर्न घेऊन परत या. अपघाताचा प्रसंग पूर्वसूचना देऊन घडत नाही.

२. तुमच्या हाती रेसर बाइक असली तरी वाहन चालविण्याचा वेग शहरात ताशी ३० ते ४० च्या वर नेऊ नका. तुमच्या जीवापेक्षा वेग महत्त्वाचा नाही.

३. लाल सिग्नल असताना तुम्ही पुढे जाता. अशात ज्याला हिरवा सिग्नल मिळाला आहे, त्या बाजूने येणारी वाहने सहाजिकच वेगाने चौक पार करण्याचा प्रयत्न करतील आणि इथेच तुमचा घात होऊ शकतो. सिग्नल तोडण्यापेक्षा लहान गल्ल्यांमधून असे मार्ग शोधा जेथे कमी सिग्नल मार्गात लागतील.

४. ऑटो चालकांनी चालकाच्या सीटरवर प्रवासी बसवूच नये. वाहनाची जेवढी क्षमता कायद्याने ठरवून दिली आहे. ती मर्यादा ओलांडू नये.

५. मद्यपान केल्यावर वाहन चालविणे तुमच्या किंवा इतरांच्या जीवावर बेतू शकते. नागपुरात दररोज यामुळे किमान दहा अपघात घडतात. महिन्याला सरासरी पाच जणांचे प्राण जातात. त्यामुळे आपली व दुसऱ्या वाहनचालकाचीही घरी कुणी प्रतीक्षा करतेय याचे भाव ठेवा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तीन हजार ट्रकवर गंडांतर

0
0

प्रदूषण टाळण्यासाठी १५ वर्षांहून जुने ट्रक भंगारात काढण्याचे आदेश

Sachin.Yadav@timesgroup.com

कोल्हापूरः वाढते प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने १५ वर्षांहून अधिक वयाचे ट्रक भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील तीन हजार ट्रक येत्या एप्रिल महिन्यापासून भंगारात जाणार आहेत. शहरात धुराचे लोट सोडत रस्त्यावर धावणारी ही वाहने काही महिन्यात भंगारात जाणार आहेत.

केंद्र सरकारने १५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यापारी वाहनांची वाहतूक करण्यास येत्या १ एप्रिल २०१६ पासून बंदी घातली आहे. गेल्या पाच वर्षांपासून आयुर्मान संपलेल्या ट्रकच्या विषयावर ऑल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट असोसिएशन आणि सरकार यांच्यात वाद सुरु होता. अखेर यावर शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील ३ हजार ट्रक स्क्रॅप करावे लागणार आहेत. जिल्ह्यात वाळू, साखर, गूळ, भाजीपाला, बॉक्साइट, सॅनिटरी साहित्य आदी मालाची वाहतूक करण्यासाठी ट्रकची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात व्यापारी वाहतूक करणारे १६ हजार ट्रक आहेत. यात आयुर्मान संपलेले सुमारे ३ हजार ट्रक रस्त्यावर बिनधास्तपणे धावत आहेत. दरवर्षी ही वाहने प्रदूषण करतात म्हणून आरटीओकडून कारवाई केली जाते. आता केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे आरटीओच्या मोहिमेत पंधरा वर्षांवरील व्यापारी वाहने सापडल्यास त्यांना भंगार करण्याचा सल्ला आरटीओ अधिकारी देणार आहेत. फिटनेस नसलेल्या ट्रकमुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. काही ट्रकच्या बॉडीही गंजलेल्या आहेत, मात्र त्याचा वापर व्यापारी वाहतुकीसाठी केला जातो. वाहतुकीच्या असुरक्षिततेस, पर्यावरणाची हानी करण्यात आयुर्मान संपलेले ट्रक मोठा हातभार लावत आहेत. त्यामुळे धुराचे लोट सोडणारी व्यापारी वाहने स्क्रॅप केल्यास प्रदूषणाचा टक्का कमी होण्यास मदत होणार आहे. ट्रक स्क्रॅप करेपर्यंत वाहनमालकांना पर्यावरण कर भरावा लागणार आहे.

सहा, दहा आणि बारा चाकी वाहनांतून मालाची वाहतूक केली जाते. सध्या आयुर्मान संपलेलया सहा चाकी ट्रकवर कारवाई केली जाणार आहे. नवीन ट्रकची किंमत सुमारे २५ ते ३० लाखांपर्यंत आहे. त्यामुळे स्क्रॅप केलेल्या मालकांना नवीन ट्रक घ्यावा लागणार असल्याने उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.

अशी आहे भंगाराची प्र्रक्रिया

ट्रकचा इंजिन आणि चेसिस क्रमांक आरटीओ कार्यालयाला दिला जातो. त्यानुसार मोटार वाहन निरीक्षक संबधित ट्रकचा पंचनामा करतात. ज्या ठिकाणी स्क्रॅप केले जाते, त्या ठिकाणी मालकाला बोलाविले जाते. ट्रक स्क्रॅप झाल्याचा पंचनामा करुन अहवाल दिला जातो.

प्रदूषणाला हातभार लावण्यात ट्रकचा मोठा हातभार आहे. कारण जादा मालाची वाहतूक आणि हजारो किलोमीटरचा प्रवास ट्रकचा होतो. सुमारे ३० टक्के प्रदूषण ट्रकमुळे केले जाते. आयुर्मान संपलेले ट्रक भंगारात काढण्याचा निर्णय चांगला आहे. त्याची कडक अंमलबजावणी अपेक्षित आहे. तरच पर्यावरण संरक्षणाला हातभार लागू शकेल.

- उदय गायकवाड,

पर्यावरण अभ्यासक

सरकारने दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही केली जाणार आहे. त्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येईल. ट्रकचे पासिंग, परवाना आणि आयुर्मानही तपासले जाईल. जी वाहने या मोहिमेत सापडतील. त्यांना पहिल्या टप्प्यात समज देण्यात येईल. त्यानंतर दंडात्मक कारवाई करुन ट्रक जप्त केले जातील.

- लक्ष्मण दराडे,

आरटीओ

केंद्र सरकारने जरी निर्णय घेतला असला तरी अनेक ट्रकमालक आणि चालकांचा उदरनिर्वाह ट्रकवर आहे. ट्रक भंगारात काढल्यास काही मालकांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे ट्रक भंगारात काढण्याची मोहिम थांबविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन देणार आहे.

- सुभाष जाधव,

अध्यक्ष, लॉरी असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिंदू-मुस्लिम देशाचे मूळ रहिवाशी’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशातील हिंदू व मुस्लिम हे मूळ रहिवाशी असून संस्कृती एक आहे. त्यामुळे या देशातीलच समाजांमध्ये किरकोळ कारणांनी होणाऱ्या मतभेदामुळे देश विकासापासून दूर राहतो. हे समाज एकत्र राहिले तर देश मजबूत होऊन शांतता प्रस्थापित होईल,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी केले.

मंगलधाम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचची बैठक झाली. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी आप्पासाहेब दड्डीकर, इरफान पिरजादे उपस्थित होते.

हिंदू, मुस्लिम धर्म जरी वेगवेगळे असले तरी देशातील या समाजांची संस्कृती जवळपास एकसारखी आहे, असे सांगत इंद्रेशकुमार म्हणाले, 'दोन्ही समाज येथील मूळ रहिवाशी आहेत. त्याची प्रचिती विविध सण, परंपरांमधून येत असते. पण काही किरकोळ कारणांवरुन मतभेद होतात. ते मतभेद एकमेकांमध्ये सामोपचाराने मिटवता येऊ शकतात. त्या मतभेदांकडे जर दुर्लक्ष केले तर प्रत्येक घरातील जीवन आनंदी होईल.'

असहिष्णूतेबाबत बोलताना ते म्हणाले, 'काही व्यक्ती देशात असहिष्णू वातावरण असल्याचे गैरसमज पसरवत आहेत. पण जगभरातील परिस्थिती पाहिली तर भारतासारखी सहिष्णूता इतरत्र कुठेही नसेल. मात्र काहीजण राजकारणात भरकटले आहेत.' बैठकीस समीर नदाफ, नवेज मुल्ला, अमानुल्ला शेख, नियाज काझी, इस्माईल शेख, नजीर देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७१९ वाहनधारकांवर कारवाई

0
0

'डेंजरस पीपल'कडून पावणेदोन लाख रुपये दंडही केला वसूल



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्र टाइम्स'च्यावतीने सुरू करण्यात आलेल्या 'डेंजरस पीपल' जनजागृती मोहिमेनंतर शहर वाहतूक नियंत्रण विभागाने वाहनचालकांवर कारवाईचा बडगा तीव्र केला आहे. गेल्या महिनाभरात मोबाइलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबरप्लेट, वन वे तोडणे, राँग साइडने वाहन चालविणे अशा एकूण १७१९ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १ लाख ७५ हजार १०० रुपये दंड वसूल केला आहे.

शहरातील वाढलेल्या वाहन संख्येमुळे वाहतुकीच्या नियोजनावर ताण पडत आहे. दिवसेदिवस शहरात पर्यटकांचीही वाढ होत आहे. त्यातच बहुसंख्य वाहनधारकही नियम पाळत नसल्याने वाहतूक कोंडी, छोट्या अपघातात वाढ होत आहे. शहरातील चौकाचौकांत, रस्त्यांवर बेशिस्त वाहने चालविणाऱ्यांमुळे अपघातही होत आहेत. त्याचा फटका प्रामाणिक वाहनचालकांना होत आहे. चुकीच्या वाहन चालवण्याच्या पद्धतींमुळे किरकोळ अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र टाइम्स'ने डेंजरस पीपल ही मोहिम सुरू केली आहे.

'मटा'च्या डेंजरस पीपल मोहिमेचे स्वागत वाचकांकडून होत आहे. गेले महिनाभर सुरू असलेल्या मोहिमेची दखल घेत शहर वाहतूक शाखेने डेंजरस पीपल्सवर कारवाई सुरू केली आहे. मोबाइलवर बोलत वाहने चालविणाऱ्या १३५ जणांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून १३ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे. ट्रिपल सीट बसून दुचाकी चालवणाऱ्या २१९ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून २३ हजार ३०० रूपये दंड वसूल केला आहे.

याशिवाय २२० वाहनधारकांनी फॅन्सी नंबरप्लेट वापरून नियमभंग केल्याने त्यांच्याकडून २२ हजार ५०० रूपये दंड करण्यात आला आहे. प्रवेश बंद मार्गातून वाहन चालवणाऱ्या (वन वे तोडणे) ७७३ वाहनधारकांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ७८ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. राँग साइडने (विरुद्ध दिशा) वाहन चालविणाऱ्यांना ३७२जणांकडून ३७ हजार ५०० रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘काश्मीरचा विकास ३७० कलमामुळे खुंटला’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तात्पुरत्या केलेल्या ३७० कलमामुळे काश्मीरचा विकास रखडला असून काश्मीरचा प्रश्न सोडविण्यासाठी हेच मोठे आव्हान आहे. ३७० वर चर्चा होऊन हे कलम रद्द होणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेशकुमार यांनी व्यक्त केले.

ब्राह्मणसभा करवीर, मंगलधाम आ​णि महालक्ष्मी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायव्हेट हायस्कूल सभागृहात सुरू असलेल्या तात्यासाहेब तेंडुलकर स्मृति व्याख्यानमालेच्या समारोप्रसंगी ते बोलत होते.

इंद्रेशकुमार म्हणाले, 'भारतातील प्रत्येक नागरिकाला शिक्षण, रोजगार, संरक्षण आणि स्वावलंबन केवळ सीमेवर लढत असलेल्या जवानामुळे मिळत आहे. तत्कालीन राजकीय दबावामुळे आपण ५५ टक्के काश्मीर गमवालेला आहे. ३७० या कलमामुळे जम्मू काश्मीर विकासापासून दूर गेला. अनेक युद्धानंतरही भारत पराभूत होत नसल्यामुळे पाकिस्तान तुटत राहिले आणि दहशतवादाला सुरूवात झाली.'

ते पुढे म्हणाले, 'आजही जम्मू-काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे सांगावे लागते. ३७० कलमामुळे भारताने खूप काही गमावले असून असून यावर चर्चा होऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.'

ब्राह्मण सभेचे कार्यवाहक श्रीकांत लिमये यांनी इंद्रेशकुमार यांचा परिचय करून दिला. महालक्ष्मी बँकेचे अध्यक्ष विनोद डिग्रजकर यांनी प्रास्ताविक केले. दीपक भागवत यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार मराठे यांनी आभार मानले. यावेळी हरिशचंद्र अष्टेकर, प्रसाद कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, भालचंद्र अष्टेकर, सुहास तेंडुलकर, महेश धर्माधिकारी, अॅड.राजेंद्र किंकर, इरफान अली आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बादलीत बुडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

0
0

शिवाजी विद्यापीठाच्या पाळणाघरातील दुर्घटना

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील पाळणाघरात पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून १५ महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला. रणजय उत्तम सुर्वे (रा. सी ३९, शिवाजी विद्यापीठ क्वाटर्स) असे या दुर्देवी बालकाचे नाव आहे. डेप्युटी रजिस्टार उत्तम हनुमंत सुर्वे यांचा तो मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजता ही घटना उघडकीस आली.

शिवाजी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी डे केअर सेंटरची सोय आहे. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास भरलेल्या बादलीत रणजय सुर्वे खाली डोके वर पाय अवस्थेत दिसला. त्याला मदतनीस गार्गी कुडाळकर व दोन आयांनी बाहेर काढले. रणजयच्या आई प्राजक्ता यांना डे केअर सेंटरमध्ये ताबडतोब बोलावून घेण्यात आले. बेशुध्द अवस्थेतील रणजयला शिवाजी विद्यापीठातील वैद्यकीय कक्षात नेण्यात आले. पण अधिक उपचारासाठी टाकाळा येथील लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर सीपीआर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण उपचारापूर्वी डॉक्टरांनी रणजयला मृत घोषित केले. उत्तम सुर्वे हे रत्नागिरी जिल्हा परिषदेतून विद्यापीठात जुलै महिन्यात मुख्य लेखापाल या पदावर आले आहेत. त्यांच्या पत्नी प्राजक्ता यांनी तिळ्यांना जन्म दिला होता. त्यापैकी दोन मुली व एक मुलगा होता. तीन मुलांना सांभाळणे शक्य नसल्याने एक मुलगी आष्टा येथे आजोळी ठेवण्यात आली आहे. दुसरी मुलगी राधा घरी आई प्राजक्ता यांच्याकडे होती तर रणजयला पाळणाघरात ठेवले होते. सेंटरमधील हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.



विद्यापीठ प्रशासन करणार चौकशी

कुलसचिव व्ही.एन. शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त म्हणाले,' 'डे केअर सेंटरमधील घटना अतिशय दुर्देवी आहे. सुर्वे कुटुंबाचे विद्यापीठाच्यावतीने सांत्वन करण्यात आले असून शनिवारी सेंटरमधील घटनेची सविस्तर चौकशी केली जाईल. सेंटरमध्ये एक शिक्षिका व दोन महिला कर्मचारी आहेत. तसेच १२ मुले आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images