Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जयंती नाला पुन्हा फुटला

$
0
0

मैलायुक्त सांडपाणी मिसळतेय थेट पंचगंगा नदीत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळून प्रदूषणाची तीव्रता वाढत असल्याच्या तक्रारी असताना सोमवारी महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा आणखी एक नमुना सामोरा आला. खानविलकर पेट्रोल पंपाच्या पिछाडीस असलेल्या महापालिकेच्या ड्रेनेज पाइपलाइन व चेंबरला भगदाड पडून मोठ्या प्रमाणात मैलायुक्त सांडपाणी जयंती नाल्यातून थेट नदीत​ मिसळण्यास सुरूवात झाली आहे.

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेच्या दिलीप देसाई यांनी याप्रश्नी लक्ष वेधल्यानंतर महापालिका आणि जिल्हा प्रशसनाची यंत्रणा हलली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी राजेश आवटी यांनी सांडपाण्याचे नमुने घेत ते तपासणीसाठी चिपळूण येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार आहेत.

जयंती नाल्यातील मैलायुक्त सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचा ई मेल देसाई यांनी सोमवारी दुपारी जिल्हा​धिकारी, प्रांताधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिका अधिकाऱ्यांना केला. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा गतीमान झाली. महापालिकेचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी आवटी यांच्यासोबत देसाई यांनी जयंती नाला पंपिंग स्टेशन, खानविलकर पेट्रोल पंपाचा पिछाडीचा परिसर, चेंबरचे ठिकाण या परिसराची पाहणी केली. चेंबरला भगदाड पाडल्याचा आरोपही देसाई यांनी केला. दुधाळी मैदानकडून एक ड्रेनेज लाइन सिद्धार्थनगरच्या पिछाडीपर्यंत येते. सिद्धार्थनगरच्या पिछाडीस असलेल्या शेतामधून येणारे ड्रेनेज लाइन तुंबले आहे. चेंबरला भगदाड पडल्याने मैलायुक्त सांडपाणी थेट पंचगंगेत मिसळत आहे.

पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. चिपळूण येथील प्रयोगशाळेकडे ते मंगळवारी तपासणीसाठी पाठविण्यात येईल. पंधरा दिवसात अहवाल येईल. त्यानंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार महापालिकेविरोधात कारवाई होईल. जयंती नाल्यातील सांडपाणी कसलीही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात असल्याबद्दल महापालिकेविरोधात यापूर्वीच गुन्हे दाखल केले आहेत.

- राजेश आवटी, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कॅमेरा मानस्तंभाला सलाम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर

कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी स्वत: बनवलेल्या कॅमेऱ्याने ज्या ठिकाणी पहिला शॉट घेतला त्या खरी कॉर्नर येथे कोल्हापूर चित्रपट व्यवसायाच्या वर्धापनाचे औ​चिचत्य साधून कॅमेरा मानस्तंभाला सलाम करण्यात आला. महापौर अश्विनी रामाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावर्षी कोल्हापुरातील तरूण कलाकार सागर तळाशीकर, स्वप्नील राजशेखर, आनंद काळे, संजय मोहिते, भरत दैनी यांच्याहस्ते खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन करून हा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आनंदराव पेंटर, बाबूराव पेंटर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी ​चित्रपट महामंडळाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कलामह​र्षी बाबूराव पेंटर यांनी १ डिसेंबर १९१९ रोजी कोल्हापुरात ​​चित्रपट व्यवसाय सुरू केला. त्याचे स्मरण म्हणून अ​खिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने ​चित्रपट व्यवसायाचा वर्धापनदिन सोहळा साजरा केला जातो. यावेळी बोलताना महापौर रामाणे यांनी कोल्हापूर चित्रनगरीच्या पुनरूज्जीवनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी स्वागत केले. कार्यवाह सुभाष भुरके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महामंडळाचे माजी अध्यक्ष यशवंत भालकर, ख​जिनदार सतीश ​बिडकर, इम्तियाज बारगीर, सदानंद सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्ष्यांच्या जीवावर मांजा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर

दिवाळी सुटी आणि त्यानंतर वेध लागतात ते पतंग उडविण्याचे. पतंग उडविण्याचा आनंद सर्वांनाच असतो, पण हाच आनंद पक्ष्यांच्या जीवावर अनेकदा बेततो, असे दिसते. गेल्या तीन वर्षांत केवळ कोल्हापूर परिसरातच मांज्यात अडकून सुमारे दीडशेवर पक्षी जखमी झाले आहेत. या पक्ष्यांना कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले आहे.

पतंग उंच उंच जाईल तसा पतंगांची काटाकाटी करण्याची चुरस वाढत जाते. सध्या बहुतांश दुकानात नायलॉनचाच मांजा असतो. उंच आकाशात विहरणाऱ्या पक्ष्यांच्या नजरेत मांजा न आल्यामुळे त्यांच्या पंखांत मांजा गुरफटत जातो. त्यामुळे अनेक पक्षी जीव गमावतात. गेल्या ३ वर्षांत अनेक पक्षी या मांजामुळे जखमी झाले आहेत. काचेच्या भुकटीचा वापर केलेला मांजा किंवा सध्या बाजारात आलेल्या चायना मेड मांजा पक्ष्यांच्या जीवावर बेततो. पतंगप्रेमींमध्ये याबाबतचे भान अजिबातच असत नाही. सध्या बाजारात अनेक प्रकारचे पतंग आणि मांजा आले असून मोठ्या प्रमाणात चायना मेड मांजाची विक्री होत आहे.

कापाकापीच्या या खेळामध्ये अनेक पक्षी जखमी होतात. त्यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी किंवा एखादा पक्षीप्रेमी अशा पक्ष्यांचा जीव वाचविण्यात महत्त्वाची भूमिका घेतात. पतंग उडविण्यात भान हरपून जाणाऱ्यांनी पर्यावरणाची काळजी घेत साधा दोरा वापरला तर निष्पाप पक्ष्यांना जीव गमावावा लागणार नाही, असे मत पक्षीप्रेमींतून व्यक्त होत आहे.

चायना मेड मांजामुळे पक्ष्यांचा जीव धोक्यात

चायना मेड मांजा कठीण असल्यामुळे तो तुटत नाही. अनेकदा हा दोरा पक्ष्यांच्या पायात अथवा किंवा पंखांमध्ये अडकतो. हा दोरा तुटत नसल्यामुळे पक्षी जखमी होतात तर काही मरण पावतात. अग्निशमन दलाने असे जखमी पक्षी वाचवून त्यांना पांजरपोळ येथील दवाखान्यात दाखल केले.

चायना मेड दोऱ्यामुळे अनेक पक्षी जखमी झाले आहेत. शहरात ऑगस्ट ते जानेवारीदरम्यान पक्षी जखमी होण्याचे प्रमाण जास्त असते. पतंगासाठी जो दोरा वापरला जातो तो चायना मेड असल्यामुळे पक्ष्यांना इजा होते.

- टी.आर.कवाळे, स्टेशन अधिकारी, अग्निशमन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा प्रदूषणाचे दुखणे कायम

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर

संपूर्ण शहरात शंभर टक्के भुयारी गटर योजनाचा अभाव, बारा नाल्यांतील सांडपाणी अडवून ते सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळविण्याच्या यंत्रणेचा अभाव, ​नाले अडविण्यासाठी निधीची कमतरता, अपूर्ण एसटीपी प्रकल्प अशी सर्व कारणे पंचगंगा नदी प्रदूषणास कारणीभूत ठरत आहेत. शहरातील नाल्यातील सांडपाणी अडविण्याचे प्रकल्प निधीअभावी 'राम भरोसे' आहेत. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासन कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा जयंती नाल्यातील सांडपाण्यावरून स्पष्ट झाले आहे. दरवर्षी जयंती नाल्यातील सांडपाणी नदीत मिसळते. त्यामुळे बऱ्याचदा नागरिकांना प्रदूषित पाणीच प्यावे लागते.

शहराच्या विविध भागांतील सांडपाणी, औद्योगिक वसाहतीतील घातक रसायने, काही भागातून थेट नाल्यात सोडले जाणारे मैलामिश्रीत सांडपाणी, प्लास्टिक कचरा असे सर्व घटक कुठलीही प्रक्रिया न होता थेट नदीत मिसळतात. मृत जनावरे, खराब पालेभाज्या, विविध सभा समारंभात ​​शिल्लक राहिलेले अन्न नदीत टाकले जाते. यामुळे नदीप्रदूषणाची तीव्रता वाढत राहते. राष्ट्रीय नदी कृती योजनेंतर्गत नद्यांच्या शुद्धीकरणासाठी योजना राबविली जाते. या योजनेला अनुसरून शहरातील बारा नाले अडवून त्यातील सांडपाणी एसटीपी प्रकल्पाकडे वळविण्याचा प्रकल्प महापालिकेने आखला, पण या पूर्ण प्रकल्पासाठी अद्यापही निधी उपलब्ध झालेला नाही.

नाले अडविण्याचा प्रस्ताव कागदावर

राष्ट्रीय नदी कृती योजनेतून कसबा बावडा येथे ७६ एमएलडी एसटीपी प्रकल्पाची उभारणी केली. यासाठी ७४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. लक्षतीर्थ वसाहत, सिद्धार्थनगर, सीपीआर, नागाळा पार्क येथून वाहणारा, रमणमळा, जामदार क्लब, ड्रीम वर्ल्ड परिसर आणि राजाराम बंधाऱ्याच्या खालच्या भागातून वाहणाऱ्या कसबा बावडा परिसरातील नाल्यातील सांडपाणी नदीत मिसळते. हे नाले अडवून त्यातील सांडपाणी एसटीपी प्रकल्पाकडे वळविण्यासाठी १८ कोटींचा प्रस्ताव तयार आहे. मात्र त्यासाठी निधी मंजूर झालेला नाही. जयंती नाल्यासारखी पंपिंग यंत्रणा बापट कॅम्प आणि लाइनबाजार येथे करण्याचे नियोजन आहे, पण दोन्ही ठिकाणी अद्याप कामाला सुरूवात झाली नाही.

दबावगट हवा

शहरातील उर्वरित भागात ड्रेनेज लाइनसाठी महापालिका प्रशासनाने २४० कोटीचा आराखडा तयार केला आहे. शहरातील ४२८ किलोमीटर ड्रेनेजलाइनची कामे यामध्ये समाविष्ट आहेत. अमृत योजनेतून या कामासाठी निधी मिळावा म्हणून महापालिकेने प्रस्ताव सादर केला आहे. केंद्र सरकारकडून ५० टक्के, राज्य सरकारकडून २५ टक्के आणि महापालिकेला २५ टक्के निधीची तरतूद करावी लागणार आहे. महापालिकेने प्रस्ताव सादर केले आहेत, पण राजकीय पातळीवरून सरकारवर दबाव टाकला तरच निधी लवकर मिळणार आहे.

३० कोटीतून उपनगरात काम

यूआयडीएसएसएमटी योजनेतून ड्रेनेजलाइनसाठी तीस कोटींचा निधी मिळाला होता. त्यातून रंकाळा परिसर, राजेंद्रनगर, शास्त्रीनगर, हरिओमनगर, फुलेवाडी, दुधाळी पॅव्हेलियन, सानेगुरूजी वसाहत, देवकर पाणंद, प्रतिभानगर परिसरात ड्रेनेजलाइन टाकण्यात आली आहे. दुधाळी येथे २१ कोटी खर्चून १७ एमएलडीचा एसटीपी प्रकल्प उभारण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी दिली.

महापालिकेकडील उपलब्ध माहितीनुसार

शहरात रोज ९३ दशलक्ष लिटर सांडपाण्याची निर्मिती

(मैलामिश्रीत सांडपाण्याचाही समावेश)

६० दशलक्ष सांडपाण्यावर प्रक्रिया

३३ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया नाही

कोल्हापुरातील ४० टक्के भुयारी गटर योजना जुनी

(तत्कालीन प्रशासक द्वारकानाथ कपूर यांच्या कालावधीतील काम)

यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत १५ टक्के भुयारी गटर योजना (३० कोटी रुपये खर्च)

महापालिकेच्या अनागोंदीमुळे ​व प्रदूषण रोखण्याच्या कुचकामी यंत्रणेमुळे शिरोलीपासून ​शिरोळपर्यंत नदीकाठावरील गावांत आजारांचा फैलाव वाढत आहे. हायकोर्टाने बारा नाले अडविण्याचा आदेश देऊनही महापालिकेने अंमलबजावणी केली नाही. प्रदूषणमुक्तीसाठी निधी आला, आराखडा बनविला पण सक्षम अ​​धिकाऱ्यांअभावी प्रभावी अंमलबजावणी होत नाही.

- बुरहान नायकवडी, सचिव, प्रजासत्ताक सामाजिक संस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांचा वेढा अन् कारवाईत खोडा

$
0
0

वर्षानुवर्षाच्या अतिक्रमणांवर प्रशासन बडगा उगारणार कधी?

Anuradha.kadma@timesgroup.com

कोल्हापूर

चारही बाजूने अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला अंबाबाई मंदिर परिसर मोकळा करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून भाविकांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. महाद्वारात बसणाऱ्या चिंच, आवळे विक्रेत्यांनाही प्रशासन आजपर्यंत कायमस्वरूपी हटवू शकलेले नाही, तिथे वर्षानुवर्षे मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालावी तसे ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला असला तरी तो अंमलात कसा येईल हा प्रश्न आहे. एकीकडे मंदिराभोवती अतिक्रमण वेढा वाढत असताना त्याबाबत होणाऱ्या कारवाईत मात्र खोडा घातला जात आहे.

मंदिराच्या आवारात असलेल्या ओवऱ्यांतील पूजा साहित्याची दुकानेही अतिक्रमणाच्याच यादीत येतात, मात्र या दुकानदारांनी नोटिशीला स्थ​गिती आणून हा प्रश्न जैसे थे ठेवण्यात आला आहे. विद्यापीठ हायस्कूलच्या ​भिंतीलगत असलेल्या दहा ओवऱ्यांमधील दुकानांसह तीन प्रवेशद्वाराच्या कमानीत असलेली प्रत्येकी दोन अशी सहा दुकाने, गारेचा गणपती मंदिराला लागून असलेले एक दुकान आणि देवस्थान कार्यालयाच्या डावीकडे अन्नछत्राशेजारी असलेल्या दोन दुकानांचा पसारा नेहमीच वाढलेला असतो. महाद्वार कमानीपासून ते महाद्वार चौकापर्यंतचा रस्ता तर ​​चिंचा आवळे​ विक्रेत्यांनी व्यापला आहे. मंदिरात कुणी अतिमहत्वाची असामी येणार असेल तर या विक्रेत्यांच्या ठेल्यांचे अतिक्रमण हटवले जाते. एरव्ही भाविकांना मंदिरात जायला वाट राहत नाही इतका हा मार्ग दुतर्फा असलेल्या कटलरी, इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानांच्या अतिक्रमणाने काबीज केला आहे. महाद्वार, घाटी दरवाजा, अतिबलेश्वर प्रवेशद्वार आणि सरलष्कर भवनसमोरील मार्गाने मंदिरात येताना अतिक्रमण पार करूनच यावे लागते.

गाळेधारक फेरीवाले

महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड परिसरात हातगाडीवर वस्तू विकणाऱ्या ८० टक्के फेरीवाल्यांचे याच परिसरातील कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये गाळे आहेत. मात्र तरीही गाळ्यांचा वापर गोडावूनसाठी केला जातो आणि माल मात्र हातगाडीवर ठेवून रस्त्यावर विकला जातो. त्यामुळे अशा गाळेधारक फेरीवाल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

कुणीही या ... दुकान मांडा

अंबाबाई मंदिराच्या शंभर मीटर आवारात असलेल्या भवानी मंडपचा परिसर अतिक्रमणाच्या गर्तेत अडकला आहे. सध्या याठिकाणी ज्या जागेत केएमटी थांबा होता तो हटवून दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे. तर क्रीडास्तंभाच्याभोवती बिडाच्या तवेविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. मंडपाच्या कमानीतही फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. तर मेन राजाराम हायस्कूलच्या भिंतीपासून ते रोजगार हमी कार्यालयाच्या भिंतीपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तळ ठोकला आहे. ​बिडाचे तवे विकणाऱ्यांनी भवानी मंडप कमानीतील दोन्ही बाजूच्या कट्ट्यावर व्यापार थाटला आहे. या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

महापालिका, देवस्थान की छत्रपती ट्रस्ट

अंबाबाई मंदिर आवार व परिसर, महापालिका, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि छत्रपती ट्रस्ट यांच्या अखत्यारित येत असल्यामुळे अतिक्रमणावर कुणी कारवाई करायची हा चेंडू नेहमीच या तीन प्रशासनाच्या कोर्टात फिरत राहतो. अंबाबाई मंदिराच्या आवारातील अतिक्रमणांवर देवस्थान समितीने कारवाई केली पाहिजे तर मंदिराबाहेरील अतिक्रमणाबाबत महापालिकेने कारवाईचे अस्त्र उगारले पाहिजे. भवानी मंडपातील वाढत्या अतिक्रमणाबाबत छत्रपती ट्रस्टने पावले उचलण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदेशीर भरतीप्रश्नी टांगती तलवार

$
0
0

२६ शिक्षकांची चौकशी, संस्थाचालक, शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यता

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर

सरकारची शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरतीला मान्यता नसताना संस्था चालकांनी भरती केली आहे. बेकायदेशीर भरती केलेल्या २६ शिक्षकांचा अहवाल माध्यमिक शिक्षण विभागाने आयुक्तांना सप्टेंबरमध्ये अहवाल सादर केला आहे. यासाठी शिक्षण आयुक्तांनी चौकशी तपासणी समितीची स्थापना केली असून याचा अहवाल पुढील वर्षात येण्याची शक्यता आहे. अहवालामध्ये बेकायदेशीर भरती असल्याचे निष्पन्न झाल्यास मान्यतेशिवाय शिक्षक भरती केल्याबद्दल संस्थाचालक यांच्यासह तत्कालिन शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दोन मे २०१२ पासून 'माध्यमिक'मध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर भरतीला बंदी जाहीर केली होती. मात्र सरकारचा बंदी आदेश डावलून जिल्ह्यातील अनेक संस्थाचालकांनी शिक्षकांची भरती केली आहे. यासाठी त्यांनी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालकांची परवानगी घेतली आहे. यातील काही शिक्षकांच्या नियुक्तीची मान्यता २०१२ पूर्वीची दाखवली आहे. कोणतीही जाहिरात प्रसिद्ध न करता केलेल्या भरतीमध्ये जिल्ह्यातील २६ शिक्षकांचा समावेश असल्याचा अहवाल शिक्षण आयुक्तांकडे सादर केला आहे.

आयुक्तांनी राज्यातून मिळालेल्या अहवालांची तपासणी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली आहे. समितीचा अहवाल पुढील वर्षात येणार आहे. यामुळे या अहवालाची प्रतीक्षा शिक्षण क्षेत्राला लागली आहे. बेकायदेशीर केलेल्या भरतीमध्ये मासिक ४० हजार प्रमाणे २६ शिक्षकांना तीन वर्षात तीन कोटी ७४ लाख ४० हजार रुपयांचे वेतन अदा केले आहे. अहवालात नुकसान भरपाईचे आदेश निघाल्यात याची जबाबदारी तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांच्यासह संस्थाचालकांवर येण्याची शक्यता आहे.



शिक्षणाधिकारी केबिनपुढे अभ्यागतांची गर्दी

शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे माध्यमिक विभागाची जबाबदारी आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळातील अनेक नागरिक भेटीसाठी येत असतात. मात्र बऱ्याचवेळा शिक्षणाधिकारी शिंदे त्यांना भेटत नाहीत. चंदगड व गडहिंग्लजवरुन आलेले अभ्यागत दोन तास त्यांची प्रतीक्षा करत होते. शिंदे टायपिंग परीक्षेची पाहणी करण्यास गेल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांना कामाशिवाय परत जावे लागले. शिंदे यांची कामे अनेकवेळा नागाळा पार्क येथील एक वकिलांच्या घरातून सुरू असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.

'माध्यमिक' मध्ये सावळागोंधळ
एम. जी. मराठे काही दिवसांपूर्वी शिक्षण संचालक पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कडक शिस्तीमुळे त्यांचा प्रशासनावर चांगला वचक होता. शिक्षण क्षेत्रात झालेल्या गोंधळामध्ये नऊ हजार शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. सध्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सावळागोंधळच सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डोंगरावरील यात्रेची तयारी सुरू

$
0
0

एसटी बसेससाठी वर्गणीचे फलक झळकले

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीची मुख्य यात्रा २४ डिसेंबरला होत आहे. त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. गाडीप्रमुखांनी बैठकांसह एसटी बुकिंगची तयारी सुरू केली आहे. गल्लोगल्ली यात्रेच्या वर्गणीचे फलक झळकले आहेत. तर सौंदत्तीत पाण्यासह अन्य सुविधा न मिळाल्यास यात्रेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रेणुका भक्त संघटनांनी दिला आहे.

दरवर्षी देवीच्या यात्रेसाठी कोल्हापुरातून सुमारे सव्वालाख भाविक सौंदत्तीला जातात. सौंदत्तीत २४ डिसेंबरला देवीचा मुख्य पालखी सोहळा आहे. त्यासाठी २२ आणि २३ रोजी एसटीसह खासगी वाहनांतून भाविक रवाना होणार आहेत. या यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना सौंदत्ती येथे प्राथमिक सुविधा दिल्या जात नाही. धार्मिक विधी जोगनभावी कुंड येथे केला जातो. मात्र सध्या येथील पाणीपातळी कमी झाली आहे. या परिसरातील विहिरींची पातळीही कमी आहे. कुंडात सुमारे ५५ पायऱ्या उतरुन खाली गेल्यानंतरही पुरेसा पाणी साठा उपलब्ध नाही. स्वच्छता आणि देखरेख नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याच्या निषेधार्थ भाविकांसाठी कार्यरत असलेल्या जिल्हा रेणुका भक्त संघटना आणि करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनांच्या शिष्टमंडळाने सुविधा उपलब्ध करुन दिली नाहीत तर यात्रेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी एन. जयराम यांना देण्यात आले.

दरम्यान, एसटी प्रमुखांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. दरवर्षी कोल्हापुरातून प्रासंगिक कराराच्या १८५ एसटीची नोंदणी केली जाते. त्यासाठी खासगी सुमारे पाचशेहून अधिक वाहने यात्रेसाठी जातात. त्याच्या नोंदणीसाठी गाडीप्रमुखांची आणि यात्राप्रमुखांची तयारी सुरु झाली आहे. सार्वजनिक तरुण मंडळाच्या फलकावरही वर्गणी जमा करण्याचे आवाहन केले आहे. करवीर निवासिनी रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष प्रशांत खाडे, बाबुराव पाटील, उदय पाटील आणि जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे अध्यक्ष गजानन विभूते, संस्थापक अच्युत साळोखे, अशोकराव जाधव, मोहन साळोखे आदींनी जिल्हाधिकारी एन. जयराम यांची भेट घेतली.

पाणी काटकसरीने वापरा

या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने सौंदत्ती येथील तलावातील पाणी पातळी कमी झाली आहे. जोगनभावी कुंडासह रेणुकासागर येथेही पाणी नाही. त्यामुळे र्षी भाविकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन सौंदत्ती देवस्थान समितीचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर राजोपाध्ये यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संभाजीनगर होणार बसपोर्ट

$
0
0

बसस्थानाकाचा कायापालट करण्यासाठी सहा कोटींचा प्रस्ताव

SachinYadav@timesgroup.com

संभाजीनगर बसस्थानक स्मार्ट होणार असून एअरपोर्टच्या धर्तीवर बसपोर्ट करण्याचा नियोजित प्रस्ताव आहे. सुमारे सहा कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे. राज्यातील १३ बसस्थानकांच्या यादीत संभाजीनगरचा समावेश आहे. त्यामुळे परिसरातील सुमारे दहा एकर जागेचा कायापालट होणार आहे. बसपोर्टमुळे सीबीएसवरील ताण कमी होणार असून आधुनिकीकरण होणार आहे.

प्रवाशांना पर्यायी आणि सुटसुटीत बसस्थानक म्हणून संभाजीनगर बसस्थानकाचा विचार यापूर्वी झाला होता. मात्र काही प्रवाशांच्या तक्रारीमुळे विभागीय कार्यालयाने सीबीएस संभाजीनगर बसस्थानकात स्थलांतर करण्याचा निर्णय मागे घेतला. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील १३ बसस्थानकांच्या आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी १८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात यात्री निवास, सभागृह कार्यालय, स्वच्छतागृह, खाद्यपदार्थ, काही बसस्थानकावर चित्रपटगृह, आरामदायी बैठक व्यवस्था, पार्किगची सुविधा, बसस्थानकातील दर्जेदार रस्ते, प्रवाशांच्यासाठी टिव्हीची आदी अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशीप (पीपीएफ) मधून बसस्थानकांचे सुशोभिकरण होणार आहे.

सीबीएस आणि रंकाळा बसस्थानकाच्या जागेच्या तुलनेत संभाजीनगर बसस्थानकाचा १२ एकराचा आहे. यात डेपो साडेतीन एकरात आहे. त्यामुळे या बसस्थानकाची आधुनिकीकरणासाठी निवड केली आहे. विशेष घटक योजनेत एक कोटी रुपयांचा निधी कोल्हापूरला मिळाला होता. त्यानंतर संभाजीनगर बसस्थानकाची निवड झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. एप्रिल २०१६ मध्ये आराखड्यानुसार कामाची सुरुवात केली जाणार आहे. बसपोर्ट झाल्यास सीबीएस वरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या कोल्हापूर विभागाच्या ताफ्यात ७५० एसटी आहेत. त्याचा विविध मार्गावर दररोज २५ हजारांहून अधिक प्रवासी लाभार्थी आहेत. तर भारमानात सातत्याने वाढ होत आहे.

यापूर्वीचा प्रस्ताव दोन कोटींचा संभाजीनगर बसस्थानकाचा कायापालट करण्यासाठी यापूर्वी विभागीय कार्यालयाने दोन कोटींचा रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे रेंगाळला. आता पुन्हा राज्य मार्ग परिवहन मंडळाने घेतलेल्या निर्णयात संभाजीनगर बसस्थानकाचा समावेश झाल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. तर विशेष घटक योजनेतंर्गत सीबीएससाठी १ कोटींचा निधी खर्च केला आहे.

एसटीकडे पाहण्याचा लूक बदलला जाणार आहे. प्रत्यक्षात या प्रस्तावाचे काम २०१६ पासून सुरु होईल. त्यासाठी संभाजीनगर बसस्थानकाच्या जागेचे नियोजनाची चर्चा झाली आहे. मुंबईत त्याबाबतचा प्रस्ताव तयार आहे. यात उपलब्ध असलेल्या जागेनुसार आणखी काही बदल सुचविण्यात येतील. ए. वाय. पाटील, संचालक, एसटी

नवा प्रस्ताव अद्याप विभागीय कार्यालयाकडे आलेले नाही. यापूर्वी विभागीय मंडळाने दोन कोटी रुपये बजेट असलेला आधुनिकीकरणाचा प्रस्ताव दिला होता. आता नव्याने बसपोर्टचा विचार पुढे आला आहे. त्याबाबतच्या सूचना आल्यास कार्यवाही केली जाणार आहे. एल. डी. पाटील, स्थापत्य अभियंता, विभागीय कार्यालय

एसटी व्यवस्थापनाकडून स्थानकाचा लूक बदलण्याच्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाची व्यवस्था काही बसस्थानकात नाही. प्रवासीप्रिय घोषणा केल्या जातात. मात्र त्यांची अंमलबजावणी होईपर्यंत कित्येक वर्षे वाट पाहावी लागत असल्याचे चित्र वर्षानुवर्षे कोल्हापूर विभागात आहे. रमेश कुलकर्णी, प्रवासी

संभाजीनगर बसस्थानक एकूण परिसर - १२ एकर डेपो - ३.५ एकर काम सुरू होणार - २०१६ पासून

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेटरच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा गडहिंग्लज

चंदगड येथील हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून वेटरचा खून केल्याप्रकरणी गुरुनाथ गणपती तारळेकर ( वय ३५ इनाम कोळीन्द्रे ता .चंदगड ) याचा खून केल्याप्रकरणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी दोघांना जन्मठेप व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. अशोक पुंडलिक गावडे (३१ ,रा. वाळकोळी ता. चंदगड ) व रमेश बाले ठाकूर (वय २८, रा. नेपाळ ) अशी त्यांची नावे आहेत. आरोपी अशोक याने मृताच्या वारसांना नुकसान भरपाईपोटी तीन लाख रुपये द्यावेत, असा आदेशही न्यायालयाने दिला.

५ फेब्रुवारी, २०१४ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आरोपी चंदगड बसस्थानकाशेजारील टॉप इन टाऊन हॉटेलमध्ये चहासाठी गेले होते. त्यावेळी वेटर गुरुनाथ तारळेकर याच्यासोबत बाचाबाची झाली. त्यामुळे तारळेकर तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनकडे निघाला. त्याच्या मागोमाग संबंधित आरोपी निघाले. त्याचवेळी अशोकच्या मालकीची बाहेर उभ्या असलेल्या चारचाकीतून रमेश याने लाकडी काठी काढून अशोक याच्याकडे दिली. अशोक याने तारळेकराच्या डोक्यात जोराचा प्रहार केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला प्रथम बेळगाव येथे त्यानंतर हुबळी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. मात्र दोन दिवसात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जमावाने पेटविले होते पोलिस स्टेशन

या प्रकरणी आरोपींना पाठीशी घातल्याच्या कारणावरून चंदगड पोलिस ठाण्यावर जमावाने हल्ला केला व पेटवून दिले. त्यावेळी जमाव प्रचंड संतप्त झाला होता. मात्र पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी गंभीर जखमी अवस्थेत सुद्धा प्रसंगावधान राखत हवेत गोळीबार केला. त्यामुळे जमाव पांगला होता. त्यानंतर तात्काळ अशोक गावडे याला अटक झाली.

१६ साक्षीदार तपासले

वादग्रस्त परिस्थितीमुळे या खटल्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर व एल. डी. सुरवसे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. याकामी सरकारी वकील अॅड. बी.के. देसाई यांनी १६ साक्षीदार तपासले. फिर्यादीसह विलास गावडे व सामिल्ला मुल्ला हे फितूर झाले. मात्र शेवटच्या टप्प्यात विलासला आरोपींनी भीती दाखविल्याने साक्ष फिरविल्याचे सांगत पुन्हा साक्ष दिली. न्यायाधीश देशमुख यांनी सबळ पुराव्याच्या आधारावर आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘फ्लॅश’चा वीजग्राहकांना झटका

$
0
0

मीटरचा वेग वाढल्याने आजऱ्यात २५ हजारांची‌ बिले

रमेश चव्हाण, आजरा

महावितरण कंपनीकडून सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या घरगुती वीज नोंदणीसाठी लावलेली फ्लॅश कंपनीची मीटर अचानक वेगाने धावतात. यामुळे पल्स वाढून एकेका ग्राहकाला २५ हजार रुपये बिल येत आहे. आजरा तालुक्यातील एक हजार मीटरमध्ये दोष आढळून आला आहे. नुकत्याच आजरा गावात एका ग्राहकाला २४ हजार ५०० रुपयांचे बील आले आहे. घरात दोन-तीन वीजेचे दिवे व फ्रिज-इस्त्रीचा वापर करणाऱ्या व पाच-सहाशे रूपये मासिक वीजबील भरणाऱ्या ग्राहकांना वीजबिल पाहून धक्का बसत आहे. मात्र, फ्लॅश कंपनीच्या मीटरच्या नादुरूस्तीचा असा आकस्मितपणे वेगवान होण्याचा प्रश्न अनुत्तरित आहे.

वर्ष-दीड वर्षापूर्वी वीज वितरण कंपनीने तालुक्यातील सिंगल फेजवरील सुमारे तीन हजारपर्यंत घरगुती वीज ग्राहकांच्या घरी नवीन मीटर बसविली आहेत. ही नवी वीजमीटर फ्लॅश या भारतीय वीज मीटर कंपनीकडून खरेदी करण्यात आली आहेत. साधारणत: अशा प्रकारचा खरेदी-विक्री बाबतचा व्यवहार वीज-वितरण कंपनीच्या मुंबईस्थित मुख्यालयाचे व्यवस्थापकीय संचालक व संचालक दर्जाचे उच्चपदस्थच करतात. मात्र तत्कालीन स्थितीत दर्जेदार वाटलेल्या फ्लॅश मीटरनी काही महिन्यातच वेग पकडला असून, त्याचा झटका मात्र, ग्राहकांना बसत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून या मीटरनी आपला वेग अचानक वाढवून मीटरच्या माध्यमातून नोंद होणारे पल्स गतीने वाढविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे मीटर त्याच्या कमाल गतीने पळू लागते व वीजबील पंचवीस-तीस हजार रूपयांच्या घरात सहज पोहोचत आहे.

फ्लॅश कंपनीची वीज-मीटर वापरण्याआधी कॅप‌िटल कंपनीची मीटर वापरली जात असत. त्या मीटरचा परफॉर्मन्स तसा चांगलाच होता. पण त्यापेक्षा फ्लॅशची मीटर गुणवत्तापूर्ण वाटल्याने खरेदी करण्यात आली व कॅप‌िटलऐवजी त्यांचा वापर सुरू झाला. वर्षभराच्या कालावधीत तालुक्याच्या एका विभागात सध्या ५००-६०० मीटर सदोष ठरली आहेत. कधी कधी मीटर सदोष ठरण्याचे प्रमाण ५० च्या घरात जाते. यामुळे संबंधीत ग्राहकांच्या भरमसाठ बिले आल्यामुळे तत्काळ नव्या एचई कंपनीच्या मीटरना रिप्लेस केले जात आहे. याबाबत आजरा परिसरातील वीजग्राहकांना येथील वीज कंपनी अधिकारी-कर्मचारी कोणतीही अडवणूक न करता सहकार्य करीत आहेत, ही जमेची बाजू ठरली आहे.

घरगुती ग्राहकांच्या विजेचा वापर कमीत कमी असतो. साधारणत: पाचशे ते एक हजार रूपयांच्या आसपासच बीले असतात. अशा वेळी मीटरच्या नोंदीनुसार काढलेली बीले अचानकपणे वाढलेली आढळतात. तेव्हा मीटरमध्ये नक्कीच काही बिघाड असल्याचे जागेवरच सिद्ध होते. त्यामुळे अशा ग्राहकांच्या घरातील युनीटनुसार वीजेची आकारणी करून पुढील महिन्याच्या बिलामधून ती वसूल करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

- आर. एन. लोंढे, उप-कार्यकारी अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सांगली काँग्रेस दुरुस्त करू’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'अगोदर सांगलीतील काँग्रेसचे घर दुरुस्त करू अन् नंतर राज्यात लक्ष घालू,' असे स्पष्ट करीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री पतंगराव कदम यांनी आगामी जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष निश्चित उभारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला.

माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालयाच्या सभागृहाला मदन पाटील यांचे नाव बुधवारी देण्यात आले. या वेळी कदम, माजी दुग्धविकास मंत्री आमदार मधुकराव चव्हाण, आमदार शिवाजीराव नाईक, महापौर विवेक कांबळे, आयुक्त अजिज कारचे, स्थायी समितीचे सभापती संतोष पाटील, उपमहापौर प्रशांत पाटील, गटनेते किशोर जामदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, स्वाभिमानी विकास आघाडीचे गटनेते शिवराज बोळाज, मदन पाटील यांच्या कन्या मोनिका आणि सोनिया आदी उपस्थित होते.

कदम म्हणाले, वसंतदादांच्या नंतर राजकीय पोकळी निर्माण झाली आहे, ही राजकीय पोकळी भरुन काढू, यासाठी काँग्रेसचे घर दुरुस्त करू. सगळे दुरुस्त होईल, कारण भाजपच्या दिशाभूलीची हवा बिहारच्या निवडणुकीने बदलली आहे. आता आम्ही ही जिल्ह्यात वाळवा, शिराळा आणि तासगावसोडून इतर सर्व पाचही तालुक्यांत ताकदीने लक्ष घालणार आहोत. मदन पाटील पण राजकारणात फार हुशार, महापालिकेची पदे देताना सदस्यांना माझ्याकडे पाठवायचा, माझ्याकडून पदाधिकारी निवडी करायचा आणि नंतर तो काय करतो हेच कळत नव्हते, अशी टिप्पणी केली.

व्यापारी संकुलाचे नामकरण

माजी मंत्री मदन पाटील यांच्या जयंतीनिमित्त सममाधीस्थळावर विविध मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. भक्ती संगीत-भावगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच शाळा नं. एकमधील व्यापारी संकुलाचा मदन पाटील व्यापारी संकुलाचा नामकरण समारंभ मधुकरराव चव्हाण, पतंगराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखी आदेशच नाही

$
0
0

दुष्काळाबाबत अधिकाऱ्यांना केवळ तोंडी सूचना; कदम यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

दुष्काळाच्या प्रश्नावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही पुढे शिवसेना आहे. भयानक परिस्थिती आहे. माणसे मरतील, अशी अवस्था आहे. सरकार कोणतीही कृती करायला तयार नाही. तोंडी आदेशावर अधिकारी काम करूच शकत नाहीत. आपण सहा जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशी केली. परंतु दुष्काळाबाबत सरकारने अद्याप कोणताही लेखी आदेश काढलेला नाही, असा दावा काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.

कदम म्हणाले, दुष्काळासारखी कोणतीही आपत्ती असेल तर वेळप्रसंगी राज्याच्या सर्व विभागाचे बजेट खर्च करण्याची वेळ आली तरी हरकत नाही, अशा पद्धतीने तयारी ठेवावी लागतो. रोज रोज निर्णय घ्यावे लागतात. विभाग आणि जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना काही अधिकार द्यावे लागतात. परंतु यापैकी हे सरकार काहीच करताना दिसत नाही. तोंडच्या घोषणा ही काही उपाययोजना नव्हे. आघाडी सरकारच्या काळात आचारसंहिता असताना एका रात्रीत आम्ही निर्णय घेतले होते. सरकार गेले तरी बेहत्तर, असा निश्चय करून निर्णय घेतले म्हणून त्यावेळी दुष्काळातील जनतेला दिलासा मिळाला. सद्यस्थितीत या सरकारला परिस्थितीचे भान आहे, असे वाटत नाही. काँग्रेस -राष्ट्रवादी विरोधक म्हणून सरकारला जाब विचारत आहेच. पण आमच्याही पुढे जाऊन सत्तेत सहभागी असलेली शिवसेनाच सरकारला जाब विचारत आहे. काँग्रेसची एक बैठक झाली आहे. आम्ही विरोधी पक्षनेत्याकडे सरकारच्या आदेशांची यादी मागितली आहे. अधिवेशनात प्रश्न लावून धरला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांचा वेढा; कारवाईत खोडा

$
0
0

वर्षानुवर्षाच्या अतिक्रमणांवर प्रशासन बडगा उगारणार कधी?

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चारही बाजूने अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला अंबाबाई मंदिर परिसर मोकळा करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून भाविकांसह स्थानिक नागरिकांकडून होत आहे. महाद्वारात बसणाऱ्या चिंच, आवळे विक्रेत्यांनाही प्रशासन आजपर्यंत कायमस्वरूपी हटवू शकलेले नाही, तिथे वर्षानुवर्षे मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालावी तसे ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला असला तरी तो अंमलात कसा येईल हा प्रश्न आहे. एकीकडे मंदिराभोवती अतिक्रमण वेढा वाढत असताना त्याबाबत होणाऱ्या कारवाईत मात्र खोडा घातला जात आहे.

मंदिराच्या आवारात असलेल्या ओवऱ्यांतील पूजा साहित्याची दुकानेही अतिक्रमणाच्याच यादीत येतात, मात्र या दुकानदारांनी नोटिशीला स्थ​गिती आणून हा प्रश्न जैसे थे ठेवण्यात आला आहे.

विद्यापीठ हायस्कूलच्या ​भिंतीलगत असलेल्या दहा ओवऱ्यांमधील दुकानांसह तीन प्रवेशद्वाराच्या कमानीत असलेली प्रत्येकी दोन अशी सहा दुकाने, गारेचा गणपती मंदिराला लागून असलेले एक दुकान आणि देवस्थान कार्यालयाच्या डावीकडे अन्नछत्राशेजारी असलेल्या दोन दुकानांचा पसारा नेहमीच वाढलेला असतो. महाद्वार कमानीपासून ते महाद्वार चौकापर्यंतचा रस्ता तर ​​चिंचा आवळे​ विक्रेत्यांनी व्यापला आहे. मंदिरात कुणी अतिमहत्वाची असामी येणार असेल तर या विक्रेत्यांच्या ठेल्यांचे अतिक्रमण हटवले जाते.

एरव्ही भाविकांना मंदिरात

जायला वाट राहत नाही इतका हा मार्ग दुतर्फा असलेल्या कटलरी, इमिटेशन ज्वेलरीच्या दुकानांच्या अतिक्रमणाने काबीज केला आहे. महाद्वार, घाटी दरवाजा, अतिबलेश्वर प्रवेशद्वार आणि सरलष्कर भवनसमोरील मार्गाने मंदिरात येताना अतिक्रमण पार करूनच यावे लागते. अतिक्रमण हटविण्याबाबत यापूर्वी अनेकदा भाविकांतून मागणी झाली आहे. मात्र कारवाईत साततत्याचा अभाव आहे.

​गाळेधारक फेरीवाले

महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड परिसरात हातगाडीवर वस्तू विकणाऱ्या ८० टक्के फेरीवाल्यांचे याच परिसरातील कमर्शिअल कॉम्प्लेक्समध्ये गाळे आहेत. मात्र तरीही गाळ्यांचा वापर गोडावूनसाठी केला जातो आणि माल मात्र हातगाडीवर ठेवून रस्त्यावर विकला जातो. त्यामुळे अशा गाळेधारक फेरीवाल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

महापालिका, देवस्थान की छत्रपती ट्रस्ट

अंबाबाई मंदिर आवार व परिसर, महापालिका, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि छत्रपती ट्रस्ट यांच्या अखत्यारित येत असल्यामुळे अतिक्रमणावर कुणी कारवाई करायची हा चेंडू नेहमीच या तीन प्रशासनाच्या कोर्टात फिरत राहतो. अंबाबाई मंदिराच्या आवारातील अतिक्रमणांवर देवस्थान समितीने कारवाई केली पाहिजे तर मंदिराबाहेरील अतिक्रमणाबाबत महापालिकेने कारवाईचे अस्त्र उगारले पाहिजे. भवानी मंडपातील वाढत्या अतिक्रमणाबाबत छत्रपती ट्रस्टने पावले उचलण्याची गरज आहे.

कुणीही या ... दुकान मांडा

अंबाबाई मंदिराच्या शंभर मीटर आवारात असलेल्या भवानी मंडपचा परिसर अतिक्रमणाच्या गर्तेत अडकला आहे. सध्या याठिकाणी ज्या जागेत केएमटी थांबा होता तो हटवून दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे. तर क्रीडास्तंभाच्याभोवती बिडाच्या तवेविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. मंडपाच्या कमानीतही फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. तर मेन राजाराम हायस्कूलच्या भिंतीपासून ते रोजगार हमी कार्यालयाच्या भिंतीपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तळ ठोकला आहे. ​बिडाचे तवे विकणाऱ्यांनी भवानी मंडप कमानीतील दोन्ही बाजूच्या कट्ट्यावर व्यापार थाटला आहे. या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

कुणीही या ... दुकान मांडा

अंबाबाई मंदिराच्या शंभर मीटर आवारात असलेल्या भवानी मंडपचा परिसर अतिक्रमणाच्या गर्तेत अडकला आहे. सध्या याठिकाणी ज्या जागेत केएमटी थांबा होता तो हटवून दुचाकी पार्किंग करण्यात आले आहे. तर क्रीडास्तंभाच्याभोवती बिडाच्या तवेविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. मंडपाच्या कमानीतही फेरीवाल्यांनी दुकाने थाटली आहेत. तर मेन राजाराम हायस्कूलच्या भिंतीपासून ते रोजगार हमी कार्यालयाच्या भिंतीपर्यंत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तळ ठोकला आहे. ​बिडाचे तवे विकणाऱ्यांनी भवानी मंडप कमानीतील दोन्ही बाजूच्या कट्ट्यावर व्यापार थाटला आहे. या अतिक्रमणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इथे मोडून पडतात उण्यादुण्याच्या भिंती

$
0
0



विकास विद्यामंदिरमध्ये सामान्य मुलांसोबत शिकताहेत विशेष मुले

Anuradha.kadam@timesgroup.com

कोल्हापूरः समाजातील विषमता हा फार मोठा रोग आहे. एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे दरी अशा विषमतेमुळे समाजाची वैचारिक बाजू दुबळी होत असते. ही जाणीव जिथे होते ​तिथे समानतेचे पहिले पाऊल पडू शकते आणि मग उण्यादुण्यांच्या साऱ्या ​भिंती गळून पडतात. या उक्तीची अनुभूती कोल्हापुरातील विकास विद्यामंदिरच्या प्रांगणात येत आहे. अंध, अस्थिव्यंग, कर्णबधिर आ​णि अपंगमती असलेली ३० मुले या शाळेत सर्वसामान्य मुलांसोबत शिकत आहेत. व्यक्तिगत पातळीवर तर या मुलांचे पुस्तकी शिक्षण सुरू आहेच, पण त्याहीपलिकडे एकमेकांच्या उण्यादुण्याचे मोल जपत आयुष्यातील मूल्यशिक्षणाचा पाठ खऱ्याअर्थाने या मुलांच्या मनावर कोरला जात आहे.

दुधाळी येथील विकास हायस्कूलमध्ये गेल्या दोन दशकांपासून विषमतेची दरी दूर करणारी पिढी घडवण्याचा हा वेगळा प्रयोग आत्मीयतेने सुरू आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव अशी शाळा आहे की, जिथे सर्वसामान्य मुले अपंगांना त्यांच्यातील उण्यासह स्वीकारतात आ​णि अपंग मुले सर्वसामान्यमुलांच्या दुण्यातून आत्मविश्वासाला उभारी देतात. मुख्याध्यापक व्ही. के. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही वेगळी वाट गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे.

विकास विद्यामंदिरमध्ये दहावीपर्यंत ​शिक्षण दिले जाते. वीटभट्टी कामगार, ऊसतोडणी कामगार, पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणाऱ्या

कुटुंबातील मुले या शाळेत ​शिकत आहेत. या शाळेचे वेगळेपणे सांगायचे तर ज्यांना नियतीने अंधत्व दिले आहे, अपंगत्वाच्या आघाताने ज्यांचे आयुष्य परावलंबी केले आहे, अस्थिव्यंग आ​णि कर्णबधीरता अशा दोन अपंगत्वामुळे ज्यांना न्यूनगंडाने पोखरले आहे अशी विशेष मुले सर्वसामान्य मुलांसोबतच शिकतात. फरक आहे तो केवळ काही विषयांचा. सरकारी नियमाप्रमाणे अपंग मुलांना

सायन्सऐवजी गृहशास्त्र, शरीरशास्त्र व आरोग्यशास्त्र हे विषय आहेत, तर भूमितीऐवजी अपंग मुलांना संगीताचा अभ्यासक्रम आहे.

विशेष म्हणजे अंध ​शिक्षक अजय वणकुद्रे व वैभवी बचाटे यांच्याकडे अपंग मुलांची जबाबदारी आहे. सर्वसामान्य मुलांच्या चेहऱ्यावर नेहमीच विशेष मुलांकडे पाहताना प्रश्नार्थक भाव असतात. उत्सुकतेतही एक केविलवाणी सहानुभूती असण्याची शक्यता असते. हाच फरक विकास विद्यामंदिरमधील वातावरणात गळून पडतो. सर्वसामान्य मुलांनाही अपंग मुलांकडे पाहण्याची दृष्टी मिळावी यासाठी अपंग मुलांमधील कलागुणांना वाव देण्याचा उपक्रम शाळेत केला जातो. अपंग मुलांच्या गाण्याचे कार्यक्रम केले जातात. अपंग मुलांना सर्वसामान्य मुलांच्या सहवासातून बोलायचे कसे, अनुभव कसा घ्यायचा हे ​शिकायला मिळते. एकमेकांच्या समन्वयातून अभ्यासक्रमाच्या पलिकडे या मुलांचा रोजचा शाळेतील अनुभव वेगळा असतो.

असाही मदतीचा हात

शाळेत शिकणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांपैकी काही मुले ही तुळजापूर, कराड या भागातील आहेत. ही मुले क्रांतीसिंह नाना पाटील नगर परिसरातील वसतिगृहात राहतात. त्या मुलांना शाळेपर्यंत ने आण करण्यासाठी अंध युवक मंचाने गाडीची व्यवस्था केली आहे. या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले दोन अंध शिक्षक विद्यार्थ्यांना विविध विषयांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून शाळेत येतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रेशनकार्ड करणार धान्य बचत

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूरः राज्य सरकारने रेशन कार्ड स्मार्ट करण्याचा निर्णय घेतल्याने याची अंमलबजावणी गतीने सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत वितरीत केलेल्या अर्जांपैकी ७८ टक्के रेशनकार्डचे डाटा एन्ट्रीचे काम पूर्ण झाले आहे. स्मार्ट रेशनकार्ड यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात धान्याची बचत होणार असून, उर्वरित धान्याचा लाभ पुन्हा केशरी रेशनकार्ड धारकांना मिळू शकतो.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरकारभार, बोगस आणि दुबार रेशन कार्डधारकांमुळे धान्याचा होणारा अपव्यय रोखण्यासाठी राज्य सरकारने रेशन कार्ड यंत्रणा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या कामात गती घेऊन जवळपास ८० टक्के रेशन कार्डांचे डाटा एन्ट्रीचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित वीस टक्के रेशन कार्डधारकांचे पत्ते अपूर्ण असल्याने हे काम रखडले होते, मात्र डिसेंबर अखेरपर्यंत १०० टक्के रेशनकार्डांचे डाटा एन्ट्रीचे काम पूर्णत्वास येईल, असा दावा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात डाटा एन्ट्रीचे सर्वाधिक १०० टक्के काम आजरा तालुक्यात झाले आहे. यानंतर पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील रेशन कार्डचे डाटा एन्ट्रीचे काम झाले आहे. सर्वात कमी ५३ टक्के काम कोल्हापूर शहरातील झाले आहे. उर्वरित रेशनकार्डमध्ये अपुरा पत्ता असलेले कार्ड बहुसंख्येने असल्याने अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्सकडून अर्ज संकलित करण्याचे काम सुरू आहे.

राज्याच्या तुलनेत कोल्हापुरातील रेशनकार्ड डाटा एंट्रीचे काम तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण कार्ड संखेच्या तुलनेत मात्र सर्वाधिक काम कोल्हापूर जिल्ह्यात झाले आहे. संपूर्ण राज्यात रेशनकार्ड डाटा एंन्ट्रीचे काम पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन धान्यवितरण यंत्रणा सुरू होणार आहे. याचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार असून, सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेतील बोगस आणि दुबार रेशन कार्डना आळा बसणार आहे.

एकूण रेशनकार्ड ः ४१९२७६४

आधार कार्डशी संलग्न ः १८५१०३१

वितरित करण्यात आलेले प्री प्रिंन्टेड फॉर्म ः ८४९२१६

संकलित करण्यात आलेले प्री प्रिन्टेड फॉर्म ः ६६५८९६

डाटा एन्ट्री पूर्ण झालेले रेशनकार्ड ः ६६१४२७

डाटा एन्ट्री पूर्ण झालेल्या रेशनकार्डची टक्केवारी ः ७७.८९

स्मार्ट रेशन कार्डसाठी कोल्हापूर जिल्ह्याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. आमच्या विभागाने जवळपास ८० टक्के प्री प्रिन्टेड फॉर्मची डाटा एन्ट्री पूर्ण केली आहे. राज्य सरकारच्या पुरवठा विभागाकडून येणाऱ्या पुढील सूचनांनुसार लवकरच रेशनिंग यंत्रणा ऑनलाईन होईल.

- विवेक आगवणे,

जिल्हा पुरवठा अधिकारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खरीप वाया गेल्याने शेतकरी हवालदिल

$
0
0

गडहिंग्लज तालुक्यात पाण्याची टंचाई

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

पावसाच्या बाबतीत सधन असलेल्या गडहिंग्लज तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालाच नाही. परिणामी तालुक्यातील नदी व लघुपाटबंधारे तलावात अत्यल्प पाठीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. मात्र पावसाअभावी बहुतांश खरीप हंगाम हातातून निसटल्यामुळे हवालदिल झालेला बळीराजा आणखीन धास्तावला आहे.

संपूर्ण राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, पावसाळ्याच्या उत्तरार्धातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील सहा लघुपाटबंधारे प्रकल्पांत अत्यल्प पाणीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा नियोजनबद्धरीत्या वापरणे क्रमप्राप्त आहे. तालुक्यात एकूण ४८ हजार हेक्टर भौगोलिक क्षेत्र असून त्यापैकी ४२ हजार हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. यापैकी १० हजार हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे, तर ३२ हजार जिरायत आहे. खरीप हंगामाचा विचार केल्यास तालुक्यात साडेसात हजार हेक्टर क्षेत्रावर भुईमूग, ८ हजार हेक्टर क्षेत्र भात, १३ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली, तर उर्वरित तीन हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, नाचणी तसेच तूर, मूग व उडीद अशी आंतरपिके घेण्यात आली आहेत. मात्र, या पिकांच्या एकूण उत्पादनात भुईमूग २५ टक्के, भात ३५ टक्के व सोयाबीनमध्ये १० टक्के घट झाल्याचे तालुका कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

तालुक्यातील जनावरांची संख्या पाहता चाऱ्यासाठी मका, ज्वारी असे चारापीक उसामध्ये आंतरपीक म्हणून घेता येईल. यासाठी कृषी विभागाकडून बियाणांचे वाटप होत आहे. तसेच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी शेतामध्ये ठिबक सिंचनाचा उपयोग करून पाण्याच्या अपव्यय टाळावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरी वेदर ग्राउंडवर ओपन जिम साकारणार

$
0
0

नागाळा पार्क परिसरातील रस्त्यांची कामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. विवेकानंद महाविद्यालयासह आरटीओ ऑफिस, जलसंधारण, पोस्ट, सार्वजनिक बांधकाम यांसह अनेक शासकीय कार्यालये या परिसरात आहेत. एसटी महामंडळाचे वर्कशॉपही याच परिसरात असल्याने प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात प्रभागातील रस्त्यांचे काम पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. आमदार फंडातून रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे सुरू आहे. प्रभागातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यांचे दर्जेदार डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच प्रभाग खड्डेमुक्त करू.

प्रभागातील रिकाम्या जागांचा विकास करण्यासाठी नियोजन सुरू आहे. परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी मेरी वेदर ग्राऊंड उपलब्ध आहे. तेथे ओपन जिमही निर्माण केली जाईल. तेथे लोकांना व्यायामाची साधने उपलब्ध होतील. प्रभागातील नागोबा मंदिराची मालकी सध्या खाजगी व्यक्तीकडे आहे. मात्र, तेथे बाग निर्माण करून मंदिराचे सुशोभिकरणाचा प्रस्ताव आहे. परिसरातील हॉल विकसित करून, तेथे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र निर्माण करता येईल. परिसरात वॉकिंग ट्रॅकचा फायदा नागरिकांना होईल. सध्या या जागेची मालकी असलेल्या व्यक्तींच्या सहकार्यानेच मंदिर परिसराचा विकासाचे प्रयत्न आहेत.

शहराच्या विकासासाठी हद्दवाढ, विमानतळ विस्तारीकरण महत्त्वाचे आहे. हद्दवाढीशिवाय शहराला अधिक विकासनिधी मिळणार नाही. त्यामुळे शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा महापालिकेत लावून धरणार आहे. उपनगरे आणि नव्याने सहभागी होणाऱ्या गावांच्या नियंत्रित विकासासाठी नियोजन व्हावे यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरू. विमानसेवा बंद असल्याने शिवाजी विद्यापीठातील कुलगुरू परिषदेकडे ३० जणांनी पाठ फिरवली. उद्योगांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे विमानतळासाठी पाठपुरावा करू.

- अर्जुन माने, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणी दूधगंगेत

$
0
0



कागलसह अन्य गावांना प्रदूषित पा‌णी पुरवठा

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल शहरातील दुर्गंधीयुक्त पाणी, मैला, केरकचरा येथील करंजे पाणंदच्या ओढ्यातून दुधगंगा नदीच्या पाण्यात मिसळत आहे. सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने कोल्हापूर पाठोपाठ कागल व नदीतून पाणीपुरवठा होणाऱ्या गावांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या ओढ्याजवळून जाणेही त्रासदायक ठरत असून नाकाला रुमाल बांधून जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेमया आरोग्य विभागाशी संपर्क साधून तक्रारी केल्या आहेत.परंतु त्याची फारशी दखल घेतली गेलेली नाही.

कागल बसस्थानकाच्या पश्चिमेस राज्य महामार्गामया बोगद्यातून करंजे पाणंद मार्गे अनंत रोटो वसाहत, मौलाली माळ, करंजे वसाहत व अन्य शेतकऱ्यांच्या वसाहतींकडे जावे लागते. याठिकाणी रहाणारे सहा ते सात नागरिक दैनंदिन कामकाजासाठी ये जा करीत असतात. रस्त्यांदरम्यान दोन ओढे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहतात. या ओढ्यातून माळभाग तसेच शहरातून येणाऱ्या गटारगंगा मिसळतात.

शहरातील मैलामिश्रीत पाणी, प्लास्टिक, घाण, दारुच्या रिकाम्या बाटल्या, टाकाऊ वस्तू आणि येथील नागरिकांनी टाकलेला केरकचरा टाकला जातो. भरीत भर म्हणून ओढ्यात वेली, झाडेझुडपे, आळू अशा वनस्पतीनी दाट गर्दी केली आहे. गेली कित्येक महिने ओढ्यातील वनस्पतीना तटलेला कचरा आणि घाण पाण्यामुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्यवर परिणाम होत आहे. शिवाय हे सर्व दुर्गंधीयुक्त पाणी थेट दूधगंगा नदीत मिसळत आहे.

या पाण्यामुळे नदीचे पाणीही दुषित झाल्याने त्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नदीकाठच्या गावांचे आरोग्यही धोक्यात येवू लागले आहे. याठिकाणी भेट दिली असता नागरिक रोष व्यक्त करतात. आणि पालिकेला वारंवार कळवूनही दखल घेतली जात नसल्याची खंतही व्यक्त करतात.

करंजे ओढा स्वच्छ करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिला आहे. त्यानुसार ओढ्याचे पाणी तीन ठिकाणी अडवून क्लोरीनद्वारे स्वच्छ करुन शेतकऱ्यांना शेतीसाठी दिले जाणार आहे. सध्या शेतकरी हे पाणी थेट वापरतात. त्यामुळे नदीत पाणी जातच नाही.

- प्रभाकर पत्की, मुख्याधिकारी, कागल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टिंबर मार्केटचा कायापालट करू

$
0
0

नाथा गोळे तालीम प्रभागाची पुनर्रचना झाल्यानंतर टिंबर मार्केट, गंजी माळ हा भाग या प्रभागात नव्याने समाविष्ट झाला आहे. जुन्या भागांमध्ये फारशा सुविधा प्रलंबित नाहीत. मात्र या नव्याने सहभागी झालेल्या, अनेक वर्षांपासून सुविधांपासून वंचित असलेल्या टिंबर मार्केटसारख्या भागाला रस्ते, आरोग्य, पाणी अशा मुलभूत सुविधांबरोबर अन्य सुविधांनी परिपूर्ण बनवणार आहे. त्याचबरोबर सुशोभिकरणही करण्यात येणार आहे.

खरे तर टिंबर मार्केटमध्ये रस्ते शोधायलाच लागायचे. अनेक ठिकाणी खोदाईमुळे तर एखाद्या गावातील पाणंद रस्त्याची आठवण यायची. ही सर्व दुरवस्था दूर करून रस्ते सुधारण्याला प्राधान्य दिले आहे. अनेक ठिकाणी पॅचवर्क सुरू केले आहे. तर जे अतिशय खराब रस्ते झाले होते. त्यांचे पूर्णपणे डांबरीकरण करायचे आहे. ड्रेनेज लाइन, पिण्याच्या पाण्याच्या वितरण नलिका, गटारी अशा सर्वच प्रकारच्या सुविधा ​देण्याचे नियोजन आहे. गंजीमाळ परिसरात सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करण्यात येत आहे. तसेच या परिसरातील महिलांसाठी कुटिरोद्योग उभे करण्यासाठी बचतगटांची गरज असल्याचे दिसून आले आहे. त्यादृष्टीने या परिसरातून पाच बचतगट स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गवत मंडई परिसरातील लोकांची प्रॉपर्टी कार्डवर नावे लागलेली नाहीत. कित्येक वर्षांपासून या लोकांचा प्रयत्न सुरू आहे. स्वतःच्या प्रॉपर्टीवर स्वतःचे नाव लावण्याचेही प्रमुख टार्गेट आहे. याशिवाय या परिसरात सभागृह, पाण्याचा प्रश्न सोडवण्याला प्राधान्य आहे.

जुन्या भागातील स्कॉयवॉकचा ​प्रकल्प यापूर्वी महापालिकेच्या सभेत चर्चीला गेला होता. तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता जोपासली जाणार आहे. तसेच भागात ब्लड बँकेचे नियोजन प्रशासनाच्या पातळीवरून रखडले आहे. त्याबाबतही पाठपुरावा करुन लवकरात लवकर आधुनिक ब्लड बँक सुरू करण्याचा मनोदय आहे.

- जयश्री चव्हाण, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रूद्रचा सहा वर्षांपासून ठावठिकाणा नाही

$
0
0

कोल्हापूरः ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा मुख्य साधक रूद्र पाटील याचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. सीबीआय, एनआयएसह कोल्हापूर आणि कर्नाटक पोलिसांना तो शिताफीने गुंगारा देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या सर्वोच्च तपास यंत्रणांसमोर त्याने मोठे आव्हान निर्माण केले आहे. कर्नाटकातील ज्येष्ठ विचारवंत एम.एन. कलबुर्गी यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक तसेच सीबीआय पोलिस त्याचा शोध घेत आहेत. रूद्र पाटील पकडला गेल्यास नरेंद्र दाभोळकर, पानसरे व कलबुर्गी हत्येचा तपास वेगाने होईल असा कयास आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images