Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कागल देखरेख संघाच्या जागेबाबत आरोप-प्रत्यारोप

$
0
0
कागल तालुका देखरेख संघाच्या अवसायक तथा सहाय्यक निबंधकानी गैरसमजूतीतून हसनसो मुश्रीफ दूध संस्थेस अतिक्रमण समजून नोटीस दिली आहे.प्रत्यक्षात कागल तालुका देखरेख संघाच्या जागेत अतिक्रमण झालेले नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने

$
0
0
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकत्र येऊन दोन्ही काँग्रेस एकमेकांसोबत आहेत, असे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दाखवून द्यावे असा निर्णय राज्यस्तरावर झाला आहे.

नागरी सुविधांसाठी शिवसेनेचा मोर्चा

$
0
0
येथील प्रभाग १४ मधील जुना चंदूर रोड परिसरात नागरी सुविधांची वानवा असून त्यांची तातडीने पूर्तता करण्यात यावी, या मागणीसाठी इचलकरंजी शहर शिवसेनेच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

केएमटीची नाइट सर्व्हिस बारगळण्याची शक्यता

$
0
0
महिला व प्रवाशांना रात्रीचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी केएमटी नाइट सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी केली. केएमटीने नाइट सर्व्हिससाठी तीन वेळा निविदा काढूनही खासगी बस सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांनी पाठ फिरवली आहे.

भरत त्यागी : ५ आरोपींना बेंगळुरुमध्ये अटक

$
0
0
भरत त्यागी हत्या प्रकरणातील पाच आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी बेंगळुरुमधून अटक केली आहे. अटक केलेल्या संदीप गायकवाड याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली देत इतरांचीही नावे उघड केली.

फसवणूकप्रकरणी मायलेकींना कोठडी

$
0
0
बोगस कंपनी स्थापन करून नोकरी लावण्याच्या आमिषाने बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी अनिता विजयकुमार बनसोडे व तिची मुलगी आम्रपाली (रा. सध्या राजारामपुरी १० वी गल्ली) या मायलेकींना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

हप्ता देणा-यांचाच व्यवसाय

$
0
0
राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज डिपार्टमेंट) हा विभाग म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने दुर्लक्षाचा विषय. एक्साइज विभाग हा दारु उत्पादक आणि विक्रेत्यांकडून कर गोळा करत असल्याने आपला या विभागाशी काय संबंध, अशी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया असते.

अतिक्रमणे काढा, अन्यथा हायकोर्टात जाऊ

$
0
0
महालक्ष्मी मंदिरातील अतिक्रमणे काढून टाकण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यापूर्वी आदेश देऊनही अतिक्रमणधारकांना साधी नोटीसही दिली गेलेली नाही. या हलगर्जीपणाबाबत तक्रारदारांनी देवस्थान समिती व पुरातत्व विभागाला नोटीस दिली आहे.

स्थायी समितीचा ‘ग्रीन सिग्नल’

$
0
0
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आवश्यक असलेल्या १७ चौकात सिग्नल उभारण्याच्या निविदेला स्थायी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

ज्येष्ठ कवी, साहित्यिक हरपला

$
0
0
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य, ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्रा.प्रसन्नकुमार पाटील (वय ७७) यांचे शुक्रवारी निधन झाले. दुंडगे (ता.गडहिंग्लज) येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्यकर्त्यांनाही धडा शिकवू

$
0
0
‘राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे कोल्हापूर खंडपीठासंदर्भात जोपर्यंत ठोस प्रस्ताव सादर होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना भेटण्यात अर्थ नाही.

शाहूपुरीतील मंडळांचा ‘नो डॉल्बी’

$
0
0
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंडळांनी डॉल्बीला विरोध करत डॉल्बी न वापरण्याचा निर्धार केला आहे. पोलिस अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांची तसेच लोकप्रतिनिधींची बैठक आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये झाली.

खंडपीठासाठी आर या पार

$
0
0
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी २५ वर्षे संघर्ष करणाऱ्या वकिलांनी आता आरपारची लढाई पुकारली आहे.

एसटी उलटून तिघे ठार

$
0
0
सातारा शहरापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरेगाव नजीकच्या वर्धनगड (ता. कोरेगाव) येथील घाटात दहिवडीहून साताऱ्याकडे येणारी एसटी (एम. एच.१४ बी. टी. २५९४ ) ही समोरून आलेल्या सुमोला वाचविण्याच्या प्रयत्नात ३०० फूट खोल दरीत कोसळली.

जप्त दारूला फुटतात पाय

$
0
0
विनापरवाना दारुची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून माल जप्त केला जातो. कर चुकवलेला स्टॉक आणि बीअर शॉपीमध्ये देशी-विदेशीची खुलेआम विक्री करणाऱ्यांवरही कारवाई होते.

इको-फ्रेंडली बाप्पाला मागणी

$
0
0
गणेशोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कुंभारवाड्यात घरगुती गणेश मूर्तींबरोबरच सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मूर्तींच्या कामानेही वेग घेतला आहे.

विसर्जन स्पॉट अस्वच्छ

$
0
0
गणरायाचे आगमन पंधरवड्यावर आले आहे. बाप्पांच्या स्वागताच्या उत्सुकतेप्रमाणेच त्याच्या निरोपाच्या क्षणी हुरहूर लागते. तेव्हा रंकाळा खण, इराणी खण, राजाराम तलाव, कोटितीर्थ तलाव, पंचगंगा नदी या प्रमुख विसर्जनस्थळांकडे सोयीनुसार पावले वळतात.

सपोनि सुपेंना दंड

$
0
0
गांधीनगरमधील किशनचंद हारुमल वधवा यांच्यावर विविध स्वरुपाचे सात गुन्हे नोंदवून त्यांची धिंड काढल्याचे प्रकरण सहायक पोलिस निरीक्षक विलास सुपे यांच्या चांगलेच अंगलट आले.

भाजीपाला, फळांचाही झाला ‘कांदा’

$
0
0
कांदा आणि मिरचीपाठोपाठ भाजीपाला, धान्य आणि फळांचे दरही गगनाला भिडल्याने ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. महागाई वाढल्याचे कारण देत किरकोळ बाजारपेठेतील व्यापा‍ऱ्यांनी जीवनावश्यक वस्तूंची वारेमाप दरवाढ केल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

पदाच्या लालसेपोटी संचालक विरोधात

$
0
0
‘शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनमध्ये (स्मॅक) गेली चार वर्षे एकत्र असलेल्या संचालकांना अखेरच्या वर्षी काम चुकीचे चालल्याचा साक्षात्कार कसा झाला?’ असा सवाल करत ‘वैयक्तिक पदाच्या लालसेपोटीच काही संचालकांनी फूट पाडली आहे,’ असा आरोप स्मॅक विकास आघाडीने केला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images