Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

टोलचा भुर्दंड कोणावर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी कोल्हापूर

सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ३० नोव्हेंबरपूर्वी टोलमुक्तीचा शब्द जनतेला दिला असला तरी, ही टोलमुक्ती कशा पद्धतीने साध्य होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. प्रकल्पाच्या रकमेपेक्षा भरमसाठ रकमेचा दावा करणाऱ्या आयआरबीने मोठ्या रकमेची मागणी केली तर, याचा भुर्दंड कोल्हापूरच्या जनतेवर बसू नये यावर टोल विरोधी कृती समिती ठाम आहे. तर महापालिकेत सत्तेत असणाऱ्या कॉँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीही महापालिकेवर भार न टाकता टोलमुक्तीचा आग्रह कायम ठेवला आहे.

आयआरबीचे टोल ३० नोव्हेंबरपूर्वी हद्दपार करू, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. याबाबत आयआरबी कंपनीशी चर्चा करण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहेत. टोलमुक्तीसाठी नेमका कोणता पर्याय काढला जाणार याबाबत मात्र स्पष्टता नसल्याने वाहनांवरील टोल जाऊन जनतेवर छुपा बोजा वाढेल काय याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता कोणताही अतिरिक्त भार महापालिकेला झेपणार नाही. महापालिकेकडे उत्पन्नाची पुरेशी साधने नाहीत. निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेत्यांनी दिलेला टोलमुक्तीचा शब्द पाळावा. भुर्दंड बसणारा पर्याय जनतेला मान्य होणार नाही.

- सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री

सरकारने दिलेला टोलमुक्तीचा शब्द आम्ही पाळणार आहोत. रक्कम कशी उभी करायची हा पुढचा प्रश्न आहे. सध्या रक्कम निश्चितीसाठी चर्चा सुरू आहेत. नागरिकांवर भुर्दंड पडू नये असा आमचाही प्रयत्न आहे.

- चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतागृहासाठी मंगळसूत्र गहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा प्रश्न असतानाच आपल्याकडे घरातही स्वच्छतागृहे नसल्याने त्यांची दुहेरी कुचंबणा होते. घरात शौचालय नसेल तर लग्नाला नकार देणाऱ्या महिलाही आहेत. वाशीम जिल्ह्यातील संगीता आव्हाळे यांनी घरात शौचालय बांधण्यासाठी मंगळसूत्र गहाण ठेवले होते.

त्याच्या पावलावर पाऊल टाकत कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव येथील सुनीता व रुक्मिणी दुधाळ या दोन महिलांनी आपली मंगळसूत्रे गहाण ठेऊन शौचालय बांधण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सभापती गजानन कोठावळे यांनी या शौचालयाचे उद्घाटन केले. दोघींचा या वेळी सत्कारही करण्यात आला.

जागतिक शौचालयदिनानिमित्त गुरुवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध उपक्रम आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषदेतर्फे हे सर्व उपक्रम राबवले गेले. ठिकठिकाणी शौचालयांच्या बांधकामांना प्रारंभ करण्यात आला. या दिनामित्त अग्रण धुळगाव येथे २५ खड्डे तयार करण्यात आले.

बांधकामासाठी पंचायत समिती स्तरावरून गवंडी प्रशिक्षण घेतलेले ३० गवंडी उपलब्ध करून देण्यात आले. गावात ३१६ कुटुंबे असून, १५८ कुटुंबांकडे शौचालयाची व्यवस्था नसल्याने गवंडी प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात आले. 'प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरी शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला,' असल्याचे सभापती कोठावळे यांनी सांगितले. ग्रामस्थांना आरोग्य व स्वच्छता याबाबत मार्गदर्शनही केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प. महाराष्ट्राने अन्याय केला

$
0
0

आमदार वीरेंद्र जगताप यांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनीच दुष्काळी तालुक्यावर अन्याय केला आहे,' असा आरोप अमरावतीचे काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी येथे केला. विधानमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालील या पथकाने खानापूर तालुक्यातील साळशिंगे व माहुली येथील टेंभू सिंचन योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खानापूरचे आमदार अनिल बाबर, बाळासाहेब पाटील, शशिकांत खेडेकर, धैर्यशील पाटील, बाळासाहेब मोटकुटे, मिलिंद माने, विधानभवनाचे सहसचिव अशोक मोहिते उपस्थित होते.

जगताप पुढे म्हणाले, 'राज्याच्या घटनेमध्ये विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र असे तीन प्रदेश धरलेले आहेत. तालुका हा घटकच नाही. राज्याचे एकूण सिंचन क्षेत्र ५४ टक्क्यांवर आहे. तर अमरावतीचे १८ टक्के, जालना ७.८ टक्के, विदर्भाचे २४ टक्के, वर्ध्याचे ७९ टक्के, सांगलीचे ८० टक्के तर कोल्हापूरचे ११० टक्के आहे. जादा मागास प्रदेश अमरावती आहे. त्यामुळे आम्हाला सिंचनामध्ये राज्याच्या बरोबरीने आणा.'

'आमचा भाग दुष्काळी असल्याने आमच्यावर मोठे वार होत आहेत. आमच्याकडे पाण्याची कमतरता आहे. विदर्भाचा अनुशेष भरून काढायला आमचा विरोध नाही, अनुशेषाला धक्का न लावता अतितुटीच्या व तुटीच्या भागाला प्राधान्य द्यावे. शेतीमध्ये क्रांती करणारा आमचा भाग आहे. टेंभू सिंचन योजनेचे पाणी जात नाही, परंतु युरोपमध्ये द्राक्षांचा दर पळशीमध्ये ठरतो. द्राक्षबागायतीबाबत विद्यापीठापेक्षाही चांगले संशोधक शेतकरी येथे आहेत. त्यामुळे २-३ वर्षांत टेंभू सिंचन योजना पूर्ण होऊन पाणी आल्यास आमचा भाग महाराष्ट्रातील कॅलिपोर्निया होईल,' असा विश्वास आमदार बाबर यांनी व्यक्त केला.

विधानमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर, 'टेंभू उपसा सिंचन योजना हा दुष्काळी भागासाठीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यामुळे या योजनेचे काम वेळेत पूर्ण व्हायला हवे. त्यात अजिबात हयगय होता कामा नये. काम दर्जेदार न झाल्यास सर्व संबंधितांना जबाबदार धरले जाईल. या योजनेच्या भरीव निधीसाठी सकारात्मक शिफारस केली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांचा भाव वधारला...

$
0
0

दिग्विजय कुंभार, शाहूवाडी

विधानपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने मतदारांचा भाव आतापासूनच वधारू लागला आहे. अटीतटीच्या होणाऱ्या या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मोलाची किंमत मिळणार असल्याने विशेषकरून नगरपालिका क्षेत्रातील मतदारांचा रुबाब भलताच वाढू लागला आहे. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी बनलेले माजी मंत्री सतेज पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांच्यामध्ये विधानपरिषदेसाठी प्रतिष्ठेचा सामना रंगला आहे. विधानपरिषदेच्या निमित्ताने पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील नेत्यांचीही कसोटी लागणार आहे. यानिमित्ताने कोण कुणाच्या बाजूने उभे राहणार हेही समजणार आहे. पन्हाळा नगरपरिषदेतील बदलत्या घडामोडींमुळे कोरेंची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

तालुक्यात मलकापूर ही एकमेव क वर्ग नगरपरिषद आहे. निवडणुकीसाठी पालिकेतील १७ नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती व चार जिल्हा परिषद सदस्य असे २२ मतदार आहेत. नगरपालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्य पक्षाची सत्ता असल्याने पक्षीय पातळीवरील निर्णयांना महत्त्व आले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सात व जनसुराज्यचे पाच नगरसेवक आहेत. पालिकेतील विरोधी पक्षाचे म्हणजे शिवसेनेचे पाच नगरसेवक आहेत. पंचायत समितीचे सभापती पंडितराव नलवडे हे काँग्रेसचे आहेत. जिल्हा परिषदेच्या चार मतदारांपैकी भाग्यश्रीदेवी गायकवाड व योगीराज गायकवाड हे दीर भावजय कॉंग्रेसचे तर आकांक्षा पाटील व लक्ष्मी पाटील या दोन सदस्या शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांचे समर्थक आहेत.तालुक्यातील २२ मतदारांचा राजकीयदृष्टया विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे सात, शिवसेनेकडे सात, जनसुराज्यकडे पाच व काँग्रेसकडे तीन सदस्य आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेचा फॉर्म्युला या निवडणुकीत राहून माजी मंत्री सतेज पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास किमान दहा सदस्य त्यांच्या पाठीशी राहू शकतील. शिवसेनेनेचा पक्षीय पातळील जो निर्णय होईल तो होईल. सतेज पाटील यांचे सरूडकर नातेवाईक तर अनुराधा पाटील- सरूडकर गोकुळच्या सदस्या आहेत. त्यामुळे उमेदवारी कुणालाही मिळाली तरी सरुडकरांची कोंडी होणार आहे. जनसुराज्यने आपली भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांच्याही चार ते पाच मतदारांना महत्त्व आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत सांडपाणी थेट पंचगंगेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प(सीईटीपी) लगत असलेल्या ओढ्यातील ड्रेनेजचे चेंबर फुटून मैलायुक्त सांडपाणी थेट ओढ्याद्वारे पंचगंगा नदीत मिसळत आहे. या संदर्भातील माहिती असूनही पालिकेला मात्र त्याचे काहीच गांर्भीय असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषण संदर्भात नेमकी काय कार्यवाही सुरु आहे याची प्रचिती येत असल्याची चर्चा नागरिकांतून होऊ लागली आहे.

पंचगंगा नदी प्रदुषणाचा प्रश्न गंभीर बनला असतानासुद्धा पालिका प्रशासन आणि प्रदुषण नियंत्रण मंडळ केवळ कागदोपत्रीच कार्यवाहीचा फार्स करीत आहे. हेरवाड येथील बंधार्यात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने त्या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले. त्यानुसार चार दिवसापूर्वी प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने शहरात येऊन पाण्याचे नमुने घेतानाच अहवालही सादर केला होता.

शुक्रवारी सकाळी गुडमार्निंग पथक या परिसरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांविरुद्ध कारवाई करीत असताना भागातील काही नागरिकांनी उपमुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांच्यासह पालिकेच्या अधिकार्यांना ओढ्यालगत असलेले चेंबर फुटून मैलायुक्त सांडपाणी थेट ओढ्यात मिसळत असल्याचे दाखवले. त्यावर अधिकाऱ्यांनी केवळ 'बघतो' असे मोघम उत्तर दिल्याने संतप्त महिलांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले. एकिकडे नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जात आहेत.

मात्र जनतेच्या जीवाशी येणाऱ्या गांभिर्यपूर्वक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. गत तीन ते चार आठवड्यापूर्वी हे चेंबर फुटले आहे. या संदर्भात पालिकेला कळवूनसुध्दा त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. चेंबर फुटल्याने मैलायुक्त पाण्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी या भागात पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वीकृती’साठी जीव लागला टांगणीला

$
0
0

appasaheb.mali@timesgroup.com

'आधी लगीन विधान परिषदेचे आणि त्यानंतरच महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक आणि विविध समिती सभापतीपदाच्या निवडीचे' असा पवित्रा नेत्यांनी घेतला आहे. यामुळे महापौर, उपमहापौर निवडीनंतर अन्य पदासाठी पुढे सरसावलेल्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्याचवेळी स्वीकृत नगरसेवकपदासाठी वेगवेगळ्या माध्यमातून फिल्डींग लावली जात आहे. पराभूत उमेदवारही स्वीकृत नगरसेवक पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. डिसेंबर महिन्याच्या २० तारखेपर्यंत विधानपरिषदेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या तोंडावर कुणाचीही नाराजी पत्करायला नको म्हणून 'समिती सभापती आणि स्वीकृत'चा निर्णय लांबणीवर पडणार आहे.

महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडीनंतर साऱ्यांच्या नजरा स्थायी समिती सभापती, परिवहन समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभाप​​तिपदी वर्णी लागण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीनंतर सर्वच पक्ष आणि आघाड्यांना विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करावी लागते. दोन डिसेंबरपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे आघाडीची नोंदणी करावी लागणार आहे. आज अखेर काँग्रेस आघाडीनेच नोंदणी केली आहे. सर्वच पक्षांची नोंदणी झाल्यानंतर महापालिकेची सर्वसाधारण सभा होणार आहे.

वीस डिसेंबरच्या आत सर्वसाधारण सभा झाल्यास त्या सभेत विविध समितीसाठी सदस्यांची नावे निश्चित केली जातील. समिती सदस्यांची नावे सभेत निश्चित झाली तरी सभापतिनिवडीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जाहीर केला जातो. विधान परिषदेची निवडणूक वीस डिसेंबरच्या आसपास होण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीच्या धांदलीत स्थायीसह अन्य समिती, आणि स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून पंचाईत नको म्हणून या निवडी लांबणीवर पडणार आहेत. यामुळे स्वीकृत नगरसेवक आणि विधि समित्यांच्या सभापतिसाठी जानेवारीपर्यंत वाट पाहावे लागणार आहे.

नाराजी टाळण्यासाठी प्रयत्न

स्वीकृत नगरसेवक आणि स्थायी समिती सभापतिपदावर अनेकांचा डोळा आहे. काँग्रेसला दोन, राष्ट्रवादीला एक आणि भाजत ताराराणी आघाडीला दोन स्वीकृतच्या जागा मिळणार आहेत. काँग्रेसकडून दोन जागासाठी सध्य स्थितीला वीसहून अधिक जण इच्छुक आहेत. माजी उपमहापौर हरिदास सोनवणे, अजित पोवार, इंद्रजित सलगर, दिलीप भुर्के, जगमोहन भुर्के, राजेंद्र्र साबळे, उदय जाधव, मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी असे अनेकजण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही जयंत पाटील, उत्तम कोराणे, राजेश लाटकर, रमेश पोवार अशी यादी लांबणारी आहे. भाजप ताराराणी आघाडीतील माजी महापौर, माजी नगरसेवक स्वीकृतसाठी पुढे सरसावले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला प्रत्येकी दोन आणि एक जागा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शौचालय बांधा, अन्यथा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात सर्व‌त्र निर्मल योजना राबविण्यात येत असताना इचलकरंजी नगरपालिका युद्धपातळीवर कामाला लागली आहे. उघड्यावर शौचास बसू नये याबाबत जागृती करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता थेट वाजत गाजत पकडले जाऊ लागले आहे. हा पहिला टप्पा असला तरी आता बांधकाम व्यावसायिक, यंत्रमाग कारखानदारांना शौचालयांची सोय करण्यास सांगण्यात आले आहे तर सामुहिक शौचालयांसाठी पाऊल उचलले जाऊ लागले आहेत. तसेच सामुहिक शौचालये उभारण्यासाठी अनुदानाचा हातही पालिकेने पुढे केला आहे.

उघड्यावर शौचास बणासऱ्याविरोधात नगरपालिकेने गुरुवारी अनोखी मोहीम हाती घेतली. यामध्ये एका पथकाने सभवित जागेवर आधीपासून पहारा ठेवला आणि जे नागरिक उघड्यावर शौचास बसतात त्यांना पकडून हलगी वाजवत आणले. त्यांच्याकडून ५० रूपये दंडही स्वीकारला. वास्तविक इचलकरंजी शहराची रचना लक्षात घेता, येथे विविध प्रांतातील लोक नोकरी व्यवसायानिमित्त‌आलेले आहेत. इचलकरंजी मुख्य शहर आणि उपनगरात भाड्याच्या घरांमध्ये, खोल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. बहुतांशी खोल्यांमध्ये शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे बहुतांशी यंत्रमाग कामगार उघड्यावर शौचास बसतात. अनेकदा यासाठी गटारींचा वापरही केला जातो. त्यामुळे याला आळा बसण्यासाठी पालिकेने मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात उघड्यावर शौचास बसलेल्यांना पकडल्यानंतर खरी मेख लक्षात आल्याने, पालिकेने बांधकाम व्यावसायिक व यंत्रमाग कारखानदारांना शौचालये बांधण्याबाबत नोटीस काढली आहे. या नोटिशीत म्हटले आहे की, इचलकरंजी शहर औद्योगिक शहर असून परगावचे लोक नोकरीसाठी येथे स्थायिक होतात. त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता या कर्मचाऱ्यांना शौचालयाची सोय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. अनेक यंत्रमाग कारखान्यांमध्ये शौचालय व मुतारीची सोय नाही, त्यामुळे कामगार उघड्यावर शौचास जातात. ही बाब गंभीर आहे. कामगारांसाठी तत्काळ शौचालय व मुतारी न बांधल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

तसेच शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात कामगार काम करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांनाही कामगारांसाठी शौचालयांची सोय करावी अशी नोटीस काढली आहे. तसेच बांधकामाचा लेआऊट करताना त्यात तशी तरतूद करण्याची अट घातली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

देशात डाळीचे दर गगनाला भिडले आहेत. शेतीमालाच्या आधारभूत किंमती वाढल्या असत्या तर पर्यायाने उत्पादनात वाढ झाली असती व दर नियंत्रणात राहिले असते. मात्र शेतीमालाचे दर वाढविले तर महागाई वाढेल असे वाटल्याने केंद्र सरकारने आधारभूत किंमतीत म्हणावी तशी वाढ केली नाही. शेतकऱ्यांच्या जमाखर्चाचा हिशोब टिकला पाहिजे हे सरकारचे धोरण गेल्या वर्षभरात दिसले नाही. अपेक्षा पूर्ण न झाल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला आहे, असे प्रतिपादन माजीमंत्री व आमदार जयंत पाटील यांनी केले.

जयसिंगपुरात शरद साखर कारखाना नरंदे, शरद कृषी महाविद्यालय जैनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शरद संजिवनी कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार जयंत पाटील बोलत होते. याप्रसंगी शरद साखरचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर, द. भा. जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील- बोरगावकर, नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर, चंगेजखान पठाण, जिल्हा कृषी अधिकारी मोहन आटोळे, सत्येंद्रराजे निंबाळकर प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले, साखरेचे दर ३५०० रूपये क्विंटल होते. हे दर टिकविणे सरकारचे काम होते. मात्र सरकारने ठोस उपाय केले नाहीत. १९०० रूपये क्विंटल दराने साखर विकावी लागली. आता १२ टक्के साखर निर्यातीमया धोरणामुळे २७०० रूपयापर्यंत दर वाढले. अशीच स्थिती राहिल्यास साखर कारखानदारी मोडकळीस येईल. यामुळे साखरेचे दर ३५०० रूपयांवर नेण्याचे खरे आंदोलन केले पाहिजे.

बदलत्या काळात शेतीमध्ये नवतंत्रज्ञानाचा अवलंब होत आहे. नवे शास्त्र विकसीत होत असल्याने शेतीमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत. आजचा शेतकरी उच्चशिक्षीत आहे. शेतीमध्ये कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी तो वेगवेगळे प्रयोग करीत आहे. नव्या दृष्टीने प्रयोगशिलता वाढल्याने गुणात्मक बदल होत आहेत. कृषी विद्यापीठे नवे शास्त्र शेतकर्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृषी प्रदर्शनातून हे नवे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीसाठी प्रयोगशिलतेने नवकल्पनांना वाव द्यावा.

राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकर्यांना कृषी प्रदर्शनाचा लाभ मिळावा यासाठी जयसिंगपुरात कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले. शेतीच्या नव्या तंत्रज्ञानातून शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधावी.

प्रारंभी आमदार जयंत पाटील यांनी फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. स्वागत प्रकाश पाटील टाकवडेकर यांनी केले. आभार रावसाहेब भिलवडे यांनी मानले. सुत्रसंचलन बबन यादव यांनी केले.

याप्रसंगी संजय पाटील-यड्रावकर, शरद इन्स्टिट्युटचे एक्झ‌िक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, उपनगराध्यक्षा स्वाती पडुळकर, विजयसिंह माने देशमुख, थबा कांबळे, डी.बी.पिष्टे, रावसाहेब भिलवडे, अजित उपाध्ये, तालुका कृषी अधिकारी आर.एम.राजमाने, सागर चौगुले यासह मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षा पार्किंगने वाहतूक ब्लॉक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रवाशांची वाट पाहत रस्त्यावर कुठेही पार्क केल्या जाणाऱ्या रिक्षा, थांब्यावर प्रमाणापेक्षा अधिक थांबणाऱ्या तसेच थांबा नसलेल्या ठिकाणीही उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षांमुळे सर्वसामान्यांना वाहतूक कोंडी व त्रासाला सामोरे जावे लागते आहे. शहर वाहतुकीमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या बहुसंख्य रिक्षांना शिस्त नसल्याने मोठा त्रास होत आहे. याकडे अनेकवेळा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिसही दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. रिक्षाचालकांच्या या मानसिकतेमुळे अनेकवेळा इतर वाहनधारकांनाही फटका बसत असतो.

मध्यवर्ती बसस्थानक परिसर हा रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचे उत्तम उदाहरण आहे. प्रवाशांना उतरण्यासाठी रिक्षा स्टॉपजवळ थांबण्याची जागा केली आहे. पण अनेकवेळा तिथे प्रवाशी उतरल्यानंतर रिक्षाचालक नव्या प्रवाशांसाठी तिथेच थांबून राहतात. तेथील बुलाव डावच्या रिक्षा तर अनेकवेळा मुख्य रस्त्यापर्यंत पार्क केल्या जातात. या अस्ताव्यस्त पार्क होणाऱ्या रिक्षांमुळे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडतो आहे. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास ही परिस्थिती हाताबाहेर जाते. शहरातील महत्त्वपूर्ण ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना घेण्यासाठी या रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभ्या केल्या जातात. रिक्षा स्टॉपमधील रिक्षांकडे न जाता आपल्याकडे प्रवाशी यावेत असा प्रयत्न रिक्षाचालकांकडून केला जातो. विशेष म्हणजे येथे असलेले वाहतूक पोलिस रिक्षाचालकांच्या मुजोरीकडे दुर्लक्ष करतात.

याशिवाय शहरात विविध ठिकाणी रिक्षाचालकांनी स्टॉप बनवले आहेत. दाभोळकर कॉर्नरजवळील वडापच्या रिक्षांनी तर सरळ रस्त्यावर स्टॉप केला आहे. हीच परिस्थिती स्वयंभू गणेश मंदिर चौकात आहे. रंकाळा स्टँडसमोर तर लागलेल्या रिक्षांमुळे एसटी, बस या खोळंबत असल्याने वाहतुकीची कोंडी होते.

सरळ चाललेली रिक्षा अचानक थांबवणे, मागील वाहनचालकास योग्य जागा न देता प्रवाशांची चढउतार करणे असे प्रकार सातत्याने घडतात. यामुळे अनेकदा छोटेमोठे अपघात घडतात. पोलिस अधूनमधून रिक्षाचालकांवर कारवाई करतात. मात्र, या कागदी कारवाईचा परिणाम झालेला दिसून येत नाही. शहरातील मुख्ये रस्ते अजूनही अरुंद असून त्यावर रिक्षाचालकांचा हक्क असल्याचे दिसते. रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे प्रवाशी वैतागले असून त्यावर ठोस उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न महापालिका, पोलिस तसेच आरटीओकडून कधी होणार याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालुक्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रे

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : वाड्यावस्त्यांतील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता वाढवा, त्यांना स्थानिक पातळीवर विद्यार्जनासाठी पुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व ठिकाणांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून केंद्राची अंतिम यादी नोव्हेंबरअखेर जाहीर होणार आहे. या केंद्रांमध्ये स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करण्यासाठी बारा लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. दर्जेदार पुस्तके खरेदी करण्यासाठी जिल्हा ग्रंथालयाने पुस्तकांची सूची तयार करुन दिली असून या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात येणार आहेत.

स्पर्धा परीक्षेत प्रशासकिय अधिकारी घडवण्याचा ड्रीम प्रोजेक्ट शिक्षण व अर्थ समिती सभापती अभिजीत तायशेटे यांनी हाती घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तकांसह अध्ययनासाठी निवारा मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. गेल्या सहा महिन्यापासून याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. कमीत-कमी निधीमध्ये केंद्रे सुरू करण्यासाठी मान्यताप्राप्त वाचनालय, ग्रंथालय, कॉलेज ग्रंथालयांची निवड केली जाणार आहे. अशा ग्रंथालयाचा पूर्वीच्या सुविधांचा वापर करुन घेतला जाणार आहे.

प्रत्येक तालुक्यात होणाऱ्या केंद्रांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यातील ६० हजार रुपयांची पुस्तके खरेदी केली जाणार आहेत. उर्वरीत ४० हजार रुपयांतून पुस्तके ठेवण्यासाठी तिजोरी, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच, टेबल साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. तालुक्याच्या ठिकाणी होणाऱ्या केंद्राचा सर्वाधिक फायदा गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड व चंदगड तालुक्यातील वाड्यावस्त्यांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रशासकीय विद्यार्थ्यांचा टक्का वाढण्यास मदत होणार आहे.

सक्षम सभापतींमुळे दर्जा वाढण्यास मदत

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा नेहमीच चर्चेच्या विषय बनल्या आहेत. विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या मिळणाऱ्या सुविधांमुळे अनेकवेळा बदनामीला सामोरे जावे लागले आहे. मात्र अलकडे शिक्षण समिती सभापतीपद विशेष चर्चेत आले आहे. सुरुवातीस महेश पाटील व नंतर अभिजीत तायशेटे यांनी प्राथमिक शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. दोघेही उच्चविद्याभूषित असल्याने त्यांनी अनेक स्त्युत्य उपक्रम राबवून शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

प्राथमिक टप्प्यावर बारा तालुक्यांसाठी बारा तालुका स्पर्धा परीक्षा केंद्रे सुरुवात करण्यात येणार आहे. वर्षानंतर याचा लेखाजोखा मांडून केंद्रे वाढवण्याचा किंवा आहे त्या केंद्रांना अधिक सुविधा देण्याचा निर्णय घेतला जाईल.

-अभिजीत तायशेटे, सभापती, शिक्षण व अर्थ समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर एकमेव संशयित

$
0
0

न्यायालयीन कोठडीवर आज सुनावणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येला दहा म​हिने पूर्ण झाले असून पोलिसांना या गुन्ह्यात सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड हा एकमेव संशयिताला अटक करण्यात यश आले आहे. समीरला अटक केल्यानंतर या हत्येसंबधी अन्य संशयित, पुरावे गोळा करणे व हत्येचा सूत्रधार शोधण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत.

हत्येच्या तपासासाठी पोलिसांनी दीड लाखाहून अधिक मोबाईल व फोन कॉलची तपासणी केली. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरसह कर्नाटक सीमा भागात तपास केला. राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली. तरीही तपासाचा बहुतांश भाग कोल्हापूर पोलिसांकडेच होता. पोलिसांनी उजव्या संघटनांतील काही संशयितांच्या फोन कॉलवर नजर ठेवली होती. दरम्यान ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात हुबळी येथे माजी कुलगुरू एन.एन. कलबुर्गी यांची हत्या झाली. पानसरे व कलबुर्गी हत्येत साम्य असल्याने कोल्हापूर पोलिसांचे पथक कर्नाटकात रवाना झाले.

दरम्यान, १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी सांगली येथून समीर गायकवाडला अटक केली. त्यानंतर त्याच्या घरातून २३ मोबाइल व ३१ सीमकार्ड जप्त केली. तसेच ठाणे यांनी त्याच्या खोलीतून समीरचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. समीरची मैत्रीण व मानलेल्या बहिणीशी बोलताना पानसरे हत्येसंबधी उल्लेख केला होता. संभाषणातील आवाजाचे नमुने पुणे व गुजरात येथील फॉरेन्सिक लॅबला पाठवले. दोन्ही लॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. समीरचे मोबाईलवर गोवा बॉम्ब स्फोटातील फरारी आरोपी रूद्र पाटील याच्याशी कॉल झाल्याची माहिती पुढे आली.

समीरला हजर करणार?

समीरच्या न्यायालयीन कोठडीवर शनिवारी (ता.२१) सुनावणी होणार आहे. सुनावणीवेळी समीरला हजर करावे, अशी विनंती समीरच्या वकिलांनी केली आहे. शनिवारी समीरला हजर करणार की, व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सुनावणी घेणार हे शनिवारी स्पष्ट होणार आहे. खटल्यासंबधी समीरला गोपनीय माहिती द्यावयाची आहे, असे समीरने स्पष्ट केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत फोटोग्राफर ठार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मार्केट यार्ड चौकात ट्रकची धडक बसल्याने अरुण बळवंत खोपडे (वय ४५, रा. इंगवले कॉलनी, फुलेवाडी) हे फोटोग्राफर ठार झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रकवर दगडफेक करून चालकाला मारहाण केली. पोलिसही वेळेत न पोहोचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अपघात झाला.

अरूण खोपडे हे पत्नीसमवेत मोटार सायकलवरून गांधीनगर येथे कपडे खरेदी करण्यासाठी निघाले होते. मार्केट यार्डजवळ मागून आलेल्या ट्रकची मोटारसायकलच्या आरशाला धडक बसल्याने खोपडे यांची मोटारसायकल डळमळीत झाली. त्यानंतर ट्रकने मागून धडक दिल्याने ते व पत्नी रस्त्यावर आपटले. अरूण हे डोक्यावर पडल्याने जागीच ठार झाले. दरम्यान, ट्रकचालकाने ट्रक न थांबवता पुढे निघून गेला. यावेळी चौकातील नागरिकांनी पाठलाग केला. तावडे हॉटेलजवळ ट्रॅफिक जॅम झाल्याने ट्रक थांबला. नागरिकांनी दगडफेक करून ट्रक फोडला. तसेच चालक गिरीश विठ्ठल जाधव (४४, रा. नांद्रे, ता. मिरज, जि. सांगली) या बेदम मारहाण करून ताब्यात घेतले.

दरम्यान खोपडे यांचा मृतदेह वीस मिनिटे रस्त्यांवर पडून होता. त्यांच्या पत्नी विराज सुन्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला बसल्या. त्यानंतर शाहूपुरी पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेशी संपर्क साधून मृतदेह हलवला. पोलिसांनी चालक जाधवला ताब्यात घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासात राजकीय हस्तक्षेप नकोच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ज्येष्ठ विचारवंत अॅड. गोविंदराव पानसरे यांच्या पोलिस तपासात राजकीय हस्तक्षेप नकोच. त्यांच्या हत्येप्रकरणी एकच मारेकरी पकडला आहे. त्याचाही पूर्ण तपास झालेला नाही, त्यामुळे अजूनही आम्ही थांबलेलो नाही, हत्येचा छडा लागेपर्यंत सातत्याने आग्रही राहू' असा विश्वास मेघा पानसरे यांनी व्यक्त केला. पानसरे यांच्या हत्येला नऊ महिने पूर्ण झाले. दर महिन्याच्या २० तारखेला मॉर्निग वॉक काढण्यात येतो.

पानसरे यांच्या निवासस्थानापासून ते शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा भवनपर्यंत मॉर्निग वॉक झाला. सुमारे शंभराहून अधिक जण या वॉकमध्ये सहभागी झाले. मेघा पानसरे म्हणाल्या, 'विवेकवादी विचार संपविण्याचे काम अजूनही काही यंत्रणा करीत आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि विवेकी विचार मांडण्याची परवानगी आहे. मात्र विधायक समाजनिर्मितीत अडथळा ठरत असलेल्या काही यंत्रणांनी पानसरे यांचा खून केला. त्यांच्या हत्येप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्या मारेकऱ्याकडून पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. भविष्यात पानसरे यांच्या तपासात राजकीय हस्तक्षेपाची शक्यता नाकारत येत नाही. हा हस्तक्षेप झाल्यास हत्या करणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकणार नाही.' वॉकमध्ये दिलीप पोवार, व्यंकाप्पा भोसले, जीवन बोडके, तनुजा शिपूरकर, निहाल शिपूरकर आदी सहभागी झाले.

युवा साहित्यिकांसोबत २६ नोव्हेंबरला संवाद

अभिव्यक्ति स्वातंत्र्य आणि विवेकवादी विचारांची जागृती करण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबरला युवा साहित्यिकांशी संवाद साधला जाणार आहे. या संवादात पुणे, धारवाड, कोल्हापूर, सांगली परिसरातील युवा साहित्यिक सहभागी होणार आहेत. गायन समाज देवल क्लबच्या भांडारकर स्मृतिभवनात सकाळी ११ वाजता कार्यक्रम होत मॉर्निग वॉकमध्ये संयोजकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नव्या २९ बसना लागणार ‘ब्रेक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूथ्थान योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) मंजूर झालेल्या १०४ बसेसपैकी २९ बसेसच्या आगमनाला ब्रेक लागला आहे. जेएनएनयूआरएम योजना बंद करून त्यातील काही योजनांचा समावेश अमृत योजनेत केला आहे. केंद्राने जेएनएनयूआरएम योजनेत केलेला बदल आणि २९ बसेसच्या खरेदीची वर्क ऑर्डर देण्यास झालेला विलंब यामुळे महापालिका प्रशासनाला ११ कोटीचा फटका बसला आहे. काँगेस आघाडीच्य कालावधीत केएमटीला १०४ बसेस खरेदीसाठी ४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता.

१०४ बसेसची खरेदी, बस थांब्याचे सुशोभिकरण, वर्कशॉप अद्ययावत करणे अशा विविध कामांचा समावेश ४४ कोटी रुपयांत समाविष्ठ करण्यात आला होता. महापालिका पशासनाने जून २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत निविदा खरेदी प्रकिया राबवली. अशोक लेलँड कंपनीची सर्वात कमी दराची प्रती बस २४ लाख ४९ हजार रुपयांची निविदा मान्य करत ७५ बसेसची ऑर्डर दिली होती. तांत्रिक बाबी पूर्ण करून प्रती बस २८ लाख रुपये इतका खर्च आला आहे. उर्वरित २९ बसेस खरेदीचा प्रस्तावही मंजूर झाला होता.

केएमटीकडे जेएनएनयूआरएम योजनेतंर्गत आतापर्यंत ७५ बसेस उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरित २९ बसेससाठी वर्क ऑर्डर आणि इतर प्रकिया गेल्या सात महिन्यापासून सुरू होत्या. अमृत योजनेत समा​वेश झाला तर बदललेल्या निकषनुसार उपलब्ध योजनेसाठी केंद्र सरकार ५० टक्के निधीची तरतूद करते

तर राज्य आणि महापालिका प्रशासनाला पत्येकी २५ टक्के निधी गुंतवावा लागणार आहे. नव्या निकषामुळे नवीन २९ बसेस खरेदीला ब्रेक लागला आहे. दरम्यान 'आतापर्यंत ७५ बसेस उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरित ११ कोटी रुपयांतून २९ बसेस खरेदी करण्यात येणार होत्या. शिवाय डेपो विकासासाठी ४.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आयटीएस (इंटिलिजिन्स ट्रान्सपोर्ट सर्व्हिस)साठी २.२५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. २९ बसेस उपलब्ध व्हाव्यात याकरिता महापालिका पातळीवर प्रयत्न करण्यात आले' असे केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक संजय भोसले यांनी सांगितले.

बदलामुळे योजनांना लागली कात्री

केंद्र सरकारने जेएनएनयूआरम योजनाच गुंडाळली आहे. या योजनेंतर्गत समाविष्ट विकासपकल्प, योजनांचा अमृत योजनेत समाविष्ठ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. वास्त​वात, जेएनएनयूआरएमच्या माध्यमातून विविध विकासकामांसाठी निधीची तरतूद केली होती. त्यातील काही योजना, आणि निधींना कात्री लावल्याने केएमटीला नव्या बसेस मिळणार नाहीत. २९ बसेसच्या नुकसानीसह अन्य तांत्रिक बाबींनाही फटका बसला आहे. या योजनेतील उर्वरित ११ कोटी रुपये परत गेले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५२ कर्मचाऱ्यांना केएमटीची नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कामचुकार कर्मचाऱ्यांना ट्रॅकवर आणण्यासाठी केएमटी प्रशासनाने कारवाईची मोहिम चालूच ठेवली आहे. समाधानकारक काम न करणे, सातत्याने गैरहजर राहणाऱ्या तब्बल ५२ कायम कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करण्यात येऊ नये? अशी नोटीस गुरुवारी बजावली. सात दिवसांत समाधानकारक खुलासा केला नाही तर त्यांची खातेनिहाय चौकशी करून नोकरीतून बडतर्फे केले जाऊ शकते.

दरम्यान, वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना करून, नोटीस काढूनही सुधारणा झाली नाही म्हणून पहिल्या टप्प्यात रोजंदारीवरील २८ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात टाकले आहे. त्यामध्ये १७ वाहक आणि ११ चालकांचा समावेश आहे. त्यापुढे जाऊन आता सर्वच कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या परिवहन विभागाच्या केएमटीच्या सध्या १०० बसेस शहरात धावतात. रोजचे सरासरी उत्पन्न आठ लाखांच्या आसपास आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो. पगार दोन, दोन महिने उशिरा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र दीवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर केएमटी प्रशासनाने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा एकत्रित पगार दिला. कायम कर्मचारीही सातत्याने गैरहजर राहात असल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावरही कारवाई होणार आहे.

२८ गैरहजर रोजंदारी कर्मचाऱ्यांना काढून टाकले

दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी केएमटीचे कर्मचारी मोठ्या संख्येने गैरहजर राहिले. त्याचा फटका प्रशासनाला बसला. दररोज केएमटी २६००० किलोमीटर धावते. भाऊबीजेदिवशी ५००० किलोमीटरने हा प्रवास कमी झाला. त्यामुळे उत्पन्नावरही परिणाम झाला. त्याबाबत तपासणी केल्यानंतर वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी दोषी आढळलेल्या २८ जणांबाबत कडक भूमिका घेण्यात आली. त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

प्रवाशांचीही ससेहोलपट

केएमटीच्या कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरपणामुळे व्यवस्थापनाला सातत्याने आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागले आहे. अचानक गैरहजर राहणे, त्यामुळे फेऱ्या रद्द करायला लागणे अशा प्रकारांतून प्रवाशांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याची दखल आता घेण्यात आली आहे.

३६५ पैकी १३८ दिवसांपेक्षा कमी दिवस कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ५२ वाहक चालकांना नोटीस काढली आहे. यात २८ वाहक, २४ चालकांचा समावेश आहे. सात दिवसांत समाधानकारक खुलासा आला नाही तर खातेनिहाय चौकशी होऊन कारवाई होऊ शकते. कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा अधिकार आयुक्तांना आहे. ते पुढील कारवाई करतील.

- संजय भोसले, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राज्यातील दुष्काळ संपवू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

'राज्यातील युती सरकारने जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून अवघ्या नऊ महिन्यांत १४०० कोटी रुपये खर्च करून २४ टीएमसी पाणी अडवले आहे. राज्यातील दुष्काळ समूळ नष्ट करायचा विडा सरकारने उचलला आहे. आठ हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली आहे. त्यामुळे आमचे सरकार हे शेतकऱ्यांच्या मदतीला धाऊन जाणारे सरकार असून, गरज भासल्यास कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत केली जाईल,'अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.

पाटण तालुक्यातील मरळी येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाचे भूमीपूजन व स्व. शिवाजीराव देसाई यांचा ७२ वा जयंती सोहळा या संयुक्त कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री उपस्थित होते.

या वेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री विजय शिवतारे, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, आमदार शंभुराज देसाई, आमदार सत्यजित पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.

युती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांना चांदीची तलवार, शाल व श्रीफळ देऊन आमदार शंभुराज देसाई यांनी सत्कार केला. या प्रसंगी दौलत सहकारी साखर कारखाना आणि मोरण शिक्षण संस्था यांच्याकडून एक लाख एक हजार रुपयांचा धनादेश दुष्काळ निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास त्याचबरोबर हुतात्मा कर्नल संतोष महाडिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, 'महाराष्ट्राला कोयनेने दौलत दिली असून, त्यामुळेच महाराष्ट्र उजळला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा दिली आहे. राज्याच्या गृहमंत्री पदावर असतानाच राज्याने कणखर नेतृत्व जाणले. त्याकाळी पोलिसांना राहण्यासाठी घरे नव्हती. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनीच पोलिसांनी घरे मिळवून दिली ती आज आपणाला दिसत आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थंडीत स्वाइन फ्लूचे सावट

$
0
0

आरोग्य यंत्रणा सज्ज; ऑक्टोबरअखेर १८४ रुग्ण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठी थंड हवामान पोषक असल्यामुळे थंडीमध्ये पुन्हा स्वाइन फ्लू डोके वर काढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे १८४ रुग्ण आढळले असून ४४ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. सुदैवाने, गेल्या काही दिवसांत स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात थंडी वाढली आहे. स्वाइन फ्लूचे विषाणू थंडीत अधिक जोमाने कार्यरत होतात. त्यांचे आयुष्यही वाढते. पर्यायाने नागरिकांत त्याचा संसर्ग वाढतो. सर्दी, पडसे व त्यातून निर्माण होणारा हा आजार असल्याने त्याबाबत काळजी महत्त्वाची ठरते. सध्या खासगी रुग्णालयांत सर्दी, खोकला, पडसे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापण्यात आला असून, शहरात आयसोलेशन अॅपल,अॅस्टर आधार, सिद्धीविनायक, आदी रुग्णालये तसेच ग्रामीण भागात ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६ ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालयांमध्ये सुविधा केली आहे.

स्वाइन टाळण्यासाठी

सातत्याने हात साबणाने धुवा, पौष्टिक आहार घ्या, लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, पालेभाज्या अशा पदार्थांचा आहार घ्या. धूम्रपान टाळा, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, भरपूर पाणी प्या, मधुमेही, हृदयरोगी, वयस्कर, लहान मुले, गरोदर महिला यांची विशेष काळजी घ्या.

थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. सध्यातरी खासगी किंवा सरकारी रुग्णालयात स्वाइनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, तरीही या मोसमात स्वाइन फ्लूच्या आजाराबाबत दक्षता घेण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. शहरातील विविध ठिकाणी जागृतीसाठी फलक लावण्यात आले आहेत.'

-डॉ. एस. एस. साठे, जिल्हा शल्यचिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानपरिषदेची रणधुमाळी दोन दिवसांत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असून दोन दिवसात निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावरुन उमेदवारी जाहीर झाल्याच्या चर्चा जोरात सुरु असल्या तरी काँग्रेसची उमेदवारी २६ नोव्हेंबरनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर परदेश दौऱ्यावर असलेले एक इच्छुक प्रकाश आवाडे परत आले आहेत. तसेच महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश दिल्लीमध्ये परतले आहेत. दरम्यान, आमदार महादेवराव महाडिक बंडखोरीच्या तयारीत असल्याचे समजते.

उमेदवारीबाबत आमदार महादेवराव महाडिक, सतेज पाटील, पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांनी दावे केले आहेत. त्यांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न चालवले आहेत. एक जानेवारीपूर्वी निवडणूक होऊन प्रक्रिया पूर्ण होण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची आवश्यकता आहे. त्याबाबतचा कार्यक्रम तयार झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्याकडून फक्त तो कार्यक्रम जाहीर होण्याचीच औपचारिकता आहे. त्यामुळे कदाचित शनिवारी किंवा जास्तीत जास्त सोमवारी हा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्यामुळे पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यास एक डिसेंबरपर्यंत मुदत मिळू शकते. एकीकडे कार्यक्रम जाहीर होण्याच्या मार्गावर असताना शुक्रवारी काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांना जाहीर झाल्याबाबतचे काही संदेश सोशल मीडियावरुन फिरले.

त्यामुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण २५ नोव्हेंबरला दिल्लीला अहवाल घेऊन गेल्यानंतरच उमेदवारी जाहीर होणार आहे. कदाचित २६ किंवा २७ नोव्हेंबरला नाव जाहीर होऊ शकते. महाराष्ट्राचे निरीक्षक मोहन प्रकाश हे दिल्लीमध्ये पोहचले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही या उमेदवारीबाबत प्रदेश पातळीवरुन आढावा घेण्याची शक्यता आहे.

सध्या उमेदवारी जाहीर झाल्याच्या घोषणांची चर्चा असली तरी २५ तारखेनंतरच उमेदवारी जाहीर होऊ शकते. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे अहवाल घेऊन दिल्लीला जाण्याची आवश्यकता आहे.

- पी. एन. पाटील

सध्या सोशल मीडियावरुन काही संदेश फिरत असले तरी त्यामध्ये काही तथ्य नाही. पुढील आठवड्यात उमेदवारीचा निर्णय होणार आहे. त्यापूर्वी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. मतदारांच्या भेटीगाठी सुरु आहेत.

- सतेज पाटील

मी विद्यमान आमदार असून या निवडणुकीच्या उमेदवारीसाठी मी सक्षम असल्याची बाजू प्रदेशाध्यक्षांसमोर मांडली आहे. पक्षाकडून उमेदवारीचा निर्णय होईल. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्याचे काम करत आहे.

- महादेवराव महाडिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरच्या आरोपपत्रासाठी हालचाली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड व फरारी असलेला रूद्र पाटील यांच्यात संबध आले असून त्यादृष्टीने पोलिसांनी पुरावे जमवण्यास सुरूवात केली आहे. समीरवर आरोपपत्र दाखल करण्यास पोलिसांना हे पुरावे महत्वाचे ठरणार असून आरोपपत्र बळकट करण्यासाठी पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

पानसरे यांच्या हत्येप्रकरणी समीर याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून जप्त केलेल्या २३ मोबाइल व ३१ सीमकार्डवरून पोलिसांनी तपास केला. या तपासात रूद्र पाटील याच्याशी समीरने एकवेळ संपर्क साधला होता हे स्पष्ट झाले आहे. रूद्रने नेपाळहून समीरला कॉल केला होता अशी माहिती यापूर्वी तपासात पुढे आली आहे. रूद्र फरारी असून त्याचा शोध एनआयए, कर्नाटक सीआयडी, सीबीआय या संस्था घेत आहे. मडगाव येथील बॉम्बस्फोटाप्रकरणात रूद्र फरारी आहे. डॉ. दाभोलकर, पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी रूद्र पाटीलवर संशय व्यक्त केला आहे. अनेक वर्षे फरारी असलेल्या आरोपी रूद्रने साधलेला संवाद तपासात महत्वाचा घटक राहणार आहे. त्याचा उल्लेख आरोपपत्रात होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी धमकी दिली!: समीर गायकवाड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याने कोर्टातील व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीच्यावेळी पोलिसांच्यावर धमकी दिल्याचा आरोप केला. 'सामाजिक संघटनांचा आमच्यावर दबाव असल्याने आम्ही सांगू त्यांची नावे घे. नकार दिला तर तुला फासावर चढवीन, तुझ्या कुटुंबाला त्रास देईन. आमच्या म्हणण्याप्रमाणे सांगितलेस तर २५ लाख रूपये देईन', असे पोलिसांनी सांगितल्याचे समीर म्हणाला. समीरने केलेल्या आरोपांची चौकशी करून त्याचा अहवाल पाच डिसेंबरच्या सुनावणीच्यावेळी द्यावा, असा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. यादव यांनी दिला.

समीरला कोर्टासमोर गोपनीय माहिती द्यावयाची आहे, असे व्हिडिओ कॉन्फरन्स सुनावणीवेळी समीरचे वकील एम.एम. सुहासे, समीर पटवर्धन यांनी सांगितले. पण विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले व पानसरे कुटुंबियांचे वकील अॅड विवेक घाटगे यांनी आक्षेप घेत जेल मॅन्युएलच्या विरोधात असल्याचा युक्तीवाद केला. समीरला म्हणणे मांडू न देणे म्हणजे त्याच्या मानवी हक्कावर गदा आणण्यासारखे होईल याकडे अॅड पटवर्धन यांनी लक्ष वेधले. त्यानंतर न्यायदंडाधिकारी यादव यांनी समीरला म्हणणे मांडण्यास सांगितले.

समीर म्हणाला, नऊ ऑक्टोबर २०१५ रोजी ब्रेन मॅपिंग टेस्टच्या सुनावणीच्यावेळी मला कोर्टात आणले. त्यावेळी माझ्या तोंडावर बुरखा होता. मला काही दिसत नव्हते. मी कोर्टाकडे जाण्यासाठी पायऱ्या चढत असताना एक व्यक्ती माझ्याजवळ आली. 'मी पोलिस आहे. माझ्या साहेबांचा तुला निरोप आहे. तू ब्रेन मॅपिंगसाठी होकार दे. तू नकार दिलास तर तुला आम्ही फासावर चढवू. तुझ्या कुटुंबाला त्रास होईल. आमच्यावर सामाजिक संघटनांचा दबाव आहे. आमच्या म्हणण्याप्रमाणे बोललास तर तुला २५ लाख रूपये दिले जातील. माफीचा साक्षीदार केले जाईल आणि या सगळ्यात सोडवले जाईल. आम्ही म्हणतो त्यांची नावे घे', असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यानंतर मला कोर्टात आणले. माझ्या तोंडावरील बुरखा काढला. पण ती व्यक्ती कोण होती हे मला बुरख्यामुळे कळले नाही, अशी माहिती समीरने दिली. यावर न्यायदंडाधिकारी यादव यांनी 'तू कोर्टाला का सांगितले नाहीस?' असा प्रश्न केला असता 'मला कोर्टात हजर केल्याने मी गोंधळलो होतो' असा खुलासा समीरने केला. त्यानंतर न्यायदंडाधिकारी यादव यांनी समीरला 'वेळच्या वेळी तक्रार कर. तक्रार निःसंकोचपणे कर' अशी सूचना दिली. त्यानंतर तपास अधिकारी अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैत्यन्य यांना न्यायदंडाधिकारी यादव यांनी समीरने केलेल्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

या संदर्भात पानसरे यांचे वकील अॅड विवेक घाटगे यांनी प्रतिक्रिया विचारले असता ते म्हणाले, 'समीरने सनसनाटीपणासाठी आरोप केला आहे. ब्रेन मॅपिंग चाचणीच्यावेळी त्याला कोर्टाने चाचणी संबधी सर्व माहिती दिली होती. त्याने ब्रेन मॅपिंगसाठी नकार दिला होता. तसेच तुला काही सांगायचे आहे का असा प्रश्न विचारला असता त्याने नकार दिला होता'.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images