Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘गोकुळ’ची सॅटेलाईट डेअरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून गोकुळ दूध संघाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. शिरोळ तालु्नयात उदगाव येथे पहिली सॅटेलाईट डेअरी उभारण्यात आली असून येथे दूध संकलनाबरोबरच पॅकेजिंग करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात ही डेअरी कार्यान्वित होईल, अशी माहिती अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. उदगाव येथे सॅटेलाईट डेअरीमध्ये दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर अध्यक्ष विश्वास पाटील व उर्मिला पाटील यांच्या पूजा तसेच वास्तुशांत विधी झाला.

यानंतर झालेल्या पत्रकार बैठकीत बोलताना अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, उदगाव येथील सॅटेलाईट डेअरीमध्ये अद्ययावत यंत्रसामुग्री कार्यान्वित करण्यात आली आहे. येथे दोन लाख लिटर दूधावर प्रक्र‌िया करता येईल. या डेअरीमुळे शिरोळ तालुक्यातून अधिकाधिक दूध संकलन करणे सोईचे झाले आहे. गोकुळ दूध संघाचा हा पहिलाच सॅटेलाईट डेअरी प्रकल्प असून येथे दूध चिलींग, प्रोसेसिंग तसेच प्रतिदिनी ४० हजार लिटर दूध पॅकिंग होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोलिस कॉन्स्टेबलची इचलकरंजीत आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी पोलिस ठाणे (गावभाग) येथील पोलिस कॉन्स्टेबलने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. इम्रान दिलावर सनदी (वय ३२, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. थोरात चौक येथील पोलिस वसाहतीत ही घटना घडली. इम्रान यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबाबतची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, मुळचे कोल्हापूरचे इम्रान सनदी हा गेल्या दोन वर्षापासून इचलकरंजीत प्रथम पोलिस उपअधीक्षक कार्यालय व त्यानंतर सध्या गावभाग पोलिस ठाण्याकडे कार्यरत होते. थोरात चौक येथील पोलिस वसाहतीतील सी बिल्डिंगमध्ये ते राहण्यास होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी रात्रीची ड्युटी विनंती करुन घेतली होती. बुधवारी रात्री ते ड्युटीवर आले नव्हते. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी करता त्यांनी गुरुवारी पोलिस ठाण्याच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभावेळी उपस्थित राहतो, असे सांगितले होते. त्यानंतर इम्रान यांनी कोल्हापूरातील आपले वडील, पत्नी यांच्याशी फोनवरुन संपर्कात होते. शुक्रवारी सकाळी त्याच्याशी संपर्क न झाल्याने इम्रान यांचे वडील दिलावर यांनी येथील नातेवाईकांशी संपर्क साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३५ एकरांतील ऊस खाक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, चंदगड

निट्टूर (ता. चंदगड) येथे तांबाळ नावाच्या शेतातील उसाच्या फडाला गुरुवारी अचानक आग लागल्याने ३५ एकरातील ऊस जळाला. आगीचे कारण समजू शकले नाही. आगीमध्ये ५० शेतकऱ्यांचा सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले. हेमरस साखर कारखान्याने जळालेल्या उसाची उचल करण्यासाठी तत्काळ ऊस तोडणी सुरु केली आहे.

निट्टूर ग्रामस्थांची निट्टूर-कोवाड रस्त्याच्या नदीकडील बाजूला तांबाळ नावाची शेती आहे. अचानकपणे लागलेल्या आगीत सतबा पाटील, शिवाजी पाटील, धोंडिबा पाटील, पुंडलिक पाटील, कल्लापा पाटील, यल्लापा पाटील, सोमशेखर मिश्रकोटी, उद्य मिश्रकोटी, पुजा पाटील, सुलभा पाटील, शिवाजी पाटील, शिवाजी सुभाना पाटील, मनोहर पाटील, सुभाष पाटील, अरुण पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, मनोहर पाटील, सुभाष पाटील, अरुण पाटील, रामचंद्र पाटील, सुरेश पाटील, निल्लव्वा मिश्रकोटी यांच्यासह ५० शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

गुरुवारी अचानकपणे उसाच्या फडाला आग लागली. वा ऱ्याचा वेग मोठा असल्याने आग पसरत गेली. शेत एकमेकाला लागून असल्याने उसाचे फड पेटत गेले. परिसरातील दोनशेहून अधिक ऊस तोडणी मजुरांनी आग विझविण्यासाठी शर्तींचे प्रयत्न केले. आग इतकी भयंकर होती की, तब्बल झळांमुळे आग विझवण्यात अडथळे येत होते. तब्बल दिड किलोमीटर अंतरावर ही आग पसरत गेली. आगीने रौद्र रुप धारण केल्याने शेतकरी हताशपणे पहात होता. सायंकाळी चार वाजेपर्यंत ऊस पेटत होता.

हेमरसचे मुख्य शेती अधिकारी उत्तमराव पाटील, गट प्रमुख नामदेव पाटील, संजय पाटील, उमेश हंपन्नावर यांनी घटनास्थळी भेट देऊन जळालेल्या ऊसाची उचल झाली आहे. रविवार पर्यंत संपुर्ण उसाची उचल करण्याचे कारखान्याचे नियोजन केले आहे. तलाठी एस. टी. सरोळकर यांनी पंचनामा केला.

गावात सर्वत्र दिवाळीची उत्साह होता अशातच उसाला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्व ग्रामस्थ शेतात गेले. हातातोंडाशी आलेले ऊसपीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना अनेकांना अश्रू आवरले नाहीत. दिवाळी दिवशीच फडाला आग लागल्याने दिवाळीही साजरी करता आली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठेवींचा दिवाळी धमाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने ठेवीदारांना आकर्षिक करण्यासाठी आकर्षक व्याजदराच्या ठेव योजना जाहीर केल्या होत्या. ठेव योजनांना गुंतवणूकदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने दीपावली पाडव्यानिमित्त सर्व शाखा सुरू ठेवल्या होत्या. बँकेच्या या निर्णयाला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद देत एका दिवसांत तब्बल आकरा कोटी १५ लाख रुपयांच्या ठेवी जमा केल्या आहेत. तर अनंत चतुर्दशीपासून आजअखेर ३०० कोटी ठेवी बँकेत जमा झाल्या आहेत. ठेव योजनेतील आठरा महिने मूदत असलेल्या धनवर्षा ठेव योजनेला ग्राहकांचा अधिक प्रतिसाद मिळत आहे.

बँकेवरील प्रशासक नियुक्तीनंतर कर्मचाऱ्यांनी प्रामुख्याने कर्ज वसुलीला प्राधान्य दिले होते. प्रशासकांच्या काळात कर्जवसुलीमध्ये वाढ झाल्यानंतर जिल्हा बँकेची निवडणूक पार पडली. नवनिर्वाचित संचालक मंडळ अस्तित्वात आले, तरी त्यांच्यामागे सहकार विभागाच्या चौकशीचा ससेमिरा अद्याप सुरूच आहे. निवडणुकीमध्ये संचालकांनी बँकेला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचे वचन दिले होते. याची पूर्तता करताना त्यांनी कर्जवसुलीसह गुंतवणूकदारांना आकर्षिक करण्यासाठी विविध मुदतीचा चांगल्या परताव्याचा योजना जाहीर केल्या होत्या.

सहा वर्षात लखपती होणारी 'स्वप्नपूर्ती', मुलां-मुलींसाठी 'सावित्री' ज्येष्ठांसाठी पेन्शन व फंड मिळवून देणारी 'स्वधन' आणि 'धनवर्षा' ठेवींना जुलैपासून सुरूवात केली होती. योजनेमधील केवळ १८ महिन्यात दहा टक्क्याप्रमाणे परतावा असलेल्या योजनेला गुंतवणूकदारांनी अधिक प्रतिसाद दिला होता. यामुळे योजनेचा कालवधी मार्च २०१६ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी सर्व शाखा दुपारी एकपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहकांनी संचालकमंडळाचा निर्णय योग्य ठरवताना एका दिवसांत तब्बल आकरा कोटी १५ लाखांच्या ठेवी जमा केल्या आहेत. जिल्हा बँकेत सातत्याने ठेवीचा ओघ वाढत असल्याने संचालक मंडळालाही काहीसा दिलासा मिळाला आहे. ठेवी जमा करण्यामध्ये ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. व्यावसायिकांना ठेवी देण्याबाबत ‍त्यांनी प्रबोधन केले आहे.

......

अनंत चुतर्दशी ते दिवाळीच्या काळात बँकेमध्ये ठेवींचा ओघ कमी होत असे. यावेळी मात्र, संचालक आणि कर्मचाऱ्यांनी ठेवींचे प्रमाण वाढविण्यात यावर्षी यश आले आहे. जुलैमध्ये सुरू केलेल्या ठेव योजनामुळे साडेतीन महिन्याच्या कालवधीत बँकेत तब्बल ३०० कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. इतर वर्षापेक्षा पन्नास टक्क्यांनी ठेवीचे प्रमाण वाढले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभेद्य भुईकोट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल तालुक्यात कागलमधील यशवंत भुईकोट आणि पिराचीवाडीतील भुईकोट असे दोन भुईकोट किल्ले असून पिराचीवाडी किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आजही इतिहासाची साक्ष देत एकविसाव्या शतकातदेखील खंबीरपणे उभा आहे. मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांची उदासिनता यामुळे किल्ल्याच्या बुरुजांची दुरवस्था होत आहे. या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी व्हावी, अशी मागणी इतिहास प्रेमींकडून होत आहे.

बिद्री साखर कारखान्याच्या ईशान्येला ८ किमीवर असलेले पिराचीवाडी हे १४०० लोकवस्तीचं गाव. छत्रपती शिवरायांच्या काळात कसबा वाळवे येथील पराक्रमी सेनापती सर्जेराव घाटगे यांच्याकडे या किल्ल्याचे वतन होते. येथे पीर नावाचा फकीर गावामध्ये तसेच परिसरातून भिक्षा मागत फिरत होता. पिरबाबा म्हणून त्याची परिसरात मोठी ख्याती होती. त्यामुळे गावचे नाव 'पिराचीवाडी दिल्याची अख्यायिका सांगितली जाते.

या किल्ल्यावर घोड्यासाठी तबेला,पाणी पिण्यासाठी विहिरी, तलाव, किल्ल्याची तटबंदी तब्बल १० फूट रूंद असून या तटबंदीवरून तोफा सहजपणे फिरवता येईल, अशी रचना केल्याचे दिसून येते. सन १९६० पर्यंत या किल्ल्याचे सात बुरुज सुस्थितीत होते.

निसर्गरम्य अशा या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन घेण्यासाठी शाळेच्या सहली येत असत. हा ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व पुराभिलेखागार अधिकारी गणेश खोडके यांच्या मदतीने भडगाव येथील समाधान सोनाळकर हा दुर्गप्रेमी युवक करत आहे. या ऐतिहासिक वास्तूची दुरावस्था थांबवून सुशोभिकरण करावे अशी मागणी इतिहासप्रेमींमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांभोवती समस्यांचा ‘पहारा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

अपुरी कर्मचारी संख्या, सुसज्ज इमारतीचा अभाव आणि निवासस्थानात सुविधांची वानवा यामुळे शाहूवाडी पोलिसांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

१४२ महसुली गावे, दोनशेहून अधिक वाड्यावस्त्या आणि धनगरवाड्यांनी विस्तृत असलेल्या दुर्गम आणि डोंगराळ तालुक्यात आता ४५ पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. बांबवडे दूरक्षेत्र वगळता मलकापूर, आंबा, करंजफेण, भेडसगाव या ठिकाणची दूर क्षेत्रे निव्वळ कर्मचाऱ्याअभावी कुलुपबंद राहू लागली आहेत. ५४ वर्षात लोकसंख्या चौपट झाली असली तरी कर्मचारीसंख्या जैसे थे राहिल्याने पोलिसांवरचा ताण कमी न होता वाढतच आहे.

विविध सण, विशाळगड उरूस, जुगाई, उदगिरी, धोपेश्वर इथल्या यात्रा, बांबवडे, मलकापूर इथली वाहतुकीची कोंडी, विविध आंदोलने, जोतिबा यात्रा यासाठी कायम बंदोबस्त लागत असल्यामुळे २४ तास ड्युटी करून पोलिसांची दमछाक होत असते. आंबा, विशाळगड, उदगिरी, अनुस्कुरा ही ठिकाणे अलीकडे अपघात आणि गुन्हेगारीच्या दृष्ट‌िकोनातून पटलावर येऊ लागली आहेत. विशाळगड व आंबा घाट ही ठिकाणे म्हणजे गुन्हेगारांच्या दृष्टीने घातपाताचे केंद्रच बनू लागले आहे. अशा ठिकाणी गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी दळणवळणाची प्रभावी यंत्रणा नसल्याने गुन्ह्यांची निर्गत करण्यासाठी पोलिसांसमोर नवी आव्हाने उभी राहत आहेत.

ा ठाण्याच्या इमारतीचे भाग्य केव्हा उजळणार असा प्रश्न पोलिसांबरोबरच सर्वसामान्य लोकांसमोर आहे. ठाणे अंमलदाराच्या खोलीला पावसाळ्यात गळती लागते. आरोपींना ठेवण्यासाठी असणाऱ्या लॉकअपच्या खोल्या खूपच अपुऱ्या पडत आहेत. विशाळगड, करंजफेण, उदगिरी, शित्तूर वारुण व अनुस्कुरा या भागातून फिरतीवरून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना क्षणभर विश्रांती घ्यायचे म्हटले तर येथे जागा नाही. शस्त्रागाराची खोलीही अपुरी आहे. छोट्यामोठ्या गुन्ह्यात असलेल्या संशयितांना बसण्यासाठी जागा नसल्याने आवारातल्या झाडाखाली तिष्टत बसावे लागते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समायोजन आकार ही फसवणूक

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

लघुदाब यंत्रमागधारकांचा सवलतीचा वीज दर २६६ पैसे प्रति युनिटप्रमाणे सर्वांना समान करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. पण त्याचबरोबर इंधन समायोजन आकारात असलेली ५० टक्के सवलत २२ पैसे वा ३० पैसे प्रति युनिट ही रद्द करण्यात आलेली आहे. महावितरणने केवळ यंत्रमागासाठी अतिरेकी व अवाढव्य इंधन समायोजन आकार लागू केला आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांची वीज बिले २७ हॉर्सपॉवरच्या आतील यंत्रमागासाठी ४२२ पैसे युनिट व २७ हॉर्सपॉवरचे वरील यंत्रमागासाठी ४५८ पैसे युनिटप्रमाणे येणार आहेत हे स्पष्टच झाले आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला असाच आहे, अशी टीका करत ही शुद्ध फसवणूक असल्याची टीका महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

जून, २०१५ पर्यंत राज्यातील सर्व लघुदाब यंत्रमागधारकांचा वीज दर २५७ पैसे प्रति युनिट असा सर्वांना समान होता. तथापि २६ जून, २०१५ रोजी आयोगाची नवीन टेरीफ ऑर्डर झाल्यानंतर आयोगाच्या आदेशानुसार वाढीव आकार लागू झाला. त्यामुळे २७ हॉर्सपॉवरच्या आतील यंत्रमागासाठी वीज दर २९४ पैसे युनिट व २७ हॉर्सपॉवरच्या वरील ग्राहकांचा दर २५७ पैसे युनिट हाच राहिला. ही तफावत काढून टाकावी व सर्वांना समान दर २५० पैसे प्रति युनिट करावा, अशी मागणी राज्यातील विविध यंत्रमागधारक संघटना व यंत्रमाग क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी केली होती. त्या मागणीस प्रतिसाद देऊन राज्य सरकारने आता ७ नोव्हेंबर, २०१५ च्या शासन निर्णयाद्वारे सर्वांना समान वीजदर २६६ पैसे प्रति युनिट निश्चित केला आहे. हे करताना एक ऑगस्ट, २०१२ पासून लागू असलेली इंधन समायोजन आकारातील ५० टक्क्याची सवलत मात्र रद्द केलेली आहे. ही सवलत २७ हॉर्सपॉवरच्या आतील यंत्रमागासाठी कमाल २२ पैसे युनिट व २७ हॉर्सपॉवरचे वरील वीज ग्राहकांसाठी कमाल ३० पैसे युनिट झाली होती. वीज आकारात करण्यात आलेला फरक व इंधन समायोजन आकारातील रद्द केलेली सवलत याचा हिशोब केल्यास २७ हॉर्स पॉवरच्या आतील ग्राहकांना केवळ ६ पैसे प्रति युनिट वाढीव सवलत मिळालेली आहे. तर २७ हॉर्सपॉवरच्या वरील ग्राहकांना ३९ पैसे प्रति युनिट भुर्दंड लादण्यात आलेला आहे. त्यामुळे हा शासन निर्णय म्हणजे यंत्रमागधारकांची निव्वळ फसवणूक असल्याचा दावाही होगाडे यांनी यावेळी केला.

या अतिरेकी, अवाजवी व बेकायदेशीर इंधन समायोजन आकाराच्या विरोधात संघटनेच्यावतीने आयोगासमोर १९ नोव्हेंबर रोजी सुनावणीवेळी दाद मागण्यात येणार असल्याचेही होगाडे म्हणाले. पत्रकार परिषदेत विजय जगताप, जावीद मोमीन, बशीर जमादार आदी उपस्थित होते.

महावितरणने इंधन समायोजन आकारानी करणारे परिपत्रक प्रसिद्ध केले असून त्यामुळे वीज खरेदी खर्चात ७५ पैसे प्रतियुनिट वाढ होणार आहे. वीज नियामक आयोगाने २६ जुलै रोजी तारीख ऑर्डर देताना वीज खरेदी दरात मंजूरी दिली होती. महानिर्मितीकडील वीज खरेदीस महावितरणची मागणी ३२२ पैसे प्रतियुनिट अशी होती तर आयोगाने ३७८ पैसे प्रतियुनिट मान्यता दिली आहे. एकूण सरासरी वीज खरेदी खर्चामध्ये महावितरणची मागणी ३४८ पैसे ‌प्रतियुनिट अशी होती. तर आयोगाने ३७० पैसे प्रतियुनिट अशी मान्यता दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यावर कचऱ्याचे ढीग

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीर शहरात मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या कचऱ्याचा उठाव संथगतीने सुरू असल्याने शहराचे आरोग्य धोक्यात आले. गल्ली-बोळ स्वच्छ असताना कोंडाळे कचऱ्याने भरून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गेला आठवडाभर शहरात दीपावलीची धामधूम सुरू आहे. शहरातील बाजारपेठा, मंडईत मोठी उलाढाल झाली आहे. पण त्याचबरोबर कचराही मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागला आहे. महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, राजारामपुरी, शाहूपुरी या भागातील बाजारपेठांमुळे प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण गेले आठ दिवस वाढले आहे. घरोघरी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेमुळे कचऱ्यात वाढ झाली. फूल मार्केट व पूजेच्या साहित्याच्या विक्रीत मोठी उलाढाल झाली असली तरी त्यापासून तयार कचराही मोठा प्रमाणात झाला आहे.

महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी गल्लीबोळातील कचऱ्याचा उठाव करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न केले, पण कोंडाळ्यातील कचरा उठाव करण्याची यंत्रणा संथ झाल्याने कोंडाळे कचऱ्याने भरल्याचे चित्र शहरात दिसत आहे. उपनगरांत परिस्थिती ठळकपणे दिसत आहे.

सध्या कसबा बावडा येथील कचरा प्रकल्पावर डंपिंग सिस्टीम कोलमडली आहे. शहरात रोज १५० ते १६० टन कचरा तयार होतो. हा कचरा प्रकल्पावर डंप करण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कचऱ्याचे डंपिंग करून नवीन कचरा टाकण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने शहरातील कोंडाळ्यातील कचऱ्याचा उठाव संथ गतीने सुरू आहे. सध्या वारे वेगाने वाहत आहे. कचरा कोंडाळ्यातील कचरा वाऱ्याने पुन्हा रस्त्यांवर येत आहे. रस्त्यांवर येणारा कचरा पुन्हा उचलण्यासाठी सफाई कामगारांना त्रास होत आहे. कचरा व धूळ वाऱ्यामुळे पसरत असल्याने साथीचे रोग पसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोंडाळ्यातील कचरा उचलण्यासाठी यंत्रणा राबवावी.

दीपावलीत शहरात मोठ्या आवाजाच्या फटाक्यांचे प्रमाण कमी असले तरी आतषबाजीच्या फटाक्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा या दिवशी फटाक्याची मोठ्या प्रमाणावर आतषबाजी झाली. फटाक्यांचा कचरा मोठा प्रमाणात झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुश्रीफांनी वारू रोखला

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाजप नको असेल तर ताराराणी पक्षासोबत आघाडी करून सत्ता घ्या, असा रेड कार्पेट प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या गळी उतरवण्याचा जोरदार प्रयत्न झाला. पण ज्या ताराराणी व भाजपवर निवडणुकीदरम्यान सातत्याने टीका केली, त्यांच्याशीच हातमिळवणी करण्याचा प्रकार जनतेशी विश्वासघाताप्रमाणे असल्याने आमदार हसन मुश्रीफ यांनी या सत्तेच्या समीकरणाला प्रथमपासूनच कडाडून विरोध केला. त्यांनी हा विरोध वरिष्ठांपर्यंत तीव्रतेने पोहोचवलाही. त्यामुळेच राजकारणात कधीही काहीही घडू शकते यावर विश्वास असणाऱ्या पालकमंत्र्यांना दहा दिवस प्रयत्न करूनही चमत्कारापर्यंत मजल मारता आली नाही.

महापालिकेच्या निवडणुकीत महाडिक कुटुंबीयांची भाजपला मिळालेली ताकद, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनीही ताराराणी पक्षाला दिलेली छुपी साथ, त्यातून राष्ट्रवादीकडील उमेदवारांना बसलेला फटका हे मुश्रीफांना चांगलेच माहिती होते. त्यांची खदखद जाणवतही होती. गेल्या सभागृहातील नगरसेवकांचे संख्याबळही त्यांना राखता आले नाही हा राष्ट्रवादीला फार मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत ज्या पक्षांमुळे राष्ट्रवादीला फटका बसला त्यांच्याशी आघाडी करण्याचे धाडसच होते. कोल्हापूर जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात असला तरी शहरात पक्षाची पाळेमुळे महापालिकेच्या गेल्या निवडणुकांमधून चांगली रुजण्यास सुरुवात झाली आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून पक्षाची शहरात बांधणी होत असताना या नगरसेवकांच्याच विरोधकांबरोबर सत्तेत जायचे हे त्यांचे मोठे खच्चीकरण होणार होते. त्यामुळे नगरसेवकांकडूनही त्याला विरोध दर्शवला होता. यापेक्षा ज्यांना भाषणांमधून टीकेचे लक्ष्य केले, त्यांनाच सोबत घेऊन जायचे हा जनतेचा मोठा विश्वासघात करण्याचाच प्रकार होता. या बाबींवर विचार करुन मुश्रीफांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे तसेच अजित पवार यांच्याशी चर्चा करुन काँग्रेसशी आघाडी केली. मात्र, पालकमंत्र्यांकडून शरद पवारांपर्यंत कड्या जोडण्याचा प्रयत्न झाला.

मुश्रीफांनी मात्र या आघाडीसाठीचा कडाडून विरोध कायम ठेवला. त्यावेळी राष्ट्रवादीतील असो वा काँग्रेसमधील असो, नगरसेवकांना फोडता येईल का याची चाचपणी केली गेली. यातून नगरसेवकांचे 'अर्थ' कारण वेगावण्याची चिन्हे लक्षात आली. २००५ च्या सभागृहात स्थायी समिती सभापती होण्यासाठी लाखोंची खिरापत वाटण्यात आली होती. तर महापौरपदासाठी फोडाफोडीचे राजकारण त्याहूनही भयानक झाले. नेत्यांना व कारभाऱ्यांना अक्षरशः राजकारण नको असे वाटत होते. ही सर्व माहिती असल्याने राष्ट्रवादी, जनसुराज्यशक्ती आघाडीचे प्रा. जयंत पाटील यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन या परिस्थितीची गंभीर कल्पना दिली. त्यापूर्वीच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही या आघाडीसाठी प्रतिसाद न देण्याचे ठरले होते. या दोन बाबीही पालकमंत्र्यांची पाऊले चमत्कारापासून माघारी फिरण्यास कारणीभूत ठरल्या.

घोडेबाजाराला छेद

ज्या महापालिकेच्या राजकारणात घोडेबाजार हा शब्द मुरलेला नव्हे तर अनेकांच्या रक्तात भिनलेला आहे. येथील कामातून काही ना काही स्वार्थ शोधण्याची फोफावत चाललेली प्रवृत्ती, त्यातून विकासकामांचा उडणारा बोजवारा हे सारे शहरवासीयांनी अनुभवलेले असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलेल्या भूमिकेमुळे अनेक नगरसेवकांमधील अस्वस्थता वाढली आहे. निवडणुकीतील झालेला खर्च त्यांच्या डोळ्यासमोर दिसत असून ही त्यांना संधी होती.

गटातटाचे राजकारण व त्यातून एकमेकांवर कुरघोड्यांचे राजकारण हा येथील महापालिकेतील राजकारणाचा पाया आहे. त्यातूनच गेल्या २० वर्षात ताराराणी आघाडीचे सर्वेसर्वा आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली. या कालावधीत एकछत्री सत्ता असल्याने फोडाफोडीसाठी फार आटापिटा करावा लागला नाही. पण निवडून येणारा भविष्यात आपल्यासोबत राहावा म्हणून त्याला निवडणुकीच्या काळात रसद पुरवण्याची पद्धत त्यांनी वापरली. त्यानंतर महापालिकेतील सत्तेत राहत असताना अनेकांनी विविध प्रकल्पातून तसेच कामांतून ​चिरीमिरी कमावत नगरसेवकपदाचा रुबाब मारला. पक्षीय राजकारण सुरू झाल्यानंतर संक्रमणाच्या कालावधीत फोडाफोडीसाठी पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. पण ज्यावेळी पक्षीय सत्तेसाठी संख्याबळाची आवश्यकता स्पष्ट झाली. यंदा मात्र काँग्रेस आघाडीला काठावर बहुमत आहे. भाजप, ताराराणी आघाडीही सत्तेजवळ असल्याने त्यांनीही प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. पण त्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेला पवित्रा शहरवासीयांनाच धक्का देणारा होता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसाच्या ट्रॉलीवरून पडून आठ जखमी

$
0
0


कोल्हापूर - ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीवरून खाली पडून आठजण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी अडीच वाजता आकुर्डे (ता. पन्हाळा) येथे घडला. तोडणी केलेला ऊस ट्रॉलीत भरून ट्रॅक्टर जात होता. ट्रॉलीतील उसावर आठजण बसले होते. अचानक उसाची ट्रॉली डळमळीत झाल्याने उसावर बसलेले सर्वजण रस्त्यावर पडले व जखमी झाले.

शंकर गुंडू पाटील, सागर बाळू पाटील, दगडू सर्जेराव गुरव, सुनील बापू पाटील, प्रल्हाद नारायण गुरव, शिवाजी कृष्णात गुंगुरकर, बाळू गुंडू पाटील (सर्व रा. आकुर्डे), श्रीकांत दत्तात्रय चव्हाण (रा. चव्हाणवाडी) अशी जखमींची नावे आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारास दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुळाला २७०० रुपयेच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्ताने काढल्या जाणाऱ्या गूळ सौद्यासाठी आलेल्या उत्पादक शेतकऱ्यांची गुरुवरी निराशा झाली. गुरुवारी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेल्या सौद्यामध्ये स्पेशल गुळाला ३७०० तर सरासरी २७०० रुपये दर मिळाला. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्याने उत्पादकांनी आपली नाराजी उघडपणे दाखवली. दर कमी असल्याचे शेतकऱ्यांनी मांडताच संचालकांनी कोल्ड स्टोअरेजचे कारण पुढे करत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या खुलाश्यानंतर त्यांनी उत्पादकांची अधिकची नाराजी ओढावून घेतली.

गूळ हंगामाने अद्याप जोर पडकला नसला, तरी विजयीदशमीच्या दसऱ्यापासून बाजार समितीमध्ये गूळ सौद्यांना सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्ताच्या अपेक्षीत दर मिळाला नव्हता. तरीही पाडव्याच्या सौद्याला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र दिवाळी पाडव्यालाही अपेक्षित दर मिळाला नाही. सकाळी राम सोसायटीच्या अडत दुकानात सौद्याला सुरुवात झाली. २३०० रुपयांपासून सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये फारशी वाढ झाली नाही. उच्च प्रतीच्या गुळाला ३७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मात्र सरासरी दर २७०० रुपयांपर्यंतच राहिल्याने उत्पादकांनी नाराजी व्यक्त केली. कमी दरामुळे गुऱ्हाळघरे चालवायची कशी? असा प्रश्न उत्पादकांनी उपस्थित केला.

यावेळी 'बाजार समितीच्या आवारात लवकरच कोल्ड स्टोअरेजची उभारणी करण्यात येणार आहे' असे उपसभापती विलास साठे यांनी सांगितले. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून कोल्ड स्टोअरेजचे कारण पुढे केले जात आहे. त्याबाबत कार्यवाही होत नसल्याचा अनुभव वर्षानुवर्षे उत्पादकांना येत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, 'कारखानदारांना एफआरपी जाहीर केल्याशिवाय गुळाला अपेक्षीत दर मिळणार नाही' असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी सांगितले. कारखान्यांनी एफआरपीनुसार दर देण्याच यापूर्वीच मान्य केले आहे, फक्त त्याचे टप्पे निश्चित नसल्याचे निदर्शनास आणून देत उत्पादकांनी संघटनेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. बाजार समितीत सभापती परशराम खुडे यांच्या हस्ते गूळ सौद्यांना सुरुवात झाली. यावेळी सर्जेराव पाटील, उदयसिंह पाटील, दशरथ माने, कृष्णात पाटील, बाबासाहेब लाड, शारदा पाटील आदींसह संचालक, अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयटीआयच्या शुल्कात कपात

$
0
0


Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षाच्या फीमध्ये केलेली तब्बल सोळा टक्के वाढ कमी करण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थी संघटना, लोकप्रतिनिधींनी फी कमी करण्याची केलेली मागणी मान्य झाली आहे. राज्य सरकारने आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दिलासा देत वार्षिक शुल्कात एक हजार रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या वार्षिक शुल्कातील सेमिस्टरच्या सुरुवातीस परत देण्याचे आदेश राज्यातील आयटीआय संस्थांना काढले आहेत. या निर्णयाचा जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांसह राज्यातील ९० हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधारवड ठरलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून लाखो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून रोजगार आणि स्वतःचे व्यावसाय सुरू केले आहेत. नाममात्र शुल्कामध्ये शिक्षण मिळत असताना यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून वार्षिक शुल्क १८० रुपयांवरुन तब्बल तीन हजार रुपये करण्याचा निर्णय राष्ट्रीय व्यावसाय व प्रशिक्षण संचालनालयाने घेतला होता. शुल्कवाढीचा सर्वाधिक फटका ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शुल्कासोबत यावर्षीपासून दोन सत्रांत होणाऱ्या परीक्षा शुल्कामध्ये वाढ केली होती.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह लोकप्रतिनिधिंनी फी वाढीविरोधात आंदोलन केले होते. तालुक्यात एक याप्रमाणे राज्यात ४१८ शासकीय व ३६० अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. शासकीय प्रशिक्षण संस्थामधून एक वर्षाचा अभ्यासक्रम असलेले १५ व दोन वर्षांच्या कालावधीचे १७ प्रकारच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. त्यासाठी वसतिगृहाव्यतीरिक्त केवळ १८० रुपये वार्षिक फी आकारली जात होती. तर अशासकीय प्रशिक्षण संस्थामध्ये २४ हजार रुपये फी आकारण्याची मर्यादा निश्चित केली जात होती.

प्रशिक्षणानंतर नोकरीची हमखास संधी असल्याने ग्रामीण भागातील दहावी व बारावी पास विद्यार्थी आशा अभ्यासक्रमाला जास्त पसंती देत होते. गेल्या ३५ वर्षापासून प्रशिक्षण संस्थातील शुल्क रचनेत कोणताही बदल झालेला नव्हता. यावर्षीपासून शुल्क रचनेमध्ये बदल केल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते.

राज्य सरकारने एक हजार रुपये परत देण्याचे आदेश दिले आहेत. तरीही खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून १७५० ते २१५० तर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ९५० रुपये फी आकारली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीपीचे काम रखडले

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाइन बाजार येथील सांडपाणी प्रकिया प्रकल्पातील पंपिग स्टेशन आणि पाइपलाइनचे काम संथ गतीने सुरू आहे. ठेकेदाराकडूनही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने हे काम आणखी काही महिने रखडणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पाणी पंचगंगेत मिसळत आहे. थेट सांडपाण्यावर प्रक्रिया न करता पाणी मिसळत असल्याने पुन्हा आरोग्याचे तीन तेरा वाजणार आहेत.

शहरातील विविध नाल्यांतून जयंती नाल्यात एकत्र केल्या जाणाऱ्या एकूण ७६ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन होते. गेले एक वर्षे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू आहे. दुधाळी पॅव्हेलियन येथे सुरू करण्यात येणाऱ्या प्रकल्पालाही अजून गती आलेली नाही. दसरा चौक येथील पंपिग स्टेशनमधून सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट पाणी पंचगंगेत मिसळले जाते. वीज पुरवठा बंद झाल्यास या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था नाही. कसबा बावडा येथील एसटीपीचे कामालाही गती आलेली नाही. लाइनबझार येथील पंपिंग स्टेशनचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मार्गावरील पाइपलाइनचे कामही तीस टक्के अपुरे आहे. जयंती नाला येथे पाणी अडवून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन होते. दुधाळी नाला येथील पाणीही खेचून जयंती नाला येथे आणले जाणार होते. रमणमळा, कसबा बावडा येथील सांडपाणी एसटीपीत आणण्याचे नियोजन होते. मात्र या दोन्ही प्रकल्पाची कामेही संथ गतीने सुरू आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जयंती नाला येथील पंपिंग स्टेशन सुरू करण्यात आले. काम वेळेत पूर्ण न केल्यास ठेकेदारास रोज एक लाख रूपये दंड करण्याचा इशारा तत्कालीन आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिला होता. मात्र, ठेकेदाराकडून कामाला प्रतिसाद मिळत नसल्याने प्रकल्पाचे काम थंडावले आहे. राष्ट्रीय नदी कृती योजनेंतर्गत कसबा बावडा येथे तीन टप्प्यात कामाचे नियोजन होते. या ठिकाणी पंपिगचे स्टेशनला मुहुर्त मिळालेला नाही. जयंती नाल्यातून नदीत जाणारे पाणी अडवून त्याच्यावर शुद्धीकरणाचे प्रयत्न अपुरे पडले आहेत.

याशिवाय महापालिकेला याबाबत पूर्णवेळ अधिकारी नाही. पंचगंगा नदी प्रदूषणास यापुढे आयुक्तांना जबाबदार धरण्यात येईल अशी भूमिता राष्ट्रीय हरित लवादाने घेतली आहे. असे असुनही जयंती नाला ओव्हरफ्लो होऊन काळसर रंगाचे फेसाळयुक्त सांडपाणी वाहते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टोलचा निर्णय मंगळवारी?

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मूल्यांकन समितीने सादर केलेल्या अहवालाचा आधार घेत टोल बंद करण्यासाठी आयआरबीला द्यायच्या रकमेचा अंतिम प्रस्ताव मंगळवारी (१७ नोव्हेंबर) तयार केला जाणार आहे. त्याचदिवशी तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठेवला जाईल. त्यानंतर आयआरबीला दिला जाईल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

दरम्यानच्या काळात टोलवसुली होणार नाही. या प्रकरणात तडजोडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुंबईत सातत्याने बैठका होतील. आयआरबीचा ४७३ कोटींचा दावा आहे. तर टोल विरोधी कृती समितीकडून अभ्यासाअंती १९२ कोटीपर्यंतच या प्रस्तावावर खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कृती समितीच्यावतीने १६ नोव्हेंबरला शिरोली नाक्याजवळ नियोजित आंदोलन होणार असल्याचे निमंत्रक निवास साळोखे यांनी जाहीर केले. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी सर्किट हाऊसवर कृती समितीशी चर्चा केली. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'मूल्यांकन समितीचा अहवाल तयार आहे. त्यात व्याज तसेच आयआरबीने महापालिकेला विविध कामांसाठी दिलेली ९० कोटींच्या रकमेचा समावेश नाही. त्या सर्वांसह आयआरबी ४७३ कोटींचा दावा आहे. रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राध्येशाम मोपलवार यांच्याशी मंगळवारी मंत्रीमंडळ बैठकीपूर्वी चर्चा होईल. त्यानंतर आयआरबीला किती रक्कम द्यायची हा प्रस्ताव मी, मोपलवार, बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवू. त्यांच्याकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर आयआबीसमोर तो ठेवला जाईल. हा प्रस्ताव आयआरबी मान्य करेल. मात्र त्यांनी काही वेगळा प्रयत्न केला तर मुख्यमंत्री आदेश काढू शकतील. '

प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, 'आयआरबीने किंवा इतर कुणी टेंबलाईवाडीतील जागेची किंमत कमी केली तर जागा द्यायला तयार होऊ नये. ग्लोबल टेंडर काढून जास्तीत जास्त पैसे मिळतील याची दक्षता घ्यावी.'

रक्कम भागवायची कशी?

रस्ते विकास प्रकल्पासाठी आयआरबीने केलेला क्लेम तसेच स्थानिक अभ्यासकांच्या मदतीने रस्त्याच्या खर्चाची काढलेली रक्कम यामध्ये तफावत आहे. पण ३९० ते ४०० कोटी रुपयांपर्यंतची रक्कम सरकारकडून आयआरबीला द्यावी लागेल, असे दिसते. मुळात ही रक्कम जितकी कमीत कमी देता येईल हे सरकारच्या प्रशासकीय पातळीवर पाहण्याची गरज आहे. त्यासाठी व्याजाचा प्रकार तसेच कमी झालेले काम, वसूल झालेल्या टोलची वजाबाकी यावरही कटाक्षाने काम करण्याची गरज आहे. महापालिकेने दिलेली एक जागा विक्री करायचा प्रस्ताव आहे. पण त्या एका जागेमुळे ही रक्कम भागवणे शक्य नसल्याने आणखी काही जागांची विक्री करणे किंवा सरकारकडून थेट निधी देणे हे दोन पर्याय समोर आहेत.

१९२ कोटी रुपये हा खर्च अभ्यासकांनी काढला आहे. आयआरबीने ४७३ कोटी रुपयांचा क्लेम केला आहे. पण ती रक्कम ३९० कोटी रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेने आयआरबीला दिलेल्या तीन लाख चौरस फुटांच्या जागेची विक्री करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आयआरबीने त्याची रक्कम १० ते १५ कोटी रुपयांच्या आसपास केली आहे. पण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या तज्ज्ञ संस्थेने त्या जागेची किंमत १०७ कोटी ५७ लाख रुपये इतकी केली आहे. त्याबाबतची माहिती नगररचना विभागाचे सहायक संचालकांनी माहितीच्या ​अधिकारात दिली आहे. मात्र, या जागेच्या विक्रीसाठी जर ग्लोबल टेंडर काढले तर त्यापेक्षाही अधिक रक्कम येऊ शकते, असा मतप्रवाह आहे. त्यासाठी सरकारने आयआरबी म्हणते म्हणून तितकीच रक्कम न पकडता स्वतंत्र प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच त्याव्यतिरिक्त आणखी काही जागा विक्री करता येतील, असा मुद्दा बैठकीत पुढे आला. कावळा नाका येथील मोठ्या वाहनांच्या पार्किंगसाठी राखीव असलेली एक जागा आहे ती विकता येईल. तसेच वॉटरवर्ल्डच्या जागेचा करारही संपला आहे. त्याचीही विक्री करता येईल. जनता बझारच्या इमारतींबाबतचाही करार संपला असल्याने त्यांच्या इमारतीही विकता येऊ शकतात, असे नगरसेवक सत्यजित कदम यांनी सांगितले. बीओटी तत्त्वावरील ठेकेदार व्याज आकारताना चक्रवाढ व्याज आकारले जाते. त्यामुळे व्याजाची रक्कम प्रचंड होते. त्यासाठी आयआरबीने आकारलेल्या व्याजाची पद्धती तपासण्याचीही फार आवश्यकता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपात काँग्रेस आघाडीची सत्ता

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

१६ नोव्हेंबरला चमत्कार घडणार आणि भाजपचाच महापौर होणार असे सांगून राजकारणात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी या चमत्काराच्या प्रयत्नातून माघार घेतली.

'एकेक नगरसेवक फोडून घोडेबाजार करण्याची भाजपची संस्कृती नाही. केवळ शहर विकासाला वेग आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या १५ नगरसेवकांच्या एकत्रित पाठिंब्याची अपेक्षा होती, पण त्यांनी गुरुवारी रात्री नकार कळवल्याने सत्ता स्थापनेचा प्रयत्न थांबवला आहे. मात्र तरी निवडणूक लढवली जाईल,' असे त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. त्यामुळे सोमवारी (१६ नोव्हेंबर) काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे महापौर, उपमहापौर होण्याचा मार्ग सुकर झाला. हा निर्णय केवळ राष्ट्रवादीला 'साक्षात्कार' होईपर्यंत असेल असे सांगत पाटील यांनी पाच वर्षांत केव्हाही घडामोडी घडू शकतात, असेही सूचन केले.

महापौर निवडीसाठी तीन दिवस शिल्लक असताना पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, 'चमत्कारामागे घोडेबाजार अशी भूमिका नव्हती. सद्सदविवेकबुद्धीला आवाहन केले होते. राष्ट्रवादीला अडचणीचे होऊ नये म्हणून ताराराणी व राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करावी. भाजप बाहेर राहील असाही प्रस्ताव दिला होता. ताराराणीचा महापौर तो भाजपचा महापौर मानणार होतो. भेटीगाठी, चर्चेनंतर या निर्णयापर्यंत आले नसल्याने चर्चा बंद केली. आता महापालिकेतील एक ताकदवान विरोधी गट म्हणून काम करण्यासाठी शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी आमच्यासोबत यावे असा प्रयत्न आहे.'

विरोधी गट म्हणून काम करताना चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, पण चुकीची कामे होऊ देणार नाही, असे सांगत ते म्हणाले, 'चांगले प्रस्ताव असतील तर निधी देणार नाही असे होणार नाही. श्रेयवादाचे राजकारण चालू देणार नाही. रंकाळ्यासाठी १०८ कोटी मंजूर झाले. त्यातील खर्च केलेल्या आठ कोटीचा हिशोब दिला नसल्याने १०० कोटी अडकले आहेत.महापालिकेत सत्ता नाही तर मी कशाला दिल्लीला फेऱ्या मारु हा विचार होऊ शकतो. पंचगंगा घाटाच्या सुशोभीकरणाचा २६ कोटीचा आराखडा तयार आहे. त्याला महापालिकेची ना हरकत लागेल. अशा वेगवेगळ्या सत्तांमुळे निर्णयांमध्ये फरक पडू शकतो,' असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री पाटील यांनी चमत्काराचा विषय थांबवल्याने निवडणूक बहुमताच्या आधारे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अश्विनी रामाणे महापौर होतील तर राष्ट्रवादीच्या शमा मुल्ला उपमहापौर होतील यात शंका राहिलेली नाही. काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ४४ तर भाजप आघाडीचे एका अपक्षासह ३३ संख्याबळ आहे. शिवसेनेने त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला तर ते ३७ वर पोहचेल. यामुळे बहुमताच्या आधारे काँग्रेस आघाडी सत्तेवर येईल. भविष्यातील चमत्काराच्या उद्देशाने भाजप व ताराराणी आघाडीच्यावतीने महापौर व उपमहापौरपदासाठी स्वतंत्र अर्ज भरले आहेत. त्यापैकी कुणाची माघार होणार की दोन्हीही पक्ष निवडणूक लढवणार हे स्पष्ट झालेले नाही.

पाटील म्हणाले, 'निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईत होतो. त्यावेळी इतर कामासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी फोनवरुन संपर्क झाला. त्यावेळी मीच त्यांना कोल्हापुरात मदत करा, असे सांगितले. पवार यांनी तेव्हापासून सकारात्मक विचार करु असे सांगितले होते. राष्ट्रवादीने भाजप, ताराराणी आघाडीला पाठिंबा दिला तर तो चमत्कारच होणार होता. त्यामुळे त्या जोरावर मी १६ तारखेला चमत्कार घडेल, असे सांगत होतो, पण शेवटी गुरुवारी रात्री त्यांच्याकडून निर्णय होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा चमत्कार होऊ शकला नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपला चार, तर सेनेला दोन मंत्र‌िपदे

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नोव्हेंबर अखेरपर्यंत राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यामध्ये घटक पक्षांचे चार, शिवसेनेचे दोन तर भाजपचे चार मंत्र्यांचा समावेश असेल. भाजपच्या मंत्र्यांची नावे १७ नोव्हेंबरला निश्चित केली जाणार आहेत. तर जानेवारीमध्ये केल्या जाणाऱ्या महामंडळाच्या निवडींमध्ये पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप असेल असे संकेतही त्यांनी दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप, आरपीआय, शिवसंग्राम सेना यांच्यासह शिवसेना व भाजपच्या मंत्र्यांचे शपथविधी होतील. विस्तारासाठी घटक पक्ष व शिवसेना यांना सहा तर भाजपला सहा असे समीकरण ठरल्याचे सांगत पाटील म्हणाले, 'शेतकरी संघटनेकडून सदाभाऊ खोत, रासपचे ​महादेव जानकर, आरपीआयच्यावतीने रामदास आठवले तर शिवसंग्रामचे विनायक मेटे यांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. भाजपकडे सहा मंत्रीपदे असली तरी या टप्प्यात चारच मंत्र्यांचा शपथविधी होईल. उर्वरित दोन मंत्री प्रलंबित ठेवली जातील. भाजपचे सांगलीत मंत्रीपद असेल.' तिथे सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक यांची नावे चर्चेत आहेत.' महामंडळासाठी पश्चिम महाराष्ट्राचा विचार होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्यकिरणे अडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किरणोत्सवाच्या मार्गातील ताराबाई रोडवरील इमारतींची वाढीव बांधकामे, इमारतींची उंची, विद्युत तारा, झाडांच्या फांद्या, हवेतील धूलीकणांसह ढगाळ हवामान या अडथळ्यांची शर्यत यंदाही अंबाबाई मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण किरणोत्सव सोहळ्यातही कायम राहिली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या समन्वयातून गेल्या अनेक वर्षापासून किरणोत्सव मार्गातील अडथळे दूर करण्याच्या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. दुसरा किरणोत्सवही पूर्णत्वाच्या प्रतीक्षेतच संपला.

स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना असलेल्या अंबाबाई मंदिराचे वै​शिष्ट्य याठिकाणी होणाऱ्या या किरणोत्सवामुळे अधिकच महत्त्वपूर्ण आहे. या सोहळ्यावेळी वर्षातून दोन वेळा सलग तीन दिवस सूर्यास्ताची किरणे अंबाबाईच्या गाभाऱ्यात थेट येतात. यामध्ये पहिल्यादिवशी चरणांवर, दुसऱ्यादिवशी कमरेवर आ​िण तिसऱ्यादिवशी देवीच्या मुखावर मावळतीच्या किरणांचा अ​भिषेक होतो असे हे वैशिष्ट्य आहे. यावर्षीच्या दुसऱ्या टप्प्यातील किरणोत्सव ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत झाला, मात्र मूर्तीच्या चरण आ​णि कमरेपर्यंतच किरणे पोहोचली.

रंकाळा ते महाद्वार या किरणोत्सव मार्गात काही इमारतींचे वाढीव बांधकाम झाले आहे. झाडांच्या फांद्याही आडव्या येत असल्याचे पाहणीमध्ये निदर्शनास आले आहे. किरणोत्सव मार्गात ज्यांची घरे आहेत, अशा चार ते पाच कुटुंबीयांना वाढीव बांधकाम न करण्याच्या सूचना पाच ते सहा वर्षापूर्वी महापालिकेने दिल्या होत्या. किरणोत्सव सोहळ्याचे वैशिष्ट्य जपण्यासाठी त्यांनी तयारीही दाखवली, मात्र अन्य इमारती उभ्या राहिल्या. त्यांच्याबाबत दक्षता घेतली न गेल्याने नवीन अडथळे तयार होत आहेत.

इमारतीच्या वाढीव बांधकामासारख्या मानवी अडथळ्यांसोबतच किरणोत्सवासमोर आव्हान असते हवेतील धूलीकण आ​णि ढगाळ हवामानाचे. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या व दुसऱ्या आठवड्याच्या काठावर हा सोहळा होत असतो. याकाळात हवामानात लक्षणीय बदल होत असल्याचा परिणाम हवेतील धूलीकणांच्या वाढीवरही होतो. तसेच थंडी सुरू झाल्याने सूर्यकिरणांमधील प्रखरताही सौम्य होत असल्यामुळे हवामानातील बदलाचे पडसाद या सोहळ्याच्या पूर्णत्वावर होत आहेत.

यावर्षीच्या पहिल्या पर्वातील किरणोत्सव ३१ जानेवारी आ​णि १ व २ फेब्रुवारी रोजी होता. मात्र, पहिल्यादिवशी किरणांचा चरणस्पर्श झाल्यानंतर किरणोत्सवाचा टप्पा यशस्वी झाला नव्हता. मात्र या पर्वातही या सोहळ्याने निराशेचे ढग कायम ठेवले.


किरणोत्सव मार्गातील मानवी व नैस​र्गिक अडथळ्यांसोबत पृथ्वी जर एका बाजूला कलली असेल तर किरणोत्सवाच्या कालावधीतच एखाद्या दिवसाने बदल होऊ शकतो का? यादृष्टिने किरणोत्सवाचा अभ्यास करण्यात येत आहे. यासाठी विवेकानंद कॉलेज, केआयटी कॉलेज येथील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मिलिंद कारंजकर आणि प्रा. किशोर हिरास्कर यांनी निरीक्षणे नोंदवली आहेत. तसेच पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांच्या निरीक्षणानुसार हवेत वाढत्या वायूप्रदूषणाचाही परिणाम हवेतील धूलीकणांच्या वाढीवर होत असल्याचे म्हणणे आहे. सूर्यकिरणांची तीव्रता, दिशा यांचाही अभ्यास केला जात आहे. किरणे वक्र होणे या प्रदूषणाच्या मर्यादेवर अवलंबून असल्यामुळे हवामानातील अडथळेच किरणोत्सवातील प्रमुख अडसर ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाठशिवणीचा खेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसमधील चौघांनी इच्छा व्यक्त केली असली तरी आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील यांच्यातील चुरस मतदारांना आत्ताच पहायला मिळत आहे. सकाळी एका नेत्याने भेटीगाठी घेतल्यानंतर पाठोपाठ दुसरा नेता येऊन त्याच नगरसेवकांची भेट घेऊन मतदार फुटून जाऊन नयेत याचा आटापिटा करत आहे. दरम्यान, सोमवारी काँग्रेसचे निरीक्षक अशोक बागवे व सत्यजीत देशमुख येणार असून त्यांच्याकडे इच्छुकांची नावे दिली जाणार आहेत. त्यानंतर तिकिटासाठी प्रदेश पातळीवर जोर लावला जाणार आहे.

विधानपरिषदेसाठी महाडिक यांनी दोन महिन्यांपासून स्थानिक नेत्यांच्या मतदारांच्या भेटीगाठी घेण्याचा सपाटा चालवला आहे. मध्यंतरी महापालिकेच्या निवडणुकीमुळे त्यामध्ये खंड पडला होता. पण महापालिकेचा निकाल लागताच महाडिकांनी पुन्हा त्या नेत्यांची व मतदारांच्याही भेटीगाठी सुरु केल्या. सतेज पाटील यांनीही त्याच गतीने जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिकांमधील गटातटाच्या नेत्यांच्या भेटीही घेतल्या जात असून पाटील व महाडिक यांच्यातच जास्त चुरस दिसत आहे. दिवाळीनंतर आता या भेटीगाठींना आणखी वेग आला आहे. सतेज पाटील यांनी शनिवारी सकाळी शाहूवाडी व मलकापूरच्या मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. दुपारपर्यंत त्यांच्या भेटीगाठी व चर्चेनंतर पाटील माघारी परतताच आमदार महाडिक यांनी त्याच मतदारांना भेटण्यासाठी शाहूवाडी व मलकापूर गाठले. सायंकाळपर्यंत त्यांच्याशी चर्चा सुरु होती.

या दोघांनी प्रचंड चुरशीने निवडणुकीची तयारी चालवली आहे. दुसरीकडे पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे यांनीही आपापल्या पातळीवर प्रयत्न चालवले आहेत. इच्छुकांची नावे प्रदेश काँग्रेसला कळवण्यासाठी निरीक्षक असलेले बागवे व देशमुख सोमवारी येणार असल्याचे समजते. चौघा इच्छुकांशी चर्चा करुन तेच नावे प्रदेश पातळीवर पाठवणार आहेत. त्यानंतर उमेदवारी मिळवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या भेटीगाठीसाठी या इच्छुकांच्या मुंबई, दिल्ली फेऱ्या जास्त होणार आहेत.

काकांच्या मदतीला पुतण्या

विधानपरिषदेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचा समझोता झाला आहे. पण अजून काँग्रेसचा उमेदवार ठरलेला नसताना राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र आपले काका आमदार महादेवराव महाडिक यांच्या मदतीसाठी मतदारांच्या भेटीगाठी चालवल्या आहेत. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी काँग्रेसचा सहमतीचा उमेदवार असेल तरच पाठिंबा असेल असे मत नोंदवले होते. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा जो कुणी उमेदवार असेल तो राष्ट्रवादीला मान्य आहे की नाही हे स्पष्ट केलेले नाही. मात्र खासदार तरीही आमदार महाडिक यांच्या मदतीसाठी धावले आहेत. याबाबत कार्यकर्त्यांमध्येही जोरदार चर्चा आहे. यापूर्वी महाडिक यांनी लोकसभेच्या निवडणुकीत केलेल्या मदतीची पुतण्या या पद्धतीने परतफेड करत असल्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिपदासाठी सेनेचे प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेच्या दोघांना मंत्रीपद मिळणार असल्याने शिवसेनेच्या तिघा आमदारांनी मंत्रीपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरूवात केली आहे. मंगळवार (ता.१७) नंतर मंत्रीपदासाठी वेगवान हालचाली होणार आहेत.

बिहार निवडणुकीतील दारूण पराभवानंतर भाजपाने मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रीपदे येणार असल्याने कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर हे सहा आमदार निवडून आल्याने कोल्हापूरचा मंत्रीपदावरील दावा प्रबळ झाला आहे. मंत्रीपदासाठी आमदार क्षीरसागर, नरके, मिणचेकर यांच्या नावाची जोरात चर्चा आहे. तिघांचीही ही दुसरी टर्म आहे. क्षीरसागर हे आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात तर नरके यांनी सहकाराच्या माध्यमातून करवीर व गगनबावडा तालुक्यात सेनेचे जाळे विणले आहे. डॉ. मिणचेकर हे अभ्यासू व्यक्तिमत्व असून राखीव प्रभागातून ते विजयी झाले आहेत. मंगळवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथीच्या कार्यक्रमानंतर उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे नियोजन इच्छुकांकडून होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राज्य नाट्य’चा टायमिंग घोळ

$
0
0


Anuradha.Kadam@timesgroup.com
कोल्हापूर - हौशी रंगकर्मी आणि प्रायोगिक रंगभूमीच्या वर्तुळात महत्त्वाची असलेल्या राज्य नाट्यस्पर्धेतील सहभागी संघांच्या तालमी रंगल्या असतानाच स्पर्धेच्या वेळापत्रकाच्या घोळामुळे मतप्रवाहाला सुरुवात झाली आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील सात नाटकांची वेळ दुपारी एक वाजता ठेवली असून, दुपारच्या प्रयोगांना प्रेक्षक मिळणार नाहीत या शक्यतेतून रंगकर्मींनी नाराजीचा सूर लावला आहे. २४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्यनाट्यस्पर्धेचा पडदा उघडण्यापूर्वीच तो वेळापत्रकाच्या घोळात अडकला आहे.

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचलनालयाच्यावतीने हौशी रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य नाट्य स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेतील कोल्हापूर केंद्राच्या फेरीला २४ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यावर्षी या स्पर्धेत पंधरा संघांनी सहभाग घेतला असून गेल्या महिन्याभरापासून तालमींनाही वेग आला आहे. शाहू स्मारक भवन येथे या स्पर्धेतील नाटके सादर होणार आहेत. गेल्या दीड वर्षापासून केशवराव भोसले नाट्यगृह नूतनीकरणासाठी बंद असल्यामुळे गेल्यावर्षीही ही स्पर्धा शाहू स्मारक भवन येथेच रंगली होती. मात्र, यावर्षी स्पर्धेच्या कालावधीदरम्यान सात दिवस शाहू स्मारक सभागृह व्याख्यानमालेसाठी आरक्षित केल्यामुळे राज्यनाट्य स्पर्धेतील सात नाटकांचे प्रयोग दुपारी एक वाजता ठेवले आहेत. त्यामुळे स्पर्धेतील निम्मी नाटके दुपारी एक वाजता तर निम्मी नाटके रात्री नऊ वाजता असे वेळापत्रक तयार केले आहे. त्यामुळे काही रंगकर्मींसह प्रायोगिक नाट्यसंस्थांनी विरोध केला आहे.

२४ ते ३० नोव्हेंबर आणि ८ ते १० डिसेंबर या कालावधीत स्पर्धेतील नाटके रात्री नऊ वाजता होणार आहेत. मात्र एक ते ७ डिसेंबरअखेर ज्या संघांचे प्रयोग आहेत त्यांची वेळ दुपारी एक वाजता आहे. यापैकी काही दिवस हे कामाचे दिवस आहेत, त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक क्षेत्रातील रसिकांना या वेळेत प्रयोगाला येणे शक्य नसल्याने प्रेक्षकसंख्येवर त्याचा परिणाम होणार असल्याचा मुद्दा काही रंगकर्मींनी उप​स्थित केला आहे.

अन्यथा स्पर्धेबाहेर

दुपारी एक वाजता प्रयोगाची वेळ मान्य नसलेल्या संघांनी स्पर्धा समन्वयकांना प्रयोगाची वेळ किंवा स्पर्धेचे स्थळ बदलण्याची मागणी केली आहे. हा बदल न झाल्यास स्पर्धेत सहभागी न होण्याचे संकेतही या संघांनी दिले आहेत.

राज्यनाट्य स्पर्धेचे केंद्र मिळण्यासाठी किमान दहा संघांचा सहभाग असणे आवश्यक असते. यावर्षी १५ संघांचा सहभाग आहे. मात्र, दुपारचा प्रयोग निश्चित झालेल्या नाटकांची संख्या सात असल्याने त्या संघांनी माघार घेतल्यास केंद्र अडचणीत येण्याची शक्यता आहे.

रंगकर्मींची आज बैठक

२४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेतील नाट्यप्रयोगांच्या वेळापत्रकावरून घोळ चालला आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी कोल्हापुरातील रंगकर्मी, प्रायोगिक नाट्यसंस्था यांची बैठक रविवारी दुपारी चार वाजता नागाळा पार्क येथील भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images