Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सत्ता काँग्रेस-एनसीपीची

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतील सत्ता आणि महापौरपद आपल्याकडेच राखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने एकसंध राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व नगरसेवकांनी एकत्र येत आघाडीत एकजूट असल्याचे दाखवून दिले. त्याचवेळी घोडेबाजाराला लगाम घालण्यासाठी काँग्रेस आघाडी एकत्र आल्याचे सांगत बहुमताचा आकडा आमच्याकडे असून, भाजप-ताराराणी आघाडीच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा. दोन्ही पदांसाठी उमेदवारी अर्ज न भरता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नवा पायंडा पाडावा, असे आवाहन काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केले. दोन्ही काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत ताराबाई पार्क येथील महाराणी लॉन येथे नगरसेवकांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचाच महापौर होणार असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सांयकाळी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी एकत्र येत भाजप आघाडीचे मनसुबे उधळून लावले. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, भैया माने, महापौर वैशाली डकरे, काँग्रेसचे अॅड. सुरेश कुराडे, प्रकाश सातपुते, संध्या घोटणे यांच्या उपस्थितीत एकीचे दर्शन घडविले. हात उंचावून महापालिकेत काँग्रेस आघाडी अभेद्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. महापौर आणि उपमहापौरपदासाठी मंगळवारी (ता.१०) दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यासाठी मंगळवारी दुपारी एक​त्रित अर्ज भरण्यात येणार असल्याचे नेत्यांनी घोषित केले. अपक्ष नगरसेवक राहुल माने, निलोफर आजरेकर यावेळी उपस्थित होत्या.

काँग्रेसचे नेते सतेज पाटील म्हणाले, 'महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असून, दोन अपक्षांसह आघाडीचे संख्याबळ ४४ पर्यंत पोहोचते. लोकांनी काँग्रेस आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. महापौरपदाच्या निवडीवरून भाजप आघाडीचे नेते वातावरण दूषित करण्याचा, अफवा पसरविण्यात, लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण करण्यात पटाईत आहेत. मात्र, नगरसेवकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आनंदपर्वाला आज प्रारंभ

$
0
0

कोल्हापूर - आकाशकंदील व विद्युत रोषणाईने उजळलेली घरे, पहाटेपासून दारांत तेवणाऱ्या पणत्या, अंगणात काढलेल्या रांगोळ्या आणि फुलांच्या माळांच्या सजावटीने शहरातील वातावरण मंगलमय झाले आहे. चैतन्यमय दिवाळीच्या आगमनासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या आनंदपर्वाचा मंगळवारी (१० नोव्हेंबर) मुख्य दिवस आहे. पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानाबरोबर नरक चतुदर्शी आहे. सोमवारी धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरी पूजन करण्यात आले.

नरक चतुर्दशी व अभ्यंगस्नान

मंगळवारी (१० नोव्हेंबर) असून दिवाळीचा हा मुख्य दिवस आहे.

लक्ष्मीपूजन व वहीपूजन मुहूर्त

पूजनासाठी सकाळी ६.३० ते ९.४२, ११ ते दुपारी ११.४२, दुपारी २ वाजून ५ मिनिटे ते रात्री ८ वाजून २४ मिनिटांनी आ​णि रात्री ९.२५ ते रात्री १२.२५ ही वेळ आहे. तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याचा सण गुरुवारी (ता.१२) साजरा होत आहे. वहीपूजनासाठी वेळ पहाटे ३.३० ते ८.१० आणि सकाळी १०.१५ ते दुपारी २ पर्यंत आहे. यादिवशी धान्यावर बळीराजाची प्रतिमा काढून पूजा केली जाते. या मंगलमय दिवाळी सणाची सांगता शुक्रवारी (ता.१३) भाऊबीज या सणाने होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदाचे गिफ्ट कुणाला?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाची निवडणूक प्रतिष्ठेची करत भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडीने निवडणूक लढविण्याचे ठरविल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान उभे ठाकले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर भाजपचाच होणार, असे जाहीर केल्याने या पदासाठी चुरस वाढली आहे. त्यांनी नगरसेवकांना सदसदविवेक बुद्धीला स्मरूण महापौर निवडीत भाजपाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्य पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधत चमत्कार घ​डविण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र येत महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी ताकद दाखवली आहे. यामुळे महापौरपदाची गिफ्ट कुणाला याविषयी उत्सुकता लागली आहे. महापौरपदासाठी भाजप, ताराराणी आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत.

महापालिकेच्या ८१ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. काँग्रेसचे संख्याबळ २७, राष्ट्रवादीचे १५ आ​णि दोन अपक्षांनी काँग्रेसला दिलेला पाठिंबा असे बेरजेचे गणित मांडत बहुमताचा आकडा गाठल्याचा दोन्ही काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. काँग्रेस आघाडीकडे ४४ इतके संख्याबळ असताना दुसरीकडे भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडी महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी हालचाली करत आहेत. भाजप आघाडीचे संख्याबळ ३२ इतके आहे. अपक्ष नगरसेवक राजू ​​​दिंडोर्ले यांनी भाजप आघाडीला पाठिंबा दिला आहे. भाजप आघाडीला आणखी आठ नगरसेवकांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत.

दोन्ही बाजूच्या नेत्यांनी महापौर आपल्याच पक्षाचा करण्यासाठी कंबर कसल्याने निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची बनली आहे. पदासाठी मंगळवारी (ता.१०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. यामुळे घडामोडींना वेग आला असून काँग्रेसने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. भाजप आघाडीकडून मंगळवारी सकाळी इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सूर्यकिरणे गर्भकुडीपर्यंतच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोमवारी सूर्यकिरणे गर्भकुटीतील मूर्तीच्या दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचली; पण ढगाळ हवामानामुळे किरणे पुढे सरकली नाहीत. पायरीवर पोहोचल्यानंतर किरणांची तीव्रता संपल्याने किरणोत्सवाचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची मात्र निराशा झाली. सूर्यकिरणांच्या मार्गातील अडथळ्यांचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या समितीनेही किरणांच्या मार्गाची पाहणी केली असून, सुस्पष्ट किरणोत्सवासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे मंदिरातील किरणोत्सव. सूर्याच्या दक्षिणायनातील किरणोत्सवाला सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी सूर्यकिरणे गर्भकुडीतील मूर्तीच्या दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचली आणि लुप्त झाली. सूर्यास्तापूर्वीच्या ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणांची तीव्रता कमी झाली. ५ वाजून ४१ मिनिटांनी दुसऱ्या पायरीर्यंत पोहोचलेली किरणे लुप्त झाल्याने मूर्तीच्या पायापर्यंत किरणे पोहोचू शकली नाहीत. किरणोत्सव विनाअडथळा पार पडावा यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अभ्यास समिती नेमली होती. समितीने काही अडथळे काढल्यामुळे किरणोत्सव पाहण्याची पर्वणी मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र अजूनही काही अडथळे शिल्लक असल्याचे अभ्यासक चंद्रकांत परुळेकर यांचे म्हणणे आहे.

किरणोत्सवातील अडथळ्यांचा अभ्यास करून सुस्पष्ट किरणोत्सव व्हावा यासाठी महापालिकेनेही पाच सदस्यीय समितीची स्थापना केली असून, या समितीने किरणोत्सव मार्गाचा अभ्यास केला. ५ वाजून ४१ मिनिटांनी मंदिरातील किरणे लुप्त झाली, त्यानंतर बारा मिनिटांनी सूर्यास्त झाला. याचा अर्थ सूर्यकिरण मार्गातील काही अडथळे काढल्यास आणि आकाश निरभ्र असेल तर किरणोत्सव पूर्णक्षमतेने होईल, असा दावा समितीच्या सदस्यांनी केला आहे.

किरणोत्सव मार्गात काही ठिकाणी नवीन बांधकाम झाल्याचेही निदर्शनास आले आहे. दरम्यान, धनत्रयोदशीनिमित्त धन्वंतरीच्या रूपात देवीची पूजा बांधण्यात आली होती. किरणोत्सव पाहण्यासाठीही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांचा अंबाबाई मूर्तीवर होणारा अभिषेक येत्या दोन दिवसांत अनुभवायला मिळेल अशी आशा भाविक आणि अभ्यासकांना आहे.

सूर्यकिरणांचा प्रवास

सायंकाळी ५.१४ ला सूर्यकिरणे गरुड मंडपात पोहोचली. ५.२४ ला गणपती मंदिराच्या मागे आलेली किरणे ५.२७ ला मंदिराच्या पुढे पोहोचली. ५.३२ ला सूर्यकिरणे पितळी उंबरठ्यावर आली. ५.४१ ला ती गर्भकुटीतील मूर्तीच्या दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचली आणि तुप्त झाली.

किरणोत्सव विनाअडथळा व्हावा यासाठी महापालिका आयुक्तांनी स्थापन केलेल्या समितीकडून सूर्यकिरण मार्गाचा अभ्यास सुरू आहे. या मार्गावर इमारतींची उंची वाढू नये यासाठी निकष तयार केले जाणार आहेत. जे अडथळे आहेत तेही काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - धनंजय खोत, सहायक संचालक, नगररचना विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेमरस कारखान्याविरोधात आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील हेमरस साखर कारखान्याने २०१३-१४ च्या गळीत हंगामातील उसाला प्रतिटन ९० रुपया हप्ता देण्याचे लेखी जाहीर करुनही अद्याप हप्ता न दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी सुमारे सहा तास वाहतूक रोखली. यावेळी हेमरसचे युनिट हेड भरत कुंडल यांनी १५ जानेवारापर्यंत गाळप झालेल्या उसाचे १५ जानेवारी व त्यानंतर गाळप झालेल्या उसाचे ३० मार्चला एकरकमी ९० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. स्वाभिमानीचे राज्य सचिव राजेंद्र गड्याण्णावर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.

मागील सालाच्या गळीत हंगामातील ऊसाला ३४० रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार वेळा आंदोलने केली. यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी आंदोलक व कारखाना व्यवस्थापन यांच्यामध्ये तोगडा काढत ९० रुपयांचा हप्ता देण्याबाबत कारखान्याला सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. याला वर्ष उलटले तरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने आज आंदोलन करण्यात आले.

दुपारी बारा वाजल्यापासून आंदोलनकांनी राजगोळी येथील हेमरसच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. त्यामुळे ऊस घेऊन आलेली वाहने रस्त्यावरच उभी राहिली. वाहतुकीला अडथळा येवू नये, यासाठी पोलिस निरीक्षक अंगद जाधवर यांनी उसाची वाहने आंदोलन स्थळापासून दूरवर उभे केली होती. ९० रुपयांचा हप्ता घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यामुळे हेमरस कारखान्याचे युनिट हेट भरत कुंडल हे आंदोलनस्थळी चर्चेसाठी आले. शेतकऱ्यांना ९० रुपयांचा हप्ता देण्याचे मान्य केले होते. मात्र बाजारातील साखरेचे दर कमी झाल्याने वेळेत देणे शक्य झाले नाही. कारखान्याची सद्यस्थिती पाहता हा हप्ता त्वरीत देणे शक्य नाही.

त्यामुळे १५ जानेवारापर्यंत गाळप झालेल्या उसाचे १५ जानेवारी व त्यानंतर गाळप झालेल्या उसाचे ३० मार्चला एकरकमी ९० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी गड्याण्णावर यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची लवकर उचल करुन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. आंदोलनामध्ये प्रा. दीपक पाटील, तानाजी पाटील, बाळाराम फडके, नवनीत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

'जवाहर'चा गळीत हंगाम सुरू

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०१५-१६ या २३ व्या ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ मंगळवार १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला. कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे व सौ. इंदूमती आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कारखान्याचे चेअरमन व माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे व त्यांच्या पत्नी किशोरी आवाडे या उभयतांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामास सुरुवात करण्यात आली. काटा पूजन आण्णासो गोटखिंडे आणि त्यांच्या पत्नी कमलताई गोटखिंडे यांच्या हस्ते करण्यात आले. कारखान्याकडे २०१५-१६ हंगामाकरीता १७ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद झालेली आहे. चालू हंगामाच्या सुरुवातीपासून खोडवा ऊस गाळपाचे नियोजन केले आहे, अशी माहिती यावेळी चेअरमन प्रकाश आवाडे यांनी दिली. तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी गाळप हंगाम २०१५-१६ करीता आपला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रकाश आवाडे यांनी केले. यावेळी विलासराव खानविलकर, अॅड. सी. बी. कोरे, शिवाजी पुजारी, प्रकाश सातपुते, बाळासो माळकर, उदय शेटे, स्वप्नील आवाडे, राहुल आवाडे, यळगूडचे कुबेर पाटील, जयवंतराव मोहिते, आप्पासाहेब पाटील, इंगळीचे रावसाहेब पाटील, श्रीमंधर चौगुले, भूपाल कणिरे आदी उपस्थित होते.

'दत्त-शिरोळ'च्या हंगामास प्रारंभ

शिरोळ येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालू गळित हंगामात १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. यावर्षी सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. पाण्याची कमतरता असल्याने उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले. दत्त साखर कारखान्याचा ४४ वा ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ गणपतराव पाटील यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील यांनी सपत्नीक पूजा केली. काटापूजन संचालक श्रेणिक पाटील व अरूणकुमार देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, संचालक युसूफ मेस्त्री, अनिल यादव, शेखर पाटील, इंद्रज‌ित पाटील, बाबासाहेब पाटील, शरदचंद्र पाठक, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, आण्णासो पवार आदी उपस्थित होते. स्वागत रावसाहेब भोसले यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठेबाजांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने व्यापाऱ्यांना नियंत्रण आदेश लागू केल्यानंतर पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत जिल्ह्यातील सहा व्यापाऱ्यांकडील खाद्यतेल आणि डाळींचे साठे जप्त केले होते. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासमोरील सुनावणीत संबंधित व्यापारी दोषी आढळले असून, पुढील कारवाईस सुरुवात झाली आहे. ताब्यात घेतलेला मुद्देमाल जप्त करून व्यापाऱ्यांकडून बँक गॅरंटी जमा करून मुद्देमाल पुन्हा व्यापाऱ्यांकडे सोपवला आहे.

डाळींचे दर वाढल्यानंतर केंद्र सरकारने साठेबाजांवर वचक ठेवण्यासाठी नियंत्रण आदेश लागू केला होता. या आदेशान्वये जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी धान्य दुकाने आणि गोदामांवर छापे टाकले होते. या कारवाईत जिल्ह्यात सहा ठिकाणी खाद्यतेल आणि डाळींच्या साठ्यांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा पुरवठा विभागाने संबंधित व्यापारी आणि दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत, त्याचबरोबर सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे सुनावणी सुरू होती. व्यापारी आणि दुकानदारांनी म्हणणे सादर केल्यानंतर त्यांनी नियंत्रण आदेशाचा भंग केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दोषी व्यापाऱ्यांकडील खाद्यतेल आणि डाळींच्या एकूण रकमेच्या पन्नास टक्के रक्कम बँक गॅरंटी म्हणून जमा करून घेऊन मुद्देमाल व्यापाऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेतला आहे. साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कोर्टातही खटला चालणार आहे. कोर्टाने दोषी ठरवल्यास व्यापाऱ्यांना आर्थिक दंड आणि सश्रम कारावासाचीही शिक्षा होऊ शकते. दरम्यान, पुरवठा विभागाच्या कारवाईत कोल्हापूर जिल्ह्यात तूरडाळ केवळ ६७.५ किलो सापडली होती. त्यामुळे १०० रुपये किलो दराने विक्री करण्यासाठी जप्तीची तूरडाळ उपलब्ध नसल्याने खुल्या बाजारातील दरानुसारच कोल्हापूरकरांना तूरडाळ खरेदी करावी लागणार आहे.

कारावास?

जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कलम ६ अ अन्वये नियंत्रण आदेशाचा भंग करणारे व्यापारी अथवा दुकानदार यांना कमीतकमी तीन महिने, तर अधिकाधिक सात वर्षांचा सश्रम कारावास होऊ शकतो. यासह आर्थिक दंडाचीही तरतूद केली आहे, त्यामुळे साठेबाजीत दोषी सापडणाऱ्यांना कारावासाची शिक्षा होऊ शकते. यामुळे साठेबाजांवर वचक बसणार आहे.

कारवाई झालेले व्यापारी

जिल्हा पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत उजळाईवाडी येथील अदाणी विल्मर आणि गोल्डन व्हॅली प्रा. लिमिटेड, इचलकरंजीतील फ्युचर रिटेल लिमिटेड बिग बझार, अजय ट्रेडर्स आणि कागलमधील डी. एन. ट्रेडर्स, सीयेन ट्रेडर्समध्ये खाद्यतेलासह डाळींचे अतिरिक्त साठे सापडले. जिल्हा पुरवठा विभागाने सर्व दोषी व्यापाऱ्यांकडून पन्नास टक्के बँक गॅरंटी जमा केली असून, मुद्दमाल परत केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राध्यापकांचे वेतन ‘ऑनलाइन’

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील १३३ सीनिअर कॉलेजमधील सात हजार कर्मचाऱ्यांचा महिन्याचे वेतन ऑनलाइन मिळणार आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालय एचटीई सेवार्थची तयारी पूर्ण झाली असून नोव्हेंबर पेड डिसेंबरमध्ये ऑनलाइन वेतन जमा होणार आहे. सहसंचालक कार्यालयही पेपरलेस झाले असून दरवर्षी कागदापोटी होणारा लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे.

शिक्षण सहसंचालक कार्यालयात प्रत्येक देयके करण्यासाठी किमान पाच एफोर आकाराच्या कागदांचा वापर केला जातो. त्यासाठी वर्षाला लाखो रुपयांच्या खर्चाचे बजेट आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर आणि कामात पारदर्शीपणा येण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण सेवा आणि अर्थ (एचटीई सेवार्थ) संगणकीकृत प्रणाली राबविली. या प्रणालीचे कामकाज शिक्षण सहसंचालक कार्यालयाने पूर्ण केले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुमारे ४० कोटी रुपयांचे वेतन ऑनलाइन दिले जाणार आहे. शैक्षणिक संस्थातील प्राचार्य, संस्थाचालक, कुलसचिवांतर्फे यापुढे वेतनाची प्रक्रिया होणार नाही. या नव्या प्रणालीमुळे प्राध्यापकांना दर महिन्याला कधी वेतन होणार, याची चौकशी करावी लागणार नाही. या प्रणालीसाठी प्रत्येक कॉलेजला आयडी आणि पासवर्ड नुसार कॉलेजमधील कर्मचाऱ्याचे वेतन आणि अन्य माहिती प्रणालीत अपडेट केली आहे. वेतनाच्या आकड्यात काही बदल असल्यास कॉलेजला चेंज रिपोर्ट द्यावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या बँकखात्यावर ईसीएसद्वारे वेतन जमा केले जाणार आहे. सरकारी विभागाच्या विविध पातळीवर आहरण आणि संवितरण अधिकारी आदातांची देयके काढतात. ही देयके कोषागारात टाकली जाणार आहेत. त्यानंतर रोकड व्यवस्थापन पद्धतीनुसार एसबीआय बॅकेतून आदातांनी दिली जाणार आहेत.

वित्त विभागाच्या लेखा आणि कोषागार विभागाने देयकांसाठी बिल पोर्टल तयार केले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्यासाठी सेवार्थ पोर्टल, शालेय शिक्षण विभागाचे शालार्थ वेतन प्रणाली, सामाजिक न्याय विभागाची समाज सेवार्थ आणि उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाची उच्च तंत्रशिक्षण सेवा आणि अर्थ (एचटीई) संगणीकृत प्रणाली आहे.

ऑनलाइन प्रणालीसह रेकॉर्डसाठी हार्डकॉपी शिक्षण सहसंचालक कार्यालय ठेवणार आहे. कॉलेजने परिपूर्ण माहिती भरली असली तरी कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी कॉलेजच्या लिपिकाला बोलावून विनाकारण हेलपाटे मारावे लावत असल्याच्या तक्रारी यापूर्वी होत्या. या तक्रारीला पुन्हा वाव दिला जाणार नसल्याचा विश्वास सहसंचालक कार्यालयाने व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४४ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परदेशी ट्रेडिंग कंपनीमध्ये पैशांची गुंतवणूक करून दोन वर्षांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून ४४ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची फिर्याद अभय प्रभाकर जाधव (वय-४५, रा.देवकर पाणंद) यांची जुना राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात फिर्याद दिली आहे.

अमोल मनोहर पेडणेकर, आशीष मनोहर पेडणेकर, विजया अमोल पेडणेकर आणि संजय अरविंद वेसणेकर या चौघांनी जर्मनीतील ट्रेडिंग कंपनीत पैसे गुंतवण्याचे आवाहन जाधव यांना केले होते. दोन वर्षांत रक्कम दुप्पट देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. जाधव यांनी वेळोवेळी रोख आणि चेक स्वरुपात ४३ लाख ७८ हजार रुपये पेडणेकरांकडे दिले, मात्र पैसे परत मागितले असता पेडणेकर कुटुंबियांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभय जाधव यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दाखल दिली. अमोल मनोहर पेडणेकर, आशीष मनोहर पेडणेकर, विजया अमोल पेडणेकर या तिघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौर उमेदवारीतही कुरघोड्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष-ताराराणी आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. महापौरपदासाठी काँग्रेस आघाडीच्या अश्विनी अमर रामाणे यांच्या विरोधात भाजपकडून सविता शशिकांत भालकर तर ताराराणी आघाडीकडून स्मिता मारूती माने यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ताराराणी-भाजपकडून स्वतंत्र उमेदवारी दिल्याने उमेदवारी दाखल करतानाही कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या शमा सलीम मुल्ला यांनी उमेदवारी दाखल केली. त्यांच्या विरोधात भाजपकडून संतोष गायकवाड आणि ताराराणी आघाडीकडून राजसिंह शेळके उमेदवार असतील.

सोळा नोव्हेंबरला महापौर आणि उपमहापौर निवड होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दुपारी आघाडीचे नेते व नगरसेवकांची बैठक घेत सत्तेसाठीचा दावा बोलून दाखवला.

काँग्रेसचे नेते माजी मंत्री सतेज पाटील यांनी माजी नगरसेवक मधुकर रामाणे यांच्या स्नुषा अश्विनी यांना महापौरपदासाठी संधी दिली.

काँग्रेसकडून रामाणे यांच्याशिवाय स्वाती यवलुजे, दीपा मगदूम, उमा बनछोडे यांच्या मुलाखती झाल्या होत्या. मंगळवारी दुपारी काँग्रेस कमिटीतील बैठकीत शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी रामाणे यांचे नावे जाहीर केले. ताराराणीकडून स्मिता माने तर भाजपकडून सविता भालकर महापौरपदाच्या उमेदवार आहेत. भाजप, ताराराणी आघाडीचे संख्याबळ ३२ आहे. अपक्ष नगरसेवक राजू दिंडोर्ले यांनी पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. त्यांच्या पाठिंब्यासंदर्भात शिवसेनेशी बोलणी झाल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला उपमहापौरपद असून शमा मुल्ला यांनी आघाडीतर्फे अर्ज दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ विस्तारात घटकपक्षांना संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा समावेश जवळपास निश्चित आहे. ‌शिवाय सांगलीतून आमदार शिवाजीराव नाईक किंवा सुरेश खाडे यांपैैकी एकाला मंत्रीपद मिळणार आहे. येत्या २५ नोव्हेंबरच्या दरम्यान हा मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यातील एका आमदाराला मंत्रीपद मिळण्याची चिन्हे आहेत. त्यात चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर व डॉ. सुजित मिणचेकर यांच्यात चुरस असेल.

भाजपच्यावतीने घटकपक्षांना मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजर गेले वर्षभर दाखवले जात आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मंत्रीमंडळ विस्ताराचे चर्चा सुरू केली जाते, पण प्रत्यक्षात त्याची अमलबजावणी होत नाही. ७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीमंडळ विस्ताराचू सूतोवाच केले आहे. बिहारचा निकाल लागल्यानंतर भाजपचे बरेच नेते जमिनीवर आले आहेत. त्यामुळे घटकपक्षांना फार नाराज करून चालणार नाही, याची जाणीव झाल्यानेच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.

गेले वर्षभर विस्तार होत नसल्याने रासप, रिपाइं व स्वाभिमानी संघटनेचे नेते भाजपवर नाराज आहेत. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय या पक्षांनी घेतला. विविध मार्गाने आपले उपद्रवमूल्य दाखवण्याचा प्रयत्न हे पक्ष करत आहेत. महापालिका निवडणुकीत सेनेने भाजपविरोधी जी टोकाची भूमिका घेतली त्याचाच तो भाग होता. या पार्श्वभूमीवर आता मंत्रीमंडळ विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली. नव्या मंत्रीमंडळात जानकर व खोत यांचा समावेश जवळपास ​नक्की आहे. मंत्रीमंडळात स्थान देण्याचे भाजपने विधानसभेपूर्वी कबूल केले होते. त्यामुळे त्यांना स्थान मिळणार आहे. शिवसेनेचे सहा आमदार निवडून आल्याने जिल्ह्यात एका आमदाराला मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नरके, क्षीरसागर व मिणचेकर यांच्यात स्पर्धा आहे.

बिहार निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, असे भाष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच दिल्ली येथील एका पत्रकार परिषदेत केले होते. दिवाळी झाली की उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट होणार आहे.

नरामाईचे धोरण

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीवेळी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार भांडणे झाली असली तरी महापालिकेत सत्ता स्थापन करताना फारशा कुरबुरी झाल्या नाहीत. महापालिकेपेक्षा राज्यातील सत्तेची खुर्ची महत्त्वाची आहे, असा निरोप दोन्ही पक्षातील वरिष्ठांनी दिल्याने खालच्या पातळीवर सर्व वाद तात्काळ आटोपता घेण्यात आल्याचे कळते. लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार असल्याचेही वृत्त आहे.कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील सरकारचा पाठिंबा काढून घेण्यापासून ते जबड्यातील दात मोजण्यापर्यंतची भाषा झाली होती. वास्तविक दोन्ही पक्षांनी आपापल्या परीने ताकद दाखवल्याने या निवडणुकीवरून विनाकारण राज्यातील सत्ता कशाला अडचणीत आणायची, यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून विचारमंथन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसटी-व्हॉट्सअॅप’चा प्रवास

$
0
0


Udaysing.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : हिंजवडीत आयटी क्षेत्रात नोकरीला असलेला एक तरुण. त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शुक्रवारी सकाळीच बस नंबर व कंडक्टरचा मोबाइल नंबर पडतो. त्यानंतर ऑनलाइन बुकिंग सुरू होते. पाहता पाहता एक बस भरली की, तरुणांकडून आणखी बस सोडण्याची मागणी होते. त्यांच्या मागणीची खातरजमा करून ऑनलाइन जादा बस दिली जाते, तसेच सायंकाळी ती हिंजवडीत जातेही. ही पद्धती कोणत्याही खासगी आराम बस कंपनीची नव्हे तर एसटी महामंडळामार्फत गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. दोन व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून थेट प्रवाशांशी कनेक्ट होण्याचा अनोखा फंडा एसटीच्या कोल्हापूर आगाराने अवलंबून तो यशस्वीही केला आहे.

नोकरीनिमित्त आठवड्याच्या सुरुवातीला कोल्हापुरातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही आयटी क्षेत्रातील तरुणांची संख्या भरपूर आहे. शुक्रवारी सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर ते थेट बस पकडून कोल्हापुरात रात्रीपर्यंत येतात. त्यासाठी कधी एसटी, तर कधी खासगी आराम बस पकडत होते. त्यामध्ये भरपूर वेळ जायचा. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी सांगलीतून थेट हिंजवडी ही बस सुरू केली. त्या धर्तीवर कोल्हापुरातूनही हिंजवडीपर्यंत निमआराम बस सुरू केली. त्यातून ये-जा करणाऱ्यांचा एक ग्रुप तयार झाला. ते शुक्रवारी घरी जाण्यासाठी कंट्रोल केबिनला फोन करून हिंजवडीला कोणती बस आली आहे, पोहोचली आहे का? याची विचारणा करत.

अनेकदा या बस जुन्या असल्याने विलंब होत होता. जुन्या निमआराम बस बंद केल्यानंतर कोल्हापुरातून साधी बस सोडण्यात आली. त्यामध्ये सध्याचे स्थानकप्रमुख अभय कदम यांनी पुढाकार घेतला. त्यांचा या बसमधून ये-जा करणाऱ्या तरुणांशी संवाद सुरू झाला आणि पाहता पाहता व्हॉटस अॅपचे दोन ग्रुप तयार झाले.

हिंजवडीतून शुक्रवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही बस सुटते. सोमवारी पहाटे ५.५० वाजता पुण्यासाठी रवाना होते. कदम शुक्रवारी सकाळी हिंजवडीसाठी असलेल्या बसचा नंबर व कंडक्टरचा मोबाइल नंबर त्या ग्रुपवर पाठवतात.

कंडक्टरशी संपर्क करून तरुण ऑनलाइन बुकिंग करतात. अनेकदा एक बस फुल्ल झाली तर तरुण जादा बस सोडण्याची मागणी करतात. कदम त्यांच्याशी व्हॉटस अॅपवरून जादा बसच्या सीट होऊ शकतील का याचा अंदाज घेतात आणि एक बस हिंजवडीसाठी तातडीने वळवतात. त्याचे बुकिंगही ऑनलाइन केले जाते.

त्यामुळे तरुणांसाठी थेट हिंजवडीतून जादा बसची सोय होते व एसटीलाही उत्पन्न मिळत राहते. नव्या युगातील तरुण व जुन्या मळलेल्या वाटेनेच धावणाऱ्या एसटीचा या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून घडलेला संगम महामंडळाला आधुनिकतेकडे व प्रवाशांच्या सोयीसाठी दक्षपणे पाहण्याची सवय लावणारा ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किरणांचा चरणस्पर्श

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किरणोत्सवाच्या पहिल्या दिवशी ढगाळ हवामानामुळे सूर्यास्ताच्या किरणांचा अंबाबाई गाभाऱ्यापर्यंतचा हुकलेला प्रवास मंगळवारी चरणस्पर्शाने पहिल्या टप्प्यापर्यंत यशस्वी झाला. दिवाळी आ​णि किरणोत्सवाचा दुर्मीळ योग या सोहळ्याने साधला. सायंकाळी पाच वाजता गरूडमंडपात आलेली सूर्यकिरणांची तिरिप गाभाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत पाच वाजून ४७ ​मिनिटांनी गभकुडीच्या पायरीवरून मूर्तीच्या चरणांपर्यंत पोहोचली. यावेळी केशरीकिरणांनी देवीचा गाभारा उजळून गेला आणि जणू मावळतीच्या सूर्याने दिवाळीचा दीप गाभाऱ्यात लावल्याची अनुभूती भाविकांनी घेतली.

सोमवार (ता. ९) पासून अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याला सुरूवात झाली. मात्र पहिल्यादिवशी ढगाळ हवामानामुळे सूर्यास्ताची किरणे देवीच्या चरणापर्यंत पोहोचू शकली नव्हती. त्यामुळे मंगळवारी किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किरणोत्सव होणार की नाही याची उत्सुकता भाविकांसह देवस्थान समिती व किरणोत्सव पाहणी समितीलाही लागून राहिली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास किरणे गरूड मंडपात आली. ५ वाजून १३ मिनिटांच्या ठोक्याला किरणे गणपती चौकाजवळ आली तर पुढच्या सात मिनिटात किरणांनी घंटा चौकात आपली झाक सोडली. पाच वाजून २३ ​मिनिटांनी पितळी उंबऱ्याच्या आत किरणांनी प्रवेश केली. साडेपाचच्या सुमारास किरणांच्या प्रकाशाने पेटी चौकात सोनेरीरंग चढला. यावेळी पेटीचौकातील दिवे मालवण्यात आले. पाच वाजून ४७ ​मिनिटांनी चरणांना स्पर्श करत किरणे खाली झुकली. यावेळी ​जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, शुभांगी साठे आदी उपस्थित होते.

तीव्र किरणे

जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सव दोन पर्वांमध्ये होतो. यापैकी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या किरणोत्सव काळात सूर्यकिरणांची प्रखरता तुलनेने कमी असते. दिवस लहान होत असल्यामुळे ढगाळ हवामानाचा अडथळाही होऊ शकतो. मात्र बुधवारच्या किरणांमध्ये प्रखरता जास्त असल्याचे किरणोत्सव समितीतील तज्ज्ञांच्या नोंदीमधून निदशनास आले.

पाहणी

किरणोत्सवाच्या कालाप्रमाणे सूर्यास्ताची किरणे पहिल्यादिवशी मूर्तीच्या चरणांवर, दुसऱ्यादिवशी पोटावर आ​णि तिसऱ्यादिवशी मुखावर पडतात. मात्र गेल्या काही वर्षात ही कालप्रक्रिया बदलत असल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किरणे चरणापर्यंत पोहोचल्याने किरणोत्सव सोहळा १२ तारखेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदान त्यागाला २ टक्के प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गिव्ह इट अप' म्हणजेच गॅस अनुदान सोडण्याच्या केंद्र सरकारच्या मोहिमेला कोल्हापूर जिल्ह्यातून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. मोदी सरकारने गेल्या वर्षभरात विविध जाहिरातींद्वारा नागरिकांना अनुदान सोडण्याचे भावनिक आवाहन केले असले तरी, जिल्ह्यातून केवळ दोन टक्के ग्राहकांनी अनुदान सोडले आहे. विशेष म्हणजे सरकारी कर्मचारी, करदाते आणि लोकप्रतिनिधीच या मोहिमेबाबत निरुत्साही आहेत.

गरिबांना सहजतेने गॅस सिलिंडरचे कनेक्शन मिळावे यासाठी केंद्रसरकारने 'गिव्ह इट अप' या मोहिमेला सुरुवात केली होती. घरगुती वापराच्या गॅसवरील सरकारी अनुदान नाकारून त्या रकमेत गरीब ग्राहकाला विना डिपॉझिट कनेक्शन देण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले आहे. ही योजना कल्याणकारी असली तरी, याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.

एका ग्राहकाला अनुदानापोटी वर्षभरात साधारण १२०० ते १५०० रुपये मिळतात. याच अनुदानावरील पैशात गरीब ग्राहकाला विना डिपॉझिट गॅस कनेक्शन देण्याची योजना केंद्र सरकार राबवत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुरवठा विभागाने दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना गॅस कनेक्शन देण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रमुख तीन गॅस वितरण कंपन्यांना गिव्ह इट अप योजनेस प्रोत्साहित करून दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कनेक्शन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. गॅस कंपन्यांनी आजपर्यंत सुमारे १७,५०० कनेक्शन दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना दिली आहेत, तर गॅसचे अनुदान सोडणाऱ्या ग्राहकांची संख्या १५,६०० इतकीच आहे. तीनही कंपन्यांची जिल्ह्यातील एकूण ग्राहक संख्या सहा लाख पन्नास हजार आहे. या तुलनेत गॅस अनुदान सोडणाऱ्यांची संख्या केवळ दोन टक्क्यांच्या आसपास आहे. केरोसिन आणि लाकडाचा वापर कमी व्हावा आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे या हेतूने गॅस कनेक्शन वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झळाळला घाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली येथील समाज विकास केंद्राच्यावतीने दूधगंगा नदी घाटाची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे. या केंद्राच्या कार्यकर्त्यानी 'आम्ही प्रकाशबीजे रुजवत चाललो आहोत,वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो आहोत' हे ब्रीद घेवून काम करताना गणेशउत्सव आणि होळी सारख्या सणांमध्येही पर्यावरण वाचवण्याचा संदेश कृतीतून दिला आहे.

यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर दुसरीकडे धार्मिक विधी आणि अंधश्रद्धेचा धोका नद्यांच्या प्रदुषणाला कारणीभूत ठरत आहे. याचा विचार करुन समाज विकास केंद्राच्या कार्यकर्त्यांनी नदीतून वाहून आलेला आणि घाटावरील कचरा श्रमदानाने काढून स्वखर्चाने त्याची योग्य विल्हेवाट लावली. सणांच्या काळात नद्या आणि हवेच्या प्रदुषणाबाबत या केंद्रकडून जनजागृतीही केली जाते. याशिवाय स्पर्धा परिक्षेसाठी मार्गदर्शनही केले जाते. गणपती उत्सवाच्या काळात मूर्ती दान उपक्रम राबवून १३०० मूर्ती नदीत न टाकता त्यांचे योग्य ठिकाणी संवर्धन केले जाते. होळी लहान पोळी दान उपक्रम राबवून कोल्हापूरातील 'अवनी' संस्था आणि कागलमच्या मुकबधीर विद्यालयला तसेच ऊस तोड मजूरांना पोळ्या दान केल्या जातात.

या केंद्राच्या कार्यकर्त्यांनी सिद्धनेर्ली येथे दूधगंगा नदी घाटात वेळोवेळी सोडलेले निर्माल्य, नारळ, फुलांचे हार आणि अन्य साहित्य बाहेर काढले या उपक्रमांमध्ये मुकुंद गोनुगडे, प्रकाश मगदूम, सार्थक मगदूम, अजिंक्य कांबळे, पंकज बंके, योगेश पोवार, दीपक आगळे आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ कार्यालयातच हृदयविकाराने मृत्यू

$
0
0

कोल्हापूर : जिल्हा दूध संघाचे सहाय्यक दूध संकलन अधिकारी अमरसिंह विजयसिंह रणनवरे (वय ५३, रा. चौगुले गल्ली, गुरूवार पेठ, कागल, सध्या रा. पाचगांव) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात दुपारी दोनच्या सुमारास ही घटना झाली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली आहे.

गोकुळच्या कार्यालयात अध्यक्ष विश्वासराव पाटील यांनी अधिकारी व सुपरवायझर यांची बैठक बोलावली होती. बैठक संपल्यानंतर रणनवरे यांच्या छातीत दुखू लागले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी मोटार बोलावली पण त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

रणनवरे यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी गोकुळ कर्मचाऱ्यांच्यात पसरली. गोकुळचे कर्मचारी मोठ्या संख्येने सीपीआर हॉस्पिटलमध्ये आले होते. रणनवरे यांनी गोकुळच्या संकलनात प्रामाणिकपणे काम केले होते. त्यांनी परिश्रमाच्या जोरावर मोठ्या पदावर झेप घेतली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता कागल येथे होणार आहे. दरम्यान, बैठकीत वाद झाल्यामुळे रणनवरे तणावाखाली होते असा आरोप काही कर्मचा‍ऱ्यांनी केला.

याबाबत गोकुळचे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'बैठकीत कोणत्याही प्रकारचा वाद झाला नाही. त्यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. गोकुळ संघ त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे राहील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विदेशी पर्यटकांचे करवीर दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डेक्कन ओडिसी या शाही रेल्वेच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या फेरीतून इंग्लंड, जर्मनीसह देशातील १४ पर्यटकांनी ऐतिहासिक करवीरचे दर्शन घेतले. ऐतिहासिक भवानी मंडपात सायंकाळी मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांनी सारेजण भारावून गेले. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी हे देखील या शाही रेल्वेतून आले होते.

कॉक्स अँड किंग्ज या कंपनीच्यावतीने डेक्कन ओडिसी रेल्वेच्या फेऱ्या आयोजित केल्या जात आहेत. आतापर्यंत विविध ठिकाणांचे जसे आरक्षण होईल, त्याप्रमाणे या रेल्वेचे आयोजन करण्यात येते. यंदाचा हंगाम सुरु झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये बुधवारी प्रथमच या रेल्वेची फेरी आयोजीत केली होती. यामध्ये चौदा पर्यटक आहेत. त्यातील इंग्लंड व जर्मन या देशातील सहा तर उर्वरित देशातीलच पर्यटक होते. त्यामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव कुलकर्णीही होते. औरंगाबाद, वेरुळला भेट दिल्यानंतर ही रेल्वे कोल्हापुरात आली होती. येथील भेटीनंतर रत्नागिरी, गोवा पाहून मुंबईला परत जाणार आहे.

येथे ही रेल्वे आल्यानंतर त्यांनी प्रथम न्यू पॅलेसला भेट दिली. तेथील म्युझियमची पाहणी करुन झाल्यानंतर पर्यटकांनी अंबाबाई मंदिराला भेट दिली. प्राचीन मंदिरावरील कलाकुसर पाहून परदेशी पर्यटक मुग्ध झाले. त्यानंतर कोल्हापूरच्या कला, क्रीडा प्रकारांची ओळख करुन देण्यासाठी भवानी मंडपामध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी व जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा उपस्थित होते.

मर्दानी राजा सुहास ठोंबरे आखाड्याच्या कार्यकर्त्यांनी मर्दानी खेळांची प्रा​त्य​क्षिके पर्यटकांसमोर सादर केली. पायाखालील लिंबू मारणे, पोटावर ठेवलेले केळ कापणे, विटाफेक, लाठी काठी अशा विविध प्रकारातून पर्यटकांनी थरार अनुभवला. विटाफेकीचा प्रकार पाहून अनेक पर्यटकही काही क्षण भारावले. वस्ताद आनंदराव ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखालील मुली व मुलांच्या पथकाने हालगी घुमक्याच्या तालावर जवळपास तासभर भवानी मंडप थरारुन सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटीत खर्च, लाखांत सादर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणुकीच्या कालावधीत काही प्रभागात रोज भोजनावळी सुरू होत्या. काही प्रभागात पैसे वाटप केल्याच्या तक्रारी झाल्या. मतदारांना भेटवस्तू, दुर्गा दर्शन, दिवाळी साहित्य पोहोच करण्यात आले. निवडणुकीच्या धामधुमीत काही प्रभागातील उमेदवारांनी कोट्यवधी रुपये खर्च केले. काही प्रभागात खर्चाने पन्नास लाख रुपयांचा आकडा गाठला. प्रत्येक प्रभागात पैशाचा महापूर वाहत असताना राज्य निवडणूक आयोगाला सादर करावयाच्या निवडणूक खर्च अहवालात हा खर्च बड्या उमेदवारांनी दीड ते सव्वा दोन लाख रुपयापर्यंतच दाखविला आहे. काही अपक्ष उमेदवारांनी संपूर्ण निवडणुकीसाठी दहा हजार रुपये खर्च केल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीतील खर्चाचा ताळमेळ लागत नसल्याने अद्यापही काही राजकीय पक्षांनी निवडणूक खर्चाचा तपशील सादर केलेला नाही.

भारतीय जनता पक्ष, ताराराणी आघाडी, शिवसेनेने अद्याप खर्चाचा अहवाल दिलेला नाही. पक्षीय पातळीवर खर्च सादर करण्यास विलंब होत असला तरी अपक्ष उमेदवारांनी मात्र निवडणूक खर्च सादर केला आहे. अन्य उमेदवारांनी खर्चाचा तपशील तयार केला आहे. पक्षीय पातळीवरून अजून प्रत्येक उमेदवाराच्या नावावर दाखविण्यात येणारा खर्च निश्चित करावयाचा आहे. पक्षाकडून निश्चित केलेल्या खर्चाचे पत्र प्राप्त झाले की उमेदवार एकूण खर्चाचा अहवाल सादर करणार आहेत. काही पक्षांना निवडणुकीतील खर्चाचा ताळमेळ लागेनासा झाला आहे. परिणामी खर्चाचा अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने खर्चाचा तपशील दिला आहे. पक्षातर्फे आयोजित कॉर्नर सभा, प्रचार सभा, रोड शो, पक्षाचे झेंडे, नेत्यांची निवास व्यवस्था, हो​र्डिंग्ज अशा विविध घटकावरील खर्च हा पक्षाकडून होणारा खर्च म्हणून निश्चित केला आहे.

काँग्रेस पक्षाने महापालिकेच्या ८१ प्रभागात निवडणूक लढविली. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा झाल्या. कॉर्नर सभा घेण्यात आल्या. पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे खर्च सादर करण्यात आला असून २१, २१, ५५२ रुपये इतका खर्च दाखविण्यात आला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाने महापालिकेच्या १५ जागा लढविल्या होत्या. पक्षातर्फे निवडणूक कालावधीत जाहीर सभा, पोस्टर, झेंडे, बॅनर, रिक्षातून प्रचारावर झालेला खर्च २,५२,०१८ इतका झाला आहे. पंधरा जागा लढवूनही एकाही जागेवर यश मिळाले नाही.

अपक्ष उमेदवारांची संख्या १४०च्या आसपास होती. यामध्ये काही हौशी उमेदवारांचा समावेश होता. स्वतःची गल्ली, कॉलनीपुरती ताकद मर्यादित असताना त्यांनी निवडणुकीसाठी शड्डू ठोकला होता. उमेदवारी अर्ज भरणे, निवेदन वाटप यापुरताच काहींचा प्रचार सिमित राहिला अशा उमेदवारांनी निवडणुकीचा एकूण खर्च हा आठ ते दहा हजार रुपये इतका दाखविला आहे.

अखिल भारत हिंदू महासभा, कोल्हापूरतर्फे पाच प्रभागात निवडणूक लढविली होती. प्रतिभानगर, शास्त्रीनगर, कळंबा फिल्टर हाऊस, फुलेवाडी या प्रभागात उमेदवार रिंगणात होते. हिंदू महासभेतर्फे राज्य निवडणूक आयोगाला खर्चाचा अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये पक्षाचा निवडणूक खर्च निरंक असा दाखविण्यात आला आहे.

..........

मुदतीत अहवाल सादर न केल्यास संबंधित उमेदवाराला पुढील तीन वर्षासाठी कोणतीही निवडणूक लढविण्यास मनाई

विजयी उमेदवारांनी मुदतीत अहवाल न दिल्यास पद रद्द होण्याची टांगती तलवार

मर्यादेपेक्षा जादा खर्च केल्यास पद रद्द

उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा तीन लाख रुपयापर्यंत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेसचे ‘आस्ते कदम!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे बंडखोरीची फारशी संधी मिळू नये, यासाठी शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात इच्छुकांची नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, इच्छूक उमेदवार सतेज पाटील यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी इचलकरंजीतील अनेक नेत्यांच्या भेटी घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली.

विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी आमदार महादेवराव महाडिक, सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील व माजी मंत्री प्रकाश आवाडे प्रयत्नशील आहेत. यातील महाडिक व सतेज पाटील यांनी प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पाटील यांनी बुधवारी आवाडे यांची भेट घेत मदत करण्याची विनंती केली. याशिवाय माजी खासदार निवेदिता माने, माजी मंत्री जयवंतराव आवळे, अशोकराव जांभळे, हिंदूराव साळोखे, मदन कारंडे, रवींद्र माने यांचीही पाटील यांनी भेट घेतली. विधानसभा, महापालिका, नगरपालिका या सर्वच निवडणुकीत आमदार महाडिक यांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केलेला नाही. त्यामुळे त्यांनी विधानपरिषदेची उमेदवारी मागणे हा मोठा विनोद असल्याचे पाटील यांनी या सर्वांशी बोलताना स्पष्ट केले.

या निवडणुकीसाठी इच्छूक असलेले सर्वच उमेदवार सक्षम आहेत. त्यामुळे एकाला उमेदवारी दिल्यास दुसऱ्याला बंडखोरी करता येऊ नये यासाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतरच उमेदवारी घोषित करण्यात येणार आहे. पुढील महिन्यात शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निवडणूक जाहीर होईल. इच्छुकांची नावे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांच्याकडे मिळाली आहेत. ही नावे घेऊन १६ नोव्हेंबरला मुंबईत येण्याचे आदेश त्यांना मिळाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तेसाठी धडपड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी आतूर झालेल्या नेतेमंडळींपुढे नगरसेवकांची मोट कायम ठेवण्याचे आव्हान आहे. यावर उपाय म्हणून भाजपचे नेते चमत्कार आणि 'अध्यात्मा'ची भाषा करत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते प्रत्येकाला पदाचे आमिष दाखवित आहेत. सत्तेसाठी दोन्ही आघाड्यांकडून नगरसेवकांना पदाच्या आमिषात गुंतविले जात आहे. नगरसेवकांना खूश करण्यासाठी सगळेच नेतेमंडळी प्रत्येकाला पदाची खिरापत वाटणार असल्याने महापालिकेत पुन्हा एकदा दहा महिन्याचा महापौर, सहा महिन्याचा स्थायी सभापती असे चित्र असणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीने दोन अपक्ष नगरसेवकांसह बहुमताच्या मॅजिक फिगरचा टप्पा ओलांडला आहे. दोन्ही काँग्रेसकडे ४४ संख्याबळ झाल्याने पुन्हा सत्ता येणार हे स्पष्ट झाले आहे. तरीही भाजप-ताराराणी आघाडीचे नेते महापौर निवडीच्या दिवशी चमत्काराची भाषा करत आहेत. त्यांच्याकडे एका अपक्षासह आजअखेर ३३ सदस्य आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या चार आहे. शिवसेनेचा पाठिंबा मिळेल असे भाजपचे म्हणणे आहे. तरीही त्यांना सत्तेसाठी आणखी पाच सदस्यांची आवश्यकता आहे. यासाठी अन्य पक्षांतील नगरसेवकांची फोडाफोडी करावी लागणार आहे. मात्र भाजप नेते म्हणतात तो चमत्कार साधणे सोपे नाही. पक्षांतर बंदी कायद्यातील बदल, नुकतीच निवडणूक झाल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर नगरसेवकांची होणारी मानहानी आणि खुद्द पक्षाच्या प्रतिमेला बसणार धक्का हे भाजपसमोरील आव्हान असेल.

गणित

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई केली जाते. पूर्वी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांच्या एकूण संख्येपैकी एक तृतीय्यांश सदस्यांनी पक्षांतर केले तर त्यांच्याविरोधात कारवाई होत नव्हती. आता या कायद्यात बदल झाला आहे. पक्षांतरबंदीच्या कचाट्यातून सुटका करून घ्यायची असेल तर दोन तृतीय्यांश सदस्यसंख्या आवश्यक आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत चमत्कार झाला, काही जणांनी दुसऱ्या पक्षात उडी घ्यायच्या पावित्र्यात असले तरी एकट्या-दुकट्यांनी धाडस करणे महागात पडणार आहे. यामुळे दोन तृतीय्यांशपेक्षा कमी सदस्यसंख्या असेल तर त्या सदस्यांवर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते. त्यानुसार संबंधिताला सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी येऊ शकते.

नगरसेवकांवर वॉच

महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजकीय नेत्यांसह इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. भेटीगाठी आणि नगरसेवकांशी थेट संपर्क साधला जात आहे. काँग्रेससह भाजप-ताराराणी आघाडीने महापौरपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दिवाळीचे औचित्य साधून इच्छुकांनी नगरसेवकांना शुभेच्छा देतानाच सोबत राहण्याचे साकडेही घातले. महापौर, उपमहापौरपदाच्या निवडीसाठी पाच दिवस उरल्याने दगाफटका होऊ नये म्हणून प्रत्येक पक्षाकडून नगरसेवकांवर वॉच ठेवला जात आहे. कारभाऱ्यांच्या माध्यमातून तशी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. काँग्रेसआघाडीकडून नगरसेविका अश्विनी रामाणे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात भाजपच्या सविता भालकर, 'ताराराणी'कडून स्मिता माने निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस आघाडीकडे काठावरचे बहुमत असल्याने भाजप-ताराराणी आघाडीने महापौरपदासाठी फिल्डींग लावली आहे.

राजकीय भेट

राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रा. जयंत पाटील यांनी बुधवारी रात्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. या संदर्भात प्रा. पाटील म्हणाले, 'दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलो होतो. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यात झालेल्या चर्चेनुसार महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीचीच सत्ता येणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत किरणे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लक्ष्मीपूजन आ​णि किरणोत्सवाचा योग साधत बुधवारी सूर्यास्ताची किरणे करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या कमरेपर्यंत पोहोचली. मंगळवारी किरणांचा चरणस्पर्श झाल्यामुळे किरणे पुढच्या टप्प्यावर पोहोचतील, अशी भाविकांच्या मनातील आशा किरणोत्सवामुळे उजळली. सायंकाळी पाच वाजून ४६ मिनिटांनी किरणांनी मूर्तीच्या कमरेला स्पर्श केला.

सायंकाळी पाच वाजता गरूडमंडपात आलेली सूर्यकिरणांची तिरिप गाभाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत पाच वाजून ३८ मिनिटांनी गर्भकुडीच्या संगमरवरी पायरीपर्यंत आली. यावेळी किरणांची तीव्रता १२० लक्स इतकी होती. त्यानंतर पुढच्या चौथ्या मिनिटाला किरणे जेव्हा गभकुडीच्या दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचली तेव्हा प्रखरता वाढून ती २३२ लक्स इतकी तीव्र झाली. पाच वाजून ४३ मिनिटांनी ही तीव्रता काहीअंशी कमी होत १९ लक्सवर खाली आली. मात्र किरणे पुढे सरकत होती. पाच वाजून ४६व्या मिनिटाला देवीच्या मूर्तीच्या कमरेला किरणांनी स्पर्श केला. त्याठिकाणी तीन मिनिटे किरणे स्थिर होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images