Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

थकबाकी २९५ कोटींवर

$
0
0

वसुली न झाल्यास कोल्हापूर विभागात भारनियमनाचा धोका

Uddhav.Godase

@timesgroup.com

कोल्हापूर ः महावितरणच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाची थकबाकी तब्बल २९५ कोटींवर गेली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांबरोबरच कृषी आणि औद्योगिक ग्राहकांचीही थकबाकी वाढल्याने भारनियमनाचा धोका वाढला आहे. लवकरच थकबाकीची वसुली झाली नाही, तर डिसेंबर महिन्यापासूनच दोन्ही जिल्ह्यांमध्ये भारनियमन सुरू होऊ शकते.

राज्यात विजबिलांची सर्वाधिक वसुली होणारे जिल्हे म्हणून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची ओळख होती. घरगुती, कृषी आणि औद्योगिक या तीन्ही प्रकारातील ग्राहकांचा वीजबिल वसुलीचा टक्का समाधानकारक होता, त्यामुळे गेल्या दोन वर्षात महावितरणचे कोल्हापूर विभागीय कार्यालय भारनियमनमुक्त होते. गेल्या दोन वर्षात मात्र वीज बिलांची थकबाकी वाढल्याने महावितरणसमोरील संकट वाढले आहे. अपेक्षित वसुली नसल्याने विद्युत वाहिन्यांचे नुतनीकरण, दुरुस्ती यासह कर्मचारी वाढ करण्यात अडचणी येत आहेत.

सर्वाधिक थकबाकी कृषीपंपांची आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृषीपंपांची थकबाकी २०८ कोटींवर पोहोचली आहे. या थकबाकीची वसुली व्हावी यासाठी महावितरणने कृषीसंजीवनी योजना सुरू केली होती, मात्र या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. कृषीसंजीवनी अंतर्गत शेतकऱ्यांना कृषीपंपाच्या वीज बिलात ५० टक्के सवलत दिली होती, तरीही ही थकबाकी कायम आहे. सांगली जिल्ह्यात १६३ कोटी ४० लाख रुपयांची कृषीपंपांची थकबाकी आहे. ही थकबाकी प्रमाणापेक्षा अधिक असल्याने तातडीने वसुली न झाल्यास भारनियमन सुरू करण्याच्या हालचाली महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहेत. यावेळी कमी पाऊस झाल्याने वीजनिर्मितीवरही मर्यादा येणार आहेत, त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून महावितरणने थकबाकी वसुलीसाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. थकबाकीची वसुली तातडीने व्हावी यासाठी महावितरणनेही उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा पाठवून, तर आवश्यक त्या ठिकाणी तडजोडी करीत काही सवलती देऊन ग्राहकांना वीजबिल भरण्यास प्रोत्साहित केले जात आहे. यातूनही अपेक्षित वसुली न झाल्यास मात्र डिसेंबरपासूनच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही भारनियमन लागू होणार आहे. सध्या दोन्ही जिल्ह्यातील चार फीडर भारनियमनात गेले आहेत. भारनियमन सुरू झाल्यास याचा फटका घरगुती ग्राहकांसह शेतीलाही मोठ्या प्रमाणात बसणार आहे.

संभाव्य भारनियमन टाळण्याची जबाबदारी सर्वच ग्राहकांची आहे. सर्वाधिक थकबाकी कृषीपंपांची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषीसंजीवनी योजनेचा आधार घेतला तर त्यांनाही याचा फायदा होईल. थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत, पण मर्यादेपेक्षा थकबाकी वाढली तर मात्र भारनियमनाला सामोरे जावे लागेल.

- फुलसिंग राठोड, जनसंपर्क अधिकारी, महावितरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहर विकासाचा अजेंडा राबवा

$
0
0

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करताना कोल्हापूर शहर सुंदर आणि महापालिकेचा कारभार स्वच्छ असला पाहिजे. नगरसेवक म्हणून नूतन सदस्यांनी केवळ प्रभागाचे लोकप्रतिनिधित्व न करता संपूर्ण शहराचा विकास हाच अजेंडा राबविला पाहिजे. शहराच्या विकासासाठी कोल्हापूरची हद्दवाढ आवश्यक असून, नव्या सभागृहाने त्यासाठी पाठपुरावा करावा. महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा आल्याने उत्पन्नाचे नवे मार्ग शोधावे लागणार आहेत. रस्ते, गटर्स, ड्रेनेज या पायाभूत सुविधांची पूर्तता करणे हे महापालिका व नगरसेवकांचे कर्तव्यच आहे. मात्र, यापलीकडे कार्यकक्षा विस्तारत कोल्हापूरची सांस्कृतिक, कलापूर ही ओळख आणखी गडद करण्यासाठी दर्जेदार आणि आशयघन सांस्कृतिक महोत्सवांच्या आयोजनात पुढाकार घ्यायला हवा. महापालिकेच्या हॉस्पिटलमधून दर्जेदार आरोग्य सुविधा, पार्किंग आणि वाहतुकीची सुविधा, महापालिका शाळांचा दर्जा आणि ग्रीन सिटी या संकल्पना अमलात आणण्यासाठी नूतन नगरसेवक कटिबद्ध झाले तर शहरवासीयांचे जीवन सुसह्य होईल, असा सूर 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित



स्वच्छता, चौकांच्या सुशोभिकरणावर हवा भर

कोणत्याही शहराची प्रतिमा ही त्या शहरातील स्वच्छता, चौक सुशोभिकरण आणि आरोग्यविषयक सुविधा यावर आधारलेली असते. बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटक, भाविक, प्रवाशांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या तरच शहराची प्रतिमा उंचावणार आहे. नव्या सभागृहात तरुण चेहऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. या सभागृहाने कोल्हापूर शहर स्वच्छ व सुंदर बनविण्याचा ध्यास बाळगावा. कोल्हापूरला सामाजिक, ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. कोल्हापुरातील प्रत्येक चौकाला एक इतिहास आहे. दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, जनता बझार चौक, तोरस्कर चौक असो वा भवानी मंडपासारखी ऐतिहासिक वास्तू या प्रत्येक घटकाचे सुशोभिकरण, उत्तम देखभाल झाली पाहिजे. संस्थानकाळात कोल्हापूर देखणे शहर होते, ते देखणेपण पाहावयास मिळत नाही. चौक, वास्तूंची देखभाल, संवर्धन व सुशोभित या घटकांना प्राधान्यक्रम दिला पाहिजे.

आरोग्य सुविधेची फेररचना गरजेची

कोल्हापुरात आज अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. खासगी संस्थेतील सुविधा, खर्च सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे आहे. हॉस्पिटलचे बिल भागविताना सामान्य कुटुंबांची वाताहत होत आहे. प्रशासनाने, महापालिकेच्या दवाखान्यात अद्ययावत आरोग्य सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. मोठ्या आजारावर उपचार सुविधा असली पाहिजे. शिवाय खासगी मोठ्या हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना माफक दरात आरोग्य सुविधा देणे बंधनकारक केले पाहिजे. आरोग्यविषयक सुविधेची फेररचना गरजेची आहे.

महापालिका शाळा उत्कृष्ट, गुणवत्ता उत्तम हवी

खासगी शिक्षण संस्थेतील फी सर्वांनाच परवडणारी नाही. याकरिता महापालिका शाळा उत्कृष्ट बनल्या पाहिजेत, शैक्षणिक गुणवत्ता उत्तम हवी. प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे, त्याचबरोबर ते उत्तम पद्धतीचे असले पाहिजे. शैक्षणिक पूरक उपक्रम राबविताना मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. महापालिका शाळेकडे इमारती आहेत, प्रशस्त मैदान आहे, त्यांचा योग्य वापर करत शाळा उत्कृष्ट बनविल्या पाहिजेत.

- डॉ. जे. एफ. पाटील, अर्थतज्ज्ञ

विकासकामांत राजकीय हस्तक्षेप नको

मागच्या सभागृहाने शहरात काही पायाभूत सुविधा करण्याचा चांगला प्रयत्न झाला आहे. रस्ते चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे. पण टोलवसुलीच्या प्रयत्नामुळे तो फसला गेला आहे. रस्ते चांगले न करता टोलवसुली करणाऱ्या कंपनीला चांगलाच धडा मिळाला आहे. थेट पाइपलाइन योजनेमुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी योजनेच्या कामाला गती द्यायला हवी. शहरात मुबलक पाणी आहे, पण वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी नव्या सभागृहाने प्रयत्न केले पाहिजेत. एक बांधकाम व्यावसायिक म्हणून शहरात प्रगती करण्यासाठी मोठी संधी आहे. पण महापालिकेतील नोकरशाही, दप्तर दिरंगाई आणि राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप यामुळे माझ्यासारख्या माणसाला काम करणे अवघड जाते. सामान्य माणसाची प्रशासकाकडून वारंवार अडवणूक होते. बांधकाम परवानगी ऑनलाइन होऊनही परवानगी मिळण्यासाठी विलंब का होतो याचा विचार होण्याची गरज आहे. कारभाऱ्यांचा हस्तक्षेप सातत्याने होतो. राजकीय हस्तक्षेप थांबवण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. पुण्यात राजकीय नेते व प्रशासनामध्ये उत्तम सुसंवाद असल्याने पुण्याची प्रगती झाली आहे. तिथे महापालिका प्रत्येक भागात पोचली आहे. कोल्हापुरात मात्र सगळे उलटे आहे. सध्या बांधकाम व्यावसायिक रस्ते, गटर, स्ट्रीट लाइट या प्रक्रिया करत आहेत. प्रशासनाने जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर ५० टक्के प्रश्न सहज सुटू शकतात. कचऱ्याचे व्यवस्थापन घरातून झाले पाहिजे. नवीन बांधकाम परवाना देताना सांडपाणी प्रकल्प उभारणीची सक्ती केली असल्याने प्रदूषणाचा प्रश्नही कमी होणार आहे. गेल्या वीस वर्षांत उपनगरांची संख्या वेगाने वाढत आहे. पण पायाभूत सुविधा पुरवण्यात महापालिका कमी पडत आहे. उपनगरांत पायाभूत सुविधांचे जाळे विणण्यासाठी नवीन नगरसेवकांनी प्रयत्न केले पाहिजेत. टीडीआर, एफएसआयमुळे महापालिकेचे उत्पन्न वाढले आहे. पण जमा झालेले उत्पन्न विकासकामांवर खर्च पडत नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राजकीय नेतृत्व प्रगल्भ हवे. कोल्हापूर महापालिकेचे नेतृत्व करणारे बहुतांश नेते हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे ते हद्दवाढीला विरोध करतात. हद्दवाढ होण्यासाठी नवीन सभागृहाने पुढाकार घेतला पाहिजे. प्रसंगी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे.

व्ही. बी. पाटील, बांधकाम व्यावसायिक

वॉर्ड समितीच्या कामात सुसूत्रता यावी

महापालिकेच्या नवीन सभागृहात ४२ महिला निवडून आल्या आहेत ही अभिमानाची व शहराच्यादृष्टीने महत्त्वाची घटना आहे. आज देशात अहिष्णुतेचे वातावरण असताना कोल्हापुरात महालक्ष्मी मंदिर प्रभागात अल्पसंख्याक महिला निवडून येते हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा विजय आहे. नव्या सभागृहात महिलांना काम करण्याची मोठी संधी आहे. पण महिलांना खरोखर संधी मिळते का? हा संशोधनाचा विषय आहे. महिलांनी त्यांचे अधिकार समजून घेऊन फक्त प्रभागाचा विचार न करता शहराच्या विकासाचा​ विचार करण्याची मानसिकता ठेवली पाहिजे. सभागृहात कोणते प्रश्न मांडायचे, कसे मांडायचे याचे प्रशिक्षण होण्याची गरज आहे. सध्या महापालिकेत महासभेत एका प्रश्नाचे तीन हजार प्रश्न तयार होतात आणि फाटे फुटतात. त्यामुळे सभागृहाचा बराचसा वेळ वाया जातो. महापालिकेचे प्रशासन चालवताना वॉर्ड कमिटीला मोठे अधिकार आहेत. पण गेल्या पाच वर्षांत ही कमिटी स्थापन करण्यासाठी बळकट करण्यासाठी राजकीय नेते व प्रशासनाने प्रयत्न केले नाहीत. प्रत्येक प्रभागात १५ ते २० नगरसेवक, त्यांचे तीन प्रतिनिधींची नियुक्ती करावी लागते. प्रभागातील प्रश्न वॉर्ड समितीत सुटले तर सभागृहात शहराच्या प्रमुख प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. पण इथे मात्र वॉर्ड समितीचे काम होत नाही, पण वॉर्ड समितीच्या अधिकारातील चर्चा महासभेत होते हे दुर्दैव आहे. वॉर्ड समितीच्या कामात सुसूत्रता आल्यावर महासभेवरील ताण कमी होऊ शकतो. प्रशासनावर वचक ठेवता येतो. प्रशासनाकडून कामेही करू घेता येऊ शकते. महापालिकेतील नव्या सभागृहाने सांस्कृतिक व सामाजिक प्रश्नांवर नवीन उपक्रम घेण्याची गरज असते. सांस्कृतिक व सामाजिक जाण ही शहराची ओळख असते. पण महापालिका वर्षभरात फक्त एक व्याख्यानमाला आयोजित करून बोळवण करते. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी विश्वस्त म्हणून काम केले पाहिजे. पण नगरसेवक नेत्यांच्या भूमिकेत असतात. त्यांनी आपली भूमिका बदलण्याची गरज आहे.

- अॅड. प्रशांत चिटणीस,

उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन

वाहतूक, पार्किंग नियोजनाने विकासास गती

कोल्हापूर शहरात वाहनांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. दरवर्षी इथे नवीन ३० ते ४० हजार वाहने रस्त्यांवर येतात. गेल्या दहा वर्षांत तीन लाखांच्या आसपास नवीन वाहने येऊनही रस्त्यांची संख्या मर्यादित आहे. पार्किंगची ठिकाणेही कमी आहेत. गेल्या वीस वर्षांत अंबाबाई मंदिरास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. वाहतुकीचे नियोजन व पार्किंग ही शहरासमोरील महत्त्वाची समस्या आहे. शहरात वाहतुकीची शिस्त कशी आहे यावर शहराची प्रतिमा ठरली जाते, हे लक्षात घेऊन नव्या सभागृहाने उपाययोजना केली पाहिजे. दहा वर्षांत वाहनांची वाढ होऊनही वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी दहा लाखांची तरतूद करणे महापालिकेला जमलेले नाही. यापुढे प्रत्येक वर्षी वाहतूक नियोजनासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्याची गरज आहे. अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवात ४८ लाख भाविकांनी दर्शन घेतल्याची आकडेवारी उपलब्ध झाली आहे. चार लाख स्थानिक भाविक आहेत असे समजून घेतले तरी ४४ लाख भाविक आले होते हे लक्षात घेतले पाहिजे. पर्यटकांची वाहने व स्थानिक वाहने यांची संख्या लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे. पार्किंगच्या जागा निश्चित केल्या पाहिजेत. पुढील पाच ते दहा वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन नियोजन केले पाहिजे. शहरातील ए, बी, सी, डी, ई वॉर्डांसाठी वाहतुकीचे स्वतंत्र नियोजन करण्याची गरज आहे. उपनगरांत नव्याने भाजी मंडई व हॉकर्स न झाल्याने तेथील नागरिकांना महाद्वार रोडवर धाव घ्यावी लागते. त्यामुळे वाहतुकीचा ताण शहरावर पडतो. शहराला जोडणाऱ्या नऊ प्रमुख रस्त्यांवर मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीच्या कोंडीला तोंड द्यावे लागते. हे रस्ते प्रशस्त करण्यासाठी रस्ता रूंदीकरणासाठी नव्या सभागृहाने पावले उचलली पाहिजेत. शहरात अवजड वाहनांचे नियोजन करण्यासाठी शहराच्या बाहेर ट्रक टर्मिनन्स उभारण्याची गरज आहे. रंकाळा व संभाजीनगरातून शहरात एसटी बसेसच्या ८०० फेऱ्या होत्यात. ही वाहने शहरातील मुख्य व गर्दीच्या ठिकाणी येऊ नयेत यासाठी एसटीची बसस्थानके शहराबाहेर नेली पाहिजेत. सध्या शहरात पाच मीटरला एक रिक्षा उभी असते. त्याऐवजी १०० ते १५० मीटर अंतरावर नव्याने रिक्षा स्टॉप होण्याची गरज आहे.

- विनायक रेवणकर,

अभ्यासक, वाहतूक नियोजन

ग्रीन सिटी, आरोग्यसुविधांना हवा प्राधान्यक्रम

विकासाच्या नावाखाली शहरात सिमेंटचे जंगल वाढत आहे. परिणामी शहराच्या तापमानात भर पडत आहे. विकासकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते. शहरातील झाडे, वनस्पती नाहीशा झाल्याने त्याचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतो. झाडे, फुलझाडांअभावी शहर बकाल बनते. नव्या सभागृहातील प्रत्येक सदस्याने ग्रीन सिटी संकल्पना जोपासली पाहिजे. निवडून येण्यासाठी उमेदवार महिनाभराच्या कालावधीत ज्या ताकदीने यंत्रणा वापरतात, तरुणाईचा अवलंब करतात तीच शक्ती त्यांनी निवडून आल्यानंतर प्रभागाच्या विकासासाठी खर्ची करावी. प्रत्येक मंडळाला, भागाभागातील कार्यकर्त्यांना प्रभाग विकासाचा अजेंडा द्यावा. लोकांच्या सहभागातून कचरा उठाव, बगीच्यांची देखभाल, महापालिका शाळांचा विकास या गोष्टी साध्य करता येतात. त्यादृष्टीने नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ऑक्सिजन देऊ शकणाऱ्या वनस्पतींची लागवड केली तर ते आरोग्यासाठी उपकारक ठरेल.

आरोग्यविषयक सुविधांचा कृती आराखडा

महापालिकेने शहरवासीयांना माफक दरात अत्याधुनिक दर्जाच्या आरोग्यविषयक सुविधा देण्याचा कृती आराखडा तयार केला पाहिजे. दरवर्षी एका घटकावर लक्ष केंद्रित करून महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये त्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. अतिदक्षता विभाग, डायलेसिस युनिट, ऑर्थोपेडिक सेंटर, स्कॅनची सुविधा, अद्ययावत प्रसूतिगृह, हृदयशस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक मशिनरीज आ​णि स्टाफ अशा अनेक आरोग्यविषयक सुविधा टप्प्याटप्प्याने करता येतील. महापालिका हॉस्पिटलमध्ये या सुविधा निर्माण करून लोकांमध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे. आरोग्यविषयक सुविधा माफक दरात उपलब्ध केल्यास शहरवासीयांत विश्वास निर्माण होईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील नव्या संशोधनाचा, अत्याधुनिक सुविधांचा लाभ सामान्य, मध्यमवर्गीय लोकांना घेता येईल. उत्सव म्हणजे स्वतःचा आनंद अशी मानसिकता दृढ होत आहे. मात्र ध्वनी, वायू प्रदूषणामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडते. कर्णकर्कश आवाज, डॉल्बीचा धिंगाणा अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवकांनीच पुढाकार घेतला पाहिजे. विधायक कार्यासाठी ​पैशाचा विनियोग होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. नव्या सभागृहाने यासाठी पुढाकार घ्यावा.

- डॉ. आरती परुळेकर, कान, नाक, घसा तज्ज्ञ

उत्पन्नाचे नवे मार्ग शोधावे लागणार

सभागृहाने निश्चित केलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. जकात, एलबीटी बंद झाल्यामुळे उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. उत्पन्न कमी म्हणून सुविधा नाहीत आणि सुविधा कमी मिळतात म्हणून उत्पन्न वाढीत अडचणी हे चित्र बदलावे लागणार आहे. याकरिता आर्थिक शिस्त लावून घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने मावळत्या सभागृहापुढे महापालिकेचे महसुली ३५० कोटीचे व राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध प्रकल्पांचे ७५० कोटी मिळून ११०० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मांडले आहे. नव्या सभागृहातील सदस्यांच्या शहर विकासाच्या, पायाभूत सुविधांच्या, त्यासाठी आवश्यक निधी यासंदर्भात मोठ्या अपेक्षा असणार आहेत. प्रशासनाला पहिल्यांदा सभागृहापुढे महापालिकेचे उत्पन्न, उपलब्ध निधी आणि विकासकामासाठी केली जाणारी तरतूद हे नव्या सभागृहापुढे मांडावे लागणार आहे. महापालिकेला उत्पन्नाचे नवे मार्ग शोधावे लागणार आहेत. घरफाळा, पाणीपट्टी, नगररचना विभाग, व्यवसाय परवाना फी आणि दुकान गाळे हे सध्या महापालिकेचे उत्पन्नाचे पारंपरिक मार्ग आहेत. एक ऑगस्टपासून राज्य सरकारने एलबीटी रद्द केली आहे. त्याऐवजी अनुदान सुरू केले आहे. एलबीटीच्या माध्यमातून वर्षाला ११० कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले होते.

उत्पन्नाचे नवीन पर्याय

हद्दवाढीअभावी कोल्हापूर शहराच्या विस्ताराला मर्यादा पडत आहेत. शहराचा विस्तार नसल्याने त्याचा थेट फटका आर्थिक उत्पन्नाला बसत आहे. हक्काचा उत्पनाचा मार्ग बंद झाल्याने महापालिका आता नवे मार्ग शोधत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने होर्डिंग्ज पॉलिसी, पार्किंग पॉलिसी, सांडपाणी अधिभार, जादा बांधकामासाठी प्रीमियम पॉलिसी हे पर्याय स्वीकारले आहेत. सध्या घरफाळा विभागाकडून वर्षाला ४२ कोटी रुपये, पाणीपुरवठा विभागाकडून ४८ कोटी आणि नगररचना विभागाकडून ५२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. बांधकाम परवाना मिळणाऱ्या उत्पन्नातून ठराविक टक्के निधी 'विकास निधी' म्हणून राखून ठेवला जातो. त्या माध्यमातून शहरातील विकास प्रकल्पांवर, प्रकल्पात महापालिकेने करावयाच्या गुंतवणुकीवर खर्च केला जातो. महापालिकेच्या आस्थापन आणि वेतनावर होणारा खर्च १६७ कोटी रुपयांपर्यंत आहे. उत्पन्नवाढीसाठी नव्या पर्यायाचा अवलंब केला जात आहे.

- संजय सरनाईक,

मुख्य लेखापाल, महापालिका

'राऊंड टेबल'मध्ये उमटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हान भेसळ रोखण्याचे

$
0
0

अनेकांकडून रवा, खाद्य तेल, मिठाईमध्ये भेसळ

satish.ghatage

@timesgroup.com

दिवाळी सणात ग्राहकांच्या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन व्यापारी व दुकानदार मंडळी भेसळ करत असल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून फक्त नमुने घेण्याचे काम सुरू असून या नमुन्याचा अहवाल दिवाळीनंतर येणार असल्याने ग्राहकांच्या जीवाशी खेळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. बाजारात दुकानासमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. चांगल्या मालात भेसळ करून ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार सुरू आहेत. रवा, खाद्य तेल, खवा, मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू आहे. अनेक व्यापाऱ्यांनी मुदत संपलेल्या अन्नधान्य पदार्थांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मार्केट यार्ड येथील चणाडाळ व तांदळाच्या मुदत संपलेल्या मालाच्या साठ्यावर कारवाई केली. ही कारवाई हिमनगाचे एक टोक असल्याची चर्चा सुरू आहे. मुदत संपलेला माल नव्याने आलेल्या मालात मिसळला जात आहे. ५० किलो अन्नधान्यामध्ये पाच ते सहा किलो कमी दर्जाचे अन्नधान्य मिसळून ग्राहकांच्या माथी मारत आहेत. खोबऱ्याच्या वाट्या काळ्या दिसाव्यात म्हणून रंगवल्या जात आहेत. रव्यामध्ये मक्याचा रवा मिसळला जात आहे. शेंगतेलात स्वस्त दराचे तेल मिसळले जात आहे. एकीकडे ग्राहकांनी पॅकबंद खाद्यतेल खरेदी करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन करत असले तरी दुसरीकडे लूज खाद्यतेलाची विक्री जोरात सुरू आहे. लूज खाद्यतेल खरेदी केल्यावर दुकानदारांकडून पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात प्रशासन धन्यता मानत आहे.

फराळ व मिठाईमध्ये बनावट खव्याचा वापर केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूरच्या आसपास मुबलक खवा उपलब्ध असल्याने बनावट खव्याचा वापर होत नसल्याचा दावा दुकानदारांकडून केला जात आहे. फराळाचे पदार्थ तुपातील व रिफाईंड तेलातील आहेत अशी जाहिरात केली जात आहे. पण तेलातील पदार्थ ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत.

फराळाचे पदार्थ उघड्यावर विकले जात असतानाही अन्न व औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुकानात नियमित स्वच्छता ठेवावी.

दुकानात कीटकनाशक प्रतिबंधक यंत्रणेची व्यवस्था करावी.

अन्न पदार्थांसाठी वापरली जाणारी भांडी व ट्रे स्वच्छ व कोरडे असावेत.

मिठाईचे रिकामे बॉक्स व पॅकेट्स स्वच्छ जागेत ठेवावेत.

मिठाई हाताळणाऱ्या नोकरांनी सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत.

नोकरांना पूर्ण केस झाकले जातील अशा टोप्या व हातमोजे पुरवावेत.

फरशी साफ करण्यासाठी फिनेलचा वापर करावा.

झाकणासह कचराकुंडी दुकानाच्या बाहेर ठेवावी. दिवसातून दोन-वेळा ती रिकामी करावी.

नाशवंत पदार्थ आवश्यक तापमानात फ्रीजमध्ये ठेवावेत.

मुदतबाह्य, शिळे अन्न पदार्थ साठवू नयेत. भेसळ रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील निरीक्षक अन्नधान्य व मिठाईचे नमुने घेत आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येत आहे. प्रयोगशाळेतील अहवालानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल. भेसळीबाबत काही तक्रार असल्यास ग्राहकांनी मोबाइल क्र. ७७२०००२१७५ व ९७६४२२१२६१ वर संपर्क साधावा.

-एस. ए. चौगुले, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाचे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरेदीचा उत्साह वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीच्या उत्साहाबरोबरच खरेदीचाही उत्साह वाढल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे. कपडे, वाहन, फर्निचर यांसह गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठा ग्राहकांनी भरून गेल्या आहेत. दुकाने, मॉल्स आणि शोरुम्स सजली असून, खरेदीदारांची गर्दी वाढली आहे, तर महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरीतही खरेदीला उधाण आले आहे.

पगारानंतरच्या पहिल्या आठवड्यातच दिवाळी आल्याने दिवाळी खरेदीचा उत्साह वाढला आहे. यातच अनेकांची भिशी फुटली आहे तर कर्मचाऱ्यांचे बोनसही मिळाल्याने बाजारपेठांत खरेदीसाठी गर्दी झाली आहे. दिवाळीचा आनंद वाढणारी महत्त्वाची खरेदी म्हणजे कपडे खरेदी. ब्रँडेड कपडे खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी राजारामपुरीतील कपड्यांच्या दुकानांना पसंती दिली आहे. अनेक मोठ्या ब्रँड्सच्या शोरुम्स ग्राहकांच्या गर्दीने फुलले आहेत. रस्त्यावरच्या खरेदीसाठी महाद्वार रोड सर्वांनाच सोयीचा असल्याने शुक्रवारपासूनच या ठिकाणी प्रचंड गर्दी वाढली आहे. कपड्यांसह रांगोळी, पणत्या, आकाशकंदिलांनी अख्खा महाद्वार रोड गजबजला आहे. मोठ्या प्रमाणात लोक सहकुटुंब खरेदीचा आनंद घेण्यासाठी महाद्वार रोडवर गर्दी करीत आहेत.

वाहन क्षेत्राला दिवाळी म्हणजे विक्रीसाठी मोठी संधी असते. हीच संधी साधण्यासाठी शहरातील आणि शहराबाहेरील सर्व वाहन कंपन्यांची शोरुम्स सज्ज झाली आहेत. कोल्हापूर शहरात मोठ्या ब्रँड्सच्या गाड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे याहीवेळी वाहन उद्योगातील मोठ्या कंपन्यांच्या शोरुम्समध्ये खरेदीची धूम सुरू असलेली दिसत आहे. दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी वाहनांचे बुकिंग करण्यासही मोठी गर्दी आहे. अनेक शोरुम्सनी शहरातील मोक्याच्या जागांवर पेन्डॉल तयार करून ग्राहकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न केले आहेत. ग्राहकांसाठी अनेक फेस्टिव्हल ऑफरही उपलब्ध असल्याने विक्रीला प्रतिसाद मिळत आहे. दिवाळीच्या निमित्ताने वाहन क्षेत्रात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. ग्रा‌हकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत असल्याने शोरुम्समालकही आनंदात आहेत.

गृहोपयोगी वस्तूंमध्ये टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, एसी यांसह फर्निचर खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. सध्या मार्केटमध्ये आधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त असे आकर्षक टीव्ही संच उपलब्घ आहेत, त्यामुळे जुने टीव्ही देऊन नवीन टीव्ही संच खरेदीसाठी मोठा प्रतिसाद असल्याचे विक्रेते सांगतात. गेल्या काही दिवसांपासून काहिसे थंड असलेले गृहप्रकल्पांचे मार्केटही दिवाळीच्या मुहुर्तावर उसळी घेईल, असा तज्ञांच अंदाज आहे. गृहप्रकल्पांची विचारपूस आणि बुकिंगसाठीही गर्दी वाढू लागली आहे. सोन्याचे दर सध्या स्थिर असल्याने खरेदीला प्रतिसाद वाढणार आहे. खरेदीच्या उत्साहने कोट्यवधींची उलाढाल होत असल्याने बाजारपेठेत सध्या चैतन्याचे वातावरण दिसत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदाचा निर्णय मंगळवारी

$
0
0

कोल्हापूर ः महापालिकेत राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीची संयुक्त सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र याला आमदार हसन मुश्रीफ यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षप्रमुखांनी सोमवारी त्यांना मुंबईला बोलावले आहे. दरम्यान, अशी आघाडी झाल्यास महापौर व उपमहापौर ही पदे राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव ताराराणी आघाडीने दिल्याचे समजते. मंगळवारी महापौरपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहे.

महापालिकेत राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीची संयुक्त सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र याला आमदार हसन मुश्रीफ यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षप्रमुखांनी सोमवारी त्यांना मुंबईला बोलवले आहे. दरम्यान, अशी आघाडी झाल्यास महापौर व उपमहापौर ही दोन्ही पदे राष्ट्रवादीला देण्याचा प्रस्ताव ताराराणी आघाडीने दिल्याचे समजते. मंगळवारी महापौरपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहे. या दिवशीच नवी सत्ता कुणाची येणार हे स्पष्ट होणार आहे.

महापालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. पदवाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे, पण काँग्रसला रोखण्यासाठी भाजप व ताराराणी आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. ताराराणी आघाडीबरोबर सत्ता स्थापन करण्यास मुश्रीफ तयार नाहीत. असे झाल्यास पक्षाचे नुकसान होणार असल्याची ​भीती आहे, पण राज्यात भाजप व राष्ट्रवादीची सलगी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय नेत्यांनी राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीच्या संयुक्त सत्ता स्थापनेला संमती दिल्याचे समजते, पण मुश्रीफ यांनी त्याला टोकाचा विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी मुश्रीफांना मुंबईला बोलावले आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार व अजित पवार यांच्याशी चर्चा होणार आहे. मुश्रीफांची समजूत काढण्याचे जोरदार प्रयत्न राज्यस्तरीय नेत्याकडून सुरू आहेत. आदेश देण्याऐवजी समजूत काढण्यावर या नेत्यांनी भर दिल्याचे समजते.

दोन्ही काँग्रेसच्या आघाडीत महापौरपद काँग्रेसला तर उपमहापौरपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. पाच वर्षांत कोणत्या पक्षाला कोणते पद द्यायचे याचे वाटप झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला महापौरपद देण्याचा प्रस्ताव ताराराणी आघाडीने दिल्याचे समजते. या दोन्ही पक्षाची आघाडी व्हावी यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी राज्यपातळीवरील अनेक नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरला द्यायचीय गोपनीय माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित, सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाडला कोर्टाला गोपनीय माहिती द्यायची असल्याने त्यांना हजर करावे, अशी मागणी समीरच्या वकिलांनी कोर्टात केली. दरम्यान, समीरच्या वकिलांच्या मागणीवर १७ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. तसेच्या त्याच्या न्यायालयीन कोठडीत २१ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

समीरच्या न्यायालयीन कोठडीची सुनावणी शनिवारी दुपारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर झाली. यावेळी समीरचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज दिला. शनिवारी सकाळी इचलकरंजीकर यांनी कळंबा कारागृहात समीरची भेट घेतली. यावेळी समीरने कोर्टापुढे काही सांगायचे असल्याचे सांगितल्याचे इचलकरंजीकर यांनी कोर्टाला सांगितले. त्यासाठी समीरला कोर्टात हजर करावे, अशी मागणी केली, पण बंदोबस्त नसल्याने समीरला कोर्टात हजर करता आले नाही. या संदर्भात सरकारी पक्षाला म्हणणे मांडण्यासाठी तारीख द्यावी, अशी विनंती विशेष सरकारी अभियोक्ता चंद्रकांत बुधले यांनी केली. त्यानंतर न्यायदंडाधिकारी डांगे या संदर्भात १७ नोव्हेंबरला सुनावणी होईल, असे सांगितले. समीरने आपले म्हणणे व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे मांडावे, असेही स्पष्ट केले.

दरम्यान व्हिडिओ कॉन्सरन्सची सुनावणी दिवाणी न्यायाधीश सुनीलजीत द. पाटील यांच्यासमोर होणार असल्याचे न्यायदंडाधिकारी डांगे यांनी सांगितले. व्हिडिओ कॉन्फरन्स रूममध्ये सुनावणीसाठी कळंबा कारागृहाशी सुमारे सव्वा तास संपर्क सुरू होता, पण तांत्रिक कारणाने सुनावणी होऊ न शकल्याने न्यायाधीश पाटील यांनी समीरच्या न्यायालयीन कोठडीत २१ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घनसाळचा वास दरवळणार

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, आजरा

सर्वोत्कृष्ट चव व सुवासामुळे खवय्यांच्या मनात घर केलेल्या आजरा घनसाळचे एकरी सरासरी उत्पादन यावर्षी किंचितसे घटणार असले तरी एकरी ४०-४५ क्विंटल उत्पादन शक्य आहे. यावर्षी अडीचशे एकरात घनसाळ रोपलावण झाली आहे. तालुक्याला कमी पावसाचा तडाखा बसला असला तरी पावसाच्या व पाणीस्त्रोतांच्या परिसरातच घनसाळ लावण होत असल्याने प्रमाणे पावसाच्या कमी पर्जन्यमानापासून घनसाळ वाचला आहे. यावर्षी घनसाळला भौगोलिक निर्देशांक मिळविण्याचे प्रयत्न झाले. मात्र त्यावेळी सादर करण्यात आलेल्या घनसाळच्या वैशिष्ठ्यपूर्ण गुणधर्मांनी युक्त बियाणे काढण्याचा प्रयत्न येथील शंभर एकरावर झाला आहे. तेथील बियाणे हे अस्सल बियाणे असेल, ज्याचा विस्तार पुढील वर्षी तालुक्यातील इतर परिसरातही होणार असल्याचे मत आजरा कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

आजऱ्याचा सुप्रसिद्ध घनसाळ पिकविण्यासाठीचे पर्याप्त हवामान व पाऊस येथील पश्चिम विभागात आहे. इतर भातपिकांपेक्षा घनसाळ गरवा भातपिक (जास्त कालवधी घेणारा) असला तरी येथील पर्जन्यमान त्यास पोषक ठरते. विशेषत: चित्री आणि हिरण्यकेशी नद्यांच्या खोऱ्यातील जमिनीत घनसाळ पारंपारिक पद्धतीने घेण्यात येत असतो. मात्र यावर्षी अत्यंत निचांकी पर्जन्यमान तालुक्यात राहिल्याने घनसाळ उत्पादक थोडे चिंताग्रस्त होते. धूळवाफेच्या भातशेतीप्रमाणे रोपलावण उत्पादनही घटण्याची अटकळ होती. अशातच काही रोग-किडींचा प्रादुर्भावही घनसाळवर झाला होता. मात्र वेळीच उपाययोजना झाल्याने सरासरी ४-५ टक्के घट वगळता घनसाळ मुबलक होईल. विशेष म्हणजे यावेळी जीआयच्या बियाण्यांसाठी चित्रीच्या खोऱ्यातील लाटगाव, पोळगाव, मसोली, हाळोली, जेऊर, चितळे परिसरात यावर्षी कृषी विभागाच्या देखरेखीखाली केलेल्या १०० एकरी प्रकल्पामध्ये अस्सल घनसाळचे सुमारे अडीच हजार क्विंटल उत्पादन मिळणार आहे.

तालुक्यातील शेतीमाल कंपनीद्वारे याचे वितरण करीत तालुक्यातील साधरणत: घनसाळयोग्य ३५० एकर क्षेत्रात पुढील वर्षी अस्सल घनसाळ घेण्याचे नियोजन आहे. तालुक्यात जीआयसाठीचा प्रकल्प वगळता उर्वरीत सुमारे दीडशे एकर क्षेत्रामध्येही घनसाळ पिकविला जातो. पण हे उत्पादन पारंपारिक पध्दतीने घेतल्यामुळे त्यात सरमिसळता असते. या क्षेत्रामध्येही पावणे चार हजार क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षात महोत्सवांतून विकण्यात आलेल्या आणि खवैय्यांच्या पंसंतीस उतरलेल्या घनसाळला चढा दर मिळतो आहे. गेल्यावर्षी साडेतीन हजार रूपये प्रतिक्विंटल भातदर मिळाला होता. यावेळी किमान तेवढा गृहीत धरल्यास १ लाख ५७ हजार रूपये मिळू शकतात. इतर भातपिकांच्या दरापेक्षा हा दर दुप्पट आहे. पण योग्य वातावरण व पाऊस गरजेचा असल्याने तालुक्याचे मुक्य पिक बात असले तरी घनसाळ उत्पादनाला मर्यादा येतात. पण जेथे शक्य आहे तेथे याचे उत्पादन गेण्याचे नियोजन पुढील वर्षी होईल. -श्रीकांत निकम, तालुका कृषी अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा पात्रात स्वच्छता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

पंचगंगा नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत जाणारा कचरा आणि उथळ बनलेल्या पात्रामुळे नदीतील पाणी दुषित होऊन मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. हे नदीपात्र मोठे करण्यासाठी स्वच्छ मोहीम मंगळवारपासून विविध सामाजिक संघटनांच्यावतीने लोकसहभाग आणि पालिका प्रशासनाच्या सहकार्याने हाती घेण्यात आली. पहिल्याच दिवशी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भविष्यकाळातही ही मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवण्यात येणार असून नागरिकांनीही त्यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. तर अद्यापही ज्या मंडळांचे श्री मूर्तींचे पाट व दोरी याठिकाणी ठेवलेली आहे. त्या त्या संबंधित मंडळांनी तातडीने ते घेऊन जावे. अन्यथा पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

इचलकरंजीची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी विविध कारणांनी प्रदुषित बनली आहे. त्यामुळे या नदीतील पाण्याचा पिण्यासाठी वापर करता येत नाही. तर प्रदुषणास जबाबदार घटकांवरही केवळ कागदोपत्रीच कारवाई केली जात असल्याने पंचगंगा नदी अत्यंत दुषित बनली आहे. त्यामुळे इचलकरंजी नागरिक मंच, इचलकरंजी तालीम संघ, राजू आलासे युवा मंच, इचलकरंजी नगरपालिका कर्मचारी यांच्यावतीने मंगळवारी स्वछता मोहीम सुरु करण्यात आली.

या मोहिमेअंतर्गत नदीपात्रात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती तसेच दुर्गामाता मूर्ती काढून त्या एकत्र करुन त्यांचे शहापुर खणीत विसर्जन करण्यात आले. त्याचबरोबर नदीपत्रातील वेगवेगळा कचरा, प्लास्टिक आदीची साफसफाई करण्यात आली. सदर मोहिमेत उपनगराध्यक्ष रणजित जाधव, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, नगरसेवक मोहन कुंभार संतोष शेळके, आयजीएमचे आरोग्याधिकारी डॉ. श्रीकांत सुर्यवंशी, नागरिक मंचचे अभिजित पटवा, प्रदीप सुतार उमेश पाटील, अमित बियानी, राजू नदाफ, शितल मगदुम, चिदानंद कोटगी, दीपक लाटणे, प्रसाद दामले, इराण्णा सिंहासने, जीवंधर नवले ,उत्कर्ष सुर्यवंशी, इचलकरंजी तालीम संघाचे पै. अमृत भोसले व त्यांचे सर्व सहकारी, नगरपरिषदेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नदीचे पात्र उथळ बनल्याने पाण्याचा योग्यरितीने विसर्ग होण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनोहरगडाचे उलगडले अंतरंग

$
0
0

satish.ghatage@timesgroup.com

कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मनोहर गडासंबधी मोडी लिपीतील कागदपत्रे उजेडात आल्यानंतर या गडासंबंधीची नवी माहिती समोर आली आहे. करवीर संस्थानातील मोडी भाषेतील कागदपत्रांचा अभ्यास करत असताना गडांच्या दरवाजांची नावे, सैनिक, रसद व तलावाची माहिती पुढे आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीमध्ये गडकोटांना अतिशय महत्त्व होते. आंबोलीपासून २० किलोमीटर अंतरावरील मनोहर गड आहे. या गडाला मनोहर संतोष गड असे म्हणले जाते. पण मनोहर गड व संतोष नावाचा डोंगर असे वेगवेगळे परिसर आहेत. शिवाजी महाराज आग्य्राहून सुखरूप सुटून आल्यानंतर विश्रांतीसाठी मनोहर गडावर राहिले होते. त्यानंतर ते राजगडावर गेले होते असा उल्लेख अनेक इतिहासाच्या पुस्तकात उपलब्ध आहे. या माहिती व्यतिरिक्त संतोष गडासंबधी कोणतीच माहिती उपलब्ध नव्हती.

दुर्गप्रेमी व मोडी भाषेचे अभ्यासक अमित आडसुळे यांनी करवीर संस्थानातील मोडी भाषेतील कागदपत्रांचा अभ्यास करताना त्यांना मनोहर गडासंबधीची माहिती मिळाली. मनोहर गडाला दोन दरवाजे होते. बिनी दरवाजा व सर दरवाजा अशी नावे होती असे १८१८ च्या कागदपत्रात उल्लेख आहे. मनोहर गडावर १८२७ मध्ये गडावर त्याच्या खालील चौक्यांवर जे पहारेकरी होते त्यांच्या संख्येचा उल्लेख कागदपत्रात आहे. सर दवाजावर १३, बिनी दरवाजावर ८ सैनिकांची नेमणूक केली होती. तसेच अश्वारूढ दोन सैनिक, बारगीर, तटकरी, मेटकरी, नौबती यांची नियुक्ती होती. मनोहर गडाला लागून असलेल्या सुळका म्हणजेच संतोष गडावर १४ सैनिक होते. दोन्ही गडावर २६४ सैनिक सरंक्षणासाठी होते.

मनोहर गडास छत्रपतीकडून १८२७ मधये दारूगोळा पाठवण्यात आला होता. त्यामध्ये तोफेचे १०० गोळे, तीन हत्यारे, १५५० बंदुकीच्या गोळ्या, गंधक, बंदुकीची दारू असे साहित्य पाठवण्यात आले होते. बावडा दप्तरात यापूर्वी मनोहर गडासंबधीची कागदपत्रे यापूर्वीच प्रकाशित झाली आहेत. बावडा दप्तर कागदपत्रांच्या पुस्तकामध्ये १६७१ मधील शिवाजीमहाराजांचे अस्सल पत्र प्रकाशित करण्यात आले आहे. या पत्रामध्ये किल्ले बांधणी व दुरूस्तीसाठी खर्च केला होता. मनोहर गडास एक हजार रूपये शिवाजी महाराजांनी दिले होते असा उल्लेख आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लवादाचा मुहूर्त दिवाळीनंतर

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघ आणि अहमदाबाद येथील होम केअर रिटेल मार्टच्या 'मॅग्नेट' व्यवस्थापनातील वाद संपुष्टात आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामार्फत लवाद नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवादासाठी निवृत्त न्यायाधीश पात्रता आवश्यक असल्याने संघाच्यावतीने पी. एन. हेब्बाळकर आणि भरत जगताप यांची नावे दिली आहेत. दिवाळीनंतर या दोन्हीपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊन लवादाच्या कामाला सुरुवात होणार आहे. मॅग्नेट कंपनीकडे चार कोटी ८५ लाख रुपयांची थकबाकी आहे. लवादाच्या निर्णयानंतर थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहील.

शेतकरी संघाला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी संघाच्या मुख्य इमारतीमधील तळमजला मासिक पाच लाख रुपये भाडेतत्वावर होम कोअर रिटेलच्या मॅग्नेट व्यवस्थापनाला दिला होता. त्यांच्याकडून एक कोटी ११ लाख रुपये अनामत घेतली होती. मात्र, मॅग्नेट व्यवस्थापनाने संघाला कोणतीही पूर्वकल्पना न देता सहा महिन्यांत बोजा गुंडळला. मात्र संघाने मॅग्नेटविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने कोल्हापूर जिल्ह्यातील निवृत्त न्यायाधिशांची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २०१२ मध्ये के. डी. पाटील यांची नियुक्ती केली होती. पाटील संघाचे सभासद असल्याने मॅग्नेट व्यवस्थापनाने हरकत घेतली होती. त्यामुळे पाटील यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला. नंतर श्रीकांत कुलकर्णी यांची नियुक्ती केली. लवादाच्यावतीने कामकाजाला सुरुवात होऊन अंतिम टप्प्यापर्यंत सुनावणी आली होती. त्याचदरम्यान कुलकर्णी यांचे निधन झाले. त्यानंतर लवाद नेमणुकीसाठी विविध कारणाने विलंब झाला. सप्टेंबरमध्ये संघाच्या निवडणुकीची धामधुम सुरू असताना संघाच्या व्यवस्थापनाने पुन्हा लवाद नेमणुकीसाठी हालचाली सुरू केल्या. त्यासाठी संघाने निवृत्त न्यायाधीश पी. एन. हेब्बाळकर व भरत जगताप यांची नावे सादर केली. दिवाळी सुटीनंतर या दोनपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होऊन कामकाजाला सुरुवात होणार आहे. लवादाची नेमणूक झाल्यानंतर सुनावणी प्रक्रिया त्वरीत होण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे शेतकरी संघ आणि मॅग्नेट कंपनीतील वाद लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्याची वाईट अवस्था

$
0
0


Sagar.Yadav@timesgroup.com

कोल्हापूर : कोल्हापूरच्या ऐतिहासिक सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या रंकाळा तलावाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. महापालिकेकडून तलावाच्या जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे वास्तव आहे. ऐतिहासिक तटबंदीवरील दगड निखळून पडत आहेत. याशिवाय अनेक दगड हुल्लडबाजांनी पाण्यात ढकलून दिले आहेत. तर काहींनी तलावाच्या तटबंदीचे दगड स्वत:च्या दारात नेऊन ठेवले आहेत.

महापालिकेचे तत्कालीन प्रशासक द्वारकानाथ कपूर यांच्या कार्यकाळात रंकाळा तलावाला चौपाटीची किनार देण्यात आली. त्यामुळे रंकाळ्याच्या सौंदर्यात भर पडली. राजर्षी शाहूकालीन शालिनी पॅलेसच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या चौपाटीवर बगीचा निर्माण केल्याने रंकाळा तलाव पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला. कारंजे, विद्युत दिवे, पदपथ उद्यान आदी गोष्टी निर्माण करून रंकाळा तलाव पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले. तलावाभोवती लोकवस्ती झाल्याने तलावासभोवती पूर्वीपासून असणारे नैसर्गिक स्त्रोत बंद झाले. त्याऐवजी लोकवस्तीकडून तलावाकडे प्रदूषित पाण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे रंकाळा तलावाला जलपर्णींचा विळखा वाढला. अनेक वर्षे रंकाळा तलावाचे सौंदर्य जलपर्णीच्या दलदलीखाली लपले होते. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून जलपर्णीपासून रंकाळा तलावाची काहीशी मुक्तता झाली.

दुसरीकडे तलावाच्या डागडुजीसाठी कोणत्याही विशेष उपायोजना आणि कायमस्वरुपी भरघोस निधी उपलब्ध नसल्याने त्याच्या तटबंदीची वारंवार पडझड होत आहे. ऐतिहासिक तटबंदीचे सौंदर्य वाढविणारे एकएक दगड निखळून पडले. अनेक दगड हुल्लडबाजांनी जाणून-बूजून पाण्यात ढकलून दिले. एवढेच नव्हे तर अनेकांनी तलावाच्या तटबंदीचे दगड स्वत:च्या दारात नेऊन ठेवले. जनावरांबरोबरच वाहने धुणे, भांडी व कपड्यांच्या धुलाई यासारख्या गोष्टींमुळे रंकाळा तलावात प्रदूषित गोष्टींची भरच पडत गेली. पाण्याचा रंग बदलण्याबरोबरच दुर्गंधी सुटण्याचे प्रकारही वारंवार होत आहेत. मात्र तलावाच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून होत नसल्याचे वास्तव आहे.

........

१८७७ च्या सुमारास रंकाळा तलावाच्या बांधणीस सुरुवात झाली. सुमारे सहा वर्षांच्या कालावधीनंतर १८८३ च्या सुमारास रंकाळा तालावाला चिरेबंद दगडाच्या भक्कम तटबंदीने बंदीस्त करण्यात आले. आकर्षक स्थापत्य कलेचा वापर करून तटबंदी बरोबरच टॉवर, कमानी, पायऱ्यांसह, डोमची बांधणी काळ्याकुट्ट दगडाच्या सहाय्याने करण्यात आली. करवीर छत्रपती घराण्यातील चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकीर्दीत तलावाचे सौंदर्य खुलले. जयसिंगराव आबासाहेब घाटगे (कागलकर) यांच्या मार्गदर्शनाखाली हे बांधकाम करण्यात आले. या कामासाठी त्याकाळी २ लाख ५२ हजार खर्च करण्यात आले.

.........

शहरातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतन संवर्धन आणि संरक्षणासाठी उपाय योजना म्हणून महापालिकेच्यावतीने वारसा स्थळांची यादी (हेरिटेज) तयार केली होती. यात सुमारे ६० वास्तूंचा समावेश आहे. ऐतिहासिक महत्वानुसार त्यांची विभागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्यांच्या जतनासाठी प्रयत्न होणार होता. या यादीत रंकाळा तलावाचाही समावेश आहे. मात्र केवळ यादी पलिकडे कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून किरणोत्सव

$
0
0

कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील यावर्षीच्या दुसऱ्या पर्वातील किरणोत्सवाला सोमवार (ता.९) पासून सुरूवात होणार आहे. ९ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत हा किरणोत्सव सोहळा होतो.

पहिल्या दिवशी मूर्तीच्या चरणांवर मावळतीची सूर्यकिरणे पडतात. दुसऱ्यादिवशी पोटावर तर तिसऱ्या दिवशी मूर्तीच्या मुखावर सूर्यास्ताच्या किरणांचा अभिषेक होतो अशी या किरणोत्सवाची प्रक्रिया आहे. किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी स्थानिक भाविकांसह पर्यटक भाविकांचीही गर्दी होते. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीच्यावतीने तयारी करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टस्करामुळे मळण्या बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

पंधरवड्यापूर्वी आजरा तालुक्यात अवतरलेल्या टस्कराची दहशत तालुक्याच्या पश्चिम भागामधील शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. मसोली, हाळोली व खानापूरच्या जंगल परिसरात वास्तव्य असलेला हा टस्कर शेतीवाडीत कधी उतरेल याचा नेम नाही. सायंकाळ झाली की जंगलातून खाली उतरणे आणि शेतातील उभी पिके फस्त करण्याबरोबरच लोळण घेत नासधूस करण्याचे सत्रच हत्तीने आरंभले आहे. टस्कराच्या या कृत्याची धास्ती घेऊन शेतकरी सायंकाळच्या आधीच शेतातून खाली उतरू लागला आहे. भातकापणीचा हंगाम सुरू असला तरी रात्री होणाऱ्या भातपिकांच्या मळण्या बंद करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मसोली नजीक मिलाग्रीन नावच्या शेतात उतरणाऱ्या टस्कराने दरवर्षीप्रमाणे येथील एम. आर. कांबळेंच्या शेतातील भातपिकाचे अतोनात नुकसान केले आहे.

गेले पाच-सहा दिवस या परिसरातून सायंकाळनंतर टस्कर बिनधास्तपने वावरू लागला आहे. भातकापणीचा हंगाम भरात आलेला असताना कापलेले भात मळण्यासाठीही शेतकऱ्याला धास्ती पडत आहे. पावसाअभावी पिकाचे मोठे नुकासान झाले आहे. त्यामुळे जे काही थोडेफार हातात आलेले पीक हाता मळून घरात येणे दुरापास्त झाले आहे. खानापूर-मसोली दरम्यानच्या पोलिसाची तळी नावाच्या परिसरात त्याचा वावर वाढला आहे. सकाळपर्यंत पिकाचे नुकसान करीत नंतर भरपिकाच्या शेतात मनसोक्तपणे लोळण घेताना या टस्कराला अनेक ग्रामस्थांनी पाहिले आहे. रात्रभराच्या टस्कराच्या मुक्कामांमुळे शेतकरी परिसराकडे न जाणेच पसंत करीत आहेत. हत्तीने लोळण गेतलेल्या व तुडविलेल्या शेतातील भातपिक पूर्णत: जमिनदोस्त होत असल्याने शेतकऱ्याच्या तोंडचा घासच हरवत चालला आहे. हतबल शेतकऱ्याला धीर देण्याचेच काम वनविभाग करीत असला तरी टस्कराला हुसकावून लावण्याचीच मागणी शेतकरी करीत आहेत.

एम. आर. कांबळेंच्या शेतात नित्यनेमाने टस्कर येत राहिला आहे. आतापर्यंत खंडाने शेती कसणाऱ्या कांबळेंच्या २५-३० वाफ्यातील भातपिकाचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. घनसाळ पिकाचा काढणीचा कालावधी इतरांपेक्षा अधिक आहे. या परिसरातील घनसाळ पीक अद्याप पंधरा-वीस दिवसानंतर कापणीला येईल. सध्या पक्वतेच्या उंबरठ्यावरील घनसाळ पिकाचे टस्कर नुकसान करीत आहे. कांबळेंबरोबरच नजिकच्या तुकाराम जानू गुरव व जानबा गुरव यांच्या भातपिकांचे काही झाडांचे नुकसान टस्कराने केले आहे.

हत्ती जेरबंदीस विलंब का?

आजरा आणि चंदगड तालुक्यातील टस्करास जेरबंद करण्याबाबत सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. वनविभागाकडूनच ही माहिती महिनाभरापूर्वी देण्यात आली आहे. ऐन सुगीत हत्तींकडून होणारे नुकसान पाहिल्यास जेरबंदीच्या मोहिमेस होणारा विलंब समजण्यापरिकडचा आहे. आणखी किती नुकसान झाल्यावर ही कारवाई करण्यात येणार अशी उद्वीग्न प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीने शेतकरी त्रस्त

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, चंदगड

सध्या तालुक्यात सर्वत्र सुगीची धांदल सुरु आहे. लांबलेला पाऊस आणि मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी पिचला जात आहे. एरवी घरामध्ये बसून असलेल्या व्यक्तीही सुगी हंगामात आलेली धान्य घरात आणण्यासाठी मदत करत असल्याचे चित्र आहे. शेतकरी अडल्यामुळे चढ्या भावाने मजुर घेऊन सुगी आटोपण्याचा खटाटोप करत आहेत.

यंदा पावसाने ओढ दिली असली तरी, ओढे, नदी आणि ओहोळांच्या पाण्यावर पिके जगविली आहेत. आता मात्र, अवकाळी पाऊसामुळे हातातोंडाशी आलेली पिकेही जमिनदोस्त होत आहेत. त्यामुळे मिळेल त्या मजुरीला घेऊन सुगीचे धान्य एकत्र करण्यात शेतकरी वर्ग गुंतला आला. धान्याची वेळेत कापणी व मळणी न झाल्यास उत्पादनात घट होत असल्याने मजुरांना भलतेच महत्त्व आले आहे. सकाळी बाहेर पडलेला शेतकरी रात्री साडेसात ते आठच्या सुमारास घरात येत आहे. सध्या तालुक्यात भात कापणी व भुईमूग काढणीची कामे जोरात सुरु आहेत. शाळांना दिवाळीची सुटी असल्याने घरातील शाळेला जाणारी मुलेही कामाला मिळत असल्याने मदत होत आहे. सुटीनंतर शाळेला जाताना घरातून नवीन कपडे मिळणार या आशेने कामाला लागली आहेत. जीवाचा आटापिटा करुन एकदाची सुगी आटोपण्यात शेतकरी वर्ग गुंतला आहे. तालुक्याच्या पूर्वी भागात लागवडीखालील क्षेत्र मोठे असल्याने गटा-गटाने लोक एकमेकांच्या शेतातील कामे आटोपण्यासाठी मदत करत आहेत.

एकाच्या शेतातील शेतीची कामे संपल्यानंतर तोच गट पुन्हा गटातील दुसऱ्यांच्या शेतामध्ये जात आहे. खेड्या-पाड्यातील गावामधील गल्लीमध्ये दुपारच्या वेळी वयस्कर व लहान मुलेच गावात असतात. कार्तिकी एकादशी जवळ आल्याने अनेकांची सुगी संपवण्याची धांदल सुरू आहे. काहीजण सुगीची जबाबदारी घरच्यावर सोपवून पंढरपूरला रवाना होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुळाचे गणित बिघडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उत्पादन खर्चापेक्षा दर कमी मिळत असल्याने गूळ उत्पादकांचे गणित जमेना झाले आहे. पंधार दिवसांपूर्वी सुरू झालेल्या गूळ सौद्यामध्ये सरासरी दोन हजार ७०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत असल्याने गुऱ्हाळ घरे कशी चालवायची अशा प्रश्न निर्माण झाला आहे. कोल्हापुरी गुळाने गुजरातमध्ये काबीज केलेल्या मार्केटवर उत्तर प्रदेशमधील गुळाने अतिक्रमण केल्याने मागणी कमी झाल्याचा परिणामही कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील सौद्यांवर दिसू लागला आहे.

बाजार समितीमध्ये प्रशासनाच्या कडक सूचनेमुळे मुहूर्ताचे सौदे काढताना फुगीर पद्धतीने काढण्यात आले नाहीत. यामुळे स्पेशल गुळाला तीन हजार ८०० रुपये दर मिळाला होता. हंगामामध्ये हाच दर स्थिर राहून किमान सरासरी तीन हजार २०० ते तीन ४०० रुपये दर मिळेल अशी अपेक्षा गूळ उत्पादकांकडून व्यक्त केली जात होती. मात्र उत्पादकांची अपेक्षा फोल ठरली आहे. ऑक्टोबरपासून नियमित सौद्यांना सुरुवात होऊनही उत्पादकांना सरासरी दोन हजार ६०० ते दोन हजार ७०० रुपये दर मिळत आहे. मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी असल्याने गुऱ्हाळ घरे चालवायची कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुऱ्हाळमालकांना तज्ज्ञ गुळवे आणि मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. यावर मार्ग काढताना गुऱ्हाळमालक मेटाकुटीला आले असतानाही दरानेही त्यांचे पूर्ण गणितंच विस्कळीत केले आहे. सातत्याने ढासळणाऱ्या गूळ दरामुळे उत्पादक गेल्या अनेक वर्षांपासून किमान आधारभूत किंमत देण्याची मागणी करत आहेत. शेती उत्पादीत सर्व उत्पादनासाठी सरकारने किमान आधारभूत किंमत निश्चित केली आहे. मात्र यामध्ये गुळाचा समावेश केलेला नाही. अशी आधारभूत किमंत ठरवल्यास गुळाचे दर ठरलेल्या किंमतीपेक्षा कमी असल्यास सरकारला गुळाची खरेदी करावी लागेल.

किमान आधारभूत किंमत महत्त्वाची

मजुरांचा तुटवडा

एफआरपीकडे उत्पादकांचे लक्ष

शंभर गुऱ्हाळ घरे सुरू

उत्तर प्रदेशचे गुजरात मार्केटवर अतिक्रमण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जनधन’मध्ये सव्वाचार लाख खातेदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री जनधन योजनेत कोल्हापूर जिल्ह्यातील चार लाख २३ हजार ९७८ कुटुंबांची बँक खाती काढली आहेत. उर्वरित कुटुंबांची बँक खाती काढण्याची गती देण्यात येणार आहे, अशी माहिती बँक ऑफ इंडिया अग्रणी बँक अधिकारी एम. जी. कुलकर्णी यांनी दिली.

कुलकर्णी म्हणाले, 'जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे बचत खाते असावे, यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सव्वाचार लाख बँक खाती काढली असून यामध्ये ग्रामीण भागातील एक लाख ३२ हजार ६३२ कुटुंबांचा समावेश आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत झिरो बॅलन्सवर बँक खाते काढले जात असून एक लाखाच्या अपघाती विम्याचे संरक्षण दिले जात आहे.'

ते म्हणाले,'विमा संरक्षणासा रुपे डेबिट कार्ड दिले जात असून तीन लाख एक हजार ३७४ खातेदारांना रुपे कार्ड दिले आहे. नियमित खातेदारास कमीत कमी एक हजार ते जास्तीतजास्त पाच हजारापर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट कर्ज सुविधा दिली जात आहे. '

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षण धोरणाविरोधात बंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शैक्षणिक धोरणांच्या विरोधात राज्य शिक्षण बचाव कृती समितीने बंड पुकारले आहे. राज्य सरकार शिक्षण क्षेत्रात अन्यायकारक निर्णय घेत आहे. त्याचा फटका शिक्षण संस्थाचालक, शिक्षक आणि पर्यायाने विद्यार्थ्यांना बसत आहे. अन्यायकारक निर्णय थांबवावेत, यासाठी पहिल्या टप्प्यात राज्य सरकारला जाग येण्यासाठी माध्यमिक शिक्षकांनी घंटानाद आंदोलन केले. टप्याटप्याने आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.

राज्यातील संस्थाचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी एकत्रित येऊन राज्य शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली. २८ ऑगस्ट २०१५ मध्ये शालेय शिक्षण विभागाने अन्यायकारक परिपत्रक काढल्याचा आरोप शिक्षण बचाव कृती समितीने केला आहे. संस्थाचालकांचे मुलभूत अधिकार काढून घेणे, अशैक्षणिक कामाचा बोजा लादणे, शिक्षण व्यवस्था अस्थिर करणे, शिक्षकेतरांच्या नेमलेल्या समितीचा अहवाल मंजूर न करणे, कला, क्रीडा शिक्षकांची पदे नष्ट करण्यासारखे अनेक निर्णय घेतले आहेत. त्या विरोधात राज्यातील शैक्षणिक संघटनांनी एकत्रित येऊन लढा उभारला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक संघटनांननी शैक्षणिक धोरणांच्या विरोधात एकत्रित लढा देणार आहेत.

आंदोलनाचे टप्पे

१४ नोव्हेंबर - झोपमोड आंदोलन, रात्री दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन निवेदन दिले जाणार आहे.

३० नोव्हेंबर - पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा

९ आणि १० डिसेंबर - राज्यातील शाळा बंद, नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा

या संघटनांचा सहभाग

राज्य शिक्षण संस्था महामंडळ, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, अखिल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक सयुंक्त महामंडळ, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन), महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी, महाराष्ट्र माध्यमिक शाळा महामंडळ, राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळ, महाराष्ट्र कला अध्यापक संघ महामंडळ, राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ.

मागण्या अशा

खासगी शिक्षण संस्थाची स्वायतत्ता कायम ‍ठेवावी

कला, क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करावी

प्राथमिक शाळांत लिपिक आणि सेवकांची पदे मान्य करावीत

शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्रपणे राबवावी

शिक्षक शिक्षकेतरांना शाळाबाह्य कामे नको

अनुदान पात्र शाळांना अनुदान द्यावे

२५ टक्के राखीव प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा द्यावा

केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान द्यावे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ठरेल महापौरपदाचा उमेदवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदासाठी इच्छुक चार नगरसेविकांच्या मुलाखतीचा फार्स काँग्रेस कमिटीत सोमवारी सायंकाळी पार पडला. चारही नगरसेविकांना एकत्र बोलावून जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री सतेज पाटील यांनी त्यांच्या मुलाखती घेतल्या. पाच मिनिटांतच मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. महापौरपदासाठीच्या मुलाखत प्रक्रियेच्या निमित्ताने काँग्रेसचे नगरसेवक एकवटले. माजी मंत्री सतेज पाटील यांनी मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, महापौरपदाचा उमेदवार मंगळवारी (ता.१०) निश्चित केला जाईल असे स्पष्ट करत उत्सुकता ताणली आहे, पण स्वाती यवलुजे यांचे नाव या पदासाठी आघाडीवर आहे.

काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युलानुसार महापौरपद काँग्रेसकडे आहे. काँग्रेसकडून महापौरपदासाठी स्वाती यवलुजे, अश्विनी रामाणे, उमा बनछोडे, दीपा मगदूम इच्छुक आहेत. सोमवारी सायंकाळी काँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.

जिल्हाध्यक्ष पाटील व माजी मंत्री पाटील यांनी चारही इच्छुक नगरसेविकांना एकत्रित मुलाखतीला बोलाविले. पाच मिनिटे मुलाखतीचा सोपस्कार पूर्ण केला. त्यानंतर काँग्रेस कमिटीच्या हॉलमध्ये नूतन नगरसेवकांचा मेळावा झाला. सतेज पाटील यांनी भाजप आघाडीच्या हालचालीवर निशाणा साधताना विरोधकांनी फॉर्म भरू दे, त्यानंतर निर्णय घेऊ असा टोलाही लगावला. वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असेही पाटील म्हणाले.

जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील म्हणाले, 'काँग्रेसला महापौर, राष्ट्रवादील उपमहापौर असा फॉर्म्युला ठरला आहे. मावळत्या सभागृहात मोठे बहुमत झाल्याने विरोधकांचा त्रास झाला नाही. मात्र, नव्या सभागृहात बहुमताचा आकडा काठावर असल्याने एकमेकांना अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.'

..........

महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रत्येक प्रक्रियेत सहभागी असणारे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण सोमवारी काँग्रेस कमिटीत झालेल्या मुलाखतीला अनुपस्थित होते. महापौरपदाच्या मुलाखत प्रक्रियेतून त्यांना डावलल्यामुळे ते नाराज होऊन त्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा होती. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना दूरध्वनी केला, पण चव्हाण काही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या स्नुषा जयश्री चव्हाण महापौरपदासाठी इच्छुक आहेत. मात्र त्या मुलाखतीवेळी उपस्थित नव्हत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाजीपूर अभयारण्य खुले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य नुकतेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. जैवविविधतेने नटलेल्या या अभयारण्यात गव्यांसह शेकडो प्रकारची फुलपाखरे, विविध पक्षी, शेकरू आणि दुर्मिळ वनस्पती पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दिवाळीच्या सुटीत दाजीपूरची सफर करणा-यांसाठी निसर्गाचा हा खजिना पाहायला मिळणार आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी राखीव ठेवलेले जंगल म्हणजे सध्याचे दाजीपूर अभयारण्य. गव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या या अभयारण्यात गव्यांसह शेकरुही पहायला मिळतात. प्रचंड पावसामुळे जून ते ऑक्टोबरदरम्यान या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश मिळत नाही. पावसाळा संपताच पर्यटक आणि अभ्यासकांसाठी दाजीपूर अभयारण्यात वर्दळ वाढते. कोल्हापूर शहरापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेले दाजीपूर अभयारण्य ३५१ चौरस किलोमीटर परिसरात विस्तारले आहे. १९८५ मध्ये अभयारण्य म्हणून दर्जा प्राप्त झाल्यानंतर हे ठिकाण गव्यांसाठी प्रसिद्धीस आले. मोठ्या प्रमाणात होणा-या पावसामुळे या ठिकाणी जैवविविधत बहरली आहे. वनस्पतींच्या विविधतेमुळे फुलपाखरे आणि पक्षीही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. फुलपाखरांच्या दोनशेहून अधिक प्रजाती दाजीपूर अभयारण्यात आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेले राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मन जातीचेही फुलपाखरू दाजीपुरात पाहायला मिळते.

अभयारण्यात गवे, बिबटे, अस्वल, डुक्कर, भेकर यासह ३५ वन्यप्राण्यांच्या प्रजातींचे वास्तव्य आहे. २३५ प्रजातींचे पक्षी ही या अभयारण्याची खासियत आहे. अभयारण्यात शेकरूंची संख्या बाराशेच्या वर पोहोचली आहे, त्यामुळे शेकरूंचे दर्शनही सहज घडते. फळे आणि फुलझाडांच्या १५०० हून अधिक प्रजाती अभयारण्यात बहरल्या आहेत, त्यामुळेच पक्षी आणि फुलपाखरांसाठी हे अभयारण्य आश्रयस्थान बनले आहे. अभयारण्यात पर्यटक आणि वन्यप्रेमींना पाहण्यासाठी कोकणदर्शन पॉईंट, सांबरकोंड, उगवाई मंदिर, शिवगड किल्ला, माळवाडी डॅम आदी ठिकाणे आहेत. जंगलात काही ठिकाणी निरीक्षण मनोरेही उभे केले आहेत, त्यामुळे पर्यटकांना शांत बसून प्राणी आणि पक्षी निरीक्षण करता येते. जंगलातील प्राण्यांना वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये यासाठी पर्यटकांसाठी खाजगी वाहने जंगलात घेऊन जाण्यास मनाई आहे, याऐवजी सायकल आणि गाइडसह चॅम्पर या वाहनाचीही सुविधा अभयारण्य प्रशासनाने उपलब्ध केली आहे. दिवाळीच्या सुट्टीत सहकुटुंब निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आनंद घेण्यासाठी दाजीपूर अभयारण्य आनंदाचा खजिना ठरणार आहे.

जंगलात तंबूची सोय

अभयारण्यातील रात्रीचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांना तंबूंची व्यवस्था केली आहे. ठक्याचा वाडा या ठिकाणी तंबूंमध्ये राहण्याची सोय आहे, त्याचबरोबर जंगलात जाण्यासाठी गाईडसह विशेष वाहनही उपलब्ध आहे. जंगलाचे नियम पाळून पर्यटनाचा आनंद घेतला तर दाजीपूरची सफर नक्कीच अविस्मरणीय ठरू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधान परिषदेचा धमाका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व माजी मंत्री प्रकाश आवाडे एकत्र आले आहेत. तिघांत कुणालाही काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय दुपारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या सतेज पाटील यांना आतातरी एकाकी लढत द्यावी लागणार आहे. सतेज पाटील यांना सोडून कुणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी आमदार महाडिक यांनी केली.

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे इच्छूक नेते सक्रीय झाले आहेत. दोन्ही काँग्रेसने या निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. यामुळे या पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी चार नेत्यांत चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये महाडिक, पी.एन.पाटील, आवाडे व सतेज पाटील यांचा समावेश आहे. महाडिक व सतेज पाटील यांनी प्रचाराला सुरूवातही केली आहे.

या पार्श्वभूमीवर श्रीपतरावदादा बँकेत महाडिक,पी.एन. व आवाडे यांची बैठक झाली. या बैठकीत महाडिक व आवाडे यांनी विधानपरिषदेसाठी इच्छूक असून आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रदेश पातळीवर शिफारस करावी, अशी मागणी पी.एन. यांच्याकडे केली. आपणही या उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे पीएन यांनी त्यांच्यासमोर स्पष्ट केले.

या ती​न नेत्यांत बराच वेळ चर्चा झाली. तिघांत ज्याला उमेदवारी मिळेल त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानपरिषदेसाठी इच्छूक असल्याचे सतेज पाटील यांनी यापूर्वीच पीएन यांना भेटून सांगितले आहे. बैठक संपल्यानंतर माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी पी.एन. यांच्याशी संपर्क साधून काँग्रेसचा जो निर्णय होईल त्याला आपलाही पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images