Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पुरोगामी नेते हुसेन जमादार यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाईचारा संघटनेचे अध्यक्ष हुसेन चाँदसाहेब जमादार (वय ७१, रा. प्लॉट नं. ६६, अरूणोदय हौसिंग सोसायटी, राजेंद्रनगर) यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

जमादार हे बुधवारी रात्री झोपी गेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांना जमादार यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले. गेले तीन वर्षे ते डिप्रेशनखाली होते. पुणे व कोल्हापुरातील डॉक्टरांकडे ते उपचार घेत होते. त्यांच्या आजारात चढउतार होत होते असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. गुरूवारी सकाळी दहा वाजता बागल चौक येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जमादार यांनी हमीद दलवाई यांच्यासोबत मुस्लिम पुरोगामी समाजासाठी काम सुरू केले होते. त्यांनी आंतरभारती शिक्षण मंडळात त्यांनी २२ वर्षे हायस्कूलमध्ये नोकरी केली. विद्यार्थी दशेपासून समाजकार्यास सुरूवात केली. मुस्लीम समाजातील कालबाह्य चा​लीरिती, रूढी या विरूध्द आवाज उठवला. मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक सभासद होते. मुस्लिम समाज प्रबोधन व शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी काम केले. मुस्लिम समाजातील तलाक​ पीडित महिलांसाठी केंद्र स्थापन करून महिलांना न्याय देण्याचे काम केले. कोल्हापुरातील वारांगणासाठी संघटना तयार करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले. एड्स आजारासंबधी जनजागृती केंद्र त्यांनी सुरू केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गायकवाडच्या कोठडीत वाढ

$
0
0

कोल्हापूरः ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्त्येप्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित सनातन संस्थेचा प्रमुख साधक समीर गायकवाड याची न्यायालयीन कोठडीची मुदत सात नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. दरम्यान, समीरच्या ओळख परेड पंचनामा अहवाल कोर्टाकडून तपास अधिकाऱ्यांना प्राप्त झाला आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर.डी. डांगे यांच्यासमोर न्यायालयीन कोठडीची सुनावणी झाली. पुरेसे पोलिस दल उपलब्ध नसल्याने समीर गायकवाडला कोर्टात हजर करता येणार नाही, असे पत्र अतिरिक्त वरिष्ठ तुरूंग अधिकाऱ्यांनी कोर्टाला सादर केले. त्यामुळे समीरच्या अनुपस्थितीत सुनावणी झाली. समीरचे वकील एम.एम. सुहासे व समीर पटवर्धन उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्मार्ट सिटी योजना बोगस’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारच्यावतीने राबवण्यात येत असलेली स्मार्ट सिटी योजना बोगस आहे. शहरे निवडण्यात पक्षपातीपणा झाला असून महानगरपालिकांमध्ये खासगीकरण करण्याची संकल्पना या योजनेच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी चव्हाण शुक्रवारी आले होते. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. या योजनेमध्ये अनेक शहरांचा समावेश झालेला नाही येथूनच बोगसगिरी सुरु झाली आहे. या योजनेतील बोग​सगिरीचा पर्दाफाश करताना चव्हाण म्हणाले, 'शहरे निवडताना पक्षपातीपणा झाला आहे. विरोधी सरकारची सत्ता असलेल्या राज्यातील कोलकत्ता, बंगळुरु, सिमला सारखी शहरे या योजनेत समाविष्ट नाहीत. ही शहरे कशी सुटली? याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यानंतर ​गावांच्या यादीत खाली वर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच जी ९८ शहरे निवडली, त्यांना पाच वर्षात ४८० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडलेल्या शहरांना हा निधी देत असताना लोकसंख्येप्रमाणे त्या निधीची वाटणी केलेली नाही. मुंबईसारख्या राजधानीच्या शहराला ४८० कोटी व अकरा हजार लोकसंख्या असलेल्या शहरालाही ४८० कोटी रुपयांचा निधी हे न पटणारेच आहे. या योजनेतील निधीही देण्याची यंत्रणा शंकास्पद आहे. ज्यावेळी निवडलेल्या शहरात विकासकामे करण्यासाठी कंपनी स्थापन केली जाईल, त्यावेळीच हा निधी मिळणार आहे. ते खर्च करण्यासाठी मॅनेजिंग डायरेक्टर असेल. त्याच्यामार्फतच या कामांची पूर्तता केली जाईल. मग महापौर व लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक तिथे जाऊन काय करणार? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दरोडेखोरांना पुन्हा संधी नको’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'टोल, एलबीटी लादणारे, घोटाळेबाज, बँका बुडविणारे ढोंगी विरोधक तेच तेच प्रश्न सोडविण्याची खोटी आश्वासने देत आहेत. अशा संधिसाधूंना दरोडे घालण्यासाठी पुन्हा निवडून देण्यापेक्षा महायुतीला एकदा तरी संधी द्या. कोल्हापूर एक आदर्श शहर बनवू,' असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले. महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ रंकाळा टॉवर, जाऊळाचा गणपती येथे शुक्रवारी आयोजित जाहीर सभांत ते बोलत होते.

मंत्री खडसे म्हणाले, 'महापालिकेत सत्तांतर काळाची गरज आहे. पंधरा वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे महापालिकेची सत्ता आहे. टोलचा निर्णय कुणी घेतला, टोल वसुलीची समंती या आघाडीने दिली. आयआरबीशी करारच झाला नसता तर टोल रद्द करण्याची घोषणा करावीच लागली नसती. महापालिका क्षेत्रात काँग्रेसनेच एलबीटी लादला. काँग्रेस, राष्ट्रवादीने सहकारी बँका बुडविल्या. महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा हीच आघाडी नागरिकांना ढोंगी आश्वासने देत आहे. त्यामुळे विरोधकांच्या या अपप्रचाराला बळी पडू नका.'

'कोल्हापूर महापालिकेत अनेक वर्षे दोन्ही काँग्रेसची सत्ता आहे. या भ्रष्टाचारी व घोटाळेबाज सत्तेला जनता कंटाळली आहे. यामुळे यावेळी आमचीच सत्ता येणार असा दावा करून ते म्हणाले, आमची सत्ता आल्यानंतर कोल्हापूरला विकासाचा नवा चेहरा देऊ,' अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, पुंडलिक जाधव, महानगर अध्यक्ष महेश जाधव यांची भाषणे झाली. यावेळी खासदार संजय पाटील, महायुतीचे उमेदवार हेमंत कांदेकर, रचना मोरे, मीनाक्षी मेस्त्री, प्रियांका इंगवले, वैशाली पाटील, शेखर कुसाळे, अमोल पालोजी, आदी उपस्थित होते. अजित ठाणेकर यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाचणी गावावर सीसीटीव्हीची नजर

$
0
0

कागल : कागल तालुक्यातील बाचणी येथे ग्रामपंचायतीच्या दहा लाख रुपयांच्या फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले. वायरलेस असणारे हे एच.डी.कॅमेरे अत्याधुनिक आहेत. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण ग्रामपंचायतीतून चालत असले तरी कागल पोलिस ठाणे आणि जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालय कधीही बाचणी गाव कार्यालयात बसून पाहू शकतील अशी ही यंत्रणा आहे. अशा पद्धतीने कार्यप्रणाली वापरणारे बाचणी गाव राज्यातील एकमेव असल्याचा दावा सरपंच सूर्यकांत पाटील यांनी केला आहे.

बाचणी राजकीयदृष्ट्या संवेदनशील गाव आहे. परिसरातील २५ गावांतील लोक येथे दर सोमवारी बाजाराच्या निमित्ताने येतात. बाजारात दागिने, पर्स अशा चोऱ्या वारंवार घडतात. याशिवाय निवडणूक काळात पोस्टर्स फाडण्याचे प्रकार होत असत आणि विनाकारण तणावही निर्माण होत असे. त्यामुळे याठिकाणी आणि मुख्य चौकात एक लाख रुपये खर्च करून एच.डी. कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरुंदवाडमध्ये दोन गटांत हाणामारी

$
0
0

अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

कुरुंदवाड येथे शनिवारी सकाळी युवकांच्या दोन गटात हाणामारी झाली. यानंतर पोलिस ठाण्यासमोर दोन समाजाचे गट आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला. जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर पुढील अनर्थ टळला. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

याबाबत अधिक माहिती अशी ः कुरुंदवाड येथे व्यायामशाळेत जाणाऱ्या दोन समाजाच्या युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होता. त्यांच्यात दोन दिवसांपूर्वीही वादावादी झाली होती. याचेच पर्यवसान शनिवारी सकाळी दोन गटात हाणामारीत झाले. हे वृत्त शहरात पसरताच तणाव निर्माण झाला. दोन्ही समाजातील युवक व महिलांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली. जमावाने पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी जमावाला रोखले. दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी कुरुंदवाडमध्ये येऊन शांततेचे आवाहन केले. पोलिस ठाण्यात दोन्ही समाजाची बैठक घेण्यात आली. कुरुंदवाड येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या परंपरेस मोहरम सणात गालबोट लावू नये; अन्यथा कारवाई करू, असा इशारा जिल्हा पोलिसप्रमुख शर्मा यांनी दिला. त्यानंतर वातावरण निवळले व पुढील अनर्थ टळला. शांतता बैठकीत विलास कांबळे, दिगंबर सकट, महावीर आवळे, राजू आवळे, रामदास मधाळे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीत तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

एस. टी. बसला बाजू देत असताना मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात एस.टी.च्या मागील चाकाखाली सापडून युवक जागीच ठार झाला. अपघात शनिवारी दुपारी टेलिफोन ऑफिसजवळ घडली. प्रवीण राजेंद्र दोशी (वय २२, रा. निकेतन अपार्टमेंट, श्रीपादनगर) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघाताची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

याबाबत पोलिस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः प्रवीण दोशी मोटारसायकल (एमएच ०९ सीवाय १२१७) वरून शिवाजी पुतळ्याकडून संभाजी चौकाच्या दिशेने निघाला होता. त्याचवेळी कर्नाटक आगाराची एस.टी. बस (केए २३ एफ ५२८) चिकोडीला जात होती. टेलिफोन ऑफिसजवळ एस.टी. बस मोटारसायकलला ओव्हरटेक करून पुढे जात होती. त्यावेळी प्रवीणने एस.टी.ला बाजू देण्यासाठी मोटारसायकल रस्त्याकडेला घेतली. पण तेथे रस्त्यावर पसरलेल्या बारीक खडीवरून मोटरसायकल घसरली. त्यामुळे तोल जाऊन प्रवीण एस. टी.च्या बाजूला पडला. तो थेट मागच्या चाकाजवळच पडला. डोक्यावरूनच बसचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. तत्काळ बस थांबवून तेथून बसचालकाने पलायन केले. घटनेची माहिती समजताच शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी आले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच दोशी याच्या नातेवाइकांसह त्याच्या मित्रमंडळींनी आयजीएम परिसरात गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीचे काम करण्यास शिक्षकांचा ‌नकार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिक्षकांना निवडणुकीशी संबंधित कामे लावू नयेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला असल्याने बी.एल.ओ. म्हणून महापालिकेच्या निवडणुकीत काम करण्यास नकार दिला असल्याची माहिती खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

रसाळे म्हणाले, 'शिक्षकांना ‌बी.एल.ओ. म्हणून काम लावू नका असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. बी.एल. ओ च्या सततच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षक सतत शाळेबाहेरच्या कामात व्यस्त असून अध्यापनास पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे या कामातून कायमची मुक्तता व्हावी यासाठी राज्यातील व जिल्ह्यातील काही संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्ती ए.एस.ओक व व्ही.एल.अथीलया यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रथम सत्रात परीक्षेच्या व शिक्षकांच्या कामाचा विचार करून बी.ए.ओ.शी संबंधित निवडणुकीचे काम शिक्षकांना देऊ नये. त्यांच्यावर सक्ती करू नये व कोणीतीही कारवाई करून नये असे स्पष्ट आदेश सुनावण‌वेळी दिल आहेत. ही कामे शिक्षकांना दिल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरेल.' यावेळी राजेंद्र कोरे, विलास पिंगे, दिलीप माने, सुभाष धादवड, पी.एस.घाटगे, सुदर्शन सुतार, रंगराव कुसाळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घराला लागलेल्या आगीत ८ लाखांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुना बुधवार पेठ भगतसिंग चौक येथील मोहन शिंदे यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागून अंदाजे आठ लाखाचे नुकसान झाले. शिंदे यांचे तीन मजली वीट मातीचे घर जळून खाक झाले. शनिवारी सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाने पाऊण तासाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणल्याने शेजारची घरे बचावली.

मोहन शिंदे यांचे आरसीसी व दगडमातीचे घर आहे. आरसीसी घराच्या मागील बाजूस जुने घर आहे. शनिवारी रात्री शॉर्ट सर्किटने आग लागल्यानंतर आगीचा भडका तीस फुटापर्यंत उंच गेला. परिसरातील नागरिकांनी शिंदे यांच्या घराकडे धाव घेतली.

अग्निशमन दलाला आगीची वर्दी दिल्यावर तीन अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी आले. आगीचे ठिकाण मागील बाजूस असल्याने पाईप जोडून युध्दपातळीवर पाण्याचा मारा करण्यात आला. स्थानिक भगतसिंग तरूण मंडळ, जुना बुधवार पेठ तरूण मंडळ, सोन्या मारूती चौकातील कार्यकर्त्यांनी अग्निशमन दलाला मदत केली. आगीचा झळा शेजारील उदय भोसले यांच्या घराला लागू नयेत यासाठी अ​ग्निशमन दलाच्या जवानांनी काळजी घेतली. तरीही भोसले यांच्या हॉटेलला आगीची थोडी झळ बसली. तब्बल पाऊण तासानंतर आग विझवण्यात आली. आगीत घरातील सर्व प्रापंचिक साहित्य वितळून गेले. पोलिसांनी टाऊन हॉमार्गे होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अदित्य ठाकरे यांचा आज कोल्हापुरात ‘रोड शो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेना युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे यांचा महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी (ता.२५) रोड शो होणार आहे. तसेच दुपारी साडेतीन वाजता शिवसेनेचा वचननामा ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा चौकातील दिगंबर जैन बोर्डिंग येथील कार्यक्रमात प्रसिध्द करण्यात येणार आहे. रविवारी दुपारी चार वाजता ताराराणी चौकातून रोड शो ला सुरूवात होणार आहे. शहरातील प्रमुख मार्ग व प्रभागात रोड शो चे आयोजन केले आहे. रोड शोला शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर व चंद्रदीप नरके यांनी केले आहे. वचननामा प्रकाशन सोहळ्यास खासदार विनायक राऊत, अरूण दूधवडकर, संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, सत्यजित पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हायकोर्टाची माफी मागू नये’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींचा अवमान केल्याप्रकरणी सहा जिल्ह्यातील वकिलांनी हायकोर्टाची माफी मागू नये, असा सूर जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत बहुतांशी वकिलांनी काढला. सहा जिल्ह्यातील वकिलांच्या बैठकीनंतर याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड राजेंद्र चव्हाण बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याबाबत निवृत्तीच्यादिवशी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोणताच निर्णय न दिल्याने कोल्हापुरात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. कोल्हापुरात वकिलांनी कोर्टाचा आवारात शहा यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. तसेच तीन दिवस कोर्ट कामकाजावर बहिष्कार घेतला होता. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुंबई हायकोर्टाने सहा जिल्ह्यातील बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. २४ नोव्हेंबरला सहा जिल्ह्यातील वकिलांना म्हणणे मांडण्याची मुदत दिली असून २८ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बार असोशिएशनने बैठकीचे आयोजन केले होते.

खंडपीठाचे आंदोलन हे सामूहिक असून गेली २५ वर्षे लढा सुरू असताना निर्णय घेण्याबाबत हायकोर्ट विलंब करत असेल तर उद्रेक होणे साहजिक आहे. माफी मागण्याऐवजी आपले म्हणणे मांडून आपला हक्क मागू या, असे मत काही वकिलांनी व्यक्त केले. महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य अॅड. शिवाजीराव चव्हाण, माजी अध्यक्ष अॅड शिवाजीराव राणे, अॅड. अजित मोहिते, अॅड. विवेक घाटगे, अॅड. अभिजित कापसे, उपाध्यक्ष अॅड. प्रशांत चिटणीस यांनी आपली मते व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रबळ अपक्ष पडणार भारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षाचे उमेदवार रिंगणात असले तरी काही प्रभागात अपक्ष भारी पडणार आहेत. सत्ता स्थापनेवेळी पुरेसे संख्याबळ नसल्यास या अपक्षांची मोट बांधावी लागते. त्यामुळे काही प्रभागात कामाच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर अपक्ष बाजी मारण्याचे संकेत आहेत. महापालिका निवडणुकीत १४० अपक्ष रिंगणात आहेत.

काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, महायुती, एसफोरए आघाडी, अखिल भारत हिंदू महासभा, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असले तरी काही प्रभागात प्रबळ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील नगर - जिवबानाना जाधव पार्कात मधुकर सावंत, दुधाळी पॅव्हेलियन प्रभागातून संभाजी बसुगडे, तटाकडील प्रभागातून चंद्रकांत साळोखे, पंचगंगा तालीममधून शारदा कळके, बलराम कॉलनीतून राहुल माने या अपक्षांनी जोरदार तयारी केली आहे. दौलतनगर प्रभागात आणि बुद्धगार्डन प्रभागात प्रत्येक सात अपक्ष रिंगणात आहेत. टेंबलाइवाडी व क्रांतीसिंह नाना पाटील नगर प्रभागात प्रत्येक सहा उमेदवार अपक्ष आहेत.

कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास त्रिशंकू स्थिती निर्माण होते. त्यावेळी अपक्ष अनेकांचे तारणहार ठरतात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप-ताराराणी आघाडी या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्याचा फायदा काही ठिकाणी अपक्षांना होण्याची शक्यता आहे. पक्षांकडून उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज झालेल्या काही उमेदवारांनी अपक्षांचा झेंडा हाती घेतला आहे. पक्षाचे कट्टर कार्यकर्ते असूनही उमेदवारी दिली नसल्याच्या निषेधार्थ काही बंडखोर अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. या कार्यकर्त्यांचा मोठा जनंसपर्क आहे. अपक्षही प्रत्येक मतांचे गणित जुळवित आहेत. गेल्या दहा ते वीस वर्षात राजकीय पक्षांकडून फारशी विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे हक्काचा माणूस म्हणून निवडून देण्याचे आवाहन अपक्षांकडून सुरू आहे.

मावळत्या सभागृहात नऊ अपक्षांची मोट

यापूर्वी महापालिकेच्या राजकाराणात ताराराणी आघाडीने अनेकदा अपक्षांची मोट बांधली. यापूर्वी २०१०च्या निवडणुकीत ९ अपक्ष निवडून आले. त्यापैकी दोघांना राजकीय पक्षांनी पुरस्कृत केले होते. सातपैकी पाच अपक्षांची आघाडी नोंदणीकृत झाली. या आघाडातील पाच आणि जनसुराज्यशक्ती पक्षाचे चार अशा नऊ नगरसेवकांची पुन्हा जनसुराज्य -अपक्ष आघाडी स्थापन करुन राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे मावळत्या सभागृहात अपक्षांना सोबत घेऊन आघाडी स्थापन झाली. आताही अपक्ष उमेदवारांना मिळालेल्या मतांवर जय पराजयाची गणिते मांडली जात आहेत.

उमेदवारांकडून अपक्षांची मनधरणी

काही प्रभागांत राजकीय पक्षांनी केलेल्या सर्वेक्षणात अपक्ष उमेदवार भारी पडतील असा अहवाल दिला आहे. त्यामुळे मतविभाजनाचा मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज असल्याने काही उमेदवारांनी अपक्षांची मनधरणी सुरु केली आहे. अपक्षांना मानणारे गठ्ठा मतदान वळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आज रंगणार प्रचार‘वॉर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, सभामधून एकमेंकावर सोडले जाणारे टीकेचे वाग्बाण आणि गुफ्त बैठकांमुळे शहर व उपनगरात प्रचाराने वेग पकडला आहे. त्यातच प्रचारासाठी उद्याचा सार्वजनिक सुटीचा शेवटचा रविवार असल्याने सर्वच उमेदवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे. जाहीर सभा प्रमाणेच कोपरा सभा, पदयात्रांतून प्रभागातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणूक पक्षीय पातळीवर लढली जात असल्याने अनेक उमेदवारांनी तिकीट मिळवण्यात यश मिळवले आहे. तिकिटाची लढाई जिंकल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला जोर आला आहे. प्रभागातील स्थानिक प्रश्नांना महत्त्व देत मतदारांना आपलेसे करण्याची उमेदवारांची धडपड सुरू होती. पदयात्रा, वैयक्तिक भेटीगाठीनंतर आता आता जाहीर सभांचे स्वरुप आले आहे.

प्रमुख राजकीय पक्षांचे राज्यपातळीवरील नेतेमंडळींची पायधूळ शहरात पडत असल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजप, शिवसेनेवर हल्लाबोल सुरू असतानाच ज्यांच्याकडे महापालिकेची सत्ता आहे त्या दोन्ही काँग्रेसना भाजप, शिवसेनेने टीकेचे लक्ष केले आहे. मात्र याचवेळी सरकारमध्ये एकत्र असूनही शिवसेना-भाजप एकमेकावर तोंडसुख घेत असल्याने मतदार आणि शहरवासियांची चांगलीच करमणूक होत आहे. जाहीर सभांचा धडाका नुकताच सुरू झाला आहे.

अपक्षांनी आणला दम

राज्य आणि जिल्हा पातळीवर चारही पक्षांचे नेते तोंडसुख घेत आहेत. जाहीर प्रचारसभांच्या निमित्ताने प्रचार चांगला रंगत असतानाच काही प्रभागातील अपक्षांनी सर्वच पक्षांच्या उमेदवारांसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. जाहीरसभांना मोठा राजकीय नेता नसला, तरी आपआपल्या प्रभागात निवडणुकीतील विविध नीतींचा अवलंब करत त्यांनी जबरदस्त आव्हान उभे केले आहे.

पडद्यामागे वेगळी फौज

प्रभागात उमेदवार जाहीर प्रचारात सहभागी होत असले तरी पडद्यामागे हालचालीसाठी प्रत्येक उमेदवाराने कार्यकर्त्यांची वेगळीच फौज तयार केली आहे. जाहीर प्रचारांपासून दूर राहत ही मंडळी फोडाफोडीच्या राजकारणात आहेत. प्रभागातील मंडळांचा पाठिंबा मिळवण्याबरोबरच मतदारसंघातील मतदारांचा शोध घेतला जात आहे. नोकरी, व्यावसायानिमित्त अन्यत्र गेलेल्या मतदारांशी संपर्क साधला जात आहे. यासाठी लॅपटॉप, कम्प्युटर आदी तंत्राचा वापर केला जात आहे. यामुळे उमेदवारांची संपर्क कार्यालये हायटेक झाल्याचे दिसून येत आहे.

अशोक चव्हाण आज कोल्हापुरात

कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण रविवारी कोल्हापुरात येत आहेत. चव्हाण यांची प्रचार सभा रविवारी संध्याकाळी पाच वाजता प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे. आगामी पाच दिवसांत कॉँग्रेसचे नारायण राणे, पतंगराव कदम यांच्यासह अन्य नेतेही प्रचार संभांसाठी हजेरी लावणार आहेत. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तोफाही धडाडणार आहेत. मंगळवारी विधान परिषदेचे नेते धनंजय मुंडे, तर बुधवारी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभा होणार आहेत. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांचे प्रचारदौरे नियोजित केले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याही सभा होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूरडाळ उतरली, फळदरात घट

$
0
0

कोल्हापूरः मागील आठवड्यात नवरात्रोत्सवामुळे चढलेले फळांचे दर आता बऱ्यापैकी उतरले आहेत.त्याचप्रमाणे, साठेबाजांवर कारवाईचा बडगा उगारल्याने तूरडाळीच्या किमतीही दोनशे रुपयांखाली आल्या आहे. भाजीपाल्याचे दर मात्र कमीअधिक प्रमाणात स्थिर आहेत. किरकोळ बाजारपेठेत मागील आठवड्यामध्ये तूरडाळ प्रतिकिलो २२० रुपयांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर ही कृत्रिम भाववाढ असल्याचे लक्षात आल्याने राज्यभरातील साठेबाजांवर धडक कारवाई करण्यात आली. परिणामी आता तूरडाळीचे दर प्रतिकिलो १७५ ते १८० रुपयांपर्यंत आले आहेत.

अन्य डाळींच्या किमतींमध्येही प्रत्येकी १० ते २० रुपयांची घट झाली असून मूग डाळ १३० रुपये, उडीद डाळ १७० रुपये, मसूर डाळ ८० रुपये, तर हरभरा डाळ ७० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. कडधान्यांमध्ये मटकीचे दर काहीसे वाढले असून प्रतिकिलो १२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तेलाचे दरही स्थिर आहेत. शेंगदाणा तेल १२० रुपये किलो, सूर्यफूल तेल ९० रुपये लिटर, तर सरकी तेल ७२ रुपये लिटर दराने उपलब्ध आहे.

पालेभाज्यांच्या दरामध्ये काहीशी वाढ झाली असून पालक, मेथी व कोथिंबिरीचे दर प्रतिपेंडी २० रुपये इतके आहेत.

कांद्याचा भाव उतरला असून प्रतिकिलो ३० रुपये इतका झाला आहे. टॉमेटो १५ रुपये किलो, तर बटाटा २० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. फळांचे दरही उतरले असून सर्व फळांच्या प्रतिकिलो दरांमध्ये प्रत्येकी २० ते ३० रुपयांची घट झाली आहे. सफरचंद ७०, मोसंबी ४० रुपये, सिताफळ ८० रुपये, डाळिंब ७० रुपये, चिकू ४० रुपये, संत्री ७० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत.

चौदा हजार क्विंटल बेदाण्याची आवक

कुपवाड : सांगली मार्केट कमिटीत या आठवड्यात १४९२० क्विंटल देशी आणि गावरान बेदाण्याची आवक झाली आहे. ही आवक गेल्या आठवड्यापेक्षा ३२७१ क्विंटलनी कमी आहे. या बेदाण्याला सरासरी सोळा हजार रुपये दर मिळाला आहे. कोल्हापुरी गुळाची आवकही २३५४ क्विंटलनी घटली असून गुळाला सरासरी २५३७ रुपये इतका मिळाला असल्याचे मार्केट कमिटीमधून सांगण्यात आले. राजापुरी हळदीची आवक ३०६ क्विंटलनी घटली असली तरी परपेठ आणि चोरा हळदीची आवक जास्त झाली आहे. राजापुरी हळदीला सरासरी ९२०० तर परपेठ हळदीला ८२५० रुपये असा दर मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बी लावणाऱ्या सहा मंडळांवर गुन्हे

$
0
0

कोल्हापूरः मोहरमच्या कत्तलरात्र पंजेभेटीच्या मिरवणुकीत डॉल्बी वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सहा मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. गुजरी, भाऊसिंगजी रोडवर रात्री दहा ते पहाटे साडेतीन वाजेपर्यंत डॉल्बीचा दणका सुरू असल्याने कारवाई करण्यात आली. डी.डी. ग्रुप शाहूपुरी, प्रसाद तरूण मंडळ, वेताळमाळ तालीम शिवाजी पेठ, रविवार पेठ तरूण मंडळ, स्पार्टन ग्रुप सब जेल, एम.जे. राजारामपुरी या मंडळाच्या अध्यक्ष, सदस्य व डॉल्बीचालकांवर ध्वनी प्रदूषण कायद्याखाली कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंभीर परिणाम भोगावे लागतील

$
0
0

मुश्रीफांचा महाडिकांना इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेची आरक्षित जागा हडपल्याच्या आरोपाची गंभीर दखल घेत आमदार हसन मुश्रीफ यांनी सुनील कदम यांच्यावर एक कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पत्रकारांना सांगितले. कदम यांना आमदार महादेवराव महाडिक यांचीच फूस असल्याचा आरोप करीत त्याचे गंभीर परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात भोगावे लागतील, असा थेट इशाराही मुश्रीफ यांनी महाडिक यांना दिला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

माजी महापौर सुनील कदम यांनी आमदार मुश्रीफांनी महापालिकेची आरक्षीत जागा हडप केल्याचा आरोप केला होता. संबंधित जागा महापालिकेची नाही. ती राणोजी आणि उदयसिंह घोरपडे यांच्या वैयक्तिक मालकीची होती. ही जागा २००४ मध्ये मुलाच्या नावे रितसर खरेदी केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. याबाबतचे पुरावेही त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने चुकीची माहिती पसरवून जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा हा प्रकार असल्याने कदम यांच्याविरोधात एक कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

संबंधित जागा आरक्षित असल्याचेही कदम यांनी म्हंटले होते, यावर ही जागा खाजगी मालकीची असल्याने अरक्षित असण्याचा संबंधच नसल्याचे स्पष्ट करीत हसन मुश्रीफ यांनी महापालिकेचे अधिकृत नकाशे सादर केले. कदम यांना फूस लावणारे आमदार महाडिकच आहेत. सुनील कदम यांच्या आरोपांबाबत खुलासा करण्याचे आवाहन महाडिक यांना केले आहे, मात्र त्यांच्याकडून अजूनपर्यंत काहीच खुलासा आला नाही, याचा अर्थ सुनील कदम यांच्या वक्तव्यामागे महादेवराव महाडिकच असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला.

याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात दिसतील असे सांगत गोकुळमधील दुधाचे ट्रक कुणाचे किती आहेत, टेंडर कुणाचे आहे, ट्रकमधील दुधाचे नेमके काय होते याचे पुरावे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे देऊ, असे मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. खोटी माहिती देऊन बदनामी करण्याचा प्रयत्न केलात तर याचे गंभीर परिणाम जिल्ह्याच्या राजकारणात भोगावे लागतील असा स्पष्ट इशाराच मुश्रीफ यांनी महाडिकांना दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४१ लाखांचा साठा जप्त

$
0
0

पुरवठा विभागाकडून तिघा जणांवर गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने लागू केलेल्या नियंत्रण आदेशामुळे जिल्ह्यात डाळ, तेल आणि तेलबियांच्या साठ्यांवरील कारवाई सलग चौथ्या दिवशी सुरू राहिली. जिल्हा पुरवठा विभागाने इचलकरंजी आणि बोरवडे (ता. कागल) येथे केलेल्या कारवाईत सुमारे ४१ लाखांचा साठा जप्त करण्यात आला. जीवनावश्यक वस्तू कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शनिवारी कागल तालुक्यातील बोरवडेतील सियेन ट्रेडर्स या खाद्यतेलाच्या साठ्यावर प्रांताधिकारी मोनिका सिंग यांच्या पथकाने छापा टाकून ३७ लाख ८ हजाराचा खाद्यतेल साठा जप्त केला. गेली १० वर्षे योगेश शिंदे या व्यापाऱ्याचा विना परवाना व्यवसाय सुरू असल्याचे कारवाईत निष्पन्न झाले आहे. शिंदे यांच्या गोडावूनमध्ये ४६३ क्विंटलचा सुमारे ३७ लाख ८ हजारांचा विना परवाना तेल साठा सापडला. प्रांताधिकारी सिंग यांनी शिंदे यांच्याविरोधात मूरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कागलमधील डी.एन.ट्रेडर्स वर छापा टाकून २ हजार ८६१ किलोचा खाद्यतेल साठा जप्त केला. जप्त केलेल्या खाद्यतेलाची किंमत २ लाख २७० रुपये आहे. बरकत नायकवडी यांचे दुकान, शोरुम आणि तेलाची टाकीही सील करण्यात आली. मर्यादेपेक्षा ८६१ किलो जास्त तेलाचा साठा आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. नायकवडी यांच्यावर कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इचलकरंजीत बिग बझारवर टाकलेल्या छाप्यात साठा मर्यादा आणि परवान्याचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. ९.१८ क्विंटल डाळी, १.२४ क्विंटल खाद्य तेलबिया आणि २२८२ लिटर खाद्यतेल सापडले. साठा मर्यादेपेक्षा अधिक होता, त्याचबरोबर बिग बझारकडे आवश्यक परवानेही नव्हते त्यामुळे संबंधित फर्मचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चार दिवसांत ३९१ छापे

पुरवठा विभागाने इचलकरंजी आणि कागलमध्ये सहा ठिकाणी धाड टाकून एकूण ४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तीन जणांविरोधात नियंत्रण आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, सहा दुकाने सील केली आहेत. गेल्या चार दिवसात पुरवठा विभागाने ३९१ ठिकाणी छापे टाकल्याने व्यापाऱ्यांत खळबळ माजली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीरची लाय डिटेक्टर

$
0
0

कोल्हापूर :

कॉ. गोविंदराव पानसरे हत्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाडने ब्रेन मॅपिंग चाचणीला नकार दिल्यानंतर आता त्याच्या लाय डिटेक्टर आणि व्हाईस अॅनालिसिसचाही प्रयत्न करणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.

पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असून, परदेशापर्यंतही तपास यंत्रणा कार्यान्वित आहेत. त्यामुळे तपासाचे काम पूर्ण होताच समीर गाकवाडवर आरोपपत्र दाखल केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिमायेच्या मूर्तीवर वज्रलेप

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

भोई गल्लीतील प्राचीन आदिमाया महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला वज्रलेप करण्याचे काम पूर्ण झाले आहे. भोईगल्लीत नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व शतचंडियाग सोहळा मंगळवारपासून सुरू होणार आहे. या निमित्त सलग सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत, अशी माहिती श्री आदिमाया महालक्ष्मी गणेश व नवरात्र उत्सव मंडळ व श्री आदिमाया महालक्ष्मी व दुर्गादेवी मंदिर ट्रस्टचे मोहन लोखंडे यांनी दिली.

मोहन लोखंडे म्हणाले, 'सन १९७२साली रविवार पेठेतील भोईगल्लीत भुयारी गटर योजनेसाठी खोदाई सुरू असताना ही मूर्ती जमिनीत सापडली होती. त्यावेळी तेथेच या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. सुमारे ४५वर्षांनंतर या मूर्तीला वज्रलेप व नव्याने मंदिर बांधण्याचा संकल्प भोई समाजाने सोडला होता. प्राचीन मूर्तींना वज्रलेप करणारे पुणे येथील अशोक ताम्हणकर यांना वज्रलेपाचे काम सोपवण्यात आले. त्यांनी अभ्यास करून ही मूर्ती २७३०वर्षांपूर्वीची अंबिका भुवनेश्वरी या पोथीतील चित्राशी साधर्म्य असणारी व हल सातवाहन राजांच्या कालखंडातील असल्याचे सांगितले होते. गेले वर्षभर त्यांच्याकडून मूर्तीला वज्रलेप करण्याचे काम सुरू होते. ते आता पूर्ण झाले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडकूरमध्ये विद्यार्थ्यांची फसवणूक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा चंदगड

अडकूर (ता. चंदगड) येथील राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी विद्यालयाने सन २०१२- १३ व २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात १७४ विद्यार्थ्यांनी कृषी पदविका पूर्ण केली आहे. मात्र हे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी अन्यत्र गेले असता कृषी पदवी व संस्था बोगस असल्याचे निर्दशनास आले. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे या संस्थेचे संस्थाचालक व संस्थेची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थांनी तहसीलदारांकडे निवेदनातून केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, अडकूर येथे सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी विद्यालय संलग्नता असल्याचे दाखवून विद्यार्थ्यांचे प्रवेश केले. मात्र, पदवीका पूर्ण झाल्यानंतर आम्हाला अन्यत्र कुठेच प्रवेश मिळेना. हे कॉलेज बोगस असल्याचे निदर्शनास आले. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची यामुळे मोठी कुचंबना झाली आहे. त्यांना मानसिक धक्का बसला असून भविष्य अंधकारमय झाले आहे. तरी राष्ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी विद्यालय, अडकूरच्या संस्थाचालक व संचालक मंडळाची कसून चौकशी व्हावी. सर्व परिस्थिती पाहता या बोगसगिरीची कल्पना सर्वच संचालकांना होती तरीही वैयक्तिक स्वार्थापोटी आम्हा सर्व विद्यार्थ्यांचा नाहक बळी दिला जात आहे.

निवेदनावर प्रशांत पाटील, पंकज घाटगे, अजय कांबळे, अमोल कांबळे, शरद नाईक, किसन नाईक, अजित पाटील, विक्रम कोरजकर, विजय रणवरे, संकेत पाटील, दशरथ दळवी, लखन गावडे यांच्यासह ३४ विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images