Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पत्ते कुटणाऱ्यांना उमेदवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खासगी सावकारकी तसेच क्लबमध्ये पत्ते कुटणाऱ्यांना भाजप ताराराणी ने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना जनता कधीच साथ देणार नाही, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सदर बाजार, ​सर्किट हाऊस, शाहू कॉलेज या प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजीत सभांमध्ये ते बोलत होते.

पाच वर्षांत राष्ट्रवादीने सदर बाजारासाठी विकासकामे केली आहेत. त्यांना जनता नक्कीच साथ देईल. येथील उमेदवार परिसराचा यापुढेही नक्कीच विकास करतील, असा विश्वास व्यक्त केला. अच्छे दिन येणार असल्याची स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपाच्या महागाईने जनता त्रस्थ झाली आहे. रेशनवर मिळणारे धान्यही बंद करुन तोंडचा घास काढून घेण्याचे पाप केले आहे. त्यांना जनता उत्तर देईल असे सांगितले. यावेळी राजू लाटकर, प्रा. जयंत पाटील यांची भाषणे झाली.

दरम्यान, ज्यांनी महापौरपदासाठी ज्यांनी ताराराणी आघाडीशी काडीमोड घेऊन आमदार मुश्रीफ यांचे पाय धरले. त्यांनी अगोदर निष्ठा तपासावी, मगच आमच्या नेत्यांवर टीका करावी असा टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल माने यांनी माजी महापौर सुनील कदम यांना लगावला. त्यांनीच लाचखोर महापौर तृप्ती माळवी यांना पाठिंबा देऊन नैतिकता दाखवून दिली आहे. त्यांना जनता कधीच माफ करणार नाही, असेही सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विकासाच्या मुद्यांचा अभाव

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रभागात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यमान नसरसेवक या समस्या सोडवण्यात कमी पडले आहेत. आपले कर्तृत्व जनतेसमोर येऊ नये, यासाठी भाजप-ताराराणीवर तथ्यहीन आरोप करत आहेत. विरोधकांकडे विकासाचा मुद्दा नसल्याने त्यांच्या टीकेतून अभिप्रेत होत असल्याचा टोला आमदार अमल महाडिक यांनी लगावला. भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभा व पदयात्रेत बोलत होते.

आमदार महाडिक म्हणाले, महापालिकेच्या अनेक प्रभागात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत आहे. धनशक्तीच्या माध्यमातून निवडणुकीत विजय मिळवून सत्ता हस्तगत करण्याचा डाव खेळला जात आहे. अशा कुटनितीमध्ये विरोधक यशस्वी झाल्यास पुढील पाच वर्षे समस्या कायम राहतील. महापालिकेच्या गेल्या पाच वर्षातील नियोजनशून्य कारभारामुळे शहर 'स्मार्ट सिटी'मधून वगळले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाठी केंद्र, राज्य त्याचप्रमाणे महापालिकेतही सत्ता आवश्यक आहे. तकलादू योजना शहरवासियांच्या माथी मारुन शेकडो कोटी रुपयांची विकास कामे झाल्याचा दावा केला जात आहे.

कोल्हापूरच्या मुलभूत व सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवून शहराशी संबंधीत प्रश्न मार्गी लावण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीला सामोरे जात आहे. प्रत्येक प्रभाग शहर समजून विकासकामे केली जातील. नियोजनच्या अभावामुळे महापालिकेची काँग्रेस, राष्ट्रवादीने दुर्दशा केली असल्याचा आरोप पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजेंद्रनगरमध्ये बहुरंगी लढत

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजेंद्रनगरमध्ये काँग्रेस विरूद्ध राष्ट्रवादीची खरी लढत दिसून येत असून यंदाची निवडणूक ही बहुरंगी लढत आहे. यादीत नाव नसल्याने तर काहींचा दाखल ‌न मिळाल्याने या निवडणुकीतील काहींची‌ संधी हुकली आहे. या प्रभागात काँग्रेसचे लाला भोसले आणि राष्ट्रवादीचे मुश्ताक मलबारी या उमेदवारांना दिग्गज नेत्यांचा पाठिंबा असल्यामुळे दोन्ही पक्ष आपली पुरेपुर ताकद लावण्याचा प्रयत्न करत आहेत.

काँग्रेस पक्षाकडून लाला शिवाजी भोसले, राष्ट्रवादीकडून मुश्ताक मुसा मलबारी, शिवसेनेचे मोहन मोरे, आरपीआयचे अशोक भंडारी, रासपचे अमित शिवमूर्ती पाटील, भाकपचे सुभाष वाणी आणि कोणत्या पक्षात आपला निवाडा न लागल्यामुळे अखेर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात प्रशांत डवरी उभे राहिले आहेत. या प्रभागात प्रा. जयंत पाटील याचे वर्चस्व असल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद इतर उमेदवारांच्या तुलनेत अधिक आहे. राष्ट्रवादीचे मलबारी यांना प्रा.जयंत पाटील यांच्याबरोबरच शक्ती ग्रुप व जय भवानी मंडळ अशा दोन मोठ्या मंडळांचा पाठिंबा मिळाला आहे. तर या प्रभागात ‌‌शिवसेनेला आणि आरपीआयला स्थानिक उमेदवार मिळाला नाही.

शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांपैकी मयूर पाटील यांचे यादीत नाव नसल्याने तर शशिकांत पाटील यांना दाखला ‌न मिळाल्याने तसेच लहू ताटे यांचा पत्ता कट झाला आहे. राष्ट्रवादी -जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराला अधिक महत्त्व आले आहे. तर अशोक भंडारी यांचेही नाव चर्चेत आहे. नव्या भागरचनेमुळे राजेंद्रनगरमधील उत्तरेकडील परिसर कमी झाला असून पूर्वेकडील काही भाग वाढला आहे.

या प्रभागातील इच्छुकांनी प्रचाराच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केला जात असून या भागात संपर्क कार्यालय उभारण्यात आले आहे. मतदारांना मत देण्याचे आवाहन करण्यासाठी सकाळी ८ पासून रात्री ९ पर्यंत लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे’

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे,' असा टोला काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी खासदार विनायक राऊत यांना लगावला. सत्ताधाऱ्यांना कोल्हापूरच्या विकासासाठी निधी देण्यासाठी त्यांचा कुणी हात अडविला होता ? युती सरकारने स्मार्ट सिटी, तीर्थक्षेत्र विकासासह फसवी टोलमुक्ती केली आहे. स्मार्ट सिटीचे क्रेडिट घेण्यासाठी पालकमंत्री यांनी एकतरी बैठक घेण्याची गरज असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगाविला.

काँग्रेस हा पक्ष संपलेला आहे. दहा वर्षे हा पक्ष उभारी घेऊ शकत नाही, अशी टीका शिवसेनचे खासदार विनायक राउत यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पाटील म्हणाले, 'आमच्यावर टीका करण्यापेक्षा शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे. सत्तेत असतानाही शिवसेनेला काहीच करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बिनबुडाची टीका शिवसेनेने करु नये.' विविध विकासकामांसाठी निधी कोठून आणणार या प्रश्नावर पाटील म्हणाले, 'देशात अनेक राज्यात काँग्रेस विरोधी पक्षात असला तरी विकासकामांचा निधी खेचून आणला. केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असली म्हणजे निधी मिळणार नाही, असे नाही. सत्ता आली नाही तर निधी देणार नाही, असे भाजप-शिवसेनेने जाहीर करावे. निधी देणार नाही, म्हणजे हा ब्लॅकमेल करण्याचा प्रकार आहे.'

मालोजीराजे आमच्यासोबतच

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावेळी माजी आमदार मालोजीराजे उपस्थित नव्हते. त्याबाबत सतेज पाटील म्हणाले, 'मालोजीराजे आमच्या सोबतच आहेत. काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्याबाबतची कल्पना जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना दिली होती. ते काँग्रेससोबत सक्रिय आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू समाधीस्थळाच्या कामास प्रारंभ

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टाऊन हॉल परिसरातील नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या कामास प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. एक वर्षात समाधी स्थळाचा पहिला टप्पा पूर्ण होण्याची शक्यता आहे. महापालिकेने समाधीस्थळासाठी ६७ लाखाचा निधी मंजूर केला आहे.

तीन महिन्यापूर्वी समाधीस्थळ कामाचा शुभारंभ झाला असून काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष कामास सुरूवात झाली आहे. ५५ फूट लांब व ५५ फूट रूंद जागेवर काळ्या दगडातील चबुतरा बांधण्यात येणार आहे. या चबुतऱ्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू झाले आहे. पाच ते सात फूट उंचीच्या चबुतऱ्यावर समाधीस्थळाकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर मेघडंबरी बांधण्यात येणार आहे. मेघडंबरीला जाळीदार पडदा बांधण्यात येणार आहे.

समाधीस्थळ विकसित करण्यासाठी साडेपाच कोटी रूपये खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात महापालिकेने ६७ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अर्किटेक्ट अभिजित जाधव कसबेकर यांनी समाधीस्थळाचा आराखडा केला असून विखे पाटील यांच्याकडे काम देण्यात आले आहे. समाधीस्थळाभोवती लॅन्डस्केप, कंपाऊंड वॉल, शिवाजी महाराज व ताराराणी मंदिर परिसर सुशोभिकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभारंभात छोटे सभागृह, व्यायामशाळा व ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निधी उभारावा लागणार आहे. नर्सरी बागेत राजर्षी शाहू महाराजांची समाधी बांधावी अशी मागणी २०१२ मध्ये इतिहास संशोधक इंद्रजित सावंत व अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी तत्कालिन महापौर जयश्री सोनवणे यांच्याकडे केली. त्यानंतर या मागणीला जोर आला. सर्वसाधारण सभेत समाधी बांधण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. नर्सरी बागेत शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराबाई यांची मंदिरे बांधली आहेत. या मंदिरांशेजारी महापालिकेच्या जागेत शाहू समाधीस्थळ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या जागेवरील ग्रीन झोनचे आरक्षण बदलण्यात थोडा कालावधी गेल्यानंतर दीड वर्षापूर्वी तत्कालिन स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण व अदिल फरास यांनी स्मारकांसाठी भरीव निधीची तरतूद केली. तीन महिन्यापूर्वी समाधीस्थळाच्या कामाचे उद्भघाटन झाले. प्रत्यक्षात गेल्या आठवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे. चबुतऱ्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू झाले आहे.

रघुनाथ पंडित यांची समाधी ...

रघुनाथ पंडित हे शाहू महाराजांचे स्नेही होते. त्यांच्या निधनानंतर महाराजांनी आपल्या समाधीजवळ पंडीत महाराजांची समाधी व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. पण प्रत्यक्षात महाराजांचे समाधीस्थळ उभारले नसल्याने पंडीत यांची समाधी उभारली गेली नव्हती. शाहू समाधीजवळ पंडीत यांची समाधी उभारण्यात येणार आहे.

शाहू समाधीस्थळ उभारणीसाठी पाच ते सहा कोटी खर्च अपेक्षित आहे. पण पहिल्या टप्प्यात समाधीस्थळ उभारण्यात येणार आहे. पाया, चबुतरा व मेघडंबरी असे समाधीस्थळाचे स्वरूप असून हे काम चार ते पाच महिन्यात पूर्ण होणार आहे. - एस.के. पाटील, उपशहर अभियंता, शिवाजी मार्केट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानाचा शालू विष्णूमाता म्हणून स्वीकारला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तिरूपती बालाजीकडून गेले २० वर्षे श्री अंबाबाईसाठी येणारा मानाचा शालू हा विष्णूपत्नी या नात्याने येत होता. पतीकडून आलेले मानाचे वस्त्र म्हणून अंबाबाईला हा शालू विजयादशमी दिवशी नेसवला जात होता. मात्र गेल्या काही काळापासून अंबाबाईचे पार्वती हे मूळ रूप बदलून तिचे लक्ष्मीकरण करण्याचा घाट घातला जात आहे . या पार्श्वभूमीवर हा मानाचा शालू 'विष्णूमाता' या नात्याने स्वीकारला जात असल्याचे देवस्थान समितीतर्फे सदस्या संगीता खाडे यांनी जाहीर केले.

करवीर निवासिनी अंबाबाई ही पार्वतीचे रूप आहे. मात्र गेल्या तीन ते चार वर्षापासून अंबाबाई ही लक्ष्मीचे रूप असल्याचे सांगून काही लोकांकडून चुकीचा इतिहास रचला जात असल्याच्या तक्रारी अंबाबाईसंदर्भात मूर्ती व प्राचीन इतिहास संशोधकामार्फत केल्या जात होत्या. अंबाबाई ही तिरूपती बालाजीची पत्नी असून ती रूसून करवीरात आली आहे आणि आपल्या पत्नीसाठी दरवर्षी बालाजी महावस्त्र पाठवतो अशी आख्यायिकाही जोडली जात होती. मात्र तिरूपती बालाजीची पत्नी ही अंबाबाई नसून पद्मावती असल्याचे अभ्यासकांनी पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे.

अंबाबाई मूर्तीची झीज झाल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी मूर्तीवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेनंतर मूर्तीची अंबाबाई असल्याची ओळख दाखवणारी मस्तकावरील नागमुद्रा घडवलीच नसल्याचे उघड झाले. नागमुद्रा हे प्रतीक पार्वती अर्थात अंबा असल्याची खूण असताना नागमुद्रा न घडवल्याचे तीव्र पडसाद कोल्हापुरात उमटले. त्यामुळे अंबाबाई की महालक्ष्मी असा मतप्रवाहदेखील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नवरात्रोत्सवापूर्वी दोन महिने आधीच करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूळ स्वरूपाबाबत चर्चेला उधाण आल्यामुळे नवरात्रोत्सवात बालाजी देवस्थानकडून येणारा मानाचा शालू कोणत्या नात्याने स्वीकारला जाणार याबाबतही उत्सुकता होती.

करवीर निवासिनी अंबाबाई भक्त मंडळातर्फे 'शोध अंबाबाईचा' या विषयावर डॉ. राजेंद्र कुंभार यांचे व्याख्यान कोल्हापुरात घेण्यात आले. या व्याख्यानाच्यानिमित्ताने अंबाबाईच्या मूळ रूपावर पुराव्यानिशी डॉ. कुंभार यांनी प्रकाशझोत टाकला. अंबाबाई ही शक्तिरूप असून तिच्या मूर्तीमध्ये घडवण्यात आलेली आयुधे, नाग, सिंह, म्हाळुंग यामध्येच ती पार्वतीचे रूप असल्याचे दाखले असल्याचे डॉ. कुंभार यांनी स्पष्ट केले होते. ही व्याख्यानमालिका कोल्हापुरात अखंड सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंबाबाईला जाणीवपूर्वक महालक्ष्मी असे नामकरण करण्याचा डाव काही लोकांनी मांडला आहे. अंबाबाईचा इतिहास वाचला तर ही गोष्ट चुकीची आहे हे लक्षात येते. अंबाबाईला महालक्ष्मी बनवून तिरूपती बालाजीशी पत्नीचा संबंध लावत श्रीपूजकांनी आपली झोळी भरून घेतली आहे. यापुढे ही मक्तेदारी खपवून घेतली जाणार नाही. - वसंतराव मुळीक, अध्यक्ष, भक्त मंडळ

आजपर्यंत देवीची नेमकी ओळख पुराव्यांमधून उजेडात न आल्यामुळे बालाजीची पत्नी म्हणून शालू स्वीकारला जात होता. मात्र, अभ्यासकांनी दिलेल्या दाखल्यानुसार अंबाबाई ही पार्वतीचे रूप असल्याची भूमिका देवस्थानने घेतली असून मुलाकडून आईसाठी महावस्त्र भेट म्हणून हा शालू यापुढे स्वीकारला जाणार आहे. - संगीता खाडे, सदस्या, देवस्थान समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज शाही दसरा सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा चौक मैदानावर गुरूवारी होणाऱ्या शाही सीमोल्लंघन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करण्यात येणार आहे. हजारो कोल्हापूरकरांच्या साक्षीने सायंकाळी सहाच्यादरम्यान होणाऱ्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संस्थानकाळातील मानकरी, सरकार, सरदार घरण्यातील वारसदारांना निमंत्रीत केले आहे.

दरम्यान, शारदीय नवरात्रोत्सवातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईला दरवर्षी तिरूपती देवस्थानमार्फत देण्यात येणाऱ्या महावस्त्राची (शालू) बुधवारी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरच्या आठ जणांना ‘शिवछत्रपती’

$
0
0

म. टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर दसरा सणाच्या पूर्वसंध्येला बुधवारी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. २०१२-१३ आणि १३-१४ या वर्षांसाठीच्या क्रीडा जीवनगौरव, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, संघटक आणि खेळाडूंचा यात समावेश आहे. क्रीडानगरी असा लौकिक असणाऱ्या कोल्हापुरातील दोन क्रीडा संघटकांसह सहा खेळाडूंसह आठ जणांना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

२०१२-१३ चा क्रीडा संघटक पुरस्कार राजाराम शेटगे यांना तर खेळाडूत जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाजपटू राही सरनोबत, कुस्तीपटू रणजीत नलवडे, हॅण्डबॉलपटू उज्ज्वला जाधव यांचा समावेश आहे. सन २०१३-१४ साठीचा क्रीडा संघटक पुरस्कार निवृत्ती भेरट यांना जाहीर झाला आहे. कुस्तीपटू विशाल माने व वेटलिफ्टींगपटू चंद्रकांत माळी यांचा समावेश आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासाठी रमेश विपट (२०१२-१३) आणि गणपतराव माने (२०१३-१४) यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा आघाडीचा जलतरणपटू वीरधवल खाडेला २०१३-१४ या वर्षीचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

मुख्य म्हणजे २०११मध्ये त्याला अर्जुन पुरस्कार देण्यात आला होता. शिवछत्रपती पुरस्कारापासून तो वंचित राहिला होता. पुरस्कार निवड समितीतही वीरधवलचा समावेश होता हे विशेष. त्यामुळे अर्जुन पुरस्कार‌ मिळाल्यानंतर छत्रपती पुरस्कार जिंकणारा आणि निवड समितीत स्थान मिळविणारा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून हा राज्य पुरस्कार जिंकणारा वीरधवल पहिला खेळाडू ठरला. २०१३-१४च्या पुरस्कारांत जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक हरीश परब, अॅथलिट श्रद्धा घुले याची निवड करण्यात आली आहे.

२०१२-१३ च्या शिवछत्रपती साहसी क्रीडा पुरस्कारासाठी पल्लवी वर्तक, मुंबई तर २०१३-१४ च्या साहसी क्रीडा पुरस्कारासाठी उमेश झिरपे, पुणे यांची निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे २०१२-१३ च्या एकलव्‍य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) नागपूरच्या रोशनी रिनके या खेळाडूला पॉवरलिफ्टींग मध्ये तर पुण्याच्या अमोल बोरीवाले या खेळाडूला मैदानी तिरंदाजीसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच २०१३-१४ च्या एकलव्‍य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) साठी नागपूरची वैशाली थुल या खेळाडूला मैदानी, टेबल टेनिस, तलवारबाजी त्याचप्रमाणे नागपूरच्या विपीन ईटनकर या खेळाडूला मैदानी टेबल टेनिस, तलवारबाजी व पॉवरलिफ्टींग या खेळासाठी पुरुष गटात निवड केली.कोल्हापूरच्या आठ जणांना 'शिवछत्रपती'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फटाके न वाजविण्याची प्रतिज्ञा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिवाळीत फटाके वाजवून पैशांचा अपव्यय तसेच आरोग्याला धोका पोहचवण्यापेक्षा त्या फटाक्यांवर खर्च होणारे पैसे वाचवून सकारात्मक, पर्यावरणपूरक काम करण्यासाठी देण्याची प्रतिज्ञा येथील बाळासाहेब खराडे संस्थेच्या शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी घेतली. पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले असून त्यातील निम्म्या मुलांकडून हा उपक्रम अंगीकारला जातो. या उपक्रमाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.

फटाक्यांच्या प्रचंड किंमतीमुळे वारेमाप पैसे खर्च होतातच. शिवाय त्याच्यातून होणारे हवेचे प्रदूषणही वेगळेच. त्याचे ध्वनीप्रदूषण हा तिसरा फटका. अशा केवळ विनाकारण खर्च व आरोग्याला घातक असलेल्या फटाक्यांना फाटा देण्यासाठी शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून उपक्रम राबवला जात आहे. 'पेटता फटाकडी होते पैशाची नासाडी' या नावाखाली ​कलाशिक्षक मिलिंद यादव यांनी उपक्रम राबवला. त्यामध्ये प्रथम मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना सामावून घेतले. त्यातून जमा होणाऱ्या पैशातून शाळेतील आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी नवीन कपडे घेऊन दिले. यंदा पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून फटाके उडवणार नाही, त्याच पैशातून सकारात्मक पर्यावरणपूरक काम करेन असे प्रतिज्ञापत्र घेतले. त्यासाठी विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेतला. त्यापूर्वी श्याम बेनेगल यांचा 'रखडलेले बालपण' हा चित्रपट दाखवण्यात आला. लहान मुले कशाप्रकारे बालपण हरवून बसतात हे विद्यार्थ्यांना भावल्याने अनेकांनी अशा मुलांसाठी मदत करण्यासाठी फटाके न उडवण्याचा निर्धार केला. यानुसार किमान ५० टक्के विद्यार्थ्यांकडून फटाके न उडवण्याची अपेक्षा यादव यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साठेबाजांना हादरा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकारने जारी केलेल्या नियंत्रण आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी बुधवारी(ता.२१) दिवसभरात शहरासह जिल्ह्यात २९५ ठिकाणी डाळी आणि खाद्यतेलाचे साठे तपासले. या तपासणीत उजळाईवाडी येथे ११८६ क्विंटलचा अतिरिक्त खाद्यतेलाचा साठा आढळला. छाप्यात सुमारे एक कोटींचा साठा जप्त केला आहे. नियंत्रण आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन परवानेधारकांवर फौजदारी गुन्ह्यासह परवाना रद्दची कारवाई रात्री उशिरार्यंत सुरू होती.

मर्यादेपेक्षा जास्त खाद्यतेल साठा असल्याच्या संशयावरून उजळाईवाडी येथील अदानी विल्मर लिमिटेड आणि गोल्डन व्हॅली अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या दोन फर्मच्या एकत्रित गोडावूनवर छापा टाकण्यात आला. छाप्यात ११८६.४० क्विंटल खाद्यतेल आढळून आले. नियमानुसार दोन्ही कंपन्यांना ६०० क्विंटल साठा करण्याची परवानगी असताना या दोन्ही कंपन्यांनी नियमांचा भंग केल्याने पुरवठा अधिकाऱ्यांनी खाद्यतेल ताब्यात घेतले. हा सर्व साठा सुमारे एक कोटी रुपयांचा आहे. अदानी विल्मर आणि गोल्डन व्हॅली या दोन्ही फर्मचे परवाने रद्द करण्याची कारवाई पुरवठा अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे, तर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन्ही फर्मच्या मालकांवर गोकुळ शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

देशभरात डाळींच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने केंद्र सरकारने तीन दिवसांपूर्वीच जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत नियंत्रण आदेश लागू केला आहे. या आदेशान्वये कोल्हापूर जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी प्रांत, तहसीलदार आणि पुरवठा विभागाच्या अव्वल कारकुनांना साठे तपासणीच्या सूचना दिल्या होत्या. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात २९५ ठिकाणी तपासणी करण्यात आली. सर्वच ठिकाणी डाळींचे साठे मर्यादित प्रमाणात आढळले आहेत. पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी त्यांच्या पथकासह शहरातील मॉल्स आणि मार्टमध्येही तपासणी केली. शहरातील धान्य व्यापारी आणि मोठ्या मॉल्समध्ये डाळींचे साठे नियमानुसारच असल्याचे तपासणीत निदर्शनास आले आहे.

जिल्ह्यात डाळींसह खाद्यतेलाचे अतिरिक्त साठे निदर्शनास आल्यास पुरवठा विभाग, महसूल विभागातील कर्मचारी आणि अधिका-यांना माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केले आहे. सध्याची कारवाई दिवाळीपर्यंत सुरू राहणार आहे. अतिरिक्त साठे करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती आगवणे यांनी दिली आहे. उजळाईवाडी येथील कारवाईत जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, करवीरचे तहसीलदार योगेश खरमाटे, मनोज पाटील यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत देशभरात ३२९० ठिकाणी साठेबाजांवर छापे मारून ३६ हजार टन तूरडाळीचा साठा जप्त केला आहे. आयात केलेल्या डाळीबरोबरच हा जप्त करण्यात आलेला साठा बाजारात आल्यास डाळीचे भाव कमी होण्यास मदत होणार आहे.

३६ हजार टन डाळ जप्त

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत देशभरात तीन हजार २९० ठिकाणी साठेबाजांवर छापे मारून ३६ हजार टन तूरडाळीचा साठा जप्त केला आहे. आयात केलेल्या डाळीबरोबरच हा जप्त करण्यात आलेला साठा बाजारात आल्यास डाळीचे भाव कमी होण्यास मदत होणार आहे. तूरडाळीच्या भावाने सध्या २१० रुपये किलोचा उच्चांक नोंदवला आहे.

कोणी काय केले?

दिल्लीत केंद्रीय भांडार आणि सफल या मदर डेअरीच्या दुकानांत मिळून ५०० ठिकाणी तूरडाळीची १२० रुपये किलो दराने विक्री

उत्तराखंडमध्ये डेहराडून, हरिद्वार, उधमसिंगनगर येथे बाजार समित्यांकडून १४५ रुपये किलो दराने डाळविक्रीसाठी विशेष दुकाने

हरियाणा स्टेट को ऑपरेटिव्ह बोर्डाला (हाफेड) त्यांच्या आउटलेटद्वारे विक्री करण्याची केंद्राची सूचना

डाळ शिजेना?

राज्यात पडलेला अवकाळी पाऊस आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांची पिके वाया गेल्याने बाजारात कडधान्यांची टंचाई जाणवत आहे, परिणामी डाळींची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. डाळींच्या दरवाढीचा परिणाम कोल्हापुरातही जाणवू लागला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तूर डाळीचे दर ८० रुपयांपासून तब्बल २२० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. इतर डाळींच्या दरातही २५ ते ३० टक्के दरवाढ झाली आहे.

साठेबाजांवर कारवाईला सुरूवात

केंद्र सरकारच्या नियंत्रण आदेशानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यापारी आणि मोठ्या मॉल्सवर छापे टाकून साठे तपासणीचे काम सुरू केले आहे. बुधवारी जिल्ह्यात २९५ ठिकाणी तपासणीचे काम झाले असून, यात दोन परवानाधारकांवर क्षमतेपेक्षा अधिक खाद्यतेलाचा साठा आढळल्याने कारवाई करण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांकडील डाळींचा साठा मर्यादा

शहर वर्गवारी साठा मर्यादा (क्लिंटलमध्ये)

महानगरपालिका क्षेत्र ३५०० (होलसेल) २०० (किरकोळ)

अ वर्ग महापालिका २५०० (होलसेल) १५० (किरकोळ)

नगरपालिका व इतर १५०० (होलसेल) १५० (किरकोळ)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पानसरेंवर दोन बंदुकांतून गोळीबार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावर दोघा हल्लेखोरांनी दोन बंदुकांतून अगदी जवळून गोळ्या झाडल्याचे बॅलेस्टिक रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनीच पानसरेंवर गोळीबार केल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली आहे. दोन्ही हल्लेखोर पुरुष होते, की त्यात एक महिलाही होती, हेही सीसीटीव्ही फुटेजवरील अहवालात स्पष्ट झाले आहे.

१६ फेब्रुवारी २०१५ ला सकाळी सव्वानऊच्या सुमारास हा हल्ला झाला होता. पोलिसांना घटनास्थळी पाच पुंगळ्या सापडल्या होत्या. चार पुंगळ्या जमिनीवर तर एक पुंगळी सागर शिक्षण संस्थेच्या भिंतीला लागली होती. हल्लेखोरांनी पाच राउंड फायर केले होते. पानसरे यांच्या मानेत आणि छातीत गोळी घुसली होती तर एक गोळी कमरेजवळून घासून गेली होती. पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्या डोक्यालाही एक गोळी चाटून गेली होती.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे संशयित असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या पुंगळ्या पुणे, मुंबई व गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबला तपासासाठी पाठवल्या होत्या. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात पाचही पुंगळ्यात थोडा फरक जाणवला आहे. त्यामुळे पानसरे यांच्यावर दोन बंदुकांतून गोळ्या झाडल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही बंदुका गावठी बनावटीच्या होत्या. मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार व नेपाळ सीमेवर गावठी बंदुकांची विक्री होत असते. त्यामुळे हल्लेखोरांनी गावठी बंदुकीचा वापर केला होता हे स्पष्ट झाले आहे.

पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेला सनातनचा प्रमुख साधक समीर गायकवाड यांच्या आवाजाच्या नमुन्याची तपासणीही फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आली. गायकवाडच्या ठाण्यातील खोलीत जप्त केलेल्या साहित्यात पोलिसांना तपासाच्या दृष्टीने चांगली माहिती मिळाली आहे. त्यातच बॅलेस्टिक रिपोर्टमध्ये हल्लेखोर दोन असल्याने गुन्ह्यातील दोन बंदुका जप्त करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. हल्लेखोर दोन असल्याने त्यांना शोधण्यासाठी एसआयटीने युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू केली आहे.

झब्बा घातलेली व्यक्ती पुरुषच!

सीसीटीव्ही फुटेजचा लंडन फॉरेन्सिककडून आलेला अहवाल मिळाला आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून मोटारसायकलवर मागे बसलेली संशयित महिला असावी असा पोलिसांचा अंदाज होता. पण मागे बसलेल्या व्यक्तींना झब्बा घातलेला असल्याने दोन्ही हल्लेखोर पुरुषच असावेत यावर पोलिसांचे एकमत होऊ लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरोगामी नेते हुसेन जमादार यांची आत्महत्या

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाईचारा संघटनेचे अध्यक्ष हुसेन जमादार यांनी आज सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ते ६७ वर्षांचे होते. पुरोगामी मुस्लिम चळवळीत त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.

जमादार यांनी हमीद दलवाई यांच्या सोबत मुस्लिम पुरोगामी समाजासाठी काम सुरू केले होते. कोल्हापूरातील मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या सुधारणेसाठी ते गेल्या ४० वर्षापासून काम करत होते. मुस्लिम समाजातील तलाक पीडित महिलांचे केंद्र सुरू केले होते. या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम करत होते. कोल्हापूरातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची संघटना तयार करून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम जमादार यांनी सुरू केले होते.

एड्स प्रबोधनासाठी जनजागृती केंद्र जमादार यांनी सुरू केले होते. दोन वर्षापूर्वी मुस्लिम सत्यशोधक मंडळाला सोडचिट्ठी देत त्यांनी भाईचारा ही संघटना सुरू केली होती. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी कोल्हापूरात प्रबोधन परिषद घेतली होती.

४० वर्षापासून मुस्लिम समाजासाठी काम करत असताना त्यांच्याकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याने गेल्या वर्षभरापासून ते निराश होते. त्यातून त्यांनी आज पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

शहाबानो प्रकरणी न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी कोल्हापूर ते दिल्ली पायी मोर्चा काढून पाठिंबा दिला होता. सर्वोद्य सेवा संघ, राष्ट्र सेवा दल, खादी ग्रामोद्योग, स्वातंत्र्य सैनिक संघटना अशा अनेक संघटनांच्या माध्यमातून ते सक्रीय होते. आंतरभारती शिक्षण मंडळात त्यांनी अनेक वर्ष शिक्षक म्हणून काम केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ताराराणी’ला स्वतःचाच आधार

$
0
0

अपक्षांवर अवलंबून राहण्याचे राजकारण आले संपुष्टात

Udaysing.Patil@timesgroup.com

एका प्रभागात दोन, काही वेळेस तिघांना रसद. त्यातून निवडून येईल तो आपला असे समीकरण अवलंबत आतापर्यंत महापालिकेत सत्ता घेतली. पण आता विविध पक्षांच्या स्पर्धेत उतरलेल्या ताराराणी आघाडीला यंदा मात्र ठरवलेल्या उमेदवारालाच निवडून आणण्याचे आव्हान पेलायचे आहे. आता एक पराभूत झाला तर दुसरा नगरसेवक मिळण्याची किंवा अपक्षही हाताला लागण्याची चिन्हे नाहीत.

महापालिकेत पक्षीय राजकारण नव्हते. त्यावेळी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ताराराणी आघाडीने सत्ता उपभोगली. त्यासाठी महाडिक यांचे सारे आपलेच घोडे असे समीकरण यशस्वी ठरले. प्रत्येकाला अंधारात ठेवून प्रत्येकाला मदत करण्याचे धोरणही महाडिक यांनीच राबवले. त्यामुळे प्रथम क्रमांकाचा उमेदवार कदाचित पराभूत झाला तर त्यानंतरचा उमेदवार महाडिक यांनाच नमस्कार करत मदत करत होता. महाडिक यांना या नगरसेवकांमुळेच विधानपरिषदेचे अपेक्षित संख्याबळही गाठता येत होते. पण गेल्या दोन निवडणुकांपासून पक्षीय राजकारणाचा समावेश होऊ लागला तसा अपक्षांवरील भरवसा कमी होऊ लागला. गेल्या निवडणुकीत तरी अपक्षांना स्थान न मिळाल्याने सत्तेसाठी या अपक्षांना कसलीही तडजोड करत पक्षांशी जोडावे लागले.

यंदा भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह ताराराणी आघाडी हे सारे पक्ष स्वतंत्र लढत असल्याने अनेक ठिकाणी काही पक्षांना योग्य ते उमेदवार मिळाले नाहीत. त्यामुळे अपक्षांची संख्या कमी झाली. जे काही अपक्ष आहेत, त्यातील काही अपवाद सोडल्यास ताकदवानही नाहीत. त्यामुळे निवडून येणारे अपक्ष सत्तेचा तराजू झुकवू शकतील, असे अजिबात वाटत नाही. या परिस्थितीमुळे मात्र ताराराणी आघाडीची कोंडी झाली आहे. ज्यांनी आतापर्यंत अपक्षांच्या जिवावर व एकाच प्रभागातील उमेदवारांना एकमेकांना झुंजवण्याची पद्धती अवलंबली. त्यांना यावेळी मात्र जे उमेदवार दिले, त्यांच्यावरच अवलंबून रहावे लागणार आहे. ते उमेदवार निवडून आले नाहीत तर ते दुसऱ्या उमेदवारांना घेण्यास अडचण येणार आहे. तसे विजयी उमेदवार घेतले तर उमेदवारी दिलेल्या इच्छुकांचा विश्वासघात केल्याचेच स्पष्ट होईल. कदाचित त्यासाठीही काही गेम खेळला गेला का यांची शंका निर्माण होणार आहे.

निवडणुकीमध्ये भाजपसोबत आहे. ते आपले उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशावेळी त्यांच्याकडून ताराराणी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात वैयक्तिकरित्या किती उतरणार हे आगामी कालावधीत समजणार आहे. मुश्रीफ यांच्या टिकेला ताराराणी आघाडीकडून माजी महापौर सुनील कदम यांना उत्तर द्यावे लागले. यामुळे ताराराणी आघाडीच्या मदतीला फार फार तर आमदार अमल महाडिक उतरू शकतात. आमदार महादेवराव महाडिक थेट उतरु शकत नाहीत. ही अडचणही आघाडीला त्रासदायक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता राज्यपातळीवरील नेत्यांची टोलेबाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षांचे स्थानिक नेते, मंत्री, उमेदवारांनी आठवडाभरात प्रचारसभांमधून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात केल्यानंतर आता प्रचाराचा पुढील टप्पा गाजवण्यासाठी राज्यपातळीवरील नेते शहरात दाखल होत आहेत. महसूल मंत्री एकनाथ खडसे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुक्रवारच्या सभांनंतर राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे नेते पुढील सात दिवस प्रचार शिगेला पोहचविणार आहेत. त्यामुळे गल्लीबोळातील फेऱ्यांबरोबर शहरातील चौकांमध्ये, मैदानांमध्ये या नेत्यांचा आवाज घुमणार आहे.

गेले २२ दिवस इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक, पक्षांचे स्थानिक नेते, आमदार कार्यरत होते. त्यांनी आपापल्या पातळीवर प्रचार सुरू केला होता. गेल्या दोन आठवड्यांत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराची पत्रके घराघरात पोहोचू लागली. चिन्हे मिळाल्यानंतर थेट रस्त्यावर फलक, रॅलीतून प्रचाराला सुरुवात केली. त्यापाठोपाठ स्थानिक नेत्यांच्याही सभा सुरू झाल्या. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार अमल महाडिक यांच्याबरोबर स्थानिक कारभाऱ्यांनी सभांमधून एकमेकांवर आरोपाला सुरुवात केली. प्रत्येकाने विरोधकांना टार्गेट करुन आक्रमक भाषणबाजी सुरू केली.

राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन झाले. दसरा झाल्यानंतर शुक्रवारपासून राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा शहरातील विविध भागात आयोजित केल्या. त्यामध्ये महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी चार विविध भागांत, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची क्रशर चौकात सभा झाली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पतंगराव कदम या ज्येष्ठ नेते मंडळींबरोबर प्र​णिती शिंदे यांच्यासह अन्य काही नेत्यांच्या सभांचे नियोजन केले जात आहे. राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या सभाही घेण्याचे नियोजन आहे. शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे रविवारी येत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित केली आहे. भाजपचे मंत्री प्रचारासाठी टप्प्याटप्प्याने येत आहेत. ३० ऑक्टोबरला प्रचार समारोप होत आहे. त्यापूर्वी जास्तीत जास्त नेते प्रचार सभांसाठी उपलब्ध व्हावेत यासाठी स्थानिक नेतेमंडळी नियोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्षतीर्थमध्ये कार्यालय फोडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

​निवडणुकीच्या प्रचाराची रंगत वाढू लागली असताना राजकीय ईर्ष्येनेही डोके वर काढले आहे. गुरुवारी रात्री प्रभाग क्रमांक ५१ लक्षतीर्थ वसाहत येथील ताराराणी आघाडीच्या उमेदवार शिवानी संजय पाटील यांचे कार्यालय अज्ञातांनी फोडले. लक्षतीर्थ चौकात पाटील यांनी निवडणूक प्रचार कार्यालय सुरू केले आहे. गुरुवारी रात्री तीनच्या सुमारास अज्ञात दहा ते पंधरा जणांनी पाटील यांच्या कार्यालयावर हल्ला केला. हल्लेखोरांनी खिडक्यांच्या काचा दगडांनी फोडल्या.

कार्यालयाजवळ बाटल्यांचा खच पडला होता. हल्ला झाल्याची घटना कळताच पाटील समर्थकांनी कार्यालयाजवळ मोठी गर्दी केली होती. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात या घटनेची तक्रार म्हणून नोंद झाली आहे. खोडकरपणाने कार्यालयावर हल्ला केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. लक्षतीर्थ वसाहत हा संवेदनशील प्रभाग असून या परिसरात टोळीयुद्धाने डोके वर काढले आहे. या प्रभागात निवडणूक चौरंगी असल्याने राजकीय ईर्ष्येने डोके वर काढले आहे. निवडणूक शांततेत होण्यासाठी हल्लेखोरांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोस्टरबाजीची धूम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेची निवडणूक ऐन भरात आली असताना शहराच्या विकासाचा मुद्दा घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी पोस्टरबाजीवर भर दिला आहे. शहर टोलमुक्त, पारदर्शी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, स्मार्ट सिटीकडे वाटचाल असे विकासाच मुद्दे मांडतच विरोधकांवर टिकास्त्रही सोडले आहे. फसव्या आघाडीला दूर करा, अशीही उपरोधिक टीका आणि मार्मिक पोस्टरबाजी राजकीय पक्षांनी केली आहे. स्थानिक नेत्यांसह राष्ट्रीय नेतेही पोस्टरवर झळकत आहेत.

काँग्रेस पक्षाने कोल्हापूरची स्मार्ट सिटीकडे वाटचाल याविषयी गेल्या काही वर्षात नव्याने उभारलेल्या इमारतींच्या माध्यमातून पोस्टर्स प्रदर्शित केली आहे. न्यायसंकुल, जिल्हाधिकारी कार्यालय, केशवराव भोसले नाट्यगृह या इमारतींसह कोल्हापूरची स्मार्ट सिटीककडे वाटचाल सुरू आहे हे पोस्टरमधून मांडले आहे. त्यावर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे छायाचित्र आहे. पाच वर्षात कोल्हापूरचा विकास केवळ काँग्रेसने केला असल्याचे पोस्टर्समधून मांडले आहे.

'महाराष्ट्रासह देशाला नंबर एक बनवू शकतो', असे आश्वासने भाजपने पोस्टरमधून मतदारांना दिली आहेत. महायुतीच्या पोस्टरवर भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी महायुतीलाच विजय करण्याचे आवाहन आहे. केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि कोल्हापुरातदेखील भाजप-ताराराणी पक्ष महायुतीलाच विजयी करा, असे आवाहन करणारे पोस्टर्स झळकले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो त्यावर आहेत. कमळ आणि कपबशीचे चिन्ह आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना आश्वासन दिल्याचेही पोस्टर प्रदर्शित केले आहे. देश बदलतोय. नवंकाही घडतयं.. तुमचं एक मत कोल्हापूरही बदलू शकतं, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.

शिवसेनेने 'टोला आम्हीच देणार', या आशयाची फलकबाजी केली आहे. 'कोल्हापूर शहर टोलमुक्त करणार म्हणजे करणारच...' अशी ग्वाही पोस्टरमधून दिली आहे. 'आम्ही जनतेसोबत... जनता आमच्यासोबत, लढाई शिवसेनेची, स्वाभिमानाची, शिवसेना आपली कामाला पुढे' असा आशयाचे पोस्टर्स शहरभर आहेत. टोलच्या लढाईत शिवसेना अग्रभागी असल्याचे पोस्टरमधून दर्शविले आहे. सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या छायाचित्रासह टोलमुक्तीचे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय आमदार राजेश क्षीरसागर यांच्या फोटोसह 'विळा प्लस भोपळा, दिल्लीत नाकारलं... राज्यात नाकारलं अशा पक्षासोबत कोल्हापुरात आघाडी?, फसव्या आघाडीला ८१ नं पळवून लावूया,' अशी टोलेबाजी शिवसेनेने केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पोस्टरवर 'महाराष्ट्र नव्हे, देशात कोल्हापूरला नंबर एक आम्हीच बनवू शकतो,' 'आम्ही कोल्हापुरी, आम्ही राष्ट्रवादी' अशी वाक्ये आहेत. नूतन जिल्हाधिकारी कार्यालय, केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू खासबाग मैदान, नवीन अत्याधुनिक केएमटी, न्यायसंकुलाची इमारत, आयआरबीची रस्ते अशा केलेल्या कामांची छायाचित्रे त्यांच्या पोस्टर्सवर आहेत. मागील पाच वर्षात आमच्या नगरसेवकांसोबत आम्ही कोल्हापूर शहरात १४५० कोटींचा विकास केला. सत्ता पुन्हा राष्ट्रवादीस दिल्यास कोल्हापूर नंबर वन बनवू ,असे आश्वासन देण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसने मार्मिक टीका करणारी पोस्टरबाजी केली आहे. कळसूत्रीच्या बाहुल्यांचा खेळ मांडत 'महापालिकेत बाहुल्यांचा खेळ पुन्हा बघायचाय? विचार करा, विकास बघा,' असे आवाहन केले आहे. या फलकबाजीची मतदारांत मोठी चर्चा सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाजप शहराचा विध्वंस करेल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आरएसएससारख्या सत्ताबाह्य केंद्राला शरण जाऊन भाजपने महाराष्ट्राची वाटचाल प्रतिगामित्वाच्या दिशेने चालवली आहे. देशभरात दादरी, दलित हत्येतून सामाजिक तणाव वाढवला जात आहे. अशा स्थितीत पुरोगामी कोल्हापूरपण टिकवून काँग्रेसला एकहाती सत्ता दिली नाही तर भाजप आघाडी कोल्हापूरचाही विध्वंस करेल,' असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. सानेगुरुजी वसाहत परिसरातील काँग्रेसच्या उमेदवारांसाठी शुक्रवारी रात्री क्रशर चौकात प्रचार सभा झाली. यावेळी चव्हाण बोलत होते.

महापालिकेच्या निवडणुकीत येथे विचित्र आघाड्या झाल्या असल्या तरी काँग्रेस मात्र एकनिष्ठपणे स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवत असल्याचे सांगत चव्हाण यांनी भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारवर टीकेच्या जोरदार तोफा डागल्या. ते म्हणाले, 'भाजपच्या नवीन सरकारने जुन्या लोकप्रिय

योजनांची नावे बदलली. काही योजना बंद केल्या. काही योजनांचे पैसे दिले नाहीत. या निवडणुकीतील जाहीरनाम्यावर फुले, शाहू, आंबेडकरांचे फोटो न छापून मा​नसिकताच दाखवली आहे.

दादरी असो वा दलित बालकांच्या जळीत प्रकरणानंतर निषेध केला जात नाही, ही त्यांची संवेदनशीलता आहे. आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन त्या विचारांप्रमाणे चालणाऱ्या सरकारच्या ताब्यात

कोल्हापूर देणार का? देशातील सामाजिक तणाव वाढत आहे. मंत्री बेताल वक्तव्य करत आहेत. पण पंतप्रधान काही बोलत नाहीत. त्यामुळे पुरोगामी कोल्हापूरपण टिकवले नाही तर ते कोल्हापूरचाही विध्वंस करतील. या भाजपला प्रादेशिक वाद जाणीवपूर्वक जोपासायची असल्याने ते फक्त अशा संधीची वाट पाहत असतात.'

ते पुढे म्हणाले, 'भाजप सरकार पश्चिम महाराष्ट्राकडे आकसाने पाहत आहे. विदर्भाचा विकास झाला पाहिजे, पण त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय हे चुकीचे आहे. दुष्काळासाठी नवीन कर बसवला असे सां​गितले जात आहे. पण एलबीटी रद्द केल्यानंतर येणारी तूट भरून काढण्याचाच हा प्रयत्न आहे. सध्या काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ३६ हजार टनाचा साठा करणारे कोण, त्याला संरक्षण देणारे अधिकारी कोण त्यांची नावे जाहीर करा. पंतप्रधान सत्तेवर आले ते उद्योगपतींना खूश करण्यासाठीच. त्यामुळे त्या उद्योगपतींच्या उपकाराची आता परतफेड सुरू आहे. थेट पाइपलाइनसारखी योजना, ऐतिहासिक शाहू खासबाग मैदान, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी निधी दिल्याचे समाधान आहे. यावेळी जर सत्ता दिली नाही तर अन्य विकासकामे पूर्ण होण्याची शंका व्यक्त करत काँग्रेसला स्पष्ट बहुमत द्या.'

माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, 'गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला गती देण्याचे काम काँग्रेसने केले. पालकमंत्री आता त्या कामांची उदघाटने करत आहेत. त्यांनी वर्षभरात एकही भूमिपूजन केलेले नाही. कोट्यवधीचा निधी देतो असे सांगत आहेत. यापूर्वी त्यांचे हात बांधले होते का? आतापर्यंत कोल्हापूरला काय दिले याचा जाब विचारूनच मत मागायला या असे आता सुनावण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीत ताराराणी आघाडी भ्रष्ट असल्याचे पालकमंत्री सांगत होते. मग एक वर्षात ती साजूक झाली का?' याप्रसंगी ज्येष्ठ नेते, आमदार पतंगराव कदम, जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचीही भाषणे झाली. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी स्वागत केले.

आत एक, बाहेर एक सारे संपवले

कोल्हापूर हा वाघ, सिहांचा जिल्हा आहे. एका पिंजऱ्यात ते कधी राहत नाहीत. विधानसभा निवडणुकीत गद्दारीने काँग्रेसचे उमेदवार पाडले गेले. हा अनुभव घेऊन या निवडणुकीत निर्णय घेतला. आत एक आणि बाहेर एक हे सारे संपवले आहे. आता थेट जाणारा पक्ष आहे. इतर सारे बंद करुन टाकले आहे, अशी टोलेबाजी करत पतंगराव कदम यांनी नागरिकांना आता सारे प्रयोग थांबवा व एकहाती काँग्रेसच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूलमंत्र्यांनी घेतला विभागांचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राज्यात फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० टक्के अनुदानावर फळबागांचा भरीव कार्यक्रम 'मनरेगा'च्या माध्यमातून हाती घेतला जाईल,' असे प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. जिल्ह्यातील महसूल, कृषी विभागांच्या कामांचा आढावा गोकुळ शिरगाव येथील गोशिमाच्या सभागृहात आयोजित केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत खडसे यांनी घेतला. खडसे म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या फळबागांसाठी एक्स्पोर्ट झोन निर्माण करुन त्यासाठीच्या सर्व व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा मानस आहे. तसेच शेतकऱ्यांनी किमान १० टक्के क्षेत्रावर फळबाग लावगड कार्यक्रम हाती घ्यावा', असे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांनी’ सत्ता दलालांना दिली

$
0
0

मुश्रीफ यांनी लगावला आमदार महाडिकांना टोला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमदार महादेवराव महाडिक यांनी सत्तेचा उपयोग केवळ मोठेपणासाठी केला. त्यांच्यामुळे कोल्हापूर विकासापासून दूर राहिले,' टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी विक्रमनगर येथे झालेल्या सभेत लगावला.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'आमदार महाडिक गोरगरिबांच्या कामासाठी प्रसिद्ध नसून सत्तेच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी विकासकामासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणताही निधी आणला नाही. याउलट त्यांनी महापौर पदाची खांडोळी करण्यात धन्यता मानली. निवडून आलेल्या अपक्षांची मोट बांधून सत्ता दलालांच्या हाती सोपविली. महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. महापालिकेच्या निविदा आणि जमिनीचे आरक्षण उठविण्यात त्यांच्या कारभाऱ्यांना रस राहिला. त्यामुळेच अनेक वर्षे कोल्हापूर विकासापासून दूर राहिले. दहा वर्षांपूर्वी पक्षीय राजकारणाची सुरुवात राष्ट्रवादीने केली. जनतेने महाडिक आणि कंपनीला लाथाडत राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीला निवडून दिले. विकासकामांसाठी शेकडो कोटींचा निधी आणला. जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायसंकुल, नवीन १०४ केएमटी बसेस, शिवाजी विद्यापीठाला ५० कोटी रुपयांचा निधी दिला.'

दरम्यान, काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे यांना ताराराणी आघाडी आणि आमदार महादेवराव महाडिक यांना दरवाजा ठोठवण्याचा वेळ का आली? असा सवाल आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. रमळमळा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आर. के. पोवार, उत्तम कोराणे, झहिदा मुजावर, राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल मधाळे, वर्षाराणी लांडगे, रशीद बारगीर, प्रा. जयंत पाटील, राजू लाटकर, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

मालोजीराजे महाडिकांची पायरी का चढले?

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'मालोजीराजेंना एका रात्रीत महाडिकांच्या घराची पायरी चढावी लागली, याचे गौडबंगाल त्यांनीच जाहीर करावे. पक्षीय राजकारणास विरोध करण्याचे कामही महाडिक यांच्या कंपनीने केले आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महायुतीला संधी द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेवर 'कमळ' फुलणार असल्याची खात्री झाल्याने सर्वच विरोधक महायुतीवर टीकेची झोड उठवत आहेत, असा टोला लगावतानाच कोल्हापूरच्या ‌िवकासासाठी महापालिकेत महायुतीला संधी द्या, असे आवाहन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ रंकाळा टॉवर, जाऊळाचा गणपती येथे शुक्रवारी आयोजित जाहीर सभांत ते बोलत होते.

खडसे म्हणाले, आघाडी सरकारच्या काळातच अनेक भ्रष्टाचार झाले. माजी मंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्या काळातच अनेक भ्रष्टाचार झाले. केंद्रात आणि राज्यात युती सरकारचा एकही मंत्री जेलमध्ये गेला नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. कोल्हापूर महापालिकेवरही झेंडा फडविण्यासाठी मतदारांनी महायुतीला साथ देण्याची गरज आहे. सत्ता दिल्यास मालकीहक्काची घरे, बी टेन्युअरचा प्रश्न, रंकाळा सुशोभिकरण, आदी शहर विकासाच्या योजना मार्गी लावल्या जातील.', असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, 'विरोधकांच्या पोटात कमळ चिन्हाचाही गोळा आला आहे. श्री अंबाबाईच्या चरणी वाहण्यासाठी भाविक कमळ घेऊन जातात. त्यामुळे कमळाचा प्रचार सुरू असल्याची तक्रारही विरोधकांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली. विरोधकांकडून सर्व प्रकारचे आरोप आणि अडथळे सुरू आहेत. मात्र, महायुतीचा विजय निश्चित आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भ्रष्टाचारी लोकांना पराभूत करण्याची हीच वेळ आहे.'

'मुश्रीफ यांनी भूखंड लाटले' कोल्हापूर ः 'आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील ओपन स्पेस पंधरा गुंठे जागा मुलाच्या नावावर केली. कागलच्या तलाव परिसरातील दहा हजार चौरस फुटाची जागाही विकसनासाठी घेतली. जागा लाटणाऱ्या हसन मुश्रीफांनी कागदोपत्री पुरावे जाहीर करावेत,' असे जाहीर आव्हान ताराराणी पक्षाचे पदाधिकारी आणि माजी महापौर सुनील कदम यांनी दिले.

रंकाळा टॉवर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत त्यांनी माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर कडाडून टीका केली.

सुनील कदम म्हणाले, 'आमदार हसन मुश्रीफ यांनी तत्कालीन गुरु सदाशिवराव मंडलिक यांचाही घात केला. कागल बँकेतून अडीच कोटी रुपयांचा ढपला पाडला. त्याचा ठपका कर्मचाऱ्यांवर ठेवला. केडीसीसी बँकेतही सुमारे दहा कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. मुश्रीफ यांनी विविध ठिकाणी जमिनी बळकावल्या. हा भ्रष्टाचार पचविण्यासाठीच त्यांना महापालिकेत सत्ता गरजेची आहे.'

'पुन्हा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता दिली तर प्रसंगी रंकाळा तलावावर स्लॅब टाकून घरे बांधतील' असा टोला कदम यांनी लगावला. ते म्हणाले, 'माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांवर टोल लादला. टोलमध्ये ढपला कुणी पाडला, हे जनतेला माहिती आहे. कोणत्याही नगरसेवकाला विचारात न घेता थेट पाइपलाइन योजना आणली. या योजनेतही ढपला पाडला.

केवळ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उदघाटनचा सपाटा लावला. काँग्रेसच्या या भ्रष्टाचाराला राष्ट्रवादी काँग्रेसने साथ देऊन तेही पापाचे भागीदार बनले. हॉटेल वृषालीमधून कोणी कोणी पैसे आणले, त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग काढून पाहा. कोण खरे आणि कोण खोटे आहे, याचे उत्तर नागरिकांना मिळेल' असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images