Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

समीरच्या अटकेने घातपातांना ब्रेक?

$
0
0

Satish.Ghatage@timesgroup.com

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित समीर गायकवाड याच्या अटकेमुळे घातपाती कारवायांना तूर्तास ब्रेक लागण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांतून बोलून दाखवली जात आहे. दुसरीकडे आणखी एक समीर तयार होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाला अधिक लक्ष घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

अतिरेकी व दहशतवादी कारवायांमुळे पोलिस सावधपणे काम करत आहेत. गुन्हेगारी रोखण्याबरोबर गुन्ह्यांचा शोध घेण्याचा ताण पोलिसांवर आहे. पोलिस हे सॉफ्ट कॉर्नर असल्याने प्रत्येक घटनेतील अपयशाचे खापर पोलिस प्रशासनवर फोडले जाते.

दहशतवादी कारवाया रोखण्याबरोबर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी राज्याचे पोलिस दल काम करत आहे. दाभोळकरांच्या हत्येला दीड वर्षे तर पानसरे यांच्या हत्येला सात महिने उलटून गेले तरी त्यांचे हल्लेखोर सापडलेले नसल्याने पोलिसांवर दबाव वाढत चालला आहे. तरीही कोल्हापूर पोलिसांनी टेक्निकल सर्व्हेलन्सव्दारे संशयित समीरला अटक केल्याने चांगले यश मिळाले आहे, असे गृहविभागाचे म्हणणे आहे.

पानसरे हत्येच्या कटात समीर सहभागी असावा, असा संभाषणाचा पुरावा मिळाला असल्याने त्याला अटक करण्यात आली. समीरने दिलेली माहिती व त्याच्याकडून जप्त केलेल्या साहित्याचा आधार घेऊन हल्लेखोरांना अटक करावे लागणार आहे.

किमान पाच ते सहा जणांचे जीव वाचले!

समीरला अटक केल्यानंतर राज्यातील पाच ते सहा वृध्दांचे प्राण वाचले हेच आमचे समीर अटकेचे यश आहे, अशी सूचक प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली. या तपासात पोलिसांना मोठे यश मिळू शकेल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी निधीवर डल्ला

$
0
0

बोगस एनओसी करण्यात कंत्राटदारांची यंत्रणा आघाडीवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील खासगी जमिनीवरील विकासकामांसाठी सरकारचा निधी बिनबोभाट खर्च करण्यासाठी महापालिकेचे बोगस ना हरकत पत्र बनवले जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात विकासकामे करण्यासाठी जवळपास ७५ टक्के पत्रे बोगसच बनवली जात असल्याची माहिती असून अगदी शंभर रुपयात हे पत्र तयार करून मिळते. या बनावटगिरीतून महापालिकेतील यंत्रणेचा थेट फायदा नसला तरी फूल नाही, पण फुलाची पाकळी तर मिळतच असल्याने 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' असा सारा मामला आहे.

आमदार, खासदार यांचे फंड विविध ठिकाणच्या विकासकामांसाठी खर्च करता येतात. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे हा निधी खर्च करण्यासाठीचे संबंधित लोकप्रतिनिधींकडून पत्र दिले जाते. महापालिकेच्या यंत्रणेकडून हा निधी खर्च केला जाणार असेल तर जिथे काम करायचे आहे, ती जमीन महापालिकेच्या ताब्यात आहे का? त्यावर यापूर्वी केव्हा खर्च केला आहे किंवा कामाचे नियोजन केले आहे का याची माहिती मिळते. त्यानुसार तिथे काम करायचे की नाही हे निश्चित केले जाते. पण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा निधी खर्च होणार असेल तर हा विभाग महापालिकेकडून त्या जमिनीवर काम करण्यासाठी महापालिकेची काही हरकत आहे का, याची विचारणा करत असते. पण महापालिका नवीन विकसित होत असलेल्या ठिकाणची जागा महापालिकेकडे हस्तांतरित होत नाही, तोपर्यंत तिथे सरकारी निधी खर्च करण्यास परवानगी देत नाही. तसेच बांधकाम परवानगीमध्ये संबंधित बांधकाम व्यावसायिकाने तेथील रस्ते विकसित करण्याची अट असते. तिथे ही कामे केली जात नाही. यामुळे ज्यांना खासगी ​जमिनीवर हा निधी खर्च करायचा आहे, तिथे बोगस ना हरकत पत्राचा वापर केला जात आहे.

यामध्ये कंत्राटदार तसेच सार्वजनिक बांधकामची यंत्रणा आघाडीवर असून जिल्हा नियोजन मंडळाच्या कागदपत्रात महापालिकेचा एक कागद म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे मंडळही त्याची खातरजमा करत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदार मात्र या प्रकाराचा गैरफायदा घेत बनावट पत्र वापरुन काम पुढे रेटले जाते. यातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाणीपुरवठा, विद्युत विभाग यांची कामे केली जात नसताना ती कामे केली गेली असल्याची माहिती आहे.

दहा वर्षांत ५० कोटींचा खर्च

अनेक बांधकाम ​व्यावसायिकांना रस्ते तसेच विविध विकासकामांसाठी पैसा खर्च करण्यापेक्षा काही टक्केवारी हातावर टेकवली तर कोट्यवधीचा फायदा खिशात पडतो. या प्रकारे गेल्या दहा वर्षांत अशा बोगस ना हरकत पत्रांच्या माध्यमातून ५० कोटींहून अधिक रुपयांचा निधी खर्च झाला असल्याचे समजते. यातून महापालिकेच्या तिजोरीवर थेट भार पडत नसला तरी नागरिकांच्या करातून जमा झालेला निधी काही लोकांवर उधळपट्टी केला जात असल्याचा गंभीर प्रकार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगली, इचलकरंजीत सनातनचे कनेक्शन घट्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक समीर गायकवाड याला कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या सांगलीतील घरातून धार्मिक पुस्तकांसह २३ मोबाइल संच आणि ३१ सीमकार्ड हस्तगत केली होती. सांगलीत त्याचे नातेवाईक आणि मित्र राहत आहेत. तपासकामात मदत करणारी ज्योती कांबळे ही मैत्रिण इचलकरंजीतील असल्याने तपासात सांगली आणि इचलकरंजीकडे लक्ष वेधले आहे.

सनातन संस्थेचा आश्रम मिरजमध्ये आहे. आश्रमाच्या माध्यमातून सनातनचे हजारो साधक संपूर्ण जिल्ह्यासह सीमाभागातही कार्यरत आहेत. धार्मिक पुस्तकांची विक्री, प्रवचने, व्याख्यानांचे आयोजन, गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न अशी कामे साधक करतात. सांगली आणि मिरजेत जातीय दंगलीनंतर पीडित हिंदू कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्याबरोबरच त्यांना न्यायालयीन लढाईत मदत करण्याचेही काम सनातनच्या साधकांनी केले. त्यामुळे संस्थेला स्थानिकांची सहानुभूीत मिळाली. मडगाव स्फोटातील आरोपी रुद्र पाटील यानेही राज्य सरकारच्या एका योजनेविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मुस्लिम आणि ख्रिश्चन शाळांना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या मदतीचे सरकारचे धोरण चुकीचे असल्याची याचिका त्याने सांगली कोर्टात दाखल केली होती. दंगलीतील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी रुद्र याची पत्नी प्रीती हिने स्वतः वकीलपत्र घेतले आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात सनातन संस्थेला वेगळे महत्व प्राप्त झाले. त्यातूनच जिल्ह्यात सनातन संस्थेचे प्रस्थ वाढले. आजही या संस्थेचे शेकडो कार्यकर्ते जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही कार्यरत आहेत.

इचलकरंजीतही स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांच्या साहायाने सनातन संस्था वाढली. संशयित समीर गायकवाड याची मैत्रिण ज्योती कांबळे इचलकरंजीची आहे. समीरने मोबाईलवरून ज्योतीशी केलेल्या संभाषणातूनच पोलिसांना संशय आला. तिचीही सध्या चौकशी सुरू आहे. त्यातून इचलकरंजीतील काही साधकही पोलिसांच्या रडारवर आहेत.

मलगोंडा पाटील, सारंग कुलकर्णी, रुद्र पाटील आणि आता समीर गायकवाड अशी नावे स्पष्ट झाली आहेत. मडगाव स्फोटासह अन्य ठिकाणच्या घटानांमध्ये पोलिसांनी जे संशयित ताब्यात घेतले, त्यामध्ये बहुतांश बहुजन समाजातील आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक बहूजन समाजातील व्यक्तींचा वापर केला जात असल्याचा आरोपही संस्थेवर झाले आहेत. मात्र संबंधितांच्या बचावासाठी सनातनचे साधकही प्रत्येकवेळी पुढे सरसावले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सनातनचे कोम्बिंग ऑपरेशन करा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्त्याप्रकरणाच्या तपासात कर्नाटक पोलिस फार पुढे गेले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी एकट्या समीर गायकवाड भोवतीच घुटमळू नये. किमान स्वतःच्या इभ्रतीसाठीतरी राजकीय दबावाला बळी न पडता सनातन संघटनेचे पूर्णतः कोम्बिंग ऑपरेशन केले पाहिजे. कायद्याच्या बाहेर असलेल्या आणि गुप्त पध्दतीने चालवल्या जाणाऱ्या सनातनसारख्या संघटनांवर तातडीने बंदी घालावी, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणले, 'हिंदूंमध्ये अतिरेकी संघटना उभ्या रहात आहेत. त्यांना या देशातला हिंदू असुरक्षित वाटतो का? गेल्या साठ वर्षांत या देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश यांसारख्या वरिष्ठ पदावर ९९ टक्के हिंदूच रहात आले आहेत. मग हिंदूंना धोका कोणापासून आहे?. असा सवाल करुन आंबेडकर म्हणाले, 'व्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग करुन गुप्त पध्दतीने इतरांचे स्वातंत्र्य कुणी हिरावून घेत असेल तर त्यांच्यावर वेळीच बंदी घालणे ही काळाची गरज आहे. ट्रेड युनियन, धर्मादाय संस्था, निवडणुक आयोग आणि कंपनी अ‍ॅक्टनुसार स्थापन झालेल्या संघटना किंवा राजकीय पक्ष यांनाच कायदेशीर बंधन असते. त्यांना कायद्यानुसारच कामकाज करावे लागते. गुप्तपध्दतीने कामकाज करणाऱ्या संघटना कायद्याच्या नियंत्रणात रहात नाहीत. त्यामुळे अशा कायद्याच्या बाहेर असलेल्या सर्वच संघटनांवर बॅन आणला पाहिजे.'

आंबेडकर म्हणाले, 'कॉ. पानसरे यांची विचारसरणी सनातन्यांना चालत नव्हती. २००५-०६ च्या सनातनच्या प्रकाशनांमध्ये जे आपल्या विचाराच्या विरोधात आहेत, त्यांना संपविले पाहिजे. अशी उघडपणे आवाहने केली गेली आहेत. त्यामुळे पानसरे हत्याप्रकरणाचा तपास केवळ एकट्या समीर गायकवाड याच्याभोवती मर्यादीत कक्षेत न ठेवता या तपासाची व्याप्ती पोलिसांकडून वाढविली पाहिजे. नक्षलवादी, अतिरेकी कारवायांच्या बाबतीत एकजरी धागा हाताला लागला तर तपास यंत्रणा जसे कोंबींग ऑपरेशन करुन त्याची पाळंमुळं खोदून काढते. मग सनातनच्या पदाधिकाऱ्यांचे कोम्बिंग ऑपरेशन का केले जात नाही?'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची घराणेशाही

$
0
0

प्रस्थापित घरांतच तिकीट; पती-पत्नी, दीर-भावजयीलाही उमेदवारी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान नगरसेवकांच्या घरातच उमेदवारीचे वाटप करतानाही २१ प्रभागांत नवीन चेहरे दिले आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते राजेश आणि त्यांची पत्नी सुरमंजरी यांना उमेदवारी देण्यासह ​जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते, विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव यांच्यासह त्यांच्या भावजय दिपिका जाधव यांनाही ​उमेदवारी देऊन एकाच घरात दोन-दोन उमेदवारी देत मतांची गणिते मांडली आहेत. पाच विद्यमान नगरसेवक, तीन माजी नगरसेवकही या पक्षाकडून रिंगणात उतरत आहेत.

शुक्रवारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजेश लाटकर, संगिता खाडे, उत्तम कोराणे, अनिल साळोखे, जहीदा मुजावर यांच्या उपस्थितीत पहिली ४१ उमेदवारांची यादी जाहीर झाली. पद्माराजे उद्यान प्रभागात शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या अजिंक्य चव्हाण यांना तर शिपुगडे तालीम प्रभागात काँग्रेसमधून पक्षात आलेल्या नंदकुमार मोरे यांच्या पत्नी सरीता यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय २० विद्यमान नगरसेवकांच्या पत्नी किंवा पतींना उमेदवारी यादीत स्थान देण्यात आले आहे.

यादी जाहीर केल्यानंतर जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, 'राष्ट्रवादी व जनसुराज्यशक्ती पक्षाची सत्ता महापालिकेवर येणार हे स्पष्ट आहे. आतापर्यंत केलेल्या विविध विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक जिंकण्यास काहीच अडचण नाही.'

प्रा. जयंत पाटील म्हणाले, 'आमदार हसन मुश्रीफ व माजी आमदार विनय कोरे यांनी ही निवडणूक आक्रमकपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्वबळावर ४१ जागा जिंकत सत्ता काबीज करण्याचे धोरण पक्षाचे आहे. उमेदवारांच्या यादीसाठी सर्व जातीतील, उच्चशिक्षित तसेच निवडून येण्याची क्षमता असलेले असे उमेदवार आहेत.'

नात्यागोत्यातील उमेदवारी वाटपामुळे बंडखोरीची चिन्हे

राष्ट्रवादी काँग्रेसने निम्म्याहून अधिक उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली. त्यामध्ये महत्वाच्या प्रभागांचाही समावेश आहे. अनेक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी होती. तेथे उमेदवारी मिळेल अशी आशा असलेले अनेकजण नाराज झाल्याचे दिसून आले. सुर्वेनगर प्रभागात पक्षाने ​जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या कन्या मेघा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. गेल्या निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभव स्वीकारावा लागलेले सुनील महाडेश्वर हे तेथे तिकिटासाठी इच्छुक होते. मात्र पाटील यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांनी इतर पक्षांशी संपर्क साधला. ते अन्य पक्षात जाऊन बंडखोरी करणार की राष्ट्रवादीच्या उमेदवाराला विजयी करणार याकडे लक्ष लागले आहे. मुलाखत दिलेल्या अन्य काही इच्छुकांनीही अन्य पक्षांकडे संपर्क साधला आहे. उमेदवारी न मिळाल्यास येऊ असा शब्दही दिला आहे. अशा इच्छुकांनी तातडीने अशा पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही इच्छुक अन्य पक्षांकडे जाण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारची बंडखोरी रोखण्यासाठी नेते कशी जुळणी करतात याची उत्सुकता आहे.

अन्य पक्षांच्या घडामोडी वेगात

राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर झाल्यानंतर अन्य पक्षांच्या घडामोडींनाही वेग आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि ताराराणी आघाडी-भाजप या तिन्ही मुख्य घटकांच्या उमेदवारी याद्या फायनल असल्याची स्थिती आहे. मात्र बंडखोरी आणि अन्य गोंधळ टाळण्यासाठी यादी लांबवली जात आहे. राष्ट्र्वादी काँग्रेसने तिकीट दिलेल्या उमेदवारांना प्रचाराचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतजमिनीवरही उभी राहणार स्टार हॉटेल्स

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर-इचलकरंजी, सांगली-मिरजसह राज्यातील चौदा मंजूर प्रादेशिक योजनांमधील 'शेती' तसेच 'शेती ना विकास' झोनवर थ्री स्टार व त्यापेक्षा अधिक चांगल्या दर्जाच्या तारांकित हॉटेलच्या उभारणीला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. कोल्हापूर -सांगली रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. यामुळे या रस्त्यावर मोठी हॉटेल्स उभारण्यास परवानगी मिळाल्याने प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

महामार्गालगतच्या शेती तसेच शेती ना विकास झोनवर बांधकामासाठी फक्त ०.१० चटईक्षेत्र मंजूर आहे. या झोनवर आता ०.९० जादा चटईक्षेत्र मंजूर केले जाणार आहे. याचाच अर्थ संबंधित झोनवर आता शंभर टक्के बांधकाम करता येणार आहे. मात्र या वाढीव चटईक्षेत्रासाठी लगतच्या बिगरशेती जमिनीचा दर विचारात घेऊन पस्तीस टक्के अधिमूल्य आकारले जाणार आहे. या आकारणीमुळे राज्याच्या तिजोरीत भर पडेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यासह कोल्हापूर-इचलकरंजी, सांगली-मिरज, नागपूर, चंद्रपूर-बल्लारपूर, नाशिक, नगर, जळगाव-भुसावळ प्रदेश, औरंगाबाद-जालना प्रदेश, औरंगाबाद, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रदेश, रायगड व मुंबई महानगर प्रदेशाच्या मंजूर प्रादेशिक योजनेतील शेती शेती ना विकास झोनवर अशी हॉटेल्स उभारणे शक्य होणार आहे. मात्र, या थ्री स्टार व त्यावरील दर्जाच्या हॉटेल्ससाठी निवासी झोनचे बांधकाम रेखांकनासह इमारत बांधकामासाठीचे सर्व नियम लागू होणार आहेत.

या संदर्भातील अधिसूचना अवर सचिव संजय सावजी यांनी काढली आहे. महामार्गांलगतच्या सुविधांतर्गत वाढीव चटईक्षेत्रासाठी ३५ टक्के अधिमूल्य आकारून या हॉटेल्सला परवानगी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आता महामार्गांलगत टोलेजंग हॉटेल्स उभी राहणार आहेत. त्याबरोबरच सुविधाही देण्याचे नियोजन आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी ‘मटा’चं पुढचं पाऊल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकविसाव्या शतकात विकासाची गगनभरारी मारण्यासाठी सरसावलेले कोल्हापूर स्मार्ट सिटी बनण्यासाठी सज्ज आहे. समृद्ध वारसा, कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधांची प्रगतीपथावर असलेली वाटचाल, ब्रॅंडच्या शोधात असलेल्या छोट्या-मोठ्या उत्पादनांसह नव्या युगाला साद घालणारी आधुनिक इंडस्ट्री, कृषीपूरक उद्योग, मोठ्या पाठींब्याच्या प्रतिक्षेतील स्थानिक वाहतूक व्यवस्था यासर्व प्राधान्याच्या घटकांच्या सक्षमीकरणासाठी 'महाराष्ट्र टाइम्स' ने सातत्याने मोठे पाठबळ दिले आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून 'स्मार्ट सिटी'साठी 'महाराष्ट्र टाइम्स' पुढचं पाऊल टाकत आहे. अर्थात या प्रयत्नांना कोल्हापूरकरांची साथ हवी आहे.

मुंबई, पुण्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये महानगर बनण्याचे सामर्थ्य आहे. शहराला महानगर बनवण्याबरोबरच शहरवासियांना आधुनिक युगातील पायाभूत सुविधांची उपलब्धता करुन देऊन शहराच्या विकासात योगदान देण्याच्यादृष्टीने 'मटा' ने कोल्हापूरमध्ये पदार्पण केले. शहराच्या सकारात्मक प्रगतीचा वेध घेतला. त्यासाठी 'कोल्हापूर रायझिंग' हा उपक्रम राबवत विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, मान्यवरांच्या योगदानाची दखल घेत भविष्यातील या क्षेत्रांमधील संधी शहरवासियांसमोर मांडल्या. कोल्हापूरचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये व्हावा यासाठी प्रथमपासून आक्रमक व आग्रही भूमिका घेतली. त्यासाठी विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पाठपुरावाही केला. स्मार्ट सिटीसाठी नेमके काय हवे याबाबतची जागरुकता करुन देण्याबरोबरच त्यादृष्टीने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित केले.

स्मार्ट सिटी झाल्यास कोल्हापूरचा वेगाने विकास होणार आहे. त्यामुळे या योजनेत कोल्हापूरचा सहभाग व्हावा यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ करण्याची भूमिका 'मटा' ने घेतली. त्यानुसार राजकीय क्षेत्राबरोबच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व जाणकारांच्या ​भूमिका अग्रक्रमाने मांडल्या. 'मटा' च्या भूमिकेचे कोल्हापुरातील विविध क्षेत्रांनीही तितक्याच आत्मीयतेने स्वागत करुन विकासाच्या या भूमिकेत 'मटा' सोबत असल्याचे स्पष्ट केले. त्यातूनच कोल्हापूर स्मार्ट सिटी होण्यासाठी वाटचाल सुरु झाली आहे. स्मार्ट सिटीची एक संधी हुकली असली तरी आता थांबून चालणार नाही. पुढचे पाऊल टाकायलाच हवे, अशी 'मटा'ची भूमिका आहे. यासाठी 'मटा' चा पुढाकार आहेच. आता गरज आहे ती कोल्हापूरकरांच्या सहभागाची.

मांडा रोखठोक भूमिका

कोल्हापूरमध्ये स्मार्ट सिटी होण्याची अंगभूत ताकद आहे. कोल्हापूरने याच ताकदीच्या जोरावर छोट्या शहरापासून महानगराच्यादिशेने वाटचाल केली. 'स्मार्ट सिटी'ची नवी ओळख बनवण्यासाठी विविध क्षेत्रात आणखी सूत्रबद्धरितीने विकास साधण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूरवासियांसोबत कायमच असणारा 'मटा' या माध्यमातूनही कोल्हापूर स्मार्ट सिटी बनवण्यासाठी आग्रही राहणार आहे. स्मार्ट सिटीसाठी काय करता येईल, आपल्या कल्पनेतील स्मार्ट सिटीचा आराखडा काय, कोल्हापूरची खरी ताकद कोणत्या पायाभूत क्षेत्रात आहे, केंद्र सरकारच्या प्रकल्पाचे निकष कसे पूर्ण करता येतील?, सरकारी मदतीशिवाय आपले शहर स्मार्ट बनवता येईल काय यासह आपल्ता ठळक, मुलभूत सूचना मांडण्याचे व्यासपीठ 'मटा' ने उपलब्ध करून दिले आहे. तुमच्या सूचना smartcitymt@gmail.com या मेलवर पाठवा. ​अथवा १५० ते २०० शब्दात लिहून आपल्या आयकार्ड फोटोसह खालील पत्त्यावर पाठवा.

पत्ता ः निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स, गुलमोहर अपार्टमेंट, नागाळा पार्क कमानीजवळ, कोल्हापूर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मूर्ती त्रिशताब्दीवर्ष अध्याय

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या विराजमान असलेल्या मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेला २६ सप्टेंबर २०१५ रोजी ३०० वे वर्षे सुरू होत आहे. तीन शतकांपूर्वी झालेल्या परकीय आक्रमणकाळात तत्कालीन श्रीपूजकांपैकी एकाने ही मूर्ती एका श्रीपूजकाच्याच घरात लपवून ठेवली होती. नंतर करवीर संस्थानाची स्थापना झाल्यानंतर या मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली तोच हा दिवस. करवीर काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मूर्तीच्या त्रिशताब्दी वर्ष सोहळ्याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता आहे. या वर्षात तीर्थक्षेत्र विकास आराखडा, मंदिर व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र पोलिसचौकी, सतर्क सुरक्षायंत्रणा, रखडलेला बॅगस्कॅनर प्रस्ताव मार्गी लावण्यासाठीही देवस्थान व्यवस्थापनाने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे.

मंदिराची प्राचीनत्व

अंबाबाईच्या मूळ मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने एक नवे पर्व निर्माण होत आहे. मंदिराच्या वास्तू कौशल्यापासून ते अंतरंगातील रचना, शीलालेख या सर्वांनाच वेगळे महत्व आहे. त्यामध्ये देवीच्या मूर्तीचाही एक इतिहास आहे. चालुक्य, शिलाहार आणि यादव काळात प्रामुख्याने मंदिराचा विकास झाला. आजचे जे महाद्वार बांधले गेले, तो यादवांचा कालखंड होता. ३०० वर्षांपूर्वी आदिलशाहीच्या काळातील आक्रमणाचा फटका अंबाबाईच्या मूर्तीलाही बसला होता. त्या दरम्यान मूर्ती सुरक्षित रहावी म्हणून ग्रामदैवत असलेल्या कपिलेश्वर मंदिराच्या मागे राहणाऱ्या श्रीपूजकांनी ती स्वतःच्या घरी लपवून ठेवल्याची नोंद करवीर महात्म्य ग्रंथात आहे. त्यानंतर जेव्हा १७१० साली करवीर संस्थानाची स्थापना झाली. मात्र, तोपर्यंत अंबाबाई मंदिराची गर्भकुडी मूर्तीविना रिकामी होती. पण सरस्वती, महाकाली यांची मूर्ती मंदिरात होती. दरम्यान नरहर भट सावगावकर यांनी पन्हाळगडावर जाऊन छत्रपतींना अंबाबाईच्या मूर्तीविषयी सांगून पुजाऱ्यांच्या घरात ठेवल्याची माहिती दिली. छत्रपतींनी सिदोजी घोरपडे यांना आज्ञा दिल्यानंतर २६ सप्टेंबर १७१५ या विजयादशमीदिवशी अंबाबाई मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून ती मूर्ती नित्यपूजेत आहे.

मूर्ती संरक्षणाचे उपाय

पुनर्प्रतिष्ठापित अंबाबाई मूर्ती नित्यपूजेत आली असली तरी दुग्धाभिषेक, कुंकूमार्जन यामुळे कालौघात मूर्तीची झीज होण्यास सुरूवात झाली. सन १९२१ च्या दरम्यान मूर्तीचा डावा हात दुखावला तेव्हापासून १९५५ सालापर्यंत अंबाबाईची मूर्ती हात आणि कंबर यांच्यामध्ये धातूच्या पट्टीने आधार दिलेल्या अवस्थेत होती. तत्कालीन द्वारकापीठ शंकराचार्य यांच्या पुढाकाराने मूर्तीला वज्रलेप करून तिचे संरक्षण करण्याचा विचार पुढे आला. अंबाबाईच्या मूर्तीवर झालेला तो पहिला वज्रलेप. २००५ साली मूर्तीच्या कपाळावर नागाचा फणा दिसत होता, मात्र पुढच्या पाच वर्षात हा फणा पुसट होत गेल्याचे पुरावे श्रीपूजकांनी नोंद करून ठेवले आहेत. मूळ मूर्तीवर अभिषेक व कुंकूमार्जन करणे बंद करून १८ वर्षे होऊनही मूर्तीची झीज होतच होती. त्यामुळे मूर्ती संवर्धनाबाबत तातडीने ​निर्णय घेण्यासाठी मुळात वज्रलेपाचा वाद मिटवणे अत्यंत गरजेचे होते. तरीही वज्रलेपाबाबतच्या दोन मुद्द्यावरून दोन तप चाललेल्या न्यायालयीन लढ्याला अखेर श्रीपूजक आ​णि देवस्थान समिती यांच्यातील समन्वयासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या मध्यस्थीमुळे यश आले. वज्रलेपाऐवजी केमिकल कॉन्झर्वेशन (रायासनिक संवर्धन)चा पर्याय देवस्थान समितीनेही मान्य केला. त्यानुसार मूर्तीवर संवर्धन करण्यात आले आहे.

अशी आहे मूळ मूर्ती

दोन फूट ९ इंच उंची असलेली अंबाबाईची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे. या पाषाणातच अभ्रकाचा अंश असल्यामुळे मूर्तीला चकाकी आहे. चतूर्भुज असलेल्या या मूर्तीच्या चार हातात म्हाळुंग, गदा, ढाल आणि पानपत्र आहे. वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीत नाक, डोळे, दागिने, कमरेखाली घोट्यापर्यंत वस्त्र कोरलेले आहेतच पण शिवाय मूर्तीच्या पाठीवरही कोरीव नक्षीकाम आहे. मस्तकावर कपाळपट्टीवर साडेतीन वेटोळ्याचा नाग तर माथ्यावर पुरुषप्रकृतीचे प्रतीक असलेले सयोनी लिंग आहे. दोन्ही पाय समचरण असून कानापर्यंत कोरलेली आकर्णनेत्र आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘प्रस्ताव गांभीर्याने आला नाही’

$
0
0

माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा आरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विषय योग्य पद्धतीने माझ्या नजरेसमोर आणला असता तर मी त्यावर नक्की बंदी घातली असती' असे सांगताना हा विषय राज्य सरकारकडून केंद्राकडे गांभीर्याने आणलाच गेला नाही असा आरोप माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. पण, केंद्राने ते गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले.

कोल्हापुरातील डीवायपी मॉलच्या उद्‍घाटनासाठी शिंदे शुक्रवारी कोल्हापुरात आले होते. पत्रकारांनी संवाद साधला असता शिंदे म्हणाले, 'हा प्रस्ताव पाठवला तेव्हा म्हणजे २०११ साली मी गृहमंत्री नव्हतो. मी २०१३ मध्ये गृहमंत्री झालो. रोज हजारो कागदपत्रे या मंत्रालयाकडे येत असतात. सर्वच कागदपत्रे पाहणे अशक्य आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे, त्यांनी योग्य पद्धतीने विषय समोर आणायला हवा होता. त्याचा पाठपुरावा करायला हवा होता. तसे काही झाले नाही. माझ्याकडे योग्य पद्धतीने विषय आला असता तर नक्की सनातनवर बंदी घातली असती.'

'या देशात जात, धर्माच्या विरोधात लढणाऱ्या पानसरे, दाभोळकर यांची हत्या होणे ही दुर्दैवी बाब आहे' असे सांगून शिंदे म्हणाले, 'सरकारने याबाबत कडक धोरण स्वीकारायले हवे. दहशतवादाविरोधी लढ्यास आमचा कायम पाठिंबा असेल. सरकारनेही याप्रकरणी सक्षमपणे कारवाई करायला हवी. दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घ्यायला हवी.' यावेळी डॉ. डी. वाय. पाटील, कुलपती डॉ. संजय पाटील, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीकडून २१ नवे चेहरे

$
0
0

जनसुराज्यसोबत पहिली उमेदवार यादी जाहीर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जनसुराज्यशक्ती पक्षाने आघाडी घेत सर्वप्रथम ४१ प्रभागांतील उमेदवारांची यादी शुक्रवारी जाहीर केली. यामध्ये विद्यमान २० नगरसेवकांच्या घरात उमेदवारी दिली आहे. तर २१ प्रभागात नवीन चेहरे दिले आहेत. पाच आजी तर तीन माजी नगरसेवक पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. ४१ पैकी ८ उमेदवार जनसुराज्यशक्तीचे आहेत, असे सांगण्यात आले. आगामी तीन दिवसांत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी व जनसुराज्यने उमेदवारीसाठी प्रथम आघाडी उघडली. त्यासाठी अर्ज मागवून मुलाखतीही घेतल्या. त्यानंतर गणेशोत्सवात पहिली यादी जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शुक्रवारी पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जनसुराज्यचे प्रा. जयंत पाटील, आर. के. पोवार आदींच्या उपस्थितीत यादी जाहीर करण्यात आली. मुलाखतीवेळी विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा पक्षाकडून लढण्याची ​इच्छा दर्शवली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे बहुतांशी विद्यमान नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक पुन्हा पक्षाकडून रिंगणात असणार हे स्पष्ट झाले होते. त्याचे चित्र उमेदवारी यादीत दिसून आले. शिक्षण सभापती महेश जाधव यांच्या पत्नी स्नेहल, उपमहापौर ज्योत्स्ना मेढे यांचे पती बाळकृष्ण मेढे यांना संधी मिळाली आहे. शिवाय राजेश लाटकर, विनायक फाळके, मुरलीधर जाधव, महेश सावंत, सुनील पाटील या नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर सरिता नंदकुमार मोरे, संभाजी देवणे, सुवर्णा सांगावकर हे माजी नगरसेवक रिंगणात आले आहेत. विद्यमान नगरसेवक आदिल फरास यांना उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांच्या आईंना उमेदवारी दिली आहे.

नगरसेवकांच्या घरात पुन्हा उमेदवारी देण्याबाबत प्रा. पाटील म्हणाले, 'उमेदवारी देण्यामागे निवडून येण्याची क्षमता पाहिली आहे. अनेक ठिकाणी त्यांच्यापेक्षा सरस उमेदवार नसल्याचे जाणवल्याने त्यांना उमेदवारी दिली आहे. यादी जाहीर करण्यापूर्वी इतर इच्छुकांशी चर्चा केली असल्याने विरोध असायचा प्रश्न नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आणखी दहा जणांकडे चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या संशयित समीर गायकवाड यांच्या जप्त केलेल्या मोबाइलच्या तपासणीनंतर कोल्हापूर पोलिसांनी सांगलीच्या दहा जणांकडे चौकशी सुरू केली आहे. कोल्हापूर पोलिस मुख्यालयात रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. दरम्यान ठाणे येथे समीरसमवेत आणखी तीन सहकारी त्याच्यासोबत काम करत होते, अशी माहिती पुढे आली. त्यादृष्टीने ठाणे येथे पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे.

चौकशीत समीरचा भाऊ मित्रांच्या मोबाइलवरून संपर्क साधत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आहे. एका खासगी सुरक्षा रक्षकाच्या मोबइलवरून समीरला त्याचा भाऊ २००८ पासून कॉल करत असल्याचे लक्षात आले आहे. पानसरे यांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वी त्या सुरक्षकाचा मोबाइल बंद असल्याचे पोलिसांना लक्षात आले आहे. मामेभावाचा विवाह असल्याने नोकरीवर बोलावतील म्हणून मोबाइल बंद ठेवला होता असा खुलासा त्याने केला आहे.

ठाणे येथे समीर ज्या खोलीत रहात होता तेथे त्याचे आणखी तीन साथीदार रहात होते. समीरचे तीनही साथीदार वर्तकनगर येथे नोकरीस जातो असे सांगत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. समीर सनातनच्या धर्मरथाबरोबर फिरत होता. तो साधकाच्या घरी राहण्याऐवजी लॉजवर रहात होता का याचीशी चौकशी केली जात आहे.

समीरची कोठडी आज संपणार

समीरची पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपणार आहे. त्यामुळे त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. यावेळी पोलिसांकडून काय युक्तिवाद केला जातो, त्याकडे लक्ष आहे.

शुक्रवारी दिवसभर चौकशी

शुक्रवारी चौकशीसाठी दहा पथकातील १०० कर्मचारी रात्री उशिरापर्यंत कार्यरत होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या जेवण, नाष्टा व चहाची सोय पोलिस मुख्यालयात करण्यात आली होती. प्रत्येकाची कसून चौकशी सुरू होती.

फिर्यादींकडूनही वकिलांची फौज

सांगलीतील सर्व नामांकित फौजदारी वकिलांनी पानसरे कुटुंबीयांतर्फे वकीलपत्र देण्यास सुरूवात केली आहे. अ‍ॅड. श्रीकांत जाधव, जे.व्ही. पाटील, गिरीष तपकीरे, शाम जाधव, प्रकाश जाधव, दीपक शिंदे, प्रमोद सुतार, माजी जिल्हा सरकारी वकील अशोक वाघमोडे, वसंतराव मोहिते, आदींसह सत्तर वकीलांनी आत्तापर्यंत्त वकील पत्र दिले आहे. यासाठी अ‍ॅड. के.डी. शिंदे व अजितराव सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला आहे.

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा विषय योग्य पद्धतीने माझ्या नजरेसमोर आणला असता तर मी त्यावर नक्की बंदी घातली असती' असे सांगताना हा विषय राज्य सरकारकडून केंद्राकडे गांभीर्याने आणलाच गेला नाही.

-सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री

डॉ. कलबुर्गी हत्त्याप्रकरणाच्या तपासात कर्नाटक पोलिस फार पुढे गेले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी एकट्या समीर गायकवाड भोवतीच घुटमळू नये. किमान स्वतःच्या इभ्रतीसाठीतरी सनातन संघटनेचे पूर्णतः कोम्बिंग ऑपरेशन केले पाहिजे. सनातनसारख्या संघटनांवर तातडीने बंदी घालावी.

-अॅड. प्रकाश आंबेडकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समीर गायकवाडला २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी समीर गायकवाडला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली. सत्र न्यायालयाच्या या आदेशामुळे समीर गायकवाड २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी असेल. या कालावधीत पानसरे हत्या प्रकरणात तपास पथकाला समीरची चौकशी करता येणार आहे.

लवकरच समीरची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करुन पानसरे हत्येप्रकरणी आणखी माहिती मिळवण्यासाठी पोलिस प्रयत्न करण्याची शक्यता आहे. पोलिसांची सायबर सेल सध्या २३ मोबाइल आणि ३१ सीमकार्डची सखोल तपासणी करत आहे. समीरच्या संपर्कात असणा-या काही व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे समजते.

समीर तपासात सहकार्य करत नसल्याने गुजरातची फॉरेन्सिक लॅबची टीम कोल्हापुरात आली होती. त्यांनी समीरच्या आवाजाचे नमुने व त्याच्या मानसिक स्थितीचा अभ्यास अत्याधुनिक तंत्राव्दारे केला आहे. समीरसंबंधीचा अहवाल तयार झाला असून दोन दिवसांत हा अहवाल कोल्हापुरात आला आहे. सीबीआयच्या मानसपोचार तज्ज्ञांकरवी समिरच्या संभाषणाचे मानसिक पृथ्थकरण करण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालात समीर हा पानसरे यांच्यासंबंधात चेष्टेत बोलत असल्याचा दावाही खोटा ठरला आहे, अशी माहिती एसआयटीने दिली.

............

नार्को टेस्ट

नार्को अॅनालीसीस करताना संशयित आरोपीला गुंगीचे औषध दिले जाते. त्यानंतर आरोपीला झोप येऊ लागते. झोपेच्या विशिष्ट स्थितीत त्याला प्रश्न विचारून उत्तरे घेतली जातात. टेस्टच्यावेळी एक भूलतज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञ, मानसशास्त्र चिकित्सक उपस्थित असतात. या टेस्टचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाते. यावेळी तेथे तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला उपस्थित राहता येत नाही. मानसशास्त्र चिकित्सक प्रश्नांची सरबत्ती करून व मिळालेल्या उत्तराची चिकित्सा करून अहवाल देतात. तसेच टेस्टचे व्हिडिओ चित्रीकरण देतात.

ब्रेन मॅपिंग टेस्ट

या टेस्टमध्ये बंद खोलीत टीव्ही लावला जातो. संशयिताच्या डोक्यावर सेन्सर्स असलेले हेल्मेट लावले जाते. हे सेन्सर्स मॉनिटरला जोडले जातात. मेंदूच्या संबंधित क्रियांचा आलेख या चाचणीत असतो. संशयिताला गुन्ह्याच्या संबंधित दृश्ये दाखवली जातात. आरोपीच्या विचारातील चलबिलता मॉनिटरवर दिसते. त्यानुसार निष्कर्ष काढून अहवाल दिला जातो.

.......................

कोर्टात तपास अधिकारी अॅडिशनल एस. पी. एस. चैतन्य यांनी मांडलेले मुद्देः

सर्व जप्त मोबाईल आणि सीमकार्डचा तपास सुरु आहे

समीर तपासात सहकार्य करत नसल्यामुळे काही मानसिक चाचण्या करण्याची आवश्यकता आहे

हत्येसाठी वापरलेले शस्त्र अद्याप सापडलेले नाही

तपास करण्यासाठी समीरला आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी

सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी मांडलेले मुद्दे:

पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवलेला आवाजाचा नमुना समीरच्या आवाजाशी जुळतो आहे

गुजरातमधून अद्याप फोरेन्सिक लॅबचा अहवाल आलेला नाही

समीरची मैत्रीण ज्योति कांबळे हिने आपल्या समोर बोलताना समीरने पानसरेंची हत्या केल्याचे सांगितले अशी माहिती तपास पथकाला दिली आहे

जप्त केलेल्या मोबाइल आणि सीमकार्ड प्रकरणात प्रजापती नावाच्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे, याच प्रजापतीने मोबाइल आणि सीमकार्ड गोळा करुन समीरला पुरवली आहेत, प्रजापतीने नेमके कोणा-कोणाचे मोबाइल आणि सीमकार्ड समीरला पुरवले हे लवकरच सप्ष्ट होईल

सनातनच्या श्रद्धा पवार यांची या प्रकरणातली भूमिका अद्याप समजलेली नाही, या प्रकरणात तपास सुरु आहे

तपास करण्यासाठी समीरला आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी

समीर गायकवाडचे वकील एम. एम. सुहासे यांनी मांडलेले मुद्दे:

कोणावर अन्याय होऊ नये म्हणून समीरचे वकीलपत्र घेतले

आवाजाच्या नमुन्याशी समीरच्या आवाजाचा नमुना जुळल्याने समीर पानसरेंचा खुनी ठरत नाही

ज्या कारणासाठी पोलिस कोठडी वाढवून मागितली आहे त्याचा काहीही तपास झालेला दिसत नाही

रुद्र आणि समीरचा संबंध नाही

अनेक मोबाइल आणि सीमकार्ड जप्त केले आहेत म्हणून पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी चुकीची आहे

कोर्टात युक्तीवाद सुरु असताना पुढे आलेले मुद्दे:

समीरने एकाशी बोलताना आपण खूप पाप केले असल्यामुळे कुंभमेळ्याला जाणार असल्याचे आणि दोन डुबक्या मारणार असल्याचे सांगितले होते. हे वक्तव्य करुन आपण दोन हत्या केल्याचे तर समीर दर्शवत नाही ना? - अॅडव्होकेट विवेक घाडगे, सरकारी वकिलांचे सहकारी

गणेश उत्सवामुळे पोलिस बळ कमी आहे त्यामुळे तपासाला वेळ लागत आहे ही बाब लक्षात घेऊन तपासाला वेळ द्यावा आणि समीरला पोलिस कोठडी द्यावी

पोलिस तपासात श्रद्धा, सुमित खामकर आणि अजयकुमार प्रजापती ही नावे पुढे आली आहेत, या लोकांची तसेच आणखी काहीजणांची चौकशी अद्याप व्हायची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटन ‘विपुल’, प्रतिसाद मात्र ‘कूल’

$
0
0

sagar.yadav@timesgroup.com

कोल्हापूर : 'करवीर काशी' असे धार्मिक महत्व, 'छत्रपतींची राजधानी' हा ऐतिहासिक वारसा, 'लोकराजा राजर्षी शाहूंची नगरी' ही पुरोगामी विचारांची वैचारिक ओळख आणि त्यांच्या दूरदष्टीने लाभलेले हिरवाईचे वरदान यामुळे कोल्हापूरनगरी विपुलतेने परिपूर्ण आहे. मंदिरे, गडकोट किल्ले, अभयारण्ये, संग्रहालये अशा विविधतेने इथले पर्यटन नटलेले आहे. मात्र या पर्यटनाचे मार्केटिंग होत नसल्याने विपुल पर्यटनाला पर्यटकांचा थंडा प्रतिसाद लाभत असल्याचे वास्तव आहे.

भौगोलिकदृष्ट्या महत्वपूर्ण अशा पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगेच्या छत्रछायेखाली जैव विविधतेने भरपूर असणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. ‌जीवनदायिनी पंचगंगा नदीच्या काठावर वसलेल्या या शहराचे प्राचीनकाळापासून संदर्भ मिळतात. इसवी सनापूर्वी किमान दोन शतके अगोदरपासून कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध होते. रोम साम्राज्याशी कोल्हापूरशी असणारा संबंध ब्रम्हपुरी परिसरातील उत्खननात सापडलेल्या अनेक अस्सल ऐतिहासिक वस्तूरुपी पुराव्यांवरून सिध्द झाला आहे. यामुळे कोल्हापूरचे ऐतिहासिक महत्व अधिकच दृढ होते.

विविधतेने परिपूर्ण पर्यटन

करवीरकाशी, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापुरात अंबाबाई मंदिर, जोतिबा, टेंबलाई, नवदूर्गा, खिद्रापूर अशी विविध धार्मिक स्थळे ठिकठिकाणी आहेत. शिवछत्रपतींची नगरी असल्याने तब्बल १३ गडकोट किल्ल्यांनी भक्कम असा हा किल्ला आहे. पुरोगामी विचारांचा वारसा आणि दूरदृष्टीतून राजर्षी शाहूंनी विविध जातीधर्मियांच्या शिक्षणासाठी स्थापलेली विद्यार्थी वसतीगृहे, शेती विकासासाठी बांधलेली धरणे, व्यापार विकासासाठी उभारलेले रेल्वे स्थानक, युवा पिढी निर्व्यसनी व भक्कम करण्यासाठी रुजविलेली खेळ परंपरा व त्या अंतर्गत उभारलेले खासबाग कुस्ती मैदान, पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या उपाययोजनेतील राधानगरी अभयारण्य अशा वैशिष्ट्यांमुळे कोल्हापूरची ओळख 'शाहूनगरी' अशी आली आहे. रंकाळा तलाव, शिवाजी पूल, पंचगंगा नदी घाट, जुना राजवाडा, नवा राजवाडा, शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस), शालिनी पॅलेस, टाऊन हॉल संग्रहालय, छत्रपती शहाजी वस्तू संग्रहालय, मांडरे कला दालन, कणेरी मठ येथील 'भारतीय संस्कृति संग्रहालय' अशा ऐतिहासिक वास्तूंनी नटलेला हा जिल्हा आहे.

मार्केटिंगची वानवा

कोकण आणि गोवा, पुणे, सोलापूर, कर्नाटक या सर्वांना मध्यवर्ती असणाऱ्या कोल्हापूरला पर्यटन विकासाच्या अनेक संधी आहेत. मात्र पर्यटनाच्या विकासासाठी योग्य मार्केटिंग होत नसल्याचे दिसते. अंबाबाई आणि रंकाळा तलाव सोडून कोल्हापुरात इतरही बरेच पाहाण्यासारखे आहे हे लोकांना माहितीच नसल्याचे वास्तव आहे. पर्यटन माहिती केंद्र व माहिती पुस्तिका, 'कोल्हापूर दर्शन' यासारख्या योजना 'आरंभशूर' प्रकारच्याच असल्याचे दिसते. यामुळे कोल्हापुरात येणारे पर्यटक अंबाबाई मंदिर आणि त्यासमोरच काही अंतरावर असणारा रंकाळा पाहूनच माघारी फिरतात. कोल्हापुरातील इतर परिपूर्ण पर्यटनस्थळांची माहिती विविध माध्यमांतून जगभर पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारचा पर्यटन विकास विभाग, हॉटेल व्यावसायिक, जिल्हा व महापालिका प्रशासन या सर्वांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.

'कोल्हापूर दर्शन, माहिती केंद्र या सारख्या योजनांबरोबरच एमटीडीसीने कोल्हापूरच्या पर्यटनाची माहिती पुस्तिका व नकाशा अपटेड करून विविध भाषेत तो सर्वदूर पोहोचवावा. पर्यटन 'गाईड' विकास कार्यक्रम राबवून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.

- सिद्धार्थ लाटकर, कोल्हापूर हॉटेल मालक संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झेरॉक्स मशीन धूळ खात

$
0
0

लाभार्थी नसतानाही जिल्हा परिषदेची खरेदी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारी निधी मिळतो म्हणून त्यावर डल्ला मारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने तीन कोटी निधीतून ५४९ झेरॉक्स मशीन घेतली, पण सहा महिन्यांनंतरही त्याला लाभार्थीच मिळत नसल्याने यातील बहुसंख्य मशीन धूळखात पडून आहेत. आम्ही सांगू त्यांनाच मशीन द्या म्हणत सदस्यांनी आग्रह धरल्याने मशीन वापराविना लाभार्थ्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

समाजकल्याण विभागाच्यावतीने गतवर्षी ५५० झेरॉक्स मशीन घेण्यात आली होती. यासाठी तीन कोटीचा निधी मंजूर होता, पण खरेदी आपल्याच पातळीवर करता यावी यासाठी अधिकाऱ्यांनी तीन कोटी निधीचे तीन भाग पाडले. मागासवर्गीय, अपंग व महिला या तीन घटकांसाठी हे मशीन घ्यायचे होते. प्रत्येक घटकासाठी वेगळा प्रस्ताव तयार करण्यात आला. एक कोटीऐवजी ९९ लाख ९२ हजारांचे तीन प्रस्ताव तयार करत अधिकाऱ्यांनी ई-टेंडरला फाटा दिला. सांगलीच्या एका कंपनीकडून मशीन खरेदी केले. साधारणतः ५२ हजार रुपयाला एक याप्रमाणे या मशीनची खरेदी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सदस्यांना अंधारात ठेवत ही खरेदी केली. खरेदीनंतर लाभार्थी शोधताना सदस्यांची आठवण झाली.

मागासवर्गीय, अपंग व महिला मशीन खरेदी करण्यापूर्वी लाभार्थी यादी तयार करणे आवश्यक होते. मात्र, तशी यादी नसतानाच मशीन खरेदी करण्यात आली. खरेदी होऊन सहा महिने झाल्यानंतरही लाभार्थी मिळत नसल्याने जिल्ह्यात विविध ठिकाणी मशीन धूळखात पडून आहेत. पूर्वी काही लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यात आली होती, पण नंतर सदस्यांनी विशिष्ट लोकांच्या नावाचा आग्रह धरला आहे. यामुळे मशीन द्यायचे कोणाला, या वादात ती पडून आहेत. मशीन घेताना फारशी चौकशी न करताच दिल्याने मशीनच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

'जिल्हा परिषद सदस्यांनी नवीन लाभार्थ्यांची नावे देण्याचा आग्रह धरल्याने झेरॉक्स मशीन वाटप बंद करण्यात आले आहे. पण आता यादी काढण्यात येणार असून, ती निश्चित होताच त्याचे वाटप सुरू करण्यात येईल.'

- किरण कांबळे, सभापती, समाजकल्याण विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रिगेडियर भालेराव यांचे पुण्यात निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ब्रिगेडियर डॉ. एस. एम. भालेराव यांचे पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये नुकतेच निधन झाले. पुण्यामध्ये त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुणे, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद व मुंबई येथील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उप​स्थित होते.

मराठवाड्यातील उस्मानाबाद ​जिल्ह्यात सालेगाव येथे १६ एप्रिल १९३५ रोजी त्यांचा जन्म झाला. औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेने त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि १९६० साली एमबीबीएस पदवी संपादन केली. १९४८ साली झालेल्या मराठवाडामुक्ती संग्रामात त्यांचा सहभाग होता. १९६१—६२ या कालावधीत सिकंदराबाद येथे लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर लेफ्टनंट या पदावर त्यांची नियुक्ती झाली आणि त्याच वर्षी जम्मू काश्मीर येथे नेमणूक करण्यात आली. चिनी आक्रमणात युद्धात सहभागी होऊन त्यांनी देशसेवेस वाहून घेतले. ते प्राचार्य डॉ. हरिश भालेराव यांचे ज्येष्ठ बंधू होत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘जयंत आठवलेंना देशद्रोही ठरवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरोगामी विचारांनी कार्य करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी निंदनीय आहे. या घटनांचे समर्थन आणि पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्यांना पाठीशी घालणारी माहिती ​प्रसारित करणाऱ्या 'सनातन प्रभातत या अंकाचे डॉ.जयंत आठवले यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, असा एकमुखी ठराव जाहीर प्रतिरोध परिषदेत करण्यात आला.

कॉम्रेड पानसरे यांच्यासह दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ शाहू स्मारक भवन येथे शनिवारी जाहीर प्रतिरोध परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नंदकुमार गोंधळी, दलित ऐक्य चळवळीचे मच्छिंद्र कांबळे, पार्थ पोळके, अॅड. पंडित सडोलीकर यांनी या परिषदेत विचार मांडले.

पार्थ पोळके म्हणाले, 'सनातन विचारांची माणसे राज्यघटनाच नाकारत आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पानसरे, कलबुर्गी, दाभोलकर ही माणसे त्यांचे विचार मांडत होती. त्यामुळे विचारांवर हल्ला करण्याचा अधिकार कोणालाही नाही. सनातन सारख्या संस्था महाराष्ट्रातच का वाढीस लागत आहेत याचाही विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे. पेशवाईची सवय झालेल्यांना सत्तेचा हव्यास झाला आहे.'

दरम्यान, यावेळी करण्यात आलेल्या ठरावात, 'सनातन प्रभात'च्या अंकातील आक्षेपार्ह मजकूर हा ​हिंसेचे समर्थन करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशद्रोहाचे कारस्थान रचण्याचा हा प्रकार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी झालेल्या काही दहशतवादी कारवायांमध्ये सनातन संस्थेचा सहभाग आढळून आला आहे. काही साधकांविरोधात पोलिसांकडे पुरावे आहेत. बहुजनांना बहुजनांच्या विरोधात उभे करण्याचा सनातनचा डाव असून त्यांचा जाहीर निषेध करत असल्याचेही या परिषदेत जाहीर करण्यात आले. स्वागत सुनील कांबळे यांनी केले. सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनिल म्हमाने यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाच्या आवाराला छावणीचे स्वरूप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शनिवारी सुटीचा दिवस असूनही कसबा बावडा येथील कोर्टामध्ये सकाळपासूनच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाडची सुनावणी शनिवारी होणार असल्याने पोलिसांनी सकाळपासूनच परिसरात अतिरिक्त कुमक तैनात केली होती.

पोलिसांच्या मदतीला केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवानांची फौजही तैनात होती. त्यामुळे कोर्टाच्या आवाराला छावणीचे स्वरूप आले होते. कोर्टाची दोन्ही प्रवेशद्वारे बंद ठेवण्यात आली होती, प्रत्येकाला तपासणी करूनच आत प्रवेश देण्यात येत होता. त्यामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या आवाराबाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुटपाथवर गर्दी केली होती. कोर्टाच्या आवारामध्ये सकाळी अकरापासून प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी जमण्यास सुरुवात झाली. कोल्हापूर बार असोसिएशनतर्फे पानसरे यांच्या बाजूने वकीलपत्र घेण्यासाठी अडीचशेहून अधिक वकील जमणार असल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आल्याने शनिवारी सकाळपासून वकिलांचा वावरही लक्षणीय होता. सुटीदिवशी कोर्ट भरणार असल्याने बहुतांश दुपारच्या सत्रामध्ये सुनावणी होईल, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरवत सकाळच्या सत्रातच सुनावणी घेण्याचे निश्चित करण्यात आले.

साधारणतः साडेअकराच्या सुमारास गायकवाडला कोर्टामध्ये आणण्यात आले. सुमारे दोन तास या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तोपर्यंत कोर्टाच्या आवारामध्ये गर्दी झाली होती. सुनावणी संपून गायकवाडला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली, तोपर्यंत दुपारचे दीड वाजले होते. सुनावणी सुरू असताना आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. प्रत्यक्षात पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली.

यावेळी दिलीप पवार, सतीश कांबळे, सुभाष वाणी, रघू यादव, अनिल म्हमाणे, योगेश फोंडे हे डाव्या पक्षांचे नेते, आरपीआयचे पंडीत सडोलीकर, हिंदू जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी, पानसरे यांच्या कन्या स्मिता सातपुते, जावई बन्सी सातपुते, स्नुषा मेघा पानसरे, नातू कबीर पानसरे आदी उपस्थित होते.

अॅड. पटवर्धन यांचा अॅड. घाटगेंना आक्षेप

कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड याच्या सुनावणीच्यावेळी गायकवाडचे वकील अॅड पटवर्धन यांनी जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड विवेक घाटगे यांच्या युक्तीवादावर आक्षेप घेतला. अॅड घाटगे युक्तीवाद करत असताना पटवर्धन यांनी सरकारी वकील उपस्थित असताना घाटगे युक्तीवाद कसा करू शकतात असा सवाल केला. आपण वकीलपत्र घेतले असून कोर्टाने परवानगी दिली आहे, असे घाटगे यांनी सांगितले. तरीही अॅड. पटवर्धन बोलू लागल्यावर न्यायदंडाधिकारी पाटील यांनी घाटगे यांना म्हणणे मांडण्याची परवानगी दिली असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार वकील उभे करू

$
0
0

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी आरोपी समीर गायकवाड याच्या शनिवारच्या सुनावणीसाठी पानसरे यांच्या वकिलपत्रावर तीनशे वकिलांनी सह्या केल्या असल्या, तरी पुढील सुनावणीवेळी गरज भासल्यास तीन हजार वकीलांची फौज उभी करू, असा इशारा कोल्हापूर बार असोसिएशनतर्फे शनिवारी देण्यात आला.

याप्रकरणी मागील सुनावणीवेळी गायकवाडचे आरोपपत्र घेण्यासाठी हिंदू विधिज्ञ संघटनेतर्फे ३१ वकील उभे करण्यात आले होते. याद्वारे कोल्हापूरसारख्या पुरोगामी शहरामध्ये आरोपीच्या बाजूने दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर, पानसरे कुटुंबियांनी याविषयी बार असोसिएशनला विनंती केल्यानंतर केवळ दोन दिवसांमध्ये तीनशे वकिलांची फौज उभी करण्यात आल्याचे वकील विवेक घाटगे यांनी सांगितले.

हे वकील केवळ पानसरे कुटुंबियांसोबत नसून पानसरे यांच्या पुरोगामी विचारांसोबत उभे असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ सप्टेंबर रोजी असून त्यावेळी पानसरे यांच्याबाजूने याहून अधिक वकील कोर्टामध्ये उभे असतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

मागील सुनावणीवेळी गायकवाडतर्फे बाजू मांडणारे वकील सतीश पुनाळेकर यांनी हेमंत करकरेंविषयी पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या विधानाचा वकील प्रकाश मोरे यांनी यवेळी जाहीर निषेध केला. पानसरे यांच्याबाजूने तीनशे वकील उभे करण्यामागे शक्तिप्रदर्शन करण्याचा हेतू नव्हता, तर मागील सुनावणीवेळी आरोपीच्या बाजूने ३१ वकिलांची फौज उभी करण्याचे जे दबावतंत्र अवलंबण्यात आले होते, त्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी तीनशे वकिलांनी वकीलपत्र घेतल्याचे ते म्हणाले. या प्रकरणामध्ये भविष्यातही अशाप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास तीन हजार वकिलांची फौज उभी राहिल, असा इशारा मोरे यांनी या वेळी दिला.

सखोल तपासाची आशा

दरम्यान, पानसरे कुटुंबियांच्या पाठीशी कोल्हापूर बार असोसिएशन ठामपणे उभे राहिल्याबद्दल पानसरे यांचे जावई बन्सी सातपुते यांनी आभार व्यक्त केले. पोलिसांनी आतापर्यंत केलेला तपास व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद समाधानकारक असल्यामुळेच आरोपीच्या पोलिस कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ करण्यात आल्याचे ते म्हणाले. या दोन दिवसांमध्ये पोलिस अधिक सखोल तपास करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदार शोधण्यातच शक्ती खर्च

$
0
0

नोंदीतील तफावत, संलग्नतेअभावी करावी लागणार पायपीट

appasaheb.mali@timesgroup.com

कोल्हापूर : शहराची नवी प्रभागरचना करताना भौगोलिक संलग्नतेचा अभाव आणि प्रभागातील मतदार नोंदीच्या तफावतीमुळे उमेदवारांना यंदा पायाला भिंगरी बांधून प्रचार करावा लागणार आहे. ८१ प्रभागापैकी तब्बल २५ प्रभागातील मतदार संख्या सहा हजाराहून ​अधिक आहे. काही प्रभागाची भौगोलिक लांबी अडीच किलो मीटरपर्यंत पसरली आहे. प्रभागाचा विस्तार मोठा आणि मतदार कमी अशा भागात उमेदवारांसाठी प्रत्येक मतदार मोलाचा ठरणार आहे. प्रारूप मतदार यादीतील घोळामुळे उमेदवाराला अन्य प्रभागातील मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे आणि मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. परिणामी मतदार शोधण्यातच उमेदवारांची शक्ती खर्च पडणार आहे. अन्य प्रभागात समाविष्ठ झालेल्या मतदारांच्या नावात दुरूस्ती झाली नाही तर बोगस मतदानाची शक्यता अधिक आहे.

मतदार शोधताना दमछाक

सहा हजारहून अधिक मतदार असलेले प्रभाग १५ आहेत. दाटीवाटीची घरे आणि प्रभागात मतदारसंख्या मोठी असल्याने येथे उमेदवारांना पायाला भिंगरी बांधून प्रचा करावा लागणार आहे. प्रत्यक्ष प्रचाराआधीच मतदार यादीनुसार नावे शोधताना इच्छुकांची दमछाक होत आहे. एवढ्या मतदारांपर्यंत पोहचणे अनेकांसाठी जिकीरीचे बनणार आहे. यादीतीतल घोळ निस्तरला नाही, तर मतदानावरही परिणाम होण्याची शक्यता उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे.

रंकाळा स्टँड - ६०४९, टाकाळा खण - ६१०९, शिवाजी पार्क - ६१६९, प्रतिभानगर - ६१७९, सुभाषनगर - ६१८२, बलराम कॉलनी - ६१९०, लक्ष्मी विलास पॅलेस - ६२२८, दुधाळी पॅव्हेलियन - ६२३७, राजारामपुरी तवन्नाप्पा पाटणे हायस्कूल - ६२५८, पंचगंगा तालीम - ६२७३, राजारामपुरी - ६२८३, शिपुगडे तालीम - ६३१८, दौलतनगर - ६३२३, पोलिस लाइन - ६३९८, यादवनगर - ६३४८, कॉमर्स कॉलेज - ६४६४, साने गुरुजी वसाहत - ६४९२, मंगेशकरनगर - ६६५८, फिरंगाई तालीम - ६७२३, संभाजीनगर - ६८०३, तटाकडील तालीम - ७३२१, महालक्ष्मी मंदिर - ७३३७, ट्रेझरी ऑफीस - ७४७५, शाहूपुरी तालीम -७८२३, बिंदू चौक प्रभाग -८१६५.

६००० पर्यंतचे प्रभाग

कदमवाडी - ४५४६, सर्किट हाऊस -४५५६, शाहू कॉलेज -४५७८, कसबा बावडा पॅव्हेलियन -४८१९, भोसलेवाडी कदमवाडी - ५४५२, कसबा बावडा हनुमान तलाव - ५९९७, ताराबाई पार्क - ४७७५, नागाळा पार्क - ५७३२, रमणमळा - ५४००, व्हीनस कॉर्नर - ५६४०, कनाननगर - ४६६८, महाडिक वसाहत - ५४१९, मार्केट यार्ड - ५६२४, टेंबलाईवाडी -४७१८, ​विक्रमननगर - ४६९४, साईक्स एक्स्टेंशन - ५४९७, सिद्धार्थनगर - ५७१४, शिपुगडे तालीम - ६३१८, खोल खंडोबा - ५३९८, शिवाजी उद्यमनगर - ५७४२, राजारामपुरी एक्स्टेंशन - ५३९९, पांजरपोळ - ४८००, कैलासगडची स्वारी मंदिर - ५६३४, लक्षतीर्थ वसाहत - ५६५६, चंद्रेश्वर - ४९३९, पद्माराजे उद्यान - ५९२१, नाथा गोळे तालीम - ४९६९, नेहरूनगर - ५३८३, जवाहरनगर - ४९०६, बुद्ध गार्डन - ४७८४, सम्राटनगर - ५७५७, राजेंद्र्रगनगर - ५४०२, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी - ५२८१, रामानंदनगर जरगनगर - ५०६९, तपोवन - ५१८५, राजलक्ष्मीनगर - ५१७३, रंकाळा तलाव - ५३२८, फुलेवाडी - ५९७२, आपटेनगर तुळजाभवानी - ५८५०, साळोखेनगर - ५११६, शासकीय मध्यवर्ती कारागृह - ४५२९, रायगड कॉलनी बाबा जरगनगर - ४९४५, सुर्वेनगर - ५४५६.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघे शहर रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दहा दिवसांच्या उत्साही सणाची रविवारी सार्वजनिक गणेश विसर्जनाने सांगता होणार असल्याने शनिवारी देखावे पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविकांनी अलोट गर्दी केली होती. सायंकाळपासून पहाटेपर्यंत लोकांची वर्दळ रस्त्यावर दिसत होती. दरम्यान, बहुतांश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पहाटेच गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकीत नेण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीत सज्ज ठेवल्या होत्या, तर अनेक मंडळांनी आपले ट्रॅक्टर मुख्य मिरवणूक मार्गावर नेऊन लावले होते. सलग तीन सुट्यांची पर्वणी साधत अनेकांनी दोन दिवस गणेश दर्शनाचा मनसोक्त आनंद लुटला.

गर्दीमुळे चौकाचौकांत वाहतुकीची कोंडी होत होती. त्यावर नियंत्रणासाठी वाहतूक नियंत्रण कक्ष व पोलिस दलातर्फे उपाययोजना सुरूच होती. हुल्लडबाज तरुणांच्या गटांवर साध्या वेशभूषेतील पोलिसांकडून कारवाईही केली जात होती. बहुतांश लोकांनी घराबाहेरच जेवण, नाश्त्याचा बेत आखला होता. बालचमूंनी खेळणी खरेदीसाठी गर्दी केली होती, त्यामुळे चौकांना जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

यंदाही वैशिष्ट्यपूर्ण विसर्जन मिरवणुका

यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणार आहे. लेटेस्ट, हिंदवी, दयावान, वेताळ, फिरंगाई, वाघाची तालीम यांसह विविध तालीम, मंडळांच्यावतीने चित्ररथ, डी.जे., लेसर शो, साउंड इफेक्ट, वॉटर शोचे आयोजन केले आहे. याशिवाय पर्यावरण, दुष्काळ, शिक्षण, सामाजिक समस्या, प्रलंबित प्रश्न, यांसह विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या सजीव व तांत्रिक देखावे मिरवणुकीत असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images