Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

एक ऑगस्टची मतदार यादीच अंतिम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक एक नोव्हेंबरला घेण्याच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू आहे. प्रशासकीय पातळीवर त्या दिशेने हालचाली सुरू आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी शनिवारी (ता. १९) जाहीर होणार आहे. हरकती आणि सुनावणीसाठी दहा दिवसाचा कालावधी मिळणार आहे. आवश्यक त्या सुधारणा करून तीन ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे.

शहरातील विविध प्रभागातील मतदारसंख्या साधारणपणे ४,५०० ते ७००० च्या आसपास असणार आहे. १ ऑगस्ट २०१५ रोजी अस्तित्वात असलेली मतदारयादी निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता २८ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या निवडणुकीतही उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप मतदानाची तारीख जाहीर करण्यात आली नाही. निवडणुकीचा कार्यक्रम कालावधी किमान २५ दिवस ते कमाल ४० दिवसांपर्यंत असू शकतो. दुसरीकडे महापालिका प्रशासकीय पातळीवर प्रारूप यादी जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. आयुक्त पी. शिव शंकर यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत यादीसंबंधी आढावा घेतला. ८१ प्रभागातील प्रारूप मतदार यादीला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.

चारही विभागीय कार्यालयांत यादी प्रसिद्ध

'चारही विभागीय कार्यालयात प्रारूप यादी उपलब्ध असणार आहे. इच्छुक उमेदवारांना प्रारूप मतदार यादी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रारूप मतदार यादी संदर्भात २८ सप्टेबरपर्यंत हरकती, सूचना दाखल करण्याची मुदत आहे. उपलब्ध हरकती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करून त्यांच्या आदेशानुसार सुधारणा होऊन अंतिम यादी ३ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील मतदारसंख्येत ५११५ इतकी मतदारांची वाढ झाली आहे,' अशी माहिती आयुक्त पी. शिव शंकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डायरीतील ‘साधक’ रडारवर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर विष्णू गायकवाडच्या डायरीत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सनानतच्या साधकांची चौकशी सुरू केली आहे.

गायकवाडची मैत्रीण ज्योती कांबळे पोलिसांना सहकार्य करत आहे. दोघांनी गेल्या सात महिन्यात इचलकरंजी व कोल्हापुरात तीनदा भेट दिली होती, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. दरम्यान, सांगली आणि मिरजेतील साधकांकडेही पोलिसांनी चौकशी केल्याचे समजते. नवी मुंबई व्हाया इचलकरंजी-कोल्हापूर असे कनेक्शन आहे का, या अंगानेही चौकशी सुरू आहे.

समीरच्या घरावर गुरूवारी टाकलेल्या छाप्यात सनातन संस्थेच्या संबंधीत कागदपत्रे व डायरी मिळाली आहे. डायरीत १०० हून अधिक व्यक्तींचे मोबाइल व फोन नंबर मिळाले आहेत. त्यात सनातनच्या सक्रीय कार्यकर्ते व साधकांचे क्रमांक आहेत. कोल्हापूर व सांगली पोलिसांनी डायरीत मिळालेल्या क्रमांकावरून शुक्रवारी मिरज, सांगली, कोल्हापूरमधील साधकांकडे चौकशी केली आहे. दरम्यान, एटीएसचे संजय कुमार दोन दिवसाच्या तपासानंतर दुपारी पुण्याकडे रवाना झाले. कोल्हापूर पोलिसांसह सीबीआय आणि सीआयडी अधिकारीही समीरकडे चौकशी करत आहेत.

दरम्यान, पानसरे हत्या प्रकरणात गायकवाडला केवळ तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अटक झाल्याचा दावा सनातन संस्थेतर्फे केला आहे. पुरोगाम्यांकडून सेलिब्रिटींसह आंदोलने, खोटे आरोप व कोर्टात याचिका करून तपास यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सनातन संस्थेने मुंबईत पत्रकार परिषदेत केला आहे.

समीरचे जप आणि स्तोत्र

समीर विचारलेल्या प्रश्नांना बगल देत आहे. काही वेळा तो स्तोत्र म्हणतो तर काही वेळा जप करतो. काही वेळा तो भक्तीगीतेही गुणगुणतो. पानसरे हत्येसंबंधित विचारलेल्या प्रश्नांना तो उत्तर देत नाही. त्याने पानसरे संबंधी केलेल्या वक्तव्याबद्दल बोलण्याचे टाळत आहे. समीरची मैत्रीण ज्योती कांबळे तपासात सहकार्य करत आहे. तिला पोलिसांनी मुंबईतील कांजूर मार्ग येथून ताब्यात घेतले आहे.
.
................

पानसरे यांच्या हत्येचा तपास करत असलेल्या विशेष पथकाने संकेश्वर येथून श्रीधर विजय जाधव (२३) आणि सुशील विजय जाधव (२१) यांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही समीरचे मेहुणे आहेत. संकेश्वर पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. बनावट पिस्‍तूल विकणाऱ्या मनीष नागोरी याच्याकडेही चौकशी केली आहे. नागोरीला दाभोळकर हत्येच्या तपासात यापूर्वी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रात्री उशिरा सांगली येथील सनातनच्या एका कार्यकर्त्याकडे चौकशी केली आहे.
.
..........

गेल्या सात महिन्यात समीर व ज्योतीने कोल्हापूर व इचलकरंजीला तीनदा भेट दिल्याचे सांगितले. समीर पानसरेसंबंधी वक्तव्य केल्याचा दुजोरा ज्योतीने दिला आहे पण, समीर मात्र नाकारत आहे. गेले दोन दिवस पोलिसांना सहकार्य करून ज्योती तिच्या इचलकरंजीतील नातलगाकडे जाते. दोघांना एकत्रित प्रश्न विचारताना समीर तिच्यावर डाफरत असल्याने पोलिसांचा संशय बळावत चालला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बीचा दणका सतरा मंडळांना

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणपती आगमनाच्या मिरवणुकीतच डॉल्बीमुक्तीच्या विचाराचे विसर्जन करत कानठळ्या बसवणाऱ्या डॉल्बीवर नाचणाऱ्या १७ मंडळांना ध्वनीप्रदूषण विरोधी कायद्यानुसार दणका बसला आहे. गुरूवारी गणेशागमन मिरवणुकीत राजारामपुरीतील मिरवणूक मार्गावर डॉल्बीच्या आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या १७ मंडळांविरोधात कारवाईचा प्रस्ताव राजारामपुरी पोलिसांनी तयार केला आहे. डॉल्बीविरोधातील कारवाईचा बडगा शहरातील अन्य मिरवणूक मार्गावर कर्क्कश डॉल्बीचा वापर केलेल्या मंडळांवरही उगारला जाणार आहे. ध्वनिप्रदूषण केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात येणार आहे.

गुरूवारी सायंकाळनंतर तरूण मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीला सुरूवात झाली होती. डॉल्बीमुक्त गणेशोत्सव असे आवाहन पोलिस प्रशासन आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी वारंवार आवाहन करूनही मिरवणुकीतील डॉल्बीच्या भिंतींनी त्याला हरताळ फासला. राजारामपुरीतील मुख्य मार्ग सायंकाळी सहानंतर डॉल्बीच्या कर्णकर्कश्‍श आवाजाने गजबजून गेला. आवाजाची मर्यादा न पाळत डॉल्बीच्या ठेक्यावर बेभानपणे नाचणाऱ्या तरूणाईने ध्वनीप्रदूषणाच्या साऱ्या सीमा ओलांडल्याचे चित्र दिसले.

ध्वनीप्रदूषण विरोधी कायद्याचा भंग करणाऱ्या राजारामपुरीतील १७ मंडळांची नावे निश्चित केली आहेत. विसर्जन मिरवणुकीतही आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस मुख्यालयाकडून आले आहेत.

अमृत देशमुख, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉ. पानसरे हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवा

0
0

मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्याविषयी मौन बाळगणारे मुख्यमंत्री सनातन संस्थेच्या दबावाखाली काम करतात का? अशी विचारणा करीत या हत्येचा तपास योग्य व्हावा यासाठी सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

पानसरे यांच्या हत्येचा तपास योग्य व्हावा यासाठी तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होता कामा नये असे सांगत हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी विखे यांनी केली. सीबीआयकडे तपास द्या नाही तर न्यायालयाच्या नियंत्रणाखालील विशेष तपास पथकाने (एसआयटी) हा तपास करावा अशी दुसरी मागणीही राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.

दरम्यान, येथील सरकारी मत्सबीज केंद्रात कागदोपत्री मत्सबीज वर्षभर बंद पडले आहे. मात्र या मत्सबीज संगोपन केंद्रात काही खासगी व्यक्ती व संस्था मत्सबीज तयार करून त्याची खुलेआम विक्री करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बी वाजवणाऱ्या १६ मंडळांची नावे जाहीर

0
0

मंडळाच्या अध्यक्षांसह सदस्यांची चौकशी करणार
मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर

गणपती आगमनाच्या मिरवणुकीत गुरूवारी कानठळ्या बसवणाऱ्या डॉल्बीवर राजारामपुरी मुख्यमार्गावर नाचणाऱ्या १६ मंडळांची यादी राजारामपुरी पोलिसांनी जाहीर केली आहे. या मंडळांनी वापरलेली डॉल्बी यंत्रणा कुणाच्या मालकीची असून भाडेतत्वावर घेण्यासाठी कुणी आर्थिक व्यवहार केला आहे याबाबत मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांची चौकशी करण्यात येणार आहे. क्षमतेपेक्षा अधिक आवाज असलेल्या डॉल्बीचा वापर करून ध्वनिप्रदूषण केल्याच्या आरोपावरून या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दोषी मंडळे

चॅलेंज स्पोर्टस क्लब, शिवशक्ती मित्रमंडळ ( राजारामपुरी १३ वी गल्ली), छत्रपती फ्रेन्डस सर्कल (२ री गल्ली), फ्रेंडस तरूण मंडळ (७ वी गल्ली), एकता मित्र मंडळ, हनुमान तालीम मंडळ (३ री गल्ली), राधेय युवक मित्र मंडळ (८ वी गल्ली), छत्रपती राजे शिवाजी तरूण मंडळ, वेलकम फ्रेंडस सर्कल (१४ वी गल्ली), पद्मराज स्पोर्टस ( ९ वी गल्ली), अष्टविनायक तरूण मंडळ (आईचा पुतळा), शहीद भगतसिंग तरूण मंडळ (६ वी गल्ली), आर. टी. ग्रुप (११ वी गल्ली), जयशिवराय मित्र मंडळ (दौलत नगर), दि गणेश सांस्कृतिक सेवा मंडळ (माळी कॉलनी), राजारामपुरी स्पोर्टस मंडळ (३ री गल्ली) या मंडळाचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळिंबाचे मोल वाढले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फेब्रुवारी-मार्चमध्ये अवकाळी पावसाने दिलेला तडाखा आणि नैऋत्य मान्सून पावसाने दिलेल्या ओढीमुळे डाळिंब पिकावर चांगलाच परिणाम झाला आहे. अपेक्षित उत्पादनापेक्षा केवळ १५ ते २० टक्के उत्पादन मिळत असल्याने डाळिंबाची आवक प्रचंड घटली आहे. यामुळे एक किलो डाळिंबाचा दर १५० ते २५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या आठवड्यातील दरापेक्षा दरात तिप्पटीने वाढ झाली आहे. डाळिंबाची आवक घटत असतानाच नागपुरी संत्र्यांची आवक सुरू झाली आहे. फळभाज्यांचे दरही स्थिर आहेत.

फेब्रुवारीमध्ये डाळिंब उत्पादक क्षेत्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान झाले होते. आंबिया बहाराला अखेरच्या क्षणी पावसाने तडाखा दिल्याने उत्पादकांचे नुकसान झाले होते. आंबिया बहारामधील डाळिंबाचे उत्पादन कमी झाल्याचे परिणाम बाजारपेठेवर दिसू लागले आहेत. अवकाळी पावसानंतर जतन केलेल्या डाळिंबा बागांना पाणी टंचाईचाही परिणाम दिसू लागला आहे. आवक घटल्याने दरावर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्यात ३० ते ४० रुपयांवर असलेला दर १५० ते २५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नवरात्रोत्सवात फळांना जास्त मागणी असते. नवरात्रोत्सवाला अद्याप एक महिन्याचा अवधी असला, तरी डाळिंबाच्या दरामध्ये अशीच वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

संत्री आवक सुरू

सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संत्र्यांची आवक सुरू होते. परदेशी फळांमुळे वर्षभर बाजारपेठेत संत्री मिळत असले, तरी खास नागपुरी संत्र्यांची आवक गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू झाली आहे.

सांगली बाजारपेठेत बेदाण्याची आवक

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढत असून गेल्या आठवड्यात १६०६९ क्विंटल इतकी एकूण आवक झाली आहे. क्विंटलला जास्तीत जास्त दर २६ हजार रुपयांपर्यत गेला असला तरी किमान दरही एक हजार रुपयांनी उतरला असून तो आता ८ हजारावर स्थिर झाला आहे. राजापुरी आणि चोरा हळदीची आवक घटली असून परपेठेतील हळदीची आवक मात्र ११६६ क्विंटलनी वाढली आहे. कोल्हापुरी गुळाची आवकही ३४१५ क्विंटलनी घटली असून कमाल दर मात्र ३६०० वर पोहचला आहे. सोयाबीनची आवक मात्र ४५१ क्विंटलनी वाढली आहे. घाऊक बाजारात कांद्याचे दर उतरले असले तरी किरकोळ पेठेत अद्यापही एक किलो कांद्याला साठ ते सत्तर रुपये मोजावे लागत आहेत.

फळभाज्यांचे दर स्थिर

मागणीप्रमाणे फळभाज्यांची आवक होत असल्याने या आठवड्यात दर स्थिर राहिले आहेत. सर्वच फळभाज्यांचे दर २० ते ३० रुयपे किलोवर स्थिर राहिल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. फळभाजीसह मेथी, चाकवत, पालक भाज्यांची आवक वाढली आहे. फ्लॉवर व कोबीच्या दरात या आठवड्यातही वाढ झालेली नसल्याने उत्पादकांपुढे संकट निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्तारीकरणाला निधी देऊ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विमानतळ विस्तारीकरणासाठी विमानतळ प्राधिकरणाने वन विभागाची १५ एकर जमीन घेतली आहे. या बदल्यात वन विभागाला दिलेल्या जमिनीसाठी विकास निधीची तरतूद केंद्र सरकारकडून होत नसेल, तर राज्य सरकार रक्कम अदा करेल, असा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. या ठरावामुळे विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या चार वर्षांपासून विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. विस्तारीकरणासाठी विमानतळ प्राधिकरणाने वन विभागाची १५ एकर जमीन ताब्यात घेतली आहे. या जमिनीच्या बदल्यात वन विभागास शाहूवाडी तालुक्यात १५ एकर जमीन देण्यात आली आहे, मात्र या जमिनीवर वृक्षारोपण करण्यासाठी आवश्यक असलेली पावणेदोन कोटींची रक्कम विमानतळ प्राधिकरणाने वन विभागाकडे अदा केलेली नाही. ही रक्कम कोणी द्यायची यावरून काम अडले आहे. हा मुद्दा नियोजन बैठकीत उपस्थित होताच याबाबत केंद्र सरकारने संबंधित रक्कम अदा करण्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेण्याची सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. जर केंद्र सरकारने पैसे दिले नाहीत, तर ही रक्कम राज्य सरकार अदा करेल अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

बैठकीत ग्रामीण भागातील वीज जोडण्या रखडल्याचा मुद्दा चांगलाच तापला. आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, सत्यजीत पाटील-सरुडकर यांनी याबाबत महावितरणचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरत याआधी मंजूर झालेल्या ३ कोटी ४१ लाख रुपयांचे काय झाले असा सवाल उपस्थित केला.

यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा दुष्काळ सदृश्य जाहीर करावा आणि धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग करावा अशी मागणी केली. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, जि.प. अध्यक्षा विमल पाटील, आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित पाटील, सुरेश हाळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, अमल महाडिक उपस्थित होते.

खासदारांनाही हवा निधी

जिल्हा नियोजन समितीकडून निधी वितरणाबाबत विसंगती होत असल्याचा आरोप आमदार मुश्रीफ, क्षीरसागर, नरके, सत्यजीत पाटील-सरूडकर यांनी केला. सर्व लोकप्रतिनिधींना समान किंवा त्यांच्या मतदारसंघातील गरजेनुसार निधी उपलब्ध व्हावा असा आग्रह आमदारांनी धरला. हाच मुद्दा पकडून खासदार धनंजय महाडिक यांनीही खासदारांसाठी किमान पाच कोटीच्या निधीची तरतूद जिल्हा नियोजन समितीतून झाली पाहिजे असा आग्रह धरला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार जिल्ह्यांतील लोकेशनला महत्त्व

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉ. गोविंद पानसरे हत्येतील अटक केलेल्या संशयित समीर गायकवाड याच्या मोबाइल कॉलिंगचा तपास करताना त्याने चार जिल्ह्यांतील विशिष्ट लोकेशनवर जास्त चर्चा केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी समीरच्या जप्त केलेल्या २३ मोबाइलच्या फॉरेन्सिक अॅनॅलिसीस करताना ही बाब समोर आली आहे. दरम्यान, याप्रकरणी समीरच्या सर्व नातेवाइकांकडे चौकशी करण्यात येत आहे.

समीरला अटक केल्यानंतर सांगली पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून सनातन संस्थेचे दोन बॅग्ज साहित्य, एक चाकू, विनासीमकार्डचे २३ मोबाइल संच, ५० सीमकार्ड, एक लॅपटॉप जप्त केला होता. त्याच्याकडे सापडलेल्या २३ मोबाइल संचांचे फॉरेन्सिक अॅनॅलिसीस सुरू केले आहे.

अॅनॅलिसीसमध्ये चार जिल्ह्यांत विशिष्ट लोकेशनवर समीरने कॉल केल्याचे स्पष्ट झाले आहे. या चार जिल्ह्यांत कर्नाटकातील एखादा जिल्हा असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. समीरविरोधात तांत्रिक पुरावा महत्त्वाचा ठरणार असल्याने सायबर सेलमधील अधिकारी युद्धपातळीवर काम करत आहेत.

संशयित गायकवाडच्या आवाजाचे नमुने पोलिसांनी गुजरात येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांनी गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबवर संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांना विचारले असता, देशात गुजरातची फॉरेन्सिक लॅब प्रथम क्रमांकाची आहे. आमच्या दृष्टीने गुजरातची लॅब सर्वोत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. समीरचे वकीलपत्र घेण्यासाठी हिंदू विधिज्ञ परिषदेने तयारी सुरू केली आहे. परिषदेचे पदाधिकारी वीरेंद्र इचलकरंजीकर व प्रीती पाटील आज कोर्टात उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

0
0

कोल्हापूर : सनातन संस्थेला दहशतवादी घोषित करून त्यावर तत्काळ बंदी घालावी, त्यांना पाठीशी घालणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसह महाराष्ट्र सरकारचा धिक्कार करणाऱ्या घोषणा देत विविध संस्था संघटनांच्यावतीने शनिवारी दसरा चौकात निदर्शने करण्यात आली. हिंदू धर्माचा बुरखा पांघरुण सनातन संस्था हिंदू विरोधी कारवाया करत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपप्रणित सरकार आल्यामुळे त्यांच्या कारवायात वाढच होत आहे. निदर्शनात पिपल्स रिपब्लीकन पार्टी, नॅशनल ब्लॅक पॅंथर, महाराष्ट्र विकास आघाडी, दलित ऐक्य चळवळ, ऑल इंडिया नाग आर्मी, संभाजी ब्रिगेड, दलित महिला संघर्ष समिती, फकिरा क्रांती दल, दलित युवक संघर्ष समिती, फुले शाहू आंबेडकर फोरम, सम्यक प्रतिष्ठान, बसवण्णा क्रांती दल आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रारूप मतदारयादीवरून घोळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी (ता.१९) प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध झाली. सकाळी १० वाजता यादी प्रसिद्ध झाली, मात्र सायंकाळी चारवाजेपर्यंत यादी न मिळाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना मतदार यादीशिवाय परत जावे लागले. तर काही ठिकाणी झेरॉक्स उपलब्ध नसल्याने विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर १२४ मतदारयांद्याची विक्री झाली. प्रारुप मतदारयादीवर २८ सप्टेंबरपर्यंत हरकती घेण्यात येणार आहेत.

एक ऑगस्ट २०१५ पर्यंत मतदारयादीत नाव नोंदणी केलेल्या मतदारांचा प्रारुप मतदारयादीमध्ये समावेश केला आहे. चार लाख ५२ हजार ९०८ एकूण मतदारांचा मतदारयादीमध्ये समावेश आहे. यामध्ये पुरुष दोन लाख ३० हजार ८८९ व दोन लाख २२ हजार १७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. यानुसार सकाळी मतदारयादी प्रसिद्ध करुन महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात लावण्यात आल्या.

मतदारयादीची अधिकची प्रत नसल्याने यादी खरेदीसाठी आलेल्या नागरीकांची चांगलीच अडचण झाली. एका पृष्ठासाठी दोन रुपये याप्रमाणे नागरी सुविधा केंद्रामध्ये मतदारयादीतील पानांच्या संख्येनुसार शुल्क जमा केल्यानंतर मतदारयादी देण्यात येत होती. यानुसार मतदारयादीसाठी सरासरी ४०० ते ८०० रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे. गांधी मैदान विभागीय कार्यालयातून एकाही यादीची विक्री झाली नसली, तरी एक तक्रार मात्र दाखल झाली आहे. शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयातून नऊ, राजारामपुरीतून ६२ तर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयातून ६३ मतदारयाद्यांची विक्री झाली आहे. हरकती प्राप्त झाल्यानंतर अंतिम यादी तीन ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे.

बिंदू चौक प्रभागात सर्वाधिक मतदार

शनिवारी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप यादीमध्ये सर्वात जास्त ८१६५ मतदारांचा समावेश प्रभाग क्रमांक ३२ बिंदू चौक प्रभागात आहे. हा प्रभाग सर्वसाधारण खुला असल्याने येथील उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. कळंबा फिल्टर हाऊस मतदारसंघात सर्वात कमी ३१०४ मतदारांचा समावेश आहे. यामुळे येथील उमेदवाराला ७०० ते ८०० मते विजयापर्यंत पोहोचवणारी ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उट्टे काढण्यासाठी शड्डू

0
0

Gurubal.Mali@timesgroup.com

कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्याचा प्रयत्न महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे. महापालिकेच्या सत्तेतून बाहेर ठेवल्याचा राग आमदार महादेवराव महाडिक हे सतेज पाटील यांच्यावर काढत आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांनी घरावर मोर्चा काढल्याचा राग पालकमंत्र्यांच्या मनातून अजूनही गेलेला नाही, त्यामुळे संधी मिळेल तिथे ते मुश्रीफांवर हल्ला चढवत आहेत. मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची महापालिकेतून सुट्टी करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व महाडिक यांनी पक्षनिष्ठेला बाजूला ठेवत गट्टी केली आहे. या दोघांच्या शिवाजी चौकातील भाषणबाजीने महापालिका निवडणुकीत वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप होणार याची झलकच दिसली आहे.

महापालिका निवडणुकीची सध्या सर्वच पक्षात जुळवाजुळव सुरू आहे. कोणत्या पक्षाला किती जागा यापेक्षा आपल्या गटाला जादा जागा कशा मिळतील यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून आमदार महाडिक आणि माजी राज्यमंत्री सतेज पाटील या दोन काँग्रेसच्या नेत्यांतच टोलबाजी सुरू झाली आहे. शिवाजी चौकाच्या महागणपती समोर महाडिक यांनी पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांनी केलेले आरोप नवीन नाहीत. यापूर्वी अनेकदा त्यांनी असे आरोप केले आहेत. पण संधी मिळेल तेथे त्यांनी पाटील यांच्यावर आरोप करत महापालिका निवडणुकीतील इरादा स्पष्ट करत आहेत. यापूर्वी पाटील हे सातत्याने महाडिक यांच्यावर घसरत होते. तेव्हा महाडिक मौन बाळगत होते, आता परिस्थिती उलटी आहे.

पाच वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीनंतर महाडिक यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी पाटील यांनी आमदार मुश्रीफ यांना जवळ केले. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आता जवळ केले आहे. ताराराणी आघाडी कोणाची आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. विधानसभेत पाडल्यानंतर आता पाटील यांना महापालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचा महाडिक यांचा डाव आहे. यामुळेच ते संधी मिळेल तेथे त्यांना कोंडीत पकडत आहेत.

पालकमंत्री पाटील यांचा आमदार मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यावर जुना राग आहे. तो काढण्यासाठी प्रथम त्यांनी महाडिक यांना जवळ केले. त्यातून सतेज पाटील यांचा पराभव केला. आता मुश्रीफ यांच्यावर राग काढण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा बँकेच्या फेरचौकशी​चा ससेमिरा लावला आहे. मुश्रीफांनी पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढला, तो पालकमंत्र्यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर मुश्रीफांनी अनेकदा पालकमंत्र्यांना लक्ष केले. यामुळेच पालकमंत्री आता मुश्रीफ यांच्यामागे लागले आहेत. 'फुरफुरू नका, आडवे आला तर आडवे करू' अशी भाषा वापरत पालकमंत्र्यांनी पुढील कारवाईची झलक दाखवली आहे. सहकारमंत्री असल्याने आता त्यांच्या हातात ताकद आहे आणि राज्य बँक, जिल्हा बँकेतील घोटाळयात मुश्रीफांचे नाव आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या हातात आयते कोलित आहे. महापालिका ​निवडणूक महिन्यानंतर होणार असली तरी नेत्यांमध्ये खडाखडी सुरू झाली आहे. शिवाजी चौकात त्याची झलक पहायला मिळाली आहे.आता महिनाभर ही कुस्ती चांगलीच रंगणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

इर्षेचे पडसाद उमटणार

लोकसभेपासून महाडिक यांचे स्टार उजळले आहेत, तर दुसरीकडे विधानसभा गोकुळ, राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत अपयश आल्याने पाटील बॅकफूटवर आले आहेत. आता तिसरा अंक सुरू झाल्याचे सांगत महाडिक यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. महापालिका निवडणुकीतील या इर्षेचे पडसाद नंतर विधानपरिषद निवडणुकीत उमटण्याची चिन्हे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर, कराडमधील साधकांवर नजर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाड याला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता कोल्हापूर, सातारा व कराडमधील साधकांवर नजर वळवली आहे. समीर हा मूळचा सांगलीचा असल्याने कोल्हापूर, सातारा व कराडमधील उजव्या विचारांच्या कार्यकर्त्यांसमवेत उठबस असण्याची शक्यता ठेऊन पोलिस तपास करत आहेत.

समीर गायकवाड याच्या घरावर धाड टाकल्यानंतर पोलिसांना सनातन संस्थेसंबधीच्या कागदपत्रांचे घबाड पोलिसांना मिळाले आहे. समीरची डायरी मिळाली असून सांगली व कोल्हापूर पोलिसांनी संयुक्तपणे तपास सुरू केला आहे. समीरची मैत्रिण ज्योती कांबळे हिने समीरसमवेत कोल्हापूर व इचलकरंजीत दोन ते तीन वेळा भेट दिल्याचे कबूल केले आहे. त्याचबरोबर समीरने स्वतंत्र्यपणे कोल्हापुरात भेट दिल्याची पोलिसांना शक्यता वाटत आहे. समीर या हत्येतील प्लॅनर असल्याने त्याच्या कोल्हापुरातील साधकांच्या भेटीगाठी झाली असण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील एका पोलिस ठाण्याच्या निरीक्षकाने शनिवारी कसून चौकशी केली.

कोल्हापूर जिल्ह्यात सनातनचे मोठे जाळे असून अनेक साधक आहेत. हे साधक सर्व वयोगटातील असले तरी तरूण साधकांच्यावर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात सनातन संस्थेच्या अनेक शाखा कार्यरत आहेत. प्रत्येक साधकाची विशिष्ट शाखेवर नियुक्ती केली जाते. सध्या काही संस्थांवर कार्यरत असलेले पदाधिकारी दहा वर्षापूर्वी सनातन संस्थेच्या कार्यकारिणीवर कार्यरत होते. अशा पदाधिकाऱ्यांची यादीही पोलिसांनी तयार केली असून त्यांच्या हालचालीवर गुप्त नजर ठेवण्यात येत आहे.

केंद्र व राज्यात नवीन सरकार ​अस्तित्वात असल्यावर सनातन संस्था आक्रमक झाली होती. कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज व कराड या परिसरात संस्थेने चांगलेच हातपाय पसरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज काय नवीन माहिती पुढे आली?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अटक केलेल्या संशयिताकडून आज काय नवीन माहिती पुढे आली का? त्याच्या साथीदारांनी हत्येच्या कटाबाबत काही कबूल केले का? पोलिसांनी आज चौकशीत काय विचारले? हे प्रश्न आहेत उमा पानसरे यांचे. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या समीर गायकवाडच्या चौकशीकडे जसे प्रत्येकाचे लक्ष लागले आहे त्याहून कैकपटीने उमा पानसरे यांचेही कान लागून राहिले आहेत. मला धक्का बसेल या विचाराने माझ्यापासून चौकशीतून बाहेर येणारी माहिती लपवू नका, कारण त्यातील एखाद्या माहितीने मला काही आठवू शकेल असे त्या आपल्या कुटुंबीयांना सांगत आहेत. गेल्या चार दिवसांपासून गायकवाड याच्या चौकशीबाबत आणि पानसरे हत्येच्या घटनेबाबत वृत्तपत्रातून येणाऱ्या बातम्या आणि ​टीव्हीवरील चर्चा उमाताई आवर्जून ऐकत आहेत.

सात महिन्यांपूर्वी कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या तेव्हा शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या पत्नी उमा पानसरे यादेखील गंभीर जखमी झाल्या होत्या. उमाताईंच्या डोक्यात गोळी घुसल्याने त्यांच्या स्मरणक्षमतेवर परिणाम झाला आहे. तसेच त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यामुळेही त्या शारिरीकदृष्ट्या खचल्या आहेत. एकीकडे पानसरेअण्णांची उणीव आणि दुसरीकडे उमाताईंना कसे सावरायचे अशा भावनिक कल्लोळात असतानाच समीर गायकवाड या संशयिताच्या अटकेने पानसरे यांच्या घरातील वातावरण काहीसे हलके झाले आहे.

पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या एकमेव साक्षीदार असलेल्या उमाताईंना जेव्हा ही बातमी सांगितली तेव्हा त्या काहीशा कोलमडल्या. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी स्वत:ला सावरले आहे. गायकवाडाचा वृत्तपत्रात आलेला फोटो पाहून त्या रोज कन्या स्मिता आणि स्नुषा मेघा यांना म्हणतात की किती तरूण मुलगा आहे हा? हत्येत या मुलाचा कसा सहभाग असेल? एखादा माणूस अशाप्रकारचे कृत्य करून सहा महिने शांत डोक्याने कसा काय जगू शकतो? कधीतरी याच्या मनात त्याने केलेल्या कृत्याबद्दल पश्चातापाची भावना आली नसेल का? अशा प्रश्नांचे काहूर उमाताईंच्या मनात उठत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सनातन, बजरंग, श्रीराम’चे कूळ एकच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सनातन, बजरंग दल, हिंदू राष्ट्र व श्रीराम सेनेचे कूळ एकच आहे. पण संशयित सापडल्यानंतर ते मराठा समाज व बहुजन समाजातील आहेत, अशी पोस्ट सोशल मीडियावर पसरवणारी व्यवस्था आहे. संशयित पकडूनही त्यांच्या पाठिशी अशा संस्था जाहीरपणे उभ्या राहतात, हे मोठे आश्चर्य आहे,' असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

विखे-पाटील यांनी पानसरे कुटुंबियांची भेट घेऊन हत्येच्या तपासाबाबत चर्चा केली. पानसरे हत्येच्या तपासात राजकीय दबाव येऊ नये यासाठी विरोधी पक्षाने सरकारवर दबाव आणावा. सनातन संस्थेवर बंदी घालण्याबरोबरच यापुढे कोणत्याही पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता अशा हल्ल्यांना बळी पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशी मागणी पानसरे कुटुंबातील सदस्य व डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली. चर्चेत मेघा पानसरे, अॅड. बन्सी सातपुते, कॉ. दिलीप पवार, नामदेव गावडे, सुभाष देसाई यांनी सहभाग घेतला.

विखे पाटील यांनी पानसरे यांच्या पत्नी उमा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ते म्हणाले, 'शीना बोरा प्रकरणात आरोपींना अटक होऊनही सरकारने हा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे. तसेच पोलिस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली. पण, पानसरे हत्येचा तपासात मात्र युती सरकारने ​कायम ढिलाई दाखवली आहे. पानसरे हत्येचा तपास सीबीआयकडे देण्याची खरी गरज होती.'

'कलबुर्गी तपासात कर्नाटक पोलिसांच्या धडक कारवाईमुळे श्रीराम सेनेचे कार्यकर्ते फरार झाले आहेत. राज्यात मात्र सनातनचे संस्थेचे पदाधिकारी संशयिताचे समर्थन करत असल्याचे चित्र आहे. पानसरे हत्येतील संशयिताला पकडल्यानंतर भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षाचे नेते काहीही बोलत नाहीत. बेळगाव, गुलबर्गा, धारवाड व हुबळी येथे कनेक्शन दिसून येत आहे. पण राज्य सरकार कोणताच निर्णय घेत नाही,' अशी टीकाही त्यांनी केली.

बॉम्ब बनवणे ही कसली साधना?

पानसरे यांचे जावई अॅड बन्सी सातपुते म्हणाले, 'सनातनवर बंदी घालताना लोकांचे प्रबोधनही करण्याची गरज आहे. करोडोंच्या घोटाळ्याबद्दल सनातनची मंडळी काहीच बोलत नाहीत. एखाद्याची हत्या करणे हे कोणत्या साधनेत बसते. कागलमध्ये पानसरे हत्येसंबंधातील नाटकावर पोलिस बंदी आणतात आणि सनातन व त्यांच्या संस्थेच्या कार्यक्रमाला मात्र ताबडतोब परवानगी मिळते. पनवेल येथे सुरू असलेल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये कडवे साधक बनवले जात आहेत. बॉम्ब बनवणे हे कोणत्या साधनेत बसते ?'

सनातनवर बंदी घाला

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले,'दहशतवादी 'सिमी' वर बंदी घालण्याचे धाडस आघाडी सरकारने केले होते. त्यानंतर बीड, जालना, औरंगाबाद येथील सिमीची पाळेमुळे खणून काढली होती. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित सनातन संस्थेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने ताबडतोब या संस्थेवरही बंदी घालावी. पानसरे हत्येचा तपास करताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांची बदली सरकारने केली होती. यापुढे तपास पूर्ण होईपर्यंत सरकारने कोणत्याही अधिकाऱ्यांची बदली करू नये.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुद्र अजूनही मोकाट कसा?

0
0

Udhav.godase@timesgroup.com

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाड आणि गोव्यासह मुंबईतील स्फोटांचा मोस्ट वॉन्टेड रुद्रगौंडा पाटील याचे संबंध तपासात उघड होत असल्याने रुद्रगौंडा पाटील तपासाच्या केंद्रस्थानी आला आहे. रुद्रगौंडा पाटील हा गंभीर गुन्ह्यातील मोस्ट वॉन्टेड आरोपी असूनही गेली पाच वर्षे तो मोकाट कसा? असा प्रश्न पुरोगामी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

शस्त्र आणि स्फोटकांचा अवैध वापर करणाऱ्या रुद्रगौंडा पाटील याला २००९ मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोस्ट वॉन्टेड जाहीर केले आहे. मडगाव स्फोटानंतर भावे नाट्यगृह आणि गडकरी रंगायतनमधील स्फोटातही रुद्रगौंडा पाटीलच्या नावाची चर्चा होती, पण पाच वर्षांपासून रुद्र पाटील तपास यंत्रणांना गुंगारा देत आहे. मडगावमध्ये १६ ऑक्टोबर २००९ मध्ये झालेल्या स्फोटात रुद्रगौंडाचा भाऊ मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक दोघे मृत्यूमुखी पडले होते. स्कूटरच्या डिकीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्याने ती घटना घडली होती. त्या घटनेनंतर मडगाव पोलिसांनी रुद्रगौंडा पाटीलसह त्याचे साथीदार सारंग पाटील आणि जयप्रकाश आण्णा यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. पण हे आरोपी पोलिसांच्या हाती लागले नव्हते.

मडगाव स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवल्यानंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रुद्रगौंडा पाटीलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. तपास करताना त्याच्या सांगलीच्या घरापर्यंत पोलिस पोहोचले होते. पोलिसांनी २००९ मध्येच रुद्रगौंडा पाटीलचा फोटो, वर्णन आणि पत्ता एनआयएच्या वेबसाइटवर प्रसिध्द केली आहे. गेली पाच वर्षे एनआयएकडून रुद्रगौंडा पाटीलचा शोध सुरू असूनही गंभीर गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पुरोगामी संघटनांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रुद्रगौंडा पाटील याच्या नावाची चर्चा डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हतयेनंतरही सुरू होती. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि डॉ. कलबुर्गी या तिघांच्याही हत्येमध्ये काही साम्य पोलिसांना आढळले आहे. त्यामुळे या तिन्ही प्रकरणात एकच व्यक्ती असावा, असा संशय बळावला आहे. समीर गायकवाड आणि रुद्रगौंडा पाटील या दोघांची मैत्री होती.

अनेकदा यांच्यात बोलणे झाल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळेच रुद्रगौंडा पाटीलची पत्नी अॅड. प्रीती पाटीलने समीर गायकवाडचे वकीलपत्र घेतले आहे. इतक्या दिवसात पोलिसांनी प्रीती पाटीलकडे रुद्रगौंडा पाटीलबाबत काही विचारणा केली आहे काय? प्रीती पाटीलकडून एनआयए, एसआयटी आणि कोल्हापूर पोलिसांना काही महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत काय? या प्रश्नांची उत्तरे पानसरे हत्येचा उलगडा करण्यास महत्वाची ठरणार आहेत.

एनआयएची माहिती

एनआयएकडून रुद्रगौंडा पाटीलचे दोन पत्ते जाहीर. रुद्रगौंडा पाटीलचे दोन फोटोही प्रसिध्द केले आहेत. धोकादायक शस्त्रे आणि स्फोटकांच्या वापराबाबतचे गुन्हे त्याच्यावर दाखल केल्याची माहिती एनआयएने वेबसाइटवर प्रसिध्द केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेट्रोल भेसळ, मटक्याचे काय?

0
0

सतेज पाटील यांचे महाडिक यांना प्रतिआव्हान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हिंमत असेल तर ‌शिवाजी चौकातील गणपतीसमोर पेट्रोल भेसळीतील राजन शिंदे आणि मटका अडड्यावरील छाप्याबाबत बोला, असे प्रतिआव्हान माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आमदार महाडिक यांना दिले. शुक्रवारी शिवाजी चौकातील २१ फुटी गणेश मूर्ती दर्शन उदघाटनप्रसंगी आमदार महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर टीका केली होती. याला पाटील यांनी पत्रकाद्वारे प्रतिआव्हान केले.

आपण दोन नंबरवाले नाही, असे महाडिक वारंवार सांगायचा प्रयत्न का करतात ? असा सवाल करत जो चोर असतो तो आपण चोरी केली नसल्याचे रेटून बोलत असतो. न्यू शाहूपुरीत २६ फेब्रुवारी १९७९ रोजी माधवराव रामचंद्र महाडिक यांच्या घरातील मटका अडड्यावर पोलिसांनी छापा टाकला. ते महाडिक नेमके कोण ? पेट्रोल भेसळ प्रकरणात ज्याला तुरुंगात जावे लागले त्या राजन शिंदे याच्याशी आपला काय संबंध ? याचा खुलासा आमदार महाडिक यांनी करावा असे आव्हानही पाटील यांनी केले.

महाडिक कंपनीच्या काळ्या धंद्यांची सविस्तर माहिती २८ जुलैच्या सर्व वर्तमानपत्रातून आली आहे, ती महाडिक यांनी व्यवस्थित वाचावी म्हणजे त्यांना त्यांच्या काळ्या कारनाम्यांचे स्मरण होईल. महाडिक यांची 'डॉयलॉगबाजी' आणि त्यांचे तेच ते सोंगी भजन ऐकून जनताच काय, शिवाजी चौकातील महागणपतीही कंटाळला आहे. मोगलांच्या घोड्यांना ज्याप्रमाणे पाण्यात 'धनाजी संताजी' दिसायचे त्याप्रमाणे महाडिक यांना प्रत्येक ठिकाणी माझाच चेहरा दिसत असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

ज्यांनी राजकारणात ५० वर्षे घालविली त्या महाडिक यांना ४३ वर्षांच्या माझ्यासारख्या तरुणाची एवढी धास्ती का वाटते ? वास्तविक शिवाजी चौकातील महागणपती हे राजकीय व्यासपीठ नसल्याचे त्यांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. कोल्हापूरची रखडलेली कामे मार्गी लागावीत यासाठी महागणपतीकडे साकडे मागायचे सोडून लोकांच्या टाळ्या शिट्ट्या ऐकून नाटकातील कलाकाराला करंट यावा अशी डायलॉगबाजी महाडिक करत असल्याची खिल्लीही पाटील यांनी उडविली.

महाडिक घराणे सत्तेचे दिवाणे

काकांनी कॉंग्रेसला आणि पुतण्याने राष्ट्रवादीला टांग लावल्याने ते पक्षाच्या फलकांवरून गायब झाले आहेत. सत्ता असेल त्या पक्षात सामील होणारे महाडिक घराणे सत्तेचे दिवाने आहेत. अशा महाडिक कंपनी विरोधात जनतेच्या पाठबळावर आपला लढा हिमतीने सुरु राहाणार असल्याचेही सतेज पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉल्बीप्रकरणी ११ मंडळांवर खटले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग करणाऱ्या ११ मंडळांच्या २२ कार्यकर्त्यांवर करवीर पोलिसांनी दोन दिवसांत खटले दाखल केले आहेत. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच मंडळाच्या अध्यक्षांना १० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पाचगाव, मोरेवाडी व जरगनगरात डॉल्बी लावून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या ११ मंडळांवर पोलिसांनी खटले दाखल केले आहेत. पाचगाव येथील महादेव तालीम मंडळाचे अध्यक्ष संतोष मारुती शिंदे, डॉल्बीमालक सुनील शिंदे, पाचगाव येथील ओंकार ग्रुपचा अध्यक्ष प्रथमेश निकम व डॉल्बीमालक रवींद्र माने, ​मोरेवाडी येथील तिरुपती कला-क्रीडा संस्कृती मंडळाचा अध्यक्ष प्रवीण बनछोडे व डॉल्बीमालक दिग्विजय तानाजी पाटील, जरगनगर मराठा मावळा ग्रुपचा अध्यक्ष नीलेश पाटील, समर्थ ग्रुपचा अध्यक्ष बंडू मोरे, पाचगाव माळवाडी मित्र मंडळाचा अध्यक्ष अमित पाटील, आर. के. नगर येथील रॉयल फ्रेंड्स सर्कलचा अध्यक्ष अजिंक्य माने, उपाध्यक्ष अजय साखळकर, डॉल्बीमालक दिनेश नेने, जरगरनगर येथील जय राजे मंडळाचा अध्यक्ष प्रसाद खटावकर, मोरेवाडी येथील अनिल स्पोर्टसचा अध्यक्ष मच्छिंद्र मोरे, डॉल्बीमालक विशाल मोरे यांच्याविरुद्ध खटले दाखल केले.

शनिवारी नऊ मंडळांच्या सोळा कार्यकर्त्यांविरुद्ध खटले दाखल केले असून, केदारनाथ मित्र मंडळ व हिंदवी स्वराज मित्र मंडळावर सोमवारी न्यायालयात खटले सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तपास सीबीआयकडे द्या’

0
0

कोल्हापूरः जेष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांबाबत मौन बाळगणारे मुख्यमंत्री सनातनच्या दबावाखाली काम करतात का, अशी विचारणा करत या प्रकरणाचा तपास राजकीय हस्तक्षेपाशिवाय होण्यासाठी सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. सीबीआयकडे तपास देणार नसाल तर कोर्टाच्या देखरेखेखाली एसआयटीने तपास करावा, असेही त्यांनी सुचवले.

पानसरे यांच्या हत्येमागे प्रतिगामी शक्ती असल्याचा आरोप पहिल्यापासून होत होता, समीर गायकवाडला अटक झाल्याने ते सिध्द झाले असल्याचे सांगून पाटील म्हणाले, 'सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी कालच मी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. घटना घडली तेव्हा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सनातन संस्थेला घाईगडबडीने क्लिनचिट दिली होती. त्याचे प्रायचिश्त म्ह्णून त्यांनी जनतेची माफी मागावी. मंत्रीमंडळ बैठकीत सनातनवर बंदी घालण्याचा ठरावही आणावा.'

कोर्टाने अहवाल देण्याचा आदेश दिल्यानंतर एसआयटीने कारवाई केल्याचे सांगून पाटील म्हणाले की यापुढील तपास राजकीय हस्तक्षेपाविना होण्याची गरज आहे. शीना बोरा प्रकरणाचा तपास घाईगडबडीने सीबीआयकडे देण्यात आला. पण पानसरे प्रकरण गंभीर असताना हे प्रकरण सीबीआयकडे का सोपवले नाही? सरकार याबाबत गंभीर नाही. केंद्र आणि राज्य सरकारने विश्वासार्हता गमवली आहे.

सनातनची माहिती सरकारने माहिती लपवून ठेवली. तपासावर राजकीय दबाव होता. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उघडपणे उजव्या शक्तीचा सहभाग नाही, असे सांगून क्लीन चीट देत होते. पालकमंत्री पाटील यांनी आता जनतेची माफी मागावी.

-राधाकृष्ण विखे-पाटील

पोलिस तपासानुसार सनातन संस्थेविषयी समोर येणारी माहिती हीच या संस्थेचे भवितव्य ठरवेल. कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही. विरोधी नेते विखे-पाटील यांचे आरोप पूर्णपणे चुकीचे आहे. असे आरोप करण्याची त्यांची जुनीच सवय आहे.

-चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

कलबुर्गी हत्येत सनातन कनेक्शन?

दरम्यान, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येतही समीरचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कर्नाटक पोलिसांनी आज त्याच्याकडे चौकशी केली. अटकेनंतर सलग तीन दिवस समीरकडे एसआयटी, सीबीआय, सीआयडीची पथके चौकशी करत आहेत. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ नेते पानसरे व डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येत साम्य असल्याने तपास करणाऱ्या सर्व यंत्रणा सक्रीय झाल्या आहेत. पानसरे यांचा हत्येचा तपास थंडावला आहे असे वाटत असताना कलबुर्गी यांच्या हत्येनंतर कोल्हापूर पोलिसांचे पथक हुबळीला गेले होते. कोल्हापूर व कर्नाटक पोलिस तपासात एकमेकाचे सहकार्य घेत आहेत.

समीर गायकवाडला अटक केल्यानंतर कर्नाटकातील पोलिसांनी कोल्हापुरात येऊन चौकशी केली आहे. पानसरे यांच्या हत्येनंतर हल्लेखोर कर्नाटकात पळून गेले असल्याची शक्यता लक्षात घेऊन कोल्हापूर पोलिसांनी बेळगाव, हुबळी, धारवाड, कारवारपर्यंत तपास केला होता. तत्कालीन विशेष पोलिस महानिरीक्षक रितेश कुमार यांनी कर्नाटक व गोव्यातील अकरा जिल्ह्यातील अधीक्षकांत समन्वय बैठका सुरू केल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनआयए पथक आज येणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सनातन संस्थेचा कार्यकर्ता समीर गायकवाड याच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक (एनआयए) रविवारी कोल्हापुरात येणार आहे. २००९ मध्ये गोवा-मडगांव बॉम्बस्फोटाच्या तपासातही एनआयएने समीरची एनआयने चौकशी केली आहे.

दरम्यान, मडगाव स्फोटातील फरार आरोपी सारंग दिलीप अकोलकर ऊर्फ कुलकर्णी याचे नाव पानसरे हत्या प्रकरणात चौकशीत पुढे आले आहे. पोलिसांनी कुलकर्णीचा शोध सुरू केला आहे. सारंगवर पुणे, गोवा पोलिस व राज्य एटीएस व एनआयकडे १२ गुन्हे दाखल आहेत. मडगाव स्फोटातील फरार आरोपी सारंग दिलीप अकोलकर ऊर्फ कुलकर्णी याचे नाव पानसरे हत्या प्रकरणात चौकशीत पुढे आले आहे. सारंगवर पुणे, गोवा पोलिस व राज्य एटीएस व एनआयकडे १२ गुन्हे दाखल आहेत.

समीरची विशेष पथकासह सीआयडी, सीबीआय, कर्नाटक पोलिस चौकशी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एनआयए पथक तपासासाठी येणार असल्याचे संकेत कोल्हापूर पोलिसांकडून मिळत होते. या माहितीला शनिवारी सायंकाळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनीही दुजोरा दिला. एनआयएकडून समीरबरोबरच त्याची मैत्रीण ज्योतीची चौकशी होण्याची शक्यता आहे. एनआयए चौकशी करणार असल्याने असल्याने सनातन संस्थेवर देशविघातक असल्याचा शिक्का बसू शकतो, अशी चर्चा पोलिस दलात सुरू झाली आहे.

शनिवारी गृहविभागानेही तपासाची सविस्तर माहिती एसआयटीकडून घेतली. एनआय पथक कोल्हापुरात येत असल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी शनिवारी सायंकाळी तातडीने बैठक घेतली. बैठकीला पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अतिरिक्त पोलिस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील उपस्थित होते.

मैत्रिणीचा जबाब कोर्टात

समीरची मैत्रिण ज्योती कांबळे हिने शुक्रवारी दुपारी कोर्टात लेखी जबाब दिला. हा जबाब पोलिसांना तपासासाठी उपयुक्त ठरणार आहे. जबाबासाठी साध्या वेषातील महिला अधिकारी आणि पोलिसांनी तिला कोर्टात नेले. सुमारे पाऊण तास तिने स्वहस्ताक्षरात हा जबाब लिहून दिला. हा जबाब तपास अधिकाऱ्यांना बंद लखोट्याव्दारे पाठवण्यात आला आहे. जबाब कोर्टासमोर दिल्याने दबाव टाकून जबाब घेतला असा आरोप पोलिसांवर होऊ शकत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासगीकरणाचा बाऊ करू नका

0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

पाणीपट्टी वसुली, बंद मीटर दुरूस्ती यासाठी खासगी एजन्सी नियुक्त करण्याबरोबरच महापालिका क्षेत्रातील नागरिकांना ८ रुपयांची पाणीपट्टी ३ रुपये दर हजारी लिटरनुसार करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे महापौर विवेक कांबळे यांनी येथे सांगितले.

कांबळे म्हणाले, पाणी पुरवठ्याच्या खासगीकरणाचा उगाचच बाऊ केला जात आहे. याचा अभ्यास न करताच मतप्रदर्शन करणे सुरू आहे. सध्या महापालिकेकडे असणाऱ्या उपलब्ध कर्मचाऱ्यांद्वारे पाणी पुरवठ्याची यंत्रणा सक्षम करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात पाणी गळतीही आहे. मालमत्ताधारकांची संख्या एक लाख १५ हजारांच्या आसपास आहे. प्रत्यक्षात पाणी कनेक्शन्स मात्र ६७ हजार आहेत. याचा अर्थ ४० हजार मालमत्ताधारकांकडे पाणी कनेक्शन्स नाहीत. किमान २० हजार कनेक्शन्स तरी वाढायला हवीत. ७० टक्के पाण्याचे मीटर बंद आहेत. त्यामुळे पाणी गळती वाढत चालली आहे. अपार्टमेंटस्ना एकेकच पाणी कनेक्शन आहे. या सर्वामुळे या विभागाचा तोटा मोठा आहे. या कामी महापालिकेची यंत्रणा कमी पडते.

पालिका व्यावसायिक संकुल उभारणार

महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी मोडकळीस आलेली अतिथीगृहाची, तसेच प्रसूतीगृहाची इमारत पाडून तेथे भव्य व्यावसायिक संकुल उभारले जाईल. तसेच जयश्री टॉकीज जवळील पार्किंग जागेवरही पार्किंग आरक्षणासह मोठे व्यावसायिक संकुल उभारले जाईल. हे दोन्ही प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मांडले आहेत. त्यावर येत्या ३० सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापौर विवेक कांबळे यांनी दिली.

प्रसूतीगृह तात्पुरते शाळा क्र.१३ मध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. बांधकाम पूर्ण होताच ते पुन्हा जुन्या ठिकाणी आणले जाईल. एलबीटी हटल्यामुळे मापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याची गरज आहे. म्हणूनच महापालिकेच्या मोक्याच्या जागांवर व्यावसायिक संकुले बांधण्याची कल्पना आहे. सदर जागेची मालकी महापालिकेकडेच राहील.

पूर्वीच्या बीओटीचा वाईट अनुभव पाहता कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीने बांधकामांना थारा दिला जाणार नाही. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या पद्धतीने बांधकाम केले जाईल. गुंतवणुकीच्या मोबदल्यात २९ वर्षे कराराने बाहेरची गुंतवणूक स्वीकारली जाईल. गुंतवणुकीच्या मोबदल्यात त्यांना भाडे मिळेल. या व्यावसायिक जागांतून महापालिकेला घरपट्टीचे चांगले उत्पन्नही मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images