Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी शिंदे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि गांधीवादी कार्यकर्ते दत्ताजी अनंत शिंदे (वय ९४) यांचे शुक्रवारी राजारामपुरीतील राहत्या घरी निधन झाले. जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघाचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजता आहे.

स्वातंत्र्यसैनिक शिंदे यांना एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, जयप्रकाश नारायण, सानेगुरूजी यांचा सहवास लाभला. चलेजाव चळवळ, प्रजा समाजवादी पक्ष, गोवा मुक्ती चळवळीत ते अग्रेसर राहिले होते. त्यासाठी १९४३ ते १९४६ या कालावधीत तीन वर्षे सहा महिन्यांची शिक्षाही भोगली. पुणे येथील सत्याग्रह, धान्य सत्याग्रह, सभाबंदी हुकूमाचा भंग आदींसह संयुक्त महाराष्ट्र सत्याग्रहाच्या पहिल्या तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते. त्यांच्या नगरसेवकपदाच्या कारकीर्दीत महापालिकेच्या चौकातील विठ्ठल रामजी शिंदे स्मारकाची उभारणी झाली. राष्ट्र सेवा दल, जिल्हा स्टुडंट युनियन, सोशालिस्ट पार्टी आदी संस्थेत ते कार्यरत राहिले. शिवाजी विद्यापीठाने शिंदे यांना पेन्शन सुरु केली होती. मात्र ती नाकारुन विद्यापीठात त्यांनी गांधी अभ्यास केंद्र सुरू केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विसर्जनासाठी सहा कुंड

$
0
0

इराणी खणीवरील विसर्जन प्रक्रिया गत‌िमान करणार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन टाळण्यासाठी पंचगंगा घाटावर चार तर कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावर दोन विसर्जन कुंड उभारूण्यात येणार आहेत. शुक्रवार पेठेनजीकच्या घाटावर ज्योतिरादित्य बिल्डर्स आणि पंचगंगा घाट संवर्धन समिती यांच्या सहकार्याने फोल्डिंगचे कुंड उभारण्यात येणार आहेत. राजाराम बंधाऱ्यावर कायमस्वरुपी दोन कुंड बांधले जाणार आहेत. शिवाय इराणी खणीवरही आणखी दोन धक्के बांधण्याचे नियोजन आहे.

हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला पर्यावरणपूरक गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला जाणार आहे, याचा लेखी आराखडा सादर करायला सांगितला आहे. त्यानुसार आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरणप्रेमी आदींसह संयुक्त बैठक घेतली. यामध्ये गेल्यावर्षीच्या झालेल्या त्रुटींवर चर्चा झाली. त्यामध्ये इराणी खणीवर सार्वजनिक मंडळे विसर्जनासाठी कमी गेली. पंचगंगा घाटावर एखाद्या मंडळाने मोठी मूर्ती दान केली तर ती रंकाळा खणीकडे नेताना महापालिकेची होणारी धावपळ थांबवण्यासाठी जास्तीत जास्त मंडळे इराणी खणीकडेच जातील यादृष्टीने नियोजन करण्यास सांगितले. मिरवणूक मार्गावर पंचगंगा हॉस्पिटल आहे. तिथे नवजात अर्भक असतात. डॉल्बीच्या आवाजाने ती पिवळी पडल्याचा गंभीर प्रकार जयश्री तोडकर यांनी निदर्शनास आणून दिला. त्यामुळे तिथे डॉल्बी येऊ नये किंवा आला तरी आवाज बंदच असावा असे मांडण्यात आले.

याबाबत ज्योतिरादित्य बिल्डर्सचे संजय शिंदे व पंचगंगा घाट संवर्धन समितीने घाट परिसरात चार विसर्जन कुंड उभारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आराखडूाही सादर केला. निर्माल्य विसर्जनासाठीही स्वतंत्र काहील

प्लास्टिकचा कचरा संकलनासाठी कुंड्या

महापालिकेकडून त्यादृष्टीने लवकरच कार्यवाही

चार विभागीय कार्यालयांतर्फेही काहिली

काही उद्यानांमध्येही काहिली

उद्यानांतील बंद कारंज्यांचे विसर्जन कुंड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट बेंचमध्ये मुख्यमंत्र्यांचा खोडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या ठरावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे नाव घुसडले. त्यामुळेच बेंच स्थापण्यात खोडा बसल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला.

सर्किट बेंचसाठी वकिलांनी तीन दिवस कोर्ट कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी झालेल्या सभेत मुश्रीफ व पाटील यांनी अशी ही टीका केली. आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यासह माजी आमदार पी.एन. पाटील, माजी आमदार संजय घाटगेंंनी पाठिंबा दिला.

सतेज पाटील म्हणाले, 'आघाडी सरकारच्या काळात तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई हायकोर्टाला लेखी पत्र दिले होते. तसेच सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सर्व खर्च सरकार देणार असल्याचेही कळवले होते. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्किट बेंच ठरावात कोल्हापूरचे नाव घुसडले. यापुढे आंदोलनात आम्ही पाठीशी राहू.' त्यांनी आंदोलनास ५० हजाराची देणगीही जाहीर केली.

माजी आमदार पी.एन. पाटील यांनीही पुण्याचे नाव घुसडल्याने सर्किट बेंचची मागणी प्रलंबित राहिल्याचा आरोप केला. रवींद्र जानकर, अजित मोहिते, महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे, धनंजय पठाडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसर्गे येथून युवक बेपत्ता

$
0
0

चंदगड ः बसर्गे (ता. चंदगड) येथून उत्तम यल्लाप्पा गोंधळी (वय २२) हा तरुण पारायणाला जातो असे सांगून ३ सप्टेंबरला घरातून निघून गेला. अद्याप तो न परतल्याने याबाबतची फिर्याद त्याचे वडील यलाप्पा गोंधळी यांनी चंदगड पोलिसांत दिली आहे. याबाबत माहिती अशी ः उत्तम हा ३ सप्टेंबरला भावेश्वरी मंदिरात सुरू असलेल्या पारायणाला जातो असे सांगून घरातून निघून गेला. रात्र झाली तरी घरी न परतल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो कोठेही सापडला नसल्याने बेपत्ता असल्याची फिर्याद चंदगड पोलिसांत दिली. अंगाने जाड, रंगाने निमगोरा, अंगात निळ्या रंगाची जीन पॅन्ट, पांढरा शर्ट, पायात स्लीपर अशा वर्णनाचा तरुण कोणाला आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पोलिस उपनिरीक्षक पी. आर. गंपले तपास करीत आहेत.

इचलकरंजीत स्वाइनचा रुग्ण

इचलकरंजी ः येथील सुर्वे मळा परिसरात स्वाइन फ्लूसदृश आजाराची लागण झालेला रुग्ण आढळून आल्याने भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. हवामानात सातत्याने होत असलेले बदल व शहरातील बजबजपुरी यामुळे हा आजार पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने पालिकेने तत्पर आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात आयजीएमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाच्यावतीने घरोघरी जाऊन चौकशी करण्यात येत आहे.

'ढाल प्रतिकारशक्तीची' आज प्रसारित

इचलकरंजी ः येथील कलाविष्कार फाउंडेशनच्यावतीने स्वाइन फ्लूवर प्रकाशझोत टाकणारा व उपाय सुचविणारा 'ढाल प्रतिकारशक्तीची' हा लघुपट तयार केला असून, त्याचे उदघाटन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते व नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता.१३) सकाळी १०.३० वाजता नवीन नगरपालिकेच्या सभागृहात होणार असल्याची माहिती निर्माते अॅड. सनी बागडे व दिग्दर्शक सुदर्शन शेळके यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रमाग संघटना कृती समितीचा तिरडी मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यास राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ शनिवारी यंत्रमाग संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने सरकारविरोधात प्रतीकात्मक तिरडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला कामगारांचा अल्पसा प्रतिसाद लाभला. मात्र, आंदोलनात अचानकपणे बदल करत जुन्या नगरपालिकेच्या दारातच तिरडी जाळण्यात आल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

शाहू पुतळा येथून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सरकारची प्रतीकात्मक तिरडी बांधण्यात आली होती. यावेळी केंद्र सरकार आणि मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शंखध्वनी करण्यात आला. मोर्चाची सांगता गांधी पुतळा येथे करण्यात येणार होती. मात्र, प्रमुख मार्गावरून मोर्चा जुन्या नगरपालिका इमारतीनजीक आला असताना आंदोलकांनी अचानकपणे तिरडी रस्त्यावर ठेवून जाळण्यात आली. त्यामुळे बंदोबस्तासाठी गांधी पुतळा चौकात थांबलेल्या पोलिसांची धावपळ उडाली. आंदोलनात दत्ता माने, भरमा कांबळे, हणमंत लोहार, आनंदा गुरव, बंडोपंत सातपुते, सदा मलाबादे, कामगार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढली, भाजीपाला घसरला

$
0
0

उत्पादक हवालदिल, ग्राहकांमध्ये मात्र समाधान

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अपुऱ्या पावसामुळे संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला असताना हाच अपुरा पाऊस भाजीपाला व फळभाजी पिकासाठी अत्यंत पोषक ठरत आहे. यामुळे भाजीपाल्याच्या पिकांचे भरघोस उत्पादन होत असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. जिल्ह्यासह सांगली, बेळगाव जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक होत असल्याने दर प्रचंड घसरले आहेत. दर घसरण झाल्यामुळे उत्पादन खर्चावर आधारीतही दर मिळत नसल्याने भाजीपाला उत्पादक हवालदील झाले आहेत. तर फुलांच्या दरात तर मोठी घसरण झाल्याने अनेक उत्पादकांनी फुलशेती मोडून इतर पिकांच्या लागणीसाठी शेतीची मशागत सुरू केली आहे.

अपुऱ्या पावसामुळे राज्यातील सर्वच भागातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तूंमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून वाढ होऊ लागली आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ कांद्याच्या दरामध्ये झाली आहे. महागाई चटके सर्वसामान्यांना बसू लागले असल्याने नाराजी निर्माण झाली होती. जून, जुलैमध्ये भाजीपाला व फळभाज्यांच्या दरात वाढ झाल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. अपुऱ्या पावसामुळे इतर पिकांच्या लागणी खोळंबल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली होती. या भाजीपाल्याची आवक किरकोळ बाजारपेठेत होऊ लागली आहे. बांधावरील वरणा, चवळी आदी भाज्यांसह शेजारील जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली आहे. यामुळे भाजीपाल्यांच्या दरात प्रचंड घसरण झाली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. फ्लॉवर, कोबी व फुलांच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्याने उत्पादक दर मिळत नसल्याने जाग्यावर टाकून देत आहेत.

कांदा अजूनही चढाच

कांद्याचे वाढणारे दर आवाक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने इजिप्तवरुन कांद्याची आवक सुरू केली आहे. इजिप्तवरुन आलेला कांदा गुरुवारी कोल्हापूर बाजार समितीमध्ये दाखल झाला. समितीमधून अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी खरेदी करुन किरकोळ बाजारपेठेत कांद्याची विक्री सुरू केली आहे. इजिप्त आणि राज्यातून कांद्याची आवक होत असूनही कांद्याचे दर पुन्हा वाढले असून गेल्या आठवड्यात ४५ ते ५० रुपयांपर्यंत कमी झालेला दर पुन्हा ६० रुपयांवर पोहोचला आहे.

सांगली बाजारात सोयाबीनची आवक

कुपवाडः सांगली बाजार समितीत पुन्हा बेदाण्याची आवक वाढली असून आडवड्याभरातील आवक १२६३ क्विंटलने जास्त आहे. राजापुरी, परपेठ, चोरा हळद आणि कोल्हापूरी गुळाची आवकही घटली आहे. हळदीचा कमाल दर आठ हजार तर गुळाचा कमाल दर तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांवर पोहचला आहे. सोयाबीनची आवक ४६८ क्विंटलनी वाढली असून क्विंटलचा दर साडेतीन हजार रुपये मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकारी बँकांवर गंडांतर?

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

कोल्हापूर : सहकारी बँकांमध्ये होणाऱ्या गैरकारभारावर बोट ठेवत या बँकांचे खासगी व्यापारी बँकांमध्ये रुपांतर करण्याचा घाट रिझर्व्ह बँकेने घातला आहे. वीस हजार कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या सहकारी बँकांना खासगी व्यापारी बँका बनवण्याचा अहवाल नुकताच उच्चाधिकार समितीने दिला आहे. या निर्णयामुळे सहकार बँकिंग

मोडीत निघण्याचा धोका निर्माण झाला आहे.

राज्याच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान देणारा घटक म्हणून सहकारी बँकांचा उल्लेख केला जातो. सभासदांचे हित डोळ्यामोर ठेवून गरजूंना अर्थपुरवठा करण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या सहकारी बँकांनी शेतीसह छोट्या उद्योगांना आर्थिक पाठबळ देऊन, विकासाला हातभार लावला होता. मात्र काही सहकारी बँकांमधील गैरकारभारामुळे संपूर्ण सहकारी बँकिंगवर आक्षेप घेतले जात आहेत. गेल्या दहा वर्षात देशातील सहकारी बँकांची संख्या २१०४ वरून १५०७ पर्यंत खाली आहे. सहकारी बँकांच्या या उतरत्या आलेखामुळे त्यांची गरज कमी झाल्याचा अर्थ रिझर्व्ह बँकेच्या उच्चाधिकार समितीने काढला आहे.

सध्याच्या सहकार कायद्यानुसार रिझर्व्ह बँकेचे थेट सहकारी बँकांवर नियंत्रण नाही, त्यामुळे सहकारी बँकांवर कारवाई करण्यात रिझर्व्ह बँकेला अडचणी येत आहेत. सर्व सहकारी बँकांचे व्यापारी बँकांमध्ये रुपांतर केल्यास यावर थेट रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण राहणार आहे. देशातील एकूण बँकिंगसाठी हा हिताचा निर्णय असला, तरी सहकाराच्या दृष्टीने मात्र तोट्याचा आहे. या निर्णयाने जगातील सर्वात मोठे सहकारी बँकिंगचे जाळे उद्धवस्त होण्याचा धोका या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या अहवालाची अंलमबजावणी झाली तर राज्यातील सहकार मोडीत निघण्याची शक्यता आहे, तर ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर याचा विपरित परिणाम होण्याचा धोका आहे. सभासदांना केंद्रीभूत मानून काम करणाऱ्या सहकारी बँका बंद झाल्या तर, ठेवीदारांच्या हिताचे काम करणाऱ्या व्यापारी बँकांमुळे राज्यातील आर्थिक घडी विस्कटू शकते. देशातील एकूण बँकिंगमध्ये सध्या असलेला सहकारी बँकांचा वाटा ३ ते ४ टक्के एवढाच आहे.

प्रस्तावित निर्णयामुळे तो एक टक्क्याच्याही खाली जाईल, त्यामुळे रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांचे व्यापारीकरण करण्यापेक्षा त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँकेने हा अहवाल बँकेच्या वेबसाईटवर टाकला असून, १७ सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. सहकार मोडीत काढणारा हा निर्णय असल्याने देशभरातून याला विरोध सुरू झाला आहे.

सावकारीला पर्याय म्हणून शेतकरी आणि छोट्या उद्योजकांसाठी निर्माण झालेल्या सहकारी बँकांनी आर्थिक क्रांती केल्याचे नाकारून चालणार नाही. गैरकारभार होत असतील तर त्यावर कारवाई करावी, पण सरसकट सहकारी बँकांचे व्यापारी बँकांमध्ये रुपांतर करणे सहकार उद्ध्वस्त करणारे ठरेल.

- किरण कर्नाड, अध्यक्ष, कर्नाड्स बँकिंग रिसर्च फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौकीला दुर्लक्षाची ‘बेडी’

$
0
0

सुरक्षा प्रस्तावाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नऊ दिवस भाविकांसह पर्यटकांच्या गर्दीचा उच्चांक गाठणारा शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या महिन्याभरावर आला असतानाही अंबाबाई मंदिरातील स्वतंत्र पोलिस चौकीबाबत पोलिस प्रशासन आणि सुरक्षायंत्रणेच्या पातळीवर शून्य हालचाली सुरू आहेत. दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये अंबाबाई मंदिराचा समावेश असल्याचे सातत्याने नमूद केले जात असतानाही नवरात्रौत्सवात मंदिराची सुरक्षा स्वतंत्र पोलिस कुमकेअभावी कुचकामी ठरण्याचा धोका नाकारता येणार नाही. गेल्या दीड वर्षांपासून सरकारदरबारी स्वतंत्र पोलिस चौकीचा धूळखात पडून असलेला प्रस्ताव किमान नवरात्रौत्सवापूर्वी मार्गी लागण्यासाठी लोकप्रतिनिधींसह पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाल करण्याची गरज आहे.

पोलिस चौकीसाठी कायमस्वरूपी कर्मचारी वर्ग नियुक्त करावा, असा प्रस्ताव जिल्हा पोलिस मुख्यालयामार्फत सहा वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे पाठविला असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे नेहमीचे काम सांभाळून पोलिस येथे सुरक्षेसाठी तैनात असतात. मंदिर परिसरात सुरक्षित असे बहुमजली वाहनतळ उभारण्याचीही सूचना करण्यात आलेली आहे; पण याबाबत प्रशासनाकडून थंड प्रतिसाद आहे.

मंदिरात सध्या ३२ पोलिस बंदोबस्तासाठी आहेत. मात्र, त्यांची कायमस्वरूपी नेमणूक नाही. यापैकी दोन शिफ्टमध्ये १६ पोलिसांची ड्युटी असते. त्यापैकी काही पोलिस पेटीचौकात, तर उर्वरित चार प्रवेशद्वारांवर नियुक्त केले जातात. नवरात्रौत्सव काळात शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आणि करवीर पोलिस ठाण्यांतून प्रत्येकी दोन असे सहा पोलिस बंदोबस्तासाठी मागवून घेतले जातात. अन्यवेळी आळीपाळीने जुना राजवाडा ठाण्यातील पोलिसांना सुरक्षेची जबाबदारी दिली जाते. मंदिरात काही आपत्कालीन परिस्थिती उद्भ्वली तर कोणतीही यंत्रणा आजमि​तीला पोलिसांच्या हाताशी नाही. स्वतंत्र पोलिस कुमक आणि आधुनिक हत्यारे नसल्याने प्रवेशद्वारावरील सुरक्षारक्षकांकडील हँड मेटल डिटेक्टर मागण्याची वेळ पोलिसांवर येते. पोलिसांकडे एसएलआर बंदुका नाहीत. प्रशिक्षित घातपात विरोधी पथक नाही. त्याचा परिणाम सुरक्षेवर होत आहे. मंदिरासासाठी स्वतंत्र पोलिस चौकी आणि पोलिसांची कुमक देण्याचा विनंती प्रस्ताव गेल्या सहा वर्षांपासून राज्याच्या गृहमंत्रालयात पडून आहे.

भाविकांकडूनही मागणी

अंबाबाई मंदिरात स्वतंत्र पोलिस चौकी व्हावी या मागणीला स्थानिक भाविकांसह पर्यटक भाविकांकडूनही जोर मिळत आहे. गर्दीच्यावेळी चोरी होणे, लहान मुलांना पळवण्याच्या घटना घडणे यासारखे प्रकार घडले आहेत. अशावेळी तातडीने पोलिस मदत मिळण्यासाठी मंदिराच्या आवारात पोलिस चौकी असणे आवश्यक आहे. तसेच अंबाबाई मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे व्यापारी, दुकानदार यांच्याकडूनही स्वतंत्र पोलिस चौकी होण्याच्या प्रस्तावाला दुजोरा देण्यात आला आहे.

'अंबाबाई मंदिरात स्वतंत्र पोलिस चौकी होणे गरजेचे आहे. नवरात्रौत्सवकाळात ९ ते १० लाख भाविक येतात. त्याचा पोलिस यंत्रणेवर ताण येतो. चौकीच्या प्रस्तावाबाबत जिल्हा पोलिसप्रमुख मनोजकुमार शर्मा यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढण्यात येईल. नवरात्रौत्सवाला महिन्याचा अवधी असल्याने स्वतंत्र चौकीबाबत रखडलेल्या प्रश्नावर निश्चित उपाययोजना होईल.'

- चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

मंदिरातील सध्याची सुरक्षा यंत्रणा

एकूण सुरक्षा कर्मचारी ६० (दोन शिफ्टमध्ये ३०-३० कर्मचारी)

महिला पोलिस ८ (प्रवेशद्वारांवर ४, गाभाऱ्यात ४)

सुरक्षारक्षक १८, म​​​हिला २

हँड हेल्ड मेटल डिटेक्टर ८

क्लोज सर्किट कॅमेरे ३०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यळगूडच्या सरपंच, उपसरपंचांना मारहाण

$
0
0

हुपरी : यळगूड (ता. हातकणंगले) येथील अंबाबाईनगरात होत असलेली अतिक्रमणे रोखण्यासाठी गेलेल्या सरपंच वंदना दादासाहेब पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह १७ ग्रामपंचायत सदस्यांवर चटणीपूड टाकून जमावाने मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. तसेच सरपंच व सदस्यांच्या समर्थकांनी अतिक्रमणधारकांना यावेळी बेदम मारहाण केली. याप्रकरणी दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्याद नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

यळगूड येथील जवाहर कारखान्याच्या पछाडीस असलेल्या गट नं. २८१ या अंबाबाईनगर वसाहतीमध्ये अनेकांनी बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केलेले आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांचा समावेश आहे. गणेश रजपूत याच्या अतिक्रमित घराचे नव्याने बांधकाम सुरू होते. याची माहिती समजताच सरपंच पाटील, उपसरपंच गोटखिंडे यांच्यासह सदस्य घटनास्थळी आले. यावेळी अतिक्रमणधारकांबरोबर कर्मचारी व सदस्यांत वादावादी झाली. त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.

भावाचा बहीण, भाचीवर हल्ला

इचलकरंजी : कौटुंबिक वादातून भावाने बहीण व भाचीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शनिवारी दुपारी गावभागातील शेळके गल्ली परिसरात घडली. नंदा विष्णू करडे (वय ४०) व पूजा विष्णू करडे (१७) अशी जखमींची नावे आहेत. नंदा यांची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हल्लेखोर भाऊ दीपक लवटेला रात्री उशिरा ताब्यात घेतले. नंदा करडे व त्यांचा भाऊ दीपक पांडुरंग लवटे (दोघेही रा. शेळके गल्ली) हे एकाच घरात, पण विभक्त राहतात. दीपकचा नंदा यांच्या मोठ्या मुलीशी २००८ मध्ये विवाह झाला होता, पण त्यांचे सोडपत्र झाले आहे. वडिलांचा सांभाळ करण्याच्या कारणातून बहीण-भावात वाद होता.

मंडपावरून पडून कामगार जखमी

कोल्हापूरः मंडप घालताना २५ फुटांवरून खाली पडल्याने वाझिद हैदर नायकवडे (वय २५, रा. उजळाईवाडी, ता. करवीर) हा कामगार जखमी झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी शनिवार पेठेतील सम्राट चौकात घडली. न्यू सम्राट तरुण मंडळाच्यावतीने गणेशोत्सवासाठी मोठा मंडप घालण्याचे काम सुरू आहे.

नवविवाहितेचा जळाल्याने मृत्यू

कोल्हापूर : गजानन महाराजनगर येथे पेटल्याने स्वानंदी सुनील क्षीरसागर (वय २५) या नवविवाहितेचा मृत्यू झाला. स्वानंदी यांचा तीन महिन्यापूर्वी विवाह झाला होता. क्षीरसागर यांच्या घरी सायंकाळी साडेसातच्या सुमारास धूर येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. घरामध्ये स्वानंदी या जळलेल्या अवस्थेत होत्या. त्यांना ताबडतोब सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीपूर्वी टोलमाफीचा डाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'निवडणुकीपूर्वी टोल रद्दची घोषणा करणाऱ्यांनी दहा महिने उलटूनही कोल्हापूरचा टोल रद्द केलेला नाही. टोल रद्द करण्याठी ८०० कोटींची तरतूद सरकारने केली आहे. पण कोल्हापूरचा टोल रद्द केला तर पश्चिम महाराष्ट्राला जास्त निधी जातो, प्रादेशिक असमतोल निर्माण होतो अशी टीका होत असल्याने टोल रद्द केलेला नाही. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मात्र कोल्हापूरची टोलमाफी राज्य सरकार जाहीर करेल,' असा टोला राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित हसन मुश्रीफ फाऊंडेशन आयोजित गणराया अॅवॉर्ड पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमात कॉ. पानसरे हत्या,उसाचा प्रश्न व मंत्री ​गिरीश बापट यांच्या वक्तव्यावर पाटील यांनी टीका केली.

जयंत पाटील म्हणाले, 'महाराष्ट्रात पुरोगामी नेत्याची हत्या पचल्यामुळे कर्नाटक जाऊन हत्या करण्याचे धाडस हल्लेखोरांत वाढले आहे. अशा गंभीर विषयाला धरून देखावे सादर केले तर जनतेमध्ये सामाजिक प्रश्नांची जाणीव अधिक वाढेल. केंद्र व राज्यातील सरकारने सर्वांचा भ्रमनिरास केला आहे. कृषीमंत्रीपदी शरद पवार नसल्याने कारखाने कर्ज काढून एफआरपी देणार आहेत. पण पुढील २०१६ च्या हंगामात जुने कर्ज जास्त झाल्याने कारखाने अडचणीत येणार आहेत.'

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, 'पानसरे यांची हत्या होऊन सात महिने झाले तरी हल्लेखोर सापडलेले नाहीत. मांसाहार करण्यावरूनही वाद सुरू झाले आहेत. राष्ट्रवादीने पाच वर्षांत कोल्हापूरसाठी ११०० कोटीची निधी आणला आहे. गेल्या पाच वर्षात कोणताही घोटाळा, ठराव उठवण्याचे काम केलेले नाही. उलट ज्यांनी एका दिवसात १८८ ठराव केले ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.'

स्वागत माजी महापौर आर.के. पोवार यांनी केले तर शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सुनील महाडेश्वर यांनी आभार मानले.

स्पर्धेचा निकाल

सजीव देखावाः शिवाजीराजे तरूण मंडळ, कसबा बावडा, मित्र प्रेम मंडळ, उमेश कांदेकर युवा मंच, मनोरंजन तरूण मंडळ, शिवाजी तरूण मंडळ वाडकर गल्ली कसबा बावडा.

तांत्रिक देखावाः विजेता तरूण मंडळ कसबा बावडा, नंदी तरूण मंडळ, जय शिवराय मित्र मंडळ उद्यमनगर, शाहूपुरी युवक मंडळ, राजर्षी शाहू चौक, जवाहरनगर, शिवशाही मित्र मंडळ लक्ष्मीपुरी.

उत्कृष्ट सजावटः लेटेस्ट तरूण मंडळ, तुकाराम माळी तालीम, संभाजीनगर तरूण मंडळ, शिपुगडे तालीम मंडळ, सम्राट मित्र मंडळ, श्री तरूण मंडळ.

उत्कृष्ट मूर्तीः गिरणी कॉर्नर, हत्यार ग्रुप, साई तरूण मंडळ, शाहू तरूण मंडळ, ओमकार फ्रेंडस सर्कल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिक-मुश्रीफ धुसफूस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना राष्ट्रवादी पक्षाच्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये सध्या जोरदार धुसफूस सुरू आहे. खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांच्यात सुरू झालेल्या या शीतयुध्दामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. युवाशक्तीच्या दहीहंडीला मुश्रीफांनी मारलेली दांडी आणि मुश्रीफ फाउंडेशनच्या गणराया अॅवॉर्डला महाडिकांना न दिलेले निमंत्रण यातून या दोन नेत्यांत दरार निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणुकीच्या नियोजनपासूनही महाडिक यांना दूर ठेवण्यात येत असल्याने हा दरार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिका निवडणुकीची जबाबदारी खासदार महाडिक यांच्याकडे सोपवण्याची घोषणा दोन महिन्यांपूर्वी आमदार मुश्रीफ यांनी केली होती. पण, तसे न करता नंतर मुश्रीफ यांनी सर्व सूत्रे आपल्या ताब्यात ठेवली आहेत. उमेदवार मुलाखतीपासून ते उमेदवार निश्चितीपर्यंत सर्व पातळीवर फक्त मुश्रीफच सक्रीय दिसत आहेत. त्यांच्यासोबत आर. के. पोवार, प्रा.जयंत पाटील व शहराध्यक्ष राजेश लाटकर सूत्रे हलवत आहेत. दुसरीकडे महाडिक मात्र राष्ट्रवादीसाठी फारसे सक्रीय दिसत नाहीत. दोन दिवस झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीकडेही ते फिरकले नाहीत. अलिकडे मुश्रीफ आणि त्यांच्यात महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी फारशा संयुक्त बैठका झाल्याचे दिसत नाहीत. यातून या दोघांत काहीतरी बिनसल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे. या आठवड्यात झालेल्या दोन कार्यक्रमाने त्यावर शिक्कामोर्तब झाले.

महाडिक व मुश्रीफ यांच्यात काहीतरी बिनसल्याचा पहिला पुरावा दहीहंडीच्या कार्यक्रमात मिळाला. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या दहीहंडीला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील इस्लामपुरातून आले. पण, कागलहून मुश्रीफ मात्र आले नाहीत. निमंत्रण देऊनही त्यांनी या कार्यक्रमाला येण्याचे टाळल्याचे समजते. शनिवारी शाहू स्मारक भवनात हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या गणराया अॅवॉर्डचे वितरण झाले. नाव फाउंडेशनचे असले तरी कार्यक्रम राष्ट्रवादीचाच होता. कार्यक्रमाला पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पक्षाच्या खासदाराला निमंत्रणच दिलेले नाही. व्यासपीठावरील फलकावर पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची नावे होती, मात्र खासदारांचे नाव नव्हते. त्यामुळे दिवसभर कोल्हापुरात असूनही निमंत्रण नसल्याने महाडिक यांनी कार्यक्रमाला जाण्याचे टाळले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे अधिवेशन सकाळी झाले. नियोजनाप्रमाणे महाडिक यांच्याहस्ते उद्घाटन होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुश्रीफ भूषविणार होते. पण, मुश्रीफ तिकडेही फिरकले नाहीत. महापालिका निवडणुकीच्या नियोजनसाठी सायंकाळी राष्ट्रवादीची बैठक झाली, पण तेथे महाडिक नव्हते.

या दोन तीन घटनांवरून महाडिक व मुश्रीफ यांच्यात शीतयुध्द सुरू असल्याची जाणीव कार्यकर्त्यांना होत आहे. त्यामुळे त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी होत आहे. महाडिक यांचे अनेक कार्यकर्ते ताराराणी व भाजप आघाडीच्या नियोजनात असल्याचे दिसत आहेत. यामुळे मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा आहे.

दांडी की उपस्थिती?

रविवारी (ता.१३) सदर बाजार येथे सांस्कृतिक सभागृहाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमास महाडिक व मुश्रीफ या दोघांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे येथे कोण दांडी मारणार की दोघेही उपस्थित राहणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाकप निवडणूक लढणार तत्त्वांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणूक रिंगणात उतरायचे म्हटले की ​लाखो रूपये गाठीशी हवेत. कार्यकर्त्यांचा राबता सांभाळण्यासाठी जेवणावळी हव्यात. इच्छुकांच्या मुलाखतीतही त्यांना किती खर्च करण्याची ताकद आहे या प्रश्नाचे उत्तर पक्षनेत्यांना द्यावे लागते. कितीही नाकारले तरी हे पडद्यामागचे वास्तव आहे. त्यामुळे निवडणूक म्हणजे वारेमाप खर्च या समीकरणाला छेद देत आम्हाला तत्त्वावर निवडणूक ​लढवायची आहे, असा एल्गार भारतीय कम्युनिस्ट पक्षाने पुकारला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संपर्कात असलेल्या १५ इच्छुकांनाही पक्षाने हीच अट घातली आहे.

डाव्या आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातही सध्या महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. समाजात चळवळींचा पक्ष म्हणून ओळख जपणाऱ्या भाकपच्या अजेंड्यावर शहराचा विकास हा मुद्दा अग्रक्रमावर आहे. त्यादृष्टिने शहरातील विशिष्ट प्रभागात किमान १५ ते २० उमेदवार भाजपच्यावतीने रिंगणार उतरवले जाणार आहेत. सध्या तरी भाकपने उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेले नसले तरी संपर्कातील १५ इच्छुकांना भाकपच्या तत्त्वांची आणि विचारसरणीची कल्पना देण्यासाठी कार्यकर्त्यांची एक फळी कामाला लागली आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्वतंत्रपणे महापालिका निवडणुकीत उतरणार की आघाडी करणार हा विषय गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासूनच चर्चेत होता. दरम्यान डाव्यांच्या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेण्याबाबत आघाडीत मतभिन्नता झाल्यामुळे आघाडीची घडी नीट बसली नव्हती. सध्या मनसेसोबत जाण्याबाबत डाव्या विचारसरणीच्या सर्वच पक्षांची नाराजी असल्यामुळे महापालिकेत शेकाप, माकप, लाल निशाण या पक्षासोबत दलित संघटना व भाकप संलग्न असलेल्या विविध जनसंघटनांची मिळून आघाडीची बांधणी करण्याच्या दृष्टिनेही पक्षातील हालचालींनी वेग घेतला आहे. अर्थात भाकपच्या उमेदवारी निश्चितीसह कोणत्या पक्षांसोबत आघाडी करायची याचा निर्णय पक्का होण्यासाठी गणेशोत्सव संपण्यापर्यंत थांबण्याचा निर्णय मात्र झाला आहे.

आघाडीत समाविष्ट असलेले डावे पक्ष आणि संघटना यांनी अद्याप आपले उमेदवार निश्चित केले नसल्यामुळे एकूणच डाव्या आघाडीचे उमेदवार कोण असतील हे ठरलेले नाही. शिवाय तरूण की अनुभवी उमेदवार यापेक्षा भाकपच्या विचारांशी आणि तत्त्वांशी एकरूप असलेला सक्षम उमेदवार हेच भाकपचे ध्येय असेल असा प्रयत्न उमेदवार निवडीत राहणार आहे. कोल्हापूर शहरातील मुलभूत प्रश्नांची जाण असलेला, गुंडगिरी आणि धर्मांध संघटनांना थारा न देणारा आणि भ्रष्टाचाराविरोधात लढा देणारा उमेदवार भाकप आणि संभाव्या डाव्या आघाडीचा चेहरा बनून रिंगणात उतरेल याबाबत पक्ष ठाम आहे.

कॉ. पानसरे यांची उणीव

भाकपचा आधारस्तंभ असलेले कॉ. गोविंद पानसरे यांची फेब्रुवारीत हत्या झाली. त्यांची उणीव पक्षाला भासत आहे. मात्र पानसरे यांच्यानंतरही भाकपची फळी मजबूत ठेवण्यासाठी कार्यकर्ते निर्माण व्हायचे असतील तर पक्षाचा विचार भिनलेला उमेदवार महापालिकेत जाण्याची गरज आहे असे पक्षाचे शहरसचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षांनी घेतला सर्व्हेचा आधार

$
0
0

निवडणुकीच्या बदलत्या स्वरूपाचा परिणाम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणूक लढवण्याआधीच जय-पराजयाची गणिते समजून घेण्यासाठी प्रमुख राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी खासगी सर्व्हे कंपन्यांचा आधार घेतला आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह काही उमेदवारांनीही लाखो रुपये खर्च करून हे सर्व्हे करून घ्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात सर्व्हेची जोरदार चर्चा सुरू आहे.

निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची वाढलेली संख्या, मतदारांना दाखवली जाणारी आमिषे, पाडापाडीचे राजकारण आणि निवडणुकीतील पैशांचा वारेमाप वापर यामुळे निवडणुकांचे गणित बदलले आहे. निवडणूक लढवण्याआधीच प्रभागातील उमेदवाराचा जनाधार, पक्षाचा जनाधार, निवडणुकीवर प्रभाव टाकणारे घटक जाणून घेण्याचा प्रयत्न इच्छूक उमेदवारांकडून आणि पक्षनेत्यांकडूनही केला जातो. यासाठी खासगी सर्व्हे कंपन्यांची मदत घेतली जात आहे. कोल्हापुरातही सर्वच प्रमुख पक्षांनी अशा कंपन्यांची मदत घ्यायला सुरूवात आहे.

मुंबई, पुणे आणि औरंगाबादमधील अशा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यातील सर्व्हे पूर्ण केले आहेत. त्यानुसार पक्ष आणि उमेदवारांनी रणनीती आखली आहे. शिवसेनेसाठी मराठवाड्यातील कंपनीने सर्व्हे पूर्ण केला आहे, तर भाजपसाठी मुंबईहून आलेल्या कंपनीने सर्व्हे केला आहे. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसने निवडणूकपूर्व सर्व्हे केल्यानंतरच उमेदवारी निश्चित करण्यास सुरूवात केली आहे.शहरातील काही अपक्ष उमेदवारांनीही सर्व्हेचा आधार घेतला आहे.

सध्या चार खासगी कंपन्यांकडून शहरात काम सुरू आहे. विशेष म्हणजे या कामात कमालीची गोपनियता पाळली जात आहे. पक्षाचे नाव, उमेदवाराचे नाव बाहेर पडू नये, सर्व्हेतील मुद्यांची जाहीर चर्चा होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे.

सर्व्हेचे अर्थकारण

निवडणुकांचा सर्व्हे करताना पक्ष किंवा उमेदवारांच्या मागणीनुसार सर्व्हेची रक्कम ठरते. संपूर्ण शहराचा केवळ कल स्पष्ट करण्यासाठी सहा ते आठ लाखांपर्यंत रक्कम घेतली जाते, तर प्रभागनिहाय विश्लेषणात्मक सर्व्हे करण्यासाठी वीस ते तीस हजारांची रक्कम घेतली जाते. त्यामुळे उमेदवारांकडून सर्व्हेला प्राधान्य मिळत आहे.

असे चालते सर्व्हेचे काम

सर्व्हे कंपन्या पक्ष किंवा इच्छूक उमेदवारांच्या मागणीनुसार सर्व्हे करतात. प्रभागनिहाय सर्व्हेमध्ये जातीय समीकरणे, निवडणुकीवर प्रभाव टाकणारे स्थानिक मुद्दे, प्रभागाचे प्रश्न, उमेदवारांचा जनाधार, प्रभागातील आर्थिक, सामाजिक स्थिती, विरोधी उमेदवारांचे कच्चे आणि पक्के दुवे यावर भर देऊन अभ्यास केला जातो, तर संपूर्ण शहराचा केवळ कल स्पष्ट करताना इतर पक्षांशी तुलना करून लोकप्रियता, पूर्वेतिहास, नेतृत्व, संघटन, उमेदवारांची निवड या घटकांवर जनतेचा कल तपासला जातो. मागणीनुसार प्रभागनिहाय आणि पक्षनिहाय सर्व्हे करून देण्याची पद्धत आहे. विशेष म्हणजे केवळ सर्व्हे करून कल सांगण्याची जबाबदारी या कंपन्यांची नसून, विजयासाठी काय करावे लागेल, प्रचारात कोणते मुद्दे चालणार, अशा अनेक बाबींचे मार्गदर्शन सर्व्हे कंपन्यांकडून केले जाते, त्यामुळे या कंपन्यांना मागणी वाढली आहे.

मागणीनुसार आम्ही सर्व्हे करून देत आहोत. राज्य पातळीवर अनेक पक्षांनी आमच्या कामाचा अनुभव घेतला आहे. सर्व्हेंचा फायदा झाल्यानेच कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत मागणी वाढली आहे. सध्या चार नामांकित कंपन्या कोल्हापुरात कार्यरत आहेत.

चंद्रकांत पांडे एमडी, थर्ड पोल प्रायव्हेट लिमिटेड, औरंगाबाद

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिर्याद न घेता पोलिसच झाले शिरजोर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चोरीची फिर्याद दाखल करून न घेता चोरट्यांकडून हस्तगत केलेल्या ७२ तोळे सोन्याच्या दागिन्यावर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच डल्ला मारल्याची चर्चा इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकांत जोरात सुरू आहे. याप्रश्नी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यासाठी जाणाऱ्या फिर्यादीला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

चार महिन्यांपूर्वी इचलकरंजीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरात चोरी झाली होती. चोरट्यांनी ७२ तोळे दागिने लंपास केले होते. याबाबतची फिर्याद द्यायला गेलेल्या व्यावसायिकाला इन्कम टॅक्सचा ससेमीरा मागे लागेल, अशी भीती दाखवत फिर्याद देण्यापासून अधिकाऱ्यांनी परावृत्त केले. त्याचवेळी तपास सुरू ठेवू, दागिने मिळालेच तर ते परत देऊ, असा शब्दही दिला.

तपासादरम्यान संबंधित बांधकाम व्यावसायिकाने घरातील दोन मोलकरणीवर संशय व्यक्त केला होता. त्याच आधारावर पोलिसांनी दोघा मोलकरणींकडे चौकशी केल्यावर त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या वापरत पोलिसांनी सोन्याचे दागिने हस्तगत केले. दुसरीकडे सोन्याचे दागिने जास्त असल्याने पोलिसांच्याही तोंडाला पाणी सुटले. ते दागिने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाटून घेतले. चोरीचा तपास झाला का, अशी विचारणा करायला गेल्यावर संबंधित व्यावसायिकाला तपास सुरू आहे, असे वारंवार सांगण्यात आले. परंतु, काहीच कळायला मार्ग नसल्यामुळे या व्यावसायिकाने पोलिसांकडे फिर्याद घेण्यासाठी तगादा लावला. इन्कम टॅक्स रिटर्नची सर्व कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे सांगून त्याने चोरीची फिर्याद घ्यायचा आग्रह ‌धरला. पण, तरीही पोलिस टाळाटाळ करू लागले.

वरिष्ठांचाही 'हात'

दरम्यान, याप्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून अन्यत्र बदलीही झाली. दरम्यान, चोरीचा छडा लागल्याची आणि पोलिसांनी दागिने वाटून घेतल्याची माहिती व्यावसायिकाला मिळाली. त्याने वरिष्ठांकडेही तक्रार केली. पण, तिथेही दाद लागू दिली नाही. अखेर थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. पण, वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत फिर्यादी पोहोचू नये, अशी काळजी घेणारी यंत्रणाही कार्यरत झाली आहे. ७२ तोळ्याचा मामला मुरवण्यासाठी धडपड सुरू असली तरी एका ज्येष्ठ वकिलांच्या मध्यस्थीने पोलिस अधीक्षकांकडे फिर्यादीकडून अर्ज देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ठरणार लढ्याची दिशा

$
0
0

सर्किट बेंचबाबत ‌सहा जिल्ह्यांतील वकिलांची बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंचसाठीच्या लढ्याची दिशा ठरविण्यासाठी आज (ता.१३) कोल्हापुरात बैठक होणार आहे. बेंच स्थापन करण्याचा निर्णय निवृत्त न्यायमूर्ती मोहित शहा यांनी प्रलंबित ठेवल्यामुळे वकिलांच्या भावना संतप्त आहेत. सकाळी साडेअकरा वाजता बार असोसिएशनच्या कार्यालयात बैठक होणार आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्यातील ७० ते ८० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सर्किट बेंचचा निर्णय मोहित शहा यांनी निर्णय स्थगित ठेवल्याने कोल्हापुरात तीन दिवस न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला. मोहित शहा यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. वकिलांनी कोल्हापूर बंदला सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. तीन दिवसाच्या बंदनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक होत आहे. या बैठकीत साताऱ्याचे अॅड. धैर्यशील पाटील, कराडचे संभाजीराव मोहिते, सांगलीचे श्रीकांत जाधव, सिंधुदुर्गचे दिलीप नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.

हायकोर्टातील सर्व न्यायमूर्तींची भेट देऊन त्यांना आंदोलनाचा इशारा द्यावा, असा मतप्रवाहही पुढे आला आहे. तर दुसरीकडे न्यायाधीशांवर विश्वास ठेवून उपयोग होत नाही. आंदोलनाची तीव्रता वाढवावी असाही मतप्रवाह आहे. आंदोलनाची तीव्रता वाढावी यासाठी सर्वांत जास्त आग्रह तरूण वकील धरत आहेत. यातून बैठकीत सुवर्णमध्य काढण्याची शक्यता आहे.

सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन व्हावे यासाठी उग्र आंदोलन छेडावे यासाठी आग्रह होऊ लागला आहे. पण, आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सहा जिल्ह्यातील वकिलांचे मत घेणे आवश्यक आहे. त्यानंतर कृती समिती आंदोलनाची दिशा ठरवेल.

-निमंत्रक अॅड. राजेंद्र चव्हाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बावीस जणांवर ठपका

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

कोल्हापूरः कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार ६५ संचालक आणि तत्कालीन सचिवांपैकी १८ माजी संचालक आणि चार सचिवांना शुक्रवारी (ता.१२) लवाद प्रदीप मालगावे यांनी नोटीस बजावली आहे.

यामध्ये माजी सभापती दिनकर कोतेकर, माजी उपसभापती शामराव सूर्यवंशी, विद्यमान संचालक नंदकुमार वळंजू, निवृत्त सचिव संपतराव पाटील यांचा समावेश आहे. संचालक व सचिवांवर २६ लाख ७५ हजार २६१ रुपयांचे नुकसान केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. संचालक व सचिवांना म्हणणे मांडण्यासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर अंतिम अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे सादर होणार आहे.

समितीत बेकायदेशीर नोकरभरती व भूखंड विक्रीप्रकरणी संचालक मंडळ बरखास्त लवादामार्फत चौकशी सुरू होती. ज्या संचालकांवर ठपका ठेवला होता, त्यांनी १९८६ पासून समितीच्या कारभाराची चौकशीची मागणी केली होती. ही मागणी विचारात घेऊन मालगावे यांनी ६५ संचालक व १३ सचिवांना प्रथम नोटीस बजावली. सर्वंकष माहिती आणि तपासणी करून पहिल्या टप्प्यात संचालक आणि सचिवांवर समितीच्या सुमारे २६ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवला आहे. पहिल्या टप्प्यात १८ संचालक व चार सचिवांना पुन्हा नोटीस बजावल्याने साहजिकच यांच्यावर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे.

यांना पाठवल्या पुन्हा नोटीस

दिनकर कोतेकर (बेलवळे), दत्तात्रय पाटील (आदमापूर), शामराव सूर्यवंशी (बीड), नामदेव पाटील (कुडित्रे), कृष्णराव पाटील (राशिवडे), मारुती ढेरे (वरणगे), दत्तात्रय साळोखे (पोहाळे तर्फे आळते), शिवाजीराव गायकवाड (पाटणे), दिनकर पाटील (आणाजे), शालन पाटील (सातार्डे), सुशीला पाटील (निळपण), पांडूरंग महाडेश्वर (निगवे खा.), शामराव भोई (कपिलेश्वर), लक्ष्मण मुडेकर (वाघवे), अशोक बल्लाळ (एकोंडी-मयत), नंदकुमार वळंजू, नयन प्रसादे (कोल्हापूर), तानाजी पाटील (वडणगे). सचिव-कृष्णात चव्हाण (मसूद माले), राजाराम जाधव (कोल्हापूर), आर. टी. पाटील (अकणूर), संपतराव पाटील (अंबप)

अहवालाची धास्ती

या चौकशीच्या कक्षेत सर्व पक्षांचे आणि नेत्यांशी लागेबांधे असलेले कार्यकर्ते असल्याने पहिल्यापासून लवाद मालगावे यांच्यावर राजकीय दबाव येत होता. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपाती चौकशी पूर्ण केली आहे. पहिल्या टप्प्यात १८ संचालकांवर ठपका ठेवला असल्याने त्यांच्या अहवालाची सर्वांनीच धास्ती घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाहीच उन्माद उतरवेल

$
0
0

बाळासाहेब पाटील

जागतिकीकरणात सर्वत्र फॅसिस्ट प्रवृत्ती वाढताहेत. भारतात अलीकडच्या काही दिवसांत या शक्तींना राजकीय सत्तेचे बळ मिळाले आहे. लोकशाहीचे अंकूर खुडण्याचे धाडस या शक्ती करीत आहेत. विवेकवादी विचारांच्या माणसांची त्यांना भीती वाटतेय. परंतु, फॅसिझमचा हा उन्माद उतरविण्याची ताकद लोकशाहीतच आहे, असा ठाम विश्वास शाहीर संभाजी भगत यांनी 'मटा'शी बोलताना व्यक्त केला.

विवेकवाद्यांच्या हत्या झाल्यानंतरच्या एकूण परिस्थितीकडे कसे बघता?

उत्तर : अशा हत्या होणे हे संवेदनशील घटकांना हादरवून सोडणाऱ्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना प्रश्न पडतो की लिहिणारे, बोलणारे, जागृती करणाऱ्यांना का मारले जाते? त्यांच्या हातात चाकू, सुरा, बंदुका नाहीत तरीही ते तुम्हाला डेंजर का वाटताहेत? माणसांना का मारले जातेय हा मोठा प्रश्न पडला आहे. कलाकार, बुद्धीवादी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे काम फॅसिस्ट लोक नेहमी करतात. भारतात लोकशाही आहे असे वाटते, तरीही असे कसे काय मारू शकते असे वाटते. पण, महाराष्ट्रात वातावरण चांगले होते. भांडवलशाहीचा विकास होतो, मक्तेदारी केंद्रित होते, तीही काही लोकांच्या हातातच. तेव्हा छोट्या छोट्या देशांमध्ये लोकशाहीचा अवकाश लहान होत जातो. कुठला पक्ष सत्तेवर आहे याला जास्त महत्त्व नसते. एक विशिष्ट वर्ग या सगळ्या गोष्टी नियंत्रित करत असतो, अशा वेळी फॅसिस्ट लोकांना नेहमी बंदुकांची, चाकू, सुऱ्यांची भीती वाटत नाह‌ी. ते त्यातले नसतात. त्यांना भीती वाटते ती विचारांची. विवेकाची भीती वाटते. आपण टाकलेली भूल एवढी मजबूत असते की ती भूल उतरवण्याचे काम विवेक करतो. खरा शिवाजी कळला तर, खरा ‌विज्ञानवाद, बुद्धिप्रामाण्यवाद कळला तर... लोक आपल्याला प्रश्न विचारतील या भयगंडातून हत्या होतात. या हत्या समझदारीने, ठरवून केलेल्या आहेत. ज्यावेळी प्रतिक्रांतीला सुरूवात होते, तेव्हा असे खून झालेले आहेत. समाजाला हा एक प्रकारचा इशारा असतो. आपण फॅसिझमच्या दिशेने चाललेलो आहे हे स्पष्ट होत आहे. गेल्या २०-२५ वर्षांत ते अधिक गतीने काम करत आहे. बाबरी मशिदीवरील हल्ला हा काही मशिदीवर नव्हता. येथे जी काही लोकशाही मूल्ये रूजत होती तिचे अंकूर खुडून टाकण्याचे कारस्थान या हल्ल्यात झाले. जागतिकीकरणाच्या जगात संकुचित फॅसिझम रुजताना दिसतो आहे. विशिष्ट लोकांना दुय्यम स्थान देण्याचे काम, लोकशाहीने दिलेले हक्क काढून घेण्याचे काम कोणतेही हत्यार न वापरता सुरू आहे. हा फॅसिझमचा उन्माद आपल्याला सोशल मीडियातून दिसतोच आहे. जे दबक्या आवाजात सुरू होते ते आता खुलेआम बोलले जाऊ लागले आहे.

हिदुत्वाच्या मुद्द्यावर शेषराव मोरे यांनी मांडलेले मुद्द्यांबाबत काय सांगाल?

उत्तर : अंदमानमध्ये विश्व‌ साहित्य संमेलनात शेषराव मोरेंनी मांडलेले मुद्दे काही आश्चर्यकारक नाहीत. ते दुसरं काही बोलू शकत नाहीत. सत्ता आली की लहान मोठे घटक बोलायला लागतात. त्यांना बळ येणारच ना? हा काही एकट्या मोरेंचा विषय नाही. त्यांच्यासारख्यांनी बाबासाहेबांना देशद्रोही ठरवले, फुल्यांवर जहरी टीका केली. आता आमच्यासारख्यांना बोलतात त्यावेळी आम्ही एकच विचार करतो की जर महामानवांना अशी टीका सहन करावी लागली असेल तर आम्ही 'किस झाड की पत्ती...?' शेषराव मोरेंचे जे वक्तव्य आहे हे फॅसिझमचा पुरस्कार करणाऱ्यांचे नेतृत्व आहे. आत्ता सत्ता आल्याने त्यांना स्फुरण चढले आहे.

आम्ही मांडू तोच इतिहास खरा, असा अट्टाहासही दिसतोय...

उत्तर : बाबासाहेब पुरंदेरेंनी जो शिवाजी मांडला त्याला ते इतिहास लेखन म्हणतात. पण, ज्यांना ‌इतिहास कळतो ते त्याला ललित शिवचरित्र असा शिक्का मारतील. सांस्कृतिक अधिसत्ता नेहमी प्रतिकांना आपलेसे करत असतात. बाबासाहेब आबेडकरांच्या बाबतीतही झाले. ही राष्ट्रवादाची प्रतिके म्हणून हायजॅक केली. महात्मा फुले, डांगे, शाहीर अमर शेख यांनी शिवाजी मांडल्यानंतर शिवाजी महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. बु‌द्धिवादी लोकांनी खूप संशोधन केले. शेतकऱ्यांची मुले शिकायला लागल्यानंतर त्यांना खरा शिवाजी कळायला लागला. त्यांनी सांगायला सुरुवात केली. नवा शिवाजी कळला तर तो सांगितलाच पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जसा अस्पृश्य निवारणाच्या चळवळीत जसा समतोल आणला तसा कॉ. गोविंद पानसरेंनी शिवाजी महाराज मांडताना आणला. खरा शिवाजी सांगायला सुरू केल्यानंतर त्यांचा खून झाला. त्यांना भीती होती की खरा ‌शिवाजी लोकांना कळेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्षात मारता आले नाही, मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा खून केला गेलाय. काही लोकांना शारीरिकदृष्ट्या मारू शकत नाहीत मग त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वीकारतात, त्याला देवत्व देतात आणि त्यांचे भक्तगण त्यांचा खून करतात. पानसरेंनी शिवाजी महाराज माणूस म्हणून मांडले. शिवरायांना संपवता आले नाही. मग त्यांना स्वीकारले आणि त्यांना प्रतिगामी इंजेक्शन देऊन मांडायला सुरूवात केली. अशा संपत चाललेल्या माणूसपणाला पुन्हा माणसात येण्याची प्रक्रिया सुरूच असते. प्रतिकांची खेचाखेची सातत्याने सुरू असते. कारण त्या प्रतिकांच्या आड उभे राहून राज्य करायचे असते. आपण शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करायचे कारण असे की, सर्वसामान्य माणूस या तिघांच्या जवळचा आहे.

विवेकवाद्यांची हत्या होत असताना सत्य मांडताना गोळ्यांची भीती वाटत नाही?

उत्तर : एखादे काम हातात घेतल्यानंतर त्याचे परिणाम माहीत आहेत. मग भीती कशाची? ज्या काळात मी काम करतोय तेथे काहीही होऊ शकते. म्हणून घाबरून काही न करता घरात बसून चालणार नाही. खूप अंधाराच्या काळात माणसांनी उभा राहिले पाहिजे. नाही उभे राहिले तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होईल. आपण काही महामानव नाही. मी रस्त्यावर गाणारा माणूस आहे. आज अशी परिस्थिती आहे की, आपण गप्प बसलो तरी आपल्याला मारणारच आहेत. फॅसिझमचा काळ येतो तेव्हा लहान मोठे कलाकार निशाण्यावर असतात. फॅसिझमच्या काळात मुस्कटदाबी होते. त्यावर मात करण्याचीही तयारी ताकदीने ठेवली पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्ट‌िहीन शिल्पा झाली नृत्यातील पदवीधर

$
0
0

मिरजः मिरजेतील शिल्पा मुकुंद मैंदर्गी या मुलीने दृष्टी नसतानाही टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भरतनाट्यम या नृत्यातील एम. ए. ची पदवी प्राप्त केली आहे. जिद्दीने यश प्राप्त केलेल्या शिल्पा मैंदर्गीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दहावीपर्यंत शिकलेल्या शिल्पाला अंधूक दिसत होते. मात्र, त्यानंतर पूर्ण दृष्टी गेली. बालवयात पाहिलेले नृत्याचे फोटो तिला खुणावत होते. मराठीतील बी. एची पदवी प्राप्त केल्यानंतर तिने नृत्याच्या शास्रोक्त अभ्यासाला सुरुवात केली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद पूर्व परिक्षेत तिने प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. पुणे येथील कलावर्धिनी संस्थेचा भरतनाट्यम हा पाच वर्षांचा अभ्यासक्रमही तिने पूर्ण केला आहे.

शिल्पाला नृत्यश्री संस्थेच्या संचालिका धनश्री आपटे यांनी नृत्यासाठी मार्गदर्शन केले. वाचनासाठी अंजली गोखले तर परिक्षेवेळी श्रद्धा म्हसकर यांनी तिला लेखनिक म्हणून मदत केली. जिद्द व अथक परिश्रमांमुळे शिल्पाने हे यश मिळविले. सन २००९ मध्ये अपंग सेवा केंद्राच्या ज्ञानगौरव या पुरस्कारानेही ती सन्मानित झाली आहे. वृत्तपत्रे, सांगली आकाशवाणी व दूरदर्शनवरील वाहिन्यांवरही तिच्या मुलाखती झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचासह १८ जणांवर गुन्हे

$
0
0

यळगूड सरपंच, दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांचा समावेश

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

यळगुड (ता. हातकणंगले) येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या सरपंच आणि अन्य सदस्य वादावादी व मारामारीप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल होवून सरपंच वंदना दादासो पाटील, उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांवर जबरी चोरी व मारामारीचे तर अतिक्रमन करणारा रजपूत यांच्या बाजूचे दलित महासंघाचे बाबासो दबडे, सुनील कोरे याच्यासह १२ जणांवर विनयभंग, जबरी चोरी, मारामारी असे गुन्हे रविवारी हुपरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. याप्रकरणी यळगूडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, यळगूड येथे जवाहर कारखान्याच्या पिछाडीस असलेल्या अंबाबाई नगर येथे गट नं. २८१ मध्ये गणेश सुभाष रजपूत हा अतिक्रमण करून पक्के घर बांधत होता. ही माहिती समजताच यळगूडचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्य अतिक्रमण सुरू असलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी अतिक्रमण तत्काळ काढून घेण्याच्या सूचना दिल्या. त्यावेळी गणेश रजपूत याला हुपरी पोलिस ठाण्यात पाठवून दिलेे. त्यानंतर अतिक्रमण केलेल पक्क्या विटांचे घर जेसीबी मशिनच्या सहाय्याने जमिनदोस्त करण्यात आले. यावेळी गणेशची पत्नी ज्योती यांच्याबरोबर सर्व ग्रामपंचायत प्रशासन व कर्मचारी यांच्याबरोबर वादावादी झाली. यावेळी सरपंच वंदना पाटील व उपसरपंच सुभाष गोटखिंडे यांच्यासह अन्य लोकांवर चटणीची पूड टाकण्यात आली. तसेच महिला कर्मचारी चंद्रभागा कांबळे यांच्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे गठंण लंपास केले, अशी फिर्याद सरपंच पाटील यांनी दिली आहे.

तर अतिक्रमन केलेल्या ज्योती रजपूत यांनी कोणत्याही प्रकारची नोटीस न देता ग्रामपंचायतीने घर व प्रापंचिक साहित्य उद्धवस्त करत बेदम मारहाण केली व अनिल पाटील व वसंत शिंदे यांनी घरासाठी उसनवार आणलेले रोख २५ हजार रूपये लंपास करत विनयभंग केल्याची फिर्याद ज्योती रजपूत यांनी दिली.

यळगुडमधील अतिक्रमण प्रकरणामध्ये गणेश रजपूत हा दलित महासंघाचा कार्यकर्ता आहे. वाद विकोपास जावू नये म्हणून मिटविण्यास आलेल्या दलित महासंघ कार्याध्यक्ष बाबासो दबडे यांच्यासह सहा जणांवर खोटे गुन्हे दाखल करणेत आले आहेत. याबाबत पोलिस प्रमुखांची भेट घेणार आहोत.

- सुनील कोरे, हुपरी शहराध्यक्ष, दलित महासंघ

यळगुड गावातील खुल्या जागांचे संरक्षण करून अनेक ठिकाणची अतिक्रमणे तत्काळ काढणार असून भविष्यात रिकाम्या जागांची गावाला गरज आहे. गणेश रजपूत या अतिक्रमन करणाऱ्याचा कैवार घेऊन दलित महासंघाचे पदाधिकारी भीती घालत आहेत. अशा प्रकारांना अजिबात भीक घालणार नाही.

- वंदना पाटील, सरपंच यळगूड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा कर्मचारी उद्यापासून संपावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने येत्या मंगळवारी(दि. १५) मध्यरात्रीपासून सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संपात महापालिकेतील सर्वच चार हजार ७७९ कर्मचारी सहभागी होणार असल्याचे महापालिका कर्मचारी संघाने जाहीर केले आहे.

कर्मचारी विविध मागण्यांसाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासनाशी चर्चा करीत आहेत. मागण्यांबाबत प्रशासनाकडून चालढकल होत असून, महापालिकेचे आयुक्त मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप कर्मचारी संघाने केला आहे. रोजंदारी कर्मचा-यांना सेवाजेष्ठतेनुसार कायम सेवेत सामावून घ्यावे, अधीक्षक संवर्गातील रिक्त पदे भरावितअशा २० मागण्यांचा आग्रह कर्मचारी संघाने धरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images