Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

२० कोटींची टिमकी कशाला वाजवता?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी २० कोटी रुपयांचा महानगरपालिकेला निधी दिल्याबद्दल फार टिमकी वाजवू नये. आम्ही पाच वर्षात ११०० कोटी रुपयांचा निधी आणला आहे', असे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 'हत्ती चले अपनी चाल म्हणणाऱ्यांनी हत्ती चिखलात रुतल्यावर काय होते याचीही जाणीव ठेवावी' अशी टीकाही त्यांनी केली.

याबाबत आमदार मुश्रीफ यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पालकमंत्री पाटील यांनी अकरा महिन्यांमध्ये निधी का आणला नाही?. निवडणुकीच्या तोंडावर आणि आचारसंहितेच्या पूर्वसंध्येला हा विकासनिधी खर्च होणार नाही याची माहिती असूनही त्यांनी शहरवासियांची फसवणूक चालवली आहे. 'हाथी चले अपनी चाल, कुत्ते भौके हजार' हे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना माहीती हवे की एकदा हत्ती चिखलात रूतला की त्याला दहा क्रेन लावूनसुद्धा तो चिखलातून वर निघू शकत नाही. चंद्रकांत पाटील यांच्या हत्तीची अवस्था चिखलातील हत्तीसारखी होणार आहे महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत पक्षीय पातळीवर पहिल्यांदाच लढताना राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढून जुनसुराज्य शक्ती आणि अपक्ष नगरसेवकांच्या मदतीने पक्ष प्रथम क्रमाकांचा बनवला. निवडणुकीत चांगली माणसे मिळत नसल्याने त्यांना ताराराणी आघाडीची साथ घ्यावी लागली आहे. शिवसेनेला तुम्ही नाकारले आहे. आम्हाला उमेदवार शोधावे लागेलेले नाहीत. आम्ही दलाल व बाजारबुणग्यांना जवळ करत नाही.'

दानवेंचा निषेध

भाजपच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मुश्रीफ यांनी निषेध केला आहे. पत्रकात म्हटले आहे की, दानवे यांनी आपली पात्रता ओळखून टीका करायला हवी होती. साखर कारखान्यांसंदर्भात अनेकवेळा दानवे यांना मुंबई आणि दिल्लीत पवार यांच्या निवासस्थानावर भेटताना मी पाहिले आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘शेकाप’ची चाचपणी सुरू

$
0
0

Anuradha.Kadam@timesgroup.com

कोल्हापूर : नगरपालिकेपासून कोल्हापूरच्या विकासाला दिशा देणाऱ्या आणि कोल्हापूरला बालेकिल्ला अशी ओळख देणाऱ्या भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे (शेकाप) महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. अनुभवी उमेदवारांसह तरुण चेहऱ्यांनाही शेकाप संधी देणार आहे. स्वबळावर लढण्यापेक्षा शेकापच्या विचार आणि तत्त्वासोबत येणाऱ्या अन्य पक्षांसोबत युती करण्याच्या दृष्टिनेही शेकाप येत्या महिन्याअखेरपर्यंत आपले पाऊल टाकेल अशी शक्यता आहे.

शेकापने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक रिंगणात डाव्या आघाडीचा एक भाग म्हणून शड्डू ठोकला होता. भारतीय कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह स्वतंत्र तिसरी आघाडी म्हणून या युतीने आजवर हातमिळवणी केली होती. मात्र, गेल्या लोकसभा आणि विधानसभेत या युतीला अपेक्षित यश मिळाले नाही. शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्यावरून झालेल्या मतभेदाचे पर्यवसन डाव्या आघाडीत अप्रत्यक्ष फूट पडण्यावर झाले. डाव्या आघाडीच्या तत्वात मनसे बसणार नाही या कारणावरून डाव्या आघाडीतच दुफळी निर्माण झाली.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शेकापने आपला उमेदवार रिंगणात उतरवताना डाव्या आघाडीतील कोणते पक्ष सोबत येतील का? याची जुळवणी केली होती. मात्र त्यावेळीही डाव्या आघाडीतील बिघाडी तशीच राहिली. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शेकापच्या गोटात अन्य डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत मोट बांधण्याचा विचार गांभीर्याने केला जात आहे. मात्र त्यासाठी शेकापच्या तत्वांना आणि विचारांना मुरड घातली जाणार नाही असेही पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

एकीकडे डाव्या आघाडीचे गणित मांडले जात असताना शहरातील ८१ प्रभागांत शेकापचा उमेदवार देण्याबाबतही पक्षात हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या ही प्रक्रिया चर्चेच्या पातळीवर असली तरी अनुभवी आणि तरुण इच्छुकांना समान संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नव्या पिढीचे प्रश्न समजून घेण्यासाठी युवा उमेदवारांचा शोध सुरू आहे. शहरातील प्रत्येक नागरी प्रश्न व समस्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अनुभव नेतृत्वही शेकापतर्फे देण्यात येणार आहे. सप्टेंबरअखेर या प्रक्रियेला मूर्त रूप येईल.

नगरपालिका असताना शेकापचा दबदबा होता. कोल्हापूर हे शेकापचे शहर म्हणून परिचित होते. तोच काळ आता पुन्हा येण्याची वेळ आली आहे. पुरोगामी विचारांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सध्या वैचारिक दुबळेपणा आला आहे. त्यामुळे ही निवडणूक शेकापसाठी महत्त्वाची आहे. - संपतराव पवार-पाटील, माजी आमदार, शेकाप



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नेत्यांसमोर बंडखोरांचे आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विविध राजकीय पक्षांनी प्रभागनिहाय इच्छुकांची चाचपणी केली. निष्ठावंत कार्यकर्त्यांपासून इतर पक्षांतील इच्छुकांचाही त्यामध्ये समावेश आहे. मात्र निवडणूक जाहीर करण्यास अजून वेळ असल्याने उमेदवारी जाहीर करून अन्य इच्छुकांना दुसरा मार्ग पकडण्यास प्रवृत्त करण्यापेक्षा जिथे तुल्यबळ इच्छुकांची संख्या जास्त आहे, तिथे नेत्यांनी सावध पवित्रा घेतला आहे.

तुल्यबळ इच्छुकाला गोपनिय पद्धतीने उमेदवारी निश्चित असल्याचे सांगत, उर्वरीत सर्व इच्छुकांना लटकवत ठेवण्याचे धोरण नेत्यांनी अवलंबले आहे. यामुळे आत्ताच प्रभागांत नाराजी निर्माण न करता उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत अनेक प्रभागात नेत्यांकडून इच्छुकांची अशीच अवस्था ठेवली जाण्याची शक्यता आहे.

प्रत्येक प्रभागात कोणत्या ना कोणत्या पक्षाचा नगरसेवक, पदाधिकारी आहेच. काँग्रेस व राष्ट्रवादीचे सध्याच्या सभागृहात संख्याबळ जास्त असल्याने त्यांच्याकडे आजी तसेच माजी नगरसेवकांबरोबर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही इच्छुक आहेत.

शिवसेनेचीही शहराच्या मध्यवस्तीतील तसेच उपनगरातील काही प्रभागांमध्ये ताकद आहे. त्यांच्याकडेही विद्यमान नगरसेवकांबरोबर पक्षाचे पदाधिकारी इच्छुक आहेत. भाजपमध्ये ठरलेल्या प्रभागात कोणाला उमेदवारी द्यायचे हे जवळपास निश्चित झाले आहे. उर्वरित ठिकाणी जे कुणी इच्छुक असतील, त्यातून निवडले जाणार आहेत. ताराराणी आघाडीमध्येही तीच अवस्था आहे. अशा परिस्थितीत सध्या एखाद्या उमेदवाराला तिकिट दिल्याचे जाहीर केल्यास तेथील अन्य इच्छुकांना दुसऱ्या पक्षाचा मार्ग स्वीकारण्याची मोकळीक मिळते. त्यातून त्या प्रभागातील पक्षाची ताकद कमी होण्याचा धोका नेत्यांच्या वाटतो. तो थांबवण्यासाठी सध्या निवडणुकीला अवकाश असल्याने जास्तीत जास्त इच्छुकांची मनधरणी करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

इच्छुकच दुसरीकडे गेल्यास या प्रयत्नांना अडचण येणार असल्याने सारे इच्छुक तिकिटाच्या आशेवर आपल्याकडेच जास्तीत जास्त काळ कसे राहतील याचा फंडा पक्षांनी अवलंबला आहे. काही प्रभागात चार-चार जणांनी उमेदवारी मागितली आहे. त्यातील एकालाच उमेदवारी मिळणार आहे. तरीही मला उमेदवारी मिळणार असल्याचे नेत्यांनी सांगितल्याचे उमेदवार सांगत आहेत. त्यामुळे नेत्यांनी कुणाला न दुखावता साऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्या जोरावर उमेदवार प्रभागांमध्ये वेगाने कामाला लागले आहेत.

प्रत्येकजण एखाद्या पक्षाची उमेदवारी आहे असे सांगत आहे. त्यांच्या या तयारीमुळे भागातील नागरिकही अचंबित होत आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पुन्हा सक्षम उमेदवार या निकषावर अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना इच्छेवर पाणी सोडून, दुसऱ्याच्या नावाने जयजयकार करण्याची वेळ येण्याची जास्त शक्यता आहे. त्यातून नाराज विरोधकांच्या गोटात मिसळणार हे स्पष्ट आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपूर्वी कमी होत चाललेली पंचगंगा नदीची पाणीपातळी बुधवारनंतर एका दिवसात नऊ इंचाने वाढली आहे. तसेच कडवी धरणही जवळपास भरले आहे. शहर व परिसरात दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साठल्याने बऱ्याच दिवसानंतर पावसाळी वातावरण जाणवू लागले आहे.

यंदा दोन महिने पावसाने मोठी ओढ दिली होती. बुधवारी ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरु झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरु होती. गुरुवारी सकाळी मात्र उघडीप होती. सकाळी अकरापासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली व दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. काही भागात रिमझिम तर काही भागात जोरदार असा पाऊस पडत होता. त्यामुळे दुचाकीवाहनधारकांची तारांबळ उडत होती. पाऊस नसल्याने जयंती नाल्यावर बंधारे घालण्यात आले होते. बुधवारी झालेल्या पावसामुळे ते ओसंडून वाहत होता. गुरुवारीही बंधाऱ्यावरुन प्रचंड प्रमाणात पाणी ओसंडत राहिले. दिवसभर पडलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाण्याची डबकी साठली होती. तर काही ठिकाणी खड्डे मुजवण्यासाठी भरलेल्या मुरुमाचा या पावसाने ​चिखल झाला होता. बुधवारपासून झालेल्या पावसामुळे हवेत गारवाही निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमुख रस्ते हॉकर्समुक्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या असलेल्या शहरातील हॉकर्स तसेच नो हॉकर्स झोन अखेर महानगरपालिकेने जाहीर केले. यानुसार शहरातील प्रचंड गजबजलेला असा महाद्वार रोड, शिवाजी रोड, बिंदू चौक, भवानी मंडप, स्टेशन रोड, टेंबलाई नाका ते आझाद चौक, महापालिका परिसर, करवीरनगर वाचन मंदिर ते बिंदू चौक अशा अनेक रस्त्यांवर नो हॉकर्स झोन करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक विभागीय कार्यालयनिहाय हॉकर्स तसेच नो हॉकर्स झोन तयार केले आहेत.

फेरीवाल्यांचे पुनर्वसन करताना वाहतुकीला शिस्त लागावी, अनधिकृत फेरीवाल्यांना चाप बसावा यासाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार विभागीय कार्यालय पातळीवर तसेच महापौरांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापना केली होती. त्यांच्या बैठकांनुसार शहरातील विविध भागातील ठिकाणे हॉकर्स व नो हॉकर्स झोन म्हणून निश्चित केली आहेत. आतापर्यंत या झोनसाठी स्थानिक नगरसेवकांबरोबर फेरीवाल्यांनीही वेळोवेळी विरोध केला होता. त्यामुळे ही प्रक्रिया रखडली होती. त्यानुसार भवानी मंडप परिसर, बिंदू चौक परिसर, शिवाजी पुतळा परिसर, ​शिवाजी रोड, महापालिका मुख्य इमारत परिसर, विद्यापीठ हायस्कूल समोरील रस्ता, महाद्वार रोड, हे नो हॉकर्स झोन म्हणून घोषित केले आहेत. दाभोळकर कॉर्नर ते व्हिनस चौकापर्यंत, स्टेशन रोड दक्षिणेकडील भाग, रेल्वे फाटक नंबर दोनकडील उड्डाणपूल ते आझाद चौकपर्यंतच्या रस्त्यांच्या दोन्हीकडील भाग नो हॉकर्स झोन म्हणून निश्चित केले आहेत. येत्या काही दिवसात त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु होणार आहे.

यामुळे शहरातील विविध भागात अनधिकृत आणि नगरसेवकांच्या वरदहस्ताने सुरू झालेले बेकायदेशीर केबिन्सचा व्यवसाय थांबणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते व चौक परिसर केबिनमुक्त होणार असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ अंतर्गत शहरातील फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण व पुनर्वसन होणार आहे.

नो हॉकर्स झोन म्हणून निश्चित केलेले काही ठिकाणे..

नंगीवली चौक-पद्माराजे हायस्कूल ते बिनखांबी गणेश मंदिर-महाद्वार रोड

मिरजकर तिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर ते उभा मारूती चौक रस्ता.

बिनखांबी गणेश मंदिर ते पापाची तिकटी.

जोतिबा रोड, गंगावेश चौक, ताराबाई रोड (उत्तर बाजू)

करवीर नगर वाचन मंदिर ते बिंदू चौक

गुजरी पूर्व पश्चिम रस्त तसेच गुजरी ते घाटी दरवाजा





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रादेशिक आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रादेशिक विकास आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, २२ सप्टेंबरपर्यंत विकास आराखडा विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात येणार आहे. केंद्रातील योजनांचा विकास आराखड्यात समावेश करून शहराचा सर्वांगिण विकास साधणारा आणि संपूर्ण जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून टाकणारा आराखडा पूर्णत्वाच्या वाटेवर आहे.

शहर विकासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाची बाब म्हणजे जागेचा अभाव. शहरात पुरेशी जागा उपलब्ध व्हावी यासाठी मध्यवर्ती बस स्थानक आणि रेल्वे स्थानक शहराबाहेर स्थलांतरीत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. निवासी वापराकरीता शहरात जागा उपलब्ध व्हावी यासाठी उद्यानांचे आरक्षण कमी करण्याचा विचार असून, याबाबत आगामी बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. शहराच्या हद्दवाढीचा आग्रह आराखड्यात धरला आहे. हद्दवाढीनंतर वाढणाऱ्या शहराच्या लोकसंख्येचा फायदा अनेक केंद्रीय योजनांसाठी होणार असून त्यातून शहराचा कायापालट करता येईल, त्यामुळे हद्दवाढीबाबत आग्रह धरला आहे. शहरातील क्रीडांगणे, झोपडपट्टी यासाठीही नियोजनाची शिफारस विकास आराखड्यात केली आहे. वाढती वाहनांची संख्या आणि पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता बहुमजली वाहनतळाची गरज विकास आराखड्यात अधोरेखित केली आहे.

शहरासह जिल्ह्यातील पर्यटन, पर्यावरण आणि प्राचीन वारसा स्थळांच्या सुरक्षेबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. पूर, भूस्खलन अशा नैसर्गीक आपत्तींचीही विकास आराखड्यात दखल घेतली आहे. १२ ते १४ सप्टेंबरदरम्यान सर्व विभागातील अहवालांचे अंतिम सादरीकरण होणार असू सर्व त्रुटी दूर करून २२ सप्टेंबरपर्यंत अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करणार असल्याची माहिती सैनी यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्सवाची धमाल ‘मटा’च्या वेबसाइटवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गणेशाच्या आगमनाची प्रतीक्षा आता पूर्ण होत असून, आठवडाभरात संपूर्ण वातावरण गणेशमय होणार आहे. गणेशोत्सवाच्या चैतन्यमय वातावरणात भर टाकण्यासाठी आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने खास वेबसाइट सुरू केली असून, त्याद्वारे वाचकांना बाप्पाच्या आगमनाच्या तयारीपासून प्रत्यक्ष उत्सवातील धमाल सर्वांपर्यंत पोहचविता येणार आहे.

'मटा'च्या http://www.mataganeshotsav.com/ या वेबसाइटवर तुम्ही तुमचे फोटो शेअर करू शकता, तसेच त्यातील एका क्लिकसरशी महाराष्ट्रातील गणेशोत्सवाची झलकही तुम्हाला पाहायला मिळू शकते. गेल्या गणेशोत्सवात या वेबसाइटला मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाही या वेबसाइटच्या माध्यमातून या अनोख्या गणेशोत्सवात सहभागी होता येणार आहे. या वेबसाइटवरून बाप्पांची आरती डाउनलोड करता येणार आहे, तसेच आरतीचे व्हिडिओही पाहता येणार आहेत. लोकसहभागाच्या माध्यमातून गणेशोत्सव व्यापक करण्यासाठी 'मटा'ने हा पुढाकार घेतला आहे.

अपलोड करा तुमच्या बाप्पांचा फोटो

या खास वेबसाइटवर विकसित केलेल्या पेजेसमध्ये एक आहे 'फोटो कॉन्टेस्ट'. गणेशमूर्ती, मंडळे, घरगुती गणेश, कुटुंबासह बाप्पा, बाप्पाचा फॅन या विभागांतर्गत तुम्ही तुमच्या घरात, मंडळात विराजमान झालेल्या गणरायाचे फोटो अपलोड करू शकता. यंदा तुमच्या घरच्या बाप्पांची मूर्ती कशी आहे, ती कशी सजवली आहे, हे या निमित्ताने तुम्ही जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचवू शकाल. ८८६६००१८३० या क्रमांकाच्या व्हॉट्स अॅपवर फोटो पाठवूनही तुम्ही हे इतरांपर्यंत पोहोचवू शकाल. विशेष म्हणजे, सर्वोत्कृष्ट फोटोंना 'मटा'कडून आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. त्याशिवाय निवडक फोटोंचे प्रदर्शन गणेशोत्सवानंतर आयोजित करण्यात येणार आहे.

खाद्यपदार्थ कला क्लिक

गणपती या विद्येच्या देवतेसह या उत्सवाची अजून एक महत्त्वाची बाब असते, ती खाद्यपदार्थ. उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर बाप्पाला दाखवला जातोच, शिवाय या निमित्ताने विविध पदार्थही घरी तयार केले जातात. याच दिवसांत तुम्ही तयार केलेल्या काही नव्या पदार्थांची रेसिपी किंवा नेहमीचेच, पण वेगळ्या पद्धतीने केलेले पदार्थ तुम्हाला 'रेसिपीज' या पेजवर अपलोड करता येणार आहेत. फक्त पदार्थांच्या रेसिपीज नाहीत, तर त्यासह त्यांचे सुंदर फोटोही आवर्जून अपलोड करा आणि तुमची ही पाककृती सर्वांपर्यंत पोहोचवा.

आमचा कलात्मक गणपती

प्रत्यक्ष गणपतीची मूर्ती साकारणाऱ्या हातांप्रमाणेच गणपती आणि कलेचे नातेही अगदी जवळचे आहे. पर्यायाने कलाकाराचेही. त्यामुळेच गणेशोत्सवादरम्यान चित्र, शिल्प, खडू, पाने-फुले किंवा साबणापासून तयार केलेले बाप्पाही पाहायला मिळतात. गणरायाच्या साकारलेल्या अशा विविध रूपांना आणि कलाकाराच्या कल्पकतेला दाद मिळवून द्यायलाच 'मटा'च्या वेबसाइटवरील 'आमचा गणपती' हे खास पेज. त्यावर तुम्ही साकारलेला 'आमचा गणपती' पाठवून फक्त आप्तेष्टांकडून नाही, तर इतरांकडून दाद मिळवू शकता.











मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई, पुणे, सांगलीसह सहा पथके कार्यरत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा तपास नवी मुंबई, पुणे, सांगलीसह कोल्हापुरातील तीन पथकांकडून सुरू आहे. एकूण सहा पथकांकडून तपास सुरू असून हत्या नेमक्या कोणत्या कारणावरून याचा माग घेतला जात आहे.

पानसरे दाम्पत्यावर १६ फेब्रुवारीला गोळीबार झाला. गंभीर जखमी अवस्थेतील पानसरे यांचा २० फेब्रुवारीला मृत्यू झाला. पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी प्रारंभी २३ ते २५ पथके कार्यरत होती. कोल्हापूर परिक्षेत्रासह मुंबई, पुण्यातील गुन्हे शाखांनी तपास केला. तीन महिन्यानंतर तपास पथकांची संख्या कमी करून सध्या ती सहा पथकावर आली आहे. पानसरे कुटुंबांनी तपाससाठी एसआयटीची उच्च न्यायालयात मागणी केली होती. न्यायालयाच्या आदेशापूर्वीच राज्य सरकारने विशेष पथकाची नियुक्ती केली. राज्य गुन्हे शाखेचे अतिरिक्त अधीक्षक संजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

सध्या सहा पथकांकडून तपास सुरू असून सहा पथकांच्या प्रमुखांच्यात समन्वय ठेवण्यात आला आहे. डॉ. एम.एम्. कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती कळताच कोल्हापुरातील दोन पथके धारवाडला रवाना झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाधिकारी सैनी यांनी मागवली टंचाईची माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी जिल्ह्यातील उपलब्ध पाणीसाठा, चारा आणि अन्नधान्याच्या स्थितीबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांकडून अहवाल मागवला आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक आयोजित केली होती.

राज्य सरकारने जिल्ह्यातील पाणीसाठ्यांच्या वापराबात जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिल्याने पाण्याचे नियोजन करण्यावर सैनी यांनी भर दिला आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकेच्या आयुक्तांनीही बैठकीला उपस्थिती लावली. जिल्ह्यात सद्यस्थितीला तरी टंचाई जाणवत नसली, तरी भविष्यात टंचाईच्या झळा बसू नयेत यासाठी आतापासूनच जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरु आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसाने स्थिती आणखी सुधारली आहे. पिकांच्याबाबतीत शेतक-यांना काहीसा दिलासा मिळाला आहे, पण वर्षभरातील सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी असल्याने आणि धरणांमधील पाणीसाठा जोमतेम असल्याने जिल्हा प्रशासनाने नियोजनावर भर दिला आहे. प्रत्येक तालुक्यातील पाणी साठ्यांची स्थिती, चारा, अन्नधान्य याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहा यांचा निषेध करून पालिका सभा तहकूब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'वुई वॉन्ट सर्किट बेंच, सर्किट बेंच आमच्या हक्काचे, मोहित शहा मुर्दाबाद' अशा घोषणा देत महापालिका सभागृहाने सर्किट बेंचसाठी पाठिंबा दिला. त्याचवेळी हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याच्या निर्णय न घेतल्याबद्दल हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांचा निषेध करत सभा तहकूब केली. महापौर वैशाली डकरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. तहकूब सभा सोमवारी (ता.१४) सकाळी ११.३० वाजता होणार आहे.

महापौर वैशाली डकरे यांनी सर्किट बेंचसाठी कोल्हापूकरांचा लढा सुरू आहे. मात्र पुन्हा एकदा कोल्हापूरकांची फसवणूक झाली आहे. कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याचा निर्णय न घेतल्याबद्दल सभागृह निषेध करत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीचे गटनेते राजू लाटकर म्हणाले, 'सहा जिल्ह्यातील वकील, पक्षकार आणि नागरिकांची सर्किट बेंचची मागणी आहे. सर्किट बेंच स्थापनेचा निर्णय अंतिम टप्प्यावर होता. सर्किट बेंच नाकारण्यामागे षडयंत्र आहे. कोल्हापूरकरांना संघर्षाशिवाय काही मिळाले नाही. सर्किट बेंच हे कोल्हापूरच्या हक्काचे आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा एल्गार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारण्यात आलेल्या कोल्हापूर बंदला ‌संमिश्र प्रतिसाद मिळाला. याप्रश्नी मावळते न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोणताच निर्णय न घेतल्याच्या प्रकाराचा यावेळी निषेध करण्यात आला. शहरातील बहुतांशी शाळा-महाविद्यालये बंद होती. सरकारी कार्यालयातील वर्दळ थंडावली होती. बंदच्या निमित्ताने वकिलांनी सर्किट बेंचच्या मागणीचा एल्गार पुन्हा पुकारला. बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.

दरम्यान, खंडपीठ कृती समितीच्यावतीने काढलेल्या मोटारसायकल रॅलीत वकिलांसह राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सर्किट बेंचप्रश्नी कोल्हापूरच्या झालेल्या घोर निराशेमुळे कृती समितीने कोल्हापूर बंदची हाक दिली होती. गुरुवार सकाळपासूनच रस्त्यांवर तुरळक वाहतूक होती. विद्याथीं वाहतूक रिक्षा संघटेनेने आंदोलनाला पाठिंबा दिल्याने विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीमुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दुपारच्या सत्रातील शाळाही बंद होत्या. महापालिकेच्या शाळांत सर्किट बेंचची स्थापना तातडीने करण्याची मागणी करून प्रार्थनेनंतर शैक्षणिक कामकाज बंद ठेवण्यात आले.

जिल्हा न्यायालयाच्या आवारात सकाळपासूनच वकिलांनी गर्दी केली होती. सकाळी ११ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत वकिलांची संख्या लक्षणीय होती. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष नगरसेवक राजेश लाटकर, प्रदेश सदस्य माजी महापौर आर.के. पोवार, शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, उपमहापौर ज्योत्स्ना मेढे यांच्यासह राजकीय व सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बंदचे आवाहन करत रॅली प्रमुख मार्गावरुन काढण्यात आली. 'वुई वाँट जस्टीस, वुई वॉट सर्किट बेंच', 'सर्किट बेंच मिळाले पाहिजे,' 'मोहित शहांचा निषेध असो,' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. स्टेशन रोड, महाव्दार रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, पापाची तिकटी, शिवाजी पेठ, लक्ष्मी रोड परिसरातील दुकाने बंद होती. खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड. राजेंद्र चव्हाण, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत चिटणीस, माजी अध्यक्ष अजित मोहिते, शिवाजीराव राणे, विवेक घाटगे आदिंनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

रविवारी बैठक

सर्किट बेंचप्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी खंडपीठ कृती समितीची रविवारी, (ता. १३) जिल्हा बार असोसिएशनच्या कार्यालयात बैठक होणार आहे, अशी माहिती अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी दिली. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहणार आहे.

रॅलीतून लढ्याचा निर्धार

मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचची मागणी मान्य न केल्याच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीत न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. रॅलीत राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, पक्षकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्किट बेंचच्या मागणीसाठी वकिलांच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

सर्किट बेंचची स्थापना न केल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील वकीलांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुरूवारी कोल्हापूर बंदची हाक खंडपीठ कृती समितीने दिली होती. बंदला सर्व राजकीय व सामाजिक संघटनांनी पाठींबा दिला होता. वकिलांच्यावतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून न्यायालयाचा आवार वकीलांनी फुलला होता. सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आर.के. पोवार यांच्या हस्ते रॅलीस प्रारंभ झाला.

ज्येष्ठ व कनिष्ठ वकील मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. कनिष्ठ वकील खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय न घेणाऱ्या मोहित शहा यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. रॅली मार्गावर राजकीय व सामाजिक कार्यकर्ते सहभागी होत होते. सीपीआर चौक, दसरा चौक, व्हिनस टॉकीज चौकात रॅली मोठी होत गेली. 'वुई वाँट हायकोर्ट बेंच' च्या घोषणेने रॅली दुमदुमून गेली. रॅलीच्या मार्गावरील सर्व दुकाने बंद केली जात होती. स्टेशन रोडवर दुकाने बंद झाल्याने शुकशुकाट होता.

दाभोळकर चौकात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर रॅलीत सहभागी झाले. चौकात आमदार क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, शहराध्यक्ष राजेश लाटकर, नगरसेवक शारंगधर देशमुख, जयकुमार शिंदे, पद्माकर कापसे, पक्षकार संघटनेचे प्रसाद जाधव, मनसेचे राजू जाधव यांनी शहा यांच्या निषेधाच्या घोषण दिल्या. ताराराणी चौकात उपमहापौर ज्योत्स्ना मेढे सहभागी झाल्या. त्यानंतर मोटारसायकल रॅली, टेंबलाई उड्डाण पूल, टाकाळा रोड, राजारामपुरी एकमार्गी रोड, राजारामपुरी मुख्य रस्ता, बागल चौक, पार्वती टॉकीज, उमा टॉकीज, आझाद चौक, दुर्गा हॉटेल, देवल क्लब, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, शिवाजी चौकातून परत महानगरपालिका, जिल्हा न्यायालयाच्या आवारात विसर्जित झाली.

विसर्जन रॅलीचे नंतर छोट्या सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलताना महापौर वैशाली डकरे म्हणाल्या, 'हायकोर्टाने कोल्हापूरवर अन्याय केला आहे. जनतेच्या मागणीकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी होणाऱ्या आंदोलनात करवीरकर जनता सहभागी होईल.' आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, 'कोल्हापूरला कोणतीही गोष्ट झगडल्याशिवाय मिळत नाही. आपण सातत्याने लढत आहोत. आज जरी आम्ही सत्ताधारी असलो तरी खंडपीठाच्या लढाईसाठी शिवसेना कायम रस्त्यावर उतरेल.' राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील म्हणाले, 'आम्ही या आंदोलनात कायम अग्रभागी राहू.' शहराध्यक्ष राजेश लाटकर म्हणाले, 'सर्किट बेंचच्या स्थापनेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढा देऊ.' आंदोलनात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावतीने प्रतिमा पाटील यांनी पाठींबा दिला. तर कॉ. दिलीप पवार म्हणाले, 'खंडपीठ स्थापन होईपर्यंत लढा चालूच ठेवायचा आहे.'

आंदोलनापासून भाजप अलिप्त

मंगळवारच्या सभेत भाजप महानगर अध्यक्ष महेश जाधव यांनी कोल्हापूर बंद आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते सहभागी होतील अशी घोषणा केली होती. पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बंद पाळू नका, असे आवाहन केले होते. त्यामुळे बंदच्या आंदोलनात भाजपचा कोणताही पदाधिकारी सहभागी झाला नाही शिवाय कार्यकर्तेही रॅलीकडे फिरकले नाहीत.

खोटारडा माणूस.....

'अशिया खंडातील सर्वात खोटारडा माणूस' अशा आशयाचा न्यायमूर्ती मोहित शहा यांच्या प्रतिमेसह फलक लक्ष वेधून घेत होता. 'दार उघड, आता दार उघड, गणपती बाप्पा खंडपीठाचे दार उघड', 'कोल्हापुरातील खंडपीठ कोणासाठी? सर्वसामान्य जनतेसाठी' हे फलक लक्ष वेधून घेत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूरचा राजा’ला आठ लाखांचे दागिने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळावेश स्टँड परिसरातील गोल सर्कल मित्र मंडळाच्या 'कोल्हापूरच्या राजा' गणेशमूर्तीची भव्य सभामंडपात गणेश चतुर्थीदिवशी प्रतिष्ठापना केली जाणार आहे. भाविकांची देणगी व कार्यकर्त्यांच्या वर्गणीतून मूर्तीसाठी आठ लाखाचे सोन्याचे दागिने केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

'लालबागच्या राजा'च्या धर्तीवर ही मूर्ती तयार केली आहे. गेल्या आठवड्यात मूर्तीचे कोल्हापुरात आगमन झाले आहे. 'लालबागच्या राजा'चे अलंकार घडवणाऱ्या सुवर्णकार नाना वेदक यांच्याकडून बाजूबंद, सोनपट्टा, सोनपाडळे, बाळी, हात, तोडे, कमरपट्टा, अंगठी असे दागिने घडवले आहेत. मूर्ती शाडूची आहे. ती पंचगंगा नदीत विसर्जित करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

डिंपल कमलाकर कराळे गरीब मुलीला १५ हजाराची मदत.

व्यसनमुक्ती पंधरवड्यात सामाजिक प्रबोधन

१०१ कार्यकर्त्यांचा नेत्रदानाचा संकल्प.

मोफत आरोग्य शिबिर

१४ वर्षाखालील मुलांची मोफत रक्तगट तपासणी.

दुष्काळ निवारणासाठी मदत करणार

डॉल्बीला फाटा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धरणसाठ्यात होतेय वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या महिन्याभरा पासून दडी मारून बसलेल्या पावसाचे पुनरागमन झाले आहे. सध्या जिल्ह्यातील मुख्य धरणे भरण्याच्या मार्गावर असून काही धरणांच्या पाणीपातळीत किंचीत वाढ झाली आहे. राधानगरी धरणाबरोबरच कासारी, कडवी धरणे भरली असून पाऊस असाच राहिला तर कुंभी, पाटगाव, वारणा आदी धरणे भरण्याची शक्यता आहे. कापशी खोऱ्याचा प्राण असलेले चिकोत्रा धरण मात्र, अजूनही निम्मेही भरलेले नाही..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता सुताचा तिढा...

$
0
0

सा‌यझिंग कामगारांच्या संपानंतर दर वाढविल्याने पेच

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सायझिंग असोशिएशने केलेल्या आवाहनास कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने शुक्रवारी शहर व परिसरातील ८० हून अधिक सायझिंग सुरु झाल्या. तर शनिवारपासून उर्वरीत सायझिंग सुरु होत आहेत.सायझिंग सुरु झाल्याचे समाधान असताना नफेखोरीला चटावलेल्या सूत व्यापाऱ्यांनी प्रति किलो दोन ते तीन रुपयांची वाढ केल्याने यंत्रमागधारकांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. सायझिंग सुरु झाल्याने वस्त्रनगरीतील यंत्रमागाची चक्रे पुन्हा फिरु लागल्याने शहरातील थंडावलेले व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहेत.

सुधारित किमान वेतनाच्या आंदोलनासाठी सायझिंग-वार्पिंग कामगारांनी तब्बल ५२ दिवसांचा संप अजूनही सुरू आहे. यामध्ये प्रशासनाने तोडगा काढताना ५०० रुपये पगारवाढीचा प्रस्ताव ठेवत सायझिंग सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला होता. हा तोडगा सायझिंगधारकांनी मान्य केल्याने संप माघारीचा चेंडू आता कामगार संघटनांच्या कोर्टात गेला आहे. मात्र, जर ही पगावरवाढ मान्य असेल तर कामगारांनी नुकसान करून घेऊ नये. त्यांनी कामावर जावे असे कामगार नेते ए. बी. पाटील यांनी जाहीर केले. त्यामुळे र शुक्रवारपासून १५० पैकी ८० पेक्षा अधिक सायझिंग सुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सायझिंगधारक कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांची भेट घेऊन पगारवाढ परवडत नसतानाही कायदा व सुव्यवस्था टिकवण्यासाठी आपल्या सुचनेवरुन हा तोडगा मान्य केला असल्याचे सांगितले. आता सायझिंगचा प्रश्न सुटत असताना नफेखोरीला चटावलेले व्यापारी सूतदरा‌त वाढ करत आहेत. सायझिंगच्या संपामुळे यंत्रमागही बंद राहिले होते. आता सायझिंग व यंत्रमाग सुरू झाल्याने सूताला मागणी वाढण्याची शक्यता गृहित धरून व्यापा ऱ्यांनी सूताची प्रतिकिलो दोन ते तीन रूपये वाढ केली आहे. त्यामुळे गेल्या ५२ दिवसांपासून बंदमुळे नुकसान सहन केलेले यंत्रमागधारक पेचात अडकले आहेत.

पीस रेटबाबत मंगळवारी बैठक

यंत्रमाग कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या किमान वेतन संदर्भात उपस्थित झालेले प्रश्न तसेच इतर अनुषंगिक प्रश्नांबाबत मंगळवारी (ता १५) कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी व्यापक बैठक बोलवली आहे. या बैठकीत सदरचे किमान वेतन पीस रेटवर रुपांतरित करणेबाबत विचार विनियमय करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिली. २९ जानेवारीला किमान वेतनाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर यंत्रमाग व अनुषंगिक उद्योगांकडून नवीन दरानुसार कामगारांना वेतन देणे परवडत नसल्याची बाब प्रकर्षाने निर्दशनास आली आहे. सदर अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे. मात्र, सन १९८४ मध्ये किमान वेतन जाहीर झाले तेव्हा, पीस रेटमध्ये नव्हते म्हणून पुन्हा सन १९७१ च्या अधिसुचनेतील पीस रेटचा आधार घेवून १९८८ मध्ये नेमलेल्या तज्ज्ञ समितीने पीस रेटच्या आधारे वेतन निश्चित केले आहे. त्यामुळे पीस रेटवरील वेतन निश्चित करणे आवश्यक आहे. याअधिसूचनेबाबत मुंबई हाकोर्टात याच िका दाखल असलने कामगार विभागाने विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागितला होता.

दादा संधी सोडू नका...

सायझिंग कामगारांच्या संपाबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आमदार हसन मुश्रीफ यांनी उपरोधिक ‌टीका केली आहे. ‌पालकमंत्री पाटील यांनी सायझिंगधारकांच्या संपाबाबत कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. सायझिंग कामगारांचा संप अतिंम टप्प्यात आला आहे, त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी कामगार मंत्र्यांना घेऊन सरकारतर्फे आश्वासन द्यावे, गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस असताना कामगारांच्या तोंडात गोड मोदक घालावा, आता संप मिटत असताना श्रेय घेण्याची नामी संधी पाटील यांना चालून आली आहे. त्यामुळे ती दवडू नये. कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तर त्यांचे मंत्रिपद धोक्यात येऊन हाळवणकरांना संधी मिळू शकते, त्यामुळे त्यांनी ही संधी सोडू नये, असा सल्ला आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मडिलगेकरांचा डॉल्बीमुक्तीचा संकल्प

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

मडिलगे (ता. आजरा) येथील ग्रामस्थांनी डॉल्बीमुक्त गाव राखण्याचा व ध्वनीप्रदूषण टाळण्याचा संकल्प केला आहे. याबाबत नुकतीच ग्रामसभा घेत सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे. या संकल्पाचे अनुकरण इतरांनीही करून डॉल्बी हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पुष्पलता जाधव होत्या.

डॉल्बीची ध्वनीप्रदूषणाची क्षमता इतरांच्या तुलनेत खूपच आहे. वेळोवेळी या प्रकारच्या ध्वनीक्षेपकांचा वापर न करण्याबाबत केवळ चर्चाच होत राहिल्या आहेत. प्रशासनाने या प्रकारच्या ध्वनी यंत्रणेवर बंदीचा बडगा उगारला असला तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर मडिलगेकरांनी स्तुत्य पाऊल उचलत किमान आपले गाव या प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्त राखण्याचे ठरवीले आहे. इतर गावांमधूनही अशा प्रकारची पावले उचलणे गरजेचे आहे. उपसरपंच गणेश देसाई यांनी या प्रकारच्या संकल्पाची व त्याबाबतच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज अधोरेखीत करताना या यंत्रणेचे दुष्परिणाम रूग्ण, लहान मुले व वृध्दांना कसे सहन करावे लागतात, याचे विवेचन केले. सध्याच्या तरूणाईनेच याबाबत पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी स्पष्ट केली व ठराव मांडला. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष के. व्ही. येसणे, गणपतराव पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुलांच्या आरोग्याशी खेळ

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

कागल तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून एकीकडे शालेय पोषण आहर बंद असतांना दुसरीकडे शाळांमधील शिल्लक डाळीला कीड लागली आहे. या किडलेल्या डाळीचा हिशोब द्यावा लागणार असल्याने शाळांना त्या आहारात त्याचा वापर होण्याची शक्यता आहे. यामुळे आता तांदूळ उपलब्ध झाला असला तरी खराब डाळीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या डाळींचा तालुक्यातील साठा नष्ट करुन शाळांना नवीन तांदळाबरोबर चांगली डाळ उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी होत आहे.

उपलब्ध डाळीमध्ये मोठ्या प्रमाणात किडे असूनही ती धूवून, वाळवून वापरली जात आहे. शिक्षक, मुख्याध्यापकांना उपलब्ध असलेल्या साठ्यातच आहार द्यायचा असल्याने त्यांचीही कोंडी झाली आहे.

कागल तालुक्यात २७ हजार ८५० विद्यार्थी शालेय पोषण आहराचा लाभ घेतात. त्यांना १२७३ क्विंटल तांदूळ दोन महिन्यासाठी लागतो. महिन्याभरानंतर हा तांदूळ आता उपलब्ध झाला आहे. परंतु काही शाळांमध्ये दोन महिन्यापूर्वी मिळालेली डाळ कीड लागून खराब झाली आहे. प्रतिविद्यार्थी दररोज सुमारे वीस ग्रॅमप्रमाणे डाळ लागते. महिन्याभरापुर्वीच काही शाळांमध्ये या डाळीमुळे आहारात आळ्या सापडल्याची काही उदाहरणे दडपली आहेत. शाळांमध्ये शिल्लक धान्य साठवण्याची योग्य यंत्रणा अथवा उपकरणे नसल्याने या डाळी तसेच अन्य आहारातील पदार्थ खराब झाले आहेत. याची नियमानुसार सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापकांची असते. त्यामुळे मुख्याध्यापकांना एक तर ही खराब डाळ नष्ट करुन स्वत:च्या पगारातून उपलब्ध करावी लागणार आहे किंवा ती वापरावी लगणार आहे.

पंचायती समितीचा शालेय पोषण आहार विभाग केवळ धान्य कसे साठवायचे याबाबत सूचना देण्याचे काम करतो. या व्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास एखाद्या ठिकाणी अचानक भेट देवून पहाणी करु शकतो परंतु आशा पध्दतीच्या पहाणीतून अद्याप कोणत्याही शाळांवर, शिक्षकांवर कारवाई झाल्याचे उदाहरण नाही. तक्रार आल्यास चौकशी करुन कारवाई केली जाते. परंतु आपल्याच शाळेतील पोषण आहारातील गंभीर बाबीची तक्रार कोणी करेल का याचा जराही विचार प्रशासनाने केलेला नाही. परिणामी या विभागाकडे पोषण आहारात आळ्या, किडलेले धान्य सापडूनही अद्याप लेखी तक्रार प्राप्त झाल्याचे उदाहरण नाही.

आलंय तसंच खायचं...

तालुक्यातील एका शाळेत डाळ किडलेली होती. आहार शिजवणाऱ्यांनी सदरची डाळ धूवून वाळवून आणली. परंतू डाळीतील किडे आहारात सापडले. हा आहार एका शिक्षकाला दाखवल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, 'वरुन जसे आलयं तसंच खायच...' त्यामुळे काही शाळांत डाळ नष्ट न करता विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.

धान्य साठवणूकीत खराब होऊ नये यासाठी आम्ही वारंवार सूचना देवून आचानक तपासणी करतो. खराब धान्याबाबत लेखी तक्रार आल्यास त्याची चौकशी करुन पुढील कार्यवाही करतो. परंतू तालुक्यात मोठ्या प्रमाणात डाळी खराब झाल्या असतील, असे मला वाटत नाही.

- सौ. एस. बी. सलगर, अधीक्षक, शालेय पोषण आहार, कागल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणांनी बावडा ‘पॅक’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या आठवड्यात कसबा बावड्यात घडलेल्या दुर्देवी अपघातानंतर केवळ दोन ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार करून महापालिकेची यंत्रणा थंड पडली आहे. वर्दळीच्या ठिकाणची अतिक्रमणे हटवण्यापेक्षा दुसरीकडेच उपाययोजना करून जबाबदारी पार पाडण्यापुरते समाधान महापालिका प्रशासन मानत आहे. मात्र गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांवरील अतिक्रमणे हटणार कधी असा सवाल वाहनधारक करीत आहेत.

कसबा बावड्यात मुख्य रस्त्यावर वर्दळ वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्यावर अपघातांमध्ये गेल्या वर्षभरात दोघांना जीव गमवावा लागला आहे. तर दहाहून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यांवरील अपघाताला कारणीभूत ठरणारे अतिक्रमण हटवण्याची मागणी वारंवार होत असते. मागील आठवड्यातील अपघातानंतरही अतिक्रमाणाच्या चर्चेने जोर पकडला होता. महापालिका प्रशासनाने अतिक्रमणे हटवून रस्ता रिकामा करण्याऐवजी वर्दळीच्या ठिकाणापासून दूर छत्रपती राजाराम कॉलनीजवळ दोन स्पीड ब्रेकर तयार केले. बावड्यातील अस्ताव्यस्त पार्किंग, दुकानधारकांचे अतिक्रमण आणि वर्दळीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर तयार करण्याची गरज आहे. असे असताना मनपा प्रशासन मात्र मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

भगवा चौक ते श्रीराम पेट्रोलपंपापर्यंत मुळातच रस्ता अरुंद आहे. यातच दुकानधारकांचे अतिक्रमण वाढल्याने अर्धाअधिक रस्ता व्यापलेला असतो. फुटपाथवरील वाहनांचे पार्किंग, खाद्यपदार्थांच्या गाड्या यामुळे एकेरी वाहतूक सुरु असते. यातच आता गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यांवरच मंडप उभारण्याचे काम सुरु केल्याने वाहतुकीचा प्रश्न आणखी गंभीर होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि वाहतूक नियंत्रण पोलिसांनी आत्तापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेतला तर हा प्रश्न तातडीने निकालात निघेल.

बावड्यात मुळातच जागा कमी आहे. रस्त्याला लागून घरे असल्यामुळे काही ठिकाणी वाहनांचे पार्किंग फुटपाथवर आहे. अलिकडे खाद्यपदार्थांच्या गाड्याही वाढल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमणे हटवण्याबाबत महापालिकेला विनंती केली आहे. अतिक्रमण हटवण्याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकरही तयार केले पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरला आहे.

- अजित पोवार, नगरसेवक

बावड्यातील अतिक्रमणांचा सर्व्हे सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अतिक्रमणे हटवण्याचे आवाहन नागरिकांना करणार आहोत. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे हटवली नाहीत तर कायदेशीर कारवाई करून अतिक्रमणे हटवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

- हर्षल घाटगे, उपशहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत बोंद्रे यांचे निधन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री शाहू शिक्षण संस्थेचे सचिव, गोकुळ दूध संघाचे संचालक चंद्रकांत ऊर्फ सुभाष बोंद्रे (वय ६७) यांचे शुक्रवारी हदयविकाराने निधन झाले. त्यांना शुक्रवारी पहाटे उपचारासाठी सव्वा तीनच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. दिवगंत कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे ते चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात पत्नी रमा आणि मुलगा अभिषेक, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १४) सकाळी नऊ वाजता आहे.

बोंद्रे यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची दर्शनासाठी गर्दी झाली. त्यांचे पार्थिव दसरा चौकातील श्री शाहू शिक्षण संस्थेत दर्शनासाठी ठेवले होते. तेथून रंकाळा पार्क येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघाली. दुपारी पंचगंगा स्मशानभूमी येथे अत्यंसस्कार करण्यात आले. आमदार महादेवराव महाडिक, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आदींनी आदरांजली वाहिली.

बोंद्रे तिस‍ऱ्यांदा ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍'गोकुळ'मध्ये संचालक झाले होते. कोल्हापूर सेंट्रल कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह स्टोअरच्या १७ शाखांच्या माध्यमातून पंचवीस वर्षे कार्यरत राहिले. विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. सोमवारी (ता. १४) दुपारी चार वाजता दसरा चौकातील शाहू शिक्षण संस्थेत शोकसभा घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुकानदारांचा पसारा रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अवघ्या पाच दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रस्ते अडवून मंडप घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असतानाच व्यापारी पेठांमध्ये अतिशय रहदारीच्या रस्त्यांवर दुकानदार व विक्रेत्यांनी मंडप घालण्यास सुरुवात केली आहे. परिणामी या मंडपांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून काणाडोळा केला जात आहे. याचा त्रास वाहनधारक, नागरिकांना होत आहे.

गणेश मंडळांबरोबर व्यापारीपेठांमध्ये दुकानांच्या बाहेर मंडप उभारण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. पापाची तिकटी पानलाइन, कुंभार गल्ली या दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी मंडप घातल्याने रस्ते चिंचोळे होऊ लागले आहेत. परिणामी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी व वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. महाद्वार रोड फेरीवाल्यांनी व्यापला आहे. या रस्त्यांवरही मंडप घालण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. उत्सवासाठी लागणारी डेकोरेशन, पूजेचे साहित्य, कपडे, पडदे विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. हातगाडीवरून विक्री करणारे विक्रेतेही मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत. शिवाजी पुतळा, भवानी मंडप, राजारामपुरी परिसरातही दुकानदार मंडप घालू लागले आहेत.

कुंभार व्यावसायिकांनीही मूर्ती व मुखवटे विक्रीसाठी मंडप घातले आहेत. पापाची तिकटी ते लोणार गल्लीत मंडपाची उभारणी सुरू आहे. या परिसरात सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्ती नेण्यासाठी मोठी गर्दी होते. प्रत्येक दुकानात मांडण्याची सोय असताना दुकानासमोर रस्त्यावर पाच ते सात फूट लांबीचे मंडप उभारले आहेत. मंडप उभारणीसाठी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. उत्सवकाळात होणारी वाहतुकीची कोंडी व गर्दी लक्षात घेता महापालिकेने शिस्त लावण्याची गरज आहे. अतिक्रमण विभागाच्या साठ कर्मचाऱ्यांचे पथक हातावर घडी घालून गप्प बसले आहे. उत्सवकाळात कारवाई करू नका, असे लोकप्रतिनिधींचे आदेश आहेत असे कर्मचारी खासगीत सांगत असले तरी त्याचा फटका भाविक व ग्राहकांना होत आहेत.

कुठे आहे समिती?

वाहतुकीचे मुख्य रस्ते, चौक व फुटपाथवर गणेशोत्सवासाठी मंडप घालू नये, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी करवीर तहसीलदार, महापालिका सहायक आयुक्त व जिल्हा विशेष शाखेच्या पोलिस निरीक्षकांची त्रिसदस्यीय समिती नियुक्ती केली आहे. हायकोर्टाचा आदेश डावलून मंडप उभारले जात असताना कुठे आहे समिती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्पन्नवाढीचा नवा स्रोत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पे अँड पार्किंगच्या वसुलीला खासगी ठेकेदाराकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने महापालिका प्रशासनाने स्वतःची यंत्रणा वापरून सोमवारपासून चार ठिकाणी पे अँड पार्क सुविधा उपलब्ध करणार आहे. महापालिकेचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे प्रशासनाकडून उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात सोमवारपासून (ता.१४) चार ठिकाणी पे अँड पार्किंगची यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

आयुक्त पी. शिव शंकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या संदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. या कामाकरिता एलबीटी आणि घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाणार आहे. महापालिकेतर्फे शहरात १३ पे अँड पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

नऊ ठिकाणी पुढील टप्प्यात नियोजन

रंकाळा पदपथ उद्यान, रंकाळा चौपाटी, रंकाळा टॉवर परिसर, नागोजीराव पाटणकर हायस्कूल जवळ, कपिलतीर्थ मार्केट परिसर, शिवाजी तंत्र निकेतन कॉलेज पूर्व व पश्चिम बाजू, आरटीओ ऑफिससमोरील बाजू, करवीर तहसिलदार कार्यालय परिसर व टेलिफोनमधील रस्ता, हुतात्मा पार्क समोर बहुतांशी दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात लावली जातात. अन्य विभागातील कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी पुढील टप्प्यात पे अँड पार्किंग सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. बिंदू चौक परिसरातील पे अँड पार्किंगच्या करारावरून जून महिन्यात वाद निर्माण झाला होता. खासगी संस्थेला येथील वसुलीचा ठेका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images