Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चित्पावन ब्राह्मणांचा १२५ वर्षाचा इतिहास शब्दबद्ध

$
0
0
चित्पावन ब्राह्मण लोकांनी कोल्हापूरात येऊन कशा पध्‍्दतीने उद्योग करून स्पर्धात्मक युगातही अनेक वर्षे आपला व्यवसाय टिकविला याची माहिती नव्या पिढीला व्हावी यासाठी 'कोल्हापूर चित्पावन कोशा' तयार करण्यात आला आहे.

प्रिंटला इलेक्ट्रॉनिक्सचा धोका नाही

$
0
0
प्रिंट मीडियाला १५० वर्षांची परंपरा आहे. त्याचे स्वत:चे काही संकेत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला संकेत आहेत कुठे? असा सवाल करीत प्रिंट मीडियाला इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा कसलाच धोका नाही. कारण ते आपले स्पर्धक नाहीत.

बचत गट मेळाव्यात 'अनिस' स्टॉल

$
0
0
बचत गटांचे मेळावे आणि यात्रा भरतील त्या ठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मोफत स्टाल देऊन प्रबोधनाचे काम अधिक जोमाने करण्यास प्रोत्साहन देऊ, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

आज ठरवणार टोलविरोधाची रणनीती

$
0
0
टोलविरोधातील आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी टोलविरोधी कृती समितीची सोमवारी (१० जून) ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील व खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे.

परखंदळेत डेंगीसदृश्य तापाची साध

$
0
0
शाहूवाडी तालुक्यातील परखंदळे गावात डेंगीसदृश्य तापाची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली असून सध्या २५ रुग्ण असून त्यापैकी गंभीर चौघाजणांवर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. तिघाजणांवर बांबवडेत तर १८ जणांवर गावात उपचार सुरु आहेत.

मराठा आरक्षणासाठी २६ जुलैला जागर

$
0
0
'मराठा समाजाला आरक्षण देण्यास राज्यकर्ते टाळाटाळ करत आहेत. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या समितीचा अहवाल लवकरच येईल. या अहवालानंतर राज्य सरकारची भूमीका स्पष्ट होईल. मात्र, जोपर्यंत प्रत्यक्ष आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरुच राहील' असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

चोरीचा गुटखा सांगलीत विकला

$
0
0
निपाणी येथून चोरीला गेलेला आतापर्यंतचा गुटखा हा महाराष्ट्रातील कागल, सांगली आणि जत येथे विकला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत आतापर्यंत निपाणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. त्यामुळे गुटखा चोरीच्या मुळापर्यंत पोलिस पोहचले आहेत.

'हम-तुम' करणार सहाजणी कैद

$
0
0
चमकू नका झी टीव्हीवरील हम तुम ह्मा शो चे सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी अभिनेता अभय देओलने स्वीकारल्याचे जाहीर केल्यापासून अतिशय खास संकल्पना असलेल्या या शोबद्दल चर्चा सुरू आहे. छोट्या पडद्यावर प्रथमच भारतीय दर्शक सहा महिलांना त्यांचे खासगी आयुष्य राष्ट्रीय वाहिनीवर उघडपणे जगताना दिसून येणार आहे.

कोल्हापूर- सोलापूर रेल्वेचे वाजले बारा

$
0
0
कोल्हापूर ते सोलापूर एक्सप्रेस रेल्वे येत्या एक जुलैपासून रात्री बारा वाजता सोडण्याचा निर्णय सोलापूर विभागाने घेतला आहे. रात्रीची वेळ प्रवाशांच्या गैरसोयीची असल्याने महाराष्ट्र रेल्वे रोड पॅसेजर असोसिएशने या निर्णयाला विरोध केला आहे.

भटके-विमुक्त साहित्य संमेलनअध्यक्षपदी मोरे

$
0
0
भटके-विमुक्त साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. दादासाहेब मोरे यांनी निवड करण्यात आली. मोरे यांनी भटके-विमुक्तांवर विपुल लेखन केले असून ते सामाजिक परिवर्तनाच्या वाटेवरील अभ्यासू कार्यकर्ते असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक व स्वागताध्यक्ष व्यंकाप्पा भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खराब रस्ते, कच-याचे ढीग, तुंबलेल्या गटारी

$
0
0
फुलेवाडी येथील पहिल्या बस स्टॉपसमोरील कॉलनी रस्त्याची पूर्णपणे चाळण उडाली असून, त्याचे डांबरीकरण केंव्हा होणार, याबाबत येथील नागरिकांना प्रतीक्षा आहे. पहिल्या बस स्टॉपपासून फुलेवाडीत वळल्यानंतर अगदी फुलेवाडी चौकापर्यंतचा हा रस्ता पूर्णपणे उखडला असून, रस्त्यात छोटे-मोठे खड्डे पडले आहेत.

मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई हवी

$
0
0
शहरात अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केलेले असताना बिंदू चौक परिसरात सध्या मोकाट गाई आणि म्हशींचा त्रास होत आहे. महापालिकने ही जनावरे ताब्यात घेऊन त्यांच्या मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.

न्यू कॉलेज रोडवर मैलामिश्रित सांडपाणी

$
0
0
गांधी मैदानकडून न्यू कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजच्या चेंबरमधून मैला ओव्हरफ्लो होत आहे. या रस्त्यावर ही समस्या सातत्याने उद्भवत असल्याने त्याकडे महापालिकेने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

खानविलकर बंगल्यासमोरील डांबरीकरण रखडले

$
0
0
खानविलकर बंगल्यासमोरील रस्त्याचे डांबरीकरण गेले कित्येक महिने रखडले आहे. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने तेथे चिखल होऊन रस्ता निसरडा झाला आहे. तरी महापालिकेने या ठिकाणचे तातडीने डांबरीकरण गरजेचे आहे.

महाराष्ट्र हायस्कूल रस्त्यावर पॅचवर्कची गरज

$
0
0
उभा मारुती चौकातून महाराष्ट्र हायस्कूलकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. येथे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. त्यामुळे येथे किमान पॅचवर्क करणे गरजेचे आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सोलापूर अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेत

$
0
0
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, दुष्काळी सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. आठवडाभरापूर्वी मान्सूनपूर्व पाऊस काही प्रमाणात पडला होता.

गुटखा चोरीप्रकरणी पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त

$
0
0
निपाणी येथील सहारा हॉटेलजवळून पोलिस असल्याचे भासवून आयशर टेम्पोसह लुटलेला पाच लाखांच्या गुटखाप्रकरणी निपाणी पोलिसांनी सोमवारी ४३ हजार रुपये रोकड आणि सात आरोपींसह १५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वाळव्यात पेरण्या खेळंबल्या

$
0
0
वाळवा तालुक्यात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. रविवारी दिवसभर संततधार सुरू होती तर सोमवारी उघडझाप असली तरी दिवसभर पाऊस सुरूच होता. मात्र, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

डोनेशनच्या विरोधात विद्यार्थी सेनेची निदर्शने

$
0
0
शाळा आणि कॉलेजने डोनेशन घेतल्यास संस्था बंद पाडण्याचा इशारा भारतीय विद्यार्थी सेनेने शिक्षण उपसंचालक व्ही. बी. पायमल यांना दिला. काही कॉलेजकडून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे.

KMT कडील भाडेतत्त्वावरील चालकांच्या संपाने ३० बसेस बंद

$
0
0
केएमटीला भाडेतत्वावर सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी पगारवाढीचा प्रस्ताव अमान्य केल्याने भाडेतत्वावरील ३० बसेसच्या ९० चालकांनी सोमवारी दुपारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे केएमटीच्या अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>