Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोलिस निरीक्षकांवर हल्ला

$
0
0

कराड येथे रात्रीची गस्त घालताना जमावाचे कृत्य

म. टा. वृत्तसेवा, कराड

शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील रात्रीची गस्त घालत असताना जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डोळ्याला गंभीर मार लागला आहे. गस्ती पथकातील पोलिस बाजीराव पवार यांनाही जमावाने मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री बाराच्या दरम्यान विद्यानगर येथे घडली. या प्रकरणी सात जणांना अटक केली आहे. त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडीत दिली आहे. संबधित सातही जण मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांच्या दुचाकी गाड्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

सध्या कराड परिसरातील अनेक गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीचा गदारोळ सुरू आहे. त्यातच या निवडणुकीसाठी आज मतदान होत असल्याने येथील शहर व ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्त वाढवून रात्रगस्त वाढविली आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी रात्री बी. आर. पाटील आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत असताना त्यांना येथील विद्यानगर परिसरात बेकायदा जमाव जमल्याची खबर मिळाली. या बाबतची माहिती मिळताच पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पाटील हे आपल्याबरोबर असलेल्या पोलिसांसह जमावाच्या दिशेन निघाले असता, जमाव आक्रमक होत पाटील यांच्यावरच चाल करून आला. त्यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. पण, त्याला न जुमानता त्यांना धक्काबुक्की करत त्यांचा हात धरून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तेथे असलेले पोलिस हवालदार बाजीराव सर्जेराव पवार यांनी हस्तक्षेप करत पाटील यांना सुरक्षितस्थळी नेले. मात्र, या वेळी आक्रमक जमावाने बाजीराव पवार यांनाच मारहाण करून त्यांचा हात मोडण्याचा प्रयत्न केला. या वेळी अन्य पोलिसांनी जमावाला हुसकावून लावल्याने जमाव पांगला.

या प्रकरणी अख्तर बालेखान आत्तार (२३, रा. बनवडी कॉलनी, बनवडी, ता. कराड) याला तत्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आत्तार याच्याकडे चौकशी केली असता, त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे अन्य सहा जणांना अटक केली. या मध्ये रिजा हारूण नाईक (२४, रा. बनवडी, ता. कराड), शहारूख रहिम मुल्ला (२३, रा. बनवडी कॉलनी, बनवडी, ता. कराड), मोहसिन फकीर शेख (२५, रा. उंडाळकर होस्टेलजवळ, सैदापूर, ता. कराड), अभिजित तुकाराम मोरे (२८, रा. बनवडी, ता. कराड), सौरभ सुरेश पाटील (२३, रा. बनवडी कॉलनी, बनवडी, ता. कराड), शिवराज बाबुराव विभुते (२८, रा. बनवडी कॉलनी, बनवडी, ता. कराड) यांचा समावेश आहे. या सात जणांना येथील कोर्टासमोर उभे केले असता त्यांना मंगळवारपर्यंत एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दुहेरी खून प्रकरणाचीही चौकशी करणार

बबलू माने व सलिम शेख या दोन गुंड टोळ्यांच्या टोळीयुद्धातून बबलू माने व सलीम शेख उर्फ सल्या चेप्या याचा हस्तक बाबर खान या दोघांचे गेल्या काही दिवसांपूर्वी येथील भरबाजार पेठेतील भाजी मंडईजवळ खून झाले होते. या दोन्ही खून खटल्यांचा सखोल तपास करण्यात पाटील यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे पाटील यांच्यावर दबाव असतानाही त्यांनी कशाचीही पर्वा न करता दोन्ही बाजूंच्या गुंडांच्या अड्यांवर छापे टाकत बेकायदा घातक शस्त्रे, कागदपत्रे व महत्वाचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या बेधडक कारवाईने अनेक गुंडांचा त्यांच्यावर राग आहे. या रागातून हा हल्ला करण्यात आला काय? याचाही पोलिस तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आगीत ६५ हजारांचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जनावराच्या गोठ्याला आग लागून सुमारे ६५ हजाराचे नुकसान झाले. शुक्रवार पेठ जामदार क्लबसमोर ही घटना घडली. स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखल्याने म्हशी व गाईंचा जीव वाचला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बाळासो पोवार यांचा शंकराचार्य मठाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला राबाडेंच्या शेताजवळ गोठा आहे. या गोठ्याला सातच्या सुमारास आग लागली. ही बातमी समजताच स्थानिक नागरिकांनी तिकडे धाव घेतली. काही जागरुक नागरीकांनी अग्निशामक दलाला वर्दी दिली. दलाल मार्केट, ताराराणी मार्केट, टिंबर मार्केट येथील अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक नागरिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी धाडसाने व प्रसंगावधान राखून सहा म्हशी आणि गाई बाहेर काढल्या. तोपर्यंत आगीचे लोळ उठले. सुमारे एक तासभरानंतर आग विझवण्यात आली. पोवार यांनी गोठ्याच्या मागे पिंजार व गवत अशी वैरण पावसाळ्यासाठी साठा करून ठेवली होती. ही वैरणही आगीत खाक झाल्याची माहिती अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती राष्ट्रवादीकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केले. मार्केट कमिटी निवडणुकीत नव्याने दाखल झालेल्या शिवसेना व मित्रपक्षाचा त्यामुळे पुरता धुव्वा उडाला. विजयी उमेदवार व समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्याची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला.

गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल तालुक्यातील ३७ गावांचा समावेश असलेल्या कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या १८ जागांसाठी निवडणूक झाली. मार्केट कमिटीच्या व्यापारी भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. याआधीच हमाल व तोलारी गटातून बाबुराव चौगुले हे बिनविरोध निवडून आले.

सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे विजयी उमेदवार असे- सेवा संस्था गट: सर्वसाधारण- धनाजी काटे (२६५०), रवींद्र शेंडूरे (२६८५), गोविंद सावंत (२५७३), उदयकुमार देशपांडे(१६२६), जयवंत शिंपी (२७१७), जितेंद्र शिंदे (२७००), मार्तंड जरळी (१६५३), भटकी विमुक्त- चंद्रशेखर पाटील (३०२३), इतर मागास- संभाजी सुतार (२८२३), महिला- चंद्रकला बामुचे (३२१९), सुमन लकडे (३०२७). ग्रामपंचायत गट: सर्वसाधारण- अशोक चराटी (१३८६), सारिका चौगुले (१२८७), आर्थिक दृष्ट्या दुर्बल- दयानंद नाईक (१४२६), अनुसूचित जाती जमाती- किरण कांबळे (१३३२). व्यापारी गट- विश्वनाथ करंबळी (१४७१), नारायण बांदिवडेकर (१४१५). प्रक्रिया गट- नामदेव नार्वेकर (२४६).

१९ जागांपैकी कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था प्रतिनिधी गटातून सर्वसाधारण ७, महिला २, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त गटातून प्रत्येकी १, ग्रामपंचायती गटातून सर्वसाधारण २, अनुसूचित जातीजमाती व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून प्रत्येकी १, व्यापारी व अडत प्रतिनिधी २, हमाल तोलारी १ व कृषी पणन प्रक्रिया संस्था प्रतिनिधी १ असे १९ संचालकांची निवड झाली.

अशोक चराटींचे कौशल्य फळाला

व्यवस्थापनातील अनियमितता तसेच भ्रष्टाचार व बोगस नोकरभरती यामुळे चर्चेत आलेल्या बाजार समितीमध्ये सत्तांतर होईल असा होरा होता. शिवसेनेने याविरोधात रान पेटविले. मात्र, सोसायटी आणि ग्रामपंचायतींवर असलेली पकड हेच राष्ट्रवादीच्या विजयाचे गमक असल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. अशोक चराटी यांची स्वच्छ प्रतिमा आणि व्यस्थापन कौशल्याचा पुन्हा एकदा कस लागला.

सहकारातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना शिवसेनेने दिलेली धडक जनतेचा जनाधार मिळवून गेली. सत्ताधाऱ्यांचा हा नैतिक पराभवच आहे. यापुढील काळातही शेतमालाला योग्य भाव व शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सत्ताधाऱ्यांना भाग पाडू.

- ‍विजय देवणे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची सरकारकडून बोळवण

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

मोर्चा, निवदेने, उपोषण आणि विधानभवनावर धडक देऊनही राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे गुरुवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या पत्रातून स्पष्ट झाले. सोळा महिन्यांचे मानधन थकीत असताना केवळ चारच महिन्यांच्या मानधनाची तरतूद केल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. एक वर्षाचे मानधन अद्यापही थकीत असले, तरी राज्य सरकारने सेविका व मदतनीसांच्या मानधनात अनुक्रमे ९५० व ५०० रुपयांची वाढ करून काही प्रमाणात दिलासा दिला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन देण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला गुरुवारी प्राप्त झाले आहेत.

राज्यातील ९५ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाढ देण्याचा निर्णय २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, मानधनवाढीचा निर्णय घेतल्यापासून कर्मचाऱ्यांना मानधनच मिळालेले नाही. याविरोधात राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर सरकारला दातृत्वाचा पाझर फुटला. मात्र, सोळा महिन्यांचे मानधन थकीत असताना केवळ एप्रिल २०१५ पासून थकीत मानधन देण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

यासाठी सरकारने २२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सरकाने निश्चित केलेल्या रकमेतून केवळ चार महिन्यांचे मानधन मिळणार असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने मार्च २०१४ पासूनच्या मानधनाचा विचार न करता केवळ एप्रिलपासूनचे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वीच्या मानधनाचा नंतर विचार करू, असा पत्रात स्पष्ट उल्लेख असल्याने अंगणवाडी कर्मचारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. थकीत मानधनाबरोबर दिवाळी भाऊबीज भेट देण्याचा प्रश्न प्रलंबित असताना त्याचाही नवीन सूचनेत समावेश असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन भडकण्याची शक्यता आहे.

थकीत मानधन देण्यासाठी दाखवलेली रक्कम फुगीर आहे. केवळ चार महिन्यांचे मानधन देऊन कर्मचाऱ्यांची बोळवण केली आहे. फरकाच्या रकमेसाठी पुन्हा आंदोलन करू.'

-कॉ. अप्पा पाटील, अध्यक्ष, जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दोन ट्रॉमा केअर सेंटर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्ते अपघातातील गंभीर रुग्णांना जीवदान मिळावे यादृष्टीने तातडीची आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्ह्यात दोन ट्रॉमा केअर सेंटर सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ज्या रस्त्यांवर अपघातांची संख्या व त्यातील जखमींची गंभीरता याची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाच्यावतीने आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानंतर त्यातील मोठ्या अपघात होणाऱ्या रस्त्यांना फायदेशीर ठरेल, अशा ठिकाणी ही सेंटर सुरू करण्यासाठी सरकारकडून अर्थसाह्य घेतले जाणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. यावेळी १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी जिल्हा राज्यात प्रथम असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा आरोग्य अभियान समितीची बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. कोल्हापूर-निपाणी, कोल्हापूर-गगनबावडा या मार्गांबरोबर इतर महत्त्वाच्या मार्गांवरील अपघातांची माहिती घेण्यात येणार आहे. याबरोबरच सावित्रीबाई फुले हॉस्पिटलला अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तयार करावा. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात मनोरुग्णांसाठी केंद्र सुरू करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे पाटील यांनी सांगितले. १०८ क्रमांकाच्या सेवेमध्ये ३४ रुग्णवाहिका असून, यामध्ये ८ रुग्णवाहिकांमध्ये व्हेंटीलेटरची सुविधा, तर २६ रुग्णवाहिकांमध्ये बेस्ट लाइफ सपोर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जिल्ह्यात जननी सुरक्षा योजना आणि जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असून, गेल्यावर्षी जननी सुरक्षा योजनेतून ११ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ४३ प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड भारतीय सार्वजनिक आरोग्य मानांकनासाठी झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सूचना यावेळी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलबीटी रद्द; पण किमती ‘जैसे थे’च

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारच्या आदेशानुसार एक ऑगस्टपासून एलबीटी रद्द झाला, पण अजूनही व्यापारी व व्यावसायिक ग्राहकांकडून एलबीटीची आकारणी करत आहेत. परिणामी वस्तूंवरील किमती 'जैसे थे'च आहेत. दुसरीकडे एलबीटीसारखा आर्थिक उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आटल्याने महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर मर्यादा पडल्या आहेत. महापालिका प्रशासनाच्या नजरा राज्य सरकारच्या अनुदानाकडे लागल्या आहेत. एलबीटीच्या माध्यमातून महापालिकेला दरमहा सात कोटींहून अधिक उत्पन्न मिळत होते.

असेसमेंट होणार, वसुली द्यावी लागणार

व्यापाऱ्यांना अभय योजनेत समाविष्ट होण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे. आतापर्यंत शहरातील २१०० हून अधिक व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. अजूनही दहा हजारहून अधिक व्यापारी योजनेपासून दूर आहेत. काही व्यापाऱ्यांनी योजनेत समावेश असताना एक किंवा दोन वर्षीच एलबीटी भरल्याचे चलन कागदपत्रासोबत जोडून योजनेत सहभागी होत आहेत. अशा व्यापाऱ्यांचे महापालिकेकडून असेसमेंट होणार आहे. ज्यांनी २०११ पासून एलबीटी भरला नाहीत, त्यांच्याकडून थकबाकीची रक्कम वसूल केली जाणार असल्याचे महापालिका अ​धिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. १५ ऑगस्टपर्यंत त्यांनी योजनेत सहभाग घेतला नाही, तर त्यांच्याकडून व्याज आणि दंडाची रक्कम वसूल केली जाणार असल्याचे एलबीटी विभागाचे प्रमुख दिलीप कोळी यांनी सांगितले.

किमती 'जैसे थे'च

दहा हजारांहून अधिक वस्तूंवर एलबीटीची आकारणी होते. राज्य सरकारने एलबीटी रद्दचा आदेश काढला, पण अजूनही व्यापारी, विक्रेत्यांकडून ग्राहकांवर एलबीटीची वसुली केली जाते. सध्या कपड्यावर चार टक्के, इलेक्टॉनिक्स वस्तूवर साडेचार टक्के, इलेक्ट्रिकल वस्तूंवर चार टक्के, प्लायवूड, फर्निचर अशा वस्तूवर पाच टक्के, औषधावर अडीच टक्के आणि वाइन्सवर सात टक्के एलबीटीची आकारणी केली जाते. कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत व्यापाऱ्यांकडून ग्राहकांकडून वसूल केली जाणारी एलबीटी रद्द केली नसल्याचे संभाजीनगर परिसरातील ग्राहक सचिन पाटील यांनी सांगितले.

वर्गवारी सुरू

एकीकडे अभय योजना कार्यान्वित असताना दुसरीकडे महापालिकेने २०११ पासूनच्या एलबीटीचे असेसमेंट सुरू केले आहे. याकरिता त्यांनी वार्षिक उलाढालीच्या अनुषंगाने माहिती संकलित केली जात आहे. एलबीटी निरीक्षकांना २५ ते ५० लाख, ५० ते ७० लाख आणि ७५ लाख ते एक कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापारी, उद्योजकांची यादी तयार केली जात आहे.

चार महिन्यांत ३६ कोटींची वसुली

एलबीटीच्या माध्यमातून गेल्या चार महिन्यात ३६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. एप्रिल व मे महिन्यात प्रत्येकी ६ कोटी २९ लाख, जून महिन्यात ५ कोटी ८० लाख आणि जुलै महिन्यात एलबीटी व अभय योजना मिळून १५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

व्यापारी, व्यावसायिकांनी गेल्या महिन्यात वस्तूंची खरेदी केली आहे यासाठी त्यांनी एलबीटी भरलेला आहे. यामुळे जुना स्टॉक संपेपर्यंत त्या वस्तूवरील एलबीटी कायम असणार आहे. ऑगस्टपासून नवीन वस्तू खरेदी-विक्री केल्यास एलबीटीची रक्कम कमी करावी लागणार आहे. दुसरीकडे ५० कोटींपेक्षा अ​धिक उलाढालीवर एलबीटी कायम आहे, यामुळे अशा वस्तूवरील एलबीटी तसाच राहणार आहे.

- सदानंद कोरगावकर, अध्यक्ष, कोल्हापूर व्यापारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘साडेआठ कोटींच्या टीडीआरची मोजणी रद्द’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सानेगुरुजी वसाहत येथील क्रीडांगणासाठी आरक्षित जागेचा बोगस सातबारा जोडून टीडीआर लाटण्यासाठी पुन्हा सादर केलेले मंजूर नकाशा आणि मोजणी प्रक्रिया उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाने रद्द केली आहे. ३००० चौरस फुटांची जागा असताना एक लाख चौरस फुटांचा टीडीआर बळकावण्याचा प्रयत्न फसला. भूमिअभिलेख उपअ​धीक्षक पल्लवी शिरकाळे यांनी मंजूर नकाशे आणि मोजणी रद्द करण्याची कार्यवाही केल्याची माहिती नगरसेवक भूपाल शेटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कुलमुखत्यार धैर्यशील यादव यांनी महापालिकेतील अधिकारी व भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून आठ कोटी ५० लाख रुपयांचा टीडीआर लाटण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी यादव यांना मदत करणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली आहे. तर बोगस मोजणीप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याचेही शेटे यांनी सांगितले. दुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बोगस सर्च रिपोर्ट जोडल्याचा आरोप शेटे यांनी केला.

शेटे म्हणाले, 'धैर्यशील यादव यांच्या नावावर जागा आणि कोणतीही कागदपत्रे नसताना यापूर्वीचे आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी १२ मे २०१३ रोजी जागेची कोणतीही पाहणी न करता टीडीआरसंदर्भातील अर्ज दाखल करून घेतले. महापालिकेचे उपायुक्त विजय खोराटे यांनीही जागेच्या कागदपत्राची पाहणी न करता अॅड. प्रशांत चिटणीस यांच्याकडे टीडीआरची फाइल पाठवून अभिप्राय मागितला. संपूर्ण जागा महापालिकेची जागा असताना अॅड. चिटणीस यांनी या मिळकतीच्या मालकी हक्काबाबत १९८५ ते २०१४ या कालावधीत दिलेला अहवाल बोगस असल्याचा पुनरूच्चार शेटे यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधी चर्चा, मगच आंदोलनाचा निर्णय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांच्यात संयुक्त बैठक घेण्यासाठी खंडपीठ कृती समितीने प्रयत्न सुरू केले आहेत. चर्चेतून प्रश्न सुटला नाही तर सहा जिल्ह्यांतील वकिलांनी पुन्हा उग्र आंदोलन छेडण्याची तयारी दर्शविली आहे.

सर्किट बेंचसाठी २३ ऑगस्ट ही खंडपीठ कृती समितीने डेडलाइन दिली असली तरी चर्चेद्वारे प्रश्न सुटण्यासाठी प्रयत्न कायम ठेवले आहेत. समितीचे निमंत्रक अॅड. राजेंद्र चव्हाण यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री व मुख्य न्यायमूर्तींची संयुक्त बैठक घेण्याबाबत प्रयत्न करावेत, अशी विनंती केली आहे. सध्या अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री व न्यायमूर्तींची भेट होणे अवघड असले तरी पालकमंत्री पाटील यांनी संयुक्त भेटीबाबत प्रयत्न सुरू केले आहेत.

एकीकडे कृती समितीने चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले असले तरी न्यायालय चालढकल करत असल्याची भावना वाढत आहे. रविवारच्या सहा जिल्ह्यांतील बैठकीत वकिलांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. रास्ता रोको, रेल रोको करण्याची सूचना पुढे आली आहे.

२४ तारखेनंतर सर्किट बेंचसाठी आंदोलनाची तयारी खंडपीठ कृती समितीने सुरू केली आहे. त्यानुसार सहा जिल्ह्यांत पुन्हा बैठकींचे आयोजन करण्यात येणार आहे, असे निमंत्रक अॅड राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

अॅड. विवेक घाटगे आत्मदहनास तयार

न्यायमूर्ती शहार सात ऑगस्टला निवृत्त होत आहेत. ते निवृत्त होण्यापूर्वी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. सरकारने ठराव दिला म्हणजे काम झाले असे होत नाही. सर्किट बेंचच्या स्थापनेसाठी आपण आत्मदहन करण्यास तयार आहे, असे असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. विवेक घाटगे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चिंता, आनंदाचा पुन्हा खेळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका निवडणुकीसाठी अनेकांनी जय्यत तयारी केली, पण आरक्षणाने घात झाला. त्याचवेळी मनासारखा प्रभाग व आरक्षणही पडल्याने काहींना आकाश ठेंगणे झाले होते. मात्र, सोमवारची सायंकाळ या दोघांनाही मोठा धक्का देणारी ठरली. आरक्षण सोडत प्रक्रिया पुन्हा घेण्याचा निर्णय शहरात वाऱ्यासारखा पसरताच ज्यांचा आरक्षणाने घात झाला होता, त्यांचे चेहरे फुलून गेले, तर सोडतीपर्यंत मनासारखे झालेल्यांचे चेहरे मात्र पडले.

महापालिका निवडणुकीसाठी अनेकजण वर्षानुवर्षे तयारी करत असतात. एखाद्या निवडणुकीत मनासारखे आरक्षण झाले नाही व घरातील कुणाला उभे करता आले नाही तर पुढील पाच वर्षांनंतरच्या निवडणुकीची प्रतीक्षा करतात. त्यामुळे सोडतीवेळी सर्वांच्याच मनात धाकधूक असते. शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होत असल्याने नेमके काय होणार याबाबत उत्सुकता असते. ३१ जुलैला झालेल्या सोडतीनंतर अनेकांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या, तर अनेकांना त्यांच्या प्रभागात निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. या आनंदात अनेकांनी फटाक्यांची आतषबाजी करण्याबरोबरच भागांमध्ये मिरवणूकही काढल्या होत्या. ज्यांनी ज्या परिसरासाठी तयारी केली होती, ते वेगाने कामाला लागले होते. गणेशोत्सवाच्या काळात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने इच्छुकांनी आतापासूनच भागातील मंडळांना वर्गणी देण्यास सुरुवात केली होती. घरोघरी पोहचण्यासाठी प्रभागाचे क्रमांक व नाव टाकून पत्रके छपाईसाठी दिली होती. अनेकांनी तर नवीन प्रभागात इच्छुक असल्याचे सर्वांना समजावे यासाठी मोठी पोस्टर्सही लावली होती. आरक्षण सोडत परत घेण्याच्या निर्णयाने या साऱ्यांच्या कामावर, पैशावर पाणी फेरले आहे. त्यांची धाकधूक पुन्हा वाढली असून चिंता वाढत आहे.

त्याचवेळी जुन्या आरक्षणामुळे निवडणुकीची संधी हुकलेल्या इच्छुकांमध्ये मात्र पुन्हा जोश निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून विविध माध्यमातून पोहचलेल्या इच्छुकांनी याची खात्री करुन घेण्यासाठी अनेक ठिकाणी फोन केले. त्यांना खात्री झाल्यानंतर अनेकांना हक्काच्या प्रभागात किंवा शेजारच्या प्रभागात पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी निर्माण झाली आहे. आरक्षण पडल्याने काहींनी संपर्काचे थांबवलेले काम तातडीने सुरू केले. काहींनी अन्य कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची का, याचा चालवलेला विचारही थांबवला. आरक्षणामुळे ओबीसी दाखले मिळवण्यासाठी सुरू केलेला खटाटोपही काहींनी थांबवला. ओबीसी, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला ही आरक्षणे आता नवीन प्रक्रियेत बदलू शकतात.

आरक्षणाच्या कचाट्यातून आमचा प्रभाग सुटला होता. तसेच प्रभाग रचनाही व्य​वस्थित झाल्याने निवडणुकीत यश मिळणार होते. मात्र, ही प्रक्रिया रद्द केल्याने नवीन प्रक्रियेत आरक्षणातून प्रभाग वगळला जाईल हे सारे दैवावर आहे. त्यामुळे माझ्या तोंडचा घास काढून घेतल्यासारखी परिस्थिती झाली आहे.'

-ईश्वर परमार, माजी नगरसेवक

विद्यमान सभागृहात ​ज्या प्रभागातून निवडून गेले, तो तसाच राहून शेजारच्या प्रभागातही वेगळे आरक्षण पडल्याने अडचण वाढली होती. त्यामुळे निवडणूक लढवण्यावर मर्यादा आल्या होत्या. पण नवीन आरक्षण प्रक्रिया राबवण्याच्या निर्णयाने आमच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते.

-कादंबरी कवाळे, माजी महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्यजित कदम गेले ताराराणी आघाडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढलेले नगरसेवक सत्यजित कदम यांनी ताराराणी आघाडीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी मदत न केल्याच्या पार्श्वभूमीवर मी काँग्रेस पक्ष सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कदम हे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने नियुक्त केलेल्या समितीचे सदस्य होते.

कदम हे गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर नगरसेवक म्हणून निवडून आले. पाच वर्षे ते कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून विधानसभेची तयारी करत होते. माजी आमदार मालोजीराजे यांनी रिंगणातून माघार घेतल्याने कदम यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत त्यांना चाळीस हजारांहून अधिक मते मिळाली. काही नेत्यांनी मदत न केल्याने आपला पराभव झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. कदम हे महाडिक समर्थक असल्याने ते ताराराणी आघाडीत जाण्याची चिन्हे होती. अखेर ते सोमवारी आघाडीत सहभागी झाले. माजी आमदार सतेज पाटील यांचे विरोधक असल्याने ही भूमिका घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फरशीवाल्या गवंड्यांचा गाव

$
0
0

भगवान शेवडे, शिराळा

पन्हाळा तालुक्यातील मिठारवाडी हा अवघ्या दीडहजार लोकवस्तीचा गाव केवळ फरशी बसवणाऱ्या गवंड्यांचा गाव म्हणून ओळखू लागला आहे. फरशी बसवण्यासाठी केवळ राजस्थानी कारागिरांची मक्तेदारी या गावातील ५० हून अधिक तरुणांनी खोडून काढली आहे.

पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावात आर्थिक उत्पनाची साधने नाहीत. गावच डोंगरमाथ्यावर असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची वानवा असल्यामुळे शेतीला पाणी मिळत नाही. पूर्ण डोंगरावर जमीन असल्यामुळे केवळ पावसाळी पिके घेवून मिळालेल्या कडधान्य हाच उदर निर्वाहासाठीचा काय तो पर्याय होता. मात्र, आता या गावातील प्रत्येकाने आपल्या रोजगाराचे साधन निर्माण केले आहे. केवळ कौशल्याच्या बळावर येथील तरूण फरशी बसवण्यात पारंगत झाला आहे. अखंड गावातील लोक या व्यवसायात आहेत. आता फरशीवाल्या गवंड्यांचा गाव अशी मिठारवाडीची ओळख झाली आहे.

या गावातील तरूण तुटपुंज्या पगारावर काही तरुण कोल्हापूर, वारणानगर याठिकाणी जातही होते. मात्र, त्यात प्रापंचिक खर्चाची कसरत करावी लागत होती.

दरम्यानच्या काळातच गावातील राजाराम बाजीराव जगताप या ४३ वर्षाच्या गृहस्थाने गवंड्याच्या हाताखाली मजूर म्हणून कामला सुरुवात केली. २५ वर्षापुर्वी पन्हाळा तालुक्यातील कोतोली गावच्या उत्तम साळवी या कुंभार समाजातील कारागीराच्या हाताखाली ते काम करू लागले. त्यातून त्यांना केवळ फरशी बसवण्याची कला अवगत विकसित केली.

सध्या बाबुराव तोडकर, राजाराम पाटील, संभाजी तोडकर, संभाजी जगताप, सचिन खुडे, सरदार खुडे, कुमार गोमाटे, प्रकाश भाकरे, हंबीरराव जगताप, भैरीनाथ भाकरे या तरुणांनी आपले स्वतंत्र व्यवसाय सुरु केले आहेत.

मिठारवाडीच्या हाताला मिळाले काम

शेती हा उदरनिर्वाहाचा मुख्य स्रोत असलेल्या मिठारवाडीत फरशी बसविण्याची कला अवगत केली आहे. आज गावातील शिक्ष‌ित, अल्पशिक्ष‌ित ३० ते ४० टक्के तरुण याच व्यवसायात आहेत, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात 'मिठारवाडी' म्हटले की फरशी बसवणाऱ्या मिस्त्रीचे गाव अशी गावाची नवी ओळख या तरुणानी निर्माण केली आहे. कोल्हापूरपर्यंत सायकलचा प्रवास करून तरूणांची काम करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंदगडचे सत्ताकेंद्र उद‍्ध्वस्त

$
0
0

संपत पाटील, चंदगड

तालुक्याची अस्मिता असलेला हलकर्णी (ता. चंदगड) येतील दौलत साखर कारखाना गेले चार हंगाम बंद आहे. अतिशय दुर्गम भागातही साडेतीन दशके अतिशय डौलाने उभे असलेला हा कारखाना आता विक्री करण्याचा निर्णय घेतल्याने तालुक्यातील औद्योगिक पटलावरील महत्त्वाची संस्था इतिहासजमा होणार आहे. जिल्हा बँकेच्या ६१ कोटी रूपयांच्या कर्जासाठी बँकेने कारखाना विक्रीसाठी काढण्याचा संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला आहे. मात्र, 'दौलत'च्या आजच्या स्थितीला कारणीभूत घटकांवर कर्जाची जबाबदारी निश्चित करुन दौलतसोबत त्यांच्याही मालमत्तेचा लिलाव करावा, अशी मागणी सभासद, शेतकरी व उत्पादक आता करत आहेत. तसेच ज्या 'दौलत'वरून चंदगडच्या राजकारणाची सूत्रे हलवली जात होती, त्या कारखान्याची विक्री होणार असल्याने सत्ताकेंद्राला एकप्रकारे उद्ध्वस्त करण्याचा हा डाव असल्याचे बोलले जात आहे.

दौलत सहकारी साखर कारखान्याची स्थापना सन १९७१ मध्ये झाली. सुरुवातीला कारखान्याची सूत्रे तत्कालीन आमदार व्ही. के. चव्हाण-पाटील यांच्याकडे होती. प्रत्यक्षात कारखाना सुरू झाल्यानंतर मात्र नरसिंगराव पाटील यांच्याकडे हा कारखाना आला. प्रारंभी तालुक्यात कारखाना उभा राहिल्याने कारखान्याला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस घालण्यास सुरुवात केली.

चंदगड तालुका हा डोंगराळ असून या ठिकाणी काजू, भात व नाचणीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जात होते. दौलत कारखान्याच्या उभारणीनंतर ५० टक्के जमीन उसाच्या लागवडीखाली आली. लोकांच्या हातात एकदम पैसा येत असल्याने हळू-हळू या पिकाकडे व्यावसायिक दृष्टीकोणातून बघण्यास लोकांनी सुरवात केल्याने परिणामी उसाचे उत्पादन वाढले.

गेल्या ४० वर्षांच्या काळात सर्वांधिक सत्ता माजी आमदार नरसिंग पाटील यांची होती. गेली चार वर्षे दौलत कारखाना बंद अवस्थेत आहे. या काळात गोपाळ पाटील यांची कारखान्यावर सत्ता होती. 'दौलत'च्या जीवावरच आजपर्यंतच्या वेळोवेळी येणाऱ्या विविध प्रकारच्या निवडणुका लढविण्यात आल्या. प्रत्येक वेळी दौलतच्या नावाचा वापर केला गेला. 'दौलत'च्या भल्यासाठी जाणीवपूर्वक कोणीही प्रयत्न केले नाहीत. कारखान्याची गाळप क्षमता चांगली, उसाचा उतारा, साखरेच्या दर्जा, कामगार, व्यवस्थापन उत्तम होते. मात्र केवळ सत्तेची ईर्षा, पार्टिकल बोर्ड प्रकल्पात केलेली गुंतवणूक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका या कारखान्याच्या बळावर लढल्या गेल्या. अनेकदा कारखान्याच्या कामासाठी केलेल्या मुंबई, दिल्ली वाऱ्यामुळे प्रवासाचा अनाठायी खर्च, जेवणाळी आणि सग्यासोऱ्यांची सोय यामुळे हा कारखाना पुरता डबघाईला आला.

तालुक्यात गटातटाचे राजकारण प्रभावी असल्याने आजपर्यंत नेत्यांचा शब्द प्रमाण मानला गेला. आजपर्यंत अनेक निवडणुकीमध्ये 'दौलत'वरुनच सर्व चक्रे फिरली आहेत. 'दौलत'ची विक्री झाल्यास स्थानिक नेते सामान्य माणसाच्या रोषाला कारणीभूत रहाणार आहेत. राजकीय अस्थिरता निर्माण होवून प्रस्तापित नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका निर्माण होईल. त्यामुळे नेतेमंडळींनी हा निर्णय वरवर न घेता निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेता जनतेला विश्वासात घेवून अजूनही पर्याय उभे करणे आवश्यक आहे.

मेहुण्या-पाहुण्यांच्या काळातच डबघाई

दौलत सहकारी साखर कारखान्यावर माजी आमदार नर‌सिंगराव पाटील यांची सर्वाधिक काळ सत्ता होती. त्यावेळी त्यांचे मेहुणे गोपाळ पाटील कारखान्यात एमडी होते. त्यामुळे मेहुणे पाहुणे बोले आणि कारखाना चाले अशी अवस्था बराच काळ होती. या मेहुण्या-पाहुण्यांच्या काळात हा कारखाना पुरता खोलात गेला. नंतर तर नर‌सिंग पाटलांना बाजूला सारून गोपाळ पाटील यांनी कारखाना ताब्यात गेतला. आता नरसिंगराव पाटील शेतकरी मेळावे घेऊन कारखाना वाचविण्याची जी धडपड करत आहेत ते केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी किंवा पापाचे धनी आपण होऊ नये यासाठी करत आहेत, असे म्हणावे लागेल.

३२८ कोटींचे दौलतवर कर्ज

जिल्हा बँक, राष्ट्रीय सहकार विकास निगम, बँक ऑफ इंडिया बेळगांव, केंद्र सरकारचा साखर विकास निधी, सह्याद्री व नवहिंद क्रेडिट सोसायटी, कामगार पतसंस्था, कागगार पगार, सभासदांची देणी, सरकारी व व्यापारी देणी यासह इतर देणी अशी एकूण ३१ मार्च, २०१५ नुसार ३२८ कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा 'दौलत'वर आहे.

३१ जुलैला जिल्हा बँकेमध्ये 'दौलत' संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मी अनुपस्थित होतो. या बैठकीला मी वैयक्तिक कारणामुळे अनुपस्थित रहाणार असल्याचे संचालक मंडळाला लेखी कळविले होते. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतलेला निर्णय मला माहिती नाही. माझ्याविषयी अफवा पसरविल्या जात आहेत.

- नरसिंग पाटील, संचालक, जिल्हा बँक

'दौलत'चा लिलाव होण्यामुळे ज्या सभासदांचे व कामगारांचे नुकसान होणार आहे. त्यांनीच आजच्या स्थितीला जबाबदार घटकांना कारखान्याची सत्ता दिली आहे. कारखान्यामध्ये उधळपट्टी केल्याने कारखान्याची आजची अवस्था आहे. तरीही बँकेने विचार करुन निर्णय घ्यावा.

- भरमू पाटील, माजी राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनोमिलन सेनेच्या पथ्यावर?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कानपिचक्या दिल्यानंतर ​शहरातील शिवसेनेतील दोन्ही गटांचे मनोमिलन झाले. हे मनोमिलन शिवसेनेच्या पथ्यावर पडणार आहे. नेत्यांच्या आदेशानंतर झालेले मनोमिलन कितपत टिकले हे मात्र निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

भाजपने शहराच्या राजकारणात बळकट असलेल्या ताराराणी आघाडी पक्षाबरोबर युती केल्याने शिवसेनेच्या यशाबद्दल शंका उत्पन्न केली जात होती. शिवसेनेतील गटातटाच्या राजकारणामुळे आणि भाजप ताराराणी आघाडीसोबत गेल्याने भाजाप विस्तारेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. शिवसेनेपेक्षा वरचढ असल्याचे दाखवण्याच्या भाजपच्या प्रयत्नामुळे सेनेच्या वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्या. स्वतःच्या घरातील सर्व सदस्यांची तोंडे एका दिशेने करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी कानपिचक्या दिल्या.

रविवारी संपर्कनेते अरूण दुधवडकर यांनी कोल्हापुरात येऊन सर्व गटांसोबत चर्चा करून शिवसेना महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली असे चित्र दर्शविले. मनोमिलनापूर्वी आमदार क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यातून विस्तवही जात नव्हता. दुसरीकडे मंत्रीपदाच्या स्पर्धेत आमदार क्षीरसागर आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्यात शीतयुद्धही सुरू होते. गटातील या राजकारणामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते विभागले गेले होते. मनोमिलन झाल्यामुळे शिवसेना एकसंध निवडणूक लढण्यास सज्ज झाल्याचे चित्र पहायला मिळणार आहे.

त्यामुळे सेनेला ८१ जागांवर निश्चितच उमेदवार मिळतील. सेनेचा एखादा गट ऐन निवडणुकीवेळी अन्य पक्षांत गेला असता तर पक्षाला फटका बसला असता. परस्परांच्या उमेदवारंना पाडण्यासाठी प्रयत्न झाले असते. त्याचा फायदा विरोधी पक्षांना मिळाला असता. या सर्व शक्यता मनोमिलनामुळे कमी झाल्या आहेत. मात्र तिकीट वाटपावेळी कोणत्याही गटावर अन्याय होणार नाही याची काळजी प्रमुखांना घ्यावी लागेल. प्रत्येक गटाची विशिष्ट प्रभागात ताकद असल्याने त्याचा फायदा सेनेला निश्चितच होईल. मात्र महापालिकेत आमदार क्षीरसागर यांचे नेतृत्व गटांना स्वीकारावे लागेल. तर क्षीरसागर यांना सर्वांना एकत्र घेऊन काम करावे लागेल. तरच सेनेला फायदा होऊ शकेल.

प्रत्येक पक्ष, संघटनेत मतभेद असतात. मात्र मतभेद म्हणजे गट-तट नव्हेत. तरीही आम्ही सर्व मतभेदांना तिलांजली देऊन ८१ जागा लढवणार आहोत. फक्त शिवसेनेकडेच ८१ उमेदवारांची यादी तयार आहे. या निवडणुकीत शिवसेना इतिहास घडवेल.

- आमदार राजेश क्षीरसागर

संपर्क नेत्यांच्या आदेशानंतर समन्वय समिती नेमली आहे. या समितीची प्रत्येक आठवड्याला बैठक होईल. आमदार क्षीरसागर यांच्यासह मी, शहरप्रमुख, महिला आघाडीप्रमुख, युवा सेनाप्रमुख यात असतील. आढावा बैठकीचा प्रत्येक अहवाल मुंबईला पाठवला जाईल.

- संजय पवार, जिल्हाप्रमुख

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ताराराणी आघाडी पार्ट टू

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

'निवडून येईल तो आमचा' या सूत्रानुसार ताराराणी आघाडीने महापालिकेवर १५ वर्षे राज्य केले. आमदार महादेवराव महाडिक यांनी त्याचे नेतृत्व केले. त्यानंतरच्या काळात दुसरी पिढी राजकारणात आली. त्यांच्या सोबत माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार मालोजीराजे यांनीही या आघाडीचे नेतृत्व केले. पाच वर्षापूर्वी विसर्जित केलेली ही आघाडी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. आता आघाडीने भाजपच्या हातात हात घातला आहे. ही आघाडी काँग्रेसच्या एका गटाची असल्याने महापालिकेत काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याचा आरोपही सुरू झाला आहे.

महापालिकेच्या स्थापनेनंतर सुरुवातीला माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड व माजी कृषीराज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांची सत्ता होती. निवडून आलेल्या नगरसेवकांना एकत्र करून ते सत्ता स्थापन करत होते. या दोघांत वितुष्ट निर्माण झाल्यानंतर गायकवाड यांनी आमदार महाडिक यांची मदत घेतली. तेव्हापासून महाडिक यांचा महापालिकेत शिरकाव झाला. नंतरची सलग पंधरा वर्षे त्यांनी सत्ता गाजवली. मात्र २००५ च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि माजी आमदार विनय कोरे त्यांच्या एकहाती सत्तेला सुरूंग लावला. त्यांमुळे गेलेली सत्ता परत मिळवण्यासाठी ताराराणी आघाडीने भा​जपबरोबर समझोता केला आहे.

आघाडी महाडिकांचीच, पण ...

सध्या आमदार महाडिक यांचा आघाडीशी काही संबंध नसल्याचा देखावा निर्माण करण्यात आला आहे. मात्र, महाडिक यांच्या तालावर नाचणारे कारभारी ताराराणी आघाडीची सूत्रे हलवत आहेत, त्यांचे एक चिरंजीव स्वरूप आघाडीचे अध्यक्ष आहेत. दुसरे सुपूत्र अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे ही आघाडी आमदार महाडिक यांच्या आशीर्वादानेच पुन्हा सक्रिय झाली हे स्पष्ट आहे. मात्र याबाबत ते नकार देत आहेत. वस्तूतः आमदार महाडिक यांना गोकुळ आणि विधान परिषदेच्या निवडणुकीची काळजी अधिक आहे. त्यापुढे त्यांना अन्य सर्व निवडणुका त्यांच्यासाठी गौण आहेत. त्यामुळे ते अन्य निवडणुकांत फारसे सक्रीय होत नाहीत. आता सतेज पाटील महापालिकेत सक्रिय असल्याने त्यांची ताकद कशी कमी करता येईल यावरच त्यांची भिस्त आहे. त्यांचे विधान परिषदेतील ​भवितव्यही त्यावर अवलंबून आहे. काँग्रेसबरोबरच इतर पक्षांची ताकद आपल्याला मिळावी यासाठीच महडिक यांनी ताराराणी आघाडीला भाजपच्या कळपात सोडले आहे. नव्या आघाडीमुळे भाजप आणि शिवसेनेची युती संपल्यात जमा आहे. फक्त घोषणा व्हायची शिल्लक आहे एवढेच.

कथित विसर्जित आघाडीचे केले पुनरुज्जीवन

'निवडून येईल तो नगरसेवक आमचा' यानुसार नगरसेवकांना एकत्र करत आमदार महादेवराव महाडिक यांनी पी. एन. पाटील व अरुण नरके यांच्या सोबतीने कोल्हापूर महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली. पुढे त्यांनी आघाडीला 'ताराराणी आघाडी' असे नाव दिले; मात्र आघाडीची रितसर नोंदणी केली गेली नाही. त्यानंतरच्या महापालिकेच्या लागोपाठ तीन निवडणुकांत ताराराणी आघाडीचा करिश्मा चालला. या आघाडीच्या नावावर अनेकजण महापौर झाले. अगदी तीन किंवा सहा महिन्यांचा महापौर किंवा अन्य पदांची वाटणी अशी सोयीस्कर पद्धतही महाडिक यांनीच रुढ केली. या आघाडीला एक-दोन वेळा राजर्षी शाहू आघाडीने धक्का देत विरोध केला. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला सुरुंग लागला. २००५ साली महापालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवर व्हावी असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी राज्य स्तरावर ठरवले. याकाळात अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यांच्या आदेशामुळे आमदार महाडिक यांनी ताराराणी आघाडी विसर्जित केली; मात्र पुढे लोकसभा निवडणुकीत महाडिक यांनी अपक्ष उमेदवार, तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांना ताकद दिली. विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांच्या विरोधात धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले. यानंतरच्या काळात महाडिक यांनी पुन्हा ताराराणी आघाडीची स्थापना केली. त्याची रितसर नोंदणी केली. त्याचे अध्यक्षपद धनंजय महाडिक यांच्याकडे दिले गेले; पण राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर धनंजय महाडिकांनी आघाडीचा कागदोपत्री राजीनामा दिला. त्यानंतर आता आमदार महाडिक यांचे पूत्र स्वरूप हे नवे अध्यक्ष म्हणून समोर आले आहेत.

चौघे कट्टर समर्थक कारभारी

ताराराणी आघाडीचा कारभार आता आमदार महाडिक यांचे कट्टर समर्थक हाताळत आहेत. माजी नगरसेवक सुहास लटोरे, सुनील मोदी, माजी महापौर सुनील कदम आणि संजय स्वामी यांनी आघाडीची सूत्रे हातील घेतली आहेत. वस्तूतः प्रत्येक निवडणुकीत हे चौघे महाडिक यांच्या आदेशानुसार सूत्रे हलवितात. चौघांकडे नेटवर्क आहे, वेळही भरपूर आहे. महाडिक आदेश देतील, त्यानुसार कारभार चालतो. आर्थिक बळ महाडिकांचे आणि कारभार चौघांनी करायचा हे नेहमीच चालते. अपवाद फक्त जिल्हा बँकेच्या यंदाच्या निवडणुकीचा. जिल्हा बँकेच्या राजकारणात या कारभाऱ्यांनी महाडिक यांचा आदेश जुमानला नाही. प्रा. जयंत पाटील यांना विजयी करण्याचा आदेश असताना कारभाऱ्यांनी प्रा. जयंत पाटील यांचा पराभव केला. मात्र नंतर प्रा. पाटील यांनी स्वीकृत संचालक म्हणून बँकेत येत याचे उट्टे काढले हा भाग अलहिदा.

ताराराणी आघाडी ५० जागा लढणार

भाजप आणि ताराराणी आघाडी यांच्यात समझोता झाल्यानंतर आता जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे. प्राथमिक चर्चेनुसार ही आघाडी ५० जागा लढणार आहे. उर्वरित ३१ जागा भा​जप लढवणार असून सत्ता आल्यास महापौरपद भाजपला देण्यात येणार आहे. सध्या तरी अनेक आजी व माजी नगरसेवक ताराराणी आघाडीच्या संपर्कात आहेत. महाडिक यांच्याशी एकनिष्ठ असेलेले व त्यांच्या गटात असणारे अनेक उमेदवार यामध्ये आहेत.

महापौरपदाची केली खांडोळी

ताराराणी आघाडीच्या काळात महापौर पदाची खांडोळी करण्याची पद्धत पाडली गेली. एक वर्षाचे महापौरपद असताना वर्षात चार-चार जणांना महापौर करण्याची किमया महाडिक यांनी केली. त्यामुळे ताराराणी आघाडी बरीच बदनाम झाली. मात्र, या आघाडीच्या काळात अनेकांना बिनपैशात पदे मिळाली. पदाधिकारी निवडताना होणाऱ्या सहली बंद झाल्या. भिकशेठ पाटील, आर. के. पोवार, राजू शिंगाडे, प्रल्हाद चव्हाण यांसारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना महापौर होण्याची संधी मिळाली ती ताराराणी आघाडीमुळेच.

बाबू फरासांचा बिन आवाजाचा बॉम्ब

ताराराणी आघाडीला आजवर दणका दिला तो राजर्षी शाहू आघाडीने. महापालिकेच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून १९९६-९७ या काळात ताराराणी आघाडीतील काही नगरसेवक फुटून या नव्या आघाडीत गेले. त्यांनी बिनआवाजाचा बाँब फोडला. त्यातून कांचन कवाळे यांनी मायादेवी भंडारे यांचा पराभव केला. त्यानंतर बाबू फरास यांनी ताराराणी आघाडीचे उमेदवार नंदकुमार वळंजू यांचा पराभव केला. हे दोन धक्के सोडले तर ताराराणी आघाडीने १५ वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवली. विशेष म्हणजे ताराराणी आघाडी सत्तेवर असताना या आघाडीकडे सर्व पदे होती. विरोधी पक्षनेतेपदही याच आघाडीकडे असायचे. त्यासाठी महापालिकेत कागदोपत्री विरोधी आघाडी स्थापन केली जायची.

खराडेंचाही दणका

महापालिकेच्या एका निवडणुकीत ताराराणी आघाडीच्या सई खराडे महापौर झाल्या. नंतर ही आघाडी काँग्रेसचीच असल्याचे जाहीर करत खराडे या काँग्रेसच्या असल्याचे जाहीर करण्यात आले. अडीच वर्षात तीन महिलांना महापौर करण्याचे ठरले होते. त्यावेळच्या निर्णयानुसार नगरसेविका माणिक पाटील व सरिता मोरे यांना ही संधी मिळणार होती. मात्र खराडे यांनी ऐनवेळी जनसुराज्यचा नारळ हाती घेतला. त्यामुळे ताराराणी आघाडी सत्तेतून बाहेर पडली. त्यानंतर ही आघाडी आजवर सत्तेत आलेली नाही.

ताराराणी आघाडीचे आजवरचे महापौर

भिकशेठ पाटील, आर. के. पोवार, पी. टी. पाटील, दिनकर पाटील, रामभाऊ फाळके, राजू शिंगाडे, प्रल्हाद चव्हाण, रघुनाथ बावडेकर, भिमसिंग रजपूत, बंडोपंत नाइकडे, शामराव शिंदे, जयश्री जाधव, शिवाजीराव कदम, सुनील कदम, शिरीष कणेरकर, भिमराव पोवार, दिपक जाधव, दिलीप मगदूम, बाजीराव चव्हाण, मारुतराव कातवरे, नंदकुमार वळंजू, सई खराडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत ७२ टीएमसी पाणीसाठा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

ऐन पावसाळ्याच्या दिवसात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस गायब झाला आहे. तरीही अधूनमधून पडलेल्या हलक्या सरींच्या जोरावर धरणातील पाणीसाठा ७२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरण भरण्यासाठी अजून ३३ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. कोयना धरणामध्ये असलेल्या एकूण ७२ टीएमसी पाणीसाठ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ६५ टीएमसी इतका आहे. धरणातील पाणी उंची २१३२.४ फूट असून, जलपातळी ६५०.६३१ मीटर इतकी आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयना येथे एकूण २०८८ मी. मी., नवजा येथे २२९५ तर महाबळेश्वर येथे २२४५ मी. मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून धरणात सुमारे ५० टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


व्यापाऱ्यांकडून १२५ कोटी वसूल करणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

'एलबीटीपोटी महापालिकेचे केवळ २० कोटी रुपयेच देणे आहे, असा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. पण, व्यापाऱ्यांचा हा दावा सर्वस्वी चुकीचा आहे. त्यांच्याकडून गेल्या दोन वर्षांचा सुमारे १२५ कोटी रुपयांचा कर येणेबाकी आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडून वसुली केली जाईल, असा इशारा महापौर विवेक कांबळे यांनी दिला आहे.

कांबळे म्हणाले, 'गेल्या दोन वर्षांत वसूल केलेला एलबीटी बऱ्याच व्यापाऱ्यांनी महापालिकेकडे जमा केलेला नाही. हा कर व्यापारी काही पदरचा देत नाहीत. ग्राहकांकडून वसूल केलेला एलबीटी कर महापालिकेला द्यायला नको काय? त्यांची चुकवेगिरी महापालिका कदापि सहन करणार नाही. वास्तविक कर चुकवेगिरी हा फौजदारी स्वरुपाचा गुन्हा आहे. तरीही महापालिकेने सबुरीने घेतले. त्यांच्यावर अशी कारवाई केली नाही. राज्य सरकारने एलबीटी संदर्भातील अभय योजनेची मुदत १५ ऑगस्टपर्यंत वाढविली आहे, ती संपल्यावर व्याज-दंडासह एलबीटीची थकबाकी वसूल केली जाईल.'

दरम्यान, सरकारने ५० कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांचा एलबीटी रद्द केला आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न कमालीचे घटणार आहे. सरकारने वेळच्या वेळी अनुदानाची रक्कम दिली तरच महापालिका चालेल अन्यथा महापालिकेचे कामकाज ठप्प होईल, अशी स्थिती आहे. एकूण परिस्थिती चिंताजनक आहे. एलबीटी रद्द झाल्याने ग्राहकांना कमी दरात सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध होतील, असे ग्राहकांना वाटते. तसे घडते का पहायचे आहे,'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गारगोटीत मोटारीच्या धडकेत वृद्धा जागीच ठार

$
0
0

गारगोटी : गारगोटीतील मुख्य रस्त्यावर टाटा इंडिंका गाडीने फरफटत नेल्याने अपघातात वृद्धा जागीच ठार झाली. आंबूबाई एकनाथ चव्हाण (वय ५५ रा. मोरेवाडी) असे तिचे नाव आहे. या अपघाताची नोंद भुदरगड पोलिसांत झाली आहे. त्या रूग्णालयात आजारी असणाऱ्या भावाला भेटण्यास जात होत्या. वाहनचालक नदीम काझी (वय २० रा. सोमवार पेठ, कोल्हापूर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टाटा इंडिका गाडीने आजरा अर्बन बँकेकडे चालत जाणाऱ्या आंबूबाई चव्हाण या वृद्धेस जोराची धडक दिली. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना गाडीने सुमारे ५० फुट फरफटत नेले. त्याचवेळी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या दोघा मोटारसायकलींनाही गाडीने धडक दिली. आंबूबाई एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या भावास भेटून घरी परतत होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयसिंगपुरातून चोरट्यांचा धुमाकूळ

$
0
0

जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील शाहूनगरमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी दमयंती कुगे यांचे एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसुत्र हिसडा मारून लंपास केले. दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तसेच येथील तिसऱ्या गल्लीत सुलभा श्रीनिवास कट्टी या वृद्धेचे सव्वाचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेची नोंद पोलिसांत झाली आहे. त्या सकाळी आंघोळीला गेल्या होत्या. यानंतर चोरट्यांनी मंगळसूत्र, कंठमणी यासह सव्वाचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडी दरवाजाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

बसस्थानकातून दक्षिणेकडे जाणाऱ्या दिंडी दरवाजाचे रुंदीकरणासाठी राज्य परिवहन मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा दिंडी दरवाजा तोडून तेथे रुंदीकरण सुरु झाले आहे. परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्राससंदर्भात ३० जुलै रोजी 'दिंडी दरवाजाचा खोड काढा' या मथळ्याखाली 'मटा'ने बातमी प्रसिद्ध केली होती. या दरवाजाच्या रुंदीकरणाचे काम सुरु होताच नागरिक, रहिवाशी व समाजातील विविध स्थरातून समाधान व्यक्त होत आहे.

बसस्थानकाच्या दक्षिणेतील संपूर्ण भाग हा डॉक्टर्स कॉलनी आहे. बसस्थाकातून डॉक्टर्स कॉलनीकडे जाण्यासाठी एसटी स्टँडच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीमध्ये दीड फुटाचा बोळ वजा रस्ता सुरु होता. डॉक्टर्स कॉलनी परिसरात शहरातील बहुतांश हॉस्पिटल्स, साई मंदिर उद्यान, जागृती हायस्कूल, डॉ. घाळी महाविद्यालय, मुलींचे हायस्कूल, हॉटेल्स, सरकारी कार्यालयांसह उपनगरे आहेत.

या सर्वच ठिकाणी जाण्यासाठी महाविद्यालयीन व शाळकरी मुले, महिला, नोकरवर्ग व शहरातील बहुतांश नागरिक याच दिंडी दरवाजाचा वापर करतात. मात्र दिंडी दरवाजा दीड फुटाचा असल्याकारणाने नागरिकांनी येथून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तसेच या विभागातील हॉस्पिटल्समध्ये तातडीच्या प्रसंगी एखाद्या रुग्णाला नेताना अनेक समस्या निर्माण होतात.

या परिसरात शाळा-महाविद्यालये पाहता येथे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयाच्या वेळेत तर येथे प्रचंड गर्दी अनुभवायला मिळते. अरुंद दरवाजामुळे या परिसरात अनेकदा मुलींची छेडछाड होते. त्यातून भांडणाचे अनेक प्रसंग उद्‍भवले आहेत. त्यामुळे या दरवाजाचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्थाच्या दृष्टीने रुंदीकरण व्हावे असे पत्र महामंडळाला दिले होते. याबाबत आगारप्रमुख सुनील जाधव दिंडी दरवाज्याचे रुंदीकरण करू असे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर या दिंडी दरवाजाचे रुंदीकरणाचे काम सुरु झाले असून परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस पाटील लाच घेताना जाळ्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

जमिनीच्या वादात कारवाई न करण्यासाठी मडिलगे येथील एका शेतकऱ्याकडून सात हजार रूपयांची लाच स्वीकारताना मडिलगे (ता. आजरा) येथील पोलिस पाटील ज्ञानदेव शंकर पाटील याला मंगळवारी लाचलुपचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. आजरा पोलिस ठाण्यातील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक सचिन मिरधे यांनी लाच मागितल्याची तक्रार पांडुरंग कृष्णा घुरे (वय ४१, रा. मडिलगे) यांनी केली होती. मात्र या प्रकरणात आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत मिरधे यांनी हात झटकले.

तक्रारदार घुरे व त्यांचा भाऊ धोंडिबा कृष्णा घुरे यांच्यामध्ये जमिनीच्या कारणावरून वाद आहे. यावरून पांडुरंग घुरे व त्यांच्या पत्नीवर ३० जुलै रोजी आजरा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कारवाई न करण्याच्या कारणाखाली त्यांच्याकडे पोलिस उपनिरिक्षक सचिन मिरधे यांनी सात हजार रूपयांची मागणी केली होती. यानुसार आजऱ्यातील मुख्य मार्गावरच मिरधे यांनी पोलिस पाटील ज्ञानदेव याला पैसे स्वीकारण्यास सांगितले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार लाच स्वीकरताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहात पकडले. पोलिस पाटील ज्ञानदेव यांच्याविरूद्ध आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली..

पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अर्जुन सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक उदय आफळे, पोलीस निरीक्षक सुनील वायदंडे, मनोहर खणगावकर, जितेंद्र शिंदे, मनोज खोत, संदीप पावलेकर व सर्जेराव पाटील यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images