Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘मेरी आवाज सुनो’मध्ये पूजा प्रथम

$
0
0

स्नेहलता सातपुते द्वितीय तर राजवर्धन तगारे तृतीय

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वर सुमिनी मेरी आवाज सुनो गायन वाद्यवृंदातर्फे घेण्यात आलेल्या सीनेगीत गायन (सारेगम) स्पर्धेत पूजा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावत ७ हजार रूपये रोख व ट्रॉफी या बक्षीसावर नाव कोरले. स्नेहलता सातपुते द्वितीय तर राजवर्धन तगारे तृतीय क्रमांकाने विजयी झाले. त्यांना अनुक्रमे रोख पाच हजार व तीन हजार आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे महाराष्ट्र टाइम्स माध्यम प्रायोजक होते. तर आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या सहकार्याने ही स्पर्धा घेण्यात आली. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे २८ व २९ जुलै रोजी दोन दिवस या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

शिवानी काईंगडे हिला चौथ्या क्रमाकांचे बक्षीस देण्यात आले तर ऋचा गावंडे हिला पाचवा क्रमांक पटकावला. निखिल पुराणिक व संग्राम पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. शिवराज पाटील आणि डॉ. विनोदकुमार ठाकूरदेसाई यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. नितीन सोनटक्के, सूरज नाईक, मिलिंद वेदांते, यशपाल देवकुळे, शेखर आयरेकर, अजित कांबळे यांनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टिळक, अण्णाभाऊंना अभिवादन

$
0
0

सुराज्य संस्थेच्यावतीने आयोजित अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोवाडा सादर करताना शाहीर सदाशिव निकम व सहकारी.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंत‌ीनि‌त्त शहरांतील शाळांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. व्याख्यान, प्रतिमापूजन आणि विद्यार्थ्यांचे मनोगत अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले.

राजर्षी शाहू हायस्कूल

मुख्याध्यापक डी.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. किशोरी पाटील आणि साबिया बेळगावकर या वि‌द्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले.

प्रायव्हेट हायस्कूल

बी. एस. जाधव व एम. आर. गोरे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका एस. एस. तारे, पी. के. गुळवणी आदी उपस्थित होते. अवंतिका कवठेकरने सूत्रसंचालन केले. वैष्णवी चौगुले हिने आभार मानले.

स. म. लोहिया हायस्कूल

पी. डी. पाटील यांनी लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्याविषयी विचार मांडले. अभय व्हटकर, दिग्विजय व्हटकर, राजवर्धन व्हटकर, ऋग्वेद आठले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सिद्धेश प्रभू याने सूत्रसंचालन केले.

लोक जनशक्ती पार्टी

उपमहापौर ज्योत्स्ना मेढे-पवार आणि समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड यांच्याहस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सुशीलकुमार कोल्हटकर, अॅड. पंडितराव सडोलीकर आदी उपस्थित होते.

साई हायस्कूल

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री साई हायस्कूलमध्ये डी. एस. पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एच. पाटील होते. सौ. आर. यू. मोटे यांनी प्रास्ताविक केले. व्ही. डी. पवार यांनी आभार मानले.

कोरगावकर हायस्कूल

एस. पी. पाटील यांचे अण्णा भाऊ साठे यांच्यासंबंधी व्याख्यान झाले. विक्रम भोसले, वैभव पोवार, राभिया मुजावर, भाग्यश्री शिंदे यांची भाषणे झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. बी. शिंदे होते.

सुराज्य बहुउद्देशीय संस्था

शाहीर सदाशिव निकम यांच्या शाहिरीचे आयोजन केले. यावेळी अध्यक्ष दिनकर धोंगडे, प्रदीप मंगल, नगरसेवक अनिल आवळे, नगरसेवक अब्राहम आवळे आदी उपस्थित होते.

आरपीआय (आठवले गट)

पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संजय जिरगे, सुखदेव बद्धिहाळकर, गुलाब शिर्आदी उपस्थित होते.

मगदूम हायस्कूल

अध्यक्षस्थानी अध्यापिका आर. डी. माळी होत्या. यावेळी साक्षी सुतार, मयुरी ढोके, श्रद्धा काशीद, वृषाली पाटील, साकर कोकरे आदि विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. वाय. बी. माणगावे यांनी सुत्रसंचालन तर आर. जे. पाटील यांनी आभार मानले.

देशभक्त सामाजिक सेवा संस्था

राजेंद्र नगर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी सीपीआरचे शल्यचिकित्सक शिवाजी साठे, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, डॉ. मुरलीधर भानारकर यांच्या हस्ते मुलांचा गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसहभागातून कायापालट

$
0
0

उदगांव येथे वैकुंठधाम स्मशानभूमी लोकसहभागातून साकारली आहे.

अजय जाधव, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील उदगांव येथे कृष्णा नदीकाठी असणाऱ्या वैकुंठधाम स्मशानभूमीचे रूप लोकसहभागातून पालटले. स्मशानभूमीच्या नुतनीकरणासाठी नागरिक, लोकप्रतिनिधींबरोबरच उद्योजकांचे मदतीचे हात पुढे आले अन् स्मशानभुमी परिसराचा एक वर्षात कायापालट झाला.

उदगांव येथे कोल्हापूर- सांगली मार्गालगत कृष्णा नदी काठी वैकुंठधाम स्मशानभूमीत जयसिंगपूर, उदगांव येथील मृतांवर अनेक वर्षापासून अंत्यसंस्कार करण्यात येतात. १९८० साली येथे अंत्यसंस्कारासाठी शेड बांधण्यात आले. यानंतर गैरसोय ओळखून नागरिकांना बसण्यासाठी शेड तसेच मृतदेह दहनासाठी कठडेही बांधण्यात आले. सन

२००८ साली या स्मशानभूमीचे लोकवर्गणीतून नूतनीकरण करण्यात आले.

या स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी जयसिंगपूर येथील माजी नगरसेवक रमेश इंगळे, सुभाष चौधरी, प्रकाश निटवे, सागर आडगाणे, रूस्तुम मुजावर, धवल देसाई, राजेंद्र पाटील, विनेश खाडे, गुंडू मिणचे, संजय मजलेकर, अॅड. श्रीकांत घोडके, धनंजय आडगाणे, सुरेश चौधरी, जितेंद्र पाटील, सुरेश पाचोरे तसेच अन्य सामाजिक कार्यकर्ते प्रत्येक पंधरा दिवसांनी मोहीम राबवितात. आता या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून तसेच लोकसहभागातून वैकुंठधाम स्मशानभुमीचा कायापालट झाला आहे. स्मशानभुमीच्या नुतनीकरणासाठी मदतीचे आवाहन झाल्यानंतर खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, उद्योगपती संजय घोडावत, शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक, जयसिंगपूर नगरपालिका याचबरोबरच रोटरी क्लबचे सदस्य व नागरिकांनी मदतीचा हात दिला. १०० रुपयांपासून पाच लाखांची देणगी मिळाली अन् तब्बल २५ लाख रुपये खर्चून वैकुंठधाम स्मशाभूमीचे रूप पालटले.

स्मशानभूमीत मृतदेहाचे दहन करण्यासाठी नवे कठडे बांधण्यात आले. नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या शेडचे नुतनीकरणही करण्यात आले. पावसाळ्यात स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणारी लाकडे भिजत होती, यामुळे लाकडे ठेवण्यासाठी नवे शेड बांधण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना आपली वाहने कोल्हापूर सांगली मार्गावर उभी करावी लागत होती, यामुळे स्मशानभूमी परिसरातील खड्ड्यांमध्ये भराव टाकून त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात आले.

अंत्यसंस्कारानंतर कृष्णा नदी पात्रात रक्षाविसर्जन करण्यात येत होते, यामुळे होणारे नदी प्रदूषण टाळण्यासाठी स्मशानभूमीत रक्षाकुंड बांधण्यात आले आहे. येथे विजेची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहेच. परंतु त्याचबरोबर नातेवाईकांना आंघोळ करण्यासाठी शॉवरही बसविण्यात आले आहेत. परिसरात बगिचाही करण्यात आला आहे तसेच वॉचमनची नियुक्तीही करण्यात आली आहे. यामुळे वैकुंठधाम स्मशानभुमीचे रूप पालटले आहे.

स्मशानभुमीत उदगांव, जयसिंगपूर, संभाजीपूर येथील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. आता येथील सुविधा पाहून अंकली, धामणी येथील ग्रामस्थही याठिकाणी अंत्यसंस्कार करीत आहेत.

- रूस्तुम मुजावर,

सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहवाल ऑगस्टअखेर द्या

$
0
0

'आयजीएम'मध‌ील त्रुटींची पूर्तता केल्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील इंदिरा गांधी मेमोरिअल इस्पितळ (आय जी एम) संदर्भात वस्तुस्थितीची चौकशी करून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी अहवालाद्वारे ज्या गंभीर त्रुटी दाखवल्या होत्या त्याची पूर्तता केल्याचा अहवाल या आधीच्या आदेशाप्रमाणे राज्य सरकार, नगर परिषद संचालनालय व इचलकरंजी नगरपरिषद यांनी अंतिमत: ऑगष्टपर्यंत सादर

करावा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरिअल इस्पितळ (आय जी एम) संदर्भात वस्तुस्थितीची चौकशी करून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी अहवालाद्वारे ज्या गंभीर त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटीं संबंधित वरिष्ठ प्राधिकरणानी तत्काळ दूर कराव्यात असे आदेश देऊन सुद्धा अद्याप त्याची पूर्तता झाली नसल्याने इचलकरंजी नगरपरिषद व आय जी एम प्रशासनावर कोर्ट अवमानाची कारवाई करावी या प्रमुख मागणीसाठी उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते उमेश खांडेकर व दत्ता पाटील यांचे वतीने वकील धैर्यशील सुतार यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेची मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

या आधी झालेल्या सुनावणीत इंदिरा गांधी मेमोरिअल इस्पितळ (आय जी एम) संदर्भात वस्तुस्थितीची चौकशी करून जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी अहवालाद्वारे ज्या गंभीर त्रुटी दाखवल्या होत्या त्या त्रुटींबाबत वरिष्ठ प्राधिकरणानी तत्काळ दूर कराव्यात व इचलकरंजी व परिसरातील जनतेला सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची खबरदारी घ्यावी तसेच तत्काळ आवश्यक औषधे उपलब्ध करून द्यावीत असा आदेश मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने दिले होते.

तसेच सार्वजनिक आरोग्य खाते राज्य शासन, संचालक नगर परिषद संचलनालय, इचलकरंजी न पा यांनी या त्रुटी दूर करण्यासंदर्भात तत्काळ पाऊले उचलून त्याची पूर्तता केल्याचा अहवाल मार्चपर्यंत सादर करावा असा आदेशही दिले होते परंतु अद्याप त्याची पूर्तता आठवड्याच्या विहित मुदतीत केली नसल्याचे याचिकाकर्त्यातर्फे वकील वल्लरी जठार यांनी मुख्य न्यायमूर्तींच्या निदर्शनास आणून दिले व संबंधितावर कोर्ट अवमानाची कारवाई करावी अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने वरील आदेश दिले.

मूळ याचिका ही आय जी एम रुग्णालय राज्य शासनाने ताब्यात घ्यावे व उच्च स्तरीय समिती नेमून आय जी एम सक्षमीकरणासाठी कारभाराची चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने त्रुटींची पूर्तता करून अहवाल अंतिमत: ऑगस्टअखेर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूजन, गुरुंना वंदन, धार्मिक कार्यक्रम

$
0
0

शाळा, संस्था, मंदिरांमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूचे स्थान उच्च असते. गुरुपौर्णिमेनिमित्त शाळा, महाविद्यालय, संस्था, मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन केले, तर श्री दत्त मंदिर, साई मंदिर, स्वामी समर्थ मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

विद्यापीठ हायस्कूल

मुख्याध्यापक बी. डी. कुंभार यांच्या हस्ते व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एम. व्ही. कुंभार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या जीवनातील गुरुचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, पर्यवेक्षक के. एम. जबडे, एस. वाय. कुंभार आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

साई हायस्कूल

मान्यवरांच्या हस्ते व्यासांच्या प्रतिमेचे पूजन झाले. कावडे यांनी गुरूंच्या कार्याचा गौरव करून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी गुरुजनांना वंदन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एच. पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक जे. डी. कावडे व संस्थेचे अधीक्षक मदन बोडके उपस्थित होते.

गर्ल्स हायस्कूल

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउसच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये सरस्वतीच्या मूर्तीला हार घालून गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एस. बी. शिंदे होत्या. डॉ. विलास पाटील प्रमुख पाहुणे होते. यू. एम. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गुरुपौर्णिमेविषयी कोमल पाटील, सलोनी वारके, श्वेता पाटील, फिजा चौधरी, ऐश्वर्या सुतार या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले.

तवनाप्पा पाटणे हायस्कूल

गुरुपौर्णिमेनिमित्त मान्यवरांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक विभूते गुरुजी यांच्या प्रतिमेजे पूजन करण्यात आले. यावेळी ऋतुजा चव्हाण, मनाली दिवसे, अथर्व कुलकर्णी, श्रेया माळी या विद्यार्थ्यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एस. ए. पाटील यांनी माहिती दिली. जिमखानाप्रमुख गिरगावकर यांनी गुरूचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एस. बी. सुतार, पर्यवेक्षक बी. बी. पाटील, शिक्षक-शिक्षकेतर उपस्थित होते.

न्यू हायस्कूल, पेटाळा

मुख्याध्यापक एस. पी. कणिरे यांच्या हस्ते व्यासांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक एस. आर. कांबळे उपस्थित होते. श्रेयस ठाकूर याने स्वागत केले. विद्यार्थी प्रथमेश भांदिगरे व पी. बी. परीट यांनी गुरुगीत सादर केले. अथर्व गोडसे, विराज कुलकर्णी, प्रणव वालावलकर या विद्यार्थ्यांनी गुरुचे महत्त्व विशद केले.

श्री दत्ताबाळ विद्यामंदिर

विद्यार्थ्यांनी महर्षी व्यास ते आपला पहिला गुरू आई, गुरुजन यांच्याविषयी आपल्या जीवनातील महत्त्व विशद केले. यावेळी शिक्षक कदम व पाटील यांनी गुरुबद्दल मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या उपाध्यक्ष पल्लवी देसाई, सचिव नीलेश देसाई, मुख्याध्यापिका जयश्री सावंत उपस्थित होते.

सणगर तालीम मंडळ

मंडळाच्यावतीने गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सुप्रिया मेटील, एस. एस. कुलकर्णी यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला पतंजली योगपीठाचे प्रभारी बापू पाडळकर, शेखर खापणे उपस्थित होते. सूर्यकांत गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद पोवार यांनी आभार मानले.

देशभूषण हायस्कूल

शाळेची माजी विद्यार्थिनी मुमताज इनामदार हिच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन भेट देऊन कृतज्ञता व्यक्त केली. ऐश्वर्या पोवार हिने गुरुपौर्णिमेविषयी माहिती सांगितली. सहायक शिक्षक एम. बी. तेरदाळे, मुख्याध्यापक आर. ए. गाट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

ज्ञानगंगा हायस्कूल

मार्केट यार्डमधील सौ. सुनीतादेवी सोनवणे ज्ञानगंगा हायस्कूलमध्ये अनिकेत पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. रूक्साना सय्यद, वैष्णवी कांबळे, कादंबरी खैरमोडे, गौरी सुतार, अंकिता कुंभार, प्रतीक्षा कुंभार या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.

प्रायव्हेट हायस्कूल

विभूते गुरूजी, अ. वि. जोशी, व्यास, सरस्वती यांच्या प्रतिमा पूजनाने प्रायव्हेट हायस्कूलमधील गुरूपौणिमा सोहळ्यास सुरुवात झाली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञावर्धन स्तोत्र सादर केले. आर्या नितीन जोशी, शिक्षिका एस. एस. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक एम. आर. गोरे, जिमखाना प्रमुख ए. व्ही. कुंभार, श्रीमती एस. एस. लुकतुके आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र विद्यालय

कसबा बावडा येथील मनपा महाराष्ट्र विद्यालय क्र.२५ मध्ये मुख्याध्यापिका राजश्री कोळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन आदर व्यक्त केला. यावेळी प्रदीप पाटील, कोळी, थोरवत, शमीम मुजावर आदी उपस्थित होते. शहाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. संतोष कदम सूत्रसंचालन यांनी केले.

मगदूम हायस्कूल

दादासाहेब मगदूम हायस्कूल येथे कार्यक्रम झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. आर. भेंडे होते. समर्थ ओतारी, रोहन मोरे,

स्वप्नील वाघ, गौरी हसबनीस, वृषाली पाटील, वैष्णवी आरगे, ऋतुजा पिसाळ विद्यार्थ्यांनी गुरुविषयी

मनोगतातून आदर व्यक्त केला. एस. एस. कापसे, आर. जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वीरशैव लिंगायत समाज

चित्रदुर्ग मठात झालेल्या गुरूपौ​र्णिमा उत्सवास मठाधीश चंद्रशेखर महास्वामी उपस्थित होते. मानवी जीवनात शांतीसाठी अध्यात्माची जोड देणे आवश्यक असल्याचे मत महास्वामी यांनी व्यक्त केले. यावेळी मनोहर गाडवे यांच्या हस्ती महास्वामींची पाद्यपूजा करण्यात आली. राजू वाली यांनी स्वागत केले. बी. एस. पाटील यांनी आभार मानले.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेचारशे जणांवर पोलिसांकडून गुन्हा

$
0
0

तक्रार करण्यास दोन्ही गटांची उदासीनता

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तासगाव मार्केट कमिटीच्या मतदानाच्या वेळी शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत धुमश्चक्री झाली होती. अनेकांची डोकी फुटली. कोणाचे पाय कामातून गेले. चार चाकीचा चक्काचूर झाला. तरीही या बाबत फिर्याद देण्यासाठी पोलिस ठाण्याकडे रविवारी सायंकाळपर्यंत कोणीही फिरकले नाही. परंतु, हल्लेखोरांच्या हल्ल्यात पोलिस उपाधीक्षकांसह चार पोलिस कर्मचारी जखमी झाल्याने पोलिसांनी स्वतः मात्र दोन्ही बाजूच्या बारा जणांच्या नावांसह साडेचारशे जणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे, संजय पाटील राष्ट्रवादीचे नेते दिनकर पाटील यांचा हल्लेखोरांच्या तावडीतून बचाव करण्यासाठी पुढे धावले असता हल्लेखोरांनी पिंगळे यांच्यावर काठीने हल्ला केला. त्यांच्या उजव्या दंडावर प्रहार केला. दगडफेकीत कार्यकर्त्यांबरोबरच राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकडीतील पोलिस एस. जे. कांबळे, सहायक फौजदार बी. डी. चव्हाण, हवालदार यू. एन. वालावलकर आदी जखमी झाले. हल्लेखोरांनी आमदार सुमन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या मंडपाची नासधूस, खुर्च्यांची मोडतोड केली. जमावाला शांततेचे आवाहन केले जात असतानाही जमावाने तेथील इनोव्हा गाडीची मोडतोड करुन त्यावर पेट्रोल ओतून ती जाळण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य करून जमावाने त्या परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचे कृत्य केले आहे. हे कृत्य बाबासाहेब पाटील, राजू हरी म्हेत्रे, शरद मानकर (तासगाव), अमर भगवान बुधावले (सावळज), संजय पाटील (तुरची), निवास नाना पाटील (बोरगाव), अक्षय पाटील (चिंचणी), विश्वनाथ हिंदुराव जाधव (मांजर्डे) आदींसह चारशे ते साडेचारशे जणांनी हे कृत्य केले आहे.

या फिर्यादीनंतर तासगाव पोलिसांनी बेकायदा जमाव करून सरकारी कामात अडथळा करत, कार्यकर्ते, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना जखमी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हल्लेखोरांबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. स्थानिक आणि परगावच्या हल्लेखोरांपैकी अनेकांची ओळख पटली आहे. त्यापैकी कोणाचीही गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

कृष्णात पिंगळे,

पोलिस उपाधीक्षक

तासगावमधील घटना दुर्दैवी आहे. जनता लोकप्रतिनिधींचे काम बघून मतं देत असते. गुंडगिरी आणि तोडफोडीला जनतेचे कधीच समर्थन मिळत नाही. आर. आर. पाटील यांच्या कुटुंबियांवर हल्ला करण्याचा प्रयत्न गंभीर आहे.

पतंगराव कदम, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हजारोंना मोफत ऑनलाइन रोजगार

$
0
0

तीन आय. टी. इंजिनीअरची सामाजिक बांधिलकी

सचिन यादव, कोल्हापूर



नोकरी देण्याच्या नावाखाली अनेकांना लुबाडण्याच्या घटना आपल्या आजूबाजूला दिसत आहेत. मात्र, बेरोजगार तरुणांना ऑनलाइनच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यासाठी तीन आयटी इंजिनीअरनी एकत्र येत सुरू केलेला उपक्रम आदर्शवत ठरला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांकडून एक पैही न घेता बहुराष्ट्रीय कंपनीत रोजगार मिळवून दिला जात आहे. गेल्या सव्वा वर्षाच्या काळात एक दोन नव्हे, तर तब्बल एक हजार जणांना रोजगार मिळवून देण्याचा हा उपक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याची धडपडच आहे.

तरुणांची विशेषत: ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांची नोकरी मिळविण्यासाठी होत असलेली धावाधाव आणि लुबाडणूक लक्षात घेऊन महेश सावंत, आकाश आहेर आणि विकास शिंदे या तीन तरुणांनी एकत्र येत 'व्हायब्रंट माइंड्स टेक्नॉलॉजी'ची स्थापना केली. महेश सावंत हे मूळचे कोल्हापूरचे असून, पुण्यातील वारजे येथे 'टेक्नॉलॉजी'चे कार्यालय आहे. या कार्याची माहिती मिळाल्यानंतर अन्य सहाजण या कार्यात सहभागी झाले आणि गेल्या सव्वा वर्षांपासून विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचा प्रवास सुरू झाला.

पुणे आणि मुंबईत नोकरीनिमित्त येणाऱ्या इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए, डिप्लोमा आणि बीएस.सी. उत्तीर्ण झालेल्या आणि शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी टेक्नोलॉजीचे पदाधिकारी कार्यरत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील आणि कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे परिसरातील विद्यार्थ्यांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जात आहे. टेक्नोलॉजीकडे सुमारे पाचशे बहुराष्ट्रीय कंपन्यांची कनेक्टिव्हिटी असून, www.vibrantmindstech.com या वेबसाइटवर विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन माहिती गोळा केली जाते. संबंधित विद्यार्थ्यांची शैक्षणिक पात्रता पाहून कंपनीची निवड केली जाते. सव्वा वर्षांच्या

कालावधीत 'व्हायब्रंट माइंड्स टेक्नॉलॉजी'ने एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन रोजगार उपलब्ध करून दिला आहे.



कॅम्पस इंटरव्ह्यूमधून १५ टक्के मुलांना रोजगार मिळतो पण उर्वरितांना नोकरीचा प्रश्न भेडसावत राहतो. त्यातूनच गुणवंत पण नोकरीची गरज असलेल्यांसाठी कंपनीची स्थापना केली.

- महेश सावंत, संस्थापक, व्हायब्रंट माइंड्स टेक्नॉलॉजी



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सौभाग्यवतींसाठी प्रतिष्ठा पणाला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मंगळवार पेठ परिसरातील पाचपैकी सिद्धाळा गार्डन, महालक्ष्मी मंदिर आणि मंगेशकर नगर हे तीन प्रभाग सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाल्याने निवडणुकीसाठी कंबर कसलेल्या उमेदवारांना थांबावे लागणार आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांची कोंडी झाली असून त्यांनी आता कुटुंबींयांतील ​महिला सदस्यांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित कैलासगडची स्वारी मंदिरात 'काँटे की टक्कर' दिसेल.

'कैलासगड'मध्ये मातब्बर

सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित कैलागडची स्वारी मंदिर प्रभागात आजी-माजी नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मंगळवार पेठेतील हा एकच प्रभाग खुला असल्याने साऱ्यांच्या नजरा यावर खिळल्या आहेत. माजी नगरसेवक संभाजी देवणे, विजय सूर्यवंशी, शिवसेनेचे गटनेते संभाजी जाधव, शिक्षण मंडळ सदस्य अशोक पोवार, अभिषेक देवणे, प्रताप जाधव, शेखर जाधव, सागर देवणे, कुणाल शिंदे अशी संख्या आहे. पुढील अडीच वर्षासाठी महापौरपद हे सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे. याचा विचार करून संभाजी देवणे हे पत्नी व विद्यमान नगरसेविका शारदा देवणे यांना उमेदवारी देतील अशीही शक्यता आहे.



सिद्धाळा गार्डनमध्ये चुरस

नगरसेवक सचिन चव्हाण, गेल्या वेळचे प्रतिस्पर्धी उमेदवार मदन चोडणकर, सुनील मोहिते, प्रसाद जाधव, माजी नगरसेवक बाबा पार्टे यांच्या कुटुंबीयांतील महिला या प्रभागातील उमेदवार असण्याची शक्यता आहे. नाथा गोळे तालीम प्रभागातील काही भाग सिद्धाळा गार्डनमध्ये समाविष्ठ झाला आहे. गेल्या वेळेला चोडणकर, मोहिते एकत्र होते. आता त्यांनी कुटुंबींयांतील सदस्यासाठी कोणता पर्याय निवडणार, पार्टे कोणता झेंडा घेणार यावरच लढतीचे चित्र अवलंबून आहे.





मंगेशकर नगरातही धुमशान

मंगेशकरनगर सर्वसाधारण महिलासाठी आरक्षित आहे. या प्रभागात गेल्यावेळी एकमेकाला मदत करणारे आता आमनेसामने असणार आहेत. सध्या या प्रभागाचे प्रतिनिधीत्व संभाजी जाधव करत आहे. गेल्या वेळेला त्यांच्यासोबत रणजित मंडलिक होते. त्यांच्यासह, शेखर जाधव, माजी नगरसेवक माणिक मंडलिक, विजय सुर्यवंशी, दिपक थोरात यांच्या कुटुंबींयांतील महिलांची नावे चर्चेत आहेत.



'महालक्ष्मी मंदिर' पंचरंगी

खरी कॉर्नर, शाहू मैदानातील काही प्रभागाचा नव्याने तयार झालेल्या महालक्ष्मी मंदिर प्रभागात सर्वसाधारण महिला गटासाठी चुरस आहे. नगरसेवक आर. डी. पाटील, आदिल फरास, रणजित परमार आणि माजी नगरसेवक नंदकुमार वळंजू, विजय साळोखे यांच्या कुटुंबीयांतील महिला उमेदवार असतील. सध्याच्या सभागृहात पाटील, फरास, परमार हे वेगवेगळ्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात.



फाळकेंच्या विरोधात कोण ?

शिवाजी उद्यमनगर प्रभाग यंदा ओबीसीसाठी आरक्षित आहे. स्वीकृत नगरसेवक विनायक फाळके या भागातून निवडणूक लढविणार आहेत.त्यांनी तयारी सुरू केली आहे. या प्रभागात फाळके यांच्या विरोधात कोण ? हा औत्सुक्याचा विषय आहे. ​शिवसेनेकडून पद्माकर कापसे यांचे नाव चर्चेत आहे. येत्या काही दिवसात आणखी काही नाव पुढे येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंधरा ऑगस्टला सेनेची पहिली यादी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रस्त्यावरच्या लढाईत शिवसेना कायम अग्रेसर होती. टोल आंदोलनातील शिवसेनेचा धडाक्याने तत्कालीन सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. आता आमचा आवाज महापालिकेत असेल. सेनेची पहिली यादी १५ ऑगस्ट ते २० ऑगस्टच्या दरम्यान जाहीर हाईल' असे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

आमदार क्षीरसागर म्हणाले, 'जनतेच्या प्रश्नांवर शिवसेना आवाज उठवत असल्याने सर्व राजकीय पक्षाऐवजी शिवसेना हा सक्षम पर्याय म्हणून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत. यापूर्वी शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभारावर आवाज उठवला आहे. विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे जनता आम्हाला महापालिकेच्या निवडणुकीत साथ देतील. पाणी, स्ट्रीट लाइट, स्वच्छता या सोयीसुविधाबरोबर अत्याधुनिक सुविधा महापालिकेच्या माध्यमातून देण्यासाठी सेना प्रयत्न करेल. पुढील तीन महिन्यात शिवसेनेचा झंझावात असेल. आमचे जिल्ह्यातील सर्व आमदार महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात असतील. निवडून येण्याची पात्रता असलेल्या शिवसैनिकाला उमेदवारी देण्यात येईल. '



दृष्टिक्षेपात महापालिकेत शिवसेना

१९९० ः रतन मोहिते, उदय साळोखे, संजय पवार, विनायक साळोखे, सुहास लटोरे, प्रकाश कदम, नंदकुमार गजगेश्वर.

१९९५ ः संजय पवार, दत्ता टिपुगडे, अशोक माने, विलास दाभोळकर, पद्मजा वऱ्हाडकर, कल्पना संकपाळ, पूजाश्री साळोखे, आनंदराव खेडकर, विजय पावसकर, प्रकाश चौगुले, हरिदास सोनवणे

२००० ः बाबा पार्टे, नंदकुमार गजगेश्वर, चंद्रशेखर जुगळे, उदय साळोखे, गुलजारबानू नगारजी.

२००५ ः संजय पवार

२०१० ः संभाजी जाधव, राजू हुंबे, अरूणा टिपुगडे, स्मिता माळी, महेश कदम.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिषदेत बाचाबाची, तणाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारत मुक्ती मोर्चाच्या आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय परिषदेच्या प्रवेशद्वारावरच विरोधी कार्यकर्ते आणि आणि संयोजकांत बाचाबाची झाली. विरोधकांनी घोषणाबाजी केल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण बनले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कार्यकर्ते पांगले. बिंदू चौकात आंबेडकरवादी संघटनांच्यावतीने वामन मेश्राम यांचा निषेध करण्यात आला.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आणि त्यांच्या वंशजांच्या बदनामीचे षङ्यंत्र भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम करतात. त्यामुळे रविवारी झालेल्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय परिषदेला विरोध करण्याचा इशारा समता प्रबोधिनीने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आयर्विन मल्टीपर्पज हॉलसमोर मोठा बंदोबस्त ठेवला होता. दुपारी अडीचच्या सुमारास मेश्राम यांचे भाषण सुरू असतानाच एका कार्यकर्त्याने परिषदेत बसण्यासाठी परवानगी मागितली. त्यावेळी बॅच असल्याशिवाय बसता येणार नाही, असे त्या कार्यकर्त्यांला सुनावले. त्यावेळी प्रवेशद्वारासमोर सुमारे आठ ते दहा कार्यकर्ते आणि भारती मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्ती गुरुवारपासून दर्शनासाठी खुली

$
0
0

सराफ संघातर्फे साखर वाटप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीवर गेल्या सात दिवसापासून सुरू असलेली रासायनिक संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाली असून भाविकांना दर्शनासाठी बंद असलेली मूर्ती गुरूवारी (ता.६) दुपारनंतर खुली होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे प्रभारी अध्यक्ष डॉ. अमित सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

केंद्रीय पुरातत्व शाखेच्या औरंगाबाद विभागातील तज्ज्ञ समितीमार्फत मूर्ती संवर्धन प्रक्रिया काळात केलेल्या संवर्धन प्रक्रियेचा सविस्तर अहवाल देवस्थान समितीला देण्यात आला असून त्यापैकी काही अंश श्रीपूजकांना देण्यात येणार असून बाकीचा अहवाल गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही डॉ. सैनी यांनी स्पष्ट केले.

२५ जुलैला रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरूवात झाली. या कालावधीत पहिल्या दोन दिवसात मूर्तीची स्वच्छता करण्यात आली होती. तर दुसऱ्या आर्टिस्ट आणि शिल्पकारांच्या मदतीने प्रक्रियेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला होता. गेल्या तीन दिवसात मूर्तीवर बेहडा, दुर्वा यांचा अर्क आणि बिब्ब्याचे तेल वापरून सेंद्रिय मिश्रणाद्वारे संवर्धनाची प्रक्रिया करण्यात आली. संवर्धनप्रक्रियेपूर्वीच असे ठरले होते की, या संपूर्ण प्रक्रियेतील नोंदी, बारकाव्यांचा तपशील, संवर्धनाआधीच्या मूर्तीची छायाचित्रे आणि संवर्धन प्रक्रियेनंतरच्या मूर्तीची छायाचित्रे, त्यावरील समितीची निदर्शने असा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे.या अहवालामध्ये भविष्यात मूर्तीचे संवर्धन टिकवण्यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे याबाबत समितीने काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यांचाही या अहवालामध्ये समावेश आहे. त्या अटींची प्रत श्रीपूजकांना देण्यात येणार असल्याचेही डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले. यावेळी समितीचे प्रमुख डॉ. एम. आर. सिंग उपस्थित होते.



विष्णू सहस्रनामाचे हवन

गेले पाच दिवस धार्मिक विधी अंतर्गत सुरु असलेल्या चार वेदांच्या नऊ शाखांच्या पारायणाची रविवारी सांगता झाली. रविवारी आचार्यकुंडात श्री लक्ष्मीनारायण हृदय हवन तर गरुड कुंडात विष्णू सहस्त्रनाम हवन करण्यात आले. याचे यजमान श्री व सौ गजानन मुनीश्वर हे होते. तसेच लक्ष्मीसहस्त्र नाम होमाचे यजमान अमृता व आशुतोष ठाणेकर हे होते.

सायंकाळी गरुड मंडपात देवस्थान समितीचे पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी यांच्या कुटुंबातील स्त्रीयाकरवी कुंकुमार्चन करण्यात आले.

सोमवारी (ता.३) नवावरण श्रीविद्या होम व ललितासहस्त्रनाम हवन होणार आहे. मुख्य यज्ञमंडपातील विशेष अनुष्ठानांची सांगता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपी तिढा सुटला

$
0
0

कारखान्यांना ३३७ कोटींचे कर्ज; शेतकऱ्यांना दिलासा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखरेचे भाव सातत्याने कोसळल्याने अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची थकीत एफआरपी देण्यासाठी जिल्ह्यातील तेरा सहकारी व पाच खासगी कारखान्यांना ३३७ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. केंद्र सरकारकडून मिळालेली रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. पाच वर्षाच्या मुदतीवर दिलेले कर्ज कारखान्यांना बिनव्याजी मिळणार असले, तरी कर्जासाठी कारखाना व संचालकांची सामुहिक व वैयक्तिक हमी घेण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्याने सुटकेचा निश्वास

सोडला आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एफआरपीनुसार हंगामाच्या सुरुवातील जिल्ह्यातील कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले अदा केली आहेत. मात्र त्यानंतर साखरेचे दर ढासळत गेल्याने शेतकऱ्यांची बिले थकीत गेली होती. उत्पादकांचा ऊस पुरवठा केल्यानंतर चौदा दिवसांत बिले देणे बंधनकारक असतानाही सर्वच कारखान्यांना बिले देण्यास अपयश आले होते. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कर्ज स्वरुपात पॅकेज देण्याची घोषणा केली होती. मात्र चार महिन्याचा कालवधी होऊनही यामधील रक्कम मिळालेली नव्हती. पॅकेज मिळण्यास दिरंगाई होत असल्याने कारखानदारांनी संघटित होऊन पुढील हंगाम सुरू न करण्याचा इशारा दिला होता. यामुळे एफआरपीचा प्रश्न जटील बनला होता.

शेतकऱ्यांची पीक कर्ज वेळेत परतफेड करण्यास अडचण निर्माण झाल्याने पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले होते. यामुळे सरकार व कारखानदारविरोधात असंतोष वाढत असतानाच केंद्र सरकारने जिल्ह्यातील आठरा कारखान्यांना ३३७ कोटी १६ लाख १६ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्राच्या नियमानुसार आकरा टक्के साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांना प्रतिटन साखरेला २४ हजार रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. त्यावर पहिल्या वर्षाचे दहा टक्के व्याज केंद्र सरकार तर पुढील चार वर्षाचे व्याज अनुदान स्वरुपात राज्य सरकार अदा करणार आहे. मात्र जे कारखाने वेळेत कर्ज भरणार नाहीत, अशा कारखान्याकडून योजनेतून वगळून हप्ते थकल्यापासून व्याजही देण्यात येणार नसल्याचे अधिसुचनेत स्पष्ट केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्किट बेंचसाठी २३ ऑगस्ट डेडलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री व हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांनी २३ ऑगस्टपूर्वी बैठक घेऊन निर्णय घ्यावा, अन्यथा २४ ऑगस्टनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय सहा ​जिल्ह्यांतील वकिलांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुंबई हायकोर्ट कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अॅड राजेंद्र चव्हाण होते. या वेळी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. धैर्यशील पाटील प्रमुख उपस्थित होते.

जिल्हा बार असोसिएशनच्या सभागृहात यासंदर्भात रविवारी बैठक झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील प्रतिनिधी उपस्थित होते. खंडपीठ स्थापनेबाबत होत चाललेल्या दिरंगाईबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. अॅड. धैर्यशील पाटील म्हणाले, 'मुख्यमंत्री व मुख्य न्यायमूर्तींनी खंडपीठ कृती समितीची संयुक्त बैठक घेऊन सर्किट बेंच तातडीने स्थापन करण्यासाठी निर्णय घ्यावा.' याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे अॅड. शिवाजीराव चव्हाण, सांगोल्याचे अॅड संभाजी पिंगळे, विशाल बेले, रवी पाटील, कराडचे शरदचंद्र पाटील, पंढरपूरचे वा. जी. देशमुख, सांगलीचे आर. आर. पाटील, इस्लामपूरचे बी. डी. पाटील, साताऱ्याचे दिलीप पाटील, ए. डी. पाटील, महादेवराव आडगुळे, विवेक घाटगे, शिवाजीराव राणे, अजित मोहिते, माणिक मुळीक, कोमल राणे, राजेंद्र मंडलिक यांनी आपल्या मनोगतात आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना मांडल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्यांची’ही अनोखी फ्रेंडशिप

$
0
0

माजी विद्यार्थी मेळाव्यांतून मिळतोय जुन्या आठवणींना उजाळा विद्यापीठ हायस्कूलच्या १९९० बॅचच्या माजी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन स्नेहमेळावा साजरा केला.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे बालपण शाळेत दडलेले असते. त्याचा प्रत्यय माजी विद्यार्थी मेळाव्यातून अनेक विद्यार्थ्यांना येतो. माजी विद्यार्थी मेळावा अनेक विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजमधील आठवणींना उजाळा देत आहे. वर्षानुवर्षाचा स्नेहबंध, आपुलकी, जिव्हाळा आणि निखळ मैत्रीचा सुगंध माजी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्ताने शाळा आणि कॉलेजमध्ये दरवळत आहे. अगदी ९० वर्षांचे यंग सीनिअर्सही मेळाव्यात उत्साहाने सहभागी होत आहे.

शिक्षकांनी शाळेत केलेली शिक्षा... यशानंतरची शाबासकी...वर्गात मागच्या बाकावर बसून केलेल्या खोड्या.. शाळेशी जडलेले ऋणानुबंध उलडगत आणि शाळेतील संस्कारांच्या बीजांमुळे घडल्याची ग्वाही माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात दिली जात आहे. प्रत्येक शाळा आणि कॉलेजकडे वर्षनिहाय विद्यार्थ्यांची यादी, पत्ते आणि मोबाइल क्रमांक आणि लॅण्डलाइन क्रमांकही आहे. शाळा आणि कॉलेज जीवन संपल्यानंतर प्रत्येक जण नोकरी, व्यवसाय आणि कामानिमित्त विविध संस्थेत कार्यरत असतात. काही राज्यात, परराज्यात तर काही परदेशात नोकरीला आहे. मात्र माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने वर्गातील विद्यार्थ्यांचा भेटण्याचा योग मिळत आहे. शाळा आणि कॉलेजमधून फोन आल्यानंतर लगबगीने माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले जाते.

तत्कालीन काळातील विद्यार्थी, बदलले चेहरे, त्याचा व्यवसाय आणि शाळेच्या काळातील आठवणींना मेळाव्यातून उजाळा दिला जात आहे. सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकांनी खिशातून शिट्टी काढून वाजवताच सर्व माजी विद्यार्थी सभागृहात जमा होतात. आणि शाळा पुन्हा एकदा भरल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आजही ओसंडूनच वाहतो. शहरात अनेक हायस्कूल, कॉलेजचा स्नेहमेळावा भरविला जात आहे. अगदी कुटुंबासह अनेक माजी विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित राहतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचा दणदणीत विजय

$
0
0

१९पैकी १८ जागांवर विजयी ; खासदारांच्या पॅनेलचा धुव्वा विजयी उमेदवारांनी अंजनी येथे जाऊन आर. आर. पाटील यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले.

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १९ पैकी १८ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळवले. प्रतिष्ठा पणाला लावून या निवडणुकीत उतरलेल्या खासदार संजय पाटील यांच्या भारतीय जनता पार्टीच्या पॅनेलचा पराभव झाला. व्यापारी गटातील अवघी एक जागा खासदारांच्या गटाला मिळविता आली. जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत शनिवारी मतदानाच्या दिवशी प्रचंड राडा झाल्याने रविवारी निकालासाठी जिल्ह्याचे कान टवकारले होते.

तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत प्रचारापासून मतदानापर्यंत चुरश निर्माण झाली होती. मतदानादिवशी कोणी दहशत निर्माण केली. जीवावर बेतणारे हल्ले कोणाकडून झाले. हे सर्व कशासाठी केले, याची चर्चा सुरू असतानाच बाजार समितीच्या सभागृहात रविवारी सकाळी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांनी ही प्रक्रिया पार पडली. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर झाले. शनिवारी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी केंद्रातही तणावाचे वातावरण होते. १९ जागांसाठीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक उमेदवार या पूर्वीच बिनविरोध झाला होता. उर्वरीत १८ जागांपैकी व्यापारी गटातील एक जागेवर भाजपला यश मिळाले. तर अन्य सर्व १७ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला. हमाल गटातील राष्ट्रवादीचा उमेदवार तीन मतांनी निवडून आला. तर सोसायटी आणि ग्रामपंचायत गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार दीडशे ते दोनशे मतांच्या फरकाने विजयी झाले. विजयानंतर सर्व उमेदवारांसह कार्यकर्ते सुतगिरणीच्या कार्यस्थळावर जमले. या ठिकाणी आमदार सुमन पाटील यांच्या उपस्थितीत सभा झाली. त्यानंतर सर्वांनी अंजनी येथे जावून आर. आर. पाटील यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले.

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार (कंसात पडलेली मते) पुढीलप्रमाणे, सोसायटी गट : जयसिंग जमदाडे (४८३), सतिश झांबरे (४९१), अविनाश पाटील (५३३), दिनकर पाटील (५०५), साहेबराव पाटील (४९४), नवनाथ मस्के (४७५), संपतराव सूर्यवंशी (४४४), विठ्ठल काशिद (५३७), विवेक शेंडगे (५३६), पुष्पा पाटील (५५०), रंजना पाटील (५४१).

ग्रामपंचायत गट : अजितराव जाधव (३६०), रवींद्र पाटील (३४५), राजाराम पाखरे (३६३), धनाजी पाटील (३६४). हमाल, तोलाई गट : ज्ञानू सोलनकर (२०). व्यापारी गट :

लक्ष्मण पाटील (९४). भाजपचे व्यापारी गटातील विजयी उमेदवार : कुमार शेटे (११४).

कार्यकर्त्यांच्या एकजुटीचा विजय राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत एकजुटीने काम केले. शनिवारी खासदार आणि त्यांच्या गुंडांनी केलेला हल्ला हा लोकशाहीवर केलेला हल्ला होता. मात्र, हुकूमशाही पद्धतीने जनतेत दहशत निर्माण करून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न सुज्ञ मतदारांनी हाणून पाडला.

- सुमन पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साम, दाम, दंड वापरु

$
0
0

महापालिका जिंकण्याचा दुधवडकरांसह सेनानेत्यांचा निर्धार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवसेना शहर विकासाचा अजेंडा घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीत शहरवासियांसमोर जाणार आहे. सर्व म्हणजे ८१ जागा लढवण्यात येणार आहेत. त्याकरिता उमेदवारी देण्यासाठी शिवसैनिक, निवडून येण्याची क्षमता हे निकष डोळ्यासमोर ठेवण्यात येणार आहेत. तसेच प्रचारासाठी व्यापक यंत्रणेचे पाठबळ देण्यात येणार असल्याची पहिल्या टप्प्यातील रणनीती संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी स्पष्ट केली.

भाजपने ताराराणी आघाडीबरोबर युती केल्यानंतर शिवसेनेने जोरदार आघाडी उघडली आहे. भाजपवर सडकून टीकाही केली आहे. प्रभाग सोडत झाल्यानंतर संपर्कप्रमुख दुधवडकर प्रथमच शहरात आले. त्यांनी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. कोल्हापुरात शिवसेनेचा पहिला महापौर करण्यासाठी शिवसैनिक जिवाचे रान करतील, असे त्यांनी सांगितले.

गेल्या निवडणुकीत २२ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी बळ देऊन ते निवडून आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न असतील, असे सांगत दुधवडकर म्हणाले, 'सक्षम उमेदवारांसाठी सर्व्हे केला जात आहे. त्या निकषामध्ये उतरणाऱ्यास उमेदवारी देताना शिवसैनिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यानुसार चाचपणी सुरु आहे. उमेदवारांबरोबरच गेल्या ३० वर्षातील ताराराणी आघाडी, काँग्रेस व राष्ट्रवादीचा काळा व भ्रष्टाचारी कारभार, पदाच्या खांडोळ्या, विकास ठप्प झालेले शहर हे सर्व घेऊन शिवसेना शहरवासियांसमोर जाणार आहे. त्यासाठी प्रचाराची मोठी यंत्रणा राबवण्यात येणार आहे.

मुंबईहून स्थानिक लोकाधिकार समितीची पथके प्रत्येक प्रभागात कार्यरत राहणार आहेत. तसेच उमेदवारांना आर्थिक ताकदही दिली जाणार आहे. आतापासूनच अनेक दिग्गज लोक पक्षाच्या संपर्कात आहेत.



मतभेद नव्हतेच

शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीची कायम चर्चा होत असते. त्यातून गेल्या निवडणुकीत फटका बसल्याचे दिसत होते. यावेळीही तीच चर्चा सुरु असल्याने दुधवडकर यांनी आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना एकत्र घेऊन कोणताही वाद नाही, असे पत्रकार​ परिषदेत सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख पवार व आमदार क्षीरसागर यांनीही आमच्यामध्ये मतभेद नव्हते. आता महानगरपालिका हेच लक्ष्य असेल, असे सांगितले.



लवकरच वेळ येईल

दुधवडकर यांनी शिवसेनेमध्ये सामान्य कार्यकर्त्याला आमदार तसेच विविध पदे मिळतात. वेळ आली की पक्षप्रमुख जाहीर करतील. ती वेळ लवकरच येईल, असे सांगितले. तर क्षीरसागर यांनी आर. डी. पाटील यांनी केलेल्या आरोपांबाबत लवकरच त्यांच्यावर बदनामीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले.







मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेचा स्वबळाचा नारा

$
0
0

भाजपबरोबर युतीला पूर्णविराम, नेत्यांकडून भाजपवर टीकेची झोड

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेची निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी रविवारी येथे स्पष्ट केले. भाजपने स्थानिक ताराराणी आघाडीशी युती तोडावी तरच युती करू, अशी अटही शिवसनेने घातली आहे. 'ज्या काँग्रेसवर टीका करत भाजपने सत्ता मिळवली. आता त्याच काँग्रेसशी संबंधित ताराराणी आघाडीच्या मांडीला मांडी लावून भाजप बसला आहे. शिवसेना तत्त्वाने चालणारा पक्ष असून, महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवेल. सत्ता आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेद अशा सर्व तयारीनिशी शिवसेना मैदानात उतरेल,' असे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले.

निवडणुुकीसाठी शिवसेनेच्या समन्वय समितीची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. तसेच, सोमवारी (१० ऑगस्ट) महानगरपालिकेसमोर प्रचार कार्यालयाचे उदघाटन संपर्कमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर दुधवडकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची, आमदारांची सर्किट हाऊसवर बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

'भाजपने ताराराणी आघाडीशी युती करताना शिवसेनेबरोबर चर्चा केली जाईल असे सांगितले असले, तरी त्यांच्यासोबत शिवसेना नसेल. राज्यात, केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने एखाद्या छोट्याशा आघाडीबरोबर युती करावी हे कोल्हापूरकरांच्यादृष्टीने दुर्देवी आहे. यातून भाजप संधीसाधू आहे हे स्पष्ट होतेे. एका मुलाखतीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला जे सांगितले जाते ते करतो असे सांगितले होते. त्यामुळे या नव्या युतीबाबतही कुणी तर युती करण्यास सांगितले असेलच. त्याचबरोबर आमदार महादेवराव महाडिक यांचाही जीव आता विधानपरिषदेमध्ये अडकला आहे. शिवसेना तत्त्वाने चालणारा पक्ष असल्याने काँग्रेसशी संबंधित असलेल्या या आघाडीबरोबर युती करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी जर काही पर्याय

ठेवला असला तरी भाजप, ताराराणी आघाडीसोबत शिवसेना कदापिही जाणार नाही. ताराराणी आघाडी सोडून भाजप आला तरच सेना हात मिळवण्यास तयार आहे. खासदार राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना, आरपीआय या मित्रपक्षांसोबत युतीचा विचार करू,' असेही दुधवडकर म्हणाले.

शिवसेना तत्त्वाने चालणारा पक्ष असल्याने काँग्रेसशी संबंधित असलेल्या या आघाडीबरोबर युती करण्याचा प्रश्नच नाही. ताराराणी आघाडी सोडून भाजप आला तरच सेना हात मिळवण्यास तयार आहे.

- अरुण दुधवडकर, शिवसेना संपर्कप्रमुख





मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगवा फडकवण्यासाठी पराकाष्ठा

$
0
0

पंधरा ऑगस्टला सेनेची पहिली यादी

सतीश घाटगे, कोल्हापूर



कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या चिन्हावर लढणारे दोन पक्ष म्हणजे शिवसेना आणि भाजप. १९९० पासून झालेल्या पाचही निवडणुकीत शिवसेनेने धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली. मात्र महापालिकेवर भगवा फडकविण्याचे शिवसैनिकांचे स्वप्न प्रत्यक्ष साकारलेले नाही. आगामी निवडणुकीत तर गेल्या सर्व निवडणुकीत सहकारी असलेला भाजपही समवेत नसल्याने महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शिवसेनेला पक्षांतर्गत गटबाजी संपवायची गरज आहे. तूर्त ही गटबाजी थांबविण्यात यश आले असले तरी त्यातून चांगली फलनिष्पत्ती व्हायला हवी आहे. प्रबळ विरोधी पक्षामुळे साम, दाम, दंड, भेद, निती वापरून शिवसेनेला वाटचाल करावी लागणार आहे.

मुंबई व ठाण्यातील राजकारणावर पकड असलेल्या शिवसेनेने १९९०च्या दशकात राज्याच्या सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९८७ मध्ये सेनेने कोल्हापुरात प्रवेश केला. शहराबरोबर ग्रामिण भागात पाय रोवण्यास सुरूवात केली. १९९०च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच्या प्रयत्नात कोल्हापूर शहरातून आमदार दिलीप देसाई आणि शाहूवाडीतून बाबासाहेब पाटील सरुडकर हे शिवसेनेच जिल्ह्यातील पहिले आमदार झाले. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत आमदार देसाई, जिल्हाप्रमुख रामभाऊ फाळके व शहरप्रमुख बाळ घाटगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत सेनेचे आठ नगरसेवक निवडून आले. सध्याचे ताराराणी आघाडीचे कारभारी सुहास लटोरे हे शिवसेनेचे त्या फळीतील नगरसेवक होते. शिवसेनेकडून पहिले विरोधी पक्षनेते म्हणून त्यांना मान मिळाला होता. विद्यमान जिल्हाप्रमुख संजय पवार हेही त्यावेळी पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर पवार यांनी सलग तीन वेळा निवडणूक जिंकून हॅटट्रीक साधली. माजी जिल्हाध्यक्ष विनायक साळोखे हेही शिवसेनेचे तेव्हा नगरसेवक झाले तर त्या निवडणुकीत शहरप्रमुख बाळ घाटगे यांचा पराभव झाला होता.

१९९५ मध्ये महाराष्ट्रात युतीची सत्ता आली. महापालिकेवर भगवा फडकवण्याची शिवसेनेला संधी मिळाली. त्यासाठी शिवसेनेचे आमदार सुरेश साळोखे व तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र कोल्हापूरकरांनी सेनेला नाकारले. त्यावेळी शिवसेनेचे ११ सदस्य नगरसेवक झाले. त्यामुळे शिवसेना विरोधी आघाडीत बसली. १९९९ मध्ये युतीची सत्ता गेली आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची सत्ता राज्यात आली. त्यानंतर एक वर्षाने २००० मध्ये महापालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेची घसरण झाली. त्यात अवघे पाच नगरसेवक निवडून आले.

२००५ च्या निवडणुकीपूर्वी ​शिवसेनेत मोठ्या घडमोडी झाल्या होत्या. अनेक नेते सेनेतून बाहेर गेले. अशा वातावरणात सेनेला निवडणूक लढवताना उमेदवार शोधावे लागले होते. कट्टर शिवसैनिकांनी निवडणूक लढवली, पण यश आले नाही. २००० मध्ये महानगरपालिकच्या राजकारणापासून दूर असलेल्या संजय पवार यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागली. २००५ च्या महानगरपालिकेत शिवसेनेचे एकमेव नगरसेवक म्हणून पवार यांनी विरोधी पक्षाची चोख भूमिका बजावली.

महापालिकेच्या २०१० च्या निवडणुकीपूर्वी २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर हे तिघे आमदार झाले. विधानसभा मतदारसंघ वेगळे असले तरी तिघेही कोल्हापुरात राहतात. मात्र सेनेला गटबाजीचा मोठा फटका बसला. सेनेचे पाच व एक पुरस्कृत नगरसेवक निवडून आला. तीन निवडणुकीत विजय मिळवलेले जिल्हाप्रमुख संजय पवार यांना पराभव पत्करावा लागला. या निवणुकीनंतर शिवसेनेतील गटबाजी वाढतच गेली. आमदार क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख पवार यांच्यात सेना विभागली गेली. रस्त्यांवरील लढाईत वेगवेगळ्या गटाखाली कार्यकर्ते आंदोलांना उतरत होते. सेनेच्या पाचही नगरसेवकांची दोन गटातील राजकारणामुळे फरफट झाली.आगामी महापालिकेच्या निवडणुकीत एकेकाळचा मित्र असलेल्या भाजपाने ताराराणी आघाडीशी युती केली आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सेनेच्या वरिष्ठ पातळीवर दखल घेतली आहे. खुद्द कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या निवणुकीच्या पार्श्वभूमीवर गंभीर दखल घेतली आहे. गटबाजी संपवून सर्वांनी एकत्र यावे, अशा कानपिचक्या दिल्या. संपर्क नेते अरुण दूधवडकर यांनी रविवारी एकत्र बैठक घेतली.

शिवसेना वगळता अन्य सर्व पक्षांकडे निवडणुक यंत्रणा राबवणारी स्वतंत्र यंत्रणा आहे. आज शिवसेनेकडे जोश आहे. निष्ठावंत शिवसैनिकांत उत्साह आहे. लोकसभा असो किंवा विधानसभा निवडणूक. शिवसेनेला शहरात भरभरून मते मिळतात. तिच मते महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याकडे वळवण्यात शिवसेना कमी पडते. हे कसब शिवसेनेला जमायला हवे.



शिवसेनेमुळे फरास महापौर

महापालिकेच्या १९९५ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आले. त्यांना विरोधी आघाडीत बसावे लागले. पण शिवसेनेसह विरोधी आघाडीतील नगरसेवकांनी ताराराणी आघाडीविरोधात मोट बांधली. बिनआवाजाचा बॉम्ब फोडताना सेनेने कांचन कवाळे यांना महापौर केले. त्यानंतर बाबू फरास यांना महापौर करण्यासाठी शिवसेनेने मदत केली. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन आमदार सुरेश साळोखे यांच्याकडून शिवसेनेच्या नगरसेवकांना फरास यांना मतदान करण्याचे आदेश दिले होते. शिवसेनेच्या मतावर बाबू फरास महापौर झाले.



मनं जुळायला हवीत...

लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक. प्रत्येक निवडणुकीपूर्वी मुंबईतून आदेश येतो. यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्व गटाचे नेते एकत्र आले. मात्र त्यांची मने जुळलेली नव्हती. एखाद्याला झुकते माप दिले जाते किंवा आपल्याला डावलले गेले अशी भावना त्यांच्यात निर्माण झालेली आहे. त्यातून परस्परांना धोबीपछाड करण्याचे राजकारण झाल्याची टीका होते. तिकीट वाटपावेळी विरोधकांचे पत्ते कट केले गेल्याचे आरोप केले जातात.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाईच्या मंदिरात महिलांना प्रवेश बंद

$
0
0

अनुराधा कदम, कोल्हापूर

सन २०११ साल...एप्रिल महिन्याचा मध्य...करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिरात एक आंदोलन उभे राहिले. आंदोलकांची मागणी होती, आम्हाला देवीच्या गाभाऱ्यात जाऊ द्या...अंबाबाईच्या गाभाऱ्यात महिलांना असलेल्या प्रवेशबंदी विरोधात महिलांनीच आवाज उठवला होता. भाजपच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्ष नीता केळकर आणि आमदार राम कदम यांनी कार्यकर्त्यांची फौज घेऊन कोल्हापूर गाठले आणि 'दार उघड अंबे दार उघड' असा नारा मंदिरात घुमला. या आंदोलनानंतर महिलांना अंबाबाईच्या गाभाऱ्याचे दरवाजे खुले झाले असले तरी सध्या ही पाऊलवाट थंडावली आहे. पुन्हा एकदा यासाठी चैतन्याची गरज आहे, जेणेकरून अंबाबाईच्या गाभाऱ्यात महिला ताठमानेने आणि सन्मानाने जाऊ शकतील.

आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. मंदिरातील श्रीपूजकांनी नरमाईची भूमिका घेत कदम यांना मोजक्या महिलांना घेऊन या, त्याचबरोबर आपणही सोवळे नेसून गाभाऱ्यात प्रवेश करावा, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत, कदम यांनी सोवळे नेसून महिलांना घेऊन गाभाऱ्यात प्रवेश केला. यावेळी महिलांनी देवीला साडी नेसवून ओटी भरली. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. देशाला पुरोगामी नजर आणि त्यासाठी अनेकदा संघर्षाची ठिणगी उठवणाऱ्या कोल्हापुरात हे घडले. नाशिक, पंढरपूर आदी अनेक ठिकाणी असा इतिहास घडला आहे. अंबाबाई मंदिरात काही महिलांना पूर्वीपासून प्रवेश आहे. यामध्ये छत्रपती राजघराण्यातील महिला थेट देवीच्या गर्भकुडीत जाऊ शकतात, तर श्रीपूजकांच्या घरातील महिलांना उंबऱ्याच्या आत प्रवेश मिळतो. बाहेर थांबावे लागते ते सर्वसामान्य महिलांनाच. यामध्ये एक विषमता होती आणि कोणत्या तरी परंपरेतून ती आली होती. परंपरा तयार करणारी माणसेच असतात. त्याला कधी धर्माचा, कधी देवाचा, तर कधी अन्य कोणत्या तरी गोष्टीचा आधार घेऊन परंपरा बनवल्या जातात. परंपरा पाळणारे मन जसे तयार होते, तसे कालौघात त्याला धक्का देणारी मानसिकता तयार होते. कोल्हापुरात अशी धक्का देणारी अनेक मने यापूर्वी तयार झाली होती.

महिला पौरोहित्य

वेदकाळापासून महिला या पौरोहित्य करीत होत्या, असे दिसून येते व नंतर ती पुरुषांची मक्तेदारी झाली. आजही कित्येक महिला वैदिक विधीचे प्रशिक्षण घेऊन धार्मिक विधी व कर्म अशी कामे व्यवस्थित पार पाडत आहेत. मग जर पौरोहित्य करण्यासाठी महिला चालते, तर ती देवीच्या गाभाऱ्यात का जाऊ शकत नाही, हा प्रश्न कोल्हापुरात अंबाबाईच्या दारात विचारण्यात आला होता. महिलांच्या शारीरिक अडचणीचेच कारण पुढे करायचे असेल तर तो निषिद्ध काळ वगळून तरी महिलांना कुठे मंदिर गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो, हा प्रश्नही अनुत्तरीत राहतो. त्यामुळे समाजाच्या मानसिकतेचीच मशागत गरजेची आहे.

पुजाऱ्यांचा प्रताप

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा अंबाबाई मंदिराची स्वच्छता मोहीम सुरू होते, तेव्हा एक धक्कादायक चित्र नेहमी उघड होते. देवीच्या गर्भकुडीतील पाण्याचा निचरा होण्यासाठी जी वाट आहे, जी मंदिराच्या मागे बाहेर पडते, त्यामधून दरवर्षी मंदिर स्वच्छतेवेळी गुटखा, तंबाखूच्या पुड्या वाहत बाहेर पडतात. गाभाऱ्यात देवीच्या सेवेला असलेल्या पुजाऱ्यांचाच हा प्रताप आहे, हे याठिकाणी वेगळे सांगायची गरज नाही. पण स्त्रीच्या मासिक पाळीचे कारण देत सात्विकतेचा मुद्दा उगाळणाऱ्या पुरुषी डोळ्यांना श्रीपूजकांच्या तथाकथित सात्विकतेचा मुखवटा का दिसत नाही, हा प्रश्नही मंदिरात महिला भाविकांना असलेल्या प्रवेशबंदीच्या आंदोलनावेळी आवर्जून उपस्थित करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनासाठी दहा कोटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच पर्यटकांना सुविधा व त्यांची सुरक्षितता यावर पर्यटन विकास कार्यक्रमांवर देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्याला दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी पत्रकारांना दिली.

जिल्ह्यातील पर्यटन विकास कार्यक्रमाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष या नात्याने मंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेतली. या वेळी खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त अजिज कारचे, जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील फुलारी, पुणे विभागाचे उपायुक्त (नियोजन) विजय आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, 'जिल्ह्याच्या पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत १० कोटी निधी उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये तालुकास्तरीय पर्यटनस्थळांच्या विकासांतर्गत वेगवेगळी कामे व त्यांचे अंदाजपत्रक यांचा आराखडा करून पर्यटन विभागाला सादर करण्यात येणार आहे. त्यामध्ये पर्यटनस्थळांच्या विकासामध्ये रस्ते, पार्किंग, पर्यावरणपूरक वाहनांतून सफारी यासह अन्य सुविधा देण्यावर भर असेल. तसेच, त्यांची माहिती होण्यासाठी जागोजागी दिशादर्शक फलक बसवण्याचे प्रस्तावित आहे. त्याशिवाय गर्दीच्या तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांची सुरक्षितता राहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पर्यायी वीज व्यवस्था यासाठी १० टक्के निधी राखीव ठेवण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये दोन ते तीन दिवसांचे पॅकेज देऊन पर्यटन विकास करण्याचा विचार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images