Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चुरशीने ८५ टक्के मतदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील ३७० ग्रामपंचायतींसाठी प्रचंड चुरशीने व ईर्ष्येने शनिवारी सरासरी ८५.१८ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात शांततेने मतदान झाले असले तरी अनेक गावांमध्ये तणावपूर्ण वातावरण होते. सोमवारी (ता. २७) तालुक्याच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता मतमोजणी होणार आहे. दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.

ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. मतदानासाठी येण्यासाठी अनेक उमेदवारांनी नोकरी व व्यवसायानिमित्त ठिकठिकाणी गेलेल्या मतदारांपर्यंत पोहोचून आवाहन केले होते. अनेक ठिकाणी दोन, तीन असे पॅनेल असल्याने मोठी रंगत होती. त्यामुळे जिल्ह्यातील ४७ गावांना संवेदनशील म्हणून जाहीर केले होते. शनिवारी सकाळपासून मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांनी अनेक ठिकाणी वाहनांची व्यवस्था केली होती. प्रत्येक केंद्रावर मतदारांबरोबर कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी होती. त्यामुळे दिवसभरात अनेक ठिकाणी किरकोळ वादावादीचे प्रकार झाले. काही ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करून जमावाला पांगवावे लागले. जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुकीत ८५.१८ टक्के मतदान झाले. त्यामध्ये सर्वाधिक टक्केवारी गगनबावडा तालुक्याची असून, तिथे ९१.२० टक्के मतदान झाले. त्यानंतर संवेदनशील असलेल्या कागलमध्ये ९०.०१ टक्के मतदान झाले आहे. सर्वांत कमी मतदान गडहिंग्लज तालुक्यात ८०.६४ टक्के झाले आहे.

शाहूवाडी चुरशीने ८५ टक्के मतदान

शाहूवाडी तालुक्यातील २८ ग्रामपंचायती आणि एका ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी चुरशीने ८५ टक्के मतदान झाले. साळशीतील पोटनिवडणुकीसाठी ९३८ मतदारांपैकी ७९८ जणांनी चुरशीने मतदान झाले. त्यामध्ये ३६१ जणांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. सोंडोली, वाडीचरण, उकोली व शिरगाव येथील किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडले. जांबूर-मालगाव येथील मशिनमध्ये किरकोळ दोष आढळल्याने दुपारी तीन वाजता हे यंत्र बदलून मतदान प्रक्रिया तक्रारीविना पार पडली. साळशीत एका जागेसाठी पोटनिवडणुकीत चुरशीने मतदान झाले.

सर्वाधिक ९१.२० टक्के मतदान कुरणीत

कागलः तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींसाठी किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. चौथ्या टप्प्याअखेर ८२.७० टक्के मतदान झाले. चौथ्या टप्प्याअखेर तालुक्यात सर्वाधिक मतदान कुरणी येथे ९१.२० टक्के झाले. ४६ ग्रामपंचायतींच्या ४६७ जागांसाठी ११४६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. आमदार हसन मुश्रीफ यांनी यांनी लिंगनूर दुमाला केंद्रावर सकाळी पावणे सहाच्या सुमारास मतदान केले. सकाळी दहानंतरच मतदान केंद्रावर गर्दी वाढू लागली.

निवडणुकीत सकाळी पहिल्या टप्प्यात २१.६२ टक्के, दुसऱ्या टप्प्यात ४६.६० टक्के, तिसऱ्या टप्प्यात ६८.३८ टक्के, चौथ्या टप्प्यात ८२.७० टक्के मतदान झाले. एकूण २११ केंद्रावर मतदान घेण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात कुरणीत ९१.२० टक्के, केनवडे ९०.८२ टक्के, पिंपळगाव बुद्रुक ९०.२२ टक्के, शिंदेवाडी ८९.६८ टक्के, बेलवळे खुर्द ८९.६४ टक्के मतदान झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मारामारीप्रकरणी तिघांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा स्टँड परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या वादावादीमध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पानपट्टी विक्रेत्यास तिघांनी लाथाबुक्क्यासह काठीने मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी अवधूत अशोक दळवी (वय २४ रा. हुजुर गल्ली), युनूस हसन मुजावर (वय २६ रा. गंजीगल्ली), शुभम अशोक सूर्यवंशी (वय १९ रा. ताराबाई पार्क) यांना अटक केली.

जखमी अभिजीत सुभाष पाटील (वय २३ रा. मंगळवार पेठ) हे पानपट्टी साठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानात वसुलीचे काम करतात. शुक्रवारी रात्री रंकाळा स्टँड परिसरातील एका पानपट्टीमध्ये वसुलीसाठी गेले होते. यावेळी अवधूत, युनूस व शुभम यांच्यात वादावादी सुरु होती. वादावादीचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या अभिजीतला या तिघांनी लाथाबुक्या व काठीने मारहाण केली. यामध्ये अभिजीतच्या डोक्याला गंभीर दुखापत असून त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहेत.

बनावट मद्याची वाहतूक करणारे ताब्यात

कोल्हापूरः बनावट विदेशी मद्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी जुना पुणे - बंगळूर महामार्गावर कणेरीवाडीनजीक अटक केली. त्यांच्याडून एक लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. स्वप्नील नंदकुमार साळुंखे (वय २५ रा. नरसिंगपूर ता. वाळवा. जि. सांगली), ओंकार गोरखनाथ कराळे (वय १९ रा. सडोली खालसा, ता. करवीर) यांना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपायुक्त संगीता दरेकर, राजेश कावळे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर. एल. खोत, संजय बरगे, मिलींद गरुड, एस. आय. पाटील, सुहास शिरतोडे, पंकज खानविलकर यांनी ही कारवाई केली.

जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू

कोल्हापूरः कळंबा कारागृहामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सुभाष कृष्णात खोत (वय ६५) या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जागेच्या वादातून खोत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये खोत याला न्यायाधिशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा परिसरात फुलणार वनराई

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

विद्यार्थ्यांमध्ये वनसंवर्धनाबाबत जागृती व्हावी आणि पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने जिल्ह्यातील सुमारे ६०० शाळांमध्ये एकाचवेळी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून ध्वजारोहणानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रत्येक शाळेत २० याप्रमाणे विविध वृक्षसंपदेचे रोपण करण्यात येणार आहे. शाळा निवडीचे अधिकार प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना दिले असून त्यांच्याकडून सरकारी शाळांची यादी नुकतीच वनीकरण कार्यालयाकडे सादर केली आहे. वन मंत्राल्याच्या महत्त्वाकांक्षी 'हरित महाराष्ट्र' योजनेमुळे शाळांचा परिसर वनराईने फुलून जाणार आहे. सामाजिक वनीकरण तीन रुपये या दराप्रमाणे थेट शाळेत रोपांचा पुरवठा करणार आहे.

पाच जून ते ३१ ऑगस्ट हा कालावधी वनमहोत्सव साजरा केला जातो. या कालावधीत जास्तीत-जास्त वृक्षांची लागवड करण्यासाठी सवलतीच्या दराने रोपांचा पुरवठा केला जात आहे. हा योग साधून वन व महसूल खात्यांच्यावतीने शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी 'हरित महाराष्ट्र' योजना हाती घेतली आहे. योजनेतंर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील बारा तालुक्यातील शाळा निवडीचे अधिकार प्रत्येक तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. तालुक्यातील ५० शाळांमध्ये विविध प्रजातींच्या २० रोपे याप्रमाणे जिल्ह्यातील ६०० शाळांमध्ये एक हजार २०० रोपांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट एकाचवेळी वृक्षारोपण होणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाने रोपवाटिकेमध्ये रोपांची पैदास केली आहे. तालुक्याच्या ठिकाणाहून मागणीनुसार रोप सामाजिक वनीकरण कार्यालय शाळांमध्ये पोहोच करणार आहे. २० पेक्षा जास्त रोपांची आवश्यकता भासल्यास शाळांना सरकारी दराप्रमाणे वृक्षारोपणानंतर राष्ट्रीय हरित सेनेच्या धर्तीवर प्रत्येक शाळेत दहा विद्यार्थ्यांच्या पर्यावरण रक्षक सेना तयार करुन एका विद्यार्थ्याची गटप्रमुख म्हणून निवड केली जाणार आहे. रक्षक सेनेवर नागरिकांमध्ये वन, वन्यप्राणी, जैवविविधता, पर्यावरण संदर्भातील संरक्षण, संवर्धन आणि विकास याबाबत जनजागृतीची जबाबदारीही देण्यात येणार आहे.

या प्रजातींची होणार लागवण

आंबा, चिंच, आवळा, कवठ, काजू, फणस, बदाम. सावली देणाऱ्या वृक्षांमध्ये वड, पिंपळ, पळस, कॅशिया, रेनट्री, लिंब तर गुलमोहर, चाफा, जारुळ या फुलांच्या प्रजातीबरोबरच स्थानिक हवामानुसार विविध रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना वनसंवर्धनाचे महत्त्व कळावे, वनसंपदा टिकावी आणि पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी शाळा हरित करण्यात येणार आहेत. शाळा परिसरातील वृक्षारोपणानंतर मूल्याकंन करुन त्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे.

- ए. टी. थोरात, उपसंचालक, सामाजिक वनीकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाक विभाग ऐकणार ग्राहकांच्या सूचना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावडा रोडवरील प्रधान डाकघरात विशेष आर. टी. ओ. टपाल वितरण कक्ष उघडण्यात आला आहे. ग्राहकांना येत्या पंधरा दिवसाच्या कालावधीत या कक्षातून सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत टपाल वितरण केले जाईल. तसेच ग्राहकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी ९४२३८७४४८८ या मोबाइल क्रमाकांची व्यवस्था केली असल्याची माहिती प्रवर अधीक्षक रमेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी रमेश पाटील म्हणाले, 'डाक विभागातर्फे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आर. सी बुक वितरित केली जातात. या वितरण व्यवस्थेत आर.टी ओ कडे परत जाणाऱ्या स्पीड पोस्टाचे प्रमाण दोन टक्क्यापेक्षा कमी आहे. हे प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्यासाठी प्रधान डाकघर येथे विशेष आर. टी. ओ टपाल वितरण कक्ष उघडला आहे. या कक्षात ज्या ग्राहकांचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि आर. सी बुक दिलेल्या पत्यावर येऊन परत गेले आहेत . ती पंधरा दिवसांकरिता प्रधान डाकघर येथील कक्षातून दिली जाणार आहेत. त्यानंतर ती प्रादेशिक परिवहन विभागाकडे परत पाठविली जाणार आहेत. या कालावधीत ग्राहकांनी ओळखपत्र दाखवून संबधित कागदपत्रे टपाल वितरण कक्षातून दिली जातील.'

ते पुढे म्हणाले,' ग्राहकांच्या अडचणी, सूचना जाणून घेण्यासाठी मोबाइल क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. ग्राहकांनी या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत मिस कॉल दिल्यानंतर डाक विभागातर्फे संपर्क साधला जाणार आहे.' प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्या हस्ते या कक्षाचे उदघाटन झाले. यावेळी मोटार वाहन निरीक्षक पी. डी. सावंत, सहअधीक्षक संजय देसाई, प्रधान डाकपाल एस. ई. रेळेकर आदी उपस्थित होते.

उद्योजकांच्या सोयीसाठी...

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत टपाल जमा करण्यासाठी नवीन टपाल वाहतूक रिक्षा सुरु करण्यात आली आहे. या वसाहतीत उद्योजकांच्या सोयीसाठी कार्यालयापर्यंत जाऊन टपाल गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. प्रायोगिक तत्वावर कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत पोस्ट ऑफिसची कार्यालयीन वेळ दुपारी १२ ते रात्री ८ अशी राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवार हल्लाप्रकरणी आरोपीला अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तलवार हल्ल्यातील प्रमुख आरोपी सूरज हणमंत साखरे (वय २६ रा. लक्षतीर्थ वसाहत सुतारमळा) याला जुना राजवाडा पोलिसांनी तीन महिन्यानंतर शनिवारी अटक केले. साखरे गेल्या तीन महिन्यापासून पोलिसांना चकवा देत होता. याबाबतची फिर्याद जखमी अजित पांडुरंग पोवार (वय ३९ रा. बिंदू चौक) यांनी दिली होती. हल्ल्यातील तीन आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे.

शिवजयंतीदिवशी रात्री बिंदू चौक येथून मंडळांची मिरवणूक जात होती. याचवेळी साखरेची अजित पोवार व केदार गांधी यांच्यासोबत चकमक उडाली. यातून चिडून आरोपींनी तलवारीने अजितच्या हातावर वार केले. यामध्ये अजितला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर हल्लेखोरांनी पलायन केले होते. यानंतर पोलिसांनी युनूस हसन मुजार (वय २८ रा. गंजी गल्ली), अझरुद्दीन गुलाम हुसेन बागवान (वय २३ रा. रविवार पेठ), अभिजीत प्रकाश माने (वय २९ रा. वडणगे ता. करवीर),जमीर युनूस मणेर (वय २५ रा. भुई गल्ली रविवार पेठ) यांना अटक केली होती. मात्र साखरे पोलिसांना गुंगारा देत होता. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एम. गायकवाड करत आहेत.

निवेदन आणि अटक

साखरे तीन महिने पसार होता. साखरेचा सावकारकीचा व्यवसाय असल्याने त्याचे पोलिसांशी संबध होते. यामुळे दरवेळी पोलिस साखरेला अटक करण्यास जाण्याआधीच त्याला अटकेची कुणकुण लागत असल्याची तक्रार फिर्यादीसह परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेऊन केली होती. याची दखल घेत पोलिसप्रमुखांनी साखरेला तत्काळ अटक करा अन्यथा मी कारवाई करतो, असे खडे बोल पोलिसांना सुनावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवर्धन प्रक्रियेला ‘विहिंप’चा पाठिंबा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेची तुलना महारोग्याला हातमोजे किंवा अस्थिभंग झालेल्या व्यक्तीच्या शरीराला प्लास्टर लावण्याच्या प्रक्रियेशी करणाऱ्या सनातन प्रभात अंकातील लेखाचा निषेध करून मूर्ती संवर्धन प्रक्रियेला पाठिंबा देत असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष बाळ महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. सनातन प्रभात अंकाची होळी करून हा निषेध तीव्रपणे नोंदवला जाईल, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

यावेळी बोलताना बाळ महाराज म्हणाले, 'अंबाबाईची मूर्ती ही सिद्धमूर्ती आहे. दुखापतीमुळे मूर्तीला दोष लागत नाही. तसेच ही मूर्ती पूर्णपणे भग्न झालेली नसून झीज झाली आहे. रासायनिक संवर्धन प्रक्रियेमुळे ती पूर्ववत होऊ शकते. ही प्रक्रिया धर्मशास्त्रानुसारच आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचा या प्रक्रियेला पूर्ण पाठिंबा देण्यात येणार आहे. सनातन प्रभातच्या अंकातील लेखाचा आम्ही निषेध करतो.' पत्रकार ​परिषदेला जवाहरजी छाबडा, श्रीकांत पोतनीस, संभाजी साळुंखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबा देवस्थानात गैरव्यवहार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवस्थानसाठी लागणारी हारतुरे व फुले पुरवण्यासाठी ​अजित दादर्णे यांना देण्यात आलेल्या जमिनीवर फूलशेती न करता बंगला बांधला असल्याचा नवा भ्रष्टाचार उघड झाल्याची माहिती महालक्ष्मी भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्यावतीने वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंबाबाई मंदिर आवारातील मणिकर्णिका कुंडावरील शौचालय तोडून कुंड भाविकांसाठी खुले करण्याची मागणीही यावेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केली.

वाडी रत्नागिरी येथील जोतिबा परिसरातील निवृत्त शिक्षक कृष्णात लक्ष्मण शिंगे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार अजित दादर्णे यांना जोतिबा देवस्थानला हार, तुरे व फुले पुरवण्यासाठी १९९१ साली ३ एकर जमीन दिली होती. त्यानंतर २००९ साली पुन्हा पाच एकर जमीन दादर्णे यांना देण्यात आली. मात्र फुले पुरवण्याचे काम तत्पूर्वी आधीच निश्चित करण्यात आले असताना नव्याने त्यांना जमीन का दिली हा प्रश्न निर्माण झाला आहे.

श्रीपूजकांच्या पावित्र्याचे काय?

अंबाबाई मूर्तीचे संवर्धन हे धार्मिक अधिष्ठानानुसारच होत असल्यावर ठाम असलेल्या अंबाबाई मंदिर हक्कदार श्रीपूजकांच्या पावित्र्याचे काय असा सवाल हिंदू जनजागृती समितीने उपस्थित केला. गुटखा खाऊन मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या श्रीपूजकांविरोधात सरकारकडे पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.

मंदिरात महानुष्ठानांना प्रारंभ

श्री अंबाबाईच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेदरम्यान मंदिरात सुरू असलेल्या धार्मिक विधीअंतर्गत शनिवारी सहस्त्रचंड व श्री सूक्त लक्ष पठण या महानुष्ठांनाना प्रारंभ झाला. अंबाबाईचा महिमा वर्णन करणारा श्री सप्तशती या ग्रंथाचे पठण करण्यात आले. तसेच ऋग्वेदातील श्रीसुक्ताचे आवर्तन करण्यात आले. हे विधान पाच दिवस सुरू राहणार आहे. गरूडमंडपात हनुमान चालीसाचे निरंतर पठण करण्यात आले. रविवारी (ता.२६) श्रीसुक्त लक्ष जप सुरू राहणार असून सायंकाळी पाच वाजता संगीत देवी भागवत व गायन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाचा आकस्मिक आराखडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हायजॅक केलेले विमान येथील विमानतळावर उतरवल्यानंतर तिथे आकस्मिक आराखड्यानुसार अत्यावश्यक असलेल्या तत्काळ कारवाईसाठी पूर्णवेळ पोलिस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक नेमण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार तातडीने या अधिकाऱ्याची नियुक्ती करुन त्याला प्रशिक्षणही देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील एअरोड्रोम समितीसमोर मांडण्यात आले. शनिवारी विमानतळाच्या इमारतीत याबाबतची बैठक झाली. यामध्ये या आराखड्याच्या सादरीकरणाबरोबरच त्यानुसार विविध विभागांवर असलेल्या जबाबदारीची माहिती सर्व सदस्यांना देण्यात आली. यानिमित्ताने येथील विमानतळावरुन पुन्हा प्रवासी विमानसेवा सुरु होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

आयुक्त पी. शिवशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आर्मी, महसूल, महानगरपालिका, पोलिस, एमआयडीसी, इंटेलिजन्स ब्युरो, बीएसएनएल, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एएआय), महावितरण अशा विविध विभागांची मिळून ही समिती तयार करण्यात आली आहे. या समितीच्या प्रत्येक वर्षात दोन बैठक व रंगीत तालीम आवश्यक असल्याचे समजते. त्यानुसार ही बैठक झाली. जिथे विमानतळ चालवण्याची जबाबदारी एएआयवर आहे. त्या विमानतळ प्रशासनाने आकस्मिक आराखडा बनवण्याची आवश्यकता असते.

सध्या विमानतळावर पोलिस बंदोबस्त आहे. पण आराखड्यानुसार तिथे पोलिस निरीक्षक अथवा उपनिरीक्षक हे पूर्णवेळ बंदोबस्तासाठी असणे आवश्यक असल्याचे एएआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार तातडीने अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी सांगितले. याशिवाय विमानतळावर अग्निशमन दलाची आवश्यकता असते. तसेच आकस्मिक घटना झाल्यास तातडीने या ठिकाणी बीएसएनएलने हॉट लाइन उपलब्ध करुन देण्यासाठीची तयारी ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महावितरणनेही तिथे अखंडपणे वीजपुरवठा सुरु ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अशी होणार कार्यवाही

एखादे हायजॅक झालेले विमान येथे उतरवण्यात आल्यानंतर त्याला आयसोलेटेड करुन ठेवावे. त्याने परत उड्डाण करु नये म्हणून त्याच्यासमोर व आजूबाजूला अवजड वाहने आडवी उभी करण्यात यावीत. त्यानंतर विमानतळावरील एअर ट्रॅफीक कंट्रोलच्या अधिकाऱ्यांनी जे कुणी हायजॅकर असतील, त्यांच्याशी चर्चा करुन ती माहिती विमानतळ इनचार्जना द्यायची. त्यांनी ती जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी. पुढील कारवाईसाठी कमांडो येईपर्यंत जिल्हाधिकारी हेच इन्सिडेन्ट कमांडंट म्हणून काम पाहणार असल्याने त्यांच्यावरच तोपर्यंत हायजॅकरसोबत चर्चा करण्याची जबाबदारी असते. या घटनेची माहिती होताच बीएसएनएलने तिथे हॉटलाइन उपलब्ध करुन द्यायची. तसेच महावितरणने वीजपुरवठा अखंड सुरु ठेवायचा असे या आराखड्याचे ढोबळ स्वरुप व त्यातील कार्यवाही आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषिमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रेमप्रकरणातून झाल्याचे सांगणारे केंद्रिय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांची माफी न मागितल्यास त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 'मटा'शी बोलताना दिला. आम्ही सत्तेत आहोत म्हणून सरकारचे काहीही खपवून घेणार नाही, असे बजावत शेतकऱ्यांच्या हितापुढे सर्व काही शून्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार शेट्टी म्हणाले, 'राज्यसभेत अतांराकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रेमप्रकरणातून होत असल्याचे म्हटले आहे. हे उत्तर अत्यंत निंदनीय आहे. लेखी उत्तरात मंत्र्यांच्या नावावर हे उत्तर आहे. तरीही माझा याबाबत काही संबंध नाही, सरकारी अधिकाऱ्यांच्या गलथानपणामुळे हे उत्तर प्रकाशित झाल्याची सारवासारव मंत्री सांगत आहेत. कृषीमंत्री आपण केलेली चूक कबूल करत दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी चूक इतरांवर ढकलत आहेत ही बाबच जास्त गंभीर आहे.'

अधिकाऱ्यांनी जरी तांत्रिक पद्धतीने उत्तर दिले असले तरी त्याला सामाजिक स्वरुप देण्याची जबाबदारी कृषिमंत्र्यांचीच असल्याचे सांगत शेट्टी म्हणाले, 'शेतकऱ्यांच्या आत्महत्या मालाला न मिळालेला भाव, कर्जबाजारीपणा, नैसर्गिक आपत्ती अशा अनेक कारणांमुळे होत आहेत. मंत्र्यांनी त्याची वेगळी कारणे देत शेतकऱ्यांची जी चेष्टा केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही. यापुढे शेतकऱ्यांचा असा कोणताही अपमान खपवून घेणार नाही. आम्ही सत्तेवर आहोत म्हणजे भाजपचे सारे काही खपवून घेऊ असा गैरसमज त्यांनी करून घेऊ नये.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५ लाख मुश्रीफांनाच देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे असल्यास आरोपींची माहिती घेण्यासाठी एसआयटीचे पथक जाईल. मारेकऱ्यांची इत्यंभूत माहिती दिल्यास जाहीर केलेले २५ लाखाचे बक्षिसही मुश्रीफ यांनाच दिले जाईल, असे एसआयटीचे प्रमुख संजयकुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले. एसआयटी पथक सरकारच्या दबावामुळे मारेकऱ्यांची नावे जाहीर करत नसल्याचा गौप्यस्फोट मुश्रिफांनी केला होता. या पार्श्वभूमीवर संजयकुमार यांनी ही माहिती दिली.

महापालिकेच्यावतीने शुक्रवारी कॉम्रेड पानसरे यांच्या स्मारक बांधकामाच्या उद्‍घाटन समारंभात मुश्रीफ यांनी पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागला असून एसआयटी पथक सरकारच्या दबावामुळे मारेकऱ्यांची नावे जाहीर करत नसल्याचा आरोप केला होता.

याबाबत बोलताना संजयकुमार म्हणाले की, हल्ल्यानंतर मिळालेली माहिती, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयीत हल्लेखोरांचे रेखाचित्र व सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले आहे. जर पोलिसांना पानसरे यांचे हल्लेखोर मिळाले असतील तर तपास सुरू ठेवला असता काय? हल्लेखोर लपविण्याचे काय कारण असा? सवाल संजयकुमार यांनी केला. आत्तापर्यंतच्या अनेक संशयितांची चौकशी केली आहे. मात्र अद्याप कुणालाही अटक केली नसल्याचे स्पष्ट केले.

जर मुश्रीफ यांना पानसरे यांच्या हल्लेखोरांबाबत माहिती असेल तर एसआयटी पथक मुश्रीफांकडे जाऊन माहिती घेणार असल्याचे सांगितले. कुणी पोलिस खात्यातील गोपनीय माहिती उघड करत असेल तर अशा अधिकाऱ्यांवरही कडक कारवाई करणार असून तपासाबाबत सहकार्य करण्याचे मुश्रीफांना आवाहन करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, मुश्रीफ यांनी मंगळवारी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले.

संभ्रमावस्था दूर करावी

दरम्यान, मुश्रीफ यांच्या वक्तव्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुश्रीफ यांनी सवंग लोकप्रियतेसाठी वक्तव्य केले आहे का याची तपासणी करावी. मुश्रीफांना अशी गोपनीय माहिती देण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करुन तपासाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करावा, असे पत्रक शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगेच्या पातळीत वेगाने वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाने शनिवारपासून जोर पकडण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम भागात सुरु असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगा नदीचे पाणी वेगाने वाढले. शुक्रवारी रात्रीपासून पातळीत तीन फुटाने वाढ झाल्याने राजाराम बंधारा यंदा दुसऱ्यांदा पाण्याखाली गेला. गेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात ४० मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान, जिल्ह्यात राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी परिसरात दमदार पाऊस झाला.

आठवडाभर पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. रिमझिम पडणारा पाऊस दोन दिवसांपासून जोर पकडू लागला आहे. पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये हळूहळू वाढ होत होती. मात्र शुक्रवारी रात्रीनंतर पातळी झपाटयाने वाढली. शुक्रवारी रात्री १५ फूट ७ इंचावर असलेली पाणीपातळी शनिवारी सकाळी आठ वाजता १७ फुट ६ इंच झाली. त्यानंतर दिवसभरात १८ फूट ८ इंचावर गेली. या वाढलेल्या पाण्यामुळे पंचगंगा दुथडी भरुन वाहत आहे. तसेच सध्या पाच बंधारे पाण्याखाली गेले. राजाराम, शिंगणापूर, सुर्वे, रुई, इचलकरंजी बंधाऱ्यांचा त्यामध्ये समावेश आहे. पावसाचा जोर वाढला तर नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.

शहर परिसरात दोन दिवसांपासून पावसाळा जाणवू लागला आहे. शनिवारी दिवसभर किरकोळ सरी पडत होत्या. दुपारनंतर त्यामध्ये वाढ होत काही काळ संततधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले होते.

गेल्या चोवीस तासात सरासरी ११ मिलीमीटर पाऊस पडला आहे. गगनबावड्यानंतर शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगडमध्ये चांगला पाऊस झाला आहे. वारणा धरणानंतर कासारी (७७ टक्के), कडवी (७३ टक्के), जांबरे (७३ टक्के) ही धरणे ७० टक्क्यांवर भरली आहेत. धरणक्षेत्रामध्येही पावसाचा जोर आहे.

राधानगरीत संततधार

राधानगरी : शनिवारी दिवसभर राधानगरी परिसरात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे भोगावती, दूधगंगा नदी पात्रातील पाणी पातळी कमालीची वाढत असून उर्वरित रोप लावणीला वेग आला आहे. तर तालुक्यातील तीनही धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. राधानगरी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ६५ मि.मी.पावसाची नोंद झाली. दिवसभराच्या पावसाने ग्रामपंचायत मतदानावर थोडा परिणाम झाला. चार दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसाने मध्यंतरी खोळंबल्या खरीप हंगामातील उर्वरित भात रोप लावणीला वेग आला आहे.

शाहूवाडीत पावसाची रिपरिप

शाहूवाडी : शाहूवाडी तालुक्यात शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पाऊस समाधानकारक पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे. तालुक्याच्या आंबा, उदगिरी, चांदोली, विशाळगड, येळवण जुगाई, परळे निनाई, आळतूर, कडवे, शित्तूर वारुण, कांडवण, माण या भागात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. कडवी, गेळवडे व पालेश्वर या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस पडत आहे. कडवी, कासारी, शाळी, वारणा या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबा, परळे निनाई, कडवे, येळवण जुगाई या भागात अंतिम टप्प्यातली भाताची रोप लावण गतीने सुरु आहे.

पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी

गेल्या चार दिवसात पावसाचे पुनरागमन झाल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. गेले काही दिवस पावसाने ओढ दिल्याने पिके वाळण्याच्या मार्गावर होती, मात्र चार दिवसांपान पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळाले आहे. दरम्यान, चौथ्या शनिवारच्या सुटीमुळे पन्हाळगडावर पर्यटकांनी वर्षा पर्यटनाचा आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांच्या प्रश्नांसाठी मोर्चाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

औद्योगिक वसाहतीतील कामगारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, त्यांना किमान वेतन मिळावे या मागण्यांसाठी लवकरच इचलकरंजीतील सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा श्रमिक उत्कर्ष सभेचे सरचिटणीस विजय कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिला.

कांबळे म्हणाले, 'जिल्ह्याची प्रगती व्हावी व हजारो कामगारांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सर्व सुखसोई व सुविधा देऊन पंचतारांकित औद्योगिक वसाहत निर्माण केली आहे, पंरतु राजकीय पुढाऱ्यांच्या स्वार्थी प्रवृत्ती आणि कामगार आयुक्तांच्या मालकधार्जिन्या प्रवृत्तीमुळे औद्योगिक वसाहतीत अशांतता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील औद्योगिक विभागातील विविध कंपन्यात कार्यरत असलेल्या कामगारांच्या हिताला बाधा पोहचत आहे.

कंपन्यांबरोबर श्रमिक उत्कर्ष सभेने केलेल्या कामगार हितांच्या कराराची पायमल्ली होत आहे. कामगारांचे हक्क अबाधित रहावे आणि त्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत या मागण्यांसाठी काही दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास मोर्चा काढण्यात येणार आहे.' यावेळी अनिरूद्ध सावंत, गजानन तांदळे, सागर चव्हाण, स्वप्नील माळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिला दिवस तज्ज्ञांकडून पाहणीचा

$
0
0

कोल्हापूरः अंबाबाई मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यासाठी औरंगाबादमधील केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे पथक शनिवारी कोल्हापुरात दाखल झाले. समितीच्या ११ सदस्यांनी मंदिरातील मूळ मूर्तीची पाहणी केली. त्यानंतर प्रत्यक्ष रासायनिक प्रक्रियेचा आराखडा तयार करण्यात आला.

पुरातत्त्व खात्याच्या पथकात पुरातत्त्व ​अधिकारी डॉ. एम. आर. सिंह, डॉ. विनोदकुमार, सुधीर वाघ, नीलेश महाजन आणि मनोहर सोनवणे यांचा समावेश आहे. या समितीत दोन रसायनतज्ज्ञ, दोन मॉडेल बनवणारे आर्टिस्ट, प्रत्येकी एक आर्टिस्ट, शिल्पकार आणि छायाचित्रकाराचा समावेश आहे. श्रीपूजक आणि देवस्थान समितीच्या सदस्यांनी समितीतील अधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर मूळ मूर्तीच्या सध्याच्या स्थितीची शास्त्रीयदृष्ट्या पाहणी करण्यात आली. यानुसार त्याबाबतचा आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.

लेखी नोंदी ठेवणार

रासायनिक संवर्धन प्रक्रियेतील बारकावे, नोंदी यांचे दस्तावेज करण्यात येणार आहेत. तसेच मूळ मूर्तीच्या छायाचित्रासह प्रक्रियेच्या काळात छायाचित्रेही काढण्यात येणार आहेत. रासायनिक संवर्धन प्रक्रिया कशी केली याबाबत माहिती देणारा दस्तावेज संग्रहित ठेवला जाणार असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.

मूर्तीवरील प्रक्रिया पूर्ण करण्याचा कालावधी २३ जुलै ते ६ ऑगस्ट असा निश्चित केला आला होता. दरम्यान काही अडथळा आल्यामुळे ही प्रक्रिया तीन दिवस उशिरा सुरू होत असली तरी ती ६ ऑगस्टपर्यंत दिलेल्या वेळेतच पूर्ण होणार आहे.

- डॉ. एम. आर. सिंह, पुरातत्त्व अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खचले... पण थकले नाही!

$
0
0

अनुराधा कदम

कुशीत अवघ्या सव्वा वर्षाची मुलगी असताना त्यांना पतीने आयुष्यातून वजा केले. वय फक्त २७ वर्षांचे आणि शिक्षण दहावीपर्यंतचे. माहेरी आधार शोधावा, तर आई लहानपणीच देवाघरी गेल्यामुळे पाठच्या सहा भावंडांना सांभाळणाऱ्या वडलांचीच कसरत होत होती. पतीनेच अंतर दिल्यामुळे सासरघरची दारे कधीच बंद झालेली. समोर कोरी पाटी होती आणि त्यावर चिमुकल्या मुलीचे भविष्य मांडायचे होते. खरेतर या आघाताने पायाखालची जमीनच सरकली होती, पण हातातल्या मुलीकडे पाहिले की आपसूक त्यांचे पाय घट्ट व्हायचे आणि मन खंबीर! आज तीच मुलगी पंचविशीची झाली असून, एक सक्षम व्यक्तीही बनली आहे. पण गेल्या अडीच दशकांच्या या प्रवासात एकेरी पालकत्वाचे शिवधनुष्य पेलताना होणाऱ्या सगळ्या संघर्षाने कोल्हापुरातील शोभा पाटील यांचा जीवनपट मात्र एकेरी पालकत्व निभावताना खचणाऱ्या महिलांसाठी अनुकरणीय बनला आहे.

भरतनाट्यम नृत्याविष्कारात संयोगिता पाटील या मुलीने 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' केले. त्या हिमतीच्या मुलीची आई अशी आज कोल्हापुरात ओळख असलेल्या शोभा पाटील यांच्या आयुष्याची कथा मन हेलावणारी आहेच; पण तितकीच उभारी देणारीही आहे. गेल्या २७ वर्षांपासून त्या एकेरी पालकत्वाची ही जबाबदारी नेटाने पार पाडत आहेत. अर्थात आई आणि वडील ही दोन्ही नाती एकुलत्या एका मुलीला देताना त्यांच्यातील आईला खूप खस्ता खाव्या लागल्या आहेत. त्यामध्ये आर्थिक संघर्ष तर होताच पण सर्वांत महत्त्वाचे होते ते, वडील आपल्या आयुष्यात नाहीत हे मुलगी संयोगिताला तिच्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावरची तिची समज लक्षात घेऊन सांगताना होणारी घालमेल...

सात जणांच्या भावंडांमध्ये शोभा या सगळ्यांत मोठ्या. सातव्या भावाला जन्म देऊन काही दिवसांत आई भरल्या गोकुळातून कायमची निघून गेली आणि तेव्हापासून शोभा याच सहा भावंडांच्या 'आई' झाल्या. साहजिकच दहावीनंतर शाळेची वाट सोडून दिली आणि वडिलांनी त्यांचे लग्न करून दिले. पण आयुष्याच्या जोडीदाराने शोभा यांना मनापासून स्वीकारले नाही. सहजीवनाची नाळ तुटू नये म्हणून शोभा यांनी खूप प्रयत्न केले. सामाजिक संघटनांच्या मदतीने तडजोडीचा हात पुढे केला. पण पतीने पाठ फिरवली ती कायमची. न्यायालयात घटस्फोटाची प्रक्रिया झाली तेव्हा सहजीवनच नको असलेल्या पतीकडून पैशांची खिरापत कशासाठी घ्यायची, असे स्वाभिमानी कारण देऊन शोभा यांनी पोटगी नाकारली. सगळे बंध तोडून त्यांनी सव्वा वर्षाच्या मुलीसोबत एकट्याने जगायचे ठरवले.

आता प्रश्न होता तो अर्थार्जनाचा. दहावीच्या शिक्षणावर कायमस्वरूपी आणि सुरक्षित नोकरी मिळणे अवघड होते. तरीही खासगी नोकरी करीत मुलीला वाढवणे गरजेचे होते. नोकरीसोबत शिलाईचे काम सुरू झाले. संयोगिता मोठी होत होती. आपल्या आयुष्यात पप्पा नाहीत, याची जाणीव तिला होत होती. तेव्हा पप्पा गावाला गेलेयत, असे सांगून वेळ मारून नेली. पण ती चार वर्षांची असताना मात्र शोभा यांनी तिला पप्पा आपल्यासोबत राहत नाहीत, पण का राहत नाहीत हे मी तुला मोठी झाल्यावर सांगीन, असे सांगितले.

शोभा सांगतात, 'संयोगिताचे वडील आमच्यासोबत राहत नाहीत या मुद्द्याचा आम्हा दोघींनाही त्रास झाला. पण कुणी विचारले, तर त्यांना स्पष्टीकरण देण्यात वेळ आणि शक्ती खर्ची घालण्यापेक्षा मी रस्ता बदलायचे. हे सहन करणे अवघड होते. पण पदरात मुलगी होती आणि तिला माझ्या भूतकाळाची मानसिक झळ बसू नये यासाठी मला 'आईपण' अधिक खंबीर बनवायचे होते. त्यासाठी तिला मी समाजात कसे वागायचे, वडिलांवरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी अस्वस्थ न होता कसे जगायचे हे नेहमी शिकवले. यादरम्यान मी दुसरे लग्न करावे असाही विचार माझ्या कुटुंबातून पुढे आला. पण मी संयोगिताची आई आणि वडील दोन्ही होण्यासाठी स्वतःला इतके सबळ केले होते, की मला दुसऱ्या लग्नामुळे मुलीला वडिलांच्या आधाराच्या कुबड्या घेण्याची खरेच गरज वाटली नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत ६३ टीएमसी पाणीसाठा

$
0
0

कराडः कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक प्रतिसेकंद सुमारे १० हजार क्युसेक असल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या २४ तासांत दीड टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी दुपारपर्यंत कोयना धरणातील पाणीसाठा ६३ टीएमसी इतका झाला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून दमदार पावसाचा असलेला जोर शनिवारपासून काहीअंशी ओसरला आहे. रविवारी दिवसभरात कोयनानगर येथे २५, नवजा येथे २५ तर महाबळेश्वर येथे १५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची जलपातळी २१२१.६ फूट झाली असून, धरणात रविवारी ६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरण ६० टक्के भरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वीस व्यापारी एलबीटी करपात्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगली-मिरज-कुपवाड महापालिका हद्दीत ५० कोटींवर उलाढाल असणारे करपात्र व्यापारी अवघे २० आहेत. ५० कोटीच्या आत उलाढाल असणाऱ्यांना एलबीटी माफी देणारा निर्णय राज्य सरकारने एक ऑगस्टपासून अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या महापालिका अद्दीतील दहा हजारांहून अधिक एलबीटी पात्र व्यापाऱ्यांना या करातून कायमची मुक्ती मिळणार आहे.

या संदर्भात नगरविकास खात्याचे उपसचिव गो. आ. लोखंडे यांच्या सहीचा अध्यादेश महापालिकेकडे आला आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ एलबीटी हा विषय वादग्रस्त होऊन राहिला होता. बहुतांशी व्यापारी हा कर भरतच नव्हते. त्यांनी एलबीटी कायमचा हटवा म्हणून विविध प्रकारची आंदोलने केली, अनेक वेळा बंद पाळला, मोर्चे काढले, निदर्शने केली, घेराओ घातले. अखेर त्यांच्या मागणीला यश आले.

या सर्व प्रकारामुळे महापालिकेची मात्र चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. विकास कामे ठप्प झाली. दैनंदिन कामे कशीबशी सुरू राहिली आहेत. पगार वेळेवर होईना, कंत्राटदारांची देणी मोठ्या प्रमाणात थकली आहेत, अशी अवस्था आहे.

दरम्यान, सरकारच्या ३१ जुलैपर्यंतच्या अभय योजनेचा लाभ नोंदणीकृत ८७०० व्यापाऱ्यांपैकी केवळ ३०० व्यापाऱ्यांनीच घेतला आहे. सुमारे चार हजार व्यापारी नियमित एलबीटी भरत होते. महापालिकेला एलबीटीमुळे १७५ कोटी उत्पन्न अपेक्षित होते. पण निम्म्याहून कमी वसुली झाली. सध्या गेल्या दोन वर्षांतील १६० कोटीची वसुली होणे बाकी आहे. ती कशी होणार? हा खरा प्रश्न आहे.

सांगली पालिकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. योजनांची अमलबजावणी करण्यासाठी निधी नाही. व्यापारी कर भरत नाहीत. सर्व उत्पादन दैनदिन कामांवर खर्च होत आहे. त्यात एलबीटीची बाबत सरकाने असा निर्णय घेतल्याने पालिका मोठ्या अडचणीत आली आहे. पलिकेने अनेकदा व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला राज्यसरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

ऑगस्टपासून महापालिका युद्धपातळीवर वसुली करणार आहे. दररोज किमान २५हून अधिक व्यापाऱ्यांवर कारवाईचा हा बडगा उगारला जाईल. आता कोणाचाही हस्तक्षेप होणार नसल्याने वसुली चांगली होईल.

- रमेश वाघमारे, सहायक आयुक्त (एलबीटी अधीक्षक)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदारांची गुर्मीची भाषा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

'कारखाने बंद करण्याची गुर्मीची भाषा करणाऱ्या साखर कारखानदारावर सरकार कायदेशीर कारवाई करील,' असा इशारा रविवारी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नऊ ऑगस्टपासून राज्यभर शेतकरी बचाव अभियान सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. इस्लामपूर येथे शेट्टी पत्रकारांशी बोलत होते.

'कारखानदारी परवडत नाही म्हणून कारखाने बंद करण्याची कारखानदारांची भाषा गुर्मीची आहे. साखर ही जीवनावश्यक वस्तू असल्याने कायद्याने साखरेचे उत्पादन बंद करता येणार नाहीत. तरीही कारखाने बंद केल्यास सरकार कारखानदारांच्यावर कायदेशीर कारवाई करेल. सरकारने साखर उद्योगाला मोठ्या प्रमाणावर कर सवलती दिल्या आहेत. या उद्योगासाठी जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. सरकार अनेक प्रकारे साखर उद्योगाला मदत करत असते. त्यामुळे कारखानदारांनी शेतकऱ्यांना वेठीस धरू नये. ज्याप्रमाणे पिण्याचे पाणी पुरवण्याची जबाबदारी सरकारची असते, तशीच साखर पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. कारखानदारांनी कारखाने बंद ठेवले तर सरकारने ते ताब्यात घेवून चालवावेत. ही यंत्रणा नीट चालवण्यासाठी त्यावर आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या व जनतेच्या मनात असंतोष वाढावा म्हणून कारखानदार असले राजकारण करत आहेत. सध्या १६० लाख टन साखर शिल्लक आहे. येत्या गळीत हंगामापर्यंत ८० लाख टन साखर संपणार आहे. येत्या गळीत हंगामात २६० लाख टन साखर उत्पादीत होईल. म्हणजे पुढचा गळीत हंगाम संपल्यानंतर ३४० लाख टन साखर शिल्लक असेल. त्यापैकी २४० लाख टन साखर पुढील वर्षाची गरज आहे. म्हणजे फक्त १०० लाख टन साखर शिल्लक राहील. त्यापैकी ४० लाख टनाची कच्ची साखर तयार करून निर्यात केली तर तिला २६००रुपयाहून अधिक भाव मिळेल. त्यामुळे कारखान्यांना एफआरपी देणे शक्य होईल, असेही शेट्टी म्हणाले.

क्रांतिदिनापासून अभियान

राज्यात नऊ ऑगस्ट या क्रांतिदिनापासून शेतकरी बचाव अभियान सुरू करणार आहोत. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातून या अभियानाला सुरुवात करण्यात येईल. या तालुक्यातील शेतकरी शिवहरी ढोक याने आत्महत्या केली होती. अवकाळी पावसात त्याचे घर पडले होते. त्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले होते. संघटनेने तीन महिन्यांत त्याचे घर उभा करून दिले त्याच्या तीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. म्हणून त्याच तालुक्यातून राज्यभर अभियान राबविण्यात येणार आहे, असेही शेट्टी म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन वेळी काँग्रेसवाले एकत्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

'पूर्वाश्रमीचे काँग्रेसवाले विविध ठिकाणी विखुरले असले तरी पुन्हा ते काँग्रेसच्याच दावणीला येणार, ही काँग्रेसची पद्धत आहे. चरायला कुठे का जाईनात, धार द्यायला आपापल्या घरी येण्याशी मतलब,' अशा शब्दात माजीमंत्री पतंगराव कदम यांनी सांगली जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर रविवारी भाष्य केले.

केंद्र आणि राज्य सरकारकडून अपेक्षाभंग झाल्याने लोक त्यांच्या विरोधात उठाव करण्याच्या तयारीत आहेत. हे ध्यानात घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीने शहाणे व्हावे आणि एकत्रित यावे, असे आवाहनही कदम यांनी केले आहे. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत केलेले विधान दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्यातला प्रकार आहे. निवडणुकांच्या काळात नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या स्वप्नांना भूलून जनतेने जबरदस्त उठाव केला. त्यानंतर आता आपली फसगत झाल्याची भावना जनतेत वाढीला लागली आहे. किमान जिल्हा पातळीपासून पुढेतरी एकत्र यायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. अपेक्षांचा भंग झाल्याने गोंदीया-भंडाऱ्यातील जिल्हा परिषदेत लोकांनी भाजपला कुठे नेऊन ठेवलय. याचा प्रत्यय आला आहे. लोकांनी उठावाला सुरुवात केली असून, ही परिवर्तनाची नांदीच म्हणावी लागेल. तेथील काँग्रेसच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादीने सवाल करताच आपण अजित पवारांशी बोलून गडचिरोलीत सरळे करा. त्यानंतर बाकीचे सरळ होईल, असे सांगितले आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेसने गोंदीयातील पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावून परिस्थितीचा अहवाल मागविला आहे, असेही कदम म्हणाले.

ऊसउत्पादक अडचणीत

ऊसउत्पादक शेतकरी खूपच अडचणीत सापडला आहे. पॅकेजचा एक पैसाही अद्याप आलेला नाही. पंधरा वर्षांत काय केले, असा जाब विचारणाऱ्या या सरकारला आम्ही ज्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करण्याचेही जमत नाही, असेही कदम म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनुदानातील दिरंगाई टाळा

$
0
0

जान्हवी सराटे, कोल्हापूर

अनाथ, निराश्रित, बेघर, अन्य आपत्तीग्रस्त, तुरुंगात असलेले कैद्यांची मुले, एचआयव्ही-एड्स किंवा कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसह जगणाऱ्या व्यक्तींच्या मुलांना, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणांत गुंतलेल्या व्यक्तींची मुलांचा बालसंगोपन योजनेत समावेश असतो. अशा मुलांच्या संगोपनाची जबाबदारी सरकार या योजनेच्या माध्यमातून घेते. सध्या राज्यातील १८ हजार तर कोल्हापुरातील सातशे मुलांचे संगोपन विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करते आहे. मात्र दरमहा मिळणे अपेक्षित असलेली ही रक्कम पाच ते सहा महिन्यांनंतर जमा होईल. या अनुदानात वाढ करण्यासह ती रक्कम दरमहा ऑनलाइन जमा करावी अशी अपेक्षा संस्था करत आहेत.

राज्य सरकारच्यावतीने फेब्रुवारी १९७५ पासून राज्यातील अनाथ, निराधार आणि एकच पालक असलेल्या मुलांच्या संगोपनासाठी बालसंगोपन योजनेला सुरुवात करण्यात आली. या योजनेची अमंलबजावणी गेली अनेक वर्षे सुरू आहे. राज्य सरकारने ११ नोव्हेंबर २००५ मध्ये या योजनेत काही बदल केले. त्यानंतर ९ ऑक्टोबर २०१३ रोजी सरकारने काढलेल्या सुधारित अध्यादेशानुसार दोन्ही पालक हयात असलेल्या मुलांसाठी ही योजना बंद करण्यात आली. योजनेतील लाभार्थी मंजूर करण्याचे अधिकारीही जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांऐवजी बाल कल्याण समितीला देण्यात आले आहेत.

या बालसंगोपन योजनेतून राज्यात एकूण १८ हजार आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ७०० मुलांना लाभ मिळतो. मात्र कोल्हापुरातील अनेक गरजू, एकच पालक असलेल्या मुलांपर्यंत ही योजना पोहोचलेली नाही. राज्यातील वंचित आणि अनाथ, निराधार बालकांच्या संगोपनाची जबाबदारी सरकार घेते. मात्र आणखी असंख्य मुलांना याची खऱ्या अर्थाने गरज आहे.

सरकारच्यावतीने या योजनेतून मुलांसाठी दरमहा ४२५ रुपये इतकी रक्कम मिळते. लाभार्थी बालकांसाठीचे हे अनुदान अत्यंत कमी आहे. किमान सहा महिने यासाठी थांबावे लागते. या रक्कमेचा चेक घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे ही रक्कम लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा होण्याची गरज आहे.

- प्राजक्ता देसाई, सचिव, आभास फाउंडेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहितीनंतरच परवानगी

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदणी, पोलिस ठाण्याकडील ध्वनीक्षेपकाची परवानगी, देखाव्याची स्वतंत्र परवानगी, मंडप उभारणीच्या परवानगीबरोबरच गणेशमूर्तीची उंची तसेच विसर्जन कुठे करणार याची माहिती प्रशासनाला द्यावी लागणार आहे. त्यानंतरच गणेशोत्सवाला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी महापालिकेला यापूर्वीच सूचना केली आहे. तसेच त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

काही वर्षांपूर्वी पंचगंगा नदीमध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जात होते. विविध सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी संघटना यांच्या पुढाकाराने मूर्ती व निर्माल्य विसर्जनाऐवजी दान करण्याची मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेला सध्या उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून सार्वजनिक गणेशमूर्तींबाबत लक्ष केंद्रीत केले जात आहे. दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यादिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत हायकोर्टामध्ये सुनावणी सुरु आहे. त्यामध्ये हायकोर्टाने प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका, औद्योगिक वसाहत यांनी उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी येथे बैठक घेतली होती. त्यामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था तसेच औद्योगिक वसाहतींना सूचना केली होती.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या मूर्ती करण्यात इर्षा असते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पाच फुटापेक्षा मोठी मूर्ती कोणत्याही परिस्थितीत नदीमध्ये विसर्जित करण्याबाबत अटकाव करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मंडळांना गणेशोत्सवाची परवानगी देत असतानाच त्यांच्याकडून मूर्तीची किती उंची आहे, मूर्ती लहान असो वा मोठी, ती कोणत्या ठिकाणी विसर्जन करणार आहात, मिरवणुकीमध्ये सहभागी होणार का याची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. यातून मोठ्या उंचीच्या मूर्ती पंचगंगेत विसर्जन करण्यापासून रोखण्याबाबत तसेच अशा मूर्तींची संख्या जास्त झाल्यास त्यांच्यासाठी आणखी कोणती यंत्रणा उभी करायची याबाबत नियोजन करणे शक्य होणार आहे. याबाबत सोमवारी (२७ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजीत करण्यात आली आहे. त्यामध्ये विभागीय आयुक्तांच्या या सुचनांनुसार कामकाज करण्याबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images