Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आगामी हंगामात निम्मे कारखाने बंद?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

साखरेचे दर सध्या कमालीचे घटल्याने राज्यातील साखर कारखानदारी भयंकर आर्थिक संकटातून जात आहे. हीच अवस्था कायम राहिली तर पुढील हंगामाच्यावेळी ५० टक्क्यांहून अधिक साखर कारखाने बंद ठेवावे लागतील, अशी चिंता साखर कारखानदार व्यक्त करीत आहेत.

सांगली जिल्ह्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी ऊसाला प्रतिटन २१०० रुपयांच्या आसपास दर दिला आहे. तर बाजारात साखरेचे भाव १९०० रुपयापर्यंत खाली आहे आहेत. हा फरक कसा भरून काढायचा? असा या साखर कारखान्यांचा प्रश्न आहे. या परिस्थितीमुळे राज्य सहकारी व जिल्हा जिल्हा बँक साखरेवर कर्ज द्यायला तयार नाही. सहाजिकच कारखानदारांची स्थिती आणखी कठीण होऊन बसली आहे. या साखर कारखान्यांतील साखरेचे प्रचंड साठे बाहेरही काढता येत नाहीत. कामगार-कर्मचारी-अधिकारी यांचे मासिक पगार करणे अवघड होऊन बसले आहे. साखर कारखान्यांची इतकी वाईट स्थिती यापूर्वी कधीच नव्हती. राज्य व केंद्र सरकार या कारखान्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. जणू या सरकारला महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी मोडीत काढायची आहे, असेच त्यांचे धोरण दिसते. सद्य:स्थितीत एपआरपी प्रमाणे ऊस दर देणे अशक्य कोटीतील गोष्ट होऊन बसली आहे. ज्या साखर कारखान्यांचे वीज प्रकल्प आहेत, डिस्टिलरी आहे ते कसे तरी तग धरून आहेत. पण, जे केवळ साखर उत्पादनावर अवलंबून आहेत ते कसे टिकणार? हा गंभीर प्रश्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी प्रति टन ऊसाला २५०० रुपयांच्या आसपास दर दिला आहे, त्यांची स्थिती तर आणखी वाईट झाली आहे. त्यांचे पुढील गळीत हंगाम कसे सुरू होणार, हे आव्हान त्यांच्यासमोर आहे. बहुतेक सर्वच साखर कारखान्यांची प्रचंड प्रमाणात देणी थकली आहेत. बिले लवकर मिळत नाहीत म्हणून माल पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही हात आखडता घेतला आहे. काही व्यापाऱ्यांनी तर 'आधी पैसे टाका, मग माल घेऊन जावा' असे धोरण त्यांनी ठेवले आहे.

बाजारपेठेत साखरेला उठाव नाही

जागतिक बाजारातही साखरेचे दर मंदीत आहेत. साखरेचे उत्पादन भरमसाठ झाले असून, शिल्लक साठेही पडून आहेत. देशात साखरेला म्हणावा तेवढा उठाव नाही. त्यातच कमी दरात साखर विकणे म्हणजे आर्थिक झळ सोसणे अशी त्यांची अवस्था होऊन बसली आहे. एकूणच साखर उद्योगावरील मंदीचे हे काळे ढग केव्हा व कसे नाहिसे होणार इकडे या कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वैद्यकीय कॉलेजची विद्यार्थी संख्या वाढली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मिरज

मिरजेतील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी पन्नास विद्यार्थी संख्या वाढविण्यास मेडीकल काउंन्सिल ऑफ इंडियाची मान्यता मिळाली आहे. आता येथील विद्यार्थी संख्या शंभरावरून दीडशेवर जाणार असल्याने आणखी पन्नास विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याची संधी मिळणार आहे. या वाढीव जागांसाठी प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. तसेच येथील रक्तपेढी व जळीत उपचार विभागालाही मान्यता मिळाली असूनस कामास सुरुवात होणार आहे.

मिरज सरकारी हॉस्पिटलकडे प्रशासकीय पातळीवरुन केल्या जाणाऱ्या दुर्लक्षाविरोधात मिरजेतील सामजिक कार्यकर्ते व संस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. दिप्ती डोणगावकर यांच्यासह माजी आमदार हाफिज धत्तुरे व जिजाऊ चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी मिरज सरकारी हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा देण्याच्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता हॉस्पिटलमध्ये रक्तपेढी व जळीत उपचार विभाग सुरू होण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. जुलै महिन्यापासून येथे कामास सुरुवात होणार आहे.

येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. विद्यार्थी संख्या पन्नासने वाढविण्यासाठी हॉस्पिटलकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, रक्तपेढी व जळीत विभाग नसल्याने या वाढीव जागांच्या मंजुरीच्या मार्गात अडथळे निर्माण झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढाबे, हॉटेल्सवर पोलिसांचे छापे

$
0
0

कुपवाडः मुंबईतील विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ढाबे, हॉटेल्सवर छापे घातले. ही कारवाई रविवारी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. अनेक ठिकाणी दारूविक्रीची किंवा दारू पिण्याची परवानगी नसतानाही तेथे दारू उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी संबधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

सांगली आणि परिसरात हातभट्टीची दारू, गोवा आणि हुबळी बनावटीच्या दारू विक्रीची नेहमीच चर्चा असते. बनावट दारूसाठी महामार्गावरील ढाब्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहचते. यापूर्वी असे बनावट दारू साठे अनेकवेळा पकडण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी हॉटेल्स आणि ढाबे अशा तब्बल बावीस ठिकाणी छापे घातले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंकजांविरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर

$
0
0

कुपवाड : खराब व दर्जाहिन चिक्की खरेदी करून ती पुरवठा करीत लहान-लहान मुलांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मंगळवारी सांगलीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली. जिल्हाध्यक्ष शरद लाड, ताजुद्दीन तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली सांगली-माधवनगर रस्ता रोखून धरुन कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलिसांनी ३४ जणांविरुद्ध जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाकडून करण्यात आलेल्या २०६ कोटी रुपयांच्या खरेदी प्रकरणावरून राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. तीन लाखांवरील रक्कमेची खरेदी असल्यास ई-टेंडर करण्याचा नियम असताना त्याचे उल्लंघन करण्यात आले. एका दिवसात २०६ कोटी रुपयांची खरेदी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेले सर्व साहित्य निकृष्ठ आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. नवी मुंबईच्या जगतगुरी कंपनीकडून ५ कोटी ६० लाखांची वह्यापुस्तक खरेदी करण्यात आली. मात्र, हे बिल संबधित कंपनीच्या नावे न काढता भानुदास टेकवडेंच्या नावावर पैसे जमा करण्यात आले.

४ हजार ५०० रुपयांच्या वॉटर फिल्टर खरेदीची मंजुरी असताना प्रत्यक्षात ५ हजार २००प्रमाणे खरेदी करण्यात आली. तीही स्वतःचे मॅन्युफॅक्युअरिंग नसणाऱ्या ऐव्हरेस्ट कंपनीकडून खरेदी करण्यात आली. चिक्की तयार करण्याचा कोणताही प्रकल्प नसणाऱ्या सिंधुदुर्गच्या सूर्यकांता सहकारी महिला

संस्थेस ३७ कोटी रुपयांची चक्की पुरवठ्याचे टेंडर देण्यात आले. केंद्रीय खरेदी आयुक्त राधिका रस्तोगिंनी तीन लाखापेक्षा जास्तीचे खरेदी असल्याने ई-टेंडरिंग करण्याचा सूचना दिल्या असतानाही त्याकडे कानाडोळा करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘यंत्रमागधारकांच्या तोंडाला पाने पुसली’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने टॅरिफ ऑर्डरमध्ये यंत्रमागधारक या स्वतंत्र वर्गास मान्यता दिलेली आहे, ही बाब स्वागतार्ह आहे. तथापी स्थिर आकार आणि वीजदर यामध्ये आयोगाने वाढ केलेली आहे. परिणामी मागील टॅरिफ ऑर्डरच्या तुलनेने २७ हॉर्स पॉवरच्या आतील म्हणजे राज्यातील ९० टक्के यंत्रमागधारकांच्या वीजदरामध्ये प्रती युनिट सरासरी ६३ पैसे वाढ होणार आहे. २७ हॉर्स पॉवरच्या वरील यंत्रमागधारकावर प्रती युनिट सात पैसे, उच्च दाब एक्स्प्रेस फीडर ग्राहकांवर ५५ पैसे व उच्चदाब नॉन एक्स्प्रेस फीडर ग्राहकावर ७३ पैसे याप्रमाणे बोजा पडणार आहे. यंत्रमागधारकांना दिलेली सवलत अत्यल्प आहे. एकप्रकारे ही यंत्रमागधारकांच्या तोंडाला पानेच पुसली आहेत अशी टीका महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीजतज्ञ व जनता दल नेते प्रताप होगाडे यांनी केली.

ऑगस्ट २०१०२ मध्ये आयोगाचे मागील आदेश जाहीर झाल्यानंतर राज्य शासनाने डिसेंबर, २०१२ व मार्च २०१३ मध्ये यंत्रमागधारकांचे सवलतीचे वीजदर जाहीर केले आहेत. या शासन निर्णयानुसार हा निर्णय झाल्यानंतर पुढे आयोगाने कोणतीही दरवाढ केली तर ती संपूर्ण रक्कम ग्राहकांना भरावी लागणार आहे.

या निर्णयानुसार लघुदाब यंत्रमागधारकांसाठी वीज आकार २५७ पैसे प्रती युनिट व उच्चदाब यंत्रमाग ग्राहकांसाठी ५६६ पैसे प्रति युनिट आहे. स्थिर आकार २७ हॉर्स पॉवरच्या आतील लघुदाब यंत्रमाग धारकांसाठी दरमहा ४० रुपये व २७ हॉर्स पॉवरच्यावरील ग्राहकांसाठी दरमहा प्रति केव्हीए ३० रुपये आहे. राज्यातील सर्व यंत्रमागधारक संघटना व सर्व यंत्रमाग क्षेत्रातील आमदार यांनी यंत्रमाग ही वेगळी वर्गवारी करण्याची मागणी केलेली होती. त्या मागणीस आयोगाने मान्यता दिलेली आहे. तथापी निश्चित केलेले वीजदर मात्र यंत्रमागधारकांची चेष्टा करणारे आहेत. अन्य औद्योगिक ग्राहक व यंत्रमागधारक यांच्या वीजदरातील फरक २७ हॉर्स पॉवरच्या आतील ग्राहकांसाठी ८ युनिट व २७ हॉर्स पॉवरच्यावरील ग्राहकांसाठी १० युनिट इतका अत्यल्प आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त ‌शिवार’ जोरात

$
0
0

उदयस‌िंग पाटील, कोल्हापूर

दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात पाच महिन्यात दोन मोठ्या तलावांसह २८ नाला बंधाऱ्यातून १५ हजार ८२२ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या ३४० विविध प्रकारच्या कामासाठी ६३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असून सध्या ५९ कोटी रुपयांची आणखी मागणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यात दुष्काळ भेडसावणाऱ्या गावांमध्ये पाण्याची उपलब्धता करुन देण्यासाठी सरकारने ही योजना राबवली आहे. त्यासाठी जिल्ह्यात ६९ गावांची निवड करण्यात आली असून त्यातील ३१ कामे फक्त पूर्वीच्या तलाव व नाल्यांच्या बंधाऱ्यात साठलेला गाळ काढण्याची सुचवण्यात आली होती. यामध्ये मिणचे व सावर्डे या दोन मोठ्या तलावांसह २८ नाला बंधारा होते. या सर्वांमधून ३१ हजार घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यातील मिणचे व सावडे या दोन तलावांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ होता. त्यासाठी पाच महिन्यात काम सुरु करण्यात येऊन आतापर्यंत १५ हजार घनमीटर इतक्या मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला. त्यामध्ये काही नाला बंधाऱ्यांचाही समावेश होता. पण तेथील प्रमाण कमी होते. यामुळे मिणचे, सावर्डे या तलावांमध्ये निघालेल्या गाळामुळे या पावसात पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

याशिवाय जिल्ह्यात ३४० कामे सुरु आहेत. त्यामध्ये माती नाला बांध, साखळी सिमेंट बंधारा, नाला बांध दुरुस्ती, शेततळी, ठिबक योजना अशा कामांचा समावेश आहे. त्याकरिता सरकारचे १२ विविध विभाग काम करत आहेत. ६९ गावातील या सर्व कामांना १०९ कोटी ९८ लाखाचा आराखडा तयार आहे. त्यातील ६३ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या गावांमध्ये कोणत्या स्वरुपाच्या कामांची आवश्यकता आहे. त्यानुसार ग्रामपंचायतींनी आराखडे सादर केले आहेत. त्या आराखड्यानुसार विविध प्रकारच्या कामांना सुरुवात केली आहे. त्यातील डोंगरवाड्यावरील काही गावांमध्ये सध्या पावसामुळे कामे संथ झाली आहेत. पण जिथे पावसाचे प्रमाण कमी आहे. तिथे कामे सुरुच आहेत.

पाण्याचा लाभ तत्काळ

काही नाल्यांमध्ये साठलेला गाळ काढला गेल्यास मोठ्या पावसातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात अडवता येणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाने दोन एक्सव्हेटरही मंजूर केले आहेत. त्यानुसार गाळ काढण्यासाठी आणखी वेग येणार आहे. या वर्षभरात म्हणजे मोठा पावसाळा सुरु होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करायची आहेत. जेणेकरुन या पावसाळ्यातील पाणी अडवता येणार आहे. त्याबाबतची माहिती प्रशासनाने घेण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१९ पोलिस ठाण्यांत ऑनलाइन डायरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीसीटीएनएस प्रणालीव्दारे जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्यांत बुधवार (ता.१) पासून ऑनलाइन डायरी सुरू होणार आहे. कोल्हापूर शहरातील चार व करवीर पोलिस ठाण्याचा यामध्ये समावेश झाला आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील सातारा जिल्ह्यातील नऊ तर पुणे ग्रामीणमध्ये १० पोलिस ठाण्यात बुधवारपासून ऑनलाईन डायरीचे काम सुरू होणार आहे. ऑनलाईन डायरीमुळे पेपरलेस पोलिस ठाणी होणार आहेत.

सीसीटीएनएस प्रणालीव्दारे ऑनलाईन डायरीसाठी राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. गेले वर्षभर प्रायोगिक तत्वावर ऑनलाइन डायरीबरोबर पारंपरिक डायरीचा वापर केला जात होता. जिल्ह्यातील २९ पोलिस ठाणी व सर्व पोलिस कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सीसीटीएनएसचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सीसीटीएनएसवर स्टेशन डायरी, एफआयर रजिस्टर, आर्म रजिस्टर, नोंदवही, लॉगबुक अशा ४७ प्रकारच्या नोंदी केल्या जातात. सीसीटीएनएसवर १९९८ पासूनचे कामकाज नोंदवले आहे. यावर नोंदवली गेलेली प्रत्येक नोंद एका क्लिकवर अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहता येते. २८ पोलिस ठाणी, सहा उपअधीक्षक कार्यालये, पोलिस मुख्यालय कार्यालय सर्व्हरव्दारे जोडली आहेत. यामुळे गुन्हे व गुन्हेगाराची माहिती त्वरित मिळणे शक्य होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसेस विलंबाबाबत लेलँडला नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करारानुसार मुदतीत बसेस उपलब्ध करून न दिल्यामुळे अशोक लेलँड कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येणार आहे. परिवहन विभागाने बस पुरविण्यास विलंब होत असल्याबद्दल सध्या कंपनीवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. करारानुसार दोन जुलैपर्यंत ७५ बसेस पुरवणे आवश्यक होते, परंतु आतापर्यंत केवळ २५ बसेस आल्याने परिवहन विभागाने कारवाईचे संकेत दिले आहेत. परिवहन समिती सदस्यांच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली.

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान योजनेतंर्गत ४४ कोटी रुपयांच्या निधीतून केएमटीने १०४ बसेस घेण्याचा निर्णय घेतला. १०४ बसेसचा ठेका अशोक लेलँड कंपनीला देण्यात आला आहे. निविदा प्रक्रियाद्वारे अशोक लेलँड कंपनीची निवड करण्यात आली आहे. परिवहन विभाग आणि अशोक लेलँड कंपनी यांच्यातील करारानुसार मे ते जुलै या कालावधीत ७५ बसेस उपलब्ध होणे आवश्यक होते. दोन मे, दोन जून आणि जुलै या कालावधीत प्रत्येक टप्प्यात २५ बसेस कंपनीकडून परिवहनला मिळणार होत्या.

मात्र कंपनीकडून पहिल्यापासून बसेस उपलब्ध करून देण्यास विलंब होत आहे. बसेस देण्यास उशीर होत असल्याबद्दल कंपनीवर यापूर्वी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. परिवहन समिती सदस्या यशोदा मोहिते यांनी नवीन बसेस ताफ्यात दाखल होण्यास विलंब झाल्यामुळे केएमटीचे आ​र्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणले. जालिंदर पोवार, शशिकांत पाटील, परिक्षित पन्हाळकर यांनी चर्चेत भाग घेतला. स्थायी सभापती आदिल फरास यांनी कंपनीकडून लवकर बसेस ताफ्यात दाखल होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना केली.

केएमटीचे आर्थिक नुकसान

याबाबत परिवहन सभापती अजित पोवार म्हणाले, 'अशोक लेलँड कंपनी आणि परिवहन विभागातील करारानुसार मुदतीत बसेस दाखल होणे आवश्यक होते. मात्र करारानुसार कंपनीने बसेस उपलब्ध केल्या नाहीत. परिवहन समिती सदस्यांच्या बैठकीत यासंबंधी चर्चा झाली आहे. कंपनीला कारणे दाखवा नोटीस काढली जाणार आहे. कंपनीकडून उशीरा बसेस दाखल होणार असल्याने केएमटीचे आर्थिक नुकसान होत आहे. कराराचे उल्लघंन केल्याच्या कारणास्तव कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोनोग्राफी ​मशिनची खरेदी ऑनलाइन?

$
0
0

सतीश घाटगे, कोल्हापूर

महागड्या मोटारीत चिनी बनावटीच्या सोनोग्राफी मशिनव्दारे गर्भलिंग चाचणी करणाऱ्या गुन्ह्यातील सोनोग्राफी मशिन ऑनलाईन खरेदी केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी दोन मशिन ताब्यात घेतली असून गर्भलिंग प्रतिबंधक समितीने दोन्ही मशिन सील केली आहेत.

जुना राजवाडा पोलिसांनी डॉ. हिंदूराव पोवार, डॉ. हर्षल नाईक यांना सोनोग्राफी मशिनसह ताब्यात घेतले होते. ताब्यात घेतलेले मशिन गर्भलिंग प्रतिबंधक समितीच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोवार याच्याकडे असलेले मशिन लिओ कंपनीचे आहे. पोवार याने सोनोग्राफी मशिन कासेगावच्या डॉ. विक्रम आडके याच्याकडून विकत घेतले आहे. पण सोनाग्राफी मशिन कुठून खरेदी केले हे सांगण्यास डॉ. आडके टाळाटाळ करत आहे.

हिंदूराव पोवार व डॉ. विक्रम आडके या दोघांनी ऑनलाइन मशिन खरेदी केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्त्रीरोतज्ज्ञाला सोनोग्राफी मशिन खरेदी करण्यापूर्वी शहरी भागात महानगरपालिका आरोग्याधिकारी तर ग्रामीण भागात जिल्हा शल्यचिकीत्सकाकडे अर्ज करावा लागतो. हा अर्ज गर्भलिंग प्रतिबंधक समितीच्या बैठकीत सादर केला जातो. संबधित स्त्रीरोगतज्ज्ञ सक्षम असल्यावरच मशिन खरेदीस परवानगी दिली जाते. खरेदीपूर्वी समितीचे सदस्य प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये जाऊन ज्या ठिकाणी मशिन ठेवले जाणार आहे, त्या खोलीची तपासणी करतात. समितीने सोनाग्राफी मशिनसाठी परवानगी दिल्यानंतर अधिकृत कंपनीकडे कोटेशन पाठवले जाते. अर्जात ज्या कंपनीचा उल्लेख केला आहे त्याच कंपनीचे मशिन खरेदी करावे लागते. सोनोग्राफी मशिन आल्यावर पुन्हा समिती हॉस्पिटलची तपासणी करते. मशिनला रजिस्टर नंबर दिला जातो. महानगरपालिकेकडून मशिनला पासवर्ड दिल्यानंतर काम सुरू होते. २४ तासात किती सोनोग्राफी केली याची माहिती एफ फॉर्ममध्ये नियमित भराव्या लागतात. तसेच प्रत्येक महिन्याला माहितीची कागदपत्रे जमा करावी लागतात.

'संशयितांकडील दोन्ही मशिन सील केली असून ती गर्भलिंग प्रतिबंधक समितीकडे दिली आहेत. मशिन ऑनलाइन खरेदी केली की एजंटाकडून खरेदी केली याचा तपास केला जात आहे.

- अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खेळाडूंच्या आरक्षणाचा ‘खेळ’

$
0
0

मारुती पाटील, कोल्हापूर

राज्यातील अनेक जिल्ह्यांत महसूल विभागातील तलाठी व लिपिक पदाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. नियमित व सामाजिक आरक्षणाप्रमाणे खेळाडूंना पाच टक्के आरक्षणाची तरतूद असताना अनेक ठिकाणी त्यात असमानता दिसत आहे. रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांत आरक्षणच ठेवलेले नाही, तर पुणे जिल्ह्याने आरक्षणातील पाच जागांपैकी केवळ एक जागा देऊन आरक्षणाला कात्री लावली आहे. सांगली व बीड जिल्ह्याने तंतोत अद्यादेशाचे पालन केले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांना एकच नियम असताना महसूल खात्यांतर्गत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत खेळाडूंच्या आरक्षणाचा खेळ खंडोबा केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग, राष्ट्रीय व राज्यपातळीवरील स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. २००५ च्या अद्यादेशानंतर अनेक ठिकाणी खेळाडूंनी या संधीचा फायदा घेत महत्त्वाची पदे पटकावली. राज्य लोकसेवा आयोग, पोलिस भरती, महसूल, आदी विभागांमध्ये नोकरी मिळवून करिअर केल्याने त्यांना 'आयडल' मानून युवक खेळाकडे आकर्षित झाले होते. मात्र, एप्रिल ते २५ जूनपर्यंत प्रसिद्ध झालेल्या विविध सरकारी जाहिरातींमध्ये खेळाडूंच्या आरक्षणावर गदा आणली आहे. यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या खेळाडूंचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, एनटी या नियमित आरक्षणाबरोबर सामाजिक आरक्षणामध्ये महिला, अपंग, प्रकल्प व भूकंपग्रस्त माजी सैनिक यांचा समावेश असतो. सर्व आरक्षण मिळून पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण झाल्यास खुल्या गटातील उमेदवारांना फटका बसतो. यामुळे सातारा, रत्नागिरी येथे आरक्षणच ठेवलेले नाही, तर पुणे जिल्ह्याने आरक्षणातील पाच जागांपैकी केवळ एकच जागा राखीव ठेवली आहे. मात्र, सांगली व बीड जिल्ह्याने खेळाडूंसाठी आरक्षण व्यवस्थित ठेवले आहे. प्रत्येक जिल्ह्याने खेळाडूंच्या आरक्षणाबाबत वेगवेगळे निकष लावल्याने खेळाडू हतबल झाले आहेत.

'नियमित आरक्षण आणि सामाजिक आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त देण्यास निर्बंध आहेत. खेळाडूंच्या आरक्षणामुळे यापेक्षा जास्त आरक्षण होत असल्यास खुल्या गटावर अन्याय होत असल्याने काही ठिकाणी आरक्षणाची तरतूद केली नसेल.'

- एस. चोक्कलिंगम् , विभागीय आयुक्त

'प्रत्येक खेळाडूला थेट नोकर भरतीची संधी मिळेल अशी शक्यता नसते. यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदक विजेत्यांना आरक्षणाचा फायदा होता. सरकारी जाहिरातींची अनेक खेळाडू प्रतीक्षा करत असतात. मात्र आरक्षणच ठेवले नसेल तर खेळाडूंचे कष्ट वाया जाणार आहेत.'

- स्नेहांकिता वरुटे, वेटलिफ्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लष्कर भरती झाली ऑनलाइन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लष्करातील भरती पद्धतीत महत्त्वाचा बदल करण्यात आला असून, आता ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. १ जुलैपासून ही प्रक्रिया बदलण्यात येत असून, भरतीसाठी इच्छुकांना नोंदणी करणे आवश्यक आहे. जेव्हा भरती असेल तेव्हा स्वतंत्र अर्जही करावा लागणार आहे. कोणत्याही ठिकाणाहून हे रजिस्ट्रेशन करता येणार असल्याची माहिती भरती संचालक कर्नल राहुल वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कर्नल वर्मा म्हणाले, 'भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर तरुण येतात. त्यातील अनेक जण पात्र नसतात. त्यांच्या गर्दीमुळे प्रक्रिया लांबते. हे टाळण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्याबरोबरच ज्यावेळी भरती असेल त्यावेळी त्यांना स्वतंत्र अर्ज करून भरतीसाठी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागणार आहे. जे पात्र असतील त्यांचेच अर्ज प्रक्रियेत स्वीकारले जाणार आहेत.'

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे सहा जिल्हे तसेच गोवा राज्य असा संपूर्ण परिसर कोल्हापूर रिक्रुटिंग बोर्डाच्या अंतर्गत आहे. भरतीसाठी एकदा नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या लॉगिन आणि पासवर्डच्या आधारे केवळ भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकच उमेदवार दोन वेगवेगळ्या जागांसाठी अर्ज करू शकतो.

त्यासाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे यापुढे खुली भरती होणार नाही. केवळ नोंदणी आणि अर्ज केलेल्या युवकांनाच भरतीसाठी बोलविले जाणार आहे. संबंधितांना प्रवेशपत्र मिळणार आहे. भरतीदरम्यान ते कोणत्याही ठिकाणावरून मिळविता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार टाळले जातील अशा पद्धतीने ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. त्यातून अधिकाधिक सुटसुटीतपणा आणि पारदर्शीपणा येणार आहे.

अशी करा ऑनलाइन नोंदणी

पहिल्यांदा स्वतःचा इमेल आयडी काढावा. त्यानंतर नेट कॅफे किंवा सेतू केंद्रामधून किंवा वैयक्तिक संगणकावरून www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर जावे. या इमेल आयडी आणि पासवर्डचा वापर करून नोंदणी करावी. जेव्हा भरतीची जाहिरात येईल त्याआधी दोन महिने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. पंधरा दिवस अगोदर अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद होईल. आलेल्या अर्जामधून पात्र अर्जांची छाननी केली जाईल. पात्र उमेदवारांना प्रवेश पत्र देऊन बोलविले जाईल. कागदपत्रांची तपासणी करून पुढील प्रक्रियेसाठी पाठविले जाईल. भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीएडचे १३०० विद्यार्थी नापास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन गुणपद्धतीचा फटका बसल्याचा आरोप बीएडच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे केला आहे. शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या बीएडच्या परीक्षेत ३४०९ पैकी १३०० विद्यार्थी नापास झाले. नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेतली.

विद्यालय आणि महाविद्यालयाने बदललेल्या अभ्यासक्रमानुसार नवीन गुण पद्धतीची माहिती दिलेली नाही. काही विद्यार्थ्यांना चार विषयांत बोनस गुण दिलेले आहेत. त्यामुळे काही नापास विद्यार्थी पास आणि काही विद्यार्थ्यांना बोनस गुण न मिळाल्याने नापास झाले आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने एप्रिल-२०१५ मध्ये शिक्षणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली. यापूर्वी १०० पैकी ५० गुण आणि ६०० पैकी ३०० गुण पास होण्यासाठी आवश्यक असतात.

मात्र, यावर्षी अभ्यासक्रमाचे स्वरुप बदलले. त्यानुसार लेखी ८० पैकी आणि ४० आणि अंतर्गंत २० पैकी १० गुण मिळवावे लागतात. मात्र जाहीर झालेल्या परीक्षेच्या निकालात बीएडचे १३०० विद्यार्थी नापास झाले. महाविद्यालयांनी बदललेल्या गुण रचनेची माहिती दिली नसल्याने नापासाची टक्केवारी वाढली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. काही विद्यार्थ्यांना एका विषयासाठी आठ बोनस गुण दिले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना चार विषयांना बोनस गुण दिले आहेत. निकालातील बेरजांतही चुका झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. या वर्षापासून बीएडचा अभ्यासक्रम दोन वर्षांचा झाला. त्यामुळे नापास झालेल्यांचेे भवितव्य अडचणीत येणार असल्याची भीतीही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदी वैशाली डकरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शह काटशहाच्या राजकारणात पाच महिन्यांपासून अडकलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या नगरसेविका वैशाली राजेंद्र डकरे यांची निवड निश्चित झाली आहे. महापौरपदासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डकरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यामुळे शनिवारी होणाऱ्या महापौर निवडीची केवळ औपचारिकता उरली आहे. डकरे बेचाळिसाव्या महापौर ठरणार आहेत.

महापौर निवडीवरून काँग्रेसअंतर्गत नाराजीनाट्याचे दर्शनही घडले. डकरे यांच्या नावाची घोषणा होताच इच्छुक उमेदवार, नगरसेविका मीना सूर्यवंशी व त्यांचे पती माजी नगरसेवक नंदकुमार सूर्यवंशी रागारागाने काँग्रेसच्या कार्यालयातून बाहेर पडले. महापौरपदासाठी डकरे, सूर्यवंशी आणि दीपाली ढोणुक्षे इच्छुक होत्या. माजी मंत्री सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या उपस्थितीत नगरसेवकांची मते आजमावण्यात आली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास चव्हाण यांनी महापौरपदासाठी डकरे यांच्या नावाची घोषणा केली. दोन्ही काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षाच्या नगरसेवकांसह डकरे यांनी नगरसचिव उमेश रणदिवे यांच्याकडे दोन अर्ज दाखल केले.

'जनसुराज्य'ची हवा आणि माघार

माजी मंत्री सतेज पाटील गटाच्या महापौराला विरोध राहील अशी भूमिका जनसुराज्य शक्ती आघाडीचे गटनेते प्रा. जयंत पाटील यांनी मांडली होती. यामुळे या आघाडीकडे सर्वांचे लक्ष होते. पक्षाचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते मुरलीधर जाधव यांनी मंगळवारी दुपारी दोन उमेदवारी अर्ज नेले. आघाडीकडून यशोदा मोहिते किंवा मृदुला पुरेकर यांना उमदेवारी देण्याच्या हालचाली होत्या. काँग्रेसकडून महापौरपदासाठी डकरे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राष्ट्रवादीचे राजू लाटकर यांनी प्रा. पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी दाखल न करण्याची विनंती केली. त्यानंतर जनसुराज्य आघाडी उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे क्रॉसिंगवर अडकला टँकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड-मसूर मार्गावरील उत्तर कोपर्डे गावाजवळील दत्तनगर येथे असलेल्या रेल्वे क्रॉसिंग गेटवरील लोखंडी संरक्षक कठड्याला धडकून मळीची वाहतूक करणारा टँकर रेल्वे रूळावर अडकला. यामुळे रेल्वेसह मसूर-कराड रस्त्यावरील वाहतूक काही काळ थंडावली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

दरम्यान, जेसीबी मशिनच्या सहाय्याने टँकर बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली. सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातून मळी घेवून कराडकडे निघालेला टँकर हा दत्तनगर येथील रेल्वे क्रॉसिंग गेट पास करत असताना गेटवर विरूद्ध बाजूकडून कराड-कोरेगाव एसटी बस आल्यामुळे अरूंद जागेमुळे टँकर पुढे काढताना, चालकाचा ताबा सुटून तो लोखंडी संरक्षक खांबांना धडकून विरूद्ध बाजूच्या झाडावर आदळून पुन्हा रेल्वे रूळावर अडकून बसला. या घटनेमुळे सदर मार्गावरून होणारी रेल्वे व रस्ता वाहतूक पूर्णत: कोलमडली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. तर पुणे-मिरज मार्गावरील रेल्वे वाहतूकही बंद करावी लागली.

दरम्यान, या रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून या मार्गावरून कोल्हापूरकडे जाणारी कोयना एक्स्प्रेस ही रेल्वे शिरवडे स्टेशनवर तर गोंदीयाकडे जाणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस कराड रेल्वे स्टेशन आणि लोकमान्य टिळक एक्स्प्रेस मसूर रेल्वे स्थानकावर सुमारे एक तास थांबवण्यात आल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रा. वीरसेन पाटील यांची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

ख्यातनाम कबड्डीपटू आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा प्रशिक्षक प्राध्यापक वीरसेन शिवाजीराव माने-पाटील (वय ५१ सध्या रा. इस्लामपूर मूळगाव शिरोळ, जि. कोल्हापूर) यांनी विटा (जि. सांगली) येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. रात्री उशिरा त्यांच्यावर शिरोळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. कोल्हापूर माजी जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी सिनेट सदस्य अमर पाटील यांचे बंधू होते.

वीरसेन माने-पाटील इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात क्रीडा विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहात होते. मेहुण्याच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त ते मंगळवारी सायंकाळी पत्नी व मुलांसह विट्यात आले होते. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास वीरसेन पाटील यांनी नाष्टा केला आणि विश्रांतीसाठी जातो, असे सांगून पहिल्या मजल्यावर गेले. त्यांनी दरवाजे आतून बंद करून घेतले होते. त्यावेळी घरात वाढदिवसाची

तयारी सुरू होती. साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरातील मुलांनी वीरसेन खोलीचा दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. काहीच प्रतिसाद न आल्याने खिडकीतून आत पाहिले असता छताच्या लोखंडी अँगलला विरसेन यांनी दोरीने गळफास लावून घेतल्याचे दिसले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. वीरसेन हे उत्कृष्ट कबड्डीपटू होते. देशभरात त्यांच्या खेळाचा दबदबा होता. निष्णात कबड्डी प्रशिक्षक म्हणून ते परिचीत होते. अनेक आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू त्यांनी तयार केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माजी नगरसेवकांसह आठ जणांना कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

गल्लीत का आलास, असे विचारत दोन तरुणांना माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी याच्यासह आठ जणांनी बेदम मारहाण केली. यामध्ये हर्षद राजेमोहमंद बागवान (वय २३) राहणार सातारा व असिफ बागवाड (वय २१) राहणार जयसिंगपूर हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी प्रमोद सूर्यवंशी याच्यासह ८ जणांना पोलिसांनी अटक केली असून, या सर्वांना ३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, जखमी असणाऱ्या दोन तरुणांच्या विरोधात महिला व तरुणींची छेड काढून विनयभंग केल्याची तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

या बाबत बागवान याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सातारा येथील हर्षद बागवान हा आपला जयसिंगपूर येथील नातेवाईक असिफ बागवान याच्यासह गवळीगल्ली परिसरात आला होता. त्यावेळी प्रमोद सूर्यवंशी व त्याच्या काही साथीदारांनी गल्लीत का आला आहेस, असे विचारत बेदम मारहाण केली. यामध्ये हर्षद व असिफ हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी फिर्याद दाखल होताच सांगली शहर पोलिसांनी माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी (वय ३५), किशोर बापू बनकर (वय ३०), अमोल प्रकाश वास्कर (वय २८), विकास सोनवणे (वय २९), प्रतीक मालवणकर (वय २९), धनंजय दत्तात्रय गवळी (वय २३), ऋषिकेश जयवंत कार्तिक (वय २१) सर्वजण राहणार गवळी गल्ली व कर्नाळ रोड परिसर सांगली. विजय बाळीराम साळुंखे (रा. सातारा) या आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

याच प्रकरणावरून प्रमोद सूर्यवंशी यांची पत्नी स्वाती सूर्यवंशी यांनी हर्षद बागवान व अन्य एक अनोळखी या दोघांनी आपल्या नातेवाईक महिलेच्या आडवी गाडी मारून हात धरत त्यांचा विनयभंग केला असल्याची फिर्याद सांगली शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. पोलिसात फिर्याद देताना देण्यात आलेली कारणे व प्रत्यक्षातील कारणे वेगळी असल्याची चर्चा आहे. हर्षद बागवान व सूर्यवंशी याचे नातेवाईक यांच्यात आधीपासूनच वाद असल्याचीही चर्चा आहे. यामधूनच ही मारहाण झाली असावी, अशीही चर्चा आहे.

प्रमोद सूर्यवंशीवर अनेक गंभीर गुन्हे

माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी यांच्यावर गेल्या काही दिवसांत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात झालेला रेशन गहू घोटाळ्याचा सूत्रधारही प्रमोद सूर्यवंशी हाच होता. या शिवाय इतरही अनेक गुन्हे सूर्यवंशी याच्यावर दाखल आहेत. प्रमोद सूर्यवंशी याच्यावर गेल्या काही वर्षांत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्यामुळेच सूर्यवंशी याचे गुन्हे करण्याचे प्रमाण वाढल्याची चर्चा आहे. मात्र, संबधित नेत्यानेही त्याच्या या कारनाम्यांमुळे त्याला चार हात लांबच ठेवले आहे, अशी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात आढळली नागाची १९ पिले

$
0
0

मिरजः मिरजेजवळील ढवळी येथील हणमंता तम्माण्णा कोणूर यांच्या घरातील जमिनीखाली बिळात १९ पिलांसह नागीन आढळून आली. मिरजेतील सर्पमित्र गणपती माळी व कुमार कोळी यांनी नागिनीला पिलांसह दंडोबा येथील वनक्षेत्रात नेऊन सोडले. मोठ्या संख्येने पिलांसह नागीन सापडल्याने पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. विषारी नागिन व पिले आढळल्याने कोणूर कुटुंबीयांसह परिसरात भितीचे वातावरण होते.

घरात उंदराने पाडलेल्या बिळातून साप घरात आल्याचे पाहून कोणूर यांनी सर्पमित्र माळी यांना संपर्क केला. सर्पमित्रांनी तातडीने तेथू धाव धेऊन साप असलेले बिळ खोदले असता बिळात नागीन व तीची पिले असल्याचे आढून आले. सर्पमित्रांनी नागिन व पिलांना ताब्यात घेतले. पिलांसह पकडली गेल्याने नागीन संतप्त झाली होती. बिळ पूर्ण खोदल्यानंतर तेथे फुटलेल्या अवस्थेतील १९ अंडी आढळून आली. यावरून तेथे आणखी नागाची सहा पिले असल्याचा अंदाज सर्पमित्रांनी व्यक्त केला. त्यानुसार आणखी सहा पिली आढळून आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेटाच्या मार्गात सुविधा द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

बड्याचीवाडी (ता.गडहिंग्लज) हद्दीतील मेटाचा मार्ग परिसरातील नागरिकांच्या समस्येसंदर्भातील बेघर वसाहत (मेटाचा मार्ग) कृती समितीतर्फे खासदार धनंजय महाडिक यांची कोल्हापूर येथे व आमदार हसन मुश्रीफ यांची कागल येथे भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे, बड्याचीवाडी हद्दीतील मेटाचा मार्ग येहे १२५ घरे आहेत. मात्र या परिसरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध नाहीत. मेटाचा मार्ग येथील रस्त्याच्या दुतर्फी गटारे, पिण्याचे पाणी, शौचालये व रस्ता सुस्थितीत नाहीत. त्यामुळे सदर वसाहतीत कुटुंबाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत बड्याचीवाडी यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही कुठल्याच सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. या विषयाला अनुसरून २ जून रोजी संबधित सर्व पदाधिकाऱ्यांना नागरी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले आहे. बेघर वसाहत (मेटाचा मार्ग) येथील घरकुले नियमीत करून सिटी सर्व्हे ( प्रॉपर्टी कार्ड) व ७/१२ पत्रकी नोंद व्हावी अशी मागणी केली होती. खासदार महाडिक गटर्स व शौचालयासाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.त होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राडा रोखणार कसा?

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

गेल्या काही वर्षांत आंबोली परिसरातील पावसाळी पर्यटनासाठी राज्यातील पर्यटकांसह परराज्यातील पर्यटकांचा ओढाही वाढत आहे. मात्र या पर्यटनाच्या निमित्ताने बेधुंद युवा पर्यटकांचा उद्दामपणा त्रासदायक ठरू लागला आहे. अगदी किरकोळ कारणांवरूनही पर्यटकांच्या काही गटांची एकमेकांना मारहाण करीत राडा संस्कृती रुजत आहे. याशिवाय आजरा-आंबोली मार्गावरून दुचाकी आणि चारचाकी वाहने ऊभी करून ओरडणे, किंकाळणे, टेपरेकॉर्डवर गाणी लावून मद्यधुद आणि अर्धनग्नावस्थेत धिंगाणा सुरू असतो.

पावसाळा सुरू झाला की आजरा भागात पर्यटकांची गर्दी वाढते. रामतीर्थ धबधबा आणि आंबोलीचा धबधब्याकडे पर्यटकांचा ओढा असतो. कोसळणारा पाऊस, ढगांचे पुंजके आणि पावसात न्हालेला ओलाचिंब निसर्ग पाहण्याची मजा काही औरच असते. मात्र, पर्यटनासाठी येणारे तरूणांचे टोळके मात्र अस्सल पर्यटकांचा मात्र हिरमोड करतात. दारू पिऊन दंगामस्ती करणे म्हणजेच पर्यटन असा काहींसा समज या पर्यटकांचा होत आहे. त्याच्या जोडीला पोलिसांचा अकार्यक्षमपणा त्याला खतपाणी घालत आहे. केव्हातरी एखादी कारवाई करायची आणि दाखवून द्यायचे असा प्रकार पोलिस करतात. ठिकाठिकाणी तपासणी नाके आणि पर्यटनस्थळांकडे जाताना पूर्ण दारूबंदी केली तरच या प्रकारांना आळा बसणार आहे.

हुल्लडबाजी करणारे पर्यटक शेतातून काम करणाऱ्या विशेषत: महिला वर्गाला उद्देशून अर्वाच्य भाषा वापरतात. असे हिडीस प्रकार वाढू लागले आहेत. पावसाळा आणि आंबोली पर्यटनाचे समीकरण गेल्या काही वर्षात कोल्हापूर, सांगली, सातारासह कर्नाटक परिसरात रूजले आहे. कधी रिमझिम बरसणारा तर कधी टपोरा पाऊस अंगांगावर झेलण्याची अनूभूती घेण्यासाठी विशेषत: युवा वर्ग आघाडीवर असतो. शनिवारी आणि रविवारशिवाय सुटीच्या दिवशी शेकडो पर्यटकांचे पाय इकडेच वळतात. आजऱ्यानजीकच्या रामतीर्थ धबधब्याचे दर्शन घेतल्यानंतर या पर्यटकांत विशेष चेव चढतो. आजरा शहराच्या बाजारपेठेमधूनच या पर्यटकांच्या मर्कटलीलांना सुरुवात होते. आंबोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच कशीही वाहने लावून आवश्यक खरेदी करण्यात येते. यामुळे येथील वाहतूकीचा बोजवारा तर उडतोच, याशिवाय अन्य वाहनधारकांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही घडत राहतात. याचा शहरासह कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी आलेल्या ग्रामस्थांना अकारण त्रास सहन करावा लागतो.

आंबोलीकडे रवाना होताना रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडाखाली वाहने थांबवून मद्यप्राशन करताना अनेकजण आढळतात. अशांना रोखणे म्हणजे एक तर मार खाण्यास आमत्रण देण्यापैकी असते. अनेकदा शेतकडून येणाऱ्या शेतक ऱ्यांच्या डोक्यावर असलेल्या वस्तू धक्का देवून पाडणे, पोती, इरले किंवा घोंगडे पळवणे असे प्रकार होतात. तर महिला किंवा तरूणी शेताकडून येत असतील तर शेरेबाजी करणे किंवा विनंयभंग करण्याचेही प्रकार घडले आहेत.

तपासणी नाक्यांवर पोलिसांचे दुर्लक्ष

आजरा पोलिस स्टेशनचे उत्तूर येथे औटपोस्ट आहे. कोल्हापूरवरून येणारे पर्यटक उत्तूरमार्गे येतात. तसेच काही पर्यटक गड‌‌हिंग्लज येथून येतात. त्यामुळे या दोन्ही मार्गांवर तपासणी नाके उभा करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नाही. या पर्यटकांना कोठेच न रोखल्याने ते बेभान होतात आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडी दरवाजा खुला कराच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

बसस्थानकातून दक्षिणेकडे जाणाऱ्या दिंडी दरवाजाचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी राज्य परिवहन मंडळाकडे केली आहे. परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासासंदर्भात 'महाराष्ट्र टाइम्समधून प्रसिद्ध झाल्यानंतर यासंदर्भात समाजातील विविध स्तरातून हीच मागणी पुढे येत आहे.

बसस्थानकाच्या दक्षिणेकडील भाग हा डॉक्टर्स कॉलनी म्हणून परिचित आहे. या विभागात शहरातील बहुतांश दवाखाने कार्यरत आहेत. तसेच साई मंदिर बाग, जागृती हायस्कूल, डॉ. घाळी महाविद्यालय, मुलींचे हायस्कूल, छोटे-मोठे हॉटेल्स, शासकीय कार्यालयंसह सुमारे सात उपनगरे आहेत. डॉक्टर्स कॉलनीकडे जाणाऱ्या रूग्णासह, महाविद्यालयीन व शाळकरी मुले, महिला, नोकरवर्ग या सर्वाना बस्थानाकातील संरक्षण भिंतीमध्ये असलेल्या दिंडी दरवाजाचा आधार घ्यावा लागतो. मात्र या दिंडी दरवाजा केवळ दीड फूट असल्यामुळे एकावेळेला एकच व्यक्ती कसाबसा येथून जावू शकतो. त्यामुळे येथे नेहमी गर्दी पाह्यला मिळते. एकाद्या रूग्णाला येथून नेणे अशक्य असल्याकारणाने बऱ्याचदा तातडीच्या प्रसंगी त्याला खांद्यावरून न्यावे लागते.

या परिसरात शाळा-महाविद्यालयाची संख्या अधिक असल्याकारणाने विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. मात्र काही विशिष्ट वेळा येथे भरपूर गर्दी अनुभवायला मिळते. परिणामी बऱ्याचदा मुलींचे छेडाछेडी आणि त्यातून मारामारी सारखे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे येथील नागरिकांनी या दरवाजाची रुंदीकारण व्हावे अशी मागणी केली आहे. जेणेकरून येथे गर्दी होणार नाही आणि नागरिकांना प्रवास करणे सोपे होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images